|
|
दशोपनिषदे मुक्तिकोपनिषदात रामाने उपदेश केलेल्या १०८ उपनिषदांत, ज्यांना वेदान्त उपदेश किंवा निर्गुण परब्रह्म परमेश्वराचा निर्देश / वर्णन कथन करणारी उपनिषदे म्हणतात ती मुख्यतः वर दाखविलेली १० उपनिषदे आहेत. मुक्तिकोपनिषदात भगवान श्रीराम हनुमंताला म्हणतात - सायुज्य, सारूप्य, सालोक्य तथा कैवल्य मुक्तिपैकी कैवल्य मुक्ति कोणत्या उपायाने प्राप्त होते ऐक - माण्डूक्यमेकमेवालं मुमुक्षूणाम् विमुक्तये ॥ २६ ॥ मुमुक्षूंना फक्त माण्डूक्यौपनिषद मुक्त करण्यास पुरेसे आहे. एव्हढ्याने उपरती न झाल्यास मात्र दहा उपनिषदांचे अध्ययन करणें आवश्यक आहे. ह्या दशौपनिषदांच्या अभ्यासाने माझे तेजोमयी अद्वैतधाम प्राप्त होऊं शकेल. या दशोपनिषदांवर आचार्य शंकराचार्य व काही विद्वानांची भाष्ये आहेत, म्हणून या उपनिषदांना सर्व उपनिषदांमध्ये एव वेगळे मानाचे स्थान आहे. |