रामदास स्वामींचे दासबोध

दशक १ दशक ११
दशक २ दशक १२
दशक ३ दशक १३
दशक ४ दशक १४
दशक ५ दशक १५
दशक ६ दशक १६
दशक ७ दशक १७
दशक ८ दशक १८
दशक ९ दशक १९
दशक १० दशक २०

मनोबोध (मनाचे श्लोक)      आत्माराम      बारा ओव्या शते

विविधांगी धर्मकार्य करीत असताना वेळोवेळी समर्थ रामदास स्वामींकडून विपुल लेखन होत गेले. त्यांच्या या अफाट ग्रंथरचनेमध्ये दासबोध, मनाचे श्लोक, रामायण, आत्माराम, करुणाष्टके, जुना दासबोध (एकवीस समासी), स्फुट प्रकरणे, स्फुट श्लोक, अष्टाक्षरी पाच लघुकाव्ये, चौदा ओवीशते, स्फुट ओव्या, अवांतर व प्रासंगिक प्रकरणे, विविध आरत्या, सवाया, अभंग, पदे, ललिते, मानसपूजा इत्यादींचा समावेश होतो. या सर्व वाङ्‍मयात दासबोध हा समर्थांचा प्रमुख ग्रंथ मानला जातो. त्याचे महत्त्व तसे आहेही. श्री समर्थांनी हा ग्रंथ स्वमुखे सांगितला आणि त्यांचे शिष्योत्तम श्री कल्याणस्वामी यांनी तो लिहून घेतला असे म्हटले जाते. अर्थात हा एकटकी सलगपणे लिहून पूर्ण झालेला ग्रंथ नाही. वेळ मिळेल त्याप्रमाणे त्याचे लेखन व अनेकवार संपादन झाले आहे. अनेक वर्षांच्या परिश्रमाने उपलब्ध रूपात पूर्णत्व पावलेल्या या ग्रंथात एकूण वीस दशक असून, प्रत्येक दशकात दहा समास म्हणजे एकूण सर्व मिळून दोनशे समासांचा हा ग्रंथराज आहे.