केनोपनिषत्

ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक् प्राणः चक्षुः श्रोत्रं अथ बलं इन्द्रियाणि च सर्वाणि ।
सर्वं ब्रह्मौपनिषदं | माऽहं ब्रह्म निराकुर्यां मा मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणं अस्तु
अनिराकरणं मेऽस्तु । तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
माझें शरीर, वाणी, प्राण, चक्षू, श्रोत्र, बल, (इतर) सर्व इंद्रिये वृद्धि पावोत.
हें सर्व (विश्व) उपनिषदांत वर्णिले ब्रह्म आहे. ब्रह्माचा तिरस्कार माझ्याकडून न होवो,
ब्रह्म माझा तिरस्कार न करो. तिरस्कार न होवो, तिरस्कार न होवो.
ब्रह्मात्मस्वरूपी रत झालेला जो मी त्या माझें ठायीं उपनिषद्‌गत धर्म राहोत.


प्रथमः खण्डः


ॐ केनेषितं पतति प्रेषितं मनः
     केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः ।
केनेषितां वाचं इमां वदन्ति
     चक्षुः श्रोत्रं क उ देवो युनक्ति ॥ १ ॥
आपल्या विषयाप्रत जाण्याला प्रेरणा केलेले मन आपल्या विषयाप्रत कोणाच्या प्रेरनेने गमन करते ? इंद्रियांमध्यें श्रेष्ठ जो प्राण तो कोणाच्या प्रेरणेनं आपल्या विषयाप्रत गमन करतो ? कोणी प्रेरणा केलेली ही वाणी लोक बोलतात ? कोणचा बरें देव, चक्षु आणि श्रोत्र यांना प्रेरणा करतो ? १.

श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यत्
     वाचो ह वाचं स उ प्राणस्य प्राणः ।
चक्षुषश्चक्षुरतिमुच्य धीराः
     प्रेत्यास्माल्लोकात् अमृता भवन्ति ॥ २ ॥
श्रोत्राचें जो श्रोत्र आहे, मनाचें जो मन आहे, वाचेची जो वाचा आहे, प्राणाचा जो प्राण आहे, चक्षूचा जो चक्षु आहे, तो यांना प्रेरणा करतो. इंद्रियांचा इंद्रियभाव जे बुद्धिमान जन टाकून देतात ते पुत्रमित्रकलत्ररूपी या लोकीं मेल्यावर अमृतत्व म्ह० मोक्ष पावतात. २


न तत्र चक्षुर्गच्छति न वाक् गच्छति नो मनः ।
न विद्मो न विजानीमो यथ एतत् अनुशिष्यात् ।
अन्यदेव तत् विदितात् अथो अविदितादधि ।
इति शुश्रुम पूर्वेषां ये नस्तद्व्याचचक्षिरे ॥ ३ ॥
इंद्रियांचे इंद्रियरूप जे ब्रह्म त्याप्रत चक्षु जाऊं शकत नाहीं, वाचा जाऊं शकत नाहीं, मन जाऊं शकत नाहीं. म्हणून आम्हाला तें ब्रह्म जाणतां येत नाही; शिष्याला तें समजावून देता येईल अशा रीतीनें तें आम्हांला समजले नाहीं. जें जें म्हणून ज्ञात व जें जें अज्ञात, त्या सर्वांहून निराळें हें ब्रह्म आहे. ज्या प्राचीन आचार्यांनी आम्हांला हें समजावून दिले त्याजकडून आम्हीं असेंच ऐकले ३.

यद्वाचाऽनभ्युदितं येन वाक् अभ्युद्यते ।
तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यत् इदं उपासते ॥ ४ ॥
जें वाणीने बोलतां येत नाही पण ज्यानें वाणी बोलली जाते, तेंच ब्रह्म असें तूं जाण; ज्या उपाधिभेदविशिष्ट अनात्म्याची ब्रह्म समजून उपासना करतात तो ब्रह्म नव्हे. ४.

यन्मनसा न मनुते येन आहुः मनो मतम् ।
तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यत् इदं उपासते ॥ ५ ॥
जें कधी मनाने मनन करीत नाहीं, ज्यानें मनाचे मनन करतां येतें असे ब्रह्मवेत्ते सांगतात, तेंच ब्रह्म असें तूं जाण; ज्या उपाधिभेदविशिष्ट अनात्म्याची ब्रह्म समजून उपासना करतात तो ब्रह्म नव्हे.५.

यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षूंषि पश्यति ।
तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यत् इदं उपासते ॥ ६ ॥
जें चक्षूनें पहाता येत नाही, ज्याने चक्षु दिसतात, तेंच ब्रह्म असें तूं जाण; ज्या उपाधिभेदविशिष्ट अनात्म्याची ब्रह्म समजून उपासना करतात तो ब्रह्म नव्हे. ६.

यच्छ्रोत्रेण न श्रृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतम् ।
तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यत् इदं उपासते ॥ ७ ॥
जें कधी श्रोत्रानें श्रवण केले जात नाहीं, पण ज्यानें श्रोत्राचें श्रवण करतां येतें, तेंच ब्रह्म असें तूं जाण. ज्या उपाधिभेदविशिष्ट अनात्माची ब्रह्म समजून उपासना करतात तो ब्रह्म नव्हे. ७.

यत्प्राणेन न प्राणिति येन प्राणः प्रणीयते ।
तदेव ब्रह्म त्वं विद्धि न इदं यत् इदं उपासते ॥ ८ ॥
॥ इति केनोपनिषदि प्रथमः खण्डः ॥
ज्याचा प्राणाने श्वास घेता येत नाही, पण जें प्राणाचा श्वास घेते, तेंच ब्रह्म असें तूं जाण; ज्या उपाधिभेदविशिष्ट अनात्म्याची ब्रह्म समजून उपासना करतात तो ब्रह्म नव्हे. ८. - प्रथमः खण्डः

द्वितीयः खण्डः


यदि मन्यसे सुवेद इति दभ्रं एवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम् ।
यत् अस्य त्वं यत् अस्य देवेषु अथ नु
मीमांस्यं एव ते मन्ये विदितम् ॥ १ ॥
'मला या ब्रह्माचे स्वरूप उत्तम प्रकारे समजले' असें जर तुला वाटलें तर खरोखर या ब्रह्माचे जें स्वरूप तें तुला अल्प समजले आहे. 'मला या ब्रह्माचे अधिदैवत स्वरूप समजले' असें जर तुला वाटेल तर तें देखील तुला अल्पच समजले. मला वाटतें, पुन्हा तूं ब्रह्माचे ज्ञान करून घे. शिष्याने पुन्हा विचार करून सांगितलें. 'समजलें.' १.

नाहं मन्ये सुवेद् इति नो न वेदेति वेद च ।
यो नस्तत् वेद तत् वेद नो न वेदेति वेद च ॥ २॥
मला ब्रह्म नीटपण समजले नाही ही गोष्ट मला समजली. ब्रह्म समजले नाहीं असें नाही, समजले असेही नाही. आमच्यापैकी ज्याला हें माझें म्हणणें [नो न वेदेति वेद च] कळले त्याला माझ्या मते ब्रह्म समजले' २.

यस्य अमतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः ।
अविज्ञातं विजानतां विज्ञातं अविजानताम् ॥ ३ ॥
ज्याला वाटतें, मला ब्रह्म समजले नाही, त्याला ब्रह्म समजले. ज्याला वाटतें, मला ब्रह्माचे ज्ञान झालें, त्याला ब्रह्माचे ज्ञान झालें नाही. आपल्याला ब्रह्माचे ज्ञान झालें असें ज्यांना वाटतें त्यांना मुळीच ज्ञान झालेलें नाही. आपत्याला ब्रह्माचे मुळींच ज्ञान झालें नाही असें ज्यांना वाटतें त्यांना ब्रह्माचे ज्ञान झालें असें समजावे ३.

प्रतिबोध विदितं मतं अमृतत्वं हि विन्दते ।
आत्मना विन्दते वीर्यं विद्यया विन्दतेऽमृतम् ॥ ४ ॥
सतत सारखे रहाणारे जें ज्ञान तें खरें ज्ञान होय. कारण त्यानें अमृतत्वाची प्राप्ति होते. इतर साधनांनी कांही सामर्थ्य प्राप्त झालें तर तें या देशामध्ये या स्वरूपामध्यें असेपर्यंतच काय तें प्राप्त होतें. पण ज्ञानाने मनुष्य मृत्यूचाच नाश प्राप्त करून घेतो. ४.

इह चेत् अवेदीदथ सत्यमस्ति न चेत् इह अवेदीत् महती विनष्टिः ।
भूतेषु भूतेषु विचित्य धीराः प्रेत्यास्माल्लोकात् अमृता भवन्ति ॥ ५ ॥
॥ इति केनोपनिषदि द्वितीयः खण्डः ॥
या लोकी जर आत्मस्वरूपाचें ज्ञान झालें तर त्यामध्ये सार्थकता आहे; या लोकीं जर आत्मस्वरूपाचें ज्ञान झालें नाही तर महान् नाश आहे. चराचर भूतमात्राचे ठिकाणी आत्मतत्त्व ब्रह्म आहे हें जाणणारे बुद्धिमान जन या मृत्युलोकामधून गेल्यावर अमृतत्व पावतात म्ह० ब्रह्मच होतात. ५ द्वितीयः खण्डः

तृतीयः खण्डः


ब्रह्म ह देवेभ्यो विजिग्ये तस्य ह ब्रह्मणो विजये देवा अमहीयन्त ॥ १ ॥
ब्रह्माने देवांना असुरांवर जय मिळवून दिला; त्या ब्रह्माने मिळवून दिलेल्या विजयाने देवांना महिमा प्राप्त झाला. देवांना वाटलें की, आमचाच हा विजय आहे, आमचाच हा महिमा आहे. १.

त ऐक्षन्त अस्माकं एव अयं विजयो अस्माकं एव अयं महिमा इति ।
तत् ह एषां विजज्ञौ तेभ्यो ह प्रादुर्बभूव तन्न व्यजानत किं इदं यक्षमिति ॥ २ ॥
ब्रह्माने देवाच हें मिथ्या ज्ञान जाणलें आणि देवांच्या पुढें ब्रह्म प्रकट झालें. तेव्हां हा पूजनीय महान् प्राणी कोण आहे हें देवानी ओळखले नाहीं. २.

तेऽग्निं अब्रुवन् जातवेद एतत् विजानीहि किं एतत् यज्षं इति तथा इति ॥३॥
देव अग्नीला म्हणाले, ''हे जातवेद सर्व जाणणाऱ्या, हें काय आहे तें जाण; हें पूजनीय आहे काय ? अग्नीने उत्तर केले, "बरे आहे." ३.

तत् अभ्यद्रवत् तं अभ्यवदत् कोऽसि इति ।
अग्निर्वा अहं अस्मि इति अब्रवीत् जातवेदा वा अहमस्मि इति ॥ ४ ॥
अग्नि ब्रह्माकडे गेला. ब्रह्माने विचारले, ''तूं कोण आहेस ? अग्नि म्हणाला, ''मी अग्नि आहें; मी जातवेद या नांवानेंही प्रसिद्ध आहे." ४

तस्मिँस्त्वयि किं वीर्यं इति अपि इदँ सर्वं दहेयं यदिदं पृथिव्यां इति ॥ ५॥
ब्रह्म म्हणालें, ''अशा नांवांनी प्रसिद्ध असलेल्या तुझ्यामध्ये कोणतें सामर्थ्य आहे ? अग्नि म्हणाला, ''हें जें काही पृथिवीवर आहे तें सर्व मी दहन करूं शकतों. ५.

तस्मै तृणं निदधावेतद् दह इति । तत् उपप्रेयाय सर्वजवेन तन्न शशाक दग्धुं
स तत एव निववृते न एतत् अशकं विज्ञातुं यत् एतद् यक्षं इति ॥ ६॥
ब्रह्माने अग्नीच्या पुढें तृण ठेविले व सांगितलें, "हे दहन कर" अग्नि आपल्या सर्व वेगाने त्या तृणाकडे धावला, पण त्याचें दहन करण्याला समर्थ झाला नाही. तेव्हां त्या ब्रह्मापासून तो माघारा देवांकडे गेला आणि क्षणाला, "हें पूजनीय आहे किंवा काय ते मी जाणूं शकला नाहीं." ६.

अथ वायुं अब्रुवन् वायव एतत् विजानीहि किं एतत् यक्षं इति तथा इति ॥७॥
नंतर देव वायूला हम्हणाले, "वायो हं काय आहे तें जाण, हें पूजनीय आहे काय !" वायूनें उत्तर केले, "बरे आहे." ७.

तत् अभ्यद्रवत् तं अभ्यवदत् कोऽसि इति ।
वायुर्वा अहं अस्मि इति अब्रवीत् मातरिश्वा वा अहं अस्मि इति ॥ ८ ॥
वायु ब्रह्माकडे गेला. ब्रह्माने विचारले, "तूं कोण आहेस ?" वायु म्हणाला, "मी वायु आहें; अंतरिक्षांत गमन करणारा म्हणून मातरिश्वा या नांवानेंही मी प्रसिद्ध आहे." ८.

तस्मिन् स्त्वयि किं वीर्यं इति अपीदं सर्वं आददीयं यदिदं पृथिव्यां इति ॥ ९ ॥
ब्रह्म म्हणाले, "अशा नांवांनी प्रसिद्ध असलेल्या तुझ्यामध्यें कोणतें सामर्थ्य आहे ?" " वायु म्हणाला, हें जें पृथिवीमध्ये आहे तें सर्व मी घेऊं शकतो." ९.

तस्मै तृणं निदधावेतत् आदत्स्व इति ।
तत् उपप्रेयाय सर्वजवेन तन्न शशाक आदातुं स तत एव
निववृते न एतत् अशकं विज्ञातुं यत् एतत् यक्षं इति ॥ १० ॥
ब्रह्मानें वायूच्या पुढें तृण ठेविले व सांगितलें "हें घे." वायु आपल्या सर्व वेगानें त्या तृणाकडे धावला, पण त्याचें ग्रहण करण्याला समर्थ झाला नाहीं. तेव्हां त्या ब्रह्मापासून तो माघारा देवांकडे गेला आणि म्हणाला, "हें पूजनीय आहे किंवा काय तें मी जाणूं शकली नाहीं." १०.

अथ इन्द्रं अब्रुवन् मघवन् एतत् विजानीहि किं एतत् यक्षं इति तथा इति
तत् अभ्यद्रवत् तस्मात् तिरोदधे ॥ ११ ॥
नंतर देव इंद्राला म्हणाले, "मघवन्, हें काय आहे तें जाण; हे पूजनीय आहे काय" ? इंद्राने उत्तर केलें, "बरें आहे." इंद्र ब्रह्माकडे गेला. इंद्रापासून ब्रह्म अंतर्धान पावले. ११.

स तस्मिन् एव आकाशे स्त्रियं आजगाम बहुशोभमानां
उमां हैमवतीं तां होवाच किं एतत् यक्षं इति ॥ १२ ॥
॥ इति केनोपनिषदि तृतीयः खण्डः ॥
इंद्र त्याच जागी स्तब्ध राहिला. तेथें सुवर्णाप्रमाणे दिसणारी व अतिशय शोभायमान अशी दिव्य स्त्री उमा प्राप्त झाली. इंद्र तिला म्हणाला, "आतां अंतर्धान पावले तेंच पूजनीय ( ब्रह्म) का ?" १२. तृतीयः खण्डः

चतुर्थः खण्डः


सा ब्रह्मा इति होवाच ब्रह्मणो वा एतत् विजये महीयध्वं इति
ततो हि एव हैव विदाञ्चकार ब्रह्मा इति ॥ १ ॥
उमा म्हणाली, "तें ब्रह्म आहे. ब्रह्माच्या विजयाने तुम्हांला हा महिमा प्राप्त झाला आहें." तेव्हां इंद्राला समजले, हे ब्रह्म आहे. १.

तस्माद्वा एते देवा अतितरां इव अन्यान् देवान् यत् अग्निः वायुः इन्द्रः ते
हि एनत् नेदिष्ठं पस्पृशुः ते हि एनत् प्रथमो विदाञ्चकार ब्रह्मा इति ॥ २ ॥
ज्या अर्थी अग्नि, वायु व इन्द्र या देवांनी अति समीप जाऊन ब्रह्माला स्पर्श केला व ज्या अर्थी त्यांनीं "हें ब्रह्म" अस प्रथम जाणले, त्या अर्थीं हे इतर देवाहून श्रेष्ठ आहेत. २.

तस्मात् वा इन्द्रः अतितरां इव अन्यान् देवान् स हि एनत् नेदिष्ठं पस्पर्श
स हि एनत् प्रथमो विदाञ्चकार ब्रह्मा इति ॥ ३ ॥
ज्या अर्थी इंद्रानें अति समीप जाऊन ब्रह्माला स्पर्श केला व ज्या अर्थी त्यानें "हे ब्रह्म" असें प्रथम जाणले, त्यो अर्थीं इंद्र इतरांहून, अग्नि व वायु यांहून, श्रेष्ठ आहे. ३.

तस्य एष आदेशो यत् एतत् विद्युतो व्यद्युतत् आ ३ इति
इत् न्यमीमिषत् आ ३ इति अधिदैवतम् ॥ ४ ॥
या ब्रह्माला उपमा द्यावयाची म्हटली म्हणजे जसे विजेचें चमकणें व अंतर्धान पावणे त्याप्रमाणे हें आहे. ही देवतांविषयक उपमा झाली, ४.

अथ अध्यात्मं यत एतत् गच्छतीव च मनो अनेन
च एतत् उदुपस्मरति अभीक्ष्णं सङ्कल्पः ॥ ५ ॥
या ब्रह्माला आत्मविषयक उपमा द्यावयाची म्हटली म्हणजे जसे मनाचें सर्वत्र जाणें त्याप्रमाणें हे आहे. या मनानेंच "मी ब्रह्म आहें" असा निरंतर संकल्प करतां येतो. ५.

तत् ह तत्‌वनं नाम तद्‌वनं इति उपासितव्यं
सः यः एतत् एवं वेद अभि ह एनं सर्वाणि भूतानि संवाञ्छन्ति ॥ ६॥
तें ब्रह्म तद्वन म्हणजे प्राणिमात्रानें पूजन करण्याला योग्य असें आहे. "पूजन करण्याला योग्य" या गुणाने विशिष्ट अशी त्या ब्रह्माची उपासना केली पाहिजे. ब्रह्माची जो अशी उपासना करतो म्ह० जाणतो त्याला सर्व प्राणी ब्रह्माप्रमाणेच भजतात. ६

उपनिषदं भो ब्रूहि इति उक्ता ते उपनिषद्
ब्राह्मीं वाव ते उपनिषदं अब्रूम इति ॥ ७॥
"मला उपनिषदांचे रहस्य सांग" अशी तूं प्रार्थना केल्यावरून तुला उपनिषत् सांगितलें. ब्राह्मी म्हणजे ब्रह्माचे ज्ञान जीमध्ये सांगितलें आहे असे उपनिषत् मी सांगितले. ७

तस्यै तपो दमः कर्म इति प्रतिष्ठा वेदाः सर्वाङ्गानि सत्यं आयतनम् ॥ ८॥
त्या उपनिषद्‌रूपी पुरुषाचे तप, दम व कर्म हे पाय आहेत. वेद हें सर्व शरीर, आणि सत्य हे आधारस्थान होय. ८.

यो वा एतां एवं वेद अपहत्य पाप्मानं अनन्ते
स्वर्गे लोके ज्येये प्रतितिष्ठति प्रतितिष्ठति ॥ ९॥
॥ इति केनोपनिषदि चतुर्थः खण्डः ॥
जो या ब्रह्मविद्येला वर सांगितलेल्या प्रकारें जाणतो त्याच्या पापाचा नाश होऊन नाशरहित व सर्वात श्रेष्ठ अशा सुखात्मक ब्रह्मामध्यें तो कायमचा रहातो. ९. चतुर्थः खण्डः

ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक् प्राणः चक्षुः श्रोत्रं अथ बलं इन्द्रियाणि च सर्वाणि ।
सर्वं ब्रह्मौपनिषदं | माऽहं ब्रह्म निराकुर्यां मा मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणं अस्तु
अनिराकरणं मेऽस्तु । तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
॥ इति केनोपनिषत् ॥GO TOP