नारद भक्तिसूत्रे

ईश्वरस्याप्यभिमानद्वेषित्वात् दैन्यप्रियत्वाच्च ॥ २७ ॥


अर्थ : ईश्वराचाही अभिमानाशी द्वेषभाव आहे व दैन्याशी म्हणजे लीनतेशी प्रियभाव आहे.


विवरण : मागील पंचविसाव्या सूत्रात भक्ती ही कर्म, ज्ञान व योग यांहून श्रेष्ठ आहे, असे सांगितले आहे आणि ती फलरूपा आहे असे पुढे सूत्र सव्वीसमध्ये म्हटले आहे.

कर्म, ज्ञान व योग या साधनांत अहंकार उत्पन्न होण्याचा संभव असतो. कर्मठांना कर्माभिमान, ज्ञान्यांना ज्ञानाभिमान, योग्यांना योगाभिमान उत्पन्न झालेली उदाहरणे पुष्कळ आहेत. प्राचीनबर्हिनामक एका राजाने अनेक यज्ञ केले होते, त्यास जो अभिमान झाला होता तो श्री नारदमहर्षींनी दूर केला अशी कथा भागवतामध्ये आहे. श्री. शुकाचार्यासारख्यांना ज्ञानाभिमान झाला होता व तो दूर करण्याकरिता श्री व्यासमहर्षींनी त्यांना जनक राजाकडे पाठविले होते असे वर्णन भावार्थ रामायणाच्या आरंभी आले आहे.

तुकाराममहाराजही सांगतात-
अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासे उफराटी दृष्टी केली ॥
जनक भेटीशी पाठविला तेणे । अभिमान नाणे खोटे केले ॥

चांगदेवाला योगाचा मोठा अभिमान होता तो ज्ञानेश्वरमहाराजांच्या भेटीत नष्ट झाला हे प्रसिद्ध आहे.

कोणाला कदाचित भक्तिसाधनातही अभिमान उत्पन्न होऊ शकेल म्हणून श्री नारदमहर्षी मुद्दाम या सूत्राने धोक्याची सूचना देतात. साधनांचा विचार केला असता त्यात काही साधनात प्रमातृप्रामुख्य दिसते. उदाहरणार्थ, कर्मामध्ये प्रमाता तोच कर्ता प्रमुख असतो. मी कर्ता, असा अहंकार बाळगूनच तो कर्मामध्ये प्रवृत्त होत असतो. ज्ञान हे साधन प्रमाणप्रामुख्याने होते. श्रुति, स्मृति, उपनिषद्वाक्ये, गुरुवचन इत्यादिकांवर ते अवलंबून आहे. यांनाच प्रमाण असे म्हणतात. भक्ती हे साधन प्रमेयमुख्यत्वाने होत असते. भक्तीचे प्रमेय जो भगवान त्याच्या प्रामुख्याने होत असते, म्हणजे त्याला ती कोणती व कशा प्रकारे केलेली भक्ती आवडते, त्यात कोणत्या गोष्टी प्रतिकूल असतात, कोणत्या अनुकूल असतात, त्याने शक्तीचे स्वरूप कसे सांगितले आहे इत्यादी गोष्टींचा विचार करावा लागतो. भक्ताने स्वतःला काय वाटते हे पाहावयाचे नसते. तसा विचार केल्यास श्रीनारद या सूत्रात स्पष्ट सांगतात की, ईश्वरालाही अभिमानी पुरुषाविषयी द्वेष वाटतो. 'अपि' या अव्ययाचा उपयोग करण्याचा हेतू असा असावा की ईश्वर हा सर्वांविषयी समभाव ठेवणारा आहे.

गीतेमध्ये श्रीकृष्ण स्वतःच सांगतात-
समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः ॥ गीता ९-२९
' मी सर्व भूतांचे ठिकाणी समभाव ठेवणारा आहे; मला कोणी द्वेषी नाही वा प्रिय नाही.' असा जरी तो आहे तरी पुढील चरणातच श्रीकृष्ण पुन्हा म्हणतात, 'जे भक्तीने मला जसे भजतात ते माझ्या ठिकाणी आहेत व मीही त्यांच्या ठिकाणी आहे,' म्हणजे सामान्यरूपाने तो समस्वभाव आहे. सूर्य जरी सर्वांना सारखा प्रकाश देतो तरी सर्वच त्याच्या प्रकाशाचा सारखा अनुभव घेत नाहीत. सूर्यकांत मण्यातून ठिणग्या बाहेर पडतात, कमळ विकसित होते, तारांगणे लुप्त होतात, अंधकाराचा नाश होतो, तसाच प्रकार येथे आहे. पाणी जरी सर्व शेतात सारखे दिले गेले तरी बीजाच्या धर्माप्रमाणेच त्याचा परिणाम होतो- उसात गोड, मिरचीत तिखट तर चिंचेत आंबट.

नाना बीजधर्मानुरूप । झाडा उपजवी आप ।
तैसें परिणमलें स्वरूप । माझें जीवा ॥ ज्ञा. १५-४१८
असाच भगवान आहे.

पै आघवां मीचि असे । येथ नाहीं कीर अनारिसें ।
परि प्राणियांचिया उल्लासें । बुद्धी ऐसा ॥ ज्ञा. १५-४१५
केवळ सर्वसमत्वाने व्यवहार होणार नाही व विषमता जी निर्माण होते ती जीवमात्राच्या गुण, स्वभाव व तदनुरूप क्रिया इत्यादिकांमुळे. म्हणून जीवात कोणी अभिमानी, गर्वोद्धत व त्या अभिमानात ईश्वरालाही न मानणारे व स्वतःच्याच बुद्धीप्रमाणे केवळ इतरांना दुःख देऊन स्वतः एकट्याचेच सुख पाहणारे असे असतात. त्यांचे तसेच वर्तन चालू दिल्यास 'ईश्वर' हा शब्द निरर्थक होईल. 'ईशितुं शीलं यस्य स ईश्वरः' नियमन करणे हा ज्याचा स्वभाव आहे त्यास ईश्वर म्हणतात, नियमन करणे हा ईश्वराचा स्वभाव आहे.

अभिमान हा सर्व विकाराचे मूळ आहे, व तो घातक आहे, तसेच त्याची अत्यंत घातकता ही आहे की, भक्तिप्रेमाला तो मोठा प्रतिबंधक आहे. अभिमान व प्रेम एका अधिकरणात राहू शकत नाहीत. संसारातही एकाचा अमिमान दुसऱ्यास सहन होत नाही, तो प्रतिकार करतोच, पण त्यामुळे तो दूर होत नाही तर उलट वृद्धिगत होत असतो. तो अभिमान अनेक प्रकारचा असतो देहाभिमान, वर्णाभिमान, आश्रमाभिमान, कुलाभिमान, पांडित्याभिमान, धनाभिमान, कर्तृत्वाभिमान, शूरत्वाभिमान, सौंदर्याभिमान, ज्ञानाभिमान, गुणाभिमान इत्यादी त्याचे अनेक प्रकार असू शकतात. पण कोणत्याही प्रकारचा असला तरी तो शक्तीस प्रतिबद्धकच असतो. गोपिकाना रासक्रीडाप्रसंगी भगवत्सुखाचा पूर्ण अनुभव मिळाला, त्या वेळी हा कोणालाही प्राप्त न होणारा आनंद आपण अनंतकाळ भोगला, असा आपल्या सौभाग्याचा त्यांना अभिमान झाला. भगवंताला तो खपला नाही ! त्यांचा तो अभिमान दूर करण्याकरिता श्रीकृष्ण तेथे अंतर्धानाला पावले. नंतर मात्र त्या गोपिकांना त्या वियोगाचे फार दुःख झाले. त्या विरहात त्या अभिमानविगलित होऊन वृक्ष, पक्षी, पशू इत्यादिकांना विचारू लागल्या, 'श्रीकृष्ण कोठे आहे ?' व अत्यंत शोक करू लागल्या. अशा निरभिमान अवस्थेतील त्यांचे विरहगीत गोपीगीत या नावाने प्रसिद्ध आहे. भक्तिशास्त्रात त्या गीताचा फार आदर आहे. निरभिमान होऊन देवाला कसे आळवावे त्याचे प्रत्यक्ष वर्णन त्यात आहे. अशा रीतीने विरहवेदनांनी पीडित होऊन अनेक प्रकारे त्या रुदन करू लागल्या असता त्यांच्या हृदयातील उत्कट श्रीकृष्णदर्शनलालसा व पूर्ण निरभिमानस्थिती झाली आहे हे पाहून पुन्हा श्रीकृष्णभगवान प्रगट झाले व त्यांना दर्शनसौख्य दिले असे वर्णन आहे. म्हणजे भक्तीतही एखाद्या वेळी अहंकार निर्माण होण्याचा सभव असतो, तोही देवाला आवडत नाही. न सापडे इंद्रचंद्रवलादिका । अभिमानें एका तिळमात्रे ॥
तिळमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥ तुकाराम
अभिमान हा जीवाच्या ठिकाणी अनेक विकार निर्माण करीत असतो किंबहुना कोणताही विकार मुळात अभिमानापासूनच झालेला असतो. अभिमान हा आत्मघातकी आहे. 'करवितो आत्महत्या । नेदी सत्या आकळू ॥ (तुका) अभिमान हा ज्या ज्या विषयाचा असेल त्यालाच महत्त्व देतो, देवाला देत नाही. तो जीवाला उन्मत्त करतो, देवाकडे जाऊच देत नाही. 'न पाविजे कदा उन्मत्त झालिया । दंभ तोचि वाया नागवण ॥ (तुका) अभिमान निर्माण झाला म्हणजे तो देवाशी कसे वैर करवितो याचे गीतेच्या सोळाव्या अध्यायातील आसुरी प्रकृतीच्या वर्णनातील 'अभिमान' या पदावरील व्याख्यानात श्री ज्ञानेश्वरमहाराजांनी विस्तृत वर्णन केले आहे.

कोणत्याही स्वरूपाचा अहंकार भगवद्विमुखता निर्माण करतो, मोठमोठ्याना भगवत्प्राप्तीकरिता आपले थोरपण सोडावे लागले, मग सामान्याची कथा ती काय ? याबद्दल ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायात श्रीकृष्णमुखानेच ज्ञानेश्वरमहाराज सांगतात त्या ओव्याचा भावार्थ खाली दिला आहे -
' श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ' जो जाणिवेचा अहकार बाळगतो त्यास काही कळत नाही. जो सपन्नपणा मिरवतो तोच त्याचा कमीपणा आहे, जो, ' आम्ही कृतार्थ झालो ' असे समजतो तो काहीच झाला नाही. यज्ञ, दान किवा तप, यांच्या योगाने मी सहज भगवत्प्राप्ती करून घेईन, असा जर कोणास गर्वाचा पुंज असेल तर त्यात यज्ञ, दान, तप इत्यादिकाची माझ्याजवळ गवताच्या काडीइतकीही किंमत नाही. अर्जुना ' विचार कर, ज्ञानसपन्नतेच्याबाबतीत वेदापेक्षा श्रेष्ठ कोणी- तरी आहे काय ? अथवा शेषापेक्षा अधिक तोंडाने बोलणारा कोणी आहे काय ? तो शेष माझ्या अथरुणाखाली लपून बसतो आणि वेद ' नेति नेति ' म्हणजे परमात्मा असा नाही तसा नाही असे म्हणून परत फिरतो. एवढे मोठे सनकादिक तेही वेडेपिसे झाले आहेत. तपल्याची निवड करू गेले तर महादेवाच्या पंक्तीला बसवितायेईलअसा कोणतपस्वीआहे ? तो शिवदेखील अभिमान टाकूनमाझेचरणो- दक मस्तकावर धारण करतो. ऐश्वर्याची मालकीण लक्ष्मी तिचीही येथे किमत नाही, मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्य-अभिमानत्वा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली त्यावेळी माझे पाय धुवावयाच्या भागास प्राप्त झाली. एवढ्याकरिता आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूर टाकून द्यावा, शास्त्राध्य यनाचा गर्व सोडावा, अशा रीतीने सर्व प्रकारचा लहानपणा जेव्हा घ्यावा तेव्हा माझे सान्निध्य प्राप्त होते अर्जुना ' हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्र सुद्धा नाहीसा होतो त्या मूर्यापुढे काजव्यांनी आपल्या अल्पशा प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा ' त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे तपही जेथे पुरे पडत नाही त्या माझ्या ठिकाणी या सामान्य व हेंदऱ्या (अजागळ) लोकांचा प्रवेश कमा होईल ' याकरिता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे, आणि आपल्या अगी असलेल्या सर्व गुणाचे निबलोण करावे, तसेच सपत्तीचा फुंजही ओवाळून टाकून द्यावा. ' ज्ञानेश्वरी, ९ ३६७ ते ३८१

वास्तविक कुळ, जाती वर्ण हे स्वरूपाने बाधक नाहीत, कारण प्रत्येकास ते जन्मतच चिकटलेले असतात, त्याचा शुष्क अहकार बाधक आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात -
अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । अभिजात्य झणीं श्लाघा ।
व्युत्पत्तीचा वाऊगा । सोस कां वहावा ॥
का रूपे वयसा माजा । आथिलेपणें का गाजा ।
एक भाव नाहीं माझा । तरी पाल्हाळ तें ॥ ज्ञानेश्वरी ९४३१-३२

एवढा विचार करण्याचे कारण बहुतेक लोक कोणत्या ना कोणत्या अभि मानाने युक्तच असतात तो संसारात कदाचित उपयोगी पडला तरी भक्तीमार्गात निरुपयोगीच नव्हे तर बाधक आहे अहकाराचा प्रभाव आपल्यापेक्षा जे कोण्याही प्रकारे न्यून आहेत त्याच्यावर पडतो. तो भगवतावर कसा पडेल ' कारण तो एकमेव सर्वश्रेष्ठ आहे वर्ण, आश्रम, कुळ, शुरत्व, सौदर्य इत्यादी देहाभिमानावरच अवलंबून आहे व ह्यादेहाचेच चलनवलनादी व्यवहार करविणारा जर तोच आहे तर त्याच्या पुढे हा अभिमान कसा टिकेल ? आपली सर्व प्रकारची अहंता ज्याच्या योगाने चालते त्याच्यापुढे अहंकार दाखवून काय उपयोग ?

कित्येकाना स्वसौदर्याचा अभिमान असतो, पण भगवत्सौदर्यापुढे अन्य सौदर्य कसे शोभेल ? श्री एकनाथमहाराज सांगतात-
श्रीकृष्णाचिया सौदर्यापुढें । लक्ष्मी भुलोनि झाली वेडे ।
मदन पोटा आले बापुडे । तेथ कोणीकडे इंद्रचंद्र ॥
त्रिलोकीचे बरवेपण । भुलोनि कृष्णापाशी आले जाण ।
ना कृष्ण लेशे बरवेपण । शोभे सपूर्ण तिही लोकी ॥
जो सकळ सौदर्याची शोभा । जो लावण्याचा अतिवालमा ।
ज्याच्या अगसगप्रभा । आणिली शोभा जगासी ॥ ए मा. ? .२४ १-४३
म्हणून सौदर्यामिमानही तेथे उपयोगी नाही. कोणास आपल्या बळाचा अभिमान असतो. उदाहरण हिरण्यकश्यपासारखे आपल्या बळावर ईश्वराशीही द्वेष करणारे असे अनेक दैत्य, राक्षस होऊन गेले. पण त्याचाही अभिमान देवापुढे टिकला नाही श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात-
नुधडतां बाळपणाची फुली । जे मियां अदानवी सृष्टि केली ॥
करी गिरी धरोनि उमाणिली । महेंद्रमहिमा ॥ ज्ञानेश्वरी १० .२ ८ )
आपल्या बळाच्या अभिमानाने हिरण्यकश्यपूने महाविष्णूची भक्ती करणाऱ्या प्रल्हादाचा अनेक प्रकारे छळ केला, नव्हे त्यास मारण्याचा अनेक प्रकारे यत्न केला पण देवाने त्याचे-प्रल्हादाचे-रक्षण तर केलेच पण हिरण्यकश्यपूच्या म्हणण्याप्रमाणेच स्तंभातून प्रगट होऊन त्याचाही वध केला.

कोणास वाटेल की सर्वसमस्वभाव अशा ईश्वराने असा द्वेष करावा काय ? पण याचे उत्तरही हेच आहे की ज्याचा अभिमान दूर करण्याकरिता ईश्वराने अनेक अवतार घेतले व त्याचा वध केला, त्याचा उद्धारच झाला. रावण, कुंभकर्ण, हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, कंस, शिशुपाल इत्यादिकाना मोक्षच मिळाला हे सर्व पुराणातून प्रसिद्ध आहे, वस्तुत. त्याच्या अनत दुष्कृत्यानी ते नरकलोकात कायमचे राहणार पण देवाने ! आपल भक्तरक्षणाचे ब्रीद खरे करण्याकरिता अवतार घेऊन त्याचा वध केला तरी त्यातही त्या सर्व असुराचा उद्धारच झाला ही गोष्ट सर्व साधुसंतांनी स्पष्ट केली आहे.

श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
तुझें औदार्य जाणो स्वतंत्र । देता न म्हणसी पात्रापात्र ।
पै कैवल्य ऐसें पवित्र । वैरियांही दिधले ॥ ज्ञा. ११-९८
श्रीकृष्ण कोपोनि ज्याती मारी ।
तो पावे परवरू साक्षात्कारी ॥ ज्ञा. ८-९
अशी अनेक प्रमाणे आहेत, सारांश, कोणताही अभिमान तेथे चालत नाही ईश्वरापुढेही जर अन्य कोणाचा अभिमान खपू लागला तर तोच ईश्वर होईल व याचे ईश्वरत्व-नियामकत्व-बाधित होईल. तसेच ईश्वराहून अन्य कोणीही जीव- कोटीतच म्हणजे नियम्य या सदरातच येईल त्याला अभिमान करण्याचाच अधि. कार नाही. तो करील तर ते अज्ञान ठरेल व ते दूर करणे हे ईश्वराचे कामच आहे, म्हणून नारद ईश्वर हा अभिमानद्वेषी आहे असे म्हणत आहेत.

भक्तिप्रेमानंदाचा भोग घेण्याकरिता वृत्ती निरभिमान असणे अवश्य आहे. कोणताही अभिमान निर्माण होणे हे बाधक आहे हे वर सांगितलेच आहे. त्यांतल्या त्यात भक्तप्रेमास अत्यंत विरोध करणारा जर कोणी असेल तर तो ज्ञानाभिमान होय. अंतःकरणात शब्दज्ञानाचे अल्प जरी संस्कार निर्माण झाले, मी ज्ञानी क्ये वाटू लागले की मग भक्ती ही निरर्थक वाटावयास लागते. एकनाथमहाराज या विषयाचा विस्तृत विचार करतात. भागवत एकादश स्कंध अध्याय पाचमध्ये जनक- नवयोगेश्वर संवादात हा विषय आला आहे.
आलोडोनी वेदशास्त्रार्थ । ज्ञातेपणे जे पंडित ।
गवे हेळसिती भक्तिपंथ । अति उन्मत्त ज्ञातृत्वे ॥
जेवी ज्वरिताचें मुख । दूध मानी कडू विख ।
तेवीं ज्ञानगर्वे पंडित देख । ठेले विमुख हरिभजनी ॥
आम्ही मुक्त हे मातुनी । जे विमुख भगवद्‌भजनी ।
ते पचिजती अधःपतनी । तिर्यग्योनी जन्ममरणें ॥ ए. भा. ५५७-६१

तात्पर्य, कोणताही अभिमान असणे हे भक्तिमार्गाच्या दृष्टीने घातक आहे. त्या अभिमानापासूनच पुढे सर्व विकारांची निर्मिती होत असते. देव अभिमानाचा द्वेष करतो याचे कारण भक्ताच्या भक्तीत तो अभिमान विघ्न आणणारा आहे. भक्तीत सकामता, व्यभिचारबुद्धी इत्यादी निर्माण करणारा हा अभिमानच आहे. भक्तीत केवळ परमात्म्याचाच मान असणे अवश्य आहे. इतर कोणालाही महत्त्व न दिले गेले पाहिजे. अभिमानाचा अर्थ ' अभित. मान. ' म्हणजे जवळ असणाऱ्या अन्य पदार्थाना प्रमाणभूत मानणे, त्याचे महत्त्व वाढविणे. हे अभिमानाचे कार्य आहे. अन्याचे जर महत्त्व वाढले तर मग देवाचे कसे राहणार ? भक्तजीवनात जर देवाविना अन्याचे महत्त्व वाढले तर भक्ती कशी होणार ? म्हणून भगवान भक्तांचा अभिमान नष्ट करून भक्ताच्या भक्तीचे रक्षणच करतो. यातच भक्तांचे कल्याण आहे.

अनेक भक्ताना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अभिमान झाला होता व देवाने काहीतरी निमित्त करून तो दूर केला. त्यासंबंधी पुराणात पुष्कळ कथा आहेत, अभिमानाची सर्व स्थाने देवास समर्पण करणे हे भागवत धर्मांचे लक्षण सांगितले आहे.
दारा सुत गृह प्राण । करावे भगवंतासी अर्पण ।
हें भागवत धर्म पूर्ण । मुख्यत्वे भजन या नाव ॥ ए. भा. २२९९
ईश्वरास अभिमान खपत नाही, तो अभिमानाचा द्वेषी आहे, म्हणूनच तर गीतेमध्ये अशा अभिमानी पुरुषाकरिता ' स्त, ' क्रूर ' ' नराधम,' असुर' अशी विशेपणे वापरली आहेत, ' अभिमान नाही तुका म्हणे त्यासी । नेंदी आणिकांसी करू देव ॥' असे तुकाराममहाराज म्हणतात. प्रेम व मान एकाठिकाणी राहू शकत नाहीत. एका भक्ताचे उद्‌गार प्रसिद्ध आहेत 'चाखाचाहे प्रेमरस राखाचाहे मान । दो खड्‌ग एक म्यानमें देखे सुने न कान ॥' याबद्दल एक कथा प्रसिद्ध आहे.

जेव्हा धर्मराज हे कौरवाच्या बरोबर खेळलेल्या कपट द्यूतात हरले, दुःशासन नाने सभेत द्रौपदीला फरफर ओढीत आणले, तिच्या केशपाशास हात घातला इतकेच नव्हे तर दुर्योधनाच्या आदेशानेतिच्यावस्त्रालाहातघातला तेव्हा श्रीकृष्णाने अबर- वस्त्र- अवतार घेऊन तिचे रक्षण केले. पण हे करताना थोडा वेळ लागला. पुढे पाडव वनात असता एक वेळ श्रीकृष्ण त्यांना भेटण्यास गेले. सहज बोलण्यात विषय निघाला. द्रौपदी म्हणाली, ' देवा ! कौरवसभेमध्ये तू माझी लाज तर राखलीस, पण एवढा वेळ का लावलास ? एवढे का रडविलेस ' एवढे सत्त्व का पाहिलेस ? ' श्रीकृष्ण म्हणाले, ' द्रौपदी ! ऐक, जेव्हा ' गोविद द्वारकावासिन ' म्हणून मला हाक मारलीस त्या वेळी ' गो ' शब्द कानावर पडताच मी निघालो व ' विंद ' म्हणेपर्यंत सभेजवळ आलो. पण मी काय करू ? पाहातो तो तू आपले वस्त्र दोन्ही हातांत धरून ठेवले होतेस. तुला असा अभिमान होता की, आपल्या हातांनी आपल्या लज्येचे रक्षण होऊ शकेल म्हणूनच तै घट्ट पकडून ठेवले होतेस, मग मी कसा येऊ ? जेव्हा तू ते वस्त्र हातातून सोडलेस व ' हे नाथ, हे रमानाथ ' म्हणून टाहो फोडलास तत्काळ मी प्रगट झालो. ' म्हणजे एवढा अतीसूक्ष्म अभिमान ही देवास सहन होत नाही. कारण तो देवास लहान करतो, किवा प्रेमाची जागा इतकी अडचणीची असते की तेथे दोन गोष्टीचा- मान व प्रेम याचा- समावेश होत नाही. ' प्रेम गली अति साकडी । वामे दो न समाय ॥ ' असे एका भक्ताचे उद्‌गार आहेत. एका लहानशा पिशवीत पर्वत कसा मावेल ? म्हणून भगवान हा अभिमान दूर करूनच भेटतो. म्हणून नारद या सूत्रात ईश्वरालाही अभिमानाचा द्वेष आहे असे म्हणतात.

या पुढील वाक्य ' दैन्यप्रियत्वाच्च ' हे आहे. अभिमानाचा जसा द्वेष तसा दीनाशी त्याचा प्रियभाव आहे. दैन्य शब्द व्यवहारात दरिद्री, दुःखी या रूढ अर्थाने वापरला जातो. पण त्या अर्थाने येथे दैन्य शब्द घेता येणार नाही. कारण आरंभी ' अभिमान द्वेषित्वात् ' म्हटले आहे. व्यवहारात जे दीन, दरिद्री वाटतात ते निरभि- मानी असतात, असे नाही. त्यानाही कशाचा ना कशाचा अभिमान असतोच. ते स्वतःला दीन समजत नाहीत. तसेच ईश्वरावर त्यांची भक्ती असतेच असे नाही, ते आपले दैन्यदारिद्र्य दूर करण्याकरिता कोणत्याही श्रीमंत म्हणविणाऱ्या माणसाला शरण जातात. ते देवास मानीतहीनाहीत, मानीत असलेच तर क्षुद्र देवतांना मानतात. त्याच्या ठिकाणी अत्ययता नसतेच. म्हणून येथे दीन पदानेदीन म्हणजे ' निरभिमानी हाच अर्थ घेणे उचित आहे. भगवंतास ' दीनानाथ, ' दीनवत्सल ' अशी संबोधने दिली जातात तसेच सारात द्रव्यरहित पुरुषाला दीनदरिद्री दैन्यवाणा म्हणतात; पण मोठे मोठे राजे महाराजे देखील दीन झालेले दिसून येतात. कारण आधिक्यांधी इत्यादिकानी ते पीडलेले असतातच. जन्ममरणादि संसारधर्मांनी ते युक्त असतात, तसेच जरी तै श्रीमंत असलेले इतराना वाटतात तरी त्याच्यापेक्षा कोणी श्रीमंत त्यांना दिसला तर त्याला पाहून ते स्वतःला हीनच समजतात. पर्यायाने त्यानाही दीनच म्हणावे लागेल श्रीमद्‌भागवतामध्ये दरिद्र कोणास म्हणावे या उद्धवाच्या प्रश्नास श्रीकृष्णानी ' दरिद्रो यारवसंतुष्ट, असतुष्टासच दरिद्र म्हणावे असे उत्तर दिले आहे.
ऐक दरिद्राचें लक्षण । गाठी असता कोटिधन ।
ज्याचे सतुष्ट नाही मन । परम दरिद्री जाण या नाव ॥ ए. भा. २९-५८

जो जो असतुष्ट, पराधीन, त्रिविध दु खाने पीडलेला जीवदशेत अडकलेला, तो इद्र-चद्र-ब्रह्मदेव कोणी का असेना, दीन होय. एका दृष्टीने पाहिल्यास ईश्वरा व्यतिरिक्त कोणीही जीव दीनच म्हणावा लागतो हे जरी खरे आहे तरी असे सर्व जीव ईश्वरप्रेमास पात्र होतात असे नाही कारण तेकोणत्याना कोणत्या अभिमानाने घेरलेले असतात व स्वतःस दीन समजतही नाहीत. किंबहुना स्वतःला ते ईश्वरच समजत असतात. संसारातही स्वतः संसाराच्या पाशात अडकून जन्ममरणादिकाचे क्लेश भोगत असताहीस्वत स ' ईश्वरोहंअह भोगी ' समजणारे अनेक लोक आहेत. ते स्वतःस दीन समजतच नाहीत. ईश्वरप्रेमाची अपेक्षाही ठेवीत नाहीत, तरत्याच्यावर तो प्रेम करील कसा ? व केले तरी काय उपयोग ? त्यांना त्या प्रेमाची कल्पनाही येणार नाही. म्हणून दैन्यप्रियत्व याचा अर्थ हा होतो की जे स्वतःला दीन समज- तात, व दैन्यातून मुक्त करणारा एकमेव परमात्माच असे समजून त्याच्यावरच अनन्यभाव ठेवतात. देह वा विद्या, शक्ती, धन, कुळ, जाती इत्यादि कशाचाही अहकार बाळगीत नाहीत. इतकेच नव्हे, तर इतके दिवस आपला काळ व्यर्थ गेला, काहीच भगवत्सेवा घडली नाही याबद्दल अत्यंत पश्चात्ताप जे धारण करतात व यातून आपणास सोडविणारा केवळ एकमेव भगवानच आहे, असे जे समजतात त्यानाच दीन समजावे.

दैन्याचे स्वरूप व ते दैन्य देवापुढे कसे प्रगट करावे, त्यास कसे आळवावे या विषयात श्रीएकनाथमहाराजाचे व्याख्यान महत्त्वाचे आहे. भक्त देवापुढे आपले दैन्य कसे प्रगट करतो याबद्दल ते सांगतात -
मी पडिलो विषय बंदीखानी । वेगी (गवे गरूडा वळंधवोनि ।
कृपाळुवा चक्रपाणी । मज लागुनि सोडवी ॥ ३४९ ॥
विषय महाग्रहाचे तोंडी । मी सापडलो बडिश पिडी ।
गजेन्द्राचे परी तांतडी । घाली उडी मजलागी ॥ ३५० ॥
धाव पाव गा गोविंदा । निवारी माझी विषयबाधा ।
उपेधू नको मुकुदा । घेऊनि गदा धाव वेगी ॥ ३५१ ॥
तू अडलियांचा सहाकारी । भक्तकाज कैवारी ।
मज बुडता विषयसांगरी । वेग उद्धरी गोविंदा ॥ ३५२ ॥
मी पडिलों विषयसांगरी । बुडविलो काम लोभ लहरी ।
क्रोधे विसंचिलों भारी । अभिमान सुसरी गिळियेलो ॥ ३५३ ॥
तू दीनदयाळ श्रीहरी । आल्ये बिरुद साच करी ।
मज दीनातें उद्धरी । निजबोधकरी धरोनिया ॥ ३५४ । ए. भा. २०
हा दीन कोणा जीवापुढे आपले दैन्य प्रगट करीत नाही, कारण त्याला माहीत असते की ही जीवदशा जेथपावेतो आहे तेथपावेतो सर्व दैन्यच असते. दीनाने दीनापुढे दैन्य प्रगट करून काय उपयोग ' ते स्वत. दीन आहेत, दुसऱ्याचे दैन्य काय दूर करू शकतील ? तसेच तो ईश्वरापुढेही आपले आर्थिक वा अन्य लौकिक दैन्य प्रगट करीत नाही, तर वर लिहिल्याप्रमाणे देवापुढे आपली दीनता, तीही आध्यात्मिक- प्रगट करत असतो, तो भक्तिप्रेमाचीच याचना करतो. तो हेच समजतो की, प्रेमभक्ति प्राप्त होणे हेच परमभाग्य आहे. याशिवाय जी अवस्था प्राप्त होईल ती केवढीही मोठी असली तरी ते दैन्यच आहे. अशा भक्तावरच देव प्रेम करतो म्हणून ' दैन्य प्रियत्वात् ' असे नारद म्हणतात. श्रीतुकाराम महाराज हा भाव प्रगट करताना म्हणतात.
देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ १ ॥
कृपावंत किती । दीन बहु आवडती ॥ २ ॥
त्याचा भार वाहे माथा । करी योग-क्षेम-चिंता ॥ ३ ॥
भुलोनेदी वाट । करी धरोनि दावी नीट ॥ ४ ॥
तुका म्हणे जीवे । अनुसरता एका भावे ॥ ५ ॥
' एतावानूहि प्रभोरर्थो यद्दीनपरिपालनम् । ' ' प्रभुत्वाचे प्रयोजनच दीनांचे परिपालन करणे हे आहे. ' कृपा हा ईश्वराचा स्वभाव आहे. मेघाचा स्वभाव वर्षाव करणे, चंद्राचा शीतलता देणे, सूर्याचा प्रकाश, त्याप्रमाणे दयामय प्रभूचा स्वमाव दीनावर प्रेम करून त्याचे दैन्य दूरर करणे हाच आहे. आर्त द्रौपदी, गजेंद्र दीन शबरी, सुदामा या सर्वांची उदाहरण याची साक्षभत आहेत. तत्त्वतः सर्व जीव स्वभावतः दीनच आहेत, परतंत्र आहेत ते त्या पूनी अंशभूतच आहेत. म्हणून परमात्म्याचे त्यांच्यावर सहज प्रेम असणारच, परंतु अनादी अज्ञानजन्य अभिमानामुळे ते स्वतःस दीन व ईश्वराचा अंश समजत नाहीत व ईश्वरप्रेमाची अपेक्षाही करीत नाहीत. तो अभिमान हा आपल्या अंशभूत जीवांना घातक असतो. म्हणूनच ईश्वर त्या अभिमानाचा द्वेष करतो व तो दूर करतो. तसेच जीवास अभिमान बाळगण्याचा अधिकार नाही असे समजून जे स्वतःस दीन समजतात त्यांच्यावर प्रेम करतो असे नारदमहर्षी या सूत्राच्या द्वारे सांगत आहेत.


GO TOP