नारद भक्तिसूत्रे

अस्त्येवमेवम् ॥ २० ॥


(वरील सूत्रात म्हटल्याप्रमाणे भक्तिलक्षण) असेच आहे.


विवरण : वरील एकोणिसाव्या सूत्रात नारदांनी व्यास, गर्ग यांचे भक्तिलक्षण सांगितल्या वर आपले भक्तिलक्षण सांगितले आहे. त्यानंतर आणखी अनेक भक्त होऊन गेले असतील, त्याचे कोणाचे भक्तिलक्षण सांगतील की काय असे वाटेल, पण अन्य कोणाचे भक्तिलक्षण न सांगता आपण सांगितलेले भक्तिलक्षणच योग्य आहे, असे द्विरुक्तीने सांगतात. 'अस्ति एवम् एवम् अस्ति' हे क्रियापद दोन्ही एवंकडे लावावे. "एवं अस्ति एवं अस्ति" असे आहे. म्हणजे आम्ही जे भक्तिलक्षण सांगितले तेच पूर्ण आहे यापेक्षा वेगळे किंवा श्रेष्ठ असे दुसरे लक्षण संभवत नाही असा वरील सूत्राचा आशय आहे.


GO TOP