|
ऋग्वेद - मण्डल १० - सूक्त ८१ ते ९० ऋग्वेद - मंडल १० सूक्त ८१ (विश्वकर्मन्सूक्त)
ऋषी - विश्वकर्मन् भौवन : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
य इ॒मा विश्वा॒ भुव॑नानि॒ जुह्व॒दृषि॒र्होता॒ न्यसी॑दत् पि॒ता नः॑ ।
यः इमा विश्वा भुवनानि जुह्वत् ऋषिः होता नि असीदत् पिता नः
ज्याने ह्या यच्चावत्प्राणिमात्रासाठी हवन केले, तो आमचा पिता ऋषि आणि यज्ञसंपादक होऊन स्वस्थानी अधिष्ठित झाला. आपल्या आशीर्वादानेच आम्हांला अचल धन प्राप्त व्हावे अशी इच्छा त्याने केली आणि आपली मूळ स्वरूप झांकून अगदी खालच्या कोटींतील वस्तूंतही तो प्रविष्ट झाला १.
किं स्वि॑दासीदधि॒ष्ठानं॑ आ॒रम्भ॑णं कत॒मत् स्वि॑त् क॒थासी॑त् ।
किं स्वित् आसीत् अधि-स्थानं आरम्भणं कतमत् स्वित् कथा आसीत्
तो अधिष्ठित झाला पण तें ठिकाण कोणते ? त्याने (जगत् केले) तें कोणत्या वस्तूचे बनविले, आणि ते झाले तरी कोण्त्या रीतीने हे कसें कळणार ? कारण हे विश्व निर्माण करणार्या देवाने, त्या विश्वद्रष्ट्या ईश्वराने पृथ्वी उत्पन्न करून आपल्या महिम्याने आकाशही उत्पन्न केले, पण ते झालेले असेंच दृष्टीस पडले २.
वि॒श्वत॑श्चक्षुरु॒त वि॒श्वतो॑मुखो वि॒श्वतो॑बाहुरु॒त वि॒श्वत॑स्पात् ।
विश्वतः-चक्षुः उत विश्वतः-मुखः विश्वतः-बाहुः उत विश्वतः-पात्
सर्वेश्वराला सर्व दिशांकडे डोळे आहेत आणि त्याची मुखंही सर्व दिशांकडे आहेत; त्याचे बाहु सर्वत्र आहेत आणि पायही सर्व ठिकाणी आहेत. असा तो ईश्वर आपल्या दोन बाहूंनी, आपल्या गतिसामर्थ्यांनी सर्वांमध्ये (चलनवलन) उत्पन्न करतो. पण याप्रमाणे ज्याने आकाश व पृथ्वी यांना निर्माण केले तो ईश्वर एकच आहे ३.
किं स्वि॒द्वनं॒ क उ॒ स वृ॒क्ष आ॑स॒ यतो॒ द्यावा॑पृथि॒वी नि॑ष्टत॒क्षुः ।
किं स्वित् वनं कः ओं इति सः वृक्षः आस यतः द्यावापृथिवी इति निः-ततक्षुः
तें अरण्य कोणते होतें (आणि तेथील) तो वृक्ष कोणता होता, कीं ज्याच्यापासून हे द्यावापृथिवी तासून तासून बनविले. मननशील सुज्ञांनो, आपल्या मनाला हे विचाराच की सर्व भुवने वागवितांना तो जेथे अधिष्ठित होतो, ते स्थान तेंच की काय ? ४.
या ते॒ धामा॑नि पर॒माणि॒ याव॒मा या म॑ध्य॒मा वि॑श्वकर्मन्न् उ॒तेमा ।
या ते धामानि परमाणि या अवमा या मध्यमा विश्व-कर्मन् उत इमा
हे विश्वाच्या उत्पन्नकर्त्या ईश्वरा, तुझी जी स्वरूपे अत्यंत श्रेष्ठ आहेत, तसेंच जीं निकृष्ट आणि जी मध्यम आहेत, ती कोणती ते सज्जनांना तूं हवनप्रसंगी सांग; हे स्वत: शक्तिमन्ता, आपणच संतुष्ट होऊन तूं स्वत:चेच यजन कर ५.
विश्व॑कर्मन् ह॒विषा॑ वावृधा॒नः स्व॒यं य॑जस्व पृथि॒वीं उ॒त द्याम् ।
विश्व-कर्मन् हविषा ववृधानः स्वयं यजस्व पृथिवीं उत द्यां
हे विश्वाच्या उत्पन्नकर्त्या, हविर्दानाने संतुष्ट होऊन तूंच स्वत: द्यावापृथिवीचे यजन कर. आमच्या भोंवती जे सामान्यजन आहेत, ते वेड्यांसारखे पाहातच स्वस्थ राहतील अशा थाटाचा आमचा येथील धुरीण मात्र ऐश्वर्यसंपन्न होवो ६.
वा॒चस्पतिं॑ वि॒श्वक॑र्माणं ऊ॒तये॑ मनो॒जुवं॒ वाजे॑ अ॒द्या हु॑वेम ।
वाचः पतिं विश्व-कर्माणं ऊतये मनः-जुवं वाजे अद्य हुवेम
जो स्तुतिवाणींचा प्रभु, जो विश्वाचा उत्पादक, जो मनापेक्षाही शीघ्रगति आहे, त्याला आजच्या सत्वयुद्धप्रसंगी आम्ही आमच्या सहाय्यार्थ भक्तीने हांक मारतो. तो आमच्या सर्व आहुति संतोषाने मान्य करून घेवो, तो सर्व विश्वाचे कल्याण करणारा आहे; तो नेहमी सत्कार्यच घडवून आणतो, तर तो आम्हांवर कृपा करो ७.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ८२ (विश्वकर्मन्सूक्त)
ऋषी - विश्वकर्मन् भौवन : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
चक्षु॑षः पि॒ता मन॑सा॒ हि धीरो॑ घृ॒तं ए॑ने अजन॒न् नन्न॑माने ।
चक्षुषः पिता मनसा हि धीरः घृतं एने अजनत् नम्नमानेइति
(विश्वाचा) प्रत्यक्ष पिता आणि अंत:करणाने अत्यंत उदार असा जो परमेश्वर त्याने दिव्यघृतांत पोहोंणार्या ज्या द्यावापृथिवी त्यांना निर्माण केले आणि प्रथम त्यांच्या सीमा जेव्हां त्याने पक्क्या निश्चित केल्या, तेव्हांच द्युलोक व भूलोक ह्यांचा विस्तार झाला १.
वि॒श्वक॑र्मा॒ विम॑ना॒ आद्विहा॑या धा॒ता वि॑धा॒ता प॑र॒मोत सं॒दृक् ।
विश्व-कर्मा वि-मनाः आत् वि-हायाः धाता वि-धाता परमा उत सम्-दृक्
विश्वाचा जो सूत्रचालक, त्याचे मन कांही निराळेच आहे. तो अत्यंत उदात्त आहे; तो सृष्टिकर्ता, तो नियंता, परमश्रेष्ठ आणि सर्वद्रष्टा आहे; भक्तांची मने जेव्हां यथायोग्य उत्साहाने अधिक हर्षित होतात; तेव्हा सात ऋषींच्याहीपेक्षां श्रेष्ठ असा एक (परमेश्वर)च आहे असें ते म्हणतात २.
यो नः॑ पि॒ता ज॑नि॒ता यो वि॑धा॒ता धामा॑नि॒ वेद॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ।
यः नः पिता जनिता यः वि-धाता धामानि वेद भुवनानि विश्वा
जो आमचा (प्रतिपालक) पिता, जो निर्माणकर्ता आणि जो नियंता आहे, तोच त्याची स्वत:ची स्वरूपे आणि ही सर्व भुवने जाणतो; जो वस्तुमात्राला नांव (आकार) देतो तो ईश्वर सर्व देवांमध्ये एकच आहे, आणि त्याच्याकडेच दुसरी सर्व भुवने (जे काय विचारणे असेल ते) विचारण्यासाठी जातात ३.
त आय॑जन्त॒ द्रवि॑णं॒ सं अ॑स्मा॒ ऋष॑यः॒ पूर्वे॑ जरि॒तारो॒ न भू॒ना ।
ते आ अयजन्त द्रविणं सं अस्मै ऋषयः पूर्वे जरितारः न भूना
त्याच पुरातन ऋषींनी ह्या परमेश्वराप्रीत्यर्थ आपल्या सर्व संपत्तीचा यज्ञ केला तो आपण नम्र भक्त अशा भावनेने केला; आढ्यतेने केला नाही. ते ऋषि (अशा सामर्थ्याचे होते की) अचल आणि चल अशा सर्व वस्तु रजोलोकांत बुडून गेल्या असतांना त्यांनी सर्व प्राणिमात्रांना सुसंस्कृत केले ४.
प॒रो दि॒वा प॒र ए॒ना पृ॑थि॒व्या प॒रो दे॒वेभि॒रसु॑रै॒र्यदस्ति॑ ।
परः दिवा परः एना पृथिव्या परः देवेभिः असुरैः यत् अस्ति
ह्या आकाशाच्या पलीकडे, पृथ्वीच्या पलीकडे, दिव्यविभूतींपेक्षां श्रेष्ठ, बलवान् असुरांपेक्षांही उच्च, असे जे काहीं आहे ते काय ? असें कोणते (सामर्थ्य) उदकांनी बीजरूपाने प्रथम धारण केले, कीं त्याच ठिकाणी सकल देवांनी एकमेकांना पाहिले ५.
तं इद्गर्भं॑ प्रथ॒मं द॑ध्र॒ आपो॒ यत्र॑ दे॒वाः स॒मग॑च्छन्त॒ विश्वे॑ ।
तं इत् गर्भं प्रथमं दध्रे आपः यत्र देवाः सम्-अगच्चन्त वि श्वे
ज्या ठिकाणी सकलदिव्यविबुध एकत्र झालें, तेच (ईश्वर सामर्थ्य) उदकांनी बीजरूपाने प्रथम धारण केले, तेंच एक सामर्थ्य त्या जन्मरहित ईश्वराच्या नाभिमध्ये निबद्ध झाले आहे, आणि ही यच्चयावत् भुवनेंहि तेथेंच अधिष्ठित झाली आहेत ६.
न तं वि॑दाथ॒ य इ॒मा ज॒जाना॒न्यद्यु॒ष्माकं॒ अन्त॑रं बभूव ।
न तं विदाथ यः इमा जजान अन्यत् युष्माकं अन्तरं बभूव
ज्याने ही भुवने निर्माण केली, त्याला तुम्ही कधींही जाणूं शकणार नाही, तुमच्या आणि त्याच्या (सामर्थ्या)मध्ये जे अंतर आहे, ते कांही निराळेच आहे (ते सांगता येणार नाही.) सामगायक हे देखील थंडीतील धुक्याने आच्छादून गेलेले आणि कांही तरी गुणगुणत काळ घालवून जिवाचे समधान करणारे असे पृथ्वीभर हिंडत असतात. (परंतु त्यांनाही ईश्वरी तत्व समग्र कळत नाही ७.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ८३ (मन्युसूक्त) ऋषी - मन्यु तापस : देवता - मन्यु : छंद १ - जगती; अवशिष्ट - त्रिष्टुभ्
यस्ते॑ म॒न्योऽ॑विधद्वज्र सायक॒ सह॒ ओजः॑ पुष्यति॒ विश्वं॑ आनु॒षक् ।
यः ते मन्यो इति अविधत् वज्र सायक सहः ओजः पुष्यति विश्वं आनुषक्
हे (ईश्वरी) आवेशा, हे त्वेषा, जो तुझी जोपासना करतो; हे वज्ररूप, हे बाणरूपा (आवेशा), तो शत्रूला चिरडणार्या जोमाची आणि ओजस्वितेचीच काय, पण सर्व पराक्रमांची अभिवृद्धि करतो. तर तुझ्या सहाय्याने, तुझ्या धडाडीने उत्पन्न झालेल्या तीव्रतेने आणि दुर्दम्य सामर्थ्याने आम्ही दुर्जनांना आणि आर्यांप्रमाणे (बाह्यात्कारी) वागणार्या दुष्टांना चिरडून टाकूं असे कर १.
म॒न्युरिन्द्रो॑ म॒न्युरे॒वास॑ दे॒वो म॒न्युर्होता॒ वरु॑णो जा॒तवे॑दाः ।
मन्युः इन्द्रः मन्युः एव आस देवः मन्युः होता वरुणः जात-वेदाः
इंद्र हाच मन्यु (दिव्य आवेश) होय. देव जो आहे तोही हा मन्यूच होय मन्यु हाच यज्ञ संपादक, मन्यु हाच वरुण आणि अग्नि होय. मानवी वंशातील जे लोक ते सर्व मन्यूचीच महती गातात. तर हे दैवी आदेशा, तूं आम्हांवर प्रसन्न होऊन आपल्या तीव्रतेने आमचे संरक्षण कर २.
अ॒भीहि मन्यो त॒वस॒स्तवी॑या॒न् तप॑सा यु॒जा वि ज॑हि॒ शत्रू॑न् ।
अभि इहि मन्यो इति तवसः तवीयान् तपसा युजा वि जहि शत्रून्
तीव्रामध्ये तीव्र असा तूं (दिव्य) आवेश आम्हांकडे. (आमच्यामध्ये संचार कर) तूं आम्हांला सहाय्य होऊन आपल्या त्तीव्रतेजाने शत्रूंना ठार कर. तूं दुर्जनांचा नाशक, अंध:काराचा संहारक आणि अधार्मिकांचा उच्छेद करणारा आहेस. तूं आम्हाकडे अभीष्टरूप संपत्ति घेऊन आगमन कर ३.
त्वं हि म॑न्यो अ॒भिभू॑त्योजाः स्वय॒म्भूर्भामो॑ अभिमातिषा॒हः ।
त्वं हि मन्यो इति अभिभूति-ओजाः स्वयम्-भूः भामः अभिमाति-सहः
ज्याचे तेज असह्य असा, हे दिव्य आवेशा, तूंच आहेस. तूं स्वयंभू आहेस, क्रोधाची मूर्ति आहेस, शत्रूंची दाणादाण उडविणारा आहेस. तूं सर्वद्रष्टा, सर्वदमन, दुर्दम्य आहेस; तर आमच्या सैन्यामध्ये ओजस्विता आण ४.
अ॒भा॒गः सन्न् अप॒ परे॑तो अस्मि॒ तव॒ क्रत्वा॑ तवि॒षस्य॑ प्रचेतः ।
अभागः सन् अप पराइतः अस्मि तव क्रत्वा तविषस्य प्रचेतैत् इप्र-चेतः
मी अभागी (असेन) परंतु तुझ्या ओजस्वी कर्तृत्वानेच ह्या दूरच्या ठिकाणी येऊन ठेपलो आहे. हे सर्वज्ञ मन्यो, मी दुर्बल असल्याने तुजला क्रोध येईल असेही मी करीन. परंतु आतां माझे शरीर हे तुझे आहे. तर त्याला बलवान् करण्यासाठी तूं मजकडे ये ५.
अ॒यं ते॑ अ॒स्म्युप॒ मेह्य॒र्वाङ् प्र॑तीची॒नः स॑हुरे विश्वधायः ।
अयं ते अस्मि उप मा आ इहि अर्वाङ् प्रतीचीनः सहुरे विश्व-धायः
हा मी तुझा आहे. तर तूं माझ्याकडे, मजजवल ये. माझ्याकडे वळ. हे दुष्टदमना, हे विश्वंभरा, हे (ईश्वरी) आवेशा, हे वज्रधरा मजकडे वळ. आपण दोघे मिळून अधार्मिक दुष्टांचा नाश करूं आणि मग माझा तुझ्याशी आप्तपणा कसा आहे तें समजून घे ६.
अ॒भि प्रेहि॑ दक्षिण॒तो भ॑वा॒ मेऽ॑धा वृ॒त्राणि॑ जङ्घनाव॒ भूरि॑ ।
अभि प्र इहि दक्षिणतः भव मे अध वृत्राणि जङ्घनाव भूरि
ये, पुढे ये, माझ्या उजव्या हाताकडे उभा रहा म्हणजे आपण दोघे मिळून शत्रू असंख्य असले, तरी त्यांचा पार फडशा उडवूं. (उत्साहाचा) आधार असें जे उत्कृष्ट मधुर पेय ते तुजला मी अर्पण करितो आणि आपण उभयतां मिळून ते स्वस्थपणे प्राशन करूं ७.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ८४ (मन्युसूक्त) ऋषी - मन्यु तापस : देवता - मन्यु : छंद १-३ - त्रिष्टुभ्; अवशिष्ट - जगती
त्वया॑ मन्यो स॒रथं॑ आरु॒जन्तो॒ हर्ष॑माणासो धृषि॒ता म॑रुत्वः ।
त्वया मन्यो इति स-रथं आरुजन्तः हर्षमानासः धृषिताः मरुत्वः
हे दैवी आवेशा, तुझ्या सहाय्याने आमचे शूर वीर एकसारख्या रथांत आरोहण करून हर्षाने आणि धौशाने पुढें होऊन शत्रूची फळी फोडून जावोत, त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत. म्हणून ते आपली शस्त्रेंस्त्रीं पाजळून आणि अग्नीप्रमाणे प्रखर होऊन शत्रूवर तुटून पडोत १.
अ॒ग्निरि॑व मन्यो त्विषि॒तः स॑हस्व सेना॒नीर्नः॑ सहुरे हू॒त ए॑धि ।
अग्निः-इव मन्यो इति त्विषितः सहस्व सेनानीः नः सहुरे हूतः एधि
दैवी आवेशा, तूं अग्रीप्रमाणे धगधगीत होऊन चुराडा उडवून दे. हे शत्रुदमना, तूं सेनानायक म्हणून भक्त तुजला हाक मारतात, तर तूं आमचा हो आणि शत्रूंना ठार करून त्यांचे सर्वस्व (सैनिकांना) विभागून दे. आपली ओजस्विता प्रकट करून घातकी दुष्टांना नाहींसे कर २.
सह॑स्व मन्यो अ॒भिमा॑तिं अ॒स्मे रु॒जन् मृ॒णन् प्र॑मृ॒णन् प्रेहि॒ शत्रू॑न् ।
सहस्व मन्यो इति अभि-मातिं अस्मे इति रुजन् मृणन् प्र-मृणन् प्र इहि शत्रून्
हे दैवी आवेशा, आमच्यावर चाल करणार्या दुष्टाला पादाक्रांत कर. शत्रूंचे तुकडे करून, त्यांना ठार करून, त्यांचा पार विध्वंस करून टाकून पुढे सर. तुझें तेजोबल भीषण आहे. त्याला आजपर्यंत कोणी तरी विरोध केला असे झाले आहे काय ? तूंच सत्ताधीश आहेस. अगदी एकटाच प्रकट होणार्या आवेशा, सर्वांना तूंच कह्यात ठेवतोस ३.
एको॑ बहू॒नां अ॑सि मन्यव् ईळि॒तो विशं॑-विशं यु॒धये॒ सं शि॑शाधि ।
एकः बहूनां असि मन्यो इति ईळितः विशम्-विशं युधये सं शिशाधि
हे दैवी आवेशा, बहुतांमध्ये तूंच एकटा स्तुतीस पात्र आहेस. युद्ध करण्यासाठी प्रत्येक घरांतील मनुष्याला तूंच प्रोत्साहन देऊन पुढें ने. ज्याची तेसस्विता कधीं कमी होत नाही अशा हे मन्यो, तुझ्याशी सख्य जोडले म्हणजे आम्ही विजयश्री मिळविण्यास निघतांना आकाश दुमदुमून जाईल येवढी गर्जना करूं ४.
वि॒जे॒ष॒कृदिन्द्र॑ इवानवब्र॒वोऽ॒स्माकं॑ मन्यो अधि॒पा भ॑वे॒ह ।
विजेष-कृत् इन्द्रः-इव अनव-ब्रवः अस्माकं मन्यो इति अधि-पाः भव इह
इंद्राप्रमाणे तूं विजयदाता आणि निरपवाद आचरणाचा आहेस; तर दैवी आवेशा, येथे तूंच आमचा अधिपति हो. हे दुष्टदमना, तुझ्या गोड नांवाचाच आम्ही महिमा गातो आणि तूं जेथून आलास तो अक्षय निर्झरही आम्ही जाणतो ५.
आभू॑त्या सह॒जा व॑ज्र सायक॒ सहो॑ बिभर्ष्यभिभूत॒ उत्त॑रम् ।
आभूत्या सह-जाः वज्र सायक सहः बिभर्षि अभि-भूते उत्-तरं
तूं सर्वंकष सामर्थ्यासह प्रकट होतोस. हे वज्रा, हे (दिव्य) शरा, हे सर्व विजया, अत्युत्कृष्ट असें दुर्दम्य बल आपल्या ठिकाणीं वागवितोस. तर हे मन्यो, तूं आपल्या कर्तृत्वाने, हे सर्वजनाहूता, या उत्कृष्ट यशोधन देणार्या संग्रामामध्ये आमच्याशी स्नेहार्द्रतेने रहा ६.
संसृ॑ष्टं॒ धनं॑ उ॒भयं॑ स॒माकृ॑तं अ॒स्मभ्यं॑ दत्तां॒ वरु॑णश्च म॒न्युः ।
सम्-सृष्टं धनं उभयं सम्-आकृतं अस्मभ्यं दत्तां वरुणः च मन्युः
एकत्रच राहणारे आणि दोन्ही प्रकारांनी एकेठिकाणी येणारे असें जे (दिव्य आणि ऐहिक) धन आहे, तें वरुण आणि मन्यु आम्हांला अर्पण करोत; आणि आमच्या शत्रूच्या छातीत धडकी भरून ते पराभूत होऊन चोहोंकडे पळून जाऊन नष्ट होवोत ७.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ८५ (विवाहसूक्त)
ऋषी - सूर्या सावित्री : देवता - १-५ सोम; ६-१६ सूर्याविवाह; १७ देवगण; १८ सोम व अर्क;
स॒त्येनोत्त॑भिता॒ भूमिः॒ सूर्ये॒णोत्त॑भिता॒ द्यौः ।
सत्येन उत्तभिता भूमिः सूर्येण उत्तभिता द्यौः
ही पृथ्वी सत्याच्या आधारानेंच वर उचलून धरलेली आहे, आणि आकाश हे सूर्याने तोलून धरलेले आहे. आदित्य (रूप नक्षत्रे) हेही सत्य धर्मानेच आपआपल्या जागी राहिलेले आहेत, तसाच सोम (चंद्र) देखील गगनांतच आसरा धरून राहिला आहे १.
सोमे॑नादि॒त्या ब॒लिनः॒ सोमे॑न पृथि॒वी म॒ही ।
सोमेन आदित्याः बलिनः सोमेन पृथिवी मही
आदित्य (दिव्य विभूति) सोमामुळे बलवान् आहेत. सोमाच्या, सोमवनस्पतीच्याच योगाने पृथिवीला "महि" म्हणजे श्रेष्ठ हे नांव प्राप्त झाले आहे २.
सोमं॑ मन्यते पपि॒वान् यत् स॑म्पिं॒षन्त्योष॑धिम् ।
सोमं मन्यते पपि-वान् यत् सम्-पिंषन्ति ओषधिं
जी वनस्पती चुरून रस काढतात तिला प्राशन करणारा मनुष्य "मी सोम प्राशन केला" असें समजतो; पण ज्ञानी सत्पुरुष ज्याला खरोखरीचा सोम असें म्हणतात, त्याला कोणीच प्राशन करूं शकत नाही ३.
आ॒च्छद्वि॑धानैर्गुपि॒तो बार्ह॑तैः सोम रक्षि॒तः ।
आच्चत्-विधानैः गुपितः बार्हतैः सोम रक्षितः
व्यापक अशा नियमांमुळे हे सोमा, तूं सुरक्षित आहेस आणे बार्हृतांनी (=सोमपालांनी) तुझे संरक्षण केले आहे. ग्राव्यांचा ध्वनि ऐकूनच तूं स्तिमित होतोस. परंतु भूमीवर राहणारा कोणींही मनुष्य तुला भक्षण करूं शकत नाही ४.
यत् त्वा॑ देव प्र॒पिब॑न्ति॒ तत॒ आ प्या॑यसे॒ पुनः॑ ।
यत् त्वा देव प्र-पिबन्ति ततः आ प्यायसे पुनरिति
दिव्यविबुध मात्र तुझें पाहिजे तितकें प्राशन करितात; पण त्यामुळे तूं पुन: पुन: पुष्ट होतोस. वायु हा सोमाचा (चंद्राचा) संरक्षक आहे आणि चंद्र हा वर्षाचे माप आहे ५.
रैभ्या॑सीदनु॒देयी॑ नाराशं॒सी न्योच॑नी ।
रैभी आसीत् अनु-देयी नाराशंसी नि-ओचनी
उच्च स्वरांत म्हणण्याची जी "ऋचा" तीच जिची पाठराखणी सखी झाली, मनुष्यांनी केलेल्या स्तुति ह्या जिच्या सेविका झाली, अशा त्या सूर्यकन्येचे मंगलवस्त्र "गाथेनें"च अलंकृत केले ६.
चित्ति॑रा उप॒बर्ह॑णं॒ चक्षु॑रा अ॒भ्यञ्ज॑नम् ।
चित्तिः आः उप-बर्हणं चक्षुः आः अभि-अजनं
(देवाचे) चिंतन हीच त्या सूर्यकन्येची (डोकें टेकण्याची) उशी, त्याचे दर्शन हेच तिचे अंजन, आकाश आणि पृथिवी हे तिचे रत्नभांडार. ह्या सर्व वस्तु सूर्यकन्या पतिगृही निघाली त्यावेळी तिच्याजवळ होत्या ७.
स्तोमा॑ आसन् प्रति॒धयः॑ कु॒रीरं॒ छन्द॑ ओप॒शः ।
स्तोमाः आसन् प्रति-धयः कुरीरं चन्दः ओपशः
तसेंच स्तवनसूक्तें ही (तिच्या रथाचे) कठडे, कुरीर छंद हा चांदवा, अश्विदेव हे उभयतां विवाहेच्छु तरुण आणि अग्नि हा त्या मिरवणुकीचा धुरीण झाला ८.
सोमो॑ वधू॒युर॑भवद॒श्विना॑स्तां उ॒भा व॒रा ।
सोमः वधू-युः अभवत् अश्विना आस्तां उभा वरा
सोम हाही तिच्याशी विवाह करण्यास उद्युक्त झाला; उभयतां अश्विदेव हेही उद्युक्त झाले आणि म्हणूनच मनाने पतीची आकांक्षा धरणार्या सूर्येला सविता देवाने तिच्या पतीला अर्पण केले ९.
मनो॑ अस्या॒ अन॑ आसी॒द्द्यौरा॑सीदु॒त छ॒दिः ।
मनः अस्याः अनः आसीत् द्यौः आसीत् उत चदिः
रथांपेक्षांही तिचे उत्सुक मनच रथ बनले, आकाश हे रथावरील निळा चांदवा; दोन जे शुभ्र तेजोगोल तेच (म्हणजे त्यांच्याप्रमाणे) बैलाची शुभ्रा जोडी तिच्या रथाला जुंपली; आणि अशा थाटाने सूर्या पतिगृही गेली १०.
ऋ॒क्सा॒माभ्यां॑ अ॒भिहि॑तौ॒ गावौ॑ ते साम॒नाव् इ॑तः ।
ऋक्-सामाभ्यां अभि-हितौ गावौ ते सामनौ इतः
ऋक् आणि साम ह्या दोहोंनी तुझ्या रथाचे बैल आपल्या जागीं एकसारखे राहतील अशा रीतीने जोडले आहेत. रविचंद्र हे तुझ्या रथाची दोन चाकें होवोत कारण त्यांचा द्युलोकांतील मार्ग तर अतिशय सुगम म्हणून प्रख्यातच आहे ११.
शुची॑ ते च॒क्रे या॒त्या व्या॒नो अक्ष॒ आह॑तः ।
शुची ते चक्रे इति यात्याः वि-आनः अक्षः आहतः
तुझ्या रथाची दोन्ही चाकें स्वच्छ आणि तेजस्वी आहेत. तूं आतां पतिगृही निघाली आहेस; आणि सर्वव्यापी वायु हा तुझ्या रथाचा आंस आहे., तो ठोकून पक्का बसविलेला असा आंस आहे अशा रीतीने पतिगृही निघालेल्या सूर्येने मनोगामी रथावर आरोहण केले १२.
सू॒र्याया॑ वह॒तुः प्रागा॑त् सवि॒ता यं अ॒वासृ॑जत् ।
सूर्यायाः वहतुः प्र अगात् सविता यं अव-असृजत्
याप्रमाणे सूर्येच्या विवाहाची मिरवणूक निघाली; सवित्याने ती मिरवणूक काढली, कारण मघा नक्षत्रावर गाईंना हांकून घरी नेतात आणि फाल्गुनी नक्षत्रावर विवाह साजरा होतो १३.
यद॑श्विना पृ॒च्छमा॑ना॒व् अया॑तं त्रिच॒क्रेण॑ वह॒तुं सू॒र्यायाः॑ ।
यत् अश्विना पृच्चमानौ अयातं त्रि-चक्रेण वहतुं सूर्यायाः
हे अश्वीहो, तुम्ही ही पृच्छा करीत आपल्या तीन चाकी रथांतून सूर्येच्या विवाहासाठी आगमन केलेत आणि त्या करितां तुम्हांला सकल दिव्यविबुधांनी अनुमति दिली. तेव्हां पूषाने (तुम्हांलाच) आपले वडील म्हणून आदराने पाचारण केले १४.
यदया॑तं शुभस्पती वरे॒यं सू॒र्यां उप॑ ।
यत् अयातं शुभः पती इति वरे--यं सूर्यां उप
हे मंगलाधीश अश्वीहो, जेव्हां तुम्ही वर देण्यासाठी सूर्येच्या संन्निध प्राप्त झालांत, तेव्हा तुमच्या रथाचे एक चाक कोणत्या ठिकाणी होते ? आणि वरदान देण्यासाठी तुम्ही तरी उभे कोणत्या ठिकाणी राहिलांत ? १५.
द्वे ते॑ च॒क्रे सू॑र्ये ब्र॒ह्माण॑ ऋतु॒था वि॑दुः ।
द्वे इति ते चक्रे इति सूर्ये ब्रह्माणः ऋतु-था विदुः
हे सूर्यकन्ये, तुझ्या रथाची जी दोन चाके आहेत ती ऋतूंच्या अनुरोधाने ज्ञानी सत्पुरुष जाणतात. त्या चाकांपैकी एक तर गुप्तच आहे आणि जे महात्मे आहेत, तेच ते चाक कोणते हे ओळखू शकतात १६.
सू॒र्यायै॑ दे॒वेभ्यो॑ मि॒त्राय॒ वरु॑णाय च ।
सूर्यायै देवेभ्यः मित्राय वरुणाय च
याप्रमाणे सूर्या हिला, तसेंच दिव्यविबुधांना, जगत् मित्राला, वरुणाला आणि जे महाबुद्धिमान् ह्या सृष्टीला म्हणजे तिच्यामध्ये उत्पन्न झालेल्या वस्तूंना जाणतात त्यांनाही आम्ही आतांच प्रणाम केला १७.
पू॒र्वा॒प॒रं च॑रतो मा॒ययै॒तौ शिशू॒ क्रीळ॑न्तौ॒ परि॑ यातो अध्व॒रम् ।
पूर्व-अपरं चरतः मायया एतौ शिशूइति क्रीळन्तौ परि यातः अध्वरं
ईश्वरी मायेने पूर्वेकडून पश्चिमेकडे चालत चालत हे दोन खेळकर बालक (भक्ताच्या) अध्वर यागाकडे गमन करतात. त्यांपैकी एक बालक सकल भुवनाचे निरीक्षण करतो आणि दूसरा ऋतूंना (योग्य वेळी) पालटून पुन: पुन: उत्पन्न होतो १८.
नवो॑-नवो भवति॒ जाय॑मा॒नोऽ॑ह्नां के॒तुरु॒षसां॑ ए॒त्यग्र॑म् ।
नवः-नवः भवति जायमानः अह्नां केतुः उषसां एति अग्रं
उत्पन्न होतांच जो अधिक अधिक नवीन दिसूं लागतो असा ध्वज, दिनमणीच्या ज्या उषा त्यांचा ध्वज, सर्वांच्या अगोदर पुढे येतो आणि पुढे सरतांच दिव्यबिभूतींना ज्यांचा त्यांचा हविर्भाग अर्पण होतो; तसाच चंद्रमा हा ही (स्तोतृजनाला) दीर्घायुष्य देतो १९.
सु॒किं॒शु॒कं श॑ल्म॒लिं वि॒श्वरू॑पं॒ हिर॑ण्यवर्णं सु॒वृतं॑ सुच॒क्रम् ।
सु-किंशुकं शल्मलिं विश्व-रूपं हिरण्य-वर्णं सु-वृतं सु-चक्रं
उत्तम किम्शुक, उत्तम सांवरी अशा काष्ठाचा बनविलेला हा जो नक्षीदार सोनेरी रथ आहे, त्याची चाकें कशी सहज फिरतात; तर हे सूर्ये, अशा रथांत आरोहण करून तूं अमरत्वाच्या लोकी गमन कर आणि हा विवाह तूं आपल्या पतीला मंगलमय कर २०.
उदी॒र्ष्वातः॒ पति॑वती॒ ह्येख्प् षा वि॒श्वाव॑सुं॒ नम॑सा गी॒र्भिरी॑ळे ।
उत् ईर्ष्व अतः पति-वती हि एषा विश्व-वसुं नमसा गीः-भिः ईळे
येथून तूं आतां उठ; ही आतां विवाहित झाली. हे अखिल धनाढ्या विश्वावसू, तूजला प्रणिपात करून मी तुझी स्तुति करीत आहे, तर तूं पितृगृही वास करणार्या दुसर्या सुंदर कन्यकेचा इच्छा कर. जन्मापासून जो तुझा भाग असेल तोच तूं घे. २१.
उदी॒र्ष्वातो॑ विश्वावसो॒ नम॑सेळा महे त्वा ।
उत् ईर्ष्व अतः विश्ववसो इतिविश्व-वसो नमसा ईळामहे त्वा
हे विश्वावसूम तू आता येथून उठ. प्रणामपूर्वक आम्ही तुझे स्तवन करीत आहो; तर आतां तों दुसर्या पृथुनितंबवती तरुणीची इच्छा कर. आणि ह्या स्त्रीला तिच्या पतीशीच संयुक्त कर २२.
अ॒नृ॒क्ष॒रा ऋ॒जवः॑ सन्तु॒ पन्था॒ येभिः॒ सखा॑यो॒ यन्ति॑ नो वरे॒यम् ।
अनृक्षराः ऋजवः सन्तु पन्थाः येभिः सखायः यन्ति नः वरे--यं
ज्या मार्गांनी आमचे आप्तबांधव आमच्या विवाहमंगलाला येतात ते त्यांचे मार्ग सरळ आणि निष्कंटक असे असोत. अर्यमा आणि (भाग्याधिपति) भग हे आम्हांला ध्येयांकडे नेवोत, हे दिव्यविबुधांनो, ही पति-पत्नींचे जोडी अप्रतिम होऊन आनंदांत राहो २३.
प्र त्वा॑ मुञ्चामि॒ वरु॑णस्य॒ पाशा॒द्येन॒ त्वाब॑ध्नात् सवि॒ता सु॒शेवः॑ ।
प्र त्वा मुचामि वरुणस्य पाशात् येन त्वा अबध्नात् सविता सु-शेवः
ज्याच्या योगाने सुखदारा स्त्रष्टा जो (सविता) त्याने तुजला बद्ध केले, त्या वरुणाच्या पाशापासून मी तुजला अगदी मुक्त करतो आणि सद्धर्माच्या अधिष्ठानांत, पुण्यशील महात्म्यांच्या लोकांत तुजला पतीसह मी सुखरूपपणे ठेवून देतो २४.
प्रेतो मु॒ञ्चामि॒ नामुतः॑ सुब॒द्धां अ॒मुत॑स्करम् ।
प्र इतः मुचामि न अमुतः सु-बद्धां अमुतः करं
ह्या ठिकाणापासून (ह्या पितृगृहापासून) मी तुझी मुक्तता करतो; परंतु त्या दुसर्या (ठिकाणांतून) मात्र तुला सोडीत नाही. उलट चांगली बळकट बांधून ठेवितो आणि हे परमेश्वरा (इंद्रा), हे मनोरथकर्षका, ही वधू सुपुत्रवती आणि सौभाग्यवती होईल असे कर २५.
पू॒षा त्वे॒तो न॑यतु हस्त॒गृह्या॒श्विना॑ त्वा॒ प्र व॑हतां॒ रथे॑न ।
पूषा त्वा इतः नयतु हस्त-गृह्य अश्विना त्वा प्र वहतां रथेन
पूषा तुला आपल्या रथांत बसवून पोहोंचवून देवोत. तूं आतां घरधनीण झाली आहेस, तर आपल्या घरी जा. आतां तुझ्या हाती सर्व आहे; तर घरच्या मंडळींना काय सांगावयाचे ते आतां तूंच सांगत जा २६.
इ॒ह प्रि॒यं प्र॒जया॑ ते॒ सं ऋ॑ध्यतां अ॒स्मिन् गृ॒हे गार्ह॑पत्याय जागृहि ।
इह प्रियं प्र-जया ते सं ऋध्यतां अस्मिन् गृहे गार्ह-पत्याय जागृहि
येथे तुला जे आवडत असेल त्याची तुझ्या मुलाबाळांच्या योगाने अभिवृद्धि होवो आणि गृहस्थधर्म उत्तम रीतीने पाळला जावा म्हणून तूं या घरात दक्ष रहा, या पतीबरोबर तूं एकरूप हो आणि वृद्ध होऊन इतर मंडळींना असाच उपदेश करीत जा २७.
नी॒ल॒लो॒हि॒तं भ॑वति कृ॒त्यास॒क्तिर्व्यज्यते ।
नील-लोहितं भवति कृत्या आसक्तिः व्यज्यते
कैदाशीण किंवा हडळ म्हणतात तिचा वर्ण निळा तांबडा असतो. जिची लसलस स्पष्ट दिसते, तीच कैदाशीण, तिची जात हां हां म्हणतां वाढते; पण तिचा जो पति होतो, तो मात्र संसाराच्या फाशांत सांपडतो २८.
परा॑ देहि शामु॒ल्यं ब्र॒ह्मभ्यो॒ वि भ॑जा॒ वसु॑ ।
परा देहि शामुल्यं ब्रह्म-भ्यः वि भज वसु
म्हणून तूं (गरिबांना) वस्त्र देत जा आणि विद्वानांना, श्रोत्रियांना द्रव्य देत जा. (नाही तर) हांव हीच हडळ, तिला पाय फुटून तीच पत्नी होऊन (तुझ्या) पतीच्या बोकांडी बसेल २९.
अ॒श्री॒रा त॒नूर्भ॑वति॒ रुश॑ती पा॒पया॑मु॒या ।
अश्रीरा तनूः भवति रुशती पापया अमुया
पति जेव्हां (लोभीपणाने) स्त्रीच्या वस्त्राने (अर्थात् तिच्या पैशाने) आपले शरीर झांकतो, तेव्हां अशाच तीव्र पापबुद्धिमुळे त्याचे शरीर निस्तेज होते ३०.
ये व॒ध्वश्च॒न्द्रं व॑ह॒तुं यक्ष्मा॒ यन्ति॒ जना॒दनु॑ ।
ये वध्वः चन्द्रं वहतुं यक्ष्माः यन्ति जनात् अनु
ह्या वधूच्या विवाहाच्या उज्ज्वल मिरवणुकीतील लोकांपासून जय क्षयादि रोग उत्पन्न होत असले, तर ते रोग मूल जेथून आले तिकडेच ह्या यजनीय दिव्य विभूति त्यांना घालवून देवोत ३१.
मा वि॑दन् परिप॒न्थिनो॒ य आ॒सीद॑न्ति॒ दम्प॑ती ।
मा विदन् परि-पन्थिनः ये आसीत् अन्ति दम्पती इतिदम्-पती
जे वाटमारे चोर वाटेंत दबा धरून बसतात, ते ह्या दंपत्याकडे वर डोळा करूनही न पाहोत. ते दंपती सुगम मार्गांनी सर्व अवघड ठिकाणे मागे टाकून जावोत. शत्रु त्यांचे समोर धूम ठोकून पळून जावोत ३२.
सु॒म॒ङ्ग॒लीरि॒यं व॒धूरि॒मां स॒मेत॒ पश्य॑त ।
सु-मङ्गलीः इयं वधूः इमां सम्-एत पश्यत
ही वधू उत्तम दैवाची आहे. या, जवळ या, हिला पहा आणि ही सौभाग्यवती होवो असा आशीर्वाद देऊन मग आपाअपल्या घरी परत जा ३३.
तृ॒ष्टं ए॒तत् कटु॑कं ए॒तद॑पा॒ष्ठव॑द्वि॒षव॒न् नैतदत्त॑वे ।
तृष्टं एतत् कटुकं एतत् अपाष्ठ-वत् विष-वत् न एतत् अत्तवे
हे अमुक खराब आहे, तमुक तिखट आहे, हे अगदीच टाकावू पचपचीत आहे आणि हे विषाप्रमाणे आहे, हे खाण्यायोग्य नाही, अशा रीतीने जो विद्वान ब्राह्मण सूर्येची आवडनिवड जाणत असेल तोच त्या वधूच्या पाठराखणीला योग्य होय ३४.
आ॒शस॑नं वि॒शस॑नं॒ अथो॑ अधिवि॒कर्त॑नम् ।
आशसनं वि-शसनं अथो इति अधि-विकर्तनं
कांही वस्तूंना तोडून, कांहींना कापून, कातरून जुळले त्याप्रमाणे सजावट केली, तर आतां सूर्येचे रूप पहा, विद्वान ब्रह्माच तिला सजवितो ३५.
गृ॒भ्णामि॑ ते सौभग॒त्वाय॒ हस्तं॒ मया॒ पत्या॑ ज॒रद॑ष्टि॒र्यथासः॑ ।
गृभ्णामि ते सौभग-त्वाय हस्तं मया पत्या जरत्-अष्टिः यथा असः
हा तुझा हात मी तुझ्या सौभाग्याकरितां मी आपल्या हाती धरतो. तर मी जो तुझा पति त्याच्यासह तूं वद्ध हो; पहा की, भाग्याधिपति, अर्यमा, सविता, पुरंध्रि ह्या सर्व दिव्य विबुधांनी मी गृहस्थधर्मा आचरावा म्हणून तुजला माझ्या हाती दिले आहे ३६.
तां पू॑षञ् छि॒वत॑मां॒ एर॑यस्व॒ यस्यां॒ बीजं॑ मनु॒ष्याख्प् वप॑न्ति ।
तां पूषन् शिव-तमां आ ईरयस्व यस्यां बीजं मनुष्याः वपन्ति
हे पूषा, जी अत्यंत कल्याणप्रद आहे आणि जिच्या ठिकाणी मनुष्ये बीज पेरतात अशी ही सुपीक भूमि आमच्या हाती येईल असें कर. ती उत्कंठेने आमच्या मांडीवर बसेल आणि आम्हीही तिला उत्कंठेने जवळ घेऊन आनंद करूं ३७.
तुभ्यं॒ अग्रे॒ पर्य॑वहन् सू॒र्यां व॑ह॒तुना॑ स॒ह ।
तुभ्यं अग्रे परि अवहन् सूर्यां वहतुना सह
तुझ्यासाठी सूर्येला तिच्या परिवारासह त्यांनी पुढे पाठविली आहे; तर हे अग्ने, प्रत्येक स्त्री तिच्या पतीला तूं संततीसह पुन: अर्पण कर ३८.
पुनः॒ पत्नीं॑ अ॒ग्निर॑दा॒दायु॑षा स॒ह वर्च॑सा ।
पुनरिति पत्नीं अग्निः अदात् आयुषा सह वर्चसा
अग्नीनेंही पत्नीला दीर्घायुष्य आणि ओजस्विता यांच्यासह पुन: परत दिली, आणि तिचा जो पति त्यालाही दीर्घायुषी केले. तो शंभर वर्षे जगो ३९.
सोमः॑ प्रथ॒मो वि॑विदे गन्ध॒र्वो वि॑विद॒ उत्त॑रः ।
सोमः प्रथमः विविदे गन्धर्वः विविदे उत्-तरः
प्रथम सोमाने हिचे पालन केले. त्यानंतर गंधर्वाने पालन केले, नंतर तिसर्याने तुझे (पालन) अग्नीने केले; आतां चवथ्याने तुझा जो मानवी पति तो करील ४०.
सोमो॑ ददद्गन्ध॒र्वाय॑ गन्ध॒र्वो द॑दद॒ग्नये॑ ।
सोमः ददत् गन्धर्वाय गन्धर्वः ददत् अग्नये
म्हणूनच सोमाने गंधर्वाकडे दिली, गंधर्वाने अग्नीकडे दिली आणि अग्नीने हिला माझ्या हाती देऊन वैभव आणि पुत्रही दिले ४१.
इ॒हैव स्तं॒ मा वि यौ॑ष्टं॒ विश्वं॒ आयु॒र्व्यश्नुतम् ।
इह एव स्तं मा वि यौष्टं विश्वं आयुः वि अश्नुतं
तर आतां तुम्ही येथेच रहा; परस्परापासून वियुक्त होऊ नका. संपूर्ण आयुष्याचा लाभ घ्या. आणि पुत्रपौत्रांसह आनंदाने हंसत खेळत आपल्या घरांत नांदा ४२.
आ नः॑ प्र॒जां ज॑नयतु प्र॒जाप॑तिराजर॒साय॒ सं अ॑नक्त्वर्य॒मा ।
आ नः प्र-जां जनयतु प्रजापतिः आजरसाय सं अनक्तु अर्यमा
संततीचा दाता (ईश्वर तो) आम्हाकडून संतति उत्पन्न करो, आम्हांला अगदी वार्धक्य येईपर्यंत तो आर्यजनांना प्रेमळ असा अर्यमा आम्हांला धडधाकट ठेवो. सर्वांना कल्याणप्रदच होणारी तूं आतां पतीच्या मंदिरांत गमन कर आणि आम्हां मनुष्यांना मंगलदायक आणि पशूंनाही मंगलदायक हो ४३.
अघो॑रचक्षु॒रप॑तिघ्न्येधि शि॒वा प॒शुभ्यः॑ सु॒मनाः॑ सु॒वर्चाः॑ ।
अघोर-चक्षुः अपति-घ्नी एधि शिवा पशु-भ्यः सु-मनाः सु-वर्चाः
तुझी दृष्टि मंगलकारक असो; तूं आपल्या आयुष्यभर पतीला जिवंत राखणारी, पवित्र मनाची आणि तेजस्विनी अशी होऊन पशूंवरदेखील माया करणारी हो. तूं ईश्वरभक्त हो; तुझ्या पोटी शूरवीर पुत्र जन्मास येवोत आणि कल्याणरूपा अशी तूं आमच्या मनुष्यांना आणि पशूंनाही मंगलदायक हो ४४.
इ॒मां त्वं इ॑न्द्र मीढ्वः सुपु॒त्रां सु॒भगां॑ कृणु ।
इमां त्वं इन्द्र मीढवः सु-पुत्रां सु-भगां कृणु
((ईश्वरा) इंद्रा, हे कामनावर्धका, हिला तूं उत्तम पुत्रवती आणि सौभाग्यवती कर. हिला दहा पुत्र होऊं दे म्हणजे हिचा पति हाच त्यानंतर अकरावा शोभेल असे कर ४५.
स॒म्राज्ञी॒ श्वशु॑रे भव स॒म्राज्ञी॑ श्व॒श्र्वां भ॑व ।
सम्-राजी श्वशुरे भव सम्-राजी श्वश्र्वां भव
तूं घरची राणी आहेस असे सासर्याला वाटूं दे, तूं घरची मालकीण आहेस असे सासूला वाटूं दे, आणि दिरांनाही तू घरांतील मुख्य कारभारीण आहेस असे वाटेल अशा पद्धतीने वाग ४६.
सं अ॑ञ्जन्तु॒ विश्वे॑ दे॒वाः सं आपो॒ हृद॑यानि नौ ।
सं अजन्तु विश्वे देवाः सं आपः हृदयानि नौ
सकल दिव्य विबुध आम्हांला उत्कृष्ट स्थितीमध्ये ठेवोत. आपोदेवी आमची अंत:करणे एकत्र करोत. विश्वजीवन वायु आणि सृष्टिनिर्माता (ईश्वर) हा आम्हांला सुव्यवस्थित ठेवो आणि फलदायी (भाग्यदेवता) देखील आमचा वास नेहमी एकत्रच होईल असे करो ४७.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ८६ (इंद्र-इंद्राणी-वृषाकपि संवाद, इंद्राचे पालुपदसूक्त)
ऋषी - ७, १३, २३ - वृषाकपि ऐंद्र: २-६, ९-१०, १५-१८ - इंद्राणी; अवशिष्ट - इंद्र
वि हि सोतो॒रसृ॑क्षत॒ नेन्द्रं॑ दे॒वं अ॑मंसत ।
वि हि सोतोः असृक्षत न इन्द्रं देवं अमंसत
त्यांनी सोमाचा रस पिळण्याचे सोडून दिले आणि प्रत्यक्ष देव जो इंद्र त्याच्याकडे सुद्धां लक्ष दिले नाही; ज्या यज्ञामध्यें वृषाकपि (सोमरस प्राशन करून) आनन्दमग्न झाला तेथे हा प्रकार घडला. पण सर्व सर्व पुष्टिकारक शक्तिमध्ये उत्कृष्ट (कोण असेल तर) माझा प्रियसखा इंद्र हा होय; तोच विश्वापेक्षांही अत्यंत श्रेष्ठ आहे १.
परा॒ हीन्द्र॒ धाव॑सि वृ॒षाक॑पे॒रति॒ व्यथिः॑ ।
परा हि इन्द्र धावसि वृषाकपेः अति व्यथिः
(असें आहे तर इंद्रा) हे काय आहें ? तुला वृषाकपीमुळे अत्यंत त्रास होत असतांहि तूं पुन्हा तिकडेच धांवत सुटतोस, तो इतका की दुसरीकडे कोठेंही सोम प्राशन करण्याकरितां तूं गेलास असे आढळतच नाही. तरीसुद्धां इंद्र हा यच्चावत् वस्तूंपेक्षां अत्यंत श्रेष्ठ आहे (असें लोक म्हणतातच) २.
किं अ॒यं त्वां वृ॒षाक॑पिश्च॒कार॒ हरि॑तो मृ॒गः ।
किं अयं त्वां वृषाकपिः चकार हरितः मृगः
(इंद्राणि) या वृषाकपीने किंवा ह्या हरिद्वर्ण मृगाने तुझे असे केले तरी काय ? की त्याच्यावर तूं रुष्ट व्हावेस ? हा (वृषाकपि) म्हणजे आर्य लोकांचे अभिवृद्धिकारक धनच जणो नाही काय ? ३.
यं इ॒मं त्वं वृ॒षाक॑पिं प्रि॒यं इ॑न्द्राभि॒रक्ष॑सि ।
यं इमं त्वं वृषाकपिं प्रियं इन्द्र अभि-रकसि
हे इंद्रा, तुला प्रिय असलेल्या ह्या वृषकपीचे तूं चोहोंकडून जरी रक्षण करीत आहेस, तरी देखील वराहांची शिकार करणारा हा (माझा) श्वान त्याचे दोन्ही कान आपल्या दातांनी एका लचक्यासरशी तोडून टाकील बरें! मग इंद्र हा सर्वांपेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे, (तर असेना) ४.
प्रि॒या त॒ष्टानि॑ मे क॒पिर्व्यक्ता॒ व्यदूदुषत् ।
प्रिया तष्टानि मे कपिः वि-अक्ता वि अदूदुषत्
कारण व्यवस्थित रीतीने तयार करून पुढे मांडलेल्या माझ्या प्रिय वस्तू ह्या वृषाकपीने सर्व अगदी नासून टाकल्या; म्हणून त्याचे आतां मी डोकेंच उडवितें पहा! दुसर्याचा असा छळ करणाराला मी कधीं सुख भोगू देणार नाही! (मग) इंद्र हा ...अत्यंत श्रेष्ठ आहे (तरी त्याचे काय ?) ५.
न मत् स्त्री सु॑भ॒सत्त॑रा॒ न सु॒याशु॑तरा भुवत् ।
न मत् स्त्री सुभसत्-तरा न सुयाशु-तरा भुवत्
माझ्यापेक्षां अतिशय भाग्यवती स्त्री दुसरी कोणी नाही. उत्कृष्ट भोगविलास भोगणारी अशीही दुसरी कोणी झाली नाही; (नुसते पाहतांच) देहभान विसरावयास लावणारी माझ्यावांचून कोणीच नाही; आणि पाय उचलून आनंदाने नाचावयास लावणारीहि कोणी नाही ६.
उ॒वे अ॑म्ब सुलाभिके॒ यथे॑वा॒ङ्ग भ॑वि॒ष्यति॑ ।
सुवे अम्ब सुलाभिके यथाइव अङ्ग भविष्यति
हे खरें आहे, पण आई मातु:श्री, हे सौभाग्यसंपन्ने, तुला जे हवे तसे सहज घडेल; पण बाईसाहेब (तुम्ही असे बोललांत की) माझी कंबर, माझे पाय, माझे मस्तक हे मात्र पांखराच्या पंखाप्रमाणे थरथरू. लागतात (त्याची वाट काय ?) ७.
किं सु॑बाहो स्वङ्गुरे॒ पृथु॑ष्टो॒ पृथु॑जाघने ।
किं सुबाहो इतिसु-बाहो सु-अङ्गुरे पृथुस्तो इतिपृथु-स्तो पृथु-जघने
हे रुचिरभुजशोभिनी, हे चारुगात्री, हे मनोहरानने, हे लुलितकुन्तले, हे नितम्बिनी, हे वीरपत्नी तूं ह्या आमच्या वृषाकपीवर उगाच कां बरे संतापलीस ? (मी) इंद्र सर्वांपेक्षा अत्यंत श्रेष्ठ आहे ना ? ८.
अ॒वीरां॑ इव॒ मां अ॒यं श॒रारु॑र॒भि म॑न्यते ।
अवीराम्-इव मां अयं शरारुः अभि मन्यते
कां म्हणजे! हा दुरात्मा मी जणों काय (कोणी सटरफटर आहे) मी वीरपत्नी नाहीच असेंच उद्दामपणें समजतो. मी वीरमाता आहे नां ? मी इंद्राची पत्नी आहे ना, आणि मरुतांचा मित्र माझा इंद्रा हा... अत्यंत श्रेष्ठ आहे ना ?(होय,) ९.
सं॒हो॒त्रं स्म॑ पु॒रा नारी॒ सम॑नं॒ वाव॑ गच्छति ।
सम्-होत्रं स्म पुरा नारी समनं वा अव गच्चति
मंगल यज्ञ, किंवा मंगल समारंभ ह्यांना पूर्वीपासून स्त्रिया जातच असतात आणि न्यायमूलक तो सद्धर्म त्याची नियामक म्हणूनच तूं वीरमाता झाली आहेस ना ? (मग राहिले काय ?) १०.
इ॒न्द्रा॒णीं आ॒सु नारि॑षु सु॒भगां॑ अ॒हं अ॑श्रवम् ।
इन्द्राणीं आसु नारिषु सु-भगां अहं अश्रवं
(अहो, हे खरेच आहे) आणि मीहि पण असेंच ऐकले आहे की सर्व स्त्रियांमध्ये इंद्राणी हीच अत्यंत भाग्यशालिनी आहे. कारण हिचा जो पति इंद्र तो असा आहे की त्याला वार्धक्य येणार नाही आणि मृत्युहि नाही; (उघडच आहे कीं) इंद्र हाच विश्वापेक्षां अत्यंत श्रेष्ठ आहे ११.
नाहं इ॑न्द्राणि रारण॒ सख्यु॑र्वृ॒षाक॑पेरृ॒ते ।
न अहं इन्द्राणि ररण सख्युः वृषाकपेः ऋते
पण इंद्राणि, तुला सांगूच का ? की माझा प्रियसखा वृषाकपि ह्याच्यावांचून मला चैनच पडत नाही. आणि हे त्याचे आवडते हविर्द्रव्य त्याला अर्पण केले म्हणजे ते दिव्य विभूतिंनाच पोहोचते १२.
वृषा॑कपायि॒ रेव॑ति॒ सुपु॑त्र॒ आदु॒ सुस्नु॑षे ।
वृषाकपायि रेवति सु-पुत्रे आत् ओं इति सु-स्नुषे
हे ऐश्वर्यसंपन्ने, हे वीरपुत्रवती, हे उत्तम स्नुषासंपन्ने, हे वृषाकपीचे मातु:श्री, हा तुझा इंद्र तुझे "उक्ष" पक्वान्न तर भक्षण करीलच, पण त्याच्याशिवाय तूं जें कांही त्याला प्रिय असे पक्वान्न केले असशील तेंहि स्वीकारील बरें! १३.
उ॒क्ष्णो हि मे॒ पञ्च॑दश सा॒कं पच॑न्ति विंश॒तिम् ।
उक्ष्णः हि मे पच-दश साकं पचन्ति विंशतिं
पहा, माझ्यासाठी पंधरा उक्ष आणि पंधराच काय, वीस देखील उक्ष भक्तजन एकदम तयार करीत आहेत. आणि मी जरी बलाढ्य आहे तरी तुझ्यासाठी ते पक्वान्न इतके खाईन की माझ्या पोटाच्या दोन्ही कुशी अगदी भरगच्च भरतील, (पण आतां रागावू नको) १४.
वृ॒ष॒भो न ति॒ग्मशृ॑ङ्गोऽ॒न्तर्यू॒थेषु॒ रोरु॑वत् ।
वृषभः न तिग्म-शृङ्गः अन्तः यूथेषु रोरुवत्
अगदी अणुकुचीदार शिंगाचा वृषभ जसा आपल्या कळपांमध्ये आनंदाने डुरकण्या फोडतो, तसा हा तुझ्या सोमरसाचा मन्थनदण्ड गर्जत आहे; तो आणि हे इंद्रा, तुझा भाविक भक्त ज्या सोमवल्लीला पिळून रस काढतो तो रस तुझ्या हृदयात आनंदाची उकळी उत्पन्न करतात १५.
न सेशे॒ यस्य॒ रम्ब॑तेऽन्त॒रा स॒क्थ्याख्प् कपृ॑त् ।
न सः ईशे यस्य रम्बते अन्तरा सक्थ्या कपृत्
(दुसरे असे की) ज्या (पशू)च्या दोन्ही पायांच्या मधील भाग खाली सुटलेला असतो तो पशू बळकट नसतो, तर जो खाली बसला असला तरी ज्याचे केसाळ (पुच्छ) कमानदार होते तोच बळकट १६.
न सेशे॒ यस्य॑ रोम॒शं नि॑षे॒दुषो॑ वि॒जृम्भ॑ते ।
न सः ईशे यस्य रोमशं नि-सेदुषः वि-जृम्भते
(छे! छे तसे नव्हे) जो खाली बसला असला तरी ज्याचे केसाळ पुच्छ कमान करते तो बळकट नव्हे; पण ज्याच्या पायाच्या मधील (पोटाचा) भाग खाली लबलबित सुटलेला असतो तोच बलकट असतो १७.
अ॒यं इ॑न्द्र वृ॒षाक॑पिः॒ पर॑स्वन्तं ह॒तं वि॑दत् ।
अयं इन्द्र वृषाकपिः परस्वन्तं हतं विदत्
म्हणूनच हे इंद्रा, हा कसला तरी एक पशु मारलेला आहे तो वृषाकपीला घेऊं द्या. ही त्याची तरवार, ही सुरी, हा भात शिजविण्याचा नवा गुंड आणि हे गाडाभर वाळलेले सर्पण, हे सर्व येथे ठेवले आहे १८.
अ॒यं ए॑मि वि॒चाक॑शद्विचि॒न्वन् दासं॒ आर्य॑म् ।
अयं एमि वि-चाकशत् वि-चिन्वन् दासं आर्यं
ठीक आहे; तर हा मी आलोच. दुष्ट दुर्जन कोण आणि सज्जन आर्य कोण त्याची निवड करूनच मी सर्वांवर लक्ष ठेवतो. जो शुद्धान्त:करणाने मजसाठी सोमरस पिळतो त्याचाच रस मी प्राशन करतो आणि त्याच सद्बुद्धिसंपन्न भक्तावर कृपादृष्टि ठेवतो १९.
धन्व॑ च॒ यत् कृ॒न्तत्रं॑ च॒ कति॑ स्वि॒त् ता वि योज॑ना ।
धन्व च यत् कृन्तत्रं च कति स्वित् ता वि योजना
ते (ठिकाण) विस्तीर्ण आहे तरी तुकडा तोडल्याप्रमाणे अलग दिसते आणि मध्ये अन्तर किती योजने असेल ते असो, पण हे वृषाकपि, तूं आता खालच्या (नेदीयस) लोकांत जाशील तेव्हां तेथून आमच्या गृहांच्या जवळच (एक स्थान आहे तेथे) ये २०.
पुन॒रेहि॑ वृषाकपे सुवि॒ता क॑ल्पयावहै ।
पुनः आ इहि वृषाकपे सुविता कल्पयावहै
हे वृषाकपि, खरोखरच तू परत ये. आम्ही दोघेंहि तुला समाधान वाटेल अशीच तुझी व्यवस्था ठेऊं. हा जो (प्राण्यांच्या) निद्रेचा भंग करणारा (रवि-तो) जसा आपल्या मार्गाने जातो, तसाच तूंहि आपल्या घरी परत जाशील २१.
यदुद॑ञ्चो वृषाकपे गृ॒हं इ॒न्द्राज॑गन्तन ।
यत् उदचः वृषाकपे गृहं इन्द्र अजगन्तन
पण हे वृषाकपे, हे इंद्रा, तुम्ही दोघे येथे वर स्वगृही आला मात्र आणि तुम्ही येता, न येतां तोच हा दुष्ट नीच मृग -लोकांना नादी लावून फसविणारा मृग- कोठच्या कोठे नाहिसा झाला २२.
पर्शु॑र्ह॒ नाम॑ मान॒वी सा॒कं स॑सूव विंश॒तिम् ।
पशुः ह नाम मानवी साकं ससूव विंशतिं
ही जी पर्शु ती मनुष्याच्या वंशातील आहे. ती एकदमच वीस लेकरांना प्रसवली. चिन्ता नाही, तिचे पोट दुखतच होते. पण भले (महाराज) आतां सर्व ठीक आहे. ती आतां चांगली खुशाल आहे २३.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ८७ (राक्षोघ्न अग्निसूक्त) ऋषी - पायु भारद्वाज : देवता - राक्षोघ्न अग्नि : छंद - २२-२५ - अनुष्टुभ्; अवशिष्ट - त्रिष्टुभ्
र॒क्षो॒हणं॑ वा॒जिनं॒ आ जि॑घर्मि मि॒त्रं प्रथि॑ष्ठं॒ उप॑ यामि॒ शर्म॑ ।
रक्षः-हनं वाजिनं आ जिघर्मि मित्रं प्रथिष्ठं उप यामि शर्म
राक्षसांचा नाश करणारा सत्वधीर असा जो अग्नि त्याला मी घृताहुति अर्पण करितो; जगन्मित्र परम विख्यात असा जो अग्नि त्याला आश्रयार्थ शरण जातो. हा अग्नि यज्ञकर्मांनी तीव्र झाला म्हणजे धडाक्याने प्रज्वलित होऊन दिवसा आणि तसेंच रात्रीहि संकटापासून आमचे रक्षण करो १.
अयो॑दंष्ट्रो अ॒र्चिषा॑ यातु॒धाना॒न् उप॑ स्पृश जातवेदः॒ समि॑द्धः ।
अयः-दंष्ट्रः अर्चिषा यातु-धानान् उप स्पृश जात-वेदः सम्-इद्धः
तूं लोहाप्रमाणे तीक्ष्ण दाढांचा आहेस; तर हे वस्तुमात्र ज्ञात्या देवा, प्रज्वलित होऊन दुष्ट जादूगारांना आपल्या ज्वालेने तूं होरपळून टाक. जे पिशाच्चांनाच देव समजतात त्यांना आपल्या जिव्हेने पकडून भाजून टाक. जे कच्चेंच मांस खातात त्यांनाही आपल्या (ज्वालामय) मुखांत दाबून धरून (त्यांचे) तुकडे कर २.
उ॒भोभ॑यावि॒न्न् उप॑ धेहि॒ दंष्ट्रा॑ हिं॒स्रः शिशा॒नोऽ॑वरं॒ परं॑ च ।
उभा उभयाविन् उप धेहि दंष्ट्रा हिंस्रः शिशानः अवरं परं च
हे उभयलोक-स्पर्शी देवा, (राक्षस)-घातक असा तूं आपल्या दोन्ही दाढा पाजळून दुष्ट चेटक्यांना त्यांमध्ये खोचून धर. जे कांही खाली भूमीवर आहे, जें वर आहे तेथे आणि हे जगत् राजा, अन्तरिक्षांमध्ये देखील तूं चोहोंकडे हिंडून शोधून पहा; आणि दुष्ट जादूगार जेथे सांपडतील तेथे आपल्या तीक्ष्ण दांढेंखाली त्यांना गच्च करकचून धरून रगडून टाक ३.
य॒ज्ञैरिषूः॑ सं॒नम॑मानो अग्ने वा॒चा श॒ल्याँ अ॒शनि॑भिर्दिहा॒नः ।
यजैः इषूः सम्-नममानः अग्ने वाचा शल्यान् अशनि-भिः दिहानः
(आमच्या) य़ज्ञांच्या योगाने (संतुष्ट होऊन) तूं आपले बाण बरोबर धनुष्यावर ठेऊन नेम धरून उभा राहतोस; भक्तांच्या स्तुतीने (प्रसन्न होऊन) अशनींच्या योगाने तूं त्या बाणांची टोके झगझगीत करतोस, तर त्या बाणांनी आणि अशनींनी दुष्ट मायावी जादूगारांच्या छातींवर प्रहार कर आणि जे हात त्यांनी वर उचलले असतील, ते त्यांचे हात तूं मोडून टाक ४.
अग्ने॒ त्वचं॑ यातु॒धान॑स्य भिन्धि हिं॒स्राशनि॒र्हर॑सा हन्त्व् एनम् ।
अग्ने त्वचं यातु-धानस्य भिन्धि हिंस्रा अशनिः हरसा हन्तु एनं
हे अग्नि, मायावी जादूगारांची चामडी सोलून टाक आणि तुझा प्राणघातक अशनि आपल्या तीव्रतेने त्यांना ठार करील (असें कर). हे सकल वस्तु जाणणार्या देवा, त्या दुष्टांची तूं खांडोळी करून टाक, म्हणजे मांस खाण्यासाठी वखवखलेली श्वापदें तरी त्यांचे ते तुकडे वेंचून खाऊन टाकतील ५.
यत्रे॒दानीं॒ पश्य॑सि जातवेद॒स्तिष्ठ॑न्तं अग्न उ॒त वा॒ चर॑न्तम् ।
यत्र इदानीं पश्यसि जात-वेदः तिष्ठन्तं अग्ने उत वा चरन्तं
सर्व भूतजात जाणणार्या देवा, आतां येथे जो कोणी राहिलेला किंवा भटकत असलेला अथवा अन्तरिक्षांमध्ये निरनिराळ्या रुपाने उडत असलेला मायावी दुष्ट पाहशील तेथे तेथे पारध्याच्याप्रमाणे झगझगीत घासलेल्या बाणाने त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार कर. ६
उ॒ताल॑ब्धं स्पृणुहि जातवेद आलेभा॒नादृ॒ष्टिभि॑र्यातु॒धाना॑त् ।
उत आलब्धं स्पृणुहि जात-वेदः आलेभानात् ऋष्टि-भिः यातु-धानात्
हे सकल सृष्टिवेत्त्या देवा, आपल्या आयुधांनी व लूटमारीने द्रव्य हरण करणार्या दुष्ट जादूगाराने जे दडपून ठेवले असेल, ते द्रव्य आपले हत्त्यार चालवून तूं हिसकावून घे, आणि त्यांच्यासमोर उभा राहून आणि ज्वालेले भडका उडवून देऊन त्यांना ठार कर; म्हणजे कच्चे मांस खाणारे प्राणी-कोल्हे, लांडगे गिधाडे- हे त्यांना फाडून पार खाऊन फस्त करतील ७.
इ॒ह प्र ब्रू॑हि यत॒मः सो अ॑ग्ने॒ यो या॑तु॒धानो॒ य इ॒दं कृ॒णोति॑ ।
इह प्र ब्रूहि यतमः सः अग्ने यः यातु-धानः यः इदं कृणोति
हे अग्ने, असा कोण असेल: जो असे दुष्कर्म करीत असेल, तो कोण ते आम्हांला सांग, (आणि) हे उत्कट तारुण्याढ्या देवा, आपल्या जळजळीत पेटलेल्या काष्टांनी त्याला भाजून काढ आणि मानवांना अवलोकन करणारा जो तूं त्या तुझ्या डोळ्याच्या धाकांत सर्व दुष्टांना ठेव ८.
ती॒क्ष्णेना॑ग्ने॒ चक्षु॑षा रक्ष य॒ज्ञं प्राञ्चं॒ वसु॑भ्यः॒ प्र ण॑य प्रचेतः ।
तीक्ष्णेन अग्ने चक्षुषा रक्ष यजं प्राचं वसु-भ्यः प्र नय प्र-चेतः
हे अग्ने, आपल्या तीक्ष्ण दृष्टीने या यज्ञाचे रक्षण कर. हे सर्वज्ञा, त्याला योग्य मार्गाने उत्कृष्ट धनांकडे ने. तेजाने घवघवीत आणि राक्षसांचा समूळ नाश करणार्या अशा हे मानवदृष्ट्या देवा, कोणीही जादूगार तुला फसवून तुझा घात करूं शकत नाहीं. ९.
नृ॒चक्षा॒ रक्षः॒ परि॑ पश्य वि॒क्षु तस्य॒ त्रीणि॒ प्रति॑ शृणी॒ह्यग्रा॑ ।
नृ-चक्षाः रक्षः परि पश्य विक्षु तस्य त्रीणि प्रति शृणीहि अग्रा
हे मानवदृष्ट्या देवा, चारी दिशांकडे दृष्टि फेंकून राक्षसाला हुडकून काढ आणि त्याचे तीन्ही शेंडे छाटून टाक. हे अग्ने, त्याची पाठ तूं आपल्या आगीने भाजून काढ आणि जादूगाराची पाळेमुळे खणून काढून त्याचे तीन तीन तुकडे उडीव १०.
त्रिर्या॑तु॒धानः॒ प्रसि॑तिं त एत्व् ऋ॒तं यो अ॑ग्ने॒ अनृ॑तेन॒ हन्ति॑ ।
त्रिः यातु-धानः प्र-सितिं ते एतु ऋतं यः अग्ने अनृतेन हन्ति
तो मायावी जादूगार तुझ्या पाशांत तीन तीन ठिकाणी गुंतून पडो. हे अग्ने, आपल्या लबाडीने जो सत्याचा घात करतो, त्याला आपल्या ज्वालेने करपून टाकून, हे सकल वस्तुज्ञा देवा, भक्तजनांच्या समक्ष त्याला खाली आपटून चेंचून टाक ११.
तद॑ग्ने॒ चक्षुः॒ प्रति॑ धेहि रे॒भे श॑फा॒रुजं॒ येन॒ पश्य॑सि यातु॒धान॑म् ।
तत् अग्ने चक्षुः प्रति धेहि रेभे शफ-आरुजं येन पश्यसि यातु-धानं
हे अग्निदेवा, तूं भक्तांमध्ये ती दृष्टि आण की जनावरांप्रमानी आपल्या खुरांनी लाथ मारणार्या दुष्ट जादूगारावर जिच्या योगाने तूं टेहेळणी ठेवतोस. अथर्वाप्रमाणें तूं आपल्या दिव्य ज्वालेने त्या दुष्टाला, ज्याने आपल्या खोटेपणाने सत्याला बट्टा आणला, त्या दुष्टाला आहाळून टाक १२.
यद॑ग्ने अ॒द्य मि॑थु॒ना शपा॑तो॒ यद्वा॒चस्तृ॒ष्टं ज॒नय॑न्त रे॒भाः ।
यत् अग्ने अद्य मिथुना शपातः यत् वाचः तृष्टं जनयन्त रेभाः
हे अग्ने, आज कोणच्या तरी स्त्री-पुरुषांच्या जोडप्यांनी जे कोणास कांही शिव्याशाप दिले असतील, तसेंच, भक्तजन वाचेने जे वाईट शब्द बोलले असतील, ते त्यांना मनातून क्रोध येतो म्हणून बोलतात आणि दुष्टांवर बाणाने प्रहार करण्याची त्यामुळे (त्यांना) इच्छा होते; तर तोच बाण तूं जादूगारांच्या छातीत खुपसून दे १३.
परा॑ शृणीहि॒ तप॑सा यातु॒धाना॒न् परा॑ग्ने॒ रक्षो॒ हर॑सा शृणीहि ।
परा शृणीहि तपसा यातु-धानान् परा अग्ने रक्षः हरसा शृणीहि
तूं आपल्या तप्ततेने जादुगारांना भाजून काढ. त्याच आगीने राक्षसांनाहि पार होरपळून टाक. पिशाच्यांना भजणार्या दुष्टांना जाळून टाक आणि मनुष्यांचा प्राण घेण्यांत ज्यांना मजा वाटते, त्या क्रूरांचीहि तूं प्रखर होऊन पार राखरांगोळी कर १४.
परा॒द्य दे॒वा वृ॑जि॒नं शृ॑णन्तु प्र॒त्यग् ए॑नं श॒पथा॑ यन्तु तृ॒ष्टाः ।
परा अद्य देवाः वृजिनं शृणन्तु प्रत्यक् एनं शपथाः यन्तु तृष्टाः
आज तुझ्या दिव्यशक्ति दुष्ट पातक्याला जाळून खाक करोत. त्याचे जे घाणेरडे शिव्याशाप ते त्याच्यावरच उलटोत; खोटे बोलून चोर्या करणार्या दुष्टांच्या मर्मस्थानी तुझे बाण जाऊन घुसोत आणि विश्वरूप जो तूं, त्या तुझ्या पाशांत हे दुष्ट जादूगार अडकले जावोत १५.
यः पौरु॑षेयेण क्र॒विषा॑ सम॒ङ्क्ते यो अश्व्ये॑न प॒शुना॑ यातु॒धानः॑ ।
यः पौरुषेयेण क्रविषा सम्-अङ्क्ते यः अश्व्येन पशुना यातु-धानः
जो दुष्ट जादूगार पशूच्या, अश्वाच्या; किंबहुना मनुष्याच्याहि कच्च्या मांसाने आपले अंग चोपडतो, जो अवध्य अशा धेनूचे दूध हिरावून नेतो; अशा दुष्टांची मुंडकी तूं आपल्या तप्त शस्त्राने छाटून टाक १६.
सं॒व॒त्स॒रीणं॒ पय॑ उ॒स्रिया॑या॒स्तस्य॒ माशी॑द्यातु॒धानो॑ नृचक्षः ।
संवत्सरीणं पयः उस्रियायाः तस्य मा अशीत् यातु-धानः नृ-चक्षः
तुकतुकीत अशा पुष्ट गाईंचे दूध वर्षभर पिण्यास मिळते; ते दूध दुष्ट जादूगाराला चाखण्याला कधी मिळू नये असे कर. हे मानवहितदर्शी अग्निदेवा, जो दुष्ट (दुग्धरूप) अमृताने आपलेंच पोट यथेच्छ भरूं पाहील तो समोर आल्याबरोबर तूं आपल्या ज्वालेने त्याच्या मर्माच्या ठिकाणी घाव घाल १७.
वि॒षं गवां॑ यातु॒धानाः॑ पिब॒न्त्व् आ वृ॑श्च्यन्तां॒ अदि॑तये दु॒रेवाः॑ ।
विषं गवां यातु-धानाः पिबन्तु आ वृश्च्यन्तां अदितये दुः-एवाः
धेनूचे विष(म्हणजे धेनूंना चारण्याकरितां कोणी विष आणील तर तेंच विष) मात्र दुष्ट जादूगार प्राशन करोत. अदितीसाठी ते दुरात्मे तुझ्या हातून छाटले जावोत, जगत् स्त्रष्टा देव त्यांना उधळून लावो. औषधांच्या कोणत्याहि भागाचा त्यांना लाभ न मिळो १८.
स॒नाद॑ग्ने मृणसि यातु॒धाना॒न् न त्वा॒ रक्षां॑सि॒ पृत॑नासु जिग्युः ।
सनात् अग्ने मृणसि यातु-धानान् न त्वा रक्षांसि पृतनासु जिग्युः
हे अग्नि, तूं प्राचीन काळापासूनच जादुगाराचा आणि राक्षसांचा संहार करीत आला आहेस. पण राक्षस मात्र युद्धामध्ये तुझा कधीहि पराभव करूं शकले नाहीत. तर कच्चे मांस खाणार्या त्या दुष्टांना त्यांच्या पिशाव देवांसह तूं जाळून भस्म कर आणि तुझ्या स्वर्गीय शस्त्राच्य तडाक्यांतून त्यांना जिवंत सोडूं नको १९.
त्वं नो॑ अग्ने अध॒रादुद॑क्ता॒त् त्वं प॒श्चादु॒त र॑क्षा पु॒रस्ता॑त् ।
त्वं नः अग्ने अधरात् उदक्तात् त्वं पश्चात् उत रक्ष पुरस्तात्
हे अग्नि, तूं खालील बाजूने (दक्षिण दिशेकडून) आमचे रक्षण कर, तसेंच वरून उत्तरेकडून, पाठीमागून आणि समोरूनहि तूं आमचे रक्षण कर. तुझ्या कधींहि न खंगणार्या ज्या प्रखर ज्वाला त्या प्रदीप्त होऊन पातकांत रुळणार्या त्या दुष्टांना जाळून भस्म करोत २०.
प॒श्चात् पु॒रस्ता॑दध॒रादुद॑क्तात् क॒विः काव्ये॑न॒ परि॑ पाहि राजन् ।
पश्चात् पुरस्तात् अधरात् उदक्तात् कविः काव्येन परि पाहि राजन्
तूं काव्यज्ञ (आहेस तर) आमच्या कवनाच्या प्रेमळतेने, आमच्या पाठीमागून, समोरून, खालील दिशेकडून आणि तसेंच वरच्या बाजूकडूनहि, हे जगत् राजा, आमचे सर्व बाजूंनी रक्षण कर. हे भक्तसख्या, तूं आम्हां भक्तमित्रांना सुरक्षित ठेव, हे वार्धक्यरहिता, हे मरणनरहिता, तूं स्तवनकर्त्यांना, तूं मर्त्य मानवांना सुरक्षित कर २१.
परि॑ त्वाग्ने॒ पुरं॑ व॒यं विप्रं॑ सहस्य धीमहि ।
परि त्वा अग्ने पुरं वयं विप्रं सहस्य धीमहि
हे अग्नि, हे दुर्दम्यबला, तुझे ध्यान, तुज ज्ञानमयाचे ध्यान आम्ही करीत असतो, तूं आम्हाला प्राकाराप्रमाणे आहेस, म्हणून तुजला आमच्या सभोंवती स्थापन करितो. तूं असा आहेस की तुझा वर्ण प्रत्येक दिवशी धाडस उत्पन्न करतो आणि (धर्मव्यवस्था) उध्वस्त करणार्या राक्षसांना ठार करतोस २२.
वि॒षेण॑ भङ्गु॒राव॑तः॒ प्रति॑ ष्म र॒क्षसो॑ दह ।
विषेण भङ्गुर-वतः प्रति स्म रक्षसः दह
सर्व व्यवस्था उध्वस्त करणार्या राक्षसांना तू विषाच्या आगीने भाजून काढ. आपल्या रखरखीत आणि झगझगीत भाल्यांच्या धगधगीत टोकांनी भोसकून टाक २३.
प्रत्य॑ग्ने मिथु॒ना द॑ह यातु॒धाना॑ किमी॒दिना॑ ।
प्रति अग्ने मिथुना दह यातु-धाना किमीदिना
हे अग्ने, तू "किमीदिन्" या नांवाच्या दुष्ट जादुगारांच्या जोड्या जाळून खाक कर. मी तुजला जणों घासून तीव्रच करीत आहे. तूं कोणाकडून फसला जाणार नव्हेस. तर हे स्तुतिमर्मज्ञा, माझ्या मननीय स्तवनांनी तू जागरूक रहा २४.
प्रत्य॑ग्ने॒ हर॑सा॒ हरः॑ शृणी॒हि वि॒श्वतः॒ प्रति॑ ।
प्रति अग्ने हरसा हरः शृणीहि विश्वतः प्रति
हे अग्नी, तूं आपल्या तप्त शस्त्राने प्रखर झाला आहेस; तर जिकडे तिकडे ज्वालांनी धुमाकूळ उडवून दे आणि जादुगार राक्षसांच्या प्राक्त्रमी सैन्याचे अगदी राईएवढे तुकडे कर २५.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ८८ (सूर्यस्वरूपी अग्निसूक्त, अग्नि वायुविवाद) ऋषी - मूर्धन्वत् अथवा वामदेव्य आंगिरस : देवता : सूर्य, वैश्वानर अग्नि : छंद - त्रिष्टुभ्
ह॒विष्पान्तं॑ अ॒जरं॑ स्व॒र्विदि॑ दिवि॒स्पृश्याहु॑तं॒ जुष्टं॑ अ॒ग्नौ ।
हविः पान्तं अजरं स्वः-विदि दिवि-स्पृशि आहुतं जुष्टं अग्नौ
कधींहि क्षीण न होणारें आणि प्राशन करण्यास योग्य असे प्रिय हविरन्न (आम्ही) स्वर्लोकप्रापक आणि द्युलोकव्यापी अग्नीमध्यें आहुतिरूपाने अर्पण केले आहे. भुवनांचे रक्षण करण्याकरितां दिव्य विभूति त्याच्याच धर्माप्रमाणे वागून आपल्या स्वकीय सामर्थ्याने विख्यात झाल्या १.
गी॒र्णं भुव॑नं॒ तम॒साप॑गूळ्हं आ॒विः स्वरभवज् जा॒ते अ॒ग्नौ ।
गीर्णं भुवनं तमसा अप-गूळ्हं आविः स्वः अभवत् जाते अग्नौ
सर्व जग अंधाराने (जणों) गिळलेले होते ते त्यांत पक्के गढलेले होते, पणन अग्नि प्रकट होतांच दिव्य प्रकाशहि दृग्गोचर झाला; म्हणूनच दिव्यविभूति, पृथिवी, आकाश, दिव्योदके आणि औषधी हे सर्व या अग्निच्या सहवासांत मग्न झाले २.
दे॒वेभि॑र्न्व् ऐषि॒तो य॒ज्ञिये॑भिर॒ग्निं स्तो॑षाण्य॒जरं॑ बृ॒हन्त॑म् ।
देवेभिः नु इषितः यजियेभिः अग्निं स्तोषाणि अजरं बृहन्तं
यज्ञयोग्य जे दिव्यविबुध त्याच्याच प्रेरणेने मी श्रेष्ठ अजरामर अग्नीचे स्तवन करीत आहे. ज्याने आपल्या प्रकाशाने ही पृथिवी आणि द्युलोक असे दोन्ही गोल आणि अन्तराल हे सर्व पसरून दिले आहेत ३.
यो होतासी॑त् प्रथ॒मो दे॒वजु॑ष्टो॒ यं स॒माञ्ज॒न्न् आज्ये॑ना वृणा॒नाः ।
यः होता आसीत् प्रथमः देव-जुष्टः यं सम्-आजन् आज्येन वृणानाः
जो दिव्यविबुधाना मान्य असा पहिला यज्ञ संपादक झाला आणि ज्यांनी त्याला निमंत्रण करून आज्याने उद्वर्तन केले, त्या अग्नीने-आज आपल्यास जे उडणारे आणि धांवणारे प्राणी दिसतात, तसेंच जे अचल किंवा चल दिसते, ते सर्व त्याने शक्तीने उत्फुल्ल केले आहे; कारण तो सकल वस्तूंना जणणारा आहे. ४.
यज् जा॑तवेदो॒ भुव॑नस्य मू॒र्धन्न् अति॑ष्ठो अग्ने स॒ह रो॑च॒नेन॑ ।
यत् जात-वेदः भुवनस्य मूर्धन् अतिष्ठः अग्ने सह रोचनेन
हे वस्तुजात जाणणार्या अग्निदेवा, तूं जेव्हां आपल्या दीप्तीने सर्व भुवनांच्या मस्तकावर उभा राहिलास, तेव्हा आम्ही तुजला आमच्या मननांनी आणि स्तुतींनी हलवून सोडले. असा तूं यज्ञयोग्य आहेस. द्यावापृथिवींनाहि तूंच व्यापून टाकले आहेस ५.
मू॒र्धा भु॒वो भ॑वति॒ नक्तं॑ अ॒ग्निस्ततः॒ सूर्यो॑ जायते प्रा॒तरु॒द्यन् ।
मूर्धा भुवः भवति नक्तं अग्निः ततः सूर्यः जायते प्रातः उत्-यन्
रात्रीच्या वेळी अग्नि हा भूलोकाचे मस्तक होतो; पण नंतर प्रात:काळी उदय पावणारा सूर्य बनतो; परंतु ही सर्व अद्भुत करणी पूज्य अशा दिव्यविभूतींची आहे असे समजून भक्तजन हा आळस न करितां तत्परतेने आपले कर्त्तव्यकर्म करीतच राहतो ६.
दृ॒शेन्यो॒ यो म॑हि॒ना समि॒द्धोऽ॑रोचत दि॒वियो॑निर्वि॒भावा॑ ।
दृशेन्यः यः महिना सम्-इद्धः अरोचत दिवि-योनिः विभावा
जो दर्शनीय अग्नि आपल्या महिम्यानेच प्रज्वलित झाला, तो द्युलोकनिवासे देव देदीप्यमान होऊन सुप्रकाशित झाला. )नंतर) त्या अग्निच्या ठिकाणी सकल भक्तरक्षक दिव्य जनांनी सूक्तांचा उच्चार करून आहुति अर्पण केली ७.
सू॒क्त॒वा॒कं प्र॑थ॒मं आदिद॒ग्निं आदिद्ध॒विर॑जनयन्त दे॒वाः ।
सूक्त-वाकं प्रथमं आत् इत् अग्निं आत् इत् हविः अजनयन्त देवाः
दिव्यविभूतींनी प्रथम सूक्तवाणी (सूक्तें) निर्माण केली. नंतर अग्नि आणि त्यानंतर मग आहुति याप्रमाणे वस्तु निर्माण केल्या. तोच भक्तरक्षक अग्नि ह्या (देवां)ना यज्ञरूप झाला. तो यज्ञरूप झाला तेव्हा< त्याचे ज्ञान आकाशाला झाले, पृथिवीला झाले आणि दिव्योदकांनाहि झाले ८.
यं दे॒वासोऽ॑जनयन्ता॒ग्निं यस्मि॒न्न् आजु॑हवु॒र्भुव॑नानि॒ विश्वा॑ ।
यं देवासः अजनयन्त अग्निं यस्मिन् आ अजुहवुः भुवनानि विश्वा
ज्या अग्नीला देवांनी प्रकट केले, ज्याच्या ठिकाणी संपूर्ण भुवनांची आहुति त्यांनी अर्पण केली, त्या अग्नीने न्याय मार्गाची स्थापना करून आपल्या तेजाने आणि महिम्याने पृथिवी आणि आकाश यांच्यामध्ये तप्तता उत्पन्न केली ९.
स्तोमे॑न॒ हि दि॒वि दे॒वासो॑ अ॒ग्निं अजी॑जन॒ञ् छक्ति॑भी रोदसि॒प्राम् ।
स्तोमेन हि दिवि देवासः अग्निं अजीजनन् शक्ति-भिः रोदसि-प्रां
स्तोत्रसमूहाच्या योगानेच दिव्यविबुधांनी द्युलोकांत अग्नीला निर्माण केले (म्हणजे) आपल्या सामर्थ्यांनी द्यावापृथिवींना व्याप्त करणार्या अग्नीला प्रकट केले, तेव्हां त्याचे त्यांनी (जगाच्या) उत्पत्तीसाठी तीन प्रकार योजिले, म्हणूच तोच नाना जातींच्या औषधि वनस्पतींना पक्व करतो १०.
य॒देदे॑नं॒ अद॑धुर्य॒ज्ञिया॑सो दि॒वि दे॒वाः सूर्यं॑ आदिते॒यम् ।
यदा इत् एनं अदधुः यजियासः दिवि देवाः सूर्यं आदितेयं
जेव्हा यज्ञयोग्य विबुधांनी अदितीचा पुत्र जो हा सूर्य त्याला द्युलोकांत स्थापन केले, आणि जेव्हां (सूर्य आणि अग्नि असे) दोघेहि संचार करणारे म्हणून त्यांची छान जोडी जमली, तेव्हांच (दिव्यजन) हे सर्व भुवनांना पाहू लागले ११.
विश्व॑स्मा अ॒ग्निं भुव॑नाय दे॒वा वै॑श्वान॒रं के॒तुं अह्नां॑ अकृण्वन् ।
विश्वस्मै अग्निं भुवनाय देवाः वैश्वानरं केतुं अह्नां अकृण्वन्
यच्चयावत् भुवनांच्या हितासाठी सर्वहितकारी अग्नीला जेव्हां दिव्यविभूतींनी दिवसांचा कीर्तिध्वज ठरविला, तेव्हां त्याने देदीप्यमान उषांना (आकाशांत) विस्तारून दिले आणि आपल्या दीप्तीने अंधकाराचा नाश करून दिव्योदकांवरील तम:पटल दूर केले १२.
वै॒श्वा॒न॒रं क॒वयो॑ य॒ज्ञिया॑सोऽ॒ग्निं दे॒वा अ॑जनयन्न् अजु॒र्यम् ।
वैश्वानरं कवयः यजियाः अग्निं देवाः अजनयन् अर्जुर्यं
यज्ञयोग्य आणि स्तुतिमर्मज्ञ अशा दिव्य विबुधांनी सर्वहितकारी आणि कधींहि क्षीण न होणार्या अग्नीला प्रकट केले, तेव्हं पुरातन, अचल तेजोगोल जो सूर्य त्याने यक्षाच्या इकडेतिकडे संचार करणार्या आणि प्रखर शक्तीच्या विशाल प्रमुखाला चीत केले १३.
वै॒श्वा॒न॒रं वि॒श्वहा॑ दीदि॒वांसं॒ मन्त्रै॑र॒ग्निं क॒विं अच्छा॑ वदामः ।
वैश्वानरं विश्वहा दीदि-वांसं मन्त्रैः अग्निं कविं अच्च वदामः
सर्वजन-हितकारी, अत्यंत कांतिमान्, स्तवनांचे हार्द जाणणारा अशा अग्निची आम्ही मंत्रांनी निरंतर स्तुति करितो. ज्याने आपल्या महिम्याने ह्या विस्तीर्ण द्यावापृथिवींना चोहोंकडून घेरून स्वाधीन ठेविले, तो देव त्यांच्या खालच्या बाजूस (जो प्रदेश आहे) आणि वरच्या बाजूसहि जो प्रदेश आहे तेथेंहि आहेच १४.
द्वे स्रु॒ती अ॑शृणवं पितॄ॒णां अ॒हं दे॒वानां॑ उ॒त मर्त्या॑नाम् ।
द्वे इति स्रुती इति अशृणवं पितॄणां अहं देवानां उत मर्त्यानां
पितरांचे देवांचे आणि मानवांचे मिळून दोन मार्ग आहेत असे मी ऐकले आहे. त्या दोन मार्गांनीच हे हालचाल करणारे यच्चयावत् जात असते आणि आकाशारूप पित आणि पृथ्वीरूप माता ह्यांच्यामध्ये ते रहात असते १५.
द्वे स॑मी॒ची बि॑भृत॒श्चर॑न्तं शीर्ष॒तो जा॒तं मन॑सा॒ विमृ॑ष्टम् ।
द्वे इति समीची इतिसम्-ईची बिभृतः चरन्तं शीर्षतः जातं मनसा वि-मृष्टं
मस्तकापासून उत्पन्न झालेल्या आणि मन:(सामर्थ्या)ने शुद्ध झालेल्या सर्वसंचारी प्रकाशाचा जो तेजोगोल त्याला उत्तम रितीने एकत्र वर्तणार्या द्यावापृथिवी धारण करितात आणि तो त्वरित कार्यकर तेजोगोलही कधी न चुकतां प्रकाशित होऊन सर्व भुवनांसमोर उभा राहतो १६.
यत्रा॒ वदे॑ते॒ अव॑रः॒ पर॑श्च यज्ञ॒न्योः कत॒रो नौ॒ वि वे॑द ।
यत्र वदेतेइति अवरः परः च यज-न्योः कतरः नौ वि वेद
दोन यज्ञयोग्य विभूतींमध्ये जेथे संवाद चालतो, त्यांच्यापैकी खालच्या लोकांतील कोण आणि वरच्या लोकांतील कोण हे आपल्या दोघांपैकी कोणाला माहित आहे ? आपल्या ऋत्विज हे-ज्यांत सर्व (विबुधांना) सोमप्राशनाने हर्ष होतोअसा फ़क्त नेहमींचा यज्ञ करूं शकतात; आणि जे (दिव्य विबुध) त्या यज्ञालाहि येतात, पण हे दुसरा कोण सांगू शकेल ? १७.
कत्य॒ग्नयः॒ कति॒ सूर्या॑सः॒ कत्यु॒षासः॒ कत्यु॑ स्वि॒दापः॑ ।
कति अग्नयः कति सूर्यासः कति उषसः कति ओं इति स्वित् आपः
तसेंच अग्नि हे किती आहेत, सूर्य कित्ती आहेत, उषादेवी किती आणि दिव्योदकें तरी किती आहेत (हें तुम्ही सांगाल काय ?) पितरांनो, मी हे थट्टेने किंवा स्पर्धेने विचारीत नाही, तर ही गोष्ट मला समजून घ्यावयाची आहे म्हणून, हे ज्ञानी पितरांनो, ती तुम्हाला विचारतो १८.
या॒व॒न्मा॒त्रं उ॒षसो॒ न प्रती॑कं सुप॒र्ण्योख्प् वस॑ते मातरिश्वः ।
यावत्-मात्रं उषसः न प्रतीकं सु-पर्ण्यः वसते मातरिश्वः
हे मातरिश्वा वायू, उषादेवींच्या रूपाप्रमाणे जितकें भव्य रूप हा उज्वल पंखांचा (तेजोराशी सूर्य) परिधान कारितो, तितकी निष्ठा हा यज्ञप्रविण ब्रह्मा ऋत्विज यज्ञासन्निध राहून आणि होत्याच्या खालच्या बाजूस वसून आपल्या हृदयांत वागवीत असतो १९.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ८९ (इंद्रसूक्त) ऋषी - रेणु वैश्वमित्र : देवता - ५ - इंद्र आणि सोम; अवशिष्ट - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
इन्द्रं॑ स्तवा॒ नृत॑मं॒ यस्य॑ म॒ह्ना वि॑बबा॒धे रो॑च॒ना वि ज्मो अन्ता॑न् ।
इन्द्रं स्तव नृ-तमं यस्य मह्ना वि-बबाधे रोचना वि ज्मः अन्तान्
त्या अत्यंत शौर्यशाली इंद्राचे स्तवन कर. त्याच्या तेजस्वितेच्या भराने ही प्रकाशयुक्त नक्षत्रें अगदीं अडवून टाकली आहेत. तो प्राणिमात्रांचा धारक आहे, त्याने आपल्या विस्तृततेनें पृथ्वीच्या मर्यादा भरून टाकल्या आणि विशालतेने नद्यांच्या महापूर आलेल्या उदकांनाहि मागे टाकले १.
स सूर्यः॒ पर्यु॒रू वरां॒स्येन्द्रो॑ ववृत्या॒द्रथ्ये॑व च॒क्रा ।
सः सूर्यः परि उरु वरांसि आ इन्द्रः ववृत्यात् रथ्याइव चक्रा
तो सूर्य पहा ! इंद्र त्याला रथाच्या चक्राप्रमाणे (आकाशाच्या) विस्तीर्ण पोकळीत फ़िरवील. तो कधींहि एका ठिकाणी न राहणारा असा आहे, तो सळसळत जाणार्या अस्त्राप्रमाणे आहे. त्याने आपल्या प्रखर तेजाने अंधकाराचा समूळ नाश करून टाकला २.
स॒मा॒नं अ॑स्मा॒ अन॑पावृदर्च क्ष्म॒या दि॒वो अस॑मं॒ ब्रह्म॒ नव्य॑म् ।
समानं अस्मै अनप-वृत् अर्च क्ष्मया दिवः असमं ब्रह्म नव्यं
जे सर्वांना सारखे मान्य आहे असें एक अपूर्व प्रार्थनास्तोत्र ह्या (इंद्रा)प्रीत्यर्थ अचल निष्ठेने मोठ्याने म्हण; तो या आकाशापेक्षां ह्या पृथिवीपेक्षां अत्यंत मोठा आहे. हा आर्यांचा स्वामी इंद्र द्युलोकाच्या पृष्ठभागावरूनच जणों सर्व प्राण्यांचे निरीक्षण करतो; परंतु आपल्या भक्ताला कधी मोकलीत नाही ३.
इन्द्रा॑य॒ गिरो॒ अनि॑शितसर्गा अ॒पः प्रेर॑यं॒ सग॑रस्य बु॒ध्नात् ।
इन्द्राय गिरः अनिशित-सर्गाः अपः प्र ईरयं सगरस्य बुध्नात्
ज्यांचा प्रवाह सतत वाहत आहे अशा स्तुति आणि सत्कर्मे यांना मी अन्त:करणाच्या अगदी मूळ देठापासून इंद्राला अर्पण करतो. रथाची चाके जशी आंखाला खिळून टाकावी त्याप्रमाणे त्याने आपल्या शक्तीने पृथिवी आणि आणि आकाश ही एकमेकांशी जखडून टाकिली आहेत ४.
आपा॑न्तमन्युस्तृ॒पल॑प्रभर्मा॒ धुनिः॒ शिमी॑वा॒ञ् छरु॑माँ ऋजी॒षी ।
आपान्त-मन्युः तृपल-प्रभर्मा धुनिः शिमी-वान् शरु-मान् ऋजीषी
सोमरस हा असा आहे की त्याचे प्राशन केले असतां नखशिखांत आवेश उत्पन्न होतो, तो झपाट्यासरशी भरपूर तृप्ति उत्पन्न करून (शत्रूला) गदगदा हलवून आपटतो. तो सशस्त्र आणि तीव्रवेगी आहे. पण इंद्र हा असा आहे की त्याच्या पुढे मोठमोठी अरण्ये अगदी क्षुद्र झुडपाप्रमाणे वाटतात आणि ज्या ज्या वस्तु इंद्रासारख्या आहेत असे म्हणावे, त्या त्या वस्तु त्याच्याशी काहींएक सादृश्य दाखवूं शकत नाहीत ५.
न यस्य॒ द्यावा॑पृथि॒वी न धन्व॒ नान्तरि॑क्षं॒ नाद्र॑यः॒ सोमो॑ अक्षाः ।
न यस्य द्यावापृथिवी इति न धन्व न अन्तरिक्षं न अद्रयः सोमः अक्षारिति
ज्याच्यापर्यंत पृथिवी पोहोचूं शकत नाही, अन्तराळ अथवा मोठमोठे पर्वतहि निकटवर्ति होऊं शकत नाहीत, त्या इंद्राजवळ सोम हा मात्र वहात वहात गेला. आणि त्याचा आवेश एकदा पसरूं लागला की कोणतीही वस्तु कितीही कठीण असो तिच्या त्याने ठिकर्या उडविल्याच; आणि वस्तु कितीहि अचल ती त्याने फोडून उलथून टाकलीच ६.
ज॒घान॑ वृ॒त्रं स्वधि॑ति॒र्वने॑व रु॒रोज॒ पुरो॒ अर॑द॒न् न सिन्धू॑न् ।
जघान वृत्रं स्व-धितिः वनाइव रुरोज पुरः अरदत् न सिन्धून्
त्याच्या खड्गाने वृत्राचा नाश केला. (कुर्हाडीने) झाडें तोडावी त्याप्रमाणे त्याच्या दुर्गांचा भेद केला; महानद्यांना जणों वाट खोदून दिली, मातीचा नवा घडा फोडावा तसा पर्वत तडाक्यासरशी त्याने फोडून टाकला आणि त्या इंद्राने आपोआप जोडल्या जाणार्या (किरणरूप) अश्वांनी जिकडे तिकडे प्रकाश विखरून दिला ७.
त्वं ह॒ त्यदृ॑ण॒या इ॑न्द्र॒ धीरो॑ऽ॒सिर्न पर्व॑ वृजि॒ना शृ॑णासि ।
त्वं ह त्यत् ऋण-याः इन्द्र धीरः असिः न पर्व वृजिना शृणासि
हे इंद्रा, तूं पातक रूप ऋणांचा नाश करणारा आहेस; तूं प्राज्ञ आहेस. आणि तरवारीने तुकडे करावेत त्याप्रमाणे दोषांच्या तूं ठिकर्या उडवितोस; आणि जे दुष्ट (तुज) जगन्मित्राच्या-वरुणाच्या आज्ञा मोडतात, तूं जिवलग मित्राप्रमाणे असतांहि (तुझ्याशी) जे कृतघ्नपणा करतात, त्यांना तूं छाटून टाकतोस ८.
प्र ये मि॒त्रं प्रार्य॒मणं॑ दु॒रेवाः॒ प्र सं॒गिरः॒ प्र वरु॑णं मि॒नन्ति॑ ।
प्र ये मित्रं प्र अर्यमणं दुः-एवाः प्र सम्-गिरः प्र वरुणं मिनन्ति
जे दुष्टबुद्धिचे आहेत आणि जे जगन्मित्र, अर्यमा यांच्या आज्ञा मोडतात, जे आपली वचने धाब्यावर बसवितात, जे वरुणाला जुमानीत नाहीत, त्या अधम शत्रूंवर हे इंद्रा, तूं आपले घोर हत्त्यार, हे वीरपुंगवा, तूं आपले रक्तवर्ण तडाकेबन्द हत्यार पाजळून प्रहार कर ९.
इन्द्रो॑ दि॒व इन्द्र॑ ईशे पृथि॒व्या इन्द्रो॑ अ॒पां इन्द्र॒ इत् पर्व॑तानाम् ।
इन्द्रः दिवः इन्द्रः ईशे पृथिव्याः इन्द्रः अपां इन्द्रः इत् पर्वतानां
इंद्र हा द्योलोकाचा प्रभु आहे, इंद्र हा पृथिवीचा स्वामी आहे, इंद्र हा उदकांचा अधिपति आहे, इंद्र हा पर्वतांचाहि नियंता आहे. जे उन्नतीला पोहोंचले, त्यांचा ईश्वर इंद्र, आणि जे ज्ञानी आहेत त्यांचाहि प्रभू इंद्रच होय आणि म्हणून मनुष्य हा स्वस्थ उपभोग घेत असो किंवा उद्योगांत गढून गेलेला असो, त्याने निरंतर इंद्राचाच धांवा केला पाहिजे १०.
प्राक्तुभ्य॒ इन्द्रः॒ प्र वृ॒धो अह॑भ्यः॒ प्रान्तरि॑क्षा॒त् प्र स॑मु॒द्रस्य॑ धा॒सेः ।
प्र अक्तु-भ्यः इन्द्रः प्र वृधः अह-भ्यः प्र अन्तरिक्षात् प्र समुद्रस्य धासेः
हा रात्रीपेक्षां दीर्घ, वृद्धि पावणार्या दिवसांनाहि पुरून उरणारा, अन्तरालापेक्षां विशाल आणि अफाट समुद्रापेक्षां विस्तीर्ण आहे. तो वायूच्या मर्यादेला ओलांडून गेलेला, पृथ्वीच्या सीमेपेक्षांहि पलीकडे पोहोंचलेला, महानद्यांच्या प्रवाहापेक्षां त्वरित गतिमान् आणि कोणत्याहि निवासस्थानापेक्षां उत्कृष्ट आहे ११.
प्र शोशु॑चत्या उ॒षसो॒ न के॒तुर॑सि॒न्वा ते॑ वर्ततां इन्द्र हे॒तिः ।
प्र शोशुचत्याः उषसः न केतुः असिन्वा ते वर्ततां इन्द्र हेतिः
प्रभाशालिनी उषेच्या उज्ज्वल ध्वजाप्रमणे झगझगीत असा तुझा भाला, हे इंद्रा, (शत्रूच्या शरीरांत) घूसून जावो; आकाशांतून सुटणार्या अशनिप्रमाणे तूं शत्रूंवर प्रहार कर. तुझ्या धगधगीत शस्त्राने मित्रद्रोही कृतघ्नांना तूं ठार कर १२.
अन्व् अह॒ मासा॒ अन्व् इद्वना॒न्यन्व् ओष॑धी॒रनु॒ पर्व॑तासः ।
अनु अह मासाः अनु इत् वनानि अनु ओषधीः अनु पर्वतासः
(वर्षांतील) महिने हे खरोखर इंद्राच्या आज्ञेला अनुलक्षूनच ठरविले आहेत; वनें, अरण्ये त्याच्याच इच्छेप्रमाणे राहतात; औषधिहि त्याच्याच धोरणाने नांदतात आणि पर्वत देखील तसेंच वर्तन करितात. मंजुळ स्वराने परंतु मोठ्याने ध्वनि (उत्पन्न) करणार्या रोदसीसुद्धां इंद्राला अनुसरूनच वागतात; फार काय पण इंद्र प्रकट होतांच दिव्य उदके हींहि पण त्याच्या मर्जीप्रमाणे नम्र होऊन राहतात १३.
कर्हि॑ स्वि॒त् सा त॑ इन्द्र चे॒त्यास॑द॒घस्य॒ यद्भि॒नदो॒ रक्ष॒ एष॑त् ।
कर्हि स्वित् सा ते इन्द्र चेत्या असत् अघस्य यत् भिनदः रक्षः आईषत्
हे इंद्रा, ती तुझी बरची कोठली होती बरें ? की जिच्या योगाने पापाचरणासाठी हापापलेल्या अधम राक्षसांना तूं भोंसकून ठार केलेस आणि ज्या दुष्टांनी मित्रांचाहि घात केला, गाईगुरांना वधस्थानी मारल्याप्रमाणे ज्यांनी ठार मारले, ते मित्र-घातकी नीच तुझ्या बरचीच्या तडाक्याने ठार होऊन ह्या विस्तीर्ण भूतलावर अस्ताव्यस्त पडले १४.
श॒त्रू॒यन्तो॑ अ॒भि ये न॑स्तत॒स्रे महि॒ व्राध॑न्त ओग॒णास॑ इन्द्र ।
शत्रु-यन्तः अभि ये नः ततस्रे महि व्राधन्तः ओगणासः इन्द्र
जे आमच्याशी शत्रुत्वाचे वर्तन करीत आले, जे आमच्यावर निकराने चढाई करून येत आहेत, ते कोण तर "माजलेले" "ओगण" नांवाचे दुष्ट लोक. तर हे आमचे शत्रु [मृत्यूच्या] काळ्याकुट्ट अंधकारांतच गुरफटून जावोत; आणि तारामण्डित अशा ज्या रात्री त्याहि त्यांचा नाश करोत १५.
पु॒रूणि॒ हि त्वा॒ सव॑ना॒ जना॑नां॒ ब्रह्मा॑णि॒ मन्द॑न् गृण॒तां ऋषी॑णाम् ।
पुरूणि हि त्वा सवना जनानां ब्रह्माणि मन्दन् गृणतां ऋषीणां
भक्तजनांची असंख्य सोम सवने आणि हे इंद्रा, तुझे गुणगायन करणार्या ऋषींची ब्रह्मसूक्ते ह्यांनी पूर्वी जसें तुजला हर्षयुक्त केले तसेंच आतांहि आम्ही सर्वांनी मिळून म्हटलेल्या स्तुतींची तूं मोठ्याने वाहवा कर आणि आम्ही तुजला "अर्क" स्तवनाने विनवीत आहोंत; तर सर्व गोष्टी बाजूला ठेऊन अगोदर आमच्याकडे आगमन कर १६.
ए॒वा ते॑ व॒यं इ॑न्द्र भुञ्जती॒नां वि॒द्याम॑ सुमती॒नां नवा॑नाम् ।
एव ते वयं इन्द्र भुजतीनां विद्याम सु-मतीनां नवानां
याप्रमाणे हे इंद्रा, भक्तांना सुख देणार्या तुझ्या अगदी अपूर्व अशा अनुग्रहबुद्धीचा लाभ आम्हांला घडो; आम्हांला प्रकाशाचा लाभ घडो; प्रेमाने तुझे गुणगायन करणारे आम्ही विश्वामित्रकुलोत्पन्न भक्त हे इंद्रा, खरोखर तुझे आहोत १७.
शु॒नं हु॑वेम म॒घवा॑नं॒ इन्द्रं॑ अ॒स्मिन् भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शुनं हुवेम मघ-वानं इन्द्रं अस्मिन् भरे नृ-तमं वाज-सातौ
मंगलमय भगवान् इंद्राला आम्ही पाचारण करितो, ह्या सत्त्वप्राप्तीच्या युद्धामध्ये त्याच वीरश्रेष्ठाचा धांवा करितो, तो असा आहे की भक्तांच्या हांकेला ’ओ’ देणारा, शत्रूंना भीषण, अन्धाररूप शत्रूला युद्धामध्ये ठार करणारा आणि यशोधन जिंकणारा आहे; त्यालाच आम्ही रक्षणासाठी हांक मारितो १८.
ऋग्वेद - मंडल १० सूक्त ९० (पुरुषसूक्त) ऋषी - नारायण : देवता - पुरुष : छंद - १६ - त्रिष्टुभ् ; अवशिष्ट - अनुष्टुभ्
स॒हस्र॑शीर्षा॒ पुरु॑षः सहस्रा॒क्षः स॒हस्र॑पात् ।
सहस्र-शीर्षा पुरुषः सहस्र-अक्षः सहस्र-पात्
परमात्मारूप पुरुषाला सहस्त्रावधि मस्तके आहेत, सहस्त्रावधि नेत्र आहेत, सहस्त्रावधि चरणहि आहेत. तो पृथिवीला सर्व बाजूंनी वेढून टाकून पुन: दहा बोटें शिल्लक उरलाच १.
पुरु॑ष ए॒वेदं सर्वं॒ यद्भू॒तं यच् च॒ भव्य॑म् ।
पुरुषः एव इदं सर्वं यत् भूतं यत् च भव्यं
हे जे सर्व (=विश्व) विद्यमान आहे ते सर्व तो पुरुष (=परमात्मा)च (बनला) आहे, जे पूर्वी (आतापर्यंत) होऊन गेले किंवा जे अजून पुढे व्हावयाचे आहे तेंहि हाच होय; तसेंच अमृताचा [म्हणजे जरामृत्युरहित स्थितीचा] अधिपति तोच आहे आणि अन्न भक्षण करून जे वृद्धि पावते [जे प्राणीरूप आहे] त्याचाहि स्वामी तोच आहे २.
ए॒तावा॑न् अस्य महि॒मातो॒ ज्यायां॑श्च॒ पूरु॑षः ।
एतावान् अस्य महिमा अतः ज्यायान् च पुरुषः
इतका अपार जरी त्याचा महिमा आहे, तरी तो स्वत: मात्र त्या महिम्यापेक्षांहि मोठा आहे; कारण हे जे सर्व भूतजात म्हणजे विश्व आहे, ते त्याचा केवळ चवथा भाग आहे आणि बाकीचे जे अमृतरूप तीन भाग ते दिव्य लोकी असतात ३.
त्रि॒पादू॒र्ध्व उदै॒त् पुरु॑षः॒ पादो॑ऽस्ये॒हाभ॑व॒त् पुनः॑ ।
त्रि-पात् ऊर्ध्व उत् ऐत् पुरुषः पादः अस्य इह अभवत् पुनरिति
याप्रमाणे हा त्रिभाग द्योतित (विश्वातीत) पुरुष अशा प्रकाराने उपस्थित झाला, तेव्हा त्याचा चवथा अंश पुन: ह्या लोकी प्रकट झाला. आणि (प्रकट होतांच) हे एकंदर जे (दृशादृश्य) विश्व-जे अन्न खाऊन जगते आणि ज्याला अन्नाची आवश्यकता नाही [म्हणजे सचेतन आणि अचेतन] असे दोन्ही प्रकारचे पदार्थ त्याने व्यापून टाकले ४.
तस्मा॑द्वि॒राळ् अ॑जायत वि॒राजो॒ अधि॒ पूरु॑षः ।
तस्मात् विराट् अजायत वि-राजः अधि पुरुषः
पुढे त्यापासून "विराट्" (पुरुष) उत्पन्न झाला, पण (परमात्मस्वरूप) पुरुष मात्र विराटाच्याहिवर (त्याला व्यापून) राहिला आणि विराट् देखील उत्पन्न होतांच भूमीच्या पाठीमागून आणि समोरून (=सर्व बाजूंनी) तिच्यापेक्षांहि विस्तृत झाला ५.
यत् पुरु॑षेण ह॒विषा॑ दे॒वा य॒ज्ञं अत॑न्वत ।
यत् पुरुषेण हविषा देवाः यजं अतन्वत
जेव्हां (विराट्) पुरुषाला हवि कल्पून देवांनी यज्ञ आरंभिला, तेव्हां वसंत ऋतू हा त्या (यज्ञा)चा आज्य झाला, ग्रीष्म समिधा बनला आणि शरत् ऋतू आहुति झाला ६.
तं य॒ज्ञं ब॒र्हिषि॒ प्रौक्ष॒न् पुरु॑षं जा॒तं अ॑ग्र॒तः ।
तं यजं बर्हिषि प्र औक्षन् पुरुषं जातं अग्रतः
त्या यज्ञयोग्य पुरुषाला-जो सर्वांच्या पूर्वी प्रथम उत्पन्न झाला, त्या पुरुषाला कुशास्तरणावर प्रोक्षण केले आणि त्या (हवनयोग्य पुरुषा)च्या योगाने देवांनी आणि "साध्य" ह्या नांवाचे ऋषि होते त्यांनी यजन केले ७.
तस्मा॑द्य॒ज्ञात् स॑र्व॒हुतः॒ सम्भृ॑तं पृषदा॒ज्यम् ।
तस्मात् यजात् सर्व-हुतः सम्-भृतं पृषत्-आज्यं
सर्वस्वाची आहुति दिलेल्या (किंवा सर्व प्रकारच्या आहुति दिलेल्या) त्या यज्ञापासून थबथब ठिबकणारे असे आज्य घृत एकत्र सांठले, तसेंच त्यानंतर वातवरणात संचार करणारे प्राणी नंतर वन्य पशु आणि जे ग्रामपशु ते निर्माण झाले ८.
तस्मा॑द्य॒ज्ञात् स॑र्व॒हुत॒ ऋचः॒ सामा॑नि जज्ञिरे ।
तस्मात् यजात् सर्व-हुतः ऋचः सामानि जजिरे
सर्वस्वाहुति दिलेल्या त्या यज्ञा पासून ऋचा आणि सामस्तोत्रे निर्माण झाली, त्यानंतर त्यापासून अनेक छन्द निघाले, नंतर यजू देखील त्या (यज्ञा) पासूनच उत्पन्न झाले ९.
तस्मा॒दश्वा॑ अजायन्त॒ ये के चो॑भ॒याद॑तः ।
तस्मात् अश्वाः अजायन्त ये के च उभयादतः
त्या यज्ञापासून अश्वौत्पन्न झाले आणि ज्यांना वरचे दांत किंवा वरचे आणि खालचे असे दोन्ही प्रकारचे दांत असतात ते पशूहि उत्पन्न झाले, त्याच (यज्ञा) पासून धेनू उत्पन्न झाल्या आणि अज आणि मेष हे देखील त्यापासूनच उत्पन्न झाले १०.
यत् पुरु॑षं॒ व्यद॑धुः कति॒धा व्यकल्पयन् ।
यत् पुरुषं वि अदधुः कतिधा वि अकल्पयन्
जेव्हां देवांनी त्या विराट् पुरुषाला उद्देशून पृथक् अवयव योजिले तेव्हां त्यांनी कोणकोणते अवयव कल्पिले ? त्याचे मुख कोणते ठरविले, भुजदण्ड कोणते, मांड्या कोणत्या आणि पाय तरी कोणते ठरविले ११.
ब्रा॒ह्म॒णोऽस्य॒ मुखं॑ आसीद्बा॒हू रा॑ज॒न्यः कृ॒तः ।
ब्राह्मणः अस्य मुखं आसीत् बाहू इति राजन्यः कृतः
[थांबा ते सांगतो;] ब्रह्मवेत्ते (=ब्राह्मण) हे त्याचे मुख, राज्य करणारे (क्षत्रिय) हे त्याचे भुजदण्ड, जो व्यापार करणारा (समाज) तो त्याच्या माण्ड्या आणि त्याचे जे दोन पाय त्यांच्याबद्दल शूद्र, अशी योजना झाली १२.
च॒न्द्रमा॒ मन॑सो जा॒तश्चक्षोः॒ सूर्यो॑ अजायत ।
चन्द्रमा मनसः जातः चक्षोः सूर्यः अजायत
मनापासून चन्द्र झाला, दोनी नेत्रांच्या तेजापासून सूर्य निर्माण झाला, मुखापासून इंद्र आणि अग्नि हे प्रकट झाले आणि त्याच्या श्वासोच्छ्वासापासून वायु उत्पन्न झाला १३.
नाभ्या॑ आसीद॒न्तरि॑क्षं शी॒र्ष्णो द्यौः सं अ॑वर्तत ।
नाभ्याः आसीत् अन्तरिक्षं शीर्ष्णः द्यौः सं अवर्तत
नाभिपासून अन्तराळ झाले, मस्तकापासून द्युलोक निर्माण झाला; दोन्ही चरणांपासून भूमि झाली, तसेंच कानापासून दिशा आणि इतर लोक उत्पन्न झाले-अशी (देवांनी) कल्पना केली १४.
स॒प्तास्या॑सन् परि॒धय॒स्त्रिः स॒प्त स॒मिधः॑ कृ॒ताः ।
सप्त अस्य आसन् परि-धयः त्रिः सप्त सम्-इधः कृताः
ह्या यज्ञाच्या परिधि (म्हणजे वेदीभोंवतालचे कठडे) सात आणि समिधा एकवीस केल्या होत्या; याप्रमाणे देवांनी जेव्हां यज्ञाला आरंभ करून यज्ञबलि म्हणून त्या (प्रथमोत्पन्न)पुरुषाला यूपाशी बांधले; तेव्हा यज्ञाचे हे विधान त्यांनी ठरविले १५.
य॒ज्ञेन॑ य॒ज्ञं अ॑यजन्त दे॒वास्तानि॒ धर्मा॑णि प्रथ॒मान्या॑सन् ।
यजेन यजं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमानि आसन्
अशा रीतीने यज्ञयोग्य जो पुरुष त्याच्या योगाने देवांनी यज्ञाद्वारा (ईश्वराचे) यजन केले, कारण यज्ञ (आणि अनुषंगिक) कर्मे करणे हेच (उपासनेचे) अगदी प्रथमचे धर्मविधि होते; याप्रमाणे महात्मे होते (त्यांनी अशा रीतीने यज्ञमार्ग चालू केला आणि नंतर) ते अत्युच्च दिव्य लोकांत म्हणजे जेथे पूर्वीपासून साध्य आणि देव राहतात तेथे प्राप्त झाले १६.
ॐ तत् सत् |