PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ९ - सूक्त ९१ ते १००

ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ९१ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - कश्यप मारीच : देवता - पवमान सोम : छंद - त्रिष्टुभ्


अस॑र्जि॒ वक्वा॒ रथ्ये॒ यथा॒जौ धि॒या म॒नोता॑ प्रथ॒मो म॑नी॒षी ।
दश॒ स्वसा॑रो॒ अधि॒ सानो॒ अव्ये॑ऽजन्ति॒ वह्निं॒ सद॑ना॒न्य् अच्छ॑ ॥ १ ॥

असर्जि वक्वा रथ्ये यथा आजौ धिया मनोता प्रथमः मनीषी
दश स्वसारः अधि सानौ अव्ये अजन्ति वह्निं सदनानि अच्च ॥ १ ॥

वाचेला वदविणारा, मनाचा आद्यनियामक, आणि मनोजयी अशा सोमाला रथांनीं गजबजलेल्या रणांगणावर वीराला दवडावें त्याप्रमाणें भक्तांच्या ध्यानबुद्धीनें यज्ञमंडपांत पाठविलें आहे. म्हणून परस्परांच्या भगिनी अशा ज्या दहा अंगुलि त्या हव्यवाहक सोमाला स्वस्थानीं अधिष्ठित होण्यासाठीं लोंकरीच्या पवित्रांमध्यें उच्चभागीं ओतून देत आहेत. १.


वी॒ती जन॑स्य दि॒व्यस्य॑ क॒व्यैरधि॑ सुवा॒नो न॑हु॒ष्येभि॒रिन्दुः॑ ।
प्र यो नृभि॑र॒मृतो॒ मर्त्ये॑भिर्मर्मृजा॒नो॑ऽविभि॒र्गोभि॑र॒द्भिः ॥ २ ॥

वीती जनस्य दिव्यस्य कव्यैः अधि सुवानः नहुष्येभिः इन्दुः
प्र यः नृ भिः अमृतः मर्त्येभिः मर्मृजानः अवि भिः गोभिः अत् भिः ॥ २ ॥

भक्तांच्या अनेक कवनांनीं दिव्यविबुधांच्या सेवेसाठीं हा आल्हादप्रद सोम पिळला आहे. शूर नहुषांच्या मर्त्यजनांकडून हा अमर सोम अलंकृत होत आहे. लोंकरीच्या पवित्रांनीं, गोदुग्धानें, आणि उदकांनीं स्वच्छ होऊन अलंकृत होत आहे. २.


वृषा॒ वृष्णे॒ रोरु॑वदं॒शुर॑स्मै॒ पव॑मानो॒ रुश॑दीर्ते॒ पयो॒ गोः ।
स॒हस्रं॒ ऋक्वा॑ प॒थिभि॑र्वचो॒विद॑ध्व॒स्मभिः॒ सूरो॒ अण्वं॒ वि या॑ति ॥ ३ ॥

वृषा वृष्णे रोरुवत् अंशुः अस्मै पवमानः रुशत् ईर्ते पयः गोः
सहस्रं ऋक्वा पथि भिः वचः वित् अध्वस्म भिः सूरः अण्वं वि याति ॥ ३ ॥

वीर्यशाली सोम मोठ्यानें आरोळी देऊन महावीर्यशाली इंद्राप्रीत्यर्थ स्वच्छ आणि तेजस्वी होऊन वेगानें वहात आहे. याप्रमाणें तो ऋक्‌स्तोत्रप्रिय आणि स्फूर्तिदाता यज्ञधुरीण सोम सहस्त्रावधि बारीक छिद्रांच्या पवित्रांतून आपल्या अविनाशी मार्गांनीं गमन करीत असतो. ३


रु॒जा दृ॒ळ्हा चि॑द्र॒क्षसः॒ सदां॑सि पुना॒न इ॑न्द ऊर्णुहि॒ वि वाजा॑न् ।
वृ॒श्चोपरि॑ष्टात् तुज॒ता व॒धेन॒ ये अन्ति॑ दू॒रादु॑पना॒यं ए॑षाम् ॥ ४ ॥

रुजा दृळ्हा चित् रक्षसः सदांसि पुनानः इन्दो इति ऊर्णुहि वि वाजान्
वृश्च उपरिष्टात् तुजता वधेन ये अन्ति दूरात् उप नायं एषाम् ॥ ४ ॥

राक्षसाचीं मंदिरें फार मजबूत आहेत त्यांचा विध्वंस कर; आल्हादप्रदा सोमा, तूं पावनप्रवाहानें वाहून सत्वसामर्थ्य उघड करून दे. शत्रू वरून येत असोत, जवळ असोत, किंवा दूर असोत त्यांना तूं आपल्या तीक्ष्ण शस्त्रानें छाटून टाक, त्यांच्या पुढार्‍याला हे तोडून टाक ४.


स प्र॑त्न॒वन् नव्य॑से विश्ववार सू॒क्ताय॑ प॒थः कृ॑णुहि॒ प्राचः॑ ।
ये दुः॒षहा॑सो व॒नुषा॑ बृ॒हन्त॒स्तांस्ते॑ अश्याम पुरुकृत् पुरुक्षो ॥ ५ ॥

सः प्रत्न वत् नव्यसे विश्व वार सु उक्ताय पथः कृणुहि प्राचः
ये दुः सहासः वनुषा बृहन्तः तान् ते अश्य्चाम पुरु कृत् पुरुक्षो इतिपुरु क्षो ॥ ५ ॥

हे अखिलजनप्रिया सोमा, प्राचीन कवचाप्रमाणें आमच्या अपूर्व सूक्तालाहि तूं मार्ग मोकळा करून दे. जे स्वतः अजिंक्य आहेत आणि विजयी सामर्थ्यामुळें ज्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झालें आहे असे जे तुझे आशीर्वाद त्यांना, हे अपारकर्तृत्वा, हे अतुलबला सोमा, आम्हीं प्राप्त करून घेऊं असें कर ५.


ए॒वा पु॑ना॒नो अ॒पः स्व१ र्गा अ॒स्मभ्यं॑ तो॒का तन॑यानि॒ भूरि॑ ।
शं नः॒ क्षेत्रं॑ उ॒रु ज्योतीं॑षि सोम॒ ज्योङ् नः॒ सूर्यं॑ दृ॒शये॑ रिरीहि ॥ ६ ॥

एव पुनानः अपः स्वः गाः अस्मभ्यं तोका तनयानि भूरि
शं नः क्षेत्रं उरु ज्योतींषि सोम ज्योक् नः सूर्यं दृशये रिरीहि ॥ ६ ॥

याप्रमाणें तूं पावनप्रवाहानें वहात राहून दिव्योदकें, दिव्यलोक, दिव्यप्रकाश आणि पुत्रपौत्रादि संतति ह्यांचा विपुल लाभ आम्हांस होऊं दे. आम्हांला आमची भूमि सुखदायक कर, प्रकाश भरपूर दे, आणि हे सोमा, निरंतर आमच्या नेत्रांना सूर्यदर्शनाचा लाभ होईल असें कर.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ९२ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - कश्यप मारीच : देवता - पवमान सोम : छंद - त्रिष्टुभ्


परि॑ सुवा॒नो हरि॑रं॒शुः प॒वित्रे॒ रथो॒ न स॑र्जि स॒नये॑ हिया॒नः ।
आप॒च् छ्लोकं॑ इन्द्रि॒यं पू॒यमा॑नः॒ प्रति॑ दे॒वाँ अ॑जुषत॒ प्रयो॑भिः ॥ १ ॥

परि सुवानः हरिः अंशुः पवित्रे रथः न सर्जि सनये हियानः
आपत् श्लोकं इन्द्रियं पूयमानः प्रति देवान् अजुषत प्रयः भिः ॥ १ ॥

पिळला जाणारा, हरिद्वर्ण सोमपल्लव, विजयप्राप्तीसाठीं रथाप्रमाणें हेलावून देऊन पवित्रावर ओतला आहे; त्यामुळें शुद्धप्रवाहानें वाहणार्‍या त्या सोमाला सत्कीर्ति आणि इंद्राचें कृपाबल हीं प्राप्त झालीं. आणि त्यानें आपल्या प्रेमळपणानें दिव्यविभूतिंना संतुष्ट केलें १.


अच्छा॑ नृ॒चक्षा॑ असरत् प॒वित्रे॒ नाम॒ दधा॑नः क॒विर॑स्य॒ योनौ॑ ।
सीद॒न् होते॑व॒ सद॑ने च॒मूषूपें॑ अग्म॒न्न् ऋष॑यः स॒प्त विप्राः॑ ॥ २ ॥

अच्च नृ चक्षाः असरत् पवित्रे नाम दधानः कविः अस्य योनौ
सीदन् होता इव सदने चमूषु उप ईं अग्मन् ऋषयः सप्त विप्राः ॥ २ ॥

मनुष्यांना कृपाकटाक्षानें पाहणारा, प्रतिभापूर्ण सोम आपलें नांव गाजवित आपल्या स्वस्थानीं जाण्यासाठीं पवित्राकडे सरसावला आहे. यज्ञसंपादक जसा आपल्या ठिकाणीं आसनस्थ होतो त्याप्रमाणें तो चमूपात्रांत अधिष्ठित झाला तेव्हां सात ज्ञानी ऋषि त्याच्याकडे गेले २.


प्र सु॑मे॒धा गा॑तु॒विद्वि॒श्वदे॑वः॒ सोमः॑ पुना॒नः सद॑ एति॒ नित्य॑म् ।
भुव॒द्विश्वे॑षु॒ काव्ये॑षु॒ रन्तानु॒ जना॑न् यतते॒ पञ्च॒ धीरः॑ ॥ ३ ॥

प्र सु मेधाः गातु वित् विश्व देवः सोमः पुनानः सदः एति नित्यं
भुवत् विश्वेषु काव्येषु रन्ता अनु जनान् यतते पच धीरः ॥ ३ ॥

पूर्णप्रज्ञ, सन्मार्ग जाणणारा, सकल देवप्रिय असा सोम पावनप्रवाहानें वहात वहात आपल्या शाश्वतस्थलीं प्राप्त होतो. तो भक्तांच्या निखिल काव्यमाधुरींत रममाण होवो. तो धीरोदत्त सोम आम्हां मानवांच्या पांचहि जातींच्या हितासाठीं झटत असतो ३.


तव॒ त्ये सो॑म पवमान नि॒ण्ये विश्वे॑ दे॒वास्त्रय॑ एकाद॒शासः॑ ।
दश॑ स्व॒धाभि॒रधि॒ सानो॒ अव्ये॑ मृ॒जन्ति॑ त्वा न॒द्यः स॒प्त य॒ह्वीः ॥ ४ ॥

तव त्ये सोम पवमान निण्ये विश्वे देवाः त्रयः एकादशासः
दश स्वधाभिः अधि सानौ अव्ये मृजन्ति त्वा नद्यः सप्त यह्वीः ॥ ४ ॥

पावनप्रवाहा सोमा, तुझ्या गूढ स्थानांत तेहेतीस विश्वेदेव आणि ऋत्विजांच्या दहा अंगुलि आपल्या परिपाटाप्रमाणें तुजला लोंकरीच्या पवित्राच्या उच्चदेशी ठेवून स्वच्छ करितात. भरवेगानें वाहणार्‍या सात नद्या तुला सोमाला अलंकृत करितात. ४.


तन् नु स॒त्यं पव॑मानस्यास्तु॒ यत्र॒ विश्वे॑ का॒रवः॑ सं॒नस॑न्त ।
ज्योति॒र्यदह्ने॒ अकृ॑णोदुलो॒कं प्राव॒न् मनुं॒ दस्य॑वे कर॒भीक॑म् ॥ ५ ॥

तत् नु सत्यं पवमानस्य अस्तु यत्र विश्वे कारवः सं नसन्त
ज्योतिः यत् अह्ने अकृणोत् ओं इति लोकं प्र आवत् मनुं दस्यवे कः अभीकम् ॥ ५ ॥

तेंच ह्या पावनप्रवाहा सोमाचें सत्यस्वरूप होय, कीं जेथें सर्व कर्तृत्ववान कविजन प्राप्त होतात. ज्या सत्यानें दिनमणि सूर्यासाठीं आकाश बनविलें, मनूवर कृपादृष्टि ठेवली आणि अधार्मिक दुष्टासाठीं नरक निर्माण केला ५.


परि॒ सद्मे॑व पशु॒मान्ति॒ होता॒ राजा॒ न स॒त्यः समि॑तीरिया॒नः ।
सोमः॑ पुना॒नः क॒लशा॑ँ अयासी॒त् सीद॑न् मृ॒गो न म॑हि॒षो वने॑षु ॥ ६ ॥

पर् सद्म इव पशु मन्ति होता राजा न सत्यः सं इतीः इयानः
सोमः पुनानः कलशान् अयासीत् सीदन् मृगः न महिषः वनेषु ॥ ६ ॥

पशु संपन्न गृहाकडे यज्ञपुरोहीत जातो, किंवा सत्यप्रेमी राजा लोकसभेमध्यें प्रवेश करतो, त्याप्रमाणें पावनप्रवाहा सोम द्रोणकलशांत प्रविष्ट होतो, अरण्यांतील विक्राळ श्वापदाप्रमाणें कलशांत अधिष्ठित होतो ६.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ९३ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - नोधस् गौतम् : देवता - पवमान सोम : छंद - त्रिष्टुभ्


सा॒क॒मुक्षो॑ मर्जयन्त॒ स्वसा॑रो॒ दश॒ धीर॑स्य धी॒तयो॒ धनु॑त्रीः ।
हरिः॒ पर्य् अ॑द्रव॒ज् जाः सूर्य॑स्य॒ द्रोणं॑ ननक्षे॒ अत्यो॒ न वा॒जी ॥ १ ॥

साकं उक्षः मर्जयन्त स्वसारः दश धीरस्य धीतयः धनुत्रीः
हरिः परि अद्रवत् जाः सूर्यस्य द्रोणं ननक्षे अत्यः न वाजी ॥ १ ॥

एकदम जलसिंचन करणार्‍या आणि भक्ताला प्रोत्साहन देणार्‍या ज्या ध्यानस्तुति ज्या धीरोदात्त सोमाच्या दहा भगिनी होत, त्या त्याला अलंकृत करतात. सूर्यापासून उत्पन्न झालेल्या अरुणप्रभेच्या भोंवतीं सोम धांवत चालला, आणि चपल अश्वारूढ वीराप्रमाणें द्रोणकलशाकडे धांवत गेला. १.


सं मा॒तृभि॒र्न शिशु॑र्वावशा॒नो वृषा॑ दधन्वे पुरु॒वारो॑ अ॒द्भिः ।
मर्यो॒ न योषां॑ अ॒भि नि॑ष्कृ॒तं यन् सं ग॑च्छते क॒लश॑ उ॒स्रिया॑भिः ॥ २ ॥

सं मातृ भिः न शिशुः वावशानः वृषा दधन्वे पुरु वारः अत् भिः
मर्यः न योषां अभि निः कृतं यन् सं गच्चते कलशे उस्रियाभिः ॥ २ ॥

मातांबरोबर जाणार्‍या बालकाप्रमाणें मोठ्यानें खळखळ करीत हा सर्वजनप्रिय वीरपुंगव सोम उदकांसह उचंबळून वाहतो, आणि जेव्हां तो तकतकीत गोदुग्धाशीं कलशांमध्ये मिश्र होतो तेव्हां एखादा शूर पुरुष आपल्या यौवनाढ्य लावण्यलतिकेसह स्वगृहीं जात आहे कीं काय असें वाटतें २.


उ॒त प्र पि॑प्य॒ ऊध॒रघ्न्या॑या॒ इन्दु॒र्धारा॑भिः सचते सुमे॒धाः ।
मू॒र्धानं॒ गावः॒ पय॑सा च॒मूष्व् अ॒भि श्री॑णन्ति॒ वसु॑भि॒र्न नि॒क्तैः ॥ ३ ॥

उत प्र पिप्ये ऊधः अघ्न्यायाः इन्दुः धाराभिः सचते सु मेधाः
मूधार्नं गावः पयसा चमूषु अभि श्रीणन्ति वसु भिः न निक्तैः ॥ ३ ॥

पहा ह्या अवध्य धेनूची कांस कशी तट्ट फुगली; आणि परमप्रज्ञ आल्हादप्रद सोमबिंदुही दुग्धप्रवाहाशीं संयुक्त झाला. यज्ञाचा शिरोमणि जो सोम त्याला निर्मल आणि उत्कृष्ट भूषणांनीं सुशोभित करावें त्याप्रमाणें धेनू आपल्या दुग्धाशीं मिश्र करून अलंकृत करितात. ३.


स नो॑ दे॒वेभिः॑ पवमान र॒देन्दो॑ र॒यिं अ॒श्विनं॑ वावशा॒नः ।
र॒थि॒रा॒यतां॑ उश॒ती पुरं॑धिरस्म॒द्र्य१ ग् आ दा॒वने॒ वसू॑नाम् ॥ ४ ॥

सः नः देवेभिः पवमान रद इन्दो इति रयिं अश्विनं वावशानः
रथिरायतां उशती पुरं धिः अस्मद्र्यक् आ दावने वसूनाम् ॥ ४ ॥

पावनप्रवाहा सोमा, तूं सर्वांना वश करणारा, दिव्यविभूतिंसह येऊन आम्हांला अश्वप्रचुर असें धन अर्पण कर; आणि रथारूढ वीरांविषयीं उत्कंठित असणारी जी औदार्यबुद्धि तिच्यामुळें उत्कृष्ट अभीष्टाची प्राप्ति व्हावी म्हणून तिला आमच्याकडे वळीव ४.


नू नो॑ र॒यिं उप॑ मास्व नृ॒वन्तं॑ पुना॒नो वा॒ताप्यं॑ वि॒श्वश्च॑न्द्रम् ।
प्र व॑न्दि॒तुरि॑न्दो ता॒र्य् आयुः॑ प्रा॒तर्म॒क्षू धि॒याव॑सुर्जगम्यात् ॥ ५ ॥

नु नः रयिं उप मास्व नृ वन्तं पुनानः वाताप्यं विश्व चन्द्रं
प्र वन्दितुः इन्दो इति तारि आयुः प्रातः मक्षु धियावसुः जगम्यात् ॥ ५ ॥

स्वच्छ प्रवाहानें वहात राहून तूं शूर सैनिकानीं युक्त आणि सर्वांना चंद्राप्रमाणें अत्यंत आल्हादप्रद असा आमचा उत्कर्ष कर. तुजला प्रणिपात करणार्‍या भक्ताचें आयुष्य, हे सोमा, तुझ्याकडून वृद्धिंगत होवो. आणि प्रज्ञाघन असा तूं प्राःतसवनाच्या वेळीं आमच्याकडे त्वरेनें यावेंस असें घडो ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ९४ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - कण्व धौर : देवता - पवमान सोम : छंद - त्रिष्टुभ्


अधि॒ यद॑स्मिन् वा॒जिनी॑व॒ शुभ॒ स्पर्ध॑न्ते॒ धियः॒ सूर्ये॒ न विशः॑ ।
अ॒पो वृ॑णा॒नः प॑वते कवी॒यन् व्र॒जं न प॑शु॒वर्ध॑नाय॒ मन्म॑ ॥ १ ॥

अधि यत् अस्मिन् वाजिनि इव शुभः स्पर्धन्ते धियः सूर्ये न विशः
अपः वृणानः पवते कवि यन् व्रजं न पशु वर्धनाय मन्म ॥ १ ॥

ओजस्वी सत्ववृत्तीप्रमाणें, किंवा मानवी प्रजाजन सूर्याच्या ठिकाणीं अहमहमिकेनें लक्ष लावतात त्याप्रमाणें भक्ताच्या मंगल भावना सोमाच्या ठायीं प्राप्त होण्यासाठीं जणों स्पर्धा करीत असतात. उदकांचा लाभ देणारा हा सोम, पशूंच्या अभिवृद्धीकरितां जसें संरक्षक आवार, त्याप्रमाणें, हा कविप्रतिभेला स्फूर्ति देऊन मननीय स्तोत्रांचा प्रवाह लोटतो १.


द्वि॒ता व्यू॒र्ण्वन्न् अ॒मृत॑स्य॒ धाम॑ स्व॒र्विदे॒ भुव॑नानि प्रथन्त ।
धियः॑ पिन्वा॒नाः स्वस॑रे॒ न गाव॑ ऋता॒यन्ती॑र॒भि वा॑वश्र॒ इन्दु॑म् ॥ २ ॥

द्विता वि ऊर्ण्वन् अमृतस्य धाम स्वः विदे भुवनानि प्रथन्त
धियः पिन्वानाः स्वसरे न गावः ऋत यन्तीः अभि ववश्रे इन्दुम् ॥ २ ॥

अमरत्वाचें जें तेजोमय स्थान आहे तें दिव्यलोकप्राप्तीसाठीं सोम हा अगदीं उघडपणें निदर्शनास आणतो; हीं सर्व भुवनें त्याच्या इच्छेनेंच विस्तार पावलीं आहेत. सूर्याच्या ठिकाणीं प्रकाशकिरण, किंवा आवारांत ज्याप्रमाणें धेनू विश्रांति पावतात त्याप्रमाणें भक्तिप्रेमानें उचंबळणार्‍या स्तुति सद्धर्मोत्सुक होऊन आल्हादप्रदा सोमाला मोठ्यानें हांक मारूं लागतात २.


परि॒ यत् क॒विः काव्या॒ भर॑ते॒ शूरो॒ न रथो॒ भुव॑नानि॒ विश्वा॑ ।
दे॒वेषु॒ यशो॒ मर्ता॑य॒ भूष॒न् दक्षा॑य रा॒यः पु॑रु॒भूषु॒ नव्यः॑ ॥ ३ ॥

परि यत् कविः काव्या भरते शूरः न रथः भुवनानि विश्वा
देवेषु यशः मर्ताय भूषन् दक्षाय रायः पुरु भूषु नव्यः ॥ ३ ॥

हा काव्यस्फूर्तिदाता सोम, शूराचा रथ जसा सर्व भूप्रदेशांत वावरतो त्याप्रमाणें भक्तांच्या कवनांत सर्वत्र भरून राहतो. तो दिव्यविबुधांमध्यें यश, आणि चातुर्यबलशाली मानवाला अक्षय संपत्ति देण्याची इच्छा दर्शवून सकल भक्तांकडून प्रशंसा पावतो ३.


श्रि॒ये जा॒तः श्रि॒य आ निरि॑याय॒ श्रियं॒ वयो॑ जरि॒तृभ्यो॑ दधाति ।
श्रियं॒ वसा॑ना अमृत॒त्वं आ॑य॒न् भव॑न्ति स॒त्या स॑मि॒था मि॒तद्रौ॑ ॥ ४ ॥

श्रिये जातः श्रिये आ निः इयाय श्रियं वयः जरितृ भ्यः दधाति
श्रियं वसानाः अमृत त्वं आयन् भवन्ति सत्या सं इथा मित द्रौ ॥ ४ ॥

भक्तांना भूषणभूत होण्यासाठीं जो प्रकट झाला; भूषण मिरवण्यासाठीं जो बाहेर निघाला, तो हा सोम स्तोतृजनाला वैभवाचें भूषण आणि तारुण्याचा जोम अर्पण करतो. त्याच्या वैभवाचें वस्त्र परिधान करून भक्त अमरत्व पावले. व्यवस्थित गतीनें जाणारा हा सोम विद्यमान आहे म्हणूनच न्याय्य युद्धें सत्य आणि यशस्वी होतात ४.


इषं॒ ऊर्जं॑ अ॒भ्य१ र्षाश्वं॒ गां उ॒रु ज्योतिः॑ कृणुहि॒ मत्सि॑ दे॒वान् ।
विश्वा॑नि॒ हि सु॒षहा॒ तानि॒ तुभ्यं॒ पव॑मान॒ बाध॑से सोम॒ शत्रू॑न् ॥ ५ ॥

इषं ऊर्जं अभि अर्ष अश्वं गां उरु ज्योतिः कृणुहि मत्सि देवान्
विश्वानि हि सु सहा तानि तुभ्यं पवमान बाधसे सोम शत्रून् ॥ ५ ॥

उत्साह आणि ओजस्विता यांचा प्रवाह वाहूं दे. अश्व, धेनू आणि विपुल प्रकाश हे सुलभ कर. तूं दिव्यविबुधांना हर्षित करतोस. यच्चावत् वस्तु तुजला सहज स्वाधीन करून घेतां येतात. हे सोमा, शत्रूंना तूंच पराजित करतोस ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ९५ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - प्रस्कण्व काण्व : देवता - पवमान सोम : छंद - त्रिष्टुभ्


कनि॑क्रन्ति॒ हरि॒रा सृ॒ज्यमा॑नः॒ सीद॒न् वन॑स्य ज॒ठरे॑ पुना॒नः ।
नृभि॑र्य॒तः कृ॑णुते नि॒र्णिजं॒ गा अतो॑ म॒तीर्ज॑नयत स्व॒धाभिः॑ ॥ १ ॥

कनिक्रन्ति हरिः आ सृज्यमानः सीदन् वनस्य जठरे पुनानः
नृ भिः यतः कृणुते निः निजं गाः अतः मतीः जनयत स्वधाभिः ॥ १ ॥

अरण्याच्या अन्तर्भागीं वास करणारा हा हरिद्वर्ण सोम ओतला जातांना आणि शूर ऋत्विजांच्या हातून स्वच्छ होतांना मोठ्यानें गर्जना करतो. जेव्हां दुग्धाला तो आपलें वस्त्र करतो, तेव्हां नित्य परिपाठाप्रमाणें हे ऋत्विजांनों तुम्हीं सोमासाठीं मननीय स्तोत्रें रचून तीं म्हणा १.


हरिः॑ सृजा॒नः प॒थ्यां ऋ॒तस्येय॑र्ति॒ वाचं॑ अरि॒तेव॒ नाव॑म् ।
दे॒वो दे॒वानां॒ गुह्या॑नि॒ नामा॒विष् कृ॑णोति ब॒र्हिषि॑ प्र॒वाचे॑ ॥ २ ॥

हरिः सृजानः पथ्यां ऋतस्य इयर्ति वाचं अरिता इव नावं
देवः देवानां गुह्यानि नाम आविः कृणोति बर्हिषि प्र वाचे ॥ २ ॥

वल्हीं मारणारा नाविक नौकेला गति देतो त्याप्रमाणें हरित्पल्लव सोम हा पात्रांत ओततांना सद्धर्माचा हितकर मार्ग म्हणजे जी देवस्तुति तिची स्फूर्ति देतो; आणि दिव्यसोम हा दिव्यविभूतिंचीं जीं जीं नांवे गुप्त आहेर तीं यज्ञामध्यें मोठ्यानें स्तवन करणार्‍या भक्ताकरितां प्रकट करतो २.


अ॒पां इ॒वेदू॒र्मय॒स्तर्तु॑राणाः॒ प्र म॑नी॒षा ई॑रते॒ सोमं॒ अच्छ॑ ।
न॒म॒स्यन्ती॒रुप॑ च॒ यन्ति॒ सं चा च॑ विशन्त्य् उश॒तीरु॒शन्त॑म् ॥ ३ ॥

अपां इव इत् ऊर्मयः तर्तुराणाः प्र मनीषाः ईरते सोमं अच्च
नमस्यन्तीः उप च यन्ति सं च आ च विशन्ति उशतीः उशन्तम् ॥ ३ ॥

उदकाच्या कल्लोलाप्रमाणें जोरानें झरझर वाहणार्‍या मननस्तुति सोमाकडे वेगानें धांवतात. देवापुढें नम्र होऊन केलेल्या ज्या उत्सुकस्तुति, त्या, उत्सुक सोमाच्या सन्निध जातात आणि त्याच्याशीं संलग्न होतात ३.


तं म॑र्मृजा॒नं म॑हि॒षं न साना॑व् अं॒शुं दु॑हन्त्य् उ॒क्षणं॑ गिरि॒ष्ठाम् ।
तं वा॑वशा॒नं म॒तयः॑ सचन्ते त्रि॒तो बि॑भर्ति॒ वरु॑णं समु॒द्रे ॥ ४ ॥

तं मर्मृजानं महिषं न सानौ अंशुं दुहन्ति उक्षणं गिरि स्थां
तं वावशानं मतयः सचन्ते त्रितः बिभर्ति वरुणं समुद्रे ॥ ४ ॥

पर्वताच्या शिखरावर एखाद्या विशाल वृषभाप्रमाणें अधिष्ठित झालेल्या सोमपल्लवाला ऋत्विज् हे स्वच्छ करून त्याचें दोहन करितात. सर्व जग आपल्या शब्दानें वश करणार्‍या सोमाला भक्ताच्या सद्‌भावना शरण जातात; अन्तरिक्ष समुद्रांतील वरुणरूप सोमाला त्रित हा धारण करतो ४.


इष्य॒न् वाचं॑ उपव॒क्तेव॒ होतुः॑ पुना॒न इ॑न्दो॒ वि ष्या॑ मनी॒षाम् ।
इन्द्र॑श्च॒ यत् क्षय॑थः॒ सौभ॑गाय सु॒वीर्य॑स्य॒ पत॑यः स्याम ॥ ५ ॥

इष्यन् वाचं उपवक्ता इव होतुः पुनानः इन्दो इति वि स्य मनीषां
इन्द्रः च यत् क्षयथः सौभगाय सु वीर्यस्य पतयः स्याम ॥ ५ ॥

उपवक्ता अध्वर्यू हा होत्याच्या स्तुतीला प्रोत्साहन देतो त्याप्रमाणें तूं शुद्धप्रवाहानें वाहतांना, हे आल्हादरूपा, भक्ताच्या बुद्धीला खुलावट देऊन चालन दे. तूं आणि इंद्र हे भक्ताच्या उन्नतीकरतांच यज्ञमंडपांत वास करितां, तर उत्कृष्टशौर्याचे आम्हीं प्रभू होऊं हें खचित ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ९६ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - प्रतर्दन दैवोदासि : देवता - पवमान सोम : छंद - त्रिष्टुभ्


प्र से॑ना॒नीः शूरो॒ अग्रे॒ रथा॑नां ग॒व्यन्न् ए॑ति॒ हर्ष॑ते अस्य॒ सेना॑ ।
भ॒द्रान् कृ॒ण्वन्न् इ॑न्द्रह॒वान् सखि॑भ्य॒ आ सोमो॒ वस्त्रा॑ रभ॒सानि॑ दत्ते ॥ १ ॥

प्र सेनानीः शूरः अग्रे रथानां गव्यन् एति हर्षते अस्य सेना
भद्रान् कृण्वन् इन्द्र हवान् सखि भ्यः आ सोमः वस्त्रा रभसानि दत्ते ॥ १ ॥

शूर सेनाधिपति रथांच्याहि पुढें चालून जातो त्याप्रमाणें हा सोम प्रकाशधेनू हस्तगत करण्याच्या इच्छेनें अग्रभागीं धांवून जातो; तेव्हां सर्व सेना हर्षभरित होते. भक्तजन इंद्राचा धांवा करतात; तू धांवा आपले मित्र जे भक्त त्यांच्यासाठीं सफल करून सोम हा आपलीं चटकन् नेसतां येण्यासारखीं वस्त्रें परिधान करून सिद्ध होतो १.


सं अ॑स्य॒ हरिं॒ हर॑यो मृजन्त्यश्वह॒यैरनि॑शितं॒ नमो॑भिः ।
आ ति॑ष्ठति॒ रथं॒ इन्द्र॑स्य॒ सखा॑ वि॒द्वाँ ए॑ना सुम॒तिं या॒त्यच्छ॑ ॥ २ ॥

सं अस्य हरिं हरयः मृजन्ति अश्व हयैः अस्नि शितं नमः भिः
आ तिष्ठति रथं इन्द्रस्य सखा विद्वान् एन सु मतिं याति अच्च ॥ २ ॥

ज्याच्या योगानें अश्वांना दौडत नेतात त्या प्रतोदाचा ज्याला स्पर्शहि झाला नाहीं अशा सोमरूपी हरिद्वर्ण अश्वाला या इंद्राचे हरिद्वर्ण सेवक प्रणतिपूर्वक अलंकृत करतात; तेव्हां तो इंद्राचा प्रियमित्र रथारूढ होतो; तो ज्ञानवान् सोम त्यांत आरूढ होऊन भक्तांच्या मनोहर स्तुतींकडे गमन करतो २.


स नो॑ देव दे॒वता॑ते पवस्व म॒हे सो॑म॒ प्सर॑स इन्द्र॒पानः॑ ।
कृ॒ण्वन्न् अ॒पो व॒र्षय॒न् द्यां उ॒तेमां उ॒रोरा नो॑ वरिवस्या पुना॒नः ॥ ३ ॥

सः नः देव देव ताते पवस्व महे सोम प्सरसे इन्द्र पानः
कृण्वन् अपः वर्षयन् द्यां उत इमां उरोः आ नः वरिवस्य पुनानः ॥ ३ ॥

हे दिव्य सोमा, इंद्राचें पेय तूं आहेस; तर ईश्वराच्या सेवेसाठीं, तुझा उत्कृष्ट आस्वाद दिव्यविभूतिंनीं घ्यावा म्हणून तूं पावनप्रवाहानें वहा; आणि उदकांना मुक्त करून, ह्या द्युलोकाकडून जलवर्षाव करवून आणि अपार अशा अन्तरालांतून येऊन भक्तपावन असा तूं आमचें समाधान कर ३.


अजी॑त॒ये॑ऽहतये पवस्व स्व॒स्तये॑ स॒र्वता॑तये बृह॒ते ।
तदु॑शन्ति॒ विश्व॑ इ॒मे सखा॑य॒स्तद॒हं व॑श्मि पवमान सोम ॥ ४ ॥

अजीतये अहतये पवस्व स्वस्तये सर्व तातये बृहते
तत् उशन्ति विश्वे इमे सखायः तत् अहं वश्मि पवमान सोम ॥ ४ ॥

आम्हीं कोणाकडूनहि जिंकले जाऊं नये, कोणाकडूनहि मारले जाऊं नये आमचें कल्याण व्हावें; श्रेष्ठ आणि सर्वमान्य सेवा आमच्या हातून व्हावी यासाठीं तूं वहात रहा- हीच इच्छा या आमच्या सर्व मित्रांची आहे. पावनप्रवाहा सोमा, मलाहि पण तीच गोष्ट हवी आहे ४.


सोमः॑ पवते जनि॒ता म॑ती॒नां ज॑नि॒ता दि॒वो ज॑नि॒ता पृ॑थि॒व्याः ।
ज॒नि॒ताग्नेर्ज॑नि॒ता सूर्य॑स्य जनि॒तेन्द्र॑स्य जनि॒तोत विष्णोः॑ ॥ ५ ॥

सोमः पवते जनिता मतीनां जनिता दिवः जनिता पृथिव्याः
जनिता अग्नेः जनिता सूर्यस्य जनिता इन्द्रस्य जनिता उत विष्णोः ॥ ५ ॥

मननीय स्तुतींचा जनक, द्युलोकाचा जनक, पृथ्वीचा जनक, यज्ञाग्नीचा जनक, सूर्याचा जनक आणि त्याचप्रमाणें इंद्राच्या हर्षाचा जनक आणि विष्णूच्याहि हर्षाचा जनक असा हा सोम पावनप्रवाहानें वहात आहे ५.


ब्र॒ह्मा दे॒वानां॑ पद॒वीः क॑वी॒नां ऋषि॒र्विप्रा॑णां महि॒षो मृ॒गाणा॑म् ।
श्ये॒नो गृध्रा॑णां॒ स्वधि॑ति॒र्वना॑नां॒ सोमः॑ प॒वित्रं॒ अत्य् ए॑ति॒ रेभ॑न् ॥ ६ ॥

ब्रह्मा देवानां पद वीः कवीनां ऋषिः विप्राणां महिषः मृगाणां
श्येनः गृध्राणां स्व धितिः वनानां सोमः पवित्रं अति एति रेभन् ॥ ६ ॥

दिव्यविबुधांत हा ब्रह्मा, कवींमध्यें अग्रेसर, ज्ञानी स्तोतृजनांत ऋषि, श्वापदांत महिष गृधादि खादाड पक्ष्यांत ससाणा, वृक्षोच्छेदकांत परशु अशा अनेक रूपांचा हा सोम खळखळून पवित्रांतून पार वहात जातो ६.


प्रावी॑विपद्वा॒च ऊ॒र्मिं न सिन्धु॒र्गिरः॒ सोमः॒ पव॑मानो मनी॒षाः ।
अ॒न्तः पश्य॑न् वृ॒जने॒माव॑रा॒ण्य् आ ति॑ष्ठति वृष॒भो गोषु॑ जा॒नन् ॥ ७ ॥

प्र अवीविपत् वाचः ऊर्मिं न सिन्धुः गिरः सोमः पवमानः मनीषाः
अन्तरिति पश्यन् वृजना इमा अवराणि आ तिष्ठति वृषभः गोषु जानन् ॥ ७ ॥

समुद्र जसा लाटा उत्पन्न करतो, त्याप्रमाणें पावनप्रवाह सोमानें वाचेला चालना दिली, स्तुतींना स्फूर्ति दिली; मनाला प्रेरणा केली; आणि रक्षणाच्या दृष्टीनें हीं आवारें लहान आहेत असें मनांत जाणून, ज्ञाता जो वीरपुंगव सोम तो आमच्या गो-समूहांत जाऊन उभा राहिला ७.


स म॑त्स॒रः पृ॒त्सु व॒न्वन्न् अवा॑तः स॒हस्र॑रेता अ॒भि वाजं॑ अर्ष ।
इन्द्रा॑येन्दो॒ पव॑मानो मनी॒ष्य् अ१ ंशोरू॒र्मिं ई॑रय॒ गा इ॑ष॒ण्यन् ॥ ८ ॥

सः मत्सरः पृत् सु वन्वन् अवातः सहस्र रेताः अभि वाजं अर्ष
इन्द्राय इन्दो इति पवमानः मनीषी अंशोः ऊर्मिं ईरय गाः इषण्यन् ॥ ८ ॥

हर्षनिर्भर करणारा, संग्रांमामध्यें विजयी होणारा, अपराजित आणि अमितवार्य असा तूं आमच्या सत्वसामर्थ्याकरितां वहात रहा. हे आल्हादप्रदा, तूं इंद्राप्रीत्यर्थ पावनप्रवाहानें वहाणारा मनोजयी सोम, प्रकाशधेनू जिंकण्याच्या इच्छेनें आपल्या पल्लवाच्या रसाची लाट जोरानें उडव ८.


परि॑ प्रि॒यः क॒लशे॑ दे॒ववा॑त॒ इन्द्रा॑य॒ सोमो॒ रण्यो॒ मदा॑य ।
स॒हस्र॑धारः श॒तवा॑ज॒ इन्दु॑र्वा॒जी न सप्तिः॒ सम॑ना जिगाति ॥ ९ ॥

परि प्रियः कलशे देव वातः इन्द्राय सोमः रण्यः मदाय
सहस्र धारः शत वाजः इन्दुः वाजी न सप्तिः समना जिगाति ॥ ९ ॥

सर्वप्रीय आणि देवानें प्रेरणा केलेला रम्य सोम इंद्राला हर्ष व्हावा म्हणून द्रोणकलशांत वेगानें वहात जातो. असंख्य प्रवाहांचा, असंख्य सत्वसामर्थ्यांचा हा सोम, एखादा प्रबल अश्ववीर युद्धाला जातो त्याप्रमाणें कलशांकडे धांवतो ९.


स पू॒र्व्यो व॑सु॒विज् जाय॑मानो मृजा॒नो अ॒प्सु दु॑दुहा॒नो अद्रौ॑ ।
अ॒भि॒श॒स्ति॒पा भुव॑नस्य॒ राजा॑ वि॒दद्गा॒तुं ब्रह्म॑णे पू॒यमा॑नः ॥ १० ॥

सः पूर्व्यः वसु वित् जायमानः मृजानः अप् सु दुदुहानः अद्रौ
अभिशस्ति पाः भुवनस्य राजा विदत् गातुं ब्रह्मणे पूयमानः ॥ १० ॥

तूं पुराणपुरुष आहेस, उत्कृष्ट धनदाता आहेस, तूं प्रकट होऊन उदकांमध्यें स्वच्छ होतोस; पर्वतावर म्हणजे अभिषवणफलकावर तुझें दोहन होतें. तूं निन्देपासून आमचें रक्षण करतोस आणि भुवनाचा राजा असा तूं ब्रह्मऋत्विजासाठीं शुद्ध होऊन भक्ताला सन्मार्ग दाखवितोस १०.


त्वया॒ हि नः॑ पि॒तरः॑ सोम॒ पूर्वे॒ कर्मा॑णि च॒क्रुः प॑वमान॒ धीराः॑ ।
व॒न्वन्न् अवा॑तः परि॒धीँरपो॑र्णु वी॒रेभि॒रश्वै॑र्म॒घवा॑ भवा नः ॥ ११ ॥

त्वया हि नः पितरः सोम पूर्वे कर्माणि चक्रुः पवमान धीराः
वन्वन् अवातः परि धीन् अप ऊर्णु वीरे भिः अश्वैः मघ वा भव नः ॥ ११ ॥

तुझ्या योगानेंच आमच्या प्राचीन सत्वधीर वाडवडिलांनीं, हे पावनप्रवाहा, आपलीं सत्कर्मे यथासांग केलीं. तूं अजिंक्य आणि विजयोत्सुक आहेस, चोहोंकडून बंद केलेलीं स्थानें तूं मोकळीं कर, आणि शूर सैनिक आणि अश्व यांच्यासह आम्हांला भाग्यदाता हो ११.


यथाप॑वथा॒ मन॑वे वयो॒धा अ॑मित्र॒हा व॑रिवो॒विद्ध॒विष्मा॑न् ।
ए॒वा प॑वस्व॒ द्रवि॑णं॒ दधा॑न॒ इन्द्रे॒ सं ति॑ष्ठ ज॒नयायु॑धानि ॥ १२ ॥

यथा अपवथाः मनवे वयः धाः अमित्र हा वरिवः वित् हविष्मान्
एव पवस्व द्रविणं दधानः इन्द्रे सं तिष्ठ जनय आयुधानि ॥ १२ ॥

तारुण्याचा जोम आणणारा, शत्रूंना ठार मारणारा, समाधानवृत्ति देणारा, आणि दिव्यजनाला हविर्भाग पोहोंचविणारा तूं जसा पूर्वीं मनुराजाकरितां पावनप्रवाहानें वहात होतास तसा आतांहि अक्षयसंपत्ति घेऊन येऊन आपल्या शुद्धप्रवाहानें वहा, इंद्राच्या ठिकाणीं वास कर आणि युद्धांत शस्त्रास्त्रें प्रकट कर १२.


पव॑स्व सोम॒ मधु॑माँ ऋ॒तावा॒पो वसा॑नो॒ अधि॒ सानो॒ अव्ये॑ ।
अव॒ द्रोणा॑नि घृ॒तवा॑न्ति सीद म॒दिन्त॑मो मत्स॒र इ॑न्द्र॒पानः॑ ॥ १३ ॥

पवस्व सोम मधु मान् ऋत वा अपः वसानः अधि सानौ अव्ये
अव द्रोणानि घृत वन्ति सीद मदिन् तमः मत्सरः इन्द्र पानः ॥ १३ ॥

सोमा तूं माधुर्यपूर्ण, सद्धर्मप्रवर्तक, उदकरूपवस्त्र धारण करणारा आहेस, तूं लोंकरीच्या पवित्राच्या उच्चस्थानावर स्वच्छ प्रवाहानें वहा; आणि घृतपूर्ण द्रोणकलशांत स्थिर हो. तूं अन्तःकरणाला अगदीं तल्लीन करणारा, हर्षनिर्भर करणारा आणि इंद्रानें प्राशन करण्याला अगदीं योग्य आहेस १३.


वृ॒ष्टिं दि॒वः श॒तधा॑रः पवस्व सहस्र॒सा वा॑ज॒युर्दे॒ववी॑तौ ।
सं सिन्धु॑भिः क॒लशे॑ वावशा॒नः सं उ॒स्रिया॑भिः प्रति॒रन् न॒ आयुः॑ ॥ १४ ॥

वृष्टिं दिवः शत धारः पवस्व सहस्र साः वाज युः देव वीतौ
सं सिन्धु भिः कलशे वावशानः सं उस्रियाभिः प्र तिरन् नः आयुः ॥ १४ ॥

असंख्य धारा वाहविणारा तूं द्युलोकांतून वृष्टिप्रवाह सोड. तूं अगणित संपत्ति मिळवून देणारा आणि सत्वप्रेमी आहेस तर ह्या देवयज्ञांत सिन्धूंसह, प्रकाशधेनूंसह, आमचें आयुष्य वृद्धिंगत करून गर्जना करीत द्रोणकलशामध्यें स्वच्छप्रवाहानें वहा १४.


ए॒ष स्य सोमो॑ म॒तिभिः॑ पुना॒नो॑ऽत्यो॒ न वा॒जी तर॒तीदरा॑तीः ।
पयो॒ न दु॒ग्धं अदि॑तेरिषि॒रं उ॑र्व् ऐव गा॒तुः सु॒यमो॒ न वोळ्हा॑ ॥ १५ ॥

एषः स्यः सोमः मति भिः पुनानः अत्यः न वाजी तरति इत् अरातीः
पयः न दुग्धं अदितेः इषिरं उरु इव गातुः सु यमः न वोळ्हा ॥ १५ ॥

हाच तो सोम भक्ताच्या मननीय स्तुतिकडे वहात राहून अश्वारूढ सत्ववीराप्रमाणें शत्रूंसमूहांतून पार निघून जातोच जातो; आतां तोकसा आहे म्हणाल तर उत्साहप्रद आणि नुकतेंच दोहन केलेलें अदितीचें जणों दुग्ध, किंवा प्रशस्त मार्ग, किंवा सुयंत्रित चालणारा अश्व होय १५.


स्वा॒यु॒धः सो॒तृभिः॑ पू॒यमा॑नोऽ॒भ्यर्ष॒ गुह्यं॒ चारु॒ नाम॑ ।
अ॒भि वाजं॒ सप्ति॑रिव श्रव॒स्याभि वा॒युं अ॒भि गा दे॑व सोम ॥ १६ ॥

सु आयुधः सोतृ भिः पूयमानः अभि अर्ष गुह्यं चारु नाम
अभि वाजं सप्तिः इव श्रवस्या अभि वायुं अभि गाः देव सोम ॥ १६ ॥

उत्कृष्ट शस्त्रें धारण करणारा, आणि स्तोतृजनांनीं स्वच्छ केलेला असा तूं आपलें रमणीय परंतु गुप्त नांव प्रकट करून आमच्याकडे वहात रहा. कीर्तीच्या इच्छेनें अश्वारूढ वीर धांवतो त्याप्रमाणें सत्वसामर्थ्याला अनुलक्षून, हे दिव्यसोमा, तूं वायुदेवाकडे, आणि प्रकाशधेनूंकडे वहात रहा १६.


शिशुं॑ जज्ञा॒नं ह॑र्य॒तं मृ॑जन्ति शु॒म्भन्ति॒ वह्निं॑ म॒रुतो॑ ग॒णेन॑ ।
क॒विर्गी॒र्भिः काव्ये॑ना क॒विः सन् सोमः॑ प॒वित्रं॒ अत्य् ए॑ति॒ रेभ॑न् ॥ १७ ॥

शिशुं जजानं हर्यतं मृजन्ति शुम्भन्ति वह्निं मरुतः गणेन
कविः गीः भिः काव्येन कविः सन् सोमः पवित्रं अति एति रेभन् ॥ १७ ॥

नुकत्याच उपजलेल्या बालकाला स्वच्छ करतात त्याप्रमाणें तुज भक्तप्रिय विभूतिला भक्तजन स्वच्छ करीत आहेत. हवि पोहोंचविणारा जो तूं त्या तुला मरुत् हे आपल्या समूहाने सुशोभित करितात. असें झालें म्हणजे ज्ञानी सोम ललकारी देत पवित्रांतून वहात जातो १७.


ऋषि॑मना॒ य ऋ॑षि॒कृत् स्व॒र्षाः स॒हस्र॑णीथः पद॒वीः क॑वी॒नाम् ।
तृ॒तीयं॒ धाम॑ महि॒षः सिषा॑स॒न् सोमो॑ वि॒राजं॒ अनु॑ राजति॒ ष्टुप् ॥ १८ ॥

ऋषि मनाः यः ऋषि कृत् स्वः साः सहस्र नीथः पद वीः कवीनां
तृतीयं धाम महिषः सिसासन् सोमः वि राजं अनु राजति स्तुप् ॥ १८ ॥

जो ऋषींचें मन आहे, जो ऋषींना ऋषित्व देणारा आहे, जो स्वर्लोक देणारा, असंख्य स्तुतींचा स्वीकर करणारा आणि कवींचा अग्रेसर आहे; तो महाभाग, स्तवनीय सोम आपल्या तिसर्‍या तेजोमय स्थानीं वास करण्याच्या इच्छेनें विराज आणि स्तुति यांना सुप्रकाशित करतो १८.


च॒मू॒षच् छ्ये॒नः श॑कु॒नो वि॒भृत्वा॑ गोवि॒न्दुर्द्र॒प्स आयु॑धानि॒ बिभ्र॑त् ।
अ॒पां ऊ॒र्मिं सच॑मानः समु॒द्रं तु॒रीयं॒ धाम॑ महि॒षो वि॑वक्ति ॥ १९ ॥

चमू सत् श्येनः शकुनः वि भृत्वा गो विन्दुः द्रप्सः आयुधानि बिभ्रत्
अपां ऊर्मिं सचमानः समुद्रं तुरीयं धाम महिषः विवक्ति ॥ १९ ॥

चमूपात्रांत अधिष्ठित झालेला श्येन, अभीष्टदाता, सामर्थ्यसंपन्न पक्षिराज, प्रकाशधेनू देणारा आणि आपलीं आयुधें धारण करून उदकांचा कल्लोल जो समुद्र त्याच्या निकट राहणारा महाभाग सोम तो आपलें चवथें तेजोमय स्थान देखील प्रकट करतो १९.


मर्यो॒ न शु॒भ्रस्त॒न्वं मृजा॒नो॑ऽत्यो॒ न सृत्वा॑ स॒नये॒ धना॑नाम् ।
वृषे॑व यू॒था परि॒ कोशं॒ अर्ष॒न् कनि॑क्रदच् च॒म्वो३रा वि॑वेश ॥ २० ॥

मर्यः न शुभ्रः तन्वं मृजानः अत्यः न सृत्वा सनये धनानां
वृषा इव यूथा परि कोशं अर्षन् कनिक्रदत् चम्वोः आ विवेश ॥ २० ॥

शुभ्रतेजानें मंडित असलेल्या पुरुषाप्रमाणें आपलें अंग स्वच्छ करणारा, चपल अश्वारूढ वीराप्रमाणें यशोधनासाठीं धांव घेणारा, वृषभाप्रमाणें धेनूसमूहाकडे जाणारा हा सोम द्रोणकलशाकडे वहात जाऊन चमूपात्रांत भरून राहिला आहे २०.


पव॑स्वेन्दो॒ पव॑मानो॒ महो॑भिः॒ कनि॑क्रद॒त् परि॒ वारा॑ण्य् अर्ष ।
क्रीळ॑ञ् च॒म्वो३रा वि॑श पू॒यमा॑न॒ इन्द्रं॑ ते॒ रसो॑ मदि॒रो म॑मत्तु ॥ २१ ॥

पवस्व इन्दो इति पवमानः महः भिः कनिक्रदत् परि वाराणि अर्ष
क्रीळ्अन् चम्वोः आ विश पूयमानः इन्द्रं ते रसः मदिरः ममत्तु ॥ २१ ॥

आल्हादप्रदा, पावनप्रवाहा सोमा, स्वच्छ प्रवाहानें वहात रहा. गर्जना करीत श्रेष्ठ ऋत्विजांच्या हातून लोंकरीच्या पवित्रांतून तुझा प्रवाह वाहूं दे - तूं क्रीडा करीत चमूपात्रांत स्वच्छ प्रवाहानें भरून रहा; आणि तुझा तल्लीन करणारा रस इंद्राला हर्षनिर्भर करो २१.


प्रास्य॒ धारा॑ बृह॒तीर॑सृग्रन्न् अ॒क्तो गोभिः॑ क॒लशा॒ँ आ वि॑वेश ।
साम॑ कृ॒ण्वन् सा॑म॒न्यो विप॒श्चित् क्रन्द॑न्न् एत्य॒भि सख्यु॒र्न जा॒मिम् ॥ २२ ॥

प्र अस्य धाराः बृहतीः असृग्रन् अक्तः गोभिः कलशान् आ विवेश
साम कृण्वन् सामन्यः विपः चित् क्रन्दन् एति अभि सख्युः न जामिम् ॥ २२ ॥

पहा, ह्याचे विशाल प्रवाह झपाट्यानें वहात चालले, आणि तोहि गोदुग्धाशीं मिश्र होऊन कलशामध्यें प्रविष्ट झाला. जो सामप्रिय सामगायनांची प्रेरणा करतो, तो महाज्ञानी सोम मोठ्यानें गर्जना करून मित्राच्या आप्तवर्गाकडे जातो २२.


अ॒प॒घ्नन्न् ए॑षि पवमान॒ शत्रू॑न् प्रि॒यां न जा॒रो अ॒भिगी॑त॒ इन्दुः॑ ।
सीद॒न् वने॑षु शकु॒नो न पत्वा॒ सोमः॑ पुना॒नः क॒लशे॑षु॒ सत्ता॑ ॥ २३ ॥

अप घ्नन् एषि पवमान शत्रून् प्रियां न जारः अभि गीतः इन्दुः
सीदन् वनेषु शकुनः न पत्वा सोमः पुनानः कलशेषु सत्ता ॥ २३ ॥

पावनप्रवाहा, लावण्यवती तरुणीचा प्रियकर जसा आपल्या वल्लभेकडे जातो त्याप्रमाणें सर्वत्र प्रशंसा पावलेला आल्हादप्रद सोम शत्रूंना अगदीं ठार करून कलशाकडे गमन करतो. यथेच्छ संचार करणारा पक्षी वृक्षावर स्वस्थ बसतो त्याप्रमाणें शुद्धप्रवाह सोमही कलशामध्यें स्थिर होतो २३.


आ ते॒ रुचः॒ पव॑मानस्य सोम॒ योषे॑व यन्ति सु॒दुघाः॑ सुधा॒राः ।
हरि॒रानी॑तः पुरु॒वारो॑ अ॒प्स्व् अचि॑क्रदत् क॒लशे॑ देवयू॒नाम् ॥ २४ ॥

आ ते रुचः पवमानस्य सोम योषा इव यन्ति सु दुघाः सु धाराः
हरिः आनीतः पुरु वारः अप् सु अचिक्रदत् कलशे देव यूनाम् ॥ २४ ॥

पावनप्रवाह सोमा, प्रभो, तुझ्या सहज वाहणार्‍या रसधारा नवयुवतीप्रमाणें सहल करीत असतात. सर्वांना हवाहवासा वाटणारा सोम ऋत्विजांनीं आणला तेव्हां त्या हरिद्वर्ण सोमानें उदकांत आणि कलशांत शिरतांना मोठ्यानें गर्जना केली २४.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ९७ (अनेक ऋषिविरचित पवमान सोमसूक्त)

ऋषी - अनेक ऋषि : देवता - पवमान सोम : छंद - त्रिष्टुभ्


अ॒स्य प्रे॒षा हे॒मना॑ पू॒यमा॑नो दे॒वो दे॒वेभिः॒ सं अ॑पृक्त॒ रस॑म् ।
सु॒तः प॒वित्रं॒ पर्य् ए॑ति॒ रेभ॑न् मि॒तेव॒ सद्म॑ पशु॒मान्ति॒ होता॑ ॥ १ ॥

अस्य प्रेषा हेमना पूयमानः देवः देवेभिः सं अपृक्त रसं
सुतः पवित्रं परि एति रेभन् मिता इव सद्म पशु मन्ति होता ॥ १ ॥

ह्या ऋत्विजाच्या प्रेरणेनें आणि प्रोत्साहनानें स्वच्छ होऊन त्वां दिव्यविभूतिनें आपल्या रसाचा दिव्यविबुधाशीं संयोग करून दिलास. यज्ञपुरोहित व्यवस्थित बांधलेल्या पशुयुक्त गृहांत प्रवेश करितो त्याप्रमाणें खळखळाटानें वाहणारा तुझा रस पवित्राकडे जातो १.


भ॒द्रा वस्त्रा॑ सम॒न्या३ वसा॑नो म॒हान् क॒विर्नि॒वच॑नानि॒ शंस॑न् ।
आ व॑च्यस्व च॒म्वोः पू॒यमा॑नो विचक्ष॒णो जागृ॑विर्दे॒ववी॑तौ ॥ २ ॥

भद्रा वस्त्रा समन्या वसानः महान् कविः नि वचनानि शंसन्
आ वच्यस्व चम्वोः पूयमानः वि चक्षणः जागृविः देव वीतौ ॥ २ ॥

समारंभाला योग्य अशीं मंगलवस्त्रें परिधान करणारा तूं महाप्रतिभाशाली भक्तांच्या स्तवनांची वाखाणणी करून आणि अलंकृत होऊन चमूपात्रांत वाहत जा. सूक्ष्म दृष्टीनें सर्व काहीं पाहणारा तूं देवयज्ञाविषयीं तर सदैव जागरूकच राहतोस २.


सं उ॑ प्रि॒यो मृ॑ज्यते॒ सानो॒ अव्ये॑ य॒शस्त॑रो य॒शसां॒ क्षैतो॑ अ॒स्मे ।
अ॒भि स्व॑र॒ धन्वा॑ पू॒यमा॑नो यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ३ ॥

सं ओं इति प्रियः मृज्यते सानौ अव्ये यशः तरः यशसां क्षैतः अस्मे इति
अभि स्वर धन्व पूयमानः यूयं पात स्वस्ति भिः सदा नः ॥ ३ ॥

सर्वांना प्रिय, यशस्वी जनांतहि अत्यंत यशोवान् असा क्षेत्रपालक सोम, तो आमच्यासाठीं लोंकरीच्या पवित्राच्या उच्चभागीं स्वच्छ आणि अलंकृत होतो. हे सोमा तूं गर्जना करीत स्वच्छप्रवाहानें वहात जा; आणि दिव्यविभूतिंनो तुम्हीं आपल्या कल्याणप्रद आशीर्वचनांनीं आमचें सदैव रक्षण करा ३.


प्र गा॑यता॒भ्यर्चाम दे॒वान् सोमं॑ हिनोत मह॒ते धना॑य ।
स्वा॒दुः प॑वाते॒ अति॒ वारं॒ अव्यं॒ आ सी॑दाति क॒लशं॑ देव॒युर्नः॑ ॥ ४ ॥

प्र गायत अभि अर्चाम देवान् सोमं हिनोत महते धनाय
स्वादुः पवाते अति वारं अव्यं आ सीदाति कलशं देव युः नः ॥ ४ ॥

मित्रांनों तुम्हीं गुणगायन करा. दिव्यविभूतिंचें आम्हीं ऋक्‌स्तोत्रांनीं अर्चन करतों आणि उच्चप्रतीचें धन प्राप्त व्हावें म्हणून तुम्हीं देवाला सोमरस अर्पण करा. तो मधुररुचि सोमरस लोंकरीच्या पवित्रांतून स्वच्छ होऊन वहातो आणि मग देवोत्सुक होऊन आमच्या द्रोणकलशांत अधिष्ठित होतो ४.


इन्दु॑र्दे॒वानां॒ उप॑ स॒ख्यं आ॒यन् स॒हस्र॑धारः पवते॒ मदा॑य ।
नृभि॒ स्तवा॑नो॒ अनु॒ धाम॒ पूर्वं॒ अग॒न्न् इन्द्रं॑ मह॒ते सौभ॑गाय ॥ ५ ॥

इन्दुः देवानां उप सख्यं आयन् सहस्र धारः पवते मदाय
नृ भिः स्तवानः अनु धाम पूर्वं अगन् इन्द्रं महते सौभगाय ॥ ५ ॥

दिव्यविभूतिंचें मित्रत्व जोडून तो आल्हादी आणि असंख्य धारांचा सोम दिव्यविबुधांच्या हर्षासाठीं शुद्धप्रवाहानें वाहतो. शूर ऋत्विजांनीं स्तविलेल्या सोमानें आपल्या पूर्वीच्या तेजस्वितेला अनुसरून भक्ताला महत्‌भाग्य प्राप्त होण्यासाठीं इंद्राकडे गमन केलें ५.


स्तो॒त्रे रा॒ये हरि॑रर्षा पुना॒न इन्द्रं॒ मदो॑ गच्छतु ते॒ भरा॑य ।
दे॒वैर्या॑हि स॒रथं॒ राधो॒ अच्छा॑ यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ६ ॥

स्तोत्रे राये हरिः अर्ष पुनानः इन्द्रं मदः गच्चतु ते भराय
देवैः याहि स रथं राधः अच्च यूयं पात स्वस्ति भिः सदा नः ॥ ६ ॥

तूं हरिद्वर्ण सोम, स्वच्छ होऊन स्तोतृजनांसाठीं, त्यांच्या अखंड ऐश्वर्यासाठीं वहात रहा. तुझ्या उत्कर्षाकरितां हर्षकारी रस इंद्रापाशीं प्राप्त होवो. हे सोमा, दिव्यविभूतिंसह एकाच रथांत आरूढ होऊन कृपाप्रसाद करण्याच्या हेतूनें गमन कर; आणि दिव्यविभूतिंनों तुम्हींहि आपल्या कल्याणप्रद आशीर्वचनांनीं आमचें सदैव रक्षण करा. ६.


प्र काव्यं॑ उ॒शने॑व ब्रुवा॒णो दे॒वो दे॒वानां॒ जनि॑मा विवक्ति ।
महि॑व्रतः॒ शुचि॑बन्धुः पाव॒कः प॒दा व॑रा॒हो अ॒भ्य् एति॒ रेभ॑न् ॥ ७ ॥

प्र काव्यं उशना इव ब्रुवाणः देवः देवानां जनिम विवक्ति
महि व्रतः शुचि बन्धुः पावकः पदा वराहः अभि एति रेभन् ॥ ७ ॥

आद्यकवि जो उशना त्याच्याप्रमाणें हा दिव्य सोम काव्य रचून दिव्यविभूतिंचे अवतार कथन करतो. ज्याची बिरुदावलि श्रेष्ठ आहे, जो पवित्रजनांचा बन्धू, जो दुसर्‍याला पवित्र करतो हा सोमरूपी वराह गर्जना करीत आपल्या पायांनीं सर्व भूप्रदेशाचें आक्रमण करतो ७.


प्र हं॒सास॑स्तृ॒पलं॑ म॒न्युं अच्छा॒मादस्तं॒ वृष॑गणा अयासुः ।
आ॒ङ्गू॒ष्य१ ं पव॑मानं॒ सखा॑यो दु॒र्मर्षं॑ सा॒कं प्र व॑दन्ति वा॒णम् ॥ ८ ॥

प्र हंसासः तृपलं मन्युं अच्च अमात् अस्तं वृष गणाः अयासुः
आङ्गूष्यं पवमानं सखायः दुः मर्षं साकं प्र वदन्ति वाणम् ॥ ८ ॥

हंस आणि वृषभसमूह या सोमाचा तडफदार जोष पाहूनच भयानें आपल्या स्थानाकडे चालते झाले; परंतु प्रियमित्र जे ऋत्विज ते सर्वप्रकारें स्तुत्य, दर्दम, आणि भक्तपावन अशा सोमाला अनुलक्षून एक समयावच्छेदेंकरून स्तोत्रें म्हणत असतात ८.


स रं॑हत उरुगा॒यस्य॑ जू॒तिं वृथा॒ क्रीळ॑न्तं मिमते॒ न गावः॑ ।
प॒री॒ण॒सं कृ॑णुते ति॒ग्मशृ॑ङ्गो॒ दिवा॒ हरि॒र्ददृ॑शे॒ नक्तं॑ ऋ॒ज्रः ॥ ९ ॥

सः रंहते उरु गायस्य जूतिं वृथा क्रीळ्अन्तं मिमते न गावः
परीणसं कृणुते तिग्म शृङ्गः दिवा हरिः ददृशे नक्तं ऋज्रः ॥ ९ ॥

ज्याचें स्तवन सर्वत्र होतें अशा ईश्वराच्या प्रोत्साहनाला अनुसरून सोमरस मोठ्या सरोबरीनें वहातो, तोंच सहजवृत्तीनें क्रीडा करणार्‍या सोमाला प्रकाशधेनू आकलने करूं शकत नाहींत. तीक्ष्ण शृंगाचा सोम सर्व वस्तूंची परिपूर्णता करितो. तो दिवसा हरित्‌पल्लवयुक्त आणि रात्रीं तीव्र तेजाचा दिसतो. ९.


इन्दु॑र्वा॒जी प॑वते॒ गोन्यो॑घा॒ इन्द्रे॒ सोमः॒ सह॒ इन्व॒न् मदा॑य ।
हन्ति॒ रक्षो॒ बाध॑ते॒ पर्य् अरा॑ती॒र्वरि॑वः कृ॒ण्वन् वृ॒जन॑स्य॒ राजा॑ ॥ १० ॥

इन्दुः वाजी पवते गो न्योघाः इन्द्रे सोमः सह इन्वन् मदाय
हन्ति रक्षः बाधते परि अरातीः वरिवः कृण्वन् वृजनस्य राजा ॥ १० ॥

आल्हादप्रद, सत्वाढ्य सोम हा दुग्धौघाशीं मिश्रित होऊन आपले ओजस्वी रस इंद्राच्या ठिकाणीं अर्पण करून त्याला हर्ष व्हावा म्हणून शुद्धप्रवाहानें वहातो. तो राक्षसांना ठार करतो; भक्तांना विपुल सौख्य देतो, आणि दानधर्म न करणार्‍या शत्रूंची धूळधाण उडवितो. गोसमूहाचा तो राजा होय. १०.


अध॒ धार॑या॒ मध्वा॑ पृचा॒नस्ति॒रो रोम॑ पवते॒ अद्रि॑दुग्धः ।
इन्दु॒रिन्द्र॑स्य स॒ख्यं जु॑षा॒णो दे॒वो दे॒वस्य॑ मत्स॒रो मदा॑य ॥ ११ ॥

अध धारया मध्वा पृचानः तिरः रोम पवते अद्रि दुग्धः
इन्दुः इन्द्रस्य सख्यं जुषाणः देवः देवस्य मत्सरः मदाय ॥ ११ ॥

आपल्या धारेनें, आपल्या मधुररसानें दिव्यविभूतिंना तृप्त करणारा आणि ग्राव्यांनीं पिळलेला सोमरस लोंकरीच्या पवित्रांतून स्वच्छ गाळला जात आहे. हा आल्हादी रस इंद्राच्या मित्रत्वाची लालसा धरतो. तो दिव्य आणि हर्षकारी रसच देवाच्या हर्षोत्कर्षाला कारण होतो ११.


अ॒भि प्रि॒याणि॑ पवते पुना॒नो दे॒वो दे॒वान् स्वेन॒ रसे॑न पृ॒ञ्चन् ।
इन्दु॒र्धर्मा॑ण्य् ऋतु॒था वसा॑नो॒ दश॒ क्षिपो॑ अव्यत॒ सानो॒ अव्ये॑ ॥ १२ ॥

अभि प्रियाणि पवते पुनानः देवः देवान् स्वेन रसेन पृचन्
इन्दुः धर्माणि ऋतु था वसानः दश क्षिपः अव्यत सानौ अव्ये ॥ १२ ॥

आपल्या रसानें दिव्यविभूतिंना तृप्त करून हा दिव्य आणि पावन सोम सर्व प्रकारच्या प्रियवस्तु आपल्या भक्ताकडे घेऊन येतो. प्रत्येक ऋतूप्रमाणें निरनिराळे स्वभावधर्म धारण करणारा सोम हा पवित्रावर उच्चभागीं राहून ऋत्विजाच्या दहा अंगुलींना कार्यव्यापृत करतो. १२.


वृषा॒ शोणो॑ अभि॒कनि॑क्रद॒द्गा न॒दय॑न्न् एति पृथि॒वीं उ॒त द्याम् ।
इन्द्र॑स्येव व॒ग्नुरा शृ॑ण्व आ॒जौ प्र॑चे॒तय॑न्न् अर्षति॒ वाचं॒ एमाम् ॥ १३ ॥

वृषा शोणः अभि कनिक्रदत् गाः नदयन् एति पृथिवीं उत द्यां
इन्द्रस्य इव वग्नुः आ शृण्वे आजौ प्र चेतयन् अर्षति वाचं आ इमाम् ॥ १३ ॥

रक्तवर्ण सोमरूपवृषभ दिशारूप धेनूंना प्रतिनादित करून पृथिवी आणि द्युलोक यांच्या सन्मुख गर्जना करीत जातो. तेव्हां समरांत इंद्राच्या सिंहनादाप्रमाणें ध्वनि ऐकूं येतो आणि भक्तांना स्फूर्ति देऊन जातो. सोम हा आमच्या इंद्राच्या स्तवनवाणींना अनुलक्षून वहात जातो. १३.


र॒साय्यः॒ पय॑सा॒ पिन्व॑मान ई॒रय॑न्न् एषि॒ मधु॑मन्तं अं॒शुम् ।
पव॑मानः संत॒निं ए॑षि कृ॒ण्वन्न् इन्द्रा॑य सोम परिषि॒च्यमा॑नः ॥ १४ ॥

रसाय्यः पयसा पिन्वमानः ईरयन् एषि मधु मन्तं अंशुं
पवमानः सं तनिं एषि कृण्वन् इन्द्राय सोम परि सिच्यमानः ॥ १४ ॥

अतिशय रसाळ असा तूं दुधाशीं मिश्र होऊन उचंबळून जाऊन आणि आपल्या मधुर अंकुराला तरतरीत करून वहात जातोस. हे सोमा, स्वच्छप्रवाह असा तूं इंद्राप्रीत्यर्थ ओतला जातांना संतत धार उत्पन्न करून वहातोस १४.


ए॒वा प॑वस्व मदि॒रो मदा॑योदग्रा॒भस्य॑ न॒मय॑न् वध॒स्नैः ।
परि॒ वर्णं॒ भर॑माणो॒ रुश॑न्तं ग॒व्युर्नो॑ अर्ष॒ परि॑ सोम सि॒क्तः ॥ १५ ॥

एव पवस्व मदिरः मदाय उद ग्राभस्य नमयन् वध स्नैः
परि वर्णं भरमाणः रुशन्तं गव्युः नः अर्ष परि सोम सिक्तः ॥ १५ ॥

याप्रमाणें हर्षोत्कर्षकर असा तूं उदकांचा अवरोध करणार्‍या दुष्टाला आपल्या घातक शस्त्रांनीं वठणीस आणून देवाच्या हर्षोत्सवासाठीं स्वच्छप्रवाहानें वहा; तेजस्वी अंगकांति धारण करणारा, आणि हे सोमा, प्रकाशधेनूविषयीं उत्सुक असा तूं पात्रांत ओतला गेलास म्हणजे आमच्याकडे वहात ये १५.


जु॒ष्ट्वी न॑ इन्दो सु॒पथा॑ सु॒गान्य् उ॒रौ प॑वस्व॒ वरि॑वांसि कृ॒ण्वन् ।
घ॒नेव॒ विष्व॑ग् दुरि॒तानि॑ वि॒घ्नन्न् अधि॒ ष्णुना॑ धन्व॒ सानो॒ अव्ये॑ ॥ १६ ॥

जुष्टवी नः इन्दो इति सु पथा सु गानि उरौ पवस्व वरिवांसि कृण्वन्
घना इव विष्वक् दुः इतानि वि घ्नन् अधि स्नुना धन्व सानौ अव्ये ॥ १६ ॥

आल्हादप्रदा, तूं आमच्यावर प्रसन्न हो. सर्व मार्ग आम्हांला सुगम करून आणि आमचें हित साधून या विस्तीर्ण कलशांत स्वच्छप्रवाहानें वहा. लोखंडी घणानें ठेंचून टाकल्याप्रमाणें सर्व संकटाचा चुराडा उडव, आणि लोंकरीच्या पवित्राच्या उच्च भागावर आपल्या उत्कृष्ट प्रवाहानें वहा. १६.


वृ॒ष्टिं नो॑ अर्ष दि॒व्यां जि॑ग॒त्नुं इळा॑वतीं शं॒गयीं॑ जी॒रदा॑नुम् ।
स्तुके॑व वी॒ता ध॑न्वा विचि॒न्वन् बन्धू॑ँरि॒माँ अव॑राँ इन्दो वा॒यून् ॥ १७ ॥

वृष्टिं नः अर्ष दिव्यां जिगत्नुं इळ्आवतीं शं गयीं जीर दानुं
स्तुका इव वीता धन्व वि चिन्वन् बन्धून् इमान् अवरान् इन्दो इति वायून् ॥ १७ ॥

दिव्य, त्वरितगति, धान्यसमृद्धिकर, कल्याणरूप, आणि दानोत्सुक अशी पर्जन्यवृष्टि आम्हांवर वाहूं दे. मनोहर पुष्पगुच्छ वेंचून घ्यावे त्याप्रमाणें हे आल्हादप्रदा, तुझे कनिष्ठ बन्धू जे हे वायु त्यांना उचलून घेऊन तूं धों धों वहात ये १७.


ग्र॒न्थिं न वि ष्य॑ ग्रथि॒तं पु॑ना॒न ऋ॒जुं च॑ गा॒तुं वृ॑जि॒नं च॑ सोम ।
अत्यो॒ न क्र॑दो॒ हरि॒रा सृ॑जा॒नो मर्यो॑ देव धन्व प॒स्त्यावान् ॥ १८ ॥

ग्रन्थिं न वि स्य ग्रथितं पुनानः ऋजुं च गातुं वृजिनं च सोम
अत्यः न क्रदः हरिः आ सृजानः मर्यः देव धन्व पस्त्य वान् ॥ १८ ॥

गुंतागुंत झालेली गांठ उकलावी त्याप्रमाणें सरळ नीतिमार्ग आणि वक्रमार्ग ह्याचा घोंटाळा तूं उलगडून टाक. हे सोमा, शुद्धस्वरूप, हरिद्वर्ण असा तूं कलशांत ओतला जात असतां जोमदार अश्वाप्रमाणें गर्जना कर. दिव्यरूपा तूं वीर आपल्याच सदनांत सुखासीन आहेस तेथून आमच्याकडे वहात ये १८.


जुष्टो॒ मदा॑य दे॒वता॑त इन्दो॒ परि॒ ष्णुना॑ धन्व॒ सानो॒ अव्ये॑ ।
स॒हस्र॑धारः सुर॒भिरद॑ब्धः॒ परि॑ स्रव॒ वाज॑सातौ नृ॒षह्ये॑ ॥ १९ ॥

जुष्टः मदाय देव ताते इन्दो इति परि स्नुना धन्व सानौ अव्ये
सहस्र धारः सु रभिः अदब्धः परि स्रव वाज सातौ नृ सह्ये ॥ १९ ॥

आल्हादरूपा सोमा, तूं प्रसन्न होऊन देवाच्या हर्षासाठीं, देवाच्या यज्ञासाठीं आपल्या प्रवाहानें ऊर्णापवित्राच्या उच्चभागीं वहात रहा. तूं सहस्त्रावधि धारा सोडतोस, तूं सुगंधित आणि अप्रतिहत आहेस तर शूरांच्या धकाधकीला योग्य अशा सत्वविजयाच्या प्रसंगी तूं आपला रसौघ एकसारखा वहात ठेव १९.


अ॒र॒श्मानो॒ येऽर॒था अयु॑क्ता॒ अत्या॑सो॒ न स॑सृजा॒नास॑ आ॒जौ ।
ए॒ते शु॒क्रासो॑ धन्वन्ति॒ सोमा॒ देवा॑स॒स्ताँ उप॑ याता॒ पिब॑ध्यै ॥ २० ॥

अरश्मानः ये अरथाः अयुक्ताः अत्यासः न ससृजानासः आजौ
एते शुक्रासः धन्वन्ति सोमाः देवासः तान् उप यात पिबध्यै ॥ २० ॥

ज्यांना लगामाची जरूर नाहीं, जे रथ ओढीत नाहींत, किंवा जे रथाला जोडलेलेही नाहींत असे रणांगणाकडे धावणारे तीव्रवेगी जसे अश्व, त्याप्रमाणें हे शुभ्रतेजस्क सोमरस वहात आहेत. तर हे दिव्यविबुधांनो तुम्हीं तो रस प्राशन करण्यास्तव इकडे आगमन करा २०.


ए॒वा न॑ इन्दो अ॒भि दे॒ववी॑तिं॒ परि॑ स्रव॒ नभो॒ अर्ण॑श्च॒मूषु॑ ।
सोमो॑ अ॒स्मभ्यं॒ काम्यं॑ बृ॒हन्तं॑ र॒यिं द॑दातु वी॒रव॑न्तं उ॒ग्रम् ॥ २१ ॥

एव नः इन्दो इति अभि देव वीतिं परि स्रव नभः अर्णः चमूषु
सोमः अस्मभ्यं काम्यं बृहन्तं रयिं ददातु वीर वन्तं उग्रम् ॥ २१ ॥

याप्रमाणें आल्हादरूपा सोमा, देवाच्या प्रसन्नतेला अनुलक्षून मेघमंडलांतील उदककल्लोलाचा ओघ तूं चमूपात्रांत लोट. जें सकलांना प्रिय, जें श्रेष्ठ, वीरांनीं युक्त आणि शत्रुभीषण आहे, असें धन सोम हा आम्हांस अर्पण करो २१.


तक्ष॒द्यदी॒ मन॑सो॒ वेन॑तो॒ वाग् ज्येष्ठ॑स्य वा॒ धर्म॑णि॒ क्षोरनी॑के ।
आदीं॑ आय॒न् वरं॒ आ वा॑वशा॒ना जुष्टं॒ पतिं॑ क॒लशे॒ गाव॒ इन्दु॑म् ॥ २२ ॥

तक्षत् यदि मनसः वेनतः वाक् ज्येष्ठस्य वा धर्मणि क्षोः अनीके
आत् ईं आयन् वरं आ वावशानाः जुष्टं पतिं कलशे गावः इन्दुम् ॥ २२ ॥

उत्सुक भक्ताच्या मनापासून निघालेल्या, किंवा श्रेष्ठ पुरुषानें उच्चारलेल्या वाणीनें जेव्हां या सोमाला धर्मामध्यें आणि बलसमूहामध्यें सुसंस्कृत करून ठेविलें, तेव्हांच कलशामध्यें ठेवलेल्या उत्कृष्ट आणि प्रसन्न्नचित्त अशा आपल्या पतीकडे धेनू हंबारतच धांवून आल्या २२.


प्र दा॑नु॒दो दि॒व्यो दा॑नुपि॒न्व ऋ॒तं ऋ॒ताय॑ पवते सुमे॒धाः ।
ध॒र्मा भु॑वद्वृज॒न्यस्य॒ राजा॒ प्र र॒श्मिभि॑र्द॒शभि॑र्भारि॒ भूम॑ ॥ २३ ॥

प्र दानु दः दिव्यः दानु पिन्वः ऋतं ऋताय पवते सु मेधाः
धर्मा भुवत् वृजन्यस्य राजा प्र रास्मि भिः दश भिः भारि भूम ॥ २३ ॥

जो दानशाली आहे, जो दिव्य आणि दानयोग्यवस्तूंनीं ओतप्रोत भरलेला आहे, असा महाप्राज्ञ सोम सनातन सद्धर्मासाठीं सनातन धर्माचा प्रवाह लोटून देत आहे. राजा सोम हा संकटनिवारक सामर्थ्याचा निधि आहे, तो आपल्या सहा रश्मीनीं विपुल् समृद्धीचा भार वहातो २३.


प॒वित्रे॑भिः॒ पव॑मानो नृ॒चक्षा॒ राजा॑ दे॒वानां॑ उ॒त मर्त्या॑नाम् ।
द्वि॒ता भु॑वद्रयि॒पती॑ रयी॒णां ऋ॒तं भ॑र॒त् सुभृ॑तं॒ चार्व् इन्दुः॑ ॥ २४ ॥

पवित्रेभिः पवमानः नृ चक्षा राजा देवानां उत मर्त्यानां
द्विता भुवत् रयि पतिः रयीणां ऋतं भरत् सु भृतं चारु इन्दुः ॥ २४ ॥

पवित्राच्या योगाने स्वच्छप्रवाहानें वहाणारा, मानवहितदर्शी, दिव्यविबुधांचा आणि मानवांचा राजा सोम हा दोन्ही प्रकारचा आहे. तो अक्षयधनाचा प्रभु आहे. सर्वत्र ओतप्रोत भरलेलें जें सुंदर सनातन सत्य, त्याचेंच धारण या आल्हादी सोमानें केलें आहे. २४.


अर्वा॑ँ इव॒ श्रव॑से सा॒तिं अच्छेन्द्र॑स्य वा॒योर॒भि वी॒तिं अ॑र्ष ।
स नः॑ स॒हस्रा॑ बृह॒तीरिषो॑ दा॒ भवा॑ सोम द्रविणो॒वित् पु॑ना॒नः ॥ २५ ॥

अर्वान् इव श्रवसे सातिं अच्च इन्द्रस्य वायोः अभि वीतिं अर्ष
सः नः सहस्रा बृहतीः इषः दाः भव सोम द्रविणः वित् पुनानः ॥ २५ ॥

ज्याप्रमाणें तीव्रवेगी अश्व यशासाठीं विजयचिन्हाकडे धांवतो, त्याप्रमाणें इंद्राच्या आणि वायूच्या प्रसन्नतेला अनुलक्षून तूं वहात रहा. आम्हाला उच्चप्रतीचा उत्साह हजारों पटीनें दे. हे सोमा, तूं भक्तपावन आम्हांला अक्षय संपत्तीचा दाता हो २५.


दे॒वा॒व्यो नः परिषि॒च्यमा॑नाः॒ क्षयं॑ सु॒वीरं॑ धन्वन्तु॒ सोमाः॑ ।
आ॒य॒ज्यवः॑ सुम॒तिं वि॒श्ववा॑रा॒ होता॑रो॒ न दि॑वि॒यजो॑ म॒न्द्रत॑माः ॥ २६ ॥

देव अव्यः नः परि सिच्यमानाः क्षयं सु वीरं धन्वन्तु सोमाः
आयज्यवः सु मतिं विश्व वाराः होतारः न दिवि यजः मन्द्र तमाः ॥ २६ ॥

देवाला प्रसन्न करणारे आणि पात्रांत ओतलेले सोमरस आमच्या वीरप्रचुर सदनाकडे धों धों वहात येवोत. कारण हे सोमरस भक्ताची सद्‌भक्ति देवाला अर्पण करतात. ते सर्वजनाला प्रिय, यज्ञपुरोहिताप्रमाणें दिव्यतेजाची उपासना करणारे, आणि हर्षोत्कर्षकारी असे आहेत २६.


ए॒वा दे॑व दे॒वता॑ते पवस्व म॒हे सो॑म॒ प्सर॑से देव॒पानः॑ ।
म॒हश्चि॒द्धि ष्मसि॑ हि॒ताः स॑म॒र्ये कृ॒धि सु॑ष्ठा॒ने रोद॑सी पुना॒नः ॥ २७ ॥

एव देव देव ताते पवस्व महे सोम प्सरसे देव पानः
महः चित् हि स्मसि हिताः स मर्ये कृधि सु स्थाने रोदसी इति पुनानः ॥ २७ ॥

याप्रमाणें हे दिव्यरूपा, तूं देवाचें पेय आहेस म्हणून हे सोमा, ह्या देवयज्ञांत त्याच्या उत्कृष्ट प्रसादासाठीं तूं स्वच्छप्रवाहानें वहा. तुज महाविभूतिचे आम्हीं भक्त संग्रामांत गुंतलों आहोंत, तर पावनप्रवाह असा तूं या द्यावापृथिवींना सुस्थितींत ठेव २७.


अश्वो॒ नो क्र॑दो॒ वृष॑भिर्युजा॒नः सिं॒हो न भी॒मो मन॑सो॒ जवी॑यान् ।
अ॒र्वा॒चीनैः॑ प॒थिभि॒र्ये रजि॑ष्ठा॒ आ प॑वस्व सौमन॒सं न॑ इन्दो ॥ २८ ॥

अश्वः न क्रदः वृष भिः युजानः सिंहः न भीमः मनसः जवीयान्
अर्वाचीनैः पथि भिः ये रजिष्ठाः आ पवस्व सौमनसं नः इन्दो इति ॥ २८ ॥

वीरांनीं तुझी कार्यांत योजना केली म्हणजे तूं अश्वाप्रमाणें खिंकाळतोस; तूं सिंहाप्रमाणें भयंकर आणि वेगवान आहेस. तर ये; आणि आम्हांला अनुकूल अशा अत्यंत सरळ मार्गांनीं, हे आल्हादरूपा, तुझ्या सौजन्याचा ओघ आम्हांकडे वहात ठेव २८.


श॒तं धारा॑ दे॒वजा॑ता असृग्रन् स॒हस्रं॑ एनाः क॒वयो॑ मृजन्ति ।
इन्दो॑ स॒नित्रं॑ दि॒व आ प॑वस्व पुरए॒तासि॑ मह॒तो धन॑स्य ॥ २९ ॥

शतं धाराः देव जाताः असृग्रन् सहस्रं एनाः कवयः मृजन्ति
इन्दो इति सनित्रं दिवः आ पवस्व पुरः एता असि महतः धनस्य ॥ २९ ॥

देवापासून निघालेल्या शेंकडोंच नव्हे तर सहस्त्रावधि धारा वाहूं लागल्या. त्या धारांनाच कविजन काव्यानें अलंकृत करतात. आल्हादरूपा सोमा, द्युलोकांतून अभीष्टप्राप्तीचें साधन वहात आण. कारण श्रेष्ठ अशा धनाचा पुरोगामी दूत तूंच आहेस २९.


दि॒वो न सर्गा॑ अससृग्रं॒ अह्नां॒ राजा॒ न मि॒त्रं प्र मि॑नाति॒ धीरः॑ ।
पि॒तुर्न पु॒त्रः क्रतु॑भिर्यता॒न आ प॑वस्व वि॒शे अ॒स्या अजी॑तिम् ॥ ३० ॥

दिवः न सर्गाः अससृग्रं अह्नां राजा न मित्रं प्र मिनाति धीरः
पितुः न पुत्रः क्रतु भिः यतानः आ पवस्व विशे अस्यै अजीतिम् ॥ ३० ॥

आकाशांतील पर्जन्यवृष्टीप्रमाणें, रस प्रवाह एकसारखा चालू राहिला कारण रस धीरोदात्त राजा सोम हा आपल्या मित्राचें म्हणणें कधीं मोडीत नाहीं. इतकेंच काय पण, पुत्र आपल्या कर्तृत्वानें पित्याच्या संतोषासाठीं झटतो तसा तूं या जनतेसाठीं अजिंक्यतेचा ओघ वहात आण. ३०.


प्र ते॒ धारा॒ मधु॑मतीरसृग्र॒न् वारा॒न् यत् पू॒तो अ॒त्येष्य् अव्या॑न् ।
पव॑मान॒ पव॑से॒ धाम॒ गोनां॑ जज्ञा॒नः सूर्यं॑ अपिन्वो अ॒र्कैः ॥ ३१ ॥

प्र ते धाराः मधु मतीः असृग्रन् वारान् यत् पूतः अति एषि अव्यान्
पवमान पवसे धाम गोनां जजानः सूर्यं अपिन्वः अर्कैः ॥ ३१ ॥

तुझ्या मधुर धारा वाहूं लागल्या म्हणजे तूं ऊर्णावस्त्राच्या पवित्रांतून शुद्धप्रवाहानें पाझरतोस. हे पावनप्रवाहा, तूं प्रकाशधेनूंच्या तेजोमय स्थानाकडे वहात जातोस; आणि प्रकट होतांच सूर्याला प्रकाशकिरणानीं भरून टाकतोस ३१.


कनि॑क्रद॒दनु॒ पन्थां॑ ऋ॒तस्य॑ शु॒क्रो वि भा॑स्य् अ॒मृत॑स्य॒ धाम॑ ।
स इन्द्रा॑य पवसे मत्स॒रवा॑न् हिन्वा॒नो वाचं॑ म॒तिभिः॑ कवी॒नाम् ॥ ३२ ॥

कनिक्रदत् अनु पन्थां ऋतस्य शुक्रः वि भासि अमृतस्य धाम
सः इन्द्राय पवसे मत्सर वान् हिन्वानः वाचं मति भिः कवीनाम् ॥ ३२ ॥

सद्धर्माच्या मार्गानें जातांना गर्जना करणारा शुभ्रतेजस्क तूं अमरत्वाचे तेजोमय स्थान सुप्रकाशित करतोस, आणि कविजनांच्या वाणीला सद्बुद्धीच्या योगानें स्फ़ूर्ति देऊन, हर्षोत्कर्षकारी असा तूं इंद्राप्रीत्यर्थ शुद्धप्रवाहानें वहातोस ३२


दि॒व्यः सु॑प॒र्णो॑ऽव चक्षि सोम॒ पिन्व॒न् धाराः॒ कर्म॑णा दे॒ववी॑तौ ।
एन्दो॑ विश क॒लशं॑ सोम॒धानं॒ क्रन्द॑न्न् इहि॒ सूर्य॒स्योप॑ र॒श्मिम् ॥ ३३ ॥

दिव्यः सु पर्णः अव चक्षि सोम पिन्वन् धाराः कर्मणा देव वीतौ
आ इन्दो इति विश कलशं सोम धानं क्रन्दन् इहि सूर्यस्य उप रश्मिम् ॥ ३३ ॥

हे सोमा, तूं दिव्यलोकींचा गरुडपक्षी, आपला धाराप्रवाह सत्कर्मानें भरगच्च भरून टाकून, या देवोपासनेच्या प्रसंगी खालीं भूतलाकडे दृष्टि दे. आल्हादप्रदा, तुज सोमाचें आधारपात्र जो कलश त्यांत प्रवेश कर, आणि खळखळाट उडवून रविकिरणाच्या सान्निध्यानें गमन कर ३३.


ति॒स्रो वाच॑ ईरयति॒ प्र वह्नि॑रृ॒तस्य॑ धी॒तिं ब्रह्म॑णो मनी॒षाम् ।
गावो॑ यन्ति॒ गोप॑तिं पृ॒च्छमा॑नाः॒ सोमं॑ यन्ति म॒तयो॑ वावशा॒नाः ॥ ३४ ॥

तिस्रः वाचः ईरयति प्र वह्निः ऋतस्य धीतिं ब्रह्मणः मनीषां
गावः यन्ति गो पतिं पृच्चमानाः सोमं यन्ति मतयः वावशानाः ॥ ३४ ॥

हविर्भाग करणारा ऋत्विज् तीन वाणींचा उच्चार करतो. तो सनातन सत्याचें चिन्तन आणि ब्रह्मस्तोत्राचें मनन करतो. यज्ञधेनू मार्ग हुडकीत आपल्या धन्याकडे जातात तशाच स्तोतृजनाच्या भावनाहि मोठ्या उत्कंठेनें उच्च स्वरांत गायन करीत सोमाकडे गमन करतात ३४.


सोमं॒ गावो॑ धे॒नवो॑ वावशा॒नाः सोमं॒ विप्रा॑ म॒तिभिः॑ पृ॒च्छमा॑नाः ।
सोमः॑ सु॒तः पू॑यते अ॒ज्यमा॑नः॒ सोमे॑ अ॒र्कास्त्रि॒ष्टुभः॒ सं न॑वन्ते ॥ ३५ ॥

सोमं गावः धेनवः वावशानाः सोमं विप्राः मति भिः पृच्चमानाः
सोमः सुतः पूयते अज्यमानः सोमे अर्काः त्रि स्तुभः सं नवन्ते ॥ ३६ ॥

दूध देणार्‍या गाई उंचस्वरानें हंबारत सोमाकडे जातात; तसे ज्ञानी स्तोतेहि मननस्तुतींनीं शोध करीत करीत सोमाकडेच जातात. पिळलेला सोमरस प्रवाहानें वाहूं लागला म्हणजे सर्व वस्तूंना पावन करतो, आणि अर्कस्तोत्रें आणि त्रिष्टुभ्‌स्तोत्रें देखील सोमाच्या ठिकाणीं एकत्र होऊन ईश्वराचें स्तवन करितात ३५.


ए॒वा नः॑ सोम परिषि॒च्यमा॑न॒ आ प॑वस्व पू॒यमा॑नः स्व॒स्ति ।
इन्द्रं॒ आ वि॑श बृह॒ता रवे॑ण व॒र्धया॒ वाचं॑ ज॒नया॒ पुरं॑धिम् ॥ ३६ ॥

एव नः सोम परि सिच्यमानः आ पवस्व पूयमानः स्वस्ति
इन्द्रं आ विश बृहता रवेण वर्धय वाचं जनय पुरं धिम् ॥ ३६ ॥

सोमा, याप्रमाणें तूं पात्रांत ओतला जाऊन भक्तांना पावन करणारा आहेस, तर स्वच्छप्रवाहानें वहात रहा. मोठ्यानें खळखळां वाहून तूं इंद्राच्या ठिकाणीं खुशाल प्रवेश कर, स्तुतिवाणीला वृद्धिंगत कर, आणि भक्तामध्यें स्फूर्ति उत्पन्न कर ३६.


आ जागृ॑वि॒र्विप्र॑ ऋ॒ता म॑ती॒नां सोमः॑ पुना॒नो अ॑सदच् च॒मूषु॑ ।
सप॑न्ति॒ यं मि॑थु॒नासो॒ निका॑मा अध्व॒र्यवो॑ रथि॒रासः॑ सु॒हस्ताः॑ ॥ ३७ ॥

आ जागृविः विप्रः ऋता मतीनां सोमः पुनानः असदत् चमूषु
सपन्ति यं मिथुनासः नि कामाः अध्वर्यवः रथिरासः सु हस्ताः ॥ ३७ ॥

जागरूक, ज्ञानी कवि, मननीय स्तुतींचें सत्यतत्त्व, असा जो भक्तपावन सोम तो चमूपात्रांत भरून राहिला. अनेक उत्कंठित जोडपीं आणि त्वरेनें जाणारे उत्तम भुजदंडांचे अध्वर्यू ज्याची सेवा करितात असा सोम पात्रांत भरून राहिला ३७.


स पु॑ना॒न उप॒ सूरे॒ न धातोभे अ॑प्रा॒ रोद॑सी॒ वि ष आ॑वः ।
प्रि॒या चि॒द्यस्य॑ प्रिय॒सास॑ ऊ॒ती स तू धनं॑ का॒रिणे॒ न प्र यं॑सत् ॥ ३८ ॥

सः पुनानः उप सूरे न धाता आ उभे इति अप्राः रोदसी इति वि सः आवर् इत्य् आवः
प्रिया चित् यस्य प्रियसासः ऊती सः तु धनं कारिणे न प्र यंसत् ॥ ३८ ॥

भक्तपावन सोमानें सूर्य सन्निध येतांच जगत्‌ स्त्रष्ट्याप्रमाणें उभय लोक आक्रमण करून टाकले आणि प्रकटहि केले. ज्याच्या कृपेनें प्रिय वस्तु अधिक प्रिय होतात तो सोम, काम करणाराला वेतन द्यावे त्याप्रमाणें वरदान देईल ३८.


स व॑र्धि॒ता वर्ध॑नः पू॒यमा॑नः॒ सोमो॑ मी॒ढ्वाँ अ॒भि नो॒ ज्योति॑षावीत् ।
येना॑ नः॒ पूर्वे॑ पि॒तरः॑ पद॒ज्ञाः स्व॒र्विदो॑ अ॒भि गा अद्रिं॑ उ॒ष्णन् ॥ ३९ ॥

सः वर्धिता वर्धनः पूयमानः सोमः मीढवान् अभि नः ज्योतिषा आवीत्
येन नः पूर्वे पितरः पद जाः स्वः विदः अभि गाः अद्रिं उष्णन् ॥ ३९ ॥

आपण वृद्धिंगत होऊन दुसर्‍यालाहि वृद्धिंगत करणारा, भक्तपावन, आणि अभीष्टवर्षक जो सोम त्यानें आपल्या तेजानें चोहोंकडून आमचें रक्षण केलें. अशा ह्या सोमाच्या योगानें सन्मार्गाची पाऊलवाट जाणणारे, आणि दिव्यलोकाची प्राप्ति झालेले जे आमचे पूर्वज वाडवडील त्यांनीं प्रकाशधेनू प्राप्तीच्या उद्देशानें पर्वतहि फोडून टाकला ३९.


अक्रा॑न् समु॒द्रः प्र॑थ॒मे विध॑र्मञ् ज॒नय॑न् प्र॒जा भुव॑नस्य॒ राजा॑ ।
वृषा॑ प॒वित्रे॒ अधि॒ सानो॒ अव्ये॑ बृ॒हत् सोमो॑ वावृधे सुवा॒न इन्दुः॑ ॥ ४० ॥

अक्रान् समुद्रः प्रथमे वि धर्मन् जनयन् प्र जाः भुवनस्य राजा
वृषा पवित्रे अधि सानौ अव्ये बृहत् सोमः ववृधे सुवानः इन्दुः ॥ ४० ॥

जो समुद्र अथवा भुवनांचा जो राजा त्यानें विविधस्वभावी जगाच्या पहिल्या स्थितींत प्राणिमात्र उत्पन्न करून सर्व आक्रमण केलें; त्याप्रमाणें आल्हादप्रद वीरपुंगव सोम पिळला जातांना ऊर्णापवित्रावर उच्चभागीं अत्यंत वृद्धिंगत झाला ४०.


म॒हत् तत् सोमो॑ महि॒षश्च॑कारा॒पां यद्गर्भो॑ऽवृणीत दे॒वान् ।
अद॑धा॒दिन्द्रे॒ पव॑मान॒ ओजो॑ऽजनय॒त् सूर्ये॒ ज्योति॒रिन्दुः॑ ॥ ४१ ॥

महत् तत् सोमः महिषः चकार अपां यत् गर्भः अवृणीत देवान्
अदधात् इन्द्रे पवमानः ओजः अजनयत् सूर्ये ज्योतिः इन्दुः ॥ ४१ ॥

महाविशाल सोमानें एक महत्कार्य असें केलें की, उदकांच्या पोटीं राहून देवांना प्रसन्न केलें. पावनप्रवाह सोमानें आपली ओजस्विता इंद्राच्या ठिकाणीं अर्पिली; आल्हादप्रद सोमानें सूर्याच्या ठिकाणीं प्रकाश उत्पन्न केला ४१.


मत्सि॑ वा॒युं इ॒ष्टये॒ राध॑से च॒ मत्सि॑ मि॒त्रावरु॑णा पू॒यमा॑नः ।
मत्सि॒ शर्धो॒ मारु॑तं॒ मत्सि॑ दे॒वान् मत्सि॒ द्यावा॑पृथि॒वी दे॑व सोम ॥ ४२ ॥

मत्सि वायुं इष्टये राधसे च मत्सि मित्रावरुणा पूयमानः
मत्सि शर्धः मारुतं मत्सि देवान् मत्सि द्यावापृथिवी इति देव सोम ॥ ४२ ॥

इष्टसिद्धीसाठीं आणि प्रसादासाठीं तूं वायूला दृष्ट करतोस; स्वच्छप्रवाहानें वाहून मित्रावरुणांना हृष्ट करतोस, मरुत्‌गणाला हर्षित करतोस; दिव्यविबुधांना हर्षित करतोस; हे दिव्या सोमा तूं द्यावापृथिवींनाहि हर्षित करतोस ४२.


ऋ॒जुः प॑वस्व वृजि॒नस्य॑ ह॒न्तापामी॑वां॒ बाध॑मानो॒ मृध॑श्च ।
अ॒भि॒श्री॒णन् पयः॒ पय॑सा॒भि गोनां॒ इन्द्र॑स्य॒ त्वं तव॑ व॒यं सखा॑यः ॥ ४३ ॥

ऋजुः पवस्व वृजिनस्य हन्ता अप अमीवां बाधमानः मृधः च
अभि श्रीणन् पयः पयसा अभि गोनां इन्द्रस्य त्वं तव वयं सखायः ॥ ४३ ॥

सरळ स्वभावाचा तूं सोम पावनप्रवाहानें वहा. तूं कुटिलमार्गाचा उच्छेद करणारा आहेस; आधिव्याधींना आणि शत्रुसैन्याला दूर हांकून देऊन त्यांचा नाश करणारा आहेस. तूं आपलें शुभ्र दुग्ध धेनूच्या दुग्धाशीं मिसळून देतोस. तूं इंद्राचा प्रियमित्र आहेस, आणि आम्हीं तुझे प्रियमित्र आहोत ४३.


मध्वः॒ सूदं॑ पवस्व॒ वस्व॒ उत्सं॑ वी॒रं च॑ न॒ आ प॑वस्वा॒ भगं॑ च ।
स्वद॒स्वेन्द्रा॑य॒ पव॑मान इन्दो र॒यिं च॑ न॒ आ प॑वस्वा समु॒द्रात् ॥ ४४ ॥

मध्वः सूदं पवस्व वस्वः उत्सं वीरं च नः आ पवस्व भगं च
स्वदस्व इन्द्राय पवमानः इन्दो इति रयिं च नः आ पवस्व समुद्रात् ॥ ४४ ॥

मधुररसाचा ओघ वाहूं दे. तूं सर्वोत्कृष्ट धनाचा झरा आहेस; तर वीर्यशाली संतान आणि भाग्य ह्यांचा प्रवाह आमच्याकडे वाहूं दे. हे आल्हादप्रदा तूं स्वच्छप्रवाहानें वाहून इंद्राला रुचिप्रद हो; आणि त्याच्या ऐश्वर्यसमुद्रापासून अढळ धनाचा प्रवाह आमच्यावर लोट ४४.


सोमः॑ सु॒तो धार॒यात्यो॒ न हित्वा॒ सिन्धु॒र्न नि॒म्नं अ॒भि वा॒ज्यक्षाः ।
आ योनिं॒ वन्यं॑ असदत् पुना॒नः सं इन्दु॒र्गोभि॑रसर॒त् सं अ॒द्भिः ॥ ४५ ॥

सोमः सुतः धारया अत्यः न हित्वा सिन्धुः न निम्नं अभि वाजी अक्षारिति
आ योनिं वन्यं असदत् पुनानः सं इन्दुः गोभिः असरत् सं अत् भिः ॥ ४५ ॥

पिळल्यावर तो सत्ववीर सोम आपल्या धारेनें असा वहात राहील कीं, जणों लढाई जिंकणारा अश्व, किंवा उतरल्या जागेकडे धांवणारा प्रवाहच. याप्रमाणें भक्तपावन सोम वनस्पतींना योग्य अशा सदनांत अधिष्ठित झाला आणि नंतर तो आल्हादप्रद रस उदकांसह गोदुग्धाशीं मिश्र होऊन वाहूं लागला ४५.


ए॒ष स्य ते॑ पवत इन्द्र॒ सोम॑श्च॒मूषु॒ धीर॑ उश॒ते तव॑स्वान् ।
स्वर्चक्षा रथि॒रः स॒त्यशु॑ष्मः॒ कामो॒ न यो दे॑वय॒तां अस॑र्जि ॥ ४६ ॥

एषः स्यः ते पवते इन्द्र सोमः चमूषु धीरः उशते तवस्वान्
स्वः चक्षाः रथिरः सत्य शुष्मः कामः न यः देव यतां असर्जि ॥ ४६ ॥

इंद्रा, हाच तो तुझा धीरोदत्त सोम, कीं जो तुज उत्सुक देवासाठीं चमूपात्रांत वाहत आहे. तो तीव्रवेगी, दिव्यलोकदर्शी सोम रथाप्रमाणें त्वरीत धांवणारा आहे. सत्य हेंच त्याचें बल आहे, आणि आम्हां देवभक्तांची जणों काय मूर्तिमंत आकांक्षाच असा तो पात्रांत ओतला जात आहे ४६.


ए॒ष प्र॒त्नेन॒ वय॑सा पुना॒नस्ति॒रो वर्पां॑सि दुहि॒तुर्दधा॑नः ।
वसा॑नः॒ शर्म॑ त्रि॒वरू॑थं अ॒प्सु होते॑व याति॒ सम॑नेषु॒ रेभ॑न् ॥ ४७ ॥

एषः प्रत्नेन वयसा पुनानः तिरः वर्पांसि दुहितुः दधानः
वसानः शर्म त्रि वरूथं अप् सु होता इव याति समनेषु रेभन् ॥ ४७ ॥

हा भक्तपावन सोम आपल्या पुरातन आणि अखंड तारुण्यानेंच द्युकन्येच्या तेजस्वी भूषणांना आच्छादित करून तीन प्रकारचे दु:खनिवारक आवरण परिधान करतो आणि यज्ञपुरोहित देवाचें स्तवन करीत यज्ञसभेमध्यें जातो, त्याप्रमाणें उदकामध्यें संचार करतो ४७.


नू न॒स्त्वं र॑थि॒रो दे॑व सोम॒ परि॑ स्रव च॒म्वोः पू॒यमा॑नः ।
अ॒प्सु स्वादि॑ष्ठो॒ मधु॑माँ ऋ॒तावा॑ दे॒वो न यः स॑वि॒ता स॒त्यम॑न्मा ॥ ४८ ॥

नु नः त्वं रथिरः देव सोम परि स्रव चम्वोः पूयमानः
अप् सु स्वादिष्ठः मधु मान् ऋत वा देवः न यः सविता सत्य मन्मा ॥ ४८ ॥

खरोखरच दिव्य सोमा तूं आमचा महारथी आहेस; तूं स्वच्छ होऊन चमूपात्रांत सर्व दिशांनीं वहात रहा. तूं उदकरसांत अत्यंत रुचिकर आहेस; मधुर आहेस. सद्धर्मप्रिय असा तूं जगत्‌स्रष्टा जो देव त्याच्याप्रमाणेंच सत्यसंकल्प आहेस ४८.


अ॒भि वा॒युं वी॒त्यर्षा गृणा॒नोऽ॒भि मि॒त्रावरु॑णा पू॒यमा॑नः ।
अ॒भी नरं॑ धी॒जव॑नं रथे॒ष्ठां अ॒भीन्द्रं॒ वृष॑णं॒ वज्र॑बाहुम् ॥ ४९ ॥

अभि वायुं वीती अर्ष गृणानः अभि मित्रावरुणा पूयमानः
अभि नरं धी जवनं रथे स्थां अभि इन्द्रं वृषणं वज्र बाहुम् ॥ ४९ ॥

देवसेवेसाठीं तूं वायूकडे वहात जा. तुझी स्तुति होत असतां तूं स्वच्छ होऊन मित्रावरुणाकडे वहात जा. मनोवेगी, रथारूढ, वीर्यशाली, वज्रहस्त जो शूर इंद्र, त्याच्याकडे वहात जा ४९.


अ॒भि वस्त्रा॑ सुवस॒नान्य् अ॑र्षा॒भि धे॒नूः सु॒दुघाः॑ पू॒यमा॑नः ।
अ॒भि च॒न्द्रा भर्त॑वे नो॒ हिर॑ण्या॒भ्यश्वा॑न् र॒थिनो॑ देव सोम ॥ ५० ॥

अभि वस्त्रा सु वसनानि अर्ष अभि धेनूः सु दुघाः पूयमानः
अभि चन्द्रा भर्तवे नः हिरण्या अभि अश्वान् रथिनः देव सोम ॥ ५० ॥

उत्तम वस्त्रप्रावरणें यांचा प्रवाह आमच्याकडे लोटून दे. स्वच्छ ओघानें वाहून अभीष्टरूप दुग्ध विपुल देणार्‍या धेनूंचा प्रवाह वहात राहूं दे. आमच्या संभरणासाठीं चंद्राप्रमाणें मनोल्हादी सुवर्णाचा ओघ वहात ठेव. दिव्यसोमा, अश्व आणि रथरूढ वीर यांचाहि प्रवाह वहात ठेव ५०.


अ॒भी नो॑ अर्ष दि॒व्या वसू॑न्य् अ॒भि विश्वा॒ पार्थि॑वा पू॒यमा॑नः ।
अ॒भि येन॒ द्रवि॑णं अ॒श्नवा॑मा॒भ्य् आर्षे॒यं ज॑मदग्नि॒वन् नः॑ ॥ ५१ ॥

अभि नः अर्ष दिव्या वसूनि अभि विश्वा पार्थिवा पूयमानः
अभि येन द्रविणं अश्नवाम अभि आर्षेयं जमदग्नि वत् नः ॥ ५१ ॥

आमच्याकडे, उत्कृष्ट दिव्य वस्तूंचा, त्याचप्रमाणें पृथ्वीवरील यच्चावत्‌ उत्कृष्ट वस्तूंचा प्रवाह तूं स्वच्छ होतांना वहात ठेव. आणि ज्याच्या योगानें अचलधनाचा आम्हीं उपभोग घेऊं असें जें ऋषितेज तेंहि जमदग्निप्रमाणें आमच्याकडे वहात आण ५१.


अ॒या प॒वा प॑वस्वै॒ना वसू॑नि माँश्च॒त्व इ॑न्दो॒ सर॑सि॒ प्र ध॑न्व ।
ब्र॒ध्नश्चि॒दत्र॒ वातो॒ न जू॒तः पु॑रु॒मेध॑श्चि॒त् तक॑वे॒ नरं॑ दात् ॥ ५२ ॥

अया पवा पवस्व एना वसूनि मांश्चत्वे इन्दो इति सरसि प्र धन्व
ब्रध्नः चित् अत्र वातः न जूतः पुरु मेधः चित् तकवे नरं दात् ॥ ५२ ॥

अशाच धारेनें तूं स्वच्छ प्रवाहानें वहात रहा. आल्हादप्रदा, "मांश्चत्व" सरोवरांत तूं उत्कृष्ट धनाचा ओघ लोट; म्हणजे सर्वांचा श्रेष्ठ मूलाधार, वायूप्रमाणें वेगवान्‌ आणि अखिलजनपूज्य जो इंद्र तो तत्काल शरण जाणार्‍या भक्ताला शूर पुत्राचा लाभ देईल ५२.


उ॒त न॑ ए॒ना प॑व॒या प॑व॒स्वाधि॑ श्रु॒ते श्र॒वाय्य॑स्य ती॒र्थे ।
ष॒ष्टिं स॒हस्रा॑ नैगु॒तो वसू॑नि वृ॒क्षं न प॒क्वं धू॑नव॒द्रणा॑य ॥ ५३ ॥

उत नः एना पवया पवस्व अधि श्रुते श्रवाय्यस्य तीर्थे
षष्टिं सहस्रा नैगुतः वसूनि वृक्षं न पक्वं धूनवत् रणाय ॥ ५३ ॥

आणखीहि अशाच धारेनें वहात रहा; कीर्तीला सर्वस्वी योग्य आणि सर्वप्रसिद्ध अशा श्रवाय्याच्या तीर्थावर तूं शुद्धप्रवाहानें वहा. निगुत नांवाचे जे दुरात्मे आहेत त्यांच्या साठ हजार उत्कृष्ट वस्तु आमच्याकडे लोटून दे. पक्व फळांनीं डवरलेला वृक्ष गदगद हलवावा त्याप्रमाणें ती संपत्ति हलवून आमच्याकडे झुगारून दे ५३.


मही॒मे अ॑स्य॒ वृष॒नाम॑ शू॒षे माँश्च॑त्वे वा॒ पृश॑ने वा॒ वध॑त्रे ।
अस्वा॑पयन् नि॒गुतः॑ स्ने॒हय॒च् चापा॒मित्रा॒ँ अपा॒चितो॑ अचे॒तः ॥ ५४ ॥

महि इमे इति अस्य वृषनाम शूषे इति मांश्चत्वे वा पृशने वा वधत्रेइति
अस्वापयत् नि गुतः स्नेहयत् च अप अमित्रान् अप अचितः अच इतः ॥ ५४ ॥

ह्या देवाचीं हीं श्रेष्ठ आणि वीराला योग्य अशीं दोन नांवें कल्याणप्रदच आहेत. या "मांश्चत्वा"वर किंवा ज्या ठिकाणीं बाहुयुद्धांत शत्रू ठार झाले, त्या "पृशता"वर देवाचें मी संकिर्तन करतों. पूर्वी देवानें निगुतांना गाढ झोंप आणली आणि त्यांचा संहार केला. त्याचप्रमाणें आतांहि यज्ञ न करणारे जे आमचे शत्रू आहेत त्यांना दूर हांकून देऊन त्यांचा नाश कर ५४.


सं त्री प॒वित्रा॒ वित॑तान्य् ए॒ष्य् अन्व् एकं॑ धावसि पू॒यमा॑नः ।
असि॒ भगो॒ असि॑ दा॒त्रस्य॑ दा॒तासि॑ म॒घवा॑ म॒घव॑द्भ्य इन्दो ॥ ५५ ॥

सं त्री पवित्रा वि ततानि एषि अनु एकं धावसि पूयमानः
असि भगः असि दात्रस्य दाता असि मघ वा मघवत् भ्यः इन्दो इति ॥ ५५ ॥

एकावर एक पसरून दिलेल्या तीन पवित्रांतून तूं पाझरून जातोस; स्वच्छ होतांना एकेक पवित्रांतून झरझर धांवतोस. हे आल्हादप्रदा, तूं दानशूराचाहि दाता; ऐश्वर्यवानांचाहि ऐश्वर्यसंपन्न प्रभु आहेस ५५.


ए॒ष वि॑श्व॒वित् प॑वते मनी॒षी सोमो॒ विश्व॑स्य॒ भुव॑नस्य॒ राजा॑ ।
द्र॒प्साँ ई॒रय॑न् वि॒दथे॒ष्व् इन्दु॒र्वि वारं॒ अव्यं॑ स॒मयाति॑ याति ॥ ५६ ॥

एषः विश्व वित् पवते मनीषी सोमः विश्वस्य भुवनस्य राजा
द्रप्सान् ईरयन् विदथेषु इन्दुः वि वारं अव्यं समया अति याति ॥ ५६ ॥

सर्व कांहीं जाणणारा हा मनोजयी आणि यच्चावत्‌ भुवनांचा राजा सोम शुद्धप्रवाहानें वहात आहे. यज्ञमण्डपांत आपल्या रसाचे बिंदु टपटप पाझरून देऊन हा आल्हादप्रद इन्दु ऊर्णा-पवित्रांतून सर्व बाजूंनीं पार वाहून जात आहे ५६.


इन्दुं॑ रिहन्ति महि॒षा अद॑ब्धाः प॒दे रे॑भन्ति क॒वयो॒ न गृध्राः॑ ।
हि॒न्वन्ति॒ धीरा॑ द॒शभिः॒ क्षिपा॑भिः॒ सं अ॑ञ्जते रू॒पं अ॒पां रसे॑न ॥ ५७ ॥

इन्दुं रिहन्ति महिषाः अदब्धाः पदे रेभन्ति कवयः न गृध्राः
हिन्वन्ति धीराः दश भिः क्षिपाभिः सं आजते रूपं अपां रसेन ॥ ५७ ॥

कोणाकडूनहि पराभूत न होणारे महाभाग ऋषि आल्हादप्रदा सोमाचें अवघ्राण करतात; त्याच्या स्थानांत, निरंकुश कवीप्रमाणें त्याच्या यशाचें संकीर्तन करतात. तसेंच धीरोदात्त ऋत्विज्‌ आपल्या दहा अंगुलिंनीं पिळण्यासाठीं सोमाला उचलून नेतात, आणि त्याचे रूप उदकांच्या तत्वाशीं पूर्णपणें मिसळून देतात ५७.


त्वया॑ व॒यं पव॑मानेन सोम॒ भरे॑ कृ॒तं वि चि॑नुयाम॒ शश्व॑त् ।
तन् नो॑ मि॒त्रो वरु॑णो मामहन्तां॒ अदि॑तिः॒ सिन्धुः॑ पृथि॒वी उ॒त द्यौः ॥ ५८ ॥

त्वया वयं पवमानेन सोम भरे कृतं वि चिनुयाम शश्वत्
तत् नः मित्रः वरुणः ममहन्तां अदितिः सिन्धुः पृथिवी उत द्यौः ॥ ५८ ॥

तुज पावनप्रवाहाच्या योगानें, हे सोमा, यशस्वी संग्रामामध्यें जें जें आम्हीं हस्तगत केलें आहे तें निरंतर एकत्र व्यवस्थित ठेऊं असें कर. जगन्मित्र, विश्वाला आवरणारा वरुण आणि अदिती, तसेंच सिन्धु, पृथिवी आणि द्युलोक हे, हीं सर्व वरदानें आम्हांस देवोत. ५८.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ९८ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अंबरीष वार्षागिर आणि ऋजिश्वन् भारद्वाज : देवता - पवमान सोम : छंद - अनुष्टुभ्, बृहती


अ॒भि नो॑ वाज॒सात॑मं र॒यिं अ॑र्ष पुरु॒स्पृह॑म् ।
इन्दो॑ स॒हस्र॑भर्णसं तुविद्यु॒म्नं वि॑भ्वा॒सह॑म् ॥ १ ॥

अभि नः वाज सातमं रयिं अर्ष पुरु स्पृहं
इन्दो इति सहस्र भर्णसं तुवि द्युम्नं विभ्व सहम् ॥ १ ॥

सत्वसामर्थ्याचा अतिशय लाभ करून देणारें आणि सर्व जनाला स्पृहणीय वाटणारें असें ऐश्वर्य, हे आल्हादप्रदा सोमा, हजारों लोकांचें संभरण करणारें, अपार तेजस्वी, सर्वांपेक्षां वरचढ असें ऐश्वर्य तूं आम्हांकडे वहात आण १.


परि॒ ष्य सु॑वा॒नो अ॒व्ययं॒ रथे॒ न वर्मा॑व्यत ।
इन्दु॑र॒भि द्रुणा॑ हि॒तो हि॑या॒नो धारा॑भिरक्षाः ॥ २ ॥

परि स्यः सुवानः अव्ययं रथे न वर्म अव्यत
इन्दुः अभि द्रूणा हितः हियानः धाराभिः अक्षारिति ॥ २ ॥

वीरानें रथांत बसून कवच चढवावें, त्याप्रमाणें पिळला जातांना ह्या सोमानें लोंकरीचें पवित्र हेंच कवच धारण केलें; आणि काष्ठाच्या द्रोणांत ठेवलेला आल्हादी पल्लव दाबून पिळला तेव्हां त्यांतील रस अनेक प्रवाहांनीं वहात गेला २.


परि॒ ष्य सु॑वा॒नो अ॑क्षा॒ इन्दु॒रव्ये॒ मद॑च्युतः ।
धारा॒ य ऊ॒र्ध्वो अ॑ध्व॒रे भ्रा॒जा नैति॑ गव्य॒युः ॥ ३ ॥

परि स्यः सुवानः अक्षारिति इन्दुः अव्ये मद च्युतः
धारा यः ऊर्ध्वः अध्वरे भ्राजा न एति गव्य युः ॥ ३ ॥

पिळला जातांना हा आल्हादी, आणि हर्षप्रवाह पाझरणारा इन्दु लोंकरीच्या पवित्रांतून वहात गेला. जो आपल्या दीप्त धारेनें वहातो तो प्रकाशधेनू जिंकणारा सोम एकाद्या वीराप्रमाणें अध्वरयागांत नीट वर देवाकडे गमन करतो ३.


स हि त्वं दे॑व॒ शश्व॑ते॒ वसु॒ मर्ता॑य दा॒शुषे॑ ।
इन्दो॑ सह॒स्रिणं॑ र॒यिं श॒तात्मा॑नं विवाससि ॥ ४ ॥

सः हि त्वं देव शश्वते वसु मर्ताय दाशुषे
इन्दो इति सहस्रिणं रयिं शत आत्मानं विवाससि ॥ ४ ॥

तो तूं, हे दिव्यसोमा, आपल्या असंख्य भक्तगणाला हजारों प्रकारचें, आणि शेंकडों आत्म्यांना संतोष देणारें ऐश्वर्य खचित देतोस ४.


व॒यं ते॑ अ॒स्य वृ॑त्रह॒न् वसो॒ वस्वः॑ पुरु॒स्पृहः॑ ।
नि नेदि॑ष्ठतमा इ॒षः स्याम॑ सु॒म्नस्या॑ध्रिगो ॥ ५ ॥

वयं ते अस्य वृत्र हन् वसो इति वस्वः पुरु स्पृहः
नि नेदिष्ठ तमाः इषः स्याम सुम्नस्य अध्रिगो इत्य् अध्रि गो ॥ ५ ॥

हे वृत्रनाशका, दिव्यधना, अप्रतिहता देवा, तुझ्या या सर्व स्पृहणीय निधींच्या, तुझ्या मनोत्साहाच्या, तुझ्या निजानन्दाच्या आम्हीं अगदीं सन्निध राहणारे होऊं असें कर ५.


द्विर्यं पञ्च॒ स्वय॑शसं॒ स्वसा॑रो॒ अद्रि॑संहतम् ।
प्रि॒यं इन्द्र॑स्य॒ काम्यं॑ प्रस्ना॒पय॑न्त्य् ऊ॒र्मिण॑म् ॥ ६ ॥

द्विः यं पच स्व यशसं स्वसारः अद्रि संहतं
प्रियं इन्द्रस्य काम्यं प्र स्नापयन्ति ऊर्मिणम् ॥ ६ ॥

पांचाच्या दुप्पट म्हणजे दहा अंगुलिरूप ज्या भगिनी त्या, आपल्याच यशानें मंडित, ग्राव्यांनीं चुरलेला, सर्वांना प्रिय, इंद्राला आवडणारा आणि रसकल्लोलानें उचंबळणारा असा जो सोम त्याला स्नान घालतात ६.


परि॒ त्यं ह॑र्य॒तं हरिं॑ ब॒भ्रुं पु॑नन्ति॒ वारे॑ण ।
यो दे॒वान् विश्वा॒ँ इत् परि॒ मदे॑न स॒ह गच्छ॑ति ॥ ७ ॥

परि त्यं हर्यतं हरिं बभ्रुं पुनन्ति वारेण
यः देवान् विश्वान् इत् परि मदेन सह गच्चति ॥ ७ ॥

सर्वप्रिय, हरिद्वर्ण आणि नानरूपी सोमाला पवित्रावर स्वच्छ करतात, आणि तोहि आपल्या हर्षोत्कर्षासह दिव्यविभूतिंकडेच गमन करतो ७.


अ॒स्य वो॒ ह्य् अव॑सा॒ पान्तो॑ दक्ष॒साध॑नम् ।
यः सू॒रिषु॒ श्रवो॑ बृ॒हद्द॒धे स्व१ र्ण ह॑र्य॒तः ॥ ८ ॥

अस्य वः हि अवसा पान्तः दक्ष साधनं
यः सूरिषु श्रवह् बृहत् दधे स्वः न हर्यतः ॥ ८ ॥

त्याच्याच कृपेनें, तुमच्या चातुर्यबलाचें साधन जो सोमरस तो प्राशन करा. दिव्यप्रकाशाप्रमाणें, त्या सर्वप्रिय सोमानें आमच्या मोकधुरीणांमध्यें श्रेष्ठप्रतीचें यश ठेविलें आहे ८.


स वां॑ य॒ज्ञेषु॑ मानवी॒ इन्दु॑र्जनिष्ट रोदसी ।
दे॒वो दे॑वी गिरि॒ष्ठा अस्रे॑ध॒न् तं तु॑वि॒ष्वणि॑ ॥ ९ ॥

सः वां यजेषु मानवी इति इन्दुः जनिष्ट रोदसी इति
देवः देवी इति गिरि स्थाः अस्रेधन् तं तुवि स्वनि ॥ ९ ॥

मानवहितकारी द्यावापृथिवीहो, यज्ञांमध्यें तुमचा हा दिव्यसोम प्रकट झाला; तेव्हां पर्वतावर वास करणार्‍या त्या वनस्पतिला, हे दिव्यविभूतिनों, स्तोत्रनादानें दुमदुमन गेलेल्या यज्ञमण्डपांत ऋत्विजांनीं ग्राव्यांच्या योगानें अगदीं चुरून टाकलें ९.


इन्द्रा॑य सोम॒ पात॑वे वृत्र॒घ्ने परि॑ षिच्यसे ।
नरे॑ च॒ दक्षि॑णावते दे॒वाय॑ सदना॒सदे॑ ॥ १० ॥

इन्द्राय सोम पातवे वृत्र घ्ने परि सिच्यसे
नरे च दक्षिणावते देवाय सदन सदे ॥ १० ॥

हे सोमा, वृत्रनाशन जो इंद्र त्यानें तुला प्राशन करावें म्हणून तूं द्रोणपात्रांत ओतला जात आहेस; मानवहितकारी, दक्षिणाधेनू देणारा, आणि यज्ञगृहांत वास करणारा जो परमेश्वर त्याच्याप्रीत्यर्थ तुजला पात्रांत ओतीत आहेत १०.


ते प्र॒त्नासो॒ व्युष्टिषु॒ सोमाः॑ प॒वित्रे॑ अक्षरन् ।
अ॒प॒प्रोथ॑न्तः सनु॒तर्हु॑र॒श्चितः॑ प्रा॒तस्ताँ अप्र॑चेतसः ॥ ११ ॥

ते प्रत्नासः वि उष्टिषु सोमाः पवित्रे अक्षरन्
अप प्रोथन्तः सनुतः हुरः चितः प्रातरिति तान् अप्र चेतसः ॥ ११ ॥

ते पुरातन सोमाचे रस प्रभातसमय होतांच पवित्रावर पाझरले. आणि छपून राहणार्‍या, मन्दबुद्धि दुष्टचोरट्यांना आपल्या केवळ खिंकाळण्यानेंच दूर उडवून ते विजयशाली सोमरस वाहूं लागले ११.


तं स॑खायः पुरो॒रुचं॑ यू॒यं व॒यं च॑ सू॒रयः॑ ।
अ॒श्याम॒ वाज॑गन्ध्यं स॒नेम॒ वाज॑पस्त्यम् ॥ १२ ॥

तं सखायः पुरः रुचं यूयं वयं च सूरयः
अश्याम वाज गन्ध्यं सनेम वाज पस्त्यम् ॥ १२ ॥

मित्रांनों तुम्हीं आणि आमचे धुरीण असे सर्वजण मिळून अत्यंत तेज:पुंज, सत्वसामर्थ्याच्या सुगंधाने मण्डित आणि सत्वसामर्थ्याच्या गृहांतच वास करणारा जो सोम तो प्राप्त करून घेऊं १२.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ९९ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - रेभ आणि सूनू कश्यप : देवता - पवमान सोम : छंद - अनुष्टुभ्, बृहती


आ ह॑र्य॒ताय॑ धृ॒ष्णवे॒ धनु॑स्तन्वन्ति॒ पौंस्य॑म् ।
शु॒क्रां व॑य॒न्त्यसु॑राय नि॒र्णिजं॑ वि॒पां अग्रे॑ मही॒युवः॑ ॥ १ ॥

आ हर्यताय धृष्णवे धनुः तन्वन्ति पैंस्यं
शुक्रां वयन्ति असुराय निः निजं विपां अग्रे महीयुवः ॥ १ ॥

सर्वांना प्रिय आणि मोठ्या धडाडीचा जो सोम त्याच्यासाठीं पौरुषरूप धनुष्य सज्ज करितात; आणि नंतर सेवोत्सुक भक्त दैवी सामर्थ्यानें युक्त अशा त्या सोमाकरितां, शुभ्रकान्तीचें वस्त्र म्हणजे पवित्र, स्तवनाला प्रारंभ करण्याच्या अगोदरच विणून सिद्ध करतात १.


अध॑ क्ष॒पा परि॑ष्कृतो॒ वाजा॑ँ अ॒भि प्र गा॑हते ।
यदी॑ वि॒वस्व॑तो॒ धियो॒ हरिं॑ हि॒न्वन्ति॒ यात॑वे ॥ २ ॥

अध क्षपा परि कृतः वाजान् अभि प्र गाहते
यदि विवस्वतः धियः हरिं हिन्वन्ति यातवे ॥ २ ॥

नंतर रात्रीनें अलंकृत झालेला सोम सत्वप्राप्तीच्या संगरांत एकदम घुसतो; जेव्हां यजमानांच्या ध्यानस्तुति हरिद्वर्ण सोमानें पुढें सरसावावें म्हणून त्याला उत्तेजन देतात, त्यावेळीं घुसतो २.


तं अ॑स्य मर्जयामसि॒ मदो॒ य इ॑न्द्र॒पात॑मः ।
यं गाव॑ आ॒सभि॑र्द॒धुः पु॒रा नू॒नं च॑ सू॒रयः॑ ॥ ३ ॥

तं अस्य मर्जयामसि मदः यः इन्द्र पातमः
यं गावः आस भिः दधुः पुरा नूनं च सूरयः ॥ ३ ॥

ह्या सोमाचा हर्षकर रस, जो इंद्रानें प्राशन करण्याला अत्यंत योग्य आहे, त्या रसाला आम्हीं अलंकृत करतों; ज्या सोमाला धेनूनीं आपल्या मुखांत धरलें, आणि पूर्वींचे आणि आतांचे यजमान धारण करतात, त्याला अलंकृत करतों ३.


तं गाथ॑या पुरा॒ण्या पु॑ना॒नं अ॒भ्यनूषत ।
उ॒तो कृ॑पन्त धी॒तयो॑ दे॒वानां॒ नाम॒ बिभ्र॑तीः ॥ ४ ॥

तं गाथया पुराण्या पुनानं अभि अनूषत
उतो इति कृपन्त धीतयः देवानां नाम बिभ्रतीः ॥ ४ ॥

पुरातन गाथेच्या योगानें या भक्तपावन सोमाची महती ऋत्विजांनीं गायिली, आणि दिव्यविभूतिंची नांवें जिव्हाग्रावर धारण करणार्‍या ध्यानस्तुति सोमावर अनुरक्त झाल्या ४.


तं उ॒क्षमा॑णं अ॒व्यये॒ वारे॑ पुनन्ति धर्ण॒सिम् ।
दू॒तं न पू॒र्वचि॑त्तय॒ आ शा॑सते मनी॒षिणः॑ ॥ ५ ॥

तं उक्षमाणं अव्यये वारे पुनन्ति धर्णसिं
दूतं न पूर्व चित्तये आ शासते मनीषिणः ॥ ५ ॥

ऊर्णापवित्रावर पाझरणार्‍या त्या यज्ञाधार सोमाला भक्तजन स्वच्छ करतात; ते मनोनिग्रही ऋत्विज्‌ सर्वांच्या अगोदर दिव्यविभूतींचें ज्ञान व्हावें म्हणून दूताप्रमाणें या सोमाची प्रार्थना करितात ५.


स पु॑ना॒नो म॒दिन्त॑मः॒ सोम॑श्च॒मूषु॑ सीदति ।
प॒शौ न रेत॑ आ॒दध॒त् पति॑र्वचस्यते धि॒यः ॥ ६ ॥

सः पुनानः मदिन् तमः सोमः चमूषु सीदति
पशौ न रेतः आदधत् पतिः वचस्यते धियः ॥ ६ ॥

तो भक्तपावन, तो अत्यंत हर्षकर सोमरस चमूपात्रांत अधिष्ठित होतो. जसें पशूंमध्यें तसें इतरत्रहि त्यानें उत्पत्तीचें सामर्थ्य ठेवलें आणि चमूपात्रांत तो अधिष्ठित झाला, म्हणूनच बुद्धिमत्तेचा स्वामी अशी त्याची वाखाणणी होते ६.


स मृ॑ज्यते सु॒कर्म॑भिर्दे॒वो दे॒वेभ्यः॑ सु॒तः ।
वि॒दे यदा॑सु संद॒दिर्म॒हीर॒पो वि गा॑हते ॥ ७ ॥

सः मृज्यते सुकर्म भिः देवः देवेभ्यः सुतः
विदे यत् आसु सं ददिः महीः अपः वि गाहते ॥ ७ ॥

कर्मकुशल ऋत्विजांकडून दिव्यविबुधांसाठीं पिळलेला तो दिव्यरस त्यांच्याच हातून अलंकृत होतो. तो ह्या उदकांमध्यें उत्तम तत्व स्थापन करतो ही गोष्ट सर्वश्रुत आहे, म्हणूनच मोठ्या जलौघांत तो निमज्जन करतो ७.


सु॒त इ॑न्दो प॒वित्र॒ आ नृभि॑र्य॒तो वि नी॑यसे ।
इन्द्रा॑य मत्स॒रिन्त॑मश्च॒मूष्व् आ नि षी॑दसि ॥ ८ ॥

सुतः इन्दो इति पवित्रे आ नृ भिः यतः वि नीयसे
इन्द्राय मत्सरिन् तमः चमूषु आ नि सीदसि ॥ ८ ॥

हे आल्हादप्रदा सोमा, शूर ऋत्विजांनीं तुजला पिळून पवित्रावर नेऊन ठेविला आहे म्हणून तूं इंद्राला अत्यंत हर्षप्रद होतोस, आणि म्हणूनच चमूपात्रांत अधिष्ठित होतो ८.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त १०० (पवमान सोमसूक्त)

ऋषी - रेभ आणि सूनू कश्यप : देवता - पवमान सोम : छंद - अनुष्टुभ्


अ॒भी न॑वन्ते अ॒द्रुहः॑ प्रि॒यं इन्द्र॑स्य॒ काम्य॑म् ।
व॒त्सं न पूर्व॒ आयु॑नि जा॒तं रि॑हन्ति मा॒तरः॑ ॥ १ ॥

अभि नवन्ते अद्रुहः प्रियं इन्द्रस्य
काम्यं वत्सं न पूर्वे आयुनि जातं रिहन्ति मातरः ॥ १ ॥

कोणाचाहि द्वेष न करणार्‍या उदकरूप माता, आपला प्रिय वत्स आणि इंद्राचा आवडता जो सोम, त्याचें लहानग्या तान्हुल्याप्रमाणें चुंबन घेतात १.


पु॒ना॒न इ॑न्द॒व् आ भ॑र॒ सोम॑ द्वि॒बर्ह॑सं र॒यिम् ।
त्वं वसू॑नि पुष्यसि॒ विश्वा॑नि दा॒शुषो॑ गृ॒हे ॥ २ ॥

पुनानः इन्दो इति आ भर सोम द्वि बर्हसं रयिं
त्वं वसूनि पुष्यसि विश्वानि दाशुषः गृहे ॥ २ ॥

आल्हादप्रदा सोमा, तूं स्वच्छ होतांना दोन्ही प्रकारचें ऐश्वर्य आमच्याकडे आण. हविर्दात्या यजमानाच्या गृहांतील सर्व उत्कृष्ट वस्तूंची अभिवृद्धि तूंच करतोस २.


त्वं धियं॑ मनो॒युजं॑ सृ॒जा वृ॒ष्टिं न त॑न्य॒तुः ।
त्वं वसू॑नि॒ पार्थि॑वा दि॒व्या च॑ सोम पुष्यसि ॥ ३ ॥

त्वं धियं मनः युजं सृज वृष्टिं न तन्यतुः
त्वं वसूनि पार्थिवा दिव्या च सोम पुष्यसि ॥ ३ ॥

मनानेंच जिची योजना होते अशा भक्तिभावनेला, गर्जना करणार्‍या मेघमंडलांतून जशी वृष्टि करावी त्याप्रमाणें चालना दे. ऐहिक आणि दिव्य अशा ज्या ज्या उत्कृष्ट वस्तु आहेत त्यांची, हे सोमा, अभिवृद्धि तूंच करतोस ३.


परि॑ ते जि॒ग्युषो॑ यथा॒ धारा॑ सु॒तस्य॑ धावति ।
रंह॑माणा॒ व्य् अ१ व्ययं॒ वारं॑ वा॒जीव॑ सान॒सिः ॥ ४ ॥

परि ते जिग्युषः यथा धारा सुतस्य धावति
रंहमाणा वि अव्ययं वारं वाजी इव सानसिः ॥ ४ ॥

तूं जो विजयेच्छु, त्या तुझ्या पिळलेल्या रसाची जोरानें वाहणारी धारा ऊर्णापवित्रांतून अशी धांवते, कीं जणूं युद्धोत्सुक सत्ववीरच ४.


क्रत्वे॒ दक्षा॑य नः कवे॒ पव॑स्व सोम॒ धार॑या ।
इन्द्रा॑य॒ पात॑वे सु॒तो मि॒त्राय॒ वरु॑णाय च ॥ ५ ॥

क्रत्वे दक्षाय नः कवे पवस्व सोम धारया
इन्द्राय पातवे सुतः मित्राय वरुणाय च ॥ ५ ॥

ज्यांत कर्तृत्व आहे अशा चातुर्याच्या प्राप्तीसाठीं, हे प्रतिभाचालका सोमा, तूं पिळला जाऊन तुझ्या धारेच्या योगानें, इंद्रानें, मित्रानें, आणि वरुणानें तुजला प्राशन करावें म्हणून स्वच्छ प्रवाहानें वहात रहा ५.


पव॑स्व वाज॒सात॑मः प॒वित्रे॒ धार॑या सु॒तः ।
इन्द्रा॑य सोम॒ विष्ण॑वे दे॒वेभ्यो॒ मधु॑मत्तमः ॥ ६ ॥

पवस्व वाज सातमः पवित्रे धारया सुतः
इन्द्राय सोम विष्णवे देवेभ्यः मधुमत् तमः ॥ ६ ॥

सोमा, सत्वाढ्यतेचा लाभ अतिशय देणारा, आणि इंद्राप्रीत्यर्थ, विष्णूप्रीत्यर्थ, आणि दिव्यविबुधांप्रीत्यर्थ पिळलेला अत्यंत मधुररस जो तूं तो आपल्या धाराप्रवाहानें पवित्रांतून वहात रहा ६.


त्वां रि॑हन्ति मा॒तरो॒ हरिं॑ प॒वित्रे॑ अ॒द्रुहः॑ ।
व॒त्सं जा॒तं न धे॒नवः॒ पव॑मान॒ विध॑र्मणि ॥ ७ ॥

त्वां रिहन्ति मातरः हरिं पवित्रे अद्रुहः
वत्सं जातं न धेनवः पवमान वि धर्मणि ॥ ७ ॥

तुज हरिद्वर्ण वत्साला द्वेषरहित उदकमाता पवित्रावर ठेऊन तुझें चुंबन घेतात. हे पावनप्रवाहा, धेनू आपल्या तान्हुल्या वत्साला चाटतात त्याप्रमाणें या विविधवर्ण अन्तरालांत राहणार्‍या तुजला आपोदेवी कुरवाळीत असतात ७.


पव॑मान॒ महि॒ श्रव॑श्चि॒त्रेभि॑र्यासि र॒श्मिभिः॑ ।
शर्ध॒न् तमां॑सि जिघ्नसे॒ विश्वा॑नि दा॒शुषो॑ गृ॒हे ॥ ८ ॥

पवमान महि श्रवः चित्रेभिः यासि रश्मि भिः
शर्धन् तमांसि जिघ्नसे विश्वानि दाशुषः गृहे ॥ ८ ॥

पावनप्रवाहा, तूं आपल्या अद्‌भुत किरणांनीं उत्कृष्ट विख्याति पावतोस, आणि झपाट्यानें चालून जाऊन हविर्दात्या यजमानाच्या गृहांतील दारिद्र्य आणि अज्ञानरूप सर्व अंधकाराचा समूळ नाश करतोस ८.


त्वं द्यां च॑ महिव्रत पृथि॒वीं चाति॑ जभ्रिषे ।
प्रति॑ द्रा॒पिं अ॑मुञ्चथाः॒ पव॑मान महित्व॒ना ॥ ९ ॥

त्वं द्यां च महि व्रत पृथिवीं च अति जभ्रिषे
प्रति द्रापिं अमुचथाः पवमान महि त्वनास् ॥ ९ ॥

आपलें उच्चब्रीद राखणार्‍या सोमा, तूं द्युलोक आणि पृथिवी यांनाही व्यापून उरला आहेस. हे पावनप्रवाहा, आपल्या महिम्यानें तें एक कवचच तूं धारण केलें आहेस आणखी काय ? ९.


ॐ तत् सत्


GO TOP