PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ९ - सूक्त ८१ ते ९०

ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ८१ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - वसु भारद्वाज : देवता - पवमान सोम : छंद - जगती, त्रिष्टुभ्


प्र सोम॑स्य॒ पव॑मानस्यो॒र्मय॒ इन्द्र॑स्य यन्ति ज॒ठरं॑ सु॒पेश॑सः ।
द॒ध्ना यदीं॒ उन्नी॑ता य॒शसा॒ गवां॑ दा॒नाय॒ शूरं॑ उ॒दम॑न्दिषुः सु॒ताः ॥ १ ॥

प्र सोमस्य पवमानस्य ऊर्मयः इन्द्रस्य यन्ति जठरं सु पेशसः
दध्ना यत् ईं उत् नीताः यशसा गवां दानाय शूरं उत् अमन्दिषुः सुताः ॥ १ ॥

स्वच्छ प्रवाहानें वहाणार्‍या सोमाचे मनोहर कल्लोल इंद्राच्या कलशरूप उदरांत प्रवेश करतात. तेथें, प्रत्यक्ष यशच असें जें घट्ट दूध त्यानें त्या रसाला रुचकरपणा आणला आणि त्या सोमरसांनीं भक्ताला वरदान देण्यासाठीं इंद्राला हर्ष निर्भर केलें १.


अच्छा॒ हि सोमः॑ क॒लशा॒ँ असि॑ष्यद॒दत्यो॒ न वोळ्हा॑ र॒घुव॑र्तनि॒र्वृषा॑ ।
अथा॑ दे॒वानां॑ उ॒भय॑स्य॒ जन्म॑नो वि॒द्वाँ अ॑श्नोत्य॒मुत॑ इ॒तश्च॒ यत् ॥ २ ॥

अच्च हि सोमः कलशान् असिस्यदत् अत्यः न वोळ्हा रघु वर्तनिः वृषा
अथ देवानां उभयस्य जन्मनः विद्वान् अश्नोति अमुतः इतः च यत् ॥ २ ॥

खरोखरच रथ ओढून नेणार्‍या आणि भरधांव दौडणार्‍या तेजस्वी अश्वांप्रमाणें सोम हा द्रोणकलशांकडेच वहात राहिला; आणि नंतर दिव्यविभूतिंचे दोन्ही जन्म जाणणारा सोम, इहलोक आणि दिव्यलोक ह्या दोन्ही ठिकाणीं सर्वत्र व्यापून राहिला २.


आ नः॑ सोम॒ पव॑मानः किरा॒ वस्व् इन्दो॒ भव॑ म॒घवा॒ राध॑सो म॒हः ।
शिक्षा॑ वयोधो॒ वस॑वे॒ सु चे॒तुना॒ मा नो॒ गयं॑ आ॒रे अ॒स्मत् परा॑ सिचः ॥ ३ ॥

आ नः सोम पवमानः किर वसु इन्दो इति भव मघ वा राधसः महः
शिक्ष वयः धः वसवे सु चेतुना मा नः गयं आरे अस्मत् परा सिचः ॥ ३ ॥

हे सोमा, हे आल्हादप्रदा, पावनप्रवाहानें वहाणारा तूं अत्युत्कृष्ट धन आमच्याकडे विखरून टाक, आणि श्रेष्ठ अशा वरदानाचा दाता हो. तारुण्याचा उत्साह देणार्‍या सोमा, मला "वसला" तूं आपल्या उत्तम चैतन्यानें शिकव, आणि आमचें कल्याण आमच्यापासून दूर झुगारून देऊं नको ३.


आ नः॑ पू॒षा पव॑मानः सुरा॒तयो॑ मि॒त्रो ग॑च्छन्तु॒ वरु॑णः स॒जोष॑सः ।
बृह॒स्पति॑र्म॒रुतो॑ वा॒युर॒श्विना॒ त्वष्टा॑ सवि॒ता सु॒यमा॒ सर॑स्वती ॥ ४ ॥

आ नः पूषा पवमानः सु रातयः मित्रः गच्चन्तु वरुणः स जोषसः
बृहस्पतिः मरुतः वायुः अश्विना त्वष्टा सविता सु यमा सरस्वती ॥ ४ ॥

पूषा, पावनप्रवाह सोम, भक्तवश मित्र आणि वरुण हे आमच्याकडे आगमन करोत. तसेंच प्रेमळ बृहस्पति, मरुत्, वायु, अश्वीदेव, त्वष्टा, सविता आणि उत्तम नियम घालून देणारी सरस्वती हेहि आगमन करोत ४.


उ॒भे द्यावा॑पृथि॒वी वि॑श्वमि॒न्वे अ॑र्य॒मा दे॒वो अदि॑तिर्विधा॒ता ।
भगो॒ नृशंस॑ उ॒र्व् अ१ न्तरि॑क्षं॒ विश्वे॑ दे॒वाः पव॑मानं जुषन्त ॥ ५ ॥

उभे इति द्यावापृथिवी इति विश्वं इन्वे अर्यमा देवः अदितिः वि धाता
भगः नृ शंसः उरु अन्तरिक्षं विश्वे देवाः पवमानं जुषन्त ॥ ५ ॥

सर्वव्यापक द्यावापृथिवी, देदीप्यमान अर्यमा, अदिति, दैवघटना घडविणारा प्रशंसनीय भग, विस्तीर्ण अन्तरिक्ष आणि त्याचप्रमाणें सर्व दिव्यविबुध हे स्वच्छ प्रवाहानें वहाणार्‍या सोमाचा स्वीकार करोत ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ८२ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - वसु भारद्वाज : देवता - पवमान सोम : छंद - जगती, त्रिष्टुभ्


असा॑वि॒ सोमो॑ अरु॒षो वृषा॒ हरी॒ राजे॑व द॒स्मो अ॒भि गा अ॑चिक्रदत् ।
पु॒ना॒नो वारं॒ पर्य् ए॑त्य॒व्ययं॑ श्ये॒नो न योनिं॑ घृ॒तव॑न्तं आ॒सद॑म् ॥ १ ॥

असावि सोमः अरुषः वृषा हरिः राजा इव दस्मः अभि गाः अचिक्रदत्
पुनानः वारं परि एति अव्ययं श्येनः न योनिं घृत वन्तं आसदम् ॥ १ ॥

सोमरस पिळला आहे; तो अरुणवर्ण, वीर्यशाली हरिद्वर्ण आणि अद्‌भतस्वरूप सोम हा राजाप्रमाणें दिसत आहे; प्रकाशधेनूंना अनुलक्षून त्यानें गर्जना केली, आणि स्वच्छ होतांना तो लोंकरीच्या गाळण्याकडे घृताप्रमाणें मृदु अशा त्या आपल्या स्थानीं आरोढ होण्यासाठीं श्येनपक्ष्याप्रमाणें धांवत गेला १.


क॒विर्वे॑ध॒स्या पर्य् ए॑षि॒ माहि॑नं॒ अत्यो॒ न मृ॒ष्टो अ॒भि वाजं॑ अर्षसि ।
अ॒प॒सेध॑न् दुरि॒ता सो॑म मृळय घृ॒तं वसा॑नः॒ परि॑ यासि नि॒र्णिज॑म् ॥ २ ॥

कविः वेधस्या परि एषि माहिनं अत्यः न मृष्टः अभि वाजं अर्षसि
अप सेधन् दुः इता सोम मृळ्अय घृतं वसानः परि यासि निः निजम् ॥ २ ॥

तूं स्फूर्तिदाता यज्ञसंस्था चालविण्याच्या इच्छेनें त्या महा पवित्रावर अधिष्ठित होतोस, आणि चपल वीराप्रमाणें स्वच्छ होऊन सात्विक कार्याला अनुलक्षून वहातोस; तर हे सोमा. सकल संकटांचें उच्चाटन करून आम्हांवर कृपा कर. तूं घृताप्रमाणें मृदु वस्त्र परिधान करून सर्व पवित्र व्यापून टाकतोस २.


प॒र्जन्यः॑ पि॒ता म॑हि॒षस्य॑ प॒र्णिनो॒ नाभा॑ पृथि॒व्या गि॒रिषु॒ क्षयं॑ दधे ।
स्वसा॑र॒ आपो॑ अ॒भि गा उ॒तास॑र॒न् सं ग्राव॑भिर्नसते वी॒ते अ॑ध्व॒रे ॥ ३ ॥

पर्जन्यः पिता महिषस्य पर्णिनः नाभा पृथिव्याः गिरिषु क्षयं दधे
स्वसारः आपः अभि गाः उत असरन् सं ग्राव भिः नसते वीते अध्वरे ॥ ३ ॥

पर्जन्य हा त्या श्रेष्ठ अशा सोमपल्लवाचा पिता होय. पृथिवीचा मुख्य भाग जे पर्वत त्यांच्या ठिकाणीं तो वास करतो. तेथें भगिनी आपोदेवी प्रकाशधेनूंना उद्देशून वहात गेल्या आणि चित्ताकर्षी अशा अध्वरांत ग्राव्यांशी संल्लग्न झाल्या ३.


जा॒येव॒ पत्या॒व् अधि॒ शेव॑ मंहसे॒ पज्रा॑या गर्भ शृणु॒हि ब्रवी॑मि ते ।
अ॒न्तर्वाणी॑षु॒ प्र च॑रा॒ सु जी॒वसे॑ऽनि॒न्द्यो वृ॒जने॑ सोम जागृहि ॥ ४ ॥

जाया इव पत्यौ अधि शेव मंहसे पज्रायाः गर्भ शृणुहि ब्रवीमि ते
अन्तः वाणीषु प्र चार सु जीवसे अनिन्द्यः वृजने सोम जागृहि ॥ ४ ॥

पत्‍नी जशी पतीच्या ठिकाणीं अर्पावी, त्याप्रमाणें भक्ताच्या ठिकाणीं तूं आपल्या कृपेची देणगी अर्पण करतोस. तर, पज्रेच्या बालका सोमा, मी तुजला जें बोलतों तें ऐकून घे. भक्तांच्या स्तुतीच्या आंत तूं भरून रहा ४.


यथा॒ पूर्वे॑भ्यः शत॒सा अमृ॑ध्रः सहस्र॒साः प॒र्यया॒ वाजं॑ इन्दो ।
ए॒वा प॑वस्व सुवि॒ताय॒ नव्य॑से॒ तव॑ व्र॒तं अन्व् आपः॑ सचन्ते ॥ ५ ॥

यथा पूर्वेभ्यः शत साः अमृध्रः सहस्र साः परि अयाः वाजं इन्दो इति
एव पवस्व सुविताय नव्यसे तव व्रतं अनु आपः सचन्ते ॥ ५ ॥

हे आल्हादप्रदा अपराजित सोमा, शेंकडों वरदानें, किंबहुना सहस्त्रावधि देणग्या देणारा असा त्वां पूर्वीच्या भक्तांकडे सत्वसामर्थ्य चोहोंकडून नेलेंस. त्याचप्रमाणें आतांहि आमच्या अपूर्व अभ्युदयासाठीं स्वच्छप्रवाहानें वहा. प्रत्यक्ष आपोदेवीसुद्धां तूं घालून दिलेल्या नियमानुसारच चालतात ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ८३ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - पवित्र आंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - जगती


प॒वित्रं॑ ते॒ वित॑तं ब्रह्मणस्पते प्र॒भुर्गात्रा॑णि॒ पर्य् ए॑षि वि॒श्वतः॑ ।
अत॑प्ततनू॒र्न तदा॒मो अ॑श्नुते शृ॒तास॒ इद्वह॑न्त॒स्तत् सं आ॑शत ॥ १ ॥

पवित्रं ते वि ततं ब्रह्मणः पते प्र भुः गात्राणि परि एषि विश्वतः
अतप्त तनूः न तत् आमः अश्नुते शृतासः इत् वहन्तः तत् सं आशत ॥ १ ॥

हे प्रार्थनास्तोत्राच्या प्रभो, हें तुझें पवित्र वस्त्र विस्तृत पसरलें आहे. तूं त्याचा स्वामी म्हणून त्याच्या सर्व धागादोर्‍यांना तूं सर्वतोपरि व्यापून राहतोस. ज्यानें तपानें आपलें शरीर तापविलें नाहीं अशा कच्च्या मनुष्याला ही गोष्ट साधणार नाहीं. पण पुण्याचा भार वहाणारे आणि तपश्चर्येनें पक्व झालेले जे असतात तेच त्या पवित्राचा लाभ करून घेऊं शकतात १.


तपो॑ष् प॒वित्रं॒ वित॑तं दि॒वस्प॒दे शोच॑न्तो अस्य॒ तन्त॑वो॒ व्य् अस्थिरन् ।
अव॑न्त्यस्य पवी॒तारं॑ आ॒शवो॑ दि॒वस्पृ॒ष्ठं अधि॑ तिष्ठन्ति॒ चेत॑सा ॥ २ ॥

तपोः पवित्रं वि ततं दिवः पदे शोचन्तः अस्य तन्तवः वि अस्थिरन्
अवन्ति अस्य पवीतारं आशवः दिवः पृष्थं अधि तिष्ठन्ति चेतसा ॥ २ ॥

प्रतापशाली सोमाचें पवित्र धुलोकाच्या स्थानीं पसरून दिलें आहे. त्याचे तेजःपुंज तंतूहि निरनिराळे स्पष्ट दिसत आहेत. त्याचे शीघ्रगामी तुषार सोमरस स्वच्छ करणार्‍या भक्ताचें रक्षण करतात, आणि प्रेमयुक्त अन्तःकरणानें द्युलोकाच्या पृष्ठभागीं अधिष्ठित होतात २.


अरू॑रुचदु॒षसः॒ पृश्नि॑रग्रि॒य उ॒क्षा बि॑भर्ति॒ भुव॑नानि वाज॒युः ।
मा॒या॒विनो॑ ममिरे अस्य मा॒यया॑ नृ॒चक्ष॑सः पि॒तरो॒ गर्भं॒ आ द॑धुः ॥ ३ ॥

अरूरुचत् उषसः पृश्निः अग्रियः उक्षा बिभर्ति भुवनानि वाज युः
मायाविनः ममिरे अस्य मायया नृ चक्षसः पितरः गर्भं आ दधुः ॥ ३ ॥

अनेक रंगांच्या किरणांच्या दिव्य धुरीणानें प्रभातकाल उज्ज्वल केला. सत्वसामर्थ्याचा प्रभाव दाखविणारा तो वीर सर्व भुवनें धारण करतो. त्याची माया जाणणारे भक्त त्याच्याच दैवी मायेनें उत्पन्न झाले, आणि मानवांकडे अवलोकन करणार्‍या पितरांनीं मानवजातीचें बीजारोपण केलें ३.


ग॒न्ध॒र्व इ॒त्था प॒दं अ॑स्य रक्षति॒ पाति॑ दे॒वानां॒ जनि॑मा॒न्य् अद्भु॑तः ।
गृ॒भ्णाति॑ रि॒पुं नि॒धया॑ नि॒धाप॑तिः सु॒कृत्त॑मा॒ मधु॑नो भ॒क्षं आ॑शत ॥ ४ ॥

गन्धर्वः इत्था पदं अस्य रक्षति पाति देवानां जनिमानि अद्भुतः
गृभ्णाति रिपुं नि धया निधापतिः सुकृत् तमाः मधुनः भक्षं आशत ॥ ४ ॥

गन्धर्व हा खरोखरच ह्या सोमाच्या स्थानांचें रक्षण करतो, तोच अद्‌भुतपराक्रमी दिव्यविबुधांच्या अनेक समूहांचा प्रतिपाल करतो. हातीं पाश धारण करणारा तो प्रभु आपल्या पाशानें शत्रूला पकडून ठेवितो. त्यामुळें अत्यंत पुण्यशील जे भक्त असतात ते मधुर अमृताचा उपभोग घेऊं शकतात ४.


ह॒विर्ह॑विष्मो॒ महि॒ सद्म॒ दैव्यं॒ नभो॒ वसा॑नः॒ परि॑ यास्य् अध्व॒रम् ।
राजा॑ प॒वित्र॑रथो॒ वाजं॒ आरु॑हः स॒हस्र॑भृष्टिर्जयसि॒ श्रवो॑ बृ॒हत् ॥ ५ ॥

हविः हविष्मः महि सद्म दैव्यं नभः वसानः परि यासि अध्वरं
राजा पवित्र रथः वाजं आ अरुहः सहस्र भृष्टिः जयसि श्रवः बृहत् ॥ ५ ॥

हविसंपन्ना सोमा , तूं दिव्यजनांचें स्थान जें आकाश त्याचें वस्त्र परिधान करून हव्य आणि अध्वरयाग यांच्या भोंवतीं फिरत असतोस; हे सोमा राजा, तूं पवित्राचाच रथ करून सत्वसामर्थ्यावरहि ताण करतोस आणि सहस्त्रावधि आयुधें घेऊन श्रेष्ठ अशी कीर्ति भक्तांसाठीं जिंकून आणतोस ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ८४ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - प्रजापति वाच्य : देवता - पवमान सोम : छंद - जगती


पव॑स्व देव॒माद॑नो॒ विच॑र्षणिर॒प्सा इन्द्रा॑य॒ वरु॑णाय वा॒यवे॑ ।
कृ॒धी नो॑ अ॒द्य वरि॑वः स्वस्ति॒मदु॑रुक्षि॒तौ गृ॑णीहि॒ दैव्यं॒ जन॑म् ॥ १ ॥

पवस्व देव मादनः वि चर्षणिः अप्साः इन्द्राय वरुणाय वायवे
कृधि नः अद्य वरिवः स्वस्ति मत् उरु क्षितौ गृणीहि दैव्यं जनम् ॥ १ ॥

देवाला हृष्ट करणारा, सर्वगामी, आणि उदकें आपलीशीं करून घेणारा असा तूं इंद्राप्रीत्यर्थ, वरुणाप्रीत्यर्थ, पावनप्रवाहानें वहा. ह्या विस्तृत भूमीवर आमचें आश्रयस्थान आज कल्याणयुक्त कर आणि दिव्यविभूतिंचें स्तवन कर १.


आ यस्त॒स्थौ भुव॑ना॒न्य् अम॑र्त्यो॒ विश्वा॑नि॒ सोमः॒ परि॒ तान्य् अ॑र्षति ।
कृ॒ण्वन् सं॒चृतं॑ वि॒चृतं॑ अ॒भिष्ट॑य॒ इन्दुः॑ सिषक्त्य् उ॒षसं॒ न सूर्यः॑ ॥ २ ॥

आ यः तस्थौ भुवनानि अमर्त्यः विश्वानि सोमः परि तानि अर्षति
कृण्वन् सं चृतं वि चृतं अभिष्टये इन्दुः सिसक्ति उषसं न सूर्यः ॥ २ ॥

जो अमर सोम अखिल भुवनांना व्यापून राहिला आहे तोच त्या भुवनांच्या भोंवतींहि वहात रहातो. त्यांचा संयोग आणि वियोग ह्या दोन्ही गोष्टी प्राणिमात्राच्या योगक्षेमासाठीं घडवून आणून आल्हादप्रदा सोम हा सूर्याप्रमाणेंच उषःकालाच्या पाठोपाठ येतो २.


आ यो गोभिः॑ सृ॒ज्यत॒ ओष॑धी॒ष्व् आ दे॒वानां॑ सु॒म्न इ॒षय॒न्न् उपा॑वसुः ।
आ वि॒द्युता॑ पवते॒ धार॑या सु॒त इन्द्रं॒ सोमो॑ मा॒दय॒न् दैव्यं॒ जन॑म् ॥ ३ ॥

आ यः गोभिः सृज्यते ओषधीषु आ देवानां सुम्ने इषयन् उप वसुः
आ वि द्युता पवते धारया सुतः इन्द्रं सोमः मादयन् दैव्यं जनम् ॥ ३ ॥

सकल दिव्यनिधि ज्याच्याजवळ आहेत असा जो सोम औषधिंमध्यें गोदुग्धासहित ओतला जातो, तो दिव्यविबुधांच्या सहजसुखमय स्थितींत त्यांना स्फूर्ति आणतो, आणि पिवळा असतां इंद्राला आणि दिव्यजनांना हर्षित करण्याच्या हेतूनें विद्युल्लतारूप धारेनें वहात राहतो ३.


ए॒ष स्य सोमः॑ पवते सहस्र॒जिद्धि॑न्वा॒नो वाचं॑ इषि॒रां उ॑ष॒र्बुध॑म् ।
इन्दुः॑ समु॒द्रं उदि॑यर्ति वा॒युभि॒रेन्द्र॑स्य॒ हार्दि॑ क॒लशे॑षु सीदति ॥ ४ ॥

एषः स्यः सोमः पवते सहस्र जित् हिन्वानः वाचं इषिरां उषः बुधं
इन्दुः समुद्रं उत् इयर्ति वायु भिः आ इन्द्रस्य हार्दि कलशेषु सीदति ॥ ४ ॥

हा पहा तो सहस्त्रावधि ऐश्वर्य जिंकणारा, आणि प्रभातकाळीं जागृत होणार्‍या शीघ्रस्फुरित स्तुतिवाणीला प्रेरणा करणारा सोम पावनप्रवाहानें वहात आहे. तो वायूच्या योगानें समुद्राला उचंबळून देतो, आणि इंद्राच्या कलशरूप हृदयांत स्थिर राहतो ४.


अ॒भि त्यं गावः॒ पय॑सा पयो॒वृधं॒ सोमं॑ श्रीणन्ति म॒तिभिः॑ स्व॒र्विद॑म् ।
ध॒नं॒ज॒यः प॑वते॒ कृत्व्यो॒ रसो॒ विप्रः॑ क॒विः काव्ये॑ना॒ स्वर्चनाः ॥ ५ ॥

अभि त्यं गावः पयसा पयः वृधं सोमं श्रीणन्ति मति भिः स्वः विदं
धनं जयः पवते कृत्व्यः रसः विप्रः कविः काव्येन स्वः चनाः ॥ ५ ॥

दुग्धानें प्रफुल्लित होणार्‍या आणि मननीय स्तुतींनीं स्वर्गीय प्रकाश मिळवून देणार्‍या सोमाला, यज्ञधेनू आपल्या दुग्धाशीं मिश्रित करतात, तेव्हां तो वैभवजेता सत्कार्यकुशल सोम स्वच्छ प्रवाहानें वहातो, आणि ज्ञानी कवि आपल्या कवनानें दिव्यप्रकाशाविषयीं लालस होतो ५.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ८५ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - वेन भर्गव : देवता - पवमान सोम : छंद - जगती, त्रिष्टुभ्


इन्द्रा॑य सोम॒ सुषु॑तः॒ परि॑ स्र॒वापामी॑वा भवतु॒ रक्ष॑सा स॒ह ।
मा ते॒ रस॑स्य मत्सत द्वया॒विनो॒ द्रवि॑णस्वन्त इ॒ह स॒न्त्व् इन्द॑वः ॥ १ ॥

इन्द्राय सोम सु सुतः परि स्रव अप अमीवा भवतु रक्षसा सह
मा ते रसस्य मत्सत द्वयाविनः द्रविणस्वन्तः इह सन्तु इन्दवः ॥ १ ॥

सोमा, तुजला उत्तम रीतीनें पिळलेला आहे तर तूं इंद्राप्रीत्यर्थ वेगानें वहात रहा. आधिव्याधि हे राक्षसासहित नष्ट होऊन जावोत. जे दुतोंडे किंवा कपटी असतील त्यांना तुझ्या रसाच्या आनंदाचा लाभ कधीं न मिळो; आणि तुझे वैभवसंपन्न बिन्दूच आमच्या येथें यज्ञांत वास करोत १.


अ॒स्मान् स॑म॒र्ये प॑वमान चोदय॒ दक्षो॑ दे॒वानां॒ असि॒ हि प्रि॒यो मदः॑ ।
ज॒हि शत्रू॑ँर॒भ्य् आ भ॑न्दनाय॒तः पिबे॑न्द्र॒ सोमं॒ अव॑ नो॒ मृधो॑ जहि ॥ २ ॥

अस्मान् स मर्ये पवमान चोदय दक्षः देवानां असि हि प्रियः मदः
जहि शत्रून् अभि आ भन्दनायतः पिब इन्द्र सोमं अव नः मृधः जहि ॥ २ ॥

पावनप्रवाहा सोमा, तूं संग्रामांत आम्हांला स्फुरण दे. दिव्यविभूतिंचें चातुर्यबल तूं आहेस. त्यांचा प्रिय आनंदहि तूंच आहेस. तर आमच्या समोर येऊन मोठमोठ्यानें फुशारकी मारणार्‍या शत्रूंना तूं ठार कर. हे इंद्रा, तूं सोमरस प्राशन कर आणि आमच्या शत्रुसेनेचा धुव्वा उडवून दे २.


अद॑ब्ध इन्दो पवसे म॒दिन्त॑म आ॒त्मेन्द्र॑स्य भवसि धा॒सिरु॑त्त॒मः ।
अ॒भि स्व॑रन्ति ब॒हवो॑ मनी॒षिणो॒ राजा॑नं अ॒स्य भुव॑नस्य निंसते ॥ ३ ॥

अदब्धः इन्दो इति पवसे मदिन् तमः आत्मा इन्द्रस्य भवसि धासिः उत् तमः
अभि स्वरन्ति बहवः मनीषिणः राजानं अस्य भुवनस्य निंसते ॥ ३ ॥

आल्हादप्रदा सोमा, तूं अजिंक्य आणि अत्यंत हर्षकर आहेस, तर आपल्या पावनप्रवाहानें वहात रहा. तूं इंद्राचा आत्मा आहेस. त्याचा उत्कृष्ट हविर्भागहि तूंच आहेस. म्हणून मनोनिग्रहि जे अनेक भक्त आहेत ते तुझी प्रशंसा करतात, आणि या भुवनाचा राजा जो तूं त्या तुझ्या चरणाचें चुंबन घेतात ३.


स॒हस्र॑णीथः श॒तधा॑रो॒ अद्भु॑त॒ इन्द्रा॒येन्दुः॑ पवते॒ काम्यं॒ मधु॑ ।
जय॒न् क्षेत्रं॑ अ॒भ्यर्षा॒ जय॑न्न् अ॒प उ॒रुं नो॑ गा॒तुं कृ॑णु सोम मीढ्वः ॥ ४ ॥

सहस्र नीथः शत धारः अद्भुतः इन्द्राय इन्दुः पवते काम्यं मधु
जयन् क्षेत्रं अभि अर्ष जयन् अप उरुं नः गातुं कृणु सोम मीढवः ॥ ४ ॥

सहस्त्रावधि प्रकारांनीं मार्ग दाखविणारा, असंख्य धारांचा आणि आश्चर्योत्पादक सोम हा इंद्राप्रीत्यर्थ मधुररसाचा प्रवाह सोडतो. सोमा तूं भूप्रदेश जिंकून आणि उदकें जिंकून वेगानें वहात रहा. हे सोमा मनोरथवर्षका, आम्हांला प्रशस्त मार्ग आंखून दे ४.


कनि॑क्रदत् क॒लशे॒ गोभि॑रज्यसे॒ व्य् अ१ व्ययं॑ स॒मया॒ वारं॑ अर्षसि ।
म॒र्मृ॒ज्यमा॑नो॒ अत्यो॒ न सा॑न॒सिरिन्द्र॑स्य सोम ज॒ठरे॒ सं अ॑क्षरः ॥ ५ ॥

कनिक्रदत् कलशे गोभिः अज्यसे वि अव्ययं समया वारं अर्षसि
मर्मृज्यमानः अत्यः न सानसिः इन्द्रस्य सोम जठरे सं अक्षरः ॥ ५ ॥

खळखळाट उडवून देऊन तूं कलशांतील दुग्धाशीं मिसळून जातोस; लोंकरीच्या पवित्रांतून चोहोंकडून एकदम पाझरतोस; आणि अश्वसैनिकाप्रमाणें स्वच्छ, अलंकृत आणि विजयशाली होऊन इंद्राच्या जठरास अनुलक्षून वहात राहतोस ५.


स्वा॒दुः प॑वस्व दि॒व्याय॒ जन्म॑ने स्वा॒दुरिन्द्रा॑य सु॒हवी॑तुनाम्ने ।
स्वा॒दुर्मि॒त्राय॒ वरु॑णाय वा॒यवे॒ बृह॒स्पत॑ये॒ मधु॑मा॒ँ अदा॑भ्यः ॥ ६ ॥

स्वादुः पवस्व दिव्याय जन्मने स्वादुः इन्द्राय सुहवीतु नाम्ने
स्वादुः मित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधु मान् अदाभ्यः ॥ ६ ॥

तूं दिव्यजनांसाठीं मधुरप्रवाहानें वहा. ज्याचें नांव अत्यंत आदरणीय त्या इंद्राप्रीत्यर्थ तूं मधुरप्रवाहानें वहा. तसेंच मित्रासाठीं, वरुणासाठीं, वायूसाठीं, अथवा बृहस्पतीसाठीं माधुर्ययुक्त आणि अजिंक्य असा तूं मधुरप्रवाहानें वहा.


अत्यं॑ मृजन्ति क॒लशे॒ दश॒ क्षिपः॒ प्र विप्रा॑णां म॒तयो॒ वाच॑ ईरते ।
पव॑माना अ॒भ्यर्षन्ति सुष्टु॒तिं एन्द्रं॑ विशन्ति मदि॒रास॒ इन्द॑वः ॥ ७ ॥

अत्यं मृजन्ति कलशे दश क्षिपः प्र विप्राणां मतयः वाचः ईरते
पवमानाः अभि अर्षन्ति सु स्तुतिं आ इन्द्रं विशन्ति मदिरासः इन्दवः ॥ ७ ॥

ऋत्विजांच्या दहा अंगुलि तुज तीव्रवेगी सोमाला कलशामध्यें ओतून स्वच्छ करतात. ज्ञानी भक्ताच्या मननांनीं वाणीला प्रोत्साहन मिळतें, तेव्हां पावनप्रवाही सोमरस प्रेमळ स्तुतीला अनुलक्षून वहातात आणि हर्षोत्फुल्ल करणारे सोमबिंदु इंद्राच्या जठरांत प्रवेश करतात ७.


पव॑मानो अ॒भ्यर्षा सु॒वीर्यं॑ उ॒र्वीं गव्यू॑तिं॒ महि॒ शर्म॑ स॒प्रथः॑ ।
माकि॑र्नो अ॒स्य परि॑षूतिरीश॒तेन्दो॒ जये॑म॒ त्वया॒ धनं॑-धनम् ॥ ८ ॥

पवमानः अभि अर्ष सु वीर्यं उर्वीं गव्यूतिं महि शर्म स प्रथः
माकिः नः अस्य परि सूतिः ईशत इन्दो इति जयेम त्वया धनं धनम् ॥ ८ ॥

तूं पावनप्रवाहानें वाहून उत्कृष्ट शौर्य, धेनूंना योग्य असा विस्तीर्ण प्रदेश, आणि उत्तम, विख्यात आणि कल्याणप्रद आश्रय यांचा प्रवाह आम्हांवर लोटून दे. ह्या आमच्या सोमसवनावर कोणाचाहि वर्चष्मा चालूं नये म्हणून आल्हादप्रदा सोमा, तुझ्या सहायानें आम्ही प्रत्येक युद्ध जिंकू असें कर ८.


अधि॒ द्यां अ॑स्थाद्वृष॒भो वि॑चक्ष॒णो॑ऽरूरुच॒द्वि दि॒वो रो॑च॒ना क॒विः ।
राजा॑ प॒वित्रं॒ अत्य् ए॑ति॒ रोरु॑वद्दि॒वः पी॒यूषं॑ दुहते नृ॒चक्ष॑सः ॥ ९ ॥

अधि द्यां अस्थात् वृषभः वि चक्षणः अरूरुचात् वि दिवः रोचना कविः
राजा पवित्रं अति एति रोरुवत् दिवः पीयूषं दुहते नृ चक्षसः ॥ ९ ॥

सूक्ष्म निरीक्षण करणारा वीरपुंगव सोम, द्युलोकावर अधिष्ठित झाला. त्या प्रतिभाशाली विभूतिनें द्युलोकाचे प्रदेश नाना प्रकारांनीं उज्वल केले. राजा सोम गर्जना करीत पवित्रांतून पाझरूं लागला; आणि अशा रीतीनें ऋत्विजांनीं द्युलोकाच्या अमृताचें त्या मानवदर्शी सोमापासून दोहन केलें ९.


दि॒वो नाके॒ मधु॑जिह्वा अस॒श्चतो॑ वे॒ना दु॑हन्त्य् उ॒क्षणं॑ गिरि॒ष्ठाम् ।
अ॒प्सु द्र॒प्सं वा॑वृधा॒नं स॑मु॒द्र आ सिन्धो॑रू॒र्मा मधु॑मन्तं प॒वित्र॒ आ ॥ १० ॥

दिवः नाके मधु जिह्वाः असश्चतः वेनाः दुहन्ति उक्षणं गिरि स्थां
अप् सु द्रप्सं ववृधानं समुद्रे आ सिन्धोः ऊर्मा मधु मन्तं पवित्रे आ ॥ १० ॥

मधुरभाषिणी आणि कार्यव्यापृत सुंदरी, द्युलोकाच्या अत्युच्च स्थळीं मेघमंडळांमध्यें राहणार्‍या वृषभाला पिळून टाकतात; अर्थात् उदकांतील रसबिन्दूला किंवा समुद्रांत वृद्धिंगत होणारा, नदीच्या कल्लोलांत उसळणारा, आणि पवित्रांतून पाझरणारा जो मधुर सोम त्यालाच त्या पिळून टाकतात. १०.


नाके॑ सुप॒र्णं उ॑पपप्ति॒वांसं॒ गिरो॑ वे॒नानां॑ अकृपन्त पू॒र्वीः ।
शिशुं॑ रिहन्ति म॒तयः॒ पनि॑प्नतं हिर॒ण्ययं॑ शकु॒नं क्षाम॑णि॒ स्थाम् ॥ ११ ॥

नाके सु पर्णं उपपप्ति वांसं गिरः वेनानां अकृपन्त पूर्वीः
शिशुं रिहन्ति मतयः पनिप्नतं हिरण्ययं शकुनं क्षामणि स्थाम् ॥ ११ ॥

आकाशांत उड्डान करणार्‍या सोमरूप गरुडाचें या सुंदरींच्या नानाविध स्तवनवाणींनीं गुणवर्णन केलें. त्यांच्याच मननप्रयुक्त स्तुतींनीं त्या सोमरूप शिशूचें, त्या सुवर्णमय भूमीवर राहणार्‍या सुवर्णमय पक्ष्याचें लालन केलें ११.


ऊ॒र्ध्वो ग॑न्ध॒र्वो अधि॒ नाके॑ अस्था॒द्विश्वा॑ रू॒पा प्र॑ति॒चक्षा॑णो अस्य ।
भा॒नुः शु॒क्रेण॑ शो॒चिषा॒ व्य् अद्यौ॒त् प्रारू॑रुच॒द्रोद॑सी मा॒तरा॒ शुचिः॑ ॥ १२ ॥

ऊर्ध्वः गन्धर्वः अधि नाके अस्थात् विश्वा रूपा प्र्चति चक्षाणः अस्य
भानुः शुक्रेण शोचिषा वि अद्यौत् प्र अरूरुचत् रोदसी इति मातरा शुचिः ॥ १२ ॥

सज्ज झालेला गंधर्व या सृष्टींतील अखिल वस्तूंना अवलोकन करीत उच्च आकाशांत उभा राहिला. त्याचा किरणपुंज शुभ्र तेजानें तळपूं लागला, आणि त्यानें द्यावापृथिवींना, - जगताच्या मातापितरांना सुप्रकाशित केलें १२.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ८६ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अकृष्टमाष, सिकता निवावरी आणि इतर : देवता - पवमान सोम : छंद - जगती


प्र त॑ आ॒शवः॑ पवमान धी॒जवो॒ मदा॑ अर्षन्ति रघु॒जा इ॑व॒ त्मना॑ ।
दि॒व्याः सु॑प॒र्णा मधु॑मन्त॒ इन्द॑वो म॒दिन्त॑मासः॒ परि॒ कोशं॑ आसते ॥ १ ॥

प्र ते आशवः पवमान धी जवः मदाः अर्षन्ति रघुजाः इव त्मना
दिव्याः सु पर्णाः मधु मन्तः इन्दवः मदिन् तमासः परि कोशं आसते ॥ १ ॥

पावनप्रवाहा सोमा, पहा तुझे ते शीघ्रसंचारी, ध्यानबलानें प्रेरीत, हर्षकारी रस, चपल घोड्याप्रमाणें आपण होऊन त्वरेनें वहात आहेत. ते उत्तम पल्लवांनीं मंडित, माधुर्ययुक्त आणि अत्यंत हर्षकर रसबिंदु सोमपात्रांत सांठले आहेत १.


प्र ते॒ मदा॑सो मदि॒रास॑ आ॒शवो॑ऽसृक्षत॒ रथ्या॑सो॒ यथा॒ पृथ॑क् ।
धे॒नुर्न व॒त्सं पय॑सा॒भि व॒ज्रिणं॒ इन्द्रं॒ इन्द॑वो॒ मधु॑मन्त ऊ॒र्मयः॑ ॥ २ ॥

प्र ते मदासः मदिरासः आशवः असृक्षत रथ्यासः यथा पृथक्
धेनुः न वत्सं पयसा अभि वज्रिणं इन्द्रं इन्दवः मधु मन्तः ऊर्मयः ॥ २ ॥

ते तुझे हर्षकारी शीघ्रगति, आनंदरस, रथाचे अश्व जसे निरनिराळ्या चालीनें धांवतात त्याप्रमाणें, वाहत गेले आहेत; आणि धेनू वत्साकडे पान्हावून धांवते तसे हे आल्हादबिंन्दु, ह्या मधुर रसाच्या लाटा वज्रधर इंद्राकडे दुग्धमिश्रित होऊन चोहोंकडून धांवल्या आहेत. २.


अत्यो॒ न हि॑या॒नो अ॒भि वाजं॑ अर्ष स्व॒र्वित् कोशं॑ दि॒वो अद्रि॑मातरम् ।
वृषा॑ प॒वित्रे॒ अधि॒ सानो॑ अ॒व्यये॒ सोमः॑ पुना॒न इ॑न्द्रि॒याय॒ धाय॑से ॥ ३ ॥

अत्यः न हियानः अभि वाजं अर्ष स्वः वित् कोशं दिवः अद्रि मातरं
वृषा पवित्रे अधि सानौ अव्यये सोमः पुनानः इन्द्रियाय धायसे ॥ ३ ॥

सत्वसामर्थ्याच्या झुंजाकडे जाण्यास प्रोत्साहन दिलेल्या अश्वारूढ वीराप्रमाणें तूं दिव्यप्रकाश जिंकणारा आहेस, तर मेघाची माता जें आकाश त्याच्या कलशाकडे वहात जा. लोंकरीच्या पवित्राच्या शिखरावर आरूढ होणारा तूं सोम वीर, इंद्राप्रीत्यर्थ - इंद्राच्या तृप्तीसाठीं पावनप्रवाहानें वहात रहा ३.


प्र त॒ आश्वि॑नीः पवमान धी॒जुवो॑ दि॒व्या अ॑सृग्र॒न् पय॑सा॒ धरी॑मणि ।
प्रान्तरृष॑य॒ स्थावि॑रीरसृक्षत॒ ये त्वा॑ मृ॒जन्त्य् ऋ॑षिषाण वे॒धसः॑ ॥ ४ ॥

प्र ते आश्विनीः पवमान धी जुवः दिव्याः असृग्रन् पयसा धरीमणि
प्र अन्तः ऋषयः स्थाविरीः असृक्षत ये त्वा मृजन्ति ऋषि साण वेधसः ॥ ४ ॥

पावनप्रवाहा सोमा, तुझ्या ज्या सर्वव्यापी दिव्य धारा भक्तिबलानें प्रोत्साहित होतात, त्या रसधारक कलशामध्यें दुग्धासह वाहून राहिल्या आहेत. आणि जे काव्यकल्पक ऋषि तुला अलंकृत करीत आहेत, त्यांनींच, हे ऋषिसहचरा, तुझी अखण्डधारा कलशाच्या आंत ओतली आहे ४.


विश्वा॒ धामा॑नि विश्वचक्ष॒ ऋभ्व॑सः प्र॒भोस्ते॑ स॒तः परि॑ यन्ति के॒तवः॑ ।
व्या॒न॒शिः प॑वसे सोम॒ धर्म॑भिः॒ पति॒र्विश्व॑स्य॒ भुव॑नस्य राजसि ॥ ५ ॥

विश्वा धामानि विश्व चक्षः ऋभ्वसः प्र भोः ते सतः परि यन्ति केतवः
वि आनशिः पवसे सोम धर्म भिः पतिः विश्वस्य भुवनस्य राजसि ॥ ५ ॥

सर्व कांहीं अवलोकन करणार्‍या सोमा, सज्जनाचा धीरोदत्त प्रभु जो तूं, त्या तुझे किरण अखिल भुवनांना व्यापून टाकतात. म्हणून हे सोमा, तूंहि व्यापनशील होऊन पावनप्रवाहानें वहातोस, आणि परमेश्वरच्या सृष्टिनियमांनींच तूं या सर्व तेजोगोलांचा राजा होतोस ५.


उ॒भ॒यतः॒ पव॑मानस्य र॒श्मयो॑ ध्रु॒वस्य॑ स॒तः परि॑ यन्ति के॒तवः॑ ।
यदी॑ प॒वित्रे॒ अधि॑ मृ॒ज्यते॒ हरिः॒ सत्ता॒ नि योना॑ क॒लशे॑षु सीदति ॥ ६ ॥

उभयतः पवमानस्य रश्मयः ध्रुवस्य सतः परि यन्ति केतवः
यदि पवित्रे अधि मृज्यते हरिः सत्ता नि योना कलशेषु सीदति ॥ ६ ॥

सत्प्रवृत्त, पावनप्रवाही, आणि अढळ अशा सोमाचे किरण जगताला दोन्हीं बाजूंनीं घेरून टाकतात. आणि जेव्हा हरिद्वर्ण सोम चुरून पवित्रावर स्वच्छ धुतला जातो तेव्हां तो आपल्या स्वतःच्याच घरीं रहाणारा म्हणून द्रोणकलशांत अधिष्ठित होतो ६.


य॒ज्ञस्य॑ के॒तुः प॑वते स्वध्व॒रः सोमो॑ दे॒वानां॒ उप॑ याति निष्कृ॒तम् ।
स॒हस्र॑धारः॒ परि॒ कोशं॑ अर्षति॒ वृषा॑ प॒वित्रं॒ अत्य् ए॑ति॒ रोरु॑वत् ॥ ७ ॥

यजस्य केतुः पवते सु अध्वरः सोमः देवानां उप याति निः कृतं
सहस्र धारः परि कोशं अर्षति वृषा पवित्रं अति एति रोरुवत् ॥ ७ ॥

यज्ञाचा ध्वज, आणि अध्वरयागाला उत्तम रीतीनें सिद्धीस नेणारा सोम दिव्यविबुधांच्या निवासस्थानाकडे गमन करतो; तो सहस्त्रावधि प्रवाहांनीं पाझरून द्रोणकलशाकडे वहात जातो, तो वीरपुंगव गर्जना करीत पवित्रांतून खालीं पाझरतो ७.


राजा॑ समु॒द्रं न॒द्यो३ वि गा॑हतेऽ॒पां ऊ॒र्मिं स॑चते॒ सिन्धु॑षु श्रि॒तः ।
अध्य् अ॑स्था॒त् सानु॒ पव॑मानो अ॒व्ययं॒ नाभा॑ पृथि॒व्या ध॒रुणो॑ म॒हो दि॒वः ॥ ८ ॥

राजा समुद्रं नद्यः वि गाहते अपां ऊर्मिं सचते सिन्धुषु श्रितः
अधि अस्थाट् सानु पवमानः अव्ययं नाभा पृथिव्याः धरुणः महः दिवः ॥ ८ ॥

हा वनस्पतींचा राजा समुद्रांत आणि त्याचप्रमाणें नद्यांत नानाप्रकारांनीं उड्या घेतो. महानद्यांत राहून त्याच्या उदकांच्या लाटांबरोबर वर उसळतो. पहा हा पावनप्रवाही सोम ऊर्णावस्त्राच्या शिखरावर पृथ्वीच्या मध्यप्रदेशीं आरूढ झाला आहे. तो उच्च अशा द्युलोकाचाहि धारण करणारा आहे ८.


दि॒वो न सानु॑ स्त॒नय॑न्न् अचिक्रद॒द्द्यौश्च॒ यस्य॑ पृथि॒वी च॒ धर्म॑भिः ।
इन्द्र॑स्य स॒ख्यं प॑वते वि॒वेवि॑द॒त् सोमः॑ पुना॒नः क॒लशे॑षु सीदति ॥ ९ ॥

दिवः न सानु स्तनयन् अचिक्रदत् द्यौः च यस्य पृथिवी च धर्म भिः
इन्द्रस्य सख्यं पवते वि वेविदत् सोमः पुनानः कलशेषु सीदति ॥ ९ ॥

द्युलोकाचा उच्च प्रदेश दणाणून जाईल अशी ज्यानें गर्जना केली, आकाश ज्याच्या स्वाधीन आहे, आणि सृष्टिनियमाप्रमाणें पृथिवीहि आहे, तो इंद्राचें अन्तरंग पूर्णपणें जाणणारा सोम स्वच्छप्रवाहानें वहातो आणि शुद्ध स्वरूपानें कलशांत अधिष्ठित होतो ९.


ज्योति॑र्य॒ज्ञस्य॑ पवते॒ मधु॑ प्रि॒यं पि॒ता दे॒वानां॑ जनि॒ता वि॒भूव॑सुः ।
दधा॑ति॒ रत्नं॑ स्व॒धयो॑रपी॒च्यं म॒दिन्त॑मो मत्स॒र इ॑न्द्रि॒यो रसः॑ ॥ १० ॥

ज्योतिः यजस्य पवते मधु प्रियं पिता देवानां जनिता विभु वसुः
दधाति रत्नं स्वधयोः अपीच्यं मदिन् तमः मत्सरः इन्द्रियः रसः ॥ १० ॥

सोम हा यज्ञाचें तेज आहे, सर्वांना प्रिय असें मधुरपेयहि तोच आहे. तो दिव्यविभूतिंचा प्रतिपालक किंबहुना त्यांचा जनक आहे. असा तो अपारवैभव सोम शुद्धप्रवाहानें वहातो. सृष्टिधर्माप्रमाणें वर्तणार्‍या द्यावापृथिवीच्या आंत तो रत्‍न ठेवतो तें गुप्त ठेवतो. अत्यंत हर्षकर, हर्षनिर्भर आणि इंद्राला प्रिय असा रस तोच. १०.


अ॒भि॒क्रन्द॑न् क॒लशं॑ वा॒ज्य् अर्षति॒ पति॑र्दि॒वः श॒तधा॑रो विचक्ष॒णः ।
हरि॑र्मि॒त्रस्य॒ सद॑नेषु सीदति मर्मृजा॒नो॑ऽविभिः॒ सिन्धु॑भि॒र्वृषा॑ ॥ ११ ॥

अभि क्रन्दन् कलशं वाजी अर्षति पतिः दिवः शत धारः वि चक्षणः
हरिः मित्रस्य सदनेषु सीदति मर्मृजानः अवि भिः सिन्धु भिः वृषा ॥ ११ ॥

मोठ्यानें निनाद करून तो सत्ववीर, तो द्युलोकाचा पालक, तो असंख्य प्रवाहांनीं वहाणारा सूक्ष्मद्रष्टा सोम आपल्या कलशाकडे वहात जातो. लोंकरीच्या पवित्रांनीं, आणि नद्यांच्या उदकांनीं स्वच्छ होऊन तो हरिद्वर्ण वीरपुंगव मित्राच्या गृहांत अधिष्ठित होतो ११.


अग्रे॒ सिन्धू॑नां॒ पव॑मानो अर्ष॒त्यग्रे॑ वा॒चो अ॑ग्रि॒यो गोषु॑ गच्छति ।
अग्रे॒ वाज॑स्य भजते महाध॒नं स्वा॑यु॒धः सो॒तृभिः॑ पूयते॒ वृषा॑ ॥ १२ ॥

अग्रे सिन्धूनां पवमानः अर्षति अग्रे वाचः अग्रियः गोषु गच्चति
अग्रे वाजस्य भजते महाधनं सु आयुधः सोतृ भिः पूयते वृषा ॥ १२ ॥

भक्तांना पावन करणारा सोम हा नद्यांच्या अग्रभागीं वहातो, स्तुतीच्याहि अग्रभागीं वहातो; तो सर्वांचा अग्रेसर म्हणून वाक्‌ धेनूंचा समूहांत संचार करतो. सत्वसामर्थ्याच्याहि अग्रभागीं तोच रहातो. उत्तम शस्त्रांनीं सज्ज होऊन महायुद्धांत तोच भाग घेतो, आणि तोच वीरपुंगव स्तोतृजनांकडून अलंकृत होतो १२.


अ॒यं म॒तवा॑ञ् छकु॒नो यथा॑ हि॒तो॑ऽव्ये ससार॒ पव॑मान ऊ॒र्मिणा॑ ।
तव॒ क्रत्वा॒ रोद॑सी अन्त॒रा क॑वे॒ शुचि॑र्धि॒या प॑वते॒ सोम॑ इन्द्र ते ॥ १३ ॥

अयं मत वान् शकुनः यथा हितः अव्ये ससार पवमानः ऊर्मिणा
तव क्रत्वा रोदसी इति अन्तरा कवे शुचिः धिया पवते सोम इन्द्र ते ॥ १३ ॥

हातावर घेतलेला पक्षी जसा प्रिय तसाच हाहि सर्वमान्य आहे. तो लाटांनीं उचंबळून लोंकरीच्या पवित्रांतून शुद्धप्रवाहानें वाहत आहे; तुझ्याच कर्तृत्वानें, तुझ्याच इच्छेनें, हे प्रतिभादायका इंद्रा, हा शुद्ध सोम द्यावापृथिवींच्या मधल्या अन्तरालांत स्वच्छप्रवाहानें वहात आहे १३.


द्रा॒पिं वसा॑नो यज॒तो दि॑वि॒स्पृशं॑ अन्तरिक्ष॒प्रा भुव॑ने॒ष्व् अर्पि॑तः ।
स्वर्जज्ञा॒नो नभ॑सा॒भ्यक्रमीत् प्र॒त्नं अ॑स्य पि॒तरं॒ आ वि॑वासति ॥ १४ ॥

द्रापिं वसानः यजतः दिवि स्पृशं अन्तरिक्ष प्राः भुवनेषु अर्पितः
स्वः जजानः नभसा अभि अक्रमीत् प्रत्नं अस्य पितरं आ विवासति ॥ १४ ॥

आकाशस्पर्शी असें कवच धारण करणारा, परमपूज्य आणि अन्तराल व्यापून टाकणारा हा सोम सर्व भुवनांमध्यें स्थापन केलेला आहे. तो दिव्यप्रकाशाचा ज्ञाता आहे. त्यानें मेघमंडळाच्या मार्गानें सर्व ठिकाणीं संचार केला आहे, आणि त्याचा पुरातन पिता जो ईश्वर त्याचीच सेवा तो करीत आहे १४.


सो अ॑स्य वि॒शे महि॒ शर्म॑ यच्छति॒ यो अ॑स्य॒ धाम॑ प्रथ॒मं व्या॑न॒शे ।
प॒दं यद॑स्य पर॒मे व्योम॒न्य् अतो॒ विश्वा॑ अ॒भि सं या॑ति सं॒यतः॑ ॥ १५ ॥

सः अस्य विशे महि शर्म यच्चति यः अस्य धाम प्रथमं वि आनशे
पदं यत् अस्य परमे वि ओमनि अतः विश्वाः अभि सं याति सं यतः ॥ १५ ॥

ज्यानें सर्वांच्या अगोदर ह्या इंद्राचें तेजोमय स्थान व्यापून टाकलें तोच सोम, या इंद्राच्या हृदयांत भक्तांनीं प्रवेश करावा म्हणून त्यांना निःश्रेयस मार्गाचा आधार देतो. ह्याचें निवासस्थान अत्युच्च आकाशांता आहे म्हणूनच तो स्वतः संयमी देव अखिल वस्तूंना व्यापून राहतो १५.


प्रो अ॑यासी॒दिन्दु॒रिन्द्र॑स्य निष्कृ॒तं सखा॒ सख्यु॒र्न प्र मि॑नाति सं॒गिर॑म् ।
मर्य॑ इव युव॒तिभिः॒ सं अ॑र्षति॒ सोमः॑ क॒लशे॑ श॒तया॑म्ना प॒था ॥ १६ ॥

प्रो इति अयासीत् इन्दुः इन्द्रस्य निः कृतं सखा सख्युः न प्र मिनाति सं गिरं
मर्यः इव युवति भिः सं अर्षति सोमः कलशे शत याम्ना पथा ॥ १६ ॥

आल्हादप्रद सोमा इंद्राच्या लोकीं गेला आहे, त्याचा प्राणमित्र जो इंद्र तो आपल्या मित्राचा आग्रह कधीं मोडीत नाहीं. वीर जसा सुस्वरूप तरुणींसह सहल करीत जातो त्याप्रमाणें सोमरस हा शेंकडों मार्गांनीं कलशाकडे वहात जातो १६.


प्र वो॒ धियो॑ मन्द्र॒युवो॑ विप॒न्युवः॑ पन॒स्युवः॑ सं॒वस॑नेष्व् अक्रमुः ।
सोमं॑ मनी॒षा अ॒भ्यनूषत॒ स्तुभो॑ऽ॒भि धे॒नवः॒ पय॑सें अशिश्रयुः ॥ १७ ॥

प्र वः धियः मन्द्र युवः विपन्युवः पनस्युवः सं वसनेषु अक्रमुः
सोमं मनीषाः अभि अनूषत स्तुभः अभि धेनवः पयसा ईं अशिश्रयुः ॥ १७ ॥

तुमच्या हर्षोत्फुल्ल, स्तवननिरत, आणि स्तवनोत्सुक ज्या भावना त्या आपल्या निवासस्थानांमध्यें सर्वच भरून गेल्या आहेत; म्हणूनच भक्ताच्या एकाग्र स्तुतींनीं सोमाची महती गायिली, आणि धेनू दुग्धानें तुस्त होऊन त्याच्या आश्रयाला धांवून गेल्या १७.


आ नः॑ सोम सं॒यतं॑ पि॒प्युषीं॒ इषं॒ इन्दो॒ पव॑स्व॒ पव॑मानो अ॒स्रिध॑म् ।
या नो॒ दोह॑ते॒ त्रिरह॒न्न् अस॑श्चुषी क्षु॒मद्वाज॑व॒न् मधु॑मद्सु॒वीर्य॑म् ॥ १८ ॥

आ नः सोम सं यतं पिप्युषीं इषं इन्दो इति पवस्व पवमानः अस्रिधं
या नः दोहते त्रिः अहन् असश्चुषी क्षु मत् वाज वत् मधु मत् सु वीर्यम् ॥ १८ ॥

मनाला कह्यांत ठेवणारा, बुद्धीचा परिपोष करणारा, आणि अप्रतिहत राहणारा असा उत्साह, हे आल्हादप्रदा, तूं पावनप्रवाह आहेस म्हणून आम्हांकडे अखंड वहात आण; म्हणजे तो सततप्रभावी, सत्वाढ्य आणि मधुर अशा वीर्यप्रकर्षाचें दोहन, दिवसांतून तिन्ही वेळां आमच्यासाठीं करील १८.


वृषा॑ मती॒नां प॑वते विचक्ष॒णः सोमो॒ अह्नः॑ प्रतरी॒तोषसो॑ दि॒वः ।
क्रा॒णा सिन्धू॑नां क॒लशा॑ँ अवीवश॒दिन्द्र॑स्य॒ हार्द्य् आ॑वि॒शन् म॑नी॒षिभिः॑ ॥ १९ ॥

वृषा मतीनां पवते वि चक्षणः सोमः अह्नः प्र तरीता उषसः दिवः
क्राणा सिन्धूनां कलशान् अवीवशत् इन्द्रस्य हार्दि आ विशन् मनीषि भिः ॥ १९ ॥

सन्मतींची वृष्टि करणारा, सूक्ष्म दृष्टीनें पहाणारा, दिवस, उषा आणि द्युलोक ह्यांना वृद्धिंगत करणारा जो सोम तो पावनप्रवाहानें वहात आहे. जो नद्यांना उत्पन्न करितो त्या सोमानें - मनोजयी भक्ताच्या इच्छेनें इंद्राच्या ह्रदयांत प्रवेश करणार्‍या सोमानें कलशामध्यें रसप्रवाहानें ध्वनि उत्पन्न केला १९.


म॒नी॒षिभिः॑ पवते पू॒र्व्यः क॒विर्नृभि॑र्य॒तः परि॒ कोशा॑ँ अचिक्रदत् ।
त्रि॒तस्य॒ नाम॑ ज॒नय॒न् मधु॑ क्षर॒दिन्द्र॑स्य वा॒योः स॒ख्याय॒ कर्त॑वे ॥ २० ॥

मनीषि भिः पवते पूर्व्यः कविः नृ भिः यतः परि कोशान् अचिक्रदत्
त्रितस्य नाम जनयन् मधु क्षरत् इन्द्रस्य वायोः सख्याय कर्तवे ॥ २० ॥

मनोजयी ऋत्विजांनीं नियमन केलेला हा पुरातन कवि जो सोम, तो स्वच्छ प्रवाहानें वहात आहे. त्यानें द्रोणकलश आपल्या प्रवाहानें निनादित केले; अशासाठीं कीं, त्रिताचें नांव प्रसिद्धीस आणून इंद्राचें, वायूचें, मित्रत्व जोडावें २०.


अ॒यं पु॑ना॒न उ॒षसो॒ वि रो॑चयद॒यं सिन्धु॑भ्यो अभवदुलोक॒कृत् ।
अ॒यं त्रिः स॒प्त दु॑दुहा॒न आ॒शिरं॒ सोमो॑ हृ॒दे प॑वते॒ चारु॑ मत्स॒रः ॥ २१ ॥

अयं पुनानः उषसः वि रोचयत् अयं सिन्धु भ्यः अभवत् ओं इति लोक कृत्
अयं त्रिः सप्त दुदुहानः आशिरं सोमः हृदे पवते चारु मत्सरः ॥ २१ ॥

पावनप्रवाहानें वहाणार्‍या सोमानें उषःकालांना उज्ज्वल केलें. नद्यांनीं वहात रहावें यासाठीं विस्तीर्ण प्रदेश मोकळा करून देऊन आणि एकवीस प्रकारचें दुग्धखाद्य दोहन करून हा हर्षकारी सोम विस्तीर्ण पात्रांत सुंदर रीतीनें वहात आहे. २१.


पव॑स्व सोम दि॒व्येषु॒ धाम॑सु सृजा॒न इ॑न्दो क॒लशे॑ प॒वित्र॒ आ ।
सीद॒न्न् इन्द्र॑स्य ज॒ठरे॒ कनि॑क्रद॒न् नृभि॑र्य॒तः सूर्यं॒ आरो॑हयो दि॒वि ॥ २२ ॥

पवस्व सोम दिव्येषु धाम सु सृजानः इन्दो इति कलशे पवित्रे आ
सीदन् इन्द्रस्य जठरे कनिक्रदत् नृ भिः यतः सूर्यं आ अरोहयः दिवि ॥ २२ ॥

आल्हादप्रदा सोमा, पवित्रांतून पात्रांत ओतला जाणारा तूं दिव्यविभूतिंच्या स्थानांमध्यें वहात रहा. तूं खळखळाट् उडविणारा; पण इंद्राच्या द्रोणकलशरूप जठरांत तुजला स्थिर करून ऋत्विजांनीं तुझें नियमन केलें आणि तूं सूर्याला गगनांत उंच चढवून दिलेंस २२.


अद्रि॑भिः सु॒तः प॑वसे प॒वित्र॒ आँ इन्द॒व् इन्द्र॑स्य ज॒ठरे॑ष्व् आवि॒शन् ।
त्वं नृ॒चक्षा॑ अभवो विचक्षण॒ सोम॑ गो॒त्रं अङ्गि॑रोभ्योऽवृणो॒रप॑ ॥ २३ ॥

अद्रि भिः सुतः पवसे पवित्रे आ इन्दो इति इन्द्रस्य जठरेषु आ विशन्
त्वं नृ चक्षाः अभवः वि चक्षण सोम गोत्रं अङ्गिरः भ्यः अवृणोः अप ॥ २३ ॥

आल्हादप्रदा सोमा, तुजला ग्राव्यांनीं पिळलेला आहे; आणि इंद्राच्या जठरांत प्रवेश करण्याची इच्छा धरून तूं पवित्रांतून पाझरला आहेस. सकलवस्तुजात सूक्ष्म दृष्टीनें पाहणार्‍या सोमा, तूं आम्हां मानवांनाहि कृपादृष्टीनें पाहतोस, आणि म्हणूनच हे सोमा तूं अंगिरांसाठीं प्रकाशधेनूंचा समूह मोकळा केलास २३.


त्वां सो॑म॒ पव॑मानं स्वा॒ध्यो॑ऽनु॒ विप्रा॑सो अमदन्न् अव॒स्यवः॑ ।
त्वां सु॑प॒र्ण आभ॑रद्दि॒वस्परीन्दो॒ विश्वा॑भिर्म॒तिभिः॒ परि॑ष्कृतम् ॥ २४ ॥

त्वां सोम पवमानं सु आध्यः अनु विप्रासः अमदन् अवस्यवः
त्वां सु पर्णः आ अभरत् दिवः परि इन्दो इति विश्वाभिः मति भिः परि कृतम् ॥ २४ ॥

सोमा, शुद्ध प्रवाहानें वाहणार्‍या तुला अनुलक्षून उत्तम ध्यान करणारे आणि देवकृपेची इच्छा धरणारे ज्ञानीजन हृष्ट झाले. आल्हादप्रदा सोमा, अखिल जगाच्या सदिच्छांनीं तूं अलंकृत झालास म्हणूनच गरुड तुला द्युलोकांतून खालीं घेऊन आला २४.


अव्ये॑ पुना॒नं परि॒ वार॑ ऊ॒र्मिणा॒ हरिं॑ नवन्ते अ॒भि स॒प्त धे॒नवः॑ ।
अ॒पां उ॒पस्थे॒ अध्य् आ॒यवः॑ क॒विं ऋ॒तस्य॒ योना॑ महि॒षा अ॑हेषत ॥ २५ ॥

अव्ये पुनानं परि वारे ऊर्मिणा हरिं नवन्ते अभि सप्त धेनवः
अपां उप स्थे अधि आयवः कविं ऋतस्य योना महिषाः अहेषत ॥ २५ ॥

लोंकरीच्या पवित्रांतून आपल्या लाटांनों उचंबळून स्वच्छ प्रवाहानें वहाणार्‍या हरिद्वर्ण सोमाचें स्तवन, धेनू "हंबा" असा शब्द करून करतात; म्हणून उदकांच्या सन्निध, सनातनसत्याच्या स्थानांमध्यें महाथोर भक्तांनीं प्रतिभाशाली सोमाला त्वरेनें धाडून दिलें २५.


इन्दुः॑ पुना॒नो अति॑ गाहते॒ मृधो॒ विश्वा॑नि कृ॒ण्वन् सु॒पथा॑नि॒ यज्य॑वे ।
गाः कृ॑ण्वा॒नो नि॒र्णिजं॑ हर्य॒तः क॒विरत्यो॒ न क्रीळ॒न् परि॒ वारं॑ अर्षति ॥ २६ ॥

इन्दुः पुनानः अति गाहते मृधः विश्वानि कृण्वन् सु पथानि यज्यवे
गाः कृण्वानः निः निजं हर्यतः कविः अत्यः न क्रीळ्अन् परि वारं अर्षति ॥ २६ ॥

आल्हादप्रदा सोम स्वच्छ प्रवाहानें वाहूं लागला म्हणजे शत्रुसमूहांत थेट घुसून जातो, आणि यजन करणार्‍या भक्तांसाठीं सर्व ठिकाणें सुगम करतो. धेनुदुग्धरूपी वस्त्र परिधान करून तो सर्वप्रिय प्रतिभासंपन्न सोम मौजेनें उड्या मारणार्‍या चपल अश्वाप्रमाणें पवित्रांतून वहात जातो २६.


अ॒स॒श्चतः॑ श॒तधा॑रा अभि॒श्रियो॒ हरिं॑ नव॒न्ते॑ऽव॒ ता उ॑द॒न्युवः॑ ।
क्षिपो॑ मृजन्ति॒ परि॒ गोभि॒रावृ॑तं तृ॒तीये॑ पृ॒ष्ठे अधि॑ रोच॒ने दि॒वः ॥ २७ ॥

असश्चतः शत धाराः अभि श्रियः हरिं नवन्ते अव ताः उदन्युवः
क्षिपः मृजन्ति परि गोभिः आवृतं तृतीये पृष्ठे अधि रोचने दिवः ॥ २७ ॥

शेंकडों धारांनीं अखंड वहाणार्‍या सुशोभित अशा जललहरी हरिद्वर्ण सोमाचेंच स्तवन करितात; आणि तो द्युलोकाच्या सुप्रकाशित गोलांत तिसर्‍या पटलांत असतो तरीहि दुग्धरूपवस्त्रानें आच्छादित असलेल्या त्या सोमाला ऋत्विजांच्या अंगुलि अलंकृत करतात २७.


तवे॒माः प्र॒जा दि॒व्यस्य॒ रेत॑स॒स्त्वं विश्व॑स्य॒ भुव॑नस्य राजसि ।
अथे॒दं विश्वं॑ पवमान ते॒ वशे॒ त्वं इ॑न्दो प्रथ॒मो धा॑म॒धा अ॑सि ॥ २८ ॥

तव इमाः प्र जाः दिव्यस्य रेतसः त्वं विश्वस्य भुवनस्य राजसि
अथ इदं विश्वं पवमान ते वशे त्वं इन्दो इति प्रथमः धाम धाः असि ॥ २८ ॥

तुझ्या दिव्य बीजापासूनच ह्या सर्व प्रजा निर्माण झाल्या आहेत. तूं सर्व भुवनांचा राजा आहेस; पावनप्रवाह सोमा, हें सकल जगत् तुझ्या आधीन आहे. हे आल्हादप्रदा, तूं आद्य आहेस. तेजोमयभवनें जागच्या जागीं ठेवणाराहि तूंच आहेस २८.


त्वं स॑मु॒द्रो अ॑सि विश्व॒वित् क॑वे॒ तवे॒माः पञ्च॑ प्र॒दिशो॒ विध॑र्मणि ।
त्वं द्यां च॑ पृथि॒वीं चाति॑ जभ्रिषे॒ तव॒ ज्योतीं॑षि पवमान॒ सूर्यः॑ ॥ २९ ॥

त्वं समुद्रः असि विश्व वित् कवे तव इमाः पच प्र दिशः वि धर्मणि
त्वं द्यां च पृथिवीं च अति जभ्रिषे तव ज्योतींषि पवमान सूर्यः ॥ २९ ॥

तूं विश्वाचें ज्ञान करून देणारा सागर आहेस. हे प्रतिभासंपन्ना, ह्या पांचहि दिशा तुझ्या विशिष्ट धर्मानेंच चालतात. द्युलोक आणि भूलोक ह्याच्याहि पलीकडे तूं पोहोंचला आहेस. पावनप्रवाहा, हे तेजोगोल तुझे आहेत, आणि सूर्यहि तुझाच आहे २९.


त्वं प॒वित्रे॒ रज॑सो॒ विध॑र्मणि दे॒वेभ्यः॑ सोम पवमान पूयसे ।
त्वां उ॒शिजः॑ प्रथ॒मा अ॑गृभ्णत॒ तुभ्ये॒मा विश्वा॒ भुव॑नानि येमिरे ॥ ३० ॥

त्वं पवित्रे रजसः वि धर्मणि देवेभ्यः सोम पवमान पूयसे
त्वां उशिजः प्रथमाः अगृभ्णत तुभ्य इमा विश्वा भुवनानि येमिरे ॥ ३० ॥

रजोलोकाचा विविध धर्म ज्यांत प्रतिबिंबित झाला आहे अशा पवित्रांतून हे पावनप्रवाहा, तूं स्वच्छ होऊन वाहतोस. देवभक्तांनींच तुझें गृहण प्रथम केलें, आणि यच्चावत् भुवनेंहि तुजपुढें नम्र झालीं ३०.


प्र रे॒भ ए॒त्यति॒ वारं॑ अ॒व्ययं॒ वृषा॒ वने॒ष्व् अव॑ चक्रद॒द्धरिः॑ ।
सं धी॒तयो॑ वावशा॒ना अ॑नूषत॒ शिशुं॑ रिहन्ति म॒तयः॒ पनि॑प्नतम् ॥ ३१ ॥

प्र रेभः एति अति वारं अव्ययं वृषा वनेषु अव चक्रदत् हरिः
सं धीतयः वावशानाः अनूषत शिशुं रिहन्ति मतयः पनिप्नतम् ॥ ३१ ॥

कवनांची स्फूर्ति देणारा सोम हा ऊर्णावस्त्रांतून पाझरत आहे. ह्या हरिद्वर्ण वीरपुंगवानें वनामध्ये वारंवार गर्जना केली, तेव्हां भक्तांच्या देवोत्सुक बुद्धींनीं त्याला आळविलें, आणि सज्जनांच्या मननांनीं त्या मंजुळनिनादी बालकाचें चुंबन घेतले ३१.


स सूर्य॑स्य र॒श्मिभिः॒ परि॑ व्यत॒ तन्तुं॑ तन्वा॒नस्त्रि॒वृतं॒ यथा॑ वि॒दे ।
नय॑न्न् ऋ॒तस्य॑ प्र॒शिषो॒ नवी॑यसीः॒ पति॒र्जनी॑नां॒ उप॑ याति निष्कृ॒तम् ॥ ३२ ॥

सः सूर्यस्य रश्मि भिः परि व्यत तन्तुं तन्वानः त्रि वृतं यथा विदे
नयन् ऋतस्य प्र शिषः नवीयसीः पतिः जनीनां उप याति निः कृतम् ॥ ३२ ॥

सूर्याच्या किरणांनीं तो आच्छादित झाला आहे. पण सर्वांना समजेल अशा रीतीनें यज्ञकर्माचा तीन पेडाचा तंतु तो विस्तृत पसरून देतो. सद्धर्माचे नूतन आदेश तो मनुष्यांपर्यंत आणून पोहोंचवून, कुलवधूच्या पतीप्रमाणें तो स्वगृहाकडे (द्रोणपात्राकडे) जातो ३२.


राजा॒ सिन्धू॑नां पवते॒ पति॑र्दि॒व ऋ॒तस्य॑ याति प॒थिभिः॒ कनि॑क्रदत् ।
स॒हस्र॑धारः॒ परि॑ षिच्यते॒ हरिः॑ पुना॒नो वाचं॑ ज॒नय॒न्न् उपा॑वसुः ॥ ३३ ॥

राजा सिन्धूनां पवते पतिः दिवः ऋतस्य याति पथि भिः कनिक्रदत्
सहस्र धारः परि सिच्यते हरिः पुनानः वाचं जनयन् उप वसुः ॥ ३३ ॥

नद्यांचा राजा, द्युलोकाचा पालक, असा जो सोम तो पावनप्रवाहानें वहात आहे, आणि गर्जना करीत सद्धर्माच्याच मार्गांनीं चालत आहे. पहा, तो हजारों धारांनीं वाहणारा हरिद्वर्ण सोम काव्यॆश्वर्यमंडित स्तवनांची स्फूर्ति देऊन आणि स्वच्छ होऊन द्रोणकलशांत ओतला जात आहे ३३.


पव॑मान॒ मह्य् अर्णो॒ वि धा॑वसि॒ सूरो॒ न चि॒त्रो अव्य॑यानि॒ पव्य॑या ।
गभ॑स्तिपूतो॒ नृभि॒रद्रि॑भिः सु॒तो म॒हे वाजा॑य॒ धन्या॑य धन्वसि ॥ ३४ ॥

पवमान महि अर्णः वि धावसि सूरः न चित्रः अव्ययानि पव्यया
गभस्ति पूतः नृ भिः अद्रि भिः सुतः महे वाजाय धन्याय धन्वसि ॥ ३४ ॥

पावनप्रवाहा, सूर्याप्रमाणें अद्‌भुतकर्मकारी असा तूं स्वच्छ होण्याच्या इच्छेनें अफाट समुद्रच कीं काय अशा नाना प्रकारांनीं, लोंकरीच्या पवित्रांतून धांवत जातोस; आणि ऋत्विजांनीं आपल्या बाहूंनीं ग्राव्यांच्या योगानें तुजला पिळलें असतां, श्रेष्ठ आणि धन्य अशा सत्वसामर्थ्यासाठीं तूं उचंबळून जातोस ३४.


इषं॒ ऊर्जं॑ पवमाना॒भ्यर्षसि श्ये॒नो न वंसु॑ क॒लशे॑षु सीदसि ।
इन्द्रा॑य॒ मद्वा॒ मद्यो॒ मदः॑ सु॒तो दि॒वो वि॑ष्ट॒म्भ उ॑प॒मो वि॑चक्ष॒णः ॥ ३५ ॥

इषं ऊर्जं पवमान अभि अर्षसि श्येनः न वंसु कलशेषु सीदसि
इन्द्राय मद्वा मद्यः मदः सुतः दिवः विष्टम्भः उपमः वि चक्षणः ॥ ३५ ॥

पावनप्रवाहा, तूं ऊर्जस्विता आणि उत्साह यांचा प्रवाहच भक्तांवर लोटतोस; आणि ससाणा आपल्या धरट्यांत बसतो तसा तूंहि इंद्रासाठीं कलशांत राहतोस. तूं आतां पिळला गेला आहेस; तूं हर्षकर, हर्षहेतु, आणि हर्षरूप आहेस, तूं द्युलोकाचा अगदीं निकटवर्ती आधारस्तंभ, आणि मानवांकडे विशेष दृष्टीनें पाहणारा आहेस ३५.


स॒प्त स्वसा॑रो अ॒भि मा॒तरः॒ शिशुं॒ नवं॑ जज्ञा॒नं जेन्यं॑ विप॒श्चित॑म् ।
अ॒पां ग॑न्ध॒र्वं दि॒व्यं नृ॒चक्ष॑सं॒ सोमं॒ विश्व॑स्य॒ भुव॑नस्य रा॒जसे॑ ॥ ३६ ॥

सप्त स्वसारः अभि मातरः शिशुं नवं जजानं जेन्यं विपः चितं
अपां गन्धर्वं दिव्यं नृ चक्षसं सोमं विश्वस्य भुवनस्य राजसे ॥ ३६ ॥

नूतन जन्मलेल्या, विजयी, महाज्ञानी बालकाला-उदकांचा दिव्यगन्धर्व आणि मानवांचें हित पाहणार्‍या तुज सोमाला, सात भगिनी आणि माता त्रिभुवनांमध्ये विराजमान होण्यासाठीं जवळ घेतात ३६.


ई॒शा॒न इ॒मा भुव॑नानि॒ वीय॑से युजा॒न इ॑न्दो ह॒रितः॑ सुप॒र्ण्यः ।
तास्ते॑ क्षरन्तु॒ मधु॑मद्घृ॒तं पय॒स्तव॑ व्र॒ते सो॑म तिष्ठन्तु कृ॒ष्टयः॑ ॥ ३७ ॥

ईशानः इमा भुवनानि वि ईयसे युजानः इन्दो इति हरितः सु पर्ण्यः
ताः ते क्षरन्तु मधु मत् घृतं पयः तव व्रते सोम तिष्ठन्तु कृष्टयः ॥ ३७ ॥

तूं ईश्वररूप आहेस; तूं ह्या जगताभोंवतीं आपल्या अत्यंत चपल आणि हरिद्वर्ण घोड्या जोडून भ्रमण करतोस; त्या तुझ्या घोड्या माधुर्ययुक्त घृताचा भूतलावर वर्षाव करोत. हे सोमा, मनुष्य तुझ्या आज्ञेंत वर्तन करोत ३७.


त्वं नृ॒चक्षा॑ असि सोम वि॒श्वतः॒ पव॑मान वृषभ॒ ता वि धा॑वसि ।
स नः॑ पवस्व॒ वसु॑म॒द्धिर॑ण्यवद्व॒यं स्या॑म॒ भुव॑नेषु जी॒वसे॑ ॥ ३८ ॥

त्वं नृ चक्षाः असि सोम विश्वतः पवमान वृषभ ता वि धावसि
सः नः पवस्व वसु मत् हिरण्य वत् वयं स्याम भुवनेषु जीवसे ॥ ३८ ॥

तूं सर्व प्रकारांनीं मानवांचें हित पाहणारा आहेस. हे सोमा, हे पावनप्रवाहा, हे मनोरथवर्षका, तूं नाना प्रकारांनीं त्यांच्याकडे गमन करतोस. तूं दिव्यनिधानशाली आणि सुवर्णपूर्ण आहेस तूं आपला प्रवाह आमच्यावर लोट, म्हणजे आम्हीं ह्या जगतांत उत्कृष्ट जीवनासाठीं वास करूं ३८.


गो॒वित् प॑वस्व वसु॒विद्धि॑रण्य॒विद्रे॑तो॒धा इ॑न्दो॒ भुव॑ने॒ष्व् अर्पि॑तः ।
त्वं सु॒वीरो॑ असि सोम विश्व॒वित् तं त्वा॒ विप्रा॒ उप॑ गि॒रेम आ॑सते ॥ ३९ ॥

गो वित् पवस्व वसु वित् हिरण्य वित् रेतः धाः इन्दो इति भुवनेषु अर्पितः
त्वं सु वीरः असि सोम विश्व वित् तं त्वा विप्राः उप गिरा उमे आसते ॥ ३९ ॥

तूं धेनू देणारा, धन देणारा, आणि हे आल्हादरूपा नानाविध धान्यांचें बीज पृथ्वीवर विखरणारा आहेस म्हणून तुजला ह्या भूमंडळांत ठेवलेलें आहे. सोमा, तूं उत्कृष्ट वीर आणि सर्वज्ञ आहेस; म्हणूनच हे स्तोतृजन स्तुतिद्वारा तुझी सेवा करीत असतात ३९.


उन् मध्व॑ ऊ॒र्मिर्व॒नना॑ अतिष्ठिपद॒पो वसा॑नो महि॒षो वि गा॑हते ।
राजा॑ प॒वित्र॑रथो॒ वाजं॒ आरु॑हत् स॒हस्र॑भृष्टिर्जयति॒ श्रवो॑ बृ॒हत् ॥ ४० ॥

उत् मध्वः ऊर्मिः वननाः अतिस्थिपत् अपः वसानः महिषः वि गाहते
राजा पवित्र रथः वाजं आ अरुहत् सहस्र भृष्टिः जयति श्रवः बृहत् ॥ ४० ॥

तुझ्या माधुर्याच्या लाटेनें मनोहर स्तुतींची स्फूर्ति उत्पन्न झाली. पहा, तो श्रेष्ठविभूति सोम उदकांचें वस्त्र परिधान करून त्यांतच अवगाहन करतो. तो पवित्रावर आरूढ होणारा सोम पवित्र रथावर आरोहण करणार्‍या राजाप्रमाणें सत्वसंग्रामांत आपलें वर्चस्व गाजवितो आणि सहस्त्रावधि शस्त्रास्त्रांनीं महद्यश जिंकून आणतो ४०.


स भ॒न्दना॒ उदि॑यर्ति प्र॒जाव॑तीर्वि॒श्वायु॒र्विश्वाः॑ सु॒भरा॒ अह॑र्दिवि ।
ब्रह्म॑ प्र॒जाव॑द्र॒यिं अश्व॑पस्त्यं पी॒त इ॑न्द॒व् इन्द्रं॑ अ॒स्मभ्यं॑ याचतात् ॥ ४१ ॥

सः भन्दनाः उत् इयर्ति प्रजावतीः विश्व आयुः विश्वाः सु भराः अहः दिवि
ब्रह्म प्रजावत् रयिं अश्व पस्त्यं पीतः इन्दो इति इन्द्रं अस्मभ्यं याचतात् ॥ ४१ ॥

तो संततिप्रद आशीर्वादाच्या ललकार्‍या देतो. तो विश्वजीवन सोम सहज हस्तगत होणारी समृद्धिहि प्रत्यहीं धाडून देतो. आल्हादप्रदा सोमा, तुजला प्राशन केलें म्हणजे देवभक्ति आणि संततियुक्त आणि अश्वयुक्त असें वैभव स्तोतृजन इंद्राजवळ आमच्याकरितां मागून घेवो ४१.


सो अग्रे॒ अह्नां॒ हरि॑र्हर्य॒तो मदः॒ प्र चेत॑सा चेतयते॒ अनु॒ द्युभिः॑ ।
द्वा जना॑ या॒तय॑न्न् अ॒न्तरी॑यते॒ नरा॑ च॒ शंसं॒ दैव्यं॑ च ध॒र्तरि॑ ॥ ४२ ॥

सः अग्रे अह्नां हरिः हर्यतः मदः प्र चेतसा चेतयते अनु द्यु भिः
द्वा जना यातयन् अन्तः ईयते नरा च शंसं दैव्यं च धर्तरि ॥ ४२ ॥

दिवस उगवण्यापूर्वीं तो सर्वप्रिय, हर्षरूप आणि हरिद्वर्ण सोम आपल्या चैतन्यानें आणि उज्ज्वल कांतीनें स्पष्टपणें निदर्शनास येतो. परोपकारी जन आणि दिव्यविभूति अशा उभयतांनाहि तो आपाआपल्या कामीं व्यापृत करून ह्या आधारभूत विश्वांत संचार करतो ४२.


अ॒ञ्जते॒ व्य् अञ्जते॒ सं अ॑ञ्जते॒ क्रतुं॑ रिहन्ति॒ मधु॑ना॒भ्यञ्जते ।
सिन्धो॑रुच्छ्वा॒से प॒तय॑न्तं उ॒क्षणं॑ हिरण्यपा॒वाः प॒शुं आ॑सु गृभ्णते ॥ ४३ ॥

अजते वि अजते सं अजते क्रतुं रिहन्ति मधुना अभि अजते
सिन्धोः उत् श्वासे पतयन्तं उक्षणं हिरण्य पावाः पशुं आसु गृभ्णते ॥ ४३ ॥

स्तोतृजन त्याला उद्वर्तन करतात, नाना प्रकारानें उद्वर्तन करतात; अगदीं पूर्णपणें उद्वर्तन करतात. त्या कर्तृत्वशाली सोमाचें अवघ्राण करितात, आणि त्याला मधानें लिप्त करतात. नदीच्या डोहांत बुडी मारणार्‍या त्या द्रष्ट्याला, त्या वृषभाला, सुवर्णाप्रमाणें स्वच्छ लकलकीत करणारे ऋत्विज् तेथेंच धरून ठेवतात ४३.


वि॒प॒श्चिते॒ पव॑मानाय गायत म॒ही न धारात्यन्धो॑ अर्षति ।
अहि॒र्न जू॒र्णां अति॑ सर्पति॒ त्वचं॒ अत्यो॒ न क्रीळ॑न्न् असर॒द्वृषा॒ हरिः॑ ॥ ४४ ॥

विपः चिते पवमानाय गायत मही न धारा अति अन्धः अर्षति
अहिः न जूणां अति सर्पति त्वचं अत्यः न क्रीळ्अन् असरत् वृषा हरिः ॥ ४४ ॥

त्या ज्ञानवान् पावनप्रवाह सोमासाठीं तुम्ही गायन करा. जोरानें कोसळणार्‍या वृष्टिप्रमाणें त्याचें मधुर पेय खळवळून वहात आहे. सर्प आपली कात टाकतो त्याप्रमाणें तो पवित्रांतून स्वच्छ होऊन वाहतो; पहा मौजेनें धांवणार्‍या अश्वाप्रमाणें तो हरिद्वर्ण वृषभ पुढें सरसावला आहे ४४.


अ॒ग्रे॒गो राजाप्य॑स्तविष्यते वि॒मानो॒ अह्नां॒ भुव॑ने॒ष्व् अर्पि॑तः ।
हरि॑र्घृ॒तस्नुः॑ सु॒दृशी॑को अर्ण॒वो ज्यो॒तीर॑थः पवते रा॒य ओ॒क्यः ॥ ४५ ॥

अग्रे गः राजा आप्यः तविष्यते वि मानः अह्नां भुवनेषु अर्पितः
हरिः घृत स्नुः सु दृशीकः अर्णवः ज्योतिः रथः पवते राये ओक्यः ॥ ४५ ॥

तो अग्रेसर राजा, तो उदकानें स्वच्छ झालेला सोम आपला प्रभाव दाखवीत आहे. दिवसाच्या गतीचें मापन करणारा म्हणून त्याला जगतीतलावर स्थापन केलें आहे; त्याप्रमाणें तो हरिद्वर्ण, घृतार्द्र. नयनमनोहर समुद्रच कीं काय, असा तेजोराशि आणि ऐश्वर्याचें निवासस्थान जो सोम तो आमच्या शाश्वत संपत्तीसाठीं शुद्धप्रवाहानें वहात आहे ४५.


अस॑र्जि स्क॒म्भो दि॒व उद्य॑तो॒ मदः॒ परि॑ त्रि॒धातु॒र्भुव॑नान्य् अर्षति ।
अं॒शुं रि॑हन्ति म॒तयः॒ पनि॑प्नतं गि॒रा यदि॑ नि॒र्णिजं॑ ऋ॒ग्मिणो॑ य॒युः ॥ ४६ ॥

असर्जि स्कम्भः दिवः उत् यतः मदः परि त्रि धातुः भुवनानि अर्षति
अंशुं रिहन्ति मतयः पनिप्नतं गिरा यदि निः निजं ऋग्मिणः ययुः ॥ ४६ ॥

तो द्युलोकाचा स्तंभच उभारलेला आहे. हा हर्षकर सोम- हा तीन स्वरूपाचा रस या भूतलावर चोहोंकडून वहात येत आहे; आणि जेव्हां ऋक्‌स्तोत्रप्रिय भक्त त्याच्या दुग्धरूप आवरणाजवळ प्राप्त झाले, तेव्हां सद्‌‌बुद्धीनीं, यज्ञमंदिर स्तुतीनें दुमदुमून सोडणार्‍या त्या सोमपल्लवाचें चुंबन घेतलें ४६.


प्र ते॒ धारा॒ अत्यण्वा॑नि मे॒ष्यः पुना॒नस्य॑ सं॒यतो॑ यन्ति॒ रंह॑यः ।
यद्गोभि॑रिन्दो च॒म्वोः सम॒ज्यस॒ आ सु॑वा॒नः सो॑म क॒लशे॑षु सीदसि ॥ ४७ ॥

प्र ते धाराः अति अण्वानि मेष्यः पुनानस्य सं यतः यन्ति रंहयः
यत् गो भिः इन्दो इति चम्वोः सं अज्यसे आ सुवानः सोम कलशेषु सीदसि ॥ ४७ ॥

तूं गाळला जात असतांना जोरानें वाहणार्‍या तुझ्या धारा आंवरून धरल्या तरी लोंकरीच्या पवित्रांतून त्या झरझर वाहतात. तर हे आल्हादप्रदा जेव्हां तूं चमूपात्रांत दुग्धांशीं मिश्रित होतोस, तेव्हांच हे सोमा तुझा पिळलेला रस कलशांत पडतो ४७.


पव॑स्व सोम क्रतु॒विन् न॑ उ॒क्थ्यो॑ऽव्यो॒ वारे॒ परि॑ धाव॒ मधु॑ प्रि॒यम् ।
ज॒हि विश्वा॑न् र॒क्षस॑ इन्दो अ॒त्रिणो॑ बृ॒हद्व॑देम वि॒दथे॑ सु॒वीराः॑ ॥ ४८ ॥

पवस्व सोम क्रतु वित् नः उक्थ्यः अव्यः वारे परि धाव मधु प्रियं
जहि विश्वान् रक्षसः इन्दो इति अत्रिणः बृहत् वदेम विदथे सु वीराः ॥ ४८ ॥

सोमा, तूं पवित्रप्रवाहानें वहा. तूं सत्कर्म जाणणारा आम्हांला स्तुत्यच आहेस. लोंकरीच्या पवित्रांतून आपला मधुर रस वेगानें पाझरून दे; मनुष्यभक्षक अशा यच्चावत्‌ राक्षसांना ठार कर आणि हे आल्हादप्रदा, यज्ञमंडपांत आम्हीं वीरांसह तुझें महनीय स्तोत्र गात राहू असें कर ४८.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ८७ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - उशनस् काव्य : देवता - पवमान सोम : छंद - त्रिष्टुभ्


प्र तु द्र॑व॒ परि॒ कोशं॒ नि षी॑द॒ नृभिः॑ पुना॒नो अ॒भि वाजं॑ अर्ष ।
अश्वं॒ न त्वा॑ वा॒जिनं॑ म॒र्जय॒न्तो॑ऽच्छा ब॒र्ही र॑श॒नाभि॑र्नयन्ति ॥ १ ॥

प्र तु द्रव परि कोशं नि सीद नृ भिः पुनानः अभि वाजं अर्ष
अश्वं न त्वा वाजिनं मर्जयन्तः अच्च बर्हिः रशनाभिः नयन्ति ॥ १ ॥

वेगानें धांवून जा. कलशांत अधिष्ठित हो. तूं ऋत्विजांच्या हातून स्वच्छ होत आहेस तर सत्वप्राप्तीच्या संग्रामाकडे वहात जा. युद्धोत्सुक अश्वाप्रमाणें तुजला ते स्वच्छ करून अलंकृत करीत आहेत आणि लगाम घालून कुशासनाकडे नेत आहेत १.


स्वा॒यु॒धः प॑वते दे॒व इन्दु॑रशस्ति॒हा वृ॒जनं॒ रक्ष॑माणः ।
पि॒ता दे॒वानां॑ जनि॒ता सु॒दक्षो॑ विष्ट॒म्भो दि॒वो ध॒रुणः॑ पृथि॒व्याः ॥ २ ॥

सु आयुधः पवते देवः इन्दुः अशस्ति हा वृजनं रक्षमाणः
पिता देवानां जनिता सु दक्षः विष्टम्भः दिवः धरुणः पृथिव्याः ॥ २ ॥

आल्हादप्रदा सोम उत्तम शस्त्रास्त्रांनीं युक्त होऊन पावनप्रवाहानें वहात आहे तो दुष्टांच्या शापांचा नाश करतो. धेनूंच्या आवाराचें रक्षण करतो; तो चातुर्यबलाढ्य, दिव्यविबुधांचा पालक, आणि उत्पन्नकर्ता आहे. तो आकाशाचा धिरा आहे, आणि भूलोकाचा आधार आहे. २.


ऋषि॒र्विप्रः॑ पुरए॒ता जना॑नां ऋ॒भुर्धीर॑ उ॒शना॒ काव्ये॑न ।
स चि॑द्विवेद॒ निहि॑तं॒ यदा॑सां अपी॒च्य१ गुह्यं॒ नाम॒ गोना॑म् ॥ ३ ॥

ऋषिः विप्रः पुरः एता जनानां ऋभुः धीरः उशना काव्येन
सः चित् विवेद नि हितं यत् आसां अपीच्यं गुह्यं नाम गोनाम् ॥ ३ ॥

तो ऋषि, तो स्तोता, तो लोकधुरीण आहे. तो बुद्धिशाली ऋभु आहे, आपल्या प्रतिभेनें तो उशनाच आहे. ह्या प्रकाशधेनूंचें जें एक नांव गुप्त आणि गूढ राखलें आहे तें त्यानेंच जाणलें ३.


ए॒ष स्य ते॒ मधु॑माँ इन्द्र॒ सोमो॒ वृषा॒ वृष्णे॒ परि॑ प॒वित्रे॑ अक्षाः ।
स॒ह॒स्र॒साः श॑त॒सा भू॑रि॒दावा॑ शश्वत्त॒मं ब॒र्हिरा वा॒ज्य् अस्थात् ॥ ४ ॥

एषः स्यः ते मधु मान् इन्द्र सोमः वृषा वृष्णे परि पवित्रे अक्षारिति
सहस्र साः शत साः भूरि दावा शश्वत् तमं बर्हिः आ वाजी अस्थात् ॥ ४ ॥

इंद्रा, हाच तो तुझा मधुररसस्त्रावी सोम. हा वीरपुंगव वीराला तोग्य अशा पवित्रांतून वाहत गेला. तो शेंकडोंच काय, पण सहस्त्रावधि वरदानें देणारा आहे. तो सत्ववीर अखंड चालणार्‍या यज्ञाकडे निघाला आहे. ४.


ए॒ते सोमा॑ अ॒भि ग॒व्या स॒हस्रा॑ म॒हे वाजा॑या॒मृता॑य॒ श्रवां॑सि ।
प॒वित्रे॑भिः॒ पव॑माना असृग्रञ् छ्रव॒स्यवो॒ न पृ॑त॒नाजो॒ अत्याः॑ ॥ ५ ॥

एते सोमाः अभि गव्या सहस्रा महे वाजाय अमृताय श्रवांसि
पवित्रेभिः पवमानाः असृग्रन् श्रवस्यवः न पृतनाजः अत्याः ॥ ५ ॥

हे सोमरसाचे प्रवाह सहस्त्रावधि धेंनूकडे आणि सहस्त्रावधि विख्यात वस्तूंकडे, श्रेष्ठ सत्वाढ्यता आणि अमरत्व यांच्या प्राप्तीसाठीं वहात राहिले आहेत. सत्कीर्तिविषयीं उत्सुक असलेले आणि पवित्रांतून स्वच्छ प्रवाहानें वाहणारे सोमरस, विजयी योद्ध्‌याप्रमाणें झपाट्यानें पुढें सरसावले आहेत ५.


परि॒ हि ष्मा॑ पुरुहू॒तो जना॑नां॒ विश्वास॑र॒द्भोज॑ना पू॒यमा॑नः ।
अथा भ॑र श्येनभृत॒ प्रयां॑सि र॒यिं तुञ्जा॑नो अ॒भि वाजं॑ अर्ष ॥ ६ ॥

परि हि स्म पुरु हूतः जनानां विश्वा असरत् भोजना पूयमानः
अथ आ भर श्येन भृत प्रयांसि रयिं तुजानः अभि वाजं अर्ष ॥ ६ ॥

ज्याचें स्तवन अखिल भक्तांनीं केलें, आणि लोकांचे भोग्यपदार्थ जो पवित्र करतो तो हा सोमरस पहा कसा पुढें सरसावला आहे. हे सोमा, ज्या तुजला श्येनपक्ष्यानें जगतीतलावर आणलें तो तूं झपाट्यानें पुढें वाढून, प्रेमळ पण शाश्वत संपत्ति, आणि सत्वाढ्यता यांच्याकडे आपला ओघ वळीव ६.


ए॒ष सु॑वा॒नः परि॒ सोमः॑ प॒वित्रे॒ सर्गो॒ न सृ॒ष्टो अ॑दधाव॒दर्वा॑ ।
ति॒ग्मे शिशा॑नो महि॒षो न शृङ्गे॒ गा ग॒व्यन्न् अ॒भि शूरो॒ न सत्वा॑ ॥ ७ ॥

एषः सिवानः परि सोमः पवित्रे सर्गः न सृष्टः अदधावत् अर्वा
तिग्मे शिशानः महिषः न शृङ्गे गाः गव्यन् अभि शूरः न सत्वा ॥ ७ ॥

पिळला जाणारा हा तडफदार सोम शत्रूवर फेंकलेल्या अस्त्राप्रमाणें पवित्रांतून खालीं धांवून गेला. अणकुचीदार शिंगें पाजळणार्‍या धेनूत्सुक आणि धिप्पाड वृषभाप्रमाणें, अथवा सत्ववान् शूराप्रमाणें, तो पुढें धांवून गेला ७.


ए॒षा य॑यौ पर॒माद॒न्तरद्रेः॒ कूचि॑त् स॒तीरू॒र्वे गा वि॑वेद ।
दि॒वो न वि॒द्युत् स्त॒नय॑न्त्य॒भ्रैः सोम॑स्य ते पवत इन्द्र॒ धारा॑ ॥ ८ ॥

एषा आ ययौ परमात् अन्तः अद्रेः कू चित् सतीः ऊर्वे गाः विवेद
दिवः न वि द्युत् स्तनयन्ती अभ्रैः सोमस्य ते पवते इन्द्र धारा ॥ ८ ॥

ही सोमधारा अत्युच्च पर्वताच्या खोल उदरांतून बाहेर आली, आणि तेथेंच कोठल्याशा विवरांत कोंडून ठेवलेल्या प्रकाशधेनूंना तिनें हुडकून बाहेर आणलें. हे इंद्रा, आकाशांतील मेघडंबरांत गडगडाट उडवून देणारी जणों बिजलीच, अशी ही तुझ्या सोमरसाची धारा पहा कशी वाहत आहे ८.


उ॒त स्म॑ रा॒शिं परि॑ यासि॒ गोनां॒ इन्द्रे॑ण सोम स॒रथं॑ पुना॒नः ।
पू॒र्वीरिषो॑ बृह॒तीर्जी॑रदानो॒ शिक्षा॑ शचीव॒स्तव॒ ता उ॑प॒ष्टुत् ॥ ९ ॥

उत स्म राशिं परि यासि गोनां इन्द्रेण सोम स रथं पुनानः
पूर्वीः इषः बृहतीः जीरदानो इतिजीर दानो शिक्ष सची वः तव ताः उप स्तुत् ॥ ९ ॥

हे सोमा, तूं पवित्रप्रवाहानें धेनूसमूहाच्या भोंवतीं इंद्रासह एकाच रथांत आरूढ होऊन फिरतोस, रर हे शीघ्रवरदा, श्रेष्ठ अशा अनेक आकांक्षांचें शिक्षण आम्हांस दे. हे समर्था त्या आकांक्षांचें तूं कौतुक कर ९.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ८८ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - उशनस् काव्य : देवता - पवमान सोम : छंद - त्रिष्टुभ्


अ॒यं सोम॑ इन्द्र॒ तुभ्यं॑ सुन्वे॒ तुभ्यं॑ पवते॒ त्वं अ॑स्य पाहि ।
त्वं ह॒ यं च॑कृ॒षे त्वं व॑वृ॒ष इन्दुं॒ मदा॑य॒ युज्या॑य॒ सोम॑म् ॥ १ ॥

अयं सोमः इन्द्र तुभ्यं सुन्वे तुभ्यं पवते त्वं अस्य पाहि
त्वं ह यं चकृषे त्वं ववृषे इन्दुं मदाय युज्याय सोमम् ॥ १ ॥

इंद्रा, हा सोम तुझ्याप्रीत्यर्थ पिळला जात आहे, तुझ्याप्रीत्यर्थच तो पावनप्रवाहानें वाहत आहे. तर तूं त्याचें प्राशन कर. त्याला तूंच उत्पन्न केलेंस त्या आल्हादप्रदाला हर्षासाठीं आणि सहवासासाठीं तूंच पसंत केलेंस १.


स ईं॒ रथो॒ न भु॑रि॒षाळ्योजि म॒हः पु॒रूणि॑ सा॒तये॒ वसू॑नि ।
आदीं॒ विश्वा॑ नहु॒ष्याणि जा॒ता स्वर्षाता॒ वन॑ ऊ॒र्ध्वा न॑वन्त ॥ २ ॥

सः ईं इति रथः न भुरिषाट् अयोजि महः पुरूणि सातये वसूनि
आत् ईं इति विश्वा नहुष्याणि जाता स्वः साता वने ऊर्ध्वा नवन्त ॥ २ ॥

तो हा श्रेष्ठ सोम, रसस्थ वीराप्रमाणें विपुल यश जिंकणारा सोम, असंख्य वस्तूंचें किंवा असंख्य शत्रूंचें आक्रमण करण्यासाठीं तुझ्याशीं संयुक्त झाला आहे. आणि म्हणूनच अखिल मानवजातींनीं वनांमध्यें उठून उभे राहून स्वर्लोकप्राप्तीसाठीं त्याची स्तुति केली २.


वा॒युर्न यो नि॒युत्वा॑ँ इ॒ष्टया॑मा॒ नास॑त्येव॒ हव॒ आ शम्भ॑विष्ठः ।
वि॒श्ववा॑रो द्रविणो॒दा इ॑व॒ त्मन् पू॒षेव॑ धी॒जव॑नोऽसि सोम ॥ ३ ॥

वायुः न यः नियुत्वान् इष्ट यामा नासत्या इव हवे आ शं भविष्ठः
विश्व वारः द्रविणोदाः इव त्मन् पूषा इव धी जवनः असि सोम ॥ ३ ॥

जो सोम वायूप्रमाणें "नियुत्‌" घोड्या जोडणारा, आणि इच्छेनुरूप गमन करणारा आहे; जो धांवा केला असतां सत्यस्वरूप अश्वीदेवांप्रमाणें अत्यंत कल्याणकारी आहे, अविनाशी संपत्ति देणार्‍या धनदाप्रमाणें सर्वांना अभिलक्षणीय आहे; हे सोमा असा तूं पूषाप्रमाणें प्रज्ञाप्रेरकहि आहेस ३.


इन्द्रो॒ न यो म॒हा कर्मा॑णि॒ चक्रि॑र्ह॒न्ता वृ॒त्राणां॑ असि सोम पू॒र्भित् ।
पै॒द्वो न हि त्वं अहि॑नाम्नां ह॒न्ता विश्व॑स्यासि सोम॒ दस्योः॑ ॥ ४ ॥

इन्द्रः न यः महा कर्माणि चक्रिः हन्ता वृत्राणां असि सोम पूः भित्
पैद्वः न हि त्वं अहि नाम्नां हन्ता विश्वस्य असि सोम दस्योः ॥ ४ ॥

इंद्राप्रमाणेंच जो महत्‌ कार्य करतो तो तूं हे सोमा, वृत्रांचा नाशक आणि त्यांच्या नगरांचा विध्वंसक आहेस. पेदूच्या अश्वाप्रमाणें तूं "अहि" हे नांव धारण करणार्‍या दुष्टांचाच केवल नव्हे, तर सर्वच अधार्मिकांचा निःपात करणारा आहेस ४.


अ॒ग्निर्न यो वन॒ आ सृ॒ज्यमा॑नो॒ वृथा॒ पाजां॑सि कृणुते न॒दीषु॑ ।
जनो॒ न युध्वा॑ मह॒त उ॑प॒ब्दिरिय॑र्ति॒ सोमः॒ पव॑मान ऊ॒र्मिम् ॥ ५ ॥

अग्निः न यः वने आ सृज्यमानः वृथा पाजांसि कृणुते नदीषु
जनः न युध्वा महतः उपब्दिः इयर्ति सोमः पवमानः ऊर्मिम् ॥ ५ ॥

जो अरण्यांत मोकाट सुटलेल्या दवाग्नीप्रमाणें दिसतो, जो नद्यांच्या प्रवाहांत आपलें तेज सहक प्रतिबिंबित करतो, तो हा स्वच्छ प्रवाहानें वहाणारा जणों युद्धोत्सुक वीर सोम, एखाद्या प्रचंड श्वापदाच्या आरोळीप्रमाणें आपला खळखळणारा ओघ जोरानें पुढें लोटतो ५.


ए॒ते सोमा॒ अति॒ वारा॒ण्य् अव्या॑ दि॒व्या न कोशा॑सो अ॒भ्रव॑र्षाः ।
वृथा॑ समु॒द्रं सिन्ध॑वो॒ न नीचीः॑ सु॒तासो॑ अ॒भि क॒लशा॑ँ असृग्रन् ॥ ६ ॥

एते सोमाः अति वाराणि अव्या दिव्या न कोशासः अभ्र वर्षाः
वृथा समुद्रं सिन्धवः न नीचीः सुतासः अभि कलशान् असृग्रन् ॥ ६ ॥

हे सोमरस, मेघमंडलांतून वृष्टि करणार्‍या आकाशाच्या जलाशयाप्रमाणें लोंकरीच्या पवित्रांतून वर्षाव करतात, आणि सहज वाहणार्‍या नद्या समुद्राकडेच लोटतात त्याप्रमाणें हे सोमपल्लव पिळले म्हणजे त्यांतील रस खालीं द्रोणकलशाकडेच सरसावतात ६.


शु॒ष्मी शर्धो॒ न मारु॑तं पव॒स्वान॑भिशस्ता दि॒व्या यथा॒ विट् ।
आपो॒ न म॒क्षू सु॑म॒तिर्भ॑वा नः स॒हस्रा॑प्साः पृतना॒षाण् न य॒ज्ञः ॥ ७ ॥

शुष्मी शर्धः न मारुतं पवस्व अनभि शस्ता दिव्या यथा विट्
आपः न मक्षु सु मतिः भव नः सहस्र अप्साः पृतनाषाट् न यजः ॥ ७ ॥

मरुतांच्या बलाढ्य सैन्याप्रमाणें तूं प्रभावशाली आहेस. तर स्वच्छ प्रवाहानें वहात रहा. दिव्यविबुधांच्या समूहाप्रमाणेंच तुझ्यांतहि दोष काढण्याला जागाच नाहीं. तूं उदकांप्रमाणें निर्मल आहेस. तुला आमचा कळवळा येऊं दे. तूं सहस्त्रावधि सत्कार्यें घडविणारा आणि यज्ञाप्रमाणें अधार्मिक शत्रुसैन्याला चिरडून टाकणारा आहेस ७.


राज्ञो॒ नु ते॒ वरु॑णस्य व्र॒तानि॑ बृ॒हद्ग॑भी॒रं तव॑ सोम॒ धाम॑ ।
शुचि॒ष् ट्वं अ॑सि प्रि॒यो न मि॒त्रो द॒क्षाय्यो॑ अर्य॒मेवा॑सि सोम ॥ ८ ॥

राजः नु ते वरुणस्य व्रतानि बृहत् गभीरं तव सोम धाम
शुचिः त्वं असि प्रियः न मित्रः दक्षाय्यः अर्यमा इव असि सोम ॥ ८ ॥

तुझे नियम म्हणजे राजा वरुणाचेच धर्मनियम होत. हे सोमा, तुझें तेजोमय स्थान विस्तीर्ण आणि भव्य आहे. शुद्धस्वरूप असा तूं आम्हांला मित्राप्रमाणें प्रिय आहेस. आणि हे सोमा, तूं अर्यमाप्रमाणें चातुर्यबलानें संपन्न आहेस ८.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ८९ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - उशनस् काव्य : देवता - पवमान सोम : छंद - त्रिष्टुभ्


प्रो स्य वह्निः॑ प॒थ्याभिरस्यान् दि॒वो न वृ॒ष्टिः पव॑मानो अक्षाः ।
स॒हस्र॑धारो असद॒न् न्य् अ१ स्मे मा॒तुरु॒पस्थे॒ वन॒ आ च॒ सोमः॑ ॥ १ ॥

प्रो इति स्यः वह्निः पथ्याभिः अस्यान् दिवः न वृष्टिः पवमानः अक्षाः
सहस्र धारः असदत् नि अस्मे इति मातुः उप स्थे वने आ च सोमः ॥ १ ॥

हविर्भाग पोहोंचविणारा तो सोम योग्य मार्गांनींच पाझरत राहिला, पावनप्रवाह सोमानें आकाशांतून पडणार्‍या पर्जन्याप्रमाणें वृष्टि केली आणि सहस्त्रशः प्रवाहांनीं वाहणारा सोमरस आमच्या मातेच्या सन्निध आणि वनांमध्येंहि एकसारखाच राहिला १.


राजा॒ सिन्धू॑नां अवसिष्ट॒ वास॑ ऋ॒तस्य॒ नावं॒ आरु॑ह॒द्रजि॑ष्ठाम् ।
अ॒प्सु द्र॒प्सो वा॑वृधे श्ये॒नजू॑तो दु॒ह ईं॑ पि॒ता दु॒ह ईं॑ पि॒तुर्जाम् ॥ २ ॥

राजा सिन्धूनां अवसिष्ट वासः ऋतस्य नावं आ अरुहत् रजिष्ठां
अप् सु द्रप्सः ववृधे श्येन जूतः दुहे ईं पिता दुहे ईं पितुः जाम् ॥ २ ॥

राजा सोमानें नदीच्या उदकाचें वस्त्र परिधान केलें आणि अत्यंत ऋजुगामिनी जी सद्धर्माची नौका तिच्यावर आरोहण केलें. ससाण्यानें आणलेला सोमाचा अंकुर उदकामध्येंच वृद्धिंगत झाला. पित्यानें त्याचें दोहन केलें; पित्याच्या ह्या बालकाचें त्यानेंच दोहन केलें २.


सिं॒हं न॑सन्त॒ मध्वो॑ अ॒यासं॒ हरिं॑ अरु॒षं दि॒वो अ॒स्य पति॑म् ।
शूरो॑ यु॒त्सु प्र॑थ॒मः पृ॑च्छते॒ गा अस्य॒ चक्ष॑सा॒ परि॑ पात्य् उ॒क्षा ॥ ३ ॥

सिंहं नसन्त मध्वः अयासं हरिं अरुषं दिवः अस्य पतिं
शूरः युत् सु प्रथमः पृच्चते गाः अस्य चक्षसा परि पाति उक्षा ॥ ३ ॥

सोमरूप सिंहाकडे ते प्राप्त झाले. मधुररसाचा झरा, हरिद्वर्ण आरक्त आणि ह्या द्युलोकाचा पालक अशा सोमाकडे भक्तजन प्राप्त् झाले, तेव्हां शत्रूंमध्यें प्रथम घुसणार्‍या शूर इंद्रानें "प्रकाशधेनू कोठें आहेत असें विचारलें;" कारण ह्या सोमाच्याच नेत्रानें तो वीरपुंगव इंद्र आम्हांकडे अवलोकन करून आमचें सर्वतोपरि रक्षण करितो ३.


मधु॑पृष्ठं घो॒रं अ॒यासं॒ अश्वं॒ रथे॑ युञ्जन्त्य् उरुच॒क्र ऋ॒ष्वम् ।
स्वसा॑र ईं जा॒मयो॑ मर्जयन्ति॒ सना॑भयो वा॒जिनं॑ ऊर्जयन्ति ॥ ४ ॥

मधु पृष्ठं घोरं अयासं अश्वं रथे युजन्ति उरु चक्रे ऋष्वं
स्वसारः ईं जामयः मर्जयन्ति स नाभयः वाजिनं ऊर्जयन्ति ॥ ४ ॥

मधुररसानें ओथंबलेला, विकराळ, चपल आणि विशाल अश्व जो सोम त्याला मोठमोठ्या चाकांच्या यज्ञरूप रथाला जोडून देतात. तेव्हां सख्या बहिणी म्हणजे ऋत्विजांच्या अंगुलि त्या सोमाला अलंकृत करतात. एकाच कुलांत उत्पन्न झालेल्या भगिनी त्या सत्ववीराला ओजस्वी करतात ४.


चत॑स्र ईं घृत॒दुहः॑ सचन्ते समा॒ने अ॒न्तर्ध॒रुणे॒ निष॑त्ताः ।
ता ईं॑ अर्षन्ति॒ नम॑सा पुना॒नास्ता ईं॑ वि॒श्वतः॒ परि॑ षन्ति पू॒र्वीः ॥ ५ ॥

चतस्रः ईं घृत दुहः सचन्ते समाने अन्तः धरुणे नि सत्ताः
ताः ईं अर्षन्ति नमसा पुनानाः ताः ईं विश्वतः परि सन्ति पूर्वीः ॥ ५ ॥

घृताचें दोहन करणार्‍या चौघीजणी त्याच्याबरोबर राहतात. कारण सर्वांचा एकच आधार जें अंतरिक्ष त्यांत त्यांचा निवास असतो. प्रणिपात केला म्हणजे भक्तांना त्या पावन करतात आणि सोमाकडे धांवत जातात. त्या विपुलसंख्य धेनू सर्व बाजूंनीं त्याच्या भोंवतीं भोंवतींच राहतात ५.


वि॒ष्ट॒म्भो दि॒वो ध॒रुणः॑ पृथि॒व्या विश्वा॑ उ॒त क्षि॒तयो॒ हस्ते॑ अस्य ।
अस॑त् त॒ उत्सो॑ गृण॒ते नि॒युत्वा॒न् मध्वो॑ अं॒शुः प॑वत इन्द्रि॒याय॑ ॥ ६ ॥

विष्टम्भः दिवः धरुणः पृथिव्याः विश्वाः उत क्षितयः हस्ते अस्य
असत् ते उत्सः गृणते नियुत्वान् मध्वः अंशुः पवते इन्द्रियाय ॥ ६ ॥

तो आकाशाचा स्तंभ आहे, पृथ्वीचा आधार आहे, आणि यच्चावत्‌ मानव त्याच्या अगदीं हातांत आहेत. सोमा, तुझा "नियुत्‌" अश्व जोडलेला रथ स्तोतृजनाला अभीष्टाचा अखंड झराच होय. म्हणून तुझ्या मधुररसाचा अंश इंद्राच्या हर्षासाठीं स्वच्छप्रवाहानें वहातो ६.


व॒न्वन्न् अवा॑तो अ॒भि दे॒ववी॑तिं॒ इन्द्रा॑य सोम वृत्र॒हा प॑वस्व ।
श॒ग्धि म॒हः पु॑रुश्च॒न्द्रस्य॑ रा॒यः सु॒वीर्य॑स्य॒ पत॑यः स्याम ॥ ७ ॥

वन्वन् अवातः अभि देव वीतिं इन्द्राय सोम वृत्र हा पवस्व
शग्धि महः पुरु चन्द्रस्य रायः सु वीर्यस्य पतयः स्याम ॥ ७ ॥

तूं अपराजित आहेस. देवसेवेची उत्कट लालसा धरून हे सोमा वृत्रनाशक जो तूं तो इंद्राप्रीत्यर्थ पावनप्रवाहानें वहा; चंद्राप्रमाणें अत्याल्हादप्रद जें महत्‌ ऐश्वर्य त्याचें आम्हांला स्वामित्व दे, आणि उत्कृष्ट शौर्याचे आम्हीं प्रभू होऊं असें कर ७.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ९० (पवमान सोमसूक्त)

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - पवमान सोम : छंद - त्रिष्टुभ्


प्र हि॑न्वा॒नो ज॑नि॒ता रोद॑स्यो॒ रथो॒ न वाजं॑ सनि॒ष्यन्न् अ॑यासीत् ।
इन्द्रं॒ गच्छ॒न्न् आयु॑धा सं॒शिशा॑नो॒ विश्वा॒ वसु॒ हस्त॑योरा॒दधा॑नः ॥ १ ॥

प्र हिन्वानः जनिता रोदस्योः रथः न वाजं सनिष्यन् चयासीत्
इन्द्रं गच्चन् आयुधा सं शिशानः विश्वा वसु हस्तयोः आदधानः ॥ १ ॥

हा द्यावापृथिवीचा जनक होय. त्याला हेलावून दिला, तेव्हां भक्तांना सत्वसामर्थ्य हस्तगत करून देण्याची इच्छा धरून तो रथाप्रमाणें दौडत गेला. हा इंद्राकडेच निघालेला वीर शस्त्रास्त्रांनीं झगझगीत दिसत आहे. सर्व प्रकारचीं उत्कृष्ट धनें त्यानें आपल्या दोन्हीं हातांत ठेविलीं आहेत. १


अ॒भि त्रि॑पृ॒ष्ठं वृष॑णं वयो॒धां आ॑ङ्गू॒षाणां॑ अवावशन्त॒ वाणीः॑ ।
वना॒ वसा॑नो॒ वरु॑णो॒ न सिन्धू॒न् वि र॑त्न॒धा द॑यते॒ वार्या॑णि ॥ २ ॥

अभि त्रि पृष्ठं वृषणं वयः धां आङ्गूषाणां अवावशन्त वाणीः
वना वसानः वरुणः न सिन्धून् वि रत्न धाः दयते वार्याणि ॥ २ ॥

तिन्ही उच्चस्थानांत राहणारा, तारुण्याचा जोम उत्पन्न करणारा जो वीर्यशाली सोम त्याला उच्चस्वरांत म्हटलेल्या सूक्तांनीं प्रसन्न केलें आहे. वरुण जसा नद्यांचे प्रवाह सोडतो त्याप्रमाणें पल्लवाच्छादित आणि उदार हस्तानें रत्नें देणारा सोम हा भक्तांना उत्कृष्ट संपत्ति यथेच्छ अर्पण करितो २.


शूर॑ग्रामः॒ सर्व॑वीरः॒ सहा॑वा॒ञ् जेता॑ पवस्व॒ सनि॑ता॒ धना॑नि ।
ति॒ग्मायु॑धः क्षि॒प्रध॑न्वा स॒मत्स्व् अषा॑ळ्हः सा॒ह्वान् पृत॑नासु॒ शत्रू॑न् ॥ ३ ॥

शूर ग्रामः सर्व वीरः सहावान् जेता पवस्व सनिता धनानि
तिग्म आयुधः क्षिप्र धन्वा समत् सु अषाळ्हः सह्वान् पृतनासु शत्रून् ॥ ३ ॥

सोमा तूं शूरसंघाचा नायक, सकल वीरांचा प्रभु, शत्रूंना रगडणारा विजयी योद्धा, आणि यशोधनजेता आहेस, तर आपल्या पावनप्रवाहानें वहा. तूं तेजस्वी आयुधें धारण करणारा आपलें धनुष्य झटपट सज्ज करतोस. तूं समरामध्यें अजिंक्य आणि तुमुल युद्धांत शत्रुसेनाला दडपून टाकणारा आहेस. तूं स्वच्छप्रवाहानें वहा ३.


उ॒रुग॑व्यूति॒रभ॑यानि कृ॒ण्वन् स॑मीची॒ने आ प॑वस्वा॒ पुरं॑धी ।
अ॒पः सिषा॑सन्न् उ॒षसः॒ स्व१ र्गाः सं चि॑क्रदो म॒हो अ॒स्मभ्यं॒ वाजा॑न् ॥ ४ ॥

उरु गव्यूतिः अभयानि कृण्वन् समीचीने इतिसं ईचीने आ पवस्व पुरन्धी
इतिपुरं धी अपः सिसासन् उषसः स्वः गाः सं चिक्रदः महः अस्मभ्यं वाजान् ॥ ४ ॥

धेनूंना चरण्याला विस्तीर्ण प्रदेश तूं देऊन सर्वांना निर्भय केलेंस. तर आतां परस्पर संल्लग्न आणि सर्वांचे निवासस्थान ज्या बुद्धिचालक द्यावापृथिवी त्यांच्याकडे तुझा पावनप्रवाह वाहूं दे. दिव्योदकें, उषःकाल, दिव्यलोक आणि प्रकाशधेनू या सर्वांचे नियमन करून आणि श्रेष्ठ सत्वसंपत्ति आम्हांकडे वळवून तूं सिंहनाद केलास ४.


मत्सि॑ सोम॒ वरु॑णं॒ मत्सि॑ मि॒त्रं मत्सीन्द्रं॑ इन्दो पवमान॒ विष्णु॑म् ।
मत्सि॒ शर्धो॒ मारु॑तं॒ मत्सि॑ दे॒वान् मत्सि॑ म॒हां इन्द्रं॑ इन्दो॒ मदा॑य ॥ ५ ॥

मत्सि सोम वरुणं मत्सि मित्रं मत्सि इन्द्रं इन्दो इति पवमान विष्णुं
मत्सि शर्धः मारुतं मत्सि देवान् मत्सि महां इन्द्रं इन्दो इति मदाय ॥ ५ ॥

पावनप्रवाहा, सोमा, तू वरुणाला हृष्ट कर, मित्राला तल्लीन कर, आनंदनिधि इंद्राला प्रमुदित कर, विष्णूला प्रसन्नचित्त कर, मरुतसेनेला संतुष्ट कर, तसेंच अखिल दिव्यजनांनाहि आनंदित कर. हे उल्लासरूपा स्वतः हृष्ट होण्यासाठींच तूं परमथोर इंद्राला हर्षनिर्भर कर ५.


ए॒वा राजे॑व॒ क्रतु॑मा॒ँ अमे॑न॒ विश्वा॒ घनि॑घ्नद्दुरि॒ता प॑वस्व ।
इन्दो॑ सू॒क्ताय॒ वच॑से॒ वयो॑ धा यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ६ ॥

एव राजा इव क्रतु मान् अमेन विश्वा घनिघ्नत् दुः इता पवस्व
इन्दो इति सु उक्ताय वचसे वयः धाः यूयं पात स्वस्ति भिः सदा नः ॥ ६ ॥

अशा रीतीनें राजाप्रमाणें तूं कर्तृत्वशाली सोम आपल्या प्रभावानें सर्व संकटांचा पार धुव्वा उडवून स्वच्छ प्रवाहानें वहा. हे आल्हादरूपा उत्कृष्ट सूक्तें गाणार्‍या भक्ताची तरतरी अढळ ठेव, आणि हे अखिल विभूतिनों तुम्हींहि आपल्या मंगल आशीर्वादांनीं आमचें सदैव रक्षण करा ६.


ॐ तत् सत्


GO TOP