PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ९ - सूक्त ६१ ते ७०

ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ६१ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - अमहीयु आंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


अ॒या वी॒ती परि॑ स्रव॒ यस्त॑ इन्दो॒ मदे॒ष्वा ।
अ॒वाह॑न् नव॒तीर्नव॑ ॥ १ ॥

अया वीती परि स्रव यः ते इन्दो इति मदेषु आ अव अहन् नवतीः नव ॥ १ ॥

अशा रीतीनें यज्ञाकरितां वहात रहा; आल्हादप्रदा सोमा, तूं असा आहेस कीं तुझ्या हर्षभरांत इंद्रानें नव्याण्णव नगरदुर्गांना जमीनदोस्त केलें १.


पुरः॑ स॒द्य इ॒त्थाधि॑ये॒ दिवो॑दासाय॒ शम्ब॑रम् ।
अध॒ त्यं तु॒र्वशं॒ यदु॑म् ॥ २ ॥

पुरः सद्यः इथाधिये दिवः दासाय शम्बरं अध त्यं तुर्वशं यदुम् ॥ २ ॥

सत्यबुद्धि बाळगणार्‍या दिवोदासाकरितां दुष्टांचीं नगरें त्यानें तत्काळ फोडलीं, आणि शंबर, तुर्वश आणि यदु हे त्याच्याशीं नमून राहतील असें केलें २.


परि॑ णो॒ अश्वं॑ अश्व॒विद्गोम॑दिन्दो॒ हिर॑ण्यवत् ।
क्षरा॑ सह॒स्रिणी॒रिषः॑ ॥ ३ ॥

परि नः अश्वं अश्व वित् गो मत् इन्दो इति हिरण्य वत् क्षरा सहस्रिणीः इषः ॥ ३ ॥

तूं अश्वसंपत्ति देणारा आहेस, तर अश्वसंपन्न, गोसंपन्न, आणि सुवर्णसंपन्न अशा सहस्त्रावधि मनोत्साहांचा प्रवाह आम्हांसाठीं वहात ठेव ३.


पव॑मानस्य ते व॒यं प॒वित्रं॑ अभ्युन्द॒तः ।
स॒खि॒त्वं आ वृ॑णीमहे ॥ ४ ॥

पवमानस्य ते वयं पवित्रं अभि उन्दतः सखि त्वं आ वृणीमहे ॥ ४ ॥

आपला पावनप्रवाह वहात ठेऊन पवित्र चिंब भिजवून टाकणारा जो तूं, त्या तुझ्या मित्रत्वाची आम्हीं याचना करीत आहों ४.


ये ते॑ प॒वित्रं॑ ऊ॒र्मयो॑ऽभि॒क्षर॑न्ति॒ धार॑या ।
तेभि॑र्नः सोम मृळय ॥ ५ ॥

ये ते पवित्रं ऊर्मयः अभि क्षरन्ति धारया तेभिः नः सोम मृळ्य ॥ ५ ॥

तुझे जे तरंग एकसारख्या धारेनें पवित्रांतून खालीं वाहतात, त्यांच्या योगानें हे सोमा, तूं आम्हांवर अनुग्रह कर ५.


स नः॑ पुना॒न आ भ॑र र॒यिं वी॒रव॑तीं॒ इष॑म् ।
ईशा॑नः सोम वि॒श्वतः॑ ॥ ६ ॥

सः नः पुनानः आ भर रयिं वीर वतीं इषं ईशानः सोम विश्वतः ॥ ६ ॥

तूं भक्तपावन सोम आम्हांला अक्षयधन आणि वीरसंपन्न उत्साह दे. हे सोमा, सर्वतोपरि संपत्तींचा अधिपति तूं आहेस ६.


ए॒तं उ॒ त्यं दश॒ क्षिपो॑ मृ॒जन्ति॒ सिन्धु॑मातरम् ।
सं आ॑दि॒त्येभि॑रख्यत ॥ ७ ॥

एतं ओं इति त्यं दश क्षिपः मृजन्ति सिन्धु मातरं सं आदित्येभिः अख्यत ॥ ७ ॥

ह्या नदीमातृक सोमाला ऋत्विजांच्या दहा अंगुलि पिळून स्वच्छ करतात, नंतर तो आदित्यांसह दृग्गोचर होतो ७.


सं इन्द्रे॑णो॒त वा॒युना॑ सु॒त ए॑ति प॒वित्र॒ आ ।
सं सूर्य॑स्य र॒श्मिभिः॑ ॥ ८ ॥

सं इन्द्रेण उत वायुना सुतः एति पवित्रे आ सं सूर्यस्य रश्मि भिः ॥ ८ ॥

मग पवित्रांतून गाळला गेल्यावर इंद्रासह, आणि वायूच्यासह गमन करतो, किंवा आदित्यांच्या किरणांशीं संल्लग्न होतो ८.


स नो॒ भगा॑य वा॒यवे॑ पू॒ष्णे प॑वस्व॒ मधु॑मान् ।
चारु॑र्मि॒त्रे वरु॑णे च ॥ ९ ॥

सः नः भगाय वायवे पूष्णे पवस्व मधु मान् चारुः मित्रे वरुणे च ॥ ९ ॥

माधुर्ययुक्त आणि मनोहर असा तूं, भाग्याधिपतिप्रीत्यर्थ, वायूप्रीत्यर्थ, पूषाप्रीत्यर्थ, आपला पावनप्रवाह सोड; मित्रावरुणाप्रीत्यर्थहि प्रवाह सोड ९.


उ॒च्चा ते॑ जा॒तं अन्ध॑सो दि॒वि षद्भूम्य् आ द॑दे ।
उ॒ग्रं शर्म॒ महि॒ श्रवः॑ ॥ १० ॥

उच्चा ते जातं अन्धसः दिवि सत् भूमिः आ ददे उग्रं शर्म महि श्रवः ॥ १० ॥

तुझ्या पेयाचें जन्मस्थान उच्च आहे; तें आकाशांत असूनहि त्यानें भूमि, तसेच तिचे तेजस्वी आणि कल्याणप्रद प्रदेश, आणि महत् यश ह्या सर्वांना आपल्या स्वाधीन ठेवलें आहे १०.


ए॒ना विश्वा॑न्य् अ॒र्य आ द्यु॒म्नानि॒ मानु॑षाणाम् ।
सिषा॑सन्तो वनामहे ॥ ११ ॥

एना विश्वानि अर्यः आ द्युम्नानि मानुषाणां सिसासन्तः वनामहे ॥ ११ ॥

ह्या प्रभूपाशीं मानवांना योग्य अशा सर्व उज्ज्वल धनांची आम्हीं आकांक्षा धरून तीं धनें आपल्या हस्तगत करून घेतों ११.


स न॒ इन्द्रा॑य॒ यज्य॑वे॒ वरु॑णाय म॒रुद्भ्यः॑ ।
व॒रि॒वो॒वित् परि॑ स्रव ॥ १२ ॥

सः नः इन्द्राय यज्यवे वरुणाय मरुत् भ्यः वरिवः वित् परि स्रव ॥ १२ ॥

पूज्य इंद्राप्रीत्यर्थ, वरुणाप्रीत्यर्थ, आणि मरुतांप्रीत्यर्थ कल्याणप्रद असा तूं आपला प्रवाह वहात ठेव १२.


उपो॒ षु जा॒तं अ॒प्तुरं॒ गोभि॑र्भ॒ङ्गं परि॑ष्कृतम् ।
इन्दुं॑ दे॒वा अ॑यासिषुः ॥ १३ ॥

उपो इति सु जातं अप् तुरं गोभिः भङ्गं परि कृतं इन्दुं देवाः अयासिषुः ॥ १३ ॥

उत्तमरीतीनें पिळलेला, उदकांकडे धांव घेणारा, शत्रुभंजक, आणि गोदुग्धमिश्रित अशा सोमरसाजवळ दिव्यविबुध प्राप्त झाले १३.


तं इद्व॑र्धन्तु नो॒ गिरो॑ व॒त्सं सं॒शिश्व॑रीरिव ।
य इन्द्र॑स्य हृदं॒सनिः॑ ॥ १४ ॥

तं इत् वर्धन्तु नः गिरः वत्सं संशिश्वरीः इव यः इन्द्रस्य हृदं सनिः ॥ १४ ॥

आमच्या स्तुतिवाणी, पान्हवलेल्या गाई ज्याप्रमाणें वांसराला पुष्ट करतात, त्याप्रमाणें तुझा महिमा वृद्धिंगत करोत. इंद्राचें अंतःकरण तूंच स्वाधीन करून घेऊं शकतोस १४.


अर्षा॑ णः सोम॒ शं गवे॑ धु॒क्षस्व॑ पि॒प्युषीं॒ इष॑म् ।
वर्धा॑ समु॒द्रं उ॒क्थ्यम् ॥ १५ ॥

अर्ष नः सोम शं गवे धुक्षस्व पिप्युषीं इषं वर्ध समुद्रं उक्थ्यम् ॥ १५ ॥

हे सोमा आमच्या धेनूंसाठीं सुखरूपपणें वाहणारा असा तूं उचंबळून सोडणारी उत्साहशक्ति आमच्या ठिकाणीं धडाडत राहील असें कर १५.


पव॑मानो अजीजनद्दि॒वश्चि॒त्रं न त॑न्य॒तुम् ।
ज्योति॑र्वैश्वान॒रं बृ॒हत् ॥ १६ ॥

पवमानः अजीजनत् दिवः चित्रं न तन्यतुं ज्योतिः वैश्वानरं बृहत् ॥ १६ ॥

पावनप्रवाह सोमानें आकाशाच्या अद्‌भुत निनादाप्रमाणें गर्जना केली, आणि सर्व प्रजेला हितकर असें तेजहि प्रकट केलें १६.


पव॑मानस्य ते॒ रसो॒ मदो॑ राजन्न् अदुच्छु॒नः ।
वि वारं॒ अव्यं॑ अर्षति ॥ १७ ॥

पवमानस्य ते रसः मदः राजन् अदुच्चुनः वि वारं अव्यं अर्षति ॥ १७ ॥

तूं जो पुण्यप्रवाह, त्या तुझा रस, हे सोमराजा, तुझा हर्षकर आणि अश्राप रस लोंकरीच्या पवित्रांतून सतत वाहतो १७.


पव॑मान॒ रस॒स्तव॒ दक्षो॒ वि रा॑जति द्यु॒मान् ।
ज्योति॒र्विश्वं॒ स्वर्दृ॒शे ॥ १८ ॥

पवमान रसः तव दक्षः वि राजति द्यु मान् ज्योतिः विश्वं स्वः दृशे ॥ १८ ॥

हे पावना, तुझा चातुर्यबलप्रद रस दीप्तिमान होऊन, त्याचें अखिल तेज, त्याचा स्वर्गीयप्रकाश सर्वांनीं पहावा म्हणून तो राजाप्रमाणें लोकांत मिरवत असतो १८.


यस्ते॒ मदो॒ वरे॑ण्य॒स्तेना॑ पव॒स्वान्ध॑सा ।
दे॒वा॒वीर॑घशंस॒हा ॥ १९ ॥

यः ते मदः वरेण्यः तेन पवस्व अन्धसा देव अवीः अघशंस हा ॥ १९ ॥

तुझा जो सर्वोत्कृष्ट हर्ष, त्या हर्षरूप पेयासह आपला प्रवाह वाहूं दे. तूं देवप्रिय आहेस, तूं पापनाशन आहेस. १९.


जघ्नि॑र्वृ॒त्रं अ॑मि॒त्रियं॒ सस्नि॒र्वाजं॑ दि॒वे-दि॑वे ।
गो॒षा उ॑ अश्व॒सा अ॑सि ॥ २० ॥

जघ्निः वृत्रं अमित्रियं सस्निः वाजं दिवे दिवे गो साः ओं इति अश्व साः असि ॥ २० ॥

तूं वृत्ररूप शत्रूचा नाश करणारा, भक्तांना प्रत्यहीं सत्वसामर्थ्याचा लाभ करून देणारा, धेनू प्राप्त करून देणारा आणि अश्व प्राप्त करून देणारा आहेस. २०.


सम्मि॑श्लो अरु॒षो भ॑व सूप॒स्थाभि॒र्न धे॒नुभिः॑ ।
सीद॑ञ् छ्ये॒नो न योनिं॒ आ ॥ २१ ॥

सं मिश्लः अरुषः भव सु उपस्थाभिः न धेनु भिः सीदं श्येनः न योनिं आ ॥ २१ ॥

तूं आरक्तपल्लव आहेस. तूं जवळ असलेल्या धेनूच्या दुग्धरूप तेजाशीं मिसळून जा. तूं आपल्या स्थानीं श्येनाप्रमाणें ऐटीनें राहतोस २१.


स प॑वस्व॒ य आवि॒थेन्द्रं॑ वृ॒त्राय॒ हन्त॑वे ।
व॒व्रि॒वांसं॑ म॒हीर॒पः ॥ २२ ॥

सः पवस्व यः आविथ इन्द्रं वृत्राय हन्तवे वव्रि वांसं महीः अपः ॥ २२ ॥

श्रेष्ठ अशीं उदकें अडवून धरणारा जो वृत्र त्याच्या वधाकरितां तूं इंद्राचें सहाय केलेंस; असा तूं आपला प्रवाह वहात ठेव २२.


सु॒वीरा॑सो व॒यं धना॒ जये॑म सोम मीढ्वः ।
पु॒ना॒नो व॑र्ध नो॒ गिरः॑ ॥ २३ ॥

सु वीरासः वयं धना जयेम सोम मीढवः पुनानः वर्ध नः गिरः ॥ २३ ॥

आम्हीं शूर सैनिकांनीं युक्त होऊन, हे कामनावर्षका सोमा, विजयधनें जिंकून आणूं. आणि तूंहि स्वच्छ प्रवाहानें वाहून आमच्या कवनशक्तीची अभिवृद्धि कर २३.


त्वोता॑स॒स्तवाव॑सा॒ स्याम॑ व॒न्वन्त॑ आ॒मुरः॑ ।
सोम॑ व्र॒तेषु॑ जागृहि ॥ २४ ॥

त्वा ऊतासः तव अवसा स्याम वन्वन्तः आमुरः सोम व्रतेषु जागृहि ॥ २४ ॥

तूं संरक्षण केल्यानें आणि तुझ्या कृपेनें आम्हीं युद्धांत विजय मिळवून शत्रूंचा फडशा उडवून देऊं असें कर. हे सोमा, आपल्या ब्रीदाला जागृत रहा. २४.


अ॒प॒घ्नन् प॑वते॒ मृधो॑ऽप॒ सोमो॒ अरा॑व्णः ।
गच्छ॒न्न् इन्द्र॑स्य निष्कृ॒तम् ॥ २५ ॥

अप घ्नन् पवते मृधः अप सोमः अराव्णः गच्चन् इन्द्रस्य निः कृतम् ॥ २५ ॥

शत्रूंचा फन्ना उडवून आणि दानविमुखाचा निःपात करून सोम हा इंद्रलोकीं गमन करून पावनप्रवाहानें वहातो २५.


म॒हो नो॑ रा॒य आ भ॑र॒ पव॑मान ज॒ही मृधः॑ ।
रास्वे॑न्दो वी॒रव॒द्यशः॑ ॥ २६ ॥

महः नः रायः आ भर पवमान जहि मृधः रास्व इन्दो इति वीर वत् यसः ॥ २६ ॥

उच्चप्रतीचें वैभव आमच्याकडे आण; हे पावनप्रवाहा, शत्रूंचा वध कर; आणि हे आल्हाददायका, आम्हांला वीरोचित असें यश दे २६.


न त्वा॑ श॒तं च॒न ह्रुतो॒ राधो॒ दित्स॑न्तं॒ आ मि॑नन् ।
यत् पु॑ना॒नो म॑ख॒स्यसे॑ ॥ २७ ॥

न त्वा शतं चन हुतः राधः दित्सन्तं आ मिनन् यत् पुनानः मखस्यसे ॥ २७ ॥

तूं आम्हांला कृपादान देण्याचें मनांत आणशील तर मार्गांत अडथळे शेकडों असले तरी सुद्धां ते तुजला विघ्न करूं शकणार नाहींत. कारण, शुद्धप्रवाहानें वाहून तूं आमच्या यज्ञाविषयीं उत्सुकता दाखवीत असतोस २७.


पव॑स्वेन्दो॒ वृषा॑ सु॒तः कृ॒धी नो॑ य॒शसो॒ जने॑ ।
विश्वा॒ अप॒ द्विषो॑ जहि ॥ २८ ॥

पवस्व इन्दो इति वृषा सुतः कृधि नः यशसः जने विश्वाः अप द्विषः जहि ॥ २८ ॥

हे आल्हाददायका तूं वीर आहेस. तूं पिळला जाऊन शुद्धप्रवाहानें वहात रहा; आम्हांला यशस्वी कर, आणि लोकांत जे आमचा द्वेष करीत असतील त्यांना अगदीं ठार कर २८.


अस्य॑ ते स॒ख्ये व॒यं तवे॑न्दो द्यु॒म्न उ॑त्त॒मे ।
सा॒स॒ह्याम॑ पृतन्य॒तः ॥ २९ ॥

अस्य ते सख्ये वयं तव इन्दो इति द्युम्ने उत् तमे ससह्याम पृतन्यतः ॥ २९ ॥

हे आल्हादरूपा अशा तुझ्या मैत्रीमध्यें, तुझ्या तेजस्वितेमध्यें राहून आम्हीं आमच्यावर हल्ला करणार्‍या हल्ला करणार्‍या शत्रूंना जेरीस आणूंच आणूं २९.


या ते॑ भी॒मान्य् आयु॑धा ति॒ग्मानि॒ सन्ति॒ धूर्व॑णे ।
रक्षा॑ समस्य नो नि॒दः ॥ ३० ॥

या ते भीमानि आयुधा तिग्मानि सन्ति धूर्वणे रक्ष समस्य नः निदः ॥ ३० ॥

तुझीं जीं भीषण आणि तीक्ष्ण शस्त्रास्त्रें शत्रुवधार्थ जय्यत आहेत, त्यांच्या योगानें सर्वांच्या निन्देपासून आमचें रक्षण कर ३०.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ६२ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - जमदग्नि भार्गव : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


ए॒ते अ॑सृग्रं॒ इन्द॑वस्ति॒रः प॒वित्रं॑ आ॒शवः॑ ।
विश्वा॑न्य् अ॒भि सौभ॑गा ॥ १ ॥

एते असृग्रं इन्दवः तिरः पवित्रं आशवः विश्वानि अभि सौभगा ॥ १ ॥

हे शीघ्रप्रवाही सोमबिंदु, सर्व भाग्यप्रद वस्तूंना अनुलक्षूनच आम्हीं पवित्रांतून गाळून पात्रांत ओतले आहेत १.


वि॒घ्नन्तो॑ दुरि॒ता पु॒रु सु॒गा तो॒काय॑ वा॒जिनः॑ ।
तना॑ कृ॒ण्वन्तो॒ अर्व॑ते ॥ २ ॥

वि घ्नन्तः दुः इता पुरु सु गा तोकाय वाजिनः तना कृण्वन्तः अर्वते ॥ २ ॥

ते सोमरस असंख्य संकटांचा चुराडा करून सत्वाढ्य भक्ताच्या संततिसाठीं सर्व मार्ग सुकर करतात, आणि अश्वारूढ वीराकरितां यशाची परंपरा राखतात २.


कृ॒ण्वन्तो॒ वरि॑वो॒ गवे॑ऽ॒भ्यर्षन्ति सुष्टु॒तिम् ।
इळां॑ अ॒स्मभ्यं॑ सं॒यत॑म् ॥ ३ ॥

कृण्वन्तः वरिवः गवे अभि अर्षन्ति सु स्तुतिं इळां अस्मभ्यं सं यतम् ॥ ३ ॥

धेनूसाठीं विस्तीर्ण प्रदेश मोकळा करून आणि आम्हांकडे संयमरूप समृद्धीचा प्रवाह लोटून सोमरस आमच्या ईशस्तुतींकडे धांवत येतात ३.


असा॑व्य् अं॒शुर्मदा॑या॒प्सु दक्षो॑ गिरि॒ष्ठाः ।
श्ये॒नो न योनिं॒ आस॑दत् ॥ ४ ॥

असावि अंशुः मदाय अप् सु दक्षः गिरि स्थाः श्येनः न योनिं आ असदत् ॥ ४ ॥

चातुर्यबलाढ्य, परंतु पर्वतनिवासी सोमाचा पल्लव उदकांत चुरून हर्षोत्कर्षासाठीं ज्याचा रस काढिला, तो सोमरूप श्येन आपल्या स्थानीं सुखानें विराजमान झाला आहे ४.


शु॒भ्रं अन्धो॑ दे॒ववा॑तं अ॒प्सु धू॒तो नृभिः॑ सु॒तः ।
स्वद॑न्ति॒ गावः॒ पयो॑भिः ॥ ५ ॥

शुभ्रं अन्धः देव वातं अप् सु धूतः नृ भिः सुतः स्वदन्ति गावः पयः भिः ॥ ५ ॥

देवाला प्रिय असें जें सोमपेय तें शुभ्र असतें; नंतर ऋत्विजांनीं सोमपल्लव पाण्यांत कोळून स्वच्छ केल्यानंतर त्याचा रस काढला, आणि तो रस धेनूंनीं आपल्या दुग्धानें मधुर केला. ५.


आदीं॒ अश्वं॒ न हेता॒रो॑ऽशूशुभन्न् अ॒मृता॑य ।
मध्वो॒ रसं॑ सध॒मादे॑ ॥ ६ ॥

आत् ईं अश्वं न हेतारः अशूशुभन् अमृताय मध्वः रसं सध मादे ॥ ६ ॥

अश्वाला दौडत नेणारे लोक त्याला भूषणांनीं नटवितात त्याप्रमाणें यज्ञामध्यें ऋत्विजांनीं मधुर सोमरसाला अमृतप्राप्तिसाठीं दुग्धानें अलंकृत केलें ६.


यास्ते॒ धारा॑ मधु॒श्चुतो॑ऽसृग्रं इन्द ऊ॒तये॑ ।
ताभिः॑ प॒वित्रं॒ आस॑दः ॥ ७ ॥

याः ते धाराः मधु श्चुतः असृग्रं इन्दो इति ऊतये ताभिः पवित्रं आ असदः ॥ ७ ॥

माधुर्यानें ओथंबलेल्या तुझ्या ज्या धारा ओतल्या आहेत, त्या धारांसह, हे आल्हादरूपा, तूं भक्तरक्षणासाठीं त्या पवित्रावर आरूढ हो ७.


सो अ॒र्षेन्द्रा॑य पी॒तये॑ ति॒रो रोमा॑ण्य् अ॒व्यया॑ ।
सीद॒न् योना॒ वने॒ष्व् आ ॥ ८ ॥

सः अर्ष इन्द्राय पीतये तिरः रोमाणि अव्यया सीदन् योना वनेषु आ ॥ ८ ॥

ऊर्णावस्त्राच्या गाळण्यांतून पाझरून आणि द्रोणपात्रांत स्वस्थानीं अधिष्ठित होऊन तूं इंद्राच्या प्राशनासाठीं स्वच्छप्रवाह सोड ८.


त्वं इ॑न्दो॒ परि॑ स्रव॒ स्वादि॑ष्ठो॒ अङ्गि॑रोभ्यः ।
व॒रि॒वो॒विद्घृ॒तं पयः॑ ॥ ९ ॥

त्वं इन्दो इति परि स्रव स्वादिष्ठः अङ्गिरः भ्यः वरिवः वित् घृतं पयः ॥ ९ ॥

आल्हादप्रदा सोमा, अत्यंत मधुर असा तूं, महासुखदायक घृत आणि दुग्ध यांचा प्रवाह अंगिरांसाठीं वहात ठेव ९.


अ॒यं विच॑र्षणिर्हि॒तः पव॑मानः॒ स चे॑तति ।
हि॒न्वा॒न आप्यं॑ बृ॒हत् ॥ १० ॥

अयं वि चर्षणिः हितः पवमानः सः चेतति हिन्वानः आप्यं बृहत् ॥ १० ॥

हा जो विश्वदर्शी आणि भक्तपावन सोमयेथें पात्रांत ठेवला आहे, तो आपल्या कनवाळूपणानें हलून जाऊन पहा कसा आपलें सचेतनत्व निदर्शनास आणीत आहे? १०


ए॒ष वृषा॒ वृष॑व्रतः॒ पव॑मानो अशस्ति॒हा ।
कर॒द्वसू॑नि दा॒शुषे॑ ॥ ११ ॥

एषः व्र्षा वृष व्रतः पवमानः अशस्ति हा करत् वसूनि दाशुषे ॥ ११ ॥

वीर्यशाली, आपल्या यथोचित ब्रीदाला जागणारा, आणि शापसंहारक, अशा ह्या सोमरसानें स्वच्छ प्रवाहानें वहात राहून सर्व उत्कृष्ट वस्तु भक्तासाठीं उत्पन्न केल्या आहेत ११.


आ प॑वस्व सह॒स्रिणं॑ र॒यिं गोम॑न्तं अ॒श्विन॑म् ।
पु॒रु॒श्च॒न्द्रं पु॑रु॒स्पृह॑म् ॥ १२ ॥

आ पवस्व सहस्रिणं रयिं गो मन्तं अश्विनं पुरु चन्द्रं पुरु स्पृहम् ॥ १२ ॥

गोसंपन्न, अश्वसंपन्न, सर्वाल्हाददायक, आणि सर्वांना हवेंसें वाटणारें जें धन आहे त्याचा प्रवाह तूं हजारों प्रकारांनीं वहात ठेव १२.


ए॒ष स्य परि॑ षिच्यते मर्मृ॒ज्यमा॑न आ॒युभिः॑ ।
उ॒रु॒गा॒यः क॒विक्र॑तुः ॥ १३ ॥

एषः स्यः परि सिच्यते मर्मृज्यमानः आयु भिः उरु गायः कवि क्रतुः ॥ १३ ॥

तो हा सोम, तो हा विस्तृताक्रमी, आणि काव्य-स्फुर्तिदाता सोम ऋत्विजांच्या हातून स्वच्छ होऊन पात्रांत ओतला आहे १३.


स॒हस्रो॑तिः श॒ताम॑घो वि॒मानो॒ रज॑सः क॒विः ।
इन्द्रा॑य पवते॒ मदः॑ ॥ १४ ॥

सहस्र ऊतिः शत मघः वि मानः रजसः कविः इन्द्राय पवते मदः ॥ १४ ॥

सहस्त्रावधि आयुधें धारण करणारा, शतावधि वरदानें देणारा, रजोलोकाला मापून टाकणारा आणि काव्यप्रेरक, हर्षकर सोम इंद्राप्रीत्यर्थ वहात आहे १४.


गि॒रा जा॒त इ॒ह स्तु॒त इन्दु॒रिन्द्रा॑य धीयते ।
विर्योना॑ वस॒ताव् इ॑व ॥ १५ ॥

गिरा जातः इह स्तुतः इन्दुः इन्द्राय धीयते विः योना वसतौ इव ॥ १५ ॥

भक्तांच्या वाणीनें प्रकट होणारा, परंतु भक्तांकडूनच स्तविला जाणारा हा सोम, पक्षी आपल्या घरट्यांत बसतो त्याप्रमाणें हा आल्हादप्रद रस इंद्राप्रीत्यर्थ पात्रांत ठेवला जात आहे १५.


पव॑मानः सु॒तो नृभिः॒ सोमो॒ वाजं॑ इवासरत् ।
च॒मूषु॒ शक्म॑ना॒सद॑म् ॥ १६ ॥

पवमानः सुतः नृ भिः सोमः वाजं इव असर्चत् चमूषु शक्मना आसदम् ॥ १६ ॥

पावनप्रवाही सोम शूर ऋत्विजांनीं पिळला म्हणजे चमूपात्रांत अधिष्ठित होण्यासाठीं, वीर रणांगणावर जातो त्याप्रमाणें, जोरानें पुढें सरतो १६.


तं त्रि॑पृ॒ष्ठे त्रि॑वन्धु॒रे रथे॑ युञ्जन्ति॒ यात॑वे ।
ऋषी॑णां स॒प्त धी॒तिभिः॑ ॥ १७ ॥

तं त्रि पृष्ठे त्रि बन्धुरे रथे युजन्ति यातवे ऋषीणां सप्त धीति भिः ॥ १७ ॥

तीन पृष्ठभागांच्या आणि तीन धुरा असलेल्या रथांत बसून जाण्यासाठीं सात ऋषींच्या ध्यानस्तुतींशीं सोमाचा संयोग करून देतात १७.


तं सो॑तारो धन॒स्पृतं॑ आ॒शुं वाजा॑य॒ यात॑वे ।
हरिं॑ हिनोत वा॒जिन॑म् ॥ १८ ॥

तं सोतारः धन स्पृतं आशुं वाजाय यातवे हरिं हिनोत वाजिनम् ॥ १८ ॥

रस पिळणार्‍या ऋत्विजांनों, दिव्य धन जिंकणारा आणि त्वरितगति अशा हरिद्वर्ण सोम वीराला, सत्वसामर्थ्याची प्राप्ति होण्यासाठीं देवाकडे पाठवून द्या १८.


आ॒वि॒शन् क॒लशं॑ सु॒तो विश्वा॒ अर्ष॑न्न् अ॒भि श्रियः॑ ।
शूरो॒ न गोषु॑ तिष्ठति ॥ १९ ॥

आ विशन् कलशं सुतः विश्वा अर्षन् अभि श्रियः शूरः न गोषु तिष्ठति ॥ १९ ॥

पिळल्यावर द्रोणकलशांत प्रवेश करणारा सोमरस, शूरसैनिक जसा युद्धाच्या गर्दीत निःशंक उभा राहतो त्याप्रमाणें सर्व प्रकारच्या शोभेला आपलीशीं करून ठाम राहतो. १९.


आ त॑ इन्दो॒ मदा॑य॒ कं पयो॑ दुहन्त्य् आ॒यवः॑ ।
दे॒वा दे॒वेभ्यो॒ मधु॑ ॥ २० ॥

आ ते इन्दो इति मदाय कं पयः दुहन्ति आयवः देवाः देवेभ्यः मधु ॥ २० ॥

आल्हादप्रद सोमा, तुझ्या रसरूप दुग्धाचें दोहन हर्षनिर्भर होण्यासाठीं ऋत्विज करितात, आणि दिव्यगणहि दिव्य विबुधांसाठीं त्याच्यापासून मधुर रस बनवितात २०.


आ नः॒ सोमं॑ प॒वित्र॒ आ सृ॒जता॒ मधु॑मत्तमम् ।
दे॒वेभ्यो॑ देव॒श्रुत्त॑मम् ॥ २१ ॥

आ नः सोमं पवित्रे आ सृजत मधुमत् तमं देवेभ्यः देवश्रुत् तमम् ॥ २१ ॥

आमचा अत्यंत मधुर सोम, दिव्यविभूतिंमध्यें अत्यंत विख्यात असा सोम, दिव्यविभूतिंसाठींच पवित्रावर ओता २१.


ए॒ते सोमा॑ असृक्षत गृणा॒नाः श्रव॑से म॒हे ।
म॒दिन्त॑मस्य॒ धार॑या ॥ २२ ॥

एते सोमाः असृक्षत गृणानाः श्रवसे महे मदिन् तमस्य धारया ॥ २२ ॥

हे सोमरस, जे ऋत्विजांनीं वाखाणले आहेत त्यांची त्यापेक्षांहि प्रख्याति व्हावी म्हणून, त्या अति हर्षकर पेयाला साजेल अशा प्रशस्त धारेनें पात्रांत ओतले आहेत २२.


अ॒भि गव्या॑नि वी॒तये॑ नृ॒म्णा पु॑ना॒नो अ॑र्षसि ।
स॒नद्वा॑जः॒ परि॑ स्रव ॥ २३ ॥

अभि गव्यानि वीतये नृम्णा पुनानः अर्षसि सनत् वाजः परि स्रव ॥ २३ ॥

यज्ञासाठीं गोदुग्धाशीं मिसळून जाऊन आपल्या पौरुषानें तूं पावनप्रवाह असा देवाप्रीत्यर्थ वहातोस, तर सत्वाढ्यता प्राप्त करून देणारा तूं असाच पाझरत रहा २३.


उ॒त नो॒ गोम॑ती॒रिषो॒ विश्वा॑ अर्ष परि॒ष्टुभः॑ ।
गृ॒णा॒नो ज॒मद॑ग्निना ॥ २४ ॥

उत नः गो मतीः इषः विश्वाः अर्ष परि स्तुभः गृणानः जमत् अग्निना ॥ २४ ॥

गोसंपन्न करणारा तूं, आमचा उत्साह आणि सर्व प्रकारच्या प्रशंसा यांना अनुलक्षून वहात रहा. जमदग्नीनें तुझें स्तवन केलेंच आहे. २४.


पव॑स्व वा॒चो अ॑ग्रि॒यः सोम॑ चि॒त्राभि॑रू॒तिभिः॑ ।
अ॒भि विश्वा॑नि॒ काव्या॑ ॥ २५ ॥

पवस्व वाचः अग्नियः सोम चित्राभिः ऊति भिः अभि विश्वानि काव्या ॥ २५ ॥

तूं स्तुतींचा अग्रणी म्हणून हे सोमा, आमचीं परोपरींचीं कवनें श्रवण करून आपल्या संरक्षकशक्तींनीं वहात रहा २५.


त्वं स॑मु॒द्रिया॑ अ॒पोऽग्रि॒यो वाच॑ ई॒रय॑न् ।
पव॑स्व विश्वमेजय ॥ २६ ॥

त्वं समुद्रियाः अपः अग्रियः वाचः ईरयन् पवस्व विश्वं एजय ॥ २६ ॥

समुद्राला मिळणार्‍या नद्या आणि स्तुति यांना चालना देणारा तूं अग्रणी आहेस; तर जग हलवून सोडणार्‍या सोमा, तूं पावनप्रवाहानें वहा २६.


तुभ्ये॒मा भुव॑ना कवे महि॒म्ने सो॑म तस्थिरे ।
तुभ्यं॑ अर्षन्ति॒ सिन्ध॑वः ॥ २७ ॥

तुभ्य इमा भुवना कवे महिम्ने सोम तस्थिरे तुभ्यं अर्षन्ति सिन्धवः ॥ २७ ॥

हे काव्यस्फूर्तिदात्या सोमा, हीं सर्व भुवनें तुझ्या महिम्यासाठीं आपआपल्या ठिकाणीं स्थिरावलीं, म्हणूनच मोठमोठ्या नद्या तुझ्याचकडे वहात जातात २७.


प्र ते॑ दि॒वो न वृ॒ष्टयो॒ धारा॑ यन्त्यस॒श्चतः॑ ।
अ॒भि शु॒क्रां उ॑प॒स्तिर॑म् ॥ २८ ॥

प्र ते दिवः न वृष्टयः धाराः यन्ति असश्चतः अभि शुक्रां उप स्तिरम् ॥ २८ ॥

आकाशापासून जशा वृष्टि त्याप्रमाणें तुझ्या सतत वाहणार्‍या धारा शुभ्रतेजस्क लोंकरीच्या पवित्रावर पडत असतात २८.


इन्द्रा॒येन्दुं॑ पुनीतनो॒ग्रं दक्षा॑य॒ साध॑नम् ।
ई॒शा॒नं वी॒तिरा॑धसम् ॥ २९ ॥

इन्द्राय इन्दुं पुनीतन उग्रं दक्षाय साधनं ईशानं वीति राधसम् ॥ २९ ॥

चातुर्यबलाचें साधन जो इंद्र त्याच्याप्रीत्यर्थ तो आल्हादप्रद, तीव्र, अधिपत्यशाली आणि यज्ञसेवातत्पर असा सोमरस गाळून स्वच्छ करा २९.


पव॑मान ऋ॒तः क॒विः सोमः॑ प॒वित्रं॒ आस॑दत् ।
दध॑त् स्तो॒त्रे सु॒वीर्य॑म् ॥ ३० ॥

पवमानः ऋतः कविः सोमः पवित्रं आ असदत् दधत् स्तोत्रे सु वीर्यम् ॥ ३० ॥

पावनप्रवाह, सत्यस्वरूप, काव्यप्रेरक आणि भक्तांना उत्कृष्टशौर्यशाली संतति देणारा असा सोम पवित्रावर अधिष्ठित झाला आहे ३०.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ६३ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - निध्रुवि काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


आ प॑वस्व सह॒स्रिणं॑ र॒यिं सो॑म सु॒वीर्य॑म् ।
अ॒स्मे श्रवां॑सि धारय ॥ १ ॥

आ पवस्व सहस्रिणं रयिं सोम सु वीर्यं अस्मे इति श्रवांसि धारय ॥ १ ॥

तूं स्वच्छ होऊन हे सोमा, हजारों प्रकारचें ऐश्वर्य, उत्तम शौर्य, आणि सुकीर्ति यांचा आम्हांस लाभ दे १.


इषं॒ ऊर्जं॑ च पिन्वस॒ इन्द्रा॑य मत्स॒रिन्त॑मः ।
च॒मूष्व् आ नि षी॑दसि ॥ २ ॥

इषं ऊर्जं च पिन्वसः इन्द्राय मत्सरिन् तमः चमूषु आ नि सीदसि ॥ २ ॥

उत्साह, आणि ऊर्जस्विता ह्यांच्या प्रवाहानें तूं इंद्राप्रीत्यर्थ तुडुंब भरून जातोस; आणि दिव्यजनांस अत्यंत तल्लीन करणार्‍या रसा तूं चमूपात्रांत अधिष्ठित होतोस २.


सु॒त इन्द्रा॑य॒ विष्ण॑वे॒ सोमः॑ क॒लशे॑ अक्षरत् ।
मधु॑माँ अस्तु वा॒यवे॑ ॥ ३ ॥

सुतः इन्द्राय विष्णवे सोमः कलशे अक्षरत् मधु मान् अस्तु वायवे ॥ ३ ॥

इंद्राप्रीत्यर्थ, विष्णूप्रीत्यर्थ, पिळलेला हा रस कलशांत पाझरला आहे. तो वायुदेवालाहि मधुर लागो ३.


ए॒ते अ॑सृग्रं आ॒शवो॑ऽति॒ ह्वरां॑सि ब॒भ्रवः॑ ।
सोमा॑ ऋ॒तस्य॒ धार॑या ॥ ४ ॥

एते असृग्रं आशवः अति ह्वरांसि बभ्रवः सोमाः ऋतस्य धारया ॥ ४ ॥

हे शीघ्रव्यापी हरिद्वर्ण सोमबिंदु सत्यधर्माच्या धारेनेंच जणों सर्व कपटजालांतून पार नेतात ४.


इन्द्रं॒ वर्ध॑न्तो अ॒प्तुरः॑ कृ॒ण्वन्तो॒ विश्वं॒ आर्य॑म् ।
अ॒प॒घ्नन्तो॒ अरा॑व्णः ॥ ५ ॥

इन्द्रं वर्धन्तः अप् तुरः कृण्वन्तः विश्वं आर्यं अप घ्नन्तः अराव्णः ॥ ५ ॥

हे सोमरस, इंद्राचें महात्म्य वाढविणारे, त्वरेनें कार्य करणारे, सर्व जगत् आर्यधर्मीय करून टाकणारे आणि कंजूष दुष्टांचें उच्चाटन करणारे आहेत ५.


सु॒ता अनु॒ स्वं आ रजो॑ऽ॒भ्यर्षन्ति ब॒भ्रवः॑ ।
इन्द्रं॒ गच्छ॑न्त॒ इन्द॑वः ॥ ६ ॥

सुताः अनु स्वं आ रजः अभि अर्षन्ति बभ्रवः इन्द्रं गच्चन्तः इन्दवः ॥ ६ ॥

हे पिळलेले हरिद्वर्ण रस, हे इंद्राकडे पोहोंचणारे आल्हादप्रद रस, आपल्या स्वभावानुरूप रजोलोकांकडे वहात जातात ६.


अ॒या प॑वस्व॒ धार॑या॒ यया॒ सूर्यं॒ अरो॑चयः ।
हि॒न्वा॒नो मानु॑षीर॒पः ॥ ७ ॥

अया पवस्व धारया यया सूर्यं अरोचयः हिन्वानः मानुषीः अपः ॥ ७ ॥

जिच्या योगानें तूं सूर्याला तेजस्वी केलेंस, जिच्या योगानें तूं मानवी सत्कार्याला उत्तेजन देतोस, त्या धारेनें तूं वहात रहा ७.


अयु॑क्त॒ सूर॒ एत॑शं॒ पव॑मानो म॒नाव् अधि॑ ।
अ॒न्तरि॑क्षेण॒ यात॑वे ॥ ८ ॥

अयुक्त सूरः एतशं पवमानः मनौ अधि अन्तरिक्षेण यातवे ॥ ८ ॥

तुझ्या संपर्कानें पवित्र होऊन सूर्यानें अन्तरिक्षांतून मानवांमध्यें येण्यासाठीं "एतश" नांवाचा अश्व रथाला जोडला ८.


उ॒त त्या ह॒रितो॒ दश॒ सूरो॑ अयुक्त॒ यात॑वे ।
इन्दु॒रिन्द्र॒ इति॑ ब्रु॒वन् ॥ ९ ॥

उत त्याः हरितः दश सूरः अयुक्त यातवे इन्दुः इन्द्रः इति ब्रुवन् ॥ ९ ॥

तसेंच पहा, त्या दशदिशांकडे गमन करण्यासाठीं आल्हादप्रद सोम हा " इंद्रच आहे" असें बोलून सूर्यानें आपले अश्व रथास जोडले ९.


परी॒तो वा॒यवे॑ सु॒तं गिर॒ इन्द्रा॑य मत्स॒रम् ।
अव्यो॒ वारे॑षु सिञ्चत ॥ १० ॥

परि इतः वायवे सुतं गिरः इन्द्राय मत्सरं अव्यः वारेषु सिचत ॥ १० ॥

म्हणून वायूप्रीत्यर्थ अथवा इंद्राप्रीत्यर्थ पिळलेल्या त्या हर्षकारी रसाला, हे माझ्या स्तवनवाणीनों, तुम्हीं ऊर्णावस्त्रावर ओता १०.


पव॑मान वि॒दा र॒यिं अ॒स्मभ्यं॑ सोम दु॒ष्टर॑म् ।
यो दू॒णाशो॑ वनुष्य॒ता ॥ ११ ॥

पवमान विदाः रयिं अस्मभ्यं सोम दुस्तरं यः दुः नशः वनुष्यता ॥ ११ ॥

पावनप्रवाहा सोमा, जें धन दुष्प्राप्य आहे, जें हल्ला करणार्‍या सैनिकालाहि जिंकतां येत नाहीं तें धन आम्हांस अर्पण कर ११.


अ॒भ्यर्ष सह॒स्रिणं॑ र॒यिं गोम॑न्तं अ॒श्विन॑म् ।
अ॒भि वाजं॑ उ॒त श्रवः॑ ॥ १२ ॥

अभि अर्ष सहस्रिणं रयिं गो मन्तं अश्विनं अभि वाजं उत श्रवः ॥ १२ ॥

गोयुक्त आणि अश्वयुक्त असें धन आमच्याकडे सहस्त्रशं वाहात आण; तसेंच सत्वबल आणि यशस्विता हींहि घेऊन ये १२.


सोमो॑ दे॒वो न सूर्यो॑ऽद्रिभिः पवते सु॒तः ।
दधा॑नः क॒लशे॒ रस॑म् ॥ १३ ॥

सोमः देवः न सूर्यः अद्रि भिः पवते सुतः दधानः कलशे रसम् ॥ १३ ॥

सूर्याप्रमाणें देदिप्यमान असा सोमरस ग्राव्य़ांनीं पिळला आणि कलशांत ठेवला म्हणजे स्वच्छ प्रवाहानें वाहतो १३.


ए॒ते धामा॒न्य् आर्या॑ शु॒क्रा ऋ॒तस्य॒ धार॑या ।
वाजं॒ गोम॑न्तं अक्षरन् ॥ १४ ॥

एते धामानि आर्या शुक्राः ऋतस्य धारया वाजं गो मन्तं अक्षरन् ॥ १४ ॥

आर्यजनांना योग्य अशीं तेजस्वी स्थानें, आणि गोधनयुक्त सत्वबल अशी देणगी ह्या शुभ्र सोमरसांनीं सत्यधर्माच्या प्रवाहानें वहात आणलीं १४.


सु॒ता इन्द्रा॑य व॒ज्रिणे॒ सोमा॑सो॒ दध्या॑शिरः ।
प॒वित्रं॒ अत्य॑क्षरन् ॥ १५ ॥

सुताः इन्द्राय वज्रिणे सोमासः दधि आशिरः पवित्रं अति अक्षरन् ॥ १५ ॥

आणि वज्रधर इंद्राप्रीत्यर्थ पिळलेले दधिमिश्रित सोमरस पवित्रांतून पाझरत राहिले १५.


प्र सो॑म॒ मधु॑मत्तमो रा॒ये अ॑र्ष प॒वित्र॒ आ ।
मदो॒ यो दे॑व॒वीत॑मः ॥ १६ ॥

प्र सोम मधुमत् तमः राये अर्ष पवित्रे आ मदः यः देव वीतमः ॥ १६ ॥

हे सोमा तुझा अत्यंत मधुर आणि हर्षकर रस आम्हांला दिव्य धन देण्याकरितां तूं पवित्रांतून वहात ठेव; तो रस देवसेवेविषयीं अत्यंत आसक्त आहे १६.


तं ई॑ मृजन्त्य् आ॒यवो॒ हरिं॑ न॒दीषु॑ वा॒जिन॑म् ।
इन्दुं॒ इन्द्रा॑य मत्स॒रम् ॥ १७ ॥

तं ईं इति मृजन्ति आयवः हरिं नदीषु वाजिनं इन्दुं इन्द्राय मत्सरम् ॥ १७ ॥

लढाऊ घोड्याला नदींत धुवून स्वच्छ करतात त्याप्रमाणें ऋत्विक्‌जन इंद्राप्रीत्यर्थ हर्षकारी सोमरसाला धुवून स्वच्छ करतात १७.


आ प॑वस्व॒ हिर॑ण्यव॒दश्वा॑वत् सोम वी॒रव॑त् ।
वाजं॒ गोम॑न्तं॒ आ भ॑र ॥ १८ ॥

आ पवस्व हिरण्य वत् अश्व वत् सोम वीर वत् वाजं गो मन्तं आ भर ॥ १८ ॥

हे सोमा, तूं पुण्यप्रवाहानें वहा, आणि सुवर्णप्रचुर, अश्वप्रपूरित, वीरयुक्त आणि गोधनयुक्त असें वैभव आम्हांकडे आण १८.


परि॒ वाजे॒ न वा॑ज॒युं अव्यो॒ वारे॑षु सिञ्चत ।
इन्द्रा॑य॒ मधु॑मत्तमम् ॥ १९ ॥

परि वाजे न वाज युं अव्यः वारेषु सिचत इन्द्राय मधुमत् तमम् ॥ १९ ॥

युद्धोत्सुक अश्वाला संग्रामांत दौडत न्यावा, त्याप्रमाणें मधुरतम आणि सत्वोत्सुक सोमाला ऊर्णापवित्रांतून पात्रांत ओता १९.


क॒विं मृ॑जन्ति॒ मर्ज्यं॑ धी॒भिर्विप्रा॑ अव॒स्यवः॑ ।
वृषा॒ कनि॑क्रदर्षति ॥ २० ॥

कविं मृजन्ति मर्ज्यं धीभिः विप्राः अवस्यवः वृषा कनिक्रत् अषर्ति ॥ २० ॥

अलंकृतियोग्य आणि काव्यस्फूर्ति देणार्‍या सोमाला रक्षणेच्छु भक्तजन ध्यानस्तुतींनीं अलंकृत करतात, तेव्हां वीर्यशाली सोम गर्जना करीत धांवत वहातो २०.


वृष॑णं धी॒भिर॒प्तुरं॒ सोमं॑ ऋ॒तस्य॒ धार॑या ।
म॒ती विप्राः॒ सं अ॑स्वरन् ॥ २१ ॥

वृषणं धीभिः अप् तुरं सोमं ऋतस्य धारया मती विप्राः सं अस्वरन् ॥ २१ ॥

वीर्यशाली आणि कार्यतत्पर सोमाचें स्तवन सत्यधर्माच्या धारेनें, ध्यानांनीं आणि मननीय स्तुतींनी, ज्ञानी भक्त उच्चस्वरानें करीत असतात. २१.


पव॑स्व देवायु॒षग् इन्द्रं॑ गच्छतु ते॒ मदः॑ ।
वा॒युं आ रो॑ह॒ धर्म॑णा ॥ २२ ॥

पवस्व देव आयुषक् इन्द्रं गच्चतु ते मदः वायुं आ रोह धर्मणा ॥ २२ ॥

देदीप्यमान सोमा, तुझा स्वच्छप्रवाह एकसारखा वाहूं दे. तुझा हर्षकारी रस इंद्राकडे जाऊंदे; आणि तूं आपल्या स्वभावधर्माप्रमाणें वायूच्या आंगांत भिनून वहात रहा २२.


पव॑मान॒ नि तो॑शसे र॒यिं सो॑म श्र॒वाय्य॑म् ।
प्रि॒यः स॑मु॒द्रं आ वि॑श ॥ २३ ॥

पवमान नि तोशसे रयिं सोम श्रवाय्यं प्रियः समुद्रं आ विश ॥ २३ ॥

हे शुद्धप्रवाहा, तूं स्वतःला पिळून घेऊन परमविख्यात धनाचा प्रवाह वहात सोडतोस; तर देवप्रिय असा तूं समुद्रांत प्रवेश कर २३.


अ॒प॒घ्नन् प॑वसे॒ मृधः॑ क्रतु॒वित् सो॑म मत्स॒रः ।
नु॒दस्वादे॑वयुं॒ जन॑म् ॥ २४ ॥

अप घ्नन् पावसे मृधः क्रतु वित् सोम मत्सरः नुदस्व अदेव युं जनम् ॥ २४ ॥

सत्कर्में जाणणारा, आणि हर्षोत्कर्ष करणारा असा, हे सोमा, तूं शत्रूंचा वध करून आपला स्वच्छप्रवाह वाहूं देतोस, तर देवविमुख पातक्यांचाहि नाश कर २४.


पव॑माना असृक्षत॒ सोमाः॑ शु॒क्रास॒ इन्द॑वः ।
अ॒भि विश्वा॑नि॒ काव्या॑ ॥ २५ ॥

पवमानाः असृक्षत सोमाः शुक्रासः इन्दवः अभि विश्वानि काव्या ॥ २५ ॥

स्वच्छ प्रवाहानें वहाणारे, शुभ्रवर्ण, आल्हादकर सोम सर्व प्रकारच्या काव्यस्फूर्तीला अनुलक्षून झराझर वहात राहिले २५.


पव॑मानास आ॒शवः॑ शु॒भ्रा अ॑सृग्रं॒ इन्द॑वः ।
घ्नन्तो॒ विश्वा॒ अप॒ द्विषः॑ ॥ २६ ॥

पवमानासः आशवः शुभ्राः असृग्रं इन्दवः घ्नन्तः विश्वाः अप द्विषः ॥ २६ ॥

स्वच्छप्रवाही, शीघ्रव्यापी, शुभ्रवर्ण आणि आल्हादकर असे सोम एकंदर द्वेष्ट्यांचा निःपात करून द्रोणपात्रांत वहात गेले २६.


पव॑माना दि॒वस्पर्य् अ॒न्तरि॑क्षादसृक्षत ।
पृ॒थि॒व्या अधि॒ सान॑वि ॥ २७ ॥

पवमानाः दिवः परि अन्तरिक्षात् असृक्षत पृथिव्याः अधि सानवि ॥ २७ ॥

स्वच्छ प्रवाही सोमरस द्युलोकांपासून, अन्तरिक्षापासून, चोहोंकडून पहा ह्या पृथिवीच्या उच्चशिखरावर पाझरले आहेत २७.


पु॒ना॒नः सो॑म॒ धार॒येन्दो॒ विश्वा॒ अप॒ स्रिधः॑ ।
ज॒हि रक्षां॑सि सुक्रतो ॥ २८ ॥

पुनानः सोम धारया इन्दो इति विश्वा अप स्रिधः जहि रक्षांसि सुक्रतो इतिसु क्रतो ॥ २८ ॥

हे पावना सोमा, हे आल्हादप्रदा, तूं यच्चावत् घातकी दुष्टांना पार उधळून लाव; हे महापराक्रमा सोमा, राक्षसांना ठार कर २८.


अ॒प॒घ्नन् सो॑म र॒क्षसो॑ऽ॒भ्यर्ष॒ कनि॑क्रदत् ।
द्यु॒मन्तं॒ शुष्मं॑ उत्त॒मम् ॥ २९ ॥

अप घ्नन् सोम रक्षसः अभि आर्ष कनिक्रदत् द्यु मन्तं शुष्मं उत् तमम् ॥ २९ ॥

राक्षसांचा निःपात करून हे सोमा, तूं गर्जना करीत असतां तेजस्वी आणि उत्कृष्ट असी धडाडी तुझ्या प्रवाहानें आम्हाकडे आण २९.


अ॒स्मे वसू॑नि धारय॒ सोम॑ दि॒व्यानि॒ पार्थि॑वा ।
इन्दो॒ विश्वा॑नि॒ वार्या॑ ॥ ३० ॥

अस्मे इति वसूनि धारय सोम दिव्यानि पार्थिवा इन्दो इति विश्वानि वार्या ॥ ३० ॥

आम्हांजवळ, हे सोमा, दिव्यलोकच्या तशाच भूलोकच्या सर्व उत्कृष्ट वस्तु, हे आल्हादप्रदा, सर्व अभिलक्षणीय वस्तु ठेव. ३०


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ६४ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - कश्यप मारीच : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


वृषा॑ सोम द्यु॒माँ अ॑सि॒ वृषा॑ देव॒ वृष॑व्रतः ।
वृषा॒ धर्मा॑णि दधिषे ॥ १ ॥

वृषा सोम द्यु मान् असि वृषा देव वृष व्रतः वृषा धर्माणि दधिषे ॥ १ ॥

हे सोमा तूं वीर्यशाली तेजःपुंज आहेस; हे देवा, तूं वीरालायोग्य अशीं महत्कृत्यें करणारा वीर आहेस; तूं वीर्यशालीविभूति धर्मनियमांचें संरक्षण करतोस १.


वृष्ण॑स्ते॒ वृष्ण्यं॒ शवो॒ वृषा॒ वनं॒ वृषा॒ मदः॑ ।
स॒त्यं वृ॑ष॒न् वृषेद॑सि ॥ २ ॥

वृष्णः ते वृष्ण्यं शवः वृषा वनं वृषा मदः सत्यं वृषन् वृषा इत् असि ॥ २ ॥

तुज वीराचें उत्कटबल वीराला साजेसेंच आहे; तूं राहतोस तें अरण्य वीर्यप्रद, तुझा हर्षहि वीर्यप्रद असतो; हे वीरा, खरोखरच तूं वीर शोभतोस २.


अश्वो॒ न च॑क्रदो॒ वृषा॒ सं गा इ॑न्दो॒ सं अर्व॑तः ।
वि नो॑ रा॒ये दुरो॑ वृधि ॥ ३ ॥

अश्वः न चक्रदः वृषा सं गाः इन्दो इति सं अर्वतः वि नः राये दुरः वृधि ॥ ३ ॥

तूं वीर, अश्वाप्रमाणें गरजलास. हे आल्हादप्रदा, तूं धेनू देणारा आहेस, अश्वसैनिक देणारा आहेस. तर आम्हांला दिव्य धन प्राप्त व्हावें म्हणून त्याचीं द्वारें उघडून दे ३.


असृ॑क्षत॒ प्र वा॒जिनो॑ ग॒व्या सोमा॑सो अश्व॒या ।
शु॒क्रासो॑ वीर॒याशवः॑ ॥ ४ ॥

असृक्षत प्र वाजिनः गव्या सोमासः अश्व या शुक्रासः वीर या आशवः ॥ ४ ॥

सत्वाढ्य, शुभ्रतेजस्क आणि शीघ्रव्यापी असे सोमरस, ऋत्विजानीं, धेनू, आणि वीरसैनिक मिळविण्याच्या उद्देशानें पात्रांत ओतले आहेत ४.


शु॒म्भमा॑ना ऋता॒युभि॑र्मृ॒ज्यमा॑ना॒ गभ॑स्त्योः ।
पव॑न्ते॒ वारे॑ अ॒व्यये॑ ॥ ५ ॥

शुम्भमानाः ऋतयु भिः मृज्यमानाः गभस्त्योः पवन्ते वारे अव्यये ॥ ५ ॥

सद्धर्मरत ऋत्विजांनीं आपल्या दोन्ही हातांनी चुरून रुचिकर बनविलेले सोमबिंदु ऊर्णावस्त्राच्या गाळण्यांतून वहात आहेत ५.


ते विश्वा॑ दा॒शुषे॒ वसु॒ सोमा॑ दि॒व्यानि॒ पार्थि॑वा ।
पव॑न्तां॒ आन्तरि॑क्ष्या ॥ ६ ॥

ते विश्वा दाशुषे वसु सोमाः दिव्यानि पार्थिवा पवन्तां आ अन्तरिक्ष्या ॥ ६ ॥

असे ते सोमबिंदु भक्ताकडे सर्व प्रकारचें धन अर्थात् द्युलोकांतील, पृथ्वीवरील आणि अन्तरिक्षांतील निवडक संपत्तीचा प्रवाह लोटोत ६.


पव॑मानस्य विश्ववि॒त् प्र ते॒ सर्गा॑ असृक्षत ।
सूर्य॑स्येव॒ न र॒श्मयः॑ ॥ ७ ॥

पवमानस्य विश्व वित् प्र ते सर्गाः असृक्षत सूर्यस्य इव न रश्मयः ॥ ७ ॥

हे सर्वज्ञा, स्वच्छ प्रवाह वाहविणारा तूं, त्या तुझ्या रसाच्या धारा सूर्याच्या किरणाप्रमाणें चोहोंकडे पसरतात ७.


के॒तुं कृ॒ण्वन् दि॒वस्परि॒ विश्वा॑ रू॒पाभ्यर्षसि ।
स॒मु॒द्रः सो॑म पिन्वसे ॥ ८ ॥

केतुं कृण्वन् दिवः परि विश्वा रूपा अभि आर्षसि समुद्रः सोम पिन्वसे ॥ ८ ॥

द्युलोकाच्यावर आपले ध्वज फडकावत ठेऊन सर्व प्रकारच्या साकार वस्तु तूं वहात आणतोस, आणि हे सोमा समुद्र देखील ओतप्रोत भरून टाकतोस. ८.


हि॒न्वा॒नो वाचं॑ इष्यसि॒ पव॑मान॒ विध॑र्मणि ।
अक्रा॑न् दे॒वो न सूर्यः॑ ॥ ९ ॥

हिन्वानः वाचं इष्यसि पवमान वि धर्मणि अक्रान् देवः न सूर्यः ॥ ९ ॥

ह्याप्रमाणें तुला कलवून सोडला म्हणजे, हे पावनप्रवाहा, देदीप्यमान सूर्य जसा अन्तराळीं मार्ग आक्रमण करतो, त्याप्रमाणें विविधभामनांच्या चित्तांत तूं स्तुतीची प्रेरणा करतोस ९.


इन्दुः॑ पविष्ट॒ चेत॑नः प्रि॒यः क॑वी॒नां म॒ती ।
सृ॒जदश्वं॑ र॒थीरि॑व ॥ १० ॥

इन्दुः पविष्ट चेतनः प्रियः कवीनां मती सृजत् अश्वं रथीः इव ॥ १० ॥

चित्तचालक आणि सर्वप्रिय अशा आल्हादप्रद सोमानें, सारथि जसा अश्वाला दौडत नेतो त्याप्रमाणें, कविप्रतिभेला प्रेरणा केली १०.


ऊ॒र्मिर्यस्ते॑ प॒वित्र॒ आ दे॑वा॒वीः प॒र्यक्ष॑रत् ।
सीद॑न्न् ऋ॒तस्य॒ योनिं॒ आ ॥ ११ ॥

ऊर्मिः यः ते पवित्रे आ दव अवीः परि अक्षरत् सीदन् ऋतस्य योनिं आ ॥ ११ ॥

तुझा देवसेवोत्सुकाचा रसकल्लोल पवित्रांतून पाझरला, तो सद्धर्माच्या स्थानीं अधिष्ठित होऊनच पाझरला ११.


स नो॑ अर्ष प॒वित्र॒ आ मदो॒ यो दे॑व॒वीत॑मः ।
इन्द॒व् इन्द्रा॑य पी॒तये॑ ॥ १२ ॥

सः नः अर्ष पवित्रे आ मदः यः देव वीतमः इन्दो इति इन्द्राय पीतये ॥ १२ ॥

तुझा जो हर्षकर आणि देवांविषयीं अत्यंत उत्सुक असा रस पवित्रावर ठेवला आहे तो हे आल्हादकरा सोमा, इंद्रानें प्राशन करावा म्हणून आमच्यासाठीं वहात राहूं दे १२.


इ॒षे प॑वस्व॒ धार॑या मृ॒ज्यमा॑नो मनी॒षिभिः॑ ।
इन्दो॑ रु॒चाभि गा इ॑हि ॥ १३ ॥

इषे पवस्व धारया मृज्यमानः मनीषि भिः इन्दो इति रुचा अभि गाः इहि ॥ १३ ॥

भक्तांच्या उत्साहवृद्धिसाठीं स्वच्छ धारेनें वहात रहा. हे आल्हादप्रद रसा, सुकृतकारी भक्तांनीं अलंकृत कलेला तूं आपल्या तेजोरसाने आमच्या धेनूंकडे आगमन कर १३.


पु॒ना॒नो वरि॑वस्कृ॒ध्य् ऊर्जं॒ जना॑य गिर्वणः ।
हरे॑ सृजा॒न आ॒शिर॑म् ॥ १४ ॥

पुनानः वरिवः कृधि ऊर्जं जनाय गिर्वणः हरे सृजानः आशिरम् ॥ १४ ॥

भक्तपावन तूं भक्तजनासाठीं सुखाची खाण निर्माण कर; हे स्तवनप्रिया हरिद्वर्णा, रसदुग्ध उत्पन्न करणारा तूं भक्तांना ऊर्जस्विता दे १४.


पु॒ना॒नो दे॒ववी॑तय॒ इन्द्र॑स्य याहि निष्कृ॒तम् ।
द्यु॒ता॒नो वा॒जिभि॑र्य॒तः ॥ १५ ॥

पुनानः देव वीतये इन्द्रस्य याहि निः कृतं द्युतानः वाजि भिः यतः ॥ १५ ॥

देवसेवेसाठीं स्वच्छ होणारा, आपल्या तेजानें चमकणारा, आणि सत्वाढ्य ऋत्विजांनीं आवरून धरलेला असा तूं इंद्राच्या लोकीं गमन कर १५.


प्र हि॑न्वा॒नास॒ इन्द॒वो॑ऽच्छा समु॒द्रं आ॒शवः॑ ।
धि॒या जू॒ता अ॑सृक्षत ॥ १६ ॥

प्र हिन्वानासः इन्दवः अच्च समुद्रं आशवः धिया जूताः असृक्षत ॥ १६ ॥

पुष्कळ वेळ हलविल्यानें ते शीघ्रव्यापी सोमबिंदु भक्ताच्या ध्यानबुद्धीनें प्रेरित होऊन समुद्राकडे धांवत गेले १६.


म॒र्मृ॒जा॒नास॑ आ॒यवो॒ वृथा॑ समु॒द्रं इन्द॑वः ।
अग्म॑न्न् ऋ॒तस्य॒ योनिं॒ आ ॥ १७ ॥

मर्मृजानासः आयवः वृथा समुद्रं इन्दवः अग्मन् ऋतस्य योनिं आ ॥ १७ ॥

पिळून स्वच्छ केलेले पातळ सोमरस समुद्राकडे, सत्यधर्माच्या स्थानाकडे सहज लीलेनें धांवत चालले १७.


परि॑ णो याह्य् अस्म॒युर्विश्वा॒ वसू॒न्य् ओज॑सा ।
पा॒हि नः॒ शर्म॑ वी॒रव॑त् ॥ १८ ॥

परि नः याहि अस्म युः विश्वा वसूनि ओजसा पाहि नः शर्म वीर वत् ॥ १८ ॥

तूं आमच्याविषयीं प्रेमभाव बाळगणारा आहेस, म्हणून आमच्या अखिल संपत्तीच्या भोंवतीं रहा, आणि आपल्या ओजानें आमच्या वीरसैनिकांनींयुक्त अशा स्थानांचें रक्षण कर १८.


मिमा॑ति॒ वह्नि॒रेत॑शः प॒दं यु॑जा॒न ऋक्व॑भिः ।
प्र यत् स॑मु॒द्र आहि॑तः ॥ १९ ॥

मिमाति वह्निः एतशः पदं युजानः ऋक्व भिः प्र यत् समुद्रे आहितः ॥ १९ ॥

दिव्यजनांना घेऊन येणारा, ऋक्स्त्रोत्रपठनाच्या आवाजाप्रमाणें पावलें टाकणारा, हा सोमरूप एतश समुद्रांत ठेवला असतां मोठ्यानें गर्जना करितो १९.


आ यद्योनिं॑ हिर॒ण्ययं॑ आ॒शुरृ॒तस्य॒ सीद॑ति ।
जहा॒त्यप्र॑चेतसः ॥ २० ॥

आ यत् योनिं हिरण्ययं आशुः ऋतस्य सीदति जहाति अप्र चेतसः ॥ २० ॥

तसेंच, जेव्हां तो सद्धर्माच्या सुवर्णमय अविनाशी स्थानीं अधिष्ठित होतो तेव्हां अविवेकी लोकांचा तो त्यागच करितो २०.


अ॒भि वे॒ना अ॑नूष॒तेय॑क्षन्ति॒ प्रचे॑तसः ।
मज्ज॒न्त्यवि॑चेतसः ॥ २१ ॥

अभि वेनाः अनूषत इयक्षन्ति प्र चेतसः मज्जन्ति अवि चेतसः ॥ २१ ॥

मनोहरस्तोत्र म्हणणारे भक्त त्याचें स्तवन करतात, आणि महाज्ञानी भक्त यजन करण्याची आकाङ्क्षा बाळगतात, परंतु अविवेकी मूढ मात्र पातकांतच गटांगळ्याच खात राहतात २१.


इन्द्रा॑येन्दो म॒रुत्व॑ते॒ पव॑स्व॒ मधु॑मत्तमः ।
ऋ॒तस्य॒ योनिं॑ आ॒सद॑म् ॥ २२ ॥

इन्द्राय इन्दो इति मरुत्वते पवस्व मधुमत् तमः ऋतस्य योनिं आसदम् ॥ २२ ॥

मरुतांनी सेवित अशा इंद्राप्रीत्यर्थ, हे आल्हादप्रदा सोमा तूं वहात रहा; अत्यंत मधुर असा तूं सत्य धर्माच्या स्थानीं अधिष्ठित होण्यासाठीं वहात रहा २२.


तं त्वा॒ विप्रा॑ वचो॒विदः॒ परि॑ ष्कृण्वन्ति वे॒धसः॑ ।
सं त्वा॑ मृजन्त्य् आ॒यवः॑ ॥ २३ ॥

तं त्वा विप्राः वचः विदः परि कृण्वन्ति वेधसः सं त्वा मृजन्ति आयवः ॥ २३ ॥

ज्ञानशाली, स्तवन प्रवीण आणि कल्पक असे भक्त तुजला विभूषित करतात; तसेंच सामान्यजनहि तुजला अलंकृत करतात २३.


रसं॑ ते मि॒त्रो अ॑र्य॒मा पिब॑न्ति॒ वरु॑णः कवे ।
पव॑मानस्य म॒रुतः॑ ॥ २४ ॥

रसं ते मित्रः अर्यमा पिबन्ति वरुणः कवे पवमानस्य मरुतः ॥ २४ ॥

स्वच्छ प्रवाहानें वहाणारा जो तूं, त्या तुझा रस, हे स्फूर्तिदात्या सोमा, मित्र, अर्यमा, वरुण आणि मरुत् हे प्राशन करतात २४.


त्वं सो॑म विप॒श्चितं॑ पुना॒नो वाचं॑ इष्यसि ।
इन्दो॑ स॒हस्र॑भर्णसम् ॥ २५ ॥

त्वं सोम विपः चितं पुनानः वाचं इष्यसि इन्दो इति सहस्र भर्णसम् ॥ २५ ॥

सोमा तूं स्वच्छ झालास म्हणजे ज्ञानपूर्ण वाणीची स्फूर्ति देतोस; हे आल्हादरूपा, हजारों अन्तःकरणें भरून सोडणार्‍या वाणीला स्फूर्ति देतोस. २५.


उ॒तो स॒हस्र॑भर्णसं॒ वाचं॑ सोम मख॒स्युव॑म् ।
पु॒ना॒न इ॑न्द॒व् आ भ॑र ॥ २६ ॥

उतो इति सहस्र भर्णसं वाचं सोम मखस्युवं पुनानः इन्दो इति आ भर ॥ २६ ॥

म्हणून सहस्रावधि अंतःकरणे भरून सोडणारी, आणि यज्ञाची इच्छा उत्पन्न करणारी वाणी, हे पावना, हे सोमा, तूं आम्हांमध्यें आण २६.


पु॒ना॒न इ॑न्दव् एषां॒ पुरु॑हूत॒ जना॑नाम् ।
प्रि॒यः स॑मु॒द्रं आ वि॑श ॥ २७ ॥

पुनानः इन्दो इति एषां पुरु हूत जनानां प्रियः समुद्रं आ विश ॥ २७ ॥

हे सोमरसा तूं स्वच्छ प्रवाहानें वाहून, हे असंख्यजन स्तुता, ह्या लोकांना प्रिय होऊन तूं समुद्रात प्रवेश कर २७.


दवि॑द्युतत्या रु॒चा प॑रि॒ष्टोभ॑न्त्या कृ॒पा ।
सोमाः॑ शु॒क्रा गवा॑शिरः ॥ २८ ॥

दविद्युतत्या रुचा परि स्तोभन्त्या कृपा सोमाः शुक्राः गो आशिरः ॥ २८ ॥

आपल्या घवघवीत कान्तीनें आणि जिचा सर्वत्र स्तुतिघोष चालतो अशा कृपालहरीनें हे शुभ्र सोमरस दुग्धमिश्रित झाले २८.


हि॒न्वा॒नो हे॒तृभि॑र्य॒त आ वाजं॑ वा॒ज्य् अक्रमीत् ।
सीद॑न्तो व॒नुषो॑ यथा ॥ २९ ॥

हिन्वानः हेतृ भिः यतः आ वाजं वाजी अक्रमीत् सीदन्तः वनुषः यथा ॥ २९ ॥

पुढें सरसावून जाणारा, परंतु प्रोत्साहन देणार्‍या भक्तांनीं आवरून धरलेला सत्वाढ्य सोम, विजयेच्छु वीर रणांगणावर जातो त्याप्रमाणें ऐटीनें वहात गेला २९.


ऋ॒धक् सो॑म स्व॒स्तये॑ संजग्मा॒नो दि॒वः क॒विः ।
पव॑स्व॒ सूर्यो॑ दृ॒शे ॥ ३० ॥

ऋधक् सोम स्वस्तये सं जग्मानः दिवः कविः पवस्व सूर्यः दृशे ॥ ३० ॥

आणि खरोखरच हे सोमा, तूं आमच्या कल्याणासाठीं आमच्याशीं सहवास करणारा, पण दिव्यलोकींचा काव्यप्रेरक आहेस, तर आम्हीं सूर्याला पुष्कळ वर्षे पहावें म्हणून आपला पावनप्रवाह वहात ठेव ३०.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ६५ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - भृगु वारुणि वा जमदग्नि भार्गवअवत्सार काश्यप : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


हि॒न्वन्ति॒ सूरं॒ उस्र॑यः॒ स्वसा॑रो जा॒मय॒स्पति॑म् ।
म॒हां इन्दुं॑ मही॒युवः॑ ॥ १ ॥

हिन्वन्ति सूरं उस्रयः स्वसारः जामयः पतिं महां इन्दुं महीयुवः ॥ १ ॥

एकमेकीच्या भगिनी आणि आप्त अशा ज्या प्रभाशालिनी अरुणकान्ति, त्या श्रेष्ठपणा मिळविण्याच्या इच्छेनें आपल्या परमथोर सोमरूप पतीला हलवून जागृत करतात १.


पव॑मान रु॒चा-रु॑चा दे॒वो दे॒वेभ्य॒स्परि॑ ।
विश्वा॒ वसू॒न्य् आ वि॑श ॥ २ ॥

पवमान रुचारुचा देवः देवेभ्यः परि विश्वा वसूनि आ विश ॥ २ ॥

पावन प्रवाहा, देदीप्यमान असा तूं आपल्या परोपरीच्या तेजस्वितेनें दिव्यविबुधांसाठीं सर्व प्रकारच्या उत्कृष्ट वस्तूंत प्रविष्ट हो २.


आ प॑वमान सुष्टु॒तिं वृ॒ष्टिं दे॒वेभ्यो॒ दुवः॑ ।
इ॒षे प॑वस्व सं॒यत॑म् ॥ ३ ॥

आ पवमान सु स्तुतिं वृष्टिं देवेभ्यः दुवः इषे पवस्व सं यतम् ॥ ३ ॥

हे पावनप्रवाहा, तूं दिव्यविभूतिसाठीं आणि आमच्या मनोत्साहासाठीं सुविरचित स्तुति, यथाकाल पर्जन्यवृष्टि, आणि नियमित उपासना ह्यांचा ओघ वहावयास लाव ३.


वृषा॒ ह्य् असि॑ भा॒नुना॑ द्यु॒मन्तं॑ त्वा हवामहे ।
पव॑मान स्वा॒ध्यः ॥ ४ ॥

वृषा हि असि भानुना द्यु मन्तं त्वा हवामहे पवमान सु आध्यः ॥ ४ ॥

तूं वीर्यशाली आहेस, तूं आपल्या कांतीनें चमकणारा आहेस, म्हणून हे पावना, आम्ही ध्यानशील भक्त तुजला पाचरण करीत आहोंत ४.


आ प॑वस्व सु॒वीर्यं॒ मन्द॑मानः स्वायुध ।
इ॒हो ष्व् ऐ॑न्द॒व् आ ग॑हि ॥ ५ ॥

आ पावस्व सु वीर्यं मन्दमानः सु आयुध इहो इति सु इन्दो इति आ गहि ॥ ५ ॥

तूं हर्ष उत्पन्न करून वीर्यशालित्वाचा प्रवाह वाहूं दे; हे उत्तमायुधा, आल्हादरूपा इकडे वहात ये ५.


यद॒द्भिः प॑रिषि॒च्यसे॑ मृ॒ज्यमा॑नो॒ गभ॑स्त्योः ।
द्रुणा॑ स॒धस्थं॑ अश्नुषे ॥ ६ ॥

यत् अत् भिः परि सिच्यसे मृज्यमानः गभस्त्योः द्रुणा सध स्थं अश्नुषे ॥ ६ ॥

जेव्हां उदकांसह आमच्या दोन्ही हातांनीं पिळून आणि धुवून जाऊन तूं पात्रांत ओतला जातोस, तेव्हां काष्ठाच्या अभिषवण फलकानें तूं आपलें नियतस्थान प्राप्त करून घेतोस ६.


प्र सोमा॑य व्यश्व॒वत् पव॑मानाय गायत ।
म॒हे स॒हस्र॑चक्षसे ॥ ७ ॥

प्र सोमाय व्यश्व वत् पवमानाय गायत महे सहस्र चक्षसे ॥ ७ ॥

भक्तपावन आणि सहस्त्रदृष्टि अशा श्रेष्ठ सोमाप्रीत्यर्थ व्यश्वाप्रमाणें तुम्हीहि गायन करा ७.


यस्य॒ वर्णं॑ मधु॒श्चुतं॒ हरिं॑ हि॒न्वन्त्यद्रि॑भिः ।
इन्दुं॒ इन्द्रा॑य पी॒तये॑ ॥ ८ ॥
तस्य॑ ते वा॒जिनो॑ व॒यं विश्वा॒ धना॑नि जि॒ग्युषः॑ ।
स॒खि॒त्वं आ वृ॑णीमहे ॥ ९ ॥

यस्य वर्णं मधु श्चुतं हरिं हिन्वन्ति अद्रि भिः इन्दुं इन्द्राय पीतये ॥ ८ ॥
तस्य ते वाजिनः वयं विश्वा धनानि जिग्युषः सखि त्वं आ वृणीमहे ॥ ९ ॥

माधुर्यानें ओथंबलेल्या ज्या हरिद्वर्ण सोमाचा आल्हाददायी रस, इंद्रानें प्राशन करावा म्हणून ऋत्विज् पाषाणांनीं चुरून हलवितात, त्या सत्वप्रभावी सोमापाशीं आम्हीं सर्व प्रकारच्या धनांची, त्या विजयशाली सोमापाशीं, त्याच्या मित्रत्वाची याचना करतों ८-९.


वृषा॑ पवस्व॒ धार॑या म॒रुत्व॑ते च मत्स॒रः ।
विश्वा॒ दधा॑न॒ ओज॑सा ॥ १० ॥

वृषा पवस्व धारया मरुत्वते च मत्सरः विश्वा दधानः ओजसा ॥ १० ॥

वीर्यशाली, हर्षकारी आणि ओजस्वितेनें सकल वस्तुमात्र आपल्या स्वाधीन ठेवणारा असा तूं आपल्या धारेनें स्वच्छ प्रवाह वहात ठेव १०.


तं त्वा॑ ध॒र्तारं॑ ओ॒ण्यो३ः पव॑मान स्व॒र्दृश॑म् ।
हि॒न्वे वाजे॑षु वा॒जिन॑म् ॥ ११ ॥

तं त्वा धर्तारं ओण्योः पवमान स्वः दृशं हिन्वे वाजेषु वाजिनम् ॥ ११ ॥

हे पावनप्रवाह, उभयतां द्यावापृथिवींचा धारक, दिव्यप्रकाश दृष्टीस पाडणारा, आणि सत्वप्राप्तीच्या झुंजांत सत्ववीर म्हणून गाजणारा अशा तुजला मी हलवून सोडतों ११.


अ॒या चि॒त्तो वि॒पानया॒ हरिः॑ पवस्व॒ धार॑या ।
युजं॒ वाजे॑षु चोदय ॥ १२ ॥

अया चित्तः विपा अनया हरिः पवस्व धारया युजं वाजेषु चोदय ॥ १२ ॥

अशा रीतीनें तुझें चिन्तन केलें म्हणजे तूं हरिद्वर्ण सोम ह्या माझ्या अंगुलीनें पिळला जाऊन वहात रहा, आणि आपल्या धारेनें आपल्या मित्राला सत्व प्राप्तीच्या प्रयत्‍नांत प्रोत्साहन दे १२.


आ न॑ इन्दो म॒हीं इषं॒ पव॑स्व वि॒श्वद॑र्शतः ।
अ॒स्मभ्यं॑ सोम गातु॒वित् ॥ १३ ॥

आ नः इन्दो इति महीं इषं पवस्व विश्व दर्शतः अस्मभ्यं सोम गातु वित् ॥ १३ ॥

हे आल्हादप्रदा, उच्चप्रतीचा मनोत्साह आमच्याकडे वहात आण; हे विश्वदर्शी सोमा, तूं आम्हांला सन्मार्गबोधक झाला आहेस १३.


आ क॒लशा॑ अनूष॒तेन्दो॒ धारा॑भि॒रोज॑सा ।
एन्द्र॑स्य पी॒तये॑ विश ॥ १४ ॥

आ कलशाः अनूषत इन्दो इति धाराभिः ओजसा आ इन्द्रस्य पीतये विश ॥ १४ ॥

द्रोणकलश जणों काय आपल्या निनादानें देवाची स्तुति करूं लागले आहेत; तर हे आल्हाददायका, इंद्रानें प्राशन करावें म्हणून तूं आपल्या धारेनें-आपल्या ओजस्वितेनें त्यांत प्रवेश कर १४.


यस्य॑ ते॒ मद्यं॒ रसं॑ ती॒व्रं दु॒हन्त्यद्रि॑भिः ।
स प॑वस्वाभिमाति॒हा ॥ १५ ॥

यस्य ते मद्यं रसं तीव्रं दुहन्ति अद्रि भिः सः पवस्व अभि माति हा ॥ १५ ॥

ज्या तुझा हर्षकारक तीव्र रस अध्वर्यू हे ग्राव्यांनीं चुरून दोहन करतात, तो तूं शत्रुनाशन सोम, आपला प्रवाह वहावयास लाव १५.


राजा॑ मे॒धाभि॑रीयते॒ पव॑मानो म॒नाव् अधि॑ ।
अ॒न्तरि॑क्षेण॒ यात॑वे ॥ १६ ॥

राजा मेधाभिः ईयते पवमानः मनौ अधि अन्तरिक्षेण यातवे ॥ १६ ॥

मानवी समाजामध्यें अन्तरिक्षमार्गानें गमन करावें म्हणून प्रतिभायुक्त कवनांनीं सोमराजाची विनवणी भक्त करीत आहेत १६.


आ न॑ इन्दो शत॒ग्विनं॒ गवां॒ पोषं॒ स्वश्व्य॑म् ।
वहा॒ भग॑त्तिं ऊ॒तये॑ ॥ १७ ॥

आ नः इन्दो इति शत ग्विनं गवां पोषं सु अश्व्यं वह भगत्तिं ऊतये ॥ १७ ॥

हे आल्हादप्रदा सोमा, शेंकडों प्रकारची गोधनसमृद्धि, उत्कृष्ट अश्वसंपत्ति यांचें भाग्य आमच्या रक्षणासाठीं तूं आमच्याकडे वहात आण १७.


आ नः॑ सोम॒ सहो॒ जुवो॑ रू॒पं न वर्च॑से भर ।
सु॒ष्वा॒णो दे॒ववी॑तये ॥ १८ ॥

आ नः सोम सहः जुवः रूपं न वर्चसे भर सुस्वानः देव वीतये ॥ १८ ॥

हे सोमा उत्तम रूपाप्रमाणेंच दुर्दम्य सामर्थ्य आणी चापल्य हे गुण, आमचें वर्चस्व रहावें आणि देवसेवा घडावी म्हणून, तूं घोषणा करीत आमच्यामध्यें आण १८.


अर्षा॑ सोम द्यु॒मत्त॑मोऽ॒भि द्रोणा॑नि॒ रोरु॑वत् ।
सीद॑ञ् छ्ये॒नो न योनिं॒ आ ॥ १९ ॥

अर्ष सोम द्युमत् तमः अभि द्रोणानि रोरुवत् सीदन् श्येनः न योनिं आ ॥ १९ ॥

अत्यंत तेजस्वी असा तूं ससाण्याप्रमाणें आपल्या ठिकाणीं गर्जना करीत करीत द्रोणपात्रांत वहात जा १९.


अ॒प्सा इन्द्रा॑य वा॒यवे॒ वरु॑णाय म॒रुद्भ्यः॑ ।
सोमो॑ अर्षति॒ विष्ण॑वे ॥ २० ॥

अप्साः इन्द्राय वायवे वरुणाय मरुत् भ्यः सोमः अर्षति विष्णवे ॥ २० ॥

वसतीवरी उदकाशीं मिश्रित झालेला हा सोमरस इंद्राप्रीत्यर्थ, वायुप्रीत्यर्थ, मरुतांप्रीत्यर्थ अथवा विष्णुप्रीत्यर्थ वहात आहे २०


इषं॑ तो॒काय॑ नो॒ दध॑द॒स्मभ्यं॑ सोम वि॒श्वतः॑ ।
आ प॑वस्व सह॒स्रिण॑म् ॥ २१ ॥
ये सोमा॑सः परा॒वति॒ ये अ॑र्वा॒वति॑ सुन्वि॒रे ।
ये वा॒दः श॑र्य॒णाव॑ति ॥ २२ ॥
य आ॑र्जी॒केषु॒ कृत्व॑सु॒ ये मध्ये॑ प॒स्त्यानाम् ।
ये वा॒ जने॑षु प॒ञ्चसु॑ ॥ २३ ॥

इषं तोकाय नः दधत् अस्मभ्यं सोम विश्वतः आ पवस्व सहस्रिणम् ॥ २१ ॥
ये सोमासः परावति ये अर्वावति सुन्विरे ये वादः शर्यणावति ॥ २२ ॥
ये आर्जीकेषु कृत्व सु ये मध्ये पस्त्यानां ये वा जनेषु पच सु ॥ २३ ॥

आमच्या पुत्रपौत्रांसाठीं आम्हांमध्ये उत्साह राखून, हे सोमा, तूं हजारों प्रकारचें सामर्थ्य आमच्याकडे सर्व बाजूंनीं वहात आण २१.


ते नो॑ वृ॒ष्टिं दि॒वस्परि॒ पव॑न्तां॒ आ सु॒वीर्य॑म् ।
सु॒वा॒ना दे॒वास॒ इन्द॑वः ॥ २४ ॥

ते नः वृष्टिं दिवः परि पवन्तां आ सु वीर्यं सुवानाः देवासः इन्दवः ॥ २४ ॥

जे सोमरस दूर देशांत, जे जवळच्या प्रदेशांत, तसेंच जे त्या शर्यणावतांत पिळले गेले; जे आर्जिक देशांत, कृत्व देशांत, आणि जे आपल्या सदनांत किंवा आपल्या पांच प्रकारच्या समाजांत पिळले गेले; ते देदीप्यमान आल्हादप्रद सोम पिळले गेले म्हणजे आकाशांतून पर्जन्यवृष्टि, आणि शरीरांत उत्कृष्ट शौर्य अशी देणगी आम्हांकडे वहात आणोत २२,२३,२४.


पव॑ते हर्य॒तो हरि॑र्गृणा॒नो ज॒मद॑ग्निना ।
हि॒न्वा॒नो गोरधि॑ त्व॒चि ॥ २५ ॥

पवते हर्यतः हरिः गृणानः जमत् अग्निना हिन्वानः गोः अधि त्वचि ॥ २५ ॥

देवप्रिय आणि हरिद्वर्ण असा सोम जमदग्नीनें स्तवन करून पिळला, तो गव्याच्या चामड्यावर ठेऊन घुसळल्यावर स्वच्छ प्रवाहानें वहातो २५.


प्र शु॒क्रासो॑ वयो॒जुवो॑ हिन्वा॒नासो॒ न सप्त॑यः ।
श्री॒णा॒ना अ॒प्सु मृ॑ञ्जत ॥ २६ ॥

प्र शुक्रासः वयः जुवः हिन्वानासः न सप्तयः श्रीणानाः अप् सु मृजत ॥ २६ ॥

शुभ्रतेजाचे, तारुण्याचा जोम आणणारे, आणि अश्वाप्रमाणें धांवणारे सोमरस उदकांत मिसळून स्वच्छ करा २६.


तं त्वा॑ सु॒तेष्व् आ॒भुवो॑ हिन्वि॒रे दे॒वता॑तये ।
स प॑वस्वा॒नया॑ रु॒चा ॥ २७ ॥

तं त्वा सुतेषु आभुवः हिन्विरे देव तातये सः पवस्व अनया रुचा ॥ २७ ॥

हे सोमा तुझा रस पिळून ऋत्विजांनीं देवसेवेला अर्पण केला आहे, तर ह्या अशाच तेजस्वितेनें तूं वहात रहा २७.


आ ते॒ दक्षं॑ मयो॒भुवं॒ वह्निं॑ अ॒द्या वृ॑णीमहे ।
पान्तं॒ आ पु॑रु॒स्पृह॑म् ॥ २८ ॥

आ ते दक्षं मयः भुवं वह्निं अद्य वृणीमहे पान्तं आ पुरु स्पृहम् ॥ २८ ॥

तुझ्या कल्याणकर, आणि दिव्यविभूतिंना घेऊन येणार्‍या चातुर्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोंत. तें चातुर्यबल भक्तरक्षक आहे, तें सर्वांनाच हवें हवेंसें वाटतें २८.


आ म॒न्द्रं आ वरे॑ण्यं॒ आ विप्रं॒ आ म॑नी॒षिण॑म् ।
पान्तं॒ आ पु॑रु॒स्पृह॑म् ॥ २९ ॥

आ मन्द्रं आ वरेण्यं आ विप्रं आ मनीषिणं पान्तं आ पुरु स्पृहम् ॥ २९ ॥

हर्षकारी, सर्वोत्कृष्ट, ज्ञानशील, मननीय, सर्वरक्षक आणि सर्वांना स्पृहणीय असें युक्तिबल आम्हीं तुजपाशीं हात जोडून मागत आहों २९.


आ र॒यिं आ सु॑चे॒तुनं॒ आ सु॑क्रतो त॒नूष्व् आ ।
पान्तं॒ आ पु॑रु॒स्पृह॑म् ॥ ३० ॥

आ रयिं आ सु चेतुनं आ सुक्रतो इतिसु क्रतो तनूषु आ पान्तं आ पुरु स्पृहम् ॥ ३० ॥

अक्षयधन, आणि चित्तबोधकज्ञान असें वरदान, हे सत्क्रियावान सोमा, आम्हीं विनत होऊन मागत आहों, तें आमच्या स्वतःचें संरक्षण करतें आणि सर्वांनाच स्पृहणीय वाटतें ३०.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ६६ (पवमान सोमसूक्त, अग्निसूक्त)

ऋषी - वैखानस ऋषिसमुदाय : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री, अनुष्टुप्


पव॑स्व विश्वचर्षणेऽ॒भि विश्वा॑नि॒ काव्या॑ ।
सखा॒ सखि॑भ्य॒ ईड्यः॑ ॥ १ ॥

पवस्व विश्व चर्षणे अभि विश्वानि काव्या सखा सखि भ्यः ईड्यः ॥ १ ॥

सर्वदर्शी सोमा, भक्तजनांच्या यच्चावत् कवनांना उद्देशून तूं आपला शुद्धप्रवाह वहात ठेव. तूं आम्हां भक्तांचा प्रशंसनीय मित्र आहेस १.


ताभ्यां॒ विश्व॑स्य राजसि॒ ये प॑वमान॒ धाम॑नी ।
प्र॒ती॒ची सो॑म त॒स्थतुः॑ ॥ २ ॥

ताभ्यं विश्वस्य राजसि ये पवमान धामनी इति प्रतीची इति सोम तस्थतुः ॥ २ ॥

तुझीं जीं दोन तेजस्वी स्वरूपें हे, सोमा, भक्तांच्या सन्मुखच राहिलीं आहेत त्यांच्या योगानें, हे पावना, तूं अखिल विश्वाचा अधिपति झाला आहेस २.


परि॒ धामा॑नि॒ यानि॑ ते॒ त्वं सो॑मासि वि॒श्वतः॑ ।
पव॑मान ऋ॒तुभिः॑ कवे ॥ ३ ॥

परि धामानि यानि ते त्वं सोम असि विश्वतः पवमान ऋतु भिः कवे ॥ ३ ॥

ह्याप्रमाणें तुझीं जीं जीं तेजोमय स्थानें असतात त्या स्थानांनी, हे पावना सोमा, हे काव्यज्ञा, तूं सर्व ऋतूंमध्यें व्यापून राहतोस ३.


पव॑स्व ज॒नय॒न्न् इषो॑ऽ॒भि विश्वा॑नि॒ वार्या॑ ।
सखा॒ सखि॑भ्य ऊ॒तये॑ ॥ ४ ॥

पवस्व जनयन् इषः अभि विश्वानि वार्या सखा सखि भ्यः ऊतये ॥ ४ ॥

भक्तांमध्यें मनोत्साह उत्पन्न करून, आणि सर्व उत्कृष्ट वस्तूंना अनुलक्षून तूं आपला शुद्धप्रवाह वहात ठेव; रक्षणाच्या कामीं तूं भक्तांचा प्रियमित्रच आहेस ४.


तव॑ शु॒क्रासो॑ अ॒र्चयो॑ दि॒वस्पृ॒ष्ठे वि त॑न्वते ।
प॒वित्रं॑ सोम॒ धाम॑भिः ॥ ५ ॥

तव शुक्रासः अर्चयः दिवः पृष्ठे वि तन्वते पवित्रं सोम धाम भिः ॥ ५ ॥

तुझ्या शुभ्रदीप्ति, द्युलोकाच्या पृष्ठभागावर आपल्या तेजःसमूहाच्या योगानें पवित्रच पसरून देत आहेत की काय असे वाटते. ५


तवे॒मे स॒प्त सिन्ध॑वः प्र॒शिषं॑ सोम सिस्रते ।
तुभ्यं॑ धावन्ति धे॒नवः॑ ॥ ६ ॥

तव इमे सप्त सिन्धवः प्र शिषं सोम सिस्रते तुभ्यं धावन्ति धेनवः ॥ ६ ॥

ह्या सप्तसिन्धूदेखील, हे सोमा, तुझ्या आज्ञेप्रमाणेंच वाहातात. धेनूहि तुझ्याचकडे धांव घेतात ६.


प्र सो॑म याहि॒ धार॑या सु॒त इन्द्रा॑य मत्स॒रः ।
दधा॑नो॒ अक्षि॑ति॒ श्रवः॑ ॥ ७ ॥

प्र सम याहि धारया सुतः इन्द्राय मत्सरः दधानः अक्षिति श्रवः ॥ ७ ॥

सोमा, तूं जो हर्षोत्कर्ष करणारा आहेस, त्या तुजला इंद्राप्रीत्यर्थ पिळलेला आहे तर आपल्या प्रवाहानें अविनाशी कीर्ति करून देवाकडे गमन कर ७.


सं उ॑ त्वा धी॒भिर॑स्वरन् हिन्व॒तीः स॒प्त जा॒मयः॑ ।
विप्रं॑ आ॒जा वि॒वस्व॑तः ॥ ८ ॥

सं ओं इति त्वा धीभिः अस्वरन् हिन्वतीः सप्त जामयः विप्रं आजा विवस्वतः ॥ ८ ॥

ह्या सात भगिनीनीं तुजला सूर्याच्या विस्तीर्ण अंगणांत संचार करण्याला सोडून दिलें, आणि तुज ज्ञानशीलाला उद्देशून अगदीं लय लावून मोठ्यानें आलाप घेतले ८.


मृ॒जन्ति॑ त्वा॒ सं अ॒ग्रुवो॑ऽव्ये जी॒राव् अधि॒ ष्वणि॑ ।
रे॒भो यद॒ज्यसे॒ वने॑ ॥ ९ ॥

मृजन्ति त्वा सं अग्रुवः अव्ये जीरौ अधि स्वनि रेभः यत् अज्यसे वने ॥ ९ ॥

खळखळाट उडवून देणारा तूं वनामध्यें जसा उदकानें भिजून जातोस, त्याच पद्धतीनें ह्या अंगुलि झरझर वहाणार्‍या तुज सोमाला नादयुक्त पवित्रावर गाळण्यावर ठेवून स्वच्छ करतात ९.


पव॑मानस्य ते कवे॒ वाजि॒न् सर्गा॑ असृक्षत ।
अर्व॑न्तो॒ न श्र॑व॒स्यवः॑ ॥ १० ॥

पवमानस्य ते कवे वाजिन् सर्गाः असृक्षत अर्वन्तः न श्रवस्यवः ॥ १० ॥

हे काव्यप्रिया, हे सत्वधीरा, महत्‌यशाची इच्छा धरणार्‍या अश्ववीराप्रमाणें तुझ्या पावनप्रवाहाच्या धारा चोहोंकडे धांवतात १०.


अच्छा॒ कोशं॑ मधु॒श्चुतं॒ असृ॑ग्रं॒ वारे॑ अ॒व्यये॑ ।
अवा॑वशन्त धी॒तयः॑ ॥ ११ ॥

अच्च कोशं मधु श्चुतं असृग्रं वारे अव्यये अवावशन्त धीतयः ॥ ११ ॥

मधुररसानें तोंडोतोंड भरलेला कलश लोंकरीच्या गाळण्यावर ओतला, त्या वेळेस भक्तांच्या ध्यानस्तुति उच्चस्वरांत चालू झाल्या ११.


अच्छा॑ समु॒द्रं इन्द॒वो॑ऽस्तं॒ गावो॒ न धे॒नवः॑ ।
अग्म॑न्न् ऋ॒तस्य॒ योनिं॒ आ ॥ १२ ॥

अच्च समुद्रं इन्दवः अस्तं गावः न धेनवः अग्मन् ऋतस्य योनिं आ ॥ १२ ॥

रविकिरण आणि धेनू आपआपल्या वसतिस्थानाकडे जातात, त्याप्रमाणें हे सोमरसबिंन्दु समुद्राकडे आणि सत्यधर्माच्या वसतिस्थानाकडे गेले १२.


प्र ण॑ इन्दो म॒हे रण॒ आपो॑ अर्षन्ति॒ सिन्ध॑वः ।
यद्गोभि॑र्वासयि॒ष्यसे॑ ॥ १३ ॥

प्र नः इन्दो इति महे रणे आपः अर्षन्ति सिन्धवः यत् गोभिः वासयिष्यसे ॥ १३ ॥

आल्हादप्रदा सोमा, जेव्हां गोदुग्धानें तूं आच्छादित होशील, त्या वेळेस श्रेष्ठ आनंदाचे पूर आणि नद्या आमच्याकडे धों धों वहात येतील १३.


अस्य॑ ते स॒ख्ये व॒यं इय॑क्षन्त॒स्त्वोत॑यः ।
इन्दो॑ सखि॒त्वं उ॑श्मसि ॥ १४ ॥

अस्य ते सख्ये वयं इयक्षन्तः त्वा ऊतयः इन्दो इति सखि त्वं उश्मसि ॥ १४ ॥

यज्ञ करण्याची इच्छा धरणारे, आणि हे सोमा, तूं रक्षण केलेले आम्हीं भक्तजन तुझ्या मित्रत्वाच्या आश्रयाला आहों; तुझ्या मित्रत्वाचीच आम्हांला लालसा आहे १४.


आ प॑वस्व॒ गवि॑ष्टये म॒हे सो॑म नृ॒चक्ष॑से ।
एन्द्र॑स्य ज॒ठरे॑ विश ॥ १५ ॥

आ पावस्व गो इष्टये महे सोम नृ चक्षसे आ इन्द्रस्य जठरे विश ॥ १५ ॥

प्रकाशधेनूंच्या प्राप्तीसाठीं, हे सोमा, सकल जनांना पाहणारा जो सर्वश्रेष्ठ इंद्र त्याच्याप्रीत्यर्थ शुद्धप्रवाहानें वहा, आणि इंद्राच्या उसरांत प्रवेश कर १५.


म॒हाँ अ॑सि सोम॒ ज्येष्ठ॑ उ॒ग्राणां॑ इन्द॒ ओजि॑ष्ठः ।
युध्वा॒ सञ् छश्व॑ज् जिगेथ ॥ १६ ॥

महान् असि सोम ज्येष्ठः उग्राणां इन्दो इति ओजिष्ठः युध्वा सन् शश्वत् जिगेथ ॥ १६ ॥

हे सोमा, तूं थोर वरिष्ठ आहेस; हे आल्हादप्रदा, तूं तीव्रपेयांत ओजस्वी आहेस; आणि सतत युद्ध चालवून तूं शत्रूंचीं धनें जिंकून घेतलीस १६.


य उ॒ग्रेभ्य॑श्चि॒दोजी॑या॒ञ् छूरे॑भ्यश्चि॒च् छूर॑तरः ।
भू॒रि॒दाभ्य॑श्चि॒न् मंही॑यान् ॥ १७ ॥

यः उग्रेभ्यः चित् ओजीयान् शूरेभ्यः चित् शूर तरः भूरि दाभ्यः चित् मंहीयान् ॥ १७ ॥

जे उग्र आहेत त्यांच्यापेक्षांहि तूं तेजस्वीच आहेस; कोणत्याहि शूरांपेक्षा देखील तूं अधिक शूर आहेस; आणि जे अतिशय दानशूर त्यांच्याहि पेक्षां तूं दानशूर आहेस १७.


त्वं सो॑म॒ सूर॒ एष॑स्तो॒कस्य॑ सा॒ता त॒नूना॑म् ।
वृ॒णी॒महे॑ स॒ख्याय॑ वृणी॒महे॒ युज्या॑य ॥ १८ ॥

त्वं सोम सूरः आ इषः तोकस्य साता तनूनां वृणीमहे सख्याय वृणीमहे युज्याय ॥ १८ ॥

हे सोमा, तूं आमचा अग्रेसर आहेस; उत्साह, संतति आणि उत्तम शरीर ह्यांच्या प्राप्तीकरितां आम्हीं तुझी प्रार्थना करतों; तुझ्या मित्रत्वासाठीं, तुझ्या सहवासासाठीं तुझी विनवणी करितों १८.


अग्न॒ आयूं॑षि पवस॒ आ सु॒वोर्जं॒ इषं॑ च नः ।
आ॒रे बा॑धस्व दु॒च्छुना॑म् ॥ १९ ॥

अग्ने आयूंषि पवसे आ सुव ऊर्जं इषं च नः आरे बाधस्व दुच्चुनाम् ॥ १९ ॥

हे अग्ने, तूं आमच्या आयुष्याचा प्रवाह वहात ठेव; ऊर्जस्विता आणि मनोत्साह ह्यांचा ओघ वहात ठेव; आणि दुष्टबुद्धीला आमच्यापासून दूर हांकून देऊन तिचा नायनाट कर १९.


अ॒ग्निरृषिः॒ पव॑मानः॒ पाञ्च॑जन्यः पु॒रोहि॑तः ।
तं ई॑महे महाग॒यम् ॥ २० ॥

अग्निः ऋषिः पवमानः पाच जन्यः पुरः हितः तं ईमहे महागयम् ॥ २० ॥

पतितपावन अग्नि हा पांचहि समाजांचा ऋषि आणि पुरोहित आहे, त्याच्यापाशीं आम्हीं महदैश्वर्य हात जोडून मागतों २०.


अग्ने॒ पव॑स्व॒ स्वपा॑ अ॒स्मे वर्चः॑ सु॒वीर्य॑म् ।
दध॑द्र॒यिं मयि॒ पोष॑म् ॥ २१ ॥

अग्ने पवस्व सु अपाः अस्मे इति वर्चः सु वीर्यं दधत् रयिं मयि पोषम् ॥ २१ ॥

हे अग्निदेवा, सत्क्रियावान् तूं आम्हांमध्यें वर्चस्व राखण्याची शक्ति आणि उत्कृष्ट शौर्य ठेऊन, मज भक्ताला ऐश्वर्य आणि समृद्धि देऊन पावन कर २१.


पव॑मानो॒ अति॒ स्रिधो॑ऽ॒भ्यर्षति सुष्टु॒तिम् ।
सूरो॒ न वि॒श्वद॑र्शतः ॥ २२ ॥

पवमानः अति स्रिधः अभि अर्षति सु स्तुतिं सूरः न विश्व दर्शतः ॥ २२ ॥

पावनप्रवाही सोम हा द्वेष्ट्यांना दूर पिटाळून देऊन आमच्या उत्तम स्तवनांकडे वहात येतो. तो सूर्याप्रमाणें सकल विश्वाचें निरीक्षण करणारा आहे २२.


स म॑र्मृजा॒न आ॒युभिः॒ प्रय॑स्वा॒न् प्रय॑से हि॒तः ।
इन्दु॒रत्यो॑ विचक्ष॒णः ॥ २३ ॥

सः मर्मृजानः आयु भिः प्रयस्वान् प्रयसे हितः इन्दुः अत्यः वि चक्षणः ॥ २३ ॥

तो ऋत्विजांनीं वारंवार गाळून स्वच्छ केलेला आहे. तो प्रसन्नचित्त असून देवाच्या प्रसन्नतेसाठींच पात्रांत ठेवला आहे. तो आल्हादप्रद, तीव्रगति आणि सूक्ष्मदृष्टि आहे २३.


पव॑मान ऋ॒तं बृ॒हच् छु॒क्रं ज्योति॑रजीजनत् ।
कृ॒ष्णा तमां॑सि॒ जङ्घ॑नत् ॥ २४ ॥

पवमानः ऋतं बृहत् शुक्रं ज्योतिः अजीजनत् कृष्णा तमांसि जङ्घनत् ॥ २४ ॥

पावनप्रवाह सोमानें काळ्याकुट्ट अन्धकाराचा समूळ नाश करून श्रेष्ठ असा न्यायनीतिधर्म आणि शुभ्रप्रकाश हे उत्पन्न केले २४.


पव॑मानस्य॒ जङ्घ्न॑तो॒ हरे॑श्च॒न्द्रा अ॑सृक्षत ।
जी॒रा अ॑जि॒रशो॑चिषः ॥ २५ ॥

पवमानस्य जङ्घ्नतः हरेः चन्द्राः असृक्षत जीराः अजिर शोचिषः ॥ २५ ॥

शुद्धप्रवाही, पातकांचा संहार करणारा, हरिद्वर्ण आणि चकचकाट उडवून देणारा जो सोम, त्याच्या शीतलकान्तिधारा पहा चोहोंकडे धांवूं लागल्या २५.


पव॑मानो र॒थीत॑मः शु॒भ्रेभिः॑ शु॒भ्रश॑स्तमः ।
हरि॑श्चन्द्रो म॒रुद्ग॑णः ॥ २६ ॥

पवमानः रथि तमः शुभ्रेभिः शुभ्रशः तमः हरि चन्द्रः मरुत् गणः ॥ २६ ॥

पावनप्रवाही सोम हा वीरश्रेष्ठ आहे. तो आपल्या शुभ्रतेजांनीं अतिशयच शुभ्र दिसतो; त्याचा हरिद्वर्ण आल्हादप्रद आहे, आणि मरुत्‌गण हे त्याचे सहायकर्ते होत २६.


पव॑मानो॒ व्य् अश्नवद्र॒श्मिभि॑र्वाज॒सात॑मः ।
दध॑त् स्तो॒त्रे सु॒वीर्य॑म् ॥ २७ ॥

पवमानः वि अश्नवत् रश्मि भिः वाज सातमः दधत् स्तोत्रे सु वीर्यम् ॥ २७ ॥

पावनप्रवाह सोम हा सत्वपरीक्षेंत सदैव विजयी होतो. तो भक्तांच्या ठिकाणीं उत्कृष्ट शौर्य ठेऊन आपल्या किरणांनीं सर्व व्यापून टाकतो. २७.


प्र सु॑वा॒न इन्दु॑रक्षाः प॒वित्रं॒ अत्य॒व्यय॑म् ।
पु॒ना॒न इन्दु॒रिन्द्रं॒ आ ॥ २८ ॥

प्र सुवानः इन्दुः अक्षारिति पवित्रं अति अव्ययं पुनानः इन्दुः इन्द्रं आ ॥ २८ ॥

आल्हादप्रद सोम हा पिळला तेव्हां त्याचा आल्हादप्रद रस लोंकरीच्या पवित्रांतून इंद्राप्रीत्यर्थ स्वच्छ प्रवाहानें पाझरला २८.


ए॒ष सोमो॒ अधि॑ त्व॒चि गवां॑ क्रीळ॒त्यद्रि॑भिः ।
इन्द्रं॒ मदा॑य॒ जोहु॑वत् ॥ २९ ॥

एषः सोमः अधि त्वचि गवां क्रीळति अद्रि भिः इन्द्रं मदाय जोहुवत् ॥ २९ ॥

हा सोम गव्याच्या चामड्यावर ठेवलेल्या फलकांवर ग्राव्यांशीं क्रीडाच करीत आहे कीं काय? त्यानें इंद्राला ह्रष्टचित्त करण्यासाठींच पाचारण केलें २९.


यस्य॑ ते द्यु॒म्नव॒त् पयः॒ पव॑मा॒नाभृ॑तं दि॒वः ।
तेन॑ नो मृळ जी॒वसे॑ ॥ ३० ॥

यस्य ते द्युम्न वत् पयः पवमान आभृतं दिवः तेन नः मृळ जीवसे ॥ ३० ॥

तुझें जें तेजस्वी रसदुग्ध आहे तें, पावनप्रवाहा सोमा, दिव्यलोकींहून आणलेंलें आहे. अशा त्या दुग्धानें आम्हीं जगावें म्हणून आमच्यावर अनुग्रह कर ३०.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ६७ (अनेक देवता सूक्त)

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य, कश्यप मारीच आणि इतर : देवता - पवमान सोम : छंद - गायत्री


त्वं सो॑मासि धार॒युर्म॒न्द्र ओजि॑ष्ठो अध्व॒रे ।
पव॑स्व मंह॒यद्र॑यिः ॥ १ ॥

त्वं सोम असि धारयुः मन्द्रः ओजिष्ठः अध्वरे पवस्व मंहयत् रयिः ॥ १ ॥

हे सोमा तूं धारावर्षाव करणारा आहेस. तूं तल्लीन करणारा, आणि अत्यंत ओजस्वी आहेस. तर दिव्यधनांची देणगी देणारा तूं आमच्या अध्वरयागांत स्वच्छ प्रवाहानें वहा १.


त्वं सु॒तो नृ॒माद॑नो दध॒न्वान् म॑त्स॒रिन्त॑मः ।
इन्द्रा॑य सू॒रिरन्ध॑सा ॥ २ ॥

त्वं सुतः नृ मादनः दधन्वान् मत्सरिन् तमः इन्द्राय सूरिः अन्धसा ॥ २ ॥

तूं पिळला गेलास म्हणजे शूरांना तल्लीन करणारा आणि सकलांचा आधार असतोस. आणि तूं आमचा अग्रेसर आपल्या पेयानें इंद्राला पाचारण करतोस २.


त्वं सु॑ष्वा॒णो अद्रि॑भिर॒भ्यर्ष॒ कनि॑क्रदत् ।
द्यु॒मन्तं॒ शुष्मं॑ उत्त॒मम् ॥ ३ ॥

त्वं सुस्वानः अद्रि भिः अभि अर्ष कनिक्रदत् द्यु मन्तं शुष्मं उत् तमम् ॥ ३ ॥

ग्राव्यांनीं मधुरशब्द केला आहे; तर तूं गर्जना करून तेजस्वी आणि उत्कृष्ट जोम आम्हांमध्यें आण. ३.


इन्दु॑र्हिन्वा॒नो अ॑र्षति ति॒रो वारा॑ण्य् अ॒व्यया॑ ।
हरि॒र्वाजं॑ अचिक्रदत् ॥ ४ ॥

इन्दुः हिन्वानः अर्षति तिरः वाराणि अव्यया हरिः वाजं अचिक्रदत् ॥ ४ ॥

आल्हादप्रद सोमाला हलवून सोडल्यानें तो वाहूं लागला. आणि लोंकरीच्या वस्त्रांतून पाझरतांना त्या सोमानें सत्वाढ्यतेची गर्जना केली ४.


इन्दो॒ व्य् अव्यं॑ अर्षसि॒ वि श्रवां॑सि॒ वि सौभ॑गा ।
वि वाजा॑न् सोम॒ गोम॑तः ॥ ५ ॥

इन्दो इति वि अव्यं अर्षसि वि श्रवांसि वि सौभगा वि वाजान् सोम गो मतः ॥ ५ ॥

हे आल्हादप्रदा, ऊर्णावस्त्रांतून पाझरतांना तूं सत्कीर्तीचा प्रवाह वाहवितोस, सद्‌भाग्याचा वाहवितोस, आणि हे सोमा, प्रकाशपूर्ण सत्वसामर्थ्याचाहि प्रवाह वाहवितोस ५.


आ न॑ इन्दो शत॒ग्विनं॑ र॒यिं गोम॑न्तं अ॒श्विन॑म् ।
भरा॑ सोम सह॒स्रिण॑म् ॥ ६ ॥

आ नः इन्दो इति शत ग्विनं रयिं गो मन्तं अश्विनं भर सोम सहस्रिणम् ॥ ६ ॥

आल्हादरूपा, गोसंपन्न आणि अश्वसंपन्न असें धन, हे सोमा, तूं शेंकडोंपट नव्हे तर हजारोंपटीनें आम्हांकडे घेऊन ये ६.


पव॑मानास॒ इन्द॑वस्ति॒रः प॒वित्रं॑ आ॒शवः॑ ।
इन्द्रं॒ यामे॑भिराशत ॥ ७ ॥

पवमानासः इन्दवः तिरः पवित्रं आशवः इन्द्रं यामेभिः आशत ॥ ७ ॥

आल्हादप्रद आणि त्वरितगति सोमरस, पवित्रांतून पलीकडे स्वच्छ प्रवाहानें वहाणारे रस, आपल्या गतीनें इंद्रापर्यंत पोहोंचले देखील. ७.


क॒कु॒हः सो॒म्यो रस॒ इन्दु॒रिन्द्रा॑य पू॒र्व्यः ।
आ॒युः प॑वत आ॒यवे॑ ॥ ८ ॥

ककुहः सोम्यः रसः इन्दुः इन्द्राय पूर्व्यः आयुः पवते आयवे ॥ ८ ॥

सर्वोन्नत, आणि पूर्वी प्रथमच पिळलेला सोमाचा आल्हादप्रद आणि आयुष्यवर्धक रस, विश्वायुष्य जो इंद्र त्याच्याप्रीत्यर्थ स्वच्छ प्रवाहानें वहात आहे ८.


हि॒न्वन्ति॒ सूरं॒ उस्र॑यः॒ पव॑मानं मधु॒श्चुत॑म् ।
अ॒भि गि॒रा सं अ॑स्वरन् ॥ ९ ॥

हिन्वन्ति सूरं उस्रयः पवमानं मधु श्चुतं अभि गिरा सं अस्वरन् ॥ ९ ॥

प्रकाशधेनू, सोमरूप सूर्याला, त्या मधुररसस्त्रावी पावनप्रवाह सोमाला, हलवून वहात सोडतात. त्यांनीं स्तुती करून त्याचें मधुरस्वरानें गुणगायनहि केलें आहे ९.


अ॒वि॒ता नो॑ अ॒जाश्वः॑ पू॒षा याम॑नि-यामनि ।
आ भ॑क्षत् क॒न्यासु नः ॥ १० ॥

अविता नः अज अश्वः पूषा यामनि यामनि आ भक्षत् कन्यासु नः ॥ १० ॥

अजवाहन, विश्वपोषक पूषा हा प्रत्येक प्रवासामध्यें आमचा रक्षणकर्ता असो. तो मुग्धबालिकांच्या समूहांत आम्हांस त्यांच्या प्रेमाचे अंशभागी करो १०.


अ॒यं सोमः॑ कप॒र्दिने॑ घृ॒तं न प॑वते॒ मधु॑ ।
आ भ॑क्षत् क॒न्यासु नः ॥ ११ ॥

अयं सोमः कपर्दिने घृतं न पवते मधु आ भक्षत् कन्यासु नः ॥ ११ ॥

हा सोम कपर्दधारी रुद्राप्रीत्यर्थ घृताप्रमाणें मधुररसाचा प्रवाह सोडतो, तो लावण्यवती बालिकांच्या समूहांत आम्हांस त्यांच्या अंशभागी करो ११.


अ॒यं त॑ आघृणे सु॒तो घृ॒तं न प॑वते॒ शुचि॑ ।
आ भ॑क्षत् क॒न्यासु नः ॥ १२ ॥

अयं ते आघृणे सुतः घृतं न पवते शुचि आ भक्षत् कन्यासु नः ॥ १२ ॥

तेजानें तळपणार्‍या विश्वपोषका पूषा, हा तुझ्यासाठीं पिळलेला स्वच्छ रस घृताप्रमाणें वहात आहे. तो कमनीय बालिकांच्या समूहांत आम्हांला त्यांच्या प्रेमाचे अंशभागी करो १२.


वा॒चो ज॒न्तुः क॑वी॒नां पव॑स्व सोम॒ धार॑या ।
दे॒वेषु॑ रत्न॒धा अ॑सि ॥ १३ ॥

वाचः जन्तुः कवीनां पवस्व सोम धारया देवेषु रत्न धाः असि ॥ १३ ॥

कवींच्या स्तुतींना प्रसविणार्‍या सोमा, तूं आपल्या धारेनें रसाचा शुद्धप्रवाह वहावयास लाव. सकल दिव्यविभूतीमध्यें अमूल्य रत्‍नें भक्तांना देणारा तूं आहेस १३.


आ क॒लशे॑षु धावति श्ये॒नो वर्म॒ वि गा॑हते ।
अ॒भि द्रोणा॒ कनि॑क्रदत् ॥ १४ ॥

आ कलशेषु धावति श्येनः वर्म वि गाहते अभि द्रोणा कनिक्रदत् ॥ १४ ॥

हा सोम कलशांमध्यें चोहोंबाजूंनीं धांवत वहातो, हा ससाणा आपल्या कवचांत शिरून बसतो, आणि मंजूळ शब्द करीत द्रोणपात्राच्या भोंवतीं फिरतो १४.


परि॒ प्र सो॑म ते॒ रसो॑ऽसर्जि क॒लशे॑ सु॒तः ।
श्ये॒नो न त॒क्तो अ॑र्षति ॥ १५ ॥

परि प्र सोम ते रसः असर्जि कलशे सुतः श्येनः न तक्तः अर्षति ॥ १५ ॥

सोमा, तुझा रस पिळून कलशामध्यें ओतला म्हणजे तो एकदम झडप घालणार्‍या ससाण्याप्रमाणें वहात जातो १५.


पव॑स्व सोम म॒न्दय॒न्न् इन्द्रा॑य॒ मधु॑मत्तमः ॥ १६ ॥

पवस्व सोम मन्दयन् इन्द्राय मधुमत् तमः ॥ १६ ॥

सोमा, तूं मन तल्लीन करून इंद्राप्रीत्यर्थ वहात रहा. तूं अत्यंत मधुर आहेस. १६.


असृ॑ग्रन् दे॒ववी॑तये वाज॒यन्तो॒ रथा॑ इव ॥ १७ ॥

असृग्रन् देव वीतये वाज यन्तः रथाः इव ॥ १७ ॥

तुझे रस देवसेवेसाठीं सत्वपराक्रम गाजविणार्‍या रथाप्रमाणें पुढें सरसावले १७.


ते सु॒तासो॑ म॒दिन्त॑माः शु॒क्रा वा॒युं अ॑सृक्षत ॥ १८ ॥

ते सुतासः मदिन् तमाः शुक्राः वायुं असृक्षत ॥ १८ ॥

आणि ते पिळून ठेवलेले अतिहर्षकर शुभ्रतेजस्वी सोमरस वायूकडे वेगानें चालते झाले १८.


ग्राव्णा॑ तु॒न्नो अ॒भिष्टु॑तः प॒वित्रं॑ सोम गच्छसि ।
दध॑त् स्तो॒त्रे सु॒वीर्य॑म् ॥ १९ ॥

ग्राव्णा तुन्नः अभि स्तुतः पवित्रं सोम गच्चसि दधत् स्तोत्रे सु वीर्यम् ॥ १९ ॥

तुजला ग्राव्यांनीं चुरून चांगला पिळला आणि प्रशंसा केली म्हणजे हे सोमा, तूं स्तोतृजनाच्या ठिकाणीं उत्कृष्ट शौर्य ठेऊन पवित्रांतून वहात जातोस १९.


ए॒ष तु॒न्नो अ॒भिष्टु॑तः प॒वित्रं॒ अति॑ गाहते ।
र॒क्षो॒हा वारं॑ अ॒व्यय॑म् ॥ २० ॥

एषः तुन्नः अभि स्तुतः पवित्रं अति गाहते रक्षः हा वारं अव्ययम् ॥ २० ॥

हा चुरलेला आणि सर्वांनीं प्रशंसा केलेला राक्षसांतक रस लोंकरीच्या केंसाळ गाळण्यांतून खालीं पात्रांत बुडी देऊन बसतो २०.


यदन्ति॒ यच् च॑ दूर॒के भ॒यं वि॒न्दति॒ मां इ॒ह ।
पव॑मान॒ वि तज् ज॑हि ॥ २१ ॥

यत् अन्ति यत् च दूरके भयं विन्दति मां इह पवमान वि तत् जहि ॥ २१ ॥

जें जें भय जवळून किंवा दुरून येथें मजवर कोसळूं पाहतें; तें तें हे पावनप्रवाहा, तूं नष्ट कर २१.


पव॑मानः॒ सो अ॒द्य नः॑ प॒वित्रे॑ण॒ विच॑र्षणिः ।
यः पो॒ता स पु॑नातु नः ॥ २२ ॥

पवमानः सः अद्य नः पवित्रेण वि चर्षणिः यः पोता सः पुनातु नः ॥ २२ ॥

आपल्या पवित्रतेंनें तो विश्वदर्शी सोम आज आम्हांकडे पावनप्रवाहानें वाहो. भक्तपावन जो सोम तो मला पवित्र करो २२.


यत् ते॑ प॒वित्रं॑ अ॒र्चिष्य् अग्ने॒ वित॑तं अ॒न्तरा ।
ब्रह्म॒ तेन॑ पुनीहि नः ॥ २३ ॥

यत् ते पवित्रं अर्चिषि अग्ने वि ततं अन्तः आ ब्रह्म तेन पुनीहि नः ॥ २३ ॥

अग्निदेवा तुझें जें पवित्र करणारें सामर्थ्य तुझ्या ज्वालेच्या आंत भरलेंलें आहे त्यानें आमचें ब्रह्मसाधन पवित्र कर २३.


यत् ते॑ प॒वित्रं॑ अर्चि॒वदग्ने॒ तेन॑ पुनीहि नः ।
ब्र॒ह्म॒स॒वैः पु॑नीहि नः ॥ २४ ॥

यत् ते पवित्रं अर्चि वत् अग्ने तेन पुनीहि नः ब्रह्म सवैः पुनीहि नः ॥ २४ ॥

जें तुझें पवित्र आणि ज्वालारूप सामर्थ्य आहे, त्यानें हे अग्निदेवा, आम्हांला पवित्र कर. प्रार्थनासूक्त आणि सोमसेवन ह्यांच्या योगाने आम्हाला पावन कर. २४


उ॒भाभ्यां॑ देव सवितः प॒वित्रे॑ण स॒वेन॑ च ।
मां पु॑नीहि वि॒श्वतः॑ ॥ २५ ॥

उभाभ्यां देव सवितः पवित्रेण सवेन च मां पुनीहि विश्वतः ॥ २५ ॥

जगत् निर्माण करणार्‍या देवा, तुझे पावन सामर्थ्य आणि सोमसवन ह्या उभयतांच्या योगानें मला सर्व प्रकारें पुनीत कर २५.


त्रि॒भिष् ट्वं दे॑व सवित॒र्वर्षि॑ष्ठैः सोम॒ धाम॑भिः ।
अग्ने॒ दक्षैः॑ पुनीहि नः ॥ २६ ॥

त्रि भिः त्वं देव सवितः वर्षिष्ठैः सोम धाम भिः अग्ने दक्षैः पुनीहि नः ॥ २६ ॥

जगत्‌प्रसवा देवा, हे सोमरूपा, तूं आपल्या तिन्ही अतिश्रेष्ठ सामर्थ्यपूर्ण तेजांनीं मला पवित्र कर. हे अग्निरूपा आपल्या कौशल्यबलांनीं आम्हांला शुद्ध कर २६.


पु॒नन्तु॒ मां दे॑वज॒नाः पु॒नन्तु॒ वस॑वो धि॒या ।
विश्वे॑ देवाः पुनी॒त मा॒ जात॑वेदः पुनी॒हि मा॑ ॥ २७ ॥

पुनन्तु मां देव जनाः पुनन्तु वसवः धिया विश्वे देवाः पुनीत मा जात वेदः पुनीहि मा ॥ २७ ॥

देवाचे जे सेवक, ते मला पवित्र करोत; दिव्यवसु आपल्या एकाग्रतेनें पवित्र करोत; दिव्यविबुधानों मला पावन करा; हे सर्वज्ञा अग्निदेवा, मला पवित्र कर २७.


प्र प्या॑यस्व॒ प्र स्य॑न्दस्व॒ सोम॒ विश्वे॑भिरं॒शुभिः॑ ।
दे॒वेभ्य॑ उत्त॒मं ह॒विः ॥ २८ ॥

प्र प्यायस्व प्र स्यन्दस्व सोम विश्वेभिः अंशु भिः देवेभ्यः उत् तमं हविः ॥ २८ ॥

तूं पुष्ट हो, आणि हे सोमा आपल्या सकल पल्लवानीं रसधारांचा ओघ वाहूं दे, आणि दिव्यविभूतिसाठीं उत्कृष्ट हविर्भागाचा प्रवाह सोड २८.


उप॑ प्रि॒यं पनि॑प्नतं॒ युवा॑नं आहुती॒वृध॑म् ।
अग॑न्म॒ बिभ्र॑तो॒ नमः॑ ॥ २९ ॥

उप प्रियं पनिप्नतं युवानं आहुति वृधं अगन्म बिभ्रतः नमः ॥ २९ ॥

प्रिय, अत्यंत प्रशंसनीय, आणि आहुतीना वृद्धिंगत करणारा युवक जो सोम त्याच्याकडे आम्हीं प्रणिपात करीत करीत प्राप्त झालों आहों २९.


अ॒लाय्य॑स्य पर॒शुर्न॑नाश॒ तं आ प॑वस्व देव सोम ।
आ॒खुं चि॑दे॒व दे॑व सोम ॥ ३० ॥

अलाय्यस्य परशुः ननाश तं आ पवस्व देव सोम आखुं चित् एव देव सोम ॥ ३० ॥

अलाय्याच्या फरशुनें दुष्टांचा नाश केला, तर देदीप्यमान सोमा, त्याच्याकरितां स्वच्छ प्रवाहानें वहा - दिव्य सोमा, जो उंदराप्रमाणें दुष्ट आहे त्यालाच तूं ठार कर ३०.


यः पा॑वमा॒नीर॒ध्येत्य् ऋषि॑भिः॒ सम्भृ॑तं॒ रस॑म् ।
सर्वं॒ स पू॒तं अ॑श्नाति स्वदि॒तं मा॑त॒रिश्व॑ना ॥ ३१ ॥

यः पावमानीः अधि एति ऋषि भिः सं भृतं रसं सर्वं सः पूतं अश्नाति स्वदितं मातरिश्वना ॥ ३१ ॥

ह्या पवित्र स्तुतींचें जो अध्ययन करतो, आणि ऋषींनीं संकलिक केलेल्या सुरस सूक्तांचें जो पठण करतो तो मातरिव्यानें मधुर केलेलें जें पवित्र फल, तें सर्व सेवन करितो ३१


पा॒व॒मा॒नीर्यो अ॒ध्येत्य् ऋषि॑भिः॒ सम्भृ॑तं॒ रस॑म् ।
तस्मै॒ सर॑स्वती दुहे क्षी॒रं स॒र्पिर्मधू॑द॒कम् ॥ ३२ ॥

पावमानीः यः अधि एति ऋषि भिः सं भृतं रसं तस्मै सरस्वती दुहे क्षीरं सर्पिः मधु उदकम् ॥ ३२ ॥

ह्या पवित्र स्तुतींचें जो अध्ययन करतो, ऋषींनीं संकलित केलेल्या सुरस सूक्तांचें जो पठण करतो, त्याच्यासाठीं सरस्वती ही, दुग्ध नवनीत मधु आणि स्वच्छ उदक ह्यांचा पान्हा सोडते ३२.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ६८ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - वत्सप्रि भालंदन : देवता - पवमान सोम : छंद - त्रिष्टुप्


प्र दे॒वं अच्छा॒ मधु॑मन्त॒ इन्द॒वो॑ऽसिष्यदन्त॒ गाव॒ आ न धे॒नवः॑ ।
ब॒र्हि॒षदो॑ वच॒नाव॑न्त॒ ऊध॑भिः परि॒स्रुतं॑ उ॒स्रिया॑ नि॒र्णिजं॑ धिरे ॥ १ ॥

प्र देवं अच्च मधु मन्तः इन्दवः असिस्यदन्त गावः आ न धेनवः
बर्हि सदः वचनावन्तः ऊध भिः परि स्रुतं उस्रियाः निः निजं धिरे ॥ १ ॥

दुग्ध देणार्‍या धेनूप्रमाणें मधुर रस स्त्रवणारे आल्हादप्रद सोमबिंदु देवाकडे वहात गेले आहेत. कुशासनावर ठेवलेले ते सोमरस स्तुतिवचनांनीं वाखाणलेले आहेत; त्यांच्याकरितां आपल्या कांसेंतून पाझरणार्‍या दुग्धाचें एक परिधानच जणों प्रकाशधेनूंनीं योजून ठेवलेंलें आहे १.


स रोरु॑वद॒भि पूर्वा॑ अचिक्रददुपा॒रुहः॑ श्र॒थय॑न् स्वादते॒ हरिः॑ ।
ति॒रः प॒वित्रं॑ परि॒यन्न् उ॒रु ज्रयो॒ नि शर्या॑णि दधते दे॒व आ वर॑म् ॥ २ ॥

सः रोरुवत् अभि पूर्वाः अचिक्रदत् उप आरुहः श्रथयन् स्वादते हरिः
तिरः पवित्रं परि यन् उरु ज्रयः नि शर्याणि दधते देवः आ वरम् ॥ २ ॥

तो निनादित झाला. भक्तांनीं प्रथम केलेल्या स्तुतींना अनुलक्षून त्यानें गर्जना केली; त्या हरिद्वर्ण सोमानें पालवी फुटलेल्या औषधीलतांना विशविशीत करून त्यांना स्वादिष्ट केलें. तशीच देदीप्यमान सोमानें आणखी एक गोष्ट उत्तम केली. ती ही कीं, पवित्रांतून पाझरून आपला जोम विस्तृत केला, आणि आपला चोथा मात्र शिल्लक ठेवला २.


वि यो म॒मे य॒म्या संय॒ती मदः॑ साकं॒वृधा॒ पय॑सा पिन्व॒दक्षि॑ता ।
म॒ही अ॑पा॒रे रज॑सी वि॒वेवि॑ददभि॒व्रज॒न्न् अक्षि॑तं॒ पाज॒ आ द॑दे ॥ ३ ॥

वि यः ममे यम्या संयती इतिसं यती मदः साकां वृधा पयसा पिन्वत् अक्षिता
मही इति अपारे इति रजसी इति वि वेविदत् अभि व्रजन् अक्षितं पाजः आ ददे ॥ ३ ॥

तसेंच, एकत्र राहिलेल्या आणि एकत्र वृद्धिंगत झालेल्या दोघींना ज्या हर्षकारी सोमानें मापून टाकलें, ज्यानें अक्षय द्यावापृथिवींना आपल्या रसानें भरून सोडलें, त्या सोमानें अपार अंतरालाहि स्पष्ट दृग्गोचर करून आणि त्यांना चोहोंकडून वेढून आपलें अविनाशी तेजोबल प्रदर्शित केलें ३.


स मा॒तरा॑ वि॒चर॑न् वा॒जय॑न्न् अ॒पः प्र मेधि॑रः स्व॒धया॑ पिन्वते प॒दम् ।
अं॒शुर्यवे॑न पिपिशे य॒तो नृभिः॒ सं जा॒मिभि॒र्नस॑ते॒ रक्ष॑ते॒ शिरः॑ ॥ ४ ॥

सः मातरा वि चरन् वाज यन् अपः प्र मेधिरः स्वधया पिन्वते पदं
अंशुः यवेन पिपिशे यतः नृ भिः सं जामि भिः नसते रक्षते शिरः ॥ ४ ॥

उभयतां जननींच्या जवळ जाऊन सत्कर्माला सत्वाचें पाठबळ देऊन प्रज्ञाशाली सोम आपल्या स्वाभविक सामर्थ्यानें स्वस्थान ओतप्रोत भरून सोडतो. त्याचा पल्लव यवधान्याशीं कुसकरला गेल्यानें एकरूप होतो, आणि शूर ऋत्विजांनीं आपल्या अंगुलीनीं त्याला पिळला तरी हल्लक झालेल्यांना टवटवी आणून तो त्यांचें रक्षण करतो ४.


सं दक्षे॑ण॒ मन॑सा जायते क॒विरृ॒तस्य॒ गर्भो॒ निहि॑तो य॒मा प॒रः ।
यूना॑ ह॒ सन्ता॑ प्रथ॒मं वि ज॑ज्ञतु॒र्गुहा॑ हि॒तं जनि॑म॒ नेमं॒ उद्य॑तम् ॥ ५ ॥

सं दक्षेण मनसा जायते कविः ऋतस्य गर्भः नि हितः यमा परः
यूना ह सन्ता प्रथमं वि जजतुः गुहा हितं जनिम नेमं उत् यतम् ॥ ५ ॥

कवि जन्माला येतो, तो चातुर्यशाली गुणांसहच जन्माला येतो. तोच सनातन नीतिधर्माचा अंकुर आहे; तो उभयलोकांपेक्षांहि श्रेष्ठ होय. हे उभयतां सर्वांच्या आधीं उत्पन्न झाले तरी अजून तरुणच आहेत; आणि त्यांची उत्पत्ति कशी झाली हें जरी गूढच आहे तरी त्या गूढाचा अर्धा भाग त्यांनीं स्पष्ट केला आहे ५.


म॒न्द्रस्य॑ रू॒पं वि॑विदुर्मनी॒षिणः॑ श्ये॒नो यदन्धो॒ अभ॑रत् परा॒वतः॑ ।
तं म॑र्जयन्त सु॒वृधं॑ न॒दीष्व् आँ उ॒शन्तं॑ अं॒शुं प॑रि॒यन्तं॑ ऋ॒ग्मिय॑म् ॥ ६ ॥

मन्द्रस्य रूपं विविदुः मनीषिणः श्येनः यत् अन्धः अभरत् परावतः
तं मर्जयन्त सु वृधं नदीषु आ उशन्तं अंशुं परि यन्तं ऋग्मियम् ॥ ६ ॥

जेव्हां श्येनानें दूरच्या स्वर्लोकांतून सोमवल्ली आणली, तेव्हांच त्या हर्षोत्फुल्लकर सोमाचें स्वरूप ज्ञानीजनांना कळलें. त्यांनीं समृद्धिप्रद, देवोत्सुक आणि व्यापनशील जो ऋक्स्तोत्रप्रिय सोम, त्याला नदीप्रवाहांत धुवून स्वच्छ केलें ६.


त्वां मृ॑जन्ति॒ दश॒ योष॑णः सु॒तं सोम॒ ऋषि॑भिर्म॒तिभि॑र्धी॒तिभि॑र्हि॒तम् ।
अव्यो॒ वारे॑भिरु॒त दे॒वहू॑तिभि॒र्नृभि॑र्य॒तो वाजं॒ आ द॑र्षि सा॒तये॑ ॥ ७ ॥

त्वां मृजन्ति दश योषणः सुतं सोम ऋषि भिः मति भिः धीति भिः हितं
अव्यः वारेभिः उत देवहूति भिः नृ भिः यतः वाजं आ दर्षि सातये ॥ ७ ॥

ऋषींनीं तुजला पिळून आपल्या एकाग्रबुद्धीनीं, ध्यानस्तुतींनीं, स्वस्थानीं ठेवलें म्हणजे हे सोमा, अंगुलिरूप ज्या दहा स्त्रिया त्या तुजला अलंकृत करतात; आणि ऋत्विजानीं देवाचा धांवा करून तुजला लोंकरीच्या वस्त्रांतून गाळून घेतलें म्हणजे भक्तांच्या विजयप्राप्तिसाठीं तूं आपलें सत्वसामर्थ्य प्रत्ययास आणतोस ७.


प॒रि॒प्र॒यन्तं॑ व॒य्यं सुषं॒सदं॒ सोमं॑ मनी॒षा अ॒भ्यनूषत॒ स्तुभः॑ ।
यो धार॑या॒ मधु॑माँ ऊ॒र्मिणा॑ दि॒व इय॑र्ति॒ वाचं॑ रयि॒षाळम॑र्त्यः ॥ ८ ॥

परि प्रयन्तं वय्यं सु संसदं सोमं मनीषाः अभि अनूषत स्तुभः
यः धारया मधु मान् ऊर्मिणा दिवः इयर्ति वाचं रयिषाट् अमर्त्यः ॥ ८ ॥

एकदम व्यापून टाकणारा, सर्वांना हवा हवासा वाटणारा आणि यथायोग्य स्थलीं आरूढ झालेल्या सोमाची, भक्तांनीं मनःपूर्वक गाईलेल्या पद्यांनीं प्रशंसा झाली. माधुर्ययुक्त सोम आपल्या धारेनें, आपल्या तरंगानें, दुलोकांतून भक्ताच्या वाणीला प्रेरणा करतो. तो दिव्यधनाचा नेता आहे ८.


अ॒यं दि॒व इ॑यर्ति॒ विश्वं॒ आ रजः॒ सोमः॑ पुना॒नः क॒लशे॑षु सीदति ।
अ॒द्भिर्गोभि॑र्मृज्यते॒ अद्रि॑भिः सु॒तः पु॑ना॒न इन्दु॒र्वरि॑वो विदत् प्रि॒यम् ॥ ९ ॥

अयं दिवः इयर्ति विश्वं आ रजः सोमः पुनानः कलशेषु सीदति
अत् भिः गोभिः मृज्यते अद्रि भिः सुतः पुनानः इन्दुः वरिवः विदत् प्रियम् ॥ ९ ॥

सोम हा द्युलोकांतून अखिल विश्वाला आणि रजोलोकाला चालना देतो, आणि स्वच्छ प्रवाहानें वाहून कलशांत सांठतो; उदकांनीं आणि गोदुग्धानें अलंकृत होतो, आणि ग्राव्यांनीं त्याला चुरून पिळलें म्हणजे तो आल्हादप्रद सोम, प्रिय आणि श्रेष्ठ असें जें सुख तें अर्पण करतो ९.


ए॒वा नः॑ सोम परिषि॒च्यमा॑नो॒ वयो॒ दध॑च् चि॒त्रत॑मं पवस्व ।
अ॒द्वे॒षे द्यावा॑पृथि॒वी हु॑वेम॒ देवा॑ ध॒त्त र॒यिं अ॒स्मे सु॒वीर॑म् ॥ १० ॥

एव नः सोम परि सिच्यमानः वयः दधत् चित्र तमं पवस्व
अद्वेषे द्यावापृथिवी इति हुवेम देवाः धत्त रयिं अस्मे इति सु वीरम् ॥ १० ॥

याप्रमाणें हे सोमा, तुजला पात्रांत ओतला आहे. तूं तारुण्याचा अद्‌भुत जोम भक्तांना देऊन स्वच्छ प्रवाहानें वहा. आम्हीं द्यावापृथिवींना पाचारण करतों; आणि दिव्यविभूतिनों, तुम्हीं उत्कृष्ट वीरानीं युक्त असें ऐश्वर्य आम्हांस अर्पण करा १०.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ६९ (पवमान सोमसूक्त)

ऋषी - हिरण्यस्तूप आंगिरस : देवता - पवमान सोम : छंद - त्रिष्टुप्


इषु॒र्न धन्व॒न् प्रति॑ धीयते म॒तिर्व॒त्सो न मा॒तुरुप॑ स॒र्ज्य् ऊध॑नि ।
उ॒रुधा॑रेव दुहे॒ अग्र॑ आय॒त्यस्य॑ व्र॒तेष्व् अपि॒ सोम॑ इष्यते ॥ १ ॥

इषुः न धन्वन् प्रति धीयते मतिः वत्सः न मातुः उप सर्जि ऊर्धनि
उरुधारा इव दुहे अग्रे आयती अस्य व्रतेषु अपि सोमः इष्यते ॥ १ ॥

धनुष्यापासून बाण सुटतो, किंवा धेनूच्या कांसेकडे वांसरूं सुटतें त्याप्रमाणें माझी प्रतिभा आतां ध्येयाकडे धांवून तेथें जडली आहे. विपुल दुग्धधारा सोडणार्‍या धेनूप्रमाणें ती प्रथम पुढें होऊन पान्हा सोडते; आणि याप्रमाणें ह्या इंद्राच्या यज्ञकर्मांत त्याला सोम अर्पण होतो १.


उपो॑ म॒तिः पृ॒च्यते॑ सि॒च्यते॒ मधु॑ म॒न्द्राज॑नी चोदते अ॒न्तरा॒सनि॑ ।
पव॑मानः संत॒निः प्र॑घ्न॒तां इ॑व॒ मधु॑मान् द्र॒प्सः परि॒ वारं॑ अर्षति ॥ २ ॥

उपो इति मतिः पृच्यते सिअयते मधु मन्द्र अजनी चोदते अन्तः आसनि
पवमानः सं तनिः प्रघ्नतां इव मधु मान् द्रप्सः परि वारं अर्षति ॥ २ ॥

आतां माझी मति तिकडेच रमली; मधुररसहि पाझरूं लागला; हर्षानें प्रोत्साहन पावलेली जिव्हा मुखाच्या आंत स्फुरण पावूं लागली; आणि मधुर सोमरस बिंदु, एकमेकांवर वार करणार्‍या योद्ध्‍यांच्या मालिकेप्रमाणें पवित्रांतून पात्रांत एका मागें एक असे टपटप गळूं लागले २.


अव्ये॑ वधू॒युः प॑वते॒ परि॑ त्व॒चि श्र॑थ्नी॒ते न॒प्तीरदि॑तेऋतं य॒ते ।
हरि॑रक्रान् यज॒तः सं॑य॒तो मदो॑ नृ॒म्णा शिशा॑नो महि॒षो न शो॑भते ॥ ३ ॥

अव्ये वधू युः पवते परि त्वचि श्रथ्नाईते नप्तीः अदितेः ऋतं यते
हरिः अक्रान् यजतः सं यतः मदः नृम्ना शिशानः महिषः न शोभते ॥ ३ ॥

वधूकरितां उत्सुक झालेला सोमरस पवित्राच्या आस्तरणांतून स्वच्छ प्रवाहानें वहातो; आणि अदितिमातेच्या नाती शोभणार्‍या ज्या औषधि त्यांना, नीतिधर्मशील भक्तासाठीं रसानें टचटचीत करतो. याप्रमाणें हरिद्वर्ण, पूज्य, सुयन्त्रित, देवाला ह्रष्ट करणारा आणि आपलें पौरुष गाजविणार सोम एखाद्या धिप्पाड वीराप्रमाणें शोभतो ३.


उ॒क्षा मि॑माति॒ प्रति॑ यन्ति धे॒नवो॑ दे॒वस्य॑ दे॒वीरुप॑ यन्ति निष्कृ॒तम् ।
अत्य॑क्रमी॒दर्जु॑नं॒ वारं॑ अ॒व्ययं॒ अत्कं॒ न नि॒क्तं परि॒ सोमो॑ अव्यत ॥ ४ ॥

उक्षा मिमाति प्रति यन्ति धेनवः देवस्य देवीः उप यन्ति निः कृतं
अति अक्रमीत् अर्जुनं वारं अव्ययं अत्कं न निक्तं परि सोमः अव्यत ॥ ४ ॥

सोमरूप वृषभ मोठ्यानें हंबारतो त्याबरोबर धेनू त्याच्याकडे धांवत येतात, आणि दिव्याङ्गना देवाच्या निवासस्थानाकडे जातात. तसेंच, शुभ्र ऊर्णावस्त्रांतून सोमरस वाहूं लागला म्हणजे त्यानें स्वच्छ घांसलेलें कवचच घातलें आहे कीं काय असें वाटतें ४.


अमृ॑क्तेन॒ रुश॑ता॒ वास॑सा॒ हरि॒रम॑र्त्यो निर्णिजा॒नः परि॑ व्यत ।
दि॒वस्पृ॒ष्ठं ब॒र्हणा॑ नि॒र्णिजे॑ कृतोप॒स्तर॑णं च॒म्वोर्नभ॒स्मय॑म् ॥ ५ ॥

अमृक्तेन रुशता वाससा हरिः अमर्त्यः निः निजानः परि व्यत
दिवः पृष्ठं बर्हणा निः निजे कृत उप स्तरणं चम्वोः नभस्मयम् ॥ ५ ॥

कोर्‍या करकरीत तेजोमय वस्त्राच्या योगानें ह्या अमर, निधूर्ताङ्ग, आणि हरिद्वर्ण सोमानें आपले शरीर आच्छादित केलें. त्यानें द्युलोकाचा पृष्ठभाग आपल्या पल्लवानें स्वच्छ धुतल्याप्रमाणें केला, आणि चमूपात्रासाठीं मेघवितान पसरून दिलें ५.


सूर्य॑स्येव र॒श्मयो॑ द्रावयि॒त्नवो॑ मत्स॒रासः॑ प्र॒सुपः॑ सा॒कं ई॑रते ।
तन्तुं॑ त॒तं परि॒ सर्गा॑स आ॒शवो॒ नेन्द्रा॑दृ॒ते प॑वते॒ धाम॒ किं च॒न ॥ ६ ॥

सूर्यस्य इव रश्मयः द्रवयित्नवः मत्सरासः प्र सुपः साकं ईरते
तन्तुं ततं परि सर्गासः आशवः न इन्द्रात् ऋते पवते धाम किं चन ॥ ६ ॥

सूर्याच्या किरणाप्रमाणें वेगवान आणि मनाला हर्षोत्फुल्ल आणि निद्रावश करणार्‍या सोमरसाचे तीव्रवेगी फवारे यज्ञरूपी वितत तंतूकडे एकदम येतात. कारण सोमरस इंद्राला सोडून इतर कोणत्याहि ठिकाणाकडे वहात नाहींत ६.


सिन्धो॑रिव प्रव॒णे नि॒म्न आ॒शवो॒ वृष॑च्युता॒ मदा॑सो गा॒तुं आ॑शत ।
शं नो॑ निवे॒शे द्वि॒पदे॒ चतु॑ष्पदेऽ॒स्मे वाजाः॑ सोम तिष्ठन्तु कृ॒ष्टयः॑ ॥ ७ ॥

सिन्धोः इव प्रवणे निम्ने आशवः वृष च्युताः मदासः गातुं आशत
शं नः नि वेशे द्वि पदे चतुः पदे अस्मे इति वाजाः सोम तिष्ठन्तु कृष्टयः ॥ ७ ॥

महानदीप्रमाणें उतरत्या ओघांत, किंवा खोल दरींत देखील वीर्यशाली भक्ताच्या हातून सांडलेल्या तीव्रवेगी आणि हर्षकारी रसाला इंद्राचा मार्ग सांपडला आहे, तर आमच्या निवासस्थानांत आमच्या मुलांमाणसांना आणि पशूंना तूं सुखरूप ठेव. हे सोमा, आमच्या अंगीं सत्वसामर्थ्य आणि आमच्या सहवासाला अनेक मनुष्यें राहोत ७.


आ नः॑ पवस्व॒ वसु॑म॒द्धिर॑ण्यव॒दश्वा॑व॒द्गोम॒द्यव॑मत् सु॒वीर्य॑म् ।
यू॒यं हि सो॑म पि॒तरो॒ मम॒ स्थन॑ दि॒वो मू॒र्धानः॒ प्रस्थि॑ता वय॒स्कृतः॑ ॥ ८ ॥

आ नः पवस्व वसु मत् हिरण्य वत् अश्व वत् गो मत् यव मत् सु वीर्यं
यूयं हि सोम पितरः मम स्थन दिवः मूर्धानः प्र स्थिताः वयः कृतः ॥ ८ ॥

वैभवप्रचुर सुवर्णप्रचुर, अश्वप्रचुर, गोधनप्रचुर, आणि धान्यप्रचुर अशा स्थितींत ठेवणार्‍या उत्कृष्ट शौर्याचा प्रवाह आमच्याकडे वाहूं दे. सोमरस हो, तुम्हींच आमचे पितर आहांत. तुम्हींच द्युलोकाचीं उत्तुङ्ग मस्तकें आहांत, आणि तारुण्याचा जोम आणण्याला समर्थ आहांत ८.


ए॒ते सोमाः॒ पव॑मानास॒ इन्द्रं॒ रथा॑ इव॒ प्र य॑युः सा॒तिं अच्छ॑ ।
सु॒ताः प॒वित्रं॒ अति॑ य॒न्त्यव्यं॑ हि॒त्वी व॒व्रिं ह॒रितो॑ वृ॒ष्टिं अच्छ॑ ॥ ९ ॥

एते सोमाः पवमानासः इन्द्रं रथाः इव प्र ययुः सातिं अच्च
सुताः पवित्रं अति यन्ति अव्यं हित्वी वव्रिं हरितः वृष्टिं अच्च ॥ ९ ॥

पावनप्रवाह सोम वरद इंद्राकडे रथाप्रमाणें त्वरित चालते झाले. ते हरिद्वर्ण सोमपल्लव पिळले म्हणजे ऊर्णावस्त्रांतून पात्रांत पाझरतात, आणि मेघावरण बाजूस फेंकून उदकवृष्टि करण्यास प्रवृत्त होतात ९.


इन्द॒व् इन्द्रा॑य बृह॒ते प॑वस्व सुमृळी॒को अ॑नव॒द्यो रि॒शादाः॑ ।
भरा॑ च॒न्द्राणि॑ गृण॒ते वसू॑नि दे॒वैर्द्या॑वापृथिवी॒ प्राव॑तं नः ॥ १० ॥

इन्दो इति इन्द्राय बृहते पवस्व सु मृळीकः अनवद्यः रिशादाः
भर चन्द्राणि गृणते वसूनि देवैः द्यावापृथिवी इति प्र अवतं नः ॥ १० ॥

आल्हादप्रदा सोमा, तूं वात्सल्यपूर्ण आणि कलंकरहित आहेस; शत्रुनाशन असा तूं त्या परमसमर्थ इंद्राप्रीत्यर्थ स्वच्छ प्रवाहानें वहा. चन्द्राप्रमाणें उल्लासप्रद ऐश्वर्ये स्तोतृजनासाठीं आण, आणि ह्या द्यावापृथिवी दिव्यविभूतींसह आम्हांवर कृपा करोत १०.


ऋग्वेद - मंडल ९ सूक्त ७० (पवमान सोमसूक्त)

ऋषी - रेणु वैश्वामित्र : देवता - पवमान सोम : छंद - जगती, त्रिष्टुप्


त्रिर॑स्मै स॒प्त धे॒नवो॑ दुदुह्रे स॒त्यां आ॒शिरं॑ पू॒र्व्ये व्योमनि ।
च॒त्वार्य् अ॒न्या भुव॑नानि नि॒र्णिजे॒ चारू॑णि चक्रे॒ यदृ॒तैरव॑र्धत ॥ १ ॥

त्रिः अस्मै सप्त धेनवः दुदुह्रे सत्यां आशिरं पूर्व्ये व्योमनि
चत्वारि अन्या भुवनानि निर्णिजे चारूणि चक्रे यत् ऋतैः अवर्धत ॥ १ ॥

एकवीस धेनूंनीं ह्या सोमासाठीं पूर्वेकडील आकाशांत सत्यरूप दुग्धसुधेचा पान्हा सोडला, आणि त्यानें दुसरी चार शोभिवंत भुवनें आपल्या अलंकृतिसाठीं निर्माण केलीं, त्याच वेळीं तो सनातन यज्ञधर्मानीं वृद्धिंगत झाला १.


स भिक्ष॑माणो अ॒मृत॑स्य॒ चारु॑ण उ॒भे द्यावा॒ काव्ये॑ना॒ वि श॑श्रथे ।
तेजि॑ष्ठा अ॒पो मं॒हना॒ परि॑ व्यत॒ यदी॑ दे॒वस्य॒ श्रव॑सा॒ सदो॑ वि॒दुः ॥ २ ॥

सः भिक्षमाणः अमृतस्य चारुणः उभे इति द्यावा काव्येन वि शश्रथे
तेजिष्ठाः अपः मंहना परि व्यत यदि देवस्य श्रवसा सदः विदुः ॥ २ ॥

रुचिर अमृताची याचना त्याच्यापाशीं भक्तांनीं केली तेव्हां त्याच्या प्रतिभेनें द्युलोक आणि भूलोक निरनिराळे व्यक्त झाले, त्यानें अत्यंत तेजःपुंज अशा दिव्योदकांना आपल्या महिम्यानें व्यापून टाकलें त्या वेळीं देवाच्याच गुणश्रवणानें त्याचें निवासस्थान भक्तांना विदित झालें २.


ते अ॑स्य सन्तु के॒तवो॑ऽमृत्य॒वो॑ऽदाभ्यासो ज॒नुषी॑ उ॒भे अनु॑ ।
येभि॑र्नृ॒म्णा च॑ दे॒व्या च पुन॒त आदिद्राजा॑नं म॒नना॑ अगृभ्णत ॥ ३ ॥

ते अस्य सन्तु केतवः अमृत्यवः अदाभ्यासः जनुषी इति उभे इति अनु
येभिः नृम्णा च देव्या च पुनते आत् इत् राजानं मननाः अगृभ्णत ॥ ३ ॥

ज्यांना मृत्यु नाहीं, ज्यांचा कोणीं घात करूं शकत नाहीं, असे जे त्याचे किरण ते द्युलोक आणि भूलोक ह्या दोन्ही लोकांना अनुकूल राहोत. त्या किरणांच्या योगानें मानवी आणि दिव्य सामर्थ्ये तो पवित्र करतो, आणि म्हणूनच मनःपूर्वक केलेल्या स्तुतींनीं विश्वाचा अधिपति म्हणून त्याचा आदर केला आहे ३.


स मृ॒ज्यमा॑नो द॒शभिः॑ सु॒कर्म॑भिः॒ प्र म॑ध्य॒मासु॑ मा॒तृषु॑ प्र॒मे सचा॑ ।
व्र॒तानि॑ पा॒नो अ॒मृत॑स्य॒ चारु॑ण उ॒भे नृ॒चक्षा॒ अनु॑ पश्यते॒ विशौ॑ ॥ ४ ॥

सः मृज्यमानः दश भिः सुकर्म भिः प्र मध्यमासु मातृषु प्र मे सचा
व्रतानि पानः अमृतस्य चारुणः उभे इति नृ चक्षाः अनु पश्यते विशौ ॥ ४ ॥

कर्मकुशल अशा दहा ऋत्विजांकडून तो अलंकृत होऊन अन्तराळांत मध्यभागीं असणार्‍या मेघरूप मातांमध्यें राहून सकल वस्तूंना व्यापून टाकण्याला उद्युक्त आहे, आणि सुरुचिर अमृताच्या प्राप्तीच्या मार्गांचा संरक्षक आणि वीरांचा निरीक्षक म्हणून मानव आणि दिव्य अशा दोन्ही लोकांचें तो सतत अवलोकन करतो ४.


स म॑र्मृजा॒न इ॑न्द्रि॒याय॒ धाय॑स॒ ओभे अ॒न्ता रोद॑सी हर्षते हि॒तः ।
वृषा॒ शुष्मे॑ण बाधते॒ वि दु॑र्म॒तीरा॒देदि॑शानः शर्य॒हेव॑ शु॒रुधः॑ ॥ ५ ॥

सः मर्मृजानः इन्द्रियाय धायसे आ उभे इति अन्तरिति रोदसी इति हर्षते हितः
वृषा शुष्मेण बाधते वि दुः मतीः आदेदिशानः शयर्हा इव शुरुधः ॥ ५ ॥

विश्वाचें धारण करणारें जें इंद्राचें सामर्थ्य त्याच्यासाठीं जेव्हां सोमरस स्वच्छ होऊन राहिला, तेव्हां द्युलोक आणि भूलोक ह्या दोहोंच्यामध्यें व्यापून राहिलेला भगवान् ह्रष्ट झाला. तो वीर्यशाली देव धडाक्यासरशीं दुरात्माचा नाश करतो, आणि शरसंधान करणार्‍या वीराप्रमाणें आपला नेम कोणावर धरला आहे तेंहि तो दाखवितो ५.


स मा॒तरा॒ न ददृ॑शान उ॒स्रियो॒ नान॑ददेति म॒रुतां॑ इव स्व॒नः ।
जा॒नन्न् ऋ॒तं प्र॑थ॒मं यत् स्वर्णरं॒ प्रश॑स्तये॒ कं अ॑वृणीत सु॒क्रतुः॑ ॥ ६ ॥

सः मातरा न ददृशानः उस्रियः नानदत् एति मरुतां इव स्वनः
जानन् ऋतं प्रथमं यत् स्वः नरं प्र शस्तये कं अवृणीत सु क्रतुः ॥ ६ ॥

मातांप्रमाणेंच प्रकाशधेनूंना अवलोकन करून मरुतांच्या निर्घोषाप्रमाणें गर्जना करीत करीत तो सर्वत्र संचार करतो. आद्य आणि दिव्यप्रकाशप्रापक जें सनातन सत्य तें जाणणारा महत्कार्यकर्ता जो सोम त्यानें तें सत्य सर्वांना सांगण्यासाठीं संतोषानें प्रसृत केलें ६.


रु॒वति॑ भी॒मो वृ॑ष॒भस्त॑वि॒ष्यया॒ शृङ्गे॒ शिशा॑नो॒ हरि॑णी विचक्ष॒णः ।
आ योनिं॒ सोमः॒ सुकृ॑तं॒ नि षी॑दति ग॒व्ययी॒ त्वग् भ॑वति नि॒र्णिग् अ॒व्ययी॑ ॥ ७ ॥

रुवति भीमः वृषभः तविष्यया शृङ्गेइति शिशानः हरिणी इति वि चक्षणः
आ योनिं सोमः सु कृतं नि सीदति गव्ययी त्वक् भवति निः निक् अव्ययी ॥ ७ ॥

तो भीषण वृषभ मोठ्यानें डुरकणी फोडतो, आणि आपला तडाका दाखविण्याच्या इर्षेनें तो विलक्षण धोरणी धुरीण आपलीं दोन्हीं हरित्‌वर्ण शिंगें पाजळून ठेवतो. याप्रमाणें सोम हा आपल्या अलंकृत स्थानीं आरूढ होतो, तेव्हां गव्याचें चर्म आणि मेंढ्याचें चर्म ह्यांनींच त्याचें आवरण होतें ७.


शुचिः॑ पुना॒नस्त॒न्वं अरे॒पसं॒ अव्ये॒ हरि॒र्न्य् अधाविष्ट॒ सान॑वि ।
जुष्टो॑ मि॒त्राय॒ वरु॑णाय वा॒यवे॑ त्रि॒धातु॒ मधु॑ क्रियते सु॒कर्म॑भिः ॥ ८ ॥

शुचिः पुनानः तन्वं अरेपसं अव्ये हरिः नि अधाविष्ट सानवि
जुष्टः मित्राय वरुणाय वायवे त्रि धातु मधु क्रियते सुकर्म भिः ॥ ८ ॥

स्वतः शुद्ध आणि दुसर्‍यालाहि पवित्र करणारा हरिद्वर्ण सोम आपलें निष्कलंक शरीर ऊर्णापवित्राच्या पृष्ठभागावर ठेवतो, तेव्हां त्या प्रसन्नचित्त सोमाचें, मित्र, वरुण आणि वायु यांच्याप्रीत्यर्थ कुशल ऋत्विजांच्या हातून तीन प्रकारचें पेय बनतें ८.


पव॑स्व सोम दे॒ववी॑तये॒ वृषेन्द्र॑स्य॒ हार्दि॑ सोम॒धानं॒ आ वि॑श ।
पु॒रा नो॑ बा॒धाद्दु॑रि॒ताति॑ पारय क्षेत्र॒विद्धि दिश॒ आहा॑ विपृच्छ॒ते ॥ ९ ॥

पवस्व सोम देव वीतये वृषा इन्द्रस्य हार्दि सोम धानं आ विश
पुरा नः बाधात् दुः इता अति पारय क्षेत्र वित् हि दिशः आह वि पृच्चते ॥ ९ ॥

हे सोमा वीर्यशाली असा तूं देवसेवेसाठीं स्वच्छ प्रवाहानें वहा; आणि तुज सोमाचें आगर म्हणजे इंद्राचें जें हृदय, त्यांत प्रवेश कर; आणि आम्हांला उपद्रव होण्यापूर्वींच आम्हांस संकटाच्या पार ने; कारण ज्याला एखाद्या प्रदेशाची माहिती असेल तोच मनुष्य वाट पुसणार्‍याला योग्य मार्ग दाखवील ९.


हि॒तो न सप्ति॑र॒भि वाजं॑ अ॒र्षेन्द्र॑स्येन्दो ज॒ठरं॒ आ प॑वस्व ।
ना॒वा न सिन्धुं॒ अति॑ पर्षि वि॒द्वाञ् छूरो॒ न युध्य॒न्न् अव॑ नो नि॒द स्पः॑ ॥ १० ॥

हितः न सप्तिः अभि वाजं अर्ष न्द्रस्य इन्दो इति जठरं आ पवस्व
नावा न सिन्धुं अति पर्षि विद्वान् शूरः न युध्यन् अव नः निदः स्परितिस्पः ॥ १० ॥

युद्धासाठीं उभा ठाकलेल्या अश्वाप्रमाणें तूं पुढें सरून सत्वाच्या झुंजाकडे वहात रहा. हे आल्हादप्रदा, तूं इंद्राच्या द्रोणकलशाकडे वहात रहा. तूं ज्ञानी आहेस. तर नावेच्या योगानें नदीपार जावें त्याप्रमाणें आम्हांला संकटांच्या पार ने. युद्धप्रवीण शूराप्रमाणें निन्दकांपासून आमचें रक्षण कर १०.


ॐ तत् सत्


GO TOP