|
ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त ३१ ते ४० ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ३१ ( ) ऋषी - देवता - छंद - यो यजा॑ति॒ यजा॑त॒ इत्सु॒नव॑च्च॒ पचा॑ति च । यः । यजाति । यजाते । इत् । सुनवत् । च । पचाति । च । जो यज्ञ करतो, किंवा नुसती उपासनाच करतो; जो सोमरस अर्पण करतो आणि पुरोडाश पक्व करतो तो ब्रह्मसुक्तांनी स्तवन करणारा भक्तच इन्द्राला प्रिय होतो. १. पु॒रो॒ळाशं॒ यो अ॑स्मै॒ सोमं॒ रर॑त आ॒शिर॑म् । पुरोळाशम् । यः । अस्मै । सोमम् । ररते । आऽशिरम् । जो ह्या इंद्राला परोडाश, सोमरस आणि दुग्धयुक्त हवि अर्पण करतो त्याचेंच पातकापासून रक्षण तो सर्वसमर्थ देव करतो. २. तस्य॑ द्यु॒माँ अ॑स॒द्रथो॑ दे॒वजू॑तः॒ स शू॑शुवत् । तस्य । द्युऽमान् । असत् । रथः । देवऽजूतः । सः । शूशुवत् । त्याचा रथ यशाने तेजस्वी होईल, त्याला दैवाकडून प्रेरणा मिळून तो सर्व शत्रूंना पादाक्रांत करून उत्कर्षाला पावेल. ३. अस्य॑ प्र॒जाव॑ती गृ॒हेऽस॑श्चन्ती दि॒वेदि॑वे । अस्य । प्रजाऽवती । गृहे । असश्चन्ती । दिवेऽदिवे । त्याच्याच गृहांत संततियुक्त, धेनुयुक्त, आणि सतत टिकणारी उत्साहसमृद्धि राहून त्याला प्रातेदिनी इच्छितदुग्ध देईल. ४. या दम्प॑ती॒ सम॑नसा सुनु॒त आ च॒ धाव॑तः । या । दम्पती इति दम्ऽपती । सऽमनसा । सुनुतः । आ । च । धावतः । जे पतिपत्नी अगदीं मनःपूर्वक सोमरस पिळून सिद्ध क्रतात, आणि हे देवांनों, तो रस निर्भेळ दुग्धहविशीं मिश्र करून गाळून स्वच्छ करतात; ५ प्रति॑ प्राश॒व्याँ॑ इतः स॒म्यङ्चा॑ ब॒र्हिरा॑शाते । प्रति । प्राशव्यान् । इतः । सम्यञ्चा । बर्हिः । आशाते इति । त्या उभयतांना उत्तम अन्न प्राप्त होतें; त्यांचा एक विचार निश्चल राहतो आणि यज्ञ शेवटास जातो. सत्वसामर्थ्यात त्यांना कधींच उणीव पडत नाहीं. ६ न दे॒वाना॒मपि॑ ह्नुतः सुम॒तिं न जु॑गुक्षतः । न । देवानाम् । अपि । ह्नुतः । सुऽमतिम् । न । जुघुक्षतः । ते देवांशी प्रतारणा करीत नाहींत किंवा त्यांचा प्रेमळपणा झाकूनही ठेवीत नाहीत. त्यामुळे ते फारच प्रख्यातीस पावतात. ७. पु॒त्रिणा॒ ता कु॑मा॒रिणा॒ विश्व॒मायु॒र्व्य॑श्नुतः । पुत्रिणा । ता । कुमारिणा । विश्वम् । आयुः । वि । अश्नुतः । ते उभयतां पुत्रयुक्त आणि कन्यायुक्त होऊन आणि सुवर्णाप्रमाणे अंगकांति राखून आपलें सर्व आयुष्य उत्तम रीतीनें उपभोगतात. ८. वी॒तिहो॑त्रा कृ॒तद्व॑सू दश॒स्यन्ता॒मृता॑य॒ कम् । वीतिऽहोत्रा । कृतद्वसू इति कृतत्ऽवसू । दशस्यन्ता । अमृताय । कम् । यज्ञ आणि देवाची स्तुति हेंच त्यांना प्रिय. ते आपल्या संपत्तीचा सदुपयोग करून अमर होण्यासाठी प्रार्थना अर्पण करतात. आणि मृदु केशांनी, म्हणजे पल्लवांनी, युक्त अशी सोमवल्लीची कांस पिळतात आणि देवांच्या ठिकाण निष्ठा ठेवतात. ९. आ शर्म॒ पर्व॑तानां वृणी॒महे॑ न॒दीना॑म् । आ । शर्म । पर्वतानाम् । वृणीमहे । नदीनाम् । पर्वतांचा आणि तसाच नद्यांचा सुखाश्रय आम्ही भक्तांजवळ नेहमी राहणारा जो विष्णु त्याच्यापाशीं मागत आहो. १०. ऐतु॑ पू॒षा र॒यिर्भगः॑ स्व॒स्ति स॑र्व॒धात॑मः । आ । एतु । पूषा । रयिः । भगः । स्वस्ति । सर्वऽधातमः । आम्हांकडे पूषा आगमन करो; तोच आमचे अविनाशी धन, तोच आमचे भाग्य, तोच मंगल आहे. तो आमचे सर्व मनोरथ अगदीं भरपूर पुरविणारा आहे. त्याचा मार्ग आमच्या कल्याणासाठी विस्तृतच आहे. ११. अ॒रम॑तिरन॒र्वणो॒ विश्वो॑ दे॒वस्य॒ मन॑सा । अरमतिः । अनर्वणः । विश्वः । देवस्य । मनसा । ज्याच्यावरू कोणीही हात उगारू शकत नाहीं असा अरमति विश्च, हा देवाला उचित अशा थोर मनानें आदित्यांमध्ये निष्कलंक आहे. १२. यथा॑ नो मि॒त्रो अ॑र्य॒मा वरु॑णः॒ सन्ति॑ गो॒पाः । यथा । नः । मित्रः । अर्यमा । वरुणः । सन्ति । गोपाः । आणि त्यामुळें मित्र, वरुण आणि अर्यमा हे आमचे रक्षण करणारे होतात; आणि सद्धर्माचा मार्ग सुगम होतो. १३. अ॒ग्निं वः॑ पू॒र्व्यं गि॒रा दे॒वमी॑ळे॒ वसू॑नाम् । अग्निम् । वः । पूर्व्यम् । गिरा । देवम् । ईळे । वसूनाम् । तुमचा जो सनातन अग्नि, जो उत्कृष्ट निधींचा देव, त्याचें आम्ही स्तुतींनी संकीर्तन करतो. सर्व लोकांना प्रिय आणि भक्ताच्या सत्तेचे क्षेत्र वाढविण्यांत मित्राप्रमाणे सहाय करणारा जो अग्नि त्याचें स्तवन करतो. १४. म॒क्षू दे॒वव॑तो॒ रथः॒ शूरो॑ वा पृ॒त्सु कासु॑ चित् । मक्षु । देवऽवतः । रथः । शूरः । वा । पृत्ऽसु । कासु । चित् । देवभक्ताचा रथ कितीतरी जलद धावतो. कितीही युद्धे होवोत, त्यांत तो भक्त शूरच ठरतो; कारण जो यज्ञकर्ता यजमान देवांचे मन प्रसन्न करण्यासाठी यजन करतो, तोच अधार्मिक दुष्टांवर जय मिळवितो. १५. न य॑जमान रिष्यसि॒ न सु॑न्वान॒ न दे॑वयो । न । यजमान । रिष्यसि । न । सुन्वान । न । देवयो इति देवऽयो । हे यजमाना, हे सोमार्पण करणाऱ्या देवोपासका, तुझी कधींही हानि होणार नाहीं. कारण जो यज्ञकर्ता यजमान देवाचे मन प्रसन्न करण्यासाठीं यज्ञ करतो, तोच अधार्मिक दुष्टांवर जय मिळवितो. १६. नकि॒ष्टं कर्म॑णा नश॒न्न प्र यो॑ष॒न्न यो॑षति । नकिः । तम् । कर्मणा । नशत् । न । प्र । योषत् । न । योषति । कर्तृत्वाने त्याच्या बरोबरीला कोणी येऊ शकत नाहीं; त्याला कोणी दूर लोटून देत नाहीं; आणि तोही कोणाला दूर लोटीत नाहीं. १७. अस॒दत्र॑ सु॒वीर्य॑मु॒त त्यदा॒श्वश्व्य॑म् । असत् । अत्र । सुऽवीर्यम् । उत । त्यत् । आशुऽअश्व्यम् । उत्कृष्ट वीर्यशालित्व त्याच्या ठिकाणी राहो आणि वेगवान् अश्वांचा समुदायही त्याच्याच जवळ असो. १८ ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ३२ ( ) ऋषी - देवता - छंद - प्र कृ॒तान्यृ॑जी॒षिणः॒ कण्वा॒ इन्द्र॑स्य॒ गाथ॑या । प्र । कृतानि । ऋजीषिणः । कण्वाः । इन्द्रस्य । गाथया । युद्धांत ध्रुमश्चक्री उडवून देणारा जो इन्द्र त्यानें सोमरसाच्या आवेशांत केलेले पराक्रम, हे कण्वकुलोत्पन्नांनो, तुम्हीं वर्णन करा. १. यः सृबि॑न्द॒मन॑र्शनिं॒ पिप्रुं॑ दा॒सम॑ही॒शुव॑म् । यः । सृबिन्दम् । अनर्शनिम् । पिप्रुम् । दासम् । अहीशुवम् । तो इन्द्र कसा तर ज्या भीषण वीरानें सृबिन्द, अनर्शनि, पिप्रु, आणि अहीशु ह्या दुरात्म्यांचा वध करून ज्ञानोदके खुली करून दिली. २. न्यर्बु॑दस्य वि॒ष्टपं॑ व॒र्ष्माणं॑ बृह॒तस्ति॑र । नि । अर्बुदस्य । विष्टपम् । वर्ष्माणम् । बृहतः । तिर । अवाढव्य देहाचा जो अर्बुद त्याचे धूड शरीर आणि त्याची गुढी ह्यांचा एकदमच पार धुव्वा उडवून दिला, तोही पराक्रम, हे इन्द्रा, तूंच केलास. ३ प्रति॑ श्रु॒ताय॑ वो धृ॒षत्तूर्णा॑शं॒ न गि॒रेरधि॑ । प्रति । श्रुताय । वः । धृषत् । तूर्णाशम् । न । गिरेः । अधि । पर्वतावरून खालीं कोसळणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे याचा धडाका, त्या सुंदर मुकुटधारी इन्द्राला, स्तुतिश्रवणासाठी, आणि तुमच्या रक्षणासाठी, आम्ही पाचारण करतो. ४. स गोरश्व॑स्य॒ वि व्र॒जं म॑न्दा॒नः सो॒म्येभ्यः॑ । सः । गोः । अश्वस्य । वि । व्रजम् । मन्दानः । सोम्येभ्यः । प्रकाशरूप गोधनें आणि उत्साहरूप असे ह्यांच्या आवाराची बंद कवाडे, हे वीरा, शत्रूने नगर हस्तगत करावे त्याप्रमाणें, तूं सोमरसाने हर्षनिर्भर होऊन खुली करतोस. ५ यदि॑ मे रा॒रणः॑ सु॒त उ॒क्थे वा॒ दध॑से॒ चनः॑ । यदि । मे । ररणः । सुते । उक्थे । वा । दधसे । चनः । जर मी, अर्पण केलेल्या सोमरसाकडे तुझे मन ओढत असेल, माझ्या सामगायनाची तुला आवड असेल, तर तुझ्या दैवी सुस्वभापास अनुसरून तूं आमच्याकडे ये. ६. व॒यं घा॑ ते॒ अपि॑ ष्मसि स्तो॒तार॑ इन्द्र गिर्वणः । वयम् । घ । ते । अपि । स्मसि । स्तोतारः । इन्द्र । गिर्वणः । पहा, आम्ही स्तोतृजन तुझे आहोंत; तर हे स्तुतिप्रिया देवा, हे सोमरसप्राशका इन्द्रा, आम्हांला प्रोत्साहन दे. ७. उ॒त नः॑ पि॒तुमा भ॑र संररा॒णो अवि॑क्षितम् । उत । नः । पितुम् । आ । भर । सम्ऽरराणः । अविऽक्षितम् । तूं प्रसन्न होऊन आम्हांला पुष्टि दे. तुला काय कमी ? हे भगवंता तुझे धन अपरिमित आहे. ८ उ॒त नो॒ गोम॑तस्कृधि॒ हिर॑ण्यवतो अ॒श्विनः॑ । उत । नः । गोऽमतः । कृधि । हिरण्यऽवतः । अश्विनः । आम्हांला गोधनवान संपत्तिमान् आणि अश्ववान् कर; म्हणजे सहजच आम्ही हविर्भागांनी यज्ञांची एकच गर्दी उडवून देऊं. ९. बृ॒बदु॑क्थं हवामहे सृ॒प्रक॑रस्नमू॒तये॑ । बृबत्ऽउक्थम् । हवामहे । सृप्रऽकरस्नम् । ऊतये । "बृवत्" साम हे नामांकित स्तोत्र - ज्याच्या प्रीत्यर्थ म्हणतात, ज्याचे हस्त भक्तसहायार्थ नेहमी पुढे सरसावलेच असतात त्या इन्द्राचा धांवा आम्ही संरक्षणाकरितां करीत आहो; आम्हावर कृपा करावी म्हणून त्या जगतहिंतकारी देवाला हांक मारीत आहो. १०. यः सं॒स्थे चि॑च्छ॒तक्र॑तु॒रादीं॑ कृ॒णोति॑ वृत्र॒हा । यः । सम्ऽस्थे । चित् । शतऽक्रतुः । आत् । ईम् । कृणोति । वृत्रऽहा । एकदा ठाण मांडलं म्हणजे "शतक्रतु" अथवा अनंत पराक्रम म्हणून जोआपले कर्तृत्वच गाजवितो, त्या वत्रनाशन इन्द्राजवळ अपार ऐश्वर्य भक्तांसाठीं साठविलेले आहे. ११. स नः॑ श॒क्रश्चि॒दा श॑क॒द्दान॑वाँ अन्तराभ॒रः । सः । नः । शक्रः । चित् । आ । शकत् । दानऽवान् । अन्तरऽआभरः । तो सर्वसमर्थ दातृश्रेष्ठ देव आम्हालाही समर्थ करील. कारण तो इन्द्रच आमच्यामध्ये जी जी उणीव असते ती भरुन काढतो. १२. यो रा॒यो॒३॒॑ऽवनि॑र्म॒हान्सु॑पा॒रः सु॑न्व॒तः सखा॑ । यः । रायः । अवनिः । महान् । सुऽपारः । सुन्वतः । सखा । तो अक्षय संपत्तिचा महासागर, भक्ततारक, सोमरस अर्पण करणाऱ्यांचा मित्र आहे, म्हणूनच इन्द्राचे गुणगायन करा. १३. आ॒य॒न्तारं॒ महि॑ स्थि॒रं पृत॑नासु श्रवो॒जित॑म् । आऽयन्तारम् । महि । स्थिरम् । पृतनासु । श्रवःऽजितम् । जो जगन्नियागक, युद्धामध्ये अगदीं ठाम उभ्स्स्, जो यशाचा विजयीवीर आणि ओजस्वितेनें सकलांचा प्रभु आहे त्याचें संकीर्तन करा. १४. नकि॑रस्य॒ शची॑नां निय॒न्ता सू॒नृता॑नाम् । नकिः । अस्य । शचीनाम् । निऽयन्ता । सूनृतानाम् । ह्याच्या शक्तीचे किंवा सौजन्याचे नियमन करण्याची कोणाचीहि प्राज्ञा नाही; आणि भक्तांना तो कांहीं देत नाहीं असेही कोणास म्हणतां येणार नाहीं. १५. न नू॒नं ब्र॒ह्मणा॑मृ॒णं प्रा॑शू॒नाम॑स्ति सुन्व॒ताम् । न । नूनम् । ब्रह्मणाम् । ऋणम् । प्राशूनाम् । अस्ति । सुन्वताम् । म्हणूनच ब्रह्मस्तुति करणारे, सोमरसाचा प्रसाद ग्रहण करणारे, आणि सोमरस पिळून सिद्ध करणारे जे भक्त आहेत त्यांचें देवाकडे कांहींच ऋण उरले नाहीं. किंवा त्यांनीं सोमरस निरर्थक प्राशन केला असेही कधी झाले नाहीं. १६. पन्य॒ इदुप॑ गायत॒ पन्य॑ उ॒क्थानि॑ शंसत । पन्ये । इत् । उप । गायत । पन्ये । उक्थानि । शंसत । स्तवनयोग्य जो इन्द्र त्याच्याच प्रीत्यर्थ कीर्तन करा, त्याच्याच गुणवर्णनपर सामगायनें म्हणा त्याच स्तवनीय इन्द्रा प्रीत्यर्थ ब्रह्म स्तवन म्हणा. १७. पन्य॒ आ द॑र्दिरच्छ॒ता स॒हस्रा॑ वा॒ज्यवृ॑तः । पन्यः । आ । दर्दिरत् । शता । सहस्रा । वाजी । अवृतः । ज्या स्तवनयोग्य इन्द्राने, ज्या सत्वसामर्थाढ्य आणि दुर्निवार देवाने शेंकडोच काय पण, सहस्रावधी शत्रूंच्या चिंधड्या उडवून दिल्या, तोच इन्द्र भक्तांचा उत्कर्ष करणारा आहे. १८ वि षू च॑र स्व॒धा अनु॑ कृष्टी॒नामन्वा॒हुवः॑ । वि । सु । चर । स्वधाः । अनु । कृष्टीनाम् । अनु । आऽहुवः । आपल्या दैवी स्वभावास अनुसरून आणि भक्तांच्या हांकेला धावून चोहींकडे संचार कर, आणि, हे इन्द्रा सोमरस प्राशन कर १९. पिब॒ स्वधै॑नवानामु॒त यस्तुग्र्ये॒ सचा॑ । पिब । स्वऽधैनवानाम् । उत । यः । तुग्र्ये । सचा । तो रस तुझ्या स्वर्गीय धेनूंच्याच दुधाचा आहे. तो प्राशन कर. जो 'तुग्र्य' भक्ताजवळ नेहमीच असतो, आणि जो केवळ तुझाच आहे असा हा सोमरस तूं प्राशन कर. २०. अती॑हि मन्युषा॒विणं॑ सुषु॒वांस॑मु॒पार॑णे । अति । इहि । मन्युऽसाविनम् । सुसुऽवांसम् । उपऽअरणे । जो मनुष्य रागांत असतांना सोमरस पिळतो, किंवा पातकांनी चिडमिडलेल्या ठिकाणी सोमाचे सवन करतो, त्याच्या सोमरसाचा त्याग कर, आणि आम्ही हा जो रस अर्पण केला आहे तो प्राशन कर. २१. इ॒हि ति॒स्रः प॑रा॒वत॑ इ॒हि पङ्च॒ जनाँ॒ अति॑ । इहि । तिस्रः । पराऽवतः । इहि । पञ्च । जनान् । अति । दूरच्या तिन्ही लोकांतून ये, पंचजनांपासून निघून इकडे हे. हे इन्द्रा, आम्ही मोठ्याने गर्जून मारलेल्या हाकांकडे लक्ष देऊन एकदम निघून ये. २२. सूर्यो॑ र॒श्मिं यथा॑ सृ॒जा त्वा॑ यच्छन्तु मे॒ गिरः॑ । सूर्यः । रश्मिम् । यथा । सृज । आ । त्वा । यच्छन्तु । मे । गिरः । सूर्य जसा किरणजाल फेकतो, त्याप्रमाणें आपल्या देणग्या आम्हांकडे फेक. खोल जागांकडे जशीं उदकें लोटतात त्याप्रमाणे आमच्या स्तुति तुजला चोहोंकडून घेरून इकडे घेऊन येवोत. २३. अध्व॑र्य॒वा तु हि षि॒ङ्च सोमं॑ वी॒राय॑ शि॒प्रिणे॑ । अध्वर्यो इति । आ । तु । हि । सिञ्च । सोमम् । वीराय । शिप्रिणे । हे अध्वर्यू तूं सोमरस पात्रांत ओत; त्या मुकुटधारी शूर इन्द्राकरितां, त्यानें सोमरस प्राशन करावा म्हणून तो घेऊन ये. २४. य उ॒द्नः फ॑लि॒गं भि॒नन्न्य१॒॑क्सिन्धूँ॑र॒वासृ॑जत् । यः । उद्नः । फलिऽगम् । भिनत् । न्यक् । सिन्धून् । अवऽअसृजत् । उदकाने टचटचीत फुगलेला मेघ ज्यानें फोडून टाकला; नद्यांना नीट खालीं सोडून दिलें, आणि धेनूंमध्ये पक्व आणि रुचकर दूध निर्माण केलें; २५. अह॑न्वृ॒त्रमृची॑षम और्णवा॒भम॑ही॒शुव॑म् । अहन् । वृत्रम् । ऋचीषमः । और्णऽवाभम् । अहीशुवम् । त्या झुंजार इन्द्राने वृत्र, और्णवाभ, अहीशु ह्या राक्षसांना ठार केलें आणि बर्फाच्या अणकुचीदार तुकडयानें अर्बुदाला भोसकून मारले. २६. प्र व॑ उ॒ग्राय॑ नि॒ष्टुरेऽषा॑ळ्हाय प्रस॒क्षिणे॑ । प्र । वः । उग्राय । निःऽतुरे । अषाळ्हाय । प्रऽसक्षिणे । तो शत्रूंना भयंकर वाटतो, तो झपाट्याने हल्ला चढविणारा आहे; तर अप्रतिहत, परंतु भक्तांच्या अगदीं जवळ उभा असा जो इन्द्र त्याच्या प्रीत्यर्थ त्यादेवाच्याच कृपेने सुचलेले स्तोत्र म्हणा. २७. यो विश्वा॑न्य॒भि व्र॒ता सोम॑स्य॒ मदे॒ अन्ध॑सः । यः । विश्वानि । अभि । व्रता । सोमस्य । मदे । अन्धसः । तो इन्द्र काय करतो म्हणाल तर सोमपेयाच्या हर्षावेगात देवांच्या ठिकाणी सर्व धर्मनियमांची जाणीव स्पष्टपणे उत्पन्न करतो. २८. इ॒ह त्या स॑ध॒माद्या॒ हरी॒ हिर॑ण्यकेश्या । इह । त्या । सधऽमाद्या । हरी इति । हिरण्यऽकेश्या । सोनेरी अयाळाचे, आणि त्याच्या बरोबरच हर्षोत्फुल्ल होणारे हरिद्वर्ण अश्व, त्याला त्या हृद्य अशा हविरन्नाकडे घेऊन येवोत. २९. अ॒र्वाङ्चं॑ त्वा पुरुष्टुत प्रि॒यमे॑धस्तुता॒ हरी॑ । अर्वाञ्चम् । त्वा । पुरुऽस्तुत । प्रियमेधऽस्तुता । हरी इति । हे सर्वविश्रुता इन्द्रा, प्रियमेधानें ज्यांचें वर्णन केलें आहे असे तुझे ते हरिद्वर्ण अश्व तुजला सोमप्राशनार्थ येथें घेऊन येवोत. ३०. ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ३३ ( ) ऋषी - देवता - छंद - व॒यं घ॑ त्वा सु॒ताव॑न्त॒ आपो॒ न वृ॒क्तब॑र्हिषः । वयम् । घ । त्वा । सुतऽवन्तः । आपः । न । वृक्तऽबर्हिषः । सोमरस पिळून कुशासन व्यमवस्थित ठेऊन, उदकप्रवाहाजवळ राहिल्याप्रमाणे, गाळण्यांतून वाहणाऱ्या सोरसाच्या प्रवाहाजवळ, हे वृत्रनाशना, आम्हीं भक्तजन तुली उपासना करीत आहोंत. १. स्वर॑न्ति त्वा सु॒ते नरो॒ वसो॑ निरे॒क उ॒क्थिनः॑ । स्वरन्ति । त्वा । सुते । नरः । वसो इति । निरेके । उक्थिनः । सोमरस पिळून सिद्ध होतांच शूर भक्तजन तुझा जयघोष करतात; हे कल्याणनिधे देवा, सामगायकही निर्गमनप्रसंगीं तसेंच करतात; तर मोठा आवेशी वृषभ जसा घराकडे धावतो त्याप्रमाणे हे इन्द्रा, सोमरसाकरितां तृषित होऊन तूं आमच्या गृहाकडे केव्हा बरे येशील ? २. कण्वे॑भिर्धृष्ण॒वा धृ॒षद्वाजं॑ दर्षि सह॒स्रिण॑म् । कण्वेभिः । धृष्णो इति । आ । धृषत् । वाजम् । दर्षि । सहस्रिणम् । हे धैर्यसागरा, कष्यकुलोत्पन्नांसह तूं मोठ्या धडाक्याने जें सत्वसामर्थ्य प्रकट केलेस, तें हजारों प्रकारचे, सुवर्णप्रभावी आणि गोधनयुक्त सामर्थ्य आम्हांला त्वरित मिळावे असें आम्ही हात जोडून तुजाला विनवीत आहों. ३. पा॒हि गायान्ध॑सो॒ मद॒ इन्द्रा॑य मेध्यातिथे । पाहि । गाय । अन्धसः । मदे । इन्द्राय । मेध्यऽअतिथे । तूं सोमरम प्राशन कर; आणि हे मेधातिथे, मधुरपेयाच्या हर्षांत तूं इन्द्राप्रीत्यर्थ गायन कर. तो इन्द्र असा आहे कीं, सोमरस पिळून सिद्ध होतांच, आपल्या हरिद्वर्ण अश्वांशी तो वज्रधारी इन्द्र आपला सुवर्णरथ जोडून देतो. ४. यः सु॑ष॒व्यः सु॒दक्षि॑ण इ॒नो यः सु॒क्रतु॑र्गृ॒णे । यः । सुऽसव्यः । सुऽदक्षिणः । इनः । यः । सुऽक्रतुः । गृणे । याचा डावा हात उत्तम, आणि तसा उजवाही उत्कृष्टच आहे, जो महत्कार्यकर्ता ईश्वर आहे त्याचें मी गुणानवाद गातो; जो असंख्य गुणांची खाण, ज्याचे दातृत्व अपरिमित, जो शत्रुनगरे छिन्नभिन्न करतो, तोच सर्वांनी स्तविलेला आहे. ५. यो धृ॑षि॒तो योऽवृ॑तो॒ यो अस्ति॒ श्मश्रु॑षु श्रि॒तः । यः । धृषितः । यः । अवृतः । यः । अस्ति । श्मश्रुषु । श्रितः । जो एकदम युद्धाची धुमाळी उडवितो, जो दुनिवार आहे, जो दाढीभिशावाल्या शत्रुसमूहात बिनदिक्कत घुसतो; ज्याचे तेजोवैभव अफाट; जो शत्रूंना अडवून पाडतो, आणि आपल्या कर्तृत्वाने जो सर्वथैव स्तुत्य आहे तो इन्द्र, कसून प्रयत्न करणाऱ्या भक्तांना कामधेनूप्रमाणे होतो. ६. क ईं॑ वेद सु॒ते सचा॒ पिब॑न्तं॒ कद्वयो॑ दधे । कः । ईम् । वेद । सुते । सचा । पिबन्तम् । कत् । वयः । दधे । सोमरस पिळून सिद्ध झाला म्हणजे इन्द्र तो रस केव्हां प्राशन करतो, आणि त्या वेळेस उत्साहपूर्ण असें तारुण्य कसें देतो हें कोणी तरी जाणतो काय ? तथापि सोमपेयाच्या हर्षाने तो मुकुधारी इन्द्र आपल्या ओजस्वितेने शत्रूच्या नगरांचा विध्वंस करतो तोच हा आहे येवढें खास. ७. दा॒ना मृ॒गो न वा॑र॒णः पु॑रु॒त्रा च॒रथं॑ दधे । दाना । मृगः । न । वारणः । पुरुऽत्रा । चरथम् । दधे । मदाने अनिवार झालेल्या हत्तीप्रमाणे इन्द्र हा सर्वत्र संचार करतो, हे इन्द्रा तुजला कोणीही आवरून धरू शकत नाही, तरी आम्ही सोमरस सिद्ध केला आहे तिकडे आगमन कर. तूं परमथोर आहेस. आपल्या ओजद्वितेच्या योगाने पाहिजे तिकडे जाशील. ८. य उ॒ग्रः सन्ननि॑ष्टृतः स्थि॒रो रणा॑य॒ संस्कृ॑तः । यः । उग्रः । सन् । अनिऽस्तृतः । स्थिरः । रणाय । संस्कृतः । जो शत्रुभयंकर आहे असा हा इन्द्र एकदां युद्धाला उद्युक्त झाला म्हणजे त्याला कोणीही मागे परतवूं शकत नाही; पण भक्तांचा धांवा जर तो ऐकेल तर त्याला टाकून मात्र तो जाणार नाही; खास येईलच. ९ स॒त्यमि॒त्था वृषेद॑सि॒ वृष॑जूति॒र्नोऽवृ॑तः । सत्यम् । इत्था । वृषा । इत् । असि । वृषऽजूतिः । नः । अवृतः । अगदीं खरोखर तूंच वीर्यशाली आहेस; म्हणून आमचाही वीरोत्साह अनिवार होतो. हे शत्रुभयंकरा, तूं वीर दूरच्या लोकीं जसा प्रख्यात तसाच ह्या भूलोकींही तूं वीर म्हणूनच विख्यात आहेस. १०. वृष॑णस्ते अ॒भीश॑वो॒ वृषा॒ कशा॑ हिर॒ण्ययी॑ । वृषणः । ते । अभीशवः । वृषा । कशा । हिरण्ययी । तुझ्या अश्वांचा लगाम वीराला शोभण्यासारखा भक्कम आहे, तुझा सोन्याचा चाबूकही वीरोचितच आहे; हे भगवंता, तुझा रथ देखील वीराला साजेल असा आहे, तुझे अश्व वीर्यशाली आहेत, आणि हे अनंतप्रज्ञा, तूं तर वीर्यशाली आहेसच. ११. वृषा॒ सोता॑ सुनोतु ते॒ वृष॑न्नृजीपि॒न्ना भ॑र । वृषा । सोता । सुनोतु । ते । वृषन् । ऋजीपिन् । आ । भर । तुझा वीर्यशाली भक्तच तुझ्याप्रीत्यर्थ सोमरस सिद्ध करो; तीव्र आवेगी वीरा, तो तूं इकडे आण. हरिद्वर्ण अश्वांवर आरूढ होणाऱ्या इन्द्रा, जो वीर्यशाली असेल तोच तुझ्याप्रीत्यर्थ सोमाला नदीमधे धुण्यासाठी धारण करूं शकेल. १२ एन्द्र॑ याहि पी॒तये॒ मधु॑ शविष्ठ सो॒म्यम् । आ । इन्द्र । याहि । पीतये । मधु । शविष्ठ । सोम्यम् । हे इन्द्रा, हें अत्युत्कटबलढ्या, हा मधुर सोमरस प्राशन करण्याकरिता आगमन कर. भगवान् इन्द्र, सत्पराक्रमी इन्द्र हा, भक्तांच्या स्तुति, त्यांची स्तोत्रे, आणि सामगायनें अगदींच ऐकून घेणार नाहीं काय ? १३. वह॑न्तु त्वा रथे॒ष्ठामा हर॑यो रथ॒युजः॑ । वहन्तु । त्वा । रथेऽस्थाम् । आ । हरयः । रथऽयुजः । तुज रथारूढ प्रभूला तुझे रथाला जोडलेले हरिद्वर्ण अश्व येथें आणोत. हे वृत्रनाशना, अनंतप्रज्ञा देवा, इतर लोकांच्या सोमसवनांच्या समारंभांतूनही तुजला ते इकडे आणोत. १४. अ॒स्माक॑म॒द्यान्त॑मं॒ स्तोमं॑ धिष्व महामह । अस्माकम् । अद्य । अन्तमम् । स्तोमम् । धिष्व । महाऽमह । आज आमच्या स्तवनाला तूं आपल्या अगदीं अन्तःकरणांत साठवून ठेव. हे परमपूज्य देवा, आमची सोमसवनें तुजला अत्यानंदप्रद होवोत, हे आकाशस्थ देवा, हे सोमप्रिया, तीं तुजला तल्लीन करोत. १५. न॒हि षस्तव॒ नो मम॑ शा॒स्त्रे अ॒न्यस्य॒ रण्य॑ति । नहि । सः । तव । नः । मम । शास्त्रे । अन्यस्य । रण्यति । ज्या वीराने, ज्या देवाने, आम्हांला जगांत आणले तो ना तुझ्या धोरणाने चालणार, ना माझ्या चालणार, ना दुसऱ्या कोणाच्या आज्ञेत चालणार. तो स्वतःच्याच मनाप्रमाणे वागणार. १६. इन्द्र॑श्चिद्घा॒ तद॑ब्रवीत्स्त्रि॒या अ॑शा॒स्यं मनः॑ । इन्द्रः । चित् । घ । तत् । अब्रवीत् । स्त्रियाः । अशास्यम् । मनः । हेही पण इन्द्रानें सांगितलें आहे कीं स्त्रियांचें मन कोणाच्याही ताब्यांत राहणारे नाहीं. पण त्यांचें सामर्थ्य म्हणाल तर तें मात्र अल्प आहे. १७. सप्ती॑ चिद्घा मद॒च्युता॑ मिथु॒ना व॑हतो॒ रथ॑म् । सप्ती इति । चित् । घ । मदऽच्युता । मिथुना । वहतः । रथम् । ही पहा दोन मदमस्त अश्वांची जोडी इन्द्राचा रथ इकडेच आणित आहेत, आणि म्हणूनच त्या वीराच्या रथाची धुरा सर्वांपेक्षा उत्कृष्ट ठरली. १८. अ॒धः प॑श्यस्व॒ मोपरि॑ संत॒रां पा॑द॒कौ ह॑र । अधः । पश्यस्व । मा । उपरि । सम्ऽतराम् । पादकौ । हर । खाली पहा. वर दृष्टि करू नको; आपले दोन्ही पाय चांगले नीट जुळवून घे. आपले नितंब भाग दिसू देऊं नको. लक्षात ठेव कीं तूं स्त्री आहेस, पण या यज्ञांत मात्र ब्रह्मा झाली आहेस. १९. ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ३४ ( ) ऋषी - देवता - छंद - एन्द्र॑ याहि॒ हरि॑भि॒रुप॒ कण्व॑स्य सुष्टु॒तिम् । आ । इन्द्र । याहि । हरिऽभिः । उप । कण्वस्य । सुऽस्तुतिम् । इन्द्रा, आपल्या हरिद्वर्ण अश्वासह कण्वकुलोत्पन्नांच्या उत्तम स्तुतीकडे आगमन कर आणि ज्या ह्या दिव्य आकाशलोकावर तूं अधिकार चालवतोस त्या दिव्यलोकी हे दिव्यवैभवा, तूं नंतर गमन कर १. आ त्वा॒ ग्रावा॒ वद॑न्नि॒ह सो॒मी घोषे॑ण यच्छतु । आ । त्वा । ग्रावा । वदन् । इह । सोमी । घोषेण । यच्छतु । हा सोमग्रावा मधुर शब्द करून आपल्या ध्वनीनेच तुजला येथें घेऊन येवो आणि त्यानंतर हे दिव्यवैभवा, तूं गमन कर. २. अत्रा॒ वि ने॒मिरे॑षा॒मुरां॒ न धू॑नुते॒ वृकः॑ । अत्र । वि । नेमिः । एषाम् । उराम् । न । धूनुते । वृकः । लांडग्यापुढे मेंढीचा थरकाप व्हावा त्याप्रमाणें येथें यज्ञमण्डपांत ह्या ग्राव्यांचा टणक कंगोरा सोमवल्लीला चळचळ कापावयास लावीत आहे, तर येथें ये, आणि नंतर ' हे दिव्यवैभवा तूं गमन कर. ३. आ त्वा॒ कण्वा॑ इ॒हाव॑से॒ हव॑न्ते॒ वाज॑सातये । आ । त्वा । कण्वाः । इह । अवसे । हवन्ते । वाजऽसातये । कण्वकुलोत्पन्न भक्त, त्यांच्यावर तूं कृपा करावीस म्हणून आणि त्यांना सत्वसामर्थ्य प्राप्त व्हावें म्हणून तुजला येथें पाचारण करीत आहेत; तर तूं ये, आणि नंतर हे दिव्यवैभवा तूं गमन कर. ४. दधा॑मि ते सु॒तानां॒ वृष्णे॒ न पू॑र्व॒पाय्य॑म् । दधामि । ते । सुतानाम् । वृष्णे । न । पूर्वऽपाय्यम् । पेय हें वीराला प्रथम अर्पण करावे त्याप्रमाणें मीं हे सोमरस तुझ्या पुढें ठेवीत आहे; तर ये, आणि नंतर.. .हे दिव्यवैभवा, तूं गमन कर. ५. स्मत्पु॑रंधिर्न॒ आ ग॑हि वि॒श्वतो॑धीर्न ऊ॒तये॑ । स्मत्ऽपुरन्धिः । नः । आ । गहि । विश्वतःऽधीः । नः । ऊतये । हे महाप्राज्ञा, आमच्याकडे आगमन कर; तूं विश्वबुद्धि आहेस, तर आमच्या सहायास्तव ये, आणि नंतर.. .हे दिव्यवैभवा, तूं गमन कर. ६. आ नो॑ याहि महेमते॒ सह॑स्रोते॒ शता॑मघ । आ । नः । याहि । महेऽमते । सहस्रऽऊते । शतऽमघ । हे महामननीया, हें असंख्यसहाया, हे अगणितदातृत्वा, आमच्याकडे आगमन कर, आणि नंतर... हे दिव्यवैभवा, तूं गमन कर. ७. आ त्वा॒ होता॒ मनु॑र्हितो देव॒त्रा व॑क्ष॒दीड्यः॑ । आ । त्वा । होता । मनुःऽहितः । देवऽत्रा । वक्षत् । ईड्यः । मनुराजानें दिव्यविभूतींमध्यें ज्याला यज्ञसंपादक केलें तो स्तवनीय होता अग्नि तुजला येथें आणील, आणि नंतर... हे दिव्यवैभवा तूं गमन कर. ८ आ त्वा॑ मद॒च्युता॒ हरी॑ श्ये॒नं प॒क्षेव॑ वक्षतः । आ । त्वा । मदऽच्युता । हरी इति । श्येनम् । पक्षाऽइव । वक्षतः । हे तुझे शत्रूंचा मद जिरविणारे आणि मदाने थैमान घालणारे हरिद्वर्ण अश्व, ससाणा आपल्या पंखानी भरारी मारतो, त्याप्रमाणें झपाट्यानें तुजला घेऊन येत आहेत; आणि येथें आल्यावर... हे दिव्यवैभवा तूं गमन कर. ९. आ या॑ह्य॒र्य आ परि॒ स्वाहा॒ सोम॑स्य पी॒तये॑ । आ । याहि । अर्यः । आ । परि । स्वाहा । सोमस्य । पीतये । हे प्रभो येथें ये "स्वाहा" शब्दोच्चाराबरोबर सोमरस प्राशनार्थ आगमन कर, आणि नंतर...... हे दिव्यवैभवा तूं गमन कर. १०. आ नो॑ या॒ह्युप॑श्रुत्यु॒क्थेषु॑ रणया इ॒ह । आ । नः । याहि । उपऽश्रुति । उक्थेषु । रणय । इह । आमच्या हाकेसरशी ये, आमच्या सामगायनानें उल्लसित हो आणि नंतर... दिव्यलोकी गमन कर. ११. सरू॑पै॒रा सु नो॑ गहि॒ सम्भृ॑तैः॒ सम्भृ॑ताश्वः । सऽरूपैः । आ । सु । नः । गहि । सम्ऽभृतैः । सम्भृतऽअश्वः । ज्या तुजजवळ भरदार पुठ्ठ्याचे अश्व भरपूर आहेत असा तूं अगदीं एकसारख्या पुष्ट अश्वांसहित येथें ये, आणि नंतर ... दिव्यलोकीं.. गमन कर. १२. आ या॑हि॒ पर्व॑तेभ्यः समु॒द्रस्याधि॑ वि॒ष्टपः॑ । आ । याहि । पर्वतेभ्यः । समुद्रस्य । अधि । विष्टपः । पर्वतांपासून, अंतरिक्ष समुद्राच्या वसतिस्थानांतून, जेथे असशील तेथून निघून इकडे ये आणि मग... दिव्यलोकीं गमन कर. १३. आ नो॒ गव्या॒न्यश्व्या॑ स॒हस्रा॑ शूर दर्दृहि । आ । नः । गव्यानि । अश्व्या । सहस्रा । शूर । दर्दृहि । इकडे ये, हजार गोधनें, हजारों अश्व अशा प्रकारचे ऐश्वर्य आमच्या स्वाधीन कर आणि नंतर... दिव्यलोकी गमन कर. १४. आ नः॑ सहस्र॒शो भ॑रा॒युता॑नि श॒तानि॑ च । आ । नः । सहस्रऽशः । भर । अयुतानि । शतानि । च । शेकडो, हजारोंच काय, पण असंख्य वरदाने आमच्यासाठी आण आणि नंतर... दिव्यलोकी गमन कर. १५. आ यदिन्द्र॑श्च॒ दद्व॑हे स॒हस्रं॒ वसु॑रोचिषः । आ । यत् । इन्द्रः । च । दद्वहे इति । सहस्रम् । वसुऽरोचिषः । जेव्हां ओजस्वी अश्वांनी युक्त, पशूंनी युक्त, अशा देणग्या आम्हांला इंद्राने, ऐश्वर्याने उज्वल अशा "वसरोचि" राजाकडून दिल्या. १६. य ऋ॒ज्रा वात॑रंहसोऽरु॒षासो॑ रघु॒ष्यदः॑ । ये । ऋज्राः । वातऽरंहसः । अरुषासः । रघुऽस्यदः । तेव्हां त्यांतील जलद चालणारे, वाऱ्याप्रमाणें धावणारे आणि लाल वर्णाचे अबलक घोडे सूर्याप्रमाणे तळपत आहेत असें वाटलें. १७. पारा॑वतस्य रा॒तिषु॑ द्र॒वच्च॑क्रेष्वा॒शुषु॑ । पारावतस्य । रातिषु । द्रवत्ऽचक्रेषु । आशुषु । पारावत राजाच्या जलद आणि जोरानें फिरणाऱ्या चाकांच्या रथांत मीं बसलों तेव्हां रथांच्या वनामध्यें आहे कीं काय ? असें वाटलें. १८. ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ३५ ( ) ऋषी - देवता - छंद - अ॒ग्निनेन्द्रे॑ण॒ वरु॑णेन॒ विष्णु॑नादि॒त्यै रु॒द्रैर्वसु॑भिः सचा॒भुवा॑ । अग्निना । इन्द्रेण । वरुणेन । विष्णुना । आदित्यैः । रुद्रैः । वसुऽभिः । सचाऽभुवा । अग्नि, इन्द्र, वरुण, विष्णू, आदित्य, रुद्र,वसू यांच्या सदैव बरोबर राहणारे, भक्तवत्सल असे हें अश्वीने, तुम्ही, उषादेवी आणि सूर्य ह्यांच्यासह, सोमरस प्राशन करा. १. विश्वा॑भिर्धी॒भिर्भुव॑नेन वाजिना दि॒वा पृ॑थि॒व्याद्रि॑भिः सचा॒भुवा॑ । विश्वाभिः । धीभिः । भुवनेन । वाजिना । दिवा । पृथिव्या । अद्रिऽभिः । सचाऽभुवा । आपल्या विश्वव्यापक बुद्धीनी, सर्व भुवनें, द्युलोक पृथ्वी, आणि पर्वत ह्यांच्याही बरोबर राहणारे, असे भक्तवत्सल तुम्ही, उषादेवी आणि सूर्य त्यांच्यासह, हे अश्वीहो, सोमरस प्राशन करा. २. विश्वै॑र्दे॒वैस्त्रि॒भिरे॑काद॒शैरि॒हाद्भिर्म॒रुद्भि॒र्भृगु॑भिः सचा॒भुवा॑ । विश्वैः । देवैः । त्रिऽभिः । एकादशैः । इह । अत्ऽभिः । मरुत्ऽभिः । भृगुऽभिः । सचाऽभुवा । संख्येने अकराच्या तिप्पट म्हणजे तेहतीस जे विश्वेदेव तसेंच येथें संचार करणारे जे मरुत् आणि भृगु ह्यांच्या नेहमी बरोबर राहणारे भक्तवत्सल असे तुम्ही ... सोमरस प्राशन करा. ३. जु॒षेथां॑ य॒ज्ङं बोध॑तं॒ हव॑स्य मे॒ विश्वे॒ह दे॑वौ॒ सव॒नाव॑ गच्छतम् । जुषेथाम् । यज्ञम् । बोधतम् । हवस्य । मे । विश्वा । इह । देवौ । सवना । अव । गच्छतम् । माझ्या यज्ञांचा संतोषानें स्वीकार करा, माझ्या हांकेकडे लक्ष द्या. हे दिव्य विभूतींनो, येथें माझ्या सर्व सवनांकडे आगमन करा आणि भक्तवत्सल असे तुम्ही, उएषादेवी आणि सूर्य त्यांच्यासह, हे अश्वीहो, आम्हांला उत्साह आणून द्या. ४. स्तोमं॑ जुषेथां युव॒शेव॑ क॒न्यनां॒ विश्वे॒ह दे॑वौ॒ सव॒नाव॑ गच्छतम् । स्तोमम् । जुषेथाम् । युवशाऽइव । कन्यनाम् । विश्वा । इह । देवौ । सवना । अव । गच्छतम् । तरुण बालिकेचा तरुणाने स्वीकार करावा त्याप्रमाणें तुम्ही स्तुतीचा स्वीकार करा; आणि हे दिव्यविभूतीनो, आम्हांकडे उत्साह घेऊन या. ५. गिरो॑ जुषेथामध्व॒रं जु॑षेथां॒ विश्वे॒ह दे॑वौ॒ सव॒नाव॑ गच्छतम् । गिरः । जुषेथाम् । अध्वरम् । जुषेथाम् । विश्वा । इह । देवौ । सवना । अव । गच्छतम् । स्तुतिवाणीने प्रसन्न व्हा; ह्या यागाचा स्वीकार करून संतुष्ट व्हा; दिव्यविभूतींनों, येथल्या सर्व सवनांकडे आगमन करा, अणि भक्तवत्सल असे तुम्ही उषादेवी आणि सूर्य ह्यांच्यासह आम्हांला, हे अश्वीहो, उत्साह आणून द्या. ६. हा॒रि॒द्र॒वेव॑ पतथो॒ वनेदुप॒ सोमं॑ सु॒तं म॑हि॒षेवाव॑ गच्छथः । हारिद्रवाऽइव । पतथः । वना । इत् । उप । सोमम् । सुतम् । महिषाऽइव । अव । गच्छथः । हारिद्रव पक्षी जसे वनांकडे; किंवा दांडगे महिष जसे उदकाकडे धांवत जातात, त्याप्रमाणें भक्तांनी पिळून सिद्ध केलेल्या सोमरसाकडे तुम्ही त्वरेने उडत जातां; तर भक्तवत्सल तुम्ही, उषादेवी आणि सूर्य त्यांच्यासह आमच्या यज्ञगृहाकडे, है. अश्वाहो, तीन वेळ आगमन करा. ७. हं॒सावि॑व पतथो अध्व॒गावि॑व॒ सोमं॑ सु॒तं म॑हि॒षेवाव॑ गच्छथः । हंसौऽइव । पतथः । अध्वगौऽइव । सोमम् । सुतम् । महिषाऽइव । अव । गच्छथः । दोन हंस पक्षी, दोन प्रवासी, किंवा दोन बलाढ्य महिष ह्यांनी धांवत सुटावे, त्या प्रमाणें भक्तांनी पिळून सिद्ध केलेल्या सोमरसाकडे तुम्हीं उडत जातां, तर भक्तवत्सल असे तम्हीं येथें.. .तीन वेळ आगमन करा. ८. श्ये॒नावि॑व पतथो ह॒व्यदा॑तये॒ सोमं॑ सु॒तं म॑हि॒षेवाव॑ गच्छथः । श्येनौऽइव । पतथः । हव्यऽदातये । सोमम् । सुतम् । महिषाऽइव । अव । गच्छथः । हवि अर्पण करणाऱ्या भक्तासाठी श्येन पक्ष्याप्रमाणे, किंवा पिळून सिद्ध केलेल्या सोमरसाकडे बलिष्ठ महिषांप्रमाणें तुम्ही धांवत जातां; तर भक्तवत्सल असे तुम्ही हे अश्वीहो, तीन वेळ आगमन करा. ९ पिब॑तं च तृप्णु॒तं चा च॑ गच्छतं प्र॒जां च॑ ध॒त्तं द्रवि॑णं च धत्तम् । पिबतम् । च । तृप्णुतम् । च । आ । च । गच्छतम् । प्रऽजाम् । च । धत्तम् । द्रविणम् । च । धत्तम् । सोमरस प्राशन करा, आणि तृप्त व्हा; त्याकरितां इकडे या; आणि भक्तांना पुत्रपौत्रांचा लाभ आणि अढळ संपत्ति द्या, आणि भक्तवत्सल असे तुम्ही उषादेवी आणि सूर्य त्यांच्यासह येऊन हे अश्वीहो, आमच्या ठिकाणी ऊर्जस्विता ठेवा. १०. जय॑तं च॒ प्र स्तु॑तं च॒ प्र चा॑वतं प्र॒जां च॑ ध॒त्तं द्रवि॑णं च धत्तम् । जयतम् । च । प्र । स्तुतम् । च । प्र । च । अवतम् । प्रऽजाम् । च । धत्तम् । द्रविणम् । च । धत्तम् । विजयी व्हा; भक्तांना शाबासकी द्या, त्यांचें रक्षण करा, त्यांना पुत्रपौत्राचा लाभ द्या आणि आमच्या ठिकाणी ऊर्जस्विता ठेवा. ११ ह॒तं च॒ शत्रू॒न्यत॑तं च मि॒त्रिणः॑ प्र॒जां च॑ ध॒त्तं द्रवि॑णं च धत्तम् । हतम् । च । शत्रून् । यततम् । च । मित्रिणः । प्रऽजाम् । च । धत्तम् । द्रविणम् । च । धत्तम् । शत्रूंना ठार करा, आणि मित्रांना प्रयत्नशील करा. भक्तांना पुत्रपपौत्रांचा लाभ द्या, अढळ संपत्ति द्या, आणि भक्तांमध्ये ऊर्जस्विता ठेवा. १२ मि॒त्रावरु॑णवन्ता उ॒त धर्म॑वन्ता म॒रुत्व॑न्ता जरि॒तुर्ग॑च्छथो॒ हव॑म् । मित्रावरुणऽवन्तौ । उत । धर्मऽवन्ता । मरुत्वन्ता । जरितुः । गच्छथः । हवम् । तुम्ही मित्रावरुणांचे जोडीदार आहांत; तुम्ही सद्धर्मशील आहांत. तुम्ही मरुतांना बरोबर वागवितां, आणि स्तोतृजनांच्या हाकेसरशी धांवत जातां; तर हे अश्वीहो, भक्तवत्सल असे तुम्ही, आदित्यांसह आगमन करा. १३ अङ्गि॑रस्वन्ता उ॒त विष्णु॑वन्ता म॒रुत्व॑न्ता जरि॒तुर्ग॑च्छथो॒ हव॑म् । अङ्गिरस्वन्तौ । उत । विष्णुऽवन्ता । मरुत्वन्ता । जरितुः । गच्छथः । हवम् । तुम्ही अंगिरांसहित, विष्णुसहित, मरुतांसहित स्तोतृजनांच्या हांकेसरशी धांवत जातां तर... आदित्यांसह आगमन करा. १४. ऋ॒भु॒मन्ता॑ वृषणा॒ वाज॑वन्ता म॒रुत्व॑न्ता जरि॒तुर्ग॑च्छथो॒ हव॑म् । ऋभुऽमन्ता । वृषणा । वाजऽवन्ता । मरुत्वन्ता । जरितुः । गच्छथः । हवम् । तुम्ही ऋभूंसहित आणि हे वीर्यशाली देवांनो, सत्वाढ्य असे तुम्ही मरुतांसहित स्तोतृजनांच्या हांकेतरशी धांवत येतां; तर हे अश्वीहो, भक्तवत्सल असे तुम्ही उषादेवी आणि सूर्य ह्यांच्यासह आणि आदित्यांसह आगमन करा. १५ ब्रह्म॑ जिन्वतमु॒त जि॑न्वतं॒ धियो॑ ह॒तं रक्षां॑सि॒ सेध॑त॒ममी॑वाः । ब्रह्म । जिन्वतम् । उत । जिन्वतम् । धियः । हतम् । रक्षांसि । सेधतम् । अमीवाः । ब्रह्मस्तोत्राची स्फूर्ति द्या, सद्बुद्धीला प्रेरणा करा, राक्षसांचा नाश करा, रोगाचें निवारण करा आणि हे अश्वीहो, भक्तवत्सल असे तुम्ही उषादेवी आणि सूर्य ह्यांच्यासह येऊन भक्ताचा सोमरस प्राशन करा. १६. क्ष॒त्रं जि॑न्वतमु॒त जि॑न्वतं॒ नृन्ह॒तं रक्षां॑सि॒ सेध॑त॒ममी॑वाः । क्षत्रम् । जिन्वतम् । उत । जिन्वतम् । नॄन् । हतम् । रक्षांसि । सेधतम् । अमीवाः । क्षात्रवृत्ति उसळून द्या, वीरांना उत्तेजन द्या, राक्षसांचा नायनाट करा, रोगाचा परिहार करा आणि भक्ताचा सोम प्राशन करा. १७. धे॒नूर्जि॑न्वतमु॒त जि॑न्वतं॒ विशो॑ ह॒तं रक्षां॑सि॒ सेध॑त॒ममी॑वाः । धेनूः । जिन्वतम् । उत । जिन्वतम् । विशः । हतम् । रक्षांसि । सेधतम् । अमीवाः । धेनूंची अभिवृद्धि करा. वैश्यवृत्तीच्या लोकांना समृद्ध करा, राक्षसांना ठार करा, रोगांचा उच्छेद करा आणि भक्ताचा सोमरस प्राशन करा. १८. अत्रे॑रिव शृणुतं पू॒र्व्यस्तु॑तिं श्या॒वाश्व॑स्य सुन्व॒तो म॑दच्युता । अत्रेःऽइव । शृणुतम् । पूर्व्यऽस्तुतिम् । श्यावऽअश्वस्य । सुन्वतः । मदऽच्युता । अत्रीऋषींनी पूर्वी स्तति केलेली जशी तुम्ही ऐकलीत तशीच हे उन्मादोच्छेदक देवांनो, सोम अर्पण करणार्या मन श्यावाश्वाचीही ऐका आणि हे अश्वीहो, भक्तवत्सल असे तुम्ही उषादेवी आणि सूर्य ह्यांच्यासह तीन दिवस मुरलेला हा सोमरस प्राशन करा. १९. सर्गाँ॑ इव सृजतं सुष्टु॒तीरुप॑ श्या॒वाश्व॑स्य सुन्व॒तो म॑दच्युता । सर्गान्ऽइव । सृजतम् । सुऽस्तुतीः । उप । श्यावऽअश्वस्य । सुन्वतः । मदऽच्युता । नदीच्या ओघाप्रमाणें उत्तम काव्याचे प्रवाह वाहण्यास लावा. सोम अर्पण करणारा मी श्यावाश्व त्याच्याकडे या. आणि हे मदहारक देवांनो, मुरलेला सोमरस प्राशन करा. २० र॒श्मीँरि॑व यच्छतमध्व॒राँ उप॑ श्या॒वाश्व॑स्य सुन्व॒तो म॑दच्युता । रश्मीन्ऽइव । यच्छतम् । अध्वरान् । उप । श्यावऽअश्वस्य । सुन्वतः । मदऽच्युता । सोमार्पण करणाऱ्या मज शावाश्वाचे यज्ञ, लगाम नीट धरावे त्याप्रमाणें नीट तडीस लावा, आणि हे उन्मादहारक देवांनो.,... हा मुरलेला सोमरस प्राशन करा. २१. अ॒र्वाग्रथं॒ नि य॑च्छतं॒ पिब॑तं सो॒म्यं मधु॑ । अर्वाक् । रथम् । नि । यच्छतम् । पिबतम् । सोम्यम् । मधु । आपला रथ इकडे वळवा, मधुर सोम प्राशन करा; या, हे अश्वीहो, इकडे आगमन करा; मीं तुमचा कृपाभिलाषी होऊन येण्याविषयी तुम्हांला विनवीत आहें, तर हविर्दात्या भक्ताला अमूल्य रत्ने द्या. २२. न॒मो॒वा॒के प्रस्थि॑ते अध्व॒रे न॑रा वि॒वक्ष॑णस्य पी॒तये॑ । नमःऽवाके । प्रऽस्थिते । अध्वरे । नरा । विवक्षणस्य । पीतये । प्रणिपात करून अध्वराला प्रारंभ झाला असतां, हें वीरांनो, प्रार्थनोत्सुक भक्ताचा सोमरस प्राशन करण्यासाठी या, हे अश्वीहो, आगमन करा; मीं कृपाभिलाषी होऊन विनवीत आहे तर... भक्ताला अमूल्य रत्ने द्या. २३. स्वाहा॑कृतस्य तृम्पतं सु॒तस्य॑ देवा॒वन्ध॑सः । स्वाहाऽकृतस्य । तृम्पतम् । सुतस्य । देवौ । अन्धसः । "स्वाहा" शब्दोच्चारपूर्वक तुम्हाला अर्पण केलेल्या सोमपेयानें, हे देवांनो, तुम्ही संतुष्ट व्हा, अश्वीहो या, इकडे आगमन करा आणि भक्ताला अमूल्य रत्ने द्या. २४. ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ३६ ( ) ऋषी - देवता - छंद - अ॒वि॒तासि॑ सुन्व॒तो वृ॒क्तब॑र्हिषः॒ पिबा॒ सोमं॒ मदा॑य॒ कं श॑तक्रतो । अविता । असि । सुन्वतः । वृक्तऽबर्हिषः । पिब । सोमम् । मदाय । कम् । शतक्रतो इति शतऽक्रतो । सोमरस पिळणारा आणि कुशासन व्यवस्थितपणे मांडणारा जो भक्त त्याचें तूं रक्षण करतोस. तर हे असंख्यपराक्रमा, तल्लीन होण्यासाठी तूं संतोषानें हा सोमरस प्राशन कर. भक्तांनी तुझा भाग म्हणून जो तुजला अर्पण केला आहे तो प्राशन कर. यच्चावत् शत्रुसेन्ज़्ज़् आणि त्यांचा अफाट जोर ह्यांना तूं चिरडून टाकणारा आहेस; हे सज्जनाधिपा इन्द्रा; तूं ज्ञानोदके जिंकणारा आणि मरुतांचा स्वामी आहेस. १. प्राव॑ स्तो॒तारं॑ मघव॒न्नव॒ त्वां पिबा॒ सोमं॒ मदा॑य॒ कं श॑तक्रतो । प्र । अव । स्तोतारम् । मघऽवन् । अव । त्वाम् । पिब । सोमम् । भक्ताचा प्रतिपाळ कर; हे दातृश्रेष्ठा, तूंच प्रतिपाळ कर. हे अनंतकर्तृत्वा इन्द्रा, तल्लीन होण्यासाठी तूं सोमरस प्राशन कर..... तूं ज्ञानोदके जिंकणारा आणि मरुतांचा स्वामी आहेस. २. ऊ॒र्जा दे॒वाँ अव॒स्योज॑सा॒ त्वां पिबा॒ सोमं॒ मदा॑य॒ कं श॑तक्रतो । ऊर्जा । देवान् । अवसि । ओजसा । त्वाम् । पिब । सोमम् । आपल्या ऊर्जस्वितेनें देवांचे, आणि आपल्याच ओजस्वितेने तूं स्वतःचे रक्षण करतोस; तर हे अनंतकतृत्वा इन्द्रा, तल्लीनतेसाठी तूं संतोषानें हा सोमरस प्राशन कर. तूं ज्ञानोदके जिंकणारा आणि मरुतांचा स्वामी आहेस. ३. ज॒नि॒ता दि॒वो ज॑नि॒ता पृ॑थि॒व्याः पिबा॒ सोमं॒ मदा॑य॒ कं श॑तक्रतो । जनिता । दिवः । जनिता । पृथिव्याः । पिब । सोमम् । तूं आकाशाचा उत्पन्नकर्ता आहेस, तूं पृथिवीचाही उत्पन्नकर्ता आहेस, तर हे अनंतकर्तृत्वा.. .हा सोमरस प्राशन कर. ४. ज॒नि॒ताश्वा॑नां जनि॒ता गवा॑मसि॒ पिबा॒ सोमं॒ मदा॑य॒ कं श॑तक्रतो । जनिता । अश्वानाम् । जनिता । गवाम् । असि । पिब । सोमम् । तूं. चलाख अश्व निर्माण केलेस, धेनूही निर्माण केल्यास.. तर हे अनंतकर्तृत्वा.. हा सोमरस प्राशन कर. ५ अत्री॑णां॒ स्तोम॑मद्रिवो म॒हस्कृ॑धि॒ पिबा॒ सोमं॒ मदा॑य॒ कं श॑तक्रतो । अत्रीणाम् । स्तोमम् । अद्रिऽवः । महः । कृधि । पिब । सोमम् । अत्रिऋषींनी केलेल्या स्तुतींची तूं वाहवा कर; हे वज्रधरा आणि अनंतकर्तृत्वा इन्द्रा, आल्हादासाठी तूं सोमरस प्राशन कर. ६. श्या॒वाश्व॑स्य सुन्व॒तस्तथा॑ शृणु॒ यथाशृ॑णो॒रत्रेः॒ कर्मा॑णि कृण्व॒तः । श्यावऽअश्वस्य । सुन्वतः । तथा । शृणु । यथा । अशृणोः । अत्रेः । कर्माणि । कृण्वतः । ज्याप्रामाणें, सत्कर्मे आचरणाऱ्या अत्रिंनी केलेली स्तुति तूं पूर्वी ऐकलीस त्याप्रमाणें सोम अर्पण करणाऱ्या मज श्यावाश्व्याचीही ऐक; शूरांच्या धकाधकीत त्रसदस्युचे रक्षण, हे इन्द्रा, ब्रह्मस्तोत्रांची अभिवृद्धि करून तूं एकट्यानेंच केलेस. ७. ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ३७ ( ) ऋषी - देवता - छंद - प्रेदं ब्रह्म॑ वृत्र॒तूर्ये॑ष्वाविथ॒ प्र सु॑न्व॒तः श॑चीपत॒ इन्द्र॒ विश्वा॑भिरू॒तिभिः॑ । प्र । इदम् । ब्रह्म । वृत्रऽतूर्येषु । आविथ । प्र । सुन्वतः । शचीऽपते । इन्द्र । विश्वाभिः । ऊतिऽभिः । सोम अर्पण करणाऱ्याच्या ह्या कवनाचे रक्षण वृत्राच्या तडाक्यांतून, हे सर्वशक्तिमान् इन्द्रा, तूं आपल्या सकलसहायक शक्तींनी केलेस; तर मध्यंदिन सवनाच्या प्रसंगीं, हे वृत्रनाशना, हे निष्कलंका वज्रधरा, हा पिळलेला सोमरस तूं प्राशन कर. १. से॒हा॒न उ॑ग्र॒ पृत॑ना अ॒भि द्रुहः॑ शचीपत॒ इन्द्र॒ विश्वा॑भिरू॒तिभिः॑ । सेहानः । उग्र । पृतनाः । अभि । द्रुहः । शचीऽपते । इन्द्र । विश्वाभिः । ऊतिऽभिः । हे शत्रूभयंकरा, सज्जनद्रोही दुष्टांचे सैन्य, हे सर्वशक्तिमन्ता इन्द्रा, तूं आपल्या सकल आयुधांनी रगडून टाकणारा आहेस; तर मध्यंदिन सवनांच्या प्रसंगीं, हे वृत्रनाशना, हे निष्कलंका, वज्रधरा, हा पिळलेला सोमरस तूं प्राशन कर. २. ए॒क॒राळ॒स्य भुव॑नस्य राजसि शचीपत॒ इन्द्र॒ विश्वा॑भिरू॒तिभिः॑ । एकऽराट् । अस्य । भुवनस्य । राजसि । शचीऽपते । इन्द्र । विश्वाभिः । ऊतिऽभिः । हे सर्वशक्तिमना इन्द्रा, आपल्या अखिल शक्तींनी विभूषित असा तूं ह्या भूलोकाचा एकच अधिपति आहेस; तर.. हे निष्कलंका वज्रधरा, हा सोमरस तूं प्राशन कर. ३. स॒स्थावा॑ना यवयसि॒ त्वमेक॒ इच्छ॑चीपत॒ इन्द्र॒ विश्वा॑भिरू॒तिभिः॑ । सऽस्थावाना । यवयसि । त्वम् । एकः । इत् । शचीऽपते । इन्द्र । विश्वाभिः । ऊतिऽभिः । ह्या एकत्र राहिलेल्या द्यावापृथिवींना हे सर्वशक्तिमना इन्द्रा, तूंच एकट्याने आपल्या अखिल शक्तींनी निरनिराळे फिरावयास लाविलेंस, तर.. .हे निष्कलंका, हा सोमरस तूं प्राशन कर. ४. क्षेम॑स्य च प्र॒युज॑श्च॒ त्वमी॑शिषे शचीपत॒ इन्द्र॒ विश्वा॑भिरू॒तिभिः॑ । क्षेमस्य । च । प्रऽयुजः । च । त्वम् । ईशिषे । शचीऽपते । इन्द्र । विश्वाभिः । ऊतिऽभिः । जगताचे क्षेम आणि योग ह्यांच्यावर, हे सर्वशक्तिमंता इन्द्रा, आपल्या सर्व शक्तींनी तूं अधिकार चालवितोस, तर हे निष्कलंका, हा सोमरस तूं प्राशन कर. ५. क्ष॒त्राय॑ त्व॒मव॑सि॒ न त्व॑माविथ शचीपत॒ इन्द्र॒ विश्वा॑भिरू॒तिभिः॑ । क्षत्राय । त्वम् । अवसि । न । त्वम् । आविथ । शचीऽपते । इन्द्र । विश्वाभिः । ऊतिऽभिः । क्षात्रवृत्तीच्या अभिवृद्धिकरितां तूं भक्तांचे रक्षण करतोस; नाहीं तर केलेंच नसतेस. तर हे सर्वशक्तिमन्ता इन्द्रा, आपल्या सर्वसहायक शक्तींनी येऊन ..हे निष्कलंका वज्रधरा, हा पिळलेला सोमरस प्राशन कर. ६. श्या॒वाश्व॑स्य॒ रेभ॑त॒स्तथा॑ शृणु॒ यथाशृ॑णो॒रत्रेः॒ कर्मा॑णि कृण्व॒तः । श्यावऽअश्वस्य । रेभतः । तथा । शृणु । यथा । अशृणोः । अत्रेः । कर्माणि । कृण्वतः । ज्याप्रमाणे सत्कर्माचरण करणाऱ्या अत्रिंनीं केलेली स्तुति तूं पूर्वी ऐकलीस, त्याप्रमाणें आतांही मनःपूर्वक तुला आळविणारा मी श्यावाश्व त्याचे स्तवन ऐक. पहा, कीं शूरांच्या धकाधकीत त्रसदस्यूचे रक्षण, हे इन्द्रा, ब्रह्मस्तोत्रांची अभिवृद्धि करून तूं एकट्यानेंच केलेस. ७. ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ३८ ( ) ऋषी - देवता - छंद - य॒ज्ङस्य॒ हि स्थ ऋ॒त्विजा॒ सस्नी॒ वाजे॑षु॒ कर्म॑सु । यज्ञस्य । हि । स्थः । ऋत्विजा । सस्नी इति । वाजेषु । कर्मऽसु । आमच्य्या यज्ञाचे जे तुम्ही ऋत्विज ते सत्वसामर्थ्याच्या झगड्यांत आणि सत्कर्माचरणात सारखेच दक्ष आहात ही गोष्ट, इन्द्राग्नी हो, तुम्ही ध्यानांत आणा. १. तो॒शासा॑ रथ॒यावा॑ना वृत्र॒हणाप॑राजिता । तोशासा । रथऽयावाना । वृत्रऽहना । अपराऽजिता । तुम्ही दुर्जनांचे उच्छेदक, रथारूढ, वृत्रनाशक, परंतु स्वतः कधींही पराजय न पावणारे असे आहात, हेहि, इन्द्राग्नी हो, तुमच्या लक्षांत असू द्या. २. इ॒दं वां॑ मदि॒रं मध्वधु॑क्ष॒न्नद्रि॑भि॒र्नरः॑ । इदम् । वाम् । मदिरम् । मधु । अधुक्षन् । अद्रिऽभिः । नरः । तुमच्यासाठी शूर भक्तांना हे हर्षकर मधुर पेय ग्राव्यांनी घुसळून तयार केलें आहे, त्याकडे हे इन्द्राग्नीहो, तुम्ही लक्ष पोहोचवा. ३. जु॒षेथां॑ य॒ज्ङमि॒ष्टये॑ सु॒तं सोमं॑ सधस्तुती । जुषेथाम् । यज्ञम् । इष्टये । सुतम् । सोमम् । सधस्तुती इति सधऽस्तुती । इष्टसिद्धिसाठीं, आमचा यज्ञ आणि पिळलेला सोमरस ह्यांचा तुम्ही संतोषानें स्वीकार करता तर हे इन्द्राग्नीहो इकडे आगमन करा. ४. इ॒मा जु॑षेथां॒ सव॑ना॒ येभि॑र्ह॒व्यान्यू॒हथुः॑ । इमा । जुषेथाम् । सवना । येभिः । हव्यानि । ऊहथुः । ज्याच्या योगाने तुम्ही देवांना हविर्भाग पोहोंचवितां, त्या सामसवनांनी संतुष्ट व्हा आणि त्यासाठीं हे शूर इन्द्राग्नीहो, येथें आगमन करा. ५. इ॒मां गा॑य॒त्रव॑र्तनिं जु॒षेथां॑ सुष्टु॒तिं मम॑ । इमाम् । गायत्रऽवर्तनिम् । जुषेथाम् । सुऽस्तुतिम् । मम । मी गायत्रपद्धतीनें केलेल्या ह्या उत्तम स्तुतीचा तुम्ही संतोषाने स्वीकार करा आणि हे शूर इन्द्राग्नीहो येथें आगमन करा. ६ प्रा॒त॒र्याव॑भि॒रा ग॑तं दे॒वेभि॑र्जेन्यावसू । प्रातर्यावऽभिः । आ । गतम् । देवेभिः । जेन्यावसू इति । प्रातःकाळी येणाऱ्या देवांसह सोमरस प्राशन करण्यासाठीं, हे विजयवैभव इन्द्राग्नी हो, येथें आगमन करा. ७. श्या॒वाश्व॑स्य सुन्व॒तोऽत्री॑णां शृणुतं॒ हव॑म् । श्यावऽअश्वस्य । सुन्वतः । अत्रीणाम् । शृणुतम् । हवम् । अत्रीची आणि सोमरस पिळून ठेवणाऱ्या श्यावाश्व्याची हाक, हे इन्द्राग्नी हो, सोमरसप्रशनार्थ तरी ऐका. ८. ए॒वा वा॑मह्व ऊ॒तये॒ यथाहु॑वन्त॒ मेधि॑राः । एव । वाम् । अह्वे । ऊतये । यथा । अहुवन्त । मेधिराः । त्याप्रमाणें जसा पूर्वीच्या प्रज्ञाशाली भक्तांनी तुमचा धांवा केला, तसाच धांवा सहायासाठीं, आणि तुम्ही सोमरस प्राशन करावा म्हणून, हे इन्द्राग्नीहो, मीही करीत आ हे. ९. आहं सर॑स्वतीवतोरिन्द्रा॒ग्न्योरवो॑ वृणे । आ । अहम् । सरस्वतीऽवतोः । इन्द्राग्न्योः । अवः । वृणे । सरस्वतीच्या बरोबर राहणारे जे इन्द्राग्नी, त्यांच्या कृपाछत्राची मी याचना करतो. जें गायत्रगीत ऋचांनीं म्हटले जातें तें ह्यांच्याचे प्रीत्यर्थ होय. १० ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ३९ ( ) ऋषी - देवता - छंद - अ॒ग्निम॑स्तोष्यृ॒ग्मिय॑म॒ग्निमी॒ळा य॒जध्यै॑ । अग्निम् । अस्तोषि । ऋग्मियम् । अग्निम् । ईळा । यजध्यै । ऋक्स्तवनयोग्य अशा अग्नीचे मीं स्तवन करतो. उत्साहवर्धक हविंनीं अग्नीचे यजन करण्याकरितां मीं उद्युक्त होतों म्हणून अग्नि हा दिव्यविबुधांना आम्हापुढे प्रकट करो. दिव्य आणि मानवी अशा दोन्हीं यज्ञसभेमध्यें तो कान्तदर्शी अग्नि आमचें मार्गदर्शित्व स्वीकारून संचार करतो म्हणून इतर सर्व दुर्जन पार नष्ट होवोत. १. न्य॑ग्ने॒ नव्य॑सा॒ वच॑स्त॒नूषु॒ शंस॑मेषाम् । नि । अग्ने । नव्यसा । वचः । तनूषु । शंसम् । एषाम् । अग्निदेवा, आमच्या अपूर्व प्रार्थनेनें ह्या दुष्टांचे शिव्याशाप त्यांच्या अंगातल्या अंगात जाळून टाक. तसेंच, दानशील भक्तांचे शत्रू आणि आर्यांचे सर्व शत्रु मूढ होऊन येथून पार निघून जावोत आणि बाकीचे सर्व दुष्ट नाश पावोत. २ अग्ने॒ मन्मा॑नि॒ तुभ्यं॒ कं घृ॒तं न जु॑ह्व आ॒सनि॑ । अग्ने । मन्मानि । तुभ्यम् । कम् । घृतम् । न । जुह्वे । आसनि । अग्निदेवा, ज्याप्रमाणे घृताहुति तुझ्या मुखांत अर्पण करतात, त्याप्रमाणें माझी मननीय स्तोत्रें संतोषानें मी अर्पण करीत आहे. तर तूं दिव्यविभूतींमध्ये आमच्या सेवेची आठवण ठेव. खरोखरच तू विवस्वताचा पुरातन आणि मंगलदायक असा मार्गदर्शक झाला आहेस. तर इतर सर्व दुष्ट पार नष्ट होऊन जावोत. ३. तत्त॑द॒ग्निर्वयो॑ दधे॒ यथा॑यथा कृप॒ण्यति॑ । तत्ऽतत् । अग्निः । वयः । दधे । यथाऽयथा । कृपण्यति । जितका जितका भक्त काकुळतीने विनवणी करतो, तितका-तितका अग्निदेव त्याच्यामध्यें तारुण्याचा जोम जास्त ठेवतो. ऊर्जस्वितेसाठीं ज्याला आहुति देतात असा तो दिव्यनिधीचा पालक अग्नि, अखिल देवांच्या इष्टि साठी सुख शांति आणि कल्याण यांचा लाभ भक्तांना देतो. ४. स चि॑केत॒ सही॑यसा॒ग्निश्चि॒त्रेण॒ कर्म॑णा । सः । चिकेत । सहीयसा । अग्निः । चित्रेण । कर्मणा । दुष्टांना चिरडून टाकणाऱ्या आपल्या अद्भुत कृत्यांनी अग्नि हा सर्वांना विश्रुत झाला आहे. तो सर्व मनुष्यजातीचा यज्ञसंपादक आहे. भक्तांनी अर्पण केलेल्या दक्षिणांनीं तो अगदी वेधून गेला आहे. स्वीकरणीय वस्तूंचा स्वीकार करण्याला तोच प्रवृत्त करतो. ५. अ॒ग्निर्जा॒ता दे॒वाना॑म॒ग्निर्वे॑द॒ मर्ता॑नामपी॒च्य॑म् । अग्निः । जाता । देवानाम् । अग्निः । वेद । मर्तानाम् । अपीच्यम् । दिव्यविभूतींचे अवतार अग्नीच जाणतो आणि मनुष्यांची अगदी गुप्त कृत्येही अग्नीच जाणतो. अग्नि हाच अक्षय संपत्ति देणारा आहे, म्हणून अपर्व स्तोत्रांसह याला उत्तम आहुति अर्पण केली म्हणजे उन्नतीची द्वारें तो सताड उघडून देतो. ६. अ॒ग्निर्दे॒वेषु॒ संव॑सुः॒ स वि॒क्षु य॒ज्ङिया॒स्वा । अग्निः । देवेषु । सम्ऽवसुः । सः । विक्षु । यज्ञियासु । आ । अग्नि देवांमध्यें वास करतोच, पण यज्ञप्रवण भक्तामध्ये देखील तो आनंदाने वास्तव्य करतो. भूमि जशी सर्व प्राण्यांचे पोषण करते त्याप्रमाणें काव्यस्फूर्तीची जोपासना, तो देवामध्ये पूज्य असा अग्नि परम संतोषानें करतो. ७. यो अ॒ग्निः स॒प्तमा॑नुषः श्रि॒तो विश्वे॑षु॒ सिन्धु॑षु । यः । अग्निः । सप्तऽमानुषः । श्रितः । विश्वेषु । सिन्धुषु । सात ऋषिकुलांचा अग्रणी असा हा अग्नि सर्व नद्यांच्या उदकामध्ये देखील वास करतो; म्हणून ज्याची धामें तीन आहेत, ज्याने मन्धाताच्या धर्मविहीन शत्रूचा पार नायनाट करून टाकला आहे, आणि यज्ञामध्यें ज्याचे स्तवन प्रथम करतात त्या अग्नीला आम्ही शरण आहोत. ८. अ॒ग्निस्त्रीणि॑ त्रि॒धातू॒न्या क्षे॑ति वि॒दथा॑ क॒विः । अग्निः । त्रीणि । त्रिऽधातूनि । आ । क्षेति । विदथा । कविः । हा प्राज्ञ अग्नी तीन प्रकारच्या त्रिपुटींत आणि यज्ञसभेमध्ये वास करतो; तो तेहतीस दिव्यविभूतींचे येथें यजन करो, त्यांना संतुष्ट करो. तोच ज्ञानरूप भक्तिभूषणयुक्त अग्नि आमचा मार्गदर्शक दूत झाला आहे. ९. त्वं नो॑ अग्न आ॒युषु॒ त्वं दे॒वेषु॑ पूर्व्य॒ वस्व॒ एक॑ इरज्यसि । त्वम् । नः । अग्ने । आयुषु । त्वम् । देवेषु । पूर्व्य । वस्वः । एकः । इरज्यसि । मनुष्यांमध्ये काय, आणि देवांमध्ये काय, हे सनातन अग्निदेवा, अक्षय निधीचा प्रेरक तूंच एकटा आहेस; म्हणून चोहींकडे वाहणाऱ्या नद्या आपल्याच प्रवाहांचा तुला सेतु समजून करून तुझ्या भोंवती भ्रमण करतात. १०. ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ४० ( ) ऋषी - देवता - छंद - इन्द्रा॑ग्नी यु॒वं सु नः॒ सह॑न्ता॒ दास॑थो र॒यिम् । इन्द्राग्नी इति । युवम् । सु । नः । सहन्ता । दासथः । रयिम् । इन्द्राग्नीहो, दुर्जनांना असह्य होणारे तुम्ही भक्तांना असें अढळ ऐश्वर्य द्या कीं तेणेकरून शत्रू कितीही बळकट असोत, झंझावात सुटला असतां दावाग्नि जशी अरण्यें फस्त करतो त्याप्रमाणें त्यांना आम्ही युद्धांत चिरडून टाकू. १. न॒हि वां॑ व॒व्रया॑म॒हेऽथेन्द्र॒मिद्य॑जामहे॒ शवि॑ष्ठं नृ॒णां नर॑म् । नहि । वाम् । वव्रयामहे । अथ । इन्द्रम् । इत् । यजामहे । शविष्ठम् । नृणाम् । नरम् । आम्ही तुम्हां उभयतांना अडवीत नाहीं; तर अत्युत्कट बलाढ्य आणि वारांचाही वीर, जो इन्द्र त्याचेंच प्रथम आम्ही यजन करतो. तो अश्वारूढ सैनिकांसह एकवार तरी येवो; सत्वसामर्थ्याचा आम्हांला लाभ व्हावा म्हणून येवो; आम्हांला बुद्धिलाभ व्हावा म्हणून तरी येवो. २. ता हि मध्यं॒ भरा॑णामिन्द्रा॒ग्नी अ॑धिक्षि॒तः । ता । हि । मध्यम् । भराणाम् । इन्द्राग्नी इति । अधिऽक्षितः । इन्दाग्नी हे युद्धाच्या ऐन गर्दींत खुशाल वावरतात; त्यांना कोणी जरी प्रश्न केला तरी त्यांचें मित्रत्व इच्छिणाऱ्या भक्ताला ते काव्यमर्मज्ञ देव आपल्या प्रतिभाशक्तीनें त्याच्या उत्तराची सहज जुळणी घालून देतात. अगदी उलगडा करून देतात. ३. अ॒भ्य॑र्च नभाक॒वदि॑न्द्रा॒ग्नी य॒जसा॑ गि॒रा । अभि । अर्च । नभाकऽवत् । इन्द्राग्नी इति । यजसा । गिरा । नाभाकानें पूर्वी केल्या प्रमाणें यज्ञार्ह स्तुतींनी इन्द्राग्नीचे अर्चन कर; ते असे आहेत कीं हें जगत, हें आकाश, ही विस्तीर्ण पृथिवी आणि हे सर्वे लोक, उत्कृष्टधनाचा ठेव आपल्याजवळ ठेवणाऱ्या त्या इन्द्राग्नीचेच आहेत ४. प्र ब्रह्मा॑णि नभाक॒वदि॑न्द्रा॒ग्निभ्या॑मिरज्यत । प्र । ब्रह्माणि । नभाकऽवत् । इन्द्राग्निऽभ्याम् । इरज्यत । इन्द्राग्नीप्रीत्यर्थ नाभाका प्रमाणे तुम्हीही ब्रह्मसूक्तांनी प्रार्थना करा; ज्या महासागराची मूलस्थाने सात आहेतः त्याचें वाकडे तिकडे असलेले द्वार पूर्वी बंद होते तें ह्या इन्द्राग्नीनें सताड खुले केलें. आणि इन्द्र हा तर आपल्या ओजस्वितेनें सर्वांचा प्रभूच आहे. ५. अपि॑ वृश्च पुराण॒वद्व्र॒तते॑रिव गुष्पि॒तमोजो॑ दा॒सस्य॑ दम्भय । अपि । वृश्च । पुराणऽवत् । व्रततेःऽइव । गुष्पितम् । ओजः । दासस्य । दम्भय । एकाद्या वेलाचे जुनें वाळलेले जाळे छाटून टाकावे त्याप्रमाणे दुष्टनीचांचें जाळे तं पूर्वींप्रमाणेच छाटून टाक. त्यांचें तेज तूं फिक्कें पाड. म्हणजे त्यांनीं साठविलेले धन, इन्द्राच्या सहायानें आम्ही सर्वांना वाटून देऊं. ६. यदि॑न्द्रा॒ग्नी जना॑ इ॒मे वि॒ह्वय॑न्ते॒ तना॑ गि॒रा । यत् । इन्द्राग्नी इति । जनाः । इमे । विऽह्वयन्ते । तना । गिरा । हे भक्तजन पुरातन स्तोत्रांनी इन्द्राग्नीचा नानाप्रकारांनीं धांवा करीत आहेत, तेव्हां आम्हीं आमच्या शूर सैनिकांसह शत्रुसैन्याला चिरडून टाकू, आणि आमच्याशी सख्य करणाराशी सख्य करू हे खास. ७. या नु श्वे॒ताव॒वो दि॒व उ॒च्चरा॑त॒ उप॒ द्युभिः॑ । या । नु । श्वेतौ । अवः । दिवः । उत्ऽचरातः । उप । द्युऽभिः । हे जे उभयता श्वेतवर्ण इन्द्राग्नी आपल्या दीप्तीनें मंडित होऊन आकाशाच्या खालीं, जवळ, किंवा वर संचार करीत असतात, त्या इन्द्राग्नीच्या आज्ञेनें ह्या अनेक नद्या समुद्राकडे वहात जातात. त्या सर्वांना इन्द्राग्नींनीच बन्धमुक्त केले. ८. पू॒र्वीष्ट॑ इ॒न्द्रोप॑मातयः पू॒र्वीरु॒त प्रश॑स्तयः॒ सूनो॑ हि॒न्वस्य॑ हरिवः । पूर्वीः । ते । इन्द्र । उपऽमातयः । पूर्वीः । उत । प्रऽशस्तयः । सूनो इति । हिन्वस्य । हरिऽवः । इन्द्रा, भक्तांनी तुला दिलेल्या उपमा पुष्कळ; आणि तुझ्या स्तुतीही पण पुष्कळच आहेत. हे सत्प्रेरणेच्या प्रभवा, हे हरिदश्वा, आमच्या ज्या ध्यानबुद्धि फलद्रूप झाल्या त्या तुज वीराच्या अलभ्यनिधीपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत. ९. तं शि॑शीता सुवृ॒क्तिभि॑स्त्वे॒षं सत्वा॑नमृ॒ग्मिय॑म् । तम् । शिशीत । सुवृक्तिऽभिः । त्वेषम् । सत्वानम् । ऋग्मियम् । जो झगझगीत, सत्वपूर्ण, आणि ऋक्स्तोत्रप्रिय आहे त्या इन्द्राला उत्तम स्तुतींनी तीव्र करा. अवर्षण पाडणाऱ्या शुष्ण राक्षसाच्या संततीचा तो आपल्या ओजस्वितेनें संहार करतो आणि स्वर्गीय उदकें जिंकून आणतो. १०. तं शि॑शीता स्वध्व॒रं स॒त्यं सत्वा॑नमृ॒त्विय॑म् । तम् । शिशीत । सुऽअध्वरम् । सत्यम् । सत्वानम् । ऋत्वियम् । ज्याच्या प्रीत्यर्थ भक्त अध्वरयाग करतात, जो सत्यस्वरूप, सत्वपूर्ण आहे, जो ऋतु आणि काल जाणतो इतकेच काय पण ज्याला सर्व कांहीं समजते त्या इन्द्राला जाज्वल्य करा; तो शुष्ण राक्षसाच्या संततीचा संहार करतो आणि स्वर्गीय उदकें जिंकून आणतो. ११. ए॒वेन्द्रा॒ग्निभ्यां॑ पितृ॒वन्नवी॑यो मन्धातृ॒वद॑ङ्गिर॒स्वद॑वाचि । एव । इन्द्राग्निऽभ्याम् । पितृऽवत् । नवीयः । मन्धातृऽवत् । अङ्गिरस्वत् । अवाचि । याप्रमाणे, इन्द्राग्नीप्रीत्यर्थ मीं वाडवडिलांनीं केले त्याप्रमाणें, किंवा मन्धाता आणि आंगिरस् यांचेप्रमाणे, अपूर्व स्तोत्र केलें आहे, तर हे दिव्यविभूतीनों, तुमच्या हितकर आश्रयाने आमचे रक्षण करा म्हणजे आम्ही इच्छित ऐश्वर्यांचे अधिपति होऊं. १२. ॐ तत् सत् |