ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त २१ ते ३०

ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त २१ ( इंद्रसूक्त, चित्र दानस्तुती )

ऋषी - सोभरि काण्व देवता - देवता-१-१६ इंद्र; १७-१८ चित्र दानस्तुती; छंद - प्रगाथ



व॒यमु॒ त्वाम॑पूर्व्य स्थू॒रं न कच्चि॒द्भर॑न्तोऽव॒स्यवः॑ ।
वाजे॑ चि॒त्रं ह॑वामहे ॥ १ ॥

वयम् । ऊं इति । त्वाम् । अपूर्व्य । स्थूरम् । न । कत् । चित् । भरन्तः । अवस्यवः ।
वाजे । चित्रम् । हवामहे ॥ १ ॥

हे अपूर्व स्वरूपा देवा, एखाद्या धिप्पाड किंवा गुणसंपन्न पुरुषाचा आश्रय लोक करतात, त्याप्रमाणें आम्ही रक्षणेच्छु जन सत्वयुद्धांत अद्‌भुतदर्शन जो तूं त्या तुझीच विनवणी करीत आहों १.



उप॑ त्वा॒ कर्म॑न्नू॒तये॒ स नो॒ युवो॒ग्रश्च॑क्राम॒ यो धृ॒षत् ।
त्वामिद्ध्य॑वि॒तारं॑ ववृ॒महे॒ सखा॑य इन्द्र सान॒सिम् ॥ २ ॥

उप । त्वा । कर्मन् । ऊतये । सः । नः । युवा । उग्रः । चक्राम । यः । धृषत् ।
त्वाम् । इत् । हि । अवितारम् । ववृमहे । सखायः । इन्द्र । सानसिम् ॥ २ ॥

ह्या युद्ध कार्यांत रक्षणासाठी तो आमचा झुंजार तरुण वीर तुझ्याचकडे प्राप्त झाला; त्यानें शत्रूवर चढाई केलीच. परंतु आम्ही तुलाच आमचा त्राता म्हणून मानतो, हे इन्द्रा, आम्ही तुझे प्रियभक्त तुलाच आमचा विजयदाता असें समजतो २.



आ या॑ही॒म इन्द॒वोऽश्व॑पते॒ गोप॑त॒ उर्व॑रापते ।
सोमं॑ सोमपते पिब ॥ ३ ॥

आ । याहि । इमे । इन्दवः । अश्वऽपते । गोऽपते । उर्वराऽपते ।
सोमम् । सोमऽपते । पिब ॥ ३ ॥

ये, हे पहा सोमबिंदू; हे अश्वधनाधिषा, हे गत्येपनाधिषा, हे समृद्ध- भूमिषा, हे सोमप्रिय देवा, तूं सोमरस प्राशन कर ३.



व॒यं हि त्वा॒ बन्धु॑मन्तमब॒न्धवो॒ विप्रा॑स इन्द्र येमि॒म ।
या ते॒ धामा॑नि वृषभ॒ तेभि॒रा ग॑हि॒ विश्वे॑भिः॒ सोम॑पीतये ॥ ४ ॥

वयम् । हि । त्वा । बन्धुऽमन्तम् । अबन्धवः । विप्रासः । इन्द्र । येमिम ।
या । ते । धामानि । वृषभ । तेभिः । आ । गहि । विश्वेभिः । सोमऽपीतये ॥ ४ ॥

खरोखर, विश्वबंधू जो तूं त्या तुलाच, हे इन्द्रा, आम्ही स्तोतृजन शरण आलों आहोंत. आम्हांला तुझ्यावांचून आप्तबांधव कोणी नाहींत, तर तुझीं जी तेजःपुंज स्वरूपे आहेंत त्यासह, हे मनोरथवर्षका वीरा, तूं सोमरसाचा आस्वाद घेण्याकरिता ये ४.



सीद॑न्तस्ते॒ वयो॑ यथा॒ गोश्री॑ते॒ मधौ॑ मदि॒रे वि॒वक्ष॑णे ।
अ॒भि त्वामि॑न्द्र नोनुमः ॥ ५ ॥

सीदन्तः । ते । वयः । यथा । गोऽश्रीते । मधौ । मदिरे । विवक्षणे ।
अभि । त्वाम् । इन्द्र । नोनुमः ॥ ५ ॥

पक्षी जसे वृक्षाचा आश्रय करतात त्याप्रमाणें, ह्या दुग्धमिश्रित, मधुर, चित्तहर्षकर आणि इच्छितफलदायी सोमरसाच्या ठिकाणी आम्हीं आश्रित होऊन, हे इन्द्रा, तुझे गुणानुवाद गातो. ५.



अच्छा॑ च त्वै॒ना नम॑सा॒ वदा॑मसि॒ किं मुहु॑श्चि॒द्वि दी॑धयः ।
सन्ति॒ कामा॑सो हरिवो द॒दिष्ट्वं स्मो व॒यं सन्ति॑ नो॒ धियः॑ ॥ ६ ॥

अच्छ । च । त्वा । एना । नमसा । वदामसि । किम् । मुहुः । चित् । वि । दीधयः ।
सन्ति । कामासः । हरिऽवः । ददिः । त्वम् । स्मः । वयम् । सन्ति । नः । धियः ॥ ६ ॥

हे पहा आम्ही तुजला प्रणिपात करून तुझी प्रार्थना करीत आहोंत; तर आतां वारंवार विचार कसला करीत आहेस बरें ? हरिदश्व इन्द्रा, आमचे मनोरथ कोणते ते तुला माहित आहेत. तूं उदार आहेस, आम्ही तुझे आहोंतच. पण आमचे चित्तही तुझ्याच ठिकणी आहे. ६



नूत्ना॒ इदि॑न्द्र ते व॒यमू॒ती अ॑भूम न॒हि नू ते॑ अद्रिवः ।
वि॒द्मा पु॒रा परी॑णसः ॥ ७ ॥

नूत्नाः । इत् । इन्द्र । ते । वयम् । ऊती । अभूम । नहि । नु । ते । अद्रिऽवः ।
विद्म । पुरा । परीणसः ॥ ७ ॥

हे इन्द्र', तुझ्या संरक्षणाखाली आम्ही आज नव्यानेंच आलों आहोंत असे नव्हे. हे वजधरा, तुझें सर्वव्यापि सामर्थ्य आम्हांस अगदीं पूर्वीपसून ठाऊक आहे ७



वि॒द्मा स॑खि॒त्वमु॒त शू॑र भो॒ज्य१॒॑मा ते॒ ता व॑ज्रिन्नीमहे ।
उ॒तो स॑मस्मि॒न्ना शि॑शीहि नो वसो॒ वाजे॑ सुशिप्र॒ गोम॑ति ॥ ८ ॥

विद्म । सखिऽत्वम् । उत । शूर । भोज्यम् । आ । ते । ता । वज्रिन् । ईमहे ।
उतो इति । समस्मिन् । आ । शिशीहि । नः । वसो इति । वाजे । सुऽशिप्र । गोऽमति ॥ ८ ॥

तुझें सख्य किती प्रेमळ असतें तें आम्ही जाणतो, हे शूरा तुझे दातृत्वही आम्ही जाणतो. म्हणूनच हे वज्रधरा, त्या दोन्ही गोष्टींची आम्ही तुझ्याजवळ याचना करीत आहीं. तर सर्व प्रकारे आमचा उत्कर्ष कर. हे दिव्यनिधाना, हे शोमन मुकुटधरा, प्रकाश गोधनाच्या प्राप्तीकरतां चाललेल्या युद्धांत आमचा उत्कर्ष कर ८.



यो न॑ इ॒दमि॑दं पु॒रा प्र वस्य॑ आनि॒नाय॒ तमु॑ वः स्तुषे ।
सखा॑य॒ इन्द्र॑मू॒तये॑ ॥ ९ ॥

यः । नः । इदम्ऽइदम् । पुरा । प्र । वस्यः । आऽनिनाय । तम् । ऊं इति । वः । स्तुषे ।
सखायः । इन्द्रम् । ऊतये ॥ ९ ॥

ज्याने पूर्वी आमच्याग्राठीं हेंच तेंच काय, पण सर्व उत्कृष्ट वस्तू आणल्या, त्या इन्द्राचीच हे मित्रांनो, मी तुमच्या रक्षणासाठी स्तुति करीत आहे ९.



हर्य॑श्वं॒ सत्प॑तिं चर्षणी॒सहं॒ स हि ष्मा॒ यो अम॑न्दत ।
आ तु नः॒ स व॑यति॒ गव्य॒मश्व्यं॑ स्तो॒तृभ्यो॑ म॒घवा॑ श॒तम् ॥ १० ॥

हरिऽअश्वम् । सत्ऽपतिम् । चर्षणिऽसहम् । सः । हि । स्म । यः । अमन्दत ।
आ । तु । नः । सः । वयति । गव्यम् । अश्व्यम् । स्तोतृऽभ्यः । मघऽवा । शतम् ॥ १० ॥

त्याची स्तुति करीत आहे कीं जो हरिदश्व, सज्जनप्रतिपालक आणि प्राणिमात्रांवर सत्ता चालावेणारा आहे. तोच तो सोमरसाने हृष्टचित्त झाला आणि म्हणून शेंकडो गोसमूह अणि अश्वसमूह तो औदार्यशालि देव आम्हां स्तोतृजनांना अर्पण करितो. १०.



त्वया॑ ह स्विद्यु॒जा व॒यं प्रति॑ श्व॒सन्तं॑ वृषभ ब्रुवीमहि ।
सं॒स्थे जन॑स्य॒ गोम॑तः ॥ ११ ॥

त्वया । ह । स्वित् । युजा । वयम् । प्रति । श्वसन्तम् । वृषभ । ब्रुवीमहि ।
सम्ऽस्थे । जनस्य । गोऽमतः ॥ ११ ॥

तूं आमचा पाठिराखा असलास म्हणजे तुझ्या सहायानें आम्ही गोधनसंपन्न लोकांच्या प्रदेशात, हे वीर पुंगवा, आमच्यावर फूं फूं करीत धावून येणाऱ्या शत्रचूा खरपूस समाचार घेऊं. ११.



जये॑म का॒रे पु॑रुहूत का॒रिणो॒ऽभि ति॑ष्ठेम दू॒ढ्यः॑ ।
नृभि॑र्वृ॒त्रं ह॒न्याम॑ शूशु॒याम॒ चावे॑रिन्द्र॒ प्र णो॒ धियः॑ ॥ १२ ॥

जयेम । कारे । पुरुऽहूत । कारिणः । अभि । तिष्ठेम । दुःऽध्यः ।
नृऽभिः । वृत्रम् । हन्याम । शूशुयाम । च । अवेः । इन्द्र । प्र । नः । धियः ॥ १२ ॥

हे सर्वजनस्तुत देवा, आम्ही युद्धांत योध्यावर जयच मिळवू, पापबुद्धि बाळगणाऱ्या दुष्टाला पुरून उरू, शुरूसैनिकांसह ज्ञानाच्या शत्रलूा ठार करूं आणि स्वत; उत्कर्ष पावूं; म्हणून हे इन्द्रा, आमच्या सद्‌बुद्धीचें तूं संरक्षण कर १२.



अ॒भ्रा॒तृ॒व्यो अ॒ना त्वमना॑पिरिन्द्र ज॒नुषा॑ स॒नाद॑सि ।
यु॒धेदा॑पि॒त्वमि॑च्छसे ॥ १३ ॥

अभ्रातृव्यः । अना । त्वम् । अनापिः । इन्द्र । जनुषा । सनात् । असि ।
युधा । इत् । आपिऽत्वम् । इच्छसे ॥ १३ ॥

तुला कोणी भाऊ नाहीं बन्द नाहीं; तुझा दुसरा कोणी नियंता नाहीं, किंवा हे इन्द्रा, कोणी आप्तेष्टही नाहीं. तूं प्रादुर्भूत झालास तेव्हांपासून म्हणजे पुरातन काळापासून तं आहेस तसा स्वतंत्रच आहेस. आणि युद्धाच्या योगानेंच तुझें आप्तपण भक्तांनी मिळवावें अशी तुली इच्छा आहे. १३.



नकी॑ रे॒वन्तं॑ स॒ख्याय॑ विन्दसे॒ पीय॑न्ति ते सुरा॒श्वः॑ ।
य॒दा कृ॒णोषि॑ नद॒नुं समू॑ह॒स्यादित्पि॒तेव॑ हूयसे ॥ १४ ॥

नकिः । रेवन्तम् । सख्याय । विन्दसे । पीयन्ति । ते । सुराश्वः ।
यदा । कृणोषि । नदनुम् । सम् । ऊहसि । आत् । इत् । पिताऽइव । हूयसे ॥ १४ ॥

कोणत्याही धनाढ्य मनुष्याला तूं मित्र म्हणत नाहीस. कारण धनरूपी मद्याने धुंद झाल्याने ते तुझा कंटाळाच करतात; पण जेव्हां तूं सिंहनाद करतोस तेव्हां त्यांचा निकाल लावतोस, आणि पित्याला हांक मारावी त्याप्रमाणें भक्तजन तुलाच हांक मारतात १४.



मा ते॑ अमा॒जुरो॑ यथा मू॒रास॑ इन्द्र स॒ख्ये त्वाव॑तः ।
नि ष॑दाम॒ सचा॑ सु॒ते ॥ १५ ॥

मा । ते । अमाऽजुरः । यथा । मूरासः । इन्द्र । सख्ये । त्वाऽवतः ।
नि । सदाम । सचा । सुते ॥ १५ ॥

इन्द्रा, तूं आमचा सखा असतां, आमचें रक्षण तूं करीत असतां, आणि हे इन्द्रा, सोमरस पिळून तुझे भक्त तुला तो अर्पण करीत असतां, आम्ही मात्र घरांत असून खितपणाऱ्या एखाद्या मूर्खाप्रमाणे उगीच स्वस्थ पडून राहू असे कदापी होऊं देऊ नको १५.



मा ते॑ गोदत्र॒ निर॑राम॒ राध॑स॒ इन्द्र॒ मा ते॑ गृहामहि ।
दृ॒ळ्हा चि॑द॒र्यः प्र मृ॑शा॒भ्या भ॑र॒ न ते॑ दा॒मान॑ आ॒दभे॑ ॥ १६ ॥

मा । ते । गोऽदत्र । निः । अराम । राधसः । इन्द्र । मा । ते । गृहामहि ।
दृळ्हा । चित् । अर्यः । प्र । मृश । अभि । आ । भर । न । ते । दामानः । आऽदभे ॥ १६ ॥

गोधनदात्या इन्द्रा, तुझ्या कृपाप्रसादास आम्ही मुकूं असें करूं नकोस. जें तुझे आहे, जें तुला अर्पण झालें आहे, तें घेण्याची बुद्धि आम्हांस होऊं देऊं नकोस. तूं आमचा प्रभू आहेस तर ज्या वस्तू स्थिर आहेत त्यांनाच हात लाव आणि त्याच घेऊन ये. तुझ्या दातृत्वाला प्रतिबन्ध करण्याची ताकद कोणालाही नाहीं १६.



इन्द्रो॑ वा॒ घेदिय॑न्म॒घं सर॑स्वती वा सु॒भगा॑ द॒दिर्वसु॑ ।
त्वं वा॑ चित्र दा॒शुषे॑ ॥ १७ ॥

इन्द्रः । वा । घ । इत् । इयत् । मघम् । सरस्वती । वा । सुऽभगा । ददिः । वसु ।
त्वम् । वा । चित्र । दाशुषे ॥ १७ ॥

असली श्रेष्ठ देणगी एक इन्द्रच देऊं शकेल, सुमंगल जी सरस्वती तीही वरदान देईल. किंवा धनच द्यावयाचे तर, हे चित्रराजा, तूंही तें हविर्दात्या भक्ताला देऊं शकशील. १७.



चित्र॒ इद्राजा॑ राज॒का इद॑न्य॒के य॒के सर॑स्वती॒मनु॑ ।
प॒र्जन्य॑ इव त॒तन॒द्धि वृ॒ष्ट्या स॒हस्र॑म॒युता॒ दद॑त् ॥ १८ ॥

चित्रः । इत् । राजा । राजकाः । इत् । अन्यके । यके । सरस्वतीम् । अनु ।
पर्जन्यःऽइव । ततनत् । हि । वृष्ट्या । सहस्रम् । अयुता । ददत् ॥ १८ ॥

राजा असा एक चित्र हाच होऊन गेला. इतर दुसरे राजे नुसते नावाचेच राजे, दुसरे काय ? पर्जन्यानें वृष्टी करावी त्याप्रमाणे सरस्वती नदीच्या तीरावर त्यानें पैसा ओतला. हजारोंनीच काय पण लाखांनी त्यानें द्रव्य दिलें. १८.



ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त २२ ( अश्विनीकुमारसूक्त )

ऋषी - सोभरि काण्व देवता - अश्विनीकुमार छंद - १, ३, ५, ७ बृहती; २, ४, ६ सतोबृहती; ८ अनुष्टुभ्; १२ मध्ये ज्योति; अवशिष्ट-प्रगाथ



ओ त्यम॑ह्व॒ आ रथ॑म॒द्या दंसि॑ष्ठमू॒तये॑ ।
यम॑श्विना सुहवा रुद्रवर्तनी॒ आ सू॒र्यायै॑ त॒स्थथुः॑ ॥ १ ॥

ओ इति । त्यम् । अह्वे । आ । रथम् । अद्य । दंसिष्ठम् । ऊतये ।
यम् । अश्विना । सुऽहवा । रुद्रवर्तनी इति रुद्रऽवर्तनी । आ । सूर्यायै । तस्थथुः ॥ १ ॥

अहो, तुमचा जो अतिशय मनोहर रथ त्याला आज मी पाचारण करतो; ज्या रथावर हे मंगलआव्हान अश्विहो, हे रुद्रमार्गनुसारी विभूति हो, "सूर्या" नांवाच्या लावण्यलतिकेसाठी तुम्ही आरोरण केलें १.



पू॒र्वा॒युषं॑ सु॒हवं॑ पुरु॒स्पृहं॑ भु॒ज्युं वाजे॑षु॒ पूर्व्य॑म् ।
स॒च॒नाव॑न्तं सुम॒तिभिः॑ सोभरे॒ विद्वे॑षसमने॒हस॑म् ॥ २ ॥

पूर्वऽआयुषम् । सुऽहवम् । पुरुऽस्पृहम् । भुज्युम् । वाजेषु । पूर्व्यम् ।
सचनाऽवन्तम् । सुमतिऽभिः । सोभरे । विऽद्वेषसम् । अनेहसम् ॥ २ ॥

तो रथ असा कीं ज्याने पूर्वींच्या भक्ताचे पोषणच केलें, जो हाकेसरशी येतो, जो सर्वांना हवा हवासा वाटतो, भक्तांना समृद्ध करतो, हातघाईच्या युद्धांत सर्वांच्या पुढे राहतो, आणि हे सोभरे, सत्प्रेरणानी जो सर्वांना आपल्याला अनुसरण्यास लावतो, असा तो रथ स्वतः देवापासून अलिप्त आहेच; परंतु दुसऱ्या कोणाकडूनही त्याला उपसर्ग पोहोचू शकत नाहीं २.



इ॒ह त्या पु॑रु॒भूत॑मा दे॒वा नमो॑भिर॒श्विना॑ ।
अ॒र्वा॒ची॒ना स्वव॑से करामहे॒ गन्ता॑रा दा॒शुषो॑ गृ॒हम् ॥ ३ ॥

इह । त्या । पुरुऽभूतमा । देवा । नमःऽभिः । अश्विना ।
अर्वाचीना । सु । अवसे । करामहे । गन्तारा । दाशुषः । गृहम् ॥ ३ ॥

सर्वत्र वास्तव्य करणाऱ्या त्या अश्विदेवांना प्रणिपात करून आमच्या रक्षणासाठी त्यांना आमच्याकडे आणतो, कारण ते भक्ताच्या घरीं जाणारच. ३.



यु॒वो रथ॑स्य॒ परि॑ च॒क्रमी॑यत ई॒र्मान्यद्वा॑मिषण्यति ।
अ॒स्माँ अच्छा॑ सुम॒तिर्वां॑ शुभस्पती॒ आ धे॒नुरि॑व धावतु ॥ ४ ॥

युवोः । रथस्य । परि । चक्रम् । ईयते । ईर्मा । अन्यत् । वाम् । इषण्यति ।
अस्मान् । अच्छ । सुऽमतिः । वाम् । शुभः । पती इति । आ । धेनुःऽइव । धावतु ॥ ४ ॥

तुमच्या रथाचे चक्र आकाशा भोवती गरगर फिरत असते, आणि हे बुद्धिप्रेरकांनो, दुसरें जें चक्र आहे तें तुमच्याकडेच उत्सुकतेने राहतें, तर हे मंगलाधीश अश्वीहो, धेनू जशी वत्साकडे त्याप्रमाणें तुमची वत्सलता आमच्याकडे धावतच येवो. ४.



रथो॒ यो वां॑ त्रिवन्धु॒रो हिर॑ण्याभीशुरश्विना ।
परि॒ द्यावा॑पृथि॒वी भूष॑ति श्रु॒तस्तेन॑ नास॒त्या ग॑तम् ॥ ५ ॥

रथः । यः । वाम् । त्रिऽवन्धुरः । हिरण्यऽअभीशुः । अश्विना ।
परि । द्यावापृथिवी इति । भूषति । श्रुतः । तेन । नासत्या । आ । गतम् ॥ ५ ॥

तुमच्या रथांतील सारथ्याची बसण्याची जागा त्रिकोणाकृति आहे. आणि घोड्यांचे लगाम सुवर्णरज्जूंचे आहेत. तो रथ सर्व आकाशाला आणि पृथ्वीलाही प्रदक्षिणा करतो हें प्रसिद्धच आहे, तर हे सत्यस्वरूप देवांनो, आमच्याकडे या. ५.



द॒श॒स्यन्ता॒ मन॑वे पू॒र्व्यं दि॒वि यवं॒ वृके॑ण कर्षथः ।
ता वा॑म॒द्य सु॑म॒तिभिः॑ शुभस्पती॒ अश्वि॑ना॒ प्र स्तु॑वीमहि ॥ ६ ॥

दशस्यन्ता । मनवे । पूर्व्यम् । दिवि । यवम् । वृकेण । कर्षथः ।
ता । वाम् । अद्य । सुमतिऽभिः । शुभः । पती इति । अश्विना । प्र । स्तुवीमहि ॥ ६ ॥

मनु नामक भक्तासाठी अगदीं पुरातन काळी तुम्ही लाण्डग्याकडूनू जमीन नांगरून घेऊन धान्याचे पीक काढलेत हे मंगलाधीश अश्वीहो, असे जे तुम्ही पराक्रमी आहात, त्या तुमचे स्तवन आम्ही प्रेमळ अंतःकरणाने करू. ६.



उप॑ नो वाजिनीवसू या॒तमृ॒तस्य॑ प॒थिभिः॑ ।
येभि॑स्तृ॒क्षिं वृ॑षणा त्रासदस्य॒वं म॒हे क्ष॒त्राय॒ जिन्व॑थः ॥ ७ ॥

उप । नः । वाजिनीवसू इति वाजिनीऽवसू । यातम् । ऋतस्य । पथिऽभिः ।
येभिः । तृक्षिम् । वृषणा । त्रासदस्यवम् । महे । क्षत्राय । जिन्वथः ॥ ७ ॥

सत्वसामर्थ्यसंपन्न अश्वीहो, तुम्ही सनातन धर्माला अनुसरून आमच्याकडे या. हे वीर हो, ज्याच्या योगाने त्रसदस्युचा पुत्र तृक्षि त्याचें मन उत्कृष्ट अशा क्षात्रसामर्थ्याच्या ठिकणी तुझी जडवून दिलेत. ७.



अ॒यं वा॒मद्रि॑भिः सु॒तः सोमो॑ नरा वृषण्वसू ।
आ या॑तं॒ सोम॑पीतये॒ पिब॑तं दा॒शुषो॑ गृ॒हे ॥ ८ ॥

अयम् । वाम् । अद्रिऽभिः । सुतः । सोमः । नरा । वृषण्वसू इति वृषण्ऽवसू ।
आ । यातम् । सोमऽपीतये । पिबतम् । दाशुषः । गृहे ॥ ८ ॥

तुम्हांकरिता हा ग्राव्यांनीं पिळलेला सोमरस सिद्ध केला आहे. तर हे शूरांनो, हे वीर्यधनसंपन्नांनो, तुम्ही सोमप्राशनार्थ या आणि भक्ताच्या घरीं तो रस प्राशन करा. ८.



आ हि रु॒हत॑मश्विना॒ रथे॒ कोशे॑ हिर॒ण्यये॑ वृषण्वसू ।
यु॒ञ्जाथां॒ पीव॑री॒रिषः॑ ॥ ९ ॥

आ । हि । रुहतम् । अश्विना । रथे । कोशे । हिरण्यये । वृषण्वसू इति वृषण्ऽवसू ।
युञ्जाथाम् । पीवरीः । इषः ॥ ९ ॥

ज्या रथातील बैठक देखील सोन्याची आहे अशा रथावर तुम्ही आरोहण करा. हे वृष्टिसामर्थ्यसंपन्नांनो, प्राणिमात्राला पुष्टि देणारी जी उत्साहसमृद्धि तिची जोड भक्तांना द्या. ९.



याभिः॑ प॒क्थमव॑थो॒ याभि॒रध्रि॑गुं॒ याभि॑र्ब॒भ्रुं विजो॑षसम् ।
ताभि॑र्नो म॒क्षू तूय॑मश्वि॒ना ग॑तं भिष॒ज्यतं॒ यदातु॑रम् ॥ १० ॥

याभिः । पक्थम् । अवथः । याभिः । अध्रिऽगुम् । याभिः । बभ्रुम् । विऽजोषसम् ।
ताभिः । नः । मक्षु । तूयम् । अश्विना । आ । गतम् । भिषज्यतम् । यत् । आतुरम् ॥ १० ॥

ज्या शक्तिंनी तुम्ही पक्थाचे रक्षण केलेत, ज्यांनीं अध्रिगूचे रक्षण केलेंत, विरक्त झालेल्या बभ्रूचेंही ज्या योगांनी रक्षण केलेत; त्या शक्तिंनी हे अश्वीहो, तुम्ही सत्वर, अगदीं त्वरित आमच्याकडे या आणि आधिव्याधींनी जे पछाडले असतील, त्यांना तुमचे औषध द्या. १०.



यदध्रि॑गावो॒ अध्रि॑गू इ॒दा चि॒दह्नो॑ अ॒श्विना॒ हवा॑महे ।
व॒यं गी॒र्भिर्वि॑प॒न्यवः॑ ॥ ११ ॥

यत् । अध्रिऽगावः । अध्रिगू इत्यध्रिऽगू । इदा । चित् । अह्नः । अश्विना । हवामहे ।
वयम् । गीःऽभिः । विपन्यवः ॥ ११ ॥

संचारांत अप्रतिहत असणाऱ्या अश्वीहो, कर्तव्यांत अप्रतिहत असे आम्ही भक्त दिवसाच्या ह्या धटकेला तुमचे गुणसंकीर्तन करून तुम्हा अश्विदेवांना स्तवनवाणींनी हांक मारीत आहों. ११.



ताभि॒रा या॑तं वृष॒णोप॑ मे॒ हवं॑ वि॒श्वप्सुं॑ वि॒श्ववा॑र्यम् ।
इ॒षा मंहि॑ष्ठा पुरु॒भूत॑मा नरा॒ याभिः॒ क्रिविं॑ वावृ॒धुस्ताभि॒रा ग॑तम् ॥ १२ ॥

ताभिः । आ । यातम् । वृषणा । उप । मे । हवम् । विश्वऽप्सुम् । विश्वऽवार्यम् ।
इषा । मंहिष्ठा । पुरुऽभूतमा । नरा । याभिः । क्रिविम् । ववृधुः । ताभिः । आ । गतम् ॥ १२ ॥

तर वीर्यशालि विभूतींनो त्या पूर्वींच्याच सामर्थ्यानिशी येऊन माझ्या हाकेला ओ द्या. माझी हांक नानास्वरूपाची आहे. सर्व तर्‍हेच्या लोकांना देखील ती प्रिय वाटते, तर त्या हाकेसरशी या. हे सर्वश्रेष्ठांनो, हे सर्वगामी वीरांनों, ज्या उत्साहवृत्तिंनी तुम्ही क्रिविचा उत्कर्ष वेलात त्याच उत्साहवित्तिंनी तुम्ही आमच्याकडेही या. १२.



तावि॒दा चि॒दहा॑नां॒ ताव॒श्विना॒ वन्द॑मान॒ उप॑ ब्रुवे ।
ता उ॒ नमो॑भिरीमहे ॥ १३ ॥

तौ । इदा । चित् । अहानाम् । तौ । अश्विना । वन्दमानः । उप । ब्रुवे ।
तौ । ऊं इति । नमःऽभिः । ईमहे ॥ १३ ॥

आजच्या दिवसाच्या ह्या घटकेला मी त्या अश्विदेवांना प्रणिपात करून त्यांची करुणाभाकतों, आणि हात जोडून त्यांची प्रार्थना करतो. १३.



ताविद्दो॒षा ता उ॒षसि॑ शु॒भस्पती॒ ता याम॑न्रु॒द्रव॑र्तनी ।
मा नो॒ मर्ता॑य रि॒पवे॑ वाजिनीवसू प॒रो रु॑द्रा॒वति॑ ख्यतम् ॥ १४ ॥

तौ । इत् । दोषा । तौ । उषसि । शुभः । पती इति । ता । यामन् । रुद्रवर्तनी इति रुद्रऽवर्तनी ।
मा । नः । मर्ताय । रिपवे । वाजिनीवसू इति वाजिनीऽवसू । परः । रुद्रौ । अति । ख्यतम् ॥ १४ ॥

त्यांनाच सायंकाळी, त्यांनाच प्रभातकाळीं, इतकेच काय, पण येतां जातां देखील त्या मंगलाधीश अश्वींची, त्या रुद्रमार्गानुसारी देवांची मी प्रार्थना करतो. हे सत्वसामर्थ्यसंपन्नांनो, हे रुद्रस्वरूप अश्वींनो, जो मनष्य .आमचे शत्रूत्व करतो त्याच्या स्वाधीन करून आम्हांला तुम्हीं आपल्यापासून दूर लोटूं नका. १४



आ सुग्म्या॑य॒ सुग्म्यं॑ प्रा॒ता रथे॑ना॒श्विना॑ वा स॒क्षणी॑ ।
हु॒वे पि॒तेव॒ सोभ॑री ॥ १५ ॥

आ । सुग्म्याय । सुग्म्यम् । प्रातरिति । रथेन । अश्विना । वा । सक्षणी इति ।
हुवे । पिताऽइव । सोभरी ॥ १५ ॥

-सुखशांति प्राप्त व्हावी म्हणून शांत चित्ताने आपल्या रथांतून प्रातःकाली भक्ताकडे झटकन येणारे जे अश्वीदेव त्यांची प्रार्थना मी सोभरी, पित्याची प्रार्थना करावी त्याप्रमाणें करतो १५.



मनो॑जवसा वृषणा मदच्युता मक्षुंग॒माभि॑रू॒तिभिः॑ ।
आ॒रात्ता॑च्चिद्भूतम॒स्मे अव॑से पू॒र्वीभिः॑ पुरुभोजसा ॥ १६ ॥

मनःऽजवसा । वृषणा । मदऽच्युता । मक्षुम्ऽगमाभिः । ऊतिऽभिः ।
आरात्तात् । चित् । भूतम् । अस्मे इति । अवसे । पूर्वीभिः । पुरुऽभोजसा ॥ १६ ॥

हे मनाप्रमाणे वेगवान् अश्वीहो, हे वीर्यशालि मदरहित अश्वीहो त्वरित येऊन पोहोचणाऱ्या सहायक शक्तिंसह आमच्याकडे या; हे विश्वपोषक देवांनो, अशा शेकडों शक्तिंनिशी सज्ज होऊन आमच्या संरक्षणाकरितां आमच्या जवळ असा. १६.



आ नो॒ अश्वा॑वदश्विना व॒र्तिर्या॑सिष्टं मधुपातमा नरा ।
गोम॑द्दस्रा॒ हिर॑ण्यवत् ॥ १७ ॥

आ । नः । अश्वऽवत् । अश्विना । वर्तिः । यासिष्टम् । मधुऽपातमा । नरा ।
गोऽमत् । दस्रा । हिरण्यऽवत् ॥ १७ ॥

हे अश्वीहो ! आमचे यज्ञगृह अश्वांनी संपन्न आहे, हे मधुररसलालस देवांनो, गोधनांनी परिष्कृत आहे, हें दर्शनीय विभूतींनो, तें संपत्तिनेही परिपूर्ण आहे, तर अशा आमच्या यज्ञगृहात तुम्ही आगमन कराच. १७.



सु॒प्रा॒व॒र्गं सु॒वीर्यं॑ सु॒ष्ठु वार्य॒मना॑धृष्टं रक्ष॒स्विना॑ ।
अ॒स्मिन्ना वा॑मा॒याने॑ वाजिनीवसू॒ विश्वा॑ वा॒मानि॑ धीमहि ॥ १८ ॥

सुऽप्रावर्गम् । सुऽवीर्यम् । सुष्ठु । वार्यम् । अनाधृष्टम् । रक्षस्विना ।
अस्मिन् । आ । वाम् । आऽयाने । वाजिनीवसू इति वाजिनीऽवसू । विश्वा । वामानि । धीमहि ॥ १८ ॥

उत्कृष्ट औदार्य, उत्तम वीर्य, आणि दुष्ट राक्षसांनाही दाद न देणारे असें अभिलषणीय सामर्थ्य तुमच्या आगमनांतच साठविलेले आहे, तर हे सत्वसामर्थ्यसंपन्नांनो, आम्हींही त्या आगमनांतच यच्यावत् उत्कृष्ट वस्तूंचा लाभ ध्यानबलानें करून घेऊं. १८



ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त २३ ( अग्निसूक्त )

ऋषी - विश्वमनस् वैयश्व देवता - अग्नि छंद - उष्णिह



ईळि॑ष्वा॒ हि प्र॑ती॒व्यं१॒॑ यज॑स्व जा॒तवे॑दसम् ।
च॒रि॒ष्णुधू॑म॒मगृ॑भीतशोचिषम् ॥ १ ॥

ईळिष्व । हि । प्रतीव्यम् । यजस्व । जातऽवेदसम् ।
चरिष्णुऽधूमम् । अगृभीतऽशोचिषम् ॥ १ ॥

ज्याचा प्रतिकर करणे अशक्य अशा त्या सर्वज्ञ अग्नीची स्तुति कर. ज्याचा धूम सर्वसंचारी, ज्याचे तेज दुर्दम्य, त्या अग्नीचे यजन कर १.



दा॒मानं॑ विश्वचर्षणे॒ऽग्निं वि॑श्वमनो गि॒रा ।
उ॒त स्तु॑षे॒ विष्प॑र्धसो॒ रथा॑नाम् ॥ २ ॥

दामानम् । विश्वऽचर्षणे । अग्निम् । विश्वऽमनः । गिरा ।
उत । स्तुषे । विऽस्पर्धसः । रथानाम् ॥ २ ॥

हे सर्वदर्शी, सर्वान्तर्यामी देवा, मत्सररहित भक्ताला रथादिक देणारा जो तूं त्या अग्निचे मी विश्वमना भक्त स्तवन करीत आहे. २.



येषा॑माबा॒ध ऋ॒ग्मिय॑ इ॒षः पृ॒क्षश्च॑ नि॒ग्रभे॑ ।
उ॒प॒विदा॒ वह्नि॑र्विन्दते॒ वसु॑ ॥ ३ ॥

येषाम् । आऽबाधः । ऋग्मियः । इषः । पृक्षः । च । निऽग्रभे ।
उपऽविदा । वह्निः । विन्दते । वसु ॥ ३ ॥

शत्रुनाशक आणि ऋक्‌स्तोत्रप्रिय अग्नि ज्यांच्या उत्साहाचा आणि बलाचा निग्रह करतो त्यांचें हें वर्ग कळल्याच्या योगाने हवि अर्पण करणारा भक्त आपलें अभिष्ट सहज प्राप्त करून घेतो. ३.



उद॑स्य शो॒चिर॑स्थाद्दीदि॒युषो॒ व्य१॒॑जर॑म् ।
तपु॑र्जम्भस्य सु॒द्युतो॑ गण॒श्रियः॑ ॥ ४ ॥

उत् । अस्य । शोचिः । अस्थात् । दीदियुषः । वि । अजरम् ।
तपुःऽजम्भस्य । सुऽद्युतः । गणऽश्रियः ॥ ४ ॥

पहा, या दैदीप्यमान अग्निचे, ह्या तीव्रज्वाल, सुप्रकाश आणि सकलगुणांचे शोभाधिष्ठान अशा अग्निचे अक्षय तेज प्रकट झाले आहे. ४



उदु॑ तिष्ठ स्वध्वर॒ स्तवा॑नो दे॒व्या कृ॒पा ।
अ॒भि॒ख्या भा॒सा बृ॑ह॒ता शु॑शु॒क्वनिः॑ ॥ ५ ॥

उत् । ऊं इति । तिष्ठ । सुऽअध्वर । स्तवानः । देव्या । कृपा ।
अभिऽख्या । भासा । बृहता । शुशुक्वनिः ॥ ५ ॥

ज्या तुझा अध्वरयाग उत्तम रीतीनें शेवटास जातो अशा अग्निदेवा, तुझ्या दिव्य कृपेमुळे, प्रख्यातीमुळे, आणि महत्तेजामुळे तुझे स्तवन होत असतें; तर तीव्रप्रकाश असा तूं आमच्या दृष्टिपुढे असाच रहा. ५.



अग्ने॑ या॒हि सु॑श॒स्तिभि॑र्ह॒व्या जुह्वा॑न आनु॒षक् ।
यथा॑ दू॒तो ब॒भूथ॑ हव्य॒वाह॑नः ॥ ६ ॥

अग्ने । याहि । सुशस्तिऽभिः । हव्या । जुह्वानः । आनुषक् ।
यथा । दूतः । बभूथ । हव्यऽवाहनः ॥ ६ ॥

अग्निदेवा, आमच्या उत्कृष्ट स्तवनांसह दिव्यलोकीं गमन कर. तूं आमच्या हविर्भागाचे तत्काळ हवन करून ते हविर्भाग देवांस पोहोंचविणारा दूत झाला आहेस. ६.



अ॒ग्निं वः॑ पू॒र्व्यं हु॑वे॒ होता॑रं चर्षणी॒नाम् ।
तम॒या वा॒चा गृ॑णे॒ तमु॑ वः स्तुषे ॥ ७ ॥

अग्निम् । वः । पूर्व्यम् । हुवे । होतारम् । चर्षणीनाम् ।
तम् । अया । वाचा । गृणे । तम् । ऊं इति । वः । स्तुषे ॥ ७ ॥

मानवांचा पुरातन होता जो अग्नि, त्याला मी तुमच्यासाठी पाचारण करतो. ह्या सूक्तांनी मीं त्याचीच स्तुति करतो, तुम्हांकरितां त्यालाच आळवीतों. ७.



य॒ज्ङेभि॒रद्भु॑तक्रतुं॒ यं कृ॒पा सू॒दय॑न्त॒ इत् ।
मि॒त्रं न जने॒ सुधि॑तमृ॒ताव॑नि ॥ ८ ॥

यज्ञेभिः । अद्भुतऽक्रतुम् । यम् । कृपा । सूदयन्ते । इत् ।
मित्रम् । न । जने । सुऽधितम् । ऋतऽवनि ॥ ८ ॥

अद्‌भुतपराक्रमी अग्निला त्याच्याच कृपेच्या योगाने भक्तजन यज्ञांनी संतुष्ट करतात. तो सद्धर्मरत भक्तांमध्ये प्रेमळपणानें राहणाऱ्या मित्राप्रमाणें आहे. ८.



ऋ॒तावा॑नमृतायवो य॒ज्ङस्य॒ साध॑नं गि॒रा ।
उपो॑ एनं जुजुषु॒र्नम॑सस्प॒दे ॥ ९ ॥

ऋतऽवानम् । ऋतऽयवः । यज्ञस्य । साधनम् । गिरा ।
उषः । एनम् । जुजुषुः । नमसः । पदे ॥ ९ ॥

सद्धर्मरत भक्तानों, सद्धर्मप्रतिपलक आणि यज्ञाचा संपादक जो अग्नि त्याची उपासना, त्याला प्रणिपात करण्याला योग्य जें यज्ञस्थान त्या स्थानी भक्तजनांनी केली आहे. ९.



अच्छा॑ नो॒ अङ्गि॑रस्तमं य॒ज्ङासो॑ यन्तु सं॒यतः॑ ।
होता॒ यो अस्ति॑ वि॒क्ष्वा य॒शस्त॑मः ॥ १० ॥

अच्छ । नः । अङ्गिरःऽतमम् । यज्ञासः । यन्तु । सम्ऽयतः ।
होता । यः । अस्ति । विक्षु । आ । यशःऽतमः ॥ १० ॥

अंगिरा ऋषिला अत्यंत पूज्य जो अग्नि त्या अग्नीकडे आमचे यथासाङ्‌ग यज्ञ जाऊन पोहोंचोत. अग्नि हा सर्प मानवजातीचा अत्यंत यशस्वी असा पुरोहित आहे. १०



अग्ने॒ तव॒ त्ये अ॑ज॒रेन्धा॑नासो बृ॒हद्भाः ।
अश्वा॑ इव॒ वृष॑णस्तविषी॒यवः॑ ॥ ११ ॥

अग्ने । तव । त्ये । अजर । इन्धानासः । बृहत् । भाः ।
अश्वाःऽइव । वृषणः । तविषीऽयवः ॥ ११ ॥

हे अग्ने, हे अजरामर देवा, धगधगीत पेटलेल्या त्या तुझ्या प्रचंड ज्वाला वीर्यवान् अश्वाप्रमाणे आपला धूमधडाका चालवू पहात आहेत. ११.



स त्वं न॑ ऊर्जां पते र॒यिं रा॑स्व सु॒वीर्य॑म् ।
प्राव॑ नस्तो॒के तन॑ये स॒मत्स्वा ॥ १२ ॥

सः । त्वम् । नः । ऊर्जाम् । पते । रयिम् । रास्व । सुऽवीर्यम् ।
प्र । अव । नः । तोके । तनये । समत्ऽसु । आ ॥ १२ ॥

हे ऊर्जस्वितेच्या प्रभो, तूं असा आहेस तर उत्कृष्ट शौर्य उत्पन्न करणारे जे श्रेष्ठधन आहे तें आम्हांस दे, आणि संग्रामांमध्यें आमच्या मुलाबाळाचे संरक्षण कर. १२.



यद्वा उ॑ वि॒श्पतिः॑ शि॒तः सुप्री॑तो॒ मनु॑षो वि॒शि ।
विश्वेद॒ग्निः प्रति॒ रक्षां॑सि सेधति ॥ १३ ॥

यत् । वै । ऊं इति । विश्पतिः । शितः । सुऽप्रीतः । मनुषः । विशि ।
विश्वा । इत् । अग्निः । प्रति । रक्षांसि । सेधति ॥ १३ ॥

पहा, जेव्हां लोकपालक, परंतु प्रखरतेजाचा अग्नि संतुष्ट होतो, तेव्हां मानवजातीमध्ये वावरणारे जितके राक्षस असतील त्या सर्वांचा तो पार नायनाट करतो. १३.



श्रु॒ष्ट्य॑ग्ने॒ नव॑स्य मे॒ स्तोम॑स्य वीर विश्पते ।
नि मा॒यिन॒स्तपु॑षा र॒क्षसो॑ दह ॥ १४ ॥

श्रुष्टी । अग्ने । नवस्य । मे । स्तोमस्य । वीर । विश्पते ।
नि । मायिनः । तपुषा । रक्षसः । दह ॥ १४ ॥

हे अग्ने, माझ्या अभिनव स्तोत्रांचा खरा श्रोता तूंच; तर हे वीरा, हे लोकपालका, फसवेगिरी करणाऱ्या दुष्ट राक्षसांची तूं आपल्या ज्वालेने राखरांगोळी कर. १४.



न तस्य॑ मा॒यया॑ च॒न रि॒पुरी॑शीत॒ मर्त्यः॑ ।
यो अ॒ग्नये॑ द॒दाश॑ ह॒व्यदा॑तिभिः ॥ १५ ॥

न । तस्य । मायया । चन । रिपुः । ईशीत । मर्त्यः ।
यः । अग्नये । ददाश । हव्यदातिऽभिः ॥ १५ ॥

जो भक्त हविर्दानाने अग्नीला आपली सेवा अर्पण करतो त्या भक्तावर कोणीही मर्त्यशत्रु आपल्या मायाजालाने यत्किंचित् देखील मात्रा चालवू शकत नाहीं. १५.



व्य॑श्वस्त्वा वसु॒विद॑मुक्ष॒ण्युर॑प्रीणा॒दृषिः॑ ।
म॒हो रा॒ये तमु॑ त्वा॒ समि॑धीमहि ॥ १६ ॥

विऽअश्वः । त्वा । वसुऽविदम् । उक्षण्युः । अप्रीणात् । ऋषिः ।
महः । राये । तम् । ऊं इति । त्वा । सम् । इधीमहि ॥ १६ ॥

दिव्यधनदायक अशा तुला शौर्य गाजविण्याची दूच्छा धरणारा जो व्यश्व त्यानें संतुष्ट केले; तसेंच आम्हीहि श्रेष्ठधनाच्या प्राप्तीसाठी तुला प्रज्वलित करून संतुष्ट करीत आहोंत. १६



उ॒शना॑ का॒व्यस्त्वा॒ नि होता॑रमसादयत् ।
आ॒य॒जिं त्वा॒ मन॑वे जा॒तवे॑दसम् ॥ १७ ॥

उशना । काव्यः । त्वा । नि । होतारम् । असादयत् ।
आऽयजिम् । त्वा । मनवे । जातऽवेदसम् ॥ १७ ॥

काव्य उशना याने सक्तवस्तुज्ञाता यज्ञपुरुष जो तूं दि तुझी स्थापना मनुराजासाठी पुरोहित म्हणून केली. १७.



विश्वे॒ हि त्वा॑ स॒जोष॑सो दे॒वासो॑ दू॒तमक्र॑त ।
श्रु॒ष्टी दे॑व प्रथ॒मो य॒ज्ङियो॑ भुवः ॥ १८ ॥

विश्वे । हि । त्वा । सऽजोषसः । देवासः । दूतम् । अक्रत ।
श्रुष्टी । देव । प्रथमः । यज्ञियः । भुवः ॥ १८ ॥

सर्व भक्तवत्सल दिग्धविभूतींनी तुला आपला प्रतिनिधि केले, तेव्हां हे देवा, तूंच पहिला यज्ञभोक्ता म्हणून विश्रुत झालास. १८.



इ॒मं घा॑ वी॒रो अ॒मृतं॑ दू॒तं कृ॑ण्वीत॒ मर्त्यः॑ ।
पा॒व॒कं कृ॒ष्णव॑र्तनिं॒ विहा॑यसम् ॥ १९ ॥

इमम् । घ । वीरः । अमृतम् । दूतम् । कृण्वीत । मर्त्यः ।
पावकम् । कृष्णऽवर्तनिम् । विऽहायसम् ॥ १९ ॥

वीर्यशाली भक्त मर्त्य आहे म्हणून त्यानें अमर अग्नीला, ह्या पतित पावनाला आणि भूभिमार्ग कृष्णवर्ण करणाऱ्या गगनगामी अग्नीलाच हव्यवाहक केलें पाहिजे. १९.



तं हु॑वेम य॒तस्रु॑चः सु॒भासं॑ शु॒क्रशो॑चिषम् ।
वि॒शाम॒ग्निम॒जरं॑ प्र॒त्नमीड्य॑म् ॥ २० ॥

तम् । हुवेम । यतऽस्रुचः । सुऽभासम् । शुक्रऽशोचिषम् ।
विशाम् । अग्निम् । अजरम् । प्रत्नम् । ईड्यम् ॥ २० ॥

म्हणून आम्हीही स्रुचा घेऊन सज्ज होतों, आणि परमदीप्तिमान ज्वलत्‌तेजस्व, अजरामर, पुरातन आणि स्तवनयोग्य असा मानवांचा देव जो अग्नि त्याची करुणा भाकतों. २०.



यो अ॑स्मै ह॒व्यदा॑तिभि॒राहु॑तिं॒ मर्तोऽवि॑धत् ।
भूरि॒ पोषं॒ स ध॑त्ते वी॒रव॒द्यशः॑ ॥ २१ ॥

यः । अस्मै । हव्यदातिऽभिः । आऽहुतिम् । मर्तः । अविधत् ।
भूरि । पोषम् । सः । धत्ते । वीरऽवत् । यशः ॥ २१ ॥

जो मर्त्य मानव, हविर्दानप्रवण ऋत्विजांकडून ह्या अग्निला आहुति अर्पण करून त्याची सेवा करतो, तो सर्वांचे पोषण करणारे आणि वीरांना योग्य असें यश प्राप्त करून घेतो. २१.



प्र॒थ॒मं जा॒तवे॑दसम॒ग्निं य॒ज्ङेषु॑ पू॒र्व्यम् ।
प्रति॒ स्रुगे॑ति॒ नम॑सा ह॒विष्म॑ती ॥ २२ ॥

प्रथमम् । जातऽवेदसम् । अग्निम् । यज्ञेषु । पूर्व्यम् ।
प्रति । स्रुक् । एति । नमसा । हविष्मती ॥ २२ ॥

सर्वज्ञ आणि आद्य असा जो अभि त्याच्याचकडे भक्ताची घृताहुतिपूर्ण स्रुचा यज्ञामध्ये त्याला नमस्कार करून प्रथम वळते. २२.



आभि॑र्विधेमा॒ग्नये॒ ज्येष्ठा॑भिर्व्यश्व॒वत् ।
मंहि॑ष्ठाभिर्म॒तिभिः॑ शु॒क्रशो॑चिषे ॥ २३ ॥

आभिः । विधेम । अग्नये । ज्येष्ठाभिः । व्यश्वऽवत् ।
मंहिष्ठाभिः । मतिऽभिः । शुक्रऽशोचिषे ॥ २३ ॥

व्यश्व ऋषिप्रमाणें आम्हीही आमच्या ह्या अत्युकृष्ट आणि अत्यंत प्रशस्त अशा मननीयस्तुतिंनी ज्वलत्‌तेजस्क अग्नीची सेवा करू. २३.



नू॒नम॑र्च॒ विहा॑यसे॒ स्तोमे॑भिः स्थूरयूप॒वत् ।
ऋषे॑ वैयश्व॒ दम्या॑या॒ग्नये॑ ॥ २४ ॥

नूनम् । अर्च । विऽहायसे । स्तोमेभिः । स्थूरयूपऽवत् ।
ऋषे । वैयश्व । दम्याय । अग्नये ॥ २४ ॥

आणि हे व्यश्वा, तूं देखील अत्युदात्त गृहपति जो अग्नि त्याचें स्थूरयूप ऋषिप्रमाणे ऋक्‌स्तोत्रांनी अर्चन कर. २४.



अति॑थिं॒ मानु॑षाणां सू॒नुं वन॒स्पती॑नाम् ।
विप्रा॑ अ॒ग्निमव॑से प्र॒त्नमी॑ळते ॥ २५ ॥

अतिथिम् । मानुषाणाम् । सूनुम् । वनस्पतीनाम् ।
विप्राः । अग्निम् । अवसे । प्रत्नम् । ईळते ॥ २५ ॥

मानवांचा अतिथि आणि वनस्पतींपासून प्रकट होणारा जो सनातन अग्नि त्याची कृपा संपादन करण्यासाठीं स्तवनज्ञ भक्त त्याचें संकीर्तन करीत असतात. २५.



म॒हो विश्वाँ॑ अ॒भि ष॒तो॒३॒॑ऽभि ह॒व्यानि॒ मानु॑षा ।
अग्ने॒ नि ष॑त्सि॒ नम॒साधि॑ ब॒र्हिषि॑ ॥ २६ ॥

महः । विश्वान् । अभि । सतः । अभि । हव्यानि । मानुषा ।
अग्ने । नि । सत्सि । नमसा । अधि । बर्हिषि ॥ २६ ॥

सर्व मोठमोठ्या संतजनांकरितां, आणि आम्हां दीनमानवाच्या हविर्भागांचा स्वीकार करण्याकरितां, हे अग्निदेवा, तूं ह्या कुशासनावर विराजमान हो. २६.



वंस्वा॑ नो॒ वार्या॑ पु॒रु वंस्व॑ रा॒यः पु॑रु॒स्पृहः॑ ।
सु॒वीर्य॑स्य प्र॒जाव॑तो॒ यश॑स्वतः ॥ २७ ॥

वंस्व । नः । वार्या । पुरु । वंस्व । रायः । पुरुऽस्पृहः ।
सुऽवीर्यस्य । प्रजाऽवतः । यशस्वतः ॥ २७ ॥

आणि आम्हांस सर्वोकृष्ट वस्तु विपुल अर्पण कर; सर्वाना हवें हवेसे वाटणारे, वीरयुक्त, प्रजायुक्त आणि यशस्कर असे जें श्रेष्ठ धन तेही अर्पण कर. २७.



त्वं व॑रो सु॒षाम्णेऽग्ने॒ जना॑य चोदय ।
सदा॑ वसो रा॒तिं य॑विष्ठ॒ शश्व॑ते ॥ २८ ॥

त्वम् । वरो इति । सुऽसाम्ने । अग्ने । जनाय । चोदय ।
सदा । वसो इति । रातिम् । यविष्ठ । शश्वते ॥ २८ ॥

हे वरेण्या अग्ने, तुझ्या प्रीत्यर्थ सुंदर सामगीतें गाणाऱ्या सर्व भक्तजनाला तू स्फूर्ति दे; हे दिव्यनिधे, हे यौवनाढ्य देवा, सर्वांनाच तूं उत्कृष्ट वरदान दे. २८.



त्वं हि सु॑प्र॒तूरसि॒ त्वं नो॒ गोम॑ती॒रिषः॑ ।
म॒हो रा॒यः सा॒तिम॑ग्ने॒ अपा॑ वृधि ॥ २९ ॥

त्वम् । हि । सुऽप्रतूः । असि । त्वम् । नः । गोऽमतीः । इषः ।
महः । रायः । सातिम् । अग्ने । अप । वृधि ॥ २९ ॥

अभीष्टवस्तू उत्तम रीतीनें प्राप्त करून देणारा खरोखर तूंच आहेस; तर हे अग्निदेवा, गोधनसंपन्नतेस साजेल असा उत्साह आणि श्रेष्ठ वैभव यांचा लाभ मनमोकळेपणाने होईल असें कर. २९.



अग्ने॒ त्वं य॒शा अ॒स्या मि॒त्रावरु॑णा वह ।
ऋ॒तावा॑ना स॒म्राजा॑ पू॒तद॑क्षसा ॥ ३० ॥

अग्ने । त्वम् । यशाः । असि । आ । मित्रावरुणा । वह ।
ऋतऽवाना । सम्ऽराजा । पूतऽदक्षसा ॥ ३० ॥

अग्निदेवा, तूं यशोरूप आहेस, तर सद्धर्माचे प्रवर्तक विश्वाचे अधिपति, आणि पवित्रबलानें संपन्न असे जे मित्रावरुण त्यांना आमचेकडे घेऊन ये. ३०



ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त २४ ( इन्द्रसूक्त, वरु सौषाम्ण दानस्तुति)

ऋषी - विश्वमनस् देवता - १-२७ इन्द्र; २८-३० वरु सौषाम्ण दानस्तुति; छंद - १-२९ उष्णिह, ३० अनुश्टुभ्



सखा॑य॒ आ शि॑षामहि॒ ब्रह्मेन्द्रा॑य व॒ज्रिणे॑ ।
स्तु॒ष ऊ॒ षु वो॒ नृत॑माय धृ॒ष्णवे॑ ॥ १ ॥

सखायः । आ । शिषामहि । ब्रह्म । इन्द्राय । वज्रिणे ।
स्तुषे । ऊं इति । सु । वः । नृऽतमाय । धृष्णवे ॥ १ ॥

मित्रांनो, वज्रधर इन्द्राप्रीत्यर्थ सुंदर स्तोत्रांची स्फूर्ति व्हावी असा आपण आशीर्वाद मागू आणि शत्रूंना धडकी भरविणाऱ्या त्या वारोत्तमाचे स्तवन करूं. १.



शव॑सा॒ ह्यसि॑ श्रु॒तो वृ॑त्र॒हत्ये॑न वृत्र॒हा ।
म॒घैर्म॒घोनो॒ अति॑ शूर दाशसि ॥ २ ॥

शवसा । हि । असि । श्रुतः । वृत्रऽहत्येन । वृत्रऽहा ।
मघैः । मघोनः । अति । शूर । दाशसि ॥ २ ॥

तू आपल्या उफाड धडाडीनें सर्वप्रसिद्ध आहेसच; तूं वृत्राचा वध केल्या कारणानें तुला वृत्रनाशन हें नांव प्राप्त झालें; आणि हे वीरा, मोठमोठ्या दानशूरांना देखील तं आपल्या दातृत्वाने मागें टाकिलेस. २.



स नः॒ स्तवा॑न॒ आ भ॑र र॒यिं चि॒त्रश्र॑वस्तमम् ।
नि॒रे॒के चि॒द्यो ह॑रिवो॒ वसु॑र्द॒दिः ॥ ३ ॥

सः । नः । स्तवानः । आ । भर । रयिम् । चित्रश्रवःऽतमम् ।
निरेके । चित् । यः । हरिऽवः । वसुः । ददिः ॥ ३ ॥

ज्या तुझे स्तवन भक्तांकडून नित्य होतें असा तूं, अत्यंत अद्भुत म्हणून जें प्रसिद्ध असेल तें ऐश्वर्य आम्हांस दे. कारण जेथे कांहींच नसतें अशा ठिकाणीं देखील, हे हरीदश्व इन्द्रा, तूं दिव्यनिधान देव वैभवदाता होतोस. ३.



आ नि॑रे॒कमु॒त प्रि॒यमिन्द्र॒ दर्षि॒ जना॑नाम् ।
धृ॒ष॒ता धृ॑ष्णो॒ स्तव॑मान॒ आ भ॑र ॥ ४ ॥

आ । निरेकम् । उत । प्रियम् । इन्द्र । दर्षि । जनानाम् ।
धृषता । धृष्णो इति । स्तवमानः । आ । भर ॥ ४ ॥

सर्व लोकांना प्रिय आणि निरुपम अशी जी वस्तू आहे ती तूं प्रकट कर. हे धैर्यसागरा, तुझे स्तवन सर्वत्र मोठ्या धोशाने चालले असतें, तर ती वस्तु तूं भक्तांसाठी घेऊन ये. ४.



न ते॑ स॒व्यं न दक्षि॑णं॒ हस्तं॑ वरन्त आ॒मुरः॑ ।
न प॑रि॒बाधो॑ हरिवो॒ गवि॑ष्टिषु ॥ ५ ॥

न । ते । सव्यम् । न । दक्षिणम् । हस्तम् । वरन्ते । आऽमुरः ।
न । परिऽबाधः । हरिऽवः । गोऽइष्टिषु ॥ ५ ॥

डावा हात असो किंवा उजवा असो, तुझा कोणताही हात घातकी दुष्ट धरूं शकत नाहीत आणि हे हरिदश्वा इन्द्रा, तूं प्रकाशगोधन आणण्याला प्रवृत्त होतोस तेव्हां तुला अडथळा करतील इतके कोणीच शक्तिमान नाहींत. ५.



आ त्वा॒ गोभि॑रिव व्र॒जं गी॒र्भिरृ॑णोम्यद्रिवः ।
आ स्मा॒ कामं॑ जरि॒तुरा मनः॑ पृण ॥ ६ ॥

आ । त्वा । गोभिःऽइव । व्रजम् । गीःऽभिः । ऋणोमि । अद्रिऽवः ।
आ । स्म । कामम् । जरितुः । आ । मनः । पृण ॥ ६ ॥

धेनूंसह आपल्या निवासस्थानी जावे त्याप्रमाणें, स्तुतिगोधनासह, हे वज्रधरा, मी तुजकडे येत आहें; तर मज भक्ताचा हेतु, मज भक्ताचा मनोरथ तूं परिपूर्ण कर. ६



विश्वा॑नि वि॒श्वम॑नसो धि॒या नो॑ वृत्रहन्तम ।
उग्र॑ प्रणेत॒रधि॒ षू व॑सो गहि ॥ ७ ॥

विश्वानि । विश्वऽमनसः । धिया । नः । वृत्रहन्ऽतम ।
उग्र । प्रनेतरिति प्रऽनेतः । अधि । सु । वसो इति । गहि ॥ ७ ॥

वृत्र राक्षसाला अगदीं ठार मारून टाकणाऱ्या शत्रुभयंकरा देवा, हे सन्मार्गदर्शका, हे दिव्यनिधे, विश्वमना नामक ऋषीच्या ध्यानाने तूं संतुष्ट हो आणि त्याच्या सर्व अडचणींची चिन्ता वहा. ७.



व॒यं ते॑ अ॒स्य वृ॑त्रहन्वि॒द्याम॑ शूर॒ नव्य॑सः ।
वसोः॑ स्पा॒र्हस्य॑ पुरुहूत॒ राध॑सः ॥ ८ ॥

वयम् । ते । अस्य । वृत्रऽहन् । विद्याम । शूर । नव्यसः ।
वसोः । स्पार्हस्य । पुरुऽहूत । राधसः ॥ ८ ॥

हे वृत्रनाशना वीरा, ह्या तुझ्या अपूर्व, स्पृहणीय दिव्यनिधींचा आणि कृपाप्रसादाचा आम्ही लाभ घेऊं असें, हे सर्व जनस्तुत देवा, तूं कर. ८.



इन्द्र॒ यथा॒ ह्यस्ति॒ तेऽप॑रीतं नृतो॒ शवः॑ ।
अमृ॑क्ता रा॒तिः पु॑रुहूत दा॒शुषे॑ ॥ ९ ॥

इन्द्र । यथा । हि । अस्ति । ते । अपरिऽइतम् । नृतो इति । शवः ।
अमृक्ता । रातिः । पुरुऽहूत । दाशुषे ॥ ९ ॥

हे रणभैरवा इन्द्रा, तुझी धडाडी जशी अनिवार, तसेंच, हे सर्वजनस्तुत देवा, तुझे वरदानही अमोघच असते. ९.



आ वृ॑षस्व महामह म॒हे नृ॑तम॒ राध॑से ।
दृ॒ळ्हश्चि॑द्दृह्य मघवन्म॒घत्त॑ये ॥ १० ॥

आ । वृषस्व । महाऽमह । महे । नृऽतम । राधसे ।
दृळ्हः । चित् । दृह्य । मघऽवन् । मघत्तये ॥ १० ॥

तर, हे अत्यंत पूज्या, हे सर्वोत्तमा वीरा, तुझ्या कृपेचा वर्षांव तूं आम्हावर कर. हे भगवंता, अगदीं अभेद्य अशीं जी स्थाने असतील तीं आम्हांस ऐश्वर्यसंपन्न करण्यासाठी फोडून मोकळी कर. १०.



नू अ॒न्यत्रा॑ चिदद्रिव॒स्त्वन्नो॑ जग्मुरा॒शसः॑ ।
मघ॑वङ्छ॒ग्धि तव॒ तन्न॑ ऊ॒तिभिः॑ ॥ ११ ॥

नु । अन्यत्र । चित् । अद्रिऽवः । त्वत् । नः । जग्मुः । आऽशसः ।
मघऽवन् । शग्धि । तव । तत् । नः । ऊतिऽभिः ॥ ११ ॥

आमच्या आशा तुझ्यावाचून दुसरीकडे कोठेंही गुंतलेल्या नाहींत; तर हे भगवंता, आपल्या संरक्षण शक्तींच्या योगाने आम्हांस सामर्थ्यवान् कर. ११.



न॒ह्य१॒॑ङ्ग नृ॑तो॒ त्वद॒न्यं वि॒न्दामि॒ राध॑से ।
रा॒ये द्यु॒म्नाय॒ शव॑से च गिर्वणः ॥ १२ ॥

नहि । अङ्ग । नृतो इति । त्वत् । अन्यम् । विन्दामि । राधसे ।
राये । द्युम्नाय । शवसे । च । गिर्वणः ॥ १२ ॥

हे रणभैरवा, कृपाप्रसादासाठी म्हणा, अक्षय्य धनासाठी म्हणा, तेजोवैभवासाठीं म्हणा, किंवा उत्कटबलासाठीं म्हणा, पण हे स्तवनप्रिया देवा, तुझ्यावाचून दुसरे ठिकाणच मला आढळत नाहीं. १२.



एन्दु॒मिन्द्रा॑य सिङ्चत॒ पिबा॑ति सो॒म्यं मधु॑ ।
प्र राध॑सा चोदयाते महित्व॒ना ॥ १३ ॥

आ । इन्दुम् । इन्द्राय । सिञ्चत । पिबाति । सोम्यम् । मधु ।
प्र । राधसा । चोदयाते । महिऽत्वना ॥ १३ ॥

इन्द्राप्रीत्यर्थ पात्रांत सोमरस ओता. त्यांतील मधुररस तो प्राशन करो, आणि आपल्या महिम्यानें आणि कृपाप्रसादाने स्तोतृजनाला प्रेरणा करो. १३.



उपो॒ हरी॑णां॒ पतिं॒ दक्षं॑ पृ॒ङ्चन्त॑मब्रवम् ।
नू॒नं श्रु॑धि स्तुव॒तो अ॒श्व्यस्य॑ ॥ १४ ॥

उपो इति । हरीणाम् । पतिम् । दक्षम् । पृञ्चन्तम् । अब्रवम् ।
नूनम् । श्रुधि । स्तुवतः । अश्व्यस्य ॥ १४ ॥

हरिद्‌वर्ण अश्वांचा स्वामी, आणि भक्तांशी चातुर्यबलाचा संयोग करून देणारा जो इन्द्र त्याची मीं आताच प्रार्थना केली की देवा, तुझें स्तवन करणाऱ्या ह्या अश्व्यऋषीचा धांवा तूं ऐक. १४



न॒ह्य१॒॑ङ्ग पु॒रा च॒न ज॒ज्ङे वी॒रत॑र॒स्त्वत् ।
नकी॑ रा॒या नैवथा॒ न भ॒न्दना॑ ॥ १५ ॥

नहि । अङ्ग । पुरा । चन । जज्ञे । वीरऽतरः । त्वत् ।
नकिः । राया । न । एवऽथा । न । भन्दना ॥ १५ ॥

नाहीं, खचित अत्यंत शूर असा तुझ्या व्यतिरिक्त पूर्वी कोणीही झाला नाहीं. दिव्यैश्वर्याच्या दृष्टीने, पद्धतीच्या दृष्टीने, किंवा महत्वाच्या दृष्टीनेंही झाला नाहीं. १५.



एदु॒ मध्वो॑ म॒दिन्त॑रं सि॒ङ्च वा॑ध्वर्यो॒ अन्ध॑सः ।
ए॒वा हि वी॒रः स्तव॑ते स॒दावृ॑धः ॥ १६ ॥

आ । इत् । ऊं इति । मध्वः । मदिन्ऽतरम् । सिञ्च । वा । अध्वर्यो इति । अन्धसः ।
एव । हि । वीरः । स्तवते । सदाऽवृधः ॥ १६ ॥

मधुर पदार्थामध्ये अत्यंत आवेशप्रद असा हा सोमरस पात्रांत ओत; किंवा हे अध्वर्यु, तें सर्व पेयांमध्ये उत्कृष्ट असे पेय पात्रांत ओत. निरंतर अभिवृद्धि करणाऱ्या वीराचे स्तवन अशाच पद्धतीने होते. १६.



इन्द्र॑ स्थातर्हरीणां॒ नकि॑ष्टे पू॒र्व्यस्तु॑तिम् ।
उदा॑नंश॒ शव॑सा॒ न भ॒न्दना॑ ॥ १७ ॥

इन्द्र । स्थातः । हरीणाम् । नकिः । ते । पूर्व्यऽस्तुतिम् ।
उत् । आनंश । शवसा । न । भन्दना ॥ १७ ॥

हरिद्वर्ण अश्वांवर आरोहण करणाऱ्या इन्द्रा, पूर्वींच्या ऋषींनी तुझी जी स्तुति केली आहे तिची बरोबरी उत्कटतेने किंवा महत्वाने कोणाच्यानेंही होणे नाहीं. १७.



तं वो॒ वाजा॑नां॒ पति॒महू॑महि श्रव॒स्यवः॑ ।
अप्रा॑युभिर्य॒ज्ङेभि॑र्वावृ॒धेन्य॑म् ॥ १८ ॥

तम् । वः । वाजानाम् । पतिम् । अहूमहि । श्रवस्यवः ।
अप्रायुऽभिः । यज्ञेभिः । ववृधेन्यम् ॥ १८ ॥

अशा सत्वसामर्थ्यांचा तूं प्रभु, म्हणून आम्ही रक्षणेच्छु भक्तजन, सामची सर्वतोपरी अभिवृद्धि करणारा जो तूं त्या तुझ्याप्रीत्यर्थ दक्षतेने चालविलेल्या यशकर्मांनी हवन करीत असतो. १८.



एतो॒ न्विन्द्रं॒ स्तवा॑म॒ सखा॑यः॒ स्तोम्यं॒ नर॑म् ।
कृ॒ष्टीर्यो विश्वा॑ अ॒भ्यस्त्येक॒ इत् ॥ १९ ॥

एतो इति । नु । इन्द्रम् । स्तवाम । सखायः । स्तोम्यम् । नरम् ।
कृष्टीः । यः । विश्वाः । अभि । अस्ति । एकः । इत् ॥ १९ ॥

हें पहा, मित्रांनो, स्तवनयोग्य वीर जो इन्द्र, त्याचेंच स्तवन आम्ही करणार. तो केवळ एकटा असूनही अखिल मानवांना आपल्या कह्यांत ठेवतो. १९.



अगो॑रुधाय ग॒विषे॑ द्यु॒क्षाय॒ दस्म्यं॒ वचः॑ ।
घृ॒तात्स्वादी॑यो॒ मधु॑नश्च वोचत ॥ २० ॥

अगोऽरुधाय । गोऽइषे । द्युक्षाय । दस्म्यम् । वचः ।
घृतात् । स्वादीयः । मधुनः । च । वोचत ॥ २० ॥

ज्ञान गोधनाला जो कोण्डून ठेवीत नाहीं, इतकेंच नव्हे तर तें गोधन भक्तांसाठी जपून ठेवतो असा आकाशनिवासी देव इन्द्र त्याच्या प्रीत्यर्थ अशी स्तुति करा कीं ती घृतापेक्षा मृदु आणि मधापेक्षाही मधुर असेल. २०.



यस्यामि॑तानि वी॒र्या॒३॒॑ न राधः॒ पर्ये॑तवे ।
ज्योति॒र्न विश्व॑म॒भ्यस्ति॒ दक्षि॑णा ॥ २१ ॥

यस्य । अमितानि । वीर्या । न । राधः । परिऽएतवे ।
ज्योतिः । न । विश्वम् । अभि । अस्ति । दक्षिणा ॥ २१ ॥

ज्या इन्द्राची शौर्यकृत्यें अगणित आहेत, ज्याच्या कृपाप्रसादाच्या अपरिमितत्वाचे आकलनही करतां येत नाहीं, त्याची देणगी, प्रकाश जसा जगाला व्यापून राहतो त्याप्रमाणें विश्वाला व्यापून राहते. २१



स्तु॒हीन्द्रं॑ व्यश्व॒वदनू॑र्मिं वा॒जिनं॒ यम॑म् ।
अ॒र्यो गयं॒ मंह॑मानं॒ वि दा॒शुषे॑ ॥ २२ ॥

स्तुहि । इन्द्रम् । व्यश्वऽवत् । अनूर्मिम् । वाजिनम् । यमम् ।
अर्यः । गयम् । मंहमानम् । वि । दाशुषे ॥ २२ ॥

उदकांच्या लाटांप्रमाणे ज्याचे मन चंचल नाहीं, जो सत्वाढ्य आणि जगन्नियन्ता आहे, त्या इन्द्राचे स्तवन जसे व्यश्नाने केले त्याप्रमाणे, तूं कर. तो प्रभू, आपल्या भक्ताला महनीय असें स्थान देईलच देईल. २२



ए॒वा नू॒नमुप॑ स्तुहि॒ वैय॑श्व दश॒मं नव॑म् ।
सुवि॑द्वांसं च॒र्कृत्यं॑ च॒रणी॑नाम् ॥ २३ ॥

एव । नूनम् । उप । स्तुहि । वैयश्व । दशमम् । नवम् ।
सुऽविद्वांसम् । चर्कृत्यम् । चरणीनाम् ॥ २३ ॥

म्हणून हे वैयश्वा, तूं देखील इन्द्राचे स्तवन कर. सर्व बहुमोल वस्तूंत जो दहावा अर्थात् अमोलिक, आहे, जो अत्यंत ज्ञानी, आहे, ज्याचे अखंड भजन प्राणिमात्रांनीं करावे अशा त्या इन्द्राचे तू स्तवन कर. २३.



वेत्था॒ हि निरृ॑तीनां॒ वज्र॑हस्त परि॒वृज॑म् ।
अह॑रहः शु॒न्ध्युः प॑रि॒पदा॑मिव ॥ २४ ॥

वेत्थ । हि । निःऽऋतीनाम् । वज्रऽहस्त । परिऽवृजम् ।
अहःऽअहः । शुन्ध्युः । परिपदाम्ऽइव ॥ २४ ॥

हे वज्रधरा, पापवासनांचा परिहार कसा करावा तें खरोखर तूंच जाणतोस. परिभ्रमण करणाऱ्यांमध्ये दररोज आंग स्वच्छ ठेवणारा शून्ध्यू (जो सूर्य) त्याप्रभाणें तूं आहेस. २४.



तदि॒न्द्राव॒ आ भ॑र॒ येना॑ दंसिष्ठ॒ कृत्व॑ने ।
द्वि॒ता कुत्सा॑य शिश्नथो॒ नि चो॑दय ॥ २५ ॥

तत् । इन्द्र । अवः । आ । भर । येन । दंसिष्ठ । कृत्वने ।
द्विता । कुत्साय । शिश्नथः । नि । चोदय ॥ २५ ॥

अत्यद्भूत दर्शना इन्द्रा, तें तुझें रक्षण आम्हाकडे येऊ दे कीं ज्याच्या योगाने तूं कर्तव्यतत्पर कुत्सा करितां शत्रूला दुखंड केलेस तर अशा कर्तव्याची स्फूर्ति तूं आम्हालाही दे. २५.



तमु॑ त्वा नू॒नमी॑महे॒ नव्यं॑ दंसिष्ठ॒ सन्य॑से ।
स त्वं नो॒ विश्वा॑ अ॒भिमा॑तीः स॒क्षणिः॑ ॥ २६ ॥

तम् । ऊं इति । त्वा । नूनम् । ईमहे । नव्यम् । दंसिष्ठ । सन्यसे ।
सः । त्वम् । नः । विश्वाः । अभिऽमातीः । सक्षणिः ॥ २६ ॥

अत्यंत अद्‌भूतरूपा इन्द्रा, स्तवनयोग्य जो तूं त्या तुझी विनवणी, स्वार्थबुद्धीचा त्याग करतां यावा म्हणून आम्ही आताम्च्या आताच करीत आहोंत; कारण, तूं असा आहेस कीं, आमच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर चाल करून जाऊन त्यांचा पार मोड करून टाकलास. २६.



य ऋक्षा॒दंह॑सो मु॒चद्यो वार्या॑त्स॒प्त सिन्धु॑षु ।
वध॑र्दा॒सस्य॑ तुविनृम्ण नीनमः ॥ २७ ॥

यः । ऋक्षात् । अंहसः । मुचत् । यः । वा । आर्यात् । सप्त । सिन्धुषु ।
वधः । दासस्य । तुविऽनृम्ण । नीनमः ॥ २७ ॥

तूं असा आहेस कीं, घोर पातकांपासून भक्तांची मुक्तता केलीस; किंवा हे अपार शौर्यसंपन्ना इन्द्रा, तूं सप्तसिन्धूंच्या प्रदेशांत आर्यभक्ताच्या हातून, धर्मभ्रष्ट शत्रूंची घातक शस्त्रे वांकवून तीं मोडून टाकलीस. २७.



यथा॑ वरो सु॒षाम्णे॑ स॒निभ्य॒ आव॑हो र॒यिम् ।
व्य॑श्वेभ्यः सुभगे वाजिनीवति ॥ २८ ॥

यथा । वरो इति । सुऽसाम्ने । सनिऽभ्यः । आ । अवहः । रयिम् ।
विऽअश्वेभ्यः । सुऽभगे । वाजिनीऽवति ॥ २८ ॥

हे अनुत्तमे, हे सुलक्षणे, सत्वरसामर्थ्यसंपन्ने देवि, ज्याप्रमाणें सामगायकाला त्याचप्रमाणे यच्चावत् दानशील भक्तांनाही तूं वैभव दिलेलें आहेस. २८.



आ ना॒र्यस्य॒ दक्षि॑णा॒ व्य॑श्वाँ एतु सो॒मिनः॑ ।
स्थू॒रं च॒ राधः॑ श॒तव॑त्स॒हस्र॑वत् ॥ २९ ॥

आ । नार्यस्य । दक्षिणा । विऽअश्वान् । एतु । सोमिनः ।
स्थूरम् । च । राधः । शतऽवत् । सहस्रऽवत् ॥ २९ ॥

म्हणून सोमयाजी नार्यांचे दान व्यश्वांना मिळो तशीच देणगी स्थूराला शेकड्यांनीच काय, पण हजारांनींही प्राप्त होवो. २९.



यत्त्वा॑ पृ॒च्छादी॑जा॒नः कु॑ह॒या कु॑हयाकृते ।
ए॒षो अप॑श्रितो व॒लो गो॑म॒तीमव॑ तिष्ठति ॥ ३० ॥

यत् । त्वा । पृच्छात् । ईजानः । कुहया । कुहयाऽकृते ।
एषः । अपऽश्रितः । वलः । गोऽमतीम् । अव । तिष्ठति ॥ ३० ॥

अशा प्रकारचा यज्ञनिरतभक्त "कोठे तरी आहे काय, कोठे तरी आहे काय ?" असें तुम्हांला विचारतील; तेव्हां त्यांना हेंच सांगा कीं, असा भक्त वल हा आहे; आणि गोमती नदीच्या कांठींच त्याचा वास आहे. ३०.



ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त २५ ( मित्रावरुणसूक्त )

ऋषी - मित्रावरुणसूक्त देवता - १-९, १३-२४ मित्रावरुण; १०-१२ विश्वेदेव छंद - १-२३ उष्णिह; २४ उष्णिागर्भा



ता वां॒ विश्व॑स्य गो॒पा दे॒वा दे॒वेषु॑ य॒ज्ङिया॑ ।
ऋ॒तावा॑ना यजसे पू॒तद॑क्षसा ॥ १ ॥

ता । वाम् । विश्वस्य । गोपा । देवा । देवेषु । यज्ञिया ।
ऋतऽवाना । यजसे । पूतऽदक्षसा ॥ १ ॥

ते तुमचे विथपालक दिव्यविभूति; ते सर्वदिव्यविबुधांत पूज्य, सत्यधर्मस्थापक, आणि पवित्र सामर्थ्याने मण्डित असे जे मित्र आणि वरुण, त्यांचें यजन तूं करतोस ना ? १.



मि॒त्रा तना॒ न र॒थ्या॒३॒॑ वरु॑णो॒ यश्च॑ सु॒क्रतुः॑ ।
स॒नात्सु॑जा॒ता तन॑या धृ॒तव्र॑ता ॥ २ ॥

मित्रा । तना । न । रथ्या । वरुणः । यः । च । सुऽक्रतुः ।
सनात् । सुऽजाता । तनया । धृतऽव्रता ॥ २ ॥

मित्रावरुण हे पूर्वींपासूनच जगाला मार्गदर्शकाप्रमाणे झाले आहेत. आणि वरुण आहे तो तर पुण्यकृतीच होय. असे हे अदितीचे सत्पुत्र अनादिकालापासून भक्तांकडून न्यायनीतिचें पालन करवीत आले आहेत. २.



ता मा॒ता वि॒श्ववे॑दसासु॒र्या॑य॒ प्रम॑हसा ।
म॒ही ज॑जा॒नादि॑तिरृ॒ताव॑री ॥ ३ ॥

ता । माता । विश्वऽवेदसा । असुर्याय । प्रऽमहसा ।
मही । जजान । अदितिः । ऋतऽवरी ॥ ३ ॥

ती परमथोर माता, सत्यधर्माला अनुसरणारी अदिति, तिनें सर्वज्ञ आणि अत्यंत ओजस्वी अशा मित्रावरुणांना, दैवीजीवनाचें साम्राज्य व्हावें म्हणून जन्म दिला. ३.



म॒हान्ता॑ मि॒त्रावरु॑णा स॒म्राजा॑ दे॒वावसु॑रा ।
ऋ॒तावा॑नावृ॒तमा घो॑षतो बृ॒हत् ॥ ४ ॥

महान्ता । मित्रावरुणा । सम्ऽराजा । देवौ । असुरा ।
ऋतऽवानौ । ऋतम् । आ । घोषतः । बृहत् ॥ ४ ॥

मित्रावरुण देव हे परमथोर, जगत्‌सम्राट्, दैवीसामर्थ्याने युक्त आहेत; तेंच धर्मरूप देव सद्धर्माची घोषणा मोठ्याने करीत असतात. ४



नपा॑ता॒ शव॑सो म॒हः सू॒नू दक्ष॑स्य सु॒क्रतू॑ ।
सृ॒प्रदा॑नू इ॒षो वास्त्वधि॑ क्षितः ॥ ५ ॥

नपाता । शवसः । महः । सूनू इति । दक्षस्य । सुक्रतू इति सुऽक्रतू ।
सृप्रदानू इति सृप्रऽदानू । इषः । वास्तु । अधि । क्षितः ॥ ५ ॥

ते महान् उत्कृष्टबलाचे संवर्धक, चातुर्यांचे उद्‌गमस्थान, उत्कृष्ट कर्तत्वशील, आणि अत्यंत दानशूर आहेत. उत्साहाच्या गृहांतच ते सदैव वास्तव्य करतात. ५.



सं या दानू॑नि ये॒मथु॑र्दि॒व्याः पार्थि॑वी॒रिषः॑ ।
नभ॑स्वती॒रा वां॑ चरन्तु वृ॒ष्टयः॑ ॥ ६ ॥

सम् । या । दानूनि । येमथुः । दिव्याः । पार्थिवीः । इषः ।
नभस्वतीः । आ । वाम् । चरन्तु । वृष्टयः ॥ ६ ॥

तुम्ही असे आहात कीं सर्व देणग्या तुम्हीं आपल्या हातांत ठेवल्या आहेत व दिव्य आणि ऐहिक उत्कर्ष हेंही तुमच्या हातात आहेत. तर तुमची अंतरिक्षांतील मेघोदकें जगतावर वृष्टि करोत. ६.



अधि॒ या बृ॑ह॒तो दि॒वो॒३॒॑ऽभि यू॒थेव॒ पश्य॑तः ।
ऋ॒तावा॑ना स॒म्राजा॒ नम॑से हि॒ता ॥ ७ ॥

अधि । या । बृहतः । दिवः । अभि । यूथाऽइव । पश्यतः ।
ऋतऽवाना । सम्ऽराजा । नमसे । हिता ॥ ७ ॥

गोपालक जसा आपल्या कळपावर दृष्टि ठेवतो तसे तुम्ही महान द्युलोकावर आरोहण करून या जगताकडे पहात असतां. तुम्ही न्याय- नीतिप्रिय, विश्वसम्राट् आहांत, आणि प्रणिपात करणाऱ्या भक्तासाठींच स्वर्लोकी राहिले आहांत. ७.



ऋ॒तावा॑ना॒ नि षे॑दतुः॒ साम्रा॑ज्याय सु॒क्रतू॑ ।
धृ॒तव्र॑ता क्ष॒त्रिया॑ क्ष॒त्रमा॑शतुः ॥ ८ ॥

ऋतऽवाना । नि । सेदतुः । साम्ऽराज्याय । सुक्रतू इति सुऽक्रतू ।
धृतऽव्रता । क्षत्रिया । क्षत्रम् । आशतुः ॥ ८ ॥

सत्यधर्मरूप, महत्कृत्यरत असे मित्रावरुण जगावर साम्राज्य चालविण्याकरितां स्वर्लोकीं राहिले आहेत. धर्मसंस्थापन करणाऱ्या त्या शूर सत्ताधीशांनीं आपली सत्ता सर्व ठिकाणी प्रस्थापित केली आहे. ८.



अ॒क्ष्णश्चि॑द्गातु॒वित्त॑रानुल्ब॒णेन॒ चक्ष॑सा ।
नि चि॑न्मि॒षन्ता॑ निचि॒रा नि चि॑क्यतुः ॥ ९ ॥

अक्ष्णः । चित् । गातुवित्ऽतरा । अनुल्बणेन । चक्षसा ।
नि । चित् । मिषन्ता । निऽचिरा । नि । चिक्यतुः ॥ ९ ॥

प्रत्यक्ष डोळे असल्यापेक्षां देखील त्यांच्या गुप्त नेत्रानें यांना मार्ग फारच उत्तम दिसतो. अणि जरी त्यांनीं आपले नेत्र मिटून धरले तरी सुद्धा त्यांना अतिशय उत्कृष्ट दिसते. ९



उ॒त नो॑ दे॒व्यदि॑तिरुरु॒ष्यतां॒ नास॑त्या ।
उ॒रु॒ष्यन्तु॑ म॒रुतो॑ वृ॒द्धश॑वसः ॥ १० ॥

उत । नः । देवी । अदितिः । उरुष्यताम् । नासत्या ।
उरुष्यन्तु । मरुतः । वृद्धऽशवसः ॥ १० ॥

म्हणून अदिति देवी, आणि सत्यस्वरूप अश्वीदेव हे आम्हांस मुक्त करोत. आणि महा बलाढ्य मरुत् हेही मुक्त करोत. १०.



ते नो॑ ना॒वमु॑रुष्यत॒ दिवा॒ नक्तं॑ सुदानवः ।
अरि॑ष्यन्तो॒ नि पा॒युभिः॑ सचेमहि ॥ ११ ॥

ते । नः । नावम् । उरुष्यत । दिवा । नक्तम् । सुऽदानवः ।
अरिष्यन्तः । नि । पायुऽभिः । सचेमहि ॥ ११ ॥

दिवसा आणि रात्रीं सुद्धा आमच्या नौकेला मोकळी सोडा. म्हणजे हे दानशूर मरूतांनों, आम्ही उपद्रवरहित होऊन तुमच्या संरक्षणांच्या योगाने इच्छित प्राप्त करून घेऊं. ११.



अघ्न॑ते॒ विष्ण॑वे व॒यमरि॑ष्यन्तः सु॒दान॑वे ।
श्रु॒धि स्व॑यावन्सिन्धो पू॒र्वचि॑त्तये ॥ १२ ॥

अघ्नते । विष्णवे । वयम् । अरिष्यन्तः । सुऽदानवे ।
श्रुधि । स्वऽयावन् । सिन्धो इति । पूर्वऽचित्तये ॥ १२ ॥

भक्तांचा घात होऊं न देणारा जो औदार्यशील विष्णू त्याची आम्हीं उपद्रवरहित होण्यासाठी उपासूत्र करीत आहों. हे दयासागरा, स्वयंप्रेरिता, तुझे चिंतन प्रथम करावे असा हेतु आहे तर आमची प्रार्थना ऐक. १२.



तद्वार्यं॑ वृणीमहे॒ वरि॑ष्ठं गोप॒यत्य॑म् ।
मि॒त्रो यत्पान्ति॒ वरु॑णो॒ यद॑र्य॒मा ॥ १३ ॥

तत् । वार्यम् । वृणीमहे । वरिष्ठम् । गोपयत्यम् ।
मित्रः । यत् । पान्ति । वरुणः । यत् । अर्यमा ॥ १३ ॥

उत्कृष्ट परंतु गोपनीय अशी जी अभिलषणीय वस्तु स्वतः मित्रवरुण आणि अर्थमा हे जतन करतात; त्या वस्तूची आम्ही आकांक्षा धरली आहे. १३.



उ॒त नः॒ सिन्धु॑र॒पां तन्म॒रुत॒स्तद॒श्विना॑ ।
इन्द्रो॒ विष्णु॑र्मी॒ढ्वांसः॑ स॒जोष॑सः ॥ १४ ॥

उत । नः । सिन्धुः । अपाम् । तत् । मरुतः । तत् । अश्विना ।
इन्द्रः । विष्णुः । मीढ्वांसः । सऽजोषसः ॥ १४ ॥

म्हणून उदकांचा उदधि, मरुत्, अश्विदेव, इन्द्र, विष्णु हे कामनावर्षक भक्तवत्सल देव तीच वस्तु आम्हांला देवोत. १४.



ते हि ष्मा॑ व॒नुषो॒ नरो॒ऽभिमा॑तिं॒ कय॑स्य चित् ।
ति॒ग्मं न क्षोदः॑ प्रति॒घ्नन्ति॒ भूर्ण॑यः ॥ १५ ॥

ते । हि । स्म । वनुषः । नरः । अभिऽमातिम् । कयस्य । चित् ।
तिग्मम् । न । क्षोदः । प्रतिऽघ्नन्ति । भूर्णयः ॥ १५ ॥

अशा वस्तूंचा उपभोगघेणारे ते वीराग्रणी, पाण्याच्या प्रचंड लोंढ्याप्रमाणें धडाक्यानें धांवणारे ते दिव्यविबुध, कोणाच्याही हल्ल्याची पार धूळधाण उडवून देतात. १५.



अ॒यमेक॑ इ॒त्था पु॒रूरु च॑ष्टे॒ वि वि॒श्पतिः॑ ।
तस्य॑ व्र॒तान्यनु॑ वश्चरामसि ॥ १६ ॥

अयम् । एकः । इत्था । पुरु । उरु । चष्टे । वि । विश्पतिः ।
तस्य । व्रतानि । अनु । वः । चरामसि ॥ १६ ॥

हा मानवजातीचा एकच प्रभु खरोखरच यथास्थितपणाने आणि व्यापक दृष्टीने सर्व काही पहात असतो. त्याच्याच अनुशासनाप्रमाणे आम्ही वागतो. १६.



अनु॒ पूर्वा॑ण्यो॒क्या॑ साम्रा॒ज्यस्य॑ सश्चिम ।
मि॒त्रस्य॑ व्र॒ता वरु॑णस्य दीर्घ॒श्रुत् ॥ १७ ॥

अनु । पूर्वाणि । ओक्या । साम्ऽराज्यस्य । सश्चिम ।
मित्रस्य । व्रता । वरुणस्य । दीर्घऽश्रुत् ॥ १७ ॥

पूर्वापार चालत आलेले विधि, आणि मित्रावरुणाच्या साम्राज्याचे दीर्घकालापारून प्रसिद्ध असलेले नियम आम्ही यथापूर्व पाळीत आलों आहोंत. १७.



परि॒ यो र॒श्मिना॑ दि॒वोऽन्ता॑न्म॒मे पृ॑थि॒व्याः ।
उ॒भे आ प॑प्रौ॒ रोद॑सी महि॒त्वा ॥ १८ ॥

परि । यः । रश्मिना । दिवः । अन्तान् । ममे । पृथिव्याः ।
उभे इति । आ । पप्रौ । रोदसी इति । महिऽत्वा ॥ १८ ॥

ज्याने आपल्या प्रकाशकिरणाने पृथिवीच्या आणि द्युलोकाच्या सर्व मर्यादा आक्रमण केल्या, आणि आपल्या महिन्याने ते दोन्ही लोक ओतप्रोत भरून सोडले. १८.



उदु॒ ष्य श॑र॒णे दि॒वो ज्योति॑रयंस्त॒ सूर्यः॑ ।
अ॒ग्निर्न शु॒क्रः स॑मिधा॒न आहु॑तः ॥ १९ ॥

उत् । ऊं इति । स्यः । शरणे । दिवः । ज्योतिः । अयंस्त । सूर्यः ।
अग्निः । न । शुक्रः । सम्ऽइधानः । आऽहुतः ॥ १९ ॥

त्याच्याच आकाशरूप आश्रयछत्राखालीं त्या सूर्याने आपला प्रकाश विस्तारून दिला. आहुति अर्पण केल्यानें प्रदीप्त झालेल्या तेजःपुंज अग्निप्रमाणें प्रकाश पसरून दिला. १९.



वचो॑ दी॒र्घप्र॑सद्म॒नीशे॒ वाज॑स्य॒ गोम॑तः ।
ईशे॒ हि पि॒त्वो॑ऽवि॒षस्य॑ दा॒वने॑ ॥ २० ॥

वचः । दीर्घऽप्रसद्मनि । ईशे । वाजस्य । गोऽमतः ।
ईशे । हि । पित्वः । अविषस्य । दावने ॥ २० ॥

ह्या अतिविस्तृत जगत्‌रूप गृहांत सत्वसामर्थ्य आणि ज्ञानगोधन यांच्यावर केवळ ईश्वराचा शब्दच सत्ता चालवितो. आरामदायक जें अन्न त्या अन्नावरही त्याचीच सत्ता असते, आणि आपल्या प्रसादाची देणगी देण्यालाही तोच समर्थ असतो. २०



तत्सूर्यं॒ रोद॑सी उ॒भे दो॒षा वस्तो॒रुप॑ ब्रुवे ।
भो॒जेष्व॒स्माँ अ॒भ्युच्च॑रा॒ सदा॑ ॥ २१ ॥

तत् । सूर्यम् । रोदसी इति । उभे इति । दोषा । वस्तोः । उप । ब्रुवे ।
भोजेषु । अस्मान् । अभि । उत् । चर । सदा ॥ २१ ॥

तर आतां सूर्य आणि द्यावापृथिवी यांच्यासमक्ष मीं सायंकाळी, आणि प्रातःकाळींही असें विनवितों कीं, आम्ही उपभोगांत मग्न झालो असलो तरी हे देवा तूं आम्हाला नेही हलवून पुढें चालवीत ने. २१.



ऋ॒ज्रमु॑क्ष॒ण्याय॑ने रज॒तं हर॑याणे ।
रथं॑ यु॒क्तम॑सनाम सु॒षाम॑णि ॥ २२ ॥

ऋज्रम् । उक्षण्यायने । रजतम् । हरयाणे ।
रथम् । युक्तम् । असनाम । सुऽसामनि ॥ २२ ॥

उक्षाच्या वंशातील हरयाण सुषामन् याच्या कृपेने मला एक चपल आणि एक शुभ्र असे दोन अश्व, आणि एक शृंगारलेला रथ अशा वस्तु मिळाल्या. २२.



ता मे॒ अश्व्या॑नां॒ हरी॑णां नि॒तोश॑ना ।
उ॒तो नु कृत्व्या॑नां नृ॒वाह॑सा ॥ २३ ॥

ता । मे । अश्व्यानाम् । हरीणाम् । निऽतोशना ।
उतो इति । नु । कृत्व्यानाम् । नृऽवाहसा ॥ २३ ॥

सर्व अबलक घोड्यांमध्यें माझेच दोन अश्व शत्रूंवर तुटून पडणारे आहेत. आणि जातिवंत अश्वांमध्येही शूरांना बसण्याला तेच योग्य आहेत. २३.



स्मद॑भीशू॒ कशा॑वन्ता॒ विप्रा॒ नवि॑ष्ठया म॒ती ।
म॒हो वा॒जिना॒वर्व॑न्ता॒ सचा॑सनम् ॥ २४ ॥

स्मदभीशू इति स्मत्ऽअभीशू । कशाऽवन्ता । विप्रा । नविष्ठया । मती ।
महः । वाजिनौ । अर्वन्ता । सचा । असनम् ॥ २४ ॥

उत्तम लगाम, व जीन असलेले दोन तडफदार उत्कृष्ट घोडे आणि दोन स्तवनज्ञ विद्वान् ह्यांचा लभ मला एका अपूर्व मननीय स्तुतिमुळें एकाच वेळीं झाला. २४.



ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त २६ (अश्विनीकुमार, वायुसूक्त )

ऋषी - विश्वमनस् वैयश्व अथवा व्यश्व आंगिरस देवता - १-१९ अश्विनीकुमार; २०-२५ वायु छंद - १६-१९, २१, २५ गायत्री; २० अनुष्टुभ् ; अवशिष्ट-उष्णिह



यु॒वोरु॒ षू रथं॑ हुवे स॒धस्तु॑त्याय सू॒रिषु॑ ।
अतू॑र्तदक्षा वृषणा वृषण्वसू ॥ १ ॥

युवोः । ऊं इति । सु । रथम् । हुवे । सधऽस्तुत्याय । सूरिषु ।
अतूर्तऽदक्षा । वृषणा । वृषण्वसू इति वृषण्ऽवसू ॥ १ ॥

सर्वांचे एकत्र स्तवन करावे म्हणून अग्रेसर अशा दिव्यविभूतिंमध्ये तुम्हांला तुमच्या उत्तम रथासह मी पाचारण करतो. वीर्यशाली आणि वीर्यधनसंपन्न अहो,श्वी तुम्ही असे आहांत कीं, चातुर्यात तुमची गति अगदीं अप्रतिहत चालते. १.



यु॒वं व॑रो सु॒षाम्णे॑ म॒हे तने॑ नासत्या ।
अवो॑भिर्याथो वृषणा वृषण्वसू ॥ २ ॥

युवम् । वरो इति । सुऽसाम्ने । महे । तने । नासत्या ।
अवःऽभिः । याथः । वृषणा । वृषण्वसू इति वृषण्ऽवसू ॥ २ ॥

वरो सुषामन् राजासाठी, हे सत्यस्वरूपांनों, हे वीर्यशाली, वीर्यधनाढथ अश्वीहो, तुम्ही फार पूर्वीपासून आपल्या रक्षणांसहित येत आहात. २.



ता वा॑म॒द्य ह॑वामहे ह॒व्येभि॑र्वाजिनीवसू ।
पू॒र्वीरि॒ष इ॒षय॑न्ता॒वति॑ क्ष॒पः ॥ ३ ॥

ता । वाम् । अद्य । हवामहे । हव्येभिः । वाजिनीवसू इति वाजिनीऽवसू ।
पूर्वीः । इषः । इषयन्तौ । अति । क्षपः ॥ ३ ॥

आम्ही भक्तजन आज हवि अर्पण करून, हे सत्वसामर्थ्य संपन्न वीरांनो, तुम्हाला पाचारण करीत आहोंत. उदंड उत्साहाची लालसा धरणारे आम्ही रात्र संपताच तुम्हांला हांक मारीत आहोंत. ३.



आ वां॒ वाहि॑ष्ठो अश्विना॒ रथो॑ यातु श्रु॒तो न॑रा ।
उप॒ स्तोमा॑न्तु॒रस्य॑ दर्शथः श्रि॒ये ॥ ४ ॥

आ । वाम् । वाहिष्ठः । अश्विना । रथः । यातु । श्रुतः । नरा ।
उप । स्तोमान् । तुरस्य । दर्शथः । श्रिये ॥ ४ ॥

अश्वीहो, अतिशय जलद चालणारा तो तुमचा विख्यात रथ इकडे आगमन करो. हे शूरांनो तुम्हां करितां आतुर झालेल्या भक्ताच्या स्तोत्राकडे तुम्ही त्याच्या कल्याणासाठी दयार्द्र बुद्धीनेच पाहतां. ४.



जु॒हु॒रा॒णा चि॑दश्वि॒ना म॑न्येथां वृषण्वसू ।
यु॒वं हि रु॑द्रा॒ पर्ष॑थो॒ अति॒ द्विषः॑ ॥ ५ ॥

जुहुराणा । चित् । अश्विना । आ । मन्येथाम् । वृषण्वसू इति वृषण्ऽवसू ।
युवम् । हि । रुद्रा । पर्षथः । अति । द्विषः ॥ ५ ॥

तुम्ही जरी आमच्यावर क्रुद्ध झाला असला तर हे वीर्यधनाढ्य अश्वीहो, थोडा तरी विचार करा. हे रूद्रस्वरूप अश्वींनो, तुम्ही असें पहा की आमच्या द्वेष करणाऱ्या शत्रूच्या तडाक्यातून आम्हांला तुम्हीच पार नेणार आहांत. ५.



द॒स्रा हि विश्व॑मानु॒षङ्म॒क्षूभिः॑ परि॒दीय॑थः ।
धि॒यं॒जि॒न्वा मधु॑वर्णा शु॒भस्पती॑ ॥ ६ ॥

दस्रा । हि । विश्वम् । आनुषक् । मक्षुऽभिः । परिऽदीयथः ।
धियम्ऽजिन्वा । मधुऽवर्णा । शुभः । पती इति ॥ ६ ॥

हे अद्‌भुत्तदर्शन अश्वीहो, झटपट धावणाऱ्या रथांतून तुम्ही सर्व जगताला वळसा घालता; भक्ताला स्तवनाची स्फूर्ति तुम्ही देता; तुमची अंगकांती मधाप्रमाणें स्निग्ध आहे, आणि तुम्ही मंगलाधीश आहांत. ६.



उप॑ नो यातमश्विना रा॒या वि॑श्व॒पुषा॑ स॒ह ।
म॒घवा॑ना सु॒वीरा॒वन॑पच्युता ॥ ७ ॥

उप । नः । यातम् । अश्विना । राया । विश्वऽपुषा । सह ।
मघऽवाना । सुऽवीरौ । अनपऽच्युता ॥ ७ ॥

हे अश्वींनो, तुम्ही आपल्या जगत्‌पोषक ऐश्वर्यासह आमच्याकडे या. तुम्ही अत्युदार आणि उत्कृष्ट शौर्याने मण्डित असूनही कधीं बेसावध नसता. ७.



आ मे॑ अ॒स्य प्र॑ती॒व्य१॒॑मिन्द्र॑नासत्या गतम् ।
दे॒वा दे॒वेभि॑र॒द्य स॒चन॑स्तमा ॥ ८ ॥

आ । मे । अस्य । प्रतीव्यम् । इन्द्रनासत्या । गतम् ।
देवा । देवेभिः । अद्य । सचनःऽतमा ॥ ८ ॥

माझ्या ह्या यज्ञमण्डपाकडे, हे इन्द्रा, हे सत्य स्वरूप अश्वीदेव हो, तुम्ही आज दिव्यविभूतींसह आगमन करा. भक्तांनी तुमची सेवा अगदीं मनापासून करावी असेच तुम्ही आहांत. ८.



व॒यं हि वां॒ हवा॑मह उक्ष॒ण्यन्तो॑ व्यश्व॒वत् ।
सु॒म॒तिभि॒रुप॑ विप्रावि॒हा ग॑तम् ॥ ९ ॥

वयम् । हि । वाम् । हवामहे । उक्षण्यन्तः । व्यश्वऽवत् ।
सुमतिऽभिः । उप । विप्रौ । इह । आ । गतम् ॥ ९ ॥

शत्रूला हुंदाडून मारील अशा सामर्थ्याची इच्छा धरणारे आम्ही, व्यश्वऋषिप्रमाणे उत्तम मननीय स्तुतिंनीं तुम्हांला पाचारण करीत आहोत. तर हे ज्ञानशाली अश्वीहो,तु म्ही इकडेच आगमन करा. ९.



अ॒श्विना॒ स्वृ॑षे स्तुहि कु॒वित्ते॒ श्रव॑तो॒ हव॑म् ।
नेदी॑यसः कूळयातः प॒णीँरु॒त ॥ १० ॥

अश्विना । सु । ऋषे । स्तुहि । कुवित् । ते । श्रवतः । हवम् ।
नेदीयसः । कूळयातः । पणीन् । उत ॥

सद्भक्ता, तूं अश्वीदेवांचे स्तवन कर. तुझे स्तवन ते ऐकणार नाहींत काय ? खात्रीने ऐकतील आणि तुझ्या आजूबाजूस जे कवडीचुंबक दुरात्मे आहेत त्यांचा निःपात करतील. १०



वै॒य॒श्वस्य॑ श्रुतं नरो॒तो मे॑ अ॒स्य वे॑दथः ।
स॒जोष॑सा॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा ॥ ११ ॥

वैयश्वस्य । श्रुतम् । नरा । उतो इति । मे । अस्य । वेदथः ।
सऽजोषसा । वरुणः । मित्रः । अर्यमा ॥ १० ॥

हे वीरनायकांनों, वैयश्व्याचे ऐका; आणि तशीच माझी पण प्रार्थना ऐका. तुम्ही आणि तसेंच वरुण, मित्र आणि अर्यमा हे सर्व प्रेमळच आहांत. ११.



यु॒वाद॑त्तस्य धिष्ण्या यु॒वानी॑तस्य सू॒रिभिः॑ ।
अह॑रहर्वृषण॒ मह्यं॑ शिक्षतम् ॥ १२ ॥

युवाऽदत्तस्य । धिष्ण्या । युवाऽनीतस्य । सूरिऽभिः ।
अहःऽअहः । वृषणा । मह्यम् । शिक्षतम् ॥ १२ ॥

प्रज्ञावीर अश्वीहो, तुम्ही दिलेले किंवा देण्यासाठी आणलेले जें ऐश्वर्य आहे तें, हे वीर्यशाली देवांनो, आमच्या यजमानांकडून आम्हांला प्रतिदिनी देत जा. १२.



यो वां॑ य॒ज्ङेभि॒रावृ॒तोऽधि॑वस्त्रा व॒धूरि॑व ।
स॒प॒र्यन्ता॑ शु॒भे च॑क्राते अ॒श्विना॑ ॥ १३ ॥

यः । वाम् । यज्ञेभिः । आऽवृतः । अधिऽवस्त्रा । वधूःऽइव ।
सपर्यन्ता । शुभे । चक्राते इति । अश्विना ॥ १३ ॥

जो तुमचा यज्ञ यज्ञांनीच अलंकृत होतो, त्याला वस्त्रावगुण्ठित नववधूला भूषवावे त्या प्रमाणें भूषित करून, हे अश्वीहो, तुम्ही मंगलमय करतां. १३.



यो वा॑मुरु॒व्यच॑स्तमं॒ चिके॑तति नृ॒पाय्य॑म् ।
व॒र्तिर॑श्विना॒ परि॑ यातमस्म॒यू ॥ १४ ॥

यः । वाम् । उरुव्यचःऽतमम् । चिकेतति । नृऽपाय्यम् ।
वर्तिः । अश्विना । परि । यातम् । अस्मयू इत्यस्मऽयू ॥ १४ ॥

तुमचा मार्ग अतिशय निर्मर्याद आहे, शूरांनींच रक्षण करण्यास तो योग्य आहे हे जो जाणतो त्याच्या वसतिस्थानांकडे हे भक्तवत्सल अश्वींनों, तुम्ही वळसा घेऊन जा. १४.



अ॒स्मभ्यं॒ सु वृ॑षण्वसू या॒तं व॒र्तिर्नृ॒पाय्य॑म् ।
वि॒षु॒द्रुहे॑व य॒ज्ङमू॑हथुर्गि॒रा ॥ १५ ॥

अस्मभ्यम् । सु । वृषण्वसू इति वृषण्ऽवसू । यातम् । वर्तिः । नृऽपाय्यम् ।
विषुद्रुहाऽइव । यज्ञम् । ऊहथुः । गिरा ॥ १५ ॥

शूरांनी रक्षण करण्याला योग्य असें जें यज्ञगृह त्याच्याकडे हे वीर्यधनाढ्य अश्वीहो, तुम्ही आम्हांकरितां या. बाणाच्या धोरणाने जाऊन शिकार हुडकून काढावी त्याप्रमाणें यज्ञ कोठे आहे तें आमच्या स्तवनाच्या योगाने तुम्ही जाणलेच आहे. १५.



वाहि॑ष्ठो वां॒ हवा॑नां॒ स्तोमो॑ दू॒तो हु॑वन्नरा ।
यु॒वाभ्यां॑ भूत्वश्विना ॥ १६ ॥

वाहिष्ठः । वाम् । हवानाम् । स्तोमः । दूतः । हुवत् । नरा ।
युवाभ्याम् । भूतु । अश्विना ॥ १६ ॥

दुतसदृश स्तोत्रांनी पाचारिलेल्या हे नेतृत्वकुशल अश्विनी कुमारांनो, आमच्या स्तोत्रांनी तुम्ही प्रसन्न व्हा. १६.



यद॒दो दि॒वो अ॑र्ण॒व इ॒षो वा॒ मद॑थो गृ॒हे ।
श्रु॒तमिन्मे॑ अमर्त्या ॥ १७ ॥

यत् । अदः । दिवः । अर्णवे । इषः । वा । मदथः । गृहे ।
श्रुतम् । इत् । मे । अमर्त्या ॥ १७ ॥

हे अमर अश्विनीकुमारांनो, आकाशात वा भक्तगृही, जेथे असाल तेथे माझ्या स्तोत्रांनी तुम्ही प्रसन्न व्हा. १७.



उ॒त स्या श्वे॑त॒याव॑री॒ वाहि॑ष्ठा वां न॒दीना॑म् ।
सिन्धु॒र्हिर॑ण्यवर्तनिः ॥ १८ ॥

उत । स्या । श्वेतऽयावरी । वाहिष्ठा । वाम् । नदीनाम् ।
सिन्धुः । हिरण्यऽवर्तनिः ॥ १८ ॥

श्वेतयावरी नदीकाठी स्तोत्रपठण करणारे विश्वमनस् ऋषी म्हणतात), ' हे अश्विनीकुमारांनो, सुवर्णमय जलयुक्त श्वतयावरी नदी तुम्हाकडे धाव घेत आहे. १८.



स्मदे॒तया॑ सुकी॒र्त्याश्वि॑ना श्वे॒तया॑ धि॒या ।
वहे॑थे शुभ्रयावाना ॥ १९ ॥

स्मत् । एतया । सुऽकीर्त्या । अश्विना । श्वेतया । धिया ।
वहेथे इति । शुभ्रऽयावाना ॥ १९ ॥

'हे प्रकाशमान अश्विनीकुमारांनो, कीर्तिमान आणि पोषक श्वेतयावरी नदी तुमचे स्तवन करीत आहे.' १९.



यु॒क्ष्वा हि त्वं र॑था॒सहा॑ यु॒वस्व॒ पोष्या॑ वसो ।
आन्नो॑ वायो॒ मधु॑ पिबा॒स्माकं॒ सव॒ना ग॑हि ॥ २० ॥

युक्ष्व । हि । त्वम् । रथऽसहा । युवस्व । पोष्या । वसो इति ।
आत् । नः । वायो इति । मधु । पिब । अस्माकम् । सवना । आ । गहि ॥ २० ॥

हे वायु हे सोमार्पित शत्रुनाशक वायो, तू आम्हास साह्य कर. २०



तव॑ वायवृतस्पते॒ त्वष्टु॑र्जामातरद्भुत ।
अवां॒स्या वृ॑णीमहे ॥ २१ ॥

तव । वायो इति । ऋतःऽपते । त्वष्टुः । जामातः । अद्भुत ।
अवांसि । आ । वृणीमहे ॥ २१ ॥

हे त्वष्टजामातृ, यज्ञापित, आणि आश्चर्यकारक वायो, तू आम्हास साह्य कर. २१.



त्वष्टु॒र्जामा॑तरं व॒यमीशा॑नं रा॒य ई॑महे ।
सु॒ताव॑न्तो वा॒युं द्यु॒म्ना जना॑सः ॥ २२ ॥

त्वष्टुः । जामातरम् । वयम् । ईशानम् । रायः । ईमहे ।
सुतऽवन्तः । वायुम् । द्युम्ना । जनासः ॥ २२ ॥

स्वजामातृ आणि सोमापित वायूकडे आम्ही ऐश्वर्यदात्या धनाची याचना करतो. २२.



वायो॑ या॒हि शि॒वा दि॒वो वह॑स्वा॒ सु स्वश्व्य॑म् ।
वह॑स्व म॒हः पृ॑थु॒पक्ष॑सा॒ रथे॑ ॥ २३ ॥

वायो इति । याहि । शिव । आ । दिवः । वहस्व । सु । सुऽअश्व्यम् ।
वहस्व । महः । पृथुऽपक्षसा । रथे ॥ २३ ॥

हे स्वर्गस्थैर्यकारक, बलिष्ठ अश्वयुक्त, थोर वायो, आपला रथ तू आमच्याकडे आण. २३.



त्वां हि सु॒प्सर॑स्तमं नृ॒षद॑नेषु हू॒महे॑ ।
ग्रावा॑णं॒ नाश्व॑पृष्ठं मं॒हना॑ ॥ २४ ॥

त्वाम् । हि । सुप्सरःऽतमम् । नृऽसदनेषु । हूमहे ।
ग्रावाणम् । न । अश्वऽपृष्ठम् । मंहना ॥ २४ ॥

सोमनिष्पादक प्रावन्सदृश धीरंगभीर स्तोत्रे अर्पिलेल्या है रूपवान आणि महान वायो, आम्ही तुला आवाहन करतो. २४.



स त्वं नो॑ देव॒ मन॑सा॒ वायो॑ मन्दा॒नो अ॑ग्रि॒यः ।
कृ॒धि वाजाँ॑ अ॒पो धियः॑ ॥ २५ ॥

सः । त्वम् । नः । देव । मनसा । वायो इति । मन्दानः । अग्रियः ।
कृधि । वाजान् । अपः । धियः ॥ २५ ॥

हे देवमुख्य आणि प्रसन्न वायुदेवा, अन्नोदकांच्या साह्याने तू आमचा यश सुफलित कर. २५.



ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त २७ ( विश्वेदेवसूक्त )

ऋषी - मनु वैवस्वत देवता - विश्वेदेव छंद - विषम-बृहती; सम-सतोबृहती



अ॒ग्निरु॒क्थे पु॒रोहि॑तो॒ ग्रावा॑णो ब॒र्हिर॑ध्व॒रे ।
ऋ॒चा या॑मि म॒रुतो॒ ब्रह्म॑ण॒स्पतिं॑ दे॒वाँ अवो॒ वरे॑ण्यम् ॥ १ ॥

अग्निः । उक्थे । पुरःऽहितः । ग्रावाणः । बर्हिः । अध्वरे ।
ऋचा । यामि । मरुतः । ब्रह्मणः । पतिम् । देवान् । अवः । वरेण्यम् ॥ १ ॥

(मनु वैवस्वत म्हणतो), 'हे स्तोत्यांनो, अमि, सोमनिष्पादक ग्रावन् , आणि दर्भ आदींनी युक्त अशा प्रशंसनीय यज्ञामध्ये मरुत् , ब्रह्मणस्पति आदि संरक्षक देवांना तुम्ही आवाहन करा. १



आ प॒शुं गा॑सि पृथि॒वीं वन॒स्पती॑नु॒षासा॒ नक्त॒मोष॑धीः ।
विश्वे॑ च नो वसवो विश्ववेदसो धी॒नां भू॑त प्रावि॒तारः॑ ॥ २ ॥

आ । पशुम् । गासि । पृथिवीम् । वनस्पतीन् । उषसा । नक्तम् । ओषधीः ।
विश्वे । च । नः । वसवः । विश्वऽवेदसः । धीनाम् । भूत । प्रऽअवितारः ॥ २ ॥

'हे स्तोत्यांनो, पश, यशस्थान, अरणी, आणि ओषधी आदि यज्ञीय देवांचे तुम्ही सकाळसंध्याकाळ स्तवन करा. हे सर्वधन आणि सर्वगामी देवांनो, तुम्ही आमच्या यज्ञाचे रक्षण करा.' २



प्र सू न॑ एत्वध्व॒रो॒३॒॑ऽग्ना दे॒वेषु॑ पू॒र्व्यः ।
आ॒दि॒त्येषु॒ प्र वरु॑णे धृ॒तव्र॑ते म॒रुत्सु॑ वि॒श्वभा॑नुषु ॥ ३ ॥

प्र । सु । नः । एतु । अध्वरः । अग्ना । देवेषु । पूर्व्यः ।
आदित्येषु । प्र । वरुणे । धृतऽव्रते । मरुत्ऽसु । विश्वऽभानुषु ॥ ३ ॥

आमचा पुरातन यज्ञ अमि, आदित्य, सर्वसत्ताधारी वरुण, सर्वप्रकाशक मरुत् आदि देवांप्रत पोहोचो. ३



विश्वे॒ हि ष्मा॒ मन॑वे वि॒श्ववे॑दसो॒ भुव॑न्वृ॒धे रि॒शाद॑सः ।
अरि॑ष्टेभिः पा॒युभि॑र्विश्ववेदसो॒ यन्ता॑ नोऽवृ॒कं छ॒र्दिः ॥ ४ ॥

विश्वे । हि । स्म । मनवे । विश्वऽवेदसः । भुवन् । वृधे । रिशादसः ।
अरिष्टेभिः । पायुऽभिः । विश्वऽवेदसः । यन्त । नः । अवृकम् । छर्दिः ॥ ४ ॥

हे मनुष्योत्कर्षकारक, सर्वधन, आणि शत्रुहिंसक देवानों, तुम्ही आम्हास चौर्यभयविमुक्त निवास स्थान प्रदान करा. ४



आ नो॑ अ॒द्य सम॑नसो॒ गन्ता॒ विश्वे॑ स॒जोष॑सः ।
ऋ॒चा गि॒रा मरु॑तो॒ देव्यदि॑ते॒ सद॑ने॒ पस्त्ये॑ महि ॥ ५ ॥

आ । नः । अद्य । सऽमनसः । गन्त । विश्वे । सऽजोषसः ।
ऋचा । गिरा । मरुतः । देवि । अदिते । सदने । पस्त्ये । महि ॥ ५ ॥

सहनिवासी आणि स्तोत्रस्तुत एकचित्त देव आमच्या कडे येवोत. हे अदितिसहित मस्तांनो, तुम्ही आमच्या निवासस्थानी या. ५



अ॒भि प्रि॒या म॑रुतो॒ या वो॒ अश्व्या॑ ह॒व्या मि॑त्र प्रया॒थन॑ ।
आ ब॒र्हिरिन्द्रो॒ वरु॑णस्तु॒रा नर॑ आदि॒त्यासः॑ सदन्तु नः ॥ ६ ॥

अभि । प्रिया । मरुतः । या । वः । अश्व्या । हव्या । मित्र । प्रऽयाथन ।
आ । बर्हिः । इन्द्रः । वरुणः । तुराः । नरः । आदित्यासः । सदन्तु । नः ॥ ६ ॥

हे अश्वदायी मरुतांनो, हविर्भक्षक मित्रासहित तुम्ही आमच्याकडे या. इंद्र, वरुण, आणि द्रुतगामी आदित्य आमच्या यज्ञस्थानो अवतीर्ण होवोत. ६



व॒यं वो॑ वृ॒क्तब॑र्हिषो हि॒तप्र॑यस आनु॒षक् ।
सु॒तसो॑मासो वरुण हवामहे मनु॒ष्वदि॒द्धाग्न॑यः ॥ ७ ॥

वयम् । वः । वृक्तऽबर्हिषः । हितऽप्रयसः । आनुषक् ।
सुतऽसोमासः । वरुण । हवामहे । मनुष्वत् । इद्धऽअग्नयः ॥ ७ ॥

पुरातन मनूने स्तविलेल्या हे वरुणदेवा, सोमनिष्पादक, हविते, आणि दर्भोच्छेदक भक्त तुला आवाहन करीत आहेत. ७



आ प्र या॑त॒ मरु॑तो॒ विष्णो॒ अश्वि॑ना॒ पूष॒न्माकी॑नया धि॒या ।
इन्द्र॒ आ या॑तु प्रथ॒मः स॑नि॒ष्युभि॒र्वृषा॒ यो वृ॑त्र॒हा गृ॒णे ॥ ८ ॥

आ । प्र । यात । मरुतः । विष्णो इति । अश्विना । पूषन् । माकीनया । धिया ।
इन्द्रः । आ । यातु । प्रथमः । सनिष्युऽभिः । वृषा । यः । वृत्रऽहा । गृणे ॥ ८ ॥

विष्णो, हे अश्वीहो, हे पूषा, अंतःकरणपूर्वक केलेल्या माझ्या प्रार्थनेने तुम्हीं दयार्द्र होऊन या. इन्द्र हा सर्वात अग्रेसर आहे, तोही आगमन करो. इच्छित प्राप्त करून घेणाऱ्या भक्तांकडूनच वीर्यशाली आणि वृत्रनाशन इन्द्राचे स्तवन होत असते. ८.



वि नो॑ देवासो अद्रु॒होऽच्छि॑द्रं॒ शर्म॑ यच्छत ।
न यद्दू॒राद्व॑सवो॒ नू चि॒दन्ति॑तो॒ वरू॑थमाद॒धर्ष॑ति ॥ ९ ॥

वि । नः । देवासः । अद्रुहः । अच्छिद्रम् । शर्म । यच्छत ।
न । यत् । दूरात् । वसवः । नु । चित् । अन्तितः । वरूथम् । आऽदधर्षति ॥ ९ ॥

द्वेषरहित विबुधांनों, अभंग असें जें आश्रयस्थान तें आम्हांस द्या. म्हणजे हे दिव्यनिधींनो, त्या संरक्षक चिलखताला कोणीही दुरून किंवा जवळून देखील धक्का लावू शकणार नाहीं. ९.



अस्ति॒ हि वः॑ सजा॒त्यं॑ रिशादसो॒ देवा॑सो॒ अस्त्याप्य॑म् ।
प्र णः॒ पूर्व॑स्मै सुवि॒ताय॑ वोचत म॒क्षू सु॒म्नाय॒ नव्य॑से ॥ १० ॥

अस्ति । हि । वः । सऽजात्यम् । रिशादसः । देवासः । अस्ति । आप्यम् ।
प्र । नः । पूर्वस्मै । सुविताय । वोचत । मक्षु । सुम्नाय । नव्यसे ॥ १० ॥

तुम्ही सर्वजण अगदीं एकाच स्वरूपाचे आहांत; शत्रूसंहारक देवांनो, तुम्हीं एकमेकांचे आप्तच आहांत. तर अगदीं पहिल्याने आमचे कल्याण होवो, असा आम्हांस आशीर्वाद द्या. अत्यंत अपूर्व अशा सुखाला आम्ही त्वरित पावूं असे म्हणा. १०.



इ॒दा हि व॒ उप॑स्तुतिमि॒दा वा॒मस्य॑ भ॒क्तये॑ ।
उप॑ वो विश्ववेदसो नम॒स्युराँ असृ॒क्ष्यन्या॑मिव ॥ ११ ॥

इदा । हि । वः । उपऽस्तुतिम् । इदा । वामस्य । भक्तये ।
उप । वः । विश्वऽवेदसः । नमस्युः । आ । असृक्षि । अन्याम्ऽइव ॥ ११ ॥

ही पहा तुमची स्तुति, अभिलषणीय वस्तूचा लाभ घडावा म्हणून आम्ही आतांच केली. सकलज्ञानसंपन्न देवांनो, तुम्हांला सदैव प्रणिपात करणारा जो मी त्यानें, सामान्य नव्हे तर अगदीं अपूर्व अशी स्तुति तुम्हाला अर्पण केली. ११.



उदु॒ ष्य वः॑ सवि॒ता सु॑प्रणीत॒योऽस्था॑दू॒र्ध्वो वरे॑ण्यः ।
नि द्वि॒पाद॒श्चतु॑ष्पादो अ॒र्थिनोऽवि॑श्रन्पतयि॒ष्णवः॑ ॥ १२ ॥

उत् । ऊं इति । स्यः । वः । सविता । सुऽप्रनीतयः । अस्थात् । ऊर्ध्वः । वरेण्यः ।
नि । द्विऽपादः । चतुःऽपादः । अर्थिनः । अविश्रन् । पतयिष्णवः ॥ १२ ॥

पहा तो तुमचा सूर्य, सन्मार्गबोधक देवांनो, तो सर्वोत्कृष्ट- जगत्प्रेरक सूर्य सज्ज होऊन उदय पावला आहे; आणि त्याबरोबर, नेहमीच आतुर असले द्विपाद, चतुष्पाद, आणि पक्षिजात हे आपआपल्या कार्यात कसे अगदीं गढून गेले आहेत. १२.



दे॒वंदे॑वं॒ वोऽव॑से दे॒वंदे॑वम॒भिष्ट॑ये ।
दे॒वंदे॑वं हुवेम॒ वाज॑सातये गृ॒णन्तो॑ दे॒व्या धि॒या ॥ १३ ॥

देवम्ऽदेवम् । वः । अवसे । देवम्ऽदेवम् । अभिष्टये ।
देवम्ऽदेवम् । हुवेम । वाजऽसातये । गृणन्तः । देव्या । धिया ॥ १३ ॥

संरक्षणासाठी, देवांना- तुम्हां देवांनाच आम्ही हांक मारतो; इच्छित प्राप्त व्हावें म्हणून देवांची- तुम्हां देवांचीच विनवणी करतो, आणि सत्वसामर्थ्य मिळविण्याकरितां एकाग्रबुद्धीनें स्तवन करून देवांची- तुम्हा देवांचीच करुणा भाकतों. १३.



दे॒वासो॒ हि ष्मा॒ मन॑वे॒ सम॑न्यवो॒ विश्वे॑ सा॒कं सरा॑तयः ।
ते नो॑ अ॒द्य ते अ॑प॒रं तु॒चे तु नो॒ भव॑न्तु वरिवो॒विदः॑ ॥ १४ ॥

देवासः । हि । स्म । मनवे । सऽमन्यवः । विश्वे । साकम् । सऽरातयः ।
ते । नः । अद्य । ते । अपरम् । तुचे । तु । नः । भवन्तु । वरिवःऽविदः ॥ १४ ॥

हे देवांनों, मनुऋषीकरितां तुहीं सर्व एकाच विचाराने प्रेरित झालां, त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी एकच वरदान दिलेत तर आज आणि पुढे देखील आमच्या मुलाबाळांना तुम्ही उत्तम रीतीनें लाभदायक व्हा १४.



प्र वः॑ शंसाम्यद्रुहः सं॒स्थ उप॑स्तुतीनाम् ।
न तं धू॒र्तिर्व॑रुण मित्र॒ मर्त्यं॒ यो वो॒ धाम॒भ्योऽवि॑धत् ॥ १५ ॥

प्र । वः । शंसामि । अद्रुहः । सम्ऽस्थे । उपऽस्तुतीनाम् ।
न । तम् । धूर्तिः । वरुण । मित्र । मर्त्यम् । यः । वः । धामऽभ्यः । अविधत् ॥ १५ ॥

कोणाचाही द्वेष न करणाऱ्या तुम्हां दिव्यविबुधांचे स्तुतिकीर्तनाच्या प्रसंगीं मी गुणवर्णन करतो. कारण हे जगन्मित्रा वरुणा, ज्याने तुमचें तेजोमय स्थान मिळण्यासाठी उपासना केली, त्याला कोणताही अपाय होत नाहीं. १५.



प्र स क्षयं॑ तिरते॒ वि म॒हीरिषो॒ यो वो॒ वरा॑य॒ दाश॑ति ।
प्र प्र॒जाभि॑र्जायते॒ धर्म॑ण॒स्पर्यरि॑ष्टः॒ सर्व॑ एधते ॥ १६ ॥

प्र । सः । क्षयम् । तिरते । वि । महीः । इषः । यः । वः । वराय । दाशति ।
प्र । प्रऽजाभिः । जायते । धर्मणः । परि । अरिष्टः । सर्वः । एधते ॥ १६ ॥

तुमचा वरप्रसाद मिळावा म्हणून जो भक्त तुम्हांला आपला भक्तिभाव अर्पण करतो, तो अचलस्थानाला आणि श्रेष्ठ अशा मनोत्साहाला निश्चितपणे पोहोचतो; तो आपल्या प्रजेसहवर्तमान जगांत धर्माचरणानें वर्तन करतो; आणि त्याचे सर्व लोक उपद्रवरहित राहून उत्कर्ष पावतात. १६.



ऋ॒ते स वि॑न्दते यु॒धः सु॒गेभि॑र्या॒त्यध्व॑नः ।
अ॒र्य॒मा मि॒त्रो वरु॑णः॒ सरा॑तयो॒ यं त्राय॑न्ते स॒जोष॑सः ॥ १७ ॥

ऋते । सः । विन्दते । युधः । सुऽगेभिः । याति । अध्वनः ।
अर्यमा । मित्रः । वरुणः । सऽरातयः । यम् । त्रायन्ते । सऽजोषसः ॥ १७ ॥

अर्यमा, मित्र आणि वरुण असे भक्तवत्सल आणि सारखेच वरदान देणारे देव ज्याचे रक्षण करतात त्याला युद्ध केल्यावाचूनच लाभ होतो, आणि सुगम मार्गांनीच तो नेहमी इच्छित स्थळी जातो. १७.



अज्रे॑ चिदस्मै कृणुथा॒ न्यङ्च॑नं दु॒र्गे चि॒दा सु॑सर॒णम् ।
ए॒षा चि॑दस्माद॒शनिः॑ प॒रो नु सास्रे॑धन्ती॒ वि न॑श्यतु ॥ १८ ॥

अज्रे । चित् । अस्मै । कृणुथ । निऽअञ्चनम् । दुःऽगे । चित् । आ । सुऽसरणम् ।
एषा । चित् । अस्मात् । अशनिः । परः । नु । सा । अस्रेधन्ती । वि । नश्यतु ॥ १८ ॥

चढणीच्या मैदानांतही अशा भक्ताकरितां तुम्ही उतार करतां, दुर्गम प्रदेशांतूनही सहज जातां येईल अशी वाट करतां; म्हणून शत्रूने फेकलेले अस्त्रसुद्धा दूर जाऊन पडो आणि कोणालाही इजा न करितां नष्ट होऊन जावो. १८



यद॒द्य सूर्य॑ उद्य॒ति प्रिय॑क्षत्रा ऋ॒तं द॒ध ।
यन्नि॒म्रुचि॑ प्र॒बुधि॑ विश्ववेदसो॒ यद्वा॑ म॒ध्यंदि॑ने दि॒वः ॥ १९ ॥

यत् । अद्य । सूर्यः । उत्ऽयति । प्रियऽक्षत्राः । ऋतम् । दध ।
यत् । निऽम्रुचि । प्रऽबुधि । विश्वऽवेदसः । यत् । वा । मध्यन्दिने । दिवः ॥ १९ ॥

आज सूर्य उदय पावतांच जर, हे क्षात्रतेजप्रिय विबुधांनो, तुम्ही आम्हांला सद्धर्माचा उपदेश केला आहे; आणि सूर्यास्ताच्या वेळीं, उषःकाली, किंवा हे सकलज्ञानसंपन्न देवांनो, माध्यान्हकाळीं देखील जर तोच उपदेश केला आहे; १९.



यद्वा॑भिपि॒त्वे अ॑सुरा ऋ॒तं य॒ते छ॒र्दिर्ये॒म वि दा॒शुषे॑ ।
व॒यं तद्वो॑ वसवो विश्ववेदस॒ उप॑ स्थेयाम॒ मध्य॒ आ ॥ २० ॥

यत् । वा । अभिऽपित्वे । असुराः । ऋतम् । यते । छर्दिः । येम । वि । दाशुषे ।
वयम् । तत् । वः । वसवः । विश्वऽवेदसः । उप । स्थेयाम । मध्ये । आ ॥ २० ॥

किंवा प्रत्यक्ष आगमन करून, हे आत्मबलसंपन्न विभूतींनो, सद्धर्माचरणानें करून हवि अर्पण करणाऱ्या भक्ताला जर तुम्ही उत्कृष्ट निवासस्थान देता तर हे दिव्यनिधींनो, हे सर्वधनाढथ विबुधांनो, आम्ही सुद्धा त्या निवासस्थानीं राहू असें करा. २०



यद॒द्य सूर॒ उदि॑ते॒ यन्म॒ध्यंदि॑न आ॒तुचि॑ ।
वा॒मं ध॒त्थ मन॑वे विश्ववेदसो॒ जुह्वा॑नाय॒ प्रचे॑तसे ॥ २१ ॥

यत् । अद्य । सूरे । उत्ऽइते । यत् । मध्यन्दिने । आऽतुचि ।
वामम् । धत्थ । मनवे । विश्वऽवेदसः । जुह्वानाय । प्रऽचेतसे ॥ २१ ॥

जर आज सूर्य उदय पावतांच, किंवा माध्यान्हकाळीं, किंवा अस्तमानी ती अभिलषणीय वस्तु हे सकलधनसपन्न देवांनो, तुम्ही हवि अर्पण करणाऱ्या आणि ज्ञानसंपन्न मनुराजाला दिलीत; २१.



व॒यं तद्वः॑ सम्राज॒ आ वृ॑णीमहे पु॒त्रो न ब॑हु॒पाय्य॑म् ।
अ॒श्याम॒ तदा॑दित्या॒ जुह्व॑तो ह॒विर्येन॒ वस्यो॒ऽनशा॑महै ॥ २२ ॥

वयम् । तत् । वः । सम्ऽराजः । आ । वृणीमहे । पुत्रः । न । बहुऽपाय्यम् ।
अश्याम । तत् । आदित्याः । जुह्वतः । हविः । येन । वस्यः । अनशामहै ॥ २२ ॥

तर आम्हींही तीच वस्तु हे सर्वाधीशविभूतींनो, तीच विलोभनीय वस्तु लडिवाळ पुत्राप्रमाणे तुम्हाजवळ मागत आहों ती प्राप्त होवो; हे आदित्यानों, आम्हीही हवि अर्पण करीत असततो, तर त्या योगाने आम्हालाही तिचा लाभ घडो. २३.



ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त २८ ( विश्वेदेवसूक्त )

ऋषी - विश्वेदेवसूक्त देवता - विश्वेदेव छंद - १-३, ५ गायत्री; ४ उष्णिह



ये त्रिं॒शति॒ त्रय॑स्प॒रो दे॒वासो॑ ब॒र्हिरास॑दन् ।
वि॒दन्नह॑ द्वि॒तास॑नन् ॥ १ ॥

ये । त्रिंशति । त्रयः । परः । देवासः । बर्हिः । आ । असदन् ।
विदन् । अह । द्विता । असनन् ॥ १ ॥

जे तीन आणि अधिक तीन इतके दिव्यविभूति कुशासनावर विराजमान झाले आहेत त्यांनीं सर्व जाणले. आणि पहा, दोन्हीं प्रकारांनीं वरदान दिले. १.



वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा स्मद्रा॑तिषाचो अ॒ग्नयः॑ ।
पत्नी॑वन्तो॒ वष॑ट्कृताः ॥ २ ॥

वरुणः । मित्रः । अर्यमा । स्मद्रातिऽसाचः । अग्नयः ।
पत्नीऽवन्तः । वषट्ऽकृताः ॥ २ ॥

सुवरद वरुण, तसेंच अर्यमा आणि उत्तम आहुतीचा स्वीकार करणारे आहवनीयादि अधग्नि, हे आपल्या शक्तिसह प्राप्त झाले आणि त्यांना वषट् शब्दोच्चाराने हविर्भाग मिळाला. २



ते नो॑ गो॒पा अ॑पा॒च्यास्त उद॒क्त इ॒त्था न्य॑क् ।
पु॒रस्ता॒त्सर्व॑या वि॒शा ॥ ३ ॥

ते । नः । गोपाः । अपाच्याः । ते । उदक् । ते । इत्था । न्यक् ।
पुरस्तात् । सर्वया । विशा ॥ ३ ॥

ते पाठीमागून, वरून, येथें, खाली आणि समोर अशा सर्व बाजूंनी आमचे रक्षण करणारे आहेत. ३.



यथा॒ वश॑न्ति दे॒वास्तथेद॑स॒त्तदे॑षां॒ नकि॒रा मि॑नत् ।
अरा॑वा च॒न मर्त्यः॑ ॥ ४ ॥

यथा । वशन्ति । देवाः । तथा । इत् । असत् । तत् । एषाम् । नकिः । आ । मिनत् ।
अरावा । चन । मर्त्यः ॥ ४ ॥

देव जशी इच्छा करतात तसेंच होतें. आणि कोणीही दुष्ट अधार्मिक मनुष्य त्यांच्या त्या इच्छेला मोडून काढू शकत नाहीं. ४.



स॒प्ता॒नां स॒प्त ऋ॒ष्टयः॑ स॒प्त द्यु॒म्नान्ये॑षाम् ।
स॒प्तो अधि॒ श्रियो॑ धिरे ॥ ५ ॥

सप्तानाम् । सप्त । ऋष्टयः । सप्त । द्युम्नानि । एषाम् ।
सप्तो इति । अधि । श्रियः । धिरे ॥ ५ ॥

त्यांच्यापैकी सातांजवळ सात भाले असतात, त्यांची तेजस्वी वलये सात आहेत आणि त्यांनी शोभा धारण केल्या आहेत त्याही सातच आहेत. ५



ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त २९ ( कूटसूक्त )

ऋषी - मनु वैवस्वत अथवा कश्यप मारीच देवता - विश्वेदेव छंद - द्विपदा चिरा



ब॒भ्रुरेको॒ विषु॑णः सू॒नरो॒ युवा॒ञ्ज्य॑ङ्क्ते हिर॒ण्यय॑म् ॥ १ ॥

बभ्रुः । एकः । विषुणः । सूनरः । युवा । अञ्जि । अङ्क्ते । हिरण्ययम् ॥ १ ॥

त्यांतील एक किंचित् पिवळसर, सर्वसंचारी, शूर आणि तरुण आहे. त्याच्या अंगावरील सुवर्णभूषण स्पष्टपणे दृग्गोचर होतें. १.



योनि॒मेक॒ आ स॑साद॒ द्योत॑नो॒ऽन्तर्दे॒वेषु॒ मेधि॑रः ॥ २ ॥

योनिम् । एकः । आ । ससाद । द्योतनः । अन्तः । देवेषु । मेधिरः ॥ २ ॥

दुसरा एक आपल्या स्थानी विराजमान झाला आहे. तो देदीप्यमान आणि देवांमध्यें अत्यंत प्रज्ञावान आहे. २.



वाशी॒मेको॑ बिभर्ति॒ हस्त॑ आय॒सीम॒न्तर्दे॒वेषु॒ निध्रु॑विः ॥ ३ ॥

वाशीम् । एकः । बिभर्ति । हस्ते । आयसीम् । अन्तः । देवेषु । निऽध्रुविः ॥ ३ ॥

एक आपल्या हातांत पोलादाची बरची धारण करतो, आणि देवांमध्ये संग्रामांत अगदीं अचल राहतो. ३.



वज्र॒मेको॑ बिभर्ति॒ हस्त॒ आहि॑तं॒ तेन॑ वृ॒त्राणि॑ जिघ्नते ॥ ४ ॥

वज्रम् । एकः । बिभर्ति । हस्ते । आऽहितम् । तेन । वृत्राणि । जिघ्नते ॥ ४ ॥

एक आपल्या हातीं व्यवस्थित असें वज्र धारण करतो, आणि त्या योगाने वृत्रराक्षसांचा निःपात करतो. ४.



ति॒ग्ममेको॑ बिभर्ति॒ हस्त॒ आयु॑धं॒ शुचि॑रु॒ग्रो जला॑षभेषजः ॥ ५ ॥

तिग्मम् । एकः । बिभर्ति । हस्ते । आयुधम् । शुचिः । उग्रः । जलाषऽभेषजः ॥ ५ ॥

एक आपल्या हातांत फारच तीव्र असें शस्त्र धारण करतो; तो उग्र खरा, परंतु पवित्र आणि आरोग्यकारक औषधे प्राप्त करून देणाराही आहे. ५.



प॒थ एकः॑ पीपाय॒ तस्क॑रो यथाँ ए॒ष वे॑द निधी॒नाम् ॥ ६ ॥

पथः । एकः । पीपाय । तस्करः । यथा । एषः । वेद । निऽधीनाम् ॥ ६ ॥

एक पुढे जाणाऱ्या वाटाड्याप्रमाणे मार्गांना प्रशस्त करतो, आणि भूमीगत निधान कोठे आहे तेंही त्याला कळते. ६.



त्रीण्येक॑ उरुगा॒यो वि च॑क्रमे॒ यत्र॑ दे॒वासो॒ मद॑न्ति ॥ ७ ॥

त्रीणि । एकः । उरुऽगायः । वि । चक्रमे । यत्र । देवासः । मदन्ति ॥ ७ ॥

एक जो सर्वगामी विभूति तीन पावले चालून गेला आहे, त्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष देवसुद्धा तल्लीन होतात. ५७.



विभि॒र्द्वा च॑रत॒ एक॑या स॒ह प्र प्र॑वा॒सेव॑ वसतः ॥ ८ ॥

विऽभिः । द्वा । चरतः । एकया । सह । प्र । प्रवासाऽइव । वसतः ॥ ८ ॥

पक्षी जोडलेल्या वाहनाच्या योगाने दोघेजण आपल्या बरोबर एक स्त्री घेऊन प्रवाशाप्रमाणें मार्गक्रमण करतात. ८.



सदो॒ द्वा च॑क्राते उप॒मा दि॒वि स॒म्राजा॑ स॒र्पिरा॑सुती ॥ ९ ॥

सदः । द्वा । चक्राते इति । उपऽमा । दिवि । सम्ऽराजा । सर्पिरासुती इति सर्पिःऽआसुती ॥ ९ ॥

परस्परांचीच ज्यांना उपमा साजते असे दुसारे दोघेजण जगताचे सम्राट असून द्युलोकी वास करतात. त्यांच्या प्रीत्यर्थ घृताहुति अर्पण होत असतात. ९.



अर्च॑न्त॒ एके॒ महि॒ साम॑ मन्वत॒ तेन॒ सूर्य॑मरोचयन् ॥ १० ॥

अर्चन्तः । एके । महि । साम । मन्वत । तेन । सूर्यम् । अरोचयन् ॥ १० ॥

आणि काहीजण उच्च स्वरांत ऋक्‌स्तोत्र म्हणणारे असतात ते "बृहत्" सामाचे मनन करतात आणि आपल्या तेजाने सूर्यला देखील प्रकशित करतात. १०



ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ३० ( देवसूक्त )

ऋषी - मनु वैवस्वत देवता - विश्वेदेव छंद - १ गायत्री; २ पुर उष्णिह; ३ बृहती; ४ अनुष्टुभ्



न॒हि वो॒ अस्त्य॑र्भ॒को देवा॑सो॒ न कु॑मार॒कः ।
विश्वे॑ स॒तोम॑हान्त॒ इत् ॥ १ ॥

नहि । वः । अस्ति । अर्भकः । देवासः । न । कुमारकः ।
विश्वे । सतःऽमहान्तः । इत् ॥ १ ॥

तुमच्यामध्यें कोणीही अगदीं लहान बालक नाहीं, किंवा हे देवांनों, कोणी कुमारही नाही. तुम्ही सर्व सारखेच थोर आहांत. १.



इति॑ स्तु॒तासो॑ असथा रिशादसो॒ ये स्थ त्रय॑श्च त्रिं॒शच्च॑ ।
मनो॑र्देवा यज्ङियासः ॥ २ ॥

इति । स्तुतासः । असथ । रिशादसः । ये । स्थ । त्रयः । च । त्रिंशत् । च ।
मनोः । देवाः । यज्ञियासः ॥ २ ॥

याप्रमाणे तुमचे स्तवन झालें, पण हे शत्रुनाशकांनो, तुम्ही जे तीन आणि तीस आहात, ते हे यजनीय देवानो, तुम्ही मनूचे आहांत. २.



ते न॑स्त्राध्वं॒ ते॑ऽवत॒ त उ॑ नो॒ अधि॑ वोचत ।
मा नः॑ प॒थः पित्र्या॑न्मान॒वादधि॑ दू॒रं नै॑ष्ट परा॒वतः॑ ॥ ३ ॥

ते । नः । त्राध्वम् । ते । अवत । ते । ऊं इति । नः । अधि । वोचत ।
मा । नः । पथः । पित्र्यात् । मानवात् । अधि । दूरम् । नैष्ट । पराऽवतः ॥ ३ ॥

असे ते तुम्ही आमचे रक्षण करा, आम्हांवर कृपा करा, आम्हांला आशीर्वाद द्या; आणि आमचा पूर्वज जो पिता मनु त्याच्या पुरातन मार्गांपासून आम्हांस भलतीकडे दूर जाऊं देऊं नका. ३.



ये दे॑वास इ॒ह स्थन॒ विश्वे॑ वैश्वान॒रा उ॒त ।
अ॒स्मभ्यं॒ शर्म॑ स॒प्रथो॒ गवेऽश्वा॑य यच्छत ॥ ४ ॥

ये । देवासः । इह । स्थन । विश्वे । वैश्वानराः । उत ।
अस्मभ्यम् । शर्म । सऽप्रथः । गवे । अश्वाय । यच्छत ॥ ४ ॥

हे सकलविभूतींनो, तुम्ही जे येथेंच यज्ञमंदिरांत आहांत ते तुम्ही ज्ञान गोधन आणि अश्वसंपत्ति यांच्यासाठी आम्हांला प्रशस्त आणि कल्याणप्रद असें स्थान द्या. ४.



ॐ तत् सत्



GO TOP