ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त ११ ते २०

ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ११ (अग्निसूक्त )

ऋषी - वत्स काण्व देवता - अग्नि छंद - १ प्रतिष्ठा; २ वर्धमाना; ३-९ गायत्री; १० त्रिष्टुभ्त्वम॑ग्ने व्रत॒पा अ॑सि दे॒व आ मर्त्ये॒ष्वा । त्वं य॒ज्ङेष्वीड्यः॑ ॥ १ ॥

त्वम् । अग्ने । व्रतऽपाः । असि । देवः । आ । मर्त्येषु । आ ।
त्वम् । यज्ञेषु । ईड्यः ॥ १ ॥

हे अग्निदेवा, तूं आमच्या धर्मनियमांचे रक्षण करणारा आहेस. या मर्त्यजनांमध्यें देव तूंच, आणि यज्ञकर्मांतही स्तवनार्ह तूंच आहेस. १.त्वम॑सि प्र॒शस्यो॑ वि॒दथे॑षु सहन्त्य । अग्ने॑ र॒थीर॑ध्व॒राणा॑म् ॥ २ ॥

त्वम् । असि । प्रऽशस्यः । विदथेषु । सहन्त्य ।
अग्ने । रथीः । अध्वराणाम् ॥ २ ॥

तूं धर्मसभेमध्ये प्रशंसनीयच आहेस; आणि हे संकर्षणा, अग्ने, अध्वरयागांचाही तूं धुरीण आहेस. २.स त्वम॒स्मदप॒ द्विषो॑ युयो॒धि जा॑तवेदः । अदे॑वीरग्ने॒ अरा॑तीः ॥ ३ ॥

सः । त्वम् । अस्मत् । अप । द्विषः । युयोधि । जातऽवेदः ।
अदेवीः । अग्ने । अरातीः ॥ ३ ॥

तर हे वस्तुजात जाणणाऱ्या देवा, तूं धर्मद्वेष्ट्यांशी युद्ध करून त्यांना आमच्यापासून दूर पिटाळून लाव. त्याचप्रमाणे देवनिंदकांना आणि दानधर्म न करणाऱ्यांनाही हे अग्ने, तूं दूर हाकलून दे. ३.अन्ति॑ चि॒त्सन्त॒मह॑ य॒ज्ङं मर्त॑स्य रि॒पोः । नोप॑ वेषि जातवेदः ॥ ४ ॥

अन्ति । चित् । सन्तम् । अह । यज्ञम् । मर्तस्य । रिपोः ।
न । उप । वेषि । जातऽवेदः ॥ ४ ॥

तुझ्या कितीही जवळ येऊन तुला चिकटला तरी भक्ताच्या शत्रूच्या यज्ञाचा स्वीकार, हे वस्तुजात जाणणाऱ्या देवा, तूं कधी करीत नाहीस. ४.मर्ता॒ अम॑र्त्यस्य ते॒ भूरि॒ नाम॑ मनामहे । विप्रा॑सो जा॒तवे॑दसः ॥ ५ ॥

मर्ताः । अमर्त्यस्य । ते । भूरि । नाम । मनामहे ।
विप्रासः । जातऽवेदसः ॥ ५ ॥

म्हणूनच आम्ही मर्त्यजन, मृत्युरहित जो तूं देव त्या तुझ्या नावाचे वारंवार चिंतन करतो; कारण सर्ववस्तुजाणणारा जो तूं अग्नि, त्याचे उपासक आम्ही आहोंत. ५.विप्रं॒ विप्रा॒सोऽव॑से दे॒वं मर्ता॑स ऊ॒तये॑ । अ॒ग्निं गी॒र्भिर्ह॑वामहे ॥ ६ ॥

विप्रम् । विप्रासः । अवसे । देवम् । मर्तासः । ऊतये ।
अग्निम् । गीःऽभिः । हवामहे ॥ ६ ॥

तुज ज्ञानशीलाला आम्ही भक्तिशील जन कृपाप्रसादासाठी विनवीत आहोत; आम्ही मर्त्यजन सहायासाठी तुजला आळवीत आहोंत; आणि तुज अग्नीला स्तुतींनी पाचारण करीत आहोंत. ६.आ ते॑ व॒त्सो मनो॑ यमत्पर॒माच्चि॑त्स॒धस्था॑त् । अग्ने॒ त्वांका॑मया गि॒रा ॥ ७ ॥

आ । ते । वत्सः । मनः । यमत् । परमात् । चित् । सधऽस्थात् ।
अग्ने । त्वाम्ऽकामया । गिरा ॥ ७ ॥

हे अग्ने, वत्साने तुझ्याच अत्युच्च निवासापासून तुजविषयी आतुर होऊन स्तोत्रानें तुझें चित्त आपल्याकडे आकर्षण करून घेतले. ७.पु॒रु॒त्रा हि स॒दृङ्ङसि॒ विशो॒ विश्वा॒ अनु॑ प्र॒भुः । स॒मत्सु॑ त्वा हवामहे ॥ ८ ॥

पुरुऽत्रा । हि । सऽदृङ् । असि । विशः । विश्वाः । अनु । प्रऽभुः ।
समत्ऽसु । त्वा । हवामहे ॥ ८ ॥

तं सर्वांठायी समानदृष्टिच आहेस; अखिल मानवांमध्ये तूं त्यांचा सत्ताधीश प्रभू आहेस; म्हणून संग्रामामध्यें आम्ही तुलाच पाचारण करतो. ८.स॒मत्स्व॒ग्निमव॑से वाज॒यन्तो॑ हवामहे । वाजे॑षु चि॒त्ररा॑धसम् ॥ ९ ॥

समत्ऽसु । अग्निम् । अवसे । वाजऽयन्तः । हवामहे ।
वाजेषु । चित्रऽराधसम् ॥ ९ ॥

संग्रामामध्ये कृपाप्रसादासाठी, आम्ही सत्वविजयाकाङ्‌क्षी भक्त, सत्वपरिक्षेच्या प्रसंगीं अद्भुत वरदानें देणाऱ्या अग्नीचा धांवा करतो. ९.प्र॒त्नो हि क॒मीड्यो॑ अध्व॒रेषु॑ स॒नाच्च॒ होता॒ नव्य॑श्च॒ सत्सि॑ ।
स्वां चा॑ग्ने त॒न्वं॑ पि॒प्रय॑स्वा॒स्मभ्यं॑ च॒ सौभ॑ग॒मा य॑जस्व ॥ १० ॥

प्रत्नः । हि । कम् । ईड्यः । अध्वरेषु । सनात् । च । होता । नव्यः । च । सत्सि ।
स्वाम् । च । अग्ने । तन्वम् । पिप्रयस्व । अस्मभ्यम् । च । सौभगम् । आ । यजस्व ॥ १० ॥

खरोखर तूं पुराणपुरुष देव अध्वरयागामध्ये स्तवनार्ह आहेस; पुरातनकालापासून तूच स्तुत्य यज्ञहोता आहेस. तर हे अग्निदेवा, आपल्या स्वतःला संतोषित कर, आणि आम्हांलाही यज्ञद्वारे महद्‌भाग्याचा लाभ दे. १०.ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त १२ ( इंद्रसूक्त )

ऋषी - पर्वत काण्व देवता - इन्द्र छंद - उष्णिहय इ॑न्द्र सोम॒पात॑मो॒ मदः॑ शविष्ठ॒ चेत॑ति । येना॒ हंसि॒ न्य१॒॑त्रिणं॒ तमी॑महे ॥ १ ॥

यः । इन्द्र । सोमऽपातमः । मदः । शविष्ठ । चेतति ।
येन । हंसि । नि । अत्रिणम् । तम् । ईमहे ॥ १ ॥

हे इन्द्रा, तूं सोमरसाचे प्राशन अतिशय करणारा आहेस; त्या सोमरसाचा आवेश, हे अत्यंत प्रबल इन्द्रा, तुझ्या ठिकाणीं तीव्रपणानें जागृत होतो; आणि त्या आवेशानें तूं नरभक्षक राक्षसांप्पा उडवितोस. म्हणून तसाच आवेश आम्हांमध्येंही संचरावा अशीच आम्ही तुजजवळ याचना करतो. १.येना॒ दश॑ग्व॒मध्रि॑गुं वे॒पय॑न्तं॒ स्व॑र्णरम् । येना॑ समु॒द्रमावि॑था॒ तमी॑महे ॥ २ ॥

येन । दशऽग्वम् । अध्रिऽगुम् । वेपयन्तम् । स्वःऽनरम् ।
येन । समुद्रम् । आविथ । तम् । ईमहे ॥ २ ॥

ज्या सोमरसाच्या हर्षभरांत तूं दशग्व, अध्रिगु, कंपायमान झालेला दिव्यप्रकाशी सूर्य, आणि त्याचप्रमाणें अंतरिक्षांतील व पृथ्वीवरील सागर यांचें रक्षण केलेस त्या हर्षाची जोड आम्हांसही लाभो अशी आम्हीं तुजजवळ याचना करतो. २.येन॒ सिन्धुं॑ म॒हीर॒पो रथाँ॑ इव प्रचो॒दयः॑ । पन्था॑मृ॒तस्य॒ यात॑वे॒ तमी॑महे ॥ ३ ॥

येन । सिन्धुम् । महीः । अपः । रथान्ऽइव । प्रऽचोदयः ।
पन्थाम् । ऋतस्य । यातवे । तम् । ईमहे ॥ ३ ॥

ज्या हर्षभराच्या योगाने तूं पृथ्वीवरील मोठमोठ्या नद्यांना, त्यांनीं पुरातन, यथायोग्य आणि सरळ मार्गानें वहात जावे म्हणून, रथाला दौडत न्यावे त्याप्रमाणें समुद्राकडे नेऊन सोडतोस, त्या हर्षाची आम्ही तुजजवळ याचना करतो. ३.इ॒मं स्तोम॑म॒भिष्ट॑ये घृ॒तं न पू॒तम॑द्रिवः । येना॒ नु स॒द्य ओज॑सा व॒वक्षि॑थ ॥ ४ ॥

इमम् । स्तोमम् । अभिष्टये । घृतम् । न । पूतम् । अद्रिऽवः ।
येन । नु । सद्यः । ओजसा । ववक्षिथ ॥ ४ ॥

वज्रधरा, हें स्तोत्र, पवित्र घृताप्रमाणे आम्हांला अभीष्टप्रदच होणार; हें स्तोत्र असें आहे कीं त्याच्या योगाने तूं आपल्या स्वाभाविक ओजस्वितेनें तात्काळ पुढें सरसावलास. ४.इ॒मं जु॑षस्व गिर्वणः समु॒द्र इ॑व पिन्वते । इन्द्र॒ विश्वा॑भिरू॒तिभि॑र्व॒वक्षि॑थ ॥ ५ ॥

इमम् । जुषस्व । गिर्वणः । समुद्रःऽइव । पिन्वते ।
इन्द्र । विश्वाभिः । ऊतिऽभिः । ववक्षिथ ॥ ५ ॥

ह्या स्तोत्राचा, हे स्तवनार्ह इन्द्रा, तूं स्वीकार कर. तें समुद्राप्रमाणे हृदयांत उचंबळत असते आणि हे इन्द्रा, तूं ही सर्व प्रकारच्या भक्तरक्षक सामर्थ्यानिशी पुढे सरसावतोस. ५.यो नो॑ दे॒वः प॑रा॒वतः॑ सखित्व॒नाय॑ माम॒हे । दि॒वो न वृ॒ष्टिं प्र॒थय॑न्व॒वक्षि॑थ ॥ ६ ॥

यः । नः । देवः । पराऽवतः । सखिऽत्वनाय । ममहे ।
दिवः । न । वृष्टिम् । प्रथयन् । ववक्षिथ ॥ ६ ॥

आम्ही गुण्यागोविंदाने रहावे म्हणून त्वां देवाने दूरदूरच्या ठिकाणाहूनही इतक्या इच्छित वस्तु आम्हांस दिल्यात कीं, आकाशांतून पाऊस पडावा त्याप्रमाणें त्या जिकडे तिकडे विखुरल्या आहेत. ६.व॒व॒क्षुर॑स्य के॒तवो॑ उ॒त वज्रो॒ गभ॑स्त्योः । यत्सूर्यो॒ न रोद॑सी॒ अव॑र्धयत् ॥ ७ ॥

ववक्षुः । अस्य । केतवः । उत । वज्रः । गभस्त्योः ।
यत् । सूर्यः । न । रोदसी इति । अवर्धयत् ॥ ७ ॥

पहा ह्या इन्द्राचे ध्वज सरसरू लागले; आणि त्यानें आपल्या दोन्हीं हातांनी धरलेले वस्त्र देखील जोरानें शत्रूवर जाऊन आदळले. कारण सूर्याप्रमाणे द्यावापृथिवींनाही इन्द्राने जपून वाढविले आहे. ७.यदि॑ प्रवृद्ध सत्पते स॒हस्रं॑ महि॒षाँ अघः॑ । आदित्त॑ इन्द्रि॒यं महि॒ प्र वा॑वृधे ॥ ८ ॥

यदि । प्रऽवृद्ध । सत्ऽपते । सहस्रम् । महिषान् । अघः ।
आत् । इत् । ते । इन्द्रियम् । महि । प्र । ववृधे ॥ ८ ॥

हे ऋद्धिमंता, हे सज्जनप्रतिपालका, महिषाप्रमाणे काळ्या भोर ढगांचा आणि राक्षसांचा जेव्हां तूं संहार केलास त्या वेळी तुझे महान ईश्वरीसामर्थ्य अधिकच वृद्धिंगत झालें. ८.इन्द्रः॒ सूर्य॑स्य र॒श्मिभि॒र्न्य॑र्शसा॒नमो॑षति । अ॒ग्निर्वने॑व सास॒हिः प्र वा॑वृधे ॥ ९ ॥

इन्द्रः । सूर्यस्य । रश्मिऽभिः । नि । अर्शसानम् । ओषति ।
अग्निः । वनाऽइव । ससहिः । प्र । ववृधे ॥ ९ ॥

इन्द्र हा जगतास गांजणार्‍या राक्षसांना सूर्याच्या प्रखर किरणांनी जाळून फस्त करतो आणि दावाग्नि ज्याप्रमाणें वने होरपळून चोहोंकडे पसरतो त्याप्रमाणें, शत्रूंना दडपून टाकणारा इन्द्र आवेशाने वृद्धिंगत होतो. ९.इ॒यं त॑ ऋ॒त्विया॑वती धी॒तिरे॑ति॒ नवी॑यसी । स॒प॒र्यन्ती॑ पुरुप्रि॒या मिमी॑त॒ इत् ॥ १० ॥

इयम् । ते । ऋत्वियऽवती । धीतिः । एति । नवीयसी ।
सपर्यन्ती । पुरुऽप्रिया । मिमीते । इत् ॥ १० ॥

योग्य काळी स्फुरणारी आमची ही अपूर्व ध्यानशक्ति तुझ्याकडे धांव घेत आहे. ती सर्व प्रिय भक्ति तुझे इतके गौरव करते कीं तुला जणो काय कवटाळूनच धरते. १०.गर्भो॑ य॒ज्ङस्य॑ देव॒युः क्रतुं॑ पुनीत आनु॒षक् । स्तोमै॒रिन्द्र॑स्य वावृधे॒ मिमी॑त॒ इत् ॥ ११ ॥

गर्भः । यज्ञस्य । देवऽयुः । क्रतुम् । पुनीते । आनुषक् ।
स्तोमैः । इन्द्रस्य । ववृधे । मिमीते । इत् ॥ ११ ॥

हा यशाचा गाभा, हा देवाचा भक्त, पूर्वपद्धतिप्रमणे आपल्या यज्ञकर्माला इन्द्राच्या स्तवनांनीं पवित्र करतो, आणि इतका महत्त्वास चढतो कीं तो जणोंकाय जगालाच मुठीत ठेवतो असें वाटते. ११.स॒निर्मि॒त्रस्य॑ पप्रथ॒ इन्द्रः॒ सोम॑स्य पी॒तये॑ । प्राची॒ वाशी॑व सुन्व॒ते मिमी॑त॒ इत् ॥ १२ ॥

सनिः । मित्रस्य । पप्रथे । इन्द्रः । सोमस्य । पीतये ।
प्राची । वाशीऽइव । सुन्वते । मिमीते । इत् ॥ १२ ॥

जगन्मित्र जो भक्त त्याला पाहिजे तें देणारा इन्द्र हा सोमरस प्राशन करण्याकरितां सर्वविख्यात सर्वव्यापी झाला; त्याची वरदवाणी सोमार्पण करणाऱ्या भक्ताकडे वळली आणि त्याला तिने घेरून टाकले. १२.यं विप्रा॑ उ॒क्थवा॑हसोऽभिप्रम॒न्दुरा॒यवः॑ । घृ॒तं न पि॑प्य आ॒सन्यृ॒तस्य॒ यत् ॥ १३ ॥

यम् । विप्राः । उक्थऽवाहसः । अभिऽप्रमन्दुः । आयवः ।
घृतम् । न । पिप्ये । आसनि । ऋतस्य । यत् ॥ १३ ॥

उक्थ स्तोत्राने स्तवन करणाऱ्या ज्ञानी भक्तांनी ज्याला हृष्टचित्त केलें, तो इन्द्र, यज्ञांत सत्य धर्माच्या मुखांमध्ये जेव्हां आपल्या तेजाने घृताप्रमाणे रसरसला; १३.उ॒त स्व॒राजे॒ अदि॑तिः॒ स्तोम॒मिन्द्रा॑य जीजनत् । पु॒रु॒प्र॒श॒स्तमू॒तय॑ ऋ॒तस्य॒ यत् ॥ १४ ॥

उत । स्वऽराजे । अदितिः । स्तोमम् । इन्द्राय । जीजनत् ।
पुरुऽप्रशस्तम् । ऊतये । ऋतस्य । यत् ॥ १४ ॥

आणि स्वतःसिद्ध जगत्‌प्रभु-इन्द्रासाठी जेव्हां अदितीने वाखाणण्यायोग्य असें अत्युत्कृष्ट स्तोत्र सत्यधर्माच्या रक्षणाकरितां रचले. १४.अ॒भि वह्न॑य ऊ॒तयेऽनू॑षत॒ प्रश॑स्तये । न दे॑व॒ विव्र॑ता॒ हरी॑ ऋ॒तस्य॒ यत् ॥ १५ ॥

अभि । वह्नयः । ऊतये । अनूषत । प्रऽशस्तये ।
न । देव । विऽव्रता । हरी इति । ऋतस्य । यत् ॥ १५ ॥

जेव्हां यज्ञसंपादक भक्तांनी जगाच्या रक्षणाकरितां आणि आपल्या सहायासाठी तुझी स्तोत्रे गायिली तेव्हां, हे देवा, आपल्या कार्यापासून कधी न ढळणारे तुझे हरिद्वर्ण अश्व भक्तांना कधीही विन्मुख झाले नाहीत. १५यत्सोम॑मिन्द्र॒ विष्ण॑वि॒ यद्वा॑ घ त्रि॒त आ॒प्त्ये । यद्वा॑ म॒रुत्सु॒ मन्द॑से॒ समिन्दु॑भिः ॥ १६ ॥

यत् । सोमम् । इन्द्र । विष्णवि । यत् । वा । घ । त्रिते । आप्त्ये ।
यत् । वा । मरुत्ऽसु । मन्दसे । सम् । इन्दुऽभिः ॥ १६ ॥

हे इन्द्रा, तूं विष्णूच्या स्वरूपांत किंवा त्रित अप्त्याच्या स्वरूपांत, किंवा तुझे अनुचर जे मरुत् त्यांच्या समूहांत सोमबिंदूंनी जसा हर्षनिर्भर होतोस; १६यद्वा॑ शक्र परा॒वति॑ समु॒द्रे अधि॒ मन्द॑से । अ॒स्माक॒मित्सु॒ते र॑णा॒ समिन्दु॑भिः ॥ १७ ॥

यत् । वा । शक्र । पराऽवति । समुद्रे । अधि । मन्दसे ।
अस्माकम् । इत् । सुते । रण । सम् । इन्दुऽभिः ॥ १७ ॥

किंवा हे सर्वसमर्था, अत्यंत दूरचा जो आकाशरूपी समुद्र त्याच्याही वरच्या लोकांत तूं तल्लीन होतोस, तसा आज आमच्याही अभिनव सोमबिन्दूंनी संतुष्ट हो. १७.यद्वासि॑ सुन्व॒तो वृ॒धो यज॑मानस्य सत्पते । उ॒क्थे वा॒ यस्य॒ रण्य॑सि॒ समिन्दु॑भिः ॥ १८ ॥

यत् । वा । असि । सुन्वतः । वृधः । यजमानस्य । सत्ऽपते ।
उक्थे । वा । यस्य । रण्यसि । सम् । इन्दुऽभिः ॥ १८ ॥

किंवा सोमार्पण करणाऱ्या दुसऱ्या एखाद्या सद्‌भक्ताची जशी तूं महती वाढवितोस किंवा हे सज्जनप्रतिपालका, जसा त्याच्या यज्ञांत सोमबिंदूंनी हृष्टचित्त होतोस; तसाच आमच्याही सोमरसाने तूं संतुष्ट हो. १८दे॒वंदे॑वं॒ वोऽव॑स॒ इन्द्र॑मिन्द्रं गृणी॒षणि॑ । अधा॑ य॒ज्ङाय॑ तु॒र्वणे॒ व्या॑नशुः ॥ १९ ॥

देवम्ऽदेवम् । वः । अवसे । इन्द्रम्ऽइन्द्रम् । गृणीषणि ।
अध । यज्ञाय । तुर्वणे । वि । आनशुः ॥ १९ ॥

देवाची-त्या देवाचीच मीं संरक्षणाकरिता स्तुति करीन- स्तवनाच्या रंगांत त्याचेंच स्तवन करीन; पहा कीं दुष्कृतनाशक जो यज्ञ त्या साठींच भक्तांना यच्चावत गोष्टी प्राप्त झाल्या आहेत. १९.य॒ज्ङेभि॑र्य॒ज्ङवा॑हसं॒ सोमे॑भिः सोम॒पात॑मम् । होत्रा॑भि॒रिन्द्रं॑ वावृधु॒र्व्या॑नशुः ॥ २० ॥

यज्ञेभिः । यज्ञऽवाहसम् । सोमेभिः । सोमऽपातमम् ।
होत्राभिः । इन्द्रम् । ववृधुः । वि । आनशुः ॥ २० ॥

यज्ञ तडीस नेणाऱ्या इन्द्राला यज्ञानेंच संतुष्ट केलें; सोमाविषयी अत्यंत लालस अशा इन्द्राला सोमार्पणानेंच प्रसन्न केले; होत्रस्तवनांनींही इंद्राचेंच गौरव भक्तांनी केलें; म्हणूनच त्यांना इच्छित वस्तूचा लाभ झाला. २०.म॒हीर॑स्य॒ प्रणी॑तयः पू॒र्वीरु॒त प्रश॑स्तयः । विश्वा॒ वसू॑नि दा॒शुषे॒ व्या॑नशुः ॥ २१ ॥

महीः । अस्य । प्रऽनीतयः । पूर्वीः । उत । प्रऽशस्तयः ।
विश्वा । वसूनि । दाशुषे । वि । आनशुः ॥ २१ ॥

इन्द्राची धोरणे फारच महनीय; त्याची स्तुति करावी तेवढी थोडीच. सर्व प्रकारची संपत्ती भक्ताकरता असते आणि त्यांनींच ती संपत्ति प्राप्त करून घेतली आहे. २१.इन्द्रं॑ वृ॒त्राय॒ हन्त॑वे दे॒वासो॑ दधिरे पु॒रः । इन्द्रं॒ वाणी॑रनूषता॒ समोज॑से ॥ २२ ॥

इन्द्रम् । वृत्राय । हन्तवे । देवासः । दधिरे । पुरः ।
इन्द्रम् । वाणीः । अनूषत । सम् । ओजसे ॥ २२ ॥

वृत्राचा वध करण्यासाठीं विबुधांनी इन्द्राला अग्रेसर केले आणि ओजस्विता प्राप्त करून घेण्याकरिता भक्तांच्या वाणींनी इन्द्राचीच स्तुति गायिली. २२.म॒हान्तं॑ महि॒ना व॒यं स्तोमे॑भिर्हवन॒श्रुत॑म् । अ॒र्कैर॒भि प्र णो॑नुमः॒ समोज॑से ॥ २३ ॥

महान्तम् । महिना । वयम् । स्तोमेभिः । हवनऽश्रुतम् ।
अर्कैः । अभि । प्र । नोनुमः । सम् । ओजसे ॥ २३ ॥

आपल्या महिम्याने थोर असलेल्या इन्द्राची सामगायनांनी आम्ही स्तुति करू आणि भक्तांचा धांवा ऐकणाऱ्या इन्द्राप्रीत्यर्थ ओजस्विता प्राप्त करून घेण्याककरतां "अर्क" स्तोत्रे म्हणूं. २३न यं वि॑वि॒क्तो रोद॑सी॒ नान्तरि॑क्षाणि व॒ज्रिण॑म् । अमा॒दिद॑स्य तित्विषे॒ समोज॑सः ॥ २४ ॥

न । यम् । विविक्तः । रोदसी इति । न । अन्तरिक्षाणि । वज्रिणम् ।
अमात् । इत् । अस्य । तित्विषे । सम् । ओजसः ॥ २४ ॥

आकाश आणि पृथ्वी हे दोन्हीं लोक देखील वज्रधर इन्द्राला आकलन करूं शकत नाहीत आणि अंतरिक्ष तर नाहींच नाहीं. उलट, ह्याच्याच प्रभावामुळे, ह्याच्याच ओजस्वितेमुळे मात्र सर्वच विश्व उज्ज्वल होते. २४.यदि॑न्द्र पृत॒नाज्ये॑ दे॒वास्त्वा॑ दधि॒रे पु॒रः । आदित्ते॑ हर्य॒ता हरी॑ ववक्षतुः ॥ २५ ॥

यत् । इन्द्र । पृतनाज्ये । देवाः । त्वा । दधिरे । पुरः ।
आत् । इत् । ते । हर्यता । हरी इति । ववक्षतुः ॥ २५ ॥

इन्द्रा, सैन्यें एकमेकांवर हल्ला चढवितात अशा युद्धांत जेव्हां दिव्यविबुधांनी तुला आपला धुरीण केलें त्या क्षणीच तुझ्या दोन्ही हरिद्वर्ण अश्वांनी तुला शत्रुसैन्यावर वाढून नेले. २५य॒दा वृ॒त्रं न॑दी॒वृतं॒ शव॑सा वज्रि॒न्नव॑धीः । आदित्ते॑ हर्य॒ता हरी॑ ववक्षतुः ॥ २६ ॥

यदा । वृत्रम् । नदीऽवृतम् । शवसा । वज्रिन् । अवधीः ।
आत् । इत् । ते । हर्यता । हरी इति । ववक्षतुः ॥ २६ ॥

वज्रधर इन्द्रा, नदीत लपून बसलेल्या वृत्राला जेव्हां तूं झपाट्यासरशी ठर केलेस, त्या वेळीं देखील तुझ्या हरिद्वर्ण अश्वांनीच तुला शत्रूवर चढाई करून नेले. २६.य॒दा ते॒ विष्णु॒रोज॑सा॒ त्रीणि॑ प॒दा वि॑चक्र॒मे । आदित्ते॑ हर्य॒ता हरी॑ ववक्षतुः ॥ २७ ॥

यदा । ते । विष्णुः । ओजसा । त्रीणि । पदा । विऽचक्रमे ।
आत् । इत् । ते । हर्यता । हरी इति । ववक्षतुः ॥ २७ ॥

तुझा प्रियमित्र जो विष्णू त्यानें आपल्या पराक्रमानें जेव्हां तीन पावले टाकली, तेव्हांही तुझ्या हरिद्वर्ण अश्वांनीच त्याला रथांतून नेले. २७.य॒दा ते॑ हर्य॒ता हरी॑ वावृ॒धाते॑ दि॒वेदि॑वे । आदित्ते॒ विश्वा॒ भुव॑नानि येमिरे ॥ २८ ॥

यदा । ते । हर्यता । हरी इति । ववृधाते इति । दिवेऽदिवे ।
आत् । इत् । ते । विश्वा । भुवनानि । येमिरे ॥ २८ ॥

तुझे हरीद्वर्ण अश्व प्रतिदिवशीं ज्या ज्या वेळेस धडाडीने फारच विशाल दिसू लागले त्या त्या वेळेस ही सर्व भुवनें तुझ्यापुढे नम्र झाली. २८.य॒दा ते॒ मारु॑ती॒र्विश॒स्तुभ्य॑मिन्द्र नियेमि॒रे । आदित्ते॒ विश्वा॒ भुव॑नानि येमिरे ॥ २९ ॥

यदा । ते । मारुतीः । विशः । तुभ्यम् । इन्द्र । निऽयेमिरे ।
आत् । इत् । ते । विश्वा । भुवनानि । येमिरे ॥ २९ ॥

तुझे अनुचर जे मरुत्‌गण त्यांनी, हे इन्द्रा, जेव्हां आपली मस्तके तुझ्या पुढें लवविलीं, त्या वेळेस देखील सर्व भुवनें तुझ्या चरणी लीन झाली. २९य॒दा सूर्य॑म॒मुं दि॒वि शु॒क्रं ज्योति॒रधा॑रयः । आदित्ते॒ विश्वा॒ भुव॑नानि येमिरे ॥ ३० ॥

यदा । सूर्यम् । अमुम् । दिवि । शुक्रम् । ज्योतिः । अधारयः ।
आत् । इत् । ते । विश्वा । भुवनानि । येमिरे ॥ ३० ॥

ह्या सूर्याला, ह्या शुभ्रवर्ण तेजोगोलकाला तूं आकाशांत आधार दिलास, हे पाहतांच सर्व भुवनें तुझ्या पुढें तत्काळ विनम्र झाली. ३०.इ॒मां त॑ इन्द्र सुष्टु॒तिं विप्र॑ इयर्ति धी॒तिभिः॑ । जा॒मिं प॒देव॒ पिप्र॑तीं॒ प्राध्व॒रे ॥ ३१ ॥

इमाम् । ते । इन्द्र । सुऽस्तुतिम् । विप्रः । इयर्ति । धीतिऽभिः ।
जामिम् । पदाऽइव । पिप्रतीम् । प्र । अध्वरे ॥ ३१ ॥

इन्द्रा, हें तुझें उत्तम आल्हादप्रद कवन प्रतिभाशाली कवि आत्मस्फूर्तीनें तुला समर्पण करतो; यज्ञमंडपांत आपल्या बन्धुवर्गास आपण गोड बोलून उत्तम ठिकाणी नेऊन बसवितो, त्याप्रमाणें कविजन आपली कवनें तुझ्या चरणी समर्पण करतात. ३१.यद॑स्य॒ धाम॑नि प्रि॒ये स॑मीची॒नासो॒ अस्व॑रन् । नाभा॑ य॒ज्ङस्य॑ दो॒हना॒ प्राध्व॒रे ॥ ३२ ॥

यत् । अस्य । धामनि । प्रिये । सम्ऽईचीनासः । अस्वरन् ।
नाभा । यज्ञस्य । दोहना । प्र । अध्वरे ॥ ३२ ॥

पहा ह्या इन्द्राच्या प्रिय मंदिरांत, मनोरथांचा पान्हा सोडणाऱ्या यज्ञाच्या मध्यभागी एकत्र जमणाऱ्या भक्तगणांनी प्रेमळ अन्तःकणाने त्याला आळविलें आहे. ३२.सु॒वीर्यं॒ स्वश्व्यं॑ सु॒गव्य॑मिन्द्र दद्धि नः । होते॑व पू॒र्वचि॑त्तये॒ प्राध्व॒रे ॥ ३३ ॥

सुऽवीर्यम् । सुऽअश्व्यम् । सुऽगव्यम् । इन्द्र । दद्धि । नः ।
होताऽइव । पूर्वऽचित्तये । प्र । अध्वरे ॥ ३३ ॥

तर वीर्यशालिपुत्र, जातिवंत अश्व, उत्कृष्ट गोधन यांचा, हे इन्द्रा, ज्यांत समावेश होईल असे ऐश्वर्य आम्हांला दे. यज्ञसंपादकाप्रमाणे आम्हीही अध्वरयागांत तुझेच चिंतन प्रथम करण्यासाठीं तुझे स्तवन करतो. ३३.ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त १३ (इंद्रसूक्त )

ऋषी - नारद काण्व देवता - इन्द्र छंद - उष्णिहइन्द्रः॑ सु॒तेषु॒ सोमे॑षु॒ क्रतुं॑ पुनीत उ॒क्थ्य॑म् । वि॒दे वृ॒धस्य॒ दक्ष॑सो म॒हान्हि षः ॥ १ ॥

इन्द्रः । सुतेषु । सोमेषु । क्रतुम् । पुनीते । उक्थ्यम् ।
विदे । वृधस्य । दक्षसः । महान् । हि । सः ॥ १ ॥

सोमरस पिळून सिद्ध होतांच यज्ञकर्म आणि सामगायन ह्या दोहोंनाही इन्द्र पवित्रपणा आणतो. हेतू हा की, अभिवृद्धि करणारे जें चातुर्यबल त्याचा लाभ भक्ताला व्हावा. असें करणें त्याला कठिण नाही कारण तो समर्थच आहे. १.स प्र॑थ॒मे व्यो॑मनि दे॒वानां॒ सद॑ने वृ॒धः । सु॒पा॒रः सु॒श्रव॑स्तमः॒ सम॑प्सु॒जित् ॥ २ ॥

सः । प्रथमे । विऽओमनि । देवानाम् । सदने । वृधः ।
सुऽपारः । सुश्रवःऽतमः । सम् । अप्सुऽजित् ॥ २ ॥

आकाशाच्या अगदी पहिल्या उच्च स्थानी, दिव्यविबुधांच्या मंदिरांत इन्द्राचा वास असतो. तो समृद्धिवर्धक, आणि भक्तोद्धारक आहे अशीच त्याची सर्वत्र ख्याति आहे. 'अप्सु' म्हणजे ज्ञानप्रवाह बंद करणारा जो राक्षस त्याला जिंकणारा इन्द्र होय. २.तम॑ह्वे॒ वाज॑सातय॒ इन्द्रं॒ भरा॑य शु॒ष्मिण॑म् । भवा॑ नः सु॒म्ने अन्त॑मः॒ सखा॑ वृ॒धे ॥ ३ ॥

तम् । अह्वे । वाजऽसातये । इन्द्रम् । भराय । शुष्मिणम् ।
भव । नः । सुम्ने । अन्तमः । सखा । वृधे ॥ ३ ॥

म्हणून सत्वसामर्थ्याच्या प्राप्तिसाठीं मी त्यालाच हांक मारतो; उत्कर्षासाठी त्या अतिप्रबल इन्द्राचाच धांवा करतो तर आमचे कल्याण व्हावे, अभ्युदय व्हावा म्हणून देवा तूंच आमचा जिवलग मित्र हो. ३.इ॒यं त॑ इन्द्र गिर्वणो रा॒तिः क्ष॑रति सुन्व॒तः । म॒न्दा॒नो अ॒स्य ब॒र्हिषो॒ वि रा॑जसि ॥ ४ ॥

इयम् । ते । इन्द्र । गिर्वणः । रातिः । क्षरति । सुन्वतः ।
मन्दानः । अस्य । बर्हिषः । वि । राजसि ॥ ४ ॥

हे इन्द्रा, हे परमस्तुत्या, हा पहा सोमार्पण करणाऱ्या भक्ताचा हविर्भाग तुजला अर्पण होत आहे, त्याने हृष्टचित्त होऊन ह्या आमच्या यज्ञांत तूं विराजमान हो. ४.नू॒नं तदि॑न्द्र दद्धि नो॒ यत्त्वा॑ सु॒न्वन्त॒ ईम॑हे । र॒यिं न॑श्चि॒त्रमा भ॑रा स्व॒र्विद॑म् ॥ ५ ॥

नूनम् । तत् । इन्द्र । दद्धि । नः । यत् । त्वा । सुन्वन्तः । ईमहे ।
रयिम् । नः । चित्रम् । आ । भर । स्वःऽविदम् ॥ ५ ॥

इन्द्रा, सोम अर्पण करून तुजला भजणारें आम्हीं भक्त जें कांहीं तुजजवळ मागत आहों ते तूं आम्हास देच. आमचे मागणे हेच कीं, अत्यद्‌भुत आणि स्वर्गीय आनंद देणारे जे उत्कृष्ट धन आहे ते तूं आम्हासाठी घेऊन ये. ५.स्तो॒ता यत्ते॒ विच॑र्षणिरतिप्रश॒र्धय॒द्गिरः॑ । व॒या इ॒वानु॑ रोहते जु॒षन्त॒ यत् ॥ ६ ॥

स्तोता । यत् । ते । विऽचर्षणिः । अतिऽप्रशर्धयत् । गिरः ।
वयाःऽइव । अनु । रोहते । जुषन्त । यत् ॥ ६ ॥

तुझ्या चाणाक्ष भक्तानें आपल्या स्तुतीची पराकाष्ठा केली; तेव्हां, वृक्षाला पालवी फुटावी त्याप्रमाणें त्यांना हवें होतें तें प्राप्त झालें. ६.प्र॒त्न॒वज्ज॑नया॒ गिरः॑ शृणु॒धी ज॑रि॒तुर्हव॑म् । मदे॑मदे ववक्षिथा सु॒कृत्व॑ने ॥ ७ ॥

प्रत्नऽवत् । जनय । गिरः । शृणुधि । जरितुः । हवम् ।
मदेऽमदे । ववक्षिथ । सुऽकृत्वने ॥ ७ ॥

पुरातन कालाप्रमाणेंच आतांही तूं कवनांची स्फूर्ति दे आणि भक्तांची हांक ऐक. तूं तल्लीन होतोस त्या प्रत्येक वेळीं पुण्यकर्मरत भक्तासाठी वात्सल्याने उचंबळून जातोस. ७.क्रीळ॑न्त्यस्य सू॒नृता॒ आपो॒ न प्र॒वता॑ य॒तीः । अ॒या धि॒या य उ॒च्यते॒ पति॑र्दि॒वः ॥ ८ ॥

क्रीळन्ति । अस्य । सूनृताः । आपः । न । प्रऽवता । यतीः ।
अया । धिया । यः । उच्यते । पतिः । दिवः ॥ ८ ॥

ह्याच्या सत्यमधुर वरदवाणी पर्वतावरून खालीं जोराने लोटणाऱ्या उदक प्रवाहाप्रमाणें भक्ताकडे लीलेने बागडत जातात की काय असें वाटतें. ह्या वात्सल्यामुळेच त्याला दिव्यलोकाचा राजा असे म्हणतात. ८उ॒तो पति॒र्य उ॒च्यते॑ कृष्टी॒नामेक॒ इद्व॒शी । न॒मो॒वृ॒धैर॑व॒स्युभिः॑ सु॒ते र॑ण ॥ ९ ॥

उतो इति । पतिः । यः । उच्यते । कृष्टीनाम् । एकः । इत् । वशी ।
नमःऽवृधैः । अवस्युऽभिः । सुते । रण ॥ ९ ॥

आणि म्हणूनच तो अखिल मानवांचा एकच सत्ताधारी प्रभू आहे. तर हे देवा ! तुला प्रणिपात करून आपली उन्नति आणि रक्षण करून घेऊं इच्छिणाऱ्या भक्तांनी अर्पण केलेल्या सोमरसाने तूं आनंदमग्न हो. ९.स्तु॒हि श्रु॒तं वि॑प॒श्चितं॒ हरी॒ यस्य॑ प्रस॒क्षिणा॑ । गन्ता॑रा दा॒शुषो॑ गृ॒हं न॑म॒स्विनः॑ ॥ १० ॥

स्तुहि । श्रुतम् । विपःऽचितम् । हरी इति । यस्य । प्रऽसक्षिणा ।
गन्तारा । दाशुषः । गृहम् । नमस्विनः ॥ १० ॥

सद्‌भक्ता ! अतिशय विख्यात आणि ज्ञानस्वरूप जो इन्द्र त्याचें स्तवन कर. त्याचे हरिद्वर्ण अश्व रथाला सारखे जोडलेलेच आहेत; ते हवि अर्पण करणाऱ्या प्रणिपातशील भक्ताच्या गृहाकडे धांवतच जातात. १०.तू॒तु॒जा॒नो म॑हेम॒तेऽश्वे॑भिः प्रुषि॒तप्सु॑भिः । आ या॑हि य॒ज्ङमा॒शुभिः॒ शमिद्धि ते॑ ॥ ११ ॥

तूतुजानः । महेऽमते । अश्वेभिः । प्रुषितप्सुऽभिः ।
आ । याहि । यज्ञम् । आशुऽभिः । शम् । इत् । हि । ते ॥ ११ ॥

महाप्रज्ञ देवा, तुळतुळीत रंगाचे आणि भरधाव दौडणारे आपले अश्व जोडून वेगाने जाणारा तूं आमच्या यशाकडे सत्वर ये; आमच्या येथें तुला संतोषच होईल. ११.इन्द्र॑ शविष्ठ सत्पते र॒यिं गृ॒णत्सु॑ धारय । श्रवः॑ सू॒रिभ्यो॑ अ॒मृतं॑ वसुत्व॒नम् ॥ १२ ॥

इन्द्र । शविष्ठ । सत्ऽपते । रयिम् । गृणत्ऽसु । धारय ।
श्रवः । सूरिऽभ्यः । अमृतम् । वसुऽत्वनम् ॥ १२ ॥

हे उत्कटबलाढ्या, हे सज्जनप्रतिपालका देवा, तुझें गुणसंकीर्तन करणाऱ्या भक्तास अक्षयधन दे; आणि आमच्या यजमानांना यश आणि अविनाशी निधीची सत्ता अर्पण कर. १२.हवे॑ त्वा॒ सूर॒ उदि॑ते॒ हवे॑ म॒ध्यंदि॑ने दि॒वः । जु॒षा॒ण इ॑न्द्र॒ सप्ति॑भिर्न॒ आ ग॑हि ॥ १३ ॥

हवे । त्वा । सूरे । उत्ऽइते । हवे । मध्यन्दिने । दिवः ।
जुषाणः । इन्द्र । सप्तिऽभिः । नः । आ । गहि ॥ १३ ॥

सूर्योदय होतो त्या वेळीं मी तुझा धांवा करतो, दिवसा मध्यान्हकाळींही तुजला हांक मारतो. तर हे इन्द्रा, तूं प्रसन्न होऊन आपले त्वरितगती अश्व जोडून आमच्याकडे आगमन कर. १३.आ तू ग॑हि॒ प्र तु द्र॑व॒ मत्स्वा॑ सु॒तस्य॒ गोम॑तः । तन्तुं॑ तनुष्व पू॒र्व्यं यथा॑ वि॒दे ॥ १४ ॥

आ । तु । गहि । प्र । तु । द्रव । मत्स्व । सुतस्य । गोऽमतः ।
तन्तुम् । तनुष्व । पूर्व्यम् । यथा । विदे ॥ १४ ॥

अनमान करूं नको; ये, अगदीं धांवत ये. आमच्या दुग्धमिश्रित सोमरसाचा आस्वाद घेऊन तल्लीन हो, आणि पुरातन काळापासून चाललेला यज्ञाचा धागा पूर्वपद्धतिप्रमाणे पुढेंही अबाधित ठेव. १४.यच्छ॒क्रासि॑ परा॒वति॒ यद॑र्वा॒वति॑ वृत्रहन् । यद्वा॑ समु॒द्रे अन्ध॑सोऽवि॒तेद॑सि ॥ १५ ॥

यत् । शक्र । असि । पराऽवति । यत् । अर्वाऽवति । वृत्रऽहन् ।
यत् । वा । समुद्रे । अन्धसः । अविता । इत् । असि ॥ १५ ॥

हे सर्वसमर्था, तूं दूरच्या लोकात ऐस; किंवा हें वृत्रनाशना, अगदी आमच्या जवळ ऐस; अथवा अंतरिक्ष सागराच्या उदकांत ऐस; कोठेही असलास तरी सोमपेयाचा रक्षणकर्ता तूंच आहेस. १५.इन्द्रं॑ वर्धन्तु नो॒ गिर॒ इन्द्रं॑ सु॒तास॒ इन्द॑वः । इन्द्रे॑ ह॒विष्म॑ती॒र्विशो॑ अराणिषुः ॥ १६ ॥

इन्द्रम् । वर्धन्तु । नः । गिरः । इन्द्रम् । सुतासः । इन्दवः ।
इन्द्रे । हविष्मतीः । विशः । अराणिषुः ॥ १६ ॥

आमच्या स्तुतींनी इन्द्राचे यश वृद्धिंगत होवो; आम्ही पिळलेल्या सोमबिन्दूंनी इन्द्राला द्वेष्टचित्त केले, आणि हवि अर्पण करणारे भक्त इन्द्राच्याच ठिकाणी तल्लीन झाले. १६.तमिद्विप्रा॑ अव॒स्यवः॑ प्र॒वत्व॑तीभिरू॒तिभिः॑ । इन्द्रं॑ क्षो॒णीर॑वर्धयन्व॒या इ॑व ॥ १७ ॥

तम् । इत् । विप्राः । अवस्यवः । प्रवत्वतीभिः । ऊतिऽभिः ।
इन्द्रम् । क्षोणीः । अवर्धयन् । वयाःऽइव ॥ १७ ॥

प्रसादेच्छु ज्ञानीजनांनीं अत्यंत आतुरतेने केलेल्या भक्तरक्षक स्तुतींनी त्या इन्द्राचेच यश वाढविले, झाडाला पालवी फुटून तें वृद्धिंगत व्हावे त्याप्रमाणें सामान्य जनांनी देखील इन्द्राचीच महती वाढविली. १७.त्रिक॑द्रुकेषु॒ चेत॑नं दे॒वासो॑ य॒ज्ङम॑त्नत । तमिद्व॑र्धन्तु नो॒ गिरः॑ स॒दावृ॑धम् ॥ १८ ॥

त्रिऽकद्रुकेषु । चेतनम् । देवासः । यज्ञम् । अत्नत ।
तम् । इत् । वर्धन्तु । नः । गिरः । सदाऽवृधम् ॥ १८ ॥

"त्रिकद्रुक" उत्सवामध्ये चैतन्यरूप इन्द्राची जाणीव करून देणारा यज्ञ दिव्यविबुधांनी केला. याप्रमाणे सदासर्वकाळ ज्याचा महिमा वाढतोच आहे त्या इन्द्राचेच यश आमच्या स्तवनांनी वृद्धिंगत होवो. १८.स्तो॒ता यत्ते॒ अनु॑व्रत उ॒क्थान्यृ॑तु॒था द॒धे । शुचिः॑ पाव॒क उ॑च्यते॒ सो अद्भु॑तः ॥ १९ ॥

स्तोता । यत् । ते । अनुऽव्रतः । उक्थानि । ऋतुऽथा । दधे ।
शुचिः । पावकः । उच्यते । सः । अद्भुतः ॥ १९ ॥

तुझ्या धर्मनियमांप्रमप्णे चालणारा भक्त तुझ्या प्रीत्यर्थ यथा काली सामगायन करतो तें योग्यच आहे; कारण, देव हा पवित्र, पतितपावन आणि अद्‌भुत कर्मकारी आहे असेंच सर्व म्हणतात. १९तदिद्रु॒द्रस्य॑ चेतति य॒ह्वं प्र॒त्नेषु॒ धाम॑सु । मनो॒ यत्रा॒ वि तद्द॒धुर्विचे॑तसः ॥ २० ॥

तत् । इत् । रुद्रस्य । चेतति । यह्वम् । प्रत्नेषु । धामऽसु ।
मनः । यत्र । वि । तत् । दधुः । विऽचेतसः ॥ २० ॥

तेंच हें रुद्राचे प्रभावशाली रूप पुरातन तेजोमय स्थानांत स्पष्टपणे दृग्गोचर होत आहे; अणि त्याच ठिकाणी स्वानुभवी भक्तांनी आपलें तें मन निश्चल ठेवले आहे. २०यदि॑ मे स॒ख्यमा॒वर॑ इ॒मस्य॑ पा॒ह्यन्ध॑सः । येन॒ विश्वा॒ अति॒ द्विषो॒ अता॑रिम ॥ २१ ॥

यदि । मे । सख्यम् । आऽवरः । इमस्य । पाहि । अन्धसः ।
येन । विश्वाः । अति । द्विषः । अतारिम ॥ २१ ॥

हे देवा जर माझ्याविषयी तुझ्या ठिकाणी प्रेमभाव वसत असेल तर ह्या माझ्या सोमपेयाचा स्वीकार कर, म्हणजे द्वेष्ट्यांच्या कचाटीतून आम्ही सुखरूप पार पडूं. २१.क॒दा त॑ इन्द्र गिर्वणः स्तो॒ता भ॑वाति॒ शंत॑मः । क॒दा नो॒ गव्ये॒ अश्व्ये॒ वसौ॑ दधः ॥ २२ ॥

कदा । ते । इन्द्र । गिर्वणः । स्तोता । भवाति । शम्ऽतमः ।
कदा । नः । गव्ये । अश्व्ये । वसौ । दधः ॥ २२ ॥

हे स्तवनार्ह इन्द्रा, तुझा भक्त अत्यंत सुखी केव्हां होईल बरें ? प्रकाश गोधन, आणि सर्वगामी अश्वधन अशा वैभवांत तूं आम्हांला केव्हां ठेवशील बरें ? २२.उ॒त ते॒ सुष्टु॑ता॒ हरी॒ वृष॑णा वहतो॒ रथ॑म् । अ॒जु॒र्यस्य॑ म॒दिन्त॑मं॒ यमीम॑हे ॥ २३ ॥

उत । ते । सुऽस्तुता । हरी इति । वृषणा । वहतः । रथम् ।
अजुर्यस्य । मदिन्ऽतमम् । यम् । ईमहे ॥ २३ ॥

तुझे नामांकित वीर्यशाली अश्व, तुज अजरामर देवाच्या रथाला भक्ताकडे घेऊन जातात, म्हणून तो अत्यंत हर्ष देणारा रथ देखील आम्हांस हवा हवासा वाटतो. २३.तमी॑महे पुरुष्टु॒तं य॒ह्वं प्र॒त्नाभि॑रू॒तिभिः॑ । नि ब॒र्हिषि॑ प्रि॒ये स॑द॒दध॑ द्वि॒ता ॥ २४ ॥

तम् । ईमहे । पुरुऽस्तुतम् । यह्वम् । प्रत्नाभिः । ऊतिऽभिः ।
नि । बर्हिषि । प्रिये । सदत् । अध । द्विता ॥ २४ ॥

सर्वांनी स्तविलेला जो प्रभावशालि देव त्याची आम्ही प्रार्थना करतो, म्हणजे तो आपल्या पुरातन भक्तरक्षक शक्तीसह त्याला प्रिय अशा यज्ञमंडपांत दोन्ही प्रकाराने विराजमान होईल. २४.वर्ध॑स्वा॒ सु पु॑रुष्टुत॒ ऋषि॑ष्टुताभिरू॒तिभिः॑ । धु॒क्षस्व॑ पि॒प्युषी॒मिष॒मवा॑ च नः ॥ २५ ॥

वर्धस्व । सु । पुरुऽस्तुत । ऋषिऽस्तुताभिः । ऊतिऽभिः ।
धुक्षस्व । पिप्युषीम् । इषम् । अव । च । नः ॥ २५ ॥

हे सर्वस्तुत देवा, ऋषींनी ज्याची वाखाणणी केली आहे अशा सामर्थ्यांनी आमची अभिवृद्धि कर; पुष्टिकारक जोम आम्हांमध्ये स्फुरण पावू दे; आणि आमचे रक्षण कर. २५इन्द्र॒ त्वम॑वि॒तेद॑सी॒त्था स्तु॑व॒तो अ॑द्रिवः । ऋ॒तादि॑यर्मि ते॒ धियं॑ मनो॒युज॑म् ॥ २६ ॥

इन्द्र । त्वम् । अविता । इत् । असि । इत्था । स्तुवतः । अद्रिऽवः ।
ऋतात् । इयर्मि । ते । धियम् । मनःऽयुजम् ॥ २६ ॥

अशा प्रकाराने स्तवन करणाऱ्या भक्ताचा, हे इन्द्रा, तूं रक्षण करणाराच होतोस, म्हणून हे वज्रधरा, माझ्या अंतःकरणाशी तन्मय होणारी जी ध्यानस्तुति तिला सत्यधर्माच्या जोरावरच मी तुझ्याकडे लावतो. २६.इ॒ह त्या स॑ध॒माद्या॑ युजा॒नः सोम॑पीतये । हरी॑ इन्द्र प्र॒तद्व॑सू अ॒भि स्व॑र ॥ २७ ॥

इह । त्या । सधऽमाद्या । युजानः । सोमऽपीतये ।
हरी इति । इन्द्र । प्रतद्वसू इति प्रतत्ऽवसू । अभि । स्वर ॥ २७ ॥

तुझ्या बरोबरच आनंदित होणारे तुझे ते अपार भाग्याचे हरिद्वर्ण अश्व जोडून हे इन्द्रा, "सोमपानार्थ मी निघालो" असें आम्हांस हांक मारून सांग. २७.अ॒भि स्व॑रन्तु॒ ये तव॑ रु॒द्रासः॑ सक्षत॒ श्रिय॑म् । उ॒तो म॒रुत्व॑ती॒र्विशो॑ अ॒भि प्रयः॑ ॥ २८ ॥

अभि । स्वरन्तु । ये । तव । रुद्रासः । सक्षत । श्रियम् ।
उतो इति । मरुत्वतीः । विशः । अभि । प्रयः ॥ २८ ॥

त्याचप्रमाणे रुद्रपुत्र जे मरुत्‌गण नेहमी तुझ्या आश्रयाची शोभा धारण करीत असतात तेही आमच्या प्रेमळ विनंतीस मान देतो असे आम्हांस हांक मारून मोठ्याने सांगोत. २८इ॒मा अ॑स्य॒ प्रतू॑र्तयः प॒दं जु॑षन्त॒ यद्दि॒वि । नाभा॑ य॒ज्ङस्य॒ सं द॑धु॒र्यथा॑ वि॒दे ॥ २९ ॥

इमाः । अस्य । प्रऽतूर्तयः । पदम् । जुषन्त । यत् । दिवि ।
नाभा । यज्ञस्य । सम् । दधुः । यथा । विदे ॥ २९ ॥

हेच त्या देवाचे शत्रूसंहारक अनुचर मरुत, कीं ज्यांनीं दिव्यलोकांत आपल्याला प्रिय असेंच स्थान पटकाविले, आणि यज्ञाच्या मुख्य स्थानी देखील ते जाऊन बसले हें सर्वांस माहितच आहे. २९.अ॒यं दी॒र्घाय॒ चक्ष॑से॒ प्राचि॑ प्रय॒त्य॑ध्व॒रे । मिमी॑ते य॒ज्ङमा॑नु॒षग्वि॒चक्ष्य॑ ॥ ३० ॥

अयम् । दीर्घाय । चक्षसे । प्राचि । प्रऽयति । अध्वरे ।
मिमीते । यज्ञम् । आनुषक् । विऽचक्ष्य ॥ ३० ॥

जो जो अध्वरयाग प्राचीन पद्धतीस अनुरूप होत असतो त्यांत भक्ताची दृष्टि दूर पोहोंचावी म्हणून प्रत्येक यज्ञाचे सुक्ष्मपणे निरीक्षण करून इन्द्र तो यज्ञ यथापूर्व व्यवस्थितपणे संपादन करतो. ३०वृषा॒यमि॑न्द्र ते॒ रथ॑ उ॒तो ते॒ वृष॑णा॒ हरी॑ । वृषा॒ त्वं श॑तक्रतो॒ वृषा॒ हवः॑ ॥ ३१ ॥

वृषा । अयम् । इन्द्र । ते । रथः । उतो इति । ते । वृषणा । हरी इति ।
वृषा । त्वम् । शतक्रतो इति शतऽक्रतो । वृषा । हवः ॥ ३१ ॥

इन्द्रा, हा तुझा रथ वीर्यशाली, त्याचप्रमाणे तुझे अश्वही विर्यशाली, आणि हे अपारकर्तृत्वा देवा, तूं स्वतः तर वीर्यशालीच आहेस; परंतु तुझे नामसंकीर्तनही तसेंच वीर्यशाली आहे. ३१.वृषा॒ ग्रावा॒ वृषा॒ मदो॒ वृषा॒ सोमो॑ अ॒यं सु॒तः । वृषा॑ य॒ज्ङो यमिन्व॑सि॒ वृषा॒ हवः॑ ॥ ३२ ॥

वृषा । ग्रावा । वृषा । मदः । वृषा । सोमः । अयम् । सुतः ।
वृषा । यज्ञः । यम् । इन्वसि । वृषा । हवः ॥ ३२ ॥

सोमरस पिळण्याचा ग्रावा (पाषाण) वीर्यशाली, सोमाचा आवेश वीर्यशाली, आणि हा स्वतः सोमरस तर वीर्यशाली आहेच. परंतु ज्या यज्ञाला तूं प्राप्त होतोस तोही वीर्यशाली आणि तुझे आव्हानही वीर्यशालीच असतें. ३२.वृषा॑ त्वा॒ वृष॑णं हुवे॒ वज्रि॑ङ्चि॒त्राभि॑रू॒तिभिः॑ । वा॒वन्थ॒ हि प्रति॑ष्टुतिं॒ वृषा॒ हवः॑ ॥ ३३ ॥

वृषा । त्वा । वृषणम् । हुवे । वज्रिन् । चित्राभिः । ऊतिऽभिः ।
ववन्थ । हि । प्रतिऽस्तुतिम् । वृषा । हवः ॥ ३३ ॥

वीर्यभराने प्रबळ झालेला मी तुझा भक्त, हे वज्रधरा, तुज वीर्यशाली वीराला नाना प्रकारच्या सहाय्यक शक्तींसह पाचारण करीत आहे; तूं उत्कृष्ट स्तुतीचा भोक्ता आहेस आणि तुझें संकीर्तनही वीर्यत्यशालित्व आणते. ३३.ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त १४ ( इन्द्रसूक्त )

ऋषी - गोक्तिन् आणि अश्वसूक्तिन् काण्वायन देवता - इन्द्र छंद - गायत्रीयदि॑न्द्रा॒हं यथा॒ त्वमीशी॑य॒ वस्व॒ एक॒ इत् । स्तो॒ता मे॒ गोष॑खा स्यात् ॥ १ ॥

यत् । इन्द्र । अहम् । यथा । त्वम् । ईशीय । वस्वः । एकः । इत् ।
स्तोता । मे । गोऽसखा । स्यात् ॥ १ ॥

इन्द्रा जसा तूं तसाच मीही जर अपूर्वनिधीचा एकटाच सत्ताधीश झालो तर माझा भक्त खात्रीने गोधनयुक्त होईल. १.शिक्षे॑यमस्मै॒ दित्से॑यं॒ शची॑पते मनी॒षिणे॑ । यद॒हं गोप॑तिः॒ स्याम् ॥ २ ॥

शिक्षेयम् । अस्मै । दित्सेयम् । शचीऽपते । मनीषिणे ।
यत् । अहम् । गोऽपतिः । स्याम् ॥ २ ॥

जर मी स्वतः प्रकाश गोधनाचा अधिपति झालो, तर हे सर्वशक्तिप्रभो, त्या मनोजयी भक्ताला मी ऐश्वर्य देण्याची इच्छा धरीन, इतकेंच काय, पण ते त्याला देऊनही टाकीन. २.धे॒नुष्ट॑ इन्द्र सू॒नृता॒ यज॑मानाय सुन्व॒ते । गामश्वं॑ पि॒प्युषी॑ दुहे ॥ ३ ॥

धेनुः । ते । इन्द्र । सूनृता । यजमानाय । सुन्वते ।
गाम् । अश्वम् । पिप्युषी । दुहे ॥ ३ ॥

इन्द्रा तुझी सत्यमधुर वरदवाणी सोमार्पण करणाऱ्या भक्ताला कामधेनूच होय. तिची कांस तटतटीत भरलेली आहे. ती गोरूप आणि अश्वरूप दुग्ध पाहिजे तितके पिळूं देते. ३.न ते॑ व॒र्तास्ति॒ राध॑स॒ इन्द्र॑ दे॒वो न मर्त्यः॑ । यद्दित्स॑सि स्तु॒तो म॒घम् ॥ ४ ॥

न । ते । वर्ता । अस्ति । राधसः । इन्द्र । देवः । न । मर्त्यः ।
यत् । दित्ससि । स्तुतः । मघम् ॥ ४ ॥

तुझे स्तवन केलें म्हणजे तूं भक्ताला वरदान देऊं इच्छितोस तेव्हां हे इन्द्रा, त्या तुझ्या वरप्रसादाला अडथळा करणारा असा कोणताही विबुध नाहीं किंवा मानवही नाहीं. ४.य॒ज्ङ इन्द्र॑मवर्धय॒द्यद्भूमिं॒ व्यव॑र्तयत् । च॒क्रा॒ण ओ॑प॒शं दि॒वि ॥ ५ ॥

यज्ञः । इन्द्रम् । अवर्धयत् । यत् । भूमिम् । वि । अवर्तयत् ।
चक्राणः । ओपशम् । दिवि ॥ ५ ॥

जेव्हां इन्द्राने पृथ्वीला भ्रमण करावयास लाविले आणि आकाशांत पुष्पगुच्छाप्रमाणे रमणीय अशा तारा निर्माण केल्या त्याच वेळेस यज्ञकर्मानें इन्द्राचे यश वृद्धिंगत झाले. ५वा॒वृ॒धा॒नस्य॑ ते व॒यं विश्वा॒ धना॑नि जि॒ग्युषः॑ । ऊ॒तिमि॒न्द्रा वृ॑णीमहे ॥ ६ ॥

ववृधानस्य । ते । वयम् । विश्वा । धनानि । जिग्युषः ।
ऊतिम् । इन्द्र । आ । वृणीमहे ॥ ६ ॥

याप्रमाणे ज्या तुझे यश अपरंपार आहे आणि ज्या तूं विजयधने जिंकून आपलीशी केली आहेस त्या तुझ्याच जवळ हे इन्द्रा, आम्ही रक्षणाची याचना करतो. ६व्य१॒॑न्तरि॑क्षमतिर॒न्मदे॒ सोम॑स्य रोच॒ना । इन्द्रो॒ यदभि॑नद्व॒लम् ॥ ७ ॥

वि । अन्तरिक्षम् । अतिरत् । मदे । सोमस्य । रोचना ।
इन्द्रः । यत् । अभिनत् । वलम् ॥ ७ ॥

ज्या वेळीं इन्द्राने वल राक्षसाला छिन्नभिन्न केलें, त्या वेळीं सोमाच्या आवेशांत तो इन्द्र अंतरिक्ष आणि त्यांतील तेजोगोल ह्यांच्याही पलीकडे गेला. ७.उद्गा आ॑ज॒दङ्गि॑रोभ्य आ॒विष्कृ॒ण्वन्गुहा॑ स॒तीः । अ॒र्वाङ्चं॑ नुनुदे व॒लम् ॥ ८ ॥

उत् । गाः । आजत् । अङ्गिरःऽभ्यः । आविः । कृण्वन् । गुहा । सतीः ।
अर्वाञ्चम् । नुनुदे । वलम् ॥ ८ ॥

गुहेमध्ये दडविलेल्या प्रकाशरूप घेनू अङ्‌‍गिरा ऋषींसाठी जगाच्या दृष्टीस पाडून इंद्रानेच त्यांना वर आणले, आणि वल राक्षसाला त्याचें डोके खालीं आणि पाय वर करून भिरकावून आपटले. ८.इन्द्रे॑ण रोच॒ना दि॒वो दृ॒ळ्हानि॑ दृंहि॒तानि॑ च । स्थि॒राणि॒ न प॑रा॒णुदे॑ ॥ ९ ॥

इन्द्रेण । रोचना । दिवः । दृळ्हानि । दृंहितानि । च ।
स्थिराणि । न । पराऽनुदे ॥ ९ ॥

ही जी आकाशातील तेजस्वी नक्षत्रे ठसठशीत आणि खेंचून भरलेली दिसत आहेत ती आपआपल्या जागी इंद्रानेच स्थिर केली आहेत. तीं कोणाच्यानेंही हलविलीं जाण्यासारखी नाहीत. ९.अ॒पामू॒र्मिर्मद॑न्निव॒ स्तोम॑ इन्द्राजिरायते । वि ते॒ मदा॑ अराजिषुः ॥ १० ॥

अपाम् । ऊर्मिः । मदन्ऽइव । स्तोमः । इन्द्र । अजिरऽयते ।
वि । ते । मदाः । अराजिषुः ॥ १० ॥

उदकाच्या लाटेप्रमाणें हर्षानेच जणों उचंबळणारे तुझे स्तोत्र, ज्या वेळी हे इन्द्रा; ऋषीच्या मुखांतून मोठया वेगाने चोहींकडे फैलावते त्या वेळीं तुझे हर्शाविर्भाव फार खुलून दिसतात. १०.त्वं हि स्तो॑म॒वर्ध॑न॒ इन्द्रास्यु॑क्थ॒वर्ध॑नः । स्तो॒तृ॒णामु॒त भ॑द्र॒कृत् ॥ ११ ॥

त्वम् । हि । स्तोमऽवर्धनः । इन्द्र । असि । उक्थऽवर्धनः ।
स्तोतॄणाम् । उत । भद्रऽकृत् ॥ ११ ॥

इन्द्रा, स्तोत्रांचा संवर्धक तूंच, सामगायनांचाही तूंच, आणि भक्तांचे कल्याण करणाराही पण तूंच आहेस. ११.इन्द्र॒मित्के॒शिना॒ हरी॑ सोम॒पेया॑य वक्षतः । उप॑ य॒ज्ङं सु॒राध॑सम् ॥ १२ ॥

इन्द्रम् । इत् । केशिना । हरी इति । सोमऽपेयाय । वक्षतः ।
उप । यज्ञम् । सुऽराधसम् ॥ १२ ॥

अयाळानें सुशोभित असे अश्व देवकृपा संपादन करून देणाऱ्या यज्ञाकडे इंद्रालाच सोमप्राशनार्थ घेऊन येतात १२.अ॒पां फेने॑न॒ नमु॑चेः॒ शिर॑ इ॒न्द्रोद॑वर्तयः । विश्वा॒ यदज॑यः॒ स्पृधः॑ ॥ १३ ॥

अपाम् । फेनेन । नमुचेः । शिरः । इन्द्र । उत् । अवर्तयः ।
विश्वाः । यत् । अजयः । स्पृधः ॥ १३ ॥

ज्या वेळीं तूं सर्वच शत्रूंना जिंकलेंस त्याच वेळी नुसत्या पाण्याच्या फेसानेच, हे इन्द्रा, तूं नमुचि नामक राक्षसाचे मस्तक तोडून वर उडवून दिलेस. १३.मा॒याभि॑रु॒त्सिसृ॑प्सत॒ इन्द्र॒ द्यामा॒रुरु॑क्षतः । अव॒ दस्यूँ॑रधूनुथाः ॥ १४ ॥

मायाभिः । उत्ऽसिसृप्सतः । इन्द्र । द्याम् । आऽरुरुक्षतः ।
अव । दस्यून् । अधूनुथाः ॥ १४ ॥

आपल्या कपटी युक्यांनी चोहोकडे धुडगूस घालणारे आणि आकाशाच्याही वर चढून बसणारे जे अधार्मिक दुष्ट त्यांना, हे इन्द्रा, तूं खालीं फेकून आपटून मारलेंस १४.अ॒सु॒न्वामि॑न्द्र सं॒सदं॒ विषू॑चीं॒ व्य॑नाशयः । सो॒म॒पा उत्त॑रो॒ भव॑न् ॥ १५ ॥

असुन्वाम् । इन्द्र । सम्ऽसदम् । विषूचीम् । वि । अनाशयः ।
सोमऽपाः । उत्ऽतरः । भवन् ॥ १५ ॥

याप्रमाणे तुजला सोमरस अर्पण न करणाऱ्या, आणि पुनः जिकडे तिकडे वावरणाऱ्या ज्या अधार्मिक जाती होत्या त्यांचा, हे इन्द्रा, तूं नायनाट करून टाकलास आणि भक्तांचा सोमरस प्राशन करून उत्तम रीतीनें यशस्वी झालास. १५.ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त १५ ( इन्द्रसूक्त )

ऋषी - गोधूक्तिन् आणि अश्वसूक्तिन् काण्वायन देवता - इन्द्र छंद - उष्णिहतम्व॒भि प्र गा॑यत पुरुहू॒तं पु॑रुष्टु॒तम् । इन्द्रं॑ गी॒र्भिस्त॑वि॒षमा वि॑वासत ॥ १ ॥

तम् । ऊं इति । अभि । प्र । गायत । पुरुऽहूतम् । पुरुऽस्तुतम् ।
इन्द्रम् । गीःऽभिः । तविषम् । आ । विवासत ॥ १ ॥

भक्तहो ! त्याचेंच गुणगायन करा सर्व जनांनी आळविलेला, सर्व लोकांनी स्तविलेला असा जो अविश्रांत इन्द्र त्याचीच सेवा स्तोत्रांनी करा. १.यस्य॑ द्वि॒बर्ह॑सो बृ॒हत्सहो॑ दा॒धार॒ रोद॑सी । गि॒रीँरज्राँ॑ अ॒पः स्व॑र्वृषत्व॒ना ॥ २ ॥

यस्य । द्विऽबर्हसः । बृहत् । सहः । दाधार । रोदसी इति ।
गिरीन् । अज्रान् । अपः । स्वः । वृषऽत्वना ॥ २ ॥

ज्याच्या स्वरूपाचे प्रकार दोन आहेत. त्या इन्द्राच्या प्रचंड नेटानेंच आकाश आणि पृथ्वी हीं सांवरलेली आहेत; त्याच्या वीर्यशालित्वामुळेच पर्वत, विस्तीर्ण मेघ, नद्या आणि स्वर्लोक हेही आपआपल्या जागी राहिले आहेत; २.स रा॑जसि पुरुष्टुतँ॒ एको॑ वृ॒त्राणि॑ जिघ्नसे । इन्द्र॒ जैत्रा॑ श्रव॒स्या॑ च॒ यन्त॑वे ॥ ३ ॥

सः । राजसि । पुरुऽस्तुत । एकः । वृत्राणि । जिघ्नसे ।
इन्द्र । जैत्रा । श्रवस्या । च । यन्तवे ॥ ३ ॥

सर्वजनस्तुत देवा, तूं असा राजाप्रमाणें विश्वावर एकटाच सत्ता चालवितोस; आणि ज्या ज्या वस्तू जिंकण्याला योग्य आहेत; ज्या ज्या वस्तू विख्यात आहेत त्या भक्तांच्या हस्तगत व्हाव्या म्हणून ज्ञानशत्रू जे राक्षस त्यांचा तूं एकटाच संहार करून टाकतोस. ३.तं ते॒ मदं॑ गृणीमसि॒ वृष॑णं पृ॒त्सु सा॑स॒हिम् । उ॒ लो॒क॒कृ॒त्नुम॑द्रिवो हरि॒श्रिय॑म् ॥ ४ ॥

तम् । ते । मदम् । गृणीमसि । वृषणम् । पृत्ऽसु । ससहिम् ।
ऊं इति । लोकऽकृत्नुम् । अद्रिऽवः । हरिऽश्रियम् ॥ ४ ॥

तो तुझा हर्षभर-जो वीर्यशाली असतो, जो युद्धात शत्रूंची रग जिरवितो, हे पर्वतभंजका इन्द्रा, जो लोकहितकारी असतो, आणि जो तुझ्या हरिद्वर्ण अश्वांना शोभा आणतो - त्या तुझ्या हर्षभराचें आम्ही गुणवर्णन करतो. ४.येन॒ ज्योतीं॑ष्या॒यवे॒ मन॑वे च वि॒वेदि॑थ । म॒न्दा॒नो अ॒स्य ब॒र्हिषो॒ वि रा॑जसि ॥ ५ ॥

येन । ज्योतींषि । आयवे । मनवे । च । विवेदिथ ।
मन्दानः । अस्य । बर्हिषः । वि । राजसि ॥ ५ ॥

ज्याच्या योगाने मनु नांवाच्या भक्तासाठीं तू तेजोराशि नक्षत्रे लोकांस माहित करून दिलींस, तो तूं हृष्ट होऊन ह्या यज्ञांत राजाप्रमाणें विराजमान हो. ५.तद॒द्या चि॑त्त उ॒क्थिनोऽनु॑ ष्टुवन्ति पू॒र्वथा॑ । वृष॑पत्नीर॒पो ज॑या दि॒वेदि॑वे ॥ ६ ॥

तत् । अद्य । चित् । ते । उक्थिनः । अनु । स्तुवन्ति । पूर्वऽथा ।
वृषऽपत्नीः । अपः । जय । दिवेऽदिवे ॥ ६ ॥

म्हणून सामगायक भक्त पूर्वींच्या पद्धतिप्रमाणे आजही तुझे गुणगायन करीत आहेत. तर तुज वीराला ज्या पत्नी शोभतात न्या आपोदेवींना जिंकून आणून प्रत्यही आपल्या सन्निध ठेव. ६.तव॒ त्यदि॑न्द्रि॒यं बृ॒हत्तव॒ शुष्म॑मु॒त क्रतु॑म् । वज्रं॑ शिशाति धि॒षणा॒ वरे॑ण्यम् ॥ ७ ॥

तव । त्यत् । इन्द्रियम् । बृहत् । तव । शुष्मम् । उत । क्रतुम् ।
वज्रम् । शिशाति । धिषणा । वरेण्यम् ॥ ७ ॥

तुझे ते ईश्वरीसामर्थ्य अफाट आहे, त्याचप्रमाणे तुझा झपाटा, तुझे कर्तृत्व, ही सारीच लोकोत्तर आहेत. म्हणून भक्तांची एकाग्र बुद्धीच तुझें उत्कृष्ट वज्र पाजळून ठेवते. ७तव॒ द्यौरि॑न्द्र॒ पौंस्यं॑ पृथि॒वी व॑र्धति॒ श्रवः॑ । त्वामापः॒ पर्व॑तासश्च हिन्विरे ॥ ८ ॥

तव । द्यौः । इन्द्र । पौंस्यम् । पृथिवी । वर्धति । श्रवः ।
त्वाम् । आपः । पर्वतासः । च । हिन्विरे ॥ ८ ॥

हे इन्द्रा, तुझा पराक्रम आकाश वृद्धिंगत करते आणि तुझें यश पृथ्वी वृद्धिंगत करते, आणि नद्या आणि पर्वत यांनी तर तुझें नांव जिकडे तिकडे गाजविले आहे. ८.त्वां विष्णु॑र्बृ॒हन्क्षयो॑ मि॒त्रो गृ॑णाति॒ वरु॑णः । त्वां शर्धो॑ मद॒त्यनु॒ मारु॑तम् ॥ ९ ॥

त्वाम् । विष्णुः । बृहन् । क्षयः । मित्रः । गृणाति । वरुणः ।
त्वाम् । शर्धः । मदति । अनु । मारुतम् ॥ ९ ॥

लोकांचा महान आधार जो विष्णू आणि जगताचा मित्र जा वरुण तो तूंच म्हणून भक्त तुझी प्रशंसा करतो. आणि तुझे मरुतांचे सैन्य तर तुझ्या हर्षानेंच हर्षभरित होतें. ९त्वं वृषा॒ जना॑नां॒ मंहि॑ष्ठ इन्द्र जज्ङिषे । स॒त्रा विश्वा॑ स्वप॒त्यानि॑ दधिषे ॥ १० ॥

त्वम् । वृषा । जनानाम् । मंहिष्ठः । इन्द्र । जज्ञिषे ।
सत्रा । विश्वा । सुऽअपत्यानि । दधिषे ॥ १० ॥

इन्द्रा, सर्व लोकांचा वीर्यशालि आणि अत्यंत औदार्यशालि अग्रेसर असाच तूं प्रकट होतोस; आणि तुझीं आवडतीं लेकरे जे भक्तजन त्या सर्वांना तूं एकदम आपल्या जवळ घेतोस. १०.स॒त्रा त्वं पु॑रुष्टुतँ॒ एको॑ वृ॒त्राणि॑ तोशसे । नान्य इन्द्रा॒त्कर॑णं॒ भूय॑ इन्वति ॥ ११ ॥

सत्रा । त्वम् । पुरुऽस्तुत । एकः । वृत्राणि । तोशसे ।
न । अन्यः । इन्द्रात् । करणम् । भूयः । इन्वति ॥ ११ ॥

हे सर्वजनस्तुत देवा, ज्ञानशत्रू जे वृत्र त्यांना तूं एकटाच एकदम चेचून टाकतोस कारण हें अवघड कार्य हे इन्द्रा, तुझ्या वांचून दुसरा कोणीही करू शकत नाहीं. ११.यदि॑न्द्र मन्म॒शस्त्वा॒ नाना॒ हव॑न्त ऊ॒तये॑ । अ॒स्माके॑भि॒र्नृभि॒रत्रा॒ स्व॑र्जय ॥ १२ ॥

यत् । इन्द्र । मन्मऽशः । त्वा । नाना । हवन्ते । ऊतये ।
अस्माकेभिः । नृऽभिः । अत्र । स्वः । जय ॥ १२ ॥

हे इन्द्रा, मननाच्या योगाने भक्तजन सहायासाठी तुझा परोपरीने धांवा करतात, तर आज ह्या ठिकाणी आमच्या शूर सैनिकांच्या हातून आम्हांस दिव्य प्रकाश जिंकून दे. १२.अरं॒ क्षया॑य नो म॒हे विश्वा॑ रू॒पाण्या॑वि॒शन् । इन्द्रं॒ जैत्रा॑य हर्षया॒ शची॒पति॑म् ॥ १३ ॥

अरम् । क्षयाय । नः । महे । विश्वा । रूपाणि । आऽविशन् ।
इन्द्रम् । जैत्राय । हर्षय । शचीऽपतिम् ॥ १३ ॥

श्रेष्ठ जो आश्रय तो आम्हांस मिळण्यासाठीं, सर्व प्रकारच्या कवनांत पूर्णपणे रंगून जाऊन, सर्वसत्ताधीश जो इन्द्र त्याला विजयप्रातिकरितां हर्षित कर. १३.ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त १६ ( इन्द्रसूक्त )

ऋषी - इरिम्बिठि काण्व देवता - इन्द्र छंद - गायत्रीप्र स॒म्राजं॑ चर्षणी॒नामिन्द्रं॑ स्तोता॒ नव्यं॑ गी॒र्भिः । नरं॑ नृ॒षाहं॒ मंहि॑ष्ठम् ॥ १ ॥

प्र । सम्ऽराजम् । चर्षणीनाम् । इन्द्रम् । स्तोत । नव्यम् । गीःऽभिः ।
नरम् । नृऽसहम् । मंहिष्ठम् ॥ १ ॥

चराचरांचा सम्राट, स्तवनयोग्य वीराग्रणी, वीराला योग्य अशी ज्याची धडाडी, आणि दात्यांमध्यें श्रेष्टतम असा जो इन्द्र त्याचें स्तवन स्तुतिकलापांनी करा. १.यस्मि॑न्नु॒क्थानि॒ रण्य॑न्ति॒ विश्वा॑नि च श्रव॒स्या॑ । अ॒पामवो॒ न स॑मु॒द्रे ॥ २ ॥

यस्मिन् । उक्थानि । रण्यन्ति । विश्वानि । च । श्रवस्या ।
अपाम् । अवः । न । समुद्रे ॥ २ ॥

नद्यांचे लोट जसे समुद्रामध्ये विश्रांति पावतात, त्याप्रमाणें श्रवणीय सामगायनें आणि श्रुतिमनोहर कवनें ज्या इन्द्राच्या ठिकाणी रंगून जातात. २.तं सु॑ष्टु॒त्या वि॑वासे ज्येष्ठ॒राजं॒ भरे॑ कृ॒त्नुम् । म॒हो वा॒जिनं॑ स॒निभ्यः॑ ॥ ३ ॥

तम् । सुऽस्तुत्या । आ । विवासे । ज्येष्ठऽराजम् । भरे । कृत्नुम् ।
महः । वाजिनम् । सनिऽभ्यः ॥ ३ ॥

त्या राजाधिराजाची, युद्धामध्ये मोठमोठे पराक्रम गाजविणाराची, आणि दानशील भक्तांना उत्साह आणणारा जो इन्द्र त्याची मी उत्कृष्ट स्तुतीने सेवा करतो. ३.यस्यानू॑ना गभी॒रा मदा॑ उ॒रव॒स्तरु॑त्राः । ह॒र्षु॒मन्तः॒ शूर॑सातौ ॥ ४ ॥

यस्य । अनूनाः । गभीराः । मदाः । उरवः । तरुत्राः ।
हर्षुऽमन्तः । शूरऽसातौ ॥ ४ ॥

ज्याच्या आवेशांत कोणतीही न्यूनता नसते, ज्याचे आनंद सखोल आणि अमर्याद असतात, भक्ताचा उद्धार करतात - आणि शूरांना योग्य अशा समरांत अधिकच उल्लसित होतात ४.तमिद्धने॑षु हि॒तेष्व॑धिवा॒काय॑ हवन्ते । येषा॒मिन्द्र॒स्ते ज॑यन्ति ॥ ५ ॥

तम् । इत् । धनेषु । हितेषु । अधिऽवाकाय । हवन्ते ।
येषाम् । इन्द्रः । ते । जयन्ति ॥ ५ ॥

त्या इंद्रालाच, युद्धप्रसंग उपस्थित झाला असता आम्ही हांक मारतो, आणि आमच्या बाजूनें लोकांची समजूत पटावी म्हणून त्यालाच आम्ही हांक मारतो; कारण ज्यांच्या बाजूचा इंद्र असेल तेच विजयी होतात. ५.तमिच्च्यौ॒त्नैरार्य॑न्ति॒ तं कृ॒तेभि॑श्चर्ष॒णयः॑ । ए॒ष इन्द्रो॑ वरिव॒स्कृत् ॥ ६ ॥

तम् । इत् । च्यौत्नैः । आर्यन्ति । तम् । कृतेभिः । चर्षणयः ।
एषः । इन्द्रः । वरिवःऽकृत् ॥ ६ ॥

म्हणून ज्या स्तोत्रांनी उत्साह वाढतो, त्या स्तोत्रांनी त्याला आळवून आणि सत्कर्मांनी त्यालाच प्रसन्न करून सर्वलोक "आर्य" हें नामाभिधान सार्थ करतात. असा हा इन्द्र मनाला उत्कृष्ट समाधान देणारा आहे. ६.इन्द्रो॑ ब्र॒ह्मेन्द्र॒ ऋषि॒रिन्द्रः॑ पु॒रू पु॑रुहू॒तः । म॒हान्म॒हीभिः॒ शची॑भिः ॥ ७ ॥

इन्द्रः । ब्रह्मा । इन्द्रः । ऋषिः । इन्द्रः । पुरु । पुरुऽहूतः ।
महान् । महीभिः । शचीभिः ॥ ७ ॥

इंद्र हाच ब्रह्मा, इंद्र हाच ऋषि होय; आणि समृद्धि कोणती तर इंद्र हीच. सर्वांनी धांवा करण्यास योग्य तोच आहे आणि आपल्या अपार शक्तींनी समर्थ आहे. ७.स स्तोम्यः॒ स हव्यः॑ स॒त्यः सत्वा॑ तुविकू॒र्मिः । एक॑श्चि॒त्सन्न॒भिभू॑तिः ॥ ८ ॥

सः । स्तोम्यः । सः । हव्यः । सत्यः । सत्वा । तुविऽकूर्मिः ।
एकः । चित् । सन् । अभिऽभूतिः ॥ ८ ॥

तो स्तवनयोग्य, तोच हवनयोग्य, तो सत्यस्वरूप, सत्त्वशील, आणि महत्कर्मकारी आहे. तो एकटा असला तरीही शत्रूची सगळी दाणादाण उडवून देतो. ८.तम॒र्केभि॒स्तं साम॑भि॒स्तं गा॑य॒त्रैश्च॑र्ष॒णयः॑ । इन्द्रं॑ वर्धन्ति क्षि॒तयः॑ ॥ ९ ॥

तम् । अर्केभिः । तम् । सामऽभिः । तम् । गायत्रैः । चर्षणयः ।
इन्द्रम् । वर्धन्ति । क्षितयः ॥ ९ ॥

भक्तजन त्याचे ऋक्‌स्तोत्रांनी स्तवन करतात. त्याचें सामगायनांनी गुणगायन करतात, आणि गायत्र मंत्रानीही त्याला आळवितात. सामान्य मनुष्यें देखील त्या इन्द्राचेच यशोवर्णन करीत असतात. ९.प्र॒णे॒तारं॒ वस्यो॒ अच्छा॒ कर्ता॑रं॒ ज्योतिः॑ स॒मत्सु॑ । सा॒स॒ह्वांसं॑ यु॒धामित्रा॑न् ॥ १० ॥

प्रऽनेतारम् । वस्यः । अच्छ । कर्तारम् । ज्योतिः । समत्ऽसु ।
ससह्वांसम् । युधा । अमित्रान् ॥ १० ॥

अत्यंत उच्च प्रतीचे जें अभीष्ट त्याकडे तो भक्तांना नेतो, समरांमध्ये दृष्टीपुढे प्रकाश उत्पन्न करतो आणि युद्धाच्या योगाने शत्रूंची दुर्दशा उडवून देतो १०स नः॒ पप्रिः॑ पारयाति स्व॒स्ति ना॒वा पु॑रुहू॒तः । इन्द्रो॒ विश्वा॒ अति॒ द्विषः॑ ॥ ११ ॥

सः । नः । पप्रिः । पारयाति । स्वस्ति । नावा । पुरुऽहूतः ।
इन्द्रः । विश्वा । अति । द्विषः ॥ ११ ॥

तो आमचा तारक आहे. सकल जन ज्याचा धांवा करतात तो इन्द्र नावेंतून तरून नेल्याप्रमाणें आम्हांस जय मिळवून देऊन यच्चयावत शत्रूसमूहांतून सुखरूपणे पार नेतो ११.स त्वं न॑ इन्द्र॒ वाजे॑भिर्दश॒स्या च॑ गातु॒या च॑ । अच्छा॑ च नः सु॒म्नं ने॑षि ॥ १२ ॥

सः । त्वम् । नः । इन्द्र । वाजेभिः । दशस्य । च । गातुऽय । च ।
अच्छ । च । नः । सुम्नम् । नेषि ॥ १२ ॥

हे इन्द्रा अशा प्रकारचा तूं आहेस तर सत्वसामर्थ्याच्या योगाने आम्हांस सन्मार्ग दाखीव, आणि शांतिसुखाकडे आम्हांस घेऊन चल १२.ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त १७ (इन्द्रसूक्त )

ऋषी - इरिम्बिठि काण्व देवता - इन्द्र छंद - १-१३ गायत्री; १४ बृहती; १५ सतोबृहतीआ या॑हि सुषु॒मा हि त॒ इन्द्र॒ सोमं॒ पिबा॑ इ॒मम् । एदं ब॒र्हिः स॑दो॒ मम॑ ॥ १ ॥

आ । याहि । सुसुम । हि । ते । इन्द्र । सोमम् । पिब । इमम् ।
आ । इदम् । बर्हिः । सदः । मम ॥ १ ॥

आमच्याकडे आगमन कर; आम्ही तुझ्याकरितां सोमरस पिळला आहे, तर हे इन्द्रा, तो तूं प्राशन कर आणि ह्या माझ्या कुशासनावर विराजमान हो. १.आ त्वा॑ ब्रह्म॒युजा॒ हरी॒ वह॑तामिन्द्र के॒शिना॑ । उप॒ ब्रह्मा॑णि नः शृणु ॥ २ ॥

आ । त्वा । ब्रह्मऽयुजा । हरी इति । वहताम् । इन्द्र । केशिना ।
उप । ब्रह्माणि । नः । शृणु ॥ २ ॥

प्रार्थनासूक्ते म्हणूं लागतांच जे रथाला जोडले जातात ते तुझे अयाळी घोडे, हे इन्द्रा, तुला आमच्याकडे घेऊन येणारच तर तूं येऊन आमच्या प्रार्थना ऐक. २.ब्र॒ह्माण॑स्त्वा व॒यं यु॒जा सो॑म॒पामि॑न्द्र सो॒मिनः॑ । सु॒ताव॑न्तो हवामहे ॥ ३ ॥

ब्रह्माणः । त्वा । वयम् । युजा । सोमऽपाम् । इन्द्र । सोमिनः ।
सुतऽवन्तः । हवामहे ॥ ३ ॥

आम्ही प्रार्थनासूक्ते म्हणणारे भक्त, आम्ही सोम अर्पण करणारे भक्त तुला सोमप्रिय इन्द्राला सोमरस पिळून हांक मारीत आहोत. ३.आ नो॑ याहि सु॒ताव॑तो॒ऽस्माकं॑ सुष्टु॒तीरुप॑ । पिबा॒ सु शि॑प्रि॒न्नन्ध॑सः ॥ ४ ॥

आ । नः । याहि । सुतऽवतः । अस्माकम् । सुऽस्तुतीः । उप ।
पिब । सु । शिप्रिन् । अन्धसः ॥ ४ ॥

तर सोमरस पिळून सिद्ध करणारे जे आम्ही भक्त त्यांच्या उत्कृष्ट स्तुतीकडे तूं ये आणि हे शोभनमुकुटधरा इन्द्रा, तूं सोमपेय प्राशन कर. ४.आ ते॑ सिङ्चामि कु॒क्ष्योरनु॒ गात्रा॒ वि धा॑वतु । गृ॒भा॒य जि॒ह्वया॒ मधु॑ ॥ ५ ॥

आ । ते । सिञ्चामि । कुक्ष्योः । अनु । गात्रा । वि । धावतु ।
गृभाय । जिह्वया । मधु ॥ ५ ॥

हा रस तुझ्या दोन्ही कुक्षीपात्रांत मी ओततो तो तुझ्या सर्व गात्रांत जाऊन भिनेल. तर हे इन्द्रा, तूं आपल्या जिव्हेने ह्या मधुर रसाचा आस्वाद घे. ५.स्वा॒दुष्टे॑ अस्तु सं॒सुदे॒ मधु॑मान्त॒न्वे॒३॒॑ तव॑ । सोमः॒ शम॑स्तु ते हृ॒दे ॥ ६ ॥

स्वादुः । ते । अस्तु । सम्ऽसुदे । मधुऽमान् । तन्वे । तव ।
सोमः । शम् । अस्तु । ते । हृदे ॥ ६ ॥

तुज औदार्यशील दैवाला हा रस फार रुचकर लागो, हा मधुयुक्त रस तुझ्या शरीराला आल्हाददायक होवो. तुझ्या अंतःकरणालाही तो प्रमुदित करो. १६.अ॒यमु॑ त्वा विचर्षणे॒ जनी॑रिवा॒भि संवृ॑तः । प्र सोम॑ इन्द्र सर्पतु ॥ ७ ॥

अयम् । ऊं इति । त्वा । विऽचर्षणे । जनीःऽइव । अभि । सम्ऽवृतः ।
प्र । सोमः । इन्द्र । सर्पतु ॥ ७ ॥

सर्वसाक्षी इन्द्रा, जसा एखादा वीर नवयुवतींनी वेष्टित असतो, तसा अनेक वस्तूंनी हा सोमरस परिपूरित आहे, तो तुझ्याप्रत प्राप्त होवो. ७.तु॒वि॒ग्रीवो॑ व॒पोद॑रः सुबा॒हुरन्ध॑सो॒ मदे॑ । इन्द्रो॑ वृ॒त्राणि॑ जिघ्नते ॥ ८ ॥

तुविऽग्रीवः । वपाऽउदरः । सुऽबाहुः । अन्धसः । मदे ।
इन्द्रः । वृत्राणि । जिघ्नते ॥ ८ ॥

ज्याची मान भरदार, छाती विशाळ आणि भुजदंड पिळदार असा इन्द्र सोमपेयाच्या आवेशांत शत्रूचा पार धुव्वा उडवून देतो. ८.इन्द्र॒ प्रेहि॑ पु॒रस्त्वं विश्व॒स्येशा॑न॒ ओज॑सा । वृ॒त्राणि॑ वृत्रहञ्जहि ॥ ९ ॥

इन्द्र । प्र । इहि । पुरः । त्वम् । विश्वस्य । ईशानः । ओजसा ।
वृत्राणि । वृत्रऽहन् । जहि ॥ ९ ॥

हे इन्द्रा, सत्वर पुढें ये; तूं आपल्या ओजस्वितेनें विश्वाचा अधिपति झाला आहेस, तर हे शत्रुनाशना ज्ञानशत्रूंचा संहार कर. ९दी॒र्घस्ते॑ अस्त्वङ्कु॒शो येना॒ वसु॑ प्र॒यच्छ॑सि । यज॑मानाय सुन्व॒ते ॥ १० ॥

दीर्घः । ते । अस्तु । अङ्कुशः । येन । वसु । प्रऽयच्छसि ।
यजमानाय । सुन्वते ॥ १० ॥

ज्या अंकुशाने तूं सोमरस अर्पण करणाऱ्या यजमानास अभिलषणीय धन मिळवून देतोस तो तुझा अंकुश लांब शत्रुपर्यंत जाऊन पोहोंचो. १०अ॒यं त॑ इन्द्र॒ सोमो॒ निपू॑तो॒ अधि॑ ब॒र्हिषि॑ । एही॑म॒स्य द्रवा॒ पिब॑ ॥ ११ ॥

अयम् । ते । इन्द्र । सोमः । निऽपूतः । अधि । बर्हिषि ।
आ । इहि । ईम् । अस्य । द्रव । पिब ॥ ११ ॥

हा स्वच्छ गाळलेला सोमरस, हे इन्द्रा, तुझ्याकरिता दर्भांवर ठेवला आहे, तर ह्याच्याकडे ये, धांवत ये आणि हा रस प्राशन कर ११.शाचि॑गो॒ शाचि॑पूजना॒यं रणा॑य ते सु॒तः । आख॑ण्डल॒ प्र हू॑यसे ॥ १२ ॥

शाचिगो इति शाचिऽगो । शाचिऽपूजन । अयम् । रणाय । ते । सुतः ।
आखण्डल । प्र । हूयसे ॥ १२ ॥

इन्द्रा, शक्ति हेंच तुझे गोधन; आणि शक्तीनेंच तुझें पूजन होतें, म्हणून हा सोमरस तुझ्या आनंदाला कारण होवो; शत्रूंची खांडोळी करून टाकणाऱ्या इन्द्रा, त्याकरितांच आम्ही तुला पाचारण करीत आहों. १२.यस्ते॑ शृङ्गवृषो नपा॒त्प्रण॑पात्कुण्ड॒पाय्यः॑ । न्य॑स्मिन्दध्र॒ आ मनः॑ ॥ १३ ॥

यः । ते । शृङ्गऽवृषः । नपात् । प्रनपादिति प्रऽनपात् । कुण्डऽपाय्यः ।
नि । अस्मिन् । दध्रे । आ । मनः ॥ १३ ॥

शुङ्‌गवृषाचा जो पुत्र आणि कुण्डपाय्याचा जो पौत्र त्यानें तुझ्यासाठी ह्या इन्द्राच्या ठिकणीच अपलें चित्त ठेवलें आहे. १३.वास्तो॑ष्पते ध्रु॒वा स्थूणांस॑त्रं सो॒म्याना॑म् ।
द्र॒प्सो भे॒त्ता पु॒रां शश्व॑तीना॒मिन्द्रो॒ मुनी॑नां॒ सखा॑ ॥ १४ ॥

वास्तोः । पते । ध्रुवा । स्थूणा । अंसत्रम् । सोम्यानाम् ।
द्रप्सः । भेत्ता । पुराम् । शश्वतीनाम् । इन्द्रः । मुनीनाम् । सखा ॥ १४ ॥

हे गृहपते इंद्रा तुझा आधार आम्हांस पक्का आहे, तो सोमार्पण करणाऱ्यांचें एक चिलखतच होय. सोमाचा एक बिंदू देखील शत्रूंचे शेकडो तुर्भेद्य किल्ले जमीनदोस्त करून टाकतो; कारण, जे मुनी आहेत त्यांचा इन्द्र हा प्राणमित्रच होय. १४.पृदा॑कुसानुर्यज॒तो ग॒वेष॑ण॒ एकः॒ सन्न॒भि भूय॑सः ।
भूर्णि॒मश्वं॑ नयत्तु॒जा पु॒रो गृ॒भेन्द्रं॒ सोम॑स्य पी॒तये॑ ॥ १५ ॥

पृदाकुऽसानुः । यजतः । गोऽएषणः । एकः । सन् । अभि । भूयसः ।
भूर्णिम् । अश्वम् । नयत् । तुजा । पुरः । गृभा । इन्द्रम् । सोमस्य । पीतये ॥ १५ ॥

प्रकाशधेनू हस्तगत करून घेण्याचा प्रयत्न करणारा यजनशील पृदाकुसानू हा जरी एकटा होता तरी त्यानें शेंकडो शत्रूंचा फडशा उडवून दिला, अणि त्यानें तुम्हाला आपल्या भरधांव अश्वाकडे सोमप्राशनासाठी निग्रहाने पुढे नेले. १५ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त १८ ( अनेक देवतांचे पालुपदसूक्त )

ऋषी - इरिम्बिठि काण्व देवता - ४, ६-७ अदिति; ८ अश्विनीकुमार; ९ अग्नि, सूर्य, वायु, अवशिष्ट-आदित्य छंद - उष्णिहइ॒दं ह॑ नू॒नमे॑षां सु॒म्नं भि॑क्षेत॒ मर्त्यः॑ । आ॒दि॒त्याना॒मपू॑र्व्यं॒ सवी॑मनि ॥ १ ॥

इदम् । ह । नूनम् । एषाम् । सुम्नम् । भिक्षेत । मर्त्यः ।
आदित्यानाम् । अपूर्व्यम् । सवीमनि ॥ १ ॥

खचित आतां येथें सोमयागांत मर्त्य मानवाने ह्या आदित्यांच्या जवळ कांही मागावयाचेंच तर अपूर्व असे जें सुख आहे तेंच मागावे. १.अ॒न॒र्वाणो॒ ह्ये॑षां॒ पन्था॑ आदि॒त्याना॑म् । अद॑ब्धाः॒ सन्ति॑ पा॒यवः॑ सुगे॒वृधः॑ ॥ २ ॥

अनर्वाणः । हि । एषाम् । पन्थाः । आदित्यानाम् ।
अदब्धाः । सन्ति । पायवः । सुगेऽवृधः ॥ २ ॥

ह्या आदित्यांचे मार्ग अगदी निष्कण्टक आणि निर्धास्त आहेत. त्यांचा नाश कोणीही करू शकत नाहीं, म्हणूनच ते मार्ग आम्हासहि संरक्षक आणि सुखकर्धक होतात. २.तत्सु नः॑ सवि॒ता भगो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा । शर्म॑ यच्छन्तु स॒प्रथो॒ यदीम॑हे ॥ ३ ॥

तत् । सु । नः । सविता । भगः । वरुणः । मित्रः । अर्यमा ।
शर्म । यच्छन्तु । सऽप्रथः । यत् । ईमहे ॥ ३ ॥

तर आतां, सविता, भग, वरुण, मित्र आणि अर्यमा हे आदित्य, ज्या कल्याणाची आम्हांस लालसा आहे तें अमर्याद कल्याण आम्हांस प्राप्त करून देवोत. ३.दे॒वेभि॑र्देव्यदि॒तेऽरि॑ष्टभर्म॒न्ना ग॑हि । स्मत्सू॒रिभिः॑ पुरुप्रिये सु॒शर्म॑भिः ॥ ४ ॥

देवेभिः । देवि । अदिते । अरिष्टऽभर्मन् । आ । गहि ।
स्मत् । सूरिऽभिः । पुरुऽप्रिये । सुशर्मऽभिः ॥ ४ ॥

अदिते देवि, ज्या तुझ्या वरदानांत कोणीही व्यत्यय आणूं शकत नाहीं, अशी तूं आदित्य देवांसह येथें ये. हे सर्वप्रिय देवी, उत्कृष्ट सुखप्रद अशी तूं देवांत अग्रगण्य जे आदित्य त्यांच्यासह आमच्याकडे आनंदाने आगमन कर. ४.ते हि पु॒त्रासो॒ अदि॑तेर्वि॒दुर्द्वेषां॑सि॒ योत॑वे । अं॒होश्चि॑दुरु॒चक्र॑योऽने॒हसः॑ ॥ ५ ॥

ते । हि । पुत्रासः । अदितेः । विदुः । द्वेषांसि । योतवे ।
अंहोः । चित् । उरुऽचक्रयः । अनेहसः ॥ ५ ॥

ते अदितीचे पुत्र आदित्य खरोखर असे आहेत की द्वेष्ट्यांचे तुकडे कसे उडावे हें त्यांना चांगले समजते; ते भक्तांना पातकापासून पूर्णपणे मुक्त करणारे आणि त्यांचा नाश न होऊं देणारे असे आहेत. ५.अदि॑तिर्नो॒ दिवा॑ प॒शुमदि॑ति॒र्नक्त॒मद्व॑याः । अदि॑तिः पा॒त्वंह॑सः स॒दावृ॑धा ॥ ६ ॥

अदितिः । नः । दिवा । पशुम् । अदितिः । नक्तम् । अद्वयाः ।
अदितिः । पातु । अंहसः । सदाऽवृधा ॥ ६ ॥

अदिति दिवसा आमच्या गोधनाचे रक्षण करो; ती निष्कपट देवी रात्रीही पण त्याचें रक्षण करो. जगताची नेहमी अभिवृद्धीच करणारी अशी अदिति आमचे पातकांपासून रक्षण करो. ६.उ॒त स्या नो॒ दिवा॑ म॒तिरदि॑तिरू॒त्या ग॑मत् । सा शंता॑ति॒ मय॑स्कर॒दप॒ स्रिधः॑ ॥ ७ ॥

उत । स्या । नः । दिवा । मतिः । अदितिः । ऊत्या । आ । गमत् ।
सा । शम्ऽताति । मयः । करत् । अप । स्रिधः ॥ ७ ॥

दिवसभर आमचे जे काय चिन्तन चालावयाचें तें अदिति हेंच असो. ती आपल्या भक्तरक्षक शक्तिंसह आमच्याकडे येवो. ती आमचे शांतियुक्त असें मंगल करो आणि दुष्टांना दूर हाकलून देवो. ७.उ॒त त्या दैव्या॑ भि॒षजा॒ शं नः॑ करतो अ॒श्विना॑ । यु॒यु॒याता॑मि॒तो रपो॒ अप॒ स्रिधः॑ ॥ ८ ॥

उत । त्या । दैव्या । भिषजा । शम् । नः । करतः । अश्विना ।
युयुयाताम् । इतः । रपः । अप । स्रिधः ॥ ८ ॥

तसेंच, ते दिव्य वैद्य अश्विदेव आमचे कल्याण करोत; ते आमच्या पासून दोषांना काढून टाकोत आणि घातक्यांना दूर हाकलून देवोत ९.शम॒ग्निर॒ग्निभिः॑ कर॒च्छं न॑स्तपतु॒ सूर्यः॑ । शं वातो॑ वात्वर॒पा अप॒ स्रिधः॑ ॥ ९ ॥

शम् । अग्निः । अग्निऽभिः । करत् । शम् । नः । तपतु । सूर्यः ।
शम् । वातः । वातु । अरपाः । अप । स्रिधः ॥ ९ ॥

गार्हपत्यादिक जे पांच अग्नि, त्यांच्या यजनानें अग्निदेव आमचे कल्याण करो. सूर्य आमच्या कल्याणासाठीच प्रकाशित होवो; आणि तो निष्कलंक वायु देखील अशा रीतीने .वाहो कीं दुष्ट घातकी दूर पळून जातील ९अपामी॑वा॒मप॒ स्रिध॒मप॑ सेधत दुर्म॒तिम् । आदि॑त्यासो यु॒योत॑ना नो॒ अंह॑सः ॥ १० ॥

अप । अमीवाम् । अप । स्रिधम् । अप । सेधत । दुःऽमतिम् ।
आदित्यासः । युयोतन । नः । अंहसः ॥ १० ॥

आमच्यापासून आधिव्याधी पिटाळून लावा, घातकी दुष्टांचे निर्मूलन करा, दुर्बुद्धि पार विलयास न्या. आणि हे आदित्य हो, आम्हांला पातकांपासून दूर ठेवा. १०.यु॒योता॒ शरु॑म॒स्मदाँ आदि॑त्यास उ॒ताम॑तिम् । ऋध॒ग्द्वेषः॑ कृणुत विश्ववेदसः ॥ ११ ॥

युयोत । शरुम् । अस्मत् । आ । आदित्यासः । उत । अमतिम् ।
ऋधक् । द्वेषः । कृणुत । विश्वऽवेदसः ॥ ११ ॥

अत्याचारी दुष्टाला आम्हांपासून दूर नेऊन ठार करा तसेंच हे आदित्यांनों आमच्यातील अविचाराचा निःपात करा; अणि हे सर्वज्ञ आदित्यहो, द्वेषबुद्धि लयास न्या. ११तत्सु नः॒ शर्म॑ यच्छ॒तादि॑त्या॒ यन्मुमो॑चति । एन॑स्वन्तं चि॒देन॑सः सुदानवः ॥ १२ ॥

तत् । सु । नः । शर्म । यच्छत । आदित्याः । यत् । मुमोचति ।
एनस्वन्तम् । चित् । एनसः । सुऽदानवः ॥ १२ ॥

आम्हांस अशा तऱ्हेचे शांतिसुखाचे स्थान द्या की हे अदित्यांनो, हे सुवरद देवांनो, जें प्राप्त झाले असतां महापातक्याला देखील ते पातकापासून मुक्त करील. १२.यो नः॒ कश्चि॒द्रिरि॑क्षति रक्ष॒स्त्वेन॒ मर्त्यः॑ । स्वैः ष एवै॑ रिरिषीष्ट॒ युर्जनः॑ ॥ १३ ॥

यः । नः । कः । चित् । रिरिक्षति । रक्षःऽत्वेन । मर्त्यः ।
स्वैः । सः । एवैः । रिरिषीष्ट । युः । जनः ॥ १३ ॥

जो कोणी मनुष्य राक्षसी दुर्बुद्धीने आमचा घात करूं पहात असेल तो नीच मानव त्याच्या स्वतःच्याच दुष्कृत्याने मारला जावो. १३.समित्तम॒घम॑श्नवद्दुः॒शंसं॒ मर्त्यं॑ रि॒पुम् । यो अ॑स्म॒त्रा दु॒र्हणा॑वाँ॒ उप॑ द्व॒युः ॥ १४ ॥

सम् । इत् । तम् । अघम् । अश्नवत् । दुःऽशंसम् । मर्त्यम् । रिपुम् ।
यः । अस्मऽत्रा । दुःऽहनावान् । उप । द्वयुः ॥ १४ ॥

जो आमच्याविषयी कांही घातकी हेतु मनांत धरतो, जो आत एक बाहेर एक अशा दुटप्पीपणाने वागत असतो, त्या अधम मनुष्याला, त्या शत्रूला, त्याचेंच पातक पार गडप करून टाको. १४.पा॒क॒त्रा स्थ॑न देवा हृ॒त्सु जा॑नीथ॒ मर्त्य॑म् । उप॑ द्व॒युं चाद्व॑युं च वसवः ॥ १५ ॥

पाकऽत्रा । स्थन । देवाः । हृत्ऽसु । जानीथ । मर्त्यम् ।
उप । द्वयुम् । च । अद्वयुम् । च । वसवः ॥ १५ ॥

जेथें शुद्धता असेल तेथें, त्या अन्तःकरणातच, हे देवांनों तुम्ही वास करता; आणि दुटप्पी कोण आणि निष्कपट कोण ह्याची हे दिव्यनिधींनो, तुन्हीं जाणीव ठेवता १५आ शर्म॒ पर्व॑ताना॒मोतापां वृ॑णीमहे । द्यावा॑क्षामा॒रे अ॒स्मद्रप॑स्कृतम् ॥ १६ ॥

आ । शर्म । पर्वतानाम् । आ । उत । अपाम् । वृणीमहे ।
द्यावाक्षामा । आरे । अस्मत् । रपः । कृतम् ॥ १६ ॥

शांत आसरा, मग तो पर्वतांचा आणि नद्यांचा. कां असेना, तोच आम्ही हात जोडून मागत आहों. तर हे द्यावापृथिवीहो, आमच्यापासून पातकांचे किल्मिष दूर करा. १६.ते नो॑ भ॒द्रेण॒ शर्म॑णा यु॒ष्माकं॑ ना॒वा व॑सवः । अति॒ विश्वा॑नि दुरि॒ता पि॑पर्तन ॥ १७ ॥

ते । नः । भद्रेण । शर्मणा । युष्माकम् । नावा । वसवः ।
अति । विश्वानि । दुःऽइता । पिपर्तन ॥ १७ ॥

आणि तुमच्या कल्याणदायक आश्रयाने, त्या आश्रयरूप नावेच्या योगाने, हे दिव्यनिधींनो, आम्हांस यच्चावत्र अनिष्टांतून पार न्या. १७.तु॒चे तना॑य॒ तत्सु नो॒ द्राघी॑य॒ आयु॑र्जी॒वसे॑ । आदि॑त्यासः सुमहसः कृ॒णोत॑न ॥ १८ ॥

तुचे । तनाय । तत् । सु । नः । द्राघीयः । आयुः । जीवसे ।
आदित्यासः । सुऽमहसः । कृणोतन ॥ १८ ॥

आमच्या मुलालेकरांना तुमच्या जीवनाचा लाभ व्हावा म्हणून हे महनीय आदित्यांनो, तें उत्कृष्ट दीर्घायुष्य प्राप्त करून द्या. १८.य॒ज्ङो ही॒ळो वो॒ अन्त॑र॒ आदि॑त्या॒ अस्ति॑ मृ॒ळत॑ । यु॒ष्मे इद्वो॒ अपि॑ ष्मसि सजा॒त्ये॑ ॥ १९ ॥

यज्ञः । हीळः । वः । अन्तरः । आदित्याः । अस्ति । मृळत ।
युष्मे इति । इत् । वः । अपि । स्मसि । सऽजात्ये ॥ १९ ॥

आदित्यांनो, तुमच्या मनामध्ये स्तुतियुक्त यज्ञ चांगलाच भरतो, तर आम्हांवर कृपा करा. आम्ही तुमच्यापैकीच आहोंत, तुमच्या कुलातीलच आहोंत असें समजा. १९.बृ॒हद्वरू॑थं म॒रुतां॑ दे॒वं त्रा॒तार॑म॒श्विना॑ । मि॒त्रमी॑महे॒ वरु॑णं स्व॒स्तये॑ ॥ २० ॥

बृहत् । वरूथम् । मरुताम् । देवम् । त्रातारम् । अश्विना ।
मित्रम् । ईमहे । वरुणम् । स्वस्तये ॥ २० ॥

मरुताचें तें मोठे भक्कम चिलखत, आही जगततारक देवाजवळ, तसेंच अश्विदेव, मित्र, वरुण यांच्याजवळ सर्वांच्या कल्याणासाठी हात जोडून मागत आहों. २०.अ॒ने॒हो मि॑त्रार्यमन्नृ॒वद्व॑रुण॒ शंस्य॑म् । त्रि॒वरू॑थं मरुतो यन्त नश्छ॒र्दिः ॥ २१ ॥

अनेहः । मित्र । अर्यमन् । नृऽवत् । वरुण । शंस्यम् ।
त्रिऽवरूथम् । मरुतः । यन्त । नः । छर्दिः ॥ २१ ॥

हे मित्रा, हे अर्यमन्, हे वरुणा, हे मरुतांनो, जें निर्वेध आहे, जें शूर पुरुषानी गजबजलेलें, नामांकित, आणि तिपटीने मजबूत आहे असें आश्रयस्थान आम्हांस द्या. २१.ये चि॒द्धि मृ॒त्युब॑न्धव॒ आदि॑त्या॒ मन॑वः॒ स्मसि॑ । प्र सू न॒ आयु॑र्जी॒वसे॑ तिरेतन ॥ २२ ॥

ये । चित् । हि । मृत्युऽबन्धवः । आदित्याः । मनवः । स्मसि ।
प्र । सु । नः । आयुः । जीवसे । तिरेतन ॥ २२ ॥

अदिति पुत्रांनो, आम्ही मनुष्यें बोलून चालून मृत्यूच्या आधीन होणारीच आहोंत. तर आमचे आयुष्य आम्ही उत्तमरीतीनें जगावे म्हणून होईल तितके दीर्घ करा. २२.ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त १९ (अग्नि-आदित्यसूक्त, सदस्यु दानस्तुती )

ऋषी - सोभरि काण्व देवता - १-३३ अग्नि; ३४-३५ आदित्य; ३६-३७ सदस्यु पौरुकुत्स्य दानस्तुती; छंद - २७ द्विपदा विराज्; ३४ उष्णिह; ३५ सतोबृहती; ३६ ककुम्;३७ पंक्ति; अवशिष्ट-प्रगाथतं गू॑र्धया॒ स्व॑र्णरं दे॒वासो॑ दे॒वम॑र॒तिं द॑धन्विरे । दे॒व॒त्रा ह॒व्यमोहि॑रे ॥ १ ॥

तम् । गूर्धय । स्वःऽनरम् । देवासः । देवम् । अरतिम् । दधन्विरे ।
देवऽत्रा । हव्यम् । आ । ऊहिरे ॥ १ ॥

ज्या देवाला दिव्य विबुधांनी देवांमध्ये आपला धुरीण म्हणून ठरविलें, आणि ज्याच्या योगाने ते आपआपले हविर्भाग ग्रहण करतात त्या स्वर्गीय प्रकाश देणाऱ्या अग्नीची आराधना कर. १.विभू॑तरातिं विप्र चि॒त्रशो॑चिषम॒ग्निमी॑ळिष्व य॒न्तुर॑म् ।
अ॒स्य मेध॑स्य सो॒म्यस्य॑ सोभरे॒ प्रेम॑ध्व॒राय॒ पूर्व्य॑म् ॥ २ ॥

विभूतऽरातिम् । विप्र । चित्रऽशोचिषम् । अग्निम् । ईळिष्व । यन्तुरम् ।
अस्य । मेधस्य । सोम्यस्य । सोभरे । प्र । ईम् । अध्वराय । पूर्व्यम् ॥ २ ॥

हे स्तवनज्ञ भक्ता, वैभवदाता, विचित्रतेजोमण्डित आणि ह्या पवित्र यज्ञाचा नियंता जो सनातन अग्नि त्याचे स्तवन, हे सोभरी, तूं यागनिर्विघ्नतेसाठी कर. २.यजि॑ष्ठं त्वा ववृमहे दे॒वं दे॑व॒त्रा होता॑र॒मम॑र्त्यम् ।
अ॒स्य य॒ज्ङस्य॑ सु॒क्रतु॑म् ॥ ३ ॥

यजिष्ठम् । त्वा । ववृमहे । देवम् । देवऽत्रा । होतारम् । अमर्त्यम् ।
अस्य । यज्ञस्य । सुऽक्रतुम् ॥ ३ ॥

अत्यंत पूज्य, दिव्यविबुधांतील अविनाशी यज्ञसंपादक, आणि ह्या आमच्या यज्ञाचा उत्कृष्ट सिद्धिदाता असा जो तूं देव, त्या तुझ्याच जवळ आम्ही वरदान मागत आहों. ३.ऊ॒र्जो नपा॑तं सु॒भगं॑ सु॒दीदि॑तिम॒ग्निं श्रेष्ठ॑शोचिषम् ।
स नो॑ मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ सो अ॒पामा सु॒म्नं य॑क्षते दि॒वि ॥ ४ ॥

ऊर्जः । नपातम् । सुऽभगम् । सुऽदीदितिम् । अग्निम् । श्रेष्ठऽशोचिषम् ।
सः । नः । मित्रस्य । वरुणस्य । सः । अपाम् । आ । सुम्नम् । यक्षते । दिवि ॥ ४ ॥

ओजस्वितेचा दाता, भाग्यमंडित, जाज्वल्यपदीप्ति, आणि अत्युज्ज्वलकांती अशा अग्नीजवळ मित्राचें, वरुणाचे आणि आपोदेवींचें जें स्थान द्युलोकीं आहे तें हा भक्त यज्ञद्वारा मागत आहे. ४.यः स॒मिधा॒ य आहु॑ती॒ यो वेदे॑न द॒दाश॒ मर्तो॑ अ॒ग्नये॑ ।
यो नम॑सा स्वध्व॒रः ॥ ५ ॥

यः । सम्ऽइधा । यः । आऽहुती । यः । वेदेन । ददाश । मर्तः । अग्नये ।
यः । नमसा । सुऽअध्वरः ॥ ५ ॥

जो भक्त सभिधांनी, जो हविर्भागाने, जो वेदानें म्हणजे ज्ञानाने आपली सेवा अग्नीला अर्पण करतो, किंवा जो प्रणिपाताने आपला अध्वरयाग उत्तम रीतीनें संपादन करतो, त्याच भक्ताचे वेगाने धावणारे अश्वारूढ सैनिक झपाट्याने चालून जातात; उज्ज्वल यश त्यालाच लाभते. आणि देवाविरुद्ध पापकृत्य त्याच्या हातून घडूं शकत नाहीं. मग मनुष्यासंबंधीचे पातक कोठून घडेल ? ५-६तस्येदर्व॑न्तो रंहयन्त आ॒शव॒स्तस्य॑ द्यु॒म्नित॑मं॒ यशः॑ ।
न तमंहो॑ दे॒वकृ॑तं॒ कुत॑श्च॒न न मर्त्य॑कृतं नशत् ॥ ६ ॥

तस्य । इत् । अर्वन्तः । रंहयन्ते । आशवः । तस्य । द्युम्निऽतमम् । यशः ।
न । तम् । अंहः । देवऽकृतम् । कुतः । चन । न । मर्त्यऽकृतम् । नशत् ॥ ६ ॥

आहवनायादि अग्नीच्या सेवेने आम्ही उत्कृष्टप्रतीचे अग्नि-उपासक होऊं असें घडो. हे सामर्थ्यप्रभवा, हे ओजस्वितेच्या प्रभो, हे वीरोत्तमा अग्निदेवा, तुला आमचा कळवळा येऊ दे. ७.स्व॒ग्नयो॑ वो अ॒ग्निभिः॒ स्याम॑ सूनो सहस ऊर्जां पते ।
सु॒वीर॒स्त्वम॑स्म॒युः ॥ ७ ॥

सुऽअग्नयः । वः । अग्निऽभिः । स्याम । सूनो इति । सहसः । ऊर्जाम् । पते ।
सुऽवीरः । त्वम् । अस्मऽयुः ॥ ७ ॥

आपल्या मित्रत्वांतील पाहुणा आला असतां त्याची जशी प्रशंसा चालते त्याप्रमाणें अग्नीची जिकडे तिकडे स्तुति चालत असते. रथ जसा विजयाचे साधन, तसा अग्नि हा कल्याणाचे साधन आहे असें समजा; हे देवा, सत्पुरुष तुझ्या ठिकाणींच क्षेम पावतात, कारण, शाश्वत संपत्तीचा राजा तूं आहेस. ८.प्र॒शंस॑मानो॒ अति॑थि॒र्न मि॒त्रियो॒ऽग्नी रथो॒ न वेद्यः॑ ।
त्वे क्षेमा॑सो॒ अपि॑ सन्ति सा॒धव॒स्त्वं राजा॑ रयी॒णाम् ॥ ८ ॥

प्रऽशंसमानः । अतिथिः । न । मित्रियः । अग्निः । रथः । न । वेद्यः ।
त्वे इति । क्षेमासः । अपि । सन्ति । साधवः । त्वम् । राजा । रयीणाम् ॥ ८ ॥

खरोखर जो मानव आपला अध्वरयाग, हे सद्‌भाग्या अग्ने, तुला अर्पण करतो; त्याच मनुष्याची प्रशंसा करणें योग्य. हे देवा, आपल्या ध्यानवृत्तिंनी तोच फलभागी होवो. ९.सो अ॒द्धा दा॒श्व॑ध्व॒रोऽग्ने॒ मर्तः॑ सुभग॒ स प्र॒शंस्यः॑ ।
स धी॒भिर॑स्तु॒ सनि॑ता ॥ ९ ॥

सः । अद्धा । दाशुऽअध्वरः । अग्ने । मर्तः । सुऽभग । सः । प्रऽशंस्यः ।
सः । धीभिः । अस्तु । सनिता ॥ ९ ॥

वीरांचा आश्रय असा तूं स्वतः कंबर कसून ज्याचा अध्वरयाग तडीस नेण्यास सज्ज असतोस, तोच भक्त आपले अभीष्ट साध्य करून घेतो; अश्वारूढ योध्यांनिशीं तोच विजय मिळवितो, स्तोत्रप्रवीण भक्तांसह आणि शूर सैनिकांसह तोच आपलें कार्य यशस्वी करतो. १०.यस्य॒ त्वमू॒र्ध्वो अ॑ध्व॒राय॒ तिष्ठ॑सि क्ष॒यद्वी॑रः॒ स सा॑धते ।
सो अर्व॑द्भिः॒ सनि॑ता॒ स वि॑प॒न्युभिः॒ स शूरैः॒ सनि॑ता कृ॒तम् ॥ १० ॥

यस्य । त्वम् । ऊर्ध्वः । अध्वराय । तिष्ठसि । क्षयत्ऽवीरः । सः । साधते ।
सः । अर्वत्ऽभिः । सनिता । सः । विपन्युऽभिः । सः । शूरैः । सनिता । कृतम् ॥ १० ॥

ज्याच्या गृही अग्नि मूर्तिकान प्रकट होऊन प्रेमाने स्तोत्र ग्रहण करतो; आणि विश्ववंद्य अग्नि सर्वसंचारी दिव्यविभूतिंमध्यें ज्यांचे त्यांना हविर्भाग पोहोचवितो; ११.यस्या॒ग्निर्वपु॑र्गृ॒हे स्तोमं॒ चनो॒ दधी॑त वि॒श्ववा॑र्यः ।
ह॒व्या वा॒ वेवि॑ष॒द्विषः॑ ॥ ११ ॥

यस्य । अग्निः । वपुः । गृहे । स्तोमम् । चनः । दधीत । विश्वऽवार्यः ।
हव्या । वा । वेविषत् । विषः ॥ ११ ॥

अथवा जो ज्ञानी कवि तुझें स्तवन करतो, किंवा जे सामर्थ्योद्‌भवा, जो हवि अर्पण करण्यांत अत्यंत तत्पर असतो अशा सोत्रज्ञ अणि ज्ञानी भक्ताचे वचन, हे दिव्यनिधींनो, देवापेक्षा कमी प्रतीचें पण मनुष्यांच्या शब्दांपेक्षा जासस्त मूल्यवार कर. १२.विप्र॑स्य वा स्तुव॒तः स॑हसो यहो म॒क्षूत॑मस्य रा॒तिषु॑ ।
अ॒वोदे॑वमु॒परि॑मर्त्यं कृधि॒ वसो॑ विवि॒दुषो॒ वचः॑ ॥ १२ ॥

विप्रस्य । वा । स्तुवतः । सहसः । यहो इति । मक्षुऽतमस्य । रातिषु ।
अवःऽदेवम् । उपरिऽमर्त्यम् । कृधि । वसो इति । विविदुषः । वचः ॥ १२ ॥

जो भक्त हविर्दानानें किंवा नुसत्या प्रणीपातांनीच तुर्यबलसंपन्न अग्नीची उपासना करतो किंवा त्या चंचलज्वाल अग्नीची नुसत्या स्तवनाने सेवा करतो; १२.यो अ॒ग्निं ह॒व्यदा॑तिभि॒र्नमो॑भिर्वा सु॒दक्ष॑मा॒विवा॑सति ।
गि॒रा वा॑जि॒रशो॑चिषम् ॥ १३ ॥

यः । अग्निम् । हव्यदातिऽभिः । नमःऽभिः । वा । सुऽदक्षम् । आऽविवासति ।
गिरा । वा । अजिरऽशोचिषम् ॥ १३ ॥

किंवा अपल्याच दीप्तिनें अखण्ड धगधगणाऱ्या ह्या अग्नीला जो मानव प्रज्वलित होणाऱ्या समिधेने आपली सेवा अर्पण करतो, तोच भाग्यशाली भक्त आपल्या ध्यानवृत्तींनी आणि यशस्वितेच्या तेजांनी उदक कल्लोळांतून पार नेल्याप्रमाणें यच्चावत् लोकांना संकटांतून पार नेतो. १४स॒मिधा॒ यो निशि॑ती॒ दाश॒ददि॑तिं॒ धाम॑भिरस्य॒ मर्त्यः॑ ।
विश्वेत्स धी॒भिः सु॒भगो॒ जनाँ॒ अति॑ द्यु॒म्नैरु॒द्न इ॑व तारिषत् ॥ १४ ॥

सम्ऽइधा । यः । निऽशिती । दाशत् । अदितिम् । धामऽभिः । अस्य । मर्त्यः ।
विश्वा । इत् । सः । धीभिः । सुऽभगः । जनान् । अति । द्युम्नैः । उद्नःऽइव । तारिषत् ॥ १४ ॥

हे अग्नि, आम्हांला असें तेजोवैभव दे की, आमच्या घरांत घुसून सर्व खाऊन टाकणाऱ्या राक्षसाला तें चिरडून टाकील. मनांत पापबुद्धि बाळगणाऱ्या दुष्टाच्या क्रोधलाही ते दडपून टाकील १५.तद॑ग्ने द्यु॒म्नमा भ॑र॒ यत्सा॒सह॒त्सद॑ने॒ कं चि॑द॒त्रिण॑म् ।
म॒न्युं जन॑स्य दू॒ढ्यः॑ ॥ १५ ॥

तत् । अग्ने । द्युम्नम् । आ । भर । यत् । ससहत् । सदने । कम् । चित् । अत्रिणम् ।
मन्युम् । जनस्य । दुःऽध्यः ॥ १५ ॥

ज्या उत्कटबलाच्या योगानें वरुण निरीक्षण करतो, मित्र पाहतो, अर्यमा अवलोकन करतो; ज्या सामर्थ्याने अश्वीदेव आणि भग हेही पाहतात त्या तुझ्या उत्कटबलानें, हे इन्द्रा, तुझ्या रक्षणाने आम्ही आमच्या अंतिम ध्येयाचें उत्कृष्ट ज्ञान संपादून तुझी सेवा करूं असें घडो. १६.येन॒ चष्टे॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा येन॒ नास॑त्या॒ भगः॑ ।
व॒यं तत्ते॒ शव॑सा गातु॒वित्त॑मा॒ इन्द्र॑त्वोता विधेमहि ॥ १६ ॥

येन । चष्टे । वरुणः । मित्रः । अर्यमा । येन । नासत्या । भगः ।
वयम् । तत् । ते । शवसा । गातुवित्ऽतमाः । इन्द्रत्वाऽऊताः । विधेमहि ॥ १६ ॥

हे अग्ने, हे स्तुत्यभिज्ञा, मनुष्यांवर आपली दृष्टि ठेवणाऱ्या तुज कर्तृत्वशाली देवाला ज्या स्तवनज्ञांनीं आपल्या हृदयांत ठेवले तेच हे देवा, उत्तम ध्यानयोगी होत. १७.ते घेद॑ग्ने स्वा॒ध्यो॒३॒॑ ये त्वा॑ विप्र निदधि॒रे नृ॒चक्ष॑सम् ।
विप्रा॑सो देव सु॒क्रतु॑म् ॥ १७ ॥

ते । घ । इत् । अग्ने । सुऽआध्यः । ये । त्वा । विप्र । निऽदधिरे । नृऽचक्षसम् ।
विप्रासः । देव । सुऽक्रतुम् ॥ १७ ॥

ज्यांनीं आपली इच्छा तुझ्या ठिकाणी अर्पण केली त्यांनींच, हे सद्‌भाग्या अग्नी, वेदी तयार केली, त्यांनींच आहुति दिली, त्यांनींच दिवसा सोम पिळण्याचा उपक्रम केला आणि महनीय असें धन आपल्या सत्वसामर्थाच्या जोरावर जिंकून घेतलें. १८.त इद्वेदिं॑ सुभग॒ त आहु॑तिं॒ ते सोतुं॑ चक्रिरे दि॒वि ।
त इद्वाजे॑भिर्जिग्युर्म॒हद्धनं॒ ये त्वे कामं॑ न्येरि॒रे ॥ १८ ॥

ते । इत् । वेदिम् । सुऽभग । ते । आऽहुतिम् । ते । सोतुम् । चक्रिरे । दिवि ।
ते । इत् । वाजेभिः । जिग्युः । महत् । धनम् । ये । त्वे इति । कामम् । निऽएरिरे ॥ १८ ॥

भाग्यशाली भक्ता, अग्निचे आवाहन केलें म्हणजे तो आपल्याला कल्याणदायक होतो, त्याला आहुति दिली म्हणजे ती कल्याणप्रद होते, त्याचा यज्ञ करेयाणप्रद आणि त्याच्या स्तुति देखील कल्याणप्रदच होतात १९.भ॒द्रो नो॑ अ॒ग्निराहु॑तो भ॒द्रा रा॒तिः सु॑भग भ॒द्रो अ॑ध्व॒रः ।
भ॒द्रा उ॒त प्रश॑स्तयः ॥ १९ ॥

भद्रः । नः । अग्निः । आऽहुतः । भद्रा । रातिः । सुऽभग । भद्रः । अध्वरः ।
भद्राः । उत । प्रऽशस्तयः ॥ १९ ॥

तर हे अग्ने तूं आपलें शुभाकांक्षी मन शत्रूचा नाश करण्याकडे लाव. त्यानेंच तूं संग्रामांमध्ये शत्रुंना चिरडून टाक. हल्ला करणाऱ्या सैन्याचे समूह कितीही असले आणि कसेही ठाम उभे राहिले तरी त्यांना तूं उलथून खालीं पाड, आणि तुझ्या रक्षणाच्या जोरावर आम्हीं इष्टसिद्धि प्राप्त करून घेऊं असें कर. २०.भ॒द्रं मनः॑ कृणुष्व वृत्र॒तूर्ये॒ येना॑ स॒मत्सु॑ सा॒सहः॑ ।
अव॑ स्थि॒रा त॑नुहि॒ भूरि॒ शर्ध॑तां व॒नेमा॑ ते अ॒भिष्टि॑भिः ॥ २० ॥

भद्रम् । मनः । कृणुष्व । वृत्रऽतूर्ये । येन । समत्ऽसु । ससहः ।
अव । स्थिरा । तनुहि । भूरि । शर्धताम् । वनेम । ते । अभिष्टिऽभिः ॥ २०॥

मनु राजाने ज्याला वेदीवर स्थापन केले त्या अग्नीचे मी स्तुतिकलापाने स्तवन करतो ज्या धुरीणाला, ज्या हव्यवाहन आणि परमपूज्य देवाला दिव्यविबुधांनी आपला प्रतिनिधि म्हणून पाठविलें, त्याचें मीं स्तवन करतो. २१.ईळे॑ गि॒रा मनु॑र्हितं॒ यं दे॒वा दू॒तम॑र॒तिं न्ये॑रि॒रे ।
यजि॑ष्ठं हव्य॒वाह॑नम् ॥ २१ ॥

ईळे । गिरा । मनुःऽहितम् । यम् । देवाः । दूतम् । अरतिम् । निऽएरिरे ।
यजिष्ठम् । हव्यऽवाहनम् ॥ २१ ॥

ज्याच्या ज्वाळा प्रखर, जो सर्वकाळ तरुण आणि देदीप्यमान आहे त्या अग्निप्रीत्यर्थ तूं प्रेमळ गुणगायन करतोस; तोच अग्नि तुझ्या सत्यमधुर स्तुतींनी आणि घृताहुतींनी प्रसन्न होऊन भक्तामध्ये उत्तम वीर्यशालित्व घडवितो. २२.ति॒ग्मज॑म्भाय॒ तरु॑णाय॒ राज॑ते॒ प्रयो॑ गायस्य॒ग्नये॑ ।
यः पिं॒शते॑ सू॒नृता॑भिः सु॒वीर्य॑म॒ग्निर्घृ॒तेभि॒राहु॑तः ॥ २२ ॥

तिग्मऽजम्भाय । तरुणाय । राजते । प्रयः । गायसि । अग्नये ।
यः । पिंशते । सूनृताभिः । सुऽवीर्यम् । अग्निः । घृतेभिः । आऽहुतः ॥ २२ ॥

जेव्हां घृताहुतींनी त्याचें हवन होतें तेव्हां दिव्यात्मा सूर्य आपलें रश्मिजाल पसरतो त्याप्रमाणें, अग्नि हा आपली ज्यालारूप झगझगीत वरची वर खालीं याप्रमाणें परजतो. २३.यदी॑ घृ॒तेभि॒राहु॑तो॒ वाशी॑म॒ग्निर्भर॑त॒ उच्चाव॑ च ।
असु॑र इव नि॒र्णिज॑म् ॥ २३ ॥

यदि । घृतेभिः । आऽहुतः । वाशीम् । अग्निः । भरते । उत् । च । अव । च ।
असुरःऽइव । निःऽनिजम् ॥ २३ ॥

मनुराजानें वेदीवर स्थापन केलेला अग्नि आपल्या सुगन्धपूर्ण मुखाने देवांना हविर्भाग पोहोंचवील, तेव्हांच तो उत्तम अध्वरसंपादक, तो अमर अग्निदेव, अभिलषणीय वरदान भक्तांना देईल. २४.यो ह॒व्यान्यैर॑यता॒ मनु॑र्हितो दे॒व आ॒सा सु॑ग॒न्धिना॑ ।
विवा॑सते॒ वार्या॑णि स्वध्व॒रो होता॑ दे॒वो अम॑र्त्यः ॥ २४ ॥

यः । हव्यानि । ऐरयत । मनुःऽहितः । देवः । आसा । सुऽगन्धिना ।
विवासते । वार्याणि । सुऽअध्वरः । होता । देवः । अमर्त्यः ॥ २४ ॥

हे आग्नेदेवा, जर तूं मर्त्यमानव असतास, आणि हे प्रसन्नदीप्ति देवा, हे सामर्थ्यप्रभवा, हे आहुतिप्रिया, मीं जर अमर झालो असतो; २५.यद॑ग्ने॒ मर्त्य॒स्त्वं स्याम॒हं मि॑त्रमहो॒ अम॑र्त्यः ।
सह॑सः सूनवाहुत ॥ २५ ॥

यत् । अग्ने । मर्त्यः । त्वम् । स्याम् । अहम् । मित्रऽमहः । अमर्त्यः ।
सहसः । सूनो इति । आऽहुत ॥ २५ ॥

तर हे दिव्यनिधाना, मी तुटाला दुष्टांच्या शिव्याशापांच्या तडाक्यांत सापडूं दिले नसते. हे सज्जनवंद्या, तुला पापकर्माकडेही जाऊं दिलें नसतें. मी माझा भक्त कधी अविवेकी होऊं दिला नसता, संकटांत अडकूं दिला नसता, आणि हे अग्निदेवा, पापबुद्धीने घेरूं दिला नसता. २६.न त्वा॑ रासीया॒भिश॑स्तये वसो॒ न पा॑प॒त्वाय॑ सन्त्य ।
न मे॑ स्तो॒ताम॑ती॒वा न दुर्हि॑तः॒ स्याद॑ग्ने॒ न पा॒पया॑ ॥ २६ ॥

न । त्वा । रासीय । अभिऽशस्तये । वसो इति । न । पापऽत्वाय । सन्त्य ।
न । मे । स्तोता । अमतिऽवा । न । दुःऽहितः । स्यात् । अग्ने । न । पापया ॥ २६ ॥

बापाचा लाडका मुलगा जसा आपल्या घरी जातो तसा आमचा हा हविर्भाग दिव्य बिबुधांकडे (घरीं) जावो २७.पि॒तुर्न पु॒त्रः सुभृ॑तो दुरो॒ण आ दे॒वाँ ए॑तु॒ प्र णो॑ ह॒विः ॥ २७ ॥

पितुः । न । पुत्रः । सुऽभृतः । दुरोणे । आ । देवान् । एतु । प्र । नः । हविः ॥ २७ ॥

हे अग्ने, माझ्या अगदीं निकट असणाऱ्या तुज देवाच्या संरक्षकशक्तींनी, हे दिव्यनिधाना, मी मर्त्यमानव आपले मनोरथ निरंतर प्राप्त करून घेईन असें कर. २८.तवा॒हम॑ग्न ऊ॒तिभि॒र्नेदि॑ष्ठाभिः सचेय॒ जोष॒मा व॑सो ।
सदा॑ दे॒वस्य॒ मर्त्यः॑ ॥ २८ ॥

तव । अहम् । अग्ने । ऊतिऽभिः । नेदिष्ठाभिः । सचेय । जोषम् । आ । वसो इति ।
सदा । देवस्य । मर्त्यः ॥ २८ ॥

तुझ्या कर्तृत्वाने, तुझ्या वरदानांनी, हे अग्ने, तुझ्या गुणवर्णनांनी मला यश मिळेल असें कर. तुलाच धोरणी धुरीण म्हणतात; तर हे दिव्यनिधाना, मला वर देण्यासाठी तूं प्रमुदित हो. २९.तव॒ क्रत्वा॑ सनेयं॒ तव॑ रा॒तिभि॒रग्ने॒ तव॒ प्रश॑स्तिभिः ।
त्वामिदा॑हुः॒ प्रम॑तिं वसो॒ ममाग्ने॒ हर्ष॑स्व॒ दात॑वे ॥ २९ ॥

तव । क्रत्वा । सनेयम् । तव । रातिऽभिः । अग्ने । तव । प्रशस्तिऽभिः ।
त्वाम् । इत् । आहुः । प्रऽमतिम् । वसो इति । मम । अग्ने । हर्षस्व । दातवे ॥ २९ ॥

हे अग्निदेवा, तूं ज्याचे मित्रत्व पतकरतोस, तो तुझ्या वीरप्रचुर, आणि सकल सामर्थ्यांनी परिपूर्ण अशा संरक्षकशक्तींनी सर्व संकटांतून पार पडतो. ३०.प्र सो अ॑ग्ने॒ तवो॒तिभिः॑ सु॒वीरा॑भिस्तिरते॒ वाज॑भर्मभिः ।
यस्य॒ त्वं स॒ख्यमा॒वरः॑ ॥ ३० ॥

प्र । सः । अग्ने । तव । ऊतिऽभिः । सुऽवीराभिः । तिरते । वाजभर्मऽभिः ।
यस्य । त्वम् । सख्यम् । आऽवरः ॥

हा तुझा मधुरशब्द वदविणारा, यथाकाळी केलेला, नीलवान् आणि देदीप्यमान सोमरस, हे सोमरससेवी देवा, तुला अर्पण केला आहे; महनीय ज्या उषादेवी त्यांना तूं प्रिय आहेस कारण रात्र पडली असतां सर्व वस्तू तूंच प्रकाशित करतोस. ३१.तव॑ द्र॒प्सो नील॑वान्वा॒श ऋ॒त्विय॒ इन्धा॑नः सिष्ण॒वा द॑दे ।
त्वं म॑ही॒नामु॒षसा॑मसि प्रि॒यः क्ष॒पो वस्तु॑षु राजसि ॥ ३१ ॥

तव । द्रप्सः । नीलऽवान् । वाशः । ऋत्वियः । इन्धानः । सिष्णो इति । आ । ददे ।
त्वम् । महीनाम् । उषसाम् । असि । प्रियः । क्षपः । वस्तुषु । राजसि ॥ ३१ ॥

ज्याचे तेजकिरण असंख्य, जो उत्कृष्ट भक्तरक्षक, जो विश्वाधीश, आणि त्रसदस्युचा कैवारी, त्या अग्नीला आम्ही सोभरीकुलोत्पन्न भक्त शरण आहोंत. ३२.तमाग॑न्म॒ सोभ॑रयः स॒हस्र॑मुष्कं स्वभि॒ष्टिमव॑से ।
स॒म्राजं॒ त्रास॑दस्यवम् ॥ ३२ ॥

तम् । आ । अगन्म । सोभरयः । सहस्रऽमुष्कम् । सुऽअभिष्टिम् । अवसे ।
सम्ऽराजम् । त्रासदस्यवम् ॥ ३२ ॥

वृक्षाच्या आश्रयाने जशा शाखा तसे आहवनीयादि दुसरे अग्नि, हे अग्निरूप देवा, तुझ्या आश्रयाने राहतात, म्हणून तुझ्या वीरोचित सामर्थ्याचे गौरव करीत असतां इतर स्तोत्यांप्रमाणे मीही लोकांची तेजोवैभवें त्यांना प्राप्त करून देईन. ३३.यस्य॑ ते अग्ने अ॒न्ये अ॒ग्नय॑ उप॒क्षितो॑ व॒या इ॑व ।
विपो॒ न द्यु॒म्ना नि यु॑वे॒ जना॑नां॒ तव॑ क्ष॒त्राणि॑ व॒र्धय॑न् ॥ ३३ ॥

यस्य । ते । अग्ने । अन्ये । अग्नयः । उपऽक्षितः । वयाःऽइव ।
विपः । न । द्युम्ना । नि । युवे । जनानाम् । तव । क्षत्राणि । वर्धयन् ॥ ३३ ॥

अदितीच्या प्रेमळ पुत्रांनों, द्वेषरहित देवांनो, यच्चावत श्रीमान् लोकांना एकीकडे सारून, हे अत्युदार देवांनो, दीन मानवाला तुम्ही पार नेता. ३४.यमा॑दित्यासो अद्रुहः पा॒रं नय॑थ॒ मर्त्य॑म् ।
म॒घोनां॒ विश्वे॑षां सुदानवः ॥ ३४ ॥

यम् । आदित्यासः । अद्रुहः । पारम् । नयथ । मर्त्यम् ।
मघोनाम् । विश्वेषाम् । सुऽदानवः ॥ ३४ ॥

तसेच, हे जगताच्या राजांनों, हे चराचरावर प्रभुत्व चालविणाऱ्या देवांनों, सामान्यजनांच्या समूहामध्ये कोठे तरी पडलेल्या भक्ताला देखील जर तुम्ही पार नेतां; तर हे वरुणा, हे मित्रा, हे अर्यमन्, आम्ही तर तुमचे आहों तर आम्ही सद्धर्माचेच प्रचारक होऊं असे करा. ३५.यू॒यं रा॑जानः॒ कं चि॑च्चर्षणीसहः॒ क्षय॑न्तं॒ मानु॑षाँ॒ अनु॑ ।
व॒यं ते वो॒ वरु॑ण॒ मित्रार्य॑म॒न्स्यामेदृ॒तस्य॑ र॒थ्यः॑ ॥ ३५ ॥

यूयम् । राजानः । कम् । चित् । चर्षणिऽसहः । क्षयन्तम् । मानुषान् । अनु ।
वयम् । ते । वः । वरुण । मित्र । अर्यमन् । स्याम । इत् । ऋतस्य । रथ्यः ॥ ३५ ॥

पुरुकुत्साचा पत्र जो त्रसदस्यु त्याने मला पन्नास सुंदर तरुणी अर्पण केल्या; तो तसाच अत्यंत थोर आणि सज्जनप्रतिपालक राजा आहे. ३६.अदा॑न्मे पौरुकु॒त्स्यः प॑ङ्चा॒शतं॑ त्र॒सद॑स्युर्व॒धूना॑म् ।
मंहि॑ष्ठो अ॒र्यः सत्प॑तिः ॥ ३६ ॥

अदात् । मे । पौरुऽकुत्स्यः । पञ्चाशतम् । त्रसदस्युः । वधूनाम् ।
मंहिष्ठः । अर्यः । सत्ऽपतिः ॥ ३६ ॥

मी गमनोत्सुक होऊन आणि वस्त्रप्रावरण घेऊन निघालो असतां सुवास्त्वा नदीच्या पायउतारावर आम्हाला दोनशे दहा गाईंच्या खिल्लारांचा म्होरक्या म्हणून एक काळा बैल दिला. असा तो राजा उदारांमध्ये अग्रेसर आहे. ३७.उ॒त मे॑ प्र॒यियो॑र्व॒यियोः॑ सु॒वास्त्वा॒ अधि॒ तुग्व॑नि ।
ति॒सृ॒णां स॑प्तती॒नां श्या॒वः प्र॑णे॒ता भु॑व॒द्वसु॒र्दिया॑नां॒ पतिः॑ ॥ ३७ ॥

उत । मे । प्रयियोः । वयियोः । सुऽवास्त्वाः । अधि । तुग्वनि ।
तिसॄणाम् । सप्ततीनाम् । श्यावः । प्रऽनेता । भुवत् । वसुः । दियानाम् । पतिः ॥ ३७ ॥

मी गमनोत्सुक होऊन आणि वस्त्रप्रावरण घेऊन निघालो असतां सुवास्त्वा नदीच्या पायउतारावर आम्हाला दोनशे दहा गाईंच्या खिल्लारांचा म्होरक्या म्हणून एक काळा बैल दिला. असा तो राजा उदारांमध्ये अग्रेसर आहे. ३७.ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त २० (मरुतसूक्त )

ऋषी - सोभरि काण्व देवता - मरुत् छंद - १४ सतो विराट् ; अवशिष्ट-प्रगाथआ ग॑न्ता॒ मा रि॑षण्यत॒ प्रस्था॑वानो॒ माप॑ स्थाता समन्यवः ।
स्थि॒रा चि॑न्नमयिष्णवः ॥ १ ॥

आ । गन्त । मा । रिषण्यत । प्रऽस्थावानः । मा । अप । स्थात । सऽमन्यवः ।
स्थिरा । चित् । नमयिष्णवः ॥ १ ॥

या, अनमान करूं नका. तुम्ही निघालां आहां, आतां मागें फिरू नका. हे मरुतांनों, तुम्हां सर्वांचा आवेश एकसारखा असतो. वृक्ष, पर्वत हे जमीनीमध्ये पक्के गढलेले असले तरी, हे देवांनो, तुम्ही त्यांना खालीं वाकवितांच. १.वी॒ळु॒प॒विभि॑र्मरुत ऋभुक्षण॒ आ रु॑द्रासः सुदी॒तिभिः॑ ।
इ॒षा नो॑ अ॒द्या ग॑ता पुरुस्पृहो य॒ज्ङमा सो॑भरी॒यवः॑ ॥ २ ॥

वीळुपविऽभिः । मरुतः । ऋभुक्षणः । आ । रुद्रासः । सुदीतिऽभिः ।
इषा । नः । अद्य । आ । गत । पुरुऽस्पृहः । यज्ञम् । आ । सोभरीऽयवः ॥ २ ॥

श्रेष्ठ मरुतांनों, हे रुद्रपुत्रांनो, ज्याच्या चाकांच्या धांवा बळकट आणि अतिशय झगझगीत आहेत अशा रथांत बसून. सर्वांना हवे हवेसे वाटणाऱ्या मरुतांनो, हे सोभरीवर कृपा करणाऱ्या देवांनो, तुम्ही आज उत्साहपूरित होऊन आमच्या यज्ञाकडे आगमन करा. २.वि॒द्मा हि रु॒द्रिया॑णां॒ शुष्म॑मु॒ग्रं म॒रुतां॒ शिमी॑वताम् ।
विष्णो॑रे॒षस्य॑ मी॒ळ्हुषा॑म् ॥ ३ ॥

विद्म । हि । रुद्रियाणाम् । शुष्मम् । उग्रम् । मरुताम् । शिमीऽवताम् ।
विष्णोः । एषस्य । मीळ्हुषाम् ॥ ३ ॥

तुम्हां रुद्रपुत्रांचा, तुम्हां मरुतांचा, तुम्हा सर्वव्यापी विष्णूच्या कर्तृत्वशाली वीरांचा, तुम्हां जलवर्षक विभूतींचा उग्र आणि उफाड्याचा जोर आम्हांस माहीत आहे. ३.वि द्वी॒पानि॒ पाप॑त॒न्तिष्ठ॑द्दु॒च्छुनो॒भे यु॑जन्त॒ रोद॑सी । प्र धन्वा॑न्यैरत शुभ्रखादयो॒ यदेज॑थ स्वभानवः ॥ ४ ॥

वि । द्वीपानि । पापतन् । तिष्ठत् । दुच्छुना । उभे इति । युजन्त । रोदसी इति ।
प्र । धन्वानि । ऐरत । शुभ्रऽखादयः । यत् । एजथ । स्वऽभानवः ॥ ४ ॥

नवी द्वीपें एकदम उसळून बाहेर आली; आकाश आणि पृथ्वी हे दोन्ही एनमेकांशी भिडून गेले; पाण्याचे लोंढे जिकडे तिकडे धांवू लागले; हे शुभ्रायुधधारी स्वयंप्रकाश देवांनों, असा प्रकार तुम्ही आपली हालचाल चालू केल्याबरोबर घडून आला. ४.अच्यु॑ता चिद्वो॒ अज्म॒न्ना नान॑दति॒ पर्व॑तासो॒ वन॒स्पतिः॑ ।
भूमि॒र्यामे॑षु रेजते ॥ ५ ॥

अच्युता । चित् । वः । अज्मन् । आ । नानदति । पर्वतासः । वनस्पतिः ।
भूमिः । यामेषु । रेजते ॥ ५ ॥

तुम्ही मार्ग क्रमूं लागला कीं तुमच्या वाटेवर कोणतीही अढळ वस्तु असो ती दणदणून जाते. पर्वत, मोठमोठे वृक्ष, आणि जमीन देखील हादरू लागते. ५.अमा॑य वो मरुतो॒ यात॑वे॒ द्यौर्जिही॑त॒ उत्त॑रा बृ॒हत् ।
यत्रा॒ नरो॒ देदि॑शते त॒नूष्वा त्वक्षां॑सि बा॒ह्वो॑जसः ॥ ६ ॥

अमाय । वः । मरुतः । यातवे । द्यौः । जिहीते । उत्ऽतरा । बृहत् ।
यत्र । नरः । देदिशते । तनूषु । आ । त्वक्षांसि । बहुऽओजसः ॥ ६ ॥

तुम्हांला वाट देण्यासाठीं, तुमच्या धुमश्चक्री सरशी, हें एवढे मोठे आकाश पण वरवर हटतच जाते; मग तेथून प्रबल भुजदंडाचे मरुत्‌वीर आपल्या आंगातील झगझगीत तेज जगाच्या निदर्शनास आणतात. ६.स्व॒धामनु॒ श्रियं॒ नरो॒ महि॑ त्वे॒षा अम॑वन्तो॒ वृष॑प्सवः ।
वह॑न्ते॒ अह्रु॑तप्सवः ॥ ७ ॥

स्वधाम् । अनु । श्रियम् । नरः । महि । त्वेषाः । अमऽवन्तः । वृषऽप्सवः ।
वहन्ते । अह्रुतऽप्सवः ॥ ७ ॥

वीराग्रणी, भीषणपराक्रमी, मेघाप्रमाणे नानारूपधारी परंतु सरळ स्वभवावे मरुत्, आपल्या स्वभावानुरूप कांहीं अपूर्वच शोभा धारण करतात. ७.गोभि॑र्वा॒णो अ॑ज्यते॒ सोभ॑रीणां॒ रथे॒ कोशे॑ हिर॒ण्यये॑ ।
गोब॑न्धवः सुजा॒तास॑ इ॒षे भु॒जे म॒हान्तो॑ नः॒ स्पर॑से॒ नु ॥ ८ ॥

गोभिः । वाणः । अज्यते । सोभरीणाम् । रथे । कोशे । हिरण्यये ।
गोऽबन्धवः । सुऽजातासः । इषे । भुजे । महान्तः । नः । स्परसे । नु ॥ ८ ॥

सोभरींच्या सुवर्णरथांतील बैठकीवरील आसन त्यांच्या कान्तींनी स्पष्ट नजरेस पडते तर हे प्रकाश धेनुप्रिय मरुतांनो, हे अभिजात विभूतींनो, परमथोर असे तुम्ही आम्ही ईर्षा, उपभोग, आणि स्फूर्ति यांना सत्वर पात्र होऊं असें करा. ८.प्रति॑ वो वृषदञ्जयो॒ वृष्णे॒ शर्धा॑य॒ मारु॑ताय भरध्वम् ।
ह॒व्या वृष॑प्रयाव्णे ॥ ९ ॥

प्रति । वः । वृषत्ऽअञ्जयः । वृष्णे । शर्धाय । मारुताय । भरध्वम् ।
हव्या । वृषऽप्रयाव्ने ॥ ९ ॥

सोमरस पात्रांत ओतणाऱ्या अध्वर्यूंनो, वीर्यशाली अणि मनोरथांची वृष्टि करणाऱ्या मरुत्‌समूहाला तुम्ही हविर्भाग अर्पण करा. ९.वृ॒ष॒ण॒श्वेन॑ मरुतो॒ वृष॑प्सुना॒ रथे॑न॒ वृष॑नाभिना ।
आ श्ये॒नासो॒ न प॒क्षिणो॒ वृथा॑ नरो ह॒व्या नो॑ वी॒तये॑ गत ॥ १० ॥

वृषणश्वेन । मरुतः । वृषऽप्सुना । रथेन । वृषऽनाभिना ।
आ । श्येनासः । न । पक्षिणः । वृथा । नरः । हव्या । नः । वीतये । गत ॥ १० ॥

हे मरुतांनो, ज्याला जोडलेले अश्व फार वीर्यवान् असतात, जलवर्षक मेघ हें ज्याचे स्वरूप असतें, ज्याच्या चाकांचा तुंबा हाही उदकवृष्टि करणारा असतो, अशा रथांत आरोहण करून आमचे हविर्भाग ग्रहण करण्याकरितां, हे वीराग्रणींनो, श्येनपक्षाप्रमाणे सहज भरारी मारीत या. १०.स॒मा॒नम॒ञ्ज्ये॑षां॒ वि भ्रा॑जन्ते रु॒क्मासो॒ अधि॑ बा॒हुषु॑ ।
दवि॑द्युतत्यृ॒ष्टयः॑ ॥ ११ ॥

समानम् । अञ्जि । एषाम् । वि । भ्राजन्ते । रुक्मासः । अधि । बाहुषु ।
दविद्युतति । ऋष्टयः ॥ ११ ॥

ह्या मरुतांचा अलंकार अगदीं एकसारखा असतो, त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या फुलांचे हार अगदी एकजात चकाकणारे असतात, आणि भुजदंडावर पेलून धरलेले त्यांचे भाले डोळे अगदीं दिपवून सोडतात. ११.त उ॒ग्रासो॒ वृष॑ण उ॒ग्रबा॑हवो॒ नकि॑ष्ट॒नूषु॑ येतिरे ।
स्थि॒रा धन्वा॒न्यायु॑धा॒ रथे॑षु॒ वोऽनी॑के॒ष्वधि॒ श्रियः॑ ॥ १२ ॥

ते । उग्रासः । वृषणः । उग्रऽबाहवः । नकिः । तनूषु । येतिरे ।
स्थिरा । धन्वानि । आयुधा । रथेषु । वः । अनीकेषु । अधि । श्रियः ॥ १२ ॥

ते उग्र, वीर्यशाली, आणि भरदार बाहूंचे मरुत् आपल्या आंगावर कोणतेही चिलखत घालण्याचा खटाटोप करीत नाहीत. मरुतांनों, तुमच्या रथांत ठेवलेली भक्कम धनुष्यें हीच तमची आयुधे असतात. विजयश्री ही तर तुमच्या सैन्याच्या अगदी आघाडीलाच चालते १२.येषा॒मर्णो॒ न स॒प्रथो॒ नाम॑ त्वे॒षं शश्व॑ता॒मेक॒मिद्भु॒जे ।
वयो॒ न पित्र्यं॒ सहः॑ ॥ १३ ॥

येषाम् । अर्णः । न । सऽप्रथः । नाम । त्वेषम् । शश्वताम् । एकम् । इत् । भुजे ।
वयः । न । पित्र्यम् । सहः ॥ १३ ॥

जे समुद्राप्रमाणे सर्वविश्रुत आहे, तें त्यांचें झणझणीत नांव, वाडवडिलांकडून प्राप्त होणाऱ्या तारुण्याच्या जोमाप्रमाणे एकच आहे, परंतु तें अगणित लोकांच्या उपयोगाला येतें. १३.तान्व॑न्दस्व म॒रुत॒स्ताँ उप॑ स्तुहि॒ तेषां॒ हि धुनी॑नाम् ।
अ॒राणां॒ न च॑र॒मस्तदे॑षां दा॒ना म॒ह्ना तदे॑षाम् ॥ १४ ॥

तान् । वन्दस्व । मरुतः । तान् । उप । स्तुहि । तेषाम् । हि । धुनीनाम् ।
अराणाम् । न । चरमः । तत् । एषाम् । दाना । मह्ना । तत् । एषाम् ॥ १४ ॥

म्हणून त्या मरुतांना प्रणाम कर, त्यांची स्तुति कर; दणदणत जाणार्‍या चाकांच्या अरांमाणे मागचा पुढचा हा प्रकार नसतो त्याप्रमाणें त्यांच्या देणग्याही महत्वाच्या दृष्टीने कमी ज्यास्त नसतात. १४.सु॒भगः॒ स व॑ ऊ॒तिष्वास॒ पूर्वा॑सु मरुतो॒ व्यु॑ष्टिषु ।
यो वा॑ नू॒नमु॒तास॑ति ॥ १५ ॥

सुऽभगः । सः । वः । ऊतिषु । आस । पूर्वासु । मरुतः । विऽउष्टिषु ।
यः । वा । नूनम् । उत । असति ॥ १५ ॥

तुमच्या रक्षणाच्या छत्राखाली, हे मरुतांनों, जो कोणी प्राचीन काळी होता; किंवा आताही जो कोणी असेल तो खरोखरीच भाग्यवान् होय. १५.यस्य॑ वा यू॒यं प्रति॑ वा॒जिनो॑ नर॒ आ ह॒व्या वी॒तये॑ ग॒थ ।
अ॒भि ष द्यु॒म्नैरु॒त वाज॑सातिभिः सु॒म्ना वो॑ धूतयो नशत् ॥ १६ ॥

यस्य । वा । यूयम् । प्रति । वाजिनः । नरः । आ । हव्या । वीतये । गथ ।
अभि । सः । द्युम्नैः । उत । वाजसातिऽभिः । सुम्ना । वः । धूतयः । नशत् ॥ १६ ॥

किंवा ज्या सत्वशाली भक्ताचे हविर्भाग ग्रहणकरण्याकरितां, हे शूरानों, तुम्ही येतां; तो भक्त, शत्रुला धुतकारून टाकणार्‍या हे मरुतांनो, आपल्या तेजोबलांनीं अणि सत्वप्रचुर उद्योगांनी तुमच्या शांतिसौख्याला प्राप्त होतो. १६.यथा॑ रु॒द्रस्य॑ सू॒नवो॑ दि॒वो वश॒न्त्यसु॑रस्य वे॒धसः॑ ।
युवा॑न॒स्तथेद॑सत् ॥ १७ ॥

यथा । रुद्रस्य । सूनवः । दिवः । वशन्ति । असुरस्य । वेधसः ।
युवानः । तथा । इत् । असत् ॥ १७ ॥

रुद्राचे पुत्र , द्युलोकचे रहिवासी आणि विश्वात्मा, जगत् निर्माता ईश्वर त्याचे अनुचर जे मरुत् ते जशी इच्छा करतात तसेंच घडून येतें. १७.ये चार्ह॑न्ति म॒रुतः॑ सु॒दान॑वः॒ स्मन्मी॒ळ्हुष॒श्चर॑न्ति॒ ये ।
अत॑श्चि॒दा न॒ उप॒ वस्य॑सा हृ॒दा युवा॑न॒ आ व॑वृध्वम् ॥ १८ ॥

ये । च । अर्हन्ति । मरुतः । सुऽदानवः । स्मत् । मीळ्हुषः । चरन्ति । ये ।
अतः । चित् । आ । नः । उप । वस्यसा । हृदा । युवानः । आ । ववृध्वम् ॥ १८ ॥

जे दानशील भक्त तुम्हां मरुतांचा सन्मान करतात, जे तुम्हां मनोरथवर्धक विभूतींची यथायोग्य सेवा करतात, त्यांच्याकरितां तरी, हे तारुण्याढ्य मरुतांनों, तुम्ही आपल्या वात्सल्यपूर्ण हृदयानें आमच्या जवळ येऊन आमची अभिवृद्धि करा. १८.यून॑ ऊ॒ षु नवि॑ष्ठया॒ वृष्णः॑ पाव॒काँ अ॒भि सो॑भरे गि॒रा ।
गाय॒ गा इ॑व॒ चर्कृ॑षत् ॥ १९ ॥

यूनः । ऊं इति । सु । नविष्ठया । वृष्णः । पावकान् । अभि । सोभरे । गिरा ।
गाय । गाःऽइव । चर्कृषत् ॥ १९ ॥

यौवनाढ्य, वीर्यशाली आणि पतितपावन अशा मरुतांप्रीत्यर्थ, हे सोभ्रिभक्ता, तूं अभिनव काव्यवाणीनें सुंदर गायन कर. ज्याप्रमाणें शेतकरी शेत नांगरीत असताना रंगांत येऊन गातो त्याप्रमाणें गायन कर. १९.सा॒हा ये सन्ति॑ मुष्टि॒हेव॒ हव्यो॒ विश्वा॑सु पृ॒त्सु होतृ॑षु ।
वृष्ण॑श्च॒न्द्रान्न सु॒श्रव॑स्तमान्गि॒रा वन्द॑स्व म॒रुतो॒ अह॑ ॥ २० ॥

सहाः । ये । सन्ति । मुष्टिहाऽइव । हव्यः । विश्वासु । पृत्ऽसु । होतृषु ।
वृष्णः । चन्द्रान् । न । सुश्रवःऽतमान् । गिरा । वन्दस्व । मरुतः । अह ॥ २० ॥

आव्हान करण्याला योग्य अशा वज्रमुष्टी मल्लाप्रमाणें जे शत्रूला रगडून टाकतात, सैन्यांत असो किंवा यज्ञांत असो प्रत्येक ठिकाणी जे आपले वर्चस्वच राखतात अशा त्या वार्यशाली, आल्हादप्रद, आणि सुकीर्तीने अत्यंत मण्डित अशा मरुतांचें तू आज स्तुतिपूर्वक वन्दन कर. २०गाव॑श्चिद्घा समन्यवः सजा॒त्ये॑न मरुतः॒ सब॑न्धवः ।
रि॒ह॒ते क॒कुभो॑ मि॒थः ॥ २१ ॥

गावः । चित् । घ । सऽमन्यवः । सऽजात्येन । मरुतः । सऽबन्धवः ।
रिहते । ककुभः । मिथः ॥ २१ ॥

एकसारखा आवेश प्रकट करणाऱ्या मरुतांनो, तुमच्या प्रकाशरूप धेनू एकाच जातीच्या आहेत, म्हणून बंधुभावानें त्या एकमेकींजवळ येऊन दिङ्‍मुखांचे चुबन घेतात २१.मर्त॑श्चिद्वो नृतवो रुक्मवक्षस॒ उप॑ भ्रातृ॒त्वमाय॑ति ।
अधि॑ नो गात मरुतः॒ सदा॒ हि व॑ आपि॒त्वमस्ति॒ निध्रु॑वि ॥ २२ ॥

मर्तः । चित् । वः । नृतवः । रुक्मऽवक्षसः । उप । भ्रातृऽत्वम् । आ । अयति ।
अधि । नः । गात । मरुतः । सदा । हि । वः । आपिऽत्वम् । अस्ति । निऽध्रुवि ॥ २२ ॥

हे रणभैरवांनो, नक्षस्थलावर देदीप्यमान पदक धारण करणाऱ्या देवांनों, कोणीही मर्त्य मानव भक्त जर भ्रातृभावानें तुमच्या जवळ येऊ शकतो, तर हे मरुतांनों, आमच्याकडेही आगमन करा; आमच्या निश्चयपूर्ण स्तोत्रानें तुमचा आमचा आप्तपणा कायमचाच झाला आहे. २२.मरु॑तो॒ मारु॑तस्य न॒ आ भे॑ष॒जस्य॑ वहता सुदानवः ।
यू॒यं स॑खायः सप्तयः ॥ २३ ॥

मरुतः । मारुतस्य । नः । आ । भेषजस्य । वहत । सुऽदानवः ।
यूयम् । सखायः । सप्तयः ॥ २३ ॥

हे मरुतांनो, वायूपासून प्राप्त होणारें जजे औषध आहे, तें औषध हे औदार्थशाली देवांनो, हे भक्तसख्यांनो, हें त्वरितगतिविभूतींनो, तें आमच्या करितां घेऊन या. २३.याभिः॒ सिन्धु॒मव॑थ॒ याभि॒स्तूर्व॑थ॒ याभि॑र्दश॒स्यथा॒ क्रिवि॑म् ।
मयो॑ नो भूतो॒तिभि॑र्मयोभुवः शि॒वाभि॑रसचद्विषः ॥ २४ ॥

याभिः । सिन्धुम् । अवथ । याभिः । तूर्वथ । याभिः । दशस्यथ । क्रिविम् ।
मयः । नः । भूत । ऊतिऽभिः । मयःऽभुवः । शिवाभिः । असचऽद्विषः ॥ २४ ॥

ज्यांच्या योगाने तुम्ही सिंधूचें रक्षण करितां, ज्यांच्या योगाने तुम्ही शत्रूंचा नाश करतां, ज्यांच्या योगानें तुम्ही क्रिविला वरदान देता, त्या मंगलमय संरक्षक शक्तींनी, हे कल्याणकारी देवांनो, सेवाविमुखाचा आणि अभक्ताचा तिटकारा करणाऱ्या देवांनो, तुम्ही आम्हांस कत्याणकारक व्हा. २४.यत्सिन्धौ॒ यदसि॑क्न्यां॒ यत्स॑मु॒द्रेषु॑ मरुतः सुबर्हिषः ।
यत्पर्व॑तेषु भेष॒जम् ॥ २५ ॥

यत् । सिन्धौ । यत् । असिक्न्याम् । यत् । समुद्रेषु । मरुतः । सुऽबर्हिषः ।
यत् । पर्वतेषु । भेषजम् ॥ २५ ॥

-जें सिन्धु नदीत, जें असिक्निं नदींत, जे समुद्रांत, किंवा जें औषध, हे सुयज्ञ मरुतांनो, पर्वतांत असेल, ते आम्हांकरितां घेऊन या. २५,विश्वं॒ पश्य॑न्तो बिभृथा त॒नूष्वा तेना॑ नो॒ अधि॑ वोचत ।
क्ष॒मा रपो॑ मरुत॒ आतु॑रस्य न॒ इष्क॑र्ता॒ विह्रु॑तं॒ पुनः॑ ॥ २६ ॥

विश्वम् । पश्यन्तः । बिभृथ । तनूषु । आ । तेन । नः । अधि । वोचत ।
क्षमा । रपः । मरुतः । आतुरस्य । नः । इष्कर्त । विऽह्रुतम् । पुनरिति ॥ २६ ॥

तुमच्या दृष्टीच्या टप्प्यांत सर्व विश्व येते म्हणून तें औषध आमच्या शरीरासाठी घेऊन या; आणि आम्हांस त्याच्याविषयी सर्व प्रकारचे ज्ञान करून द्या. आमच्या पातकांची क्षमा करा, आणि हे मरुतांनो, रोगग्रस्त जे आम्ही, त्या आमचे विकल शरीर पुनः पूर्ववत निरोगी करा. २६.ॐ तत् सत्GO TOP