|
ऋग्वेद - मण्डल ८ - सूक्त ४१ ते ४८ ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ४१ ( ) ऋषी - देवता - छंद - अ॒स्मा ऊ॒ षु प्रभू॑तये॒ वरु॑णाय म॒रुद्भ्योऽर्चा॑ वि॒दुष्ट॑रेभ्यः । अस्मै । ऊं इति । सु । प्रऽभूतये । वरुणाय । मरुत्ऽभ्यः । अर्च । विदुःऽतरेभ्यः । त्या अपारैश्वर्यमंडित वरुणप्रीत्यर्थ, आणि महाज्ञानी मरुतांप्रीत्यर्थ ऋक्स्तोत्र मोठ्याने म्हण. धेनू, पशू ह्यांचें सहज रक्षण करावे त्याप्रमाणे जो वरुण मनुष्यांच्या सद्बुद्धींचें सहज रक्षण करतो त्याचें स्तवन कर. १. तमू॒ षु स॑म॒ना गि॒रा पि॑तृ॒णां च॒ मन्म॑भिः । तम् । ऊं इति । सु । समना । गिरा । पितॄणाम् । च । मन्मऽभिः । मनःपूर्वक केलेल्या स्तुतीनें, वाडवडिलांच्या मननीय स्तवनांनी, नाभाकाच्या संकीर्तनांनी मी त्या वरुणाचे सर्वभावानें स्तवन करतो. जो वरुण महानद्यांच्या उद्गमस्थानाजवळ असतो, त्याच्या ज्या उदकरूप सात बहिणी त्यांच्या उदकामध्ये तो वास करतो. २. स क्षपः॒ परि॑ षस्वजे॒ न्यु॒॑१स्रो मा॒यया॑ दधे॒ स विश्वं॒ परि॑ दर्श॒तः । सः । क्षपः । परि । सस्वजे । नि । उस्रः । मायया । दधे । सः । विश्वम् । परि । दर्शतः । त्यानें रात्रींना कवटाळले, आणि आपल्या अतर्क्य मायेने प्रभातकालाला त्याच्या योग्यस्थानीं ठेऊन दिलें; त्या दर्शनीय वरुणाने विश्वाला देखील आपल्या शक्तीने चोहोंकडून आवरून धरले, आणि त्याच्या आवडत्या ज्या तिन्ही उषा त्या त्याच्याच आज्ञेस अनुसरून अभिवृद्धीला पावल्या. ३. यः क॒कुभो॑ निधार॒यः पृ॑थि॒व्यामधि॑ दर्श॒तः । यः । ककुभः । निऽधारयः । पृथिव्याम् । अधि । दर्शतः । ज्याने पृथ्वीवर दिशा उत्पन्न केल्या तो दर्शनीय वरुण पुरातन स्थान जें आकाश त्याचाही उत्पन्नकर्ता होय. सर्वांना वंदनीय असें जें स्थान, तें त्या वरुणाचेंच. गोपालकाप्रमाणें सर्वांचा प्रेरक तोच आहे. ४. यो ध॒र्ता भुव॑नानां॒ य उ॒स्राणा॑मपी॒च्या॒॑३ वेद॒ नामा॑नि॒ गुह्या॑ । यः । धर्ता । भुवनानाम् । यः । उस्राणाम् । अपीच्या । वेद । नामानि । गुह्या । जो भुवनांचा धारणकर्ता आहे; जो तेजस्वी उषांचाही धारक आहे, त्यांची अज्ञात आणि गूढ नावेंही जो जाणतो; आणि आकाशांतील तेजःपुंज गोल निरनिराळ्या रूपांचा परिपोष करतात त्याप्रमाणें तो काव्यस्फूर्ति देणारा वरुण प्रतिभेचाही परिपोष करतो. ५. यस्मि॒न्विश्वा॑नि॒ काव्या॑ च॒क्रे नाभि॑रिव श्रि॒ता । यस्मिन् । विश्वानि । काव्या । चक्रे । नाभिःऽइव । श्रिता । चाकांचे अरे जसे तुंब्यांत राहतात त्याप्रमाणें कवींची सर्व काव्यस्फूर्ती ज्याच्यामध्यें वास करते, त्या त्रित वरुणा केला उत्कंठेने भजा; धेनू ज्याप्रमाणें गोठ्यांत एकत्र रहाण्याकरितां जातात, किंवा रथाच्या धुरेला ज्याप्रमाणें अश्व जोडतात त्याप्रमाणें तुम्ही भक्ति करा. ६. य आ॒स्वत्क॑ आ॒शये॒ विश्वा॑ जा॒तान्ये॑षाम् । यः । आसु । अत्कः । आऽशये । विश्वा । जातानि । एषाम् । जो तेजोरूप वरुण सर्वांच्या आंत विलीन असतो; जो सर्वभूतें आणि त्यांची स्थाने ह्यांना व्यापून टाकतो, त्या वरुणाच्या निवासांत, त्याच्या समोर, सर्व दिव्यविभूति त्याच्या नियमानुसार वागतात. ७. स स॑मु॒द्रो अ॑पी॒च्य॑स्तु॒रो द्यामि॑व रोहति॒ नि यदा॑सु॒ यजु॑र्द॒धे । सः । समुद्रः । अपीच्यः । तुरः । द्याम्ऽइव । रोहति । नि । यत् । आसु । यजुः । दधे । तो अपार समुद्रच की काय असा वरुण त्वरितगति सूर्याप्रमाणे आकाश आक्रमण करतो; आणि ह्या मानवी प्रजाजनांमध्ये यज्ञक्रियेची स्थापना करतो; त्यानें आपल्या जाज्वल्य चरणाने मायेचा नाश करून टाकला आणि अत्युच्च-आकशांत आरोहण केलें. ८. यस्य॑ श्वे॒ता वि॑चक्ष॒णा ति॒स्रो भूमी॑रधिक्षि॒तः । यस्य । श्वेता । विऽचक्षणा । तिस्रः । भूमीः । अधिऽक्षितः । ज्या जगन्निवास वरुणाच्या शुभ्र, चकचकीत रश्मींनी तीन भुवने आणि त्यांच्यावरचे तिन्ही लोक ह्या सर्वांना व्यापून टाकले, त्या वरुणाचे स्थान अढळ आहे. सप्तलोकांवरही तो अधिपत्य चालवितो. ९. यः श्वे॒ताँ अधि॑निर्णिजश्च॒क्रे कृ॒ष्णाँ अनु॑ व्र॒ता । यः । श्वेतान् । अधिऽनिर्निजः । चक्रे । कृष्णान् । अनु । व्रता । ज्याने कृष्णवर्ण आच्छादनांना आपल्या नियमानुसार शुभ्रवर्ण केलें; ज्याने सनातन स्थान उत्पन्न केलें, तो जन्मरहित आहे म्हणून द्यावापृथिवींना आणि नक्षत्रपुंजांना खांबानें उचलून धरल्याप्रमाणे वर सावरून धरले आहे. १०. ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ४२ ( ) ऋषी - देवता - छंद - अस्त॑भ्ना॒द्द्यामसु॑रो वि॒श्ववे॑दा॒ अमि॑मीत वरि॒माणं॑ पृथि॒व्याः । अस्तभ्नात् । द्याम् । असुरः । विश्वऽवेदाः । अमिमीत । वरिमाणम् । पृथिव्याः । सर्वसाक्षी परमात्म्याने नक्षत्रे अचल केली; पृथिवीच्या विस्तीर्णपणाला मर्यादा घातली; आणि सम्राट होऊन यच्चावत् भुवनांमध्ये राहिला; ही सर्व त्या वरुणाची उरतर्क्य घटना होय. १. ए॒वा व॑न्दस्व॒ वरु॑णं बृ॒हन्तं॑ नम॒स्या धीर॑म॒मृत॑स्य गो॒पाम् । एव । वन्दस्व । वरुणम् । बृहन्तम् । नमस्य । धीरम् । अमृतस्य । गोपाम् । म्हणून हे स्तोत्या, भक्ता, त्या श्रेष्ठ वरुणाला प्रणिपात कर. प्राज्ञ आणि अमरत्वाचा प्रतिपालक अशा त्या वरुणापुढे नम्र हो. ज्यामध्ये तीन प्रकारची संरक्षणे आहेत असे धाम तो आम्हांला देवो; आणि आमच्या सन्निध राहणाऱ्या द्यावापृथिवींही आमचे रक्षण करोत. २ इ॒मां धियं॒ शिक्ष॑माणस्य देव॒ क्रतुं॒ दक्षं॑ वरुण॒ सं शि॑शाधि । इमाम् । धियम् । शिक्षमाणस्य । देव । क्रतुम् । दक्षम् । वरुण । सम् । शिशाधि । अशा प्रकारची एकाग्रबुद्धि शिकणारा जो मी भक्त, त्याचे सत्कर्म आणि चातुर्य ह्यांना, हे देवा वरुणा, तूं तेजस्वी कर; म्हणजे त्यायोगाने सर्व संकटातून आम्ही पार पडूं, आणि उत्तम तऱ्हेने तरून नेणाऱ्या नावेवर आरूढ होऊं. ३. आ वां॒ ग्रावा॑णो अश्विना धी॒भिर्विप्रा॑ अचुच्यवुः । आ । वाम् । ग्रावाणः । अश्विना । धीभिः । विप्राः । अचुच्यवुः । हे अश्वीहो, तुम्ही सोम प्राशन करावा म्हणून तुमच्याप्रीत्यर्थ सोमाभिषगाचे ग्रावे, हे सत्यस्वरूप देवांनो, ज्ञानीभक्त ध्यानस्तोत्रे म्हणतांना फिरवून राहिले आहेत. ४. यथा॑ वा॒मत्रि॑रश्विना गी॒र्भिर्विप्रो॒ अजो॑हवीत् । यथा । वाम् । अत्रिः । अश्विना । गीःऽभिः । विप्रः । अजोहवीत् । ज्याप्रमाणें हे अश्वीहो, पूर्वी ज्ञानवान् अत्रींनी तुम्हांला स्तुतींनी पाचारण केलें; हे सत्यस्वरूप देवते, सोमप्राशनार्थ पाचारण केले. ५. ए॒वा वा॑मह्व ऊ॒तये॒ यथाहु॑वन्त॒ मेधि॑राः । एव । वाम् । अह्वे । ऊतये । यथा । अहुवन्त । मेधिराः । ज्याप्रमाणें पूर्वीच्या बुद्धिमान भक्तांनी, हे नासत्यहो, तुमचा धांवा केला त्याप्रमाणें मीही सहायासाठी आणि तुम्ही सोम प्राशन करावा म्हणून तुमची विनवणी करीत आहे. ६ ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ४३ ( ) ऋषी - देवता - छंद - इ॒मे विप्र॑स्य वे॒धसो॒ऽग्नेरस्तृ॑तयज्वनः । इमे । विप्रस्य । वेधसः । अग्नेः । अस्तृतऽयज्वनः । ज्ञानरूप, सत्कर्मांचा विधाता, आणि गत्तंच्या यज्ञयागांचा कधींही उच्छेद होऊं न देणारा जो अग्नि त्याची स्तोत्रे माझी वाणी उच्चारीत असते. १ अस्मै॑ ते प्रति॒हर्य॑ते॒ जात॑वेदो॒ विच॑र्षणे । अस्मै । ते । प्रतिऽहर्यते । जातऽवेदः । विऽचर्षणे । हे सकलवस्तुजात जाणणाऱ्या, सूक्ष्मदर्शी अग्निदेवा, ह्या तुझ्या भक्ताला इच्छित देणारा जो तू, त्या तुझी उत्कृष्ट स्त्तुति रचून ती मीं म्हणत आहे २. आ॒रो॒का इ॑व॒ घेदह॑ ति॒ग्मा अ॑ग्ने॒ तव॒ त्विषः॑ । आरोकाःऽइव । घ । इत् । अह । तिग्माः । अग्ने । तव । त्विषः । हे अग्नि, पहा, रश्मीप्रमाणे ह्या तुझ्या तीव्र ज्याला आपल्या दाढांनी वनेच्या वने खाऊन फस्त करतात. ३. हर॑यो धू॒मके॑तवो॒ वात॑जूता॒ उप॒ द्यवि॑ । हरयः । धूमऽकेतवः । वातऽजूताः । उप । द्यवि । जेव्हां, सोन्याप्रमाणे पिवळ्या जर्द अशा दावाग्नीच्या ज्वाला, धुराचे लोट वर सोडीत, वाऱ्याने उफाळ होऊन आकाशापर्यंत जाऊन भिडतात; ४. ए॒ते त्ये वृथ॑ग॒ग्नय॑ इ॒द्धासः॒ सम॑दृक्षत । एते । त्ये । वृथक् । अग्नयः । इद्धासः । सम् । अदृक्षत । अशा वेळीं निरनिराळे प्रज्वलित अग्नि प्रभातकाळच्या प्रकाशमान ध्वजांप्रमाणे सुंदर दिसतात. ५. कृ॒ष्णा रजां॑सि पत्सु॒तः प्र॒याणे॑ जा॒तवे॑दसः । कृष्णा । रजांसि । पत्सुतः । प्रऽयाने । जातऽवेदसः । जेव्हां जेव्हां अग्नि हा पृथ्वीवर ठिकठिकाणी रोखून राहतो, तेव्हां तेव्हां त्या सर्वज्ञ अग्नीच्या मार्गात त्याच्या पायाखालचे धूलिकण कृष्णवर्ण होतात. ६. धा॒सिं कृ॑ण्वा॒न ओष॑धी॒र्बप्स॑द॒ग्निर्न वा॑यति । धासिम् । कृण्वानः । ओषधीः । बप्सत् । अग्निः । न । वायति । औषधींना आपलें अन्न समजून अग्नि त्यांना भक्षण करतो, परंतु तृप्त न होतां, तो पोसलेल्या टवटवीत लतांकडेही पुनः जातोच. ७. जि॒ह्वाभि॒रह॒ नन्न॑मद॒र्चिषा॑ जञ्जणा॒भव॑न् । जिह्वाभिः । अह । नन्नमत् । अर्चिषा । जञ्जणाऽभवन् । आपल्या ज्वालारूप ज्वालांनीं सर्वांला वांकविण्यास लावणारा आणि दीप्तीनें धगधगणारा अग्नि पहा, वनामध्ये आपला प्रकाश पसरीत आहे. ८ अ॒प्स्व॑ग्ने॒ सधि॒ष्टव॒ सौष॑धी॒रनु॑ रुध्यसे । अप्ऽसु । अग्ने । सधिः । तव । सः । ओषधीः । अनु । रुध्यसे । अग्निदेवा, उदकांमध्ये तुझा वास असून वनस्पतीमध्येंही तूं आहेसच; त्यांच्या उदरात राहून तूं पुनः प्रकट होतोस. ९. उद॑ग्ने॒ तव॒ तद्घृ॒ताद॒र्ची रो॑चत॒ आहु॑तम् । उत् । अग्ने । तव । तत् । घृतात् । अर्चिः । रोचते । आऽहुतम् । अग्निदेवा, ती तुझी ज्वाला स्रुचेच्या मुखांतील घुताहुतिंचे चुंबन घेऊन सुप्रकाशित होते. १०. उ॒क्षान्ना॑य व॒शान्ना॑य॒ सोम॑पृष्ठाय वे॒धसे॑ । उक्षऽअन्नाय । वशाऽअन्नाय । सोमऽपृष्ठाय । वेधसे । वृषभांचे अन्न,तसेच धेनूंचे अन्न जो उत्पन्न करतो, सोमाप्रमाणे ज्याचा पृष्ठभाग विचित्रवर्ण असतो असा जो विधाता अग्नि त्याची सेवा आम्ही स्तुतींनी करीत आहो. ११. उ॒त त्वा॒ नम॑सा व॒यं होत॒र्वरे॑ण्यक्रतो । उत । त्वा । नमसा । वयम् । होतः । वरेण्यक्रतो इति वरेण्यऽक्रतो । आणखी, आम्हीं प्रणिपात करून, हे यज्ञसंपादका, हे सर्वोत्कृष्ट कृत्ये करणाऱ्या अग्नीदेवा, तुजला समिधांनी प्रदीप्त करीत आहो. १२ उ॒त त्वा॑ भृगु॒वच्छु॑चे मनु॒ष्वद॑ग्न आहुत । उत । त्वा । भृगुऽवत् । शुचे । मनुष्वत् । अग्ने । आऽहुत । तसेंच हे निष्कलंका, भृगुप्रमाणे, मनुप्रमाणे, आणि हे आहुतिपूजिता अग्ने, अंगिराप्रमाणेही आम्ही तुजला पाचारण करीत आहोत १३. त्वं ह्य॑ग्ने अ॒ग्निना॒ विप्रो॒ विप्रे॑ण॒ सन्स॒ता । त्वम् । हि । अग्ने । अग्निना । विप्रः । विप्रेण । सन् । सता । अग्निदेवा, तूं अग्नीनेंच, तूं स्तुतिज्ञानरूप देव ज्ञानीभक्ताच्या योगानेंच, तूं सद्रूप सज्जनांच्या योगानेंच, तू सन्मित्र, मित्रत्वानेंच प्रज्वलित होतोस. १४. स त्वं विप्रा॑य दा॒शुषे॑ र॒यिं दे॑हि सह॒स्रिण॑म् । सः । त्वम् । विप्राय । दाशुषे । रयिम् । देहि । सहस्रिणम् । तर हे अग्ने, स्तवनज्ञ हविर्दात्याला हजारो प्रकारचें ऐश्वर्य आणि वीरोचित उत्साह दे. १५. अग्ने॒ भ्रातः॒ सह॑स्कृत॒ रोहि॑दश्व॒ शुचि॑व्रत । अग्ने । भ्रातरिति । सहःऽकृत । रोहित्ऽअश्व । शुचिऽव्रत । दीनबंधो अग्निदेवा, हे दर्पदलना, हे अरुणाश्वा, हे शुद्धकर्मप्रवर्तका, माझ्या ह्या स्तवनांचा स्वीकार कर. १६. उ॒त त्वा॑ग्ने॒ मम॒ स्तुतो॑ वा॒श्राय॑ प्रति॒हर्य॑ते । उत । त्वा । अग्ने । मम । स्तुतः । वाश्राय । प्रतिऽहर्यते । आणखी, हे अग्निदेवा, पहा माझ्या स्तुति, हंबरणार्या वासरांकरिता गाई जशा गोठ्याकडे धांवतात त्याप्रमाणें, तुझ्या आश्रयाला धावल्या आहेत. १७. तुभ्यं॒ ता अ॑ङ्गिरस्तम॒ विश्वाः॑ सुक्षि॒तयः॒ पृथ॑क् । तुभ्यम् । ताः । अङ्गिरःऽतम । विश्वाः । सुऽक्षितयः । पृथक् । अंगिरसांना अत्यंत पूज्य अशा देवा, जगांतील सर्व समंजस लोक आपआपल्या मनोरथांसाठी, हे अग्निदेवा, तुझ्याकडेच लक्ष लावून बसले आहेत. १८. अ॒ग्निं धी॒भिर्म॑नी॒षिणो॒ मेधि॑रासो विप॒श्चितः॑ । अग्निम् । धीभिः । मनीषिणः । मेधिरासः । विपःऽचितः । मनोजयी, बुद्धिमान् आणि ज्ञानी अशा भक्तांनी अग्नीने हवीचा स्वीकार करावा म्हणून आपल्या एकाग्रतेने त्याला हलविले आहे. १९ तं त्वामज्मे॑षु वा॒जिनं॑ तन्वा॒ना अ॑ग्ने अध्व॒रम् । तम् । त्वाम् । अज्मेषु । वाजिनम् । तन्वानाः । अग्ने । अध्वरम् । हे अग्ने, रणमैदानावर आपलें सत्वबल गाजविणाग, हव्यवाहक आणि यज्ञसंपादक जो तूं त्या तुझी स्तुति अध्वरयाग करूं इच्छिणारे भक्तजन करीत असतात. २०. पु॒रु॒त्रा हि स॒दृङ्ङसि॒ विशो॒ विश्वा॒ अनु॑ प्र॒भुः । पुरुऽत्रा । हि । सऽदृङ् । असि । विशः । विश्वाः । अनु । प्रऽभुः । सर्व ठिकाणी सर्वांना तं सारखाच दर्शनीय वाटतोस; तूं सर्व मानव जातीच्या अगदी योग्य असा प्रभु आहेस, म्हणून संग्रामामध्ये आम्ही तुझाच धांवा करीत असतो. २१. तमी॑ळिष्व॒ य आहु॑तो॒ऽग्निर्वि॒भ्राज॑ते घृ॒तैः । तम् । ईळिष्व । यः । आऽहुतः । अग्निः । विऽभ्राजते । घृतैः । घृतयुक्त आहुति अर्पण केली असतां जो अग्निदेव सुप्रकाशित होतो त्याचे स्तवन करु. तोच तुझी हांक ऐकेल. २२. तं त्वा॑ व॒यं ह॑वामहे शृ॒ण्वन्तं॑ जा॒तवे॑दसम् । तम् । त्वा । वयम् । हवामहे । शृण्वन्तम् । जातऽवेदसम् । म्हणून आम्हींहि, हे अग्ने, भक्तांची हांक ऐकणारा, सकलवस्तुमान जाणणारा, द्वेष्ट्यांना ठार करणारा अशा तुजला पाचारण करीत आहो. २३. वि॒शां राजा॑न॒मद्भु॑त॒मध्य॑क्षं॒ धर्म॑णामि॒मम् । विशाम् । राजानम् । अद्भुतम् । अधिऽअक्षम् । धर्मणाम् । इमम् । मनुष्यमात्राचा लोकोत्तर राजा, सर्व सद्धर्माचा अधिपति, अशा ह्या अग्नीचे मी स्तवन करतो, तोच माझा धांवा ऐकेल. २४. अ॒ग्निं वि॒श्वायु॑वेपसं॒ मर्यं॒ न वा॒जिनं॑ हि॒तम् । अग्निम् । विश्वायुऽवेपसम् । मर्यम् । न । वाजिनम् । हितम् । सकलवस्तुजाताचें आयुष्य तेंच ज्याचे बल असा जनहितकारी, सत्वबलाढ्य जो अग्नि त्याला आम्ही उद्दीपित करतो, शूराला किंवा तेजस्वी अश्वाला उत्तेजन द्यावे त्याप्रमाणे आम्ही उद्दीपित करतो. २५. घ्नन्मृ॒ध्राण्यप॒ द्विषो॒ दह॒न्रक्षां॑सि वि॒श्वहा॑ । घ्नन् । मृध्राणि । अप । द्विषः । दहन् । रक्षांसि । विश्वहा । क्रूर द्वेष्ट्यांच्या समुदायांचा निःपात करून आणि यच्चावत् राक्षसांना जाळून भस्म करून, हे अग्निदेवा, तूं आपल्या तीव्र तेजाने प्रकाशित हो. २६. यं त्वा॒ जना॑स इन्ध॒ते म॑नु॒ष्वद॑ङ्गिरस्तम । यम् । त्वा । जनासः । इन्धते । मनुष्वत् । अङ्गिरःऽतम । अंगिरसांना अत्यंत पूज्य अशा अग्ने, सामान्यजनही मनुभक्ताप्रमाणे तुला समिधांनीं प्रदीप्त करतात, तर हे अग्निदेवा, तूं माझी प्रार्थना ऐक. २७. यद॑ग्ने दिवि॒जा अस्य॑प्सु॒जा वा॑ सहस्कृत । यत् । अग्ने । दिविऽजाः । असि । अप्सुऽजाः । वा । सहःऽकृत । हे अग्ने, तूं आकशांत प्रकट होतोस, किंवा उदकामध्येंही प्रकट होतोस, तर हे दर्पदलना, बलप्रभवा, स्तुतीच्या योगाने आम्ही तुजला हांक मारील आहोत. २८. तुभ्यं॒ घेत्ते जना॑ इ॒मे विश्वाः॑ सुक्षि॒तयः॒ पृथ॑क् । तुभ्यम् । घ । इत् । ते । जनाः । इमे । विश्वाः । सुऽक्षितयः । पृथक् । ते भक्तजन, तसेच हे सुखवस्तू लोक देखील तुझ्या सेवनार्थ निरनिराळ्या आहुति तुजला अर्पण करतात. २९. ते घेद॑ग्ने स्वा॒ध्योऽहा॒ विश्वा॑ नृ॒चक्ष॑सः । ते । घ । इत् । अग्ने । सुऽआध्यः । अहा । विश्वा । नृऽचक्षसः । तर हे अग्नि, आम्ही उत्तम ध्यानप्रवण आणि शूरांना उचित अशी दृष्टि निरंतर ठेवणारे भक्त, दुर्धर संकटांतून सहज पार होऊं असें कर. ३०. अ॒ग्निं म॒न्द्रं पु॑रुप्रि॒यं शी॒रं पा॑व॒कशो॑चिषम् । अग्निम् । मन्द्रम् । पुरुऽप्रियम् । शीरम् । पावकऽशोचिषम् । सुप्रसन्न, सर्वप्रिय, वेदीवर अधिष्ठित, आणि प्रकाशाने पावन करणाऱ्या अग्नीची आम्हीही प्रसन्नचित्तानेंच प्रार्थना करतो ३१. स त्वम॑ग्ने वि॒भाव॑सुः सृ॒जन्सूर्यो॒ न र॒श्मिभिः॑ । सः । त्वम् । अग्ने । विभाऽवसुः । सृजन् । सूर्यः । न । रश्मिऽभिः । तर हे अग्नि, असा तूं प्रकाशवैभवशालीदेव सूर्याप्रमाणे आपल्या किरणांनी पुढें सरसावून आणि आपला प्रभाव गाजवून अंधकाराचा नायनाट कर. ३२ तत्ते॑ सहस्व ईमहे दा॒त्रं यन्नोप॒दस्य॑ति । तत् । ते । सहस्वः । ईमहे । दात्रम् । यत् । न । उपऽदस्यति । म्हणून हे दर्पदलना ज्याचा क्षय होणार नाहीं आणि जें अग्नीला योग्य आहे असें धन आम्हीं तुजपाशी मागतो. ३३ ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ४४ ( ) ऋषी - देवता - छंद - स॒मिधा॒ग्निं दु॑वस्यत घृ॒तैर्बो॑धय॒ताति॑थिम् । सम्ऽइधा । अग्निम् । दुवस्यत । घृतैः । बोधयत । अतिथिम् । समिधा अर्पण करून अग्नीची सेवा करा. घृताहुतींनी त्याला प्रदीप्त करा, आणि त्याच्या ठिकाणी हवींचे हवन करा. १. अग्ने॒ स्तोमं॑ जुषस्व मे॒ वर्ध॑स्वा॒नेन॒ मन्म॑ना । अग्ने । स्तोमम् । जुषस्व । मे । वर्धस्व । अनेन । मन्मना । हे अग्नि, माझ्या स्तोत्राचा स्वीकार कर, ह्या मननीय व मनोल्हादी स्तवनाने वृद्धिंगत हो आणि आमच्या उत्कृष्ट स्तवनांची आवड धर. २. अ॒ग्निं दू॒तं पु॒रो द॑धे हव्य॒वाह॒मुप॑ ब्रुवे । अग्निम् । दूतम् । पुरः । दधे । हव्यऽवाहम् । उप । ब्रुवे । ह्या अग्निला आम्ही आमचा प्रतिनिधि म्हणून आमच्यापढे स्थापन करतो. हवि पोहोचविणाऱ्या त्या विभूतींची आम्ही प्रार्थना करतो, म्हणजे तो दिव्यविबुधांना येथें घेऊन देईल. ३. उत्ते॑ बृ॒हन्तो॑ अ॒र्चयः॑ समिधा॒नस्य॑ दीदिवः । उत् । ते । बृहन्तः । अर्चयः । सम्ऽइधानस्य । दीदिऽवः । तूं प्रज्वलित झालास म्हणजे हे दीप्तिमंता अग्ने, तुझी विस्तीर्ण आणि शुभ्रतेजस्क प्रभा चोहोंकडे फांकते ४. उप॑ त्वा जु॒ह्वो॒॑३ मम॑ घृ॒ताची॑र्यन्तु हर्यत । उप । त्वा । जुह्वः । मम । घृताचीः । यन्तु । हर्यत । ह्या माझ्या घृतपर्ण ऋचा तुझ्या जवळ प्राप्त होवोत. हे प्रेमळ अग्निदेवा, आमच्या हविर्भागांचा स्वीकार कर ५. म॒न्द्रं होता॑रमृ॒त्विजं॑ चि॒त्रभा॑नुं वि॒भाव॑सुम् । मन्द्रम् । होतारम् । ऋत्विजम् । चित्रऽभानुम् । विभाऽवसुम् । हृष्टचित्त, यज्ञसंपादक, देवांचा ऋत्विज, अद्भुत दीप्तिमान् आणि प्रकाशनिधि अशा अग्नीचे मी स्तवन करतो; तो माझी हांक ऐकेल. ६. प्र॒त्नं होता॑र॒मीड्यं॒ जुष्ट॑म॒ग्निं क॒विक्र॑तुम् । प्रत्नम् । होतारम् । ईड्यम् । जुष्टम् । अग्निम् । कविऽक्रतुम् । तो पुरातन यज्ञसंपादक अग्नि स्तवनयोग्य आहे, तो सर्वसेव्य, काव्य स्फूर्ति देणारा, आणि अध्वरांना अपूर्व शोभा देणारा आहे. ७. जु॒षा॒णो अ॑ङ्गिरस्तमे॒मा ह॒व्यान्या॑नु॒षक् । जुषाणः । अङ्गिरःऽतम । इमा । हव्यानि । आनुषक् । हे अंगिरसांना अत्यंत पूज्य देवा, आमच्या ह्या हविर्द्रव्यांचा तूं वारंवार स्वीकार करून, आमचा यज्ञ हे अग्निदेवा, तूं योग्य काळी तडीस ने. ८. स॒मि॒धा॒न उ॑ सन्त्य॒ शुक्र॑शोच इ॒हा व॑ह । सम्ऽइधानः । ऊं इति । सन्त्य । शुक्रऽशोचे । इह । आ । वह । हे सज्जनपालका, शुभ्रप्रकाशा, तूं प्रज्वलित होऊन आणि सर्व लक्षांत घेऊन दिव्य विभूतींना येथे आण. ९. विप्रं॒ होता॑रम॒द्रुहं॑ धू॒मके॑तुं वि॒भाव॑सुम् । विप्रम् । होतारम् । अद्रुहम् । धूमऽकेतुम् । विभाऽवसुम् । तूं ज्ञानशील, यज्ञसंपादक, द्रोहरहित, धुम्रध्वज, दीप्तिवैभव आणि यज्ञांचा कीर्तिध्वज आहेस, त्या तुझी विनवणी आम्ही करीत आहों. १०. अग्ने॒ नि पा॑हि न॒स्त्वं प्रति॑ ष्म देव॒ रीष॑तः । अग्ने । नि । पाहि । नः । त्वम् । प्रति । स्म । देव । रिषतः । अग्निदेवा, आमचे सर्वतोपरी रक्षण कर; हे देवा आमचा बचाव कर; हे दर्पदमना, क्रूर दुष्टांच्या द्वेषाचा चुराडा करून टाक. ११. अ॒ग्निः प्र॒त्नेन॒ मन्म॑ना॒ शुम्भा॑नस्त॒न्वं१॒॑ स्वाम् । अग्निः । प्रत्नेन । मन्मना । शुम्भानः । तन्वम् । स्वाम् । पुरातन मननीय स्तोत्रानेच आपल्या स्वतःच्या शरीरास सुशोभित करणारा प्रतिभाशालि अग्नि हा ज्ञानशील भक्ताच्या हातून वृद्धिंगत होतो. १२. ऊ॒र्जो नपा॑त॒मा हु॑वे॒ऽग्निं पा॑व॒कशो॑चिषम् । ऊर्जः । नपातम् । आ । हुवे । अग्निम् । पावकऽशोचिषम् । ऊर्जस्वितेचा उद्गम असा जो पवित्रप्रकाश अग्नि, त्याला आम्ही आमच्या उत्तम अध्वरयागाच्या प्रसंगी येण्याविषयी हात जोडून विनवीत आहोत १३. स नो॑ मित्रमह॒स्त्वमग्ने॑ शु॒क्रेण॑ शो॒चिषा॑ । सः । नः । मित्रऽमहः । त्वम् । अग्ने । शुक्रेण । शोचिषा । हे प्रसन्नदीप्ते अग्निदेवा, आपल्या शुभ्रकान्तीने मंडित होऊन दिव्य विभूतींसह येथे येऊन कुशासनावर आरोहण कर. १४. यो अ॒ग्निं त॒न्वो॒३॒॑ दमे॑ दे॒वं मर्तः॑ सप॒र्यति॑ । यः । अग्निम् । तन्वः । दमे । देवम् । मर्तः । सपर्यति । जो मानव स्वतःच्या गृहांत अग्नीची सेवा करतो त्यालाच तो अग्नि वारंवार ऐश्वर्य देतो. १५. अ॒ग्निर्मू॒र्धा दि॒वः क॒कुत्पतिः॑ पृथि॒व्या अ॒यम् । अग्निः । मूर्धा । दिवः । ककुत् । पतिः । पृथिव्याः । अयम् । अग्नि हा द्युलोकाचे मस्तक किंवा शिखर, आणि पृथिवीचा अधिपति होय. तो उदकांच्या बीजशक्तीला विकसित करतो. १६. उद॑ग्ने॒ शुच॑य॒स्तव॑ शु॒क्रा भ्राज॑न्त ईरते । उत् । अग्ने । शुचयः । तव । शुक्राः । भ्राजन्तः । ईरते । आणखी हे अग्निदेवा तुझ्या निर्मळ, प्रखर, देदीप्यमान ज्वाला, आणि तुझ्या दीप्ति सर्व एकदमच वर लोटत जातात. १७. ईशि॑षे॒ वार्य॑स्य॒ हि दा॒त्रस्या॑ग्ने॒ स्व॑र्पतिः । ईशिषे । वार्यस्य । हि । दात्रस्य । अग्ने । स्वःऽपतिः । अभिलषणीय आणि उत्कृष्ट अशा देणगीवर सत्ता तुझीच चालते; हे अग्निदेवा तूं स्वर्लोकाचा अधिपति आहेस म्हणून मी तुझा स्तोतृजन तुझ्या आश्रयाखाली राहीन. १८. त्वाम॑ग्ने मनी॒षिण॒स्त्वां हि॑न्वन्ति॒ चित्ति॑भिः । त्वाम् । अग्ने । मनीषिणः । त्वाम् । हिन्वन्ति । चित्तिऽभिः । हे अग्ने, मनोजयी भक्त आपल्या चिन्तनांनी तुजला हेलावतात. म्हणून आमच्याहि स्तुति तुझा महिमा वृद्धिंगत करोत. १९. अद॑ब्धस्य स्व॒धाव॑तो दू॒तस्य॒ रेभ॑तः॒ सदा॑ । अदब्धस्य । स्वधाऽवतः । दूतस्य । रेभतः । सदा । दुर्दम्य, स्वतंत्र, देवांचा प्रतिनिधि, आणि निरंतर घोष करणारा जो अग्नि त्याच्या सख्यत्वाची आम्ही आकांक्षा धरतों. २०. अ॒ग्निः शुचि॑व्रततमः॒ शुचि॒र्विप्रः॒ शुचिः॑ क॒विः । अग्निः । शुचिव्रतऽतमः । शुचिः । विप्रः । शुचिः । कविः । अग्नि हा अत्यंत शुद्धचारित्र्य, निष्कलंक, ज्ञानी,आणि निर्मल कवि आहे, तो शुद्ध सत्वदेव, आहुति अर्पण केली असतां सुप्रकाशित होतो. २१. उ॒त त्वा॑ धी॒तयो॒ मम॒ गिरो॑ वर्धन्तु वि॒श्वहा॑ । उत । त्वा । धीतयः । मम । गिरः । वर्धन्तु । विश्वहा । तसेंच माझ्या ध्यानक्रिया, माझ्या स्तुति ह्या सर्व तुझेंच महात्म्य वृद्धिंगत करोत; हे अग्नी आमच्या मित्रत्वाचे-स्मरण ठेव. २२. यद॑ग्ने॒ स्याम॒हं त्वं त्वं वा॑ घा॒ स्या अ॒हम् । यत् । अग्ने । स्याम् । अहम् । त्वम् । त्वम् । वा । घ । स्याः । अहम् । हे अग्निदेवा, जर मी तुझ्या ठिकाणी असतो, आणि तूं जर माझ्या ठिकाणी असतास तर तुझ्या प्रार्थना, येथल्या येथेंच सत्य आणि सफल झाल्या असत्या. २३. वसु॒र्वसु॑पति॒र्हि क॒मस्य॑ग्ने वि॒भाव॑सुः । वसुः । वसुऽपतिः । हि । कम् । असि । अग्ने । विभाऽवसुः । ऐश्वर्याचा निधि असा तूं स्वतः ऐश्वर्यरूपच आहेस; हे अग्नि, प्रकाश हें तुझेच वैभव होय. म्हणून तुझ्या वात्सल्यबुद्धींत आम्हांला जागा मिळेल असें कर. २४. अग्ने॑ धृ॒तव्र॑ताय ते समु॒द्राये॑व॒ सिन्ध॑वः । अग्ने । धृतऽव्रताय । ते । समुद्रायऽइव । सिन्धवः । अग्निदेवा, तुज सद्धर्म नियामकाकडे माझ्या स्तुति, नद्या समुद्राकडे लोटतात त्याप्रमाणे, गर्जना करीत जोराने धांवत आहेत. २५. युवा॑नं वि॒श्पतिं॑ क॒विं वि॒श्वादं॑ पुरु॒वेप॑सम् । युवानम् । विश्पतिम् । कविम् । विश्वऽअदम् । पुरुऽवेपसम् । तारुण्याढ्य, मनुष्यांचा प्रभु, स्फुर्तिदाता, सर्वभक्षक, नानारूपधर अशा अग्नीला मी आपल्या मननयोग्य स्तोत्रांनीच सुशोभित करतो. २६. य॒ज्ङानां॑ र॒थ्ये॑ व॒यं ति॒ग्मज॑म्भाय वी॒ळवे॑ । यज्ञानाम् । रथ्ये । वयम् । तिग्मऽजम्भाय । वीळवे । यज्ञाचा अग्रेसर, तीक्ष्णदंष्ट्र आणि महाबलाढ्य अशा अग्नीला आम्ही स्तोत्रांच्या योगानेंच त्वरित कळवळा उत्पन्न करूं. २७. अ॒यम॑ग्ने॒ त्वे अपि॑ जरि॒ता भू॑तु सन्त्य । अयम् । अग्ने । त्वे इति । अपि । जरिता । भूतु । सन्त्य । हे अग्नि, हे सत्प्रतिपालका, हा स्तोता तुझ्याच सन्निध राहो; हे पावना, त्याच्यावर कृपा कर. २८. धीरो॒ ह्यस्य॑द्म॒सद्विप्रो॒ न जागृ॑विः॒ सदा॑ । धीरः । हि । असि । अद्मऽसत् । विप्रः । न । जागृविः । सदा । तूं प्राज्ञ आहेस. आमच्या हविर्भागामध्ये तूं वास करतोस; ज्ञानरूप म्हणूनच जागरुक राहतोस, आणि हे अग्नि, द्युलोकांत निरंतर प्रकाशतोस. २९. पु॒राग्ने॑ दुरि॒तेभ्यः॑ पु॒रा मृ॒ध्रेभ्यः॑ कवे । पुरा । अग्ने । दुःऽइतेभ्यः । पुरा । मृध्रेभ्यः । कवे । संकटे पुढें वाढून आली आहेत, क्रूरांनी पुढे चाल केली आहे, तर अशा प्रसंगीं हे स्फूर्तिदात्या, हे दिव्यनिधे, आमच्या आयुष्याची दोरी लांब आणि बळकट कर. ३० ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ४५ ( ) ऋषी - देवता - छंद - आ घा॒ ये अ॒ग्निमि॑न्ध॒ते स्तृ॒णन्ति॑ ब॒र्हिरा॑नु॒षक् । आ । घ । ये । अग्निम् । इन्धते । स्तृणन्ति । बर्हिः । आनुषक् । जे अग्नीला समिधांनीं प्रज्वलित करतात; त्याच्यासाठी कुशासन सदासर्वदा व्यवस्थित ठेवतात, अशांचा तारुण्याढ्य इन्द्र मित्र होतो. १. बृ॒हन्निदि॒ध्म ए॑षां॒ भूरि॑ श॒स्तं पृ॒थुः स्वरुः॑ । बृहन् । इत् । इध्मः । एषाम् । भूरि । शस्तम् । पृथु । स्वरुः । त्यांच्या समिधा उत्कृष्ट, त्यांचे स्तोत्र प्रशंसनीय, त्यांचा स्वर देखील भक्कम असतो कीं ज्यांचा मित्र तारुण्याढ्य इन्द्र हा असतो. २. अयु॑द्ध॒ इद्यु॒धा वृतं॒ शूर॒ आज॑ति॒ सत्व॑भिः । अयुद्धः । इत् । युधा । वृतम् । शूरः । आ । अजति । सत्वऽभिः । प्रतिस्पर्धी जरी त्याच्या स्वतःच्या सैनिकांनी वेष्टित असला तरी युद्ध सुरू होण्यापूर्वींच जो शूर सेनानायक त्या शत्रूवर आपल्या सतेज अनुयायांसह चाल करून जातो, तारुणाढ्य इन्द्र हा अशांचाच मित्र होतो. ३. आ बु॒न्दं वृ॑त्र॒हा द॑दे जा॒तः पृ॑च्छ॒द्वि मा॒तर॑म् । आ । बुन्दम् । वृत्रऽहा । ददे । जातः । पृच्छत् । वि । मातरम् । प्रकट होतांच बाण हाती घेऊन त्या वृत्रनाशनानें अदितिमातेला विचारले कीं, "भयंकर शत्रु म्हणतेस ते कोठे आहेत ? ते आहेत असें तरी कोणी ऐकले आहे काय ?" ४. प्रति॑ त्वा शव॒सी व॑दद्गि॒रावप्सो॒ न यो॑धिषत् । प्रति । त्वा । शवसी । वदत् । गिरौ । अप्सः । न । योधिषत् । तेव्हां त्याही उत्कटबल शालिनी अदितिनें म्हटलें कीं ज्याला तुझे शत्रूत्वच करणें आवडते तो दुष्टवृत्र मत्त हतीप्रमाणे गिरिकंदरांत दडून तुझ्याशी युद्ध करूं पहात आहे ५. उ॒त त्वं म॑घवङ्छृणु॒ यस्ते॒ वष्टि॑ व॒वक्षि॒ तत् । उत । त्वम् । मघऽवन् । शृणु । यः । ते । वष्टि । ववक्षि । तत् । हे दातृश्रेष्ठा, हें ऐक कीं, ज्याला तूं मनापासून प्रिय असतोस, त्याला पाहिजे असेल तें तूं नेऊन देतोस. आणि जें बळकट व्हावे असें तूं मनांत आणतोस ती वस्तू तत्काळ बळकट होते. ६. यदा॒जिं यात्या॑जि॒कृदिन्द्रः॑ स्वश्व॒युरुप॑ । यत् । आजिम् । याति । आजिऽकृत् । इन्द्रः । स्वश्वऽयुः । उप । उत्कृष्ट अश्व बाळगणारा युद्धकांक्षी इन्द्र जेव्हां युद्धाला निघतो तेव्हां तो सर्व रथांचाही महारथी होतो. ७. वि षु विश्वा॑ अभि॒युजो॒ वज्रि॒न्विष्व॒ग्यथा॑ वृह । वि । सु । विश्वाः । अभिऽयुजः । वज्रिन् । विष्वक् । यथा । वृह । हे वज्रधरा, आमच्यावर हल्ला चढविणाऱ्या यच्चावत् शत्रूंची चोहोकडे दाणादाण उडेल असे कर. अत्यंत सत्कीर्तियुक्त असा तूंच आमचा धुरीण हो. ८. अ॒स्माकं॒ सु रथं॑ पु॒र इन्द्रः॑ कृणोतु सा॒तये॑ । अस्माकम् । सु । रथम् । पुरः । इन्द्रः । कृणोतु । सातये । ज्याला कोणीही दुष्ट अपाय करूं शकत नाही असा इन्द्र, आम्ही विजय संपादन करावा म्हणून आमच्या उत्तम रथाला सर्वांच्या पुढें नेवो. ९. वृ॒ज्याम॑ ते॒ परि॒ द्विषोऽरं॑ ते शक्र दा॒वने॑ । वृज्याम । ते । परि । द्विषः । अरम् । ते । शक्र । दावने । तुझा द्वेष करणाऱ्याच्या वार्यासही आम्ही उभे राहणार नाहीं- हे समर्था इन्द्रा, ज्ञान गोधनप्रचुर अशीं जी तुझी औदार्य कृत्यें त्यांतच आम्ही तन्मय होऊं असें कर. १०. शनै॑श्चि॒द्यन्तो॑ अद्रि॒वोऽश्वा॑वन्तः शत॒ग्विनः॑ । शनैः । चित् । यन्तः । अद्रिऽवः । अश्वऽवन्तः । शतऽग्विनः । हे वज्रधरा आम्ही अश्व संपन्न, शेंकडो प्रकारच्या संपत्तीने मंडित, युद्धास सिद्ध आणि अपराजित आहोत, ते हळू हळू ऐटीनें मार्गक्रमण करू असें कर. ११. ऊ॒र्ध्वा हि ते॑ दि॒वेदि॑वे स॒हस्रा॑ सू॒नृता॑ श॒ता । ऊर्ध्वा । हि । ते । दिवेऽदिवे । सहस्रा । सूनृता । शता । तुझी वात्सल्यवृत्ति सदैव सज्जच आहे, ती शेंकडोंच काय, पण सहस्रावधि प्रसाद स्तोतृजनाला अर्पण करते. १२. वि॒द्मा हि त्वा॑ धनंज॒यमिन्द्र॑ दृ॒ळ्हा चि॑दारु॒जम् । विद्म । हि । त्वा । धनम्ऽजयम् । इन्द्र । दृळ्हा । चित् । आऽरुजम् । हे इन्द्रा, शत्रूंचे धन जिंकून भक्तांना देणारा तूं आहेस हें आम्ही जाणतो. त्यांचे किल्ले कितीही कठीण असले तरी पूर्वी तूं "गय" हा किल्ला फोडून टाकलास त्याप्रमाणें तेही फोडून टाकतोस हेंही आम्ही जाणतो १३. क॒कु॒हं चि॑त्त्वा कवे॒ मन्द॑न्तु धृष्ण॒विन्द॑वः । ककुहम् । चित् । त्वा । कवे । मन्दन्तु । धृष्णो इति । इन्दवः । हे सर्वोन्नता, हे स्फूर्तिदात्या, हे धडाडीने हल्ला चढविणाऱ्या देवा, तुजला हे सोमबिन्दू हृष्टचित्त करोत. तुझा असा पणच आहे, म्हणूनच आम्ही तुझी विनवणी करीत आहों. १४. यस्ते॑ रे॒वाँ अदा॑शुरिः प्रम॒मर्ष॑ म॒घत्त॑ये । यः । ते । रेवान् । अदाशुरिः । प्रऽममर्ष । मघत्तये । जो कोणी पैसेवाला अधिक द्रव्यसंचय व्हावा यासाठीं तुझ्या प्रीत्यर्थ कांही दानधर्म तर करीत नाहींच पण उलट तुझा द्वेष करतो त्याची दौलत तूं आम्हांला दे. १५ इ॒म उ॑ त्वा॒ वि च॑क्षते॒ सखा॑य इन्द्र सो॒मिनः॑ । इमे । ऊं इति । त्वा । वि । चक्षते । सखायः । इन्द्र । सोमिनः । हे इन्द्रा, सोमार्पण करणारे अमचे मित्र, घरधनी चारा हाती घेऊन धेनूची वाट पाहतात त्याप्रमाणे तुझ्याकडें दृष्टि लावून राहिले आहेत. १६ उ॒त त्वाब॑धिरं व॒यं श्रुत्क॑र्णं॒ सन्त॑मू॒तये॑ । उत । त्वा । अबधिरम् । वयम् । श्रुत्ऽकर्णम् । सन्तम् । ऊतये । तूं कांही बहिरा नाहीस, उलट सुहृदय आहेस, अणि तुझें कर्णही तीव्र आहेत, म्हणून तुझ्यापासून दूर असतां तुला यथन आम्ही हांक मारीत आहों. १७. यच्छु॑श्रू॒या इ॒मं हवं॑ दु॒र्मर्षं॑ चक्रिया उ॒त । यत् । शुश्रुयाः । इमम् । हवम् । दुःऽमर्षम् । चक्रियाः । उत । कारण, तूं आमचा हा धांवा ऐकावास, आमचे बळ अनिवार करावेंस, आणि आमचा अग्दी जवळचा आप्त व्हावेस अशीच आमची तुजला विनवणी आहे १८. यच्चि॒द्धि ते॒ अपि॒ व्यथि॑र्जग॒न्वांसो॒ अम॑न्महि । यत् । चित् । हि । ते । अपि । व्यथिः । जगन्वांसः । अमन्महि । जेव्हा जेव्हां आम्हीं अगदी कावून गेलो तेव्हां न आम्ही तुझेच चिन्तन केले तर हे इन्द्रा, तूं ( ज्ञान ) गोधनदाता आमची दुःस्थिति लक्षात घे १९. आ त्वा॑ र॒म्भं न जिव्र॑यो रर॒भ्मा श॑वसस्पते । आ । त्वा । रम्भम् । न । जिव्रयः । ररभ्म । शवसः । पते । म्हातारे जसे काठीवर भार टाकतात त्याप्रमाणे हे उत्कटबलच्या प्रभो, आम्ही तुझ्याचवर अवलंबून राहिला आहों. आमच्या ह्या यज्ञसंमेलनांत तूं आम्हास मन:पूर्वक हवा आहेस २०. स्तो॒त्रमिन्द्रा॑य गायत पुरुनृ॒म्णाय॒ सत्व॑ने । स्तोत्रम् । इन्द्राय । गायत । पुरुऽनृम्णाय । सत्वने । ज्याचे पौरूष अमर्याद आहे, जो सत्वपूर्ण आहे. अशा इन्द्राप्रीत्यर्थ स्तोत्रगायन करा; युद्धांत त्याचे निवारण कोणीहि करूं शकत नाही. २१. अ॒भि त्वा॑ वृषभा सु॒ते सु॒तं सृ॑जामि पी॒तये॑ । अभि । त्वा । वृषभ । सुते । सुतम् । सृजामि । पीतये । हे वीरपंगवा, आम्ही सोमरस पिळला म्हणजे तूं तो प्राशन करावास म्हणून आणखीही रस पात्रांत ओतीत आहों, तर तृप्त हो आणि हर्ष पाव. २२. मा त्वा॑ मू॒रा अ॑वि॒ष्यवो॒ मोप॒हस्वा॑न॒ आ द॑भन् । मा । त्वा । मूराः । अविष्यवः । मा । उपऽहस्वानः । आ । दभन् । स्वहितमूढ परंतु रक्षणासाठी हापापलेले, किंवा तुझा उपहास करणारे असले नीच लोक तुला फसवितील हें शक्यच नाही. परंतु ब्रह्मद्वेष्ट्यांची म्हणजे सत्यज्ञानाचा द्वेष करणारांची आवड तूंहि ठेऊ नको. २३ इ॒ह त्वा॒ गोप॑रीणसा म॒हे म॑न्दन्तु॒ राध॑से । इह । त्वा । गोऽपरीणसा । महे । मन्दन्तु । राधसे । येथे यज्ञांत तुझा महाप्रसाद मिळावा म्हणून हे गोदुग्धमिश्रित रस तुजला हनिर्भर करोत; हा रस गौरमृग जसा सरोवराचें उदक पितो त्याप्रमाणे प्राशन कर. २४. या वृ॑त्र॒हा प॑रा॒वति॒ सना॒ नवा॑ च चुच्यु॒वे । या । वृत्रऽहा । पराऽवति । सना । नवा । च । चुच्युवे । दूरलोकी वास करणार्या वृत्रनाशन इन्द्रानें ज्या पुरातन किंवा नवीन कवनांची प्रेरणा केली तींच कवने ह्या धर्मसभेत म्हणा. २५. अपि॑बत्क॒द्रुवः॑ सु॒तमिन्द्रः॑ स॒हस्र॑बाह्वे । अपिबत् । कद्रुवः । सुतम् । इन्द्रः । सहस्रऽबाह्वे । कद्रूनें अर्पण केलेला सोमरस इन्द्राने प्राशन केला, तेव्हां तेथेंच हजारों सैनिकांनी धुमाळी उडविलेल्या युद्धांत त्याचे पौरुष चमकलें २६. स॒त्यं तत्तु॒र्वशे॒ यदौ॒ विदा॑नो अह्नवा॒य्यम् । सत्यम् । तत् । तुर्वशे । यदौ । विदानः । अह्नवाय्यम् । जे सत्य आहे ते तुर्वशामध्ये, आणि यदुमध्ये त्याला आढळले; तसेंच युद्धांत आणि यज्ञकर्मांतहि ते उपलब्ध झाले २७. त॒रणिं॑ वो॒ जना॑नां त्र॒दं वाज॑स्य॒ गोम॑तः । तरणिम् । वः । जनानाम् । त्रदम् । वाजस्य । गोऽमतः । तुमच्या लोकांचा तारक, गोधनार्थ चाललेल्या सत्वयुद्धाचा पुरस्कर्ता आणि सर्वांशी समत्वाने वागणारा जो इन्द्र त्याचीच मी महती गायिली २८. ऋ॒भु॒क्षणं॒ न वर्त॑व उ॒क्थेषु॑ तुग्र्या॒वृध॑म् । ऋभुक्षणम् । न । वर्तवे । उक्थेषु । तुग्र्यऽवृधम् । सोम पिळून सिद्ध झाला आणि सामगायन सुरू झाले म्हणजे तुग्रांनी ज्याचे महात्म्य वृद्धिंगत केले त्या ऋभुप्रतिपालक इन्द्राला यज्ञमंडपांतून कोणीहि माघारें वळवूं शकत नाही २९. यः कृ॒न्तदिद्वि यो॒न्यं त्रि॒शोका॑य गि॒रिं पृ॒थुम् । यः । कृन्तत् । इत् । वि । योन्यम् । त्रिऽशोकाय । गिरिम् । पृथुम् । पुष्कळ नद्यांचा उगन ज्याच्या ठिकाणी असतो अशा एका विशाल पर्वताचा ज्याने त्रिशोकाकरितां भेंद केला, आणि उदकरूप धेनूंना जाण्याकरिता वाट करून दिली; ३०. यद्द॑धि॒षे म॑न॒स्यसि॑ मन्दा॒नः प्रेदिय॑क्षसि । यत् । दधिषे । मनस्यसि । मन्दानः । प्र । इत् । इयक्षसि । असा तूं इन्द्र जें जें मनांत आणशील, आणि हर्षोल्लसित होऊन जे जे योजलें असशील तें तें तूं पार पाडणार नाहीस काय ? म्हणूनच हे इन्द्रा, आम्हांवर कृपा कर ३१. द॒भ्रं चि॒द्धि त्वाव॑तः कृ॒तं शृ॒ण्वे अधि॒ क्षमि॑ । दभ्रम् । चित् । हि । त्वाऽवतः । कृतम् । शृण्वे । अधि । क्षमि । तुझ्यासारख्याने यत्किंचित् जरी केले तरी ते जगांत लागलीच चोहोकडे माहित होते, तर हे इन्द्रा, तुझे लक्ष आमच्याकडे लागो ३२. तवेदु॒ ताः सु॑की॒र्तयोऽस॑न्नु॒त प्रश॑स्तयः । तव । इत् । ऊं इति । ताः । सुऽकीर्तयः । असन् । उत । प्रऽशस्तयः । इन्द्रा, तूं आम्हावर कृपा करशील तरच त्या सत्कीर्ति, आणि ती उत्कृष्ट वर्णने तुझींच होती असे लोक समजतील ३३. मा न॒ एक॑स्मि॒न्नाग॑सि॒ मा द्वयो॑रु॒त त्रि॒षु । मा । नः । एकस्मिन् । आगसि । मा । द्वयोः । उत । त्रिषु । आमच्याकडून एक अपराध होवो, दोन होवोत, तीन होवोत, किंवा पुष्कळ होवोत, परंतु हे वीरा, तूं आमचा नाश करूं नको ३४. बि॒भया॒ हि त्वाव॑त उ॒ग्राद॑भिप्रभ॒ङ्गिणः॑ । बिभय । हि । त्वाऽवतः । उग्रात् । अभिऽप्रभङ्गिनः । तुझ्यासारख्या भीषणस्वरूपाला, शत्रुच्या ठिकऱ्या ठिकर्या उडवून देणार्याला, आणि विलक्षण पराक्रम करणार्याला पाहून, मी स्वतः जरी प्रतिस्पर्ध्यास पादाक्रांत करणारा आहे. तरी सुद्धा भिऊन गेलो. ३५ मा सख्युः॒ शून॒मा वि॑दे॒ मा पु॒त्रस्य॑ प्रभूवसो । मा । सख्युः । शूनम् । आ । विदे । मा । पुत्रस्य । प्रभुवसो इति प्रभुऽवसो । माझा मित्र किंवा माझा पुत्र यांची दुःस्थिति पाहण्याचे, हे अपारधनाढ्या देवा, माझ्या नशिबी आणूं नको; देवा, तुझें अंतःकरण आमच्याकरितां कळवळून जावो ३६. को नु म॑र्या॒ अमि॑थितः॒ सखा॒ सखा॑यमब्रवीत् । कः । नु । मर्याः । अमिथितः । सखा । सखायम् । अब्रवीत् । मानव हो ! ज्याला खरोखरच काही त्रास झाला नाही असा कोणी मनुष्य आपल्या जिवलग मित्रास कधी तरी असें म्हणेल काय की अमक्याने आम्हांला मारले, किंवा अमका आम्हांला सोडून गेला ? ३७. ए॒वारे॑ वृषभा सु॒तेऽसि॑न्व॒न्भूर्या॑वयः । एवारे । वृषभ । सुते । असिन्वन् । भूरि । आवयः । हे वीरपुंगवा, सोमरस पिळून असाच जवळ आणला की तूं समृद्धीचे भाण्डार खुलें करतोस, शिकारी मनुष्य आपले श्वान एकदम मोकळें करतो त्याप्रमाणे मोकळें करतोस, ३८. आ त॑ ए॒ता व॑चो॒युजा॒ हरी॑ गृभ्णे सु॒मद्र॑था । आ । ते । एता । वचःऽयुजा । हरी इति । गृभ्णे । सुमत्ऽरथा । ते तुझे कल्याणकारक, रथाला योग्य, आणि हां हां म्हणतां जोडले जाणारे हरिद्वर्ण अश्व मी हाती धरून तुजजवळ आणतो म्हणजे आम्हां "ब्रह्म" स्तोत्र म्हणणारांना तूं इच्छित वरदान देशीलच. ३९. भि॒न्धि विश्वा॒ अप॒ द्विषः॒ परि॒ बाधो॑ ज॒ही मृधः॑ । भिन्धि । विश्वाः । अप । द्विषः । परि । बाधः । जहि । मृधः । यच्चावत् द्वेष्ट्यांचा उच्छेद कर; भक्तांना पीडा करणाऱ्या दुष्टांचे समुदाय ठार कर, आणि जे निधान स्पृहणीय आहे तें आम्हांस अर्पण कर. ४०. यद्वी॒ळावि॑न्द्र॒ यत्स्थि॒रे यत्पर्शा॑ने॒ परा॑भृतम् । यत् । वीळौ । इन्द्र । यत् । स्थिरे । यत् । पर्शाने । पराऽभृतम् । इन्द्रा, तें निधान जरी कठिण स्थळी, अचल जागीं, किंवा अवघड खोल ठिकाणीं जपून ठेवलेलें असलें तरी तें स्पृहणीय निधान तूं आम्हांस दे. ४१ यस्य॑ ते वि॒श्वमा॑नुषो॒ भूरे॑र्द॒त्तस्य॒ वेद॑ति । यस्य । ते । विश्वऽमानुषः । भूरेः । दत्तस्य । वेदति । विपुल ऐश्चर्य तूंत्र दिलेंस असें सर्व मनुष्य म्हणतील, तेच स्पृहणीय निधान तूं आम्हांस दे. ४२. ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ४६ ( ) ऋषी - देवता - छंद - त्वाव॑तः पुरूवसो व॒यमि॑न्द्र प्रणेतः । त्वाऽवतः । पुरुवसो इति पुरुऽवसो । वयम् । इन्द्र । प्रनेतरिति प्रऽनेतः । हे अपारनिधे देवा, हे सन्मार्ग धुरीण, हे हरिद्वर्ण अश्वांवर आरुढ होणार्या इन्द्रा, आम्हीं भक्त तुझ्यावर अवलंबून आहोत १. त्वां हि स॒त्यम॑द्रिवो वि॒द्म दा॒तार॑मि॒षाम् । त्वाम् । हि । सत्यम् । अद्रिऽवः । विद्म । दातारम् । इषाम् । तूंच खरोखर, हे वज्रधरा, मनोत्साह देणारा आहेस हे आम्ही जाणतो, आणि ऐश्वर्य देणारा तूंच आहेस हेंहि आम्ही जाणतो. २. आ यस्य॑ ते महि॒मानं॒ शत॑मूते॒ शत॑क्रतो । आ । यस्य । ते । महिमानम् । शतम्ऽऊते । शतक्रतो इति शतऽक्रतो । हे अनंतायुधा, हे अपारकर्तृत्वा, तुझा महिमा स्तुतिकीर्तनांनी कविजन वर्णन करीत असतात ३. सु॒नी॒थो घा॒ स मर्त्यो॒ यं म॒रुतो॒ यम॑र्य॒मा । सुऽनीथः । घ । सः । मर्त्यः । यम् । मरुतः । यम् । अर्यमा । ज्याचें संरक्षण मरुत् करीत असतात, किंवा ज्याचे संरक्षण द्वेषापासून अलिप्त असे अर्यमा आणि मित्र हे करीत असतात तो मनुष्य सन्मार्गवर्तीच असतो ४. दधा॑नो॒ गोम॒दश्व॑वत्सु॒वीर्य॑मादि॒त्यजू॑त एधते । दधानः । गोऽमत् । अश्वऽवत् । सुऽवीर्यम् । आदित्यऽजूतः । एधते । त्याला गोधन, अश्वधन, आणि शूर सैनिकांनी संपन्न अशा ऐश्वर्याचा लाभ होतो; जो आदित्याच्या प्रेरणे प्रमाणें वागतो तो अशा ऐश्वर्यानें समृद्ध होतो की ते ऐश्वर्य पाहून इतरांस चुटपुटच लागावी. ५. तमिन्द्रं॒ दान॑मीमहे शवसा॒नमभी॑र्वम् । तम् । इन्द्रम् । दानम् । ईमहे । शवसानम् । अभीर्वम् । ज्याचे बळ अत्युत्कट, आहे, ज्याला भय कसे ते माहीतच नाही असा जगत्प्रभु जो इन्द्र, त्याच्याजवळ आम्ही अढळ संपत्तीचे दान मागतों. ६. तस्मि॒न्हि सन्त्यू॒तयो॒ विश्वा॒ अभी॑रवः॒ सचा॑ । तस्मिन् । हि । सन्ति । ऊतयः । विश्वाः । अभीरवः । सचा । कोणासहि न भिणाऱ्या अशा सर्व शक्ति त्याच्याच ठिकाणीं वास करतात. अशा त्या अपारनिधि इन्द्राला त्याचे हरिद्वर्ण अश्व हर्षनिर्भर करण्यासाठी सोमरसाकडे घेऊन येवोत. ७. यस्ते॒ मदो॒ वरे॑ण्यो॒ य इ॑न्द्र वृत्र॒हन्त॑मः । यः । ते । मदः । वरेण्यः । यः । इन्द्र । वृत्रहन्ऽतमः । हे इन्द्रा, तुझा अत्युत्कट सोमहर्ष असा आहे की, तो वृत्राचा अगदी समूळ नाश करून टाकतो; तो भक्तांना स्वर्गीय प्रकाशाचे वरदान देतो आणि शूरांसह-संग्रामामध्ये अजिंक्य होतो ८. यो दु॒ष्टरो॑ विश्ववार श्र॒वाय्यो॒ वाजे॒ष्वस्ति॑ तरु॒ता । यः । दुस्तरः । विश्वऽवार । श्रवाय्यः । वाजेषु । अस्ति । तरुता । हे अखिलजन संसेव्या, तुं अनिवार आहेस, आणि सत्वसामर्थ्याच्या झटापटींत भक्ततारक म्हणून गाजत आहेस, तो तूं, हे अत्युत्कटबला इन्द्रा, आमच्या सोमयागाकडे आगमन कर, म्हणजे हे अक्षयनिधे देवा, ज्ञानधेनूंनी गजबजलेल्या ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचूं. ९. ग॒व्यो षु णो॒ यथा॑ पु॒राश्व॒योत र॑थ॒या । गव्यो इति । सु । नः । यथा । पुरा । अश्वऽया । उत । रथऽया । पूर्वीप्रमाणेच आतांहि गोधनाविषयींच्या, अश्वांविषयींच्या, आणि रथाविषयींच्या आमच्या इच्छेनुसार, हे महातेजा इन्द्रा , तूं आम्हांस वरदान दे. १०. न॒हि ते॑ शूर॒ राध॒सोऽन्तं॑ वि॒न्दामि॑ स॒त्रा । नहि । ते । शूर । राधसः । अन्तम् । विन्दामि । सत्रा । हे शूरा, तुझ्या कृपादानाचा अन्त खरोखरच मला लागणार नाहीं; तरी आम्ही मागतों तें दान, हे दातृश्रेष्ठा, वज्रधरा, तूं आम्हांस दे, अणि सात्विक सामर्थ्यांनी आमच्या बुद्धीची जोपासना कर. ११. य ऋ॒ष्वः श्रा॑व॒यत्स॑खा॒ विश्वेत्स वे॑द॒ जनि॑मा पुरुष्टु॒तः । यः । ऋष्वः । श्रवयत्ऽसखा । विश्वा । इत् । सः । वेद । जनिम । पुरुऽस्तुतः । जो अत्युदात्त आहे, ज्याची महती भक्तजन सदैव गातात तोच सर्वजनस्तुत इन्द्र प्राणिमात्रांचे सर्व जन्म जाणतो. त्याच तीव्रबलशाली इन्द्राला सर्व भक्तजन स्रुचा हाती घेऊन पि्ढ्यान् पिढ्या आहुति अर्पण करीत आले आहेत १२. स नो॒ वाजे॑ष्ववि॒ता पु॑रू॒वसुः॑ पुरःस्था॒ता म॒घवा॑ वृत्र॒हा भु॑वत् ॥ १३ ॥ सः । नः । वाजेषु । अविता । पुरुऽवसुः । पुरःऽस्थाता । मघऽवा । वृत्रऽहा । भुवत् ॥ १३ ॥ सत्वसामर्थ्याच्या झुंजांत तो दिव्यनिधिसंपन्न, दातृश्रेष्ठ, वृत्रनाशन इन्द्र आमचा नायक आणि संरक्षक झाला १३. अ॒भि वो॑ वी॒रमन्ध॑सो॒ मदे॑षु गाय गि॒रा म॒हा विचे॑तसम् । अभि । वः । वीरम् । अन्धसः । मदेषु । गाय । गिरा । महा । विऽचेतसम् । सोमपेयाच्या हर्षांत तुमच्या त्या शूरवीर महाप्राज्ञ, इन्द्राप्रीत्यर्थ मोठ्या रसभरीत वाणीने गायन कर; त्याच्या सर्वसमर्थ विख्यात नांवाचें , जसें सूक्त असेल त्याप्रमाणे संकीर्तन कर. १४ द॒दी रेक्ण॑स्त॒न्वे॑ द॒दिर्वसु॑ द॒दिर्वाजे॑षु पुरुहूत वा॒जिन॑म् । ददिः । रेक्णः । तन्वे । ददिः । वसु । ददिः । वाजेषु । पुरुऽहूत । वाजिनम् । तूं संपत्तीचा दाता, शरीराचा दाता आणि अभीष्ट निधीचा दाता आहेस. हे सर्वजनस्तुता, सत्वसामर्थ्याच्या लढाईत देखील सत्ववीराला तूं तें तत्काळ देतोस. १५ विश्वे॑षामिर॒ज्यन्तं॒ वसू॑नां सास॒ह्वांसं॑ चिद॒स्य वर्प॑सः । विश्वेषाम् । इरज्यन्तम् । वसूनाम् । ससह्वांसम् । चित् । अस्य । वर्पसः । अखिल भुवनांचा प्रेरक, दिव्यनिधींना स्वपराक्रमानें हस्तगत करणारा, आणि ह्या मानवी देहाचा कल्पक अशा इन्द्राचे आतांच्या आतां वेळ न घालवितां मी स्तवन करतो. १६. म॒हः सु वो॒ अर॑मिषे॒ स्तवा॑महे मी॒ळ्हुषे॑ अरंग॒माय॒ जग्म॑ये । महः । सु । वः । अरम् । इषे । स्तवामहे । मीळ्हुषे । अरम्ऽगमाय । जग्मये । तो अत्यंत थोर आहे. त्याच्या विषयी मला पूर्ण उत्साह वाटतो. मनोरथांची वृष्टि करणारा, स्वेच्छेने लीला करणारा आणि सर्वसंचारी अशा त्या देवाप्रीत्यर्थ यज्ञप्रसंगी म्हटल्या जाणार्या पद्यांनी आम्हीं स्तवन करतो. देवा , सकलजनहितकारी अशा मरुतांना यजनीय तूंच आहेस, तुजला प्रणिपात करून आम्ही स्तवनांनी तुझेच गुण गायन करतो. १७. ये पा॒तय॑न्ते॒ अज्म॑भिर्गिरी॒णां स्नुभि॑रेषाम् । ये । पातयन्ते । अज्मऽभिः । गिरीणाम् । स्नुऽभिः । एषाम् । जे मरुत् आपल्या वेगाच्या झपाट्यासरशी गिरिशिखरेंच केवळ नव्हे, तर मोकाट बढाईखोरांचे यज्ञ आणि उगाचच मोठ्याने गुरकावणार्यांची चैनबाजी या सर्वांना एकदमत्र भिरकावून देतात. १८. प्र॒भ॒ङ्गं दु॑र्मती॒नामिन्द्र॑ शवि॒ष्ठा भ॑र । प्रऽभङ्गम् । दुःऽमतीनाम् । इन्द्र । शविष्ठ । आ । भर । दुष्टबुद्धि लोकांचे कमरडेंच मोडेल असे सामर्थ्य, हे अत्युत्कट बलाढ्या, तूं आम्हांमध्ये आण. आणि आमच्या स्वभावाला जुळेल असे वैभव, हे बुद्धिप्रेरका, आम्हांला दे. अगदी पहिल्या प्रतीचे वैभव, हे बुद्धिप्रेरका आम्हांला दे. १९. सनि॑तः॒ सुस॑नित॒रुग्र॒ चित्र॒ चेति॑ष्ठ॒ सूनृ॑त । सनितरिति । सुऽसनितः । उग्र । चित्र । चेतिष्ठ । सूनृत । है उदारा, हे अत्युदारा, हे शत्रुभयंकरा, हे अद्भुतदर्शन, हे चिद्रूपा, हे मधुर सत्यस्वरूपा, हे अरिर्मदना, हे विश्वाधिराजा; तें वैभव असें दे की जे दुर्दम्य असेल, जें शत्रूंना पादाक्रांत करील, जे लोकांचे पोषण करील, आणि सत्वयुद्धांत अग्रेसर ठरेल. २०. आ स ए॑तु॒ य ईव॒दाँ अदे॑वः पू॒र्तमा॑द॒दे । आ । सः । एतु । यः । ईवत् । आ । अदेवः । पूर्तम् । आऽददे । कानीताचा पुत्र पृथुश्रवसा त्याच्या राजवटीत वश अश्व्य याला आज सकाळीं जितक्या वस्तु मिळाल्या तितक्या ज्याला भरपूर मिळाल्या असतील असा एखादा नास्तिक जरी असला तरी त्याला पुढे येऊं द्या. २१ ष॒ष्टिं स॒हस्राश्व्य॑स्या॒युता॑सन॒मुष्ट्रा॑नां विंश॒तिं श॒ता । षष्टिम् । सहस्रा । अश्व्यस्य । अयुता । असनम् । उष्ट्रानाम् । विंशतिम् । शता । ती देणगी किती मिळाली म्हणाल तर त्यांतील अश्वांची संख्या साठ हजार, उंटांची संख्या दहा हजार आणि एक हजार वीस, काळ्या घोड्या एक हजार, आणि तीन प्रकारच्या तांबड्या गाई दहा हजार इतकी जनावरें होती २२. दश॑ श्या॒वा ऋ॒धद्र॑यो वी॒तवा॑रास आ॒शवः॑ । दश । श्यावाः । ऋधत्ऽरयः । वीतऽवारासः । आशवः । शेपट्या पिंजारून वाढत्या वेगानें धांवणारे दहा जोरदार श्यामकर्णवारू; ते असे की, त्यांना चाबकानें इषारा केल्याबरोबर रथाची चाकें भरकन फिरूं लागतात २३. दाना॑सः पृथु॒श्रव॑सः कानी॒तस्य॑ सु॒राध॑सः । दानासः । पृथुऽश्रवसः । कानीतस्य । सुऽराधसः । महाऔदार्यशाली कानीताचा पुत्र पृथुश्रवा याच्या देणग्यांमध्येच त्याने एक सोन्याचा रथ दिला; त्यामुळे तो राजा अत्यंत उदार असा गणला जाऊन त्यानें अलौकिक कीर्ति संपादन केली २४ आ नो॑ वायो म॒हे तने॑ या॒हि म॒खाय॒ पाज॑से । आ । नः । वायो इति । महे । तने । याहि । मखाय । पाजसे । हे वायु, आमच्या ह्या मोठ्या यज्ञ समारंभाला, तो आमचा यज्ञ तेजोबलयुक्त व्हावा म्हणून, तूं आगमन कर; तुझ्या दातृत्वाच्या योगानें आम्ही पूर्वी पुष्कळ कार्य केले आहे, तसेच तुझ्या महनीय दातृत्वाने आतांहि करूं. २५. यो अश्वे॑भि॒र्वह॑ते॒ वस्त॑ उ॒स्रास्त्रिः स॒प्त स॑प्तती॒नाम् । यः । अश्वेभिः । वहते । वस्ते । उस्राः । त्रिः । सप्त । सप्ततीनाम् । उषा प्रकाशली असतां हे वायु जो तूं सत्तर सत्तर अश्वांचे एकवीस समुदाय घेऊन संचार करतोस, तो तूं , हे सोमप्रिया, या सोमरसासह, ह्या सोमार्पण करणारांसह उद्युक्त हो. तेजस्वी आणि पवित्र सोमरस प्राशन करणाऱ्या वायुदेवा, आम्हांस वरदान देण्यास उद्युक्त हो २६. यो म॑ इ॒मं चि॑दु॒ त्मनाम॑न्दच्चि॒त्रं दा॒वने॑ । यः । मे । इमम् । चित् । ऊं इति । त्मना । अमन्दत् । चित्रम् । दावने । ज्याने हे इतकें वैभव मला आपण होऊन देण्याकरितां त्या राजास हर्षनिर्भर केलें, तो पुण्यशील नहुषराजा "अरट्वा"चा अक्ष असलेल्या रथावर अधिष्ठित झाला; त्या वेळी महाकर्तृत्वशाली वायुहि आपले कर्तृत्व आणखी गाजविण्यास प्रवृत्त झाला २७. उ॒च॒थ्ये॒॑३ वपु॑षि॒ यः स्व॒राळु॒त वा॑यो घृत॒स्नाः । उचथ्ये । वपुषि । यः । स्वऽराट् । उत । वायो इति । घृतऽस्नाः । तसेंच, हे वायुदेवा, तुझ्या प्रशंसनीय शरीराविषयी पाहिले तर तूं स्वतंत्रच आहेस. घृताभिषिक्त जर कोणी असेल तर हे वायू तूंच आहेस. जे अश्वाला हवेंसे वाटते, उंटालाही पाहिजे असते, श्वानालाहि हवे असते असे काय, तर गमनवेग; आणि तो ह्या प्रकारचाः २८. अध॑ प्रि॒यमि॑षि॒राय॑ ष॒ष्टिं स॒हस्रा॑सनम् । अध । प्रियम् । इषिराय । षष्टिम् । सहस्रा । असनम् । उत्साही भक्ताला प्रिय अशी देणगी म्हणजे साठ हजारघोड्यांचे पथक, आणि त्याचप्रमाणे जोमदार बैलांचा एक तांडा अशी मिळाली. २९. गावो॒ न यू॒थमुप॑ यन्ति॒ वध्र॑य॒ उप॒ मा य॑न्ति॒ वध्र॑यः ॥ ३० ॥ गावः । न । यूथम् । उप । यन्ति । वध्रयः । उप । मा । आ । यन्ति । वध्रयः ॥ ३० ॥ ज्याप्रमाणे गाई गोठ्याकडे धांवतात त्याप्रमाणे हे ओझ्याचे बैंल मजकडेच आले. ३०. अध॒ यच्चार॑थे ग॒णे श॒तमुष्ट्राँ॒ अचि॑क्रदत् । अध । यत् । चारथे । गणे । शतम् । उष्ट्रान् । अचिक्रदत् । पशूंचा जो एक मोठा समुदाय चरत होता त्यांतील शंभर उंटांना त्यानें ओरडून हाक मारली, आणि पांढरे कुत्रे होते त्यातील एकशें वीस कुत्र्यांना इषारा केला. ३१. श॒तं दा॒से ब॑ल्बू॒थे विप्र॒स्तरु॑क्ष॒ आ द॑दे । शतम् । दासे । बल्बूथे । विप्रः । तरुक्षे । आ । ददे । बल्बूथ, तुरुष्क इत्यादि म्लेंच्छ जाती पैकीं शंभर दास त्या भक्ताला मिळाले; हे वायुदेवा, तेच हे भक्त इन्द्राच्या संरक्षणाने, देवाच्या संरक्षणाने, हर्षनिर्भर होतात ३२. अध॒ स्या योष॑णा म॒ही प्र॑ती॒ची वश॑म॒श्व्यम् । अध । स्या । योषणा । मही । प्रतीची । वशम् । अश्व्यम् । त्याचप्रमाण ही थोर, सर्वप्रकारे अनुकूल आणि सुवर्णालंकारांनी नटलेली सुंदरी मज वश अश्व्याकडे त्यांनी आणली आहे ३३. ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ४७ ( ) ऋषी - देवता - छंद - महि॑ वो मह॒तामवो॒ वरु॑ण॒ मित्र॑ दा॒शुषे॑ । महि । वः । महताम् । अवः । वरुण । मित्र । दाशुषे । हे आदित्यानों, दुष्टांच्या द्वेषापासून ज्या भक्ताचें रक्षण तुम्ही करतां त्याला पातक स्पर्श सुद्धां करूं शकत नाही; इतक्या तुमच्या सहायकशक्ती निराबाध असतात; तुमच्या सहायकशक्ती इतक्या उत्कृष्ट सहायकारी असतात. १. वि॒दा दे॑वा अ॒घाना॒मादि॑त्यासो अ॒पाकृ॑तिम् । विद । देवाः । अघानाम् । आदित्यासः । अपऽआकृतिम् । हे देवानो, हे आदित्यानों, आमच्या पातकाचा परिहार कसा करावा हे तुम्हांलाच माहित आहे. पक्षी जसे आपले पंख पिलांवर पसरतात त्याप्रमाणे तुमच्या कृपेची पाखर अम्हांवर करा; कारण तुमच्या सहायशक्ती उत्कृष्ट असतात २. व्य॒॑१स्मे अधि॒ शर्म॒ तत्प॒क्षा वयो॒ न य॑न्तन । वि । अस्मे इति । अधि । शर्म । तत् । पक्षा । वयः । न । यन्तन । पक्षी आपले पंख पसरतात त्याप्रमाणे तुमच्या त्या कल्याणकारी कृपेचे छत्र आम्हांवर टेवा, म्हणजे हे सर्वज्ञ देवांनों, त्यांत यच्चावत् संरक्षणे आलीच असे आम्ही समजतों: कारण तुमच्या सहायशक्ति उत्कृष्ट सहायकारी असतात ३. यस्मा॒ अरा॑सत॒ क्षयं॑ जी॒वातुं॑ च॒ प्रचे॑तसः । यस्मै । अरासत । क्षयम् । जीवातुम् । च । प्रऽचेतसः । सर्व काही सूक्ष्म दृष्टीने पाहणाऱ्या देवांनों, ज्याला तुम्हीं आसरा दिला, ज्याला जीवनाचा मार्ग दाखविला, त्या मनुष्यासाठीच आदित्य हे जगांतील सर्व वैभवावर आपला अधिकार चालवीत असतात ४. परि॑ णो वृणजन्न॒घा दु॒र्गाणि॑ र॒थ्यो॑ यथा । परि । नः । वृणजन् । अघा । दुःऽगानि । रथ्यः । यथा । हुषार सारथी मार्गांतील खांचखळगे टाळून रथ हांकतात, त्याप्रमाणे आमचे रथी (इन्द्रियें) पातकांना बाजूस ढकलून देवोतः अशा करितां की त्यामुळे आम्ही इन्द्राच्या कल्याणकारी आश्रयाखाली राहूं, आदित्यांच्या कृपाछत्राखाली राहूं. ५. प॒रि॒ह्वृ॒तेद॒ना जनो॑ यु॒ष्माद॑त्तस्य वायति । परिऽह्वृता । इत् । अना । जनः । युष्माऽदत्तस्य । वायति । कारण यातनांनी गांजलेला असा जो जो मनुष्य असेल त्याच्याकडे, हे देवांनो, हे भक्ताकडे धांवत जाणाऱ्या आदित्यांनो, तुम्ही जाऊन पोहोंचलांत, कीं, तो मनुष्य तुम्ही दिलेल्या वरदानाचा उदर वाटेकरी होतो. कारण तुमच्या सहायकशक्ति उत्कृष्ट सहायकारी असतात ६. न तं ति॒ग्मं च॒न त्यजो॒ न द्रा॑सद॒भि तं गु॒रु । न । तम् । तिग्मम् । चन । त्यजः । न । द्रासत् । अभि । तम् । गुरु । त्याला कोणाताहि भयंकर दोष बाधत नाही, कोणतेहि जडभारी अरिष्ट त्याच्यावर कोसळत नाही. हे आदित्यांनो, ज्याला तुम्ही आपला आश्रय देतां त्यालाच हा लाभ घडतो. ७. यु॒ष्मे दे॑वा॒ अपि॑ ष्मसि॒ युध्य॑न्त इव॒ वर्म॑सु । युष्मे इति । देवाः । अपि । स्मसि । युध्यन्तःऽइव । वर्मऽसु । हे देवांनो, तुमच्या छत्राखाली असतांना अंगावर चिलखत घालून लढावे त्याप्रमाणे आम्हीं सुरक्षित राहतो; तर आमचे पातक घोर असो किंवा क्षुल्लक असो त्याच्यापासून तुम्ही आम्हांस मुक्त करा. ८. अदि॑तिर्न उरुष्य॒त्वदि॑तिः॒ शर्म॑ यच्छतु । अदितिः । नः । उरुष्यतु । अदितिः । शर्म । यच्छतु । अनंतअदिति आम्हांस मुक्त करो, अदिति कल्याणप्रद स्थान देवो, भगवान् मित्राची, अर्यमाची, वरुणाची ती माता होय ९. यद्दे॑वाः॒ शर्म॑ शर॒णं यद्भ॒द्रं यद॑नातु॒रम् । यत् । देवाः । शर्म । शरणम् । यत् । भद्रम् । यत् । अनातुरम् । देवांनो, ज्यापासून आश्रय लाभतो, ज्यापासून उत्कर्ष होतो, ज्यापासून आरोग्य लाभते अशा प्रकारचे जें तिहेरी कवचाप्रमाणे आहे, ते कल्याण आम्हास अर्पण करा. १०. आदि॑त्या॒ अव॒ हि ख्यताधि॒ कूला॑दिव॒ स्पशः॑ । आदित्याः । अव । हि । ख्यत । अधि । कूलात्ऽइव । स्पशः । पोहोणाराने उडी टाकण्याकरितां तीरावरून खाली पाहावें त्या प्रमाणे, हे, आदित्यानों, तुम्ही आम्हांकडे खाली दृष्टि फेंका. अश्वारूढ सैनिक पाण्याला उतार असेल तेथून घोड्याला नेतो, त्याप्रमाणे आम्हाला सुगम मार्गानें न्या. ११ नेह भ॒द्रं र॑क्ष॒स्विने॒ नाव॒यै नोप॒या उ॒त । न । इह । भद्रम् । रक्षस्विने । न । अवऽयै । न । उपऽयै । उत । या जगांत राक्षसीवृत्ती धरणाराचे कल्याण कधीं न होवो. आमचा घात करूं पाहणाराचे कधीं न होवो, आणि तसेच हळूच आमच्याजवळ येऊन उपद्रव करूं पाहणाराचेंहि न होवो. पण धेनूंना सुख होवो, आणि यशःप्राप्तिसाठी झगडणार्या वीराचे कल्याण असो. १२ यदा॒विर्यद॑पी॒च्यं॒॑१ देवा॑सो॒ अस्ति॑ दुष्कृ॒तम् । यत् । आविः । यत् । अपीच्यम् । देवासः । अस्ति । दुःऽकृतम् । देवानों जे काही पापकर्म आम्हीं उघडपणे केले असेल, जे कांही गुप्तपणे केलेले असेल तें तें सर्व आमच्यापासून त्रितआप्त्य याच्याकडे दूर पोहोचवून द्या. कारण० १३, यच्च॒ गोषु॑ दु॒ष्ष्वप्न्यं॒ यच्चा॒स्मे दु॑हितर्दिवः । यत् । च । गोषु । दुःऽस्वप्न्यम् । यत् । च । अस्मे इति । दुहितः । दिवः । हे द्युकन्यके उषे, जे जे दुःस्वप्न आम्हांला अथवा आमच्या धेनूंना बाधक असेल तें तें, हे उज्ज्वलप्रभाशालिनी उषे, तुं त्रितआप्त्य याच्याकडे दूर पोहोंचीव. १४. नि॒ष्कं वा॑ घा कृ॒णव॑ते॒ स्रजं॑ वा दुहितर्दिवः । निष्कम् । वा । घ । कृणवते । स्रजम् । वा । दुहितः । दिवः । हे द्युकन्यके, त्या दुःस्वप्नांचा तो अलंकार करो, किंवा एक माळच्या माळ बनवो: परंतु आम्ही आपले एकंदर दुःस्वप्न त्रितआप्त्याच्या ठिकाणी ठेऊन देऊ असें कर १५. तद॑न्नाय॒ तद॑पसे॒ तं भा॒गमु॑पसे॒दुषे॑ । तत्ऽअन्नाय । तत्ऽअपसे । तम् । भागम् । उपऽसेदुषे । तसलेंच दुःस्वप्नरूप अन्न सेवन करणारा, तसलेच काम करणारा, आणि त्याच दुःस्वप्न भागाचा स्वीकार करणारा जो त्रितआप्त्य, आणि द्वित आप्त्य, त्याच्याकडे, हे उषे, आमचे दुःस्वप्न पोहोचवून दे. १६. यथा॑ क॒लां यथा॑ श॒फं यथ॑ ऋ॒णं सं॒नया॑मसि । यथा । कलाम् । यथा । शफम् । यथा । ऋणम् । सम्ऽनयामसि । यज्ञपशुच्या अंगांतील कला आणि त्याचे खूर सुद्धा झाडून सारे अवयव अम्ही ज्याप्रमाणे दुसरीकडे नेऊन टाकतों, किंवा ज्याप्रमाणे घेतलेले कर्ज आम्ही पैंन पै देऊन टाकतो. त्याप्रमाणे आमचे सर्व दुःस्वप्न आम्ही त्रित आप्त्यापाशी नेऊन ठेवतों १७. अजै॑ष्मा॒द्यास॑नाम॒ चाभू॒माना॑गसो व॒यम् । अजैष्म । अद्य । असनाम । च । अभूम । अनागसः । वयम् । याप्रमाणे आज आम्ही जय मिळविला आहे, लाभ संपादन केला आहे, आम्ही पापमुक्त झालों आहों. तर हे उषे, पहा, की ज्या दुःखस्वप्नाने आम्ही भेदरलो होतों ते दुःस्वप्न तुझ्या तेजस्वी कांतीने दूर नाहीसे होवो, हे विबुधांनो, तुमच्या सहायक शक्ति निराबाध असतात तुमच्या शक्ति उत्कृष्ट सहायकारी असतात. १८. ऋग्वेद - मण्डल ८ सूक्त ४८ ( ) ऋषी - देवता - छंद - स्वा॒दोर॑भक्षि॒ वय॑सः सुमे॒धाः स्वा॒ध्यो॑ वरिवो॒वित्त॑रस्य । स्वादोः । अभक्षि । वयसः । सुऽमेधाः । सुऽआध्यः । वरिवोवित्ऽतरस्य । मधुर आणि अतिशय सुखप्रद अशा तारुण्य दायी सोमाचा मीं आस्वाद घेतला. मी उत्तम बुद्धिमान आहे, देवाच्या ठिकाणी उत्तम रीतीने लक्ष लावणारा आहे; दिव्यविभूति आणि मनुष्ये हीं सर्वच त्या सोमाला फारच मिष्ट असे म्हणून त्याचा आस्वाद घेण्याकरितां त्याच्या भोंवती फिरत राहतात १. अ॒न्तश्च॒ प्रागा॒ अदि॑तिर्भवास्यवया॒ता हर॑सो॒ दैव्य॑स्य । अन्तरिति । च । प्र । अगाः । अदितिः । भवासि । अवऽयाता । हरसः । दैव्यस्य । तूं आत हृदयांत शिरलास; तेव्हां आतां तूं अदितीच अनाद्यनंत झालास. दैवी कोपाचा तूं उपशम करणारा आहेस, तर हे सोमरसा, इंद्राचे मन प्रसन्न करून श्रौष्टी प्रमाणें आमच्या वाहनाची धुरा दिव्यवैभवाकडे कर २. अपा॑म॒ सोम॑म॒मृता॑ अभू॒माग॑न्म॒ ज्योति॒रवि॑दाम दे॒वान् । अपाम । सोमम् । अमृताः । अभूम । अगन्म । ज्योतिः । अविदाम । देवान् । आम्ही दिव्यरसाचें प्राशन केलें; आम्ही अमर झालो; दिव्यप्रकाशाला पावलो आणि देवांना ओळखलें. आतां धर्मविमुख दुष्ट आमचे काय करणार ? हे अमरदेवा, मनु 'याची कावेबाजी तरी आमचे काय वांकडे करणार ? ३. शं नो॑ भव हृ॒द आ पी॒त इ॑न्दो पि॒तेव॑ सोम सू॒नवे॑ सु॒शेवः॑ । शम् । नः । भव । हृदे । आ । पीतः । इन्दो इति । पिताऽइव । सोम । सूनवे । सुऽशेवः । आल्हाददायका रसा आमचे कल्याण होऊं दे, देवांनी तुला प्राशन करून आपल्या हृदयांत ठेवले आहे; तर हे सोमा, प्रेमळ पिता जमा पुत्राला, सन्मित्र जसा मित्राला, त्यात्रमाणें हे प्रशंसनीय रसा तूं सुखकर हो; तूं सुबुद्धिप्रेरक होऊन हे सोमा, आमच्या उत्तमजीवनासाठीं आमचे आयुष्य तूं वृद्धिंगत कर ४. इ॒मे मा॑ पी॒ता य॒शस॑ उरु॒ष्यवो॒ रथं॒ न गावः॒ सम॑नाह॒ पर्व॑सु । इमे । मा । पीताः । यशसः । उरुष्यवः । रथम् । न । गावः । सम् । अनाह । पर्वऽसु । हे मीं प्राशन केलेले यशस्कर आणि पापनिर्मुक्त करणारे सोमरस, रथ आणि वृषभ जसे एकच जोडलेले असतात तसे माझ्या गात्रात अगदीं भिनून गेले आहेत. ते माझें रक्षण करोत, ते मला चारित्र्यापासून नष्ट न होऊं देवोत, मला रोगांपासूनही दूर ठेवोत. ५ अ॒ग्निं न मा॑ मथि॒तं सं दि॑दीपः॒ प्र च॑क्षय कृणु॒हि वस्य॑सो नः । अग्निम् । न । मा । मथितम् । सम् । दिदीपः । प्र । चक्षय । कृणुहि । वस्यसः । नः । घांसून प्रदीप्त झालेल्या अग्निप्रमाणे मला उज्ज्वल कर. आम्हाला उत्तम दृष्टि दे, नेहमा ऐन उमेदींत ठेव. हे सोमा, तुझ्या हर्षात असतांना मीं वैभवशाली आहेच असे वाटतें. तर तशीच समूद्धि तूं निरंतर चालीव ६ इ॒षि॒रेण॑ ते॒ मन॑सा सु॒तस्य॑ भक्षी॒महि॒ पित्र्य॑स्येव रा॒यः । इषिरेण । ते । मनसा । सुतस्य । भक्षीमहि । पित्र्यस्यऽइव । रायः । तुजला पिळून सिद्ध केला म्हणजे उत्साहशाली चित्ताने पित्याच्या धनाचा उपभोग घ्यावा त्याप्रमाणें आम्ही अढळ वैभवाचा उपभोग घेऊं: हैं सोमराजा, सूर्य जसा प्रकाशपूर्ण दिवस वाढवितो त्याप्रमाणे आमचे आयुष्य तूं वृद्धिंगत कर ७. सोम॑ राजन्मृ॒ळया॑ नः स्व॒स्ति तव॑ स्मसि व्र॒त्या॒३॒॑स्तस्य॑ विद्धि । सोम । राजन् । मृळय । नः । स्वस्ति । तव । स्मसि । व्रत्याः । तस्य । विद्धि । राजा सोमा, आम्हांवर कृपा कर: तुझा विजय असो. देवाच्या आज्ञेनुसार वागणारे आम्ही भक्त तुझे आहोंत हें लक्षांत घे. हे तेजस्वी पेया, तुझे चातुर्यबल आणि आवेश जागृत असतो; तं आमचा स्वामी आहेस, तर आम्हांस उगीच्या उगीच दूर सुकवून देऊं नको ८. त्वं हि न॑स्त॒न्वः॑ सोम गो॒पा गात्रे॑गात्रे निष॒सत्था॑ नृ॒चक्षाः॑ । त्वम् । हि । नः । तन्वः । सोम । गोपाः । गात्रेऽगात्रे । निऽससत्थ । नृऽचक्षाः । आमच्या देहाचा संरक्षक, हे सोमा, तूंच आहेस. मनुष्यांवर आपली दृष्टि ठेवणारा तूं आमच्या शरीराच्या नसनसात मुरून गेला आहेस. तुझ्या आज्ञेचे उल्लंघन आमच्याकडून होत असेल त्याची क्षमा कर: हे दिव्यरसा, तूं भक्तसखा, आम्हांला अभिलषणीयच आहेस. ९. ऋ॒दू॒दरे॑ण॒ सख्या॑ सचेय॒ यो मा॒ न रिष्ये॑द्धर्यश्व पी॒तः । ऋदूदरेण । सख्या । सचेय । यः । मा । न । रिष्येत् । हरिऽअश्व । पीतः । अंतःकरणाला प्रसन्नता देणारा भक्तसखा जो सोम त्याची कांस आम्ही सोडणार नाडी. हे हरिदश्वा देवा, त्याचें प्राशन करणारा जो मी त्याचा तो कधी घात करणार नाही. जो हा सोमरस आम्ही आमच्यामध्ये ठेवला आहे त्याच्यासाठी आयुष्यवर्धक इन्द्राला मी शरण जातो १०. अप॒ त्या अ॑स्थु॒रनि॑रा॒ अमी॑वा॒ निर॑त्रस॒न्तमि॑षीची॒रभै॑षुः । अप । त्याः । अस्थुः । अनिराः । अमीवाः । निः । अत्रसन् । तमिषीचीः । अभैषुः । व्याधि अंगांत पक्या खिळलेल्या होत्या त्या पार नाहीशा झाल्या; त्यांनीं आला फारच छळले, पण शेवटीं त्यांनींच अंधारांत तोंड दडविले. त्यांचीच गाळण उडाली. उदारधी सोम आमच्यांत अधिष्ठित झाला आहे, जेव्हां आतां आमचे आयुष्य वाढेल अशाच स्थितींला आम्ही पोहोचलो आहों. ११. यो न॒ इन्दुः॑ पितरो हृ॒त्सु पी॒तोऽम॑र्त्यो॒ मर्त्याँ॑ आवि॒वेश॑ । यः । नः । इन्दुः । पितरः । हृत्ऽसु । पीतः । अमर्त्यः । मर्त्यान् । आऽविवेश । हे पितरांनो, हा सोमरस आम्ही अमच्या हृदयांत ओतला आहे. हा अमर रस आम्हां मर्त्य मानवांत प्रविष्ट झाला आहे, अशा त्या सोमाला आम्ही हविर्दानानें संतुष्ट करून-त्याच्या सौजन्याच्या छायेखालीं राहूं. १२ त्वं सो॑म पि॒तृभिः॑ संविदा॒नोऽनु॒ द्यावा॑पृथि॒वी आ त॑तन्थ । त्वम् । सोम । पितृऽभिः । सम्ऽविदानः । अनु । द्यावापृथिवी इति । आ । ततन्थ । सोमरसा, आमच्या वाडवडिलांशींही तूं असाच गोडीने राहून आकाश आणि पृथ्वी यांच्यामध्ये सर्वत्र पसरलास. हे तेजस्वी पेया, त्या तुला हवि अर्पण करून आम्ही अढळ धनाचे अधिपति होऊं. १३. त्राता॑रो देवा॒ अधि॑ वोचता नो॒ मा नो॑ नि॒द्रा ई॑शत॒ मोत जल्पिः॑ । त्रातारः । देवाः । अधि । वोचत । नः । मा । नः । निऽद्रा । ईशत । मा । उत । जल्पिः । दिव्यविभूतिंनो, तुम्हीच आमचे तारक आहांत: आमच्याशी दोन शब्द तरी बोला. झोपेचा पगडा आमच्यावर बसूं नये आणिआम्ही वाह्यात बडबड करूं नये असें करा. सोमाला आमची नेहमी आवड राहून आम्ही शूर वीरांनी युक्त व्हावें आणि देवाचें संकीर्तन करावे असें घडवा. १४. त्वं नः॑ सोम वि॒श्वतो॑ वयो॒धास्त्वं स्व॒र्विदा वि॑शा नृ॒चक्षाः॑ । त्वम् । नः । सोम । विश्वतः । वयःऽधाः । त्वम् । स्वःऽवित् । आ । विश । नृऽचक्षाः । हे सोमा, तु सर्वच प्रकारांनीं आमच्यांत तरतरी उत्पन्न केली आहेस. तर दिव्यप्रकाशाचा लाभ करून देणारा, मनुष्यमात्रावर आपली दृष्टि ठेवणारा असा तूं आमच्या हृदयांत प्रविष्ट हो. हे तेजस्वी रसा, आमची कळकळ बाळगून आपल्या सहायशक्तींनीं आमच्या पाठीमागें , तसेंच पुढेंही राहून आमचे रक्षण कर १५. ॐ तत् सत् |