PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ७ - सूक्त ८१ ते ९०

ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८१ ( उषासूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - उषा : छंद - सतोबृहती


प्रत्यु॑ अदर्श्याय॒त्यु१च्छन्ती॑ दुहि॒ता दि॒वः ।
अपो॒ महि॑ व्ययति॒ चक्ष॑से॒ तमो॒ ज्योति॑ष्कृणोति सू॒नरी॑ ॥ १ ॥

प्रति ओं इति अदर्शि आयती उच्चन्ती दुहिता दिवः
अपो इति महि व्ययति चक्षसे तमः ज्योतिः कृणोति सूनरी ॥ १ ॥

उज्ज्वल प्रकाश प्रसृत करणारी आकाशकन्या उषा ही येतांना पहा स्पष्टपणे दिसूं लागते; सकल प्राणीमात्रालाहि दिसूं लागावी म्हणून ती श्रेष्ठदेवी कवींना मधुर आलापांची स्फूर्ति देणारी ती देवी अंधकाराला गुंडाळून टाकते, आणि आपली प्रभा चोहोंकडे विखरून टाकते. ॥ १ ॥


उदु॒स्रियाः॑ सृजते॒ सूर्यः॒ सचा.ण्॑ उ॒द्यन्नक्ष॑त्रमर्चि॒वत् ।
तवेदु॑षो॒ व्युषि॒ सूर्य॑स्य च॒ सं भ॒क्तेन॑ गमेमहि ॥ २ ॥

उत् उस्रियाः सृजते सूर्यः सचा उत्ऽयत् नक्षत्रं अर्चिऽवत्
तव इत् उषः विऽउषि सूर्यस्य च सं भक्तेन गमेमहि ॥ २ ॥

जशी इतर नक्षत्रें, तसाच सूर्य हा देखील एक प्रकाशमंडित नक्षत्रच आहे. तो उदय पावतांच उषेच्या पाठोपाठ आपलेही रश्मिजाल बाहेर फेंकतो. तर हे उषे, तुझी प्रभा दिसूं लागताच तुझ्या आणि सूर्याच्या वरदानामध्ये जो आमचा वांटा आहे, त्याच्याशी आमचा योग लवकर घडीव. ॥ २ ॥


प्रति॑ त्वा दुहितर्दिव॒ उषो॑ जी॒रा अ॑भुत्स्महि ।
या वह॑सि पु॒रु स्पा॒र्हं व॑नन्वति॒ रत्नं॒ि न दा॒शुषे॒ मयः॑ ॥ ३ ॥

प्रति त्वा दुहितः दिवः उषः जीराः अभुत्स्महि
या वहसि पुरु स्पार्हं वनन्ऽवति रत्नं न दाशुषे मयः ॥ ३ ॥

हे आकाशकन्यके उषे, तुझे स्वाग करण्याकरितां आम्ही कितीतरी त्वरेने जागृत होतो. कारण तूं स्पृहणीय असे जे वैभव असेल ते भक्तांसाठी भरपूर आणतेस, आणि हे उत्कृष्ट वस्तु-दायिके देवी, तूं भक्ताला उत्कृष्ट संपत्ति तर देतेसच, पण त्याचे उत्तम कल्याणहि करतेस. ॥ ३ ॥


उ॒च्छन्ती॒ या कृ॒णोषि॑ मं॒हना॑ महि प्र॒ख्यै दे॑वि॒ स्व॑र्दृ॒शे ।
तस्या॑स्ते रत्न्॒भाज॑ ईमहे व॒यं स्याम॑ मा॒तुर्न सू॒नवः॑ ॥ ४ ॥

उच्चन्ती या कृणोषि मंहना महि प्रऽख्यै देवि स्वः दृशे
तस्याः ते रत्नऽभाजः ईमहे वयं स्याम मातुः न सूनवः ॥ ४ ॥

आपली प्रभा विस्तारून हे विस्तृत जगत्, स्पष्टपणे दृग्गोचर व्हावे आणि स्वर्गीय प्रकाशहि दृष्टिपथांत यावा अशी व्यवस्था, हे देवी, तूं आपल्या औदार्याने करतेस. तर अभीष्ट रत्‍न देणारी जी तूं, त्या तुझीच याचना आम्ही नम्रपणे करतो कीं, मातेला जसे तिचे पुत्र, त्याप्रमाणे आम्ही तुझे पुत्र व्हावें असे तूं कर. ॥ ४ ॥


तच्चि॒त्रं राध॒ आ भ॒रोषो॒ यद्दी॑र्घ॒श्रुत्त॑मम् ।
यत्ते॑ दिवो दुहितर्मर्त॒भोज॑नं॒ तद्रा॑स्व भु॒नजा॑महै ॥ ५ ॥

तत् चित्रं राधः आ भर उषः यत् दीर्घश्रुत्ऽतमं
यत् ते दिवः दुहि तः मर्तऽभोजनं तत् रास्व भुनजामहै ॥ ५ ॥

म्हणून हे अद्‌भुत कृपाधन, कीं ज्याची कीर्ति या भूलोकांतही दूर पोहोंचली आहे ते धन, हे उषे तूं घेऊन ये. आकाशकन्यके देवि, मनुष्याने उपभोग घेण्यास जी योग्य असेल तीच वस्तु तूं आम्हाला दे, म्हणजे तिचाच आम्ही अनुभव घेऊं. ॥ ५ ॥


श्रवः॑ सू॒रिभ्यो॑ अ॒मृतं॑ वसुत्व॒नं वाजा.ण्॑ अ॒स्मभ्यं॒ गोम॑तः ।
चो॒द॒यि॒त्री म॒घोनः॑ सू॒नृता॑वत्यु॒षा उ॑च्छ॒दप॒ स्रिधः॑ ॥ ६ ॥

श्रवः सूरिऽभ्यः अमृतं वसुऽत्वनं वाजान् अस्मभ्यं गोऽऽमतः चोदयित्री मघोनः सूनृतावती उषाः उच्चत् अप स्रिधः ॥ ६ ॥

सत्कीर्ति, अविनाशी संपत्ति आणि ज्ञान धनयुक्त सत्त्वसामर्थ्य अशी देणगी तूं आमचे यजमान आणि आम्ही अशा उभयतांनाही दे. तूं मनोहर वाणींची प्रेरणा करतेस, दानशीलाला तूम्च प्रोत्साहन देतेस; तर हे उशे, तूं सुप्रकाशित होऊन नितिभ्रष्ट शत्रूंचा नायनाट कर. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८२ ( इंद्रावरुणसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्रावरुण : छंद - जगती


इन्द्रा॑वरुणा यु॒वम॑ध्व॒राय॑ नो वि॒शे जना॑य॒ महि॒ शर्म॑ यच्छतम् ।
दी॒र्घप्र॑यज्यु॒मति॒ यो व॑नु॒ष्यति॑ व॒यं ज॑येम॒ पृत॑नासु दू॒ढ्यः॑ ॥ १ ॥

इन्द्रावरुणा युवं अध्वराय नः विशे जनाय महि शर्म यच्चतं
दीर्घऽप्रयज्युं अति यः वनुष्यति वयं जयेम पृतनासु दुःऽध्यः ॥ १ ॥

इंद्रवरुणांनो तुम्ही आमच्या अध्वर यागाला येऊन आमच्या सर्व लोकांना तुमचा श्रेष्ठ आणि कल्याणकारक आश्रय द्या. तुमच्या प्रित्यर्थ आरंभिलेले सत्र पुष्कळ्त दिवस चालू असते; म्हणून त्यावेळी कोणी तेथें जर विघ्न करील, तर युद्धामध्ये आम्ही त्या दुष्ट अधमाचा मोड करूं असे करा. ॥ १ ॥


स॒म्राळ॒न्यः स्व॒राळ॒न्य उ॑च्यते वां म॒हान्ता॒विन्द्रा॒वरु॑णा म॒हाव॑सू ।
विश्वे॑ दे॒वासः॑ पर॒मे व्यो॑मनि॒ सं वा॒मोजो॑ वृषणा॒ सं बलं॑ दधुः ॥ २ ॥

सम्ऽराट् अन्यः स्वऽराट् अन्यः उच्यते वां महान्तौ इन्द्रावरुणा महावसूइतिमहावसू
विश्वे देवासः परमे विऽओमनि सं वां ओजः वृषणा सं बलं दधुः ॥ २ ॥

तुम्हांपैकी एक जो वरुण त्याला सम्राट् म्हणजे विश्वाचा चक्रवर्ति असे म्हणतात, आणि दुसरा इंद्र त्याला स्वराट (म्हणजे सकल विश्व त्याच्या स्वाधीन आहे) असे म्हणतात. पण तुम्ही दोघेही मिळून परमश्रेष्ठ आणि अपार दिव्यनिधींचे अधिपति आहांत. म्हणूनच अत्युच्च अशा आकांशात राहणारे जे सकल दिव्यजन त्यांनी, हे वीरोत्तमांनो, तुमची ओजस्विता आणि तुमचे बल ह्यांची जोड आपल्या स्वतःसाठी मिळविली. ॥ २ ॥


अन्व॒पां खान्य॑तृन्त॒मोज॒सा सूर्य॑मैरयतं दि॒वि प्र॒भुम् ।
इन्द्रा॑वरुणा॒ मदे॑ अस्य मा॒यिनोऽपि॑न्वतम॒पितः॒ पिन्व॑तं॒ धियः॑ ॥ ३ ॥

अनु अपां खानि अतृन्तं ओजसा सूर्यं ऐरयतं दिवि प्रऽभुं
इन्द्रावरुणा मदे अस्य मायिनः अपिन्वतं अपितः पिन्वतं धियः ॥ ३ ॥

तुम्ही आपल्या ओजस्वितेने उदक निर्झरांची द्वारे फोडून उदकें मोकळी केलीत, सूर्याला आकाशामध्ये प्राणीमात्रांचा प्रभु मणून संचार करण्यास लावलेंत, तर इंद्रावरुणांनो, दैवी शक्तीने मंडित अशा तुम्ही सोमपानाच्या ह्या हर्षभरामध्ये निर्जल प्रदेश उदकाने जसे तुडुंब भरलेत, त्याप्रमाणे आमच्या सद्‌भावना देखील कर्तव्यतत्परतेने भरून टाका. ॥ ३ ॥


यु॒वामिद्यु॒त्सु पृत॑नासु॒ वह्न॑यो यु॒वां क्षेम॑स्य प्रस॒वे मि॒तज्ञ॑वः ।
ई॒शा॒ना वस्व॑ उ॒भय॑स्य का॒रव॒ इन्द्रा॑वरुणा सु॒हवा॑ हवामहे ॥ ४ ॥

युवां इत् युत्ऽसु पृतनासु वह्नयः युवां क्षेमस्य प्रऽसवे मितऽज्ञवः
ईशाना वस्वः उभयस्य कारवः इन्द्रावरुणा सुऽहवा हवामहे ॥ ४ ॥

तुमचे बिरूद वागविणारे आम्ही भक्त युद्धामध्ये काय, झुंजामध्ये काय, तुमचीच आठवण करतो. तुम्ही आमचा उत्कर्ष घडवून आणावा म्हणून तुमच्याच पुढे आम्ही गुढघे टेकतो. ऐहिक आणि परलौकिक अशा दोन्ही संपत्तीचे प्रभु तुम्ही, म्हणून इंद्रावरुणांनो, सहज प्रसन्न होणारे जे तुम्ही, त्या तुमचा धांवा आम्ही उपासकजन करीत असतो. ॥ ४ ॥


इन्द्रा॑वरुणा॒ यदि॒मानि॑ च॒क्रथु॒र्विश्वा॑ जा॒तानि॒ भुव॑नस्य म॒ज्मना॑ ।
क्षेमे॑ण मि॒त्रो वरु॑णं दुव॒स्यति॑ म॒रुद्भि॑ररु॒ग्रः शुभ॑म॒न्य ई॑यते ॥ ५ ॥

इन्द्रावरुणा यत् इमानि चक्रथुः विश्वा जातानि भुवनस्य मज्मना
क्षेमेण मित्रः वरुणं दुवस्यति मरुत्ऽभिः उग्रः शुभं अन्यः ईयते ॥ ५ ॥

इंद्रवरुणांनो, आपल्या घटनाचातुर्याने ह्या त्रिभुवनांतील यच्चयावत् वस्तुजात तुम्ही निर्माण केले आहे, म्हणूनच आमचा मित्र यजमान हा स्वतःच्या आणि लोकांच्या कल्याणासठी वरुणाची सेवा करतो, आणि तुम्हां उभयतांमध्ये दुसरा म्हणजे न्यायनिष्टूर जो इंद्र त्याच्यापाशींही सर्वांच्या ’मंगला’ची याचना करतो. ॥ ५ ॥


म॒हे शु॒ल्काय॒ वरु॑णस्य॒ नु त्वि॒ष ओजो॑ मिमाते ध्रु॒वम॑स्य॒ यत्स्वम् ।
अजा॑मिम॒न्यः श्न॒थय॑न्त॒माति॑रद्द॒भ्रेभि॑र॒न्यः प्र वृ॑णोति॒ भूय॑सः ॥ ६ ॥

महे शुल्काय वरुणस्य नु त्विषे ओजः मिमातेइति ध्रुवं अस्य यत् स्वं अ
जामिं अन्यः श्नथयन्तं आ अतिरत् दभ्रेभिः अन्यः प्र वृणोत् इ भूयसः ॥ ६ ॥

महत्कार्यासाठी वरुणाच्या सामर्थ्याची प्रखरता सहज अनुभवास यावी म्हणून, त्याचे जे स्वतःचे अचल ओज ते उभयतां देव प्रत्यक्ष निदर्शनास आणतात. ते असे की, वरुण हा परकीयांच्या धुमश्चक्रीला आळा घालतो; आणि दुसरा इंद्र हा आर्यभक्त थोडे असले तरी त्या थोडक्यांच्याच कडून पुष्कळ शत्रूंस जेरी आणतो. ॥ ६ ॥


न तमंहो॒ न दु॑रि॒तानि॒ मर्त्य॒मिन्द्रा॑वरुणा॒ न तपः॒ कुत॑श्च॒न ।
यस्य॑ देवा॒ गच्छ॑थो वी॒थो अ॑ध्व॒रं न तं मर्त॑स्य नशते॒ परि॑ह्वृतिः ॥ ७ ॥

न तं अंहः न दुःऽइतानि मर्त्यं इन्द्रावरुणा न तपः कुतः चन
यस्य देवा गच्चथः वीथः अध्वरं न तं मर्तस्य नशते परिऽह्वृतिः ॥ ७ ॥

हे इंद्रावरुणांनो, ज्या भक्ताच्या अध्वर यागाला तुम्ही उपस्थित होऊन त्याचा हविर्भाग ग्रहण करतां, त्या नर भक्ताला पातक बाधत नाही, संकटे घाबरून सोडीत नाहीत, मग मनःसंताप कोठून बाधणार ? म्हणून हे देवांनो, दुष्टांचे कौटाळ त्याच्यापर्यंत पोहोंचतही नाही, हे काय सांगावयास पाहिजे. ॥ ७ ॥


अ॒र्वाङ्न॑ंरा॒ दैव्ये॒नाव॒सा ग॑तं शृणु॒तं हवं॒ यदि॑ मे॒ जुजो॑षथः ।
यु॒वोर्हि स॒ख्यमु॒त वा॒ यदाप्यं॑ मार्डी॒कमि॑न्द्रावरुणा॒ नि य॑च्छतम् ॥ ८ ॥

अर्वाक् नरा दैव्येन अवसा आ गतं शृणुतं हवं यदि मे जुजोषथः
युवोः हि सख्यं उत वा यत् आप्यं मार्डीकं इन्द्रावरुणा नि यच्चतम् ॥ ८ ॥

हे शूर धुरीणांनो, तुम्ही दिव्य कृपेने युक्त होऊन इकडे भूलोकी या. आणि माझी सेवा जर आता तुम्हाला मान्य झाली आहे, तर तुम्ही माझी विनंती ऐकाच. तुमचा कळवळा, आणि आप्ताप्रमाणे तुमचा जो जिव्हाळा तो आमच्या सुखाचे साधन आहे, तर तें साधन आम्हांस अर्पण करा. ॥ ८ ॥


अ॒स्माक॑मिन्द्रावरुणा॒ भरे॑भरे पुरोयो॒धा भ॑वतं कृष्ट्योजसा ।
यद्वां॒ हव॑न्त उ॒भये॒ अध॑ स्पृ॒धि नर॑स्तो॒कस्य॒ तन॑यस्य सा॒तिषु॑ ॥ ९ ॥

अस्माकं इन्द्रावरुणा भरेऽऽभरे पुरःऽयोधा भवतं कृष्टिऽओजसा
यत् वां हवन्ते उभये अध स्पृधि नरः तोकस्य तनयस्य सातिषु ॥ ९ ॥

कितीही युद्धे उपस्थित होवोत, पण हे इंद्रावरुणांनो, लोकांची ओजस्विता स्वाधीन ठेवणार्‍या देवांनो, तुम्ही सदैव आमचे धुरीण व्हा. हे सेनानायकहो, जनतेच्या, पुत्रपौत्रांच्या हितासाठी, किंवा दुसर्‍याही लाभासाठी जेव्हां जेव्हां उभय पक्षांचे प्रतिस्पर्धी तुम्हाला साहाय्यार्थ हांक मारतात तेव्हांही तुम्ही आमचेच धुरीण व्हा. ॥ ९ ॥


अ॒स्मे इन्द्रो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा द्यु॒म्नं य॑च्छन्तु॒ महि॒ शर्म॑ स॒प्रथः॑ ।
अ॒व॒ध्रं ज्योति॒रदि॑तेरृता॒वृधो॑ दे॒वस्य॒ श्लोकं॑ सवि॒तुर्म॑नामहे ॥ १० ॥

अस्मे इति इन्द्रः वरुणः मित्रः अर्यमा द्युम्नं यच्चन्तु महि शर्म सऽप्रथः
अवध्रं ज्योतिः अदितेः ऋतऽवृधः देवस्य श्लोकं सवितुः मनामहे ॥ १० ॥

इंद्र, वरुण, मित्र आणि अर्यमा हे आम्हाला तेजोवैभव देवोत. त्याचप्रमाणे श्रेष्ठ आणि प्रशस्त असे आश्रयस्थानही अर्पण करोत. ह्याचसाठी आम्ही अनंत शक्तीच्या अक्षय्य तेजाचे आणि सद्धर्मवर्धक जो सविता त्याच्या महिम्याचे मनन करतो. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८३ ( इंद्रावरुणसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्रावरुण : छंद - जगती


यु॒वां न॑रा॒ पश्य॑मानास॒ आप्यं॑ प्रा॒चा ग॒व्यन्तः॑ पृथु॒पर्श॑वो ययुः ।
दासा॑ च वृ॒त्रा ह॒तमार्या॑णि च सु॒दास॑मिन्द्रावरु॒णाव॑सावतम् ॥ १ ॥

युवं नरा पश्यमानासः आप्यं प्राचा गव्यन्तः पृथुऽपर्शवः ययुः
दासा च वृत्रा हतं आर्याणि च सुऽदासं इन्द्रावरुणा अवसा अवतम् ॥ १ ॥

हे वीराग्रणीहो, आप्ताप्रमाचे तुमचे सहाय्य आपणांस अगदी झटून आहे असे पाहून यशःप्राप्तीची इच्छा करणारे धिप्पाड "पृथु"चे लोक, आणि परशु लोक, हे मोठमोठे फरशु हाती घेऊन युद्धासाठी पूर्वेकडे गेले. त्यांनी अधार्मिक शत्रु-सैन्याचा पार धुव्वा उडविला, आणि हे इंद्रावरुणांनो, त्या प्रसंगी तुम्ही आर्यांची सैन्ये आणि सुदास राजा ह्यांचे रक्षण केलेत. ॥ १ ॥


यत्रा॒ नरः॑ स॒मय॑न्ते कृ॒तध्व॑जो॒ यस्मि॑न्ना॒जा भव॑ति॒ किं च॒न प्रि॒यम् ।
यत्रा॒ भय॑न्ते॒ भुव॑ना स्व॒र्दृश॒स्तत्रा॑ न इन्द्रावरु॒णाधि॑ वोचतम् ॥ २ ॥

यत्र नरः सम्ऽअयन्ते कृतऽध्वजः यस्मिन् आजा भवति किं चन प्रियं
यत्र भयन्ते भुवना स्वःऽदृशः तत्र नः इन्द्रावरुणा अधि वोचतम् ॥ २ ॥

हे वीरनायकहो, ज्या वेळी आपले ध्वज फडफडावीत उभय पक्षांची सैन्ये एकमेकांवर तुटून पडतात; आणि ज्या वेळी युद्धामध्ये कोणतीही गोष्ट अनुकूल असत नाही, किंवा ज्यावेळी सर्व प्रदेशच भयाकूल होऊन केवळ आकाशाकडे दृष्टि लावून राहतो, अशा बिकटप्रसंगी हे इंद्रावरुणांनो, तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्या. ॥ २ ॥


सं भूम्या॒ अन्ता॑ ध्वसि॒रा अ॑दृक्ष॒तेन्द्रा॑वरुणा दि॒वि घोष॒ आरु॑हत् ।
अस्थु॒र्जना॑ना॒मुप॒ मामरा॑तयो॒ऽर्वागव॑सा हवनश्रु॒ता ग॑तम् ॥ ३ ॥

सं भूम्याः अन्ताः ध्वसिराः अदृक्षत इन्द्रावरुणा दिवि घोषः आ अरुहत्
अस्थुः जनानां उप मां अरातयः अर्वाक् अवसा हवनऽश्रुता आ गतम् ॥ ३ ॥

अशा प्रकारच्या युद्धामध्ये आरंभापासून शेवटपर्यंत सर्व भूप्रदेशाची धूळधाण झालेलीच दृष्टीस पडते. हे इंद्रावरुणांनो, आरोळ्यांच्या निनादाने आकाश दुमदुमून गेलेले असते, आणि लोकांचे शत्रु माझ्यासमोर उभे असतात्; अशा वेळी भक्तांची हांक त्वरित ऐकणार्‍या देवांनो, तुम्ही आमच्या सहाय्यासाठी त्वरेने या. ॥ ३ ॥


इन्द्रा॑वरुणा व॒धना॑भिरप्र॒ति भे॒दं व॒न्वन्ता॒ प्र सु॒दास॑मावतम् ।
ब्रह्मा॑ण्येषां शृणुतं॒ हवी॑मनि स॒त्या तृत्सू॑नामभवत्पु॒रोहि॑तिः ॥ ४ ॥

इन्द्रावरुणा वधनाभिः अप्रति भेदं वन्वन्ता प्र सुऽदासं आवतं
ब्रह्माणि एषां शृणुतं हविआमनि सत्या तृत्सूनां अभवत् पुरःऽहितिः ॥ ४ ॥

इंद्रावरुणांनो, तुम्ही शत्रूचा हमखास नाश करणार्‍या आपल्या आयुधांनी भेदाचा (आपसांतील दुहीचा) नायनाट करून ’सुदासा’चे रक्षण केलेत; प्रार्थनापूर्ण यागामध्यें त्याची प्रार्थना सूक्तें ऐकलीत. आणि त्यामुळे आम्ही केलेले तृत्सूंचे पौरोहित्य यथार्थपणे फलद्रूप झाले. ॥ ४ ॥


इन्द्रा॑वरुणाव॒भ्या त॑पन्ति मा॒घान्य॒र्यो व॒नुषा॒मरा॑तयः ।
यु॒वं हि वस्व॑ उ॒भय॑स्य॒ राज॒थोऽध॑ स्मा नोऽवतं॒ पार्ये॑ दि॒वि ॥ ५ ॥

इन्द्रावरुणौ अभि आ तपन्ति मा अघानि अर्यः वनुषां अरातयः
युवं हि वस्वः उभयस्य राजथः अध स्म नः अवतं पार्ये दिवि ॥ ५ ॥

हे इंद्रावरुणांनो, पातके मला चोहोंबाजूंनी संताप देत आहेत; प्रतिस्पर्ध्यांवर चालून जाणारे जे आम्ही आर्य त्यांना शत्रूहि त्रास देत आहेत. पण हे देवांनो, ऐहिक आणि पारत्रिक अशा दोन्हीं ऐश्वर्यांचे नियंते तुम्ही आहांत; तर आतांच्या ह्या आणीबाणीच्या वेळी आमच्यावर कृपादृष्टी ठेवा. ॥ ५ ॥


यु॒वां ह॑वन्त उ॒भया॑स आ॒जिष्विन्द्रं॑ च॒ वस्वो॒ वरु॑णं च सा॒तये॑ ।
यत्र॒ राज॑भिर्द॒शभि॒र्निबा॑धितं॒ प्र सु॒दास॒माव॑तं॒ तृत्सु॑भिः स॒ह ॥ ६ ॥

युवां हवन्ते उभयासः आजिषु इन्द्रं च वस्वः वरुणं च सातये
यत्र राजऽभिः दशऽभिः निऽबाधितं प्र सुऽदासं आवतं तृत्सुऽभिः सह ॥ ६ ॥

इंद्र आणि वरुण अशा तुम्हां दोघांनाही उभय पक्षांचे लोक युद्धामध्ये सहाय्यार्थ विनंति करतात. तसेच विजा ऐश्वर्य प्राप्त व्हावे म्हणूनही तुमची करुणा भाकतात; कारण दहा बलाढ्य राजांनी एकड्या "सुदासा"वर चढाई केली होती, तरी देखील तृत्सूंच्या सहित तुम्ही "सुदासा"चे संरक्षण केलेत. ॥ ६ ॥


दश॒ राजा॑नः॒ समि॑ता॒ अय॑ज्यवः सु॒दास॑मिन्द्रावरुणा॒ न यु॑युधुः ।
स॒त्या नृ॒णाम॑द्म॒सदा॒मुप॑स्तुतिर्दे॒वा ए॑षामभवन्दे॒वहू॑तिषु ॥ ७ ॥

दश राजानः सम्ऽइताः अयज्यवः सुऽदासं इन्द्रावरुणा न युयुधुः
सत्या नृणां अद्मऽसदां उपऽस्तुतिः देवाः एषां अभवन् देवऽहूतिषु ॥ ७ ॥

दहा राजे एकत्र होऊनही त्यांनी हल्ला चढविला खरा, पण ते कधीच यज्ञयाग करीत नसत; त्या कारणाने हे इंद्रावरूणांनो, ते सुदासाचा युद्धात पराजय करूं शकले नाहींत. सुदासाच्या जनपद वीराची प्रार्थना सत्य झाली आणि त्यांच्या देवयज्ञामध्ये दिव्यविबुध खरोखरच उपस्थित झाले. ॥ ७ ॥


दा॒श॒रा॒ज्ञे परि॑यत्ताय वि॒श्वतः॑ सु॒दास॑ इन्द्रावरुणावशिक्षतम् ।
श्वि॒त्यञ्चो॒ यत्र॒ नम॑सा कप॒र्दिनो॑ धि॒या धीव॑न्तो॒ अस॑पन्त॒ तृत्स॑वः ॥ ८ ॥

दाशऽराज्ञे परिऽयत्ताय विश्वतः सुऽदासे इन्द्रावरुणौ अशिक्षतं
श्वित्यञ्चः यत्र नमसा कपर्दिनः धिया धीऽवन्तः असपन्त तृत्सवः ॥ ८ ॥

दहा राजांनी "सुदासा"ला चोहों बाजूंनी पक्का वेढा घातला होता तरी, हे इंद्रवरुणांनो, तुम्हीं त्याला बचावाच्या सर्व युक्त्या शिकविल्यात. श्वेतवस्त्रे परिधान केलेले आणि जिरेटोप बांधलेले बुद्धिमान् "तृत्सूहि" सुदासाजवळ होते; त्यांनी ईश्वरी प्रार्थनेच्या योगाने आणि आपल्या कल्पनाशक्तीने यश मिळविले. ॥ ८ ॥


वृ॒त्राण्य॒न्यः स॑मि॒थेषु॒ जिघ्न॑ते व्र॒तान्य॒न्यो अ॒भि र॑क्षते॒ सदा॑ ।
हवा॑महे वां वृषणा सुवृ॒क्तिभि॑र॒स्मे इ॑न्द्रावरुणा॒ शर्म॑ यच्छतम् ॥ ९ ॥

वृत्राणि अन्यः सम्ऽइथेषु जिघ्नते व्रतानि अन्यः अभि रक्षते सदा
हवामहे वां वृषणा सुवृक्तिऽभिः अस्मे इति इन्द्रावरुणा शर्म यच्चतम् ॥ ९ ॥

तुम्हांपैकी "इंद्र" हा युद्धांमध्ये भक्ताच्या यच्चयावत् वैर्‍यांचे निर्दलन करून टाकतो, आणि दुसरा वरुण हा न्यायनीतीचे आणि सृष्टीनियमांचे सदैव परिपालन करतो. म्हणून हे वीरपुंगवांनो, प्रतिभापूर्ण पद्यांनी आम्ही तुमच्या कृपेची याचना करीत असतो: तर इंद्रावरुणांनो, तुमचे कृपाछत्र आमच्यावर ठेवा. ॥ ९ ॥


अ॒स्मे इन्द्रो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा द्यु॒म्नं य॑च्छन्तु॒ महि॒ शर्म॑ स॒प्रथः॑ ।
अ॒व॒ध्रं ज्योति॒रदि॑तेरृता॒वृधो॑ दे॒वस्य॒ श्लोकं॑ सवि॒तुर्म॑नामहे ॥ १० ॥

अस्मे इति इन्द्रः वरुणः मित्रः अर्यमा द्युम्नं यच्चन्तु महि शर्म सऽप्रथः
अवध्रं ज्योतिः अदितेः ऋतऽवृधः देवस्य श्लोकं सवितुः मनामहे ॥ १० ॥

इंद्र, वरुण, मित्र आणि अर्यमा हे आम्हाला तेजोवैभव देवोत. त्याचप्रमाणे श्रेष्ठ आणि प्रशस्त असे आश्रयस्थानही अर्पण करोत. ह्याचसाठी आम्ही अनंत शक्तीच्या अक्षय्य तेजाचे आणि सद्धर्मवर्धक जो सविता त्याच्या महिम्याचे मनन करतो. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८४ ( इंद्रावरुणसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्रावरुण : छंद - त्रिष्टुभ्


आ वां॑ राजानावध्व॒रे व॑वृत्यां ह॒व्येभि॑रिन्द्रावरुणा॒ नमो॑भिः ।
प्र वां॑ घृ॒ताची॑ बा॒ह्वोर्दधा॑ना॒ परि॒ त्मना॒ विषु॑रूपा जिगाति ॥ १ ॥

आ वां राजानौ अध्वरे ववृत्यां हव्येभिः इन्द्रावरुणा नमःऽभिः
प्र वां घृताची बाह्वोः दधाना परि त्मना विषुऽरूपा जिगाति ॥ १ ॥

विश्वाचे राजे जे इंद्रावरुण, त्यांना मी वारंवार प्रणिपात करून आणि हविर्भाग अर्पण करून ह्या अध्वर यागाकडे खास वळवीन. पहा, ही आम्ही दोन्ही हातांमध्ये धरलेली घृताने पूर्ण अशी "जुहु" (आहुति पात्र), ती नानारूपधारी अशा तुम्हांकडे आपण होऊन जाते. ॥ १ ॥


यु॒वो रा॒ष्ट्रं बृ॒हदि॑न्वति॒ द्यौर्यौ से॒तृभि॑रर॒ज्जुभिः॑ सिनी॒थः ।
परि॑ नो॒ हेळो॒ वरु॑णस्य वृज्या उ॒रुं न॒ इन्द्रः॑ कृणवदु लो॒कम् ॥ २ ॥

युवः राष्ट्रं बृहत् इन्वति द्यौः यौ सेतृऽभिः अरज्जुऽभिः सिनीथः
परि नः हेळः वरुणस्य वृज्याः उरुं नः इन्द्रः कृणवत् ओं इति लोकम् ॥ २ ॥

विश्वावरील तुमची श्रेष्ठ राजसत्ता आकाश हे अनुभवास आणून देते. कारण पहा की तुम्ही त्यांतील तेजोगोल अशा बंधनांनी एकत्र जखडून बांधले आहेत की त्या बंधनाला दोर्‍याची मुळीं आवश्यकताच नाही. वरुणाचा क्रोध आम्हांवर कधीं न होवो, आणि इंद्र हा येथे आम्हांला स्वतंत्रतेची पूर्ण मोकळीक देवो. ॥ २ ॥


कृ॒तं नो॑ य॒ज्ञं वि॒दथे॑षु॒ चारुं॑ कृ॒तं ब्रह्मा॑णि सू॒रिषु॑ प्रश॒स्ता ।
उपो॑ र॒यिर्दे॒वजू॑तो न एतु॒ प्र ण॑ स्पा॒र्हाभि॑रू॒तिभि॑स्तिरेतम् ॥ ३ ॥

कृतं नः यज्ञं विदथेषु चारुं कृतं ब्रह्माणि सूरिषु प्रऽशस्ता
उपो इति रयिः देवऽजूतः नः एतु प्र नः स्पार्हाभिः ऊतिऽभिः तिरेतम् ॥ ३ ॥

ह्या यज्ञ-सभेमध्ये आम्ही आमचा सर्वांगसुंदर यज्ञ संपादन केला. आणि आमच्या धुरीणांच्यासाठी मनोहर प्रार्थनासूक्तें म्हटली. तर जे वैभव तुम्हीं देवच अर्पण करूं शकता असे दिव्य वैभव आम्हांकडे येवो; आणि तुमची जी स्पृहणीय आणि अमोल सहाय्यसामग्री तिच्या योगाने आम्ही सर्व अनिष्टांतून पार पडूं असे होवो. ॥ ३ ॥


अ॒स्मे इ॑न्द्रावरुणा वि॒श्ववा॑रं र॒यिं ध॑त्तं॒ वसु॑मन्तं पुरु॒क्षुम् ।
प्र य आ॑दि॒त्यो अनृ॑ता मि॒नात्यमि॑ता॒ शूरो॑ दयते॒ वसू॑नि ॥ ४ ॥

अस्मे इति इन्द्रावरुणा विश्वऽवारं रयिं धत्तं वसुऽमन्तं पुरुऽक्षुं
प्र यः आदित्यः अनृता मिनाति अमिता शूरः दयते वसूनि ॥ ४ ॥

इंद्रावरुणांनो ज्याची सर्व जगाला लालसा असते, ज्याच्यामध्ये उत्कृष्ट वस्तूंची पूर्णता असते, आणि ज्यांत विपुल सामर्थ्य असते, असे वरदान आम्हांला द्या. अनंतशक्तिप्रभू जो वरुण तो अधर्माचा नाश करतो, तो वीरनायक अपार ऐश्वर्यहि देतो. ॥ ४ ॥


इ॒यमिन्द्रं॒ वरु॑णमष्ट मे॒ गीः प्राव॑त्तो॒के तन॑ये॒ तूतु॑जाना ।
सु॒रत्‍ना॑सो दे॒ववी॑तिं गमेम यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ५ ॥

इयं इन्द्रं वरुणं अष्ट मे गीः प्र आवत् तोके तनये तूतुजाना
सुऽरत्ना्सः देवऽवीतिं गमेम यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ५ ॥

तर ही माझी स्तुति इंद्राला तशीच वरुणाला पावो; पुत्र पौत्र हिच्यासंबंधाने, ती आवेशपूर्ण दणदणीत स्तुति यशस्वी होऊन तिने सर्वांचे रक्षण केले असे घडो, आणि दिव्यजनांनो, तुम्हीपण असाच आशीर्वाद देऊन आमचे रक्षण करा. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८५ ( इंद्रावरुणसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्रावरुण : छंद - त्रिष्टुभ्


पु॒नी॒षे वा॑मर॒क्षसं॑ मनी॒षां सोम॒मिन्द्रा॑य॒ वरु॑णाय॒ जुह्व॑त् ।
घृ॒तप्र॑तीकामु॒षसं॒ न दे॒वीं ता नो॒ याम॑न्नुरुष्यताम॒भीके॑ ॥ १ ॥

पुनीषे वां अरक्षसं मनीषां सोमं इन्द्राय वरुणाय जुह्वत्
घृतऽप्रतीकां उषसं न देवीं ता नः यामन् उरुष्यतां अभीके ॥ १ ॥

इंद्र आणि वरुण ह्यांच्याप्रित्यर्थ सोमरसाचे हवन करीत असतां, हे देवांनो, माझ्या सात्त्विकभावनापूर्ण स्तुति तुम्हाला अर्पण करून मी तिला पुनीत करतो. नवनीताप्रमाणे तेजस्वी अंगकांतीच्या दिव्य उषेप्रमाणे ती मननीय स्तुति मला तेजस्वी दिसते. तर मार्गामध्ये आमच्या सन्निध साहून आमचा संचार अप्रतिहत कर. ॥ १ ॥


स्पर्ध॑न्ते॒ वा उ॑ देव॒हूये॒ अत्र॒ येषु॑ ध्व॒जेषु॑ दि॒द्यवः॒ पत॑न्ति ।
यु॒वं ता.ण् इ॑न्द्रावरुणाव॒मित्रा॑न्ह॒तं परा॑चः॒ शर्वा॒ विषू॑चः ॥ २ ॥

स्पर्धन्ते वै ओं इति देवऽहूये अत्र येषु ध्वजेषु दिद्यवः पतन्ति
युवं तान् इन्द्रावरुणौ अमित्रान् हतं पराचः शर्वा विषूचः ॥ २ ॥

ज्यांच्या ज्यांच्या ध्वजांवर युद्धांत अस्त्रें येऊन आदळतात, ते ते भक्तजन देवांचा धांवा करूनच येथें युद्धांत आपली पराकाष्ठा करतात; तर हे इंद्रावरुणांनो, तुम्ही आमच्या शत्रूंना आपल्या आयुधांनी अशा रीतीने ठार करा, की बाकीचे दशदिशा पळून जातांनाही मारले जातील. ॥ २ ॥


आप॑श्चि॒द्धि स्वय॑शसः॒ सद॑स्सु दे॒वीरिन्द्रं॒ वरु॑णं दे॒वता॒ धुः ।
कृ॒ष्टीर॒न्यो धा॒रय॑ति॒ प्रवि॑क्ता वृ॒त्राण्य॒न्यो अ॑प्र॒तीनि॑ हन्ति ॥ ३ ॥

आपः चित् हि स्वऽयशसः सदःऽसु देवीः इन्द्रं वरुणं देवता धुरितिधुः
कृष्टीः अन्यः धारयति प्रऽविक्ताः वृत्राणि अन्यः अप्रतीनि हन्ति ॥ ३ ॥

पृथ्वीवरील आणि आकांशातील उदकें जी आपल्याच यशाने अलंकृत आहेत, त्यांनीसुद्धा आपल्या ठिकाणी इंद्र आणि वरुण ह्यांची ईश्वरी सत्ता मान्य केली; त्यापैकी वरुण हा निरनिराळ्या समाजांचे वेगवेगळ्या प्रकारानें परिपालन करतो, आणि दुसरा इंद्र हा आमच्या लोकांचे शत्रू कितीही बिनतोड समर्थ्याचे असले, तरी त्यांना सपशेल ठार मारतो. ॥ ३ ॥


स सु॒क्रतु॑रृत॒चिद॑स्तु॒ होता॒ य आ॑दित्य॒ शव॑सा वां॒ नम॑स्वान् ।
आ॒व॒वर्त॒दव॑से वां ह॒विष्मा॒नस॒दित्स सु॑वि॒ताय॒ प्रय॑स्वान् ॥ ४ ॥

सः सुऽक्रतुः ऋतऽचित् अस्तु होता यः आदित्या शवसा वां नमस्वान्
आववर्तत् अवसे वां हविष्मान् असत् इत् सः सुविताय प्रयस्वान् ॥ ४ ॥

हे आदित्यांनो, जो यज्ञसंपादक तुम्हाला वारंवार प्रणाम करतो, तुम्हाला हवि अर्पण करतो, तोच सद्धर्मवेत्ता भक्त सत्क्रियावान् ठरतो; तोच संरक्षणासाठी तुम्हाला आपल्याकडे वळवितो; तर अशा भक्तिमान् यज्ञहोत्याचे मंगलच होवो. ॥ ४ ॥


इ॒यमिन्द्रं॒ वरु॑णमष्ट मे॒ गीः प्राव॑त्तो॒के तन॑ये॒ तूतु॑जाना ।
सु॒रत्ना॑रसो दे॒ववी॑तिं गमेम यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ५ ॥

इयं इन्द्रं वरुणं अष्ट मे गीः प्र आवत् तोके तनये तूतुजाना
सुऽरत्नासः देवऽवीतिं गमेम यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ५ ॥

हे इंद्रा, हे वरुणा, ही माझी स्तुति तुम्हांपर्यंत जाऊन पोहोंचो. आमच्या भावि पिढीच्या कल्याणाविषयी तर - ती दणदणीतपणे यशस्वी होऊन सर्वांचे रक्षण करो. वाटेल तितकी अमोल संपत्ति जरी आम्हाला प्राप्त झाली, तरी आम्ही देवाच्या सेवेंत तत्पर राहूं असे घडवा. आणि दिव्यजनांनो, तुम्हींही अशाच आशीर्वचनांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८६ (वरुणसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वरुण : छंद - त्रिष्टुभ्


धीरा॒ त्व॑स्य महि॒ना ज॒नूंषि॒ वि यस्त॒स्तम्भ॒ रोद॑सी चिदु॒र्वी ।
प्र नाक॑मृ॒ष्वं नु॑नुदे बृ॒हन्तं॑ द्वि॒ता नक्ष॑त्रं प॒प्रथ॑च्च॒ भूम॑ ॥ १ ॥

धीरा तु अस्य महिना जनूंषि वि यः तस्तम्भ रोदसी इति चित् उर्वी इति
प्र नाकं ऋष्वं नुनुदे बृहन्तं द्विता नक्षत्रं पप्रथत् च भूम ॥ १ ॥

ह्या वरुणाच्या महिम्यामुळेच प्राणीमात्र बुद्धियुक्त झाले आहेत. ह्या वरुणानेंच आकाश आणि पृथिवी हे दोन्ही विस्तीर्ण लोक स्वतंत्रपणे (निरनिराळे) धारण केलेले आहेत. अत्युच्च आणि विशाल असे अनेक गृहयुक्त अंतराल आणि त्यांतील सूर्यरूप नक्षत्र अशा दोहोंना दोन प्रकारांनी चालना त्यानेंच दिली आणि पृथ्वीचाही विस्तार त्यानेच केला. ॥ १ ॥


उ॒त स्वया॑ त॒न्वा॒३ सं व॑दे॒ तत्क॒दा न्व१न्तर्वरु॑णे भुवानि ।
किं मे॑ ह॒व्यमहृ॑णानो जुषेत क॒दा मृ॑ळी॒कं सु॒मना॑ अ॒भि ख्य॑म् ॥ २ ॥

उत स्वया तन्वा सं वदे तत् कदा नु अन्तः वरुणे भुवानि
किं मे हव्यं अहृणानः जुषेत कदा मृळीकं सुऽमनाः अभि ख्यम् ॥ २ ॥

मी आपल्या मनाशींच बोललो की, वरुणाच्या अंतःकरणांत मला जागा कशी आणि केव्हां मिळेल ? भक्तांवर कोप न करणारा वरुण माझा हविर्भाग संतोषाने ग्रहण करील काय ? माझे मन शुद्ध होऊन मी त्या दयाघनाला केव्हा अवलोकन करूं शकेन ? ॥ २ ॥


पृ॒च्छे तदेनो॑ वरुण दि॒दृक्षूपो॑ एमि चिकि॒तुषो॑ वि॒पृच्छ॑म् ।
स॒मा॒नमिन्मे॑ क॒वय॑श्चिदाहुर॒यं ह॒ तुभ्यं॒ वरु॑णो हृणीते ॥ ३ ॥

पृच्चे तत् एनः वरुण दिदृक्षु उपो इति एमि चिकितुषः विऽपृच्चं
समानं इत् मे कवयः चित् आहुः अयं ह तुभ्यं वरुणः हृणीते ॥ ३ ॥

तर हे वरुणा, असे माझे पातक तरी कोणते ते जाणण्याची माझी इच्छा होऊन त्याविषयी मी ज्ञानी जनांना शरण जाऊन नानाप्रकाराने विचारणा केली. पण त्या सर्व अंतर्दृष्टि भक्तांनी मला एकच गोष्ट सांगितली, "बाबारे, देववरुण हा तुझ्यावर क्रुद्ध झाला आहे." ॥ ३ ॥


किमाग॑ आस वरुण॒ ज्येष्ठं॒ यत्स्तो॒तारं॒ जिघां॑ससि॒ सखा॑यम् ।
प्र तन्मे॑ वोचो दूळभ स्वधा॒वोऽव॑ त्वाने॒ना नम॑सा तु॒र इ॑याम् ॥ ४ ॥

किं आगः आस वरुण ज्येष्ठं यत् स्तोतारं जिघांससि सखायं
प्र तत् मे वोचः दुःऽदभ स्वधावः अव त्वा अनेनाः नमसा तुरः इयाम् ॥ ४ ॥

तर हे वरुणा, मी असा मोठा अपराध तरी कोणता केला, कीं मी तुझा अगदी प्रेमळ भक्त असतांही मला तूं ठार मारण्याला प्रवृत्त व्हावेंस ? हे अपराजिता देवा, हे सर्वतंत्र स्वतंत्रा, तो अपराध तरी सांग; म्हणजे तुझ्यापुढे प्रणिपात करून मी त्याचे निरसन करीन आणि त्वरेने तुझ्या पायांवर लोळण घेईन. ॥ ४ ॥


अव॑ द्रु॒ग्धानि॒ पित्र्या॑ सृजा॒ नोऽव॒ या व॒यं च॑कृ॒मा त॒नूभिः॑ ।
अव॑ राजन्पशु॒तृपं॒ न ता॒युं सृ॒जा व॒त्सं न दाम्नो॒ वसि॑ष्ठम् ॥ ५ ॥

अव द्रुग्धानि पित्र्या सृज नः अव या वयं चकृम तनूभिः
अव राजन् पशुऽतृपं न तायुं सृज वत्सं न दाम्नः वसिष्ठम् ॥ ५ ॥

आमच्या वाडवडिलांनी जरी कधी तुझी अवज्ञा केली असेल, किंवा आम्ही स्वतःच तुझे जे कांही अपराध केले असतील, त्यांच्याबद्दल तूं क्षमा कर. आणि पशूंना लंबे करणार्‍या चोरालादेखील जशी क्षमा करतात, किंवा गळ्यांचे दावें सोडून वांसराला मोकळे करतात त्याप्रमाणे मला वसिष्ठाला पातकापासून मुक्त कर. ॥ ५ ॥


न स स्वो दक्षो॑ वरुण॒ ध्रुतिः॒ सा सुरा॑ म॒न्युर्वि॒भीद॑को॒ अचि॑त्तिः ।
अस्ति॒ ज्याया॒न्कनी॑यस उपा॒रे स्वप्न॑श्च॒नेदनृ॑तस्य प्रयो॒ता ॥ ६ ॥

न सः स्वः दक्षः वरुण ध्रुतिः सा सुरा मन्युः विऽभीदकः अचित्तिः
अस्ति ज्यायान् कनीयसः उपऽअरे स्वप्नः चन इत् अनृतस्य प्रऽयोता ॥ ६ ॥

हे वरुणा, कोणीही मनुष्य आपण होऊन पातक करण्यास धजत नाही, पण त्याने पातक करावे असा प्रसंग उद्‌भवतो. केव्हां केव्हां तशी नियतीच असते’ किंवा मद्यपान, क्रोध, जुगार, आणि अविवेक हीं देखील पातकांची कारणें असतात. शिवाय कोणी एखादा जबरदस्त दुर्बलाच्या जवळ असला तर तो, अथवा एखादें भलते स्वप्न पडलें, तरी ते सुद्धा मनुष्याला खोटेपणा करण्याला, पातक करण्याला प्रवृत्त करते. ॥ ६ ॥


अरं॑ दा॒सो न मी॒ळ्हुषे॑ कराण्य॒हं दे॒वाय॒ भूर्ण॒येऽना॑गाः ।
अचे॑तयद॒चितो॑ दे॒वो अ॒र्यो गृत्सं॑ रा॒ये क॒वित॑रो जुनाति ॥ ७ ॥

अरं दासः न मीळ्हुषे कराणि अहं देवाय भूर्णये अनागाः
अचेतयत् अचितः देवः अर्यः गृत्सं राये कविऽतरः जुनाति ॥ ७ ॥

मी एखाद्या दासाप्रमाणे त्या मनोरथपूरक देवाच्या, त्या विश्वंभराच्या सेवेमध्ये राबेन आणि पापमुक्त होईन. तो कृपाळू देव अज्ञालाही ज्ञान देतो. तोच महाप्राज्ञ देव स्तोतृजनाला दिव्य संपत्तीच्या प्राप्तीची प्रेरणा करतो. ॥ ७ ॥


अ॒यं सु तुभ्यं॑ वरुण स्वधावो हृ॒दि स्तोम॒ उप॑श्रितश्चिदस्तु ।
शं नः॒ क्षेमे॒ शमु॒ योगे॑ नो अस्तु यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ८ ॥

अयं सु तुभ्यं वरुण स्वधावः हृदि स्तोमः उपऽसृइतः चित् अस्तु
शं नः क्षेमे शं ओं इति योगे नः अस्तु यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ८ ॥

हे सर्वतंत्र स्वतंत्रा वरुणा, हा स्तोत्रकलाप तुझ्या प्रित्यर्थ आहे. तर तो तुझ्या हृदयाला जाऊन भिडो. अगदी आमचे अभीष्ट प्राप्त करून देण्याला आणि प्राप्त झालेले रक्षण करण्याला तो स्तोत्रकलाप समर्थ होवो; आणि देवांनो, तुम्हींही असाच आशीर्वाद देऊन आमचे सदैव रक्षण करा. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८७ (वरुणसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वरुण : छंद - त्रिष्टुभ्


रद॑त्प॒थो वरु॑णः॒ सूर्या॑य॒ प्रार्णां॑सि समु॒द्रिया॑ न॒दीना॑म् ।
सर्गो॒ न सृ॒ष्टो अर्व॑तीरृता॒यञ्च॒कार॑ म॒हीर॒वनी॒रह॑भ्यः ॥ १ ॥

रदत् पथः वरुणः सूर्याय प्र अर्णांसि समुद्रिया नदीनां
सर्गः न सृष्टः अर्वतीः ऋतऽयन् चकार महीः अवनीः अहऽभ्यः ॥ १ ॥

सूर्याकरितां वरुणाने मार्ग आंखून ठेवला; त्याचप्रमाणे नद्यांसाठी सागराच्या लहरी उचंबळत राहतील हेंही त्यानेच ठरविले. सोडलेला बाण जसा नीट अश्वदलाकडे जातो, त्याप्रमाणे त्याची न्यायबुद्धि सरळ चालते. म्हणूनच त्याने दिनरश्मीसाठी अनेक मोठे पृथिव्यादि गोल ग्रह निर्माण केले. ॥ १ ॥


आ॒त्मा ते॒ वातो॒ रज॒ आ न॑वीनोत्प॒शुर्न भूर्णि॒र्यव॑से सस॒वान् ।
अ॒न्तर्म॒ही बृ॑ह॒ती रोद॑सी॒मे विश्वा॑ ते॒ धाम॑ वरुण प्रि॒याणि॑ ॥ २ ॥

आत्मा ते वातः रजः आ नवीनोत् पशुः न भूर्णिः यवसे ससऽवान्
अन्तः मही इति बृहती इति रोदसी इति इमे इति विश्वा ते धाम वरुण प्रियाणि ॥ २ ॥

हे वरुणा, वात हा तुझा श्वासोच्छवासच आहे. तृण भक्षण केल्याने पुष्ट झालेला पशु झोपला असता जसा मोठ्याने घोरतो तसा हा वायु अंतरीक्षांत मोठा गंभीर निनाद करीत असतो; आणि त्याच अंतरालामध्ये ह्या ज्या विशाल रोदसी आहेत, त्या सर्व, हे वरुणा, तुझी प्रिय निवासस्थानेंच होत. ॥ २ ॥


परि॒ स्पशो॒ वरु॑णस्य॒ स्मदि॑ष्टा उ॒भे प॑श्यन्ति॒ रोद॑सी सु॒मेके॑ ।
ऋ॒तावा॑नः क॒वयो॑ य॒ज्ञधी॑राः॒ प्रचे॑तसो॒ य इ॒षय॑न्त॒ मन्म॑ ॥ ३ ॥

परि स्पशः वरुणस्य स्मत्ऽइष्टाः उभे इति पश्यन्ति रोदसी इति सुमेके इतिसुऽमेके
ऋतऽवानः कवयः यज्ञऽधीराः प्रऽचेतसः ये इषयन्त मन्म ॥ ३ ॥

वरुणाचे सेवक सर्वत्र सहज संचार करतात; सर्वांगसुंदर ज्या रोदसी त्यांनाही ते अवलोकन करतात. ते अनेक सद्धर्मप्रिय, न्यायप्रिय, काव्यप्रिय, यज्ञनिष्ठ आणि अतिशय ज्ञानी आहेत. त्यामुळे चित्तवेधक कवनांची स्फूर्ति तेच देतात. ॥ ३ ॥


उ॒वाच॑ मे॒ वरु॑णो॒ मेधि॑राय॒ त्रिः स॒प्त नामाघ्न्या॑ बिभर्ति ।
वि॒द्वान्प॒दस्य॒ गुह्या॒ न वो॑चद्यु॒गाय॒ विप्र॒ उप॑राय॒ शिक्ष॑न् ॥ ४ ॥

उवाच मे वरुणः मेधिराय त्रिः सप्त नाम अघ्न्या बिभर्ति
विद्वान् पदस्य गुह्या न वोचत् युगाय विप्रः उपराय शिक्षन् ॥ ४ ॥

मला ज्ञानी करून वरुणाने सांगितले कीं पृथ्वीरूप जी अवध्य धेनु तिची नांवे सत्तावीस आहेत. अशी उच्चतम स्थानाची जीं रहस्यें आहेत, ती ज्याला माहित असतात तो आपण होऊन कांही बोलतच नाही. भावी युगांतील पुढच्या पिढींतील लोकांना शिकविण्यासाठी त्यावेळी जो कोणी ज्ञानी असेल, तो मात्र ही रहस्यें सांगेल. ॥ ४ ॥


ति॒स्रो द्यावो॒ निहि॑ता अ॒न्तर॑स्मिन्ति॒स्रो भूमी॒रुप॑राः॒ षड्वि॑धानाः ।
गृत्सो॒ राजा॒ वरु॑णश्चक्र ए॒तं दि॒वि प्रे॒ङ्खंस हि॑र॒ण्ययं॑ शु॒भे कम् ॥ ५ ॥

तिस्रः द्यावः निऽहिताः अन्तः अस्मिन् तिस्रः भूमिः उपराः षट्ऽविधानाः
गृत्सः राजा वरुणः चक्रे एतं दिवि प्रऽईङ्खं हिरण्ययं शुभे कम् ॥ ५ ॥

पहा की, द्युलोक तीन प्रकारचे आहेत. अशा द्युलोकांच्या अंतरालांतही भूर्भूवादि तीन लोक जवळजवळ स्थापिले आहेत ते असे षड्‌विध आहेत. सर्वज्ञ जो वरुण त्यानें हे तेजोगोल बनविले. ते पहात असतां सोन्याचे झोलेच आकाशांत शोभेकरितां टांगले आहेत की काय असे वाटते. ॥ ५ ॥


अव॒ सिन्धुं॒ वरु॑णो॒ द्यौरि॑व स्थाद्द्र॒प्सो न श्वे॒तो मृ॒गस्तुवि॑ष्मान् ।
ग॒म्भी॒रशं॑सो॒ रज॑सो वि॒मानः॑ सुपा॒रक्ष॑त्रः स॒तो अ॒स्य राजा॑ ॥ ६ ॥

अव सिन्धुं वरुणः द्यौःऽइव स्थात् द्रप्सः न श्वेतः मृगः तुविष्मान्
गम्भीरऽसंसः रजसः विऽमानः सुपारऽक्षत्रः सतः अस्य राजा ॥ ६ ॥

आकाशाप्रमाणेच वरुणाने खाली भूमिवरील समुद्राचीही व्यवस्था लावली; आणि त्याच्या आंत शुभ्रतेजस्क उदकबिंदूप्रमाणे किंवा त्यांतील एखाद्या भीषण जलचराप्रमाणे तो गुप्त राहिला. वरुणाच्या स्तुतीचा घोष फारच गंभीर स्वरांत चालूं असतो. तो रजोलोकांना सहज व्यापून टाकतो. त्याचे क्षत्रबल (राज्यसत्ता) सर्वांना संकटांतून सहज पार पाडते, आणि ज्या ज्या वस्तूला अस्तित्व आहे, त्या सर्वांचा वरुण हा राजा आहे. ॥ ६ ॥


यो मृ॒ळया॑ति च॒क्रुषे॑ चि॒दागो॑ व॒यं स्या॑म॒ वरु॑णे॒ अना॑गाः ।
अनु॑ व्र॒तान्यदि॑तेरृ॒धन्तो॑ यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥

यः मृळयाति चकुषे चित् आगः वयं स्याम वरुणे अनागाः
अनु व्रतानि अदितेः ऋधन्तः यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥

म्हणून एखाद्याने जरी अपराध केला (पातक केले), तरी त्याची त्याला दया येते; अशा त्या वरुणाच्या समोर आम्ही पूर्णपणे निष्पाप होऊं आणि अनंत शक्ति अदितीच्या आज्ञांचे संवर्धन करूं; म्हणून दिव्य जनांनो तुम्हीपण असाच आशीर्वाद देऊन आमचे सदैव रक्षण करा. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८८ (वरुणसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वरुण : छंद - त्रिष्टुभ्


प्र शु॒न्ध्युवं॒ वरु॑णाय॒ प्रेष्ठां॑ म॒तिं व॑सिष्ठ मी॒ळ्हुषे॑ भरस्व ।
य ई॑म॒र्वाञ्चं॒ कर॑ते॒ यज॑त्रं स॒हस्रा॑मघं॒ वृष॑णं बृ॒हन्त॑म् ॥ १ ॥

प्र शुन्ध्युवं वरुणाय प्रेष्ठां मतिं वसिष्ठ मीळ्हुषे भरस्व
यः ईं अर्वाञ्चं करते यजत्रं सहस्रऽमघं वृषणं बृहन्तम् ॥ १ ॥

वसिष्ठा, मनोरथवर्षक वरुणाप्रित्यर्थ पवित्र वृत्तीची द्योतक, अत्यंत प्रेमळ आणि मन हालवून सोडणारी अशी एक स्तुति म्हण; की जी त्या पवित्र, असंख्यवरप्रद आणि श्रेष्ठ वीरोत्तमाला आपल्या यज्ञाकडे घेऊन येईल. ॥ १ ॥


अधा॒ न्व॑स्य सं॒दृशं॑ जग॒न्वान॒ग्नेरनी॑कं॒ वरु॑णस्य मंसि ।
स्व१र्यदश्म॑न्नधि॒पा उ॒ अन्धो॒ऽभि मा॒ वपु॑र्दृ॒शये॑ निनीयात् ॥ २ ॥

अध नु अस्य सम्ऽदृशं जगन्वान् अग्नेः अनीकं वरुणस्य मंस् इ
स्वः यत् अश्मन् अधिऽपाः ओं इति अन्धः अभि मा वपुः दृशये निनीयात् ॥ २ ॥

त्याप्रमाणे त्या वरुणाचे दर्शन घेण्याकरितां मी पुढे गेलो आणि वरुणाचे म्हणून अग्नीच्याच ज्वालारूपाचें ध्यान केले. परंतु जेव्हां त्याच्या स्वरूपाचा प्रकाश शिलातलावर ठेवलेले मधुर पेय अत्यंत प्रेमाने गृहण करील, तेव्हांच त्याने आपले ते तेजोमय स्वरूप माझ्या दृष्टीला गोचर होऊं दिले असे होईल. ॥ २ ॥


आ यद्रु॒हाव॒ वरु॑णश्च॒ नावं॒ प्र यत्स॑मु॒द्रमी॒रया॑व॒ मध्य॑म् ।
अधि॒ यद॒पां स्नुभि॒श्चरा॑व॒ प्र प्रे॒ङ्ख॒ ई॑ङ्खपयावहै शु॒भे कम् ॥ ३ ॥

आ यत् रुहाव वरुणः च नावं प्र यत् समुद्रं ईरयाव मध्यं
अधि यत् अपां स्नुऽभिः चराव प्र प्रऽईङ्खे ईङ्खयावहै शुभे कम् ॥ ३ ॥

पूर्वी एकदा जेव्हां वरुण आणि मी असे दोघे एकाच नौकेंत आरूढ झालो, आणि आम्ही ती नौका भर समुद्रामध्ये हांकारली, तेव्हां आम्हीं लाटांच्या उंच शिखरावरून वर खाली अशा रीतीने सरकूं लागलो की जणों हिंदोळ्यावर बसून आम्ही मजेने झोकेंच घेत आहोत. ॥ ३ ॥


वसि॑ष्ठं ह॒ वरु॑णो ना॒व्याधा॒दृषिं॑ चकार॒ स्वपा॒ महो॑भिः ।
स्तो॒तारं॒ विप्रः॑ सुदिन॒त्वे अह्नां॒ यान्नु द्याव॑स्त॒तन॒न्यादु॒षासः॑ ॥ ४ ॥

वसिष्ठं ह वरुणः नावि आ अधात् ऋषिं चकार सुऽअपाः महःऽभिः
स्तोतारं विप्रः सुदिनऽत्वे अह्वां यात् नु द्यावः ततनन् यात् उषसः ॥ ४ ॥

ह्याप्रमाणे वरुणाने वसिष्ठाला आपल्या नौकेमध्ये बसविले; आणि त्य सत्कृतिशील देवाने आपल्या तेजःसामर्थ्याने वसिष्ठाला "ऋषि" ची योग्यता आणली. आणि पुढे असा मंगल दिवस उजाडला की "स्तवनप्रिय" वरुणाने आपल्या उपासकाला ’ऋषि’ची पदवी दिली. पण यानंतर आता कित्येक दिवस लोटले, कित्येक उषःकाल लोटून गेले. ॥ ४ ॥


क्व१ त्यानि॑ नौ स॒ख्या ब॑भूवुः॒ सचा॑वहे॒ यद॑वृ॒कं पु॒रा चि॑त् ।
बृ॒हन्तं॒ मानं॑ वरुण स्वधावः स॒हस्र॑द्वारं जगमा गृ॒हं ते॑ ॥ ५ ॥

क्व त्यानि नौ सख्या बभूवुः सचावहे इति यत् अवृकं पुरा चित्
बृहन्तं मानं वरुण स्वधावः सहस्रऽद्वारं जगम गृहं ते ॥ ५ ॥

तर हे वरुणा, ते आपले पूर्वीचे प्रेम कोठे गेले ? त्याकाळी आपण आपल्या निर्व्याज प्रेमाने एकत्र राहिलो होतो, आणि हे वरुणा, हे सर्वस्वतंत्रा, तुझे जे विशाल, आदर्शभूत आणि असंख्य द्वारांचे जे मंदित त्या मंदिरांत त्यावेळी मी प्रवेश केला होता. ॥ ५ ॥


य आ॒पिर्नित्यो॑ वरुण प्रि॒यः सन्त्वामागां॑सि कृ॒णव॒त्सखा॑ ते ।
मा त॒ एन॑स्वन्तो यक्षिन्भुजेम य॒न्धि ष्मा॒ विप्र॑ स्तुव॒ते वरू॑थम् ॥ ६ ॥

यः आपिः नित्यः वरुण प्रियः सन् त्वां आगांसि कृणवत् सखा ते
मा ते एनस्वन्तः यक्षिन् भुजेम यन्धि स्म विप्रः स्तुवते वरूथम् ॥ ६ ॥

हे वरुणा, जो तुला सख्ख्या पुत्राप्रमाणे प्रिय आहे, त्याने जरी अपराध केला, तरी तो तुझा प्रिय भक्त आहे इकडे लक्ष असूं दे. पण हे पवित्रमूर्ते देवा, आम्ही पातकी राहून वैभवाचा उपभोग घेऊं असे कधी घडवूं नको. म्हणूनच ज्ञानरूप असा तूं तुझ्या स्तोतृजनाला आपला आनंदमय आश्रय दे. ॥ ६ ॥


ध्रु॒वासु॑ त्वा॒सु क्षि॒तिषु॑ क्षि॒यन्तो॒ व्य१स्मत्पाशं॒ वरु॑णो मुमोचत् ।
अवो॑ वन्वा॒ना अदि॑तेरु॒पस्था॑द्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥

ध्रुवासु त्वा आसु क्षितिषु क्षियन्तः वि अस्मत् पाशं वरुणः मुमोचत्
अवः वन्वानाः अदितेः उपऽस्थात् यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥

तुझ्या ह्या अढळ प्रदेशामध्ये आम्ही वास्तव्य करून अदितीच्या सन्निध राहून तिच्या कृपाप्रसादाची मनीषा धरून राहात असतो. तर राजा वरुण आमच्या पातकाचे पाश तोडून आम्हांस मोकळे करो, आणि हे दिव्यविबुधांनो, तुम्हीपण सदैव हाच आशीर्वाद देऊन आमचे रक्षण करा. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ८९ (वरुणसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वरुण : छंद - जगती


मो षु व॑रुण मृ॒न्मयं॑ गृ॒हं रा॑जन्न॒हं ग॑मम् ।
मृ॒ळा सु॑क्षत्र मृ॒ळय॑ ॥ १ ॥

मो इति सु वरुण मृत्ऽमयं गृहं राजन् अहं गमं मृळ सुऽक्षत्र मृळअय ॥ १ ॥

जगत्‌राजा वरुणा, ह्या असल्या देहरूप मृत्तिकेच्या गृहांत मी पुनः पुनः प्रवेश करीन असे घडवूं नको. तर दया कर, हे सर्व सत्ताधीशा, मजवर दया कर. ॥ १ ॥


यदेमि॑ प्रस्फु॒रन्नि॑व॒ दृति॒र्न ध्मा॒तो अ॑द्रिवः ।
मृ॒ळा सु॑क्षत्र मृ॒ळय॑ ॥ २ ॥

यत् एमि प्रस्फुरन्ऽइव दृतिः न ध्मातः अद्रिऽवः मृळअ सुऽक्षत्र मृळय ॥ २ ॥

वार्‍याने फुगविलेला फुगा लटपटत जातो, त्याप्रमाणे मी थरथरां कांपत चाललो आहे; तर आता दया कर, हे सर्व सत्ताधीशा, मजवर दया कर. ॥ २ ॥


क्रत्वः॑ समह दी॒नता॑ प्रती॒पं ज॑गमा शुचे ।
मृ॒ळा सु॑क्षत्र मृ॒ळय॑ ॥ ३ ॥

क्रत्वः समह दीनता प्रतिऽईपं जगम शुचे मृळ सुऽक्षत्र मृळय ॥ ३ ॥

हे दीप्तिमंता, हे पावना, मनोदौर्बल्यामुळे मी कर्तव्यापासून भ्रष्ट होऊन उलट्याच दिशेने गेलो असेन, तर दया कर, हे सर्व सत्ताधीशा, मजवर दया कर. ॥ ३ ॥


अ॒पां मध्ये॑ तस्थि॒वांसं॒ तृष्णा॑विदज्जरि॒तार॑म् ।
मृ॒ळा सु॑क्षत्र मृ॒ळय॑ ॥ ४ ॥

अपां मध्ये तस्थिऽवांसं तृष्णा अविदत् जरितारं मृळ सुऽक्षत्र मृळय ॥ ४ ॥

चमत्कार असा पहा की, मी तुझा उपासक असा पाण्यामध्ये उभा आहे, तरीपण मी तृषाक्रांतच आहे, तर देवा दया कर, हे सर्व सत्ताधीशा, मजवर दया कर. ॥ ४ ॥


यत्किं चे॒दं व॑रुण॒ दैव्ये॒ जने॑ऽभिद्रो॒हं म॑नु॒ष्या॒३श्चरा॑मसि ।
अचि॑त्ती॒ यत्तव॒ धर्मा॑ युयोपि॒म मा न॒स्तस्मा॒देन॑सो देव रीरिषः ॥ ५ ॥

यत् किं च इदं वरुण दैव्ये जने अभिऽद्रोहं मनुष्याः चरामसि
अच् इत्ती यत् तव धर्म युयोपिम मा नः तस्मात् एनसः देव रिरिषः ॥ ५ ॥

हे वरुणा, आम्ही मानवांनी दिव्य विबुधांविरुद्ध जे कांही द्रोहबुद्धियुक्त पापकर्म आचरिले असेल, किंवा अविचाराने तुझ्या धर्मशील आज्ञा मोडल्या असतील, तर त्या अपराधाबद्दल, त्या पातकाबद्दल हे देवा, तूं आम्हांवर क्रुद्ध होऊं नको. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ९० ( इंद्रवायुसूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - वायु, इंद्रवायु : छंद - त्रिष्टुभ्


प्र वी॑र॒या शुच॑यो दद्रिरे वामध्व॒र्युभि॒र्मधु॑मन्तः सु॒तासः॑ ।
वह॑ वायो नि॒युतो॑ या॒ह्यच्छा॒ पिबा॑ सु॒तस्यान्ध॑सो॒ मदा॑य ॥ १ ॥

प्र वीरऽया शुचयः दद्रिः वां अध्वर्युऽभिः मधुऽमन्तः सुतासः
वह वायो इति निऽयुतः याहि अच्च पिब सुतस्य अन्धसः मदाय ॥ १ ॥

अध्वर्यूंनी पिळून काढलेला हा पवित्र आणि मधुर सोमरस वीराला योग्य अशा प्रवृत्तीने तुजला अर्पण केला आहे; तर हे वायु, तूं आपले "नियुत्" अश्व जोडून इकडे ये, आणि हृष्ट होण्यासाठी ह्या मधुर पेयाचे प्राशन कर. ॥ १ ॥


ई॒शा॒नाय॒ प्रहु॑तिं॒ यस्त॒ आन॒ट् छुचिं॒ सोमं॑ शुचिपा॒स्तुभ्यं॑ वायो ।
कृ॒णोषि॒ तं मर्त्ये॑षु प्रश॒स्तं जा॒तोजा॑तो जायते वा॒ज्य॑स्य ॥ २ ॥

ईशानाय प्रऽहुतिं यः ते आनट् शुचिं सोमं शुचिऽपाः तुभ्यं वायो इति
कृणोषि तं मर्त्येषु प्रऽशस्तं जातःऽजातः जायते वाज्यस्य ॥ २ ॥

तुज सर्व सत्ताधीशाला पवित्र वस्तूंचे रक्षण करणार्‍या हे वायो, तुला जो भक्त पवित्र अशा सोमरसाची उत्कृष्ट आहुति अर्पण करील, त्याला तूं सर्व मानवांमध्ये अत्यंत विख्यात करतोस, इतकेंच काय, पण त्याचा पुत्र देखील प्रसिद्ध असा सत्त्ववीर निपजतो. ॥ २ ॥


रा॒ये नु यं ज॒ज्ञतू॒ रोद॑सी॒मे रा॒ये दे॒वी धि॒षणा॑ धाति दे॒वम् ।
अध॑ वा॒युं नि॒युतः॑ सश्चत॒ स्वा उ॒त श्वे॒तं वसु॑धितिं निरे॒के ॥ ३ ॥

राये नु यं जज्ञतुः रोदसी इति इमे इति राये देवी धिषणा धाति देवं
अध वायुं निऽयुतः सश्चत स्वाः उत श्वेतं वसुऽधितिं निरेके ॥ ३ ॥

भक्ताला दिव्य संपत्ति लाभावी म्हणूनच ह्या रोदसींनी ज्या वायूला प्रकट केले, ज्या देवाला दैवी धर्म बुद्धीनें, दैवी संपत्तीसाठींच त्यांनी येथे स्थापन केले, अशा वायूचे स्वतःचे "नियुत्" नांवाचे अश्व त्या दिव्यनिधान श्वेततेजस्क वायूला कधी सोडून जात नाहींत. अगदी कांही केल्या सोडून जात नाहींत. ॥ ३ ॥


उ॒च्छन्नु॒षसः॑ सु॒दिना॑ अरि॒प्रा उ॒रु ज्योति॑र्विविदु॒र्दीध्या॑नाः ।
गव्यं॑ चिदू॒र्वमु॒शिजो॒ वि व॑व्रु॒स्तेषा॒मनु॑ प्र॒दिवः॑ सस्रु॒रापः॑ ॥ ४ ॥

उच्चन् उषसः सुऽदिनाः अरिप्राः उरु ज्योतिः विविदुः दीध्यानाः
गव्यं चित् ऊर्वं उशिजः वि वव्रुः तेषां अनु प्रऽदिवः सस्रुः आपः ॥ ४ ॥

उषःकालची प्रभा उजळली; सूर्याचे निष्कलंक रश्मि दृग्गोचर झाले; तेव्हां व्यापक तेजाचे धान करणार्‍या निष्ठावंत भक्तांनी प्रकाशधेनूंचा प्रचंड समूह अनावृत केला; त्याबरोबर तुंबून राहिलेली उदकें आपल्या मार्गाने वाहूं लागली. ॥ ४ ॥


ते स॒त्येन॒ मन॑सा॒ दीध्या॑नाः॒ स्वेन॑ यु॒क्तासः॒ क्रतु॑ना वहन्ति ।
इन्द्र॑वायू वीर॒वाहं॒ रथं॑ वामीशा॒नयो॑र॒भि पृक्षः॑ सचन्ते ॥ ५ ॥

ते सत्येन मनसा दीध्यानाः स्वेन युक्तासः क्रतुना वहन्ति
इन्द्रवायूइति वीरऽवाहं रथं वां ईशानयोः अभि पृक्षः सचन्ते ॥ ५ ॥

सत्यप्रतिज्ञ मनानें ते ऋषि धानमग्न होतात, आणि आपल्या कर्तृत्त्वाशी योगयुक्त होऊन वर्तत असतात; त्याप्रमाणे हे इंद्रावायूहो, तुम्हा सर्वशक्तिमान वीरांना घेऊन जाणार्‍या रथाला देखील तुमचे सामर्थ्य संलग्न झालेले असते. ॥ ५ ॥


ई॒शा॒नासो॒ ये दध॑ते॒ स्व॑र्णो॒ गोभि॒रश्वे॑भि॒र्वसु॑भि॒र्हिर॑ण्यैः ।
इन्द्र॑वायू सू॒रयो॒ विश्व॒मायु॒रर्व॑द्भि र्वी॒रैः पृत॑नासु सह्युः ॥ ६ ॥

ईशानासः ये दधते स्वः नः गोभिः अश्वेभिः वसुऽभिः हिरण्यैः
इन्द्रवायूइति सूरयः विश्वं आयुः अर्वत्ऽभिः वीरैः पृतनासु सह्युः ॥ ६ ॥

जे आम्हांला गोधन, अश्वधन, सुवर्णधन आणि इतर उत्कृष्ट वस्तू देऊन शिवाय दिव्यलोकही देतात, ते तुम्ही सर्वसत्ताधीशच आहांत. तर हे इंद्रवायूंनो, आमच्या धुरीणांना दीर्घायुष्य लाभावे आणि तुमच्या प्रसादाने अश्ववीर आणि शूर सैनिक ह्यांच्या सहाय्याने त्यांनी शत्रूला चिरडून टाकावे ही आमची इच्छा आहे. ॥ ६ ॥


अर्व॑न्तो॒ न श्रव॑सो॒ भिक्ष॑माणा इन्द्रवा॒यू सु॑ष्टु॒तिभि॒र्वसि॑ष्ठाः ।
वा॒ज॒यन्तः॒ स्वव॑से हुवेम यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥

अर्वन्तः न श्रवसः भिक्षमाणाः इन्द्रवायू इति सुस्तुतिऽभिः वसिष्ठाः
वाजऽयन्तः सु अवसे हुवेम यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥

आम्हांजवळ अश्ववीर नाहीत, तरी आम्ही वसिष्ठ कुलोत्पन्न भक्तजन, भक्तिप्रेरित स्तुतींनी, हे इंद्रवायूहो, तुम्हांजवळ सत्कीर्तिची याचना करतो. सत्त्वाची पराकाष्ठा करणारे आम्ही भक्त तुमच्या कृपेसाठी हविर्भाग अर्पण करतो. तर हे दिव्यजनांनो, तुम्हीं आपल्या आशीर्वचनांनी आमचे सदैव रक्षण करा. ॥ ७ ॥


ॐ तत् सत्


GO TOP