PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ७ - सूक्त ४१ ते ५०

ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ४१ ( प्रातःस्मरण सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अनेक : छंद - त्रिष्टुभ्, जगती


प्रा॒तर॒ग्निं प्रा॒तरिन्द्रं॑ हवामहे प्रा॒तर्मि॒त्रावरु॑णा प्रा॒तर॒श्विना॑ ।
प्रा॒तर्भगं॑ पू॒षणं॒ ब्रह्म॑ण॒स्पतिं॑ प्रा॒तः सोम॑मु॒त रु॒द्रं हु॑वेम ॥ १ ॥

प्रातः अग्निं प्रतः इन्द्रं हवामहे प्रतः मित्रावरुणा प्रातः अश्विना
प्रतः भगं पूषणं ब्रह्मणः पतिं प्रतः सोमं उत रुद्रं हुवेम ॥ १ ॥

आम्ही प्रभातकाळी अग्नीचे स्तवन करूं. आम्ही पहांटेस इंद्राचे स्तवन करूं. आम्ही उषःकाळी मित्र, वरुण, अश्विनी कुमार यांची प्रार्थना करूं. आम्ही सकाळीं भग (ऐश्वर्यवंत) देव, पूषा (शरीररसपोषक) देव, व ब्रह्मांडाधिपति देवाची स्तुति गाऊं. अहो आपण प्रभातसमयी सोम व रुद्र देवानिमित्त यज्ञस्तुतिद्वारें प्रार्थना करूं. ॥ १ ॥


प्रा॒त॒र्जितं॒ भग॑मु॒ग्रं हु॑वेम व॒यं पु॒त्रमदि॑ते॒र्यो वि॑ध॒र्ता ।
आ॒ध्रश्चि॒द्यं मन्य॑मानस्तु॒रश्चि॒द्राजा॑ चि॒द्यं भगं॑ भ॒क्षीत्याह॑ ॥ २ ॥

प्रातःऽजितं भगं उग्रं हुवेम वयं पुत्रं अदितेः यः विऽधर्
ता आध्रः चित् यं मन्यमानः तुरः चित् राजा चित् यं भगं भक्षि इत् इ आह ॥ २ ॥

जो सकललोकधर्ता, अदितिपुत्र, अजिंक्य, महाप्रतापी असा भक्तांना सौभाग्यैश्वर्यप्रद देव आहे त्याची आम्ही प्रातःकाळींच पूजा करूं. आणखी हाच देव असा आहे की त्याला मानून गरीब, श्रीमंत व राजा देखील त्याला असे म्हणतच असतो कीं "देवा मला धन दे." ॥ २ ॥


भग॒ प्रणे॑त॒र्भग॒ सत्य॑राधो॒ भगे॒मां धिय॒मुद॑वा॒ दद॑न्नः ।
भग॒ प्र णो॑ जनय॒ गोभि॒रश्वै॒र्भग॒ प्र नृभि॑र्नृ॒वन्तः॑ स्याम ॥ ३ ॥

भग प्रऽनेतरितिप्रऽनेतः भग सत्यऽराधः भग इमां धियं उत् अव ददत् नः
भग प्र नः जनय गोभिः अश्वैः भग प्र नृऽभिः नृऽवन्तः स्याम ॥ ३ ॥

हे भगवंता, हे भक्तिप्रगतिकर भगवंता, तू सत्य धनसंपन्न आहेस. भाग्यवर्धका देवा, आमच्या ह्या स्तोत्रबुद्धीला पूर्ण चेतनाशक्ति दे. हे भाग्यवंता, आमच्याकरितां गाई घोडे सर्वत्र पैदा कर. हे षड्गुणैश्वर्यसंपन्न देवा, आमच्याजवळ पुत्रपौत्र, सैनिकादिदास - प्रजा व पुढारीगण - इत्यादि पुष्कळ असावेत. ॥ ३ ॥


उ॒तेदानीं॒ भग॑वन्तः स्यामो॒त प्र॑पि॒त्व उ॒त मध्ये॒ अह्ना॑म् ।
उ॒तोदि॑ता मघव॒न्सूर्य॑स्य व॒यं दे॒वानां॑ सुम॒तौ स्या॑म ॥ ४ ॥

उत इदानीं भगऽवन्तः स्याम उत प्रऽपित्वे उत मध्ये अह्नां
उत उत्ऽइता मघऽवन् सूर्यस्य वयं देवानां सुऽमतौ स्याम ॥ ४ ॥

अहो भगवन्, आम्ही आतांच, दिवस उजाडल्यावर आणि दिवसाच्या मध्यमकाळी, तुमच्या कृपेने ऐश्वर्यवंत व्हावे. आणि हे महदैश्वर्यवंत देवा इंद्रा, सूर्य उदयकाळी आम्ही सदा देवाच्या स्तुत्यनुग्रबुद्धिमध्यें निमग्न असावे. ॥ ४ ॥


भग॑ ए॒व भग॑वाँ अस्तु देवा॒स्तेन॑ व॒यं भग॑वन्तः स्याम ।
तं त्वा॑ भग॒ सर्व॒ इज्जो॑हवीति॒ स नो॑ भग पुरए॒ता भ॑वे॒ह ॥ ५ ॥

भगः एव भगऽवान् अस्तु देवाः तेन वयं भगऽवन्तः स्याम
तं त्वा भग सर्वः इत् जोहवीति सः नः भग पुरःऽएता भव इह ॥ ५ ॥

अहो देवांनो, हा वैभवी देवच खरा खरा भाग्यप्रद देव आहे. त्या इंद्रदेवाच्या भक्ति योगानेच आपण ऐश्वर्यवंत होऊं. हे भाग्यप्रदा देवा, अशा गुणसंपन्न तुजला सर्वच देव व मनुष्यें प्रार्थितात. हे सुदैव देवा, तू आमचा ह्या ठिकाणी अग्रणी हो. ॥ ५ ॥


सम॑ध्व॒रायो॒षसो॑ नमन्त दधि॒क्रावे॑व॒ शुच॑ये प॒दाय॑ ।
अ॒र्वा॒ची॒नं व॑सु॒विदं॒ भगं॑ नो॒ रथ॑मि॒वाश्वा॑ वा॒जिन॒ आ व॑हन्तु ॥ ६ ॥

सं अध्वराय उषसः नमन्त दधिक्रावाइव शुचये पदाय
अर्वाचीनं वसुऽविदं भगं नः रथम्ऽइव अश्वाः वाजिनः आ वहन्तु ॥ ६ ॥

दधिक्रावाश्वसमान उषा देवी आमच्या यज्ञाला शोभा आणण्याकरितां येवोत. ते इंद्राचे बलोत्साही घोडे आमच्या मनोरथाप्रमाणे त्या ऐश्वर्यदायक इंद्रदेवाला आमच्यासमोर यज्ञार्थ सत्वर घेऊन येवोत. ॥ ६ ॥


अश्वा॑वती॒र्गोम॑तीर्न उ॒षासो॑ वी॒रव॑तीः॒ सद॑मुच्छन्तु भ॒द्राः ।
घृ॒तं दुहा॑ना वि॒श्वतः॒ प्रपी॑ता यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥

अश्वऽवतीः गोऽऽमतीः नः उषसः वीरऽवतीः सदं उच्चन्तु भद्राः
घृतं दुहानाः विश्वतः प्रऽपीताः यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥

भक्तकल्याणकारी, उदक व आयुर्घृत देणारी, सर्वतः उदक वा भक्तिरस पिणारी, अश्ववंत, प्रकाशवंत, बहु सुप्रजावंत उषा देवता आमच्या घरी सदैव निवास करोत. अहो देवगणांनो, तुम्ही आपल्या कल्याणकारक आशीर्वचनांनी आमचा सदैव प्रतिपाळ करीत असा. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ४२ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


प्र ब्र॒ह्माणो॒ अङ्‌गि॑रसो नक्षन्त॒ प्र क्र॑न्द॒नुर्न॑भ॒न्यस्य वेतु ।
प्र धे॒नव॑ उद॒प्रुतो॑ नवन्त यु॒ज्याता॒मद्री॑ अध्व॒रस्य॒ पेशः॑ ॥ १ ॥

प्र ब्रह्माणः अङ्गिरसः नक्षन्त प्र क्रन्दनुः नभन्यस्य वेतु
प्र धेनवः उदऽप्रुतः नवन्त युज्यातां अद्री इति अध्वरस्य पेशः ॥ १ ॥

ब्रह्ममूर्ति अंगिरसकुलोत्पन्न अग्निदेवाची सर्वत्र व्याप्ति आहे. आक्रंदनशील पर्जन्य आपले स्वर्गीय गीत (मेघाद्वारे) यथेच्छ चालू ठेवो. उदक परिप्लुत मेघधेनु पुष्कळ लवोत. यज्ञांतील सोमपाषाण आपले रूप दाखवोत. ॥ १ ॥


सु॒गस्ते॑ अग्ने॒ सन॑वित्तो॒ अध्वा॑ यु॒क्ष्वा सु॒ते ह॒रितो॑ रो॒हित॑श्च ।
ये वा॒ सद्म॑न्नरु॒षा वी॑र॒वाहो॑ हु॒वे दे॒वानां॒ जनि॑मानि स॒त्तः ॥ २ ॥

सुऽगः ते अग्ने सनऽवित्तः अध्वा युक्ष्व सुते हरितः रोहितः च
ये वा सद्मन् अरुषाः वीरऽवाहः हुवे देवानां जनिमानि सत्तः ॥ २ ॥

हे अग्निदेवा, चिरकाल वर्तमान हा तुझा यज्ञाचा रस्ताच आम्हां मानवांकरितां बहु सुगम आहे. तुझे लाल हिरवे पिंवळे अथवा शुभ्रवर्ण व वीर देवांना यज्ञार्थ आणणारे घोडे आपल्या रथाला जुंप. आमच्या घरी सोमरस तयार असून देवांच्या सर्व संघांना आम्ही यज्ञार्थ तुझ्याच आज्ञेने पाचारीत आहोत. ॥ २ ॥


समु॑ वो य॒ज्ञं म॑हय॒न्नमो॑भिः॒ प्र होता॑ म॒न्द्रो रि॑रिच उपा॒के ।
यज॑स्व॒ सु पु॑र्वणीक दे॒वाना य॒ज्ञिया॑म॒रम॑तिं ववृत्याः ॥ ३ ॥

सं ओं इति वः यज्ञं महयन् नमःऽभिः प्र होता मन्द्रः रिरिचे उपाके
यजस्व सु पुरुऽअनीक देवान् आ यज्ञियां अरऽमतिं ववृत्याः ॥ ३ ॥

अहो, तुम्हांकरितां देवतांच्या समोर होऊन नमनपूर्वक देवतांची महती गाणारा स्तुतिशील हा आमचा होता - आचार्य खरोखरच सर्वांमध्ये वरिष्ठ आहे. अहो यजमानांनो, देवांकरितां उत्कृष्ट यज्ञयाग सुरूच ठेवा. हे बहुतेजस्विन् अग्ने, जिला कधीं विसांवाच नाही अशा ह्या यज्ञयोग्य भूमीचे ठायी तुम्ही वारंवार येतच रहा बरे. ॥ ३ ॥


य॒दा वी॒रस्य॑ रे॒वतो॑ दुरो॒णे स्यो॑न॒शीरति॑थिरा॒चिके॑तत् ।
सुप्री॑तो अ॒ग्निः सुधि॑तो॒ दम॒ आ स वि॒शे दा॑ति॒ वार्य॒मिय॑त्यै ॥ ४ ॥

यदा वीरस्य रेवतः दुरोणे स्योनऽशीः अतिथिः आचिकेतत्
सुऽप्रीतः अग्न् इः सुऽधितः दमे आ सः विशे दाति वार्यं इयत्यै ॥ ४ ॥

जेव्हां एखाद्या ऐश्वर्यवंत व दानशूर भक्ताच्या घरी सुखशायी अग्निची सुप्रतिष्ठा करून पाहुण्याप्रमाणे आदरबुद्धीने पूजा केली जाते तेव्हां तो अग्निदेव त्या घरी समाधानपूर्वक वास्तव्य करतो. अग्नि उपासक जनाला वरप्रसाद धन देतो. ॥ ४ ॥


इ॒मं नो॑ अग्ने अध्व॒रं जु॑षस्व म॒रुत्स्विन्द्रे॑ य॒शसं॑ कृधी नः ।
आ नक्ता॑ ब॒र्हिः स॑दतामु॒षासो॒शन्ता॑ मि॒त्रावरु॑णा यजे॒ह ॥ ५ ॥

इमं नः अग्ने अध्वरं जुषस्व मरुत्ऽसु इन्द्रे यशसं कृधि नः
आ नक्ता बर्हिः सदतां उषसा उशन्ता मित्रावरुणा यज इह ॥ ५ ॥

हे अग्निदेवा, आमच्या ह्या यज्ञामध्यें आनंद मानून घे. मरुत् देवांपाशी आणि इंद्रदेवापाशी आमची ही अन्नसमर्पण कीर्ति घेऊन जा. रात्रंदिवस आमच्या आसनांवर बसला रहा. देवा ह्या यज्ञभूमीचे ठायी हव्यन्नांच्या आशेस लागलेल्या मित्रावरुण देवांची तुझ्याद्वारे पूजा होवो. ॥ ५ ॥


ए॒वाग्निं स॑ह॒स्य१ वसि॑ष्ठो रा॒यस्का॑मो वि॒श्वप्स्न्य॑स्य स्तौत् ।
इषं॑ र॒यिं प॑प्रथ॒द्वाज॑म॒स्मे यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ६ ॥

एव अग्निं सहस्यं वसिष्ठः रायःऽकामः विश्वऽप्स्न्यस्य स्तौत्
इषं रयिं पप्रथत् वाजं अस्मे इति यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ६ ॥

ऐश्वर्येच्छु ऋषि वसिष्ठ महाराजांनी सर्व जगांतील साम्राज्य धनाच्या इच्छेने सहसस्पुत्र अग्निदेवाची अशी आराधना केली कीं , "देवा, आम्हांकरितां धन , राज्य आणि उत्साहबल सर्व पृथ्वीभर पसरून ठेव". देवांनो, तुम्ही आम्हाला नित्य आपल्या शुभवचनांनी प्रतिपाळा. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ४३ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


प्र वो॑ य॒ज्ञेषु॑ देव॒यन्तो॑ अर्च॒न्द्यावा॒ नमो॑भिः पृथि॒वी इ॒षध्यै॑ ।
येषा॒म् ब्रह्मा॒ण्यस॑मानि॒ विप्रा॒ विष्व॑ग्वि॒यन्ति॑ व॒निनो॒ न शाखाः॑ ॥ १ ॥

प्र वः यज्ञेषु देवऽयन्तः अर्चन् द्यावा नमःऽभिः पृथिवी इति इषध्यै
येषां ब्रह्माणि असमानि विप्राः विष्वक् विऽयन्ति वनिनः न शाखाः ॥ १ ॥

देवश्रद्धाळू तुम्ही - ज्यांची नाना प्रकारची परमेश्वरविषयक स्तुतिस्तोत्रें अरण्यांतील वटवृक्षाच्या शाखांप्रमाणे सर्वत्र पसरलेली असतात - विप्र गण आज ह्या यज्ञामध्ये बळाची इच्छा धारण करून द्यावापृथिवींची उत्कृष्ट पूजा करा. ॥ १ ॥


प्र य॒ज्ञ ए॑तु॒ हेत्वो॒ न सप्ति॒रुद्य॑च्छध्वं॒ सम॑नसो घृ॒ताचीः॑ ।
स्तृ॒णी॒त ब॒र्हिर॑ध्व॒राय॑ सा॒धूर्ध्वा शो॒चींषि॑ देव॒यूनि अ॑स्थुः ॥ २ ॥

प्र यज्ञः एतु हेत्वः न सप्तिः उत् यच्चध्वं सऽमनसः घृताचीः
स्तृणीत बर्हिः अध्वराय साधु ऊर्ध्वा शोचींषि देवऽयूनि अस्थुः ॥ २ ॥

चपल घोड्याप्रमाणे यज्ञ देवता आमच्याकडे धांवत येवो. अहो विप्रांनो, आता तुम्ही एकचित्त होऊन अग्नींवर घृतयुक्त स्रुचा धरा. यज्ञाकरितां ही सुंदर चटई आंथरा. देवांना बोलावून आणणार्‍या अग्नीच्या ज्वाला वरती जाऊं द्या. ॥ २ ॥


आ पु॒त्रासो॒ न मा॒तरं॒ विभृ॑त्राः॒ सानौ॑ दे॒वासो॑ ब॒र्हिषः॑ सदन्तु ।
आ वि॒श्वाची॑ विद॒थ्यामन॒क्त्वग्ने॒ मा नो॑ दे॒वता॑ता॒ मृध॑स्कः ॥ ३ ॥

आ पुत्रासः न मातरं विऽभृत्राः सानौ देवासः बर्हिषः सदन्तु
आ विश्वाची विदथ्यां अनक्तु अग्ने मा नः देवऽताता मृधः करितिकः ॥ ३ ॥

खाऊं पिऊं घालावे लागणारे पुत्र जसे आईजवळ सभोंवार बसतात, त्याप्रमाणे हे सर्व देव ह्या उंच कुशासनरूपी शिखरावर ह्या यज्ञमय भूमीचे - वेदीचे - ठायी येऊन बसोत. ही यज्ञसंबंधी विश्वव्यापी स्रुचा घृतपूर्ण हवि अग्नींत सोडो. हे अग्नि देवा, अमच्या ह्या देवसभेमध्ये - यज्ञामध्ये - दुष्टहिंसक राक्षस लोकांना येऊं देऊं नका. ॥ ३ ॥


ते सी॑षपन्त॒ जोष॒मा यज॑त्रा ऋ॒तस्य॒ धाराः॑ सु॒दुघा॒ दुहा॑नाः ।
ज्येष्ठं॑ वो अ॒द्य मह॒ आ वसू॑ना॒मा ग॑न्तन॒ सम॑नसो॒ यति॒ ष्ठ ॥ ४ ॥

ते सीषपन्त जोषं आ यजत्राः ऋतस्य धाराः सुऽदुघाः दुहानाः
ज्येष्ठं वः अद्य महः आ वसूनां आ गन्तन सऽमनसः यति स्थ ॥ ४ ॥

यज्ञस्वरूप कामधेनुपासून आपापले हविर्भागरूप दुग्धधारा काढून घेणारे ते यजनीय देव आनंदाने आम्हांकडून पूजिले जावोत. आज धनद देवाचे सर्वोत्कृष्ट धन आमच्या यज्ञार्थ येवो. अहो देवांनो, तुम्ही कितीही असलां तरी सर्व एकदिल होऊन येथें याच बरें. ॥ ४ ॥


ए॒वा नो॑ अग्ने वि॒क्ष्वा द॑शस्य॒ त्वया॑ व॒यं स॑हसाव॒न्नास्क्राः॑ ।
रा॒या यु॒जा स॑ध॒मादो॒ अरि॑ष्टा यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ५ ॥

एव नः अग्ने विक्षु आ दशस्य त्वया वयं सहसावन् आस्क्राः
राया युजा सधऽमादः अरिष्टाः यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ५ ॥

हे अग्निदेवा, आमच्याच लोकांमध्ये धन ठेव. हे बलपुत्रा, आम्ही तुझेच निर्मित, तुझ्याच ऐश्वर्याने संयुक्त, तुझ्याच उत्साह बळाने सर्व एकत्र आनंदाने काम करणारे असे आहोंत. देवा, आमची कार्यें निर्विघ्नपणे पार पडोत. देवांनो, तुम्ही सदा आम्हाला आपल्या शुभवचनांनी प्रतिपाळा. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ४४ ( दधिक्रावन् सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - दधिक्रावन् : छंद - त्रिष्टुभ्, जगती


द॒धि॒क्रां वः॑ प्रथ॒मम॒श्विनो॒षस॑म॒ग्निं समि॑द्धं॒ भग॑मू॒तये॑ हुवे ।
इन्द्रं॒ विष्णुं॑म् पू॒षणं॒ ब्रह्म॑ण॒स्पति॑मादि॒त्यान्द्यावा॑पृथि॒वी अ॒पः स्वः ॥ १ ॥

दधिऽक्रां वः प्रथमं अश्विना उषसं अग्निं सम्ऽइद्धं भगं ऊतये हुवे इन्द्रं विष्णुं पूषणं ब्रह्मणः पतिं आदित्यान् द्यावापृथ् इवी इति अपः स्वः ॥ १ ॥

अहो भजकहो, तुमच्या रक्षणार्थ मी प्रथम दधिक्राश्व देवतेला व तदनंतर अश्विनी कुमार, उषादेवी, सुप्रदीपित अग्निदेव, भाग्यद देव, इंद्रभगवान्, श्रीविष्णु, पूषा, ब्रह्माधिपति देवता, सकल प्रकाशमान आदित्यगण, द्यावापृथिवींसहित आपो देवता आणि सूर्य भगवान ह्यांना यज्ञार्थ पाचारण करतो. ॥ १ ॥


द॒धि॒क्रामु॒ नम॑सा बो॒धय॑न्त उ॒दीरा॑णा य॒ज्ञमु॑पप्र॒यन्तः॑ ।
इळां॑ दे॒वीं ब॒र्हिषि॑ सा॒दय॑न्तो॒ऽश्विना॒ विप्रा॑ सु॒हवा॑ हुवेम ॥ २ ॥

दधिऽक्रां ओं इति नमसा बोधयन्तः उत्ऽईराणाः यज्ञं उपऽप्रयन्तः
इळां देवीं बर्हिषि सादयन्तः अश्विना विप्राः सुऽहवा हुवेम ॥ २ ॥

अहो आम्ही अश्वदेवता दधिक्रेला स्तोत्रांनी संशोधन करून व चांगले चेतन करून आता यज्ञास आरंभ करीत आहोत. ह्या कुशासनवर हवि देवतेला स्थापन करून सदा सुनिमंत्रित व विशेष ज्ञानी अश्विनीकुमार देवतांना आपण आता निमंत्रण देऊं. ॥ २ ॥


द॒धि॒क्रावा॑णं बुबुधा॒नो अ॒ग्निमुप॑ ब्रुव उ॒षसं॒ सूर्यं॒ गाम् ।
ब्र॒ध्नं माँ॑श्च॒तोर्वरु॑णस्य ब॒भ्रुं ते विश्वा॒स्मद्दु॑रि॒ता या॑वयन्तु ॥ ३ ॥

दधिऽक्रावाणं बुबुधानः अग्निं उप ब्रुवे उषसं सूर्यं गां
ब्रध्नं मांश्चतोः वरुणस्य बभ्रुं ते विश्वा अस्मत् दुःऽइता यवयन्तु ॥ ३ ॥

दधिक्रावाश्वदेवतेला उद्‍बोधन करून मी आता अग्निदेव, उषादेवी, श्रीसूर्य भगवान, पृथ्वी वा सरसवती देवी, आणि भक्तांना प्रेरणा व अहंकारी लोकांचा नाश करणार्‍या वरुण देवाच्या पिंवळ्या वर्णाच्या घोड्यालाही पाचारितो. हे सर्व देव आमच्या यज्ञांत हजर होऊन आमची सकल पापें घालवून देवोत. ॥ ३ ॥


द॒धि॒क्रावा॑ प्रथ॒मो वा॒ज्यर्वाग्रे॒ रथा॑नां भवति प्रजा॒नन् ।
सं॒वि॒दा॒न उ॒षसा॒ सूर्ये॑णादि॒त्येभि॒र्वसु॑भि॒रङ्‌गि॑रोभिः ॥ ४ ॥

दधिऽक्रावा प्रथमः वाजी अर्वा अग्रे रथानां भवति प्रऽजानन्
सम्ऽविदानः उषसा सूर्येण आदित्येभिः वसुऽभिः अङ्गिरःऽभिः ॥ ४ ॥

उषादेवता, भगवान सूर्यदेव, सकल प्रकाशमान आदित्यगण, वसुदेवता, तिम्ही अग्निदेवता यांच्य उत्तम परिचयांतला, फार माहितगार असा देवांचा "दधिक्रावा" अश्व प्रारंभीच रथाला जुंपला जाऊन सर्वांच्या पुढें पुढें अति शीघ्र गतिने चालणारा व महाबलवान आहे. ॥ ४ ॥


आ नो॑ दधि॒क्राः प॒थ्यामनक्त्वृ॒ीतस्य॒ पन्था॒मन्वे॑त॒वा उ॑ ।
शृ॒णोतु॑ नो॒ दैव्यं॒ शर्धो॑ अ॒ग्निः शृ॒ण्वन्तु॒ विश्वे॑ महि॒षा अमू॑राः ॥ ५ ॥

आ नः दधिऽक्राः पथ्यां अनक्तु ऋतस्य पन्थां अनुऽएतवै ओं इति
शृणोतु नः दैव्यं शर्धः अग्निः शृण्वन्तु विश्वे महिषाः अमूराः ॥ ५ ॥

अहाहा, सत्य सृष्टिनियमरूप यज्ञाच्या राजमार्गांवरून देवांनी यावे म्हणून "दधिक्रा" अश्वदेव आमच्या रस्त्यांवरून पाण्याचा शिडकाव करून ठेवो. शत्रु विध्वंसकारी अग्निदेव आमचे हे देवांचे स्तोत्र ऐकून घेवो. आणि सर्व ब्रह्मांडातील महाबली व सर्वज्ञ देव हे ऐकोत. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ४५ ( सवितृ सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - सवितृ : छंद - त्रिष्टुभ्


आ दे॒वो या॑तु सवि॒ता सु॒रत्नो॑ऽन्तरिक्ष॒प्रा वह॑मानो॒ अश्वैः॑ ।
हस्ते॒ दधा॑नो॒ नर्या॑ पु॒रूणि॑ निवे॒शय॑ञ्च प्रसु॒वञ्च॒ भूम॑ ॥ १ ॥

आ देवः यातु सविता सुऽरत्नः अन्तरिक्षऽप्राः वहमानः अश्वैः
हस्ते दधानः नर्या पुरूणि निऽवेशयन् च प्रऽसुवन् च भूम ॥ १ ॥

उत्कृष्ट रत्नमय, सर्व आकाशास पुरवणारा, किरणरूप अश्वांनी वाहिला जाणारा, मनुष्यहितकर धन आपल्या किरणरूपी हस्ताचें ठायी धारण करणारा पृथ्वीरूप प्राणिमात्रांच्या घराला व्यवस्थित ठेवणारा आणि सर्व प्राणिमात्रांना उत्पन्न करणारा प्रेरक सविता देव ह्या यज्ञभूमीचे ठायी आगमन करो. ॥ १ ॥


उद॑स्य बा॒हू शि॑थि॒रा बृ॒हन्ता॑ हिर॒ण्यया॑ दि॒वो अन्ताँ॑ अनष्टाम् ।
नू॒नं सो अ॑स्य महि॒मा प॑निष्ट॒ सूर॑श्चिदस्मा॒ अनु॑दादप॒स्याम् ॥ २ ॥

उत् अस्य बाहू इति शिथिरा बृहन्ता हिरण्यया दिवः अन्तान् अनष्टां
नूनं सः अस्य महिमा पनिष्ट सूरः चित् अस्मै अनु दात् अपस्याम् ॥ २ ॥

ह्या देवाचे सुवर्णसंपन्न, महाविस्तीर्ण, सढळ उदारहस्त आकाशाच्या अंतापर्यंत ऊर्ध्व प्रसृत झाले आहेत. ह्याच्या महिम्याची आता आपण स्तुति करूं. आणि हा सूर्य भगवानच आम्हां स्तोत्र पाठकांना प्रथमारंभी संमतिपूर्वक आपले ज्ञानोदक देवो. ॥ २ ॥


स घा॑ नो दे॒वः स॑वि॒ता स॒हावा सा॑विष॒द्वसु॑पति॒र्वसू॑नि ।
वि॒श्रय॑माणो अ॒मति॑मुरू॒चीं म॑र्त॒भोज॑न॒मध॑ रासते नः ॥ ३ ॥

सः घ नः देवः सविता सहऽवा आ साविषत् वसुऽपतिः वसूनि
विऽश्रयमाणः अमतिं उरूचीं मर्तऽभोजनं अध रासते नः ॥ ३ ॥

केवळ हा बलवान धनपति सर्वोद्‍भव देवच आम्हाला चोहोंकडून - सर्व देशांमधून - संपत्ति गोळा करण्यास देतो व लावतो. असा हा विस्तीर्ण प्रकाशरूप धारण करणारा देव आम्हांकरितां मानवी भोजन, धनधान्य फलादि भरपूर व पक्व करून ठेवतो. ॥ ३ ॥


इ॒मा गिरः॑ सवि॒तारं॑ सुजि॒ह्वं पू॒र्णग॑भस्तिमीळते सुपा॒णिम् ।
चि॒त्रं वयो॑ बृ॒हद॒स्मे द॑धातु यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ४ ॥

इमाः गिरः सवितारं सुऽजिह्वं पूर्णऽगभस्तिं ईळते सुऽपाणिं
चित्रं वयः बृहत् अस्मे इति दधातु यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ४ ॥

ही स्तुतिस्तोत्रें अग्निरूप उत्कृष्ट जिव्हामुखधारी, सुवर्ण हस्तवंत, पूर्णैश्वर्यमणि अशा भगवान सूर्य देवाला विनवितात. हा देव आम्हामध्ये नाना प्रकारचे व अत्यंत पुष्कळ असे धन धारण करो. देवतांनो, तुम्ही आपल्या मंगल आशीर्वचनेंकरून आमचा सदासर्वदा योगक्षेम करा. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ४६ ( रुद्र सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - रुद्र : छंद - त्रिष्टुभ्, जगती


इ॒मा रु॒द्राय॑ स्थि॒रध॑न्वने॒ गिरः॑ क्षि॒प्रेष॑वे दे॒वाय॑ स्व॒धाव्ने॑ ।
अषा॑ळ्हाय॒ सह॑मानाय वे॒धसे॑ ति॒ग्मायु॑धाय भरता शृ॒णोतु॑ नः ॥ १ ॥

इमाः रुद्राय स्थिरऽधन्वने गिरः क्षिप्रऽसवे देवाय स्वधाव्ने
अषाळ्हाय सहमानाय वेधसे तिग्मऽआयुधाय भरत शृणोतु नः ॥ १ ॥

आता ह्या स्तुतिगिरा दृढ धनुष्य, शीघ्रबाण, स्वधावान, अपराभूत, अति सहनशील, विधातास्वरूप महान रुद्रदेवाला वाहिल्या जावोत. तो रुद्रदेव आमचे आर्जवस्तोत्र ऐकून घेवो. ॥ १ ॥


स हि क्षये॑ण॒ क्षम्य॑स्य॒ जन्म॑नः॒ साम्रा॑ज्येन दि॒व्यस्य॒ चेत॑ति ।
अव॒न्नव॑न्ती॒रुप॑ नो॒ दुर॑श्चरानमी॒वो रु॑द्र॒ जासु॑ नो भव ॥ २ ॥

सः हि क्षयेण क्षम्यस्य जन्मनः साम्ऽराज्येन दिव्यस्य चेतति
अवन् अवन्तीः उप नः दुरः चर अनमीवः रुद्र जासु नः भव ॥ २ ॥

तोच रुद्रदेव ह्या भूलोकोत्पन्न राजादि जंतूंवर आपले दिव्य साम्राज्यैश्वर्य प्रकाशवितो. हे रुद्रभगवंता, ह्या आमच्या मनोहर व संरक्षक दुर्गांचे संरक्षण करून तू सदा आमच्या जवळच रहा. देवा, आमच्या प्रजेमध्ये तू रोगरहित रूपाने रहा. ॥ २ ॥


या ते॑ दि॒द्युदव॑सृष्टा दि॒वस्परि॑ क्ष्म॒या चर॑ति॒ परि॒ सा वृ॑णक्तु नः ।
स॒हस्रं॑ ते स्वपिवात भेष॒जा मा न॑स्तो॒केषु॒ तन॑येषु रीरिषः ॥ ३ ॥

या ते दिद्युत् अवऽसृष्टा दिवः परि क्ष्मया चरति परि सा वृणक्तु नः
सहस्रं ते सुऽअपिवात भेषजा मा नः तोकेषु तनयेषु रिरिषः ॥ ३ ॥

रोगनिवारक रुद्रदेवा व आकाशांतून अवतीर्ण झालेली पृथ्वीसहवर्तमान परिभ्रमण करणरी जी तुझी विद्युत् शक्ति, ती आमच्या संरक्षणार्थ आमच्या संभोवार असो. हे उत्कृष्ट वैभवी वायुमय रुद्रदेवा, तुझी हजारों प्रकारची औषधें आमच्या तान्ह्या पोरांना व मोठ्या पुत्रांनाही कधींही मारक न होवोत. ॥ ३ ॥


मा नो॑ वधी रुद्र॒ मा परा॑ दा॒ मा ते॑ भूम॒ प्रसि॑तौ हीळि॒तस्य॑ ।
आ नो॑ भज ब॒र्हिषि॑ जीवशं॒से यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ४ ॥

मा नः वधीः रुद्र मा परा दाः मा ते भूम प्रऽसितौ हीळितस्य
आ नः भज बर्हिषि जीवऽशंसे यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ४ ॥

भयकृद्‍भयनाशका देवा, आम्हाला मारूं नको. आणि दूर टाकून किंवा परक्यांच्या हातांतही देऊन टाकूं नकोस. अथवा आमचा पराभव करूं नकोस. तुझ्या क्रुद्धरूपाच्या पापरूपी बंधनांत आम्ही बद्ध न होऊं. हविरन्न विभागाचा स्वीकार कर. देवतांनो, तुम्ही सदा सुवचनांनी आम्हाला प्रतिपाळा. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ४७ ( अप् सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अप् : छंद - त्रिष्टुभ्


आपो॒ यं वः॑ प्रथ॒मं दे॑व॒यन्त॑ इन्द्र॒पान॑मू॒र्मिमकृ॑ण्वते॒ळः ।
तं वो॑ व॒यं शुचि॑मरि॒प्रम॒द्य घृ॑त॒प्रुषं॒ मधु॑मन्तं वनेम ॥ १ ॥

आपः यं वः प्रथमं दवऽयन्तः इन्द्रऽपानं ऊर्मिं अकृण्वत इळः
तं वः वयं शुचिं अरिप्रं अद्य घृतऽप्रुषं मधुऽमन्तं वनेम ॥ १ ॥

अहो जलदेवतांनो, इंद्राचे पेय, पृथ्वीचा रसरूपी सोम आमच्या देवभक्त पूर्वजांनी पूर्वी सृष्टीसमयी जो व जसा तयार केला होता तोच हा आज आम्ही परमशुद्ध, निष्पाप, उदकसंयुक्त, मधुमिश्रित सोमरस तुम्हांस्तव मागून घेत आहोंत. ॥ १ ॥


तमू॒र्मिमा॑पो॒ मधु॑मत्तमं वो॒ऽपां नपा॑दवत्वाशु॒हेमा॑ ।
यस्मि॒न्निन्द्रो॒ वसु॑भिर्मा॒दया॑ते॒ तम॑श्याम देव॒यन्तो॑ वो अ॒द्य ॥ २ ॥

तं ऊर्मिं आपः मधुमत्ऽतमं वः अपां नपात् अवतु आशुऽहेमा
यस्मिन् इन्द्रः वसुऽभिः मादयाते तं अश्याम देवऽयन्तः वः अद्य ॥ २ ॥

अहो जलदेवतांनो, त्या तुमच्या अत्यंत मधुर सोमरसाचे अति थंडप्रकृति "अपानपात्" (जलपुत्र) देवता रक्षण करोत कारण ह्याच्या योगाने इंद्रदेव वसुदेवांसहित आनंदित होतो. अशा हा सोमरसाला देवश्रद्धावान आम्ही आज तुम्हांपासून घेऊन तुम्हालाच समर्पण करोत. ॥२ ॥


श॒तप॑वित्राः स्व॒धया॒ मद॑न्तीर्दे॒वीर्दे॒वाना॒मपि॑ यन्ति॒ पाथः॑ ।
ता इन्द्र॑स्य॒ न मि॑नन्ति व्र॒तानि॒ सिन्धु॑भ्यो ह॒व्यं घृ॒तव॑ज्जुहोत ॥ ३ ॥

शतऽपवित्राः स्वधया मदन्तीः देवीः देवानां अपि यन्ति पाथः
ताः इन्द्रस्य न मिनन्ति व्रतानि सिन्धुऽभ्यः हव्यं घृतऽवत् जुहोत ॥ ३ ॥

यज्ञांतील स्वधाहुतींनी संतप्त होणार्‍या आपोदेवी देवांच्या मार्गांतही जाऊं शकतात अशी ज्यांची शेंकडों पवित्र तीर्थस्थाने आहेत ; त्या जलदेवी इंद्राच्या नियमांचा भंग करीत नाहींत. अशा सिंधु देवतांना आज्यसंयुक्त हव्यन्न यज्ञद्वारे समर्पण करा. ॥ ३ ॥


याः सूर्यो॑ र॒श्मिभि॑रात॒तान॒ याभ्य॒ इन्द्रो॒ अर॑दद्गा॒तुमू॒र्मिम् ।
ते सि॑न्धवो॒ वरि॑वो धातना नो यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ४ ॥

याः सूर्यः रश्मिऽभिः आततान याभ्यः इन्द्रः अरदत् गातुं ऊर्मिं
ते सिन्धवः वरिवः धातन नः यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ४ ॥

ज्यांना सूर्याने निज किरणांनी सर्वत्र विस्तारले, ज्यांच्यामधून पार जाण्यांकरितां इंद्राने त्यांच्या लाटांना दाबून टाकले, त्या समस्त सिंधूजलदेवता आम्हाला उत्कृष्ट धन समर्पण करोत. अहो जलाश्रित देवमूर्तिंनो, तुम्ही सदा आमचा कृपावचनद्वारें प्रतिपाळ करा. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ४८ ( ऋभु सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - ऋभु : छंद - त्रिष्टुभ्


ऋभु॑क्षणो वाजा मा॒दय॑ध्वम॒स्मे न॑रो मघवानः सु॒तस्य॑ ।
आ वो॑ऽर्वाचः॒ क्रत॑वो॒ न या॒तां विभ्वो॒ रथं॒ नर्यं॑ वर्तयन्तु ॥ १ ॥

ऋभुऽक्षणः वाजाः मादयध्वं अस्मे इति नरः मघऽवानः सुतस्य
आ वः अर्वाचः क्रतवः न यातां विऽभ्वः रथं नर्यं वर्तयन्तु ॥ १ ॥

ऋभुदेवाश्रित ऋभु, विभु व वाज हे ऐश्वर्यसंपन्न नरदेव आम्ही काढलेल्या ह्या सोमरसाने अति हर्षित होवोत. देवांनो, तुमच्या सदिच्छा सांप्रत जरा आमच्याकडे झुकोत. तुमचे विभु देव आपल्या मनुष्यहितपर मनोरथाला इकडे यज्ञार्थ आणोत. ॥ १ ॥


ऋ॒भुरृ॒भुभि॑र॒भि वः॑ स्याम॒ विभ्वो॑ वि॒भुभिः॒ शव॑सा॒ शवां॑सि ।
वाजो॑ अ॒स्माँ अ॑वतु॒ वाज॑साता॒विन्द्रे॑ण यु॒जा त॑रुषेम वृ॒त्रम् ॥ २ ॥

ऋभुः ऋभुऽभिः अभि वः स्याम विऽभ्वः विऽभुमिः शवसा शवांसि
वाजः अस्मान् अवतु वाजऽसातौ इन्द्रेण युजा तरुषेम वृत्रम् ॥ २ ॥

तुम्हां शहाण्या ऋभु देवांच्या कृपेने आम्ही सर्वसमृद्ध होऊं. तुम्हां वैभवी देवांच्या शीघ्र आगमनाने आम्ही महत्त्व व शत्रुविनाशक बलांप्रत पावूं. हे उत्साही "वाज" ऐश्वर्यबळ वाढविण्याकरितां चाललेल्या ह्या लढाईंमधून इंद्रदेवाच्या कृपेने आम्ही वृत्रासुराचे मर्दन करून टाकूं. ॥ २ ॥


ते चि॒द्धि पू॒र्वीर॒भि सन्ति॑ शा॒सा विश्वाँ॑ अ॒र्य उ॑प॒रता॑ति वन्वन् ।
इन्द्रो॒ विभ्वाँ॑ ऋभु॒क्षा वाजो॑ अ॒र्यः शत्रो॑र्मिथ॒त्या कृ॑णव॒न्वि नृ॒म्णम् ॥ ३ ॥

ते चित् हि पूर्वीः अभि सन्ति शासा विश्वान् अर्यः उपरऽताति वन्वन्
इन्द्रः विऽभ्वा ऋभुक्षाः वाजः अर्यः शत्रोः मिथत्या कृणवन् वि नृम्णम् ॥ ३ ॥

आणि हे देवा, प्राचीन सर्वत्र पसरलेले शत्रुगण तुझ्या आज्ञेने पाषाणाच्या मार्‍याने अगदींच नाहींसे झाले. इंद्र देव, विभुसहित ऋभुक्षा व वाजदेव आमच्या अनार्य (दुष्ट गुण) शत्रूंची हिंसा करून त्या द्वारे आमच्यात विशेष नरयोग्य पुरुषार्थ बळ चढवोत. ॥ ३ ॥


नू दे॑वासो॒ वरि॑वः कर्तना नो भू॒त नो॒ विश्वे॑ऽवसे स॒जोषाः॑ ।
सम॒स्मे इषं॒ वस॑वो ददीरन्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ४ ॥

नु देवासः वरिवः कर्तन नः भूत नः विश्वे अवसे सऽजोषाः
सं अस्मे इति इषं वसवः ददीरन् यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ४ ॥

देव आज आम्हाला आमचे धन तोडून देवोत. अहो देवांनो, तुम्ही आमच्या रक्षणाकरितां आनंदाने सर्वत्र भरलेले असा. वसुदेव आम्हाला सर्वतः अन्न देवोत. देवतांनो, तुम्ही आम्हाला आपल्या कल्याणप्रद वचनांनी सदैव प्रतिपाळा. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ४९ ( अप् सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अप् : छंद - त्रिष्टुभ्


स॒मु॒द्रज्ये॑ष्ठाः सलि॒लस्य॒ मध्या॑त्पुना॒ना य॒न्त्यनि॑विशमानाः ।
इन्द्रो॒ या व॒ज्री वृ॑ष॒भो र॒राद॒ ता आपो॑ दे॒वीरि॒ह माम॑वन्तु ॥ १ ॥

समुद्रऽज्येष्ठाः सलिलस्य मध्यात् पुनानाः यन्ति अनिऽविशमानाः
इन्द्रः या वज्री वृषभः रराद ताः आपः देवीः इह मां अवन्तु ॥ १ ॥

ज्यांच्यात समुद्र सामावलेला आहे, सर्वांना प्रिय करणार्‍या, व क्षणभर देखील एका जागी स्थिर न राहणार्‍या आपोदेवता, आकाशामधून - स्वर्गांतून (आमच्याकरितां) येतात. त्यांना वज्रधर वर्षाकामी इंद्रदेवाने फोडले - स्वस्थानांतून मुक्त केले. त्या ह्या जलधारा देवता माझे सर्वत्र संरक्षण करोत. ॥ १ ॥


या आपो॑ दि॒व्या उ॒त वा॒ स्रव॑न्ति ख॒नित्रि॑मा उ॒त वा॒ याः स्व॑यं॒जाः ।
स॒मु॒द्रार्था॒ याः शुच॑यः पाव॒कास्ता आपो॑ दे॒वीरि॒ह माम॑वन्तु ॥ २ ॥

याः आपः दिव्याः उत वा स्रवन्ति खनित्रिमाः उत वा याः स्वयम्ऽजाः
समुद्रऽअर्थाः याः शुचयः पावकाः ताः आपः देवीः इह मां अवन्तु ॥ २ ॥

ज्या मेघरूपे स्थित आहेत, ज्या नदीरूपे वाहतात, ज्या तळींविहीरींतून निघतात, ज्या स्वयंभूत तलाव सरोवरांतर्गत आहेत व ज्या समुद्राचे धनच होत, ज्या तीर्थमय जगास पावन करणार्‍या आहेत त्या सर्व जलधारा देवी माझे संरक्षण करोत. ॥ २ ॥


यासां॒ राजा॒ वरु॑णो॒ याति॒ मध्ये॑ सत्यानृ॒ते अ॑व॒पश्य॒ञ्जना॑नाम् ।
म॒धु॒श्चुतः॒ शुच॑यो॒ याः पा॑व॒कास्ता आपो॑ दे॒वीरि॒ह माम॑वन्तु ॥ ३ ॥

यासां राजा वरुणः याति मध्ये सत्यानृते इति अवऽपश्यन् जनानां
मधुऽश्चुतः शुचयः याः पावकाः ताः आपः देवीः इह मां अवन्तु ॥ ३ ॥

ज्यांचा राजा वरुण भगवान् - लोकांचे पापपुण्य बघत बघत ह्या भूमीवर येत असतो, ज्या मधुर रसाला प्रसवणार्‍या असून शुद्ध व पतित पावन आहेत त्या आपोदेवी माझे संरक्षण करोत. ॥ ३ ॥


यासु॒ राजा॒ वरु॑णो॒ यासु॒ सोमो॒ विश्वे॑ दे॒वा यासूर्जं॒ मद॑न्ति ।
वै॒श्वा॒न॒रो यास्व॒ग्निः प्रवि॑ष्ट॒स्ता आपो॑ दे॒वीरि॒ह माम॑वन्तु ॥ ४ ॥

यासु राजा वरुणः यासु सोमः विश्वे देवाः यासु ऊर्जं मदन्ति
वैश्वानरः यासु अग्निः प्रऽविष्टः ताः आपः देवीः इह मां अवन्तु ॥ ४ ॥

ज्यांच्यामध्ये राजा वरुण भगवान् वर्तमान आहे, ज्यांमध्ये सोमदेव स्थित आहे, ज्यामुळे सकल देव ओज - कांति पावून उल्हासित होतात, ज्यांचे ठायी जगद्‍व्यापी अग्नि वडवानल रूपाने प्रविष्ठ आहे, अशा त्या सर्व उदक प्रवाह देवता माझे रक्षण करोत. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ५० ( अनेक देवता सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - अनेक देवता : छंद - जगती, अति जगती, शक्वरी


आ मां मि॑त्रावरुणे॒ह र॑क्षतं कुला॒यय॑द्वि॒श्वय॒न्मा न॒ आ ग॑न् ।
अ॒ज॒का॒वं दु॒र्दृशी॑कं ति॒रो द॑धे॒ मा मां पद्ये॑न॒ रप॑सा विद॒त्त्सरुः॑ ॥ १ ॥

आ मां मित्रावरुणा इह रक्षतं कुलाययत् विऽश्वयत् मा नः आ गन्
अजकावं दुःऽदृशीकं तिरः दधे मा मां पद्येन रपसा विदत् त्सरुः ॥ १ ॥

अहो मित्रावरुणांनो, माझे ह्या भूमीवर चांगले रक्षण करा. घरांत येतांजातां किंवा सर्व पृथ्वीवर पराक्रम करीत फिरतां फिरतां मजवर कोणीही चालून न येवो. ज्याच्या योगाने कमी दिसावयास लगते असा डोळ्याचा ’अजका’ नांवाचा दुष्ट रोग मजपासून तू दूरच ठेव. सरपटत अचुक मनुष्याला डंख करणारे सर्व प्राणी मला माझ्या पायाच्या चाहुलावरून किंवा आवाजावरूनही न ओळखोत. ॥१ ॥


यद्वि॒जाम॒न्परु॑षि॒ वन्द॑नं॒ भुव॑दष्ठी॒वन्तौ॒ परि॑ कु॒ल्फौ च॒ देह॑त् ।
अ॒ग्निष्टच्छोच॒न्नप॑ बाधतामि॒तो मा मां पद्ये॑न॒ रप॑सा विद॒त्त्सरुः॑ ॥ २ ॥

यत् विऽजामन् परुषि वन्दनं भुवत् अष्ठीवन्तौ परि कुल्फौ च देहत्
अग्निः तत् शोचन् अप बाधतां इतः मा मां पद्येन रपसा विदत् त्सरुः ॥ २ ॥

जे वारंवार व पुष्कळ पीडा देणारे बोटांच्या पेरावर तद्‍भुत होणारे फोड आदि, सर्वांगभर पसरणारा गुल्फादि आदि वातरोग, हे सर्व तो प्रदीप्त अग्नि ह्या भूमीतून दूर घालवो. सरपटत व दबा धरून हल्ला करणार्‍या सर्पव्याघ्रादि दुष्ट प्राण्यांना माझ्या पायाची चाहूल न लागो. ॥ २ ॥


यच्छ॑ल्म॒लौ भव॑ति॒ यन्न॒दीषु॒ यदोष॑धीभ्यः॒ परि॒ जाय॑ते वि॒षम् ।
विश्वे॑ दे॒वा निरि॒तस्तत्सु॑वन्तु॒ मा मां पद्ये॑न॒ रप॑सा विद॒त्त्सरुः॑ ॥ ३ ॥

यत् शल्मलौ भवति यत् नदीषु यत् ओषधीभ्यः परि जायते विषं
विश्वे देवाः निः इतः तत् सुवन्तु मा मां पद्येन रपसा विदत् त्सरुः ॥ ३ ॥

कटुशेवगा इत्यादि प्रकारच्या वृक्षांमध्ये जें वीष भरलेले आहे, अथवा जें कांही नदीच्या पाण्यांत कोठें असेल, अथवा जें सोमल आदि वनस्पतींपासून होऊं शकतें त्या सार्‍या विषांचे दुष्ट परिणाम विश्वदेव ह्या यज्ञीय भूमींतून पार घालवून देवोत. सर्पादिप्राण्याला माझी चाहूल न लागो. ॥ ३ ॥


याः प्र॒वतो॑ नि॒वत॑ उ॒द्वत॑ उद॒न्वती॑रनुद॒काश्च॒ याः ।
ता अ॒स्मभ्यं॒ पय॑सा॒ पिन्व॑मानाः शि॒वा दे॒वीर॑शिप॒दा भ॑वन्तु॒
सर्वा॑ न॒द्यो अशिमि॒दा भ॑वन्तु ॥ ४ ॥

याः प्रऽवतः निऽवतः उत्ऽवतः उदन्ऽवतीः अनुदकाः च याः
ताः अस्मभ्यं पयसा पिन्वमानाः शिवाः देवीः अशिपदाः भवन्तु सर्वाः नद्यः अशिमिदाः भवन्तु ॥ ४ ॥

वर, खाली व इतस्ततः वाहणारे झरे, उदकांनी भरलेल्या नद्या, अथवा उदक विरहित नाले, त्या ह्या सर्व जगास पाणी पाजणार्‍या मंगलमय नदीदेवी आम्हाला प्लीहोदरश्लीपदादि रोग रहित होवोत. सर्व नद्या आमच्यांविषयी अहिंसक असोत. ॥४ ॥


ॐ तत् सत्


GO TOP