PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ७ - सूक्त ३१ ते ४०

ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ३१ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - विराट्, गायत्री


प्र व॒ इन्द्रा॑य॒ माद॑नं॒ हर्य॑श्वाय गायत ॥ सखा॑यः सोम॒पाव्ने॑ ॥ १ ॥

प्र वः इंद्राय मादनं हरिऽअश्वाय गायत । सखायः सोमऽपाव्ने ॥ १ ॥

मित्रांनो आता तुम्ही सोमाला पवित्र करणार्‍या "हरि" नांवाच्या अश्वांवर आरूढ होऊन भक्तांच्या यज्ञाकडे येणार्‍या इंद्र देवाप्रित्यर्थ आनंददायक स्तुतिस्तोत्र उंचस्वराने गा ॥ १ ॥


शंसेदु॒क्थं सु॒दान॑व उ॒त द्यु॒क्षं यथा॒ नरः॑ ॥ च॒कृ॒मा स॒त्यरा॑धसे ॥ २ ॥

शंस इत् उक्थं सुऽदानवे उत द्युक्षं यथा नरः । चकृम सत्यऽराधसे ॥ २ ॥

अहो उत्कृष्ट दाता, सत्यवैभव अशा इंद्र देवा प्रित्यर्थ तुम्ही आता ह्या यज्ञामध्ये आपल्या निजवाणींनी कांही प्रशंसापर स्तुतिस्तोत्रे गा; जशी पूर्वींच्या नरवीरांनी दिव्य स्तोत्रें करून ठेविली. आम्ही तर त्याचे स्तोत्र करावयाला लागलोच. ॥ २ ॥


त्वं न॑ इन्द्र वाज॒युस्त्वं ग॒व्युः श॑तक्रतो ॥ त्वं हि॑रण्य॒युर्व॑सो ॥ ३ ॥

त्वं नः इंद्र वाजऽयुः त्वं गव्युः शतक्रतोइतिशतऽक्रतो । त्वं हिरण्यऽयुः वसोइति ॥ ३ ॥

इंद्रा, तू आम्हाला धन मिळवून देणार आहेस. हे शंभर यज्ञ करणार्‍या देवा, तू आम्हाला गाई लाभून देणारा आहेस. हे धनवंता, तू आम्हाला सुवर्णादि धातुंचा लाभ करून देणार आहेस. ॥ ३ ॥


व॒यमि॑न्द्र त्वा॒यवो॑ऽभि प्र णो॑नुमो वृषन् ॥ वि॒द्धी त्व१॒स्य नो॑ वसो ॥ ४ ॥

वयं इंद्र त्वा यवो अभि प्र नोनुमः वृषन् । विद्धि तु अ१स्य नः वसोइति ॥ ४ ॥

इंद्र त्वद् एकध्यानी आम्ही तुला वारंवार सर्वतः प्रणाम करीत आहोत. हे धनदेवा, तू आमच्या ह्या प्रार्थनेला चांगले समजून घे. ॥ ४ ॥


मा नो॑ नि॒दे च॒ वक्त॑वे॒ऽर्यो र॑न्धी॒ररा॑व्णे ॥ त्वे अपि॒ क्रतु॒र्मम॑ ॥ ५ ॥

मा नः निदे च वक्तवे अर्यः रंधीः अराव्णे । त्वेइति अपि क्रतुः मम ॥ ५ ॥

देवा, तू आम्हाला आमच्या निंदखोर महा बोलक्या कंजूष स्वार्थी लोकांच्या हातांत देऊ नको. देवा, माझा यज्ञ तुलाच समर्पण असो. ॥ ५ ॥


त्वं वर्मा॑सि स॒प्रथः॑ पुरोयो॒धश्च॑ वृत्रहन् ॥ त्वया॒ प्रति॑ ब्रुवे यु॒जा ॥ ६ ॥

त्वं वर्म असि सऽप्रथः पुरःऽयोधः च वृत्रऽहन् । त्वया प्रति ब्रुवे युजा ॥ ६ ॥

वृत्रघ्ना इंद्रा, तू आमचे कवच आहेस, तूच आम्हांकरितां अवघा विस्तृत झाला आहेस, व तूच आम्हांकरितां पुढे होऊन लढणार आहेस. देवा जे आम्ही बोलतो ते तरी तुझ्या शक्तीनेंच बोलतो. ॥ ६ ॥


म॒हाँ उ॒तासि॒ यस्य॒ ते॑ऽनु स्व॒धाव॑री॒ सहः॑ ॥ म॒म्नाते॑ इन्द्र॒ रोद॑सी ॥ ७ ॥

महान् उत असि यस्य ते अनु स्वधावरीइतिस्वधाऽवरी सहः । मम्नातेइति इंद्र रोदसीइति ॥ ७ ॥

देवा इंद्रा, अहो तुम्ही खरोखरच मोठे आहांत. कारण हे देवा, तुझे बळ अग्नींतील स्वधाहुती द्वारा परितृप्त होणार्‍या रोदसींशीच ठेप घेत. ॥ ७ ॥


तं त्वा॑ म॒रुत्व॑ती॒ परि॒ भुव॒द्वाणी॑ स॒याव॑री ॥ नक्ष॑माणा स॒ह द्युभिः॑ ॥ ८ ॥

तं त्वा मरुत्वती परि भुवत् वाणी सऽयावरी । नक्षमाणा सह द्युऽभिः ॥ ८ ॥

सदा तुझ्या सन्निध असणारी, दिव्य सृष्टींत व्यापून राहणारी, आमची वायुवती वाणी त्या एवंगुणविशिष्ट अशा तुलाच शरण आली आहे. ॥ ८ ॥


ऊ॒र्ध्वास॒स्त्वान्विन्द॑वो॒ भुव॑न्द॒स्ममुप॒ द्यवि॑ ॥ सं ते॑ नमन्त कृ॒ष्टयः॑ ॥ ९ ॥

ऊर्ध्वासः त्वा अनु इंदवः भुवन् दस्मं उप द्यवि । सं ते नमंत कृष्टयः ॥ ९ ॥

इंद्र देवा, आकाशस्थ तुज दर्शनीय देवाच्याच अनुरोधाने वरील चंद्रादि लोकही राहतात. वरची नक्षत्रादि भुवनक्षेत्रांतील सर्व प्रजा तुलाच नमस्कार करतात. ॥ ९ ॥


प्र वो॑ म॒हे म॑हि॒वृधे॑ भरध्वं॒ प्रचे॑तसे॒ प्र सु॑म॒तिं कृ॑णुध्वम् ॥ विशः॑ पू॒र्वीः प्र च॑रा चर्षणि॒प्राः ॥ १० ॥

प्र वः महे महिऽवृधे भरध्वं प्रऽचेतसे प्र सुऽमतिं कृणुध्वं । विशः पूर्वीः प्र चर चर्षणिऽप्राः ॥ १० ॥

अहो अध्वर्युंनो, तुम्ही वैभवर्धक महान् इंद्र देवालाच पुष्कळ हविरन्न व सोमरसादि समर्पण करा. भक्तांना पुढचा मार्ग सुचविणार्‍या त्या देवाचीच तुम्ही पुष्कळ भक्तिध्याने करा. हे इंद्र देवा, बुद्धिप्रेरका, आम्हाला यज्ञार्थ द्रव्य पुरविणार्‍या ह्या वैश्य जनांवर तू सदा सुप्रसन्न रहा. ॥ १० ॥


उ॒रु॒व्यच॑से म॒हिने॑ सुवृ॒क्तिमिन्द्रा॑य॒ ब्रह्म॑ जनयन्त॒ विप्राः॑ ॥ तस्य॑ व्र॒तानि॒ न मि॑नन्ति॒ धीराः॑ ॥ ११ ॥

उरुऽव्यचसे महिने सुऽवृक्तिं इंद्राय ब्रह्म जनयंत विप्राः । तस्य व्रतानि न मिनंति धीराः ॥ ११ ॥

ब्राह्मणांनी सर्व व्यापक महान् इंद्र देवाप्रित्यर्थ, जेणेंकरून देवाचा उत्कृष्ट ऐश्वर्यप्रसाद मिळेल असे, ’ब्रह्म’ स्तोत्र संपादन केले. प्राज्ञ व गंभीर जन त्या देवाच्या नियमांना तोडत नाहीत; किंवा देवता लोकही त्या देवाने घालून दिलेल्या नियमांना मोडत नाहीत. ॥ ११ ॥


इन्द्रं॒ वाणी॒रनु॑त्तमन्युमे॒व स॒त्रा राजा॑नं दधिरे॒ सह॑ध्यै ॥ हर्य॑श्वाय बर्हया॒ समा॒पीन् ॥ १२ ॥

इंद्रं वाणीः अनुत्तऽमन्युं एव सत्रा राजानं दधिरे सहध्यै । हरिऽअश्वाय बर्हय सं आपीन् ॥ १२ ॥

जगद्रक्षक, राजाधिराज व ज्याच्या रागाला कोणालाच आवरितां येत नाही अशा इंद्र देवाशींच आमच्या स्तुति, शत्रूंचा पराभव करण्याची हिंमत येण्याकरितां, संल्लग्न असोत. हे स्तोत्र संपादका विप्रा, इंद्र देवाप्रित्यर्थ आमच्या बंधू जनांना भक्तिसंयुक्त उत्साहित कर. ॥ १२ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ३२ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि, शक्ति वासिष्ठ : देवता - इंद्र : छंद - प्रगाथ, द्विपदा विराज्


मो षु त्वा॑ वा॒घत॑श्च॒नारे अ॒स्मन्नि री॑रमन् ।
आ॒रात्ता॑च्चित्सध॒मादं॑ न॒ आ ग॑ही॒ह वा॒ सन्नुप॑ श्रुधि ॥ १ ॥

मोइति सु त्वा वाघतः चन आरे अस्मत् नि रीरमन् ।
आरात्तात् चित् सधऽमादं न आ गहि इह वा सन् उप श्रुधि ॥ १ ॥

तुझे यथायोग्य मन लावून यज्ञ करणार्‍या यजमानांपासून आणि आम्हांपासूनही, देवा तू कधी दूर राहूं नको. आणि यदाकदाचित् दूरही असलास, तरी तेथून आमच्या यज्ञांत देवांसह आनंदित होण्याकरितां सत्वर येत जा. अथवा, जर का तू येथेच आहेस, तर मग जवळ येऊन आमचे म्हणणे ऐकून घे. ॥ १ ॥


इ॒मे हि ते॑ ब्रह्म॒कृतः॑ सु॒ते सचा॒ मधौ॒ न मक्ष॒ आस॑ते ।
इन्द्रे॒ कामं॑ जरि॒तारो॑ वसू॒यवो॒ रथे॒ न पाद॒मा द॑धुः ॥ २ ॥

इमे हि ते ब्रह्मऽकृतः सुते सचा मघौ न मक्षः आसते ।
इंद्रे कामं जरितारः वसूऽयवः रथे न पादं आ दधुः ॥ २ ॥

देवा हे ब्रह्मस्तव करणारे सारे ब्राह्मण तुझ्या करितां काढून ठेविलेल्या ह्या मधुर इक्षुरसमय सोमरसाभंवती माशांप्रमाणे जमून तुझी वाट पहात बसले आहेत. हे धनकामी स्तोतृजन, देवा तू रथांत एक पाय घालून ठेवावा त्याप्रमाणे तुज इंद्रामध्येंच आपली मनःकामना धारण करून राहिले आहेत. ॥ २ ॥


रा॒यस्का॑मो॒ वज्र॑हस्तं सु॒दक्षि॑णं पु॒त्रो न पि॒तरं॑ हुवे ॥ ३ ॥

रायऽकामः वज्रऽहस्तं सुऽदक्षिणं पुत्रः न पितरं हुवे ॥ ३ ॥

उदार हस्ताने मंगल दान देणार्‍या व भक्तांच्या संकटनिवारणार्थ हातांत दंड धारण करणार्‍या त्या इंद्र देवाची, पोराने पित्याची करावी त्याप्रमाणे, राज्यैश्वर्येच्छु मी प्रार्थना करीत आहे. ॥ ३ ॥


इ॒म इन्द्रा॑य सुन्विरे॒ सोमा॑सो॒ दध्या॑शिरः ।
ताँ आ मदा॑य वज्रहस्त पी॒तये॒ हरि॑भ्यां या॒ह्योक॒ आ ॥ ४ ॥

इमे इंद्राय सुन्विरे सोमासः दधिऽआशिरः ।
तान् आ मदाय वज्रऽहस्त पीतये हरिऽभ्यां याहि ओक आ ॥ ४ ॥

हे दधिमिश्रित सोमरस इंद्राकरितां पिळून ठेविले आहेत. हे दंडधारी देवा, हा रस पिऊन अति हर्षित होण्याकरितां ये. देवा, आपल्या घोड्यांवर बसून आमच्या यज्ञ सदनाला लवकर ये. ॥ ४ ॥


श्रव॒च्छ्रुत्क॑र्ण ईयते॒ वसू॑नां॒ नू चि॑न्नो मर्धिष॒द्गिरः॑ ।
स॒द्यश्चि॒द्यः स॒हस्रा॑णि श॒ता दद॒न्नकि॒र्दित्स॑न्त॒मा मि॑नत् ॥ ५ ॥

श्रवत् श्रुत्ऽकर्णः ईयते वसूनां नु चित् नः मर्धिषत् गिरः ।
सद्यः चित् यः सहस्राणि शता ददत् नकिः दित्संतं आ मिनत् ॥ ५ ॥

भक्तांची प्रार्थना ऐकणे हेच ह्याचे कान अशा इंद्र देवाचे धनावर स्वामित्व चालते. तो इंद्र देव ही माझी याचना ऐकून घेतो काय ? तो माझ्या स्तुति वाणींना कधीं तरी फेंटाळून लावील काय ? कीं, जो शेंकडों नव्हे हजारो दाने आतांच्या आतांच भक्तांना देऊन टाकतो. अहो, मनुष्यांना देण्याचीच ज्याची इच्छा, असा इंद्र कोणाही भक्ताला मागण्यांपासून वारणार नव्हे. ॥ ५ ॥


स वी॒रो अप्र॑तिष्कुत॒ इन्द्रे॑ण शूशुवे॒ नृभिः॑ ।
यस्ते॑ गभी॒रा सव॑नानि वृत्रहन्सु॒नोत्या च॒ धाव॑ति ॥ ६ ॥

सः वीरः अप्रतिऽस्कुतः इंद्रेण शूशुवे नृभिः ।
यः ते गभीरा सवनानि वृत्रऽहन् सुनोति आ च धावति ॥ ६ ॥

इंद्राच्या योगाने ज्याच्या विरुद्ध कोणी वागत नाही अशा त्या शूर भक्ताची सकल जनांकडून सेवा केली जाते. कां तर तो शूर भक्त गंभीर यज्ञ-ध्याने करून तुजनिमित्त सायंप्रातः सोमरस गाळून तयार ठेवीत असतो. इतकेंच नव्हे तर हे वृत्रघ्ना इंद्रा, तो तुझ्या शोधार्थ एकसारखा धांवत असतो. ॥ ६ ॥


भवा॒ वरू॑थं मघवन्म॒घोनां॒ यत्स॒मजा॑सि॒ शर्ध॑तः ।
वि त्वाह॑तस्य॒ वेद॑नं भजेम॒ह्या दू॒णाशो॑ भरा॒ गय॑म् ॥ ७ ॥

भव वरूथं मघऽवन् मघोनां यत् संऽअजासि शर्धतः ।
वि त्वाऽहतस्य वेदनं भजेमहि आ दुःऽनशः भर गयं ॥ ७ ॥

हे ऐश्वर्यवंता, तुला हवि समर्पण करणार्‍यांना तू उत्कृष्ट वरप्रसाद देण्याचे स्थान होऊन रहा. कारण, परस्पर चढाओढ करणार्‍या शत्रूंना लढण्याची प्रेरणा तूंच करतोस. तुजकडून मारले गेलेले शत्रु दुःखामध्यें अति तडफडत असलेले आम्हांला सांपडावे. दुष्टविनाशक असा तू आमच्या गोठ्यांना व घरादारांना धनसंपत्तीने भरून टाक. ॥ ७ ॥


सु॒नोता॑ सोम॒पाव्ने॒ सोम॒मिन्द्रा॑य व॒ज्रिणे॑ ।
पच॑ता प॒क्तीरव॑से कृणु॒ध्वमित्पृ॒णन्नित्पृ॑ण॒ते मयः॑ ॥ ८ ॥

सुनोता सोमऽपाव्ने सोमं इंद्राय वज्रिणे ।
पचत पक्तीः अवसे कृणुध्वं इत् पृणन् इत् पृणते मयः ॥ ८ ॥

वज्रधारी, सोमपावक इंद्रा प्रित्यर्थ सोमरस पिळून ठेवा. त्या भक्तरक्षक देवाकरितां पक्वान्नें बनवा. तो सुखमय देव स्वतःपरिपूर्ण असून अखिल मानवांनाही ह्या प्रमाणे पुरवितोच. ॥ ८ ॥


मा स्रे॑धत सोमिनो॒ दक्ष॑ता म॒हे कृ॑णु॒ध्वं रा॒य आ॒तुजे॑ ।
त॒रणि॒रिज्ज॑यति॒ क्षेति॒ पुष्य॑ति॒ न दे॒वासः॑ कव॒त्नवे॑ ॥ ९ ॥

मा स्रेधत सोमिनः दक्षत महे कृणुध्वं राये आऽतुजे ।
तरणिः इत् जयति क्षेति पुष्यति न देवासः कवत्नवे ॥ ९ ॥

अहो भारतवासी जनहो, देवांच्या सोमार्पण विधींपासून हटूं नका. यज्ञकर्मामध्ये नित्य तत्पर असा. तुम्ही ही यज्ञ यागादि ऐश्वर्यप्राप्तीच्या इच्छेने, शत्रूंना मारण्याच्या लालसेने, अथवा मोठेपणा करितां तरी सदैव करीत रहा. अहो, यज्ञयागादि कर्मे ही ह्या जगांतील शीघ्रगती नौका होत. ह्यांचा जयजयकार (वेदमंत्रघोष) केल्याने तुमचा जयजयकार होईल. तुमच्या शत्रूंचा संहार होईल, तुमच्या ऐश्वर्याची अभिवृद्धि होईल. अहो जनहो, देव भक्तांना दुर्गति देणारे नव्हेत. ॥ ९ ॥


नकिः॑ सु॒दासो॒ रथं॒ पर्या॑स॒ न री॑रमत् ।
इन्द्रो॒ यस्या॑वि॒ता यस्य॑ म॒रुतो॒ गम॒त्स गोम॑ति व्र॒जे ॥ १० ॥

नकिः सुऽदासः रथं परि आस न रीरमत् ।
इंद्रः यस्य अविता यस्य मरुतः गमत् सः गोऽमति व्रजे ॥ १० ॥

परमेश्वराच्या शुभमंगल दासाच्या मनःकामनांच्या आड कोणीही येणार नाही. त्याचा मनोरथ कोठेंही थांबावयाचा नाही. मंगल प्रसंगी यज्ञयागादि करणार्‍या भक्ताचे सकल मनोरथ सिद्धीस जातात. अहो, ज्याचा रक्षक इंद्र देव, ज्याला मरुत् देवता तारणार्‍या, तो गोधनपूर्ण गोठ्यांत वास्तव करील. परमेश्वराच्या भक्ताचे ऐश्वर्य ज्ञान सर्वत्र वाढेल. ॥ १० ॥


गम॒द्वाजं॑ वा॒जय॑न्निन्द्र॒ मर्त्यो॒ यस्य॒ त्वम॑वि॒ता भुवः॑ ।
अ॒स्माकं॑ बोध्यवि॒ता रथा॑नाम॒स्माकं॑ शूर नृ॒णाम् ॥ ११ ॥

गमत् वाजं वाजयन् इंद्र मर्त्यः यस्य त्वं अविता भुवः ।
अस्माकं बोधि अविता रथानां अस्माकं शूर नृणां ॥ ११ ॥

इंद्रा, ज्याचा तू संरक्षक बनतोस त्याचा संग्रामांत जय होऊन तो ऐश्वर्याप्रत चढतो. हे शूर इंद्रदेवा, ह्यासाठी तू आमच्या स्वतःच्या देहरूप रथांचा व आमच्या पुढार्‍यांच्या संरक्षक हो. ॥ ११ ॥


उदिन्न्वस्य रिच्य॒ते॑ऽंशो॒ धनं॒ न जि॒ग्युषः॑ ।
य इन्द्रो॒ हरि॑वा॒न्न द॑भन्ति॒ तं रिपो॒ दक्षं॑ दधाति सो॒मिनि॑ ॥ १२ ॥

उत् इत् नु अस्य रिच्यते अंशः धनं न जिग्युषः ।
यः इंद्रः हरिऽवान् न दभंति तं रिपः दक्षं दधाति सोमिनि ॥ १२ ॥

यशस्वी पुरुषाच्या धनवैभवाप्रमाणे यज्ञांमध्ये ह्या इंद्र देवाचा भाग खरोखरच सर्व देवांहून अधिक असतो. कारण हा "हरि" अश्वसहित देव सोम अर्पण करणार्‍या भक्तामध्यें चातुर्यबल धारण करतो. अशा दानशूर भक्ताला त्याचे शत्रू आपोआप भितात. ॥ १२ ॥


मन्त्र॒मख॑र्वं॒ सुधि॑तं सु॒पेश॑सं॒ दधा॑त य॒ज्ञिये॒ष्वा ।
पू॒र्वीश्च॒न प्रसि॑तयस्तरन्ति॒ तं य इन्द्रे॒ कर्म॑णा॒ भुव॑त् ॥ १३ ॥

मंत्रं अखर्वं सुऽधितं सुऽपेशसं दधात यज्ञियेषु आ ।
पूर्वीः चन प्रऽसितयः तरंति तं यः इंद्रे कर्मणा भुवत् ॥ १३ ॥

अहो, भारतवासी जनहो, यज्ञकर्मांमध्ये सुंदर, योग्य (यमकादि काव्यालंकार सुशोभित) व मोठमोठे मंत्र इंद्र देवाकरितां संपादन करा. कारण, जो भक्त इंद्राला यज्ञकर्म समर्पण करतो, त्याची महाप्राचीन संकटे देखील नाहींही होतात. ॥ १३ ॥


कस्तमि॑न्द्र॒ त्वाव॑सु॒मा मर्त्यो॑ दधर्षति ।
श्र॒द्धा इत्ते॑ मघव॒न्पार्ये॑ दि॒वि वा॒जी वाजं॑ सिषासति ॥ १४ ॥

कः तं इंद्र त्वाऽवसुं आ मर्त्यः दधर्षति ।
श्रद्धा इत् ते मघऽवन् पार्ये दिवि वाजी वाजं सिसासति ॥ १४ ॥

इंद्रा, त्वां ऐश्वर्यास चढवलेल्या महापुरुषांपुढे कोण हिंमत करील ? हे इंद्र देवा, तुझी श्रद्धा अशी आहे की त्या श्रद्धाबळाने यज्ञ करणारा पुरुष अंती स्वर्गामध्येंही ऐश्वर्य भोगतो. ॥ १४ ॥


म॒घोनः॑ स्म वृत्र॒हत्ये॑षु चोदय॒ ये दद॑ति प्रि॒या वसु॑ ।
तव॒ प्रणी॑ती हर्यश्व सू॒रिभि॒र्विश्वा॑ तरेम दुरि॒ता ॥ १५ ॥

मघोनः स्म वृत्रऽहत्येषु चोदय ये ददति प्रिया वसु ।
तव प्रऽनीती हरिऽअश्व सूरिऽभिः विश्वा तरेम दुःऽइता ॥ १५ ॥

इंद्राप्रित्यर्थ जो आपले प्रियकर द्रव्यादि यज्ञद्वारे समर्पण करतो, अशा पुरुषांकरितां, हे इंद्रदेवा, तू त्यांच्या अरिष्टनिवारणार्थ धनादि पाठवून दे. हे सुंदर अश्ववंता इंद्रा, ह्या तुझ्या नमस्कारपूर्वक प्रार्थना मंत्रांनी सर्व स्तोत्र संपादक ब्राह्मणादि गणांसहित अखिल पापांपासून आम्ही उद्धरून जाऊं असे कर. ॥ १५ ॥


तवेदि॑न्द्राव॒मं वसु॒ त्वं पु॑ष्यसि मध्य॒मम् ।
स॒त्रा विश्व॑स्य पर॒मस्य॑ राजसि॒ नकि॑ष्ट्वा॒ गोषु॑ वृण्वते ॥ १६ ॥

तव इत् इंद्र अवमं वसु त्वं पुष्यसि मध्यमं ।
सत्रा विश्वस्य परमस्य राजसि नकिः त्वा गोषु वृण्वते ॥ १६ ॥

इंद्रदेवा, ही पृथीवरील कनिष्ठ धने तुझी. अंतराल व्यापी मध्यम द्रव्यांचा पोषकही तूच. स्वर्गातील श्रेष्ठ धनांचा प्रकाशकही तूच आहेस. तुला तुझ्या प्रकाशरूप गोधनामध्ये वावरण्यास कोणीही अटकाव करू शकत नाही. ॥ १६ ॥


त्वं विश्व॑स्य धन॒दा अ॑सि श्रु॒तो य ईं॒ भव॑न्त्या॒जयः॑ ।
तवा॒यं विश्वः॑ पुरुहूत॒ पार्थि॑वोऽव॒स्युर्नाम॑ भिक्षते ॥ १७ ॥

त्वं विश्वस्य धनऽदा असि श्रुतः ये ईं भवंति आजयः ।
तव अयं विश्वः पुरुऽहूत पार्थिवः अवस्युः नाम भिक्षते ॥ १७ ॥

देवा, जे हे जीवनार्थ कलह चाललेले असतात त्यांमध्ये सर्वांना सुप्रसिद्ध यशोधन देणारा तूंच आहेस. हे अतिस्तुत इंद्रा, हा तुझा संरक्षणकामी सर्वजगाचा पृथ्वीतत्वमय राजा, आमचा गोब्राह्मण प्रतिपालक यजमान, तुला ज्ञानरूपी उदकरसाची भिक्षा मागत आहे. ॥ १७ ॥


यदि॑न्द्र॒ याव॑त॒स्त्वमे॒ताव॑द॒हमीशी॑य ।
स्तो॒तार॒मिद्दि॑धिषेय रदावसो॒ न पा॑प॒त्वाय॑ रासीय ॥ १८ ॥

यत् इंद्र यावतः त्वं एतावत् अहं ईशीय ।
स्तोतारं इत् दिधिषेय रदवसोइतिरदऽवसो न पापऽत्वाय रासीय ॥ १८ ॥

इंद्रा ज्याअर्थी तू एवढा मोठा आहेस, आणि मी इवलेंसे साम्राज्यैश्वर्य इच्छित आहे, त्याअर्थी धनदेवा, तुझ्या स्तोत्र संपादकाला हें देच. देवा, त्याला पापांच्या हवाली करू नकोस. ॥ १८ ॥


शिक्षे॑य॒मिन्म॑हय॒ते दि॒वेदि॑वे रा॒य आ कु॑हचि॒द्विदे॑ ।
न॒हि त्वद॒न्यन्म॑घवन्न॒ आप्यं॒ वस्यो॒ अस्ति॑ पि॒ता च॒न ॥ १९ ॥

शिक्षेयं इन् महऽयते दिवेऽदिवे राय आ कुहचित्ऽविदे ।
नहि त्वत् अन्यत् मघऽवन् नः आप्यं वस्यः अस्ति पिता चन ॥ १९ ॥

देवा मी आता तुला इतकेच मागतो की तुझा भक्त, मग तो कोठेंही का असेना, त्या तुझ्या पूजा करणार्‍या भक्ताला रोज रोज तू संपत्तीचा ढीग दे. हे ऐश्वर्यवंता देवा, तुझ्यांवाचून आमचा आप्त सखा कोणी नाही. आम्ही ज्याच्या वश आहोत असा आम्हांला तुझ्यावांचून दुसरा कोणी प्रशस्त शरण्य आधार नाही. इतकेंच नव्हे तर देवा तुझ्यावांचून आम्हां मानवांचा दुसरा पालन व संरक्षण करणारा बाप ह्या जगांत कोणीच नाही. ॥ १९ ॥


त॒रणि॒रित्सि॑षासति॒ वाजं॒ पुरं॑ध्या यु॒जा ।
आ व॒ इन्द्रं॑ पुरुहू॒तं न॑मे गि॒रा ने॒मिं तष्टे॑व सु॒द्र्वम् ॥ २० ॥

तरणिः इत् सिसासति वाजं पुरंऽध्या युजा ।
आ वः इंद्रं पुरुऽहूतं नमे गिरा नेमिं तष्टाऽइव सुद्र्वं ॥ २० ॥

देवा,तू जो आमच्याशी विशाल बुद्धीचा योग घडविला आहेस त्या योगाने सत्वरगति नौकेप्रमाणे आम्हांला ह्या जगात तू अन्नबळ पुरवितोस. चांगल्या घडलेल्या काष्ठाच्या बुंध्याला सुताराने नमावे त्याप्रमाणे देवा मी तुम्हा बहुस्तुत इंद्रदेवाला ह्या प्रार्थना सूक्ताद्वारे प्रणाम करतो. ॥ २० ॥


न दु॑ष्टु॒ती मर्त्यो॑ विन्दते॒ वसु॒ न स्रेध॑न्तं र॒यिर्न॑शत् ।
सु॒शक्ति॒रिन्म॑घव॒न्तुभ्यं॒ माव॑ते दे॒ष्णं यत्पार्ये॑ दि॒वि ॥ २१ ॥

न दुःऽस्तुती मर्त्यः विंदते वसु न स्रेधंतं रयिः नशत् ।
सुऽशक्तिः इत् मघऽवन् तुभ्यं माऽवते देष्णं यत् पार्ये दिवि ॥ २१ ॥

देवांची निंदा करून मनुष्यांना कधींही धन मिळावयाचे नाही. देवांना यज्ञद्वारे हवि न मिळाल्याने जी देवहिंसा घडते ती करणार्‍यांना संपत्तिचा पुरवठा व्हावयाचा नाही. हे सर्वैश्वर्यवंत देवा, जे अंती स्वर्गांत मज सारख्याला मिळावयाचे ते देण्याची शक्ती तुला एकट्यालाच आहे. ॥ २१ ॥


अ॒भि त्वा॑ शूर नोनु॒मो॑ऽदुग्धा इव धे॒नवः॑ ।
ईशा॑नम॒स्य जग॑तः स्व॒र्दृश॒मीशा॑नमिन्द्र त॒स्थुषः॑ ॥ २२ ॥

अभि त्वा शूर नोनुमः अदुग्धाः इव धेनवः ।
ईशानं अस्य जगतः स्वःऽदृशं ईशानं इंद्र तस्थुषः ॥ २२ ॥

हे पराक्रमी इंद्रा, दूध न काढलेल्या गाईप्रमाणे आम्ही ब्राह्मणजन ह्या स्थावरजंगम सृष्टीच्या मालकाला - तुज सर्वदर्शनी दिव्यदृष्टी परमेश्वराला - प्रणतिपुरःसर वेदस्तुति गायनाचा हंबरडा फोडून आमचे सोम, घृतमय हवि व स्तोत्ररूपी दूध ग्रहण करण्याकरितां हांक मारीत आहोंत. ॥ २२ ॥


न त्वावाँ॑ अ॒न्यो दि॒व्यो न पार्थि॑वो॒ न जा॒तो न ज॑निष्यते ।
अ॒श्वा॒यन्तो॑ मघवन्निन्द्र वा॒जिनो॑ ग॒व्यन्त॑स्त्वा हवामहे ॥ २३ ॥

न त्वाऽवान् अन्यः दिव्यः न पार्थिवः न जातः न जनिष्यते ।
अश्वऽयंतः मघऽवन् इंद्र वाजिनः गव्यंतः त्वा हवामहे ॥ २३ ॥

देवा तुझ्यासारखा दुसरा कोणी ऊर्ध्व प्रकाशकारी देव नाहीं, न कोणी ह्या पृथ्वीतलावर दुसरा तुजसमान राजा. देवा, तुझ्यासारखा दुसरा कोणी कधी उत्पन्न झाला नाही आणि कधी कोणी व्हायचा नाही. हे सर्वेश्वरा इंद्रा, गाई, घोडे, राज्य सामर्थ्य आणि स्तुतिबुद्धींची इच्छा करणारे आम्ही प्रजानन तुला हांक मारीत आहोंत. ॥ २३ ॥


अ॒भी ष॒तस्तदा भ॒रेन्द्र॒ ज्यायः॒ कनी॑यसः ।
पु॒रू॒वसु॒र्हि म॑घवन्स॒नादसि॒ भरे॑भरे च॒ हव्यः॑ ॥ २४ ॥

अभि सतः तत् आ भर इंद्र ज्यायः कनीयसः ।
पुरुऽवसुः हि मघऽवन् सनात् असि भरेऽभरे च हव्यः ॥ २४ ॥

हे इंद्र देवा, मी तुझा अंश अशा मज धाकट्याच्या धनाला पूर आण. हे जगदीश्वरा, तू महाप्राचीन काळापासून अपरिमित धनसंपन्न आहेस आणि प्रतिजगत् रचण्याच्या यज्ञकाळी तू स्तवनीय झाला आहेस. ॥ २४ ॥


परा॑ णुदस्व मघवन्न॒मित्रा॑न्सु॒वेदा॑ नो॒ वसू॑ कृधि ।
अ॒स्माकं॑ बोध्यवि॒ता म॑हाध॒ने भवा॑ वृ॒धः सखी॑नाम् ॥ २५ ॥

परा नुदस्व मघऽवन्न् अमित्रात् सुऽवेदा नः वसू कृधि ।
अस्माकं बोधि अविता महाधने भव वृधः सखीनां ॥ २५ ॥

हे ब्रह्मांडाधिपति देवा, आमच्या शत्रूंना आमच्यापासून अति दूर पळवून लाव. सर्व धन, सर्व राज्यसंपदा आमची आम्हाला दिसेल व लवकर लाभेल असे कर. आम्हां आर्य जनांचा तू रक्षक हो. हे विराट् धनसंपन्ना देवा, आमच्या मित्रांचा, गोब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय राजा महाराजांचा, तू ऐश्वर्य वर्धन करणारा हो. ॥ २५ ॥


इन्द्र॒ क्रतुं॑ न॒ आ भ॑र पि॒ता पु॒त्रेभ्यो॒ यथा॑ ।
शिक्षा॑ णो अ॒स्मिन्पु॑रुहूत॒ याम॑नि जी॒वा ज्योति॑रशीमहि ॥ २६ ॥

इंद्र क्रतुं नः आ भर पिता पुत्रेभ्यः यथा ।
शिक्ष नः अस्मिन् पुरुऽहूत यामनि जीवाः ज्योतिः अशीमहि ॥ २६ ॥

हे महापराक्रमी इंद्रा, तू आमच्याकरितां मोठमोठी पराक्रमाची कामे आणून दे. देवा, बाप जसे पोरांनो शिकवितो व निजधनही देतो, तद्वत् तू आम्हाला सर्व कांही शिकव व आपले चित्तही दे. हे बहु प्रार्थित देवा, ह्या अज्ञानांधकारमय दशेमध्ये आमच्या सारखे जीव तुझी प्रेरक दिव्य दृष्टी कधी लाभेल ह्या आशेवर बसले आहेत. ॥ २६ ॥


मा नो॒ अज्ञा॑ता वृ॒जना॑ दुरा॒ध्यो३॒माशि॑वासो॒ अव॑ क्रमुः ।
त्वया॑ व॒यं प्र॒वतः॒ शश्व॑तीर॒पो॑ऽति शूर तरामसि ॥ २७ ॥

मा नः अज्ञाताः वृजनाः दुःऽआध्यः मा अशिवासः अव क्रमुः ।
त्वया वयं प्रऽवतः शश्वतीः अपः अति शूर तरामसि ॥ २७ ॥

देवा आम्हां अजाण, पापी, दुराग्रही व अमंगल अशा मानवी जंतूंना सोडून तू अन्यत्र जाऊं नको. हे पराक्रमी इंद्र देवा, तुझ्या द्वारे आम्हाला उत्तरोत्तर प्रगति मिळत राहून आम्ही ह्या शाश्वत भवसागरांतून उद्धरून जाऊं असे कर. ॥ २७ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ३३ ( वसिष्ट-इंद्र संवाद सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


श्वि॒त्यञ्चो॑ मा दक्षिण॒तस्क॑पर्दा धियंजि॒न्वासो॑ अ॒भि हि प्र॑म॒न्दुः ।
उ॒त्तिष्ठ॑न्वोचे॒ परि॑ ब॒र्हिषो॒ नॄन्न मे॑ दू॒रादवि॑तवे॒ वसि॑ष्ठाः ॥ १ ॥

श्वित्यञ्चः मा दक्षिणतःऽकपर्दाः धियम्ऽजिन्वासः अभि हि प्रऽमन्दुः
उत्ऽतिष्ठन् वोचे परि बर्हिषः नॄन् न मे दूरात् अवितवे वसिष्ठाः ॥ १ ॥

अति गौरवर्ण व शुभ्र वस्त्रधारी, उजवीकडून शेंडी ठेवणारे व विशाल बुद्धिसंपन्न अशा माझ्या पुत्रांनी मला जोराने हांक मारून जागृत करून आनंदित केले. मी उठून व यज्ञकुंडाला सव्य घेऊन तेथूनच आमच्या अग्रण्यांना म्हटले की माझ्या पुत्रांना तुमच्या यज्ञ रक्षणार्थ मजपासून दूर नेऊं नको बरे. ॥ १ ॥


दू॒रादिन्द्र॑मनय॒न्ना सु॒तेन॑ ति॒रो वै॑श॒न्तमति॒ पान्त॑मु॒ग्रम् ।
पाश॑द्युम्नस्य वाय॒तस्य॒ सोमा॑त्सु॒तादिन्द्रो॑ऽवृणीता॒ वसि॑ष्ठान् ॥ २ ॥

दूरात् इन्द्रं अनयन् आ सुतेन तिरः वैशन्तं अति पान्तं उग्रं
पाशऽद्युम्नस्य वायतस्य सोमात् सुतात् इन्द्रः अवृणीत वसिष्ठान् ॥ २ ॥

पाशद्युम्नाला मुळी धिक्कारून सोमरसाने भरलेल्या तळींवजा चमसपात्रांतून पिणार्‍या उग्र इंद्रदेवाला, फार लांबून त्यांनी (माझ्या पुत्रांनी सुदासाकडे) आणले. इंद्रदेवाने वयतपुत्र पाशद्युम्नाने काढलेल्या सोमाला सोडून वसिष्ठपुत्रांना पसंत केले. ॥ २ ॥


ए॒वेन्नु कं॒ सिन्धु॑मेभिस्ततारे॒वेन्नु कं॑ भे॒दमे॑भिर्जघान ।
ए॒वेन्नु कं॑ दाशरा॒ज्ञे सु॒दासं॒ प्राव॒दिन्द्रो॒ ब्रह्म॑णा वो वसिष्ठाः ॥ ३ ॥

एव इत् नु कं सिन्धुं एभिः ततार एव इत् नु कं भेदं एभिः जघान
एव इत् नु कं दाशऽराज्ञे सुऽदासं प्र आवत् इन्द्रः ब्रह्मणा वः वसिष्ठाः ॥ ३ ॥

खरोखर ह्या ठिकाणी हे वसिष्ठ पुत्र सिंधू नदीला सहजच तरून गेले. खरोखर ह्या ठिकाणी त्या वसिष्ठपुत्रांनी "भेद" नामक शत्रूला सहजासहजींच मारून टाकले. अहो वसिष्ठ पुत्रांनो, तुमच्या ’ब्रह्म’ स्तोत्र योगानेंच ह्या ठिकाणी दहा राजांबरोबरच्या लढाईंत इंद्राने खरोखर सुदासाचे अगदी सहजगत्या संरक्षण केले. ॥ ३ ॥


जुष्टी॑ नरो॒ ब्रह्म॑णा वः पितॄ॒णामक्ष॑मव्ययं॒ न किला॑ रिषाथ ।
यच्छक्व॑रीषु बृह॒ता रवे॒णेन्द्रे॒ शुष्म॒मद॑धाता वसिष्ठाः ॥ ४ ॥

जुष्टी नरः ब्रह्मणा वः पितॄणां अक्षं अव्ययं न किल रिषाथ
यत् शक्वरीषु बृहता रवेण इन्द्रे शुष्मं अदधात वसिष्ठाः ॥ ४ ॥

हे आमच्या वीर पुत्रांनो, तुमच्या ’ब्रह्म’ स्तोत्रगायनाने तुमच्या पितृदेवतांची तृप्ति झाली. मी वसिष्ठ आपल्या न चालणार्‍या रथाच्या अक्षाला चालवितो (मी जातो) ह्याकरितां तुम्ही आता खिन्न होऊं नका. कारण, हे वसिष्ठ पुत्रांनो, वेदस्तुतिंना मोठ्या उंच स्वराने ’शक्वरी’ छंदामधून गाइल्यामुळे तुम्ही इंद्राचे ठायी महाबल धारण केले आहे. ॥ ४ ॥


उद्द्यामि॒वे त्तृ॒ष्णजो॑ नाथि॒तासो॑ऽदीधयुर्दाशरा॒ज्ञे वृ॒तासः॑ ।
वसि॑ष्ठस्य स्तुव॒त इन्द्रो॑ अश्रोदु॒रुं तृत्सु॑भ्यो अकृणोदुलो॒कम् ॥ ५ ॥

उत् द्याम्ऽइव इत् तृष्णऽजः नाथितासः अदीधयुः दाशऽराज्ञे वृतासः
वस् इष्ठस्य स्तुवतः इन्द्रः अश्रोत् उरुं तृत्सुऽभ्यः अकृणोत् ओं इति लोकम् ॥ ५ ॥

ह्या ठिकाणी तहान लागल्यामुळे पाणी मागणार्‍या व "तृत्सु" राजांच्या, सैन्यासहित असलेल्या वसिष्ठ पुत्रांनी, दहा राजांविरुद्ध चाललेल्या महासंग्रामामध्ये जणूं काय स्वर्गदेवतेलाच (सिंधूरूपाने पर्वतांतून) बाहेर आणून ठेवले. इंद्रदेवाने स्तोत्र गाणार्‍या वसिष्ठांचे भजन ऐकून घेतले. आणि "तृत्सु" राजांकरितां ही विस्तीर्ण भूमी तयार करून दिली. ॥ ५ ॥


द॒ण्डा इ॒वेद्गो॒अज॑नास आस॒न्परि॑च्छिन्ना भर॒ता अ॑र्भ॒कासः॑ ।
अभ॑वच्च पुरए॒ता वसि॑ष्ठ॒ आदित्तृत्सू॑नां॒ विशो॑ अप्रथन्त ॥ ६ ॥

दण्डाइव इत् गोऽऽअजनासः आसन् परिऽच्चिन्नाः भरताः अर्भकासः
अभवत् च पुरःऽएता वसिष्ठः आत् इत् तृत्सूनां विशः अप्रथन्त ॥ ६ ॥

जणूं काय स्तुति वाक्धेनूंचे प्रेरक दंडच अशी पुत्रांप्रमाणे भारत प्रजा ह्या ठिकाणी अलग अलग राहिली. ह्या कारणांवरून वसिष्ठ ऋषि त्यांचे येथेंचे पुढारी (पुरोहित) बनले. आणि ह्याप्रमाणे त्यांनी "तृत्सु" राजांच्या प्रजाजनांना वाढविले. ॥ ६ ॥


त्रयः॑ कृण्वन्ति॒ भुव॑नेषु॒ रेत॑स्ति॒स्रः प्र॒जा आर्या॒ ज्योति॑रग्राः ।
त्रयो॑ घ॒र्मास॑ उ॒षसं॑ सचन्ते॒ सर्वाँ॒ इत्ताँ अनु॑ विदु॒र्वसि॑ष्ठाः ॥ ७ ॥

त्रयः कृण्वन्ति भुवनेषु रेतः तिस्रः प्रऽजाः आर्याः ज्योतिःऽअग्राः
त्रयः घर्मासः उषसं सचन्ते सर्वान् इत् तान् अनु विदुः वसिष्ठाः ॥ ७ ॥

पृथ्वी, अंतरिक्ष व अतिऊर्ध्व द्युलोक ह्या तिम्ही भुवनांचे ठायी अग्नि, वायु आणि आदित्य हे तीन देव आपापली वीर्ये धारण करतात. वसु, इंद्र आणि आदित्य ह्यांवरील (किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य) तिन्ही श्रेष्ठ प्रजा ज्योतिःप्रमुख आहेत. अग्नि, वायु, आदित्य तिन्ही देदीप्यमान देव उषेच्या आधारावर असतात. वसिष्ठ ऋषि पुत्रांनी हे सर्व येथे जाणून घेतले होते. ॥ ७ ॥


सूर्य॑स्येव व॒क्षथो॒ ज्योति॑रेषां समु॒द्रस्ये॑व महि॒मा ग॑भी॒रः ।
वात॑स्येव प्रज॒वो नान्येन॒ स्तोमो॑ वसिष्ठा॒ अन्वे॑तवे वः ॥ ८ ॥

सूर्यस्यऽइव वक्षथः ज्योतिः एषां समुद्रस्यऽइव महिमा गभीरः
वातस्यऽइव प्रऽजवः न अन्येन स्तोमः वसिष्ठाः अनुऽएतवे वः ॥ ८ ॥

सूर्याच्या ज्योतिप्रमाणे ह्या वसिष्ठ ऋषींच्या वक्षःस्थलाची शुभ्र प्रभा आहे. समुद्राप्रमाणे ह्यांचा महिमा अगाध आहे. वायुप्रमाणे ह्यांची कीर्ति वेगवान् आहे. अहो वसिष्ठ महाराज, तुमच्या महिम्याचा अथवा तुमच्या प्रार्थना स्तोत्रांचा थांग मज इंद्राशिवाय दुसर्‍या कोणाला लागणार नाही. ॥ ८ ॥


त इन्नि॒ण्यं हृद॑यस्य प्रके॒तैः स॒हस्र॑वल्शम॒भि सं च॑रन्ति ।
य॒मेन॑ त॒तं प॑रि॒धिं वय॑न्तोऽप्स॒रस॒ उप॑ सेदु॒र्वसि॑ष्ठाः ॥ ९ ॥

ते इत् निण्यं हृदयस्य प्रऽकेतैः सहस्रऽवल्शं अभि सं चरन्त् इ
यमेन ततं परिऽधिं वयन्तः अप्सरसः उप सेदुः वसिष्ठाः ॥ ९ ॥

हे वसिष्ठ ऋषि आपल्या मनांतील गुप्त पण सहस्रशाखी विस्तृत ज्ञानांसहवर्तमान सकल पृथ्वीवर संचार करते झाले. अतिविस्तृत कपड्यांनी आपल्या शरीराला झांकून घेण्याची इच्छा करणार्‍या त्या अप्सरा (दिव्य वारांगना) देखील ह्या वसिष्ठ ऋषींच्या जवळ मनःसंयमन करून खुशाल जननींप्रमाणे बेधडक ज्ञानश्रवणार्थ येऊन बसल्या. ॥ ९ ॥


वि॒द्युतो॒ ज्योतिः॒ परि॑ सं॒जिहा॑नं मि॒त्रावरु॑णा॒ यदप॑श्यतां त्वा ।
तत् ते॒ जन्मो॒तैकं॑ वसिष्ठा॒गस्त्यो॒ यत् त्वा॑ वि॒श आ॑ज॒भार॑ ॥ १० ॥

विऽद्युतः ज्योतिः परि सम्ऽजिहानं मित्रावरुणा यत् अपश्यतां त्वा
तत् ते जन्म उत एकं वसिष्ठ अगस्त्यः यत् त्वा विशः आजभार ॥ १० ॥

अहो वसिष्ठ ऋषि, जेव्हां मित्रा वरुणांनी विद्युत्स्फुलिंगाकार धारण करणार्‍या तुम्हाला बघितले व ऋषि अगस्त्यांनी इतर प्रजेमधून बाहेर आणले, तोच तुमचा पहिला व एकच अद्वितीय जन्म होय. ॥ १० ॥


उ॒तासि॑ मैत्रावरु॒णो व॑सिष्ठो॒र्वश्या॑ ब्रह्म॒न्मन॒सो॑ऽधि जा॒तः ।
द्र॒प्सं स्क॒न्नम्ब्रह्म॑णा॒ दैव्ये॑न॒ विश्वे॑ दे॒वाः पुष्क॑रे त्वाददन्त ॥ ११ ॥

उत असि मैत्रावरुणः वसिष्ठ उर्वश्या ब्रह्मन् मनसः अधि जातः
द्रप्सं स्कन्नं ब्रह्मणा दैव्येन विश्वे देवाः पुष्करे त्वा अददन्त ॥ ११ ॥

हे सर्वत्रपूज्य वसिष्ठ महाराज, अहो तुम्ही मित्रावरुण देवतांपासून उर्वशीच्या पोटी मानस पुत्र जन्मलां आहांत. सकल देवतागणांनी तुम्हाला पुष्कर सरोवराचे ठायी दिव्य विराट् पराक्रमे करून तुडुंब भरून ठेवले होते. ॥ ११ ॥


स प्र॑के॒त उ॒भय॑स्य प्रवि॒द्वान्स॒हस्र॑दान उ॒त वा॒ सदा॑नः ।
य॒मेन॑ त॒तं प॑रि॒धिं व॑यि॒ष्यन्न॑प्स॒रसः॒ परि॑ जज्ञे॒ वसि॑ष्ठः ॥ १२ ॥

सः प्रऽकेतः उभयस्य प्रऽविद्वान् सहस्रऽदानः उत वा सऽदानः
यमेन ततं परिऽधिं वयिष्यन् अप्सरसः परि जज्ञे वसिष्ठः ॥ १२ ॥

अहो, ज्ञानध्वज, उभय (इह परत्र) ज्ञ, हजारदानी - नव्हे सर्वदानी - अशा वसिष्ठ ऋषींनी मनोनिग्रहेंकरून आत्म ज्ञानानें जाणून घेतले, कीं ह्या सभोंवार असलेल्या उर्वश्यादि अप्सरांची इच्छा आपापल्या शरीराभोंवती विस्तृत वस्त्र परिधान करण्याची आहे. ॥ १२ ॥


स॒त्रे ह॑ जा॒तावि॑षि॒ता नमो॑भिः कु॒म्भे रेतः॑ सिषिचतुः समा॒नम् ।
ततो॑ ह॒ मान॒ उदि॑याय॒ मध्या॒त्ततो॑ जा॒तमृषि॑माहु॒र्वसि॑ष्ठम् ॥ १३ ॥

सत्रे ह जातौ इषिता नमःऽभिः कुम्भे रेतः सिसिचतुः समानं
ततः ह मानः उत् इयाय मद्यात् ततः जातं ऋषिं आहुः वसिष्ठम् ॥ १३ ॥

एकदां सनातन महायागामध्यें मित्रावरुण देवांना निमंत्रण आले. त्या निमंत्रणावर ते गेले असतां यज्ञांतील नमस्कारादि तृप्तिकर स्तुतींनी प्रसन्न होऊन त्यांनी दोघांनीही आपापले समान प्रमाण रेत बरोबर एकदांच कुंभामध्यें खरोखरच ओतले. त्यांतील वरच्या भागांतून वडील (अग्रमानकरी) अगस्ति ऋषि उत्पन्न झाले आणि मधल्या भागापासून उत्पन्न झालेल्यांना "वसिष्ठ ऋषि" असे नांव ऋषिलोक देते झाले. ॥ १३ ॥


उ॒क्थ॒भृतं॑ साम॒भृतं॑ बिभर्ति॒ ग्रावा॑णं॒ बिभ्र॒त् प्र व॑दा॒त्यग्रे॑ ।
उपै॑नमाध्वं सुमन॒स्यमा॑ना॒ आ वो॑ गच्छाति प्रतृदो॒ वसि॑ष्ठः ॥ १४ ॥

उक्थऽभृतं सामऽभृतं बिभर्ति ग्रावाणं बिभ्रत् प्र वदाति अग्रे
उप एनं आध्वं सुऽमनस्यमानाः आ वः गच्चाति प्रऽतृदः वसिष्ठः ॥ १४ ॥

(इंद्र देव म्हणतात कीं) हे "प्रतृत" नामधारी "तृत्सु" राजांनो, असे वसिष्ठ ऋषि - देवांचे मानसपुत्र - तुम्हांकडे आले आहेत. तुम्ही संतुष्ट चित्ताने - मित्राप्रमाणे स्वागत करण्याकरितां - त्यांच्या सामोरे जा. हे वसिष्ठ ऋषि सोमपाषाणांना घेऊन व स्वमुखाने भगवंताची स्तुति स्तोत्रें गात गात बघा तुमच्या यज्ञांत आरंभीचे मोठ्या उत्साहाने कसे बोलूं लागले आहेत. ॥ १४ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ३४ ( शांति सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - विश्वेदेव, अहि, अहिर्बुध्न्य : छंद - त्रिष्टुभ्, द्विपदा विराज्


प्र शु॒क्रैतु॑ दे॒वी म॑नी॒षा अ॒स्मत्सुत॑ष्टो॒ रथो॒ न वा॒जी ॥ १ ॥

प्र शुक्रा एतु देवी मनीषा अस्मत् सुऽतष्टः रथः न वाजी ॥ १ ॥

चांगल्या सुताराने केलेल्या मजबूत घोड्यांच्या वेगवान रथाप्रमाणे देदीप्यमान देवी "मनीषा" (कामनापूरक देवी) आम्हांकडे लवकर येवो. ॥ १ ॥


वि॒दुः पृ॑थि॒व्या दि॒वो ज॒नित्रं॑ शृ॒ण्वन्त्यापो॒ अध॒ क्षर॑न्तीः ॥ २ ॥

विदुः पृथिव्याः दिवः जनित्रं शृण्वन्ति आपः अध क्षरन्तीः ॥ २ ॥

खाली पडणारे वर्षोदक पृथ्वीलोक व द्यु (स्वर्ग) लोक ह्यांच्या उत्पत्तिला जाणते आणि ऐकतेंही. ॥ २ ॥


आप॑श्चिदस्मै॒ पिन्व॑न्त पृ॒थ्वीर्वृ॒त्रेषु॒ शूरा॒ मंस॑न्त उ॒ग्राः ॥ ३ ॥

आपः चित् अस्मै पिन्वन्त पृथ्वीः वृत्रेषु शूराः मंसन्ते उग्राः ॥ ३ ॥

पसरलेली पृथ्वी देवी आणि उदकदेवता ह्या इंद्राला पाणी पाजतात. अवर्षणरूप वृत्रासुरत्रस्त सकल क्षत्रियादि भक्तजन इंद्राची आराधना करतात. ॥ ३ ॥


आ धू॒र्ष्वस्मै॒ दधा॒ताश्वा॒निन्द्रो॒ न व॒ज्री हिर॑ण्यबाहुः ॥ ४ ॥

आ धूर्षु अस्मै दधात अश्वान् इन्द्रः न वज्री हिरण्यऽबाहुः ॥ ४ ॥

ह्या इंद्रदेवाच्या धुरीला त्याचे घोडे जुंपा. सुवर्णमय किरणरूप हस्तवंत इंद्र देव हातांत वज्र धारण करून अगदीं निघण्यास तयार झाल्याप्रमाणे आहे. ॥ ४ ॥


अ॒भि प्र स्था॒ताहे॑व य॒ज्ञं याते॑व॒ पत्म॒न्त्मना॑ हिनोत ॥ ५ ॥

अभि प्र स्थात अहऽइव यज्ञं याताइव पत्मन् त्मना हिनोत ॥ ५ ॥

अहो जनहो, यज्ञाकरितां घराबाहेर निघा. चला. अहो आपण होऊन चालून महायागाच्या रस्त्याला लागा. ॥ ५ ॥


त्मना॑ स॒मत्सु॑ हि॒नोत॑ य॒ज्ञं दधा॑त के॒तुं जना॑य वी॒रम् ॥ ६ ॥

त्मना समत्ऽसु हिनोत यज्ञं दधात केतुं जनाय वीरम् ॥ ६ ॥

अहो अस्मदीय जनहो, त्या महासंग्रामामध्ये आपण होऊन चला. लोककल्याणास्तव दानशूर व प्रज्ञाशील असा महायाग आरंभ करा. ॥ ६ ॥


उद॑स्य॒ शुष्मा॑द्भा॒नुर्नार्त॒ बिभ॑र्ति भा॒रं पृ॑थि॒वी न भूम॑ ॥ ७ ॥

उत् अस्य शुष्मात् भानुः न आर्त बिभर्ति भारं पृथिवी न भूम ॥ ७ ॥

अहो, ह्या याग बलेंकरूनच तर सूर्यदेव वरती चढत असतो नाही का ? आणि पृथ्वीही जणूं काय ह्या यागबलेंकरून अग्निच्या जोरावर लोकांचा भार सहन करते. ॥ ७ ॥


ह्वया॑मि दे॒वाँ अया॑तुरग्ने॒ साध॑न्नृ॒तेन॒ धियं॑ दधामि ॥ ८ ॥

ह्वयामि देवान् अयातुः अग्ने साधन् ऋतेन धियं दधामि ॥ ८ ॥

हे अग्निदेवा, मी यमनियमपूर्वक त्वदाश्रित देवांना निमंत्रण देत आहे. सत्य (विहित) मार्गाचे अनुष्ठान करीत एकाग्र अंतःकरणपूर्वक मी तुझ्यामध्येंच आपल्या बुद्धीला धारण करीत आहे. ॥ ८ ॥


अ॒भि वो॑ दे॒वीं धियं॑ दधिध्वं॒ प्र वो॑ देव॒त्रा वाचं॑ कृणुध्वम् ॥ ९ ॥

अभि वः देवीं धियं दधिध्वं प्र वः देवऽत्रा वाचं कृणुध्वम् ॥ ९ ॥

भो भो सकल जनहो, आता तुम्ही देवांमध्ये आपल्या बुद्धिची धारणा करा. अहो, तुम्ही आता देवांसंबंधी संभाषणे (चर्चा) सुरू करा. ॥ ९ ॥


आ च॑ष्ट आसां॒ पाथो॑ न॒दीनां॒ वरु॑ण उ॒ग्रः स॒हस्र॑चक्षाः ॥ १० ॥

आ चष्टे आसां पाथः नदीनां वरुणः उग्रः सहस्रऽचक्षाः ॥ १० ॥

भयंकर स्वरूप, सहस्रनेत्रधारी वरुण देव ह्या नद्यांचा मार्ग आंखून ठेवतो. ॥ १० ॥


राजा॑ रा॒ष्ट्रानां॒ पेशो॑ न॒दीना॒मनु॑त्तमस्मै क्ष॒त्रं वि॒श्वायु॑ ॥ ११ ॥

राजा राष्ट्रानां पेशः नदीनां अनुत्तं अस्मै क्षत्रं विश्वऽआयु ॥ ११ ॥

सर्व प्रांताचा हा राजा आणि नद्यांचा हा (वरुण देव) रूपकर्ता आहे. ह्याचे अन्याबाधित बल सर्वगामी आहे. ॥ ११ ॥


अवि॑ष्टो अ॒स्मान्विश्वा॑सु वि॒क्ष्वद्युं॑ कृणोत॒ शंसं॑ निनि॒त्सोः ॥ १२ ॥

अविष्टो इति अस्मान् विश्वासु विक्षु अद्युं कृणोत शंसं निनित्सोः ॥ १२ ॥

हे वरुण देवा, आमचे व आमच्या सकल प्रजाजनांचे सर्वत्र संरक्षण कर. आमची सर्वत्र प्रशंसा होऊं दे. आम्हाला उत्कृष्ट कर आणि आमच्या निंदाखोरांचे तोंड काळे कर. ॥ १२ ॥


व्येतु दि॒द्युद्द्वि॒षामशे॑वा यु॒योत॒ विष्व॒ग्रप॑स्त॒नूना॑म् ॥ १३ ॥

वि एतु दिद्युत् द्विषां अशेवा युयोत विष्वक् रपः तनूनाम् ॥ १३ ॥

आमचे शस्त्र शत्रूंचे शिर उडवीत सर्वत्र संचरो. आमच्या शरीरांतील रोगरूपी पापें आमच्यापासून दूर होवोत. ॥ १३ ॥


अवी॑न्नो अ॒ग्निर्ह॒व्यान्नमो॑भिः॒ प्रेष्ठो॑ अस्मा अधायि॒ स्तोमः॑ ॥ १४ ॥

अवीत् नः अग्निः हव्यऽअत् नमःऽभिः प्रेष्ठः अस्मै अधायि स्तोमः ॥ १४ ॥

यज्ञद्वारे हविरन्नादि पक्वान्नांनी परितृप्त होणारा हा आमचा प्रियतम अग्नि देव आमचे प्रणतिपुरःसर स्तुतींच्या योगाने रक्षण करो. हे स्तोत्र ह्या अग्नि देवाला समर्पण असो. ॥ १४ ॥


स॒जूर्दे॒वेभि॑र॒पां नपा॑तं॒ सखा॑यं कृध्वं शि॒वो नो॑ अस्तु ॥ १५ ॥

सऽजूः देवेभिः अपां नपातं सखायं कृध्वं शिवः नः अस्तु ॥ १५ ॥

उदकपुत्र जगन्मित्र अग्नि देवाशी, हे स्तोत्रकर्त्या, मनःसख्य कर; कीं जेणेंकरून हा अग्निदेव आपणांला कल्याणकारी होईल. ॥ १५ ॥


अ॒ब्जामु॒क्थैरहिं॑ गृणीषे बु॒ध्ने न॒दीनां॒ रज॑स्सु॒ षीद॑न् ॥ १६ ॥

अप्ऽजां उक्थैः अहिं गृणीषे बुध्ने नदीनां रजःऽसु सीदन् ॥ १६ ॥

हे स्तोत्रकर्त्या ब्राह्मणा, नदीच्या बुडाशी राहणर्‍या, पाण्यावरती शयन करणार्‍या आणि मेघोदकांना विदारणार्‍या अग्नि देवाची "उक्थ" सोत्रांनी स्तुति गा. ॥ १६ ॥


मा नो॑ऽहिर्बु॒ध्न्यो रि॒षे धा॒न्मा य॒ज्ञो अ॑स्य स्रिधदृता॒योः ॥ १७ ॥

मा नः अहिः बुध्न्यः रिषे धात् मा यज्ञः अस्य स्रिधत् ऋतऽयोः ॥ १७ ॥

अन्गिदेव आम्हाला शत्रूंच्या स्वाधीन कधीं न करो. आमचा यज्ञ ह्याच्या मार्गांतून अलग न राहो. ह्याच्या विधि विधानांप्रमाणे होऊन हा आमचा यज्ञ अग्निदेवाजवळ सर्वतः जाऊन पोंहचो. ॥ १७ ॥


उ॒त नः॑ ए॒षु नृषु॒ श्रवो॑ धुः॒ प्र रा॒ये य॑न्तु॒ शर्ध॑न्तो अ॒र्यः ॥ १८ ॥

उत नः एषु नृषु श्रवः धुः प्र राये यन्तु शर्धन्तः अर्यः ॥ १८ ॥

ह्या आमच्या पुढारी लोकांमध्ये कीर्तीची धारणा होवो. उत्साहसंपन्न आर्य जन ऐश्वर्यार्थ प्रयत्‍न करोत. ॥ १८ ॥


तप॑न्ति॒ शत्रुं॒ स्व१॒र्ण भूमा॑ म॒हासे॑नासो॒ अमे॑भिरेषाम् ॥ १९ ॥

तपन्ति शत्रुं स्वः न भूम महासेनासः अमेभिः एषाम् ॥ १९ ॥

ह्या देवांच्या बळें करून महासेनाधिपति राजे (अग्रणी) लोक सूर्याप्रमाणे आपल्या शत्रूंना तापदायक होतात. ॥ १९ ॥


आ यन्नः॒ पत्नी॒र्गम॒न्त्यच्छा॒ त्वष्टा॑ सुपा॒णिर्दधा॑तु वी॒रान् ॥ २० ॥

आ यत् नः पत्नीः गमन्ति अच्च त्वष्टा सुऽपाणिः दधातु वीरान् ॥ २० ॥

उत्तम हस्त प्रजापति (पोटांत गर्भ घडविणारा) देव, जेव्हां ठीक (ऋतु प्रसंगी शुभ मुहुर्तांवर) आपल्याच पत्‍निशी समागम करण्याकरितां जो जातो त्या भक्ताला शूर असे सुपुत्र पैदा करून देवो. ॥ २० ॥


प्रति॑ न॒ स्तोमं॒ त्वष्टा॑ जुषेत॒ स्याद॒स्मे अ॒रम॑तिर्वसू॒युः ॥ २१ ॥

प्रति नः स्तोमं त्वष्टा जुषेत स्यात् अस्मे इति अरमतिः वसुऽयुः ॥ २१ ॥

त्वष्टा (गर्भस्थ-विर्यस्थ प्रजापति) देव आमचे स्तोत्र आनंदाने ऐकून घेवो. आमच्याकडे वसुदेव (धन देवता लक्ष्मी) येण्याची लगबग वारंवार सुरू असो. ॥ २१ ॥


ता नो॑ रासन्राति॒षाचो॒ वसू॒न्या रोद॑सी वरुणा॒नी श्रृ॑णोतु ।
वरू॑त्रीभिः सुशर॒णो नो॑ अस्तु॒ त्वष्टा॑ सु॒दत्रो॒ वि द॑धातु॒ रायः॑ ॥ २२ ॥

ता नः रासन् रातिऽसाचः वसूनि आ रोदसी इति वरुणानी शृणोतु
वराऊत्रीभिः सुऽशरणः नः अस्तु त्वष्टा सुऽदत्रः वि दधातु रायः ॥ २२ ॥

दान करण्यामध्ये उदारहस्त देवपत्‍न्या तीं श्रेष्ठ धने आम्हाला अर्पण करोत. देवी रोदसी आकाश देवता आणि देवी वरुण ही आमची स्तोत्रे ऐकून घेवोत. वीर्यस्थ प्रजापति देव आपल्या सुंदरीसहवर्तमान आम्हाला सदैव सुखेंकरून वश असो. तो उत्तम दानशाली देव आम्हाला प्रभुत्व देवो. ॥ २२ ॥


तन्नो॒ रायः॒ पर्व॑ता॒स्तन्न॒ आप॒स्तद्रा॑ति॒षाच॒ ओष॑धीरु॒त द्यौः ।
वन॒स्पति॑भिः पृथि॒वी स॒जोषा॑ उ॒भे रोद॑सी॒ परि॑ पासतो नः ॥ २३ ॥

तत् नः रायः पर्वताः तत् नः आपः तत् रातिऽसाचः ओषधीः उत द्यौः
वनस्पतिऽभिः पृथिवी सऽजोषाः उभे इति रोदसी इति परि पासतः नः ॥ २३ ॥

ते ते सर्व सुवर्णादि रत्‍नखाणींनी संपन्न महापर्वत, त्या त्या धान्यबीजोत्पादक सर्व महानद्या, अहो सकल दिव्य औषधी, सकल वनस्पतींसहित अतिहर्षमाण पृथिवी देवी, अधोर्ध्व आकाश पाताळांतील दोन्ही रोदसी देवी, ही सर्व आमचे सर्वदा परिपोषण करीत राहोत. ॥ २३ ॥


अनु॒ तदु॒र्वी रोद॑सी जिहाता॒मनु॑ द्यु॒क्षो वरु॑ण॒ इन्द्र॑सखा ।
अनु॒ विश्वे॑ म॒रुतो॒ ये स॒हासो॑ रा॒यः स्या॑म ध॒रुणं॑ धि॒यध्यै॑ ॥ २४ ॥

अनु तत् उर्वी इति रोदसी इति जिहातां अनु द्युक्षः वरुणः इन्द्रऽसखा
अनु विश्वे मरुतः ये सहासः रायः स्याम धरुणं धियध्यै ॥ २४ ॥

दोन्ही अधोर्ध्व विस्तीर्ण रोदसी देवी ह्या आमच्या मागण्याला अनुमोदन देवोत. इंद्र ह्याचा मित्र आहे असा दिव्यनिधि वरुण देव आमच्या प्रार्थनेला अनुमोदन देवो. महा साहसी पराक्रमी, असे सकल मरुत् गण ह्या गोष्टीला अनुमोदन देवोत. सर्वोत्कृष्टाचा आधार आम्ही कायम रहावे म्हणून आम्ही सर्व साम्राज्य वैभवाचे धनी व निधान बनले असोत. देवांनो, ह्या विनंतीला तुमचे सर्वांचे अनुमोदन असो. ॥ २४ ॥


तन्न॒ इन्द्रो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॒ग्निराप॒ ओष॑धीर्व॒निनो॑ जुषन्त ।
शर्म॑न्स्याम म॒रुता॑मु॒पस्थे॑ यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ २५ ॥

तत् नः इन्द्रः वरुणः मित्रः अग्निः आपः ओषधीः वनिनः जुषन्त
शर्मन् स्याम मरुतां उपऽस्थे यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ २५ ॥

इंद्र, वरुण, मित्र, अग्नि, उदक, औषधी व महावृक्ष ह्या सर्व देवता आमच्या ह्या स्तोत्राचा आनंदाने स्वीकार करोत. वायुदेवाच्या सन्निधानी हवाशीर वार्‍याच्या समोर आमची सुख निवासस्थाने असोत. हे देवांनो, तुम्ही सर्व आपल्या सहज आशिर्वादें करून आमचे सदैव संरक्षण करीत रहा. ॥ २५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ३५ ( शांति सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


शं न॑ इन्द्रा॒ग्नी भ॑वता॒मवो॑भिः॒ शं न॒ इन्द्रा॒वरु॑णा रा॒तह॑व्या ।
शमिन्द्रा॒सोमा॑ सुवि॒ताय॒ शं योः शं न॒ इन्द्रा॑पू॒षणा॒ वाज॑सातौ ॥ १ ॥

शं नः इन्द्राग्नी इति भवतां अवःऽभिः शं नः इन्द्रावरुणा रातऽहव्या
शं इन्द्रासोमा सुविताय शं योः शं नः इन्द्रापूषणा वाजऽसातौ ॥ १ ॥

इंद्र व अग्नि आपल्या भक्तरक्षक सामर्थांनी आम्हाला शांतिसुखप्रद होवोत. हविद्वारे समराधित इंद्र व वरुण आम्हाला सुखकर होवोत. इंद्र व सोम देव आम्हाला उत्तम शरीरारोग्यप्रद व मानसिक भक्तियोगप्रद होवोत. इंद्र व पूषादेव ह्या जीवन संग्रामांच्या लुटींत आम्हाला हितकर धन मिळवून देणारे होवोत. ॥ १ ॥


शं नो॒ भगः॒ शमु॑ नः॒ शंसो॑ अस्तु॒ शं नः॒ पुरं॑धिः॒ शमु॑ सन्तु॒ रायः॑ ।
शं नः॑ स॒त्यस्य॑ सु॒यम॑स्य॒ शंसः॒ शं नो॑ अर्य॒मा पु॑रुजा॒तो अ॑स्तु ॥ २ ॥

शं नः भगः शं ओं इति नः शंसः अस्तु शं नः पुरम्ऽधिः शं ओं इति सन्तु रायः
शं नः सत्यस्य सुऽयमस्य शंसः शं नः अर्यमा पुरुऽजातः अस्तु ॥ २ ॥

सकल गुणैश्वर्यमंडित परमेश्वर आम्हाला कल्याणकारी असो; आणि स्तवनीय देवही आम्हाला कल्याणप्रद असोत. प्रथमारंभींच बुद्धिसूचक देव आम्हाला सुखमय होवो आणि ऐश्वर्येश देवही हितकारी होवोत. सत्य, प्रिय व मितभाषणी प्रशंसनीय देव आम्हाला हितकर असोत. पुष्कळ किंवा सर्वांच्या ठायी ज्याचा प्रादुर्भाव आहे असा आर्यांचा भगवान् सर्वाधिपति परमेश्वर आम्हाला श्रेयस्कर होवो. ॥ २ ॥


शं नो॑ धा॒ता शमु॑ ध॒र्ता नो॑ अस्तु॒ शं न॑ उरू॒ची भ॑वतु स्व॒धाभिः॑ ।
शं रोद॑सी बृह॒ती शं नो॒ अद्रिः॒ शं नो॑ दे॒वानां॑ सु॒हवा॑नि सन्तु ॥ ३ ॥

शं नः धाता शं ओं इति धर्ता नः अस्तु शं नः उरूची भवतु स्वधाभिः
शं रोदसी इति बृहती शं नः अद्रिः शं नः देवानां सुऽहवानि सन्तु ॥ ३ ॥

विधाता देव आमचे कल्याण करो आणि सर्वधर्ता देवही आम्हाला सुखप्रद होवो. आकाशांत भंवर्‍याप्रमाणे गरगर फिरून चालणारी विस्तीर्ण पृथ्वी देवता आपल्या अग्न्याराधन पूर्वक स्वधास्वाहादि तृप्तिभोजनानिशी आम्हाला समाधान सुखप्रद होवो. महान् रोदसी देवी आम्हाला शांतिसुखप्रद होवो. पर्वत आमचे कल्याण करोत. देवांची स्तुतिपुरःसर उत्कृष्ट सायंप्रातः हवने आम्हाला कल्याणमय होवोत. ॥ ३ ॥


शं नो॑ अ॒ग्निर्ज्योति॑रनीको अस्तु॒ शं नो॑ मि॒त्रावरु॑णाव॒श्विना॒ शं ।
शं नः॑ सु॒कृतां॑ सुकृ॒तानि॑ सन्तु॒ शं न॑ इषि॒रो अ॒भि वा॑तु॒ वातः॑ ॥ ४ ॥

शं नः अग्निः ज्योतिःऽअनीकः अस्तु शं नः मित्रावरुणौ अश्विना शं
शं नः सुऽकृतां सुऽकृतानि सन्तु शं नः इषिरः अभि वातु वातः ॥ ४ ॥

ज्योतिर्मुख अग्निदेव आम्हाला सुमंगलमय असो. मित्र व वरुण देव आमचे कल्याण करो. अश्विनी कुमार देव आम्हाला हितपथ्यकर राहोत. पुण्यवंतांची पुण्यकर्मे आम्हाला फायदा देणारी होवोत. गमनशील वायुदेव आमच्याकरितां मंद सुगंध वाहो. ॥ ४ ॥


शं नो॒ द्यावा॑पृथि॒वी पू॒र्वहू॑तौ॒ शम॒न्तरि॑क्षं दृ॒शये॑ नो अस्तु ।
शं न॒ ओष॑धीर्व॒निनो॑ भवन्तु॒ शं नो॒ रज॑स॒स्पति॑रस्तु जि॒ष्णुः ॥ ५ ॥

शं नः द्यावापृथिवी इति पूर्वऽहूतौ शं अन्तरिक्षं दृशये नः अस्तु
शं नः ओषधीः वनिनः भवन्तु शं नः रजसः पतिः अस्तु जिष्णुः ॥ ५ ॥

यज्ञारंभी प्रथम निमंत्रित उभय स्वर्ग व पृथ्वी देवी आमचे कल्याण करोत. अंतरिक्ष (आकाशस्थ नक्षत्र तारागण व्यापी) देव आमच्या डोळ्याला सुंदर सुंदर देखावे नजरेस पाडो. सर्व शाकभाज्याआदि औषधी व आम्रादि फलवृक्ष आम्हाला अमित हितपथ्य फलप्रद होवोत. रजोलोकाधिपति सदा जयशाली विष्णु भगवान् आम्हाला यशःसुखप्रद होवो. ॥ ५ ॥


शं न॒ इन्द्रो॒ वसु॑भिर्दे॒वो अ॑स्तु॒ शमा॑दि॒त्येभि॒र्वरु॑णः सु॒शंसः॑ ।
शं नो॑ रु॒द्रो रु॒द्रेभि॒र्जला॑षः॒ शं न॒स्त्वष्टा॒ ग्नाभि॑रि॒ह शृ॑णोतु ॥ ६ ॥

शं नः इन्द्रः वसुऽभिः देवः अस्तु शं आआदित्येभिः वरुणः सुऽशंसः
शं नः रुद्रः रुद्रेभिः जलाषः शं नः त्वष्टा ग्नाभिः इह शृणोतु ॥ ६ ॥

इंद्र देव आम्हाला सकल धनांसमवेत कल्याणमय होवो. उत्कृष्ट स्तवनीय वरुण देव ज्ञानप्रकाशी आदित्य देवांसह वर्तमान आम्हाला शांतिसुख देवो. जलसुखाभिलाषी रुद्र भगवान् आम्हाला कल्याणप्रद होवो. गर्भस्थमूर्ति घडवणारा भगवान देवांगनांसह वर्तमान आम्हाला सुखप्रद होवो आणि आमचे हे यज्ञस्थ स्तोत्र श्रवण करो. ॥ ६ ॥


शं नः॒ सोमो॑ भवतु॒ ब्रह्म॒ शं नः॒ शं नो॒ ग्रावा॑णः॒ शमु॑ सन्तु य॒ज्ञाः ।
शं नः॒ स्वरू॑णां मि॒तयो॑ भवन्तु॒ शं नः॑ प्र॒स्व१ः॒ शम्व॑स्तु॒ वेदिः॑ ॥ ७ ॥

शं नः सोमः भवतु ब्रह्म शं नः शं नः ग्रावाणः शं ओं इति सन्तु यज्ञाः
शं नः स्वराऊणां मितयः भवन्तु शं नः प्रऽस्वः शं ओं इति अस्तु वेदिः ॥ ७ ॥

सोमरस देवता आम्हाला कल्याणप्रद होवो. विराट देवाचे ’ब्रह्म’ स्तोत्र आम्हाला श्रेयस्कर होवो. सोमपाषाण आमचे कल्याण करोत आणि यज्ञभाग आम्हाला सुमंगल फलदायी होवोत. यज्ञस्तंभांची परिमाणे आम्हाला कल्याणदायक होवोत. श्रीमंत जनदेव आम्हाला यज्ञकार्यार्थ कल्याणप्रद होवोत आणि वेदी - यज्ञभूमी - आम्हाला शुभधान्यफलप्रद होवो. ॥ ७ ॥


शं नः॒ सूर्य॑ उरु॒चक्षा॒ उदे॑तु॒ शं न॒श्चत॑स्रः प्र॒दिशो॑ भवन्तु ।
शं नः॒ पर्व॑ता ध्रु॒वयो॑ भवन्तु॒ शं नः॒ सिन्ध॑वः॒ शम् उ॑ स॒न्त्व् आपः॑ ॥ ८ ॥

शं नः सूर्यः उरुऽचक्षाः उत् एतु शं नः चतस्रः प्रऽदिशः भवन्तु
शं नः पर्वताः ध्रुवयः भवन्तु शं नः सिन्धवः शं ओं इति सन्तु आपः ॥ ८ ॥

विस्तीर्ण तेजोमय चक्षुष्मंत सूर्य भगवान आमच्या कल्याणोत्कर्षार्थ प्रतिदिन उदय पावो. चारही विस्तृत दिशा आम्हाला यशस्कर होवोत. पर्वत आणि पर्वताची शिखरे, किंवा पर्वत आणि पृथ्वीची दोनही टोंके आम्हाला सुखमय असोत. सिंधू आदि नद्या आमचे कल्याण करोत आणि समुद्र व मेघ यांतील उदक देव आम्हाला सुखमय होवोत. ॥ ८ ॥


शं नो॒ अदि॑तिर्भवतु व्र॒तेभिः॒ शं नो॑ भवन्तु म॒रुतः॑ स्व॒र्काः ।
शं नो॒ विष्णुः॒ शमु॑ पू॒षा नो॑ अस्तु॒ शं नो॑ भ॒वित्रं॒ शम्व॑स्तु वा॒युः ॥ ९ ॥

शं नः अदितिः भवतु व्रतेभिः शं नः भवन्तु मरुतः सुऽअर्काः
शं नः विष्णुः शं ओं इति पूषा नः अस्तु शं नः भवित्रं शं ओं इति अस्तु वायुः ॥ ९ ॥

यमनियमादि तपःपूर्वक व्रतांसहित अदिति देवी आम्हाला कल्याण फलदायी होवो. सर्व सार "अर्क" स्तुतिप्रिय मरुद्‍गण आमचे कल्याण करोत. सर्व व्यापी विष्णु भगवान आम्हाला सुख देवोत. सर्वपोषक पूषा भगवान आम्हाला हितकर होवो. त्रिभुवनतारक देव आम्हाला शुभकर असो आणि वायु भगवान आम्हाला संतोषप्रद होवोत. ॥ ९ ॥


शं नो॑ दे॒वः स॑वि॒ता त्राय॑माणः॒ शं नो॑ भवन्तू॒षसो॑ विभा॒तीः ।
शं नः॑ प॒र्जन्यो॑ भवतु प्र॒जाभ्यः॒ शं नः॒ क्षेत्र॑स्य॒ पति॑रस्तु श॒म्भुः ॥ १० ॥

शं नः देवः सविता त्रायमाणः शं नः भवन्तु उषसः विऽभातीः
शं नः पर्जन्यः भवतु प्रऽजाभ्यः शं नः क्षेत्रस्य पतिः अस्तु शम्ऽभुः ॥ १० ॥

सर्वरक्षक सर्वोद्‍भव सविता देव आम्हाला शांति सुख देवो. प्रभावंत उषा देवी आम्हाला आनंदकारी होवोत. आमच्या सकल प्रजा जनांना भरपूर पर्जन्यसुख लाभो. क्षेत्रपति भगवान शंभुमहादेव आम्हाला सुखकर होवोत. ॥ १० ॥


शं नो॑ दे॒वा वि॒श्वदे॑वा भवन्तु॒ शं सर॑स्वती स॒ह धी॒भिर॑स्तु ।
शम॑भि॒षाचः॒ शमु॑ राति॒षाचः॒ शं नो॑ दि॒व्याः पार्थि॑वाः॒ शं नो॒ अप्याः॑ ॥ ११ ॥

शं नः देवाः विश्वऽदेवाः भवन्तु शं सरस्वती सह धीभिः अस्तु
शं अभिऽसाचः शं ओं इति रातिऽसाचः शं नः दिव्याः पार्थिवाः शं नः अप्याः ॥ ११ ॥

सकल देवगणांतील देव आम्हाला आनंदकारी होवोत. ध्यानबुद्धिंसह तीर्थमय वाग्देवी सरस्वती आम्हाला मनः शांतिसुख देवो. यज्ञार्थ सहपरिचारक गण आणि द्रव्य समर्पक धनदगण आम्हाला संतोष सुखप्रद होवोत. आकाशस्थ (किंवा स्वर्गस्थ) आणि पृथ्वीवरील भूत गण आम्हाला आनंदप्रद होवोत. तसेच जलचरगणही आम्हाला हितकर राहोत. ॥ ११ ॥


शं नः॑ स॒त्यस्य॒ पत॑यो भवन्तु॒ शं नो॒ अर्व॑न्तः॒ शमु॑ सन्तु॒ गावः॑ ।
शं न॑ ऋ॒भवः॑ सु॒कृतः॑ सु॒हस्ताः॒ शं नो॑ भवन्तु पि॒तरो॒ हवे॑षु ॥ १२ ॥

शं नः सत्यस्य पतयः भवन्तु शं नः अर्वन्तः शं ओं इति सन्तु गावः
शं नः ऋभवः सुऽकृतः सुऽहस्ताः शं नः भवन्तु पितरः हवेषु ॥ १२ ॥

सत्यव्रत परिपालनार्थ भगवद्विभूति आम्हाला समाधान सुखप्रद होवोत. घोडे आम्हाला सुखकारी, आणि गाई आम्हाला सुखकारी होवोत. सत्कर्मकारी देवगण आम्हांवर सुप्रसन्न असोत. पितृदेवगण यज्ञांतील मंगल हव्यद्वारे आम्हांवर सुसंतुष्ट असोत. ॥ १२ ॥


शं नो॑ अ॒ज एक॑पाद्दे॒वो अ॑स्तु॒ शं नो॑ऽहिर्बु॒ध्न्य१ शं स॑मु॒द्रः ।
शं नो॑ अ॒पां नपा॑त्पे॒रुर॑स्तु॒ शं नः॒ पृश्नि॑र्भवतु दे॒वगो॑पा ॥ १३ ॥

शं नः अजः एकऽपात् देवः अस्तु शं नः अहिः बुध्न्यः शं समुद्रः
शं नः अपां नपात् पेरुः अस्तु शं नः पृश्निः भवतु देवऽगोपा ॥ १३ ॥

एकपदसंयुक्त अजरामर देव आमचे कल्याण करो. दुष्टांच्या बळाच्या बुडाशी जो पराक्रमी अहिर्बुध्न्य रुद्रदेव आमच्याशी सुखकर नांदो. समुद्र आमच्याशी सुखकर वर्तो. पाण्याचा पुत्र परतीरपारक देव आम्हाला सहज सुखमय होवो. देवांची पालनकर्ती दाई पृश्निमातादेवी आम्हाला संतोष सुखकर्ती होवो. ॥ १३ ॥


आ॒दि॒त्या रु॒द्रा वस॑वो जुषन्ते॒दं ब्रह्म॑ क्रि॒यमा॑णं॒ नवी॑यः ।
शृ॒ण्वन्तु॑ नो दि॒व्याः पार्थि॑वासो॒ गोजा॑ता उ॒त ये य॒ज्ञिया॑सः ॥ १४ ॥

आदित्याः रुद्राः वसवः जुषन्त इदं ब्रह्म क्रियमाणं नवीयः
शृण्वन्तु नः दिव्याः पार्थिवासः गोऽऽजाताः उत ये यज्ञियासः ॥ १४ ॥

आदित्य, रुद्र व वसुदेव ह्या आमच्या नवीन बनविलेल्या ’ब्रह्म’ स्तोत्राचा मोठ्या संतोषाने स्वीकार करोत. स्वर्गस्थ, भूतलस्थ, ज्ञानप्रकाशसंभूत, अहो आणखी जे यज्ञार्ह देव आहेत ते सारे ह्या आमच्या प्रार्थनेला ऐकून घेवोत. ॥ १४ ॥


ये दे॒वानां॑ य॒ज्ञिया॑ य॒ज्ञिया॑नां॒ मनो॒र्यज॑त्रा अ॒मृता॑ ऋत॒ज्ञाः ।
ते नो॑ रासन्तामुरुगा॒यम॒द्य यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ १५ ॥

ये देवानां यज्ञियाः यज्ञियानां मनोः यजत्राः अमृताः ऋतऽज्ञाः
ते नः रासन्तां उरुऽगायं अद्य यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ १५ ॥

यज्ञसंबंधी देवांतील यज्ञपूज्य, मनुष्यांच्या यज्ञाचे संरक्षक, अजरामर व सत्य व्रतधारी असे जे देव ते आज आम्हाला सर्वश्रेष्ठ ज्ञानप्रकाशैश्वर्य रत्‍नाच्या राशी समर्पण करोत. देवगणांनो, तुम्ही सर्व आम्हाला कृपाळूपणे आशीर्वचने देऊन त्यायोगें आमचा सर्वदा व सर्वत्र प्रतिपाळ करीत रहा. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ३६ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


प्र ब्रह्मै॑तु॒ सद॑नादृ॒तस्य॒ वि र॒श्मिभिः॑ ससृजे॒ सूर्यो॒ गाः ।
वि सानु॑ना पृथि॒वी स॑स्र उ॒र्वी पृ॒थु प्रती॑क॒मध्येधे॑ अ॒ग्निः ॥ १ ॥

प्र ब्रह्म एतु सदनात् ऋतस्य वि रश्मिऽभिः ससृजे सूर्यः गाः
वि इ सानुना पृथिवी सस्रे उर्वी पृथु प्रतीकं अधि आ ईधे अग्निः ॥ १ ॥

आपल्या जगत् यज्ञस्थानांतून विराट्स्तोत्र आमच्या कल्पनाभूमिकेंत ह्या यज्ञामध्ये अत्यवश्य व सत्वर येवो. सूर्याने निज किरणांनी उदकधेनु निर्माण केल्या. पृथ्वी आपल्या पर्वतशिखरांसहित सविस्तर विस्तरली. अग्निमहाराज आपल्या महान् स्थानाप्रत - यज्ञकुंडाप्रत - अधिष्ठित होऊन पूर्ण प्रकाशित झाले. ॥ १ ॥


इ॒मां वां॑ मित्रावरुणा सुवृ॒क्तिमिषं॒ न कृ॑ण्वे असुरा॒ नवी॑यः ।
इ॒नो वा॑म॒न्यः प॑द॒वीरद॑ब्धो॒ जनं॑ च मि॒त्रो य॑तति ब्रुवा॒णः ॥ २ ॥

इमां वां मित्रावरुणा सुऽवृक्तिं इषं न कृण्वे असुरा नवीयः
इनः वां अन्यः पदवीः अदब्धः जनं च मित्रः यतति ब्रुवाणः ॥ २ ॥

अहो महाबली मित्रवरुण देवतांनो, नवोत्पन्न हवनद्रव्याप्रमाणे हा माझा स्तुति वाणीरूप तुमचा प्रसाद तुम्हांकरितां सादर निवेदन करतो. देवांनो, तुम्हां दोघांजणांतून एक मूर्ति महा भव्य व उग्र असून ती सकल धर्माधर्मांचा उलगडा करते, आणि वाचा देणारी एक संकटहारी देवता लोकांना निज निज कार्यार्थ प्रवृत्त करते. ॥ २ ॥


आ वात॑स्य॒ ध्रज॑तो रन्त इ॒त्या अपी॑पयन्त धे॒नवो॒ न सूदाः॑ ।
म॒हो दि॒वः सद॑ने॒ जाय॑मा॒नो॑ऽचिक्रदद्वृष॒भः सस्मि॒न्नूध॑न् ॥ ३ ॥

आ वातस्य ध्रजतः रन्ते इत्याः अपीपयन्त धेनवः न सूदाः
महः दिवः सदने जायमानः अचिक्रदत् वृषभः सस्मिन् ऊधन् ॥ ३ ॥

सोसाट्याच्या वार्‍याच्या येण्याने सर्वत्र रमणीय झाले. उत्कृष्ट दानशूरांप्रमाणे मेघरूप गाई स्वतः खूप उदक पिऊन फुगुन गेल्या आहेत. महान् स्वर्गस्थानोद्‍भूत कामवर्षक मेघाने आकाशांतून आपली जलधारा सोडून गर्जनाही केली. ॥ ३ ॥


गि॒रा य ए॒ता यु॒नज॒द्धरी॑ त॒ इन्द्र॑ प्रि॒या सु॒रथा॑ शूर धा॒यू ।
प्र यो म॒न्युं रिरि॑क्षतो मि॒नात्या सु॒क्रतु॑मर्य॒मणं॑ ववृत्याम् ॥ ४ ॥

गिरा यः एता युनजत् हरी इति ते इन्द्र प्रिया सुऽरथा शूर धायू इति
प्र यः मन्युं रिरिक्षतः मिनाति आ सुऽक्रतुं अर्यमणं ववृत्याम् ॥ ४ ॥

पराक्रमी इंद्र देवा, तू असा आहेस की तू आपल्या प्रीतिपात्र, उत्कृष्ट रथवाहक पीतवर्ण व मनोहर अशा आमच्या वाणीरूप दोन घोड्या रथास जोडून घेतल्या. जो क्रोधरूपी शत्रूला दाबून टाकून मोठ्याने किंकाळ्या फोडतो अशा सुकर्मशील अर्यमा देवाची मी स्तुतिपूर्वक प्रार्थना करतो. ॥ ४ ॥


यज॑न्ते अस्य स॒ख्यं वय॑श्च नम॒स्विनः॒ स्व ऋ॒तस्य॒ धाम॑न् ।
वि पृक्षो॑ बाबधे॒ नृभि॒ स्तवा॑न इ॒दं नमो॑ रु॒द्राय॒ प्रेष्ठ॑म् ॥ ५ ॥

यजन्ते अस्य सख्यं वयः च नमस्विनः स्वे ऋतस्य धामन्
वि इ पृक्षः बाबधे नृऽभिः स्तवानः इदं नमः रुद्राय प्रेष्ठम् ॥ ५ ॥

श्रद्धापूर्वक हविरन्न संयुक्त होत्साते आपापल्या यज्ञस्थानाप्रति जाणारे ऋषिजन ह्याचे प्रेमपुरःसर यज्ञद्वारे पूजन करते झाले. आचार्यपूजित ह्या देवाने आमचे नाना प्रकारचे सुस्वादु अन्न खाल्ले. ह्या भयकृत् भयनाशन रुद्रदेवाला आम्ही भक्तिपुरःसर प्रणाम करतो. ॥ ५ ॥


आ यत्सा॒कं य॒शसो॑ वावशा॒नाः सर॑स्वती स॒प्तथी॒ सिन्धु॑माता ।
याः सु॒ष्वय॑न्त सु॒दुघाः॑ सुधा॒रा अ॒भि स्वेन॒ पय॑सा॒ पीप्या॑नाः ॥ ६ ॥

आ यत् साकं यशसः वावशानाः सरस्वती सप्तथी सिन्धुऽमाता
याः सुस्वयन्त सुऽदुघाः सुऽधाराः अभि स्वेन पयसा पीप्यानाः ॥ ६ ॥

ज्या अन्नोत्पादक, उदकपयस्वंत, बहुधारा संपन्न व आपल्या पाण्याने तीरस्थ तृषार्तांना पाजणार्‍या गंगादि नद्या आनंदाने वाहतात त्या व ती सातवी सिंधुवत् पूज्य मातास्वरूप सरस्वती (विद्यादेवी) ह्या सर्व आमच्याकडे एकसमयाच्छेंदेकरून यज्ञार्थ आगमन करोत. ॥ ६ ॥


उ॒त त्ये नो॑ म॒रुतो॑ मन्दसा॒ना धियं॑ तो॒कं च॑ वा॒जिनो॑ऽवन्तु ।
मा नः॒ परि॑ ख्य॒दक्ष॑रा॒ चर॒न्त्यवी॑वृध॒न्युज्यं॒ ते र॒यिं नः॑ ॥ ७ ॥

उत त्ये नः मरुतः मन्दसानाः धियं तोकं च वाजिनः अवन्तु
मा नः परि ख्यत् अक्षरा चरन्ती अवीवृधन् युज्यं ते रयिं नः ॥ ७ ॥

अहो ते प्रमोदशील बलवंत मरुद्‍गण आमच्या पुत्रपौत्रांचा व बुद्धींचा प्रतिपाळ करोत. सरासर चालणारी वाग्देवता आम्हाला सोडून दुसर्‍यांकडे न बघो. हे मरुत्‍गण आमचे ऐश्वर्य योग्यप्रकारे वाढवोत. ॥ ७ ॥


प्र वो॑ म॒हीम॒रम॑तिं कृणुध्वं॒ प्र पू॒षणं॑ विद॒थ्य१ न वी॒रम् ।
भगं॑ धि॒योऽवि॒तारं॑ नो अ॒स्याः सा॒तौ वाजं॑ राति॒षाचं॒ पुरं॑धिम् ॥ ८ ॥

प्र वः महीं अरमतिं कृणुध्वं प्र पूषणं विदथ्यं न वीरं
भगं धियः अवितारं नः अस्याः शातौ वाजं रातिऽसाचं पुरम्ऽधिम् ॥ ८ ॥

अहो स्तोतृजनांनो, तुम्ही, कधी विश्रांति न घेणार्‍या पृथ्वीचे, वीराप्रमाणे यज्ञार्ह सर्वपोषक सूर्यदेवाचे, ह्या जगांतील बुद्धिसामर्थ्यांच्या वांट्यामध्ये आम्हाला ऐश्वर्य देणार्‍या, महाबुद्धिसंपन्न, उत्साहसंपन्न व सर्वरक्षक इंद्र देवाचे अधिकाधिक गुणसंकीर्तन करा. ॥ ८ ॥


अच्छा॒यं वो॑ मरुतः॒ श्लोक॑ ए॒त्वच्छा॒ विष्णुं॑ निषिक्त॒पामवो॑भिः ।
उ॒त प्र॒जायै॑ गृण॒ते वयो॑ धुर्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ९ ॥

अच्च अयं वः मरुतः श्लोकः एतु अच्च विष्णुं निसिक्तऽपां अवःऽभ् इः
उत प्रऽजायै गृणते वयः धुः यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ९ ॥

हे स्तोत्र तुम्हां मरुतांकडे, आपल्या कर्तृत्वशक्तीने गर्भपालन करणार्‍या विष्णुकडे ठीक ठीक जाऊन पोंहचो. आणि तुमचे भजन गाणार्‍या भक्तांमध्ये तुम्ही अन्न, बळ व आयुष्य धारण करा. हे देवदेवतांनो, तुम्ही सदासर्वदा आपल्या आशीर्वचनांनी आम्हां भक्तांचा प्रतिपाळ करा. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ३७ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


आ वो॒ वाहि॑ष्ठो वहतु स्त॒वध्यै॒ रथो॑ वाजा ऋभुक्षणो॒ अमृ॑क्तः ।
अ॒भि त्रि॑पृ॒ष्ठैः सव॑नेषु॒ सोमै॒र्मदे॑ सुशिप्रा म॒हभिः॑ पृणध्वम् ॥ १ ॥

आ वः वाहिष्ठः वहतु स्तवध्यै रथः वाजाः ऋभुक्षणः अमृक्तः
अभि त्रिऽपृष्ठैः सवनेषु सोमैः मदे सुऽशिप्राः महऽभिः पृणध्वम् ॥ १ ॥

स्तवनार्ह बलवंत ऋभु देवतांनो, तुमचा तेजःपुंज, अप्रतिगति, शीघ्रवाही रथ तुम्हाला इकडेस आणो. हे सत्वरगति देवांनो, ह्या उत्सवांत तुम्ही क्षीरदधिसक्तु मिश्रित महान सोमरसांनी आनंदाने आपलें पोट भरून घ्या. ॥ १ ॥


यू॒यं ह॒ रत्न॑म् म॒घव॑त्सु धत्थ स्व॒र्दृश॑ ऋभुक्षणो॒ अमृ॑क्तम् ।
सं य॒ज्ञेषु॑ स्वधावन्तः पिबध्वं॒ वि नो॒ राधां॑सि म॒तिभि॑र्दयध्वम् ॥ २ ॥

यूयं ह रत्नं मघवत्ऽसु धत्थ स्वःऽदृशः ऋभुक्षणः अमृक्तं
सं यज्ञेषु स्वधावन्तः पिबध्वं वि नः राधांसि मतिऽभिः दयध्वम् ॥ २ ॥

हे दिव्यदृष्टि ऋतुसंभवसमय पितृदेवतांनो, तुम्ही वैभवसंपन्न मेघांमध्ये अप्रतिद्वंद्व ऐश्वर्यबीज रत्‍न धारण करीत असतां. हे स्वधाद्वारा तृप्तिमंत देवांनो, तुम्ही आमच्या यज्ञांत एकमताने सर्व सोमरस पिऊन जा आणि आमच्या अन्नांवर आनंदाने ताव मारा. ॥ २ ॥


उ॒वोचि॑थ॒ हि म॑घवन्दे॒ष्णं म॒हो अर्भ॑स्य॒ वसु॑नो विभा॒गे ।
उ॒भा ते॑ पू॒र्णा वसु॑ना॒ गभ॑स्ती॒ न सू॒नृता॒ नि य॑मते वस॒व्या ॥ ३ ॥

उवोचिथ हि मघऽवन् देष्णं महः अर्भस्य वसुनः विऽभागे
उभा ते पूर्णा वसुना गभस्ती इति न सूनृता नि यमते वसव्या ॥ ३ ॥

हे ऐश्वर्यसंपन्न इंद्रा, ह्या जगांतील महान् धनाच्या वाटणींतून माझ्या हिश्शावर आलेल्या ह्या माझा अल्प भेटीचा स्वीकार करच. तुझे धनपरिपूरित दोन्ही सत्यधनस्वरूप हस्त भक्ताला धन देण्यावांचून राहतच नाहींत. ॥ ३ ॥


त्वमि॑न्द्र॒ स्वय॑शा ऋभु॒क्षा वाजो॒ न सा॒धुरस्त॑मे॒ष्यृक्वा॑ ।
व॒यं नु ते॑ दा॒श्वांसः॑ स्याम॒ ब्रह्म॑ कृ॒ण्वन्तो॑ हरिवो॒ वसि॑ष्ठाः ॥ ४ ॥

त्वं इन्द्र स्वऽयशाः ऋभुक्षाः वाजः न साधुः अस्तं एषि ऋक्वा
वयं नु ते दाश्वांसः स्याम ब्रह्म कृण्वन्तः हरिऽवः वसिष्ठाः ॥ ४ ॥

इंद्रा, स्वयंसिद्ध कीर्तिष्मंत ऋतुसंभव पितृदेवनिवासक सर्वार्थ संपादक तू देव आम्हां स्तवन करणारांच्या घरी अन्न व बलरूपाने चालून ये. श्रद्धापूर्वक देण्याची इच्छा धारण करणारे व ब्रह्मस्तोत्र संपादक आम्ही वसिष्ठ जन, हे हरीश, तुझेच होवोत. ॥ ४ ॥


सनि॑तासि प्र॒वतो॑ दा॒शुषे॑ चि॒द्याभि॒र्विवे॑षो हर्यश्व धी॒भिः ।
व॒व॒न्मा नु ते॒ युज्या॑भिरू॒ती क॒दा न॑ इन्द्र रा॒य आ द॑शस्येः ॥ ५ ॥

सनिता असि प्रऽवतः दाशुषे चित् याभिः विवेषः हरिऽअश्व धीभिः
ववन्म नु ते युज्याभिः ऊती कदा नः इन्द्र रायः आ दशस्येः ॥ ५ ॥

हे हरीदश्वनायक, ज्या वृद्धिद्वारांनी तू भक्तांमध्ये व्यापलेला असतोस त्याच रक्षोबल सामर्थ्येंकरून तू आमच्या धनाचा आणि दानकर्मांचा रक्षणकर्ता हो. इंद्रा, तूच दिलेल्या उत्साहबलाने आम्ही तुला भजत असतो. देवा, आता आम्हाला धन केव्हां देशील ? ॥ ५ ॥


वा॒सय॑सीव वे॒धस॒स्त्वं नः॑ क॒दा न॑ इन्द्र॒ वच॑सो बुबोधः ।
अस्तं॑ ता॒त्या धि॒या र॒यिं सु॒वीरं॑ पृ॒क्षो नो॒ अर्वा॒ नि उहीत वा॒जी ॥ ६ ॥

वासयसिऽइव वेधसः त्वं नः कदा नः इन्द्र वचसः बुबोधः
अस्तं तात्या धिया रयिं सुऽवीरं पृक्षः नः अर्वा नि उहीत वाजी ॥ ६ ॥

इंद्रा, तू आमच्या स्तोत्रसंपादक विप्रवर्गाला राखतोसच. देवा तू आमच्या स्तुतिवाचेला कधीं जागृत केले कोण जाणे. तू वेगवान बलवान देव आता आम्हाला घरे, राज्ये, सुप्रजादि सैनिक आणि नाना प्रकारचें अन्न आणून दे. ॥ ६ ॥


अ॒भि यं दे॒वी निर्ऋ॑॑तिश्चि॒दीशे॒ नक्ष॑न्त॒ इन्द्रं॑ श॒रदः॑ सु॒पृक्षः॑ ।
उप॑ त्रिब॒न्धुर्ज॒रद॑ष्टिमे॒त्यस्व॑वेशं॒ यं कृ॒णव॑न्त॒ मर्ताः॑ ॥ ७ ॥

अभि यं देवी निःऽऋतिः चित् ईशे नक्षन्ते इन्द्रं शरदः सुऽपृक्षः
उप त्रिऽबन्धुः जरत्ऽअष्टिं एति अस्ववेशं यं कृणवन्त मर्ताः ॥ ७ ॥

ज्या इंद्राच्या बळावर निर्‍ऋती (पृथ्वी) देवी आपली सत्ता सांभाळून आहे आणि सर्व वर्षांतील उत्तम अन्नें ज्याच्या व्याप्तीने भरली आहेत, ज्याला आपले घर म्हणून एक स्थान मुळींच नाही व ज्या जीर्णाशनपटु देवाची मर्त्य नर प्रशंसा गातात तो त्रिलोकबंधु देव हा बघा जवळच आला आहे. ॥ ७ ॥


आ नो॒ राधां॑सि सवितः स्त॒वध्या॒ आ रायो॑ यन्तु॒ पर्व॑तस्य रा॒तौ ।
सदा॑ नो दि॒व्यः पा॒युः सि॑षक्तु यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ८ ॥

आ नः राधांसि सवितरिति स्तवध्यै आ रायः यन्तु पर्वतस्य रातौ
सदा नः दिव्यः पायुः सिसक्तु यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ८ ॥

हे स्तवनार्ह सर्वोद्‍भव देवा, आम्हाला धनें दे. पर्वताच्या देणगीतींल (खाणींतील) ऐश्वर्यरत्‍नें आमच्याकडे येवोत. तुझे स्वर्गीय संरक्षणबल आम्हांवरती सदा वैभवाचा वर्षाव करीत राहो. हे देवदेवतांनो, तुम्ही सदा सर्वदा आपल्या आशीर्वचनांनी आम्हाला प्रतिपाळीत रहा. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ३८ ( सवितृ, वाजिन् सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - सवितृ, वाजिन् : छंद - त्रिष्टुभ्
0


उदु॒ष्य दे॒वः स॑वि॒ता य॑याम हिर॒ण्ययी॑म॒मतिं॒ यामशि॑श्रेत् ।
नू॒नं भगो॒ हव्यो॒ मानु॑षेभि॒र्वि यो रत्ना॑ पुरू॒वसु॒र्दधा॑ति ॥ १ ॥

उत् ओं इति स्यः देवः सविता ययाम हिरण्ययीं अमतिं यां अशिश्रेत्
नूनं भगः हव्यः मानुषेभिः वि यः रत्ना पुरुऽवसुः दधाति ॥ १ ॥

अहाहा, त्या सर्वप्रसवकर्त्या सूर्य देवाने, जिला आसरा देऊन ठेविले आहे, अशा आपल्या सुवर्णमय प्रभेला बाहेर आणले बघा. हा ऐश्वर्यवंत देव खरोखरच मनुष्यमात्रें करून स्तुतिद्वारें सायंप्रातः पूजनीय आहे. कारण हा बहुधनी असून भक्तांना रत्‍नें पुरवितो. ॥ १ ॥


उदु॑ तिष्ठ सवितः श्रु॒ध्य१॒स्य हिर॑ण्यपाणे॒ प्रभृ॑तावृ॒तस्य॑ ।
व्यु१र्वीं पृ॒थ्वीम॒मतिं॑ सृजा॒न आ नृभ्यो॑ मर्त॒भोज॑नं सुवा॒नः ॥ २ ॥

उत् ओं इति तिष्ठ सवितरिति श्रुधि अस्य हिरण्यऽपाणे प्रऽभृतौ ऋतस्य
वि उर्वीं पृथ्वीं अमतिं सृजानः आ नृऽभ्यः मर्तऽभोजनं सुवानः ॥ २ ॥

हे सर्व प्रेरक देवा, तू बाहेर ये. हे सुवर्णहस्त देवा, ह्या यज्ञांच्या मंडपामध्यें माझे एवढे स्तोत्र ऐकून घे. देवा, तू दररोज विस्तीर्ण पृथ्वीकरितां प्रभा निर्माण करतोस, आणि आम्हां नरप्राण्यांना भक्षणयोग्य भोजनसामुग्रीची खटपट करण्यास प्रवृत्त करतोस. ॥ २ ॥


अपि॑ ष्टु॒तः स॑वि॒ता दे॒वो अ॑स्तु॒ यमा चि॒द्विश्वे॒ वस॑वो गृ॒णन्ति॑ ।
स न॒ स्तोमा॑न्नम॒स्य१॒श्चनो॑ धा॒द्विश्वे॑भिः पातु पा॒युभि॒र्नि सू॒रीन् ॥ ३ ॥

अपि स्तुतः सविता देवः अस्तु यं आ चित् विश्वे वसवः गृणन्ति
सः नः स्तोमान् नमस्यः चनः धात् विश्वेभिः पातु पायुऽभिः नि सूरीन् ॥ ३ ॥

अहो, ह्या सूर्य देवाची स्तुति प्रतिदिन केली जावो. कारण ह्याची सकल दिग्देवता प्रशंसा गातात. हा प्रतिदिन नमनार्ह देव आमच्या स्तोत्रामध्यें अन्नोत्पादन शक्ति व बळ धारण करो अणि आमच्या स्तोत्र संपादक देवऋषिगणांना आपल्या सकल पालन शक्तीद्वारें निरंतर प्रतिपाळ करो. ॥ ३ ॥


अ॒भि यं दे॒व्यदि॑तिर्गृ॒णाति॑ स॒वं दे॒वस्य॑ सवि॒तुर्जु॑षा॒णा ।
अ॒भि स॒म्राजो॒ वरु॑णो गृणन्त्य॒भि मि॒त्रासो॑ अर्य॒मा स॒जोषाः॑ ॥ ४ ॥

अभि यं देवी अदितिः गृणाति सवं देवस्य सवितुः जुषाणा
अभि सम्ऽराजः वरुणः गृणन्ति अभि मित्रासः अर्यमा सऽजोषाः ॥ ४ ॥

ह्या सर्वोद्‍भव देवाची आज्ञा मानणारी प्रकाशवती अदिति देवी ह्यचे यश गाते. महासम्राट शांतिमय वरुण देव, द्वादश मित्र देव, सूर्यासारखे श्रेष्ठ अर्यमा देव हे ही ह्याचीच स्तुति गातात. ॥ ४ ॥


अ॒भि ये मि॒थो व॒नुषः॒ सप॑न्ते रा॒तिं दि॒वो रा॑ति॒षाचः॑ पृथि॒व्याः ।
अहि॑र्बु॒ध्न्य उ॒त नः॑ शृणोतु॒ वरू॒त्र्येक॑धेनुभि॒र्नि पा॑तु ॥ ५ ॥

अभि ये मिथः वनुषः सपन्ते रातिं दिवः रातिऽसाचः पृथिव्याः
अहिः बुध्न्यः उत नः शृणोतु वरूत्री एकधेनुऽभिः नि पातु ॥ ५ ॥

अहो, जे पृथ्वीवर किंवा स्वर्गांत ऐश्वर्य भोक्ते भक्तदानसेवी देव परस्पर प्रेमसंवादनांत निमग्न असतात, ते अहिर्बुध्न्य रुद्रदेवगण हे आमचे स्तोत्र ऐकोत. वाग्देवी सरस्वती आपल्या मुख्य (श्रद्धाबुद्धिरूप) गाईंसह वर्तमान होत आमचा प्रतिपाळ करो. ॥ ५ ॥


अनु॒ तन्नो॒ जास्पति॑र्मंसीष्ट॒ रत्नं॑ दे॒वस्य॑ सवि॒तुरि॑या॒नः ।
भग॑मु॒ग्रो॑ऽवसे॒ जोह॑वीति॒ भग॒मनु॑ग्रो॒ अध॑ याति॒ रत्न॑म् ॥ ६ ॥

अनु तत् नः जाःऽपतिः मंसीष्ट रत्नं देवस्य सवितुः इयानः
भगं उग्रः अवसे जोहवीति भगं अनुग्रः अध याति रत्नम् ॥ ६ ॥

भगवान् प्रजापति देव आम्हाला ह्या गोष्टीचे अनुमोदन देवो. मी ह्या सविता देवाला ज्ञान रत्‍न मागतो. समर्थ भक्तजन निजसंरक्षणार्थ ह्या भगवंताची प्रार्थना व पूजा करतात. आणि असमर्थ भक्त पण ह्याच भगवंताला ऐश्वर्य रत्‍न मागतात. ॥ ६ ॥


शं नो॑ भवन्तु वा॒जिनो॒ हवे॑षु दे॒वता॑ता मि॒तद्र॑वः स्व॒र्काः ।
ज॒म्भय॒न्तो॑ऽहिं॒ वृकं॒ रक्षां॑सि॒ सने॑म्य॒स्मद्यु॑यव॒न्नमी॑वाः ॥ ७ ॥

शं नः भवन्तु वाजिनः हवेषु देवऽताता मितऽद्रवः सुऽअर्काः
जम्भयन्तः अहिं वृकं रक्षांसि सऽनेमि अस्मत् युयवन् अमीवाः ॥ ७ ॥

यज्ञांतील देवसभेमध्ये सहज मार्ग क्रमून आलेले स्वाद्वन्नसेवी उत्साहसंपन्न देवगण आम्हाला कल्याणप्रद होवोत. भुजंग, लांडगे इत्यादि राक्षस स्वरूपांना मारून टाकून देव आम्हांपासून आमचे पुरातन पापरूप रोग घालवून टाकोत. ॥ ७ ॥


वाजे॑वाजेऽवत वाजिनो नो॒ धने॑षु विप्रा अमृता ऋतज्ञाः ।
अ॒स्य मध्वः॑ पिबत मा॒दय॑ध्वं तृ॒प्ता या॑त प॒थिभि॑र्देव॒यानैः॑ ॥ ८ ॥

वाजेऽऽवाजे अवत वाजिनः नः धनेषु विप्राः अमृताः ऋतऽज्ञाः
अस्य मध्वः पिबत मादयध्वं तृप्ताः यात पथिऽभिः देवऽयानैः ॥ ८ ॥

हे बुद्धिमंत, अजरामर, सत्यज्ञ देवतांनो, आमच्या ह्या धन निमित्त रोजरोजच्या वैश्वदेव यज्ञाचे तुम्ही नित्य संरक्षण करा. हा मधुर सोमरस प्या, आनंद करा, आणि मग देवांच्या जाण्याच्या मार्गांनी तृप्त होत्साते निज स्थलाप्रत जा. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ३९ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


ऊ॒र्ध्वो अ॒ग्निः सु॑म॒तिं वस्वो॑ अश्रेत्प्रती॒ची जू॒र्णिर्दे॒वता॑तिमेति ।
भे॒जाते॒ अद्री॑ र॒थ्येव॒ पन्था॑मृ॒तं होता॑ न इषि॒तो य॑जाति ॥ १ ॥

ऊर्ध्वः अग्निः सुऽमतिं वस्वः अश्रेत् प्रतीची जूर्णिः देवऽतातिं एति
भेजाते अद्री इति रथ्याइव पन्थां ऋतं होता नः इषितः यजाति ॥ १ ॥

नित्य ऊर्ध्वगमनशील सकल देवाग्रसर अग्नि देव आम्हा भजकांच्या स्तुतिंचा स्वीकार करो. ही प्रत्यक्ष दर्शनी, अतिशीघ्र गामिनी उषा देवी देवसभेप्रत आली आहे. ते श्रद्धावंत पत्‍नी यजमान रथाप्रमाणे आपल्या रस्त्यास लागून यज्ञकार्यार्थ येण्यास प्रवृत्त झाले आहेत. बोलावणे पाठवून आलेला आमचा होता आमच्याकरितां सत्यस्वरूप यज्ञ आता करील. ॥ १ ॥


प्र वा॑वृजे सुप्र॒या ब॒र्हिरे॑षा॒मा वि॒श्पती॑व॒ बीरि॑ट इयाते ।
वि॒शाम॒क्तोरु॒षसः॑ पू॒र्वहू॑तौ वा॒युः पू॒षा स्व॒स्तये॑ नि॒युत्वा॑न् ॥ २ ॥

प्र ववृजे सुऽप्रया बर्हिः एषां आ विश्पतीइवेति विश्पतीऽइव बीरिटे इयातेइति
विशां अक्तोः उषसः पूर्वऽहूतौ वायुः पूषा स्वस्तये नियुत्वान् ॥ २ ॥

ह्यांनी - आमच्या यजमानांनी - तुम्हांकरितां सुंदर अन्न संयुक्त कुशासन विस्तरिले आहे. तुम्ही दोघेही राजाप्रमाणे इकडेस या. उषःकालीन प्रथम हवनामध्ये तुम्ही नियुदश्वसंपन्न वायु व पूषा देव आमच्या सर्व जनांच्या कल्याणार्थ या. ॥ २ ॥


ज्म॒या अत्र॒ वस॑वो रन्त दे॒वा उ॒राव॒न्तरि॑क्षे मर्जयन्त शु॒भ्राः ।
अ॒र्वाक्प॒थ उ॑रुज्रयः कृणुध्वं॒ श्रोता॑ दू॒तस्य॑ ज॒ग्मुषो॑ नो अ॒स्य ॥ ३ ॥

ज्मयाः अत्र वसवः रन्त देवाः उरौ अन्तरिक्षे मर्जयन्त शुभ्राः
अर्वाक् पथः उरुऽज्रयः कृणुध्वं श्रोता दूतस्य जग्मुषः नः अस्य ॥ ३ ॥

अष्ट दिक्पाल देव येथे भूदेवीसमवेत आनंदाने नांदोत. शुभ्र मरुद्‍गण विस्तीर्ण गगन मंडलांतूनही येथे पूजिले जावोत. हे महागमनशील वरुणमरुतांनो, आपला रस्ता आमच्या इकडेस करा. आमच्या ह्या तुमच्याकडे येणार्‍या स्तुतिदूताचें म्हणणे ऐकून घ्या. ॥ ३ ॥


ते हि य॒ज्ञेषु॑ य॒ज्ञिया॑स॒ ऊमाः॑ स॒धस्थं॒ विश्वे॑ अ॒भि सन्ति॑ दे॒वाः ।
ताँ अ॑ध्व॒र उ॑श॒तो य॑क्ष्यग्ने श्रु॒ष्टी भगं॒ नास॑त्या॒ पुरं॑धिम् ॥ ४ ॥

ते हि यज्ञेषु यज्ञियासः ऊमाः सधऽस्थं विश्वे अभि सन्तिदेवाः
तान् अध्वरे उशतः यक्षि अग्ने श्रुष्टी भगं नासत्या पुरम्ऽधिम् ॥ ४ ॥

आमच्या यज्ञामध्यें ते यज्ञ पूज्य भक्तसंरक्षक वैश्वदेव एकमेकांसह समान स्थानावर येऊन विराजोत. हे अग्नि देवा, ह्या यज्ञामध्ये त्या यज्ञप्रिय अश्विनी कुमार देवांना व बहुबुद्धीश इंद्रालाही लवकर पोहोंचव. ॥ ४ ॥


आग्ने॒ गिरो॑ दि॒व आ पृ॑थि॒व्या मि॒त्रं व॑ह॒ वरु॑ण॒मिन्द्र॑म॒ग्निम् ।
आर्य॒मण॒मदि॑तिं॒ विष्णु॑मेषां॒ सर॑स्वती म॒रुतो॑ मादयन्ताम् ॥ ५ ॥

आ अग्ने गिरः दिवः आ पृथिव्याः मित्रं वह वरुणं इन्द्रं अग्निं
आ अर्यमणं अदितिं विष्णुं एषां सरस्वती मरुतः मादयन्ताम् ॥ ५ ॥

अग्निदेवा, स्तुतींतून, आकशांतून किंवा पृथिवींतून इकडे ये. आणि मित्र, वरुण, इंद्र, अग्नि, अर्यमा, अदिति, विष्णु ह्यांनाही येथें घेऊन ये. मरुत व सरस्वती दोन्ही आमच्या यज्ञांत संतुष्ट होवोत. ॥ ५ ॥


र॒रे ह॒व्यं म॒तिभि॑र्य॒ज्ञिया॑नां॒ नक्ष॒त्कामं॒ मर्त्या॑ना॒मसि॑न्वन् ।
धाता॑ र॒यिम॑विद॒स्यं स॑दा॒सां स॑क्षी॒महि॒ युज्ये॑भि॒र्नु दे॒वैः ॥ ६ ॥

ररे हव्यं मतिऽभिः यज्ञियानां नक्षत् कामं मर्त्यानां असिन्वन्
धाता रयिं अविऽदस्यं सदासां सक्षीमहि युज्येभिः नु देवैः ॥ ६ ॥

आमच्या यज्ञपूज्य देवांच्या बुद्धिरूप स्तुतिद्वारें मी देवाला हविर्भाग समर्पण करतो. प्रतिबंधरहित अग्नि देव मनुष्यांच्या अभिलाषांना परिपूर्ण करतो. देवतांनो, तुम्ही दासदासींसहित अखंडित ऐश्वर्य आम्हांमध्यें ठेवा. सकल सहायक देव ह्या माझ्या यज्ञ कर्माला आज साक्षीभूत असोत - ह्या यज्ञाला बघोत. ॥ ६ ॥


नू रोद॑सी अ॒भिष्टु॑ते॒ वसि॑ष्ठैरृ॒तावा॑नो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॒ग्निः ।
यच्छ॑न्तु च॒न्द्रा उ॑प॒मं नो॑ अ॒र्कं यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥

नु रोदसी इति अभिस्तुतेइत्य् अभिऽस्तुते वसिष्ठैः ऋतऽवानः वरुणः मित्रः अग्निः
यच्चन्तु चन्द्राः उपऽमं नः अर्कं यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥

आज द्यावापृथिवी देवीचे वसिष्ठ ऋषींनी स्तवन केले. व तसेंच मित्र, वरुण व अग्नि देवांचे ही स्तवन उत्कृष्ट झाले. मनसोल्हादकारी चंद्र देव आम्हाला सर्वोत्कृष्ट ऐश्वर्यरत्‍न व अन्न देवोत. अहो देवदेवतांनो, तुम्ही आमचे आपल्या आशीर्वचनांनी सदासर्वदा संरक्षण करा. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ४० ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


ओ श्रु॒ष्टिर्वि॑द॒थ्या३॒समे॑तु॒ प्रति॒ स्तोमं॑ दधीमहि तु॒राणा॑म् ।
यद॒द्य दे॒वः स॑वि॒ता सु॒वाति॒ स्यामा॑स्य र॒त्निनो॑ विभा॒गे ॥ १ ॥

ओ इति श्रुष्टिः विदथ्या सं एतु प्रति स्तोमं दधीमहि तुराणां
यत् अद्य देवः सविता सुवाति स्याम अस्य रत्निनः विऽभागे ॥ १ ॥

अहो, अतीशीघ्र व सहज निघणारी आमची ही यज्ञीय स्तुति देवांकडे बरोबर जावो. शीघ्रगामी देवांच्याजवळ हे आमचे स्तोत्ररूप गांठोडें आम्ही ठेवतो. ज्याअर्थी आता सर्वप्रसवक सवितादेव प्रेरणाच करीत आहे त्याअर्थी आम्हीही त्याच्या ऐश्वर्यविभागाच्या वाटणीमध्यें अवश्य सामील असावे. ॥ १ ॥


मि॒त्रस्तन्नो॒ वरु॑णो॒ रोद॑सी च॒ द्युभ॑क्त॒मिन्द्रो॑ अर्य॒मा द॑दातु ।
दिदे॑ष्टु दे॒व्यदि॑ती॒ रेक्णो॑ वा॒युश्च॒ यन्नि॑यु॒वैते॒ भग॑श्च ॥ २ ॥

मित्रः तत् नः वरुणः रोदसी इति च द्युऽभक्तं इन्द्रः अर्यमा ददातु
दिदेष्टु देवी अदितिः रेक्णः वायुः च यत् नियुवैतेइतिनिऽयुवैते भगः च ॥ २ ॥

मित्र, वरुण, उभयरोदसी (द्यावा-पृथिवी) देवी व इंद्र आणि अर्यमा देव आम्हाला ते आमचे ईश्वरदत्त ऐश्वर्य देवोत. देवी अदिति,वायु व भग देव हे आम्हाला जे आमचे म्हणून ह्या जगांत ठेवलेले आहे, ते राज्यैश्वर्य दाखवोत. ॥ २ ॥


सेदु॒ग्रो अ॑स्तु मरुतः॒ स शु॒ष्मी यं मर्त्यं॑ पृषदश्वा॒ अवा॑थ ।
उ॒तेम॒ग्निः सर॑स्वती जु॒नन्ति॒ न तस्य॑ रा॒यः प॑र्ये॒तास्ति॑ ॥ ३ ॥

सः इत् उग्रः अस्तु मरुतः सः शुष्मी यं मर्त्यं पृषत्ऽअश्वाः
अवाथ उत ईं अग्निः सरस्वती जुनन्ति न तस्य रायः परिऽएता अस्त् इ ॥ ३ ॥

अहो चित्रविचित्र वर्ण मृगरुप अश्ववंत मरुत देवांनो, तुम्ही ज्याला राखले तोच ओजस्वी व सामर्थ्यवंत राजा व्हावयाचा. अहो वाग्देवी सरसवती आणि आंगणांतला (यज्ञकुंडांतला) जो अग्नि देव, हे आमच्या ह्या क्षत्रिय राजा यजमानाचे संरक्षण करोत. ह्याला बळाची व यशाची जोड देवोत. ह्या आमच्या क्षत्रिय राजाच्या ऐश्वर्यांचा नाशक कोणी न निघो. ॥ ३ ॥


अ॒यं हि ने॒ता वरु॑ण ऋ॒तस्य॑ मि॒त्रो राजा॑नो अर्य॒मापो॒ धुः ।
सु॒हवा॑ दे॒व्यदि॑तिरन॒र्वा ते नो॒ अंहो॒ अति॑ पर्ष॒न्नरि॑ष्टान् ॥ ४ ॥

अयं हि नेता वरुणः ऋतस्य मित्रः राजानः अर्यमा अपः धुरितिधुः
सुऽहवा देवी अदितिः अनर्वा ते नः अंहः अति पर्षन् अरिष्टान् ॥ ४ ॥

हा अग्निदेव सत्यस्वरूप व यज्ञाचा अग्रेसर आहे. मित्र, वरुण, अर्यमा हे राजे महाराजे देव आमच्या पापकर्मांना धुऊन टाकोत. ते देव आणि सौभाग्यसंपन्न व महा धारिष्टवती अशी देवी अदिति आमच्या संकटांना आणि दोषांना आमच्यांतून दूर घालवून टाकोत. ॥ ४ ॥


अ॒स्य दे॒वस्य॑ मी॒ळ्हुषो॑ व॒या विष्णो॑रे॒षस्य॑ प्रभृ॒थे ह॒विर्भिः॑ ।
वि॒दे हि रु॒द्रो रु॒द्रियं॑ महि॒त्वं या॑सि॒ष्टं व॒र्तिर॑श्विना॒विरा॑वत् ॥ ५ ॥

अस्य देवस्य मीळ्हुषः वयाः विष्णोः एषस्य प्रऽभृथे हविःऽभिः
विदे हि रुद्रः रुद्रियं महिऽत्वं यासिष्टं वर्तिः अश्विनौ इरावत् ॥ ५ ॥

ह्या जगरूप यज्ञामध्ये हवनद्वारे पूजनीय व भक्तकामकल्पद्रूम अशा ह्या श्रीविष्णू देवाचेच सर्व देव शाखारूप आहेत. रुद्रस्वरूप महादेव आपल्या रुद्रलोकांच्याच महिम्याला जाणतात. अहो अश्विनी कुमार देवतांनो, तुम्ही आमच्या धनधान्यसंपन्न यज्ञगृहाचे ठायीं अत्यवश्य यावे बरे. ॥ ५ ॥


मात्र॑ पूषन्नाघृण इरस्यो॒ वरू॑त्री॒ यद्रा॑ति॒षाच॑श्च॒ रास॑न् ।
म॒यो॒भुवो॑ नो॒ अर्व॑न्तो॒ नि पा॑न्तु वृ॒ष्टिं परि॑ज्मा॒ वातो॑ ददातु ॥ ६ ॥

मा अत्र पूषन् आघृणे इरस्यः वरूत्री यत् रातिऽसाचः च रासन्
मयःऽभुवः नः अर्वन्तः नि पान्तु वृष्टिं परिऽज्मा वातः ददातु ॥ ६ ॥

हे कांतिमंत पूषा देवा, सर्व देववरणीय वाग्देवी सरस्वती आणि दुसर्‍या उदार देवपत्‍न्या जे आम्हाला ऐश्वर्य धन समर्पण करतील त्यांत तू ह्या ठिकाणी कधींही बिघाड करू नको - विघ्न आणूं नको. ते धन आम्हाला सुखपूर्वक लाभू दे. गमनशील सुखभावसंपन्न देव आमचे संरक्षण करोत. पृथ्वीभोंवती फिरणारा वायु आम्हाला उत्कृष्ट वर्षाजल देवो. ॥ ६ ॥


नू रोद॑सी अ॒भिष्टु॑ते॒ वसि॑ष्ठैरृ॒तावा॑नो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॒ग्निः ।
यच्छ॑न्तु च॒न्द्रा उ॑प॒मं नो॑ अ॒र्कं यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ७ ॥

नु रोदसी इति अभिस्तुतेइत्य् अभिऽस्तुते वसिष्ठैः ऋतऽवानः वरुणः मित्रः अग्निः
यच्चन्तु चन्द्राः उपऽमं नः अर्कं यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥ ७ ॥

ह्या वसिष्ठांनी ज्यांची स्तुति केली आहे अशा द्यावापृथिवी, न्यायवान् वरुण, मित्र आणि अग्नि, हे सर्व सुखप्रद देव आम्हांस अनुपम वैभव देवोत. हे देवहो, तुम्ही आम्हांस सुरक्षित ठेवून आम्हास सदैव सुखांत राहूं द्या. ॥ ७ ॥


ॐ तत् सत्


GO TOP