PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ७ - सूक्त २१ ते ३०

ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त २१ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


असा॑वि दे॒वं गोऋ॑जीक॒मन्धो॒ न्यस्मि॒न्निन्द्रो॑ ज॒नुषे॑मुवोच ।
बोधा॑मसि त्वा हर्यश्व य॒ज्ञैर्बोधा॑ न॒ स्तोम॒मन्ध॑सो॒ मदे॑षु ॥ १ ॥

असावि देवं गोऽऋजीकं अंधः नि अस्मिन् इंद्रः जनुषा ईं उवोच ।
बोधामसि त्वा हरिऽअश्व यज्ञैः बोध नः स्तोमं अंधसः मदेषु ॥ १ ॥

गोघृतमिश्रित दिव्य सोम तुझ्यास्तव गाळून तयार आहे. हा इंद्र देव ह्या सोमरसाचे ठायी स्वभावतःच प्रीतियुक्त असतो. हे सुंदर पीतवर्णाश्व देवा इंद्रा, हविस्तोत्रांनी तुला आम्ही उत्साहित करीत आहोंत. देवा, ह्या सोमरसपानाच्या आनंदाच्या भरांत आमचे स्तुतिस्तोत्र ऐकून घे. ॥ १ ॥


प्र य॑न्ति य॒ज्ञं वि॒पय॑न्ति ब॒र्हिः सो॑म॒मादो॑ वि॒दथे॑ दु॒ध्रवा॑चः ।
न्यु भ्रियन्ते य॒शसो॑ गृ॒भादा दू॒रऽ॑उपब्दो॒ वृष॑णो नृ॒षाचः॑ ॥ २ ॥

प्र यंति यज्ञं विपयंति बर्हिः सोमऽमादः विदथे दुध्रवाचः ।
नि ऊंइति भ्रियंते यशसः गृभात् आ दूरेऽऽउपब्दः वृषणः नृऽसाचः ॥ २ ॥

यजक जन यज्ञाकडे धांवून येत आहेत. त्यांनी तुझ्याकरिता यज्ञामध्ये कुशासन हांथरले आहे. सोमरस वाटण्यांत हर्ष मानणारे हे ग्रावे मोठा दुर्धर शब्द करीत आहेत. अहो, दुरूनच ज्यांचा घोररव ऐकूं येत आहे, जे नरवीरांना उत्साह देणारे, यशस्वी व कामवर्षक आहेत असे सोमरसग्रावे घरांतून आणले गेले. ॥ २ ॥


त्वमि॑न्द्र॒ स्रवि॑त॒वा अ॒पस्कः॒ परि॑ष्ठिता॒ अहि॑ना शूर पू॒र्वीः ।
त्वद्वा॑वक्रे र॒थ्यो३॒ न धेना॒ रेज॑न्ते॒ विश्वा॑ कृ॒त्रिमा॑णि भी॒षा ॥ ३ ॥

त्वं इंद्र स्रवितवै अपः करितिकः परिस्थिताः अहिना शूर पूर्वीः ।
त्वत् वावक्रे रथ्यः न धेनाः रेजंते विश्वा कृत्रिमाणि भीषा ॥ ३ ॥

शूर इंद्रा, दुष्काळरूपी अहि भुजंगाने परिवेष्टित प्राचीन उदकांचा प्रवाहमार्ग तू मोकळा करून दिलास. देवा, ह्या नदीरूपी धेनू जणों हे तुझे रथच वक्रगतीने जात आहेत. देवा, तुझ्या भितीने तुझी सर्व कर्तृत्वभुवने थरथर कांपत असतात व तू घालून दिलेल्या नियमाप्रमाणे वागतात. ॥ ३ ॥


भी॒मो वि॑वे॒षायु॑धेभिरेषा॒मपां॑सि॒ विश्वा॒ नर्या॑णि वि॒द्वान् ।
इन्द्रः॒ पुरो॒ जर्हृ॑षाणो॒ वि दू॑धो॒द्विवज्र॑हस्तो महि॒ना ज॑घान ॥ ४ ॥

भीमः विवेष आयुधेभिः एषां अपांसि विश्वा नर्याणि विद्वान् ।
इंद्रः पुरः जर्हृषाणः वि दूधोत् वि वज्रऽहस्तः महिना जघान ॥ ४ ॥

महाबळी इंद्रदेवाने जनकल्याणकारी उदकौघांचा थांग लावून आपले वज्र त्यांच्यांत भोंसकले. त्याबरोबर ते उदकौघ मेघ ह्या आनंदी इंद्रापुढे थरथर कांपावयास लागले. ह्या खड्गधारी देवाने आपल्या महिम्याने जलप्रवाहांना मारून टाकले, (मेघांचे पाणी पाणी करून सोडले). ॥ ४ ॥


न या॒तव॑ इन्द्र जूजुवुर्नो॒ न वन्द॑ना शविष्ठ वे॒द्याभिः॑ ।
स श॑र्धद॒र्यो विषु॑णस्य ज॒न्तोर्मा शि॒श्नदे॑वा॒ अपि॑ गुर्ऋ॒णतं नः॑ ॥ ५ ॥

न यातवः इंद्रः जूजुवुः नः न वंदना शविष्ठ वेद्याभिः ।
सः शर्धत् अर्यः विषुणस्य जंतोः मा शिश्नऽदेवाः अपि गुः ऋतं नः ॥ ५ ॥

इंद्रा, राक्षस आम्हाला न मारोत. हे महासमर्था, तुज देवाप्रत आम्ही बुद्धिपुरःसर नमून आहोत. हा स्वामीदेव सकल प्राण्यांवर अधिकार चालवितो व त्यांना आपापल्या कर्मांमध्ये उत्साहित करीत असतो. नित्य विषयरत देव देवता (गंधर्व, अप्सरा) आमच्या यज्ञांत न येवोत. ॥ ५ ॥


अ॒भि क्रत्वे॑न्द्र भू॒रध॒ ज्मन्न ते॑ विव्यङ्मशहि॒मानं॒ रजां॑सि ।
स्वेना॒ हि वृ॒त्रं शव॑सा ज॒घन्थ॒ न शत्रु॒रन्तं॑ विविदद्यु॒धा ते॑ ॥ ६ ॥

अभि क्रत्वा इंद्र भूः अध ज्मत् न ते विव्यक् महिमानं रजांसि ।
स्वेन हि वृत्रं शवसा जघंथ न शत्रुः अंतं विविदत् युधा ते ॥ ६ ॥

ह्या द्रष्ट्या देवाने यज्ञकर्माद्वारेंच सकल पृथ्वीला आक्रांत केले. देवा, आता तुझ्या महिम्यावांचून भूलोकांना दुसरा आधारच नाही. देवा, तू आपल्याच स्वतःच्या बळावर वृत्रासुराला ठार केलेस. देवा कोणताच शत्रू तुझ्याशी लढाईत सामना करून तुला मारूं शकत नाही. ॥ ६ ॥


दे॒वाश्चि॑त्ते असु॒र्याय॒ पूर्वे॑ऽनु क्ष॒त्राय॑ ममिरे॒ सहां॑सि ।
इन्द्रो॑ म॒घानि॑ दयते वि॒षह्येन्द्रं॒ वाज॑स्य जोहुवन्त सा॒तौ ॥ ७ ॥

देवाः चित् ते असुर्याय पूर्वेऽनु क्षत्राय ममिरे सहांसि ।
इंद्रः मघानि दयते विऽसह्य इंद्रं वाजस्य जोहुवंत सातौ ॥ ७ ॥

प्राचीन देवगणही महाबलरक्षक सामर्थ्याकरितां तुझ्याच पराक्रमांचा आश्रय धरून राहिले आहेत. सर्वदर्शक देव शत्रूंचा पराभव करून भक्तांना ऐश्वर्यसुख देतो. भक्त जन अन्नप्राप्त्यर्थ ह्या जलवर्षक देवाप्रित्यर्थ हवन करतात. ॥ ७ ॥


की॒रिश्चि॒द्धि त्वामव॑से जु॒हावेशा॑नमिन्द्र॒ सौभ॑गस्य॒ भूरेः॑ ।
अवो॑ बभूथ शतमूते अ॒स्मे अ॑भिक्ष॒त्तुस्त्वाव॑तो वरू॒ता ॥ ८ ॥

कीरिः चित् हि त्वां अवसे जुहाव ईशानं इंद्र सौभगस्य भूरेः ।
अवः बभूथ शतंऽऊते अस्मेइति अभिऽक्षत्तुः त्वाऽवतः वरूता ॥ ८ ॥

आणि हे इंद्रा, तुज ईश्वराप्रित्यर्थ यज्ञकर्मकारी जनांनी आपल्या पुष्कळ संपत्तिच्या रक्षणार्थ हवन केले. हे बहुरक्षणसमर्थ देवा, ज्यांचे तुज कृपाळू देवाच्याच चिंतनामध्ये निरंतर लक्ष्य आहे अशा आम्हां भक्तजनांस्तव तू दुःखनिवारक व आपत्तारक हो. ॥ ८ ॥


सखा॑यस्तैन्द्र वि॒श्वह॑ स्याम नमोवृ॒धासो॑ महि॒ना त॑रुत्र ।
व॒न्वन्तु॑ स्मा॒ ते॑ऽवसा समी॒के॒ऽभीतिम॒र्यो व॒नुषां॒ शवां॑सि ॥ ९ ॥

सखायः ते इंद्र विश्वह स्याम नमःऽवृधासः महिना तरुत्र ।
वन्वंतु स्म ते अवसा संऽईके अभिऽइतिं अर्यः वनुषां शवांसि ॥ ९ ॥

हे सर्व तारका इंद्रा, स्तुतिहवींनी तुझा महिमा वाढवणार्‍या आम्हां तुझ्या प्रीतिपात्र भक्त जनांना रोज रोज अधिकाधिक महत्त्व प्राप्त व्हावे. तू लढाईमध्ये शत्रूंवर चालून जाण्यांमध्ये वरिष्ठ आहेस. देवा, तुझ्या कृपारक्षणांनी आमच्या हिंसकांची शरीरे भस्म होऊन जावोत. ॥ ९ ॥


स न॑ इन्द्र॒ त्वय॑ताया इ॒षे धा॒स्त्मना॑ च॒ ये म॒घवा॑नो जु॒नन्ति॑ ।
वस्वी॒ षु ते॑ जरि॒त्रे अ॑स्तु श॒क्तिर्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ १० ॥

सः नः इंद्र त्वयतायै इषे धाः त्मना च ये मघऽवानः जुनंति ।
वस्वी सु ते जरित्रे अस्तु शक्तिः यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥ १० ॥

हे महापराक्रमी देवा, ह्या प्रमाणे तू आम्हां जनांना तुझ्या यज्ञशेषान्नाचा भोग लाभावा म्हणून आमच्यांपाशी सदैव राज्यैश्वर्य ठेव. ऐश्वर्यसंपन्न जन आपल्या आपण यज्ञयागद्वारे तुला भजतातच. तुझ्या स्तोत्र पाठकाला ब्रह्मांडाचे बळ प्राप्त होवो. अहो देवगणांनो, आपल्या आशिर्वचनांनी आमचा तुम्ही सदा सर्वदा प्रतिपाळ करा बरे. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त २२ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्, विराज्


पिबा॒ सोम॑मिन्द्र॒ मन्द॑तु त्वा॒ यं ते॑ सु॒षाव॑ हर्य॒श्वाद्रिः॑ ।
सो॒तुर्बा॒हुभ्यां॒ सुय॑तो॒ नार्वा॑ ॥ १ ॥

पिब सोमं इंद्र मंदतु त्वा यं ते सुसाव हरिऽअश्व अद्रिः ।
सोतुः बाहुभ्यां सुऽयतः न अर्वा ॥ १ ॥

इंद्रा सोमरस पी. हा तुला हर्षित करो. हे सुंदर सुपीताश्व, ह्या सोमाला तुझाकरिता वाटणार्‍याच्या दोररूपी हातांच्यद्वारे नीट मन लावून ह्या पाषाणांनी तयार करून ठेवला आहे. ॥ १ ॥


यस्ते॒ मदो॒ युज्य॒श्चारु॒रस्ति॒ येन॑ वृ॒त्राणि॑ हर्यश्व॒ हंसि॑ ।
स त्वामि॑न्द्र प्रभूवसो ममत्तु ॥ २ ॥

यः ते मदः युज्यः चारुः अस्ति येन वृत्राणि हरिऽअश्व हंसि ।
सः त्वां इंद्र प्रभुवसोइतिप्रभुऽवसो ममत्तु ॥ २ ॥

हे सुवर्णवर्णाश्व, तुझ्याकरता काढलेला जो ह उत्तम व योग्य हर्षप्रद असा सोम आहे, ज्याच्या योगाने प्रमुदित होऊन तू दुष्काळरूपी वृत्रासुराला मारीत असतोस असा हा सोमरस, लक्ष्मीसंपन्ना देवा, इंद्रा, तुला अत्यानंदित करो. ॥ २ ॥


बोधा॒ सु मे॑ मघव॒न्वाच॒मेमां यां ते॒ वसि॑ष्ठो॒ अर्च॑ति॒ प्रश॑स्तिम् ।
इ॒मा ब्रह्म॑ सध॒मादे॑ जुषस्व ॥ ३ ॥

बोध सु मे मघऽवन् वाचं आ इमां यां ते वसिष्ठः अर्चति प्रऽशस्तिं ।
इमा ब्रह्म सधऽमादे जुषस्व ॥ ३ ॥

हे राज्यैश्वर्यधनसंपन्न देवा, जी स्तुति मी ऋषिवसिष्ठ गात आहे त्या तुझ्या ह्या माझ्या प्रशंसामय स्तोत्रवाणींना चांगले पूर्ण कान देऊन ऐकून घे. देवांसह आनंद पावणार्‍या यज्ञामध्ये ह्या विराट् स्तुतिचा अतिप्रसन्न चित्तेंकरून स्वीकार कर. ॥ ३ ॥


श्रु॒धी हवं॑ विपिपा॒नस्याद्रे॒र्बोधा॒ विप्र॒स्यार्च॑तो मनी॒षाम् ।
कृ॒ष्वा दुवां॒स्यन्त॑मा॒ सचे॒मा ॥ ४ ॥

श्रुधि हवं विऽपिपानस्य अद्रेः बोध विप्रस्य अर्चतः मनीषां ।
कृष्व दुवांसि अंतमा सचा इमा ॥ ४ ॥

सोमरस पाजणार्‍या ह्या पाषाणांचे निमंत्रण (आवाज) ऐकून घे. तुझी यज्ञांमध्ये अर्चन करणार्‍या मज ब्राह्मणाच्या इच्छाही चांगल्या जाणून ठेव. ही माझी तुझ्या अत्यंत निकट येऊन पोचणारी सकल पूजा सत्यसत्य (सफल) कर. ॥ ३ ॥


न ते॒ गिरो॒ अपि॑ मृष्ये तु॒रस्य॒ न सु॑ष्टु॒तिम॑सु॒र्यस्य वि॒द्वान् ।
सदा॑ ते॒ नाम॑ स्वयशो विवक्मि ॥ ५ ॥

न ते गिरः अपि मृष्ये तुरस्य न सुऽस्तुतिं असुर्यस्य विद्वान् ।
सदा ते नाम स्वऽयशः विवक्मि ॥ ५ ॥

भक्तांच्या प्रार्थनास्तोत्रांनी यज्ञामध्ये शीघ्र धांवत येणार्‍या तुझी वेदस्तोत्रें मी कधी न विसरो. ज्ञाते लोक परमेश्वराची वेदस्तुति कधीही विसरत नाहींत. देवा, मी तुझ्या यशस्वी नांवांचा उच्चार सदैव करीत राहीन असे कर. ॥ ५ ॥


भूरि॒ हि ते॒ सव॑ना॒ मानु॑षेषु॒ भूरि॑ मनी॒षी ह॑वते॒ त्वामित् ।
मारे अ॒स्मन्म॑घव॒ञ्ज्योक्कः॑ ॥ ६ ॥

भूरि हि ते सवना मानुषेषु भूरि मनीषी हवते त्वां इत् ।
मा आरे अस्मत् मघऽवन् ज्योक् करितिकः ॥ ६ ॥

तुझी सायंप्रातः यज्ञद्वारे पूजनें मनुष्यांमध्ये पुष्कळ होवोत. ह्या भरतखंडामध्ये किंवा ह्या यज्ञांत तुझी स्तुति पुष्कळ गाईली जावो. हे राज्यैश्वर्यवंता, आम्हा भक्तांना तू घटकाभर देखील विसंबू नको. ॥ ६ ॥


तुभ्येदि॒मा सव॑ना शूर॒ विश्वा॒ तुभ्यं॒ ब्रह्मा॑णि॒ वर्ध॑ना कृणोमि ।
त्वं नृभि॒र्हव्यो॑ वि॒श्वधा॑सि ॥ ७ ॥

तुभ्य इत् इमा सवना शूर विश्वा तुभ्यं ब्रह्माणि वर्धना कृणोमि ।
त्वं नृऽभिः हव्यः विश्वधा असि ॥ ७ ॥

हे महापराक्रमी इंद्र देवा, हे सकल सोमाभिषवण तुझ्याकरिताच चालले आहे. देवा ही तुझी महाविराट् स्तुतिस्तोत्रे तुझ्यास्तव मी रचित आहे. देवा, तू आम्हां मनुष्यांकडून नाना प्रकारे स्तवनीय पूजनीय आहेस. ॥ ७ ॥


नू चि॒न्नु ते॒ मन्य॑मानस्य द॒स्मोद॑श्नुवन्ति महि॒मान॑मुग्र ।
न वी॒र्यमिन्द्र ते॒ न राधः॑ ॥ ८ ॥

नु चित् नु ते मन्यमानस्य दस्म उत् अश्नुवंति महिमानं उग्र ।
न वीर्यं इंद्र ते न राधः ॥ ८ ॥

हे सुदर्शनीया, स्तुतियोग्य तुज देवाचा महिमा खरोखरच कोणी पावत नाहीत. तुझा थंग कोणला लागत नाही. हे उग्र देवा इंद्रा, तुझी ऐश्वर्यधने देखील तुझा महिमा, सामर्थ्य प्राप्त करून देत नाहीत, (जाणत नाहीत). ॥ ८ ॥


ये च॒ पूर्व॒ ऋष॑यो॒ ये च॒ नूत्ना॒ इन्द्र॒ ब्रह्मा॑णि ज॒नय॑न्त॒ विप्राः॑ ।
अ॒स्मे ते॑ सन्तु स॒ख्या शि॒वानि॑ यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ९ ॥

ये च पूर्वे ऋषयः ये च नूत्नाः इंद्र ब्रह्माणि जनयंत विप्राः ।
अस्मेइति ते संतु सख्या शिवानि यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥ ९ ॥

इंद्रा प्राचीन ऋषिजन तसेच नवीन ज्ञाते जन तुझी जी जी विराट स्तुतिस्तोत्रे निर्माण करतात, ती सर्व आम्हाला त्वद् वात्सल्य भक्तिप्रद व पूर्ण मनःशांति सुखप्रद होवोत. अहो देव देवतांनो, आमचे तुम्ही आपल्या सहज आशिर्वचनांनी सदैव संरक्षण करीत असा. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त २३ ( संपात सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


उदु॒ ब्रह्मा॑ण्यैरत श्रव॒स्येन्द्रं॑ सम॒र्ये म॑हया वसिष्ठ ।
आ यो विश्वा॑नि॒ शव॑सा त॒तानो॑पश्रो॒ता म॒ ईव॑तो॒ वचां॑सि ॥ १ ॥

उत् ऊंइति ब्रह्माणि ऐरत श्रवस्या इंद्रं सऽमर्ये महया वसिष्ठ ।
आ यः विश्वानि शवसा ततान उपश्रोता मे ईवतः वचांसि ॥ १ ॥

अहो, वैभवकामुक ब्रह्मस्तोत्रे उच्चस्वरेकरून गाइली गेली ना ? अहो वसिष्ठ ऋषि तुम्ही आता यज्ञांत इंद्राची महती गा. कारण, ह्या इंद्राने माझ्या स्तुतिस्तोत्रांना ऐकून घेतले, व इकडे आगमन केले, आणि आपल्या सामर्थ्यानेंच सकल जगताला माझ्याकरिता विस्तृत केले. ॥ १ ॥


अया॑मि॒ घोष॑ इन्द्र दे॒वजा॑मिरिर॒ज्यन्त॒ यच्छु॒रुधो॒ विवा॑चि ।
न॒हि स्वमायु॑श्चिकि॒ते जने॑षु॒ तानीदंहां॒स्यति॑ पर्ष्य॒स्मान् ॥ २ ॥

अयामि घोषः इंद्र देवऽजामिः इरज्यंत यत् शुरुधः विऽवाचि ।
नहि स्वं आयुः चिकिते जनेषु तानि इत् अंहांसि अति पर्षि अस्मान् ॥ २ ॥

इंद्रा, ज्यायोगे स्तोत्रांमध्ये सोमादि औषधींची प्रशंसा होते, त्या देवप्रिय स्तुतिस्तोत्रांचा गजर मी गाऊन केला आहेच. मनुष्यांकडून आपल्या आयुष्याची (जिवित्वाची) चिकित्सा होणे दुर्घट आहे. देवा, ही ही पापे तू संपूर्ण निवारण कर. ॥ २ ॥


यु॒जे रथं॑ ग॒वेष॑णं॒ हरि॑भ्या॒मुप॒ ब्रह्मा॑णि जुजुषा॒णम॑स्थुः ।
वि बा॑धिष्ट॒स्य रोद॑सी महि॒त्वेन्द्रो॑ वृ॒त्राण्य॑प्र॒ती ज॑घ॒न्वान् ॥ ३ ॥

युजे रथं गोऽएषणं हरिऽभ्यां उप ब्रह्माणि जुजुषाणं अस्थुः ।
वि बाधिष्ट स्यः रोदसीइति महित्वा इंद्रः वृत्राणि अप्रती जघन्वान् ॥ ३ ॥

उदकधेनूंच्या शोधार्थ निघालेल्या इंद्रदेवाच्या रथाला मी त्या देवाचे हरिद्वर्ण अश्व जोडून दिले. माझी विराट् स्तोत्रें त्या महाहर्षित देवाजवळ जाऊन पोंचली. अवर्षण रूप अप्रतिद्वंद्व असुरांना नाहिंसे करणारा तो हा इंद्र देव आपल्या माहात्म्याने आकाशपृथिवींस पुरून उरला आहे. ॥ ३ ॥


आप॑श्चित्पिप्यु स्त॒र्यो३॒न गावो॒ नक्ष॑न्नृ॒तं ज॑रि॒तार॑स्त इन्द्र ।
या॒हि वा॒युर्न नि॒युतो॑ नो॒ अच्छा॒ त्वं हि धी॒भिर्दय॑से॒ वि वाजा॑न् ॥ ४ ॥

आपः चित् पिप्युः स्तर्यः न गावः नक्षन् ऋतं जरितारः ते इंद्र ।
याहि वायुः न निऽयुतः नः अच्छ त्वं हि धीभिः दयसे वि वाजान् ॥ ४ ॥

आणखी हे देवा, अप्रसुत कुमार गाईंप्रमाणे ह्या प्रकाश धेनूरूपी किरणे (नदी समुद्रादिकांची नाना) उदके पिऊन परिपुष्ट झाल्या. इंद्रा, तुझ्या स्तोत्र पाठकंनी आपला सनातन यज्ञधर्म प्रतिपाळला. देवा, अखंडितगति वायुदेवाप्रमाणे तूही आमच्याकडे सरळा ये. कारण, भक्तांना अन्नादिक तूच आपल्या कर्तृत्वशक्तिने पुरवितोस. ॥ ४ ॥


ते त्वा॒ मदा॑ इन्द्र मादयन्तु शु॒ष्मिणं॑ तुवि॒राध॑सं जरि॒त्रे ।
एको॑ देव॒त्रा दय॑से॒ हि मर्ता॑न॒स्मिञ्छू॑र॒ सव॑ने मादयस्व ॥ ५ ॥

ते त्वा मदाः इंद्रः मादयंतु शुष्मिणं तुविऽराधसं जरित्रे ।
एकः देवऽत्रा दयसे हि मर्तान् अस्मिन् शूर सवने मादयस्व ॥ ५ ॥

इंद्रा, ह्या स्तोत्रद्वारें तुझे ते आनंददायक सोमपान तुज बळवंत व अति धनवंत देवाला प्रमुदित करो. ह्या ब्रह्मांडामध्ये तूंच एकटा देव सर्व मर्त्यप्राण्यांवर अधिकार चालवितोस. हे महापराक्रमी देवा, ह्या सोमार्पण विधिपूर्वक यज्ञामध्ये आनंद मान. ॥ ५ ॥


ए॒वेदिन्द्रं॒ वृष॑णं॒ वज्र॑बाहुं॒ वसि॑ष्ठासो अ॒भ्यर्चन्त्य॒र्कैः ।
स न॑ स्तु॒तो वी॒रव॑द्धातु॒ गोम॑द्यू॒यम् पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ६ ॥

एव इत् इंद्रं वृषणं वज्रऽबाहुं वसिष्ठासः अभि अर्चंति अर्कैः ।
सः नः स्तुतः वीरवत् धातु गोमत् यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥ ६ ॥

वसिष्ठ ऋषि महाराज ह्याप्रमाणे "अर्क" (ज्ञानसारभूत) स्तुतींनी वर्षाकारी व विद्युतरूप खड्गहस्त इंद्र देवाचीच प्रार्थनापूजा करते झाले. तो सुप्रार्थित देव आम्हांमध्ये सुपुत्र व ज्ञानधन धारण करो. अहो इंद्रदेवाश्रित दिव्यविभूतिंनो, तुम्ही सर्वजण आम्हां मुलांना आपल्या आशिर्वचनांनी सदोदित प्रतिपाळा. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त २४ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


योनि॑ष्ट इन्द्र॒ सद॑ने अकारि॒ तमा नृभिः॑ पुरुहूत॒ प्र या॑हि ।
असो॒ यथा॑ नोऽवि॒ता वृ॒धे च॒ ददो॒ वसू॑नि म॒मद॑श्च॒ सोमैः॑ ॥ १ ॥

योनिः ते इंद्र सदने अकारि तं आ नृऽभिः पुरुहूत प्र याहि ।
असः यथा नः अविता वृधे च ददः वसूनि ममदः च सोमैः ॥ १ ॥

इंद्रा, तुमच्या बसण्याकरितां आम्ही उत्तम स्थान निर्माण केले आहे. हे पुष्कळ स्तुतिंचा मान घेणार्‍या देवा, आपल्या सकल अनुगणांसहवर्तमान ह्या आमच्या यज्ञस्थानाप्रत धांवत पळत ये, आणि आमच्या रक्षण करणार्‍यांप्रमाणे ह्या स्तुतियज्ञाचे ठायी तू विराजमान रहा. देवा, आम्हाला धन दे, आणि ह्या सोमरसपानांनी सुसंतुष्ट हो. ॥ १ ॥


गृ॒भी॒तं ते॒ मन॑ इन्द्र द्वि॒बर्हाः॑ सु॒तः सोमः॒ परि॑षिक्ता॒ मधू॑नि ।
विसृ॑ष्टधेना भरते सुवृ॒क्तिरि॒यमिन्द्रं॒ जोहु॑वती मनी॒षा ॥ २ ॥

गृभीतं ते मनः इंद्र द्विऽबर्हाः सुतः सोमः परिऽसिक्ता मधूनि ।
विसृष्टऽधेना भरते सुऽवृक्तिः इयं इंद्रं जोहुवती मनीषा ॥ २ ॥

इंद्रा, ह्या माझ्या स्तुतींनी तुझ्याकरिता दोन कुशासने मांडिली आहेत. देवा तुज्याकरिता सोमरस गाळून तयार आहे. क्षीरादि नाना मधुर रस देखील वाढून तयार आहे. वाणी आणि जिव्हारूप धेनु ज्यांत मोकळी केली गेली आहे अशा मुक्तकंठ स्वराने सर्वोत्कृष्ट अशा तुज वराला वरणारी ही आमची हविर्भोग समर्पण करण्याची इच्छारूप स्तुति तुज इंद्र देवालाच भोजन खाऊ घालू लागली आहे. ॥ २ ॥


आ नो॑ दि॒व आ पृ॑थि॒व्या ऋ॑जीषिन्नि॒दं ब॒र्हिः सो॑म॒पेया॑य याहि ।
वह॑न्तु त्वा॒ हर॑यो म॒द्र्यञ्चम् आङ्गू॒ोषमच्छा॑ त॒वसं॒ मदा॑य ॥ ३ ॥

आ नः दिवः आ पृथिव्याः ऋजीषिन् इदं बर्हिः सोमऽपेयाय याहि ।
वहंतु त्वा हरयः मद्र्यंचं आंगूषं अच्छ तवसं मदाय ॥ ३ ॥

देवा आमच्याकडे आकाशातून ये, पृथ्वीवरून ये. कोठूनही हे शीघ्रगामी देवा ह्या आमच्या यज्ञगृहामध्ये सोमपानार्थ येच. देवा, तुला तुझे सुंदर घोडे आमच्या स्तुतिस्तोत्र मार्गांवरून अतिशीघ्र मजकडेस ठीक सरळ तुझ्या आनंदास्तव घेऊन येवोत. ॥ ३ ॥


आ नो॒ विश्वा॑भिरू॒तिभिः॑ स॒जोषा॒ ब्रह्म॑ जुषा॒णो ह॑र्यश्व याहि ।
वरी॑वृज॒त्स्थवि॑रेभिः सुशिप्रा॒स्मे दध॒द्वृष॑णं॒ शुष्म॑मिन्द्र ॥ ४ ॥

आ नः विश्वाभिः ऊतिऽभिः सऽजोषाः ब्रह्म जुषाणः हरिऽअश्व याहि ।
वरीवृजत् स्थविरेभिः सुऽशिप्र अस्मेइति दधत् वृषणं शुष्मं इंद्र ॥ ४ ॥

हे हरि नांवाच्या अश्ववंता, हे सुंदर हनुवटी धारण करणार्‍या देवा इंद्रा, तू ब्रह्मांडभराच्या आपल्या भक्तसंरक्षक सामर्थ्यानिशी विराजित होत्साता, महाउल्हासाने आमच्या विराट् स्तोत्राचा स्वीकार करून, प्रौढ मरुद्‍गणांसहवर्तमान शत्रूंना हांकून लावून, आम्हाला मनकामनापूरित धनधान्यादि संतति देण्याकरितां आमच्याकडे ये. ॥ ४ ॥


ए॒ष स्तोमो॑ म॒ह उ॒ग्राय॒ वाहे॑ धु॒री३॒वात्यो॒ न वा॒जय॑न्नधायि ।
इन्द्र॑ त्वा॒यम॒र्क ई॑ट्टे॒ वसू॑नां दि॒वीव॒ द्यामधि॑ नः॒ श्रोम॑तं धाः ॥ ५ ॥

एषः स्तोमः महे उग्राय वाहे धुरिऽइव अत्यः न वाजयन् अधायि ।
इंद्र त्वा अयं अर्कः ईट्टे वसूनां दिविऽइव द्यां अधि नः श्रोमतं धाः ॥ ५ ॥

हा स्तोत्ररूप घोडा मोठ्या जोराने तुझ्या रथाच्या धुरीला जुंपवून तुज महान् उग्र देवाला येथे ओढीत आणण्याकरितां मी लावला आहे. इंद्रा, तुला हे माझे काव्यसार स्तोत्र धनधान्यैश्वर्य मागते. तर ते आम्हांकरितां आता स्वर्गामध्येंही धारण करून ठेव. ॥ ५ ॥


ए॒वा न॑ इन्द्र॒ वार्य॑स्य पूर्धि॒ प्र ते॑ म॒हीं सु॑म॒तिं वे॑विदाम ।
इष॑म् पिन्व म॒घव॑द्भ्यःञ सु॒वीरां॑ यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ६ ॥

एव न इंद्र वार्यस्य पूर्धि प्र ते महीं सुमतिं वेविदाम ।
इषं पिन्व मघवत्ऽभ्यः सुऽवीरां यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥ ६ ॥

इंद्रा, तू आम्हाकडे सर्वोत्कृष्ट राज्यधन प्रसाद घेऊन येऊन आम्हाला परिपूर्ण कर. तुझा सर्वोत्कृष्ट अनुग्रह आम्हाला आता अतिसत्वर लाभो. तुला हविसमर्पण करणार्‍यांना वीर व भक्त असे सुपूत आणि धनधान्यादि संपत्ति यथेच्छ समर्पण कर. अहो, देवदेवतांनो, तुम्हीही आम्हाला आपल्या कृपाशीर्वचने करून सदैव पालन करीत रहा. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त २५ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


आ ते॑ म॒ह इ॑न्द्रो॒त्युग्र॒ सम॑न्यवो॒ यत्स॒मर॑न्त॒ सेनाः॑ ।
पता॑ति दि॒द्युन्नर्य॑स्य बा॒ह्वोर्मा ते॒ मनो॑ विष्व॒द्र्य१॒ग्वि चा॑रीत् ॥ १ ॥

आ ते महः इन्द्रा उति उग्र सऽमन्यवः यत् संऽअरंत सेनाः ।
पताति दिद्युत् नर्यस्य बाह्वोः मा ते मनः विष्वद्र्यक् वि चारीत् ॥ १ ॥

हे ओजस्वी इंद्रा, जेव्हा समान क्रोधाने एकत्र होऊन फौज लढूं लागते तेव्हा मनुष्यहितकर तुज महान् देवाचे विद्युत्‍रूप शस्त्र आमच्या रक्षणार्थ (दुष्काळरूपी शत्रूवर) पडते. देवा, तुझे सर्वदर्शी मन आमच्यापासून कधी न ढळो. ॥ १ ॥


नि दु॒र्ग इ॑न्द्र श्नथिह्य॒मित्रा॑न॒भि ये नो॒ मर्ता॑सो अ॒मन्ति॑ ।
आ॒रे तं शंसं॑ कृणुहि निनि॒त्सोरा नो॑ भर स॒म्भर॑णं॒ वसू॑नाम् ॥ २ ॥

नि दुःऽग इन्द्र श्नथिहि अमित्रात् अभि ये नः मर्तासः अमंति ।
आरे तं शंसं कृणुहि निनित्सोः आ नः भर संऽभरणं वसूनां ॥ २ ॥

इंद्रा, जी माणसे लढाईमध्ये आमचा सामना करतील त्या आमच्या शत्रूजनाचा पूर्ण निःपात कर. आमची निंदा करणार्‍याची प्रशंसा आमच्यापासून दूर ठेव. आम्हाला भरपूर धनपरिपूरीत मंदिरे दे. ॥ २ ॥


श॒तं ते॑ शिप्रिन्नू॒तयः॑ सु॒दासे॑ स॒हस्रं॒ शंसा॑ उ॒त रा॒तिर॑स्तु ।
ज॒हि वध॑र्व॒नुषो॒ मर्त्य॑स्या॒स्मे द्यु॒म्नमधि॒ रत्नं॑ च धेहि ॥ ३ ॥

शतं ते शिप्रिन् ऊतयः सुदासे सहस्रं शंसाः उत रातिः अस्तु ।
जहि वधः वनुषः मर्त्यस्य अस्मेइति द्युम्नं अधि रत्नं च धेहि ॥ ३ ॥

हे सुवर्णमुकुटधारी देवा इंद्रा, तुझ्या भक्तदासाला मला तुझी शेंकडों संरक्षक सामर्थ्यें, हजारो प्रशंसात्मक कार्यें आणि ऐश्वर्यधन लाभोत. मजवर चालून येणार्‍या माणसाच्या शस्त्रालाच तोडून टाक. आम्हाला दिव्य धनैश्वर्य दे. ॥ ३ ॥


त्वाव॑तो॒ हीन्द्र॒ क्रत्वे॒ अस्मि॒ त्वाव॑तोऽवि॒तुः शू॑र रा॒तौ ।
विश्वेदहा॑नि तविषीव उग्रँ॒ ओकः॑ कृणुष्व हरिवो॒ न म॑र्धीः ॥ ४ ॥

त्वाऽवतः हि इंद्र क्रत्वे अस्मि त्वाऽवतः अवितुः शूर रातौ ।
विश्वा इत् अहानि तविषीऽवः उग्र ओकः कृणुष्व हरिऽवः न मर्धीः ॥ ४ ॥

इंद्रा, तुझ्याकरितां मी सदा यज्ञ करीत असो. हे शूरा, तुज भक्त संरक्षक देवाप्रित्यर्थ मी धनसंपन्न असावे. हे बलवंता उग्रस्वरूपा, ह्य यज्ञभूमीला तू रोजचें आपल्या येण्याजाण्याचे स्थान कर. हे हरिदश्ववाहका, आम्हाला नामशेष करू नको. ॥ ४ ॥


कुत्सा॑ ए॒ते हर्य॑श्वाय शू॒षमिन्द्रे॒ सहो॑ दे॒वजू॑तमिया॒नाः ।
स॒त्रा कृ॑धि सु॒हना॑ शूर वृ॒त्रा व॒यं तरु॑त्राः सनुयाम॒ वाज॑म् ॥ ५ ॥

कुत्साः एते हरिऽअश्वाय शूषं इंद्रे सहः देवऽजूतं इयानाः ।
सत्रा कृधि सुऽहना शूर वृत्रा वयं तरुत्राः सनुयाम वाजं ॥ ५ ॥

देवा, आम्ही तुझे उपासक, तुज हरिदश्व इंद्राकरितां सदा सुखोत्पादक कार्ये करणारे, देवभक्तिने येणार्‍या शक्तिची इच्छा करणारे, व तुझ्या कृपेने संकटांस तरून जाणारे, असे असल्यामुळे आम्हाला तुझ्या कृपी यज्ञसामर्थ्य अवश्य प्राप्त व्हावे. हे शूर देवा, सदा व सर्वत्र आम्हांकडून दुष्ट राक्षस शत्रु सहज मारले जातील असे कर. ॥ ५ ॥


ए॒वा न॑ इन्द्र॒ वार्य॑स्य पूर्धि॒ प्र ते॑ म॒हीं सु॑म॒तिं वे॑विदाम ।
इषं॑ पिन्व म॒घव॑द्भ्यः सु॒वीरां॑ यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ६ ॥

एव नः इंद्र वार्यस्य पूर्धि प्र ते महीं सुऽमतिं वेविदाम ।
इषं पिन्व मघवत्ऽभ्यः सुऽवीरां यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥ ६ ॥

हे इंद्रा, तू आमचीच उत्कृष्ट वरप्रसादेंकरून परिपूर्ति कर. देव, तुझी महान अनुग्रह बुद्धि आम्हाला पूर्णपणे लाभो. आमच्या ऐश्वर्यवंत क्षत्रिय यजमानांना सुपुत्र संयुक्त धनधान्यादि ऐश्वर्य नित्य पुरवीत रहा. अहो देवगणांनो, तुम्ही सदा आम्हाला आपल्या आशीर्वादांनीच संकटांतून सांभाळा. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त २६ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


न सोम॒ इन्द्र॒मसु॑तो ममाद॒ नाब्र॑ह्माणो म॒घवा॑नं सु॒तासः॑ ।
तस्मा॑ उ॒क्थं ज॑नये॒ यज्जुजो॑षन्नृ॒वन्नवी॑यः शृ॒णव॒द्यथा॑ नः ॥ १ ॥

न सोमः इंद्रं असुतः ममाद न अब्रह्माणः मघऽवानं सुतासः ।
तस्मै उक्थं जनये यज् जुजोषत् नृवत् नवीयः शृणऽवत् यथा नः ॥ १ ॥

सोम जर काढला नाही तर इंद्राला काही आनंद होत नाही. विराट स्तुति स्तोत्रांविरहित अर्पण केलेल्या रसांनी इंद्राची तृप्ति होत नाही. ह्याकरितां जे माझ्या वाणींकडून वदवले जाईल असे स्तोत्र मी निर्माण करतो. ह्या योगें सुदास भक्त राजाप्रमाणे त्या इंद्र देवाला इतका हर्ष होवो, की जेणेंकरून तो हे आमचे नवीन स्तुतिकवन ऐकूनच घेईल. ॥ १ ॥


उ॒क्थौ॑क्थे॒ सोम॒ इन्द्रं॑ ममाद नी॒थेनी॑थे म॒घवा॑नं सु॒तासः॑ ।
यदीं॑ स॒बाधः॑ पि॒तरं॒ न पु॒त्राः स॑मा॒नद॑क्षा॒ अव॑से॒ हव॑न्ते ॥ २ ॥

उक्थेऽउक्थे सोमः इंद्रं ममाद नीथेऽनीथे मघऽवानं सुतासः ।
यत् ईं सऽबाधः पितरं न पुत्राः समानऽदक्षाः अवसे हवंते ॥ २ ॥

प्रत्येक "उक्थ" स्तोत्रांसहित समर्पण केलेल्या सोमरसाने इंद्र प्रमुदित होवो. प्रत्येक नरवीराकडून परमेश्वरी स्तोत्रगायनपूर्वक समर्पण केलेला सोमरस महदैश्वर्यसंपन्न इंद्राला सुहर्षित करो. जे हे समदुःखी समानोत्साही वीर भक्त येथे आहेत ते तुझे पुत्र पित्याप्रमाणे तुझे स्वसंरक्षणार्थ हवन करीत आहेत. ॥ २ ॥


च॒कार॒ ता कृ॒णव॑न्नू॒नम॒न्या यानि॑ ब्रु॒वन्ति॑ वे॒धसः॑ सु॒तेषु॑ ।
जनी॑रिव॒ पति॒रेकः॑ समा॒नो नि मा॑मृजे॒ पुर॒ इन्द्रः॒ सु सर्वाः॑ ॥ ३ ॥

चकार ता कृणवत् नूनं अन्या यानि ब्रुवंति वेधसः सुतेषु ।
जनीःऽइव पतिः एकः समानः नि ममृजे पुरः इंद्रः सु सर्वाः ॥ ३ ॥

स्तोत्रविधाते भक्तजन सोमाभिषवण प्रसंगात जसजशा वाणी बोलतात त्या त्याप्रमाणे ते कर्मेंही करतात. देवा, भक्तजनांनी खरोखरच यांहून अधिकही भजने केली आहेत. हा एक, सर्वांना सम, सर्वस्वामी, सर्वोत्पादक मातेप्रमाणे, इंद्र देव सर्व नगरा-गावांमधून आपले भक्त शोधून काढतो. ॥ ३ ॥


ए॒वा तमा॑हुरु॒त शृ॑ण्व॒ इन्द्र॒ एको॑ विभ॒क्ता त॒रणि॑र्म॒घाना॑म् ।
मि॒थ॒स्तुर॑ ऊ॒तयो॒ यस्य॑ पू॒र्वीर॒स्मे भ॒द्राणि॑ सश्चत प्रि॒याणि॑ ॥ ४ ॥

एव तं आहुः उत शृण्वे इंद्रः एकः विऽभक्ता तरणिः मघानां ।
मिथःऽतुर ऊतयः यस्य पूर्वीः अस्मेइति भद्राणि सश्चत प्रियाणि ॥ ४ ॥

हातघाईवर आलेल्या लढाईमध्ये भक्तांकडून लढण्याकरितां सत्वर धांव घालणार्‍या इंद्र देवाचे जे प्राचीन महा पराक्रम आहेत, त्याचेच ऋषिजन नित्य गायन करीत असतात. अहो विप्रांनो, मी असे ऐकतो कीं, इंद्र हा एकटाच देव संपत्तिंचा यथाविभाग वांटणारा असून भक्तांना आपत्काळी उचलून धरणारा असा आहे. हा देव आम्हाला आमची प्रिय सुखधने आता समर्पण करो. ॥ ४ ॥


ए॒वा वसि॑ष्ठ॒ इन्द्र॑मू॒तये॒ नॄन्कृ॑ष्टी॒नां वृ॑ष॒भं सु॒ते गृ॑णाति ।
स॒ह॒स्रिण॒ उप॑ नो माहि॒ वाजा॑न्यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ५ ॥

एव वसिष्ठः इंद्रं ऊतये नॄन् कृष्टीनां वृषभं सुते गृणाति ।
सहस्रिणः उप नः माहि वाजान् यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥ ५ ॥

मी वसिष्ठ ऋषि आमच्या वीर व भक्त जनांच्या अग्रण्यांच्या संरक्षणाकरितां आमच्या भूमीवर यथेच्छ कामपूरण वर्षाव करणार्‍या इंद्रदेवाचीच ह्या सोमार्पण प्रसंगी भजनस्तुति गातो. देवा आम्हाला हजारो प्रकारची उत्साहबले प्राप्त होवोत. अहो देवदेवतांनो, आमचे आपल्या आशीर्वादांनी नित्य प्रतिपालन करा. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त २७ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


इन्द्रं॒ नरो॑ ने॒मधि॑ता हवन्ते॒ यत्पार्या॑ यु॒नज॑ते॒ धिय॒स्ताः ।
शूरो॒ नृषा॑ता॒ शव॑सश्चका॒न आ गोम॑ति व्र॒जे भ॑जा॒ त्वं नः॑ ॥ १ ॥

इंद्रं नरः नेमऽधिता हवंते यत् पार्याः युनजते धियः ताः ।
शूरः नृऽसाता शवसः चकानः आ गोऽमति व्रजे भज त्वं नः ॥ १ ॥

बरोबर निशाण मारण्याचे जेथे काम, अशा लढाईत प्रमुख सेनापति जन इंद्राचीच आराधना करतात. कारण तो त्यांच्या अंतिम ध्येयाला साध्य करून देतो. इंद्रा, असा तू लढाई करवणारा बलकामी शूर देव आम्हाला प्रकाश धेनूंच्या गोठ्यांत नेऊन पोंचवो. ॥ १ ॥


य इ॑न्द्र॒ शुष्मो॑ मघवन्ते॒ अस्ति॒ शिक्षा॒ सखि॑भ्यः पुरुहूत॒ नृभ्यः॑ ।
त्वं हि दृ॒ळ्हा म॑घव॒न्विचे॑ता॒ अपा॑ वृधि॒ परि॑वृतं॒ न राधः॑ ॥ २ ॥

य इंद्र शुष्मः मघऽवन् ते अस्ति शिक्ष सखिऽभ्यः पुरुऽहूत नृऽभ्यः ।
त्वं हि दृळ्हा मघऽवन् विऽचेता अप वृधि परिऽवृतं न राधः ॥ २ ॥

इंद्रा, ऐश्वर्यवंता प्रभो, जे तुझे बल आहे तें, हे बहुप्रार्थिता देवा, तुझ्या भक्तगणांना दे. राजा, तू सुदृढ व पूर्णविचारी आहेस. चहूंकडून मढवून काढल्याप्रमाणे आमच्या धनाला तू वाढव. ॥ २ ॥


इन्द्रो॒ राजा॒ जग॑तश्चर्षणी॒नामधि॒ क्षमि॒ विषु॑रूपं॒ यदस्ति॑ ।
ततो॑ ददाति दा॒शुषे॒ वसू॑नि॒ चोद॒द्राध॒ उप॑स्तुतश्चिद॒र्वाक् ॥ ३ ॥

इंद्रः राजा जगतः चर्षणीनां अधि क्षमि विषुऽरूपं यत् अस्ति ।
ततः ददाति दाशुषे वसूनि चोदत् राधः उपऽस्तुतः चित् अर्वाक् ॥ ३ ॥

इंद्र सकल जनांचा, सर्व विचारवंतांचा इतकेंच नव्हे, तर पृथ्वीवर जे जे म्हणून नाना वर्णाकृती चमत्कारादि आहेत त्या सर्वांचा प्रभु - राजा किंवा अधिपति आहे. आणि म्हणूनच तो उदार दानशूर भक्तांना (यज्ञ करणार्‍यांना) सकल राजैश्वर्यादि धन संप्रदान करतो. त्याची जर कोणी भक्ताने स्तुति गाइली तर तो आपल्या भक्ताच्या समोर ऐश्वर्यलक्ष्मीला आणून उभी करतो. ॥ ३ ॥


नू चि॑न्न॒ इन्द्रो॑ म॒घवा॒ सहू॑ती दा॒नो वाजं॒ नि य॑मते न ऊ॒ती ।
अनू॑ना॒ यस्य॒ दक्षि॑णा पी॒पाय॑ वा॒मं नृभ्यो॑ अ॒भिवी॑ता॒ सखि॑भ्यः ॥ ४ ॥

नू चित् नः इंद्रः मघऽवा सऽहूती दानः वाजं नि यमते नः ऊती ।
अनूना यस्य दक्षिणा पीपाय वामं नृऽभ्यः अभिऽवीता सखिऽभ्यः ॥ ४ ॥

राज्यैश्वर्यसंपन्न, मरुद्‍गणसेनासहित, व भक्तांना वरप्रसाद देणारा इंद्र देव आमच्या रक्षणार्थ खरोखरच अन्नाचा साठा करून ठेवतो. ह्या इंद्राची दक्षिणा आम्हाला पर्याप्त भरून पावली, देवा आतां आमच्या भक्त यजमानांनाही धन समर्पण करा. ॥ ४ ॥


नू इ॑न्द्र रा॒ये वरि॑वस्कृधी न॒ आ ते॒ मनो॑ ववृत्याम म॒घाय॑ ।
गोम॒दश्वा॑व॒द्रथ॑व॒द्व्यन्तो॑ यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ५ ॥

नु इन्द्र राये वरिवः कृधी नः आ ते मनः ववृत्याम मघाय ।
गोऽमत् अश्वऽवत् रथऽवत् व्यंतः यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥ ५ ॥

इंद्रा, आम्हाला तू खरोखरच ऐश्वर्याच्या श्रेष्ठ पायरीला पोंचव. देवा, आम्ही तुझ्या मनाला ऐश्वर्यास्तव आपल्याकडे वळवितो. राजा, आम्हाला गाई, घोडे आणि रथ आदि संपत्ति लाभोत. अहो देवदेवतांनो, तुम्ही आम्हाला आपल्या आशीर्वादांनी प्रतिपाळीत रहा. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त २८ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


ब्रह्मा॑ ण इ॒न्द्रोप॑ याहि वि॒द्वान॒र्वाञ्च॑स्ते॒ हर॑यः सन्तु यु॒क्ताः ।
विश्वे॑ चि॒द्धि त्वा॑ वि॒हव॑न्त॒ मर्ता॑ अ॒स्माक॒मिच्छृ॑णुहि विश्वमिन्व ॥ १ ॥

ब्रह्म णः इंद्र उप याहि विद्वान् अर्वाञ्चः ते हरयः संतु युक्ताः ।
विश्वे चित् हि त्वा विऽहवंतः मर्ता अस्माकं इत् छृणुहि विश्वंऽइन्व ॥ १ ॥

इंद्रा, आमच्या ’ब्रह्म’ स्तोत्राकडे ये. कारण तू स्तोत्रार्थ ज्ञाता आहेस. तुझे जोडलेले घोडे असे आमच्यासमोर इकडे येऊन उभे राहोत. सर्व जगातील माणसेंही तुझे भिन्न भिन्न ध्यानपूर्वक हविद्वारे पूजन करतातच. हे विश्वप्रेमी देवा, ह्या आमच्या स्तुति स्तोत्राकडे कान दे. ॥ १ ॥


हवं॑ त इन्द्र महि॒मा व्यान॒ड्ब्रह्म॒ यत्पासि॑ शवसि॒न्नृषी॑णाम् ।
आ यद्वज्रं॑ दधि॒षे हस्त॑ उग्र घो॒रः सन्क्रत्वा॑ जनिष्ठा॒ अषा॑ळ्हः ॥ २ ॥

हवं त इंद्र महिमा वि आनट् ब्रह्म यत् पासि शवसिन् ऋषीणां ।
आ यत् वज्रं दधिषे हस्ते उग्र घोरः सन् क्रत्वा जनिष्ठाः अषाळ्हः ॥ २ ॥

इंद्रा, तुझा महिमा ह्या विराट् जगत् यज्ञाला व्यापून उरला आहे. हे बलवंता, ऋषींचे जे ’ब्रह्म’ स्तोत्र त्याची तू जोपासना कर. कारण, हे महाभयंकर देवा, तू आपल्या हातांत वज्र धारण करतोस. देवा, तू घनघोर युद्ध करणरा व शत्रूंला असह्य असा असून तू ज्याच्या त्याच्या कर्मानेंच जीव जंतूंची (सृष्टीची) उत्पत्ति केलीस. ॥ २ ॥


तव॒ प्रणी॑तीन्द्र॒ जोहु॑वाना॒न्सं यन्नॄन्न रोद॑सी नि॒नेथ॑ ।
म॒हे क्ष॒त्राय॒ शव॑से॒ हि ज॒ज्ञे॑ऽतूतुजिं चि॒त्तूतु॑जिरशिश्नत् ॥ ३ ॥

तव प्रऽनीती इंद्र जोहुवानान् सं यत् नॄन् न रोदसीइति निनेथ ।
महे क्षत्राय शवसे हि जज्ञे अतूतुजिं चित् तूतुजिः अशिश्नत् ॥ ३ ॥

इंद्रा, ज्याअर्थी तुझे प्रणति पुरःसर ध्यान व हवन करणार्‍या श्रेष्ठ नरांना आपल्या माणसांप्रमाणे तू स्वर्गाप्रत चढवितोस त्याअर्थी तुज महदैश्वर्यसंपन्नाची यज्ञपूजा आमच्या राजकीय संरक्षणार्थ व आम्हाला पराक्रम बल प्राप्त्यर्थ आम्ही आता करतोंच. कारण, हे देवा, तुझ्या दयेने दानी भक्तांचे राज्य अदानी भक्तांवर चाललेले असते. ॥ ३ ॥


ए॒भिर्न॑ इ॒न्द्राह॑भिर्दशस्य दुर्मि॒त्रासो॒ हि क्षि॒तयः॒ पव॑न्ते ।
प्रति॒ यच्चष्टे॒ अनृ॑तमने॒ना अव॑ द्वि॒ता वरु॑णो मा॒यी नः॑ सात् ॥ ४ ॥

एभिः नः इंद्र अहऽभिः दशस्य दुःऽमित्रासः हि क्षितयः पवंते ।
प्रति यत् चष्टे अनृतं अनेनाः अव द्विता वरुणः मायी नः सात् ॥ ४ ॥

इंद्रा, आम्हाला आता ते पूर्व‍ऐश्वर्याचे दिवस दाखव. की ज्यावेळी आम्ही दुष्ट जनांपासून आपल्या हाल‍अपेष्टांचे संरक्षण खरोखरच केले होते. कारण, हे देवा, तू स्वतः निष्पाप असून आमच्या पापांना बघतोस व आमच्या मनांना पापांपासून परावृत्त करतोस. देवा, तू सर्वश्रेष्ठ मायाकारी आहेस. देवा, तू आम्हाला आता दोन्हींकडून राख. ॥ ४ ॥


वो॒चेमेदिन्द्रं॑ म॒घवा॑नमेनं म॒हो रा॒यो राध॑सो॒ यद्दद॑न्नः ।
यो अर्च॑तो॒ ब्रह्म॑कृति॒मवि॑ष्ठो यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ५ ॥

वोचेम इत् इंद्रं मघऽवानं एनं महः रायः राधसः यत् ददत् नः ।
यः अर्चतः ब्रह्मऽकृतिं अविष्ठः यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥ ५ ॥

ह्या ऐश्वर्यवंत प्रभु इंद्राची आम्ही ह्याप्रमाणे यज्ञाचे ठायी स्तुति स्तोत्रें म्हणत आहोंत; कीं जेणेंकरून तो देव प्रसन्न होऊन आम्हाला अखिल जगतातील साम्राज्यैश्वर्य देईल. कारण हा भगवान् देव, पूजन करणार्‍यांच्या ’ब्रह्म’ स्तोत्रसंपादनाचा संरक्षक आहे. अहो देवगणांनो, तुम्ही आम्हाला आपल्या कृपावरप्रदानें करून सदासर्वदा प्रतिपाळा. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त २९ ( इंद्र सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


अ॒यं सोम॑ इन्द्र॒ तुभ्यं॑ सुन्व॒ आ तु प्र या॑हि हरिव॒स्तदो॑काः ।
पिबा॒ त्व१॒स्य सुषु॑तस्य॒ चारो॒र्ददो॑ म॒घानि॑ मघवन्निया॒नः ॥ १ ॥

अयं सोमः इंद्र तुभ्यं सुन्वे आ तु प्र याहि हरिऽवः तत्ऽओकाः ।
पिब तु अस्य सुऽसुतस्य चारोः ददः मघानि मघऽवन् इयानः ॥ १ ॥

इंद्रा, हा सोमरस मी तुझ्याकरितां गाळीत आहे. हे हिरव्यापिवळ्या घोडेस्वारा, व सोमरसाच्या आश्रयणीया, लवकर लवकर धांवत ये. आणि येऊन हा उत्तम सोम पिऊन घे कसा. हे ऐश्वर्यधरा, तुझी प्रार्थना केल्याबरोबर तू भक्तांना यथेच्छ ऐश्वर्य संप्रदान करतोस. ॥ १ ॥


ब्रह्म॑न्वीर॒ ब्रह्म॑कृतिं जुषा॒णोऽर्वाची॒नो हरि॑भिर्याहि॒ तूय॑म् ।
अ॒स्मिन्नू॒ षु सव॑ने मादय॒स्वोप॒ ब्रह्मा॑णि शृणव इ॒मा नः॑ ॥ २ ॥

ब्रह्मन् वीर ब्रह्मऽकृतिं जुषाणः अर्वाचीनः हरिऽभिः याहि तूयं ।
अस्मिन् ऊंइति सु सवने मादयस्व उप ब्रह्माणि शृणव इमा नः ॥ २ ॥

हे विराट्मूर्ते, आमच्या महान् स्तोत्राच्या संपादनाचा स्वीकार करून आमच्या सन्मुख होत्साता तू आमच्याकडे आपल्या "हरि" घोड्यांसहवर्तमान अतित्वरित ये. ह्या सोमाभिषवण प्रसंगाचे ठायी, अगा देवा, तू आनंदित हो. ह्या आमच्या ’ब्रह्म’ स्तोत्रांना जवळ येऊन ऐकून घे. ॥ २ ॥


का ते॑ अ॒स्त्यरं॑कृतिः सू॒क्तैः क॒दा नू॒नं ते॑ मघवन्दाशेम ।
विश्वा॑ म॒तीरा त॑तने त्वा॒याधा॑ म इन्द्र शृणवो॒ हवे॒मा ॥ ३ ॥

का ते अस्ति अरंऽकृतिः सूऽक्तैः कदा नूनं ते मघऽवन् दाशेम ।
विश्वाः मतीः आ ततने त्वाऽया अधा म इंद्र शृणवः हवा इमा ॥ ३ ॥

ह्या सर्वोत्कृष्ट स्तुतिवचनांनी तुझी प्रसन्नता कशी होईल ? हे राजा, तू खरोखरच ती शांति आम्हालाही कधी देशील बरें ? देवा अखिल बुद्धिवंत जन त्वद् दत्त मतीनेच आपापला भजनपूजन विस्तार करीत असतात. तसेच मीही आता यज्ञ विस्तार करीत आहे. हे इंद्रा, आता तरी ह्या माझ्या हाकांना ऐकून घे. ॥ ३ ॥


उ॒तो घा॒ ते पु॑रु॒ष्या३॒इदा॑स॒न्येषां॒ पूर्वे॑षा॒मशृ॑णो॒रृषी॑णाम् ।
अधा॒हं त्वा॑ मघवञ्जोहवीमि॒ त्वं न॑ इन्द्रासि॒ प्रम॑तिः पि॒तेव॑ ॥ ४ ॥

उतोइति घ ते पुरुष्याः इत् आसन् येषां पूर्वेषां अशृणोः ऋषीणां ।
अध अहं त्वा मघऽवन् जोहवीमि त्वं नः इंद्र असि प्रऽमतिः पिताऽइव ॥ ४ ॥

देवा, ह्या भरतभूमीचे ठायी तुझी पुष्कळ स्तुति झाली आहे. कारण देवा तू इथेंच प्राचीन ऋषींच्याही स्तुति ऐकिल्या आहेस. राजा इंद्रा, आता मी तुजप्रित्यर्थ हवन करतो. देवा, तू पित्याप्रमाणे आम्हाला बुद्धिसूचक हो, आमच्या सन्मार्गामध्ये, सत्कर्माचरणांमध्ये आम्हाला बुद्धिप्रेरक हो. ॥ ४ ॥


वो॒चेमेदिन्द्रं॑ म॒घवा॑नमेनं म॒हो रा॒यो राध॑सो॒ यद्दद॑न्नः ।
यो अर्च॑तो॒ ब्रह्म॑कृति॒मवि॑ष्ठो यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ५ ॥

वोचेम इत् इंद्रं मघऽवानं एनं महः रायः राधसः यत् ददन् नः ।
यः अर्चतः ब्रह्मकृतिं अविष्ठः यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥ ५ ॥

ह्या ऐश्वर्यवंत प्रभु इंद्रदेवाप्रित्यर्थ आम्ही ह्याप्रमाणे स्तुतिस्तोत्रें गात आहोंत. अशाकरितां की जेणेंकरून देव प्रसन्न होऊन आम्हाला अखिल जगतातील पूर्ण ऐश्वर्यधन देईल. कारण देव हा पूजा‍अर्चा करणर्‍यांच्या ’बृहत्’ स्तोत्रसंपादन कार्याचा संरक्षक आहे. अहो, अखिल देवदेवतांनो, तुम्ही आम्हाला आपल्या कृपावरदानांनी सदा सर्वदा सांभाळा ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ७ सूक्त ३० ( इंद्र सूक्त )

ऋषी - वसिष्ठ मैत्रावरुणि : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


आ नो॑ देव॒ शव॑सा याहि शुष्मि॒न्भवा॑ वृ॒ध इ॑न्द्र रा॒यो अ॒स्य ।
म॒हे नृ॒म्णाय॑ नृपते सुवज्र॒ महि॑ क्ष॒त्राय॒ पौंस्या॑य शूर ॥ १ ॥

आ नः देव शवसा याहि शुष्मिन् भव वृध इंद्र रायः अस्य ।
महे नृम्णाय नृऽपते सुऽवज्र महि क्षत्राय पौंस्याय शूर ॥ १ ॥

हे महाबली देवा, परमसामर्थ्येंकरून तू आमच्या यज्ञाकडे ये. इंद्रा, ह्या ऐश्वर्याचा वाढविता हो. हे राजांच्या राजा, शस्त्रधारका, पराक्रमी देवा, मला आम्हाला महान् क्षत्रियबळ, पुरुषार्थबळ आणि भक्ति बलदायी हो. ॥ १ ॥


हव॑न्त उ त्वा॒ हव्यं॒ विवा॑चि त॒नूषु॒ शूराः॒ सूर्य॑स्य सा॒तौ ।
त्वं विश्वे॑षु॒ सेन्यो॒ जने॑षु॒ त्वं वृ॒त्राणि॑ रन्धया सु॒हन्तु॑ ॥ २ ॥

हवंते ऊंइति त्वा हव्यं विऽवाचि तनूषु शूराः सूर्यस्य सातौ ।
त्वं विश्वेषु सेन्यः जनेषु त्वं वृत्राणि रंधया सुऽहंतु ॥ २ ॥

वाद विवादाची लढाई प्रथमारंभी सुरू झालेली असतांनाच सूर्याच्या किरणांमध्ये शूर जन तुज हवनीय देवाची यज्ञद्वारे पूजा अर्चा व स्तुति करूं लागतात. देवा, तू सकल जनांमध्ये प्रमुख सेनापति आहेस. हे शत्रूंना मारणार्‍या देवा, तू आता आमच्या अंधकार (वा अवर्षण) शत्रूंना चेंगरून मारून टाक. ॥ २ ॥


अहा॒ यदि॑न्द्र सु॒दिना॑ व्यु॒च्छान्दधो॒ यत्के॒तुमु॑प॒मं स॒मत्सु॑ ।
नि अ१॒ग्निः सी॑द॒दसु॑रो॒ न होता॑ हुवा॒नो अत्र॑ सु॒भगा॑य दे॒वान् ॥ ३ ॥

अहा यत् इंद्र सुदिना विऽउच्छान् दधः यत् केतुं उपऽमं समत्ऽसु ।
नि अग्निः सीदत् असुरः न होता हुवानः अत्र सुऽभगाय देवान् ॥ ३ ॥

इंद्रा जेव्हा दिवस मंगलमय गेले, जेव्हा लढाईमध्ये यशध्वजेप्रमाणे तुला आम्ही धारण केले, त्यावेळी होत्याप्रमाणे अग्निदेव इतर देवांस्तव हवनकर्ता म्हणून ह्या ठिकाणी आमच्या भाग्योदयाकरितां किंवा सौभाग्यवर्धक इंद्र देवाकरितां येऊन बसला. ॥ ३ ॥


व॒यं ते त॑ इन्द्र॒ ये च॑ देव॒ स्तव॑न्त शूर॒ दद॑तो म॒घानि॑ ।
यच्छा॑ सू॒रिभ्य॑ उप॒मं वरू॑थं स्वा॒भुवो॑ जर॒णाम॑श्नवन्त ॥ ४ ॥

वयं ते ते इंद्र ये च देव स्तवंत शूर ददतः मघानि ।
यच्छ सूरिऽभ्य उपऽमं वरूथं सुऽआभुवः जरणां अश्नवंत ॥ ४ ॥

हे शूर इंद्र देव, ज्यांनी तुजकरितां यज्ञाराधनेस्तव आम्हाला धन दिले त्यांच्या प्रित्यर्थ आम्ही तुझी स्तुति स्तोत्रें केलीच. देवा, तुझ्या स्तोत्रकर्त्या विद्वान् ब्राह्मणांना सर्वोत्तम असे घर दे. तुझे स्तोत्रकर्ते आपल्या स्वतःच्या जन्मभूमीमध्येच सुखसमृद्ध पुत्रपौत्रांसह अखंड नांदोत. ॥ ४ ॥


वो॒चेमेदिन्द्रं॑ म॒घवा॑नमेनं म॒हो रा॒यो राध॑सो॒ यद्दद॑न्नः ।
यो अर्च॑तो॒ ब्रह्म॑कृति॒मवि॑ष्ठो यू॒यं पा॑त स्व॒स्तिभिः॒ सदा॑ नः ॥ ५ ॥

वोचेम इत् इंद्रं मघऽवानं एनं महः रायः राधसः यत् ददन् नः ।
यः अर्चतः ब्रह्मऽकृतिं अविष्ठः यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥ ५ ॥

ह्या ऐश्वर्यसंपन्न प्रभुदेव इंद्राप्रित्यर्थ आम्ही ह्याप्रमाणे यज्ञ द्वारें स्तुतिस्तोत्रें प्रकाशित करीत आहोंत. ह्या योगे भगवान प्रसन्न होऊन आम्हाला अखिल जगतातील पूर्ण ऐश्वर्य धन अर्पण करील. कारण, देवयज्ञ करणार्‍यांच्या विराट स्तुतिस्तोत्र संपादनकर्माचा सुसंरक्षक आहे. अहो देवांनो, तुम्ही ही आमचे आपल्या आशीर्वादांनी सर्वदा संरक्षण करीत असा. ॥ ५ ॥


ॐ तत् सत्


GO TOP