PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ६ - सूक्त ५१ ते ६०

ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ५१ ( अनेक देवता सूक्त )

ऋषी - ऋजिश्वान् बार्हस्पत्य : देवता - विश्वेदेव : छंद - अनुष्टुभ्, त्रिष्टुभ्


उदु॒ त्यच्चक्षु॒र्महि॑ मि॒त्रयो॒राँ एति॑ प्रि॒यं वरु॑णयो॒रद॑ब्धम् ।
ऋ॒तस्य॒ शुचि॑ दर्श॒तमनी॑कं रु॒क्मो न दि॒व उदि॑ता॒ व्यद्यौत् ॥ १ ॥

उत् ऊंइति त्यत् चक्षुः महि मित्रयोः आ एति प्रियं वरुणयोः अदब्धं ।
ऋतस्य शुचि दर्शतं अनीकं रुक्मः न दिव उत्ऽइता वि अद्यौत् ॥ १ ॥

पहा ह्या अपराजित मित्रवरुणाचा लोकप्रिय असा महा नेत्र उदय पावत आहे. पवित्र रमणीय, आणि सद्धर्माचे मुख असा तो नेत्र (सूर्य) आकाशाच्या आभरणाप्रमाणे उदयकाळी प्रकाशमान् झाला आहे. ॥ १ ॥


वेद॒ यस्त्रीणि॑ वि॒दथा॑न्येषां दे॒वानां॒ जन्म॑ सनु॒तरा च॒ विप्रः॑ ।
ऋ॒जु मर्ते॑षु वृजि॒ना च॒ पश्य॑न्न॒भि च॑ष्टे॒ सूरो॑ अ॒र्य एवा॑न् ॥ २ ॥

वेद यः त्रीणि विदथानि एषां देवानां जन्म सनुतः आ च विप्रः ।
ऋजु मर्तेषु वृजिना च पश्यन् अभि चष्टे सूरः अर्य एवान् ॥ २ ॥

स्फूर्तिने सर्व समजणारा हा सूर्य देवांचा उद्‍गम आणि त्यांचे तिन्ही समूह इत्यादि सर्व जाणतोच. म्हणून मनुष्यांची बरीं वाईट सर्व कृत्ये पहात पहात तो भक्त प्रेरक देव सज्जनांच्या सद्वर्तनावरही आपली कृपादृष्टी ठेवतो. ॥ २ ॥


स्तु॒ष उ॑ वो म॒ह ऋ॒तस्य॑ गो॒पानदि॑तिं मि॒त्रं वरु॑णं सुजा॒तान् ।
अ॒र्य॒मणं॒ भग॒मद॑ब्धधीती॒नच्छा॑ वोचे सध॒न्यः पाव॒कान् ॥ ३ ॥

स्तुषे ऊंइति वः महः ऋतस्य गोपान् अदितिं मित्रं वरुणं सुऽजातान् ।
अर्यमणं भगं अदब्धऽधीतीन् अच्छ वाचे सऽधन्यः पावकान् ॥ ३ ॥

ह्या श्रेष्ठ सद्धर्माचे प्रतिपालक, आणि विशुद्धप्रभव असे मित्रवरुण, अदिति, अर्यमा आणि भग ह्यांचे मी यशोगायन करतो. त्यांचे विचार कधीहि निष्फळ होत नाहीत, आणि मीही धन्य की त्यांचे संकीर्तन मी उत्तम रीतीने चालविले आहे. ॥ ३ ॥


रि॒शाद॑सः॒ सत्प॑तीँ॒रद॑ब्धान्म॒हो राज्ञः॑ सुवस॒नस्य॑ दा॒तॄन् ।
यूनः॑ सुक्ष॒त्रान्क्षय॑तो दि॒वो नॄना॑दि॒त्यान्या॒म्यदि॑तिं दुवो॒यु ॥ ४ ॥

रिशादसः सत्ऽपतीन् अदब्धान् महः राज्ञः सुऽवसनस्य दातॄन् ।
यूनः सुऽक्षत्रान् क्षयतः दिवः नॄन् आदित्यान् यामि अदितिं दुवःऽयु ॥ ४ ॥

देव हे दुष्टांना भयंकर, सज्जनांचे प्रभु, अपराजित महाराजे आहेत. वस्त्राप्रमाणे सर्वांना आच्छादन करणार्‍या प्रकाशाचे ते सढळ हाताने दान करतात. ह्या तारुण्याढ्य, सत्ताधीश, आकाशवासी शूर आदित्यांची आणि अदितिचीही मी उपसनोत्सुक भक्त नम्रभावाने प्रार्थना करीत असतो. ॥ ४ ॥


द्यौ३ष्पितः॒ पृथि॑वि॒ मात॒रध्रु॒गग्ने॑ भ्रातर्वसवो मृ॒ळता॑ नः ।
विश्व॑ आदित्या अदिते स॒जोषा॑ अ॒स्मभ्यं॒ शर्म॑ बहु॒लं वि य॑न्त ॥ ५ ॥

द्यौः पितरिति पृथिवि मातः अध्रुक् अग्ने भ्रातः वसवः मृळत नः ।
विश्वे आदित्याः अदिते सऽजोषा अस्मभ्यं शर्म बहुलं वि यंत ॥ ५ ॥

हे दिव्य आकाशा, हे अश्राप माते पृथिवी, हे बन्धो अग्नी, हे दिव्यनिधींनो आम्हांवर कृपा करा. सकल आदित्यांनो, हे आदिमाते, तुम्ही प्रेमळ आहांत तर आम्हाला ते तुमचे प्रचुर सुखाचे स्थान द्या. ॥ ५ ॥


मा नो॒ वृका॑य वृ॒क्ये समस्मा अघाय॒ते री॑रधता यजत्राः ।
यू॒यं हि ष्ठा र॒थ्यो नस्त॒नूनां॑ यू॒यं दक्ष॑स्य॒ वच॑सो बभू॒व ॥ ६ ॥

मा नः वृकाय वृक्ये समस्मै अघऽयते रीरधत यजत्राः ।
यूयं हि स्थ रथ्यः नः तनूनां यूयं दक्षस्य वचसः बभूव ॥ ६ ॥

पूज्य विभीतीनो ! लांडगा किंवा लांडगी ह्यांच्या अथवा कोणत्याही दुष्टाच्या कचाट्यांत आम्हांस सापडूं देऊ नका. तुम्हीच आमच्या शरीराचे नियंते आहांत. चातुर्य आणि वक्तृत्व ह्यांचेही पोषक तुम्हीच. ॥ ६ ॥


मा व॒ एनो॑ अ॒न्यकृ॑तं भुजेम॒मा तत्क॑र्म वसवो॒ यच्चय॑ध्वे ।
विश्व॑स्य॒ हि क्षय॑थ विश्वदेवाः स्व॒यं रि॒पुस्त॒न्वं रीरिषीष्ट ॥ ७ ॥

मा व एनः अन्यऽकृतं भुजेम मा तत् कर्म वसवः यत् चयध्वे ।
विश्वस्य हि क्षयथ विश्वऽदेवाः स्वयं रिपुः तन्वं रिरिषीष्ट ॥ ७ ॥

दुसर्‍याच्या पातकाची फळे भोगण्याचे आमच्या नशीबी न येवो. हे दैवी संपत्तिच्या निधिंनो, तुम्हाला जे अप्रिय ते आमच्या हांतून न घडो. सर्व ठिकाणी तुमचा वास आहे. तर आमच्याशी शत्रुत्व करणारा दुष्ट आपल्या स्वतःलाच इजा करून घेवो. ॥ ७ ॥


नम॒ इदु॒ग्रं नम॒ आ वि॑वासे॒ नमो॑ दाधार पृथि॒वीमु॒त द्याम् ।
नमो॑ दे॒वेभ्यो॒ नम॑ ईश एषां कृ॒तं चि॒देनो॒ नम॒सा वि॑वासे ॥ ८ ॥

नम इत् उग्रं नम आ विवासे नमः दाधार पृथिवीं उत द्यां ।
नमः देवेभ्यः नमः ईशे एषां कृतं चित् एनः नमसा आ विवासे ॥ ८ ॥

देवाला नमस्कार हेच घोर तप. मी तरी नमस्कार रूप तपाचेच आचरण करतो. नमस्कार रूप तपानेच पृथिवी आणि आकाश ह्यांना आधार मिळाला आहे. दिव्य विभूतिंस नमस्कार असो. नमस्कारानेंच त्यांच्यावर आपली सत्ता होते. म्हणून जे जे कांही पातक हातून घडले असेल ते ते नमस्कार रूप तपाने पार घालवून देतो. ॥ ८ ॥


ऋ॒तस्य॑ वो र॒थ्यः पू॒तद॑क्षानृ॒तस्य॑ पस्त्य॒सदो॒ अद॑ब्धान् ।
ताँ आ नमो॑भिरुरु॒चक्ष॑सो॒ नॄन्विश्वा॑न्व॒ आ न॑मे म॒हो य॑जत्राः ॥ ९ ॥

ऋतस्य वः रथ्यः पूतऽदक्षान् ऋतस्य पस्त्यऽसदः अदब्धान् ।
तान् आ नमःऽभिः उरुचक्षसः नॄन् विश्वान् वः आ नमे महः यजत्राः ॥ ९ ॥

सनातन धर्माचे महारथी, ज्यांची चातुर्य कृति परमपवित्र, सनातन सत्यावरच ज्यांचा निवास, जे अपराजित, असे जे तुम्ही दूरदृष्टी पूज्य आणि शूर विभूति त्या सर्व महाविभूतिंना मी नम्रपणे प्रणाम करतो. ॥ ९ ॥


ते हि श्रेष्ठ॑वर्चस॒स्त उ॑ नस्ति॒रो विश्वा॑नि दुरि॒ता नय॑न्ति ।
सु॒क्ष॒त्रासो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॒ग्निरृ॒तधी॑तयो वक्म॒राज॑सत्याः ॥ १० ॥

ते हि श्रेष्ठऽवर्चसः ते ऊंइति नः तिरः विश्वानि दुःऽइता नयंति ।
सुऽक्षत्रासः वरुणः मित्रः अग्निः ऋतऽधीतयः वक्मराजऽसत्याः ॥ १० ॥

त्यांचे तेजच अत्युत्कृष्ट असते. सर्व संकटांच्या पार आम्हांस तेच नेतात. अशा प्रकाराने वरुण, मित्र, अग्नि हे सत्ताधीश आहेत. सनातन सत्य हाच त्यांचा विचार. कविश्रेष्ठांना तर ते सत्यमयच असतात. ॥ १० ॥


ते न॒ इन्द्रः॑ पृथि॒वी क्षाम॑ वर्धन्पू॒षा भगो॒ अदि॑तिः॒ पञ्च॒ जनाः॑ ।
सु॒शर्मा॑णः॒ स्वव॑सः सुनी॒था भव॑न्तु नः सुत्रा॒त्रासः॑ सुगो॒पाः ॥ ११ ॥

ते न इंद्रः पृथिवी क्षाम वर्धन् पूषा भगः अदितिः पञ्च जनाः ।
सुऽशर्माणः सुऽअवसः सुऽनीथा भवंतु नः सुऽत्रात्रासः सुऽगोपाः ॥ ११ ॥

इंद्र, पृथिवी, पूषा, भग, अदिति, हे पांचजण आमच्या भूमिची अधिवृद्धि करोत. ते कल्याणकर, अनुग्रहकारी, सन्मार्गदर्शक आहेत. तर ते आमचे त्राते आणि प्रतिपालक होवोत. ॥ ११ ॥


नू स॒द्मानं॑ दि॒व्यं नंशि॑ देवा॒ भार॑द्वाजः सुम॒तिं या॑ति॒ होता॑ ।
आ॒सा॒नेभि॒र्यज॑मानो मि॒येधै॑र्दे॒वानां॒ जन्म॑ वसू॒युर्व॑वन्द ॥ १२ ॥

नू सद्मानं दिव्यं नंशि देवा भारत्ऽवाजः सुऽमतिं याति होता ।
आसानेभिः यजमानः मियेधैः देवानां जन्म वसुऽयुः ववंद ॥ १२ ॥

देवांनो तुमचे दिव्यमंदिर आम्हास प्राप्त होवो. मी यज्ञकर्ता भारद्वाज तुमच्या अनुग्रहाची याचना करीत आहे. आणि अमोल संपत्तिविषयी उत्सुक असलेल्या आमच्या यजमानानेंही आपल्या ऋत्विजांसहित तुम्हां देवांच्या पृथिवीवरील अवताराला प्रणाम केला. ॥ १२ ॥


अप॒ त्यं वृ॑जि॒नं रि॒पुं स्ते॒नम॑ग्ने दुरा॒ध्यम् ।
द॒वि॒ष्ठम॑स्य सत्पते कृ॒धी सु॒गम् ॥ १३ ॥

अप त्यं वृजिनं रिपुं स्तेनं अग्ने दुःऽआध्यं ।
दविष्ठं अस्य सत्ऽपते कृधी सुऽगं ॥ १३ ॥

पातकी शत्रू आणि अगदी बिलंदर चोर ह्यांना, हे अग्ने, अगदी दूर पिटाळून लाव. सज्जनप्रतिपालका, आमचा मार्ग आम्हांस सुकर कर. ॥ १३ ॥


ग्रावा॑णः सोम नो॒ हि कं॑ सखित्व॒नाय॑ वाव॒शुः ।
ज॒ही न्य१त्रिण॑म् प॒णिं वृको॒ हिषः ॥ १४ ॥

ग्रावाणः सोम नः हि कं सखिऽत्वनाय वावशुः ।
जही नि अत्रिणं पणिं वृकः हि सः ॥ १४ ॥

तुझ्याशी मित्रत्व जोडावे म्हणूनच की काय, हे सोम पाषाण सुद्धां आनंदाने मधुर शब्द करीत आहेत. तर खादड आणि कंजुष दुष्टांचा नायनाट कर. तो एक लांडगाच म्हणा, दुसरें काय ? ॥ १४ ॥


यू॒यं हि ष्ठा सु॑दानव॒ इन्द्र॑ज्येष्ठा अ॒भिद्य॑वः ।
कर्ता॑ नो॒ अध्व॒न्ना सु॒गं गो॒पा अ॒मा ॥ १५ ॥

यूयं हि स्थ सुऽदानव इंद्रज्येष्ठा अभिऽद्यवः ।
कर्त नः अध्वन् आ सुऽगं गोपाः अमा ॥ १५ ॥

औदार्यशील देवांनो, तुम्हांमध्ये इंद्रच श्रेष्ठ. तुम्ही तेजस्वी आहांत, तर मार्गांत आणि तसेच घरीही अमचे संरक्षक व्हा; आणि सर्व गोष्टी आम्हांस सुलभ करा. ॥ १५ ॥


अपि॒ पन्था॑मगन्महि स्वस्ति॒गाम॑ने॒हस॑म् ।
येन॒ विश्वाः॒ परि॒ द्विषो॑ वृ॒णक्ति॑ वि॒न्दते॒ वसु॑ ॥ १६ ॥

अपि पंथां अगन्महि स्वस्तिऽगां अनेहसं ।
येन विश्वाः परि द्विषः वृणक्ति विंदते वसु ॥ १६ ॥

मंगलकारक आणि पापरहित मार्ग आतां आम्हांस लाभला आहे. त्या मार्गाने गेले असतां सर्व द्वेष्टे बजूसच राहतात आणि मनुष्याला त्या बिनमोल दिव्य संपत्तिचा लाभ होतो. ॥ १६ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ५२ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - ऋजिश्वान् बार्हस्पत्य : देवता - विश्वेदेव : छंद - गायत्री, जगती, त्रिष्टुभ्


न तद्दि॒वा न पृ॑थि॒व्यानु॑ मन्ये॒ न य॒ज्ञेन॒ नोत शमी॑भिरा॒भिः ॥
उ॒ब्जन्तु॒ तं सु॒भ्व१ः॑ पर्व॑तासो॒ नि ही॑यतामतिया॒जस्य॑ य॒ष्टा ॥ १ ॥

न तत् दिवा न पृथिव्याः अनु मन्ये न यज्ञेन न उत शमीभिः आभिः ।
उब्जंतु तं सुऽभ्वः पर्वतासः नि हीयतां अतिऽयाजस्य यष्टा ॥ १ ॥

आकाश, पृथिवी, यज्ञ आणि माझी तपश्चर्या ह्याची शपथ घेऊन म्हणतो की मला ती गोष्ट संमत नाही. ह्या माझ्या स्तुतींनी ते अवाढव्य पर्वत त्याला दडपून टाकून वठणीवर आणोत. यज्ञकर्मांत न्यूनता आणि अतिरेक करणारा अतियाज - त्याचा याजक हीन दशेला जाईल. ॥ १ ॥


अति॑ वा॒ यो म॑रुतो॒ मन्य॑ते नो॒ ब्रह्म॑ वा॒ यः क्रि॒यमा॑णं॒ निनि॑त्सात् ॥
तपूं॑षि॒ तस्मै॑ वृजि॒नानि॑ सन्तु ब्रह्म॒द्विष॑म॒भि तं शो॑चतु॒ द्यौः ॥ २ ॥

अति वा यः मरुतः मन्यते नः ब्रह्म वा यः क्रियमाणं निनित्सात् ।
तपूंषि तस्मै वृजिनानि संतु ब्रह्मऽद्विषं अभि तं शोचतु द्यौः ॥ २ ॥

मरुतांनो, जो आमचा अवमान करील अथवा आम्ही प्रार्थनासूक्त म्हणत असतांना आमचा उपहास करील त्याला अग्निज्वाला क्रोधाने कुटिल होवोत. देवोपासनेचा द्वेष करणार्‍या त्या अधमाला आकाश भाजून काढो. ॥ २ ॥


किम॒ङ्गण त्वा॒ ब्रह्म॑णः सोम गो॒पां किम॒ङ्गि त्वा॑हुरभिशस्ति॒पां नः॑ ॥
किम् अ॒ङ्गप नः॑ पश्यसि नि॒द्यमा॑नान्ब्रह्म॒द्विषे॒ तपु॑षिं हे॒तिम॑स्य ॥ ३ ॥

किं अङ्‌ग त्वा ब्रह्मणः सोम गोपां किं अङ्‌ग त्वा आहुः अभिशस्तिऽपां नः ।
किं अङ्ग नः पश्यसि निद्यमानान् ब्रह्मऽद्विषे तपुषिं हेतिं अस्य ॥ ३ ॥

सोमा, तुला प्रार्थनेचा प्रतिपालक म्हणतात ना ? दुष्टांच्या शिव्याशापापासून आमचा बचाव करणारा असे तुलाच म्हणतात ना ? तर मग आमची निंदा होत असतांना तुला पाहवतें कसें ? ह्या ब्रह्मद्वेष्ट्यांवर तू आपले झगझगीत अस्त्र फेंक. ॥ ३ ॥


अव॑न्तु॒ मामु॒षसो॒ जाय॑माना॒ अव॑न्तु मा॒ सिन्ध॑वः॒ पिन्व॑मानाः ॥
अव॑न्तु मा॒ पर्व॑तासो ध्रु॒वासोऽवन्तु मा पि॒तरो॑ दे॒वहू॑तौ ॥ ४ ॥

अवंतु मां उषसः जायमानाः अवंतु मा सिन्धवः पिन्वमानाः ।
अवंतु मा पर्वतासः ध्रुवासः अवंतु मा पितरः देवऽहूतौ ॥ ४ ॥

उदय पावणार्‍या उषा माझेवर अनुग्रह करोत. उदकौघाने दुथडी भरून वाहणार्‍या महानद्याही मजवर कृपा करोत. अढळ पर्वत माझे रक्षण करोत. मी देवाचा धांवा मांडला असतां पूर्वज पितर माझे रक्षण करोत. ॥ ४ ॥


वि॒श्व॒दानीं॑ सु॒मन॑सः स्याम॒ पश्ये॑म॒ नु सूर्य॑मु॒च्चर॑न्तम् ॥
तथा॑ कर॒द्वसु॑पति॒र्वसू॑नां दे॒वाँ ओहा॒नोऽव॒साग॑मिष्ठः ॥ ५ ॥

विश्वऽदानीं सुऽमनसः स्याम पश्येम नु सूर्यं उत्ऽचरंतं ।
तथा करत् वसुऽपतिः वसूनां देवान् ओहानः अवसा आऽगमिष्ठः ॥ ५ ॥

आम्ही नेहमी प्रसन्नचित्त असूं, आणि आकाशांत संचार करणारा सूर्य स्वस्थपणे अवलोकन करूं असे देव करो. तो दिव्य निधिंचा भांडारी, दिव्य विभूतिंचाही हितचिंतक आणि आपल्या संरक्षक प्रसादांसह आमच्याकडे येणारा असा आहे. ॥ ५ ॥


इन्द्रो॒ नेदि॑ष्ठ॒मव॒साग॑मिष्ठः॒ सर॑स्वती॒ सिन्धु॑भिः॒ पिन्व॑माना ॥
प॒र्जन्यो॑ न॒ ओष॑धीभिर्मयो॒भुर॒ग्निः सु॒शंसः॑ सु॒हवः॑ पि॒तेव॑ ॥ ६ ॥

इंद्रः नेदिष्ठं अवसा आऽगमिष्ठः सरस्वती सिंधुऽभिः पिन्वमाना ।
पर्जन्यः नः ओषधीभिः मयःऽभुः अग्निः सुऽशंसः सुऽहवः पिताऽइव ॥ ६ ॥

आपल्या संरक्षक कृपा प्रसादांसह इंद्र आमच्याकडे येतो. आमच्याकरितां सरस्वती आपल्या महानद्यांसह उदकाने दुथडी भरून वाहते. औषधी वनस्पतींच्या योगाने पर्जन्य हा आमचे कल्याणच करतो; आणि परमस्तुत्य अग्नि हा पित्याप्रमाणे आम्हांला नेहमी सुलभ असतो. ॥ ६ ॥


विश्वे॑ देवास॒ आ ग॑त शृणु॒ता म॑ इ॒मं हव॑म् ॥ एदम् ब॒र्हिर्नि षी॑दत ॥ ७ ॥

विश्वे देवास आ गत शृणुता म इमं हवं ।
एदं बर्हिः नि सीदत ॥ ७ ॥

विश्वेदेवहो, येथे या, आमची हांक ऐका; आणि ह्या कुशासानावर आरोहण करा. ॥ ७ ॥


यो वो॑ देवा घृ॒तस्नु॑ना ह॒व्येन॑ प्रति॒भूष॑ति ॥ तं विश्व॒ उप॑ गच्छथ ॥ ८ ॥

यः वः देवाः घृतऽस्नुना हव्येन प्रतिऽभूषति ।
तं विश्वे उप गच्छथ ॥ ८ ॥

देवांनो, घृताने थबथबलेल्या हविनिशी जो भक्त तुम्हांकडे नम्रपणे येतो त्याच्याचकडे तुम्ही सर्वजण जातां. ॥ ८ ॥


उप॑ नः सू॒नवो॒ गिरः॑ शृ॒ण्वन्त्व॒मृत॑स्य॒ ये ॥ सु॒मृ॒ळी॒का भ॑वन्तु नः ॥ ९ ॥

उप नः सूनवः गिरः शृण्वंतु अमृतस्य ये ।
सुऽमृळीकाः भवंतु नः ॥ ९ ॥

अमरत्वापासून प्रादुर्भूत् झालेल्या विभूतींनो, तुम्ही आमच्या स्तवनवाणी श्रवण करा, आणि आमच्याविषयीं कळवळ बाळगा. ॥ ९ ॥


विश्वे॑ दे॒वा ऋ॑ता॒वृध॑ऋ॒तुभि॑र्हवन॒श्रुतः॑ ॥ जु॒षन्तां॒ युज्यं॒ पयः॑ ॥ १० ॥

विश्वे देवाः ऋतऽवृधः ऋतुऽभिः हवनऽश्रुतः ।
जुषंतां युज्यं पयः ॥ १० ॥

तुम्ही सनातन धर्माचे उत्कर्षक आहांत, तुम्ही यथाकाली आमची हांक ऐकतांच, तर तुम्ही सकल देव, ह्या आमच्या योग्य रीतीने समर्पण केलेल्या दुग्धाचा आस्वाद घ्या. ॥ १० ॥


स्तो॒त्रमिन्द्रो॑ म॒रुद्ग॑॑ण॒स्त्वष्टृ॑मान्मि॒त्रो अ॑र्य॒मा ॥ इ॒मा ह॒व्या जु॑षन्त नः ॥ ११ ॥

स्तोत्रं इंद्रः मरुत्ऽगणः त्वष्टृऽमान् मित्रः अर्यमा ।
इमा हव्या जुषंत नः ॥ ११ ॥

मरुतांचा संघ आणि त्वष्ट्रा ह्यांच्यासह इंद्र, मित्र आणि अर्यमा हे आमचे हविर्भाग प्रेमाने ग्रहण करोत. ॥ ११ ॥


इ॒मं नो॑ अग्ने अध्व॒रं होत॑र्वयुन॒शो य॑ज ॥ चि॒कि॒त्वान्दैव्यं॒ जन॑म् ॥ १२ ॥

इमं नः अग्ने अध्वरं होतः वयुनऽशः यज ।
चिकित्वान् दैव्यं जनं ॥ १२ ॥

यज्ञसंपादक अग्निदेवा, ह्या आमच्या यागाला ये आणि आपल्या दिव्यविभूतिंचे अगदी सूक्ष्मपणे पर्यालोचन करून त्यांच्या पद्धति प्रमाणे त्यांचा सन्मान कर. ॥ १२ ॥


विश्वे॑ देवाः शृणु॒तेमं हवं॑ मे॒ ये अ॒न्तरि॑क्षे॒ य उप॒ द्यवि॒ ष्ठ ॥
ये अ॑ग्निजि॒ह्वा उ॒त वा॒ यज॑त्रा आ॒सद्या॒स्मिन्ब॒र्हिषि॑ मादयध्वम् ॥ १३ ॥

विश्वे देवाः शृणुत इमं हवं मे ये अंतरिक्षे ये उप द्यवि स्थ ।
ये अग्निऽजिह्वाः उत वा यजत्राः आऽसद्य अस्मिन् बर्हिषि मादयध्वं ॥ १३ ॥

देवांनो, जे तुम्ही अंतरिक्षांत, किंवा द्युलोकांत आहांत ते तुम्ही ही आमची हांक ऐका; अग्नि हाच तुमची जिव्हा आहे तर तुम्ही यज्ञार्ह विभूति ह्या आमच्या कुशासनावर आरोहण करून सोमपानाने उल्लसित व्हा. ॥ १३ ॥


विश्वे॑ दे॒वा मम॑ शृण्वन्तु य॒ज्ञिया॑ उ॒भे रोद॑सी अ॒पां नपा॑च्च॒ मन्म॑ ॥
मा वो॒ वचां॑सि परि॒चक्ष्या॑णि वोचं सु॒म्नेष्विद्वो॒ अन्त॑मा मदेम ॥ १४ ॥

विश्वे देवाः मम शृण्वंतु यज्ञियाः उभेइति रोदसीइति अपां नपात् च मन्म ।
मा वः वचांसि परिऽचक्ष्याणि वोचं सुम्नेषु इत् वः अंतमा मदेम ॥ १४ ॥

परमपूज्य विश्वेदेव, आकाश आणि पृथ्वी हे उभय लोक, आणि जलसंभूत अग्नि हे आमचे मननीय स्तोत्र ऐकून घेवोत. तुम्हाला जे आवडत नाहींत असे शब्द माझ्या तोंडून कधींही न निघोत. आणि तुमच्या अगदी अंतरंगात आम्हास जागा मिळून त्या मंगल प्रमोदांत आम्ही उल्लसित राहूं असे घडो. ॥ १४ ॥


ये के च॒ ज्मा म॒हिनो॒ अहि॑माया दि॒वो ज॑ज्ञि॒रे अ॒पां स॒धस्थे॑ ॥
ते अ॒स्मभ्य॑मि॒षये॒ विश्व॒मायुः॒ क्षप॑ उ॒स्रा व॑रिवस्यन्तु दे॒वाः ॥ १५ ॥

ये के च ज्मा महिनः अहिऽमायाः दिवः जज्ञिरे अपां सधऽस्थे ।
ते अस्मभ्यं इषये विश्वं आयुः क्षपः उस्राः वरिवस्यंतु देवाः ॥ १५ ॥

अतिश्रेष्ठ आणि "अहि" भुजंगाप्रमाणे मायाकुशल असे हे जे विबुधगण पृथ्वीवर किंवा आकाशांत दिव्योदकांच्या निवासस्थानी प्रकट झाले आहेत, ते देव आम्हांस सात्विक उत्साहाची जोड मिळावी म्हणून संपूर्ण आयुष्य, रात्र आणि उषःकाल ह्या सुद्धां आम्हांस यथास्थित देवोत. ॥ १५ ॥


अग्नी॑पर्जन्या॒वव॑तं॒ धियं॑ मेऽ॒स्मिन्हवे॑ सुहवा सुष्टु॒तिं नः॑ ॥
इळा॑म॒न्यो ज॒नय॒द्गर्भ॑म॒न्यः प्र॒जाव॑ती॒रिष॒ आ ध॑त्तम॒स्मे ॥ १६ ॥

अग्नीपर्जन्यौ अवतं धियं मे अस्मिन् हवै सुऽहवा सुऽस्तुतिं नः ।
इळां अन्यः जनयत् गर्भं अन्यः प्रजाऽवतीः इषः आ धत्तं अस्मेइति ॥ १६ ॥

अग्निपर्जन्य हो माझी ध्यानबुद्धि कायम ठेवा, तुम्ही भक्तसुलभ देवहो, माझ्या मनःपूर्वक केलेल्या स्तुतिवर कृपा ठेवा. तुम्हांपैकीं एकजण स्तुति आणि अन्न उत्पन्न करतो, दुसरा, त्या स्तुतिंत तत्व आणि जीवांत बीजांकुर उत्पन्न करतो, तर संततिमुळे येणारा जो महोत्साह तो आम्हांस मिळेल असे करा. ॥ १६ ॥


स्ती॒र्णेब॒र्हिषि॑ समिधा॒ने अ॒ग्नौ सू॒क्तेन॑ म॒हा नम॒सा वि॑वासे ॥
अ॒स्मिन्नो॑ अ॒द्य वि॒दथे॑ यजत्राः॒ विश्वे॑ देवा ह॒विषि॑ मादयध्वम् ॥ १७ ॥

स्तीर्णे बर्हिषि संऽइधाने अग्नौ सूऽक्तेन महा नमसा आ विवासे ।
अस्मिन् नः अद्य विदथे यजत्राः विश्वे देवाः हविषि मादयध्वं ॥ १७ ॥

अग्नि प्रज्वलित होतांच आणि कुशासन आंथरल्यावर सूक्तांनी आणि साष्टांग प्रणिपात करून मी देवाची उपासना करतो. हे पूज्य विभूतींनो आज ह्या यज्ञमंडपांत यज्ञ पूजेने आणि हविच्या स्वीकाराने प्रमुदित व्हा. ॥ १७ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ५३ ( पूषन् सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - पूषन् : छंद - गायत्री, अनुष्टुभ्


व॒यमु॑ त्वा पथस्पते॒ रथं॒ न वाज॑सातये ॥ धि॒ये पू॑षन्नयुज्महि ॥ १ ॥

वयं ऊंइति त्वा पथः पते रथं न वाजऽसातये । धिये पूषन्न् अयुज्महि ॥ १ ॥

सन्मार्गाच्या प्रभो पूषा, सात्विक सामर्थ्य आणि सुबुद्धि ह्यांची प्राप्ति व्हावी म्हणून युद्धांतील रथाप्रमाणे त्या कर्यांच्या सिद्धिकरितां तुझी आम्ही योजना केली आहे. ॥ १ ॥


अ॒भि नो॒ नर्यं॒ वसु॑ वी॒रं प्रय॑तदक्षिणम् ॥ वा॒मं गृ॒हप॑तिं नय ॥ २ ॥

अभि नः नर्यं वसु वीरं प्रयतऽदक्षिणं । वामं गृहऽपतिं नय ॥ २ ॥

तर लोकहितकारक संपत्ति, महानुभाव अति चतुर वीर, आणि स्पृहणीय गृहस्वामी यांचा लाभ होईल तिकडे आम्हांस ने. ॥ २ ॥


अदि॑त्सन्तं चिदाघृणे॒ पूष॒न्दाना॑य चोदय ॥ प॒णेश्चि॒द्वि म्र॑दा॒ मनः॑ ॥ ३ ॥

अदित्संतं चित् आघृणे पूषन् दानाय चोदय । पणेः चित् वि म्रदा मनः ॥ ३ ॥

ज्वलत् दीप्तिमान् पूषा, कसलाही कवडी चुंबक मनुष्य असो त्याची दानधर्माकडे तू प्रवृत्ति कर, आणि पाषाण हृदयी मनुष्याच्याही मनाला द्रव आण. ॥ ३ ॥


वि प॒थो वाज॑सातये चिनु॒हि वि मृधो॑ जहि ॥ साध॑न्तामुग्र नो॒ धियः॑ ॥ ४ ॥

वि पथः वाजऽसातये चिनुहि वि मृधः जहि । साधंतां उग्र नः धियः ॥ ४ ॥

हे यज्ञसिद्धिकारक, दुष्टसंहारक, उग्र पूषन्, सर्व संपत्तिचे मार्ग तू खुले कर. ॥ ४ ॥


परि॑ तृन्धि पणी॒नामार॑या॒ हृद॑या कवे ॥ अथे॑म॒स्मभ्यं॑ रन्धय ॥ ५ ॥

परि तृंधि पणीनां आरया हृदया कवे । अथ ईं अस्मभ्यं रंधय ॥ ५ ॥

महाज्ञानी पूषा, तू आपल्या सुरीच्या टोंकाने कठिनांची मने टोंचून टोंचून पोंखरून टाक आणि अशा योगाने त्याला आमच्या आधीन कर. ॥ ५ ॥


वि पू॑ष॒न्नार॑या तुद प॒णेरि॑च्छ हृ॒दि प्रि॒यम् ॥ अथे॑म॒स्मभ्यं॑ रन्धय ॥ ६ ॥

वि पूषन् आरया तुद पणेः इच्छ हृदि प्रियं । अथ ईं अस्मभ्यं रन्धय ॥ ६ ॥

पूषा तू आपल्या सुरीने त्याला टोंच. खमंग लोकांच्या मनांत आमचे बरें करण्याची इच्छा उत्पन्न कर आणि अशा रीतीने त्याला आमच्य मुठींत आण. ॥ ६ ॥


आ रि॑ख किकि॒रा कृ॑णु पणी॒नां हृद॑या कवे ॥ अथे॑म॒स्मभ्यं॑ रन्धय ॥ ७ ॥

आ रिख किकिरा कृणु पणीनां हृदया कवे । अथ ईं अस्मभ्यं रंधय ॥ ७ ॥

मेधावी पूषा, कंजुष माणसाची कठिण हृदयें चोंचावून टाक, त्यांच्या चिरफळ्या कर आणि अशा तऱ्हेने त्यांना आमच्या आधीन ठेव. ॥ ७ ॥


याम् पू॑षन्ब्रह्म॒चोद॑नी॒मारां॒ बिभ॑र्ष्याघृणे ॥ तया॑ समस्य॒ हृद॑य॒मा रि॑ख किकि॒रा कृ॑णु ॥ ८ ॥

यां पूषन् ब्रह्मऽचोदनीं आरां बिभर्षि आघृणे । तया समस्य हृदयं आ रिख किकिरा कृणु ॥ ८ ॥

ज्वलत् दीप्तिमान पूषा, जी सुरी तू आपल्या हातांत वागवितोस, जिला पाहिल्या बरोबर भक्ताला प्रार्थना सूक्ताची स्फुर्ति होते, तिने सर्व दुष्टांच्य हृदयांना चोंचावून टाकून त्याचे वाभाडे उडव. ॥ ८ ॥


या ते॒ अष्ट्रा॒ गू॑प॒शाघृ॑णे पशु॒साध॑नी ॥ तस्या॑स्ते सु॒म्नमी॑महे ॥ ९ ॥

या ते अष्ट्रा गोऽओपशा आघृणे पशुऽसाधनी । तस्याः ते सुम्नं ईमहे ॥ ९ ॥

चामड्याचे म्यान घातलेला जो तुझा अंकुश जो भक्तांना गोधने मिळवून देतो, त्यच्यापासूनही आम्ही तुझा मंगलसौख्याची याचना करतो. ॥ ९ ॥


उ॒त नो॑ गो॒षणिं॒ धिय॑मश्व॒सां वा॑ज॒सामु॒त ॥ नृ॒वत्कृ॑णुहि वी॒तये॑ ॥ १० ॥

उत नः गोऽसनिं धियं अश्वसां वाजऽसां उत । नृऽवत् कृणुहि वीतये ॥ १० ॥

आमची बुद्धि अशी तीक्ष्ण कर की वीरांप्रमाणे आमच्या उपयोगाकरितां ती आम्हांला ज्ञान गोधनप्रद अश्वप्रद आणि सात्विक समर्थ्यप्रद होईल. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ५४ ( पूषन् सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - पूषन् : छंद - गायत्री


सं पू॑षन्वि॒दुषा॑ नय॒ यो अञ्ज॑सानु॒शास॑ति ॥ य ए॒वेदमिति॒ ब्रव॑त् ॥ १ ॥

सं पूषन् विदुषा नय यः अंजसा अनुऽशासति । यः एव इदं इति ब्रवत् ॥ १ ॥

हे पूषा, जो प्रमाणिकपणाने आम्हांला उपदेश करतो. किंवा "पहा तुझे धन हे येथे आहे" असे म्हणेल अशा विद्वान पुरुषाकडे आम्हांस घेऊन चल. ॥ १ ॥


समु॑ पू॒ष्णा ग॑मेमहि॒ यो गृ॒हाँ अ॑भि॒शास॑ति ॥ इ॒म ए॒वेति॑ च॒ ब्रव॑त् ॥ २ ॥

सं ऊंइति पूष्णा गमेमहि यः गृहान् अभिऽशासति । इमे एव इति च ब्रवत् ॥ २ ॥

आमच्या घरांची वाट जो आम्हाला दाखवितो अशा ह्या पूषाच्याच संगतिचा लाभ आम्हास घडो. ’ही पहा तुमची घरे’ असे तोच आम्हांस म्हणेल. ॥ २ ॥


पू॒ष्णश्च॒क्रं न रि॑ष्यति॒ न कोशोऽव पद्यते ॥ नो अ॑स्य व्यथते प॒विः ॥ ३ ॥

पूष्णः चक्रं न रिष्यति न कोशः अव पद्यते । नोइति अस्य व्यथते पविः ॥ ३ ॥

पूषाचे रथचक्र व हांतातील चक्र कधी मोडत नाही. त्याचा तुंबा किंवा स्थान खाली पडत नाही आणि त्यच्या चाकाची धांव किंवा चक्राची धार कधी निखळत नाही अथवा बोथट होत नाही. ॥ ३ ॥


यो अ॑स्मै ह॒विषावि॑ध॒न्न तं पू॒षापि॑ मृष्यते ॥ प्र॒थ॒मो वि॑न्दते॒ वसु॑ ॥ ४ ॥

यः अस्मै हविषा अविधत् न तं पूषा अपि मृष्यते । प्रथमः विंदते वसु ॥ ४ ॥

हवि अर्पण करून जो त्याची उपासना करतो, त्याची पूषा कधीही हेळसांड करीत नाही, उत्कृष्ट धन त्यालाच मिळते. ॥ ४ ॥


पू॒षा गा अन्वे॑तु नः पू॒षा र॑क्ष॒त्वर्व॑तः ॥ पू॒षा वाजं॑ सनोतु नः ॥ ५ ॥

पूषा गाः अनु एतु नः पूषा रक्षतु अर्वतः । पूषा वाजं सनोतु नः ॥ ५ ॥

आमच्या गोधनांच्या पाठोपठ पूषा राहो, तो आमच्य घोडेस्वारांचे रक्षण करो आणि आम्हास सत्व सामर्थ्याची देणगी देवो. ॥ ५ ॥


पूष॒न्ननु॒ प्र गा इ॑हि॒ यज॑मानस्य सुन्व॒तः ॥ अ॒स्माकं॑ स्तुव॒तामु॒त ॥ ६ ॥

पूषन् अनु प्र गाः इहि यजमानस्य सुन्वतः । अस्माकं स्तुवतां उत ॥ ६ ॥

पूषा, तुला सोम अर्पण करणारा यजमान आणि तुझे स्तवन करणारे आम्ही अशा उभयतांच्या गोधनांच्या पाठोपाठ रहा. ॥ ६ ॥


माकि॑र्नेश॒न्माकीं॑ रिष॒न्माकीं॒ संशा॑रि॒ केव॑टे ॥ अथारि॑ष्टाभि॒रा ग॑हि ॥ ७ ॥

माकिः नेशत् माकीं रिषत् माकीं सं शारि केवटे । अथ अरिष्टाभिः आ गहि ॥ ७ ॥

त्याच्यापैकी एकही हरवूं नये, एकीलासुद्धां इजा होऊ नये आणि एकसुद्धां कोठें खोल खड्ड्यांत पडूं नये, तर सर्वांनाच येथे सुखरूप घेऊन ये. ॥ ७ ॥


शृ॒ण्वन्तं॑ पू॒षणं॑ व॒यमिर्य॒मन॑ष्टवेदसम् ॥ ईशा॑नं रा॒य ई॑महे ॥ ८ ॥

शृण्वंतं पूषणं वयं इर्यं अनष्टऽवेदसं । ईशानं रायः ईमहे ॥ ८ ॥

भक्तांची प्रार्थना ऐकणारा, वीरश्रीयुक्त जगदीश, ज्याचे ऐश्वर्य कधींही नष्ट होत नाही, अशा पूषाजवळ हात जोडून आम्ही स्तोतृजन आता तुझेच झालो आहों. ॥ ८ ॥


पूष॒न्तव॑ व्र॒ते व॒यं न रि॑ष्येम॒ कदा॑ च॒न ॥ स्तो॒तार॑स्त इ॒ह स्म॑सि ॥ ९ ॥

पूषन् तव व्रते वयं न रिष्येम कदा चन । स्तोतारः ते इह स्मसि ॥ ९ ॥

पूषा, तुझ्या आज्ञेप्रमणे वागत असतांना आम्हास केव्हांही हानि पोहोंचू नये, आम्ही स्तोतृजन आता तुझे झालो आहों. ॥ ९ ॥


परि॑ पू॒षा प॒रस्ता॒द्धस्तं॑ दधातु॒ दक्षि॑णम् ॥ पुन॑र्नो न॒ष्टमाज॑तु ॥ १० ॥

परि पूषा परस्तात् हस्तं दधातु दक्षिणं । पुनः नः नष्टं आ अजतु ॥ १० ॥

आपल्या अतिदूरच्या लोकांतून पूषा आपला हात आमच्याकडे लांब करो आणि आमचे हरवलेले ज्ञान गोधन आम्हांकडे परत आणो. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ५५ ( पूषन् सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - पूषन् : छंद - गायत्री


एहि॒ वां वि॑मुचो नपा॒दाघृ॑णे॒ सं स॑चावहै ॥ र॒थीर्ऋ्॒तस्य॑ नो भव ॥ १ ॥

आ इहि वां विऽमुचः नपात् आघृणे सं सचावहै । रथीः ऋतस्य नः भव ॥ १ ॥

जलवर्षाव करून दुःख मुक्त करणार्‍या शक्तिपासून प्रकट होणार्‍या पूषा, आमच्या सन्निध ये. हे ज्वलत्तेजस्का, आपण एकत्र मिळून जाऊ. सत्यधर्माचा तू योद्धा आमचा सहाय्यकर्ता हो. ॥ १ ॥


र॒थीत॑मं कप॒र्दिन॒मीशा॑नं॒ राध॑सो म॒हः ॥ रा॒यः सखा॑यमीमहे ॥ २ ॥

रथीऽतमं कपर्दिनं ईशानं राधसः महः । रायः सखायं ईमहे ॥ २ ॥

अतिरथी योद्धा, मस्तकावर केशपाश धारण करणारा, उत्तमोत्तम वरप्रसाद सर्वस्वी ज्याच्या हातांत, असा जो भक्तसखा पूषा त्याच्या जवळ पदर पसरून आम्ही दिव्य ऐश्वर्य मागतो. ॥ २ ॥


रा॒यो धारा॑स्याघृणे॒ वसो॑ रा॒शिर॑जाश्व ॥ धीव॑तोधीवतः॒ सखा॑ ॥ ३ ॥

रायः धारा असि आघृणे वसोः राशिः अजऽअश्व । धीवतःऽधीवतः सखा ॥ ३ ॥

ज्वलत् दीप्ते पूषा, तू दिव्य संपत्तिचा ओघ किंवा ज्याचे मोलच होणे नाही असा इच्छित धनाचा राशीच आहेस. प्रत्येक बुद्धिमान भक्ताचा प्रिय मित्रहि तूच आहेस. ॥ ३ ॥


पू॒षणं॒ न्व१जाश्व॒मुप॑ स्तोषाम वा॒जिन॑म् ॥ स्वसु॒र्यो जा॒र उ॒च्यते॑ ॥ ४ ॥

पूषणं नु अजऽअश्वं उप स्तोषाम वाजिनं । स्वसुः यः जारः उच्यते ॥ ४ ॥

भगिनी उषा हिचा ज्याला प्रियकर म्हणतात, तो आपल्या रथाला अज जोडणारा महायोद्धा पूषा, त्याचे गुण संकीर्तन आम्ही खचित करू. ॥ ४ ॥


मा॒तुर्दि॑धि॒षुम॑ब्रवं॒ स्वसु॑र्जा॒रः शृ॑णोतु नः ॥ भ्रातेन्द्र॑स्य॒ सखा॒ मम॑ ॥ ५ ॥

मातुः दिधिषुं अब्रवं स्वसुः जारः शृणोतु नः । भ्राता इंद्रस्य सखा मम ॥ ५ ॥

रजनी मातेच्या वल्लभाशी मी भाषण केले, तर भगिनी उषा हिचा प्रियकर, इंद्राचा बन्धु आणि मजवर कृपालोभ करणारा असा पूषा माझे म्हणणे ऐकून घेवो. ॥ ५ ॥


आजासः॑ पू॒षणं॒ रथे॑ निशृ॒म्भास्ते ज॑न॒श्रिय॑म् ॥ दे॒वं व॑हन्तु॒ बिभ्र॑तः ॥ ६ ॥

आ अजासः पूषणं रथे निऽशृम्भाः ते जनऽश्रियं । देवं वहंतु बिभ्रतः ॥ ६ ॥

रथाला पक्के जोडलेले ते तुझे ’अज’ ते तुला पूषा देवाला, रथांत बसवून भक्त जनाला वैभवशाली करणार्‍या तुज देवाला इकडे घेऊन येवोत. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ५६ ( पूषन् सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - पूषन् : छंद - गायत्री, अनुष्टुभ्


य ए॑नमा॒दिदे॑शति कर॒म्भादिति॑ पू॒षण॑म् ॥ न तेन॑ दे॒व आ॒दिशे॑ ॥ १ ॥

य एनं आऽदिदेशति करंभऽअत् इति पूषणं । न तेन देवः आऽदिशे ॥ १ ॥

करंभ प्रिय अशा नांवाने जो कोणी ह्याचे स्मरण करतो त्या भक्ताने ह्या देवाचे अन्य नांवाने स्मरण करण्याचे कारण नाही. ॥ १ ॥


उ॒त घा॒ स र॒थीत॑मः॒ सख्या॒ सत्प॑तिर्यु॒जा ॥ इन्द्रो॑ वृ॒त्राणि॑ जिघ्नते ॥ २ ॥

उत घ सः रथिऽतमः सख्या सत्ऽपतिः युजा । इंद्रः वृत्राणि जिघ्नते ॥ २ ॥

इतकेंच नव्हे तर तो योद्ध्यांतील अग्रगण्य, सज्जननामक इंद्र देखील ह्या प्रिय मित्र पूषाशी मिळून तमोरूप शत्रूंचा नाश करतो. ॥ २ ॥


उ॒तादः प॑रु॒षे गवि॒ सूर॑श्च॒क्रं हि॑र॒ण्यय॑म् ॥ न्या॒इ॒र॒य॒द्र॒थीत॑मः ॥ ३ ॥

उत अदः परुषे गवि सूरः चक्रं हिरण्ययं । नि ऐइरयत् रथिऽतमः ॥ ३ ॥

त्याचप्रमाणे सर्वांचा अग्रेसर व वीर शिरोमणि अशा देवाने खडबडीत दिसणार्‍या नानावर्ण मेघपटलांतून ते सूर्याचे एकच चाक झपाट्याने चालवीत नेले. ॥ ३ ॥


यद॒द्य त्वा॑ पुरुष्टुत॒ ब्रवा॑म दस्र मन्तुमः ॥ तत्सु नो॒ मन्म॑ साधय ॥ ४ ॥

यत् अद्य त्वा पुरुऽस्तुत ब्रवाम दस्र मंतुऽमः । तत् सु नः मन्म साधय ॥ ४ ॥

म्हणून हे अत्यंत स्तवनीय देवा, हे अद्‍भुतमूर्ते, हे मननीयगुणा, आम्ही तुला विनवीत आहों, तर आमच्या मनीषा उत्तम रीतीने तडीस ने. ॥ ४ ॥


इ॒मं च॑ नो ग॒वेष॑णं सा॒तये॑ सीषधो ग॒णम् ॥ आ॒रात्पू॑षन्नसि श्रु॒तः ॥ ५ ॥

इमं च नः गोऽएषणं सातये सीसधः गणं । आरात् पूषन् असि श्रुतः ॥ ५ ॥

आणि आमची कार्यसिद्धि व्हावी म्हणून प्रकाश गोधनप्राप्त्यर्थ प्रयत्न करणार्‍या ह्या आमच्या लोकांना तू पुढे होऊन घेऊन जा. हे पूषा तुझी कीर्ति फारच दूरवर पसरली आहे. ॥ ५ ॥


आ ते॑ स्व॒स्तिमी॑मह आ॒रेअ॑घा॒मुपा॑वसुम् ॥ अ॒द्या च॑ स॒र्वता॑तये॒ श्वश्च॑ स॒र्वता॑तये ॥ ६ ॥

आ ते स्वस्तिं ईमहे आरेऽअघां उपऽवसुं । अद्य च सर्वऽतातये श्वः च सर्वऽतातये ॥ ६ ॥

पातकांचे उच्चाटन करणारी, इष्टसंपत्ति जवळ आणणरी अशी जी तुझी कृपाभिवृद्धि ती, आज आणि उद्या आमचे सर्व प्रकाराने कल्याण व्हावे म्हणून, तुजपाशी हात जोडून मागत आहों. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ५७ ( इंद्रा-पूषन् सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्रा-पूषन् : छंद - गायत्री


इन्द्रा॒ नु पू॒षणा॑ व॒यं स॒ख्याय॑ स्व॒स्तये॑ ॥ हु॒वेम॒ वाज॑सातये ॥ १ ॥

इंद्रा नु पूषणा वयं सख्याय स्वस्तये । हुवेम वाजऽसातये ॥ १ ॥

इंद्र आणि पूषाहो, तुमचा कृपालोभ प्राप्त व्हावा, आमचे मंगल व्हावे आणि आम्हाला सत्व सामर्थ्याचा लाभ व्हावा म्हणून, तुम्हाला आम्ही हांक मारीत आहों. ॥ १ ॥


सोम॑म॒न्य उपा॑सद॒त्पात॑वे च॒म्वोः सु॒तम् ॥ क॒र॒म्भम॒न्य इ॑च्छति ॥ २ ॥

सोमं अन्यः उप असदत् पातवे चम्वोः सुतं । करंभं अन्यः इच्छति ॥ २ ॥

इंद्र हा सुरईंतून गाळलेला सोमरस प्राशन करण्याकरितां आसनावर बसला; आणि पूषाने ’करंभ’ ग्रहण करण्याची इच्छा प्रदर्शित केली. ॥ २ ॥


अ॒जा अ॒न्यस्य॒ वह्न॑यो॒ हरी॑ अ॒न्यस्य॒ सम्भृ॑ता ॥ ताभ्यां॑ वृ॒त्राणि॑ जिघ्नते ॥ ३ ॥

अजाः अन्यस्य वह्नयः हरीइति अन्यस्य संऽभृता । ताभ्यां वृत्राणि जिघ्नते ॥ ३ ॥

बकरे हेच पूषाचे वाहन; तर हरिद्वर्ण अश्व हे इंद्राचे. आपआपल्या वाहनांवर आरोहण करून ते तमोनाश करतात. ॥ ३ ॥


यदिन्द्रो॒ अन॑य॒द्रितो॑ म॒हीर॒पो वृष॑न्तमः ॥ तत्र॑ पू॒षाभ॑व॒त्सचा॑ ॥ ४ ॥

यत् इंद्रः अनयत् रितः महीः अपः वृषन्ऽतमः । तत्र पूषा अभवत् सचा ॥ ४ ॥

मनमुराद अभीष्ट वर्षाव करणार्‍या इंद्राने स्तवनाने प्रोत्साहित होऊन जेव्हां त्या थोर दिव्योदकांना सोडवून नेले, तेव्हां पूषाही त्याच्या बरोबर होता. ॥ ४ ॥


तां पू॒ष्णः सु॑म॒तिं व॒यं वृ॒क्षस्य॒ प्र व॒यामि॑व ॥ इन्द्र॑स्य॒ चा र॑भामहे ॥ ५ ॥

तां पूष्णः सुऽमतिं वयं वृक्षस्य प्र वयांऽइव इव । इंद्रस्य च आ रभामहे ॥ ५ ॥

वृक्षाच्या मोठ्या फांदीला घट्ट धरून बसावे त्याप्रमाणे पूषा व इंद्र यांच्या कृपेचा आम्ही आश्रय करतो. ॥ ५ ॥


उत्पू॒षणं॑ युवामहेऽ॒भीशूँ॑रिव॒ सार॑थिः ॥ म॒ह्या इन्द्रं॑ स्व॒स्तये॑ ॥ ६ ॥

उत् पूषणं युवामहे अभीशून्ऽइव सारथिः । मह्यै इंद्रं स्वस्तये ॥ ६ ॥

लगाम ओढून धरून सारथी घोड्यांना आंवरून ठेवतो तसेच खरे कल्याण व्हावे म्हणून भक्तीच्या बळावर आम्ही इंद्र आणि पूषा ह्यांना जवळ ओढून घेतो. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ५८ ( पूषन् सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - पूषन् : छंद - जगती, त्रिष्टुभ्


शु॒क्रं ते॑ अ॒न्यद्य॑ज॒तं ते॑ अ॒न्यद्विषु॑रूपे॒ अह॑नी॒ द्यौरि॑वासि ।
विश्वा॒ हि मा॒या अव॑सि स्वधावो भ॒द्रा ते॑ पूषन्नि॒ह रा॒तिर॑स्तु ॥ १ ॥

शुक्रं ते अन्यत् यजतं ते अन्यत् विषुरूपेइतिविषुऽरूपे अहनीइति द्यौःऽइव असि ।
विश्वाः हि मायाः अवसि स्वधाऽवः भद्रा ते पूषन् इह रातिः अस्तु ॥ १ ॥

तुझे एक स्वरूप शुभ्र आणि तेजस्वी आहे, तुझे दुसरे स्वरूपही वंद्यच आहे. ह्याप्रमाणे निरनिराळी रूपे घेणारा दिवस किंवा आकाश ह्याप्रमाणे तू आहेस. हे स्वतंत्रा, सर्व प्रकारच्या माया तू आपल्या जवळ जतन करून ठेवितोस, तर हे पूषा तुझा मंगलकारक प्रसाद येथेंही आम्हांवर होवो. ॥ १ ॥


अ॒जाश्वः॑ पशु॒पा वाज॑पस्त्यो धियंजि॒न्वो भुव॑ने॒ विश्वे॒ अर्पि॑तः ।
अष्ट्रां॑ पू॒षा शि॑थि॒रामु॒द्वरी॑वृजत्सं॒चक्षा॑णो॒ भुव॑ना दे॒व ई॑यते ॥ २ ॥

अजऽअश्वः पशुऽपाः वाजऽपस्त्यः धियंऽजिन्वः भुवने विश्वे अर्पितः ।
अष्ट्रां पूषा शिथिरां उत्ऽवरीवृजत् संऽचक्षाणः भुवना देवः ईयते ॥ २ ॥

अज हे त्याचे घोडे, तो पशूंचा (अज्ञ जनांचा) सांभाळ करणारा आहे. बुद्धिला स्फुर्तिही तोच देतो. असा हा पूषा सर्व भुवनांमध्ये भरून राहिला आहे, आणि आपला चंचल अंकुश परजीत तो देव सर्व भुवने निरखून पहात जात असतो. ॥ २ ॥


यास्ते॑ पूष॒न्नावो॑ अ॒न्तः स॑मु॒द्रे हि॑र॒ण्ययी॑र॒न्तरि॑क्षे॒ चर॑न्ति ।
ताभि॑र्यासि दू॒त्यां सूर्य॑स्य॒ कामे॑न कृत॒ श्रव॑ इ॒च्छमा॑नः ॥ ३ ॥

याः ते पूषन् नावः अन्तरिति समुद्रे हिरण्ययीः अंतरिक्षे चरंति ।
ताभिः यासि दूत्यां सूर्यस्य कामेन कृत श्रवः इच्छमानः ॥ ३ ॥

पूषा, तुझ्या ज्या सुवर्णमय नावा अंतरिक्ष रूप समुद्रांत हिंडत असतात त्यांत बसून भक्त स्तुतीने मोहित होऊन आपले यश पसरविण्यासाठींच की काय, तू सूर्याचे दूतत्व पत्करण्यास गमन करतोस. ॥ ३ ॥


पू॒षा सु॒बन्धु॑र्दि॒व आ पृ॑थि॒व्या इ॒ळस्पति॑र्म॒घवा॑ द॒स्मव॑र्चाः ।
यं दे॒वासो॒ अद॑दुः सू॒र्यायै॒ कामे॑न कृ॒तं त॒वसं॒ स्वञ्च॑म् ॥ ४ ॥

पूषा सुऽबन्धुः दिवः आ पृथिव्याः इळः पतिः मघऽवा दस्मऽवर्चाः ।
यं देवासः अददुः सूर्यायै कामेन कृतं तवसं सुऽअंचं ॥ ४ ॥

पूषा हा आकाशापासून पृथिवीपर्यंत मध्ये असणार्‍या सर्व प्राण्यांचा प्रेमळ बांधवच आहे. तो भगवान् समृद्धिचा प्रभू, आणि त्याचे तेज तर आश्चर्य कारक आहे. तेव्हां अशा ह्या प्रेमबद्ध, परंतु विक्रमशाली आणि शीघ्रगामी पूषाला देवांनी "सूर्या" हिला (पति म्हणून) दिले. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ५९ ( इंद्राग्नी सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्राग्नी : छंद - बृहती, अनुष्टुभ्


प्र नु वो॑चा सु॒तेषु॑ वां वी॒र्या३यानि॑ च॒क्रथुः॑ ।
ह॒तासो॑ वां पि॒तरो॑ दे॒वश॑त्रव॒ इन्द्रा॑ग्नी॒ जीव॑थो यु॒वम् ॥ १ ॥

प्र नु वोच सुतेषु वां वीर्या यानि चक्रथुः ।
हतासः वां पितरः देवऽशत्रवः इंद्राग्नीइति जीवथः युवं ॥ १ ॥

तुम्ही पूर्वी जे पराक्रम केलेत त्यांचेच वर्णन मी करणार आहे. हे जगत् पित्यांनो, तुमचे अर्थात देवांचे शत्रू तुमच्या हातून ठार झाले आणि इंद्राग्नीहो, तुम्ही जसेच्या तसे जिवंतच राहिलांत. ॥ १ ॥


बळि॒त्था म॑हि॒मा वा॒मिन्द्रा॑ग्नी॒ पनि॑ष्ठ॒ आ ।
स॒मा॒नो वां॑ जनि॒ता भ्रात॑रा यु॒वं य॒मावि॒हेह॑मातरा ॥ २ ॥

बट् इत्था महिमा वां इंद्राग्नीइति पनिष्ठः आ ।
समानः वां जनिता भ्रातरा युवं यमौ इहेहऽमातरा ॥ २ ॥

खरोखर इंद्राग्नीहो तुमचा महिमा वर्णावा तेवढा थोडाच. तुम्हां उभयतांचा जनक एक म्हणून तुम्ही बंधूच आहांत, आणि येथे तेथे सर्व ठिकाणी व्यापून राहणारी अदिति तुमची आई; म्हणून तुम्ही जुळे भाऊ आहांत. ॥ २ ॥


ओ॒कि॒वांसा॑ सु॒ते सचाँ॒ अश्वा॒ सप्ती॑ इ॒वाद॑ने ।
इन्द्रा॒न्व१ग्नी अव॑से॒ह व॒ज्रिणा॑ व॒यं दे॒वा ह॑वामहे ॥ ३ ॥

ओकिऽवांसा सुते सचा अश्वा सप्तीइवतिसप्तीऽइव आदने ।
इंद्रा नु अग्नीइति अवस् अ इह वज्रिणा वयं देवा हवामहे ॥ ३ ॥

अतिशय चलाख अश्वांना खाणे पाहिले म्हणजे आनंद होतो त्याप्रमाणे सोम गाळलेला पाहतांच उभयता यजमानांना अत्यानंद होतो. म्हणून वज्रधर इंद्राग्नीहो, तुम्ही आपल्या प्रसादांसहित येथे या अशी आम्ही तुमची प्रार्थना करीत आहों. ॥ ३ ॥


य इ॑न्द्राग्नी सु॒तेषु॑ वां॒ स्तव॒त्तेष्वृ॑तावृधा ।
जो॒ष॒वा॒कं वद॑तः पज्रहोषिणा॒ न दे॑वा भ॒सथ॑श्च॒न ॥ ४ ॥

यः इन्द्राग्नीइति सुतेषु वां स्तवत् तेषु ऋतऽवृधा ।
जोषऽवाकं वदतः पज्रऽहोषिणा न देवा भसथः चन ॥ ४ ॥

इंद्राग्नीहो, सोमरस पिळून भक्तीने अर्पण करून जो तुमचे स्तवन करतो, त्या भक्ताशी हे सत्य धर्माचा उत्कर्ष करणार्‍या देवांनो, तुम्ही तृप्त होऊन भाषण करतां. "पज्र" कुलांतील भक्तांनी अर्पण केलेले हविर्भाग स्वीकारणार्‍या देवांनो, अशा भक्ताची राखरांगोळी तुम्ही कधींही करीत नाही. ॥ ४ ॥


इन्द्रा॑ग्नी॒ को अ॒स्य वां॒ देवौ॒ मर्त॑श्चिकेतति ।
विषू॑चो॒ अश्वा॑न्युयुजा॒न ई॑यत॒ एकः॑ समा॒न आ रथे॑ ॥ ५ ॥

इंद्राग्नीइति कः अस्य वां देवौ मर्तः चिकेतति ।
विषूचः अश्वान् युयुजानः ईयत एकः समान आ रथे ॥ ५ ॥

इंद्राग्नीहो, अशा ह्या तुमच्या महिम्याचे कोणता मनुष्यप्राणी सूक्ष्मपणे निरीक्षण करूं शकेल बरें ? सर्वव्यापी किरणरूप अश्व रथास जोडून तुम्हापैकी एक (इंद्रा हा) त्याच रथांत बसून जात असतो. ॥ ५ ॥


इन्द्रा॑ग्नी अ॒पादि॒यं पूर्वागा॑त्प॒द्वती॑भ्यः ।
हि॒त्वी शिरो॑ जि॒ह्वया॒ वाव॑द॒च्चर॑त्त्रिं॒शत्प॒दा न्यक्रमीत् ॥ ६ ॥

इंद्राग्नीइति अपात् इयं पूर्वा आ अगात् पत्ऽवतीभ्यः ।
हित्वी शिरः जिह्वया वावदत् चरत् त्रिंशत् पदा नि अक्रमीत् ॥ ६ ॥

इंद्राग्नीहो, हिला पाय नसूनही, पाय असणार्‍यांच्या अगोदर ही उषेची प्रभा येऊन पोहोंचली. आपले मस्तक पलिकडे सारून पुनः ती आपल्या जिव्हेनेंच बोलूं लागली आणि पुढे सरकून तीस पावले चालली (हा चमत्कारच म्हणावयाचा). ॥ ६ ॥


इन्द्रा॑ग्नी॒ आ हि त॑न्व॒ते नरो॒ धन्वा॑नि बा॒ह्वोः ।
मा नो॑ अ॒स्मिन्म॑हाध॒ने परा॑ वर्क्तं॒ गवि॑ष्टिषु ॥ ७ ॥

इंद्राग्नीइति आ हि तन्वते नरः धन्वानि बाह्वोः ।
मा नः अस्मिन् महाऽधने परा वर्क्तं गोऽइष्टिषु ॥ ७ ॥

इंद्राग्नीहो, आमच्या वीरांनी भुजदंडावरील आपली धनुष्ये आकर्ण ओढून धरली आहेत, तर ह्या महायुद्धांत, प्रकाश प्राप्त्यर्थ चाललेल्या ह्या झटापटींत तुम्ही आम्हाला सोडून देऊ नका. ॥ ७ ॥


इन्द्रा॑ग्नी॒ तप॑न्ति मा॒घा अ॒र्यो अरा॑तयः ।
अप॒ द्वेषां॒स्या कृ॑तं युयु॒तं सूर्या॒दधि॑ ॥ ८ ॥

इंद्राग्नीइति तपंति मा अघा अर्यः अरातयः ।
अप द्वेषांसि आ कृतं युयुतं सूर्यात् अधि ॥ ८ ॥

इंद्राग्नीहो, आम्हां आर्य लोकांचे घातकी शत्रु मला फार पीडा करीत आहेत. तर त्या सज्जन द्वेष्ट्यांना पार हांकून द्या. सूर्यप्रकाशापासून त्यांना वेगळे करा. ॥ ८ ॥


इन्द्रा॑ग्नी यु॒वोरपि॒ वसु॑ दि॒व्यानि॒ पार्थि॑वा ।
आ न॑ इ॒ह प्र य॑च्छतं र॒यिं वि॒श्वायु॑पोषसम् ॥ ९ ॥

इंद्राग्नीइति युवोः अपि वसु दिव्यानि पार्थिवा ।
आ नः इह प्र यच्छतं रयिं विश्वायुऽपोषसं ॥ ९ ॥

इंद्राग्नीहो, स्वर्गांतील किंवा पृथ्वीतील अमोलिक संपत्ति सर्व तुमचीच आहे., तर आम्हाला असे वैभव द्या की त्याने सर्व प्राण्यांचे पोषण होईल. ॥ ९ ॥


इन्द्रा॑ग्नी उक्थवाहसा॒ स्तोमे॑भिर्हवनश्रुता ।
विश्वा॑भिर्गी॒र्भिरा ग॑तम॒स्य सोम॑स्य पी॒तये॑ ॥ १० ॥

इंद्राग्नी उक्थऽवाहसा स्तोमेभिः हवनऽश्रुता ।
विश्वाभिः गीःऽभिः आ गतं अस्य सोमस्य पीतये ॥ १० ॥

इंद्राग्नीहो, तुम्ही साम गायनांचा आदर करणारे आणि भक्तांची हांक ऐकून धांव घेणारे आहांत, तेव्हां आमच्या अखिल सामसूक्तांनी आणि प्रशंसा स्तुतींनी प्रसन्न होऊन ह्या सोमरसाचा आस्वाद घेण्याकरितां आगमन करा. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ६० ( इंद्राग्नी सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्राग्नी : छंद - बृहती, गायत्री, अनुष्टुभ्, त्रिष्टुभ्


श्नथ॑द्वृ॒त्रमु॒त स॑नोति॒ वाज॒मिन्द्रा॒ यो अ॒ग्नी सहु॑री सप॒र्यात् ।
इ॒र॒ज्यन्ता॑ वस॒व्यस्य॒ भूरेः॒ सह॑स्तमा॒ सह॑सा वाज॒यन्ता॑ ॥ १ ॥

श्नथत् वृत्रं उत सनोति वाजं इंद्रा यः अग्नीइति सहुरीइति सपर्यात् ।
इरज्यंता वसव्यस्य भूरेः सहःतमा सहसा वाजऽयंता ॥ १ ॥

शत्रूंचे दमन करणार्‍या इंद्राग्नींची जो उपासना भक्तिपूर्वक करील तो सुद्धां तमोरूप शत्रूंचा संहार करील आणि सात्विक सामर्थ्य मिळवील. इंद्राग्नी हे उभयतांही अपार आणि सर्वोत्कृष्ट धनाचे प्रभु आहेत. ते दुष्टांना अगदी जमीनदोस्त करून काय आहे ते दाखवितात. ॥ १ ॥


ता यो॑धिष्टम॒भि गा इ॑न्द्र नू॒नम॒पः स्वरु॒षसो॑ अग्न ऊ॒ळ्हाः ।
दिशः॒ स्वरु॒षस॑ इन्द्र चि॒त्रा अ॒पो गा अ॑ग्ने युवसे नि॒युत्वा॑न् ॥ २ ॥

ता योधिष्टं अभि गाः इंद्र नूनं अपः स्वः उषसः अग्ने ऊळ्हाः ।
दिशः स्वः उषसः इंद्र चित्राः अपः गाः अग्ने युवसे नियुत्वान् ॥ २ ॥

हे इंद्रा, हे अग्नि, तुम्ही आतांचे आतां ज्ञान धेनू, दिव्योदके, स्वर्गीय प्रकाश आणि उषा चोरून नेल्या आहेत त्या हे सर्व जिंकून हस्तगत करा. इंद्रा, हे अग्ने, तुम्हांजवळ ’नियुत्’ सारखे चलाख घोडे आहेत तेव्हां दिशा, स्वर्गीय प्रकाश, उषःकाल आणि अद्‍भुत दिव्योदकें व ज्ञान धेनू ह्याची भक्तांना जोड करून द्या. ॥ २ ॥


आ वृ॑त्रहणा वृत्र॒हभिः॒ शुष्मै॒रिन्द्र॑ या॒तं नमो॑भिरग्ने अ॒र्वाक् ।
यु॒वं राधो॑भि॒रक॑वेभिरि॒न्द्राग्ने॑ अ॒स्मे भ॑वतमुत्त॒मेभिः॑ ॥ ३ ॥

आ वृत्रऽहना वृत्रऽहभिः शुष्मैः इंद्र यातं नमःऽभिः अग्ने अर्वाक् ।
युवं राधःऽभिः अकवेभिः इन्द्र अग्ने अस्मेइति भवतं उत्ऽतमेभिः ॥ ३ ॥

इंद्राग्नीहो, तुम्ही तमोनाशक देव, आपल्या तमोनाशक त्वेषावेगानिशी आमच्या प्रणिपातांकडे लक्ष देऊन इकडे या. इंद्राग्नीहो, तुमचे अव्यंग आणि सर्वोत्कृष्ट कृपाप्रसाद आहेत त्या सकट तुम्ही आमचे व्हा. ॥ ३ ॥


ता हु॑वे॒ ययो॑रि॒दं प॒प्ने विश्वं॑ पु॒रा कृ॒तम् । इ॒न्द्रा॒ग्नी न म॑र्धतः ॥ ४ ॥

ता हुवे ययोः इदं पप्ने विश्वं पुरा कृतं ।
इन्द्राग्नीइति न मर्धतः ॥ ४ ॥

ज्यांनी उत्पन्न केलेल्या ह्या सर्व जगाची एकसारखी वाखाणणी चालली आहे त्या इंद्राग्नींना मी हांक मारतो. ते कोणाही सज्जनाला उपसर्ग देत नाहीत. ॥ ४ ॥


उ॒ग्रा वि॑घ॒निना॒ मृध॑ इन्द्रा॒ग्नी ह॑वामहे । ता नो॑ मृळात ई॒दृशे॑ ॥ ५ ॥

उग्रा विऽघनिना मृधः इंद्राग्नीइति हवामहे ।
ता नः मृळात ईदृशे ॥ ५ ॥

ज्यांनी घोर शत्रूंना दांडक्यांनी चेंचून टाकले त्या इंद्राग्नीला आम्ही प्रेमभावाने पाचारण करतो. मजसारख्या गरीबावर तेच दया करतात. ॥ ५ ॥


ह॒तो वृ॒त्राण्यार्या॑ ह॒तो दासा॑नि॒ सत्प॑ती । ह॒तो विश्वा॒ अप॒ द्विषः॑ ॥ ६ ॥

हतः वृत्राणि आर्या हतः दासानि सत्पतीइतिसत्ऽपती ।
हतः विश्वाः अप द्विषः ॥ ६ ॥

जे तुम्ही सज्जनांचे प्रभू, आर्यांचे अभिमानी, तुम्ही आमच्या तामसी शत्रूंचा संहार करा. अधार्मिक दासांचा धुव्वा उडवा. इतकेंच काय, पण सत्पुरुषांच्या यच्चावत् रिपुंना पार धुळीस मिळवून द्या. ॥ ६ ॥


इन्द्रा॑ग्नी यु॒वामि॒मे३ऽभि स्तोमा॑ अनूषत । पिब॑तं शम्भुवा सु॒तम् ॥ ७ ॥

इंद्राग्नीइति युवां इमे अभि स्तोमाः अनूषत ।
पिबतं शंभुवा सुतं ॥ ७ ॥

इंद्राग्नीहो,, हे सर्व लोकांनी तुमचे स्तवन केले आहे तर हे मंगलप्रद देवांनो, हा सोमरस प्राशन करा. ॥ ७ ॥


या वां॒ सन्ति॑ पुरु॒स्पृहो॑ नि॒युतो॑ दा॒शुषे॑ नरा । इन्द्रा॑ग्नी॒ ताभि॒रा ग॑तम् ॥ ८ ॥

या वां सन्ति पुरुस्पृहः नियुतः दाशुषे नरा ।
इंद्राग्नीइति ताभिः आ गतं ॥ ८ ॥

सर्व लोकांना प्रिय झालेल्या ज्या तुमच्या ’नियुत्’ नांवाच्या घोड्या त्या जोडून हे शूरांनो, इकडे आगमन करा. ॥ ८ ॥


ताभि॒रा ग॑च्छतं न॒रोपे॒दं सव॑नं सु॒तम् । इन्द्रा॑ग्नी॒ सोम॑पीतये ॥ ९ ॥

ताभिः आ गच्छतं नरा ओपेदं सवनं सुतं ।
इंद्राग्नीइति सोमऽपीतये ॥ ९ ॥

शूर इंद्राग्नीहो, त्यांच्यावर आरोहण करून ह्या सवनाचे प्रसंगी सोम प्राशनार्थ आमच्या सन्निध या. ॥ ९ ॥


तमी॑ळिष्व॒ यो अ॒र्चिषा॒ वना॒ विश्वा॑ परि॒ष्वज॑त् । कृ॒ष्णा कृ॒णोति॑ जि॒ह्वया॑ ॥ १० ॥

तं ईळिष्व यः अर्चिषा वना विश्वा परिस्वजत् ।
कृष्णा कृणोति जिह्वया ॥ १० ॥

जो ज्वालेने अरण्यांची अरण्ये वेढून टाकतो आणि ज्योतिरुप जिव्हेने सर्व कांही कृष्णवर्ण करून सोडतो त्या अग्निला स्तवनाने प्रसन्न करा. ॥ १० ॥


य इ॒द्ध आ॒विवा॑सति सु॒म्नमिन्द्र॑स्य॒ मर्त्यः॑ । द्यु॒म्नाय॑ सु॒तरा॑ अ॒पः ॥ ११ ॥

यः इद्धे आऽविवाऽसति सुम्नं इंद्रस्य मर्त्यः ।
द्युम्नाय सुऽतरा अपः ॥ ११ ॥

अग्नि प्रज्वलित होताच जो दीन भक्त आपल्याला दिव्य तेज प्राप्त व्हावे म्हणून इंद्राच्या सुखधामाचा अवलंब करतो, त्याला संसाररूप उदकें सहज तरून जाता येतात. ॥ ११ ॥


ता नो॒ वाज॑वती॒रिष॑ आ॒शून्पि॑पृत॒मर्व॑तः । इन्द्र॑म॒ग्निं च॒ वोळ्ह॑वे ॥ १२ ॥

ता नः वाजऽवतीः इषऽ आशून् पिपृतं अर्वतः ।
इंद्रं अग्निं च वोळ्हवे ॥ १२ ॥

सत्व सामर्थ्याने येणारे उत्तेजन, आणि इंद्राग्नीस घेऊन येण्याकरतां चलाख घोडे अशी सामग्री देऊन तुम्ही उभयतां आम्हांस पूर्णकाम करा. ॥ १२ ॥


उ॒भा वा॑मिन्द्राग्नी आहु॒वध्या॑ उ॒भा राध॑सः स॒ह मा॑द॒यध्यै॑ ।
उ॒भा दा॒तारा॑वि॒षां र॑यी॒णामु॒भा वाज॑स्य सा॒तये॑ हुवे वाम् ॥ १३ ॥

उभा वां इंद्राग्नीइति आहुवध्यै उभा राधसः सह मादयध्यै ।
उभा दातारौ इषां रयीणां उभा वाजस्य सातये हुवे वां ॥ १३ ॥

इंद्राग्नीहो, तुम्हाला पाचारण करण्यास आम्ही उत्सुक झालो आहों. ऐहिक आणि पारत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रसादांसह येऊन उल्लसित होण्याकरितां तुम्हीही आतुरच आहांत. मनोत्साह आणि दिव्य संपत्ति देणारे उदार दाते तुम्ही, तेव्हां सत्व लाभार्थ तुम्हां उभयतांनाच आम्ही हांक मारतो. ॥ १३ ॥


आ नो॒ गव्ये॑भि॒रश्व्यै॑र्वसव्याइ॒रुप॑ गच्छतम् ।
सखा॑यौ दे॒वौ स॒ख्याय॑ श॒म्भुवे॑न्द्रा॒ग्नी ता ह॑वामहे ॥ १४ ॥

आ नः गव्येभिः अश्व्यैः वसव्यैः उप गच्छतं ।
सखायौ देवौ सख्याय शंभुवा इंद्राग्नीइति ता हवामहे ॥ १४ ॥

ज्ञान गोधन अश्व, आणि उत्कृष्ट संपत्ति ही बरोबर घेऊन आमच्या सन्निध या. कृपालोभ करणारे आणि मंगलदायक जे तुम्ही इंद्राग्नी देव त्या तुमचा लोभ आम्हांवर जडावा म्हणून तुमचा धांवा आम्ही करीत आहों. ॥ १४ ॥


इन्द्रा॑ग्नी शृणु॒तं हवं॒ यज॑मानस्य सुन्व॒तः ।
वी॒तं ह॒व्यान्या ग॑तं॒ पिब॑तं सो॒म्यं मधु॑ ॥ १५ ॥

इंद्राग्नीइति शृणुतं हवं यजमानस्य सुन्वतः ।
वीतं हव्यानि आ गतं पिबतं सोम्यं मधु ॥ १५ ॥

इंद्राग्नीहो, सोमरस गाळून तयार करणार्‍या भक्ताची हांक तुम्ही ऐका. त्याचे हविर्भाग ग्रहण करा, आणि सोमरसाचे मधुर पेय प्राशन करा. ॥ १५ ॥


ॐ तत् सत्


GO TOP