PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ६ - सूक्त ४१ ते ५०

ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ४१ ( इंद्र सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - बृहती


अहे॑ळमान॒ उप॑ याहि य॒ज्ञं तुभ्यं॑ पवन्त॒ इन्द॑वः सु॒तासः॑ ।
गावो॒ न व॑ज्रि॒न्स्वमोको॒ अच्छेन्द्रा ग॑हि प्रथ॒मो य॒ज्ञिया॑नाम् ॥ १ ॥

अहेळमानः उप याहि यज्ञं तुभ्यं पवंते इंदवः सुतासः ।
गावः न वज्रिन् स्वं ओकः अच्छ इंद्र आ गहि प्रथमः यज्ञियानां ॥ १ ॥

क्रोध न करता, प्रसन्न अंतःकरणाने आमच्या यज्ञ समारंभास ये. हे पिळलेले सोमबिन्दु तुझ्या प्राप्ति करितांच वहात आहेत. तर गाई आपल्या घराकडे जातात त्याप्रमाणे हे वज्रधरा इंद्रा, पूज्यविभूतींमध्ये अग्रेसर असा तू येथे आगमन कर. ॥ १ ॥


या ते॑ का॒कुत्सुकृ॑ता॒ या वरि॑ष्ठा॒ यया॒ शश्व॒त्पिब॑सि॒ मध्व॑ ऊ॒र्मिम् ।
तया॑ पाहि॒ प्र ते॑ अध्व॒र्युर॑स्था॒त्सं ते॒ वज्रो॑ वर्ततामिन्द्र ग॒व्युः ॥ २ ॥

या ते काकुत् सुऽकृता या वरिष्ठा यया शश्वत् पिबसि मध्व ऊर्मिं ।
तया पाहि प्र ते अध्वर्युः अस्थात् सं ते वज्रः वर्ततां इंद्र गव्युः ॥ २ ॥

तुझी रसना जी सर्वोत्तम रसज्ञा आहे आणि जिच्या योगाने तू नेहमी मधुर रसाच्या धारा प्राशन करतोस, त्याच आपल्या जिव्हेने ह्याही रसाचा आस्वाद घे. आमचा अध्वर्यु तुझ्यापुढेच उभा आहे. तर हे इंद्रा, तुझे ते प्रकाशविजय वज्र जरा बाजूला राहू दे. ॥ २ ॥


ए॒ष द्र॒प्सो वृ॑ष॒भो वि॒श्वरू॑प॒ इन्द्रा॑य॒ वृष्णे॒ सम॑कारि॒ सोमः॑ ।
ए॒तं पि॑ब हरिवः स्थातरुग्र॒ यस्येशि॑षे प्र॒दिवि॒ यस्ते॒ अन्न॑म् ॥ ३ ॥

एषः द्रप्सः वृषभः विश्वरूप इंद्राय वृष्णे सं अकारि सोमः ।
एतं पिब हरिऽव स्थातः उग्र यस्य इशिषे प्रऽदिवि यः ते अन्नं ॥ ३ ॥

हा द्रवरूप परंतु वीर्यप्रद आणि सर्व प्रकारची रूपे धारण करणारा हा सोमरस, कामनावर्षक वीर इंद्र त्याच्याकरितां सिद्ध केला आहे. तर हे हरिदश्व नायका, भीषण स्वरूपा, हे जगदाधारा हा तू प्राशन कर. ह्याचा स्वामी तूच आहेस आणि पुरातन कालापासून हेच तुझे अन्न आहे. ॥ ३ ॥


सु॒तः सोमो॒ असु॑तादिन्द्र॒ वस्या॑न॒यं श्रेया॑ञ्चिकि॒तुषे॒ रणा॑य ।
ए॒तं ति॑तिर्व॒ उप॑ याहि य॒ज्ञं तेन॒ विश्वा॒स्तवि॑षी॒रा पृ॑णस्व ॥ ४ ॥

सुतः सोमः असुतात् इंद्र वस्यान् अयं श्रेयान् चिकितुषे रणाय ।
एतं तितिर्वः उप याहि यज्ञं तेन विश्वाः तविषीः आ पृणस्व ॥ ४ ॥

इंद्रा बिन पिळलेल्या सोमवल्लिपेक्षा पिळून तयार केलेला रसच उत्तम होय. चतुर शहाण्या माणसाला रणांगणांत तोच ज्यास्त श्रेयस्कर. तर भक्तोद्धारार्थ त्वरेने धांवणार्‍या वीरा, ह्या यज्ञ समारंभास ये आणि आपल्या सर्व धाडसी वृत्तिंना मनमुराद तृप्त कर. ॥ ४ ॥


ह्वया॑मसि॒ त्वेन्द्र॑ याह्य॒र्वाङ्अ॑रं॑ ते॒ सोम॑स्त॒न्वे भवाति ।
शत॑क्रतो मा॒दय॑स्वा सु॒तेषु॒ प्रास्माँ अ॑व॒ पृत॑नासु॒ प्र वि॒क्षु ॥ ५ ॥

ह्वयामसि त्वा आ इंद्र याहि अर्वाङ् अरं ते सोमः तन्वे भवाति ।
शतक्रतोइतिशतऽक्रतो मादयस्व सुतेषु प्र अस्मान् अव पृतनासु प्र विक्षु ॥ ५ ॥

इंद्रा, तुला आम्ही पाचारण करीत आहों, तर आमच्याकडे आगमन कर. तुझ्या अंतरात्म्याला आमचा सोमरस खचित गार करील. हे अपार पराक्रमा देवा, सोमरसाच्या आस्वादनांत तल्लीन हो. आणि संग्रामांत सर्व लोकांमध्ये आम्हांवरच अनुग्रह कर. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ४२ ( इंद्र सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - बृहती


प्रत्य॑स्मै॒ पिपी॑षते॒ विश्वा॑नि वि॒दुषे॑ भर ।
अ॒रं॒ग॒माय॒ जग्म॒येऽपश्चाद्दघ्वने॒ नरे॑ ॥ १ ॥

प्रति अस्मै पिपीषते विश्वानि विदुषे भर ।
अरंऽगमाय जग्मये अपश्चात्ऽदघ्वने नरे ॥ १ ॥

सोमप्राशनोत्सुक, सर्वज्ञ, सर्वत्र यथेच्छगतिक, आणि शीघ्रगामी देवाला सोमरस अर्पण करा. युद्धामध्ये सर्वांच्या पुढें ज्याचे पाऊल त्या इंद्राला सोम अर्पण करा. ॥ १ ॥


एमे॑नं प्र॒त्येत॑न॒ सोमे॑भिः सोम॒पात॑मम् ।
अम॑त्रेभिरृजी॒षिण॒मिन्द्रं॑ सु॒तेभि॒रिन्दु॑भिः ॥ २ ॥

आ ईं एनं प्रतिऽऽएतन सोमेभिः सोमऽपातमं ।
अमत्रेभिः ऋजीषिणं इंद्रं सुतेऽभिः इंदुऽभिः ॥ २ ॥

सोम प्राशनाविषयी लालस, प्रचंडवेग अशा इंद्रापुढे ह्या सोमबिन्दुसह, सोमरस पूर्ण पानपात्रांसह सत्वर चला. ॥ २ ॥


यदी॑ सु॒तेभि॒रिन्दु॑भिः॒ सोमे॑भिः प्रति॒भूष॑थ ।
वेदा॒ विश्व॑स्य॒ मेधि॑रो धृ॒षत्तंत॒मिदेष॑ते ॥ ३ ॥

यदी सुतेऽभिः इंदुऽभिः सोमेभिः प्रतिऽभूषथ ।
वेद विश्वस्य मेधिरः धृषत् तंऽतं इत् एषते ॥ ३ ॥

गाळून तयार केलेल्या सोमरसबिन्दुंनो, जेव्हां जेव्हां तुम्ही देवाला प्रसन्न करतां, तेव्हां तेव्हां, तो परमप्रज्ञ धैर्यशील भगवान् मनोगत जाणतो, म्हणून आपल्या भक्ता सन्निध त्वरेने जातो. ॥ ३ ॥


अ॒स्माअ॑स्मा॒ इदन्ध॒सोऽध्वर्यो॒ प्र भ॑रा सु॒तम् ।
कु॒वित्स॑मस्य॒ जेन्य॑स्य॒ शर्ध॑तोऽ॒भिश॑स्तेरव॒स्पर॑त् ॥ ४ ॥

अस्मैऽअस्मै इत् अंधसः अध्वर्योइति प्र भर सुतं ।
कुवित् समस्य जेन्यस्य शर्धतः अभिऽशस्तः अवऽस्परत् ॥ ४ ॥

ह्या इंद्रालाच हे अध्वर्यु, तू पिळून तयार केलेले सोमरस पेय समर्पण कर. ज्यामुळे शेफारलेल्या सर्व घातक शत्रूंच्या कपट जालापासून तो आमचा बचाव करो. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ४३ ( इंद्र सूक्त )

ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - बृहती


यस्य॒ त्यच्छम्ब॑रं॒ मदे॒ दिवो॑दासाय र॒न्धयः॑ ।
अ॒यं स सोम॑ इन्द्र ते सु॒तः पिब॑ ॥ १ ॥

यस्य त्यत् शंबरं मदे दिवःऽदासाय रंधयः ।
अयं सः सोमः इंद्र ते सुतः पिब ॥ १ ॥

ज्याच्या हर्षभरांत शंबर राक्षसाला तू दिवोदासाच्या स्वाधीन केलेस तो हा सोमरस तुझ्याकरितां गाळून तयार केला आहे. तर हे इंद्रा त्याचा आस्वाद घे. ॥ १ ॥


यस्य॑ तीव्र॒सुतं॒ मदं॒ मध्य॒मन्तं॑ च॒ रक्ष॑से ।
अ॒यं स सोम॑ इन्द्र ते सु॒तः पिब॑ ॥ २ ॥

यस्य तीव्रऽसुतं मदं मध्यं अंतं च रक्षसे ।
अयं सः सोम इंद्र ते सुतः पिब ॥ २ ॥

गाळून कडक बनविलेल्या ज्याच्या उल्लासप्रद रसाचे तसेच त्याच्या मधल्या आणि शेवटच्या भागाचे तू जतन करतोस तोच हा सोमरस तुझ्यासाठी तयार केला आहे, तर हे इंद्रा त्याचे प्राशन कर. ॥ २ ॥


यस्य॒ गा अ॒न्तरश्म॑नो॒ मदे॑ दृ॒ळ्हा अ॒वासृ॑जः ।
अ॒यं स सोम॑ इन्द्र ते सु॒तः पिब॑ ॥ ३ ॥

यस्य गाः अंतः अश्मनः मदे दृळ्हाः अवऽअसृजः ।
अयं सः सोम इंद्र ते सुतः पिब ॥ ३ ॥

ज्याच्या हर्षभरांत पाषाणमय गव्हरांच्या आंत बंदोबस्तांत ठेवलेल्या प्रकाश धेनूं तू मुक्त केल्यास, तो हा सोमरस तुझ्याकरितां गाळून तयार केला आहे, तर हे इंद्रा त्याचे प्राशन कर. ॥ ३ ॥


यस्य॑ मन्दा॒नो अन्ध॑सो॒ माघो॑नं दधि॒षे शवः॑ ।
अ॒यं स सोम॑ इन्द्र ते सु॒तः पिब॑ ॥ ४ ॥

यस्य मंदानः अंधसः माघोनं दधिषे शवः ।
अयं सः सोम इंद्र ते सुतः पिब ॥ ४ ॥

ज्या मधुरपेयाने उल्लसित होऊन तू आपल्या औदार्याचा प्रभाव प्रकट करतोस तो हा सोमरस तुझ्याकरितां गाळून तयार केला आहे, तर हे इंद्रा त्याचे प्राशन कर. ॥ ४ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ४४ ( इंद्र सूक्त )

ऋषी - शंयु बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्, अनुष्टुभ, विराज


यो र॑यिवो र॒यिन्त॑मो॒ यो द्यु॒म्नैर्द्यु॒म्नव॑त्तमः ।
सोमः॑ सु॒तः स इ॑न्द्र॒ तेऽस्ति स्वधापते॒ मदः॑ ॥ १ ॥

यः रयिऽवः रयिंऽतमः यः द्युम्नैः द्युम्नवत्ऽतमः ।
सोमः सुतः सः इंद्र ते अस्ति स्वधाऽपते मदः ॥ १ ॥

हे दिव्यैश्वर्यसंपन्ना, अत्यंत संपन्न ओजाने अत्यंत उज्ज्वल असा जो हा सोमरस गाळून तयार केला आहे तो, हे आद्यशक्तिनाथा इंद्रा, तुला उल्लासप्रद होवो. ॥ १ ॥


यः श॒ग्मस्तु॑विशग्म ते रा॒यो दा॒मा म॑ती॒नाम् ।
सोमः॑ सु॒तः स इ॑न्द्र॒ तेऽस्ति स्वधापते॒ मदः॑ ॥ २ ॥

यः शग्मः तुविऽशग्म ते रायः दामा मतीनां ।
सोमः सुतः सः इंद्र ते अस्ति स्वधाऽपते मदः ॥ २ ॥

परम मंगला, जो मंगलकारक रस तुझी दिव्य संपत्ति आणि तुझी वात्सल्यवृत्ति ह्या गोष्टी भक्तांस मिळवून देतो, तो हा सोम गाळून तयार केला आहे, तर हे आत्मशक्तिप्रेरका इंद्रा, तो तुला उल्लासप्रद होवो. ॥ २ ॥


येन॑ वृ॒द्धो न शव॑सा तु॒रो न स्वाभि॑रू॒तिभिः॑ ।
सोमः॑ सु॒तः स इ॑न्द्र॒ तेऽस्ति स्वधापते॒ मदः॑ ॥ ३ ॥

येन वृद्धः न शवसा तुरः न स्वाभिः ऊतिऽभिः ।
सोमः सुतः सः इंद्र ते अस्ति स्वधाऽपते मदः ॥ ३ ॥

ज्याच्या योगाने तू संतोषाने वृद्धिंगत झालास व तसाच आपल्या आयुधांनी तत्काळ विजयी झालास तो हा सोम पिळून तयार केला आहे, हे आत्मशक्तिनाथा, तो तुला उल्लास देवो. ॥ ३ ॥


त्यमु॑ वो॒ अप्र॑हणं गृणी॒षे शव॑स॒स्पति॑म् ।
इन्द्रं॑ विश्वा॒साहं॒ नर॒म् मंहि॑ष्ठं वि॒श्वच॑र्षणिम् ॥ ४ ॥

त्यं ऊंइति वः अप्रऽहनं गृणीषे शवसः पतिं ।
इंद्रं विश्वाऽसाहं नरं मंहिष्ठं विश्वचर्षणिं ॥ ४ ॥

तुमच्यासाठी, त्या इंद्राचे स्तवन करतो; जो कोणाला अपकार करीत नाही, जो उत्कटबलाचा सागर, विश्वाला पादाक्रांत करू शकेल असा आहे; जो पराकाष्ठेचा औदार्यशील वीर आणि सर्वसाक्षी आहे, त्या इंद्राचे मी स्तवन करतो. ॥ ४ ॥


यं व॒र्धय॒न्तीद्गिरः॒ पतिं॑ तु॒रस्य॒ राध॑सः ।
तमिन्न्वस्य॒ रोद॑सी दे॒वी शुष्मं॑ सपर्यतः ॥ ५ ॥

यं वर्धयन्ति इत् गिरः पतिं तुरस्य राधसः ।
तं इत् नु अस्य रोदसीइति देवीइति शुष्मं सपर्यतः ॥ ५ ॥

तत्काळ विजय मिळवून देणे हा प्रसाद जो भक्तांवर करतो, त्या इंद्राला ह्या आमच्या स्तुति संतुष्ट करोत. दिव्य रोदसी (आकाश व पृथ्वी) ह्या सुद्धां त्याच्या दरार्‍या पुढे हात जोडून उभ्या राहतात. ॥ ५ ॥


तद्व॑ उ॒क्थस्य॑ ब॒र्हणेन्द्रा॑योपस्तृणी॒षणि॑ ।
विपो॒ न यस्यो॒तयो॒ वि यद्रोह॑न्ति स॒क्षितः॑ ॥ ६ ॥

तत् व उक्थस्य बर्हणा इंद्राय उपस्तृणीषणि ।
विपः न यस्य ऊतयः वि यत् रोहंति सऽक्षितः ॥ ६ ॥

तर आतां इंद्राला तुमच्याकरितां सामसूक्तरूप आसन भक्तिच्या बळावर समर्पण करतो. त्याच्या ठिकाणी सर्व संरक्षक शक्ति वास करतात व काव्यस्फूर्ति प्रमाणे आविर्भूत होतात. ॥ ६ ॥


अवि॑द॒द्दक्षं॑ मि॒त्रो नवी॑यान्पपा॒नो दे॒वेभ्यो॒ वस्यो॑ अचैत् ।
स॒स॒वान्स्तौ॒लाभि॑र्धौ॒तरी॑भिरुरु॒ष्या पा॒युर॑भव॒त्सखि॑भ्यः ॥ ७ ॥

अविदत् दक्षं मित्रः नवीयान् पपानः देवेभ्यः वस्यः अचैत् ।
ससऽवान् स्तौलाभिः धौतरीभिः उरुष्या पायुः अभवत् सखिभ्यः ॥ ७ ॥

हाच आमचा नूतन मित्र, त्याला आज मोठा चतुर उपासक सांपडला; तेव्हां सोमरस प्राशन करून त्याने दिव्य विभूतिंकरितां अमोल संपत्तिचा ठेवा स्पष्ट दाखवून दिला आहे. मोठ्या धडधाकट व जगाला कंपित करणार्‍या अशा घोड्या जोडून तो बिनघोर आणि आपल्या मित्रांच्या हितार्थ त्यांना दुःखमुक्त करण्याच्या इच्छेने त्यांचा संरक्षक झाला. ॥ ७ ॥


ऋ॒तस्य॑ प॒थि वे॒धा अ॑पायि श्रि॒ये मनां॑सि दे॒वासो॑ अक्रन् ।
दधा॑नो॒ नाम॑ म॒हो वचो॑भि॒र्वपु॑र्दृ॒शये॑ वे॒न्यो व्यावः ॥ ८ ॥

ऋतस्य पथि वेधाः अपायि श्रिये मनांसि देवासः अक्रन् ।
दधानः नाम महः वचःऽभिः वपुः दृशये वेन्यः विवि आवरित्याव ॥ ८ ॥

धर्ममार्गांत असतांना भक्तांनी याजनशक्ति प्रवर्धक सोमरसाचे प्राशन केले. देवांनीही आपले लक्ष स्वर्गश्रीकडे लाविले, तेव्हां ज्याची कीर्ति थोर म्हणून गाजली त्या मनोहरस्वरूप देवाने स्तुतींनी संतुष्ट होऊन आपले रूप भक्त दर्शनार्थ प्रकट केले. ॥ ८ ॥


द्यु॒मत्त॑मं॒ दक्षं॑ धेह्य॒स्मे सेधा॒ जना॑नां पू॒र्वीररा॑तीः ।
वर्षी॑यो॒ वयः॑ कृणुहि॒ शची॑भि॒र्धन॑स्य सा॒ताव॒स्माँ अ॑विढ्ढि ॥ ९ ॥

द्युमत्ऽतमं दक्षं धेहि अस्मेइति सेध जनानां पूर्वीः अरातीः ।
वर्षीयः वयः कृणुहि शचीभिः धनस्य सातौ अस्मान् अविड्ढि ॥ ९ ॥

अतिशय औज्ज्वल्य असे जे चातुर्यबल ते आमच्यामध्ये ठेव; आणि निरपराध लोकांच्या सर्व शत्रूंचा बीमोड कर. आम्हांस अलोट उमेद दे, आणि दिव्य धन मिळविण्याच्या खटपटीत आपल्या शक्तींनी आमचे सहाय्य कर. ॥ ९ ॥


इन्द्र॒ तुभ्य॒मिन्म॑घवन्नभूम व॒यं दा॒त्रे ह॑रिवो॒ मा वि वे॑नः ।
नकि॑रा॒पिर्द॑दृशे मर्त्य॒त्रा किम॒ङ्गद र॑ध्र॒चोद॑नं त्वाहुः ॥ १० ॥

इंद्र तुभ्यं इत् मघऽवन् अभूम वयं दात्रे हरिऽवः मा वि वेनः ।
नकिः आपिः ददृशे मर्त्यऽत्रा किं अङ्‌ग रध्रऽचोदनं त्वा आहुः ॥ १० ॥

भगवंता इंद्रा, तुज दानशूराकडेच आम्ही आलो आहों, तर नाही म्हणू नको. ह्या मानवलोकांत तुझ्यासारखा आम्हांला दुसरा कोणी हितकर्ता दिसतच नाही. मग काय तुला फक्त श्रीमंतांचाच पुरस्कर्ता समजतात की काय ? ॥ १० ॥


मा जस्व॑ने वृषभ नो ररीथा॒ मा ते॑ रे॒वतः॑ स॒ख्ये रि॑षाम ।
पू॒र्वीष्ट॑ इन्द्र निः॒ष्षिधो॒ जने॑षु ज॒ह्यसु॑ष्वी॒न्प्र वृ॒हापृ॑णतः ॥ ११ ॥

मा जस्वने वृषभः नः ररीथाः मा ते रेवतः सख्ये रिषाम ।
पूर्वीः ते इंद्र निःसिधः जनेषु जहि असुष्वीन् प्र वृह अपृणतः ॥ ११ ॥

वीरपुंगवा, खाबू लोकांच्या हातांत आम्हास देऊ नको. तू दिव्य ऐश्वर्यवान, तेव्हां तुझा आमच्यावर लोभ असतां आम्हांस बिलकुल धक्का लागू नये. इंद्रा, तू लोकांना किती तरी देणग्या दिल्या आहेस. तर आतां सोमविमुख दुष्टांचा नाश कर आणि तुला संतुष्ट न करणारांचा निःपात कर. ॥ ११ ॥


उद॒भ्राणी॑व स्त॒नय॑न्निय॒र्तीन्द्रो॒ राधां॒स्यश्व्या॑नि॒ गव्या॑ ।
त्वम॑सि प्र॒दिवः॑ का॒रुधा॑या॒मा त्वा॑दा॒मान॒ आ द॑भन्म॒घोनः॑ ॥ १२ ॥

उत् अभ्राणिऽइव स्तनयन् इयर्ति इंद्रः राधांसि अश्व्यानि गव्या ।
त्वं असि प्रऽदिवः कारुऽधाया मा त्वा अदामानः आ दभन् मघोनः ॥ १२ ॥

वायु मेघपटलास गति देतो त्याप्रमाणे इंद्र गर्जना करून गोधनयुक्त आणि अश्वधनयुक्त देणग्या भक्तांकडे पाठवितो. पुरातन काळापासूनच तू दीन कविचा प्रतिपालक म्हणून प्रसिद्ध आहेस, तर तुला हविरूप उपायने न देणारे जे दुष्ट असतील ते आम्हांस न फसवितील असे कर. ॥ १२ ॥


अध्व॑र्यो वीर॒ प्र म॒हे सु॒ताना॒मिन्द्रा॑य भर॒ स ह्यस्य॒ राजा॑ ।
यः पू॒र्व्याभि॑रु॒त नूत॑नाभिर्गी॒र्भिर्वा॑वृ॒धे गृ॑ण॒तामृषी॑णाम् ॥ १३ ॥

अध्वर्योइति वीर प्र महे सुतानां इंद्राय भर सः हि अस्य राजा ।
यः पूर्व्याभिः उत नूतनाभिः गीःऽभिः ववृधे गृणतां ऋषीणां ॥ १३ ॥

अध्वर्यो, वीरा, इंद्राप्रित्यर्थ सोमरसाचा चषक तू पुढे कर. तोच ह्या रसाचा राजा होय. स्तोत्रनिरत ऋषिच्या पुरातन व नवीन स्तुतिवाणींनी तोच आनंदाने वृद्धिंगत होतो. ॥ १३ ॥


अ॒स्य मदे॑ पु॒रु वर्पां॑सि वि॒द्वानिन्द्रो॑ वृ॒त्राण्य॑प्र॒ती ज॑घान ।
तमु॒ प्र हो॑षि॒ मधु॑मन्तमस्मै॒ सोमं॑ वी॒राय॑ शि॒प्रिणे॒ पिब॑ध्यै ॥ १४ ॥

अस्य मदे पुरु वर्पांसि विद्वान् इंद्रः वृत्राणि अप्रति जघान ।
तं ऊंइति प्र होषि मधुमंतं अस्मै सोमं वीराय शिप्रिणे पिबध्यै ॥ १४ ॥

आनंदाच्या भरांत अनेक प्रकारची रूपे कशी धारण करावी, हे जाणणार्‍या इंद्राने कशानेही न हटणार्‍या तमोरूप शत्रूंचा समूळ उच्छेद केला. तर ह्या शिरस्त्राण धारण करणार्‍या वीराला हा मधुर सोमरस प्राशन करण्याकरितां सादर कर. ॥ १४ ॥


पाता॑ सु॒तमिन्द्रो॑ अस्तु॒ सोमं॒ हन्ता॑ वृ॒त्रं वज्रे॑ण मन्दसा॒नः ।
गन्ता॑ य॒ज्ञं प॑रा॒वत॑श्चि॒दच्छा॒ वसु॑र्धी॒नाम॑वि॒ता का॒रुधा॑याः ॥ १५ ॥

पाता सुतं इंद्रः अस्तु सोमं हन्ता वृत्रं वज्रेण मन्दसानः ।
गन्ता यज्ञं पराऽवतः चित् अच्छ वसुः धीनां अविता कारुऽधायाः ॥ १५ ॥

इंद्र सोमरस पान करो, आणि हर्षोल्लसित होऊन वज्राने वृत्राचा फडशा उडवून टाको. तो आपल्या दूरच्या लोकांतूनही यज्ञ समारंभास येवो. तो दीनवत्सल, दिव्य संपत्तिचा निधि आमच्या ध्यानबुद्धिंचा पुरस्कर्ता होवो. ॥ १५ ॥


इ॒दं त्यत्पात्र॑मिन्द्र॒पान॒मिन्द्र॑स्य प्रि॒यम॒मृत॑मपायि ।
मत्स॒द्यथा॑ सौमन॒साय॑ दे॒वं व्य१स्मद्द्वेषो॑ यु॒यव॒द्व्यंहः॑ ॥ १६ ॥

इदं त्यत् पात्रं इंद्रऽपानं इंद्रस्य प्रियं अमृतं अपायि ।
मत्सत् यथा सौमनसाय देवं वि अस्मत् द्वेषः युयवत् वि अंहः ॥ १६ ॥

ज्या चषकांतून इंद्र सोमपान करतो तो हा येथे आहे. इंद्राला प्रिय जे सोमामृत ते त्याने प्राशन केलेच आहे. तर त्याचे सौजन्य प्रकट व्हावे म्हणून त्याला तो उल्लसित करो. द्वेषबुद्धि आणि पातक आमच्यापासून अजीबात काढून टाको. ॥ १६ ॥


ए॒ना म॑न्दा॒नो ज॒हि शू॑र॒ शत्रू॑ञ्जा॒मिमजा॑मिं मघवन्न॒मित्रा॑न् ।
अ॒भि॒षे॒णाँ अ॒भ्या३देदि॑शाना॒न्परा॑च इन्द्र॒ प्र मृ॑णा ज॒ही च॑ ॥ १७ ॥

एना मन्दानः जहि शूर शत्रून् जामिं अजामिं मघऽवन् अमित्रान् ।
अभिऽसेनान् अभि आऽदेदिशानान् पराचः इंद्र प्र मृणा जही च ॥ १७ ॥

ह्या प्रमाणे हर्षोल्लसित होऊन हे शूर भगवंता, आमच्यावर हल्ला करणार्‍या शत्रूंचा, मग ते आमचे संबंधी असोत वा नसोत - त्यांचा फडशा उडव. इंद्रा, आमच्यावर नेम धरून अस्त्र फेकणार्‍यांना नामोहरम करून ठार मारून टाक. ॥ १७ ॥


आ॒सु ष्मा॑ णो मघवन्निन्द्र पृ॒त्स्व१स्मभ्यं॒ महि॒ वरि॑वः सु॒गं कः॑ ।
अ॒पां तो॒कस्य॒ तन॑यस्य जे॒ष इन्द्र॑ सू॒रीन्कृ॑णु॒हि स्मा॑ नो अ॒र्धम् ॥ १८ ॥

आसु स्म नः मघऽवन् इंद्र पृत्ऽसु अस्मभ्यं महि वरिवः सुऽगं करितिकः ।
अपां तोकस्य तनयस्य जेषे इंद्र सूरीन् कृणुहि स्म नः अर्धं ॥ १८ ॥

भगवंता इंद्रा, ह्या आमच्या संग्रामांत आम्हाला पूर्ण अवसर आणि यशःसौकर्य ह्यांचा लाभ दे. दिव्य उदके, पुत्र पौत्र, ह्यांच्याप्रित्यर्थ चाललेल्या झटापटींतही हे इंद्रा, आम्हांला अग्रेसर करून समृद्ध कर. ॥ १८ ॥


आ त्वा॒ हर॑यो॒ वृष॑णो युजा॒ना वृष॑रथासो॒ वृष॑रश्म॒योऽत्याः ।
अ॒स्म॒त्राञ्चो॒ वृष॑णो वज्र॒वाहो॒ वृष्णे॒ मदा॑य सु॒युजो॑ वहन्तु ॥ १९ ॥

आ त्वा हरयः वृषणः युजानाः वृषऽरथासः वृषऽरश्मयः अत्याः ।
अस्मत्रांचः वृषणः वज्रऽवाहः वृष्णे मदाय सुऽयुजः वहंतु ॥ १९ ॥

तुझे ते रगेल, आपोआप जोडलेले वीरोचित रथास शोभणारे, (किरणरूप) मजबूत लगामाचे तडफदार घोडे, आमच्याकडे वळलेले ते वीर्यशाली वज्रदेही जोडीचे घोडे, तुज कामवर्षक वीराला उल्लसित करण्याकरितां इकडे आणोत. ॥ १९ ॥


आ ते॑ वृष॒न्वृष॑णो॒ द्रोण॑मस्थुर्घृत॒प्रुषो॒ नोर्मयो॒ मद॑न्तः ।
इन्द्र॒ प्र तुभ्यं॒ वृष॑भिः सु॒तानां॒ वृष्णे॑ भरन्ति वृष॒भाय॒ सोम॑म् ॥ २० ॥

आ ते वृषन् वृषणः द्रोणं अस्थुः घृतऽप्रुषः न ऊर्मयः मदंतः ।
इंद्र प्र तुभ्यं वृषऽभिः सुतानां वृष्णे भरंति वृषभाय सोमं ॥ २० ॥

हे मनोरथवर्षक वीरा, तुझे ते सणसणीत अश्व सोमपात्रा जवळ उभे आहेत. ते घृतवृष्टि करीत असतांना समुद्रवीचि प्रमाणे आनंदाने उचंबळत जातात. परंतु हे इंद्रा, शूर ऋत्विजांनी गाळलेला हा सोमरस, वीर्यशाली वीरपुंगव जो तू, त्या तुझ्याकडे पोहोंचवून देतात. ॥ २० ॥


वृषा॑सि दि॒वो वृ॑ष॒भः पृ॑थि॒व्या वृषा॒ सिन्धू॑नां वृष॒भ स्तिया॑नाम् ।
वृष्णे॑ त॒ इन्दु॑र्वृषभ पीपाय स्वा॒दू रसो॑ मधु॒पेयो॒ वरा॑य ॥ २१ ॥

वृषा असि दिवः वृषभः पृथिव्याः वृषा सिंधूनां वृषभः स्तियानां ।
वृष्णे ते इंदुः वृषभ पीपाय स्वादुः रसः मधुऽपेयः वराय ॥ २१ ॥

तू आकाशाचा प्रमुख योद्धा, पृथ्वीचा कामवर्षक वीर, महानद्यांचा पराक्रमी धुरीण आणि सरोवरांचाही वरिष्ठच आहेस. हे वीरपुंगवा, हे सोमबिंदु स्वादिष्ट आणि मधुर आहेत, ते तुज वीराच्या पसंतीकरितां उचंबळून चालले आहेत. ॥ २१ ॥


अ॒यं दे॒वः सह॑सा॒ जाय॑मान॒ इन्द्रे॑ण यु॒जा प॒णिम॑स्तभायत् ।
अ॒यं स्वस्य॑ पि॒तुरायु॑धा॒नीन्दु॑रमुष्णा॒दशि॑वस्य मा॒याः ॥ २२ ॥

अयं देवः सहसा जायमानः इंद्रेण युजा पणिं अस्तभायत् ।
अयं स्वस्य पितुः आयुधानि इंदुः अमुष्णात् अशिवस्य मायाः ॥ २२ ॥

ह्या सोमाने एकदम उत्पन्न होऊन आणि इंद्राशी तद्रूप बनून "पणि"ला दाबून टाकले. ह्या तेजःपुंज सोमबिन्दुंनी आपल्या "आकाश" पित्याची आयुधे, आणि त्या राक्षसाचे कपटजाल ही एकदमच हरण केली. ॥ २२ ॥


अ॒यम॑कृणोदु॒षसः॑ सु॒पत्नी॑र॒यं सूर्ये॑ अदधा॒ज्ज्योति॑र॒न्तः ।
अ॒यं त्रि॒धातु॑ दि॒वि रो॑च॒नेषु॑ त्रि॒तेषु॑ विन्दद॒मृतं॒ निगू॑ळ्हम् ॥ २३ ॥

अयं अकृणोत् उषसः सुऽपत्नीः अयं सूर्ये अदधात् ज्योतिः अंतरिति ।
अयं त्रिऽधातु दिवि रोचनेषु त्रितेषु विंदत् अमृतं निऽगूळ्हं ॥ २३ ॥

ह्या सोमानेच उषेला उत्कृष्ट पतिची जोड करून दिली, आणि सूर्याच्या ठिकाणी तेजस्विता ठेविली. ह्यानेंच आकाशांत, तीन प्रकारच्या तेजोलोकांत दडपून ठेविलेले तीन स्वरूपाचे अमृत भूलोकीं आणले. ॥ २३ ॥


अ॒यं द्यावा॑पृथि॒वी वि ष्क॑भायद॒यं रथ॑मयुनक्स॒प्तर॑श्मिम् ।
अ॒यं गोषु॒ शच्या॑ प॒क्वम॒न्तः सोमो॑ दाधार॒ दश॑यन्त्र॒मुत्स॑म् ॥ २४ ॥

अयं द्यावापृथिवीइति वि ष्कभायत् अयं रथं अयुनक् सप्तऽरश्मिं ।
अयं गोषु शच्या पक्वं अंतरिति सोमः दाधार दशऽयंत्रं उत्सं ॥ २४ ॥

ह्यानेच नक्षत्रे आणि पृथ्वी ह्यांना आधार दिला. सात प्रकारचे किरणरूप घोडे ह्याने रथास जोडले आणि ह्याच सोमाने प्रकाशरूप धेनूमध्ये दहा यंत्रांचा अनेक कार्य निष्पादक, आणि पूर्ण दिशेस आलेला असा दुधाचा अखंड प्रवाह उत्पन्न केला. ॥ २४ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ४५ ( इंद्र सूक्त )

ऋषी - शंयु बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - गायत्री, अनुश्टुभ


य आन॑यत्परा॒वतः॒ सुनी॑ती तु॒र्वशं॒ यदु॑म् ॥ इन्द्रः॒ स नो॒ युवा॒ सखा॑ ॥ १ ॥

यः अनयत् पराऽवतः सुऽनीती तुर्वशं यदुं । इंद्रः सः नः युवा सखा ॥ १ ॥

ज्याने तुर्वश आणि यदु ह्यांना आपल्या उत्कृष्ट नेतृत्वाने लांबून सुखरूप ठिकाणी आणले तो तारुण्यशोभी इंद्र आमचा प्राणमित्र होवो. ॥ १ ॥


अ॒वि॒प्रे चि॒द्वयो॒ दध॑दना॒शुना॑ चि॒दर्व॑ता ॥ इन्द्रो॒ जेता॑ हि॒तं धन॑म् ॥ २ ॥

अविप्रे चित् वयः दधत् अनाशुना चित् अर्वता । इंद्रः जेता हितं धनं ॥ २ ॥

ज्याला काव्यप्रतिभा मुळीच नाही अशा उपासकाच्या ठिकाणी सुद्धां तो फार हुरुप ठेवतो. आणि ज्यांच्या आंगी तडफ मुळीच नाही अशा योद्ध्यांच्या हातून ही तो इंद्र यशोधन जिंकून आणतो. ॥ २ ॥


म॒हीर॑स्य॒ प्रणी॑तयः पू॒र्वीरु॒त प्रश॑स्तयः ॥ नास्य॑ क्षीयन्त ऊ॒तयः॑ ॥ ३ ॥

महीः अस्य प्रऽनीतयः पूर्वीः उत प्रऽशस्तयः । न अस्य क्षीयंन्ते ऊतयः ॥ ३ ॥

त्याचे नियम फार उदात्त आहेत आणि त्याच्या प्रशंसेचे प्रकार तर अगणितच. त्याच्या भक्त रक्षक सामर्थ्याला कधींही कमीपणा येत नाही. ॥ ३ ॥


सखा॑यो॒ ब्रह्म॑वाह॒सेऽर्चत॒ प्र च॑ गायत ॥ स हि नः॒ प्रम॑तिर्म॒ही ॥ ४ ॥

सखायः ब्रह्मऽवाहसे अर्चत प्र च गायत । सः हि नः प्रऽमतिः मही ॥ ४ ॥

मित्रांनो, त्या प्रार्थनासूक्तप्रिय इंद्राप्रित्यर्थ मोठ्याने "अर्क" स्तोत्रें म्हणा आणि सामगायन करा. आमचे आटोकाट धोरण म्हणजे तो इंद्रच होय. ॥ ४ ॥


त्वमेक॑स्य वृत्रहन्नवि॒ता द्वयो॑रसि ॥ उ॒तेदृशे॒ यथा॑ व॒यम् ॥ ५ ॥

त्वं एकस्य वृत्रऽहन् अविता द्वयोः असि । उत ईदृशे यथा वयं ॥ ५ ॥

वृत्रनाशका, तू ह्याचा त्याचा अशा एका दोघांचा तर कृपाळू संरक्षक आहेस, पण माझ्या सारख्या प्रत्येक दीनाचाही आहेस. ॥ ५ ॥


नय॒सीद्वति॒ द्विषः॑ कृ॒णोष्यु॑क्थशं॒सिनः॑ ॥ नृभिः॑ सु॒वीर॑ उच्यसे ॥ ६ ॥

नयसि इत् ऊंइति अति द्विषः कृणोषि उक्थऽशंसिनः । नृऽभिः सुऽवीर उच्यसे ॥ ६ ॥

द्वेषबुद्धिच्या कचाटीतून आम्हांस नेतोस, आणि आम्हाला तुझ्या स्तुतिगायनाची गोडी लावतोस, म्हणून हे वीरा, शूर भक्तांना तू स्तुतियोग्य आहेस. ॥ ६ ॥


ब्र॒ह्माणं॒ ब्रह्म॑वाहसं गी॒र्भिः सखा॑यमृ॒ग्मिय॑म् ॥ गां न दो॒हसे॑ हुवे ॥ ॥

ब्रह्माणं ब्रह्मऽवाहसं गीःऽभिः सखायं ऋग्मियं । गां न दोहसे हुवे ॥ ।

प्रार्थनास्तोत्राचा प्रभु, प्रार्थनास्तोत्रप्रिय, भक्तसखा, ऋक्सूक्तलालस अशा इंद्राला, धेनूला दोहनाकरितां हांक मारावी त्याप्रमाणे मी मनोरथ दोहनाला हांक मारतो. ॥ ७ ॥


यस्य॒ विश्वा॑नि॒ हस्त॑योरू॒चुर्वसू॑नि॒ नि द्वि॒ता ॥ वी॒रस्य॑ पृतना॒षहः॑ ॥ ८ ॥

यस्य विश्वानि हस्तयोः ऊचुः वसूनि नि द्विता । वीरस्य पृतनाऽसहः ॥ ८ ॥

शत्रुसैन्य पादाक्रांत करणार्‍या त्या महावीराच्या मुठींत सर्व द्विविध अमोलिक अभीष्ट संपत्ति सांठविली आहे असे यच्चावत् जग म्हणत आहे. ॥ ८ ॥


वि दृ॒ळ्हानि॑ चिदद्रिवो॒ जना॑नां शचीपते ॥ वृ॒ह मा॒या अ॑नानत ॥ ९ ॥

वि दृळ्हानि चित् अद्रिऽवः जनानां शचीऽपते । वृह मायाः अनानत ॥ ९ ॥

तर हे वज्रधरा, तू दुष्टांच्या मजबूत नगरांचा विध्वंस करून टाक आणि दिव्य शक्तीच्या नाथा, हे कोणासही हार न जाणार्‍या देवा, त्यांच्या सर्व कपट योगांचाही फडशा पाड. ॥ ९ ॥


तमु॑ त्वा सत्य सोमपा॒ इन्द्र॑ वाजानां पते ॥ अहू॑महि श्रव॒स्यवः॑ ॥ १० ॥

तं ऊंइति त्वा सत्य सोमऽपाः इंद्र वाजानां पते । अहूमहि श्रवस्यवः ॥ १० ॥

हे सोमप्रिया, सत्यस्वरूपा, सत्वसामर्थ्य प्रभो इंद्रा, सत्कीर्तिच्या इच्छेने आम्ही तुझाच धांवा करीत असतो. ॥ १० ॥


तमु॑ त्वा॒ यः पु॒रासि॑थ॒ यो वा॑ नू॒नं हि॒ते धने॑ ॥ हव्यः॒ स श्रु॑धी॒ हव॑म् ॥ ११ ॥

तं ऊंइति त्वा यः पुरा आसिथ यः वा नूनं हिते धने । हव्यः सः श्रुधी हवं ॥ ११ ॥

तू पूर्वींही होतास, आतांही आहेस आणि युद्धप्रसंग ठेपला असतां तुझेच साहाय्य मागतात तर, आमच्या ह्या कळकळीच्या हांकेकडे लक्ष दे. ॥ ११ ॥


धी॒भिरर्व॑द्भि॒ारर्व॑तो॒ वाजाँ॑ इन्द्र श्र॒वाय्या॑न् ॥ त्वया॑ जेष्म हि॒तं धन॑म् ॥ १२ ॥

धीभिः अर्वत्ऽभिः अर्वतः वाजान् इंद्र श्रवाय्यान् । त्वया जेष्म हितं धनं ॥ १२ ॥

इंद्रा, बुद्धिसामर्थ्याच्या जोरावर, अश्वारूढ योद्ध्याच्या साहाय्याने शत्रूच्या शूर घोडेस्वारांना, त्यांच्या नामांकित लढाऊ सामर्थ्याला आणि हितकर अशा यशोधनाला आम्ही कृपेने जिंकू. ॥ १२ ॥


अभू॑रु वीर गिर्वणो म॒हाँ इ॑न्द्र॒ धने॑ हि॒ते ॥ भरे॑ वितन्त॒साय्यः॑ ॥ १३ ॥

अभूः ऊंइति वीर गिर्वणः महान् इंद्र धने हिते । भरे वितंतसाय्यः ॥ १३ ॥

स्तुतिकामुका वीरा इंद्रा, युद्धप्रसंग पडला असतां आणि हातघाईच्या वेळेस तू परमथोर देव असा उपयोगी पडला आहेस, की तुझे अंतःकरण खळबळून जाईल अशाच प्रकारची स्तुति भक्तांनी करावी. ॥ १३ ॥


या त॑ ऊ॒तिर॑मित्रहन्म॒क्षूज॑वस्त॒मास॑ति ॥ तया॑ नो हिनुही॒ रथ॑म् ॥ १४ ॥

या ते ऊतिः अमित्रऽहन् मक्षूजवःऽतमा असति । तया नः हिनुहि रथं ॥ १४ ॥

अरिमर्दना, तुझी जी संरक्षक शक्ति पराकाष्ठेची शीघ्रगामिनी असेल, तिच्या योगानेंच आमच्या रथाला वेग दे. ॥ १४ ॥


स रथे॑न र॒थीत॑मोऽ॒स्माके॑नाभि॒युग्व॑ना ॥ जेषि॑ जिष्णो हि॒तं धन॑म् ॥ १५ ॥

सः रथेन रथीऽतमः अस्माकेन अभिऽयुग्वना । जेषि जिष्णोइति हितं धनं ॥ १५ ॥

तू वीरश्रेष्ठ आहेस, म्हणून शत्रूच्या आंगावर वाढून जाणार्‍या आमच्या रथांत बसून हे विजयशाली वीरा, हितकर असे यशोधन जिंकून आणतोस. ॥ १५ ॥


य एक॒ इत्तमु॑ ष्टुहि कृष्टी॒नां विच॑र्षणिः ॥ पति॑र्ज॒ज्ञे वृष॑क्रतुः ॥ १६ ॥

य एक इत् तं ऊंइति स्तुहि कृष्टीनां विऽचर्षणिः । पतिः जज्ञे वृषऽक्रतुः ॥ १६ ॥

वीर्यशालित्वयुक्त ज्याची कर्तबगारी, जो सर्वसाक्षी, सर्वगामी आणि प्राणिमात्राचा प्रभु असा देव आविर्भूत झाला. जो एक अद्वितीय आहे, अशा त्या इंद्राचे स्तवन करा. ॥ १६ ॥


यो गृ॑ण॒तामिद् आसि॑था॒पिरू॒ती शि॒वः सखा॑ ॥ स त्वं न॑ इन्द्र मृळय ॥ १७ ॥

यः गृणतां इत् आसिथ आपिः ऊती शिवः सखा । सः त्वं न इंद्र मृळय ॥ १७ ॥

आपल्या संरक्षकशक्तिने भक्ताचा मंगलदायक, इष्ट, आप्त जो तू सर्व कांही होतोस, हे इंद्रा, तो तू आमच्यावर दया कर. ॥ १७ ॥


धि॒ष्व वज्रं॒ गभ॑स्त्यो रक्षो॒हत्या॑य वज्रिवः ॥ सा॒स॒ही॒ष्ठा अ॒भि स्पृधः॑ ॥ १८ ॥

धिष्व वज्रं गभस्त्योः रक्षःऽहत्याय वज्रिऽवः । ससहीष्ठाऽ अभि स्पृधः ॥ १८ ॥

वज्रधरा, दानवांचा नाश करण्यासाठी आपल्या खांद्यावर वज्र ठेव, आमच्याशी हमरीतुमरी करणार्‍या दुष्टांना तूच पराजित करतोस. ॥ १८ ॥


प्र॒त्नं र॑यी॒णां युजं॒ सखा॑यं कीरि॒चोद॑नम् ॥ ब्रह्म॑वाहस्तमं हुवे ॥ १९ ॥

प्रत्नं रयीणां युजं सखायं कीरिऽचोदनं । ब्रह्मवाहःऽतमं हुवे ॥ १९ ॥

सनातन, दिव्य ऐश्वर्याचे तत्त्व, भक्तसखा, दीनवत्सल आणि प्रार्थनासूक्ताविषयी अत्यंत लालस असा ह्या इंद्राचाच मी धांवा करतो. ॥ १९ ॥


स हि विश्वा॑नि॒ पार्थि॑वाँ॒ एको॒ वसू॑नि॒ पत्य॑ते ॥ गिर्व॑णस्तमो॒ अध्रि॑गुः ॥ २० ॥

सः हि विश्वानि पार्थिवा एकः वसूनि पत्यते । गिर्वणःऽतमः अध्रिऽगुः ॥ २० ॥

तोच एकटा ह्या सर्व ऐहिक अमोल संपत्तिचा धनी होय. तो अत्यंत स्तुतिकामुक आणि अकुंठितप्रभाव आहे. ॥ २० ॥


स नो॑ नि॒युद्भि॒सरा पृ॑ण॒ कामं॒ वाजे॑भिर॒श्विभिः॑ ॥ गोम॑द्भिगर्गोपते धृ॒षत् ॥ २१ ॥

सः नः नियुत्ऽभिः आ पृण कामं वाजेभिः अश्विऽभिः । गोमत्ऽभिः गोऽपते धृषत् ॥ २१ ॥

प्रकाश धेनूंच्या नाथा, आपल्या "नियुत्" घोड्या जोडून ये आणि गोधन विषयक आणि बुद्धिरूप अश्वविषयक सामर्थ्यदानाने आमचा मनोरथ बेधडक परिपूर्ण कर. ॥ २१ ॥


तद्वो॑ गाय सु॒ते सचा॑ पुरुहू॒ताय॒ सत्व॑ने ॥ शं यद्गवे॒ न शा॒किने॑ ॥ २२ ॥

तत् वः गाय सुते सचा पुरुऽहूताय सत्वने । शं यत् गवे न शाकिने ॥ २२ ॥

तुमचा सोमरस सिद्ध होतांच या सर्वजनस्तुत सत्वाढ्य समर्थाला जे प्रिय वाटेल तेच गायन - तो गोपति म्हणून - तुम्ही गा. ॥ २२ ॥


न घा॒ वसु॒र्नि य॑मते दा॒नं वाज॑स्य॒ गोम॑तः ॥ यत्सी॒मुप॒ श्रव॒द्गिरः॑ ॥ २३ ॥

न घ वसुः नि यमते दानं वाजस्य गोऽमतः । यत् सीं उप श्रवत् गिरः ॥ २३ ॥

जेव्हां जेव्हां तो आमची कळकळ्याची स्तुति ऐकतो, तेव्हां तेव्हां तो दिव्यनिधि प्रकाश धेनुविषयक सत्वसामर्थ्याची देणगी देण्याला कधींही हात आखडित नाही. ॥ २३ ॥


कु॒वित्स॑स्य॒ प्र हि व्र॒जं गोम॑न्तं दस्यु॒हा गम॑त् ॥ शची॑भि॒रप॑ नो वरत् ॥ २४ ॥

कुवित्ऽसस्य प्र हि व्रजं गोऽमंतं दस्युऽहा गमत् । शचीभिः अप नः वरत् ॥ २४ ॥

दस्युचा संहार करणार्‍या त्या पराक्रमी इंद्राने कुवित्साच्या बंदिस्त धेनूंना विमुक्त केले. ॥ २४ ॥


इ॒मा उ॑ त्वा शतक्रतोऽ॒भिप्र णो॑नुवु॒र्गिरः॑ ॥ इन्द्र॑ व॒त्सं न मा॒तरः॑ ॥ २५ ॥

इमाः ऊंइति त्वा शतक्रतोइतिशतऽक्रतो अभि प्र नोनुवुः गिरः । इंद्र वत्सं न मातरः ॥ २५ ॥

अपार पराक्रम इंद्रा, वासरांनी आई करितां ओरडावे, त्या प्रमाणे ह्या आमच्या स्तवन वाणीनी एकसारखा तुझा ध्यास घेतला आहे. ॥ २५ ॥


दू॒णाशं॑ स॒ख्यं तव॒ गौर॑सि वीर गव्य॒ते ॥ अश्वो॑ अश्वाय॒ते भ॑व ॥ २६ ॥

दूऽनशं सख्यं तव गौः असि वीर गव्यते । अश्वः अश्वऽयते भव ॥ २६ ॥

तुझा लाभ जडणे हेंच अगोदर दुर्घट, पण तो एकदा जडला की गोधनोत्सुक भक्ताला जसा तूं धेनू प्रमाणे होतोस, तसाच बुद्धिरूप अश्वाची वांच्छा धरणार्‍या उपासकाला तू बुद्धिदाता हो. ॥ २६ ॥


स म॑न्दस्वा॒ ह्यन्ध॑सो॒ राध॑से त॒न्वा म॒हे ॥ न स्तो॒तारं॑ नि॒देक॑रः ॥ २७ ॥

सः मन्दः वा हि अन्धसः राधसे तन्वा महे । न स्तोतारं निदे करः ॥ २७ ॥

आमच्यावर कृपा करण्याकरतां ह्या मधुरपेयाने तू स्वतः उल्लसित हो, आणि तुझ्या उपासकाची अनन्वित निंदा होईल असे होऊ देऊ नको. ॥ २७ ॥


इ॒मा उ॑ त्वा सु॒तेसु॑ते॒ नक्ष॑न्ते गिर्वणो॒ गिरः॑ ॥ व॒त्सं गावो॒ न धे॒नवः॑ ॥ २८ ॥

इमा ऊंइति त्वा सुतेऽसुते नक्षंते गिर्वणः गिरः । वत्सं गावः नः धेनवः ॥ २८ ॥

प्रत्येक सोमसवन प्रसंगी, पान्हा फुटलेल्या धेनूंनी वंसराकडे धांव घ्यावी, त्या प्रमाणे आमच्या स्तुति तुझ्या सन्निध त्वरेने जात आहेत. ॥ २८ ॥


पु॒रू॒तमं॑ पुरू॒णां स्तो॑तॄ॒णां विवा॑चि ॥ वाजे॑भिर्वाजय॒ताम् ॥ २९ ॥

पुरुऽतमं पुरूणां स्तोतॄणां विऽवाचि । वाजेभिः वाजऽयतां ॥ २९ ॥

असंख्य विभूतीत श्रेष्ठतम अशा तुजकडे, सामर्थ्यप्रद स्तवनांच्या योगाने सत्वसामर्थ्य मिळविण्याविषयी आतुर झालेल्या अनेक उपासकांच्या निरनिराळ्या स्तोत्रांच्या घोळक्यांत आमच्या स्तुतिही गेल्या आहेत. ॥ २९ ॥


अ॒स्माक॑मिन्द्र भूतु ते॒ स्तोमो॒ वाहि॑ष्ठो॒ अन्त॑मः ॥ अ॒स्मान् रा॒ये म॒हे हि॑नु ॥ ३० ॥

अस्माकं इंद्र भूतु ते स्तोमः वाहिष्ठः अंतमः । अस्मान् राये महे हिनु ॥ ३० ॥

आमचे कार्य खात्रीने करणारा हा स्तोत्रकलाप तुझ्या अंतरंगी जाऊन भिडो. अतिश्रेष्ठ जी संपत्ति आहे तिच्याकडे आम्हांस प्रेरणा कर. ॥ ३० ॥


अधि॑ बृ॒बुः प॑णी॒नां वर्षि॑ष्ठे मू॒र्धन्न् अ॑स्थात् ॥ उ॒रुः कक्षो॒ न गा॒ङ्ग्यः ॥ ३१ ॥

अधि बृबुः पणीनां वर्षिष्ठे मूर्धन् अस्थात् । उरुः कक्षः न गाङ्‌ग्यः ॥ ३१ ॥

गंगेच्या तटावर मोठा विस्तीर्ण वृक्ष उगवावा त्याप्रमाणे "पणि"च्या कुलांत उच्च शिरोभाग हा बृबु जाऊन बसला आहे. ॥ ३१ ॥


यस्य॑ वा॒योरि॑व द्र॒वद्भ॒द्रा रा॒तिः स॑ह॒स्रिणी॑ ॥ स॒द्यो दा॒नाय॒ मंह॑ते ॥ ३२ ॥

यस्य वायोःऽइव द्रवत् भद्रा रातिः सहस्रिणी । सद्यः दानाय मंहते ॥ ३२ ॥

त्याची कल्याणकारक अशी हजारो प्रकारची औदार्यवृत्ति महादान घडावे म्हणून वायू प्रमाणे एकदम जोराने वाहत असते. ॥ ३२ ॥


तत्सु नो॒ विश्वे॑ अ॒र्य आ सदा॑ गृणन्ति का॒रवः॑ ॥ बृ॒बुं स॑हस्र॒दात॑मं सू॒रिं स॑हस्र॒सात॑मम् ॥ ३३ ॥

तत् सु नः विश्वे अर्य आ सदा गृणंति कारवः । बृबुं सहस्रऽदातमं सूरिं सहस्रऽसातमं ॥ ३३ ॥

म्हणूनच आमचे आर्य कवि, त्या हजारो प्रकाराने संपत्ति मिळवून हजारो प्रकाराने दान करणार्‍या "बृबु"ची नेहमी प्रशंसाच करीत असतात. ॥ ३३ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ४६ ( इंद्र सूक्त )

ऋषी - शंयु बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - बृहती, सतो-बृहती


त्वां इद्धि हवा॑महे सा॒ता वाज॑स्य का॒रवः॑ ।
त्वां वृ॒त्रेष्वि॑न्द्र॒ सत्प॑तिं॒ नर॒स्त्वां काष्ठा॒स्वर्व॑तः ॥ १ ॥

त्वां इत् हि हवामहे साता वाजस्य कारवः ।
त्वां वृत्रेषु इंद्र सत्ऽपतिं नरः त्वां काष्ठासु अर्वतः ॥ १ ॥

आम्ही दीन कविजन सत्वसामर्थ्य प्राप्तिकरिता तुझाच धांवा करतो. हे इंद्रा, आम्ही मानव तमोरूप शत्रूंच्या कार्यांत, तुला सज्जन पालकाला, अश्वारूढ वीरांची चढाओढ सुरू असता त्या ठिकाणी तुलाच पाचारण करतो. ॥ १ ॥


स त्वं न॑श्चित्र वज्रहस्त धृष्णु॒या म॒ह स्त॑वा॒नो अ॑द्रिवः ।
गामश्वं॑ र॒थ्यमिन्द्र॒ सं कि॑र स॒त्रा वाजं॒ न जि॒ग्युषे॑ ॥ २ ॥

सः त्वं नः चित्र वज्रऽहस्त धृष्णुऽया महः स्तवानः अद्रिऽवः ।
गां अश्वं रथ्यं इंद्र सं किर सत्रा वाजं न जिग्युषे ॥ २ ॥

हे अद्‍भुता, वज्रधरा, तुज थोर देवाचे मोठ्या निग्रहाने भजन चाललेले असते, तर हे पर्वतभेदक इंद्रा, विजयोत्सुक वीराला सत्वसामर्थ्य द्यावे त्याप्रमाणे आम्हाला गोधन, रथ आणि अश्व ह्यांनी युक्त अशी देणगी अर्पण कर. ॥ २ ॥


यः स॑त्रा॒हा विच॑र्षणि॒रिन्द्रं॒ तं हू॑महे व॒यम् ।
सह॑स्रमुष्क॒ तुवि॑नृम्ण॒ सत्प॑ते॒ भवा॑ स॒मत्सु॑ नो वृ॒धे ॥ ३ ॥

यः सत्राऽहा विऽचर्षणिः इंद्रं तं हूमहे वयं ।
सहस्रऽमुष्क तुविऽनृम्ण सत्ऽपते भव समत्ऽसु नः वृधे ॥ ३ ॥

जो खरोखरच सर्व साक्षी आहे त्या इंद्रालाच हांक मारून मी निमंत्रण करतो. हे अपारवीर्या, हे निःसीमपौरुषा, सज्जनप्रतिपालका देवा, समरांत आमचीच सरशी होऊ दे. ॥ ३ ॥


बाध॑से॒ जना॑न्वृष॒भेव॑ म॒न्युना॒ घृषौ॑ मी॒ळ्ह ऋ॑चीषम ।
अ॒स्माकं॑ बोध्यवि॒ता म॑हाध॒ने त॒नूष्व॒प्सु सूर्ये॑ ॥ ४ ॥

बाधसे जनान् वृषभाऽइव मन्युना घृषौ मीळ्हे ऋचीषम ।
अस्माकं बोधि अविता महाऽधने तनूषु अप्ऽसु सूर्ये ॥ ४ ॥

ऋचीषमा, मनोरथवर्षका, इंद्रा, बैलाने रागाने मुसंडी मारावी त्याप्रमाणे आवेशाने तू घनघोर युद्धांत सैनिकांना त्राहि करून सोडतोस. तर स्वसंरक्षणार्थ, दिव्यौदकासाठी आणि सूर्यासाठी चाललेल्या महासंग्रामांतही तू आमचा संरक्षक हो. ॥ ४ ॥


इन्द्र॒ ज्येष्ठं॑ न॒ आ भ॑रँ॒ ओजि॑ष्ठं॒ पपु॑रि॒ श्रवः॑ ।
येने॒मे चि॑त्र वज्रहस्त॒ रोद॑सी॒ ओभे सु॑शिप्र॒ प्राः ॥ ५ ॥

इंद्र ज्येष्ठं नः आ भर ओजिष्ठं पपुरि श्रवः ।
येन इमेइति चित्र वज्रऽहस्त रोदसीइति आ उभेइति सुऽशिप्र प्राः ॥ ५ ॥

इंद्रा, उत्कृष्ट, अत्यंत उज्ज्वल, आणि मन तृप्त करणारे असे यश आम्हांस दे, की ज्याच्या योगाने हे अद्‍भुतरूपा वज्रधरा, हे मुकुटमंडिता, तू हे दोन्ही लोक भरून टाकले आहेस. ॥ ५ ॥


त्वामु॒ग्रमव॑से चर्षणी॒सहं॒ राज॑न्दे॒वेषु॑ हूमहे ।
विश्वा॒ सु नो॑ विथु॒रा पि॑ब्द॒ना व॑सोऽ॒मित्रा॑न्सु॒षहा॑न्कृधि ॥ ६ ॥

त्वां उग्रं अवसे चर्षणीऽसहं राजन् देवेषु हूमहे ।
विश्वा सु नः विथुरा पिब्दना वसिति अमित्रान् सुसहान् कृधि ॥ ६ ॥

हे जगद्‍राजा, सर्व विभूतींत थोर आणि लोक-दमन असा तू, त्या तुलाच आमच्यावर अनुग्रह करण्यासाठी आम्ही पाचरण करतो. आमची जेथे जेथे ढिलाई असेल, ते ते तू सुदृढ कर आणि हे दिव्यनिधे, शत्रूंना आम्ही सहज जिंकू असे कर. ॥ ६ ॥


यदि॑न्द्र॒ नाहु॑षी॒ष्वाँ ओजो॑ नृ॒म्णं च॑ कृ॒ष्टिषु॑ ।
यद्वा॒ पञ्च॑ क्षिती॒नां द्यु॒म्नमा भ॑र स॒त्रा विश्वा॑नि॒ पौंस्या॑ ॥ ७ ॥

यत् इंद्र नाहुषीषु आ ओजः नृम्णं च कृष्टिषु ।
यत् वा पञ्च क्षितीनां द्युम्नं आ भर सत्रा विश्वानि पौंस्या ॥ ७ ॥

इंद्रा, ह्या नहुषांच्या कुलांत जे ओज आणि जी रग आहे, इतकेंच नव्हे तर यांच्या जातींत जे औज्वल्य आणि पराक्रम आहेत ते ते सर्व आम्हांमध्ये आण. ॥ ७ ॥


यद्वा॑ तृ॒क्षौ म॑घवन्द्रु॒ह्यावा जने॒ यत्पू॒रौ कच्च॒ वृष्ण्य॑म् ।
अ॒स्मभ्यं॒ तद्रि॑रीहि॒ सं नृ॒षाह्ये॑ऽ॒मित्रा॑न्पृ॒त्सु तु॒र्वणे॑ ॥ ८ ॥

यत् वा तृक्षौ मघऽवन् द्रुह्यौ आ जने यत् पूरौ कत् च वृष्ण्यं ।
अस्मभ्यं तत् रिरीहि सं नृऽसह्ये अमित्रान् पृत्ऽसु तुर्वणे ॥ ८ ॥

भगवंता, तृक्षुमध्ये, द्रुह्युमध्ये, त्यांच्या लोकांत किंवा पुरुच्या लोकांत जे जे वीर्य विक्रम वास करीत आहेत ते ते आम्ही आमच्या शत्रूंना पादाक्रांत करावे म्हणून आणि युद्धांत हां हां म्हणता विजय मिळवावा म्हणून आम्हास अर्पण कर. ॥ ८ ॥


इन्द्र॑ त्रि॒धातु॑ शर॒णं त्रि॒वरू॑थं स्वस्ति॒मत् ।
छ॒र्दिर्य॑च्छ म॒घव॑द्भ्य्श्च॒ मह्यं॑ च या॒वया॑ दि॒द्युमे॑भ्यः ॥ ९ ॥

इंद्र त्रिऽधातु शरणं त्रिऽवरूथं स्वस्तिऽमत् ।
छर्दिः यच्छ मघवत्ऽभ्यः च मह्यं च यवय दिद्युं एभ्यः ॥ ९ ॥

इंद्रा, तीन प्रकारचा आश्रय करणारे, तिप्पट मजबूत चिलखताप्रमाणे असणारे असे जे तुझे आरामशीर गृह ते आमच्या दानशूर यजमानांना आणि मला अर्पण कर. शत्रूचे अस्त्र त्यांच्यापासून फेंटाळून दे. ॥ ९ ॥


ये ग॑व्य॒ता मन॑सा॒ शत्रु॑माद॒भुर॑भिप्र॒घ्नन्ति॑ धृष्णु॒या ।
अध॑ स्मा नो मघवन्निन्द्र गिर्वणस्तनू॒पा अन्त॑मो भव ॥ १० ॥

ये गव्यता मनसा शत्रुं आऽदभुः अभिऽप्रघ्नंति धृष्णुऽया ।
अध स्मा नः मघऽवन् इंद्र गिर्वणः तनूऽपा अंतमः भव ॥ १० ॥

त्या आमच्या यजमानांनी प्रकाश धेनूंकडे लक्ष ठेवून शत्रूंचा मोड केला, मोठ्या धारिष्टाने ते शत्रूंचा सप्पा उडवितात, तर हे स्तुतिकामुका इंद्रा, तू आमचा जिवलग संरक्षणकर्ता हो. ॥ १० ॥


अध॑ स्मा नो वृ॒धे भ॒वेन्द्र॑ ना॒यम॑वा यु॒धि ।
यद॒न्तरि॑क्षे प॒तय॑न्ति प॒र्णिनो॑ दि॒द्यव॑स्ति॒ग्ममू॑र्धानः ॥ ११ ॥

अध स्म नः वृधे भव इंद्र नायं अव युधि ।
यत् अंतरिक्षे पतयंति पर्णिनः दिद्यवः तिग्मऽमूर्धानः ॥ ११ ॥

हे पहा, झगझगीत, तिखट टोकांचे व पिसारी लावलेले बाण अंतराळांतून आमच्यावर पडूं लागले आहेत, तर हे इंद्रा, आमची सरशी कर आणि युद्धांत आमचा सेनानायक तूच हो. ॥ ११ ॥


यत्र॒ शूरा॑सस्त॒न्वो वितन्व॒ते प्रि॒या शर्म॑ पितॄ॒णाम् ।
अध॑ स्मा यच्छ त॒न्वे३तने॑ च छ॒र्दिर॒चित्तं॑ या॒वय॒ द्वेषः॑ ॥ १२ ॥

यत्र शूरासः तन्वः वितन्वते प्रिया शर्म पितॄणां ।
अध स्म यच्छ तन्वे तने च छर्दिः अचित्तं यवय द्वेषः ॥ १२ ॥

युद्धांत शूर वीर आपली शरीरें सहज रणांत पसरून देतात. तर आम्हा स्वतःला आणि आमच्या पुत्रपौत्रांस विश्रांतिचे स्थान दे आणि अविचार द्वेष ह्यांना पिटाळून लाव. ॥ १२ ॥


यदि॑न्द्र॒ सर्गे॒ अर्व॑तश्चो॒दया॑से महाध॒ने ।
अ॒स॒म॒ने अध्व॑नि वृजि॒ने प॒थि श्ये॒नाँ इ॑व श्रवस्य॒तः ॥ १३ ॥

यत् इंद्र सर्गे अर्वतः चोदयासे महाऽधने ।
असमने अध्वनि वृजिने पथि श्येनान्ऽइव श्रवस्यतः ॥ १३ ॥

इंद्रा, जोराने चाल करीत असतां, तुमुल युद्धांत, खडकाळ रस्त्याने, किंवा आडमार्गांत आपले नांव गाजविण्याकरितां आतुर झालेल्या घोडेस्वारांना तू ससाण्याप्रमाणे वेग देतोस. ॥ १३ ॥


सिन्धूँ॑रिव प्रव॒ण आ॑शु॒या य॒तो यदि॒ क्लोश॒मनु॒ ष्वणि॑ ।
आ ये वयो॒ न वर्वृ॑त॒त्यामि॑षि गृभी॒ता बा॒ह्वोर्गवि॑ ॥ १४ ॥

सिन्धून्ऽइव प्रवणे आशुऽया यतः यदि क्लोशं अनु स्वनि ।
आ ये वयः न वर्वृतति आमिषि गृभीताः बाह्वोः गवि ॥ १४ ॥

कड्यावरून वेगाने खाली आपटणार्‍या महानदी प्रमाणे किंवा आरोळीसरशी अगर साद घालतांच आमिषाकडे धांवणार्‍या पक्ष्याप्रमाणे जे एकदम उलट फिरतात आणि ज्यांनी आपल्या हातांत लगाम खूप खेंचून धरलेला असतो अशा स्वारांना तू प्रेरणा करतोस त्याचप्रमाणे आम्हांसही प्रेरणा कर. ॥ १४ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ४७ ( अनेक देवता सूक्त )

ऋषी - गर्ग बार्हस्पत्य : अनेक देवता : छंद - अनेक


स्वा॒दुष्किला॒यं मधु॑माँ उ॒तायं ती॒व्रः किला॒यं रस॑वाँ उ॒तायम् ॥
उ॒तोन्व१स्य प॑पि॒वांस॒मिन्द्रं॒ न कश्च॒न स॑हत आह॒वेषु॑ ॥ १ ॥

स्वादुः किल अयं मधुऽमान् उत अयं तीव्रः किल अयं रसऽवान् उत अयं ।
उतोइति नु अस्य पपिऽवांसं इंद्रं न कः चन सहते आऽहवेषु ॥ १ ॥

हा रस स्वादिष्ट आहे, हा मधुर आहे, हा कडक आणि फार मिष्ट आहे. हा प्राशन करणार्‍या इंद्रापुढे युद्धांत कोणीही उभा राहूं शकत नाही. ॥ १ ॥


अ॒यं स्वा॒दुरि॒ह मदि॑ष्ठ आस॒ यस्येन्द्रो॑ वृत्र॒हत्ये॑ म॒माद॑ ॥
पु॒रूणि॒ यश्च्यौ॒त्ना शम्ब॑रस्य॒ वि न॑व॒तिं नव॑ च दे॒ह्यो३हन् ॥ २ ॥

अयं स्वादुः इह मदिष्ठः आस यस्य इंद्रः वृत्रऽहत्ये ममाद ।
पुरूणि यः च्यौत्ना शंबरस्य वि नवतिं नव च देह्यः हन् ॥ २ ॥

हा रुचिकर आणि अत्यंत आल्हादप्रद रस येथेच होतो. तो प्राशन करून वृत्र नाशनार्थ इंद्र हर्षोल्लसित झाला. त्याने शंबर राक्षसाचे हजारो हल्ले निष्फळ करून त्याच्या नव्याण्णव नगरांचा विध्वंस केला. ॥ २ ॥


अ॒यं मे॑ पी॒त उदि॑यर्ति॒ वाच॑म॒यं म॑नी॒षामु॑श॒तीम॑जीगः ॥
अ॒यं षळु॒र्वीर॑मिमीत॒ धीरो॒ न याभ्यो॒ भुव॑नं॒ कच्च॒नारे ॥ ३ ॥

अयं मे पीतः उत् इयर्ति वाचं अयं मनीषां उशतीं अजीगरिति ।
अयं षट् उर्वीः अमिमीत धीरः न याभ्यः भुवनं कत् चन आरे ॥ ३ ॥

हा रस पान केला असता मला काव्य स्फुरण होते. ह्यानेच माझी उत्सुक प्रतिभा आणि कल्पना जागृत केली. ह्या गंभीर बुद्धिदायक सोमानेच सहा लोक उचलून धरले असून, त्यांच्यातून एकाही भुवनास दूर होता येणार नाही अशा रीतीने ते सर्व त्याने मोजून टाकले आहेत. ॥ ३ ॥


अ॒यं स यो व॑रि॒माणं॑ पृथि॒व्या व॒र्ष्माणं॑ दि॒वो अकृ॑णोद॒यं सः ॥
अ॒यं पी॒यूषं॑ ति॒सृषु॑ प्र॒वत्सु॒ सोमो॑ दाधारो॒र्व१न्तरि॑क्षम् ॥ ४ ॥

अयं सः यः वरिमाणं पृथिव्याः वर्ष्माणं दिवः अकृणोत् अयं सः ।
अयं पीयूषं तिसृषु प्रवत्ऽसु सोमः दाधार उरु अंतरिक्षं ॥ ४ ॥

पृथ्वीचा विस्तार आणि आकाशाची उन्नति ही त्यानेच घडविली. त्या ह्या सोमाने तीन प्रवाहांत अमृत आणि उभय लोकांच्यामध्ये विस्तीर्ण अंतराल धारण केले आहे. ॥ ४ ॥


अ॒यं वि॑दच्चित्र॒दृशी॑क॒मर्णः॑ शु॒क्रस॑द्मनामु॒षसा॒मनी॑के ॥
अ॒यम् म॒हान्म॑ह॒ता स्कम्भ॑ने॒नोद्द्याम॑स्तभ्नाद्वृष॒भो म॒रुत्वा॑न् ॥ ५ ॥

अयं विदत् चित्रऽदृशीकं अर्णः शुक्रऽसद्मनां उषसां अनीके ।
अयं महान् महता स्कंभनेन उत् द्यां अस्तभ्नात् वृषभः मरुत्वान् ॥ ५ ॥

धवल तेजाचे आगर ज्या उषा त्यांच्या रश्मिसमूहांत मनोहरकृति वर्णलहरी उत्पन्न केल्या त्या ह्यानेंच; आणि ह्याच मरुत्परिवेष्टित वीर पुंगवाने तारका मंडल सांवरून धरले आहे. ॥ ५ ॥


धृ॒षत्पि॑ब क॒लशे॒ सोम॑मिन्द्र वृत्र॒हा शू॑र सम॒रे वसू॑नाम् ॥
माध्यं॑दिने॒ सव॑न॒ आ वृ॑षस्व रयि॒स्थानो॑ र॒यिम॒स्मासु॑ धेहि ॥ ६ ॥

धृषत् पिब कलशे सोमं इंद्र वृत्रऽहा शूर संअरे वसूनां ।
माध्यंदिने सवने आ वृषस्व रयिऽस्थानः रयिं अस्मासु धेहि ॥ ६ ॥

ह्या कलशांत ठेवलेला सोमरस, हे इंद्रा, तू अभीष्ट संपत्तिकरितां चाललेल्या ह्या संग्रामांत निःसंदेह प्राशन कर. मध्यान्ह सवनाच्या वेळेसही प्राशन कर, आणि तू दिव्य ऐश्वर्याचे माहेरघर आहेस, तेव्हां ते ऐश्वर्य आम्हांमध्ये ठेव. ॥ ६ ॥


इन्द्र॒ प्र णः॑ पुरए॒तेव॑ पश्य॒ प्र नो॑ नय प्रत॒रं वस्यो॒ अच्छ॑ ॥
भवा॑ सुपा॒रो अ॑तिपार॒यो नो॒ भवा॒ सुनी॑तिरु॒त वा॒मनी॑तिः ॥ ७ ॥

इंद्र प्र नः पुरएताऽइव पश्य प्र नः नय प्रऽतरं वस्यः अच्छ ।
भव सुऽपारः अतिऽपारयः नः भव् सुऽनीतिः उत वामऽनीतिः ॥ ७ ॥

इंद्रा, तू आमचा धुरीण आहेस, अशा दृष्टीने आमच्याकडे अवलोकन कर. उत्कृष्ट अशा अभीष्ट धनाकडे आम्हाला उत्तम रीतीने घेऊन चल. आमचा तारक होऊन आमचा उद्धार कर, आणि आम्हाला सन्मार्ग आणि विलोभनीय अशा संपत्तिचाही मार्ग दाखव. ॥ ७ ॥


उ॒रुं नो॑ लो॒कमनु॑ नेषि वि॒द्वान्स्वर्व॒ज्ज्योति॒रभ॑यं स्व॒स्ति ॥
ऋ॒ष्वात॑ इन्द्र॒ स्थवि॑रस्य बा॒हू उप॑ स्थेयाम शर॒णा बृ॒हन्ता॑ ॥ ८ ॥

उरुं नः लोकं अनु नेषि विद्वान् स्वःऽवत् ज्योतिः अभयं स्वस्ति ।
ऋष्वा ते इंद्र स्थविरस्य बाहूइति उप स्थेयाम शरणा बृहंता ॥ ८ ॥

तू सर्वज्ञ महोदार देव आम्हाला दुःखनिर्बंधरहित लोकात आणि दिव्य व अकुतोभय प्रकाशाच्या स्तानांत नेऊन सोडतोस. हे इंद्रा, तुज पुराणपुरुषाचे भव्य बाहू हाच आमचा आसरा; तर त्या आसर्‍याचे आधाराने आम्ही राहू. ॥ ८ ॥


वरि॑ष्ठे न इन्द्र व॒न्धुरे॑ धा॒ वहि॑ष्ठयोः शताव॒न्नश्व॑यो॒रा ॥
इष॒मा व॑क्षी॒षां वर्षि॑ष्ठां॒ मा न॑स्तारीन्मघव॒न् रायो॑ अ॒र्यः ॥ ९ ॥

वरिष्ठे नः इंद्र वन्धुरे धाः वहिष्ठयोः शतऽवन् अश्वयोः आ ।
इषं आ वक्षि इषां वर्षिष्ठां मा नः तारीत् मघऽवन् रायः अर्यः ॥ ९ ॥

इंद्रा, तुझ्या उत्कृष्ट रथाच्या सारथ्यस्थानी, किंवा हे अनंत पराक्रमा, तुझ्या जोरदार घोड्यांवर तरी आम्हांस नेऊन बसव. सर्वोत्तम मनोत्साह आमच्या ठिकाणी आण. हे भगवंता, आम्हा आर्यजनांच्या ऐश्वर्याचा अतिक्रम कोणी करील असे होऊ देऊ नको. ॥ ९ ॥


इन्द्र॑ मृ॒ळ मह्यं॑ जी॒वातु॑मिच्छ चो॒दय॒ धिय॒मय॑सो॒ न धारा॑म् ॥
यत्किंचा॒हं त्वा॒युरि॒दं वदा॑मि॒ तज्जु॑षस्व कृ॒धि मा॑ दे॒वव॑न्तम् ॥ १० ॥

इंद्र मृळ मह्यं जीवातुं इच्छ चोदय धियं अयसः न धारां ।
यत् किं च अहं त्वाऽयुः इदं वदामि तत् जुषस्व कृधि मा देवऽवंतं ॥ १० ॥

इंद्रा, मजवर कृपा कर; आमच्या आयुष्य वर्धनाचा उपाय योज. आमची ध्याननिष्ठा तरवारीच्या धारे प्रमाणे तीक्ष्ण कर. तुझा दास मी जे कांही वेडे वाकडे बोलतो ते सर्व तू गोड करून घे. आणि मला ईश्वराचा खरा भक्त बनव. ॥ १० ॥


त्रा॒तार॒मिन्द्र॑मवि॒तार॒मिन्द्रं॒ हवे॑हवे सु॒हवं॒ शूर॒मिन्द्र॑म् ॥
ह्वया॑मि श॒क्रं पु॑रुहू॒तमिन्द्रं॑ स्व॒स्तिनो॑ म॒घवा॑ धा॒त्विन्द्रः॑ ॥ ११ ॥

त्रातारं इंद्रं अवितारं इंद्रं हवेऽहवे सुऽहवं शूरं इंद्रं ।
ह्वयामि शक्रं पुरुऽहूतं इंद्रं स्वस्ति नः मघऽवा धातु इंद्रः ॥ ११ ॥

भक्त तारक इंद्राला, दीनोद्धारक इंद्राला, प्रत्येक हांक जो कष्टी न होतां ऐकून घेतो त्या वीरशाली इंद्राला, त्या सर्व जनसेवित समर्थाला मी प्रेमाने पाचारण करतो. तो भगवान् इंद्र आमचे कल्याण करो. ॥ ११ ॥


इन्द्रः॑ सु॒त्रामा॒ स्ववाँ॒ अवो॑भिः सुमृळी॒को भ॑वतु वि॒श्ववे॑दाः ॥
बाध॑तां॒ द्वेषो॒ अभ॑यं कृणोतु सु॒वीर्य॑स्य॒ पत॑यः स्याम ॥ १२ ॥

इंद्रः सुऽत्रामा स्वऽवान् अवःऽभिः सुऽमृळीकः भवतु विश्वऽवेदाः ।
बाधतां द्वेषः अभयं कृणोतु सुऽवीर्यस्य पतयः स्याम ॥ १२ ॥

संकटमोचन, दिव्य प्रकाशदाता, वस्तुजात जाणणारा इंद्र आपल्या कृपाप्रसादांनी आमच्यावर अनुग्रह करो. द्वेषबुद्धिचा, द्वेष्ट्यांचा नायनाट करून आम्हाला निर्भय करो. तो आम्हांस उत्तमोत्तम शौर्याचे प्रभु बनवो. ॥ १२ ॥


तस्य॑ व॒यं सु॑म॒तौ य॒ज्ञिय॒स्यापि॑ भ॒द्रे सौ॑मन॒से स्या॑म ॥
स सु॒त्रामा॒ स्ववाँ॒ इन्द्रो॑ अ॒स्मे आ॒राच्चि॒द्द्वेषः॑ सनु॒तर्यु॑योतु ॥ १३ ॥

तस्य वयं सुमतौ यज्ञियस्यापि भद्रे सौमनसे स्याम ।
सः सुत्रामा स्ववान् इंद्रः अस्मेइति आरात् चित् द्वेषः सनुतः युयोतु ॥ १३ ॥

त्या यज्ञार्ह देवाच्या कृपेत त्याच्या मंगलमय वात्सल्याच्या छायेखाली आम्ही राहूं असे घडो. तो दीनतारक दिव्य प्रकाशदाता इंद्र, यच्चावत् द्वेषबुद्धि आमच्या पासून पार दूर घालवून देवो. ॥ १३ ॥


अव॒ त्वे इ॑न्द्र प्र॒वतो॒ नोर्मिर्गिरो॒ ब्रह्मा॑णि नि॒युतो॑ धवन्ते ॥
उ॒रू न राधः॒ सव॑ना पु॒रूण्य॒पो गा व॑ज्रिन्युवसे॒ समिन्दू॑न् ॥ १४ ॥

अव त्वेइति इंद्र प्रऽवतः न ऊर्मिः गिरः ब्रह्माणि निऽयुतः धवंते ।
उरू न राधः सवना पुरूणि अपः गाः वज्रिन् युवसे सं इन्दून् ॥ १४ ॥

हे इंद्रा, डोंगरावरून जलप्रवाह खाली जोराने वहावा, त्याप्रमाणे प्रार्थनासूक्ते आणि स्तवन वाणी ह्या एकसारख्या जुळून संतमुखांतून तुजकडे वहात धांवत जातात. तुझा महाप्रसाद म्हणून, हे वज्रधरा, सर्वसवन प्रसंगी, दिव्योदकें, प्रकाश, आणि तेजस्वी सोमबिन्दू तू एकत्र आणतोस. ॥ १४ ॥


क ईं॑ स्तव॒त्कः पृ॑णा॒त्को य॑जाते॒ यदु॒ग्रमिन्म॒घवा॑ वि॒श्वहावे॑त् ॥
पादा॑विव प्र॒हर॑न्न॒न्यम॑न्यं कृ॒णोति॒ पूर्व॒मप॑रं॒ शची॑भिः ॥ १५ ॥

कः ईं स्तवत् कः पृणात् कः यजाते यत् उग्रं इत् मघऽवा विश्वहा अवेत् ।
पादौऽइव प्रऽहरन् अन्यंऽऽअन्यं कृणोति पूर्वं अपरं शचीभिः ॥ १५ ॥

ह्या इंद्राची स्तुति यथार्थत्वाने कोण करूं शकेल ? ह्याला तृप्त कोण करील ? ह्याचे यजन तरी कोण करील ? हा भगवंत घोर तपाचरण करणारावरच अनुग्रह करील. चालतांना आपण पाय मागे पुढे करतो त्याप्रमाणे हा भगवंत आपल्या दैवीशक्तीने पुढे गेलेल्याला मागे आणि मागे पडलेल्याला पुढें करतो. ॥ १५ ॥


शृ॒ण्वे वी॒र उ॒ग्रमु॑ग्रं दमा॒यन्न॒न्यम॑न्यमतिनेनी॒यमा॑नः ॥
ए॒ध॒मा॒न॒द्विळु॒भय॑स्य॒ राजा॑ चोष्कू॒यते॒ विश॒ इन्द्रो॑ मनु॒ष्यान् ॥ १६ ॥

शृण्वे वीरः उग्रंऽउग्रं दमऽयन् अन्यंऽअन्यं अतिऽनेनीयमानः ।
एधमानऽद्विट् उभयस्य राजा चोष्कूयते विशः इंद्रः मनुष्यान् ॥ १६ ॥

घोरकर्म करणार्‍या प्रत्येक मनुष्याची तो पार रग जिरवून टाकतो असा त्याचा लौकीक सर्वत्र झाला आहे. तो एकेकाला व्यवस्थेने संकटांच्या पार घेऊन जातो. गर्वाने फुगलेल्याचा तो तिटकारा करतो. तो त्रैलोक्याचा राजा आहे. असा इंद्र त्याची प्रजा जे आपण मानवप्राणि त्यांच्यावर आपली पाखर घालतो. ॥ १६ ॥


परा॒ पूर्वे॑षां स॒ख्या वृ॑णक्ति वि॒तर्तु॑राणो॒ अप॑रेभिरेति ॥
अना॑नुभूतीरवधून्वा॒नः पू॒र्वीरिन्द्रः॑ श॒रद॑स्तर्तरीति ॥ १७ ॥

परा पूर्वेषां सख्या वृणक्ति विऽतर्तुराणः अपरेभिः एति ।
अननुऽभूतीः अवऽधून्वानः पूर्वीः इंद्रः शरदः तर्तरीति ॥ १७ ॥

पूर्वींच्या लोकांसह असलेला कृपालोभ अगदी अलग ठेवून, तो शीघ्र विजयी देव नवीन भक्तांवर प्रेमाने संचार करतो. त्याच्याकडे ज्यांचा मनापासून ओढा नाही अशांच्या स्तवनांना तुच्छ मानून तो शेंकडो वर्षे त्यांच्यापासून वेगाने दूर जातो. ॥ १७ ॥


रू॒पं रू॑पं॒ प्रति॑रूपो बभूव॒ तद॑स्य रू॒पं प्र॑ति॒चक्ष॑णाय ॥
इन्द्रो॑ मा॒याभिः॑ पुरु॒रूप॑ ईयते यु॒क्ता ह्यस्य॒ हर॑यः श॒ता दश॑ ॥ १८ ॥

रूपंऽरूपं प्रतिऽरूपः बभूव तत् अस्य रूपं प्रतिऽचक्षणाय ।
इंद्रः मायाभिः पुरुऽरूपः ईयते युक्ताः हि अस्य हरयः शता दश ॥ १८ ॥

विश्वांतील प्रत्येक पदार्थाच्या रूपाला नमुना हा इंद्रच झाला. हेच त्याचे जगद्‍रूप दृग्गोचर होते. हा इंद्र आपल्या नाना प्रकारच्या अलौलिक सामर्थ्यांनी युक्त होऊन सर्वत्र संचार करतो आणि त्याचे हजारो अश्व ह्याकरितां जोडून तयार आहेत. ॥ १८ ॥


यु॒जा॒नो ह॒रिता॒ रथे॒ भूरि॒ त्वष्टे॒ह रा॑जति ॥
को वि॒श्वाहा॑ द्विष॒तः पक्ष॑ आसत उ॒तासी॑नेषु सू॒रिषु॑ ॥ १९ ॥

युजानः हरिता रथे भूरि त्वष्टा इह राजति ।
कः विश्वाहा द्विषतः पक्ष आसत उतासीनेषु सूरिषु ॥ १९ ॥

हरित्तेजोमय आपले अश्व रथास जोडून हा जगत्‍स्रष्टा येथे आपली राजसत्ता चालवित आहे. तर आमचे लोक धुरीण जरी स्वस्थ बसले तरी शत्रूच्या पक्षाला आता नेहमींच कोण धरून राहील ? ॥ १९ ॥


अ॒ग॒व्यू॒ति क्षेत्र॒माग॑न्म देवा उ॒र्वी स॒ती भूमि॑रंहूर॒णाभू॑त् ॥
बृह॑स्पते॒ प्र चि॑कित्सा॒ गवि॑ष्टावि॒त्था स॒ते ज॑रि॒त्र इ॑न्द्र॒ पन्था॑म् ॥ २० ॥

अगव्यूति क्षेत्रं आ अगन्म देवाः उर्वी सती भूमिः अंहूरणा अभूत् ।
बृहस्पते प्र चिकित्स गोऽइष्टौ इत्था सते जरित्रे इंद्र पंथां ॥ २० ॥

देवांनो, अगदी नापिक मुलुखांत आम्ही येऊन पोहोंचलो आहों. जमीन मोठी परंतु अगदी हाल अपेष्टा फार अशी स्थिती आहे. तर हे स्तुतिच्या प्रभो देवा, तुझ्या भक्ताला प्रकाश धेनू प्राप्तिचा मार्ग स्पष्टपणे दाखव. ॥ २० ॥


दि॒वेदि॑वे स॒दृशी॑र॒न्यमर्धं॑ कृ॒ष्णा अ॑सेध॒दप॒ सद्म॑नो॒ जाः ॥
अह॑न्दा॒सा वृ॑ष॒भो व॑स्न॒यन्तो॒दव्र॑जे व॒र्चिनं॒ शम्ब॑रं च ॥ २१ ॥

दिवेऽदिवे सऽदृशीः अन्यं अर्धं कृष्णाः असेधत् अप सद्मनः जाः ।
अहन् दासा वृषभः वस्नयंता उदऽव्रजे वर्चिनं शंबरं च ॥ २१ ॥

इंद्राने प्रत्यही एक जात काळ्या वर्णाच्या शत्रूंस आर्य लोकांच्या ठिकाणापासून देशाच्या दुसर्‍या टोंकाकडे पार घालवून दिले. त्या वीरपुंगवाने दिव्य जलौघासाठी वर्चि व शंबर ह्यांना आणि त्यांच्या भाडोत्री सैन्याला ठार मारून टाकले. ॥ २१ ॥


प्र॒स्तो॒क इन्नु राध॑सस्त इन्द्र॒ दश॒ कोश॑यी॒र्दश॑ वा॒जिनो॑ऽदात् ॥
दिवो॑दासादतिथि॒ग्वस्य॒ राधः॑ शाम्ब॒रं वसु॒ प्रत्य॑ग्रभीष्म ॥ २२ ॥

प्रऽस्तोकः इत् नु राधसः ते इंद्र दश कोशयीः दश वाजिनः अदात् ।
दिवाऽदासात् अतिथिऽग्वस्य राधः शांबरं वसु प्रति अग्रभीष्म ॥ २२ ॥

इंद्रा, तुझ्या कृपादानाने प्रस्तोकाने दहा (धन) कोष आणि दहा लढाऊ सैनिक दिले. अतिथिग्वाच्या देणगीचा म्हणजे शंबराच्या दौलतीचा आम्ही दोविदासापासून स्वीकार केला. ॥ २२ ॥


दशाश्वा॒न्दश॒ कोशा॒न्दश॒ वस्त्राधि॑भोजना ॥ दशो॑ हिरण्यपि॒ण्डान्दिवो॑दासादसानिषम् ॥ २३ ॥

दश अश्वान् दश कोशान् दश वस्त्रा अधिऽभोजना ।
दशोइति हिरण्यऽपिण्डान् दिवःऽदासात् असानिषं ॥ २३ ॥

दहा अश्व, दहा धन कोष, दहा उपभोग योग्य वस्त्रे, आनि दहा सोन्याच्या चिपा अशी संपत्ति मला दिवोदासाकडून मिळाली. ॥ २३ ॥


दश॒ रथा॒न्प्रष्टि॑मतः श॒तं गा अथ॑र्वभ्यः ॥ अ॒श्व॒थः पा॒यवे॑ऽदात् ॥ २४ ॥

दश रथान् प्रष्टिऽमतः शतं गा अथर्वऽभ्यः । अश्वथः पायवे अदात् ॥ २४ ॥

जोडी जोडीने घोडे जोडलेले दहा रथ, शंभर गाई अशी देणगी अथर्वांकरितां अश्वथाने पायुला दिली. ॥ २४ ॥


महि॒ राधो॑ वि॒श्वज॑न्यं॒ दधा॑नान्भ॒रद्वा॑जान्सार्ञ्ज॒यो अ॒भ्ययष्ट ॥ २५ ॥

महि राधः विश्वऽजन्यं दधानान् भरत्ऽवाजान् सार्ञ्जयः अभि अयष्ट ॥ २५ ॥

सर्व लोकांना हितकर असा प्रसाद भरद्वाजांना लाभला म्हणून सृंजयाच्या पुत्राने त्यांचा सन्मान केला. ॥ २५ ॥


वन॑स्पते वी॒ड्वङ्गो॒श हि भू॒या अ॒स्मत्स॑खा प्र॒तर॑णः सु॒वीरः॑ ॥
गोभिः॒ संन॑द्धो असि वी॒ळय॑स्वास्था॒ता ते॑ जयतु॒ जेत्वा॑नि ॥ २६ ॥

वनस्पते वीळुऽअंगः हि भूयाः अस्मत्ऽसखा प्रऽतरणः सुऽवीरः ।
गोभिः संनद्धः असि वीळयस्व आऽस्थाता ते जयतु जेत्वानि ॥ २६ ॥

वृक्षवर्या, हे रथकाष्ठा तू कणखर, आमचा तारक मित्र आणि युद्धप्रवीण हो. तुला चामड्याच्या वादीने मढविला आहे तर तू चांगला बळकट हो, आणि तुझ्या ठिकाणी आरोहण करून युद्ध करणारा वीर विजयी होवो. ॥ २६ ॥


दि॒वस्पृ॑थि॒व्याः पर्योज॒ उद्भृ॑ातं॒ वन॒स्पति॑भ्यः॒ पर्याभृ॑तं॒ सहः॑ ॥
अ॒पामो॒ज्मानं॒ परि॒ गोभि॒रावृ॑त॒मिन्द्र॑स्य॒ वज्रं॑ ह॒विषा॒ रथं॑ यज ॥ २७ ॥

दिवः पृथिव्याः परि ओजः उत्ऽभृतं वनस्पतिऽभ्यः परि आऽभृतं सहः ।
अपां ओज्मानं परि गोभिः आऽवृतं इंद्रस्य वज्रं हविषा रथं यज ॥ २७ ॥

पृथिवी आणि आकाश ह्यांच्यापासून तुला जोम उत्पन्न झाला, वृक्षांपासून चिवटपणा आला, पाण्यापासून तजेला मिळाला. चामड्याच्या वादीने तुला आंवळून टाकले आहे. तू रश्मिपरिवेष्ठित आहेस. तर इंद्राचे वज्र आणि रथ ह्यांच्यासाठी हवन करा. ॥ २७ ॥


इन्द्र॑स्य॒ वज्रो॑ म॒रुता॒मनी॑कं मि॒त्रस्य॒ गर्भो॒ वरु॑णस्य॒ नाभिः॑ ॥
सेमां नो॑ ह॒व्यदा॑तिं जुषा॒णो देव॑ रथ॒ प्रति॑ ह॒व्या गृ॑भाय ॥ २८ ॥

इंद्रस्य वज्रः मरुतां अनीकं मित्रस्य गर्भः वरुणस्य नाभिः ।
सः इमां नः हव्यऽदातिं जुषाणः देव रथ प्रति हव्या गृभाय ॥ २८ ॥

तू इंद्राचे वज्र, मरुतांचे सैन्य, सूर्यबिंबाचा गाभा, आणि वरुणाचा अंतरंग आहेस. हे दिव्य रथा हा आमचा हविर्भाग गोड करून घेऊन आमच्या पाचारणाचा स्वीकार कर. ॥ २८ ॥


उप॑श्वासय पृथि॒वीमु॒त द्यां पु॑रु॒त्रा ते॑ मनुतां॒ विष्ठि॑तं॒ जग॑त् ॥
स दु॑न्दुभे स॒जूरिन्द्रे॑ण दे॒वैर्दू॒राद्दवी॑यो॒ अप॑ सेध॒ शत्रू॑न् ॥ २९ ॥

उप श्वासय पृथिवीं उत द्यां पुरुऽत्रा ते मनुतां विऽस्थितं जगत् ।
सः दुंदुभे सऽजूः इंद्रेण देवैः दूरात् दवीयः अप सेध शत्रून् ॥ २९ ॥

पृथिवी आणि नक्षत्रमंडल ह्यांना धीर दे. पण तारांबळ उडालेल्या जगाने हरतऱ्हेने तुझी आठवण ठेवावी. हे रणदुंदुभे, इंद्र आणि त्याच्या दिव्यविभूति ह्यांच्याशी प्रेमैक्य साधून तू शत्रूंना देववेल तितके दूर पिटाळून दे. ॥ २९ ॥


आ क्र॑न्दय॒ बल॒मोजो॑ न॒ आ धा॒ नि ष्ट॑निहि दुरि॒ता बाध॑मानः ॥
अप॑ प्रोथ दुन्दुभे दु॒च्छुना॑ इ॒त इन्द्र॑स्य मु॒ष्टिर॑सि वी॒ळय॑स्व ॥ ३० ॥

आ क्रन्दय बलं ओजः नः आ धाः निः स्तनिहि दुःऽइता बाधमानः ।
अप प्रोथ दुंदुभे दुच्छुनाः इतः इंद्रस्य मुष्टिः असि वीळयस्व ॥ ३० ॥

जोराने आवाज कर, आणि आम्हामध्ये बल व आवेश आण. तू संकटांना हुसकून देणारा आहेस, म्हणून तुझा गंभीर नाद होऊ दे. हे दुंदुभी, आपल्या धुम आवाजाने संकटांना उडवून दे. इंद्राचे मनगट तू आहेस तर आतां जोर धर. ॥ ३० ॥


आमूर॑ज प्र॒त्याव॑र्तये॒माः के॑तु॒मद्दु॑न्दु॒भिर्वा॑वदीति ॥
समश्व॑पर्णा॒श्चर॑न्ति नो॒ नरो॑ऽ॒स्माक॑मिन्द्र र॒थिनो॑ जयन्तु ॥ ३१ ॥

आ अमूः अज प्रतिऽआवर्तय इमाः केतुऽमत् दुंदुभिः वावदीति ।
सं अश्वऽपर्णाः चरंति नः नरः अस्माकं इंद्र रथिनः जयंतु ॥ ३१ ॥

त्या सेनेला अशी इकडे आण, आणि ह्या सेनेला माघारी फिरव. पहा ही रणमैदानाची खूण पटविणारी नौबत कसा आवाज करीत आहे ती ! आमचे शूर सैनिक जणों अश्वाचे पंख लावूनच की काय वार्‍यासारखे फिरत आहेत. तर हे इंद्रा, आमच्या रणधुरंधरांना विजय प्राप्त होऊ दे. ॥ ३१ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ४८ ( पृश्नि सूक्त )

ऋषी - शंयु बार्हस्पत्य : देवता - अनेक : छंद - अनेक


य॒ज्ञाय॑ज्ञा वो अ॒ग्नये॑ गि॒रागि॑रा च॒ दक्ष॑से ।
प्रप्र॑ व॒यम॒मृतं॑ जा॒तवे॑दसं प्रि॒यं मि॒त्रं न शं॑सिषम् ॥ १ ॥

यज्ञाऽयज्ञा वः अग्नये गिराऽगिरा च दक्षसे ।
प्रऽप्र वयं अमृतं जातऽवेदसं प्रियं मित्रं न शंसिषं ॥ १ ॥

प्रत्येक यज्ञ प्रसंगी तुमच्या करितां अग्नी प्रित्यर्थ म्हटलेल्या प्रत्येक स्तुतीच्या योगाने चातुर्यबल प्राप्त्यर्थ त्या भगववंताचे अर्चन करण्यास आम्ही सिद्ध आहों. आणि त्या मरणरहित सर्वज्ञ देवाची प्रेमळ मित्राप्रमाणे मी प्रशंसा केलीच आहे. ॥ १ ॥


ऊ॒र्जो नपा॑तं॒ स हि॒नायम॑स्म॒युर्दाशे॑म ह॒व्यदा॑तये ।
भुव॒द्वाजे॑ष्ववि॒ता भुव॑द्वृ॒ाध उ॒त त्रा॒ता त॒नूना॑म् ॥ २ ॥

ऊर्जः नपातं सः हिन अयं अस्मऽयुः दाशेम हव्यदातये ।
भुवत् वाजेषु अविता भुवत् वृधः उत त्राता तनूनां ॥ २ ॥

दैवी ओजस्वितेपासून प्रादुर्भूत होणार्‍या अग्निची उपासना करणे हेच आमचे कर्तव्य. तो अग्नि आमच्याविषयी वात्सल्याने आर्द्र नाही काय ? तो आमच्या हातून हविर्भाग सेवन करो; सत्व प्राप्त्यर्थ चाललेल्या प्रयत्नांत तो आमचा रक्षणकर्ता, उत्कर्ष करणारा आणि आमच्या स्वतःचा परित्राता होवो. ॥ २ ॥


वृषा॒ ह्यग्ने अ॒जरो॑ म॒हान्वि॒भास्य॒र्चिषा॑ ।
अज॑स्रेण शो॒चिषा॒ शोशु॑चच्छुचे सुदी॒तिभिः॒ सु दी॑दिहि ॥ ३ ॥

वृषा हि अग्ने अजरः महान् विऽभासि अर्चिषा ।
अजस्रेण शोचिषा शोशुचत् शुचे सुदीतिऽभिः सु दीदिहि ॥ ३ ॥

अग्नी, तू अभीष्टवर्षक वीर, वार्धक्याने पीडित न होणारा आहेस. तू श्रेष्ठ देव आपल्या ज्वालेने आपल्या अखंड दीप्तिने सुप्रकाशित होतोस, तर हे पवित्र तेजा, तू उज्वल होऊन आपल्या तेजस्वी कांतिने सुप्रकाशित हो. ॥ ३ ॥


म॒हो दे॒वान्यज॑सि॒ यक्ष्या॑नु॒षक्तव॒ क्रत्वो॒त दं॒सना॑ ।
अ॒र्वाचः॑ सीं कृणुह्य॒ग्नेऽवसे॒ रास्व॒ वाजो॒त वं॑स्व ॥ ४ ॥

महः देवान् यजसि यक्षि आनुषक् तव क्रत्वा उत दंसना ।
अर्वाचः सीं कृणुहि अग्ने अवसे रास्व वाजा उत वंस्व ॥ ४ ॥

म्हान् महान् दिव्य विभीतिंना तू संतुष्ट करतोस आणि नेहमी त्यांच्या प्रित्यर्थ यज्ञ चालू ठेवतोस. तर तू आपल्या अलौकिक कर्तृत्वाने, आपल्या अद्‍भुत प्रभावाने त्यांना आम्हांस अनुकूल कर. हे अग्नि, आम्हांवर अनुग्रह करावा म्हणून आम्हास पवित्र सामर्थ्य दे, आणि आमच्यावर प्रेम कर. ॥ ४ ॥


यमापो॒ अद्र॑यो॒ वना॒ गर्भ॑मृ॒तस्य॒ पिप्र॑ति ।
सह॑सा॒ यो म॑थि॒तो जाय॑ते॒ नृभिः॑ पृथि॒व्या अधि॒ सान॑वि ॥ ५ ॥

यं आपः अद्रयः वना गर्भं ऋतस्य पिप्रति ।
सहसा यः मथितः जायते नृऽभिः पृथिव्या अधि सानवि ॥ ५ ॥

जो सनातन धर्माचे तत्वच होय, ज्याला दिव्योदके, पर्वत, अरण्ये हे सर्व स्तुतीने संतुष्ट करतात, आणि वीर्यशाली ऋत्विजांनी जोराने अरणि घासून प्रकट केला असतां वेदीच्या शिरोभागी जो दृगोचर होतो. ॥ ५ ॥


आ यः प॒प्रौ भा॒नुना॒ रोद॑सी उ॒भे धू॒मेन॑ धावते दि॒वि ।
ति॒रस्तमो॑ ददृश॒ ऊर्म्या॒स्वा श्या॒वास्व॑रु॒षो वृषा श्या॒वा अ॑रु॒षोवृषा॑ ॥ ६ ॥

आ यः पप्रौ भानुना रोदसीइति उभेइति धूमेन धावते दिवि ।
तिरः तमः ददृशे ऊर्म्यासु आ श्यावासु अरुषः वृषा श्यावाः अरुषः वृषा ॥ ६ ॥

ज्याने आपल्या किरणांनी उभय लोक भरून टाकले, आणि जो धुराच्या लोटासरशी आकाशापर्यंत जाऊन थडकतो तो हा आरक्तवर्ण वीरपुंगव अग्नि, कृष्णपक्षांतील रात्रीच्या अंधकारांतूनही स्पष्टपणे दिसूं लागला आहे. तमोमय रात्रीही हा लोहितवर्ण कामवर्षक वीर स्पष्ट दिसूं लागला आहे. ॥ ६ ॥


बृ॒हद्भि॑ःरग्ने अ॒र्चिभिः॑ शु॒क्रेण॑ देव शो॒चिषा॑ ।
भ॒रद्वा॑जे समिधा॒नो य॑विष्ठ्य रे॒वन्नः॑ शुक्र दीदिहि द्यु॒मत्पा॑वक दीदिहि ॥ ७ ॥

बृहत्ऽभिः अग्ने अर्चिऽभिः शुक्रेण देव शोचिषा ।
भरत्ऽवाजे संऽइधानः यविष्ठ्य रेवत् नः शुक्र दीदिहि द्युऊमत् पावक दीदिहि ॥ ७ ॥

देवा अग्नी, भरद्वाजांसाठी प्रदीप्त होऊन आपल्या महाज्योतीने आपल्या शुभ्रवर्ण दीप्तीने, हे शुभ्रोज्वला अक्षय्ययौवन देवा, आमच्यावर दिव्य ऐश्वर्याचा प्रकाश पाड. हे पवित्र मूर्ते आमच्यावर दिव्य कांतीची प्रभा पाड. ॥ ७ ॥


विश्वा॑सां गृ॒हप॑तिर्वि॒शाम॑सि॒ त्वम॑ग्ने॒ मानु॑षीणाम् ।
श॒तं पू॒र्भिर्य॑विष्ठ पा॒ह्यंह॑सः समे॒द्धारं॑ श॒तं हिमा॑ स्तो॒तृभ्यो॒ ये च॒ दद॑ति ॥ ८ ॥

विश्वासां गृहऽपतिः विशां असि त्वं अग्ने मानुषीणां ।
शतं पूःऽभिः यविष्ठ पाहि अंहसः संऽएद्धारं
शतं हिमा स्तोतृऽभ्यः ये च ददति ॥ ८ ॥

तू यच्चावत् मानवी प्रजांचा गृहस्वामी आहेस, चिरयौवनाढ्य देवा, तुला प्रज्वलित करणार्‍या भक्ताला शंभर तटबंदी नगरांच्या योगाने रक्षण केल्याप्रमाणे पातकांपासून रक्षण कर. तुझ्या भक्तांना जे देणग्या देतात त्यांना शंभर वर्षेपर्यंत सुखांत ठेव. ॥ ८ ॥


त्वं न॑श्चि॒त्र ऊ॒त्या वसो॒ राधां॑सि चोदय ।
अ॒स्य रा॒यस्त्वम॑ग्ने र॒थीर॑सि वि॒दा गा॒धं तु॒चे तु नः॑ ॥ ९ ॥

त्वं नः चित्रः ऊत्या वसोइति राधांसि चोदय ।
अस्य रायः त्वं अग्ने रथीः असि विदाः गाधं तुचे तु नः ॥ ९ ॥

दिव्यनिधे तू अद्‍भुतरूप आहेस. तर आपल्या संरक्षक सामर्थ्यांनी आपला कृपाप्रसाद आमच्याकडे धाडून दे. अग्नि, ह्या दिव्यैश्वर्याचा नाथ तूच आहेस, तर ह्या बालकाला हा संसार खोल वाटूं देऊ नको. ॥ ९ ॥


पर्षि॑ तो॒कं तन॑यं प॒र्तृभि॒ष्ट्वमद॑ब्धै॒रप्र॑युत्वभिः ।
अग्ने॒ हेळां॑सि॒ दैव्या॑ युयोधि॒ नोऽदेवानि॒ ह्वरां॑सि च ॥ १० ॥

पर्षि तोकं तनयं पर्तृऽभिः ट्वं अदब्धैः अप्रयुत्वऽभिः ।
अग्ने हेळांसि दैव्या युयोधि नः अदेवानि ह्वरांसि च ॥ १० ॥

आपल्या अप्रतिहत आणि अविरत अशा उद्धारक सामर्थ्यांनी ह्या तुझ्या लहान अर्भकाला, पुत्राला दुःखसागराच्या पार ने. हे अग्नि, देवांचा कोप किंवा धर्मभ्रष्ट दुष्टांचे कपट ह्या दोहोंनाही आमच्यापासून दूर कर. ॥ १० ॥


आ स॑खायः सब॒र्दुघां॑ धे॒नुम॑जध्व॒मुप॒ नव्य॑सा॒ वचः॑ ।
सृ॒जध्व॒मन॑पस्फुराम् ॥ ११ ॥

आ सखायः सबःऽदुघां धेनुं अजध्वं उप नव्यसा वचः ।
सृजध्वं अनपऽस्फुरां ॥ ११ ॥

ऋत्विजांनो, अश्रुतपूर्व स्तुतीने त्या देवलोकींच्या अमृत स्त्राविणी धेनूला आपल्याजवळ वळवून आणा. जी आपल्या अमृताचा पान्हा कधी चोरीत नाही, अशा त्या धेनूला तेथून मोकळी सोडून द्या. ॥ ११ ॥


या शर्धा॑य॒ मारु॑ताय॒ स्वभा॑नवे॒ श्रवोऽमृत्यु॒ धुक्ष॑त । ।
या मृ॑ळी॒के म॒रुतां॑ तु॒राणां॒ या सु॒म्नैरे॑व॒याव॑री ॥ १२ ॥

या शर्धाय मारुताय स्वऽभानवे श्रवः अमृत्यु धुक्षत । ।
या मृळीके मरुतां तुराणां या सुम्नैः एवऽयावरी ॥ १२ ॥

स्वयंप्रकाश अशा मरुतांच्या सैन्याला जी काम-धेनू अक्षय्य यशोरूप देते, जी त्या विजयशाली मरुतांची मोठी आवडती आहे, ती ही धेनू दिव्य सुखे घेऊन इकडे मोठ्या लगबगीने येते. ॥ १२ ॥


भ॒रद्वा॑जा॒याव॑ धुक्षत द्वि॒ता ।
धे॒नुं च॑ वि॒श्वदो॑हस॒मिषं॑ च वि॒श्वभो॑जसम् ॥ १३ ॥

भरत्ऽवाजाय अव धुक्षत द्विता ।
धेनुं च विश्वऽदोहसं इषं च विश्वऽभोजसं ॥ १३ ॥

भरद्वाजाला तिने दोन प्रकारचे दुग्ध दिले. एक इच्छितवस्तू देणारी धेनू, आणि सर्व प्रकारचा सुखभोग देणारा मनोत्साह. ॥ १३ ॥


तं व॒ इन्द्रं॒ न सु॒क्रतुं॒ वरु॑णमिव मा॒यिन॑म् ।
अ॒र्य॒मणं॒ न म॒न्द्रं सृ॒प्रभो॑जसं॒ विष्णुं॒ न स्तु॑ष आ॒दिशे॑ ॥ १४ ॥

तं वः इंद्रं न सुऽक्रतुं वरुणंइव मायिनं ।
अर्यमणं न मंद्रं सृप्रऽभोजसं विष्णुं न स्तुषे आऽदिशे ॥ १४ ॥

वरुणाप्रमाणे त्या मायापटु देवाचे, तो अगाध कर्तृत्वशाली इंद्र म्हणून, हर्षनिर्भर अर्यमा म्हणून, सर्वांना सुखोपभोग सढळ हाताने देणारा विष्णु म्हणून स्तवन केले. त्याचे आम्ही स्मरण केले. ॥ १४ ॥


त्वे॒षं शर्धो॒ न मारु॑तं तुवि॒ष्वण्य॑न॒र्वाणं॑ पू॒षणं॒ सं यथा॑ श॒ता ।
सं स॒हस्रा॒ कारि॑षच्चर्ष॒णिभ्य॒ आँ आ॒विर्गू॒ळ्हा वसू॑ करत्सु॒वेदा॑ नो॒ वसू॑ करत् ॥ १५ ॥

त्वेषं शर्धः न मारुतं तुविऽस्वनि अनर्वाणं पूषणं सं यथा शता ।
सं सहस्रा कारिषत् चर्षणिऽभ्य आ आविः गूळ्हा वसु करत् सुऽवेदा नः वसु करत् ॥ १५ ॥

गंभीर घोष करणार्‍या जाज्वल्य मरुत् गणांप्रमाणे त्या अजातशत्रु पूषाचीही मी महती वर्णन केली. त्याने आम्हा जीवांकरितां शेकडोंच काय पण हजारों अमोलिक वस्तु गुप्त होत्या त्या उघड केल्या, आणि ती अमोल संपत्ति आम्हास सुलभ केली. ॥ १५ ॥


आ मा॑ पूष॒न्नुप॑ द्रव॒ शंसि॑षं॒ नु ते॑ अपिक॒र्ण आ॑घृणे ।
अ॒घा अ॒र्यो अरा॑तयः ॥ १६ ॥

आ मा पूषन् उप द्रव शंसिषं नु ते अपिऽकर्णे आघृणे ।
अघा अर्यः अरातयः ॥ १६ ॥

हे पूषा, मजकडे त्वरित ये. हे ज्वलत् दीप्ते देवा, मी आपले हितगुज तुझ्या कानांत सांगेन. हे पहा, पातकी जन हे आम्हां आर्यजनांचे शत्रुच आहेत. ॥ १६ ॥


मा का॑क॒म्बीर॒मुद् वृ॑हो॒ वन॒स्पति॒मश॑स्ती॒र्वि हि नीन॑शः ।
मोत सूरो॒ अह॑ ए॒वा च॒न ग्री॒वा आ॒दध॑ते॒ वेः ॥ १७ ॥

मा काकंबीरं उत् वृहः वनस्पतिं अशस्तीः वि हि नीनशः ।
मा उत सूरः अहरिति एव चन ग्रीवाः आऽदधते वेः ॥ १७ ॥

ही काकंबिर वनस्पती मुळापासून उपटून टाकू नको. हे देवा, आम्हांपासून दुर्बुद्धिचा नायनाट कर. आम्हाला प्रेरणा करणारा तू आहेस तर पक्ष्याचे नरडे धरावे त्याप्रमाणे भर दिवसां आमची दुर्दशा करू नको. ॥१७ ॥


दृते॑रिव तेऽवृ॒कम् अ॑स्तु स॒ख्यम् ।
अच्छि॑द्रस्य दध॒न्वतः॒ सुपू॑र्णस्य दध॒न्वतः॑ ॥ १८ ॥

दृतेःऽइव ते अवृकं अस्तु सख्यं ।
अच्छिद्रस्य दधन्ऽवतः सुऽपूर्णस्य दधन्ऽवतः ॥ १८ ॥

न गळणार्‍या आणि घट्ट दह्याने रेचून भरलेल्या हांडी प्रमाणे तुझा कृपालोभ आम्हांस केव्हांही हानिकारक न होवो. ॥ १८ ॥


प॒रो हि मर्त्यै॒रसि॑ स॒मो दे॒वैरु॒त श्रि॒या ।
अ॒भि ख्यः॑ पूष॒न्पृत॑नासु न॒स्त्वमवा॑ नू॒नं यथा॑ पु॒रा ॥ १९ ॥

परः हि मर्त्यैः असि समः देवैः उत श्रिया ।
अभि ख्यः पूषन् पृतनासु नः त्वं अव नूनं यथा पुरा ॥ १९ ॥

तू सर्वांशी सारखाच परंतु ऐश्वर्याच्या दृष्टीने मनुष्यांपेक्षा किंबहुना देवतांपेक्षाही श्रेष्ठच आहेस. हे पूषा, युद्धाच्या गर्दीत तू आम्हाकडे कृपाकटाक्षाने पहा आणि जसे पूर्वी तू आमचे रक्षण केलेस तसे आतांही कर. ॥ १९ ॥


वा॒मी वा॒मस्य॑ धूतयः॒ प्रणी॑तिरस्तु सू॒नृता॑ ।
दे॒वस्य॑ वा मरुतो॒ मर्त्य॑स्य वेजा॒नस्य॑ प्रयज्यवः ॥ २० ॥

वामी वामस्य धूतयः प्रऽनीतिः अस्तु सूनृता ।
देवस्य वा मरुतः मर्त्यस्य वा ईजानस्य प्रऽयज्यवः ॥ २० ॥

पातकी जनांची धांदल उडविणार्‍या मरुतांनो, आयुत्कर्षशाली ईश्वराची अत्युत्कृष्ट वाणी, किंवा हे यज्ञप्रिय विभूतींनो, यज्ञकर्मरत भक्ताची सत्य मधुर वाणी हीच आमचा मार्ग दर्शक हो. ॥ २० ॥


स॒द्यश्चि॒द्यस्य॑ चर्कृ॒तिः परि॒ द्यां दे॒वो नैति॒ सूर्यः॑ ।
त्वे॒षं शवो॑ दधिरे॒ नाम॑ य॒ज्ञियं॑ म॒रुतो॑ वृत्र॒हं शवो॒ ज्येष्ठं॑ वृत्र॒हं शवः॑ ॥ २१ ॥

सद्यः चिद् यस्य चर्कृतिः परि द्यां देवः न एति सूर्यः ।
त्वेषं शवः दधिरे नाम यज्ञियं मरुतः
वृत्रऽहं शवः ज्येष्ठं वृत्रऽहं शवः ॥ २१ ॥

ज्या देवांचे महद्यश सूर्याप्रमाणे सर्व आकाश मंडळाला एकदम ब्व्यापून टाकते त्या देवाच्या कृपेने मरुतांना जाज्वल बल, पवित्र कीर्ति, अंधकाराचा धुव्वा उडवून देणारी धमक, अत्युत्कृष्ट असे तमो नाशक सामर्थ्य ह्यांचा लाभ झाला. ॥ २१ ॥


स॒कृद्ध॒ द्यौर॑जायत स॒कृद्भूमि॑रजायत ।
पृश्न्या॑ दु॒ग्धं स॒कृत्पय॒स्तद॒न्यो नानु॑ जायते ॥ २२ ॥

सकृत् ह द्यौः अजायत सकृत् भूमिः अजायत ।
पृश्न्या दुग्धं सकृत् पयः तत् अन्यः न अनु जायते ॥ २२ ॥

नक्षत्र लोक हा एकदमच उत्पन्न झाला. ही पृथ्वीही एकदाच उत्पन्न झालेली आहे, आणि मेघोदकही एकवारच उत्पन्न झाले. पुनः त्यांच्याप्रमाणे दुसरा कोणताही पदार्थ उत्पन्न झाला नाही. ॥ २२ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ४९ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - ऋजिश्वान् बार्हस्पत्य : देवता - विश्वेदेव : छंद - शक्वरी, त्रिष्टुभ्


स्तु॒षे जनं॑ सुव्र॒तं नव्य॑सीभिर्गी॒र्भिर्मि॒त्रावरु॑णा सुम्न॒यन्ता॑ ।
त आ ग॑मन्तु॒त इ॒ह श्रु॑वन्तु सुक्ष॒त्रासो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॒ग्निः ॥ १ ॥

स्तुषे जनं सुऽव्रतं नव्यसीभिः गीःऽभिः मित्रावरुणा सुम्नऽयंता ।
ते आ गमन्तु ते इह श्रुवंतु सुऽक्षत्रासः वरुणः मित्रः अग्निः ॥ १ ॥

अपूर्व स्तुतीस्तोत्रांनी पुण्यशील विभूतींचे मी स्तवन करावे हेंच उचित. भक्तांना सुख देणारे मित्रवरुण त्यांचेही मी गुणगायन करतो. ते महासत्ताधीश वरुण मित्र आणि अग्नि येऊन आमची प्रार्थना ऐकून घेवोत. ॥ १ ॥


वि॒शोवि॑श॒ ईड्यं॑ अध्व॒रेष्वदृ॑प्तक्रतुमर॒तिं यु॑व॒त्योः ।
दि॒वः शिशुं॒ सह॑सः सू॒नुम॒ग्निं य॒ज्ञस्य॑ के॒तुम॑रु॒षं यज॑ध्यै ॥ २ ॥

विशःऽविशः ईड्यं अध्वरेषु अदृप्तऽक्रतुं अरतिं युवत्योः ।
दिवः शिशुं सहसः सूनुं अग्निं यज्ञस्य केतुं अरुषं यजध्यै ॥ २ ॥

जो प्रत्येक मनुष्य जातिने पूज्य मानलेला आहे, यज्ञ यागांतील आपल्या अलौकिक कर्तबगारी विषयी जो कधींही गर्व वहात नाही, जो तरुण ललनांचा प्रियसखा, जो आकाशाचा कुमार, तपःसायुज्याचे फल, आणि यज्ञाचा उज्ज्वल ध्वजच असा अग्नि त्याची उपासना करण्यास मी सिद्ध आहे. ॥ २ ॥


अ॒रु॒षस्य॑ दुहि॒तरा॒ विरू॑पे॒ स्तृभि॑र॒न्या पि॑पि॒शे सूरो॑ अ॒न्या ।
मि॒थ॒स्तुरा॑ वि॒चर॑न्ती पाव॒के मन्म॑ श्रु॒तं न॑क्षत ऋ॒च्यमा॑ने ॥ ३ ॥

अरुषस्य दुहितरा विरूपेइतिविऽरूपे स्तृऽभिः अन्या पिपिशे सूरः अन्या ।
मिथःऽतुरा विचरंतीइतिविऽचरंति पावकेइति मन्म श्रुतं नक्षत ऋच्यमानैति ॥ ३ ॥

ह्या आरक्तवर्ण विभूतीच्या कन्या दोन, त्यांची रूपेंही एकमेकी पासून भिन्न. एक नक्षत्र हारांनी नटलेली आणि दुसरी सूर्याच्या तेजाने चित्ताकर्षक झालेली आहे. एकी मागून एक अशा रीतीने येणार्‍या पुण्यवान आणि ऋक्स्तवन-प्रिय " रात्र आणि उषा " ह्या माझे विख्यात स्तोत्र श्रवण करण्याकरितां आगमन करोत. ॥ ३ ॥


प्र वा॒युमच्छा॑ बृह॒ती म॑नी॒षा बृ॒हद्र॑यिं वि॒श्ववा॑रं रथ॒प्राम् ।
द्यु॒तद्या॑मा नि॒युतः॒ पत्य॑मानः क॒विः क॒विमि॑यक्षसि प्रयज्यो ॥ ४ ॥

प्र वायुं अच्छा बृहती मनीषा बृहत्ऽरयिं विश्वऽवारं रथऽप्रां ।
द्युतत्ऽयामा निऽयुतः पत्यमानः कविः कविं इयक्षसि प्रयज्योइतिप्रऽयज्यो ॥ ४ ॥

माझी उच्चप्रतीची मनोमय स्तुति, त्या महदैश्वर्य दात्या सकलजनप्रिय आणि शीघ्रव्यापी वायूकडे जात आहे. हे यज्ञप्रिय देवा, तुझे वाहन उज्वल, तू "नियुत्" अश्वांचा मालक, आणि काव्यप्रतिभेचा प्रेरक आहेस. ज्ञानी कवीला तूच तृप्त करतोस. ॥ ४ ॥


स मे॒ वपु॑श्छदयद॒श्विनो॒र्यो रथो॑ वि॒रुक्मा॒न्मन॑सा युजा॒नः ।
येन॑ नरा नासत्येष॒यध्यै॑ व॒र्तिर्या॒थस्तन॑याय॒ त्मने॑ च ॥ ५ ॥

सः मे वपुः छदयत् अश्विनोः यः रथः विरुक्मान् मनसा युजानः ।
येन नरा नासत्येषयध्यै वर्तिः याथः तनयाय त्मने च ॥ ५ ॥

केवळ संकल्पानेच जोडला जाणारा असा जो अश्वींचा झगझगीत मनोहर रथ आहे तो माझे शरीर दिव्य कांतीने आच्छादित करो. हे सत्यस्वरूप देवांनो, आम्हाला आणि आमच्या पुत्रादिकांना सात्विक आवेश आणण्याकरितां अशाच रथांत बसून तुम्ही येता. ॥ ५ ॥


पर्ज॑न्यवाता वृषभा पृथि॒व्याः पुरी॑षाणि जिन्वत॒मप्या॑नि ।
सत्य॑श्रुतः कवयो॒ यस्य॑ गी॒र्भिर्जग॑त स्थात॒र्जग॒दा कृ॑णुध्वम् ॥ ६ ॥

पर्जन्यवाता वृषभा पृथिव्याः पुरीषाणि जिन्वतं अप्यानि ।
सत्यऽश्रुतः कवयः यस्य गीःऽभिः जगतः स्थातः जगत् आ कृणुध्वं ॥ ६ ॥

पृथ्वीचे नाथ, पर्जन्य आणि प्रभंजन, मेघमंडलांत उदक आहे त्याला चालन द्या. हे सत्यकीर्ति ज्ञानी विभूतींनो, हे जगदाधार देवांनो, स्तवनांनी जगताला आनंदित करा. ॥ ६ ॥


पावी॑रवी क॒न्या चि॒त्रायुः॒ सर॑स्वती वी॒रप॑त्नी॒ धियं॑ धात् ।
ग्नाभि॒रच्छि॑द्रं शर॒णं स॒जोषा॑ दुरा॒धर्षं॑ गृण॒ते शर्म॑ यंसत् ॥ ७ ॥

पावीरवी कन्या चित्रऽआयुः सरस्वती वीरऽपत्नी धियं धात् ।
ग्नाभिः अच्छिद्रं शरणं सऽजोषाः दुःऽआधर्षं गृणते शर्म यंसत् ॥ ७ ॥

पवित्र कन्या, अद्‍भुत चरिता, वीरपत्नि सरस्वती आमच्या ठिकाणी सुबुद्धि ठेवो. देवतांशी प्रेमाने वागणारी ती देवी भक्ताला निर्दोष सुखाचा आश्रय आणि अप्रतिहत मंगलाचे धाम देवो. ॥ ७ ॥


प॒थस्प॑थः॒ परि॑पतिं वच॒स्या कामे॑न कृ॒तो अ॒भ्यानळ॒र्कम् ।
स नो॑ रासच्छु॒रुध॑श्च॒न्द्राग्रा॒ धियं॑ धियं सीषधाति॒ प्र पू॒षा ॥ ८ ॥

पथःऽपथः परिऽपतिं वचस्या कामेन कृतः अभि आनट् अर्कं ।
सः नः रासत् शुरुधः चन्द्रऽअग्राः धियंऽधियं सीसधाति प्र पूषा ॥ ८ ॥

कवित्वाने लुब्ध होऊन देव ह्या स्तुतिच्या अंतरंगात रंगून जातो. तसा भक्तही प्रत्येक सत्मार्गाचा प्रतिपालक पूषा त्याच्या ठिकाणी आणि त्याच्या स्तवनाच्या ठिकाणी तल्लीन होऊन गेला. तो पूषा आम्हाला दुःखभार हलका करणार्‍या अशा देणग्या देवो की त्यांचा शेवट सुवर्णाप्रमाणे आल्हादजनक होईल, कारण प्रत्येक बुद्धिची घटना तोच करतो. ॥ ८ ॥


प्र॒थ॒म॒भाजं॑ य॒शसं॑ वयो॒धां सु॑पा॒णिं दे॒वं सु॒गभ॑स्ति॒मृभ्व॑म् ।
होता॑ यक्षद्यज॒तं प॒स्त्यानाम॒ग्निस्त्वष्टा॑रं सु॒हवं॑ वि॒भावा॑ ॥ ९ ॥

प्रथमऽभाजं यशसं वयःऽधां सुऽपाणिं देवं सुऽगभस्तिं ऋभ्वं ।
होता यक्षत् यजतं पस्त्यानां अग्निः त्वष्टारं सुऽहवं विभाऽवा ॥ ९ ॥

हविभरणाचे प्रथम सेवन करणारा, यशस्वी, यौवनप्रद, उदारहस्त, दिव्य दीप्तकिरण अशा त्वष्ट्रदेवाचे यजन देदीप्यमान यज्ञ संपादक अग्नि हा करो. त्वष्टा हा गृहस्थांना पूज्य आहे. आणि तो भक्तांची हांक तत्काळ ऐकतो. ॥ ९ ॥


भुव॑नस्य पि॒तरं॑ गी॒र्भिरा॒भी रु॒द्रं दिवा॑ व॒र्धया॑ रु॒द्रम॒क्तौ ।
बृ॒हन्त॑मृ॒ष्वम॒जरं॑ सुषु॒म्नमृध॑ग्घुवेम क॒विने॑षि॒तासः॑ ॥ १० ॥

भुवनस्य पितरं गीःऽभिः आभिः रुद्रं दिवा वर्धय रुद्रं अक्तौ ।
बृहंतं ऋष्वं अजरं सुऽसुम्नं ऋधक् घुवेम कविना इषितासः ॥ १० ॥

जगत्पिता रुद्र त्याला अशा स्तुतींनी रात्रंदिवस भक्तीने संतुष्ट कर. त्या श्रेष्ठ धीरोदात्त, अजरामर आणि अत्यंत सुखप्रद अशा रुद्राला, ज्ञानी ऋषींच्या वाणीने प्रोत्साहन येऊन आम्ही मनःपूर्वक आळवितो. ॥ १० ॥


आ यु॑वानः कवयो यज्ञियासो॒ मरु॑तो ग॒न्त गृ॑ण॒तो व॑र॒स्याम् ।
अ॒चि॒त्रं चि॒द्धि जिन्व॑था वृ॒धन्त॑ इ॒त्था नक्ष॑न्तो नरो अङ्गिbर॒स्वत् ॥ ११ ॥

आ युवानः कवयः यज्ञियासः मरुतः गंत गृणतः वरस्यां ।
अचित्रं चित् हि जिन्वथ वृधतः इत्था नक्षंतः नरः अङ्‌गिरस्वत् ॥ ११ ॥

हे यौवन संपन्न, यज्ञयोग्य, ज्ञानी मरुतांनो, तुम्ही ह्या भक्ताच्या मनोवेधन स्तवनाकडे लक्ष द्या. वीरांनो अंगिरसाच्या घरी घडल्याप्रमाणे येथेंही तुम्ही येऊन आणि हर्षाने प्रफुल्लित होऊन ह्या ओसाड नापिक प्रदेशाला टवटवीत करा. ॥ ११ ॥


प्र वी॒राय॒ प्र त॒वसे॑ तु॒रायाजा॑ यू॒थेव॑ पशु॒रक्षि॒रस्त॑म् ।
स पि॑स्पृशति तन्वै श्रु॒तस्य॒ स्तृभि॒र्न नाकं॑ वच॒नस्य॒ विपः॑ ॥ १२ ॥

प्र वीराय प्र तवसे तुराय अजा यूथाऽइव पशुऽरक्षिः अस्तं ।
सः पिस्पृशति तन्वि श्रुतस्य स्तृऽभिः न नाकं वचनस्य विपाः ॥ १२ ॥

वीर्यशाली बलाढ्य आणि शीघ्र विजयी देवाकडे पशुपाल गाईंचा समूह विश्रांति स्थानी पाठवितो त्यप्रमाणे आपली माननीय स्तुति पाठवून दे. तारांनी आकाश सुशोभित दिसते त्याप्रमाणे तुझी अलंकृत स्तुती आहे. त्या लोकविख्यात कविच्या वाणीतील शब्द अगदी शरीरांत जाऊन भिडतात. ॥ १२ ॥


यो रजां॑सि विम॒मे पार्थि॑वानि॒ त्रिश्चि॒द्विष्णु॒र्मन॑वे बाधि॒ताय॑ ।
तस्य॑ ते॒ शर्म॑न्नुपद॒द्यमा॑ने रा॒या म॑देम त॒न्वा३तना॑ च ॥ १३ ॥

यः रजांसि विऽममे पार्थिवानि त्रिः चित् विष्णुः मनवे बाधिताय ।
तस्य ते शर्मन् उपऽदद्यमाने राया मदेम तन्वा तना च ॥ १३ ॥

ज्याने ह्य भूलोकांतील अंतरिक्ष प्रदेश पीडित झालेल्या भक्ताच्या सुखाकरितां तीनदा आक्रमण केला, त्या ह्या सर्वव्यापी विष्णू देवाचे आपले मंगलधाम आम्हास अर्पण करावे आणि तेथे दिव्य ऐश्वर्याने मंडित होऊन आम्ही स्वतः आणि आमची संतती ह्यांनी आनंदात निमग्न असावे असे घडो. ॥ १३ ॥


तन्नोऽहिर्बु॒ध्न्यो अ॒द्भि्र॒र्कैस्तत्पर्व॑त॒स्तत्स॑वि॒ता चनो॑ धात् ।
तदोष॑धीभिर॒भि रा॑ति॒षाचो॒ भगः॒ पुरं॑धिर्जिन्वतु॒ प्र रा॒ये ॥ १४ ॥

तन् नः अहिः बुध्न्यः अत्ऽभिः अर्कैः तत् पर्वतः तत् सविता चनः धात् ।
तत् ओषधीभिः अभि रातिसाचः भगः पुरंऽधिः जिन्वतु प्र राये ॥ १४ ॥

जगताच्या तळाशी राहणारा नाग, पर्वत, सविता हे दिव्योदक आणि "अर्क" ह्यांनी संतुष्ट होऊन आमच्या स्तोत्राविषयी आवड ठेवोत. तसेच हविंचा स्वीकार करणारा भाग्यदाता देव, सद्‍बुद्धि दाता देव औषधीसह येऊन दिव्य ऐश्वर्याकडे जाण्यास आम्हास प्रोत्साहन देवो. ॥ १४ ॥


नु नो॑ र॒यिं र॒थ्यं चर्षणि॒प्रां पु॑रु॒वीरं॑ म॒ह ऋ॒तस्य॑ गो॒पाम् ।
क्षयं॑ दाता॒जरं॒ येन॒ जना॒न्स्पृधो॒ अदे॑वीर॒भि च॒ क्रमा॑म॒ विश॒ आदे॑वीर॒भ्य१श्नवा॑म ॥१५॥

नु नः रयिं रथ्यं चर्षणिऽप्रां पुरुऽवीरं महः ऋतस्य गोपां । क्षयं
दात अजरं येन जनान् स्पृधः अदेवीः अभि च क्रमाम विश आऽदेवीः अभि अश्नवाम ॥ १५ ॥

रणांत अग्रेसर, सर्वांची मने वेधून टाकणारे, अनेक वीर सेवित असे जे तेज आहे, जे ऐश्वर्य आहे, ते सद्धर्म रक्षक ऐश्वर्य आणि अक्षय्य लोक आम्हांस द्या, म्हणजे त्याच्या जोरावर पाखंडी शत्रूचा आम्ही निःपात करूं आणि देवभक्तांना आपलेसे करू. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ५० ( अनेक देवता सूक्त )

ऋषी - ऋजिश्वान् बार्हस्पत्य : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


हु॒वे वो॑ दे॒वीमदि॑तिं॒ नमो॑भिर्मृळी॒काय॒ वरु॑णं मि॒त्रम॒ग्निम् ।
अ॒भि॒क्ष॒दाम॑र्य॒मणं॑ सु॒शेवं॑ त्रा॒तॄन्दे॒वान्स॑वि॒तारं॒ भगं॑ च ॥ १ ॥

हुवे वः देवीं अदितिं नमःऽभिः मृळीकाय वरुणं मित्रं अग्निं ।
अभिऽक्षदां अर्यमणं सुऽशेवं त्रातॄन् देवान् सवितारं भगं च ॥ १ ॥

अनंतशक्ति देवि अदिति, वरुण, मित्र, अग्नि, तोंड वेंगाडण्यास न लावतां उत्कृष्ट सौख्य देणारा अर्यमा, जगत्प्रेरक सविता आणि भग ह्यांना सौख्यलाभासाठी मी विनवीत आहे. भक्तरक्षक दिव्य विभूतींनाही हात जोडून पाचारण करीत आहे. ॥ १ ॥


सु॒ज्योति॑षः सूर्य॒ दक्ष॑पितॄननागा॒स्त्वे सु॑महो वीहि दे॒वान् ।
द्वि॒जन्मा॑नो॒ य ऋ॑त॒सापः॑ स॒त्याः स्वर्वन्तो यज॒ता अ॑ग्निजि॒ह्वाः ॥ २ ॥

सुऽज्योतिषः सूर्य दक्षऽपितॄन् अनागाःऽत्वे सुऽमहः वीहि देवान् ।
द्विऽजन्मानः ये ऋतऽसापः सत्याः स्वःऽवंतः यजता अग्निऽजिह्वाः ॥ २ ॥

प्रखरतेजस्क सूर्या, अमचा निर्दोषपणा दाखविण्याकरितां मानवांचे चातुर्य संपन्न पितर जे दिव्यकांतीमान् देव त्यांना जवळ बोलावून घे. जे पृथ्वीवर आणि द्युलोकांत अशा दोन्ही ठिकाणी प्रकट होतात, ते न्यायानुवर्ति, सत्याचरणी, अलौकिक तेजाने मंडित, परम पूज्य आहेत आणि अग्नि हीच त्यांची जिव्हा होय. ॥ २ ॥


उ॒त द्या॑वापृथिवी क्ष॒त्रमु॒रु बृ॒हद्रो॑दसी शर॒णं सु॑षुम्ने ।
म॒हस्क॑रथो॒ वरि॑वो॒ यथा॑ नोऽ॒स्मे क्षया॑य धिषणे अने॒हः ॥ ३ ॥

उत द्यावापृथिवीइति क्षत्रं उरु बृहत् रोदसीइति शरणं सुऽसुम्नेइतिसुऽसुम्ने ।
महः करथः वरिवः यथा नः अस्मेइति क्षयाय धिषणेइति अनेहः ॥ ३ ॥

आकाश, पृथिवीहो आमची राजसत्ता विस्तृत करा. हे रोदसींनो, तुम्ही महत्सौख्य देणार्‍या आहांत, तर आम्हाला तुमचा विपुल आश्रय आणि आंगांत ओजस्विता द्या; म्हणजे आम्हाला दुःखमुक्तिचा अनुभव मिळेल. हे जीवांना धारण करणार्‍या शक्तिंनो, आम्ही कुशल असावे म्हणून आम्हांस दोष रहित करा. ॥ ३ ॥


आ नो॑ रु॒द्रस्य॑ सू॒नवो॑ नमन्ताम॒द्या हू॒तासो॒ वस॒वोऽधृष्टाः ।
यदी॒मर्भे॑ मह॒ति वा॑ हि॒तासो॑ बा॒धे म॒रुतो॒ अह्वा॑म दे॒वान् ॥ ४ ॥

आ नः रुद्रस्य सूनवः नमंतां अद्य हूतासः वसवः अधृष्टाः ।
यद् ईं अर्भे महति वा हितासः बाधे मरुतः अह्वाम देवान् ॥ ४ ॥

रुद्रपुत्रांनो, तुम्ही दिव्य निधिचे धारक आहांत. तुमच्या पुढे उभे राहण्याचे धाडस कोणी करीत नाही. तुम्हास आम्ही पाचारण करीत आहों तर आम्हाकडे वळा. आमच्यावर कसलेंही लहान मोठे संकट येवो, आम्ही मरुत देवांना हांक मारूं. ॥ ४ ॥


मि॒म्यक्ष॒येषु॑ रोद॒सी नु दे॒वी सिष॑क्ति पू॒षा अ॑भ्यर्ध॒यज्वा॑ ।
श्रु॒त्वा हवं॑ मरुतो॒ यद्ध॑ या॒थ भूमा॑ रेजन्ते॒ अध्व॑नि॒ प्रवि॑क्ते ॥ ५ ॥

मिम्यक्ष येषु रोदसी नु देवी सिसक्ति पूषा अभ्यर्धऽयज्वा ।
श्रुत्वा हवं मरुतः यत् ह याथ भूम रेजंते अध्वनि प्रऽविक्ते ॥ ५ ॥

त्याच्या ठिकाणी ’रोदसी’ देवी तल्लीन झाली. उपासकाला समृद्ध करणारा पूषाही त्यांच्या बरोबरच असतो. आमचा धांवा ऐकून जेव्हां मरुतांनो, तुम्ही येतां, तेव्हां, तुमच्या खास मार्गावरील भुवने सुद्धा थरारून जातात. ॥ ५ ॥


अ॒भि त्यं वी॒रं गिर्व॑णसम॒र्चेन्द्रं॒ ब्रह्म॑णा जरित॒र्नवे॑न ।
श्रव॒दिद्धव॒मुप॑ च॒ स्तवा॑नो॒ रास॒द्वाजाँ॒ उप॑ म॒हो गृ॑णा॒नः ॥ ६ ॥

अभि त्यं वीरं गिर्वणसं अर्च इंद्रं ब्रह्मणा जरितः नवेन ।
श्रवत् इत् हवं उप च स्तवानः रासत् वाजान् उप महः गृणानः ॥ ६ ॥

हे स्तोत्रगायका, त्या स्तुतिकामुक इंद्राचे आपल्या अपूर्व प्रार्थना सुक्ताने भजन कर. त्याचे स्तवन केले असतां भक्ताची हांक ऐकून ताबडतोब त्यांना तो तेज आणि सत्वसामर्थ्यें अर्पण करील. ॥ ६ ॥


ओ॒मान॑मापो मानुषी॒रमृ॑क्तं॒ धात॑ तो॒काय॒ तन॑याय॒ शं योः ।
यू॒यं हि ष्ठा भि॒षजो॑ मा॒तृत॑मा॒ विश्व॑स्य स्था॒तुर्जग॑तो॒ जनि॑त्रीः ॥ ७ ॥

ओमानं आपः मानुषीः अमृक्तं धात तोकाय तनयाय शं योः ।
यूयं हि स्थ भिषजः मातृऽतमा विश्वस्य स्थातुः जगतः जनित्रीः ॥ ७ ॥

मानवहितार्थ झटणार्‍या दिव्योदकांनो, ह्या तुमच्या लहान अर्भकाच्या सुखासमाधानार्थ तुम्ही आपला निरामय आसरा आम्हांस द्या. तुम्ही आईपेक्षा जास्त कनवाळू आहांत, तुम्हीच आमचे औषध. ह्या यच्चावत् स्थावर जंगमाच्या माताही तुम्हीच आहांत. ॥ ७ ॥


आ नो॑ दे॒वः स॑वि॒ता त्राय॑माणो॒ हिर॑ण्यपाणिर्यज॒तो ज॑गम्यात् ।
यो दत्र॑वाँ उ॒षसो॒ न प्रती॑कं व्यूर्णु॒ते दा॒शुषे॒ वार्या॑णि ॥ ८ ॥

आ नः देवः सविता त्रायमाणः हिरण्यऽपाणिः यजतः जगम्यात् ।
यः दत्रऽवान् उषसः न प्रतीकं विऽऊर्णुते दाशुषे वार्याणि ॥ ८ ॥

जगद्‍रक्षक आणि परमपूज्य असा जगत्प्रेरक देव आमच्याकडे वारंवार येवो. त्याचे किरणरूप हस्त सुवर्णमयच आहेत; तो औदार्यशाली काय देणर नाही ? उषेचे सुंदर मुख तो आमच्या दृष्टीस पाडतो, त्याबरोबरच धर्मपरायण भक्ताला अमोलिक संपत्तीचे भांडारही तो उघड करतो. ॥ ८ ॥


उ॒त त्वं सू॑नो सहसो नो अ॒द्या दे॒वाँ अ॒स्मिन्न॑ध्व॒रे व॑वृत्याः ।
स्याम॒हं ते॒ सद॒मिद्रा॒तौ तव॑ स्याम॒ग्नेऽवसा सु॒वीरः॑ ॥ ९ ॥

उत त्वं सुनोइति सहसः नः अद्य आ देवान् अस्मिन् अध्वरे ववृत्याः ।
स्यां अहं ते सदं इत् रातौ तव स्यां अग्ने अवसा सुऽवीरः ॥ ९ ॥

हे सामर्थ्य प्रभावा अग्नि, आज ह्या आमच्या यागात दिव्य विभूतींना तूच वळवून आण. तुझ्या उदार देणगीचा निरंतर उपभोग घेत मी रहावे. आणि हे अग्नि, तुझा अनुग्रहाने मी उत्कृष्ट योद्धा व्हावे असे घडो. ॥ ९ ॥


उ॒त त्या मे॒ हव॒मा ज॑ग्म्यातं॒ नास॑त्या धी॒भिर्यु॒वम॒ङ्गन वि॑प्रा ।
अत्रिं॒ न म॒हस्तम॑सोऽमुमुक्तं॒ तूर्व॑तं नरा दुरि॒ताद॒भीके॑ ॥ १० ॥

उत त्या मे हवं आ जग्म्यातं नासत्या धीभिः युवं अङ्‌ग विप्रा ।
अत्रिं न महः तमसः अमुमुक्तं तूर्वतं नरा दुःऽइतात् अभीके ॥ १० ॥

सत्यस्वरूप अश्वींनो, मी केलेल्या अंतकरण पूर्वक प्रार्थनांनी कृपाळू होऊन माझ्या हांकेसरशी वारंवार तुमचे येणे होऊ द्या. गाढ अविद्या अंधकारांतून तुम्ही अत्रिऋषिंची मुक्तता केली, तर हे शूरांनो, संकटापासून आमचा त्वरित बचाव करा. ॥ १० ॥


ते नो॑ रा॒यो द्यु॒मतो॒ वाज॑वतो दा॒तारो॑ भूत नृ॒वतः॑ पुरु॒क्षोः ।
द॒श॒स्यन्तो॑ दि॒व्याः पार्थि॑वासो॒ गोजा॑ता॒ अप्या॑ मृ॒ळता॑ च देवाः ॥ ११ ॥

ते नः रायः द्युऽमतः वाजऽवतः दातारः भूत नृऽवतः पुरुऽक्षोः ।
दशस्यंतः दिव्याः पार्थिवासः गोऽजाताः अप्याः मृळत च देवाः ॥ ११ ॥

देवांनो, प्रकाशमय, सत्वसामर्थ्यमंडित, शूरपुरुष सेवित आणि अपार सामर्थ्यप्रद असे जे दिव्य ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्याचे दाते तुम्ही व्हा. द्युलोकांत किंवा पृथिवीवर प्रकट होणारे, प्रकाशांतून किंवा उदकांतून आविर्भूत होणारे तुम्ही देव आमच्यावर कृपा करा म्हणजे झाले. ॥ ११ ॥


ते नो॑ रु॒द्रः सर॑स्वती स॒जोषा॑ मी॒ळ्हुष्म॑न्तो॒ विष्णु॑र्मृळन्तु वा॒युः ।
ऋ॒भु॒क्षा वाजो॒ दैव्यो॑ विधा॒ता प॒र्जन्या॒वाता॑ पिप्यता॒मिषं॑ नः ॥ १२ ॥

ते नः रुद्रः सरस्वती सऽजोषा मीळ्हुष्मन्तः विष्णुः मृळंतु वायुः ।
ऋभुक्षाः वाजः दैव्यः विऽधाता पर्जन्यावाता पिप्यतां इषं नः ॥ १२ ॥

रुद्र, सरस्वती, विष्णु, वायु हे प्रेमळ दानशाली देव आम्हांवर कृपा करोत. ऋभुक्षा, वाज, देवलोकांतील शिभ्यी, किंवा पर्जन्यवात ह्यापैकीं कोणीही आमचा उत्साह बळावेल असे करो. ॥ १२ ॥


उ॒त स्य दे॒वः स॑वि॒ता भगो॑ नोऽ॒पां नपा॑दवतु॒ दानु॒ पप्रिः॑ ।
त्वष्टा॑ दे॒वेभि॒र्जनि॑भिः स॒जोषा॒ द्यौर्दे॒वेभिः॑ पृथि॒वी स॑मु॒द्रैः ॥ १३ ॥

उत स्यः देवः सविता भगः नः अपां नपात् अवतु दानु पप्रिः ।
त्वष्टा देवेभिः जनिऽभिः सऽजोषा द्यौः देवेभिः पृथिवी समुद्रैः ॥ १३ ॥

तसेच तो जगत्प्रेरक सविता, भाग्यदाता देव, किंवा विद्युत्प्रेरक देव हिमतुषांरांच्या वर्षावाने तृप्त करणारी विभूति आम्हांवर कृपानुग्रह करो. त्याचप्रमाणे तो वात्सल्यपूर्ण त्वष्टा, देवांगना, देव, द्यु, पृथिवी आणि समुद्र ह्यांच्यासह संतुष्ट होऊन अमचे रक्षण करो. ॥ १३ ॥


उ॒त नोऽहिर्बु॒ध्न्यः शृणोत्व॒ज एक॑पात्पृथि॒वी स॑मु॒द्रः ।
विश्वे॑ दे॒वा ऋ॑ता॒वृधो॑ हुवा॒नाः स्तु॒ता मन्त्राः॑ कविश॒स्ता अ॑वन्तु ॥ १४ ॥

उत नः अहिः बुध्न्यः शृणोतु अजः एकऽपात् पृथिवी समुद्रः ।
विश्वे देवाः ऋताऽवृधः हुवानाः स्तुताः मंत्राः कविऽशस्ताः अवंतु ॥ १४ ॥

तसेच अहिबुध्न्य, अजएकपात्, पृथिवी, समुद्र ह्यापैकी प्रत्येक आमची प्रार्थना ऐको. सद्धर्माचा उत्कर्ष करणारे सर्व देव, ज्यांची भक्त प्रार्थना करतात, स्तुति करतात, असे कविंनी प्रशंसा केलेले सर्व देव आणि ऋषिंना स्फुरलेले मंत्र आमचे संरक्षण करोत. ॥ १४ ॥


ए॒वा नपा॑तो॒ मम॒ तस्य॑ धी॒भिर्भ॒रद्वा॑जा अ॒भ्यर्चन्त्य॒र्कैः ।
ग्नाहु॒तासो॒ वस॒वोऽधृष्टा॒ विश्वे॑ स्तु॒तासो॑ भूता यजत्राः ॥ १५ ॥

एव नपातः मम तस्य धीभिः भरत्ऽवाजा अभि अर्चंति अर्कैः ।
ग्नाः हुतासः वसवः अधृष्टाः विश्वे स्तुतासः भूत यजत्राः ॥ १५ ॥

ह्याप्रमाणे त्याचे आणि माझे वंशज भारद्वाज, ध्यानानी आणि "अर्क" स्तुतींनी देवाची उपासना करीत आहेत. परमपूज्य अपराजित देव तसेच दिव्यांगना, दिव्य निधि ह्या सर्वांचा भक्तगण धांवा आणि स्तुति करोत. ॥ १५ ॥


ॐ तत् सत्


GO TOP