|
ऋग्वेद - मण्डल ६ - सूक्त २१ ते ३० ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त २१ ( इंद्र, विश्वेदेव सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र, विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्
इ॒मा उ॑ त्वा पुरु॒तम॑स्य का॒रोर्हव्यं॑ वीर॒ हव्या॑ हवन्ते ।
इमाः ऊंइति त्वा पुरुऽतमस्य कारोः हव्यं वीर हव्या हवंते ।
हे वीरा, तुझे स्तवन करणार्या सर्वोत्कृष्ट कवीचा हविर्भाग, त्याचे तुजकडे लागून राहिलेले लक्ष आणि त्याचा धांवा हे सर्व तुलाच, रथारूढ झालेला तू अजरामर देव, त्या तुला विनवीत आहेत. अपूर्व दिव्य संपत्ति, वैभव हे तुझ्याच आज्ञेने मिळत असते. ॥ १ ॥
तमु॑ स्तुष॒ इन्द्रं॒ यो विदा॑नो॒ गिर्वा॑हसं गी॒र्भिर्य॒ज्ञवृ॑द्धम् ।
तं उ स्तुष इन्द्रं यः विदानः गिर्वाहसं गीःऽभिः यज्ञऽवृद्धं ।
जो सर्वज्ञ, भक्तांच्या स्तुति ज्याला पोहोंचतात, जो यज्ञाने आनंदित होतो त्या इंद्राचे स्तवन मी ह्या स्तोत्रांनी करीत आहे. ज्याची माया अगाध अशा ह्या देवाचा महिमा त्याच्या प्रभवामुळे पृथ्वीचा विस्तार आणि आकाश ह्यांना व्यापून शेवटी उरलाच. ॥ २ ॥
स इत्तमो॑ऽवयु॒नं त॑त॒न्वत्सूर्ये॑ण व॒युन॑वच्चकार ।
सः इत् तमः अवयुनं ततन्वत् सूर्येण वयुनवत् चकार ।
धर्माधर्माची कांहीच खूण कळत नव्हती इतका निबिड अंधकार प्रथम त्यानेच पसरून दिला होता. परंतु ज्ञान सूर्याच्या योगाने त्याने हे जग पुनः असे केले कीं त्यात न्याय आणि सृष्टिनियम ह्यांच्या खुणा स्पष्ट दिसूं लागल्या. तेव्हां मर्त्यजन तुझी सेवा यज्ञद्वारा करण्यास उत्सुक झाले. एवंच तुझा सत्तेचा उपमर्द कधींच करीत नाहींत. ॥ ३ ॥
यस्ता च॒कार॒ स कुह॑ स्वि॒दिन्द्रः॒ कमा जनं॑ चरति॒ कासु॑ वि॒क्षु ।
यः ता चकार सः कुह स्वित् इन्द्रः कं आ जनं चरति कासु विक्षु ।
ही कृत्ये ज्याने केली तो इंद्र आहे तरी कोठे ? भक्ताजवळ कोणत्या प्रदेशात आहे ? हे देवा, कोणता यज्ञ तुझ्या मनाला संतोष देईल ? हे इंद्रा, कोणते "अर्क" स्तोत्र, कोणता यज्ञ होता तुझे अंतःकरण ओढून घेईल ॥ ४ ॥
इ॒दा हि ते॒ वेवि॑षतः पुरा॒जाः प्र॒त्नास॑ आ॒सुः पु॑रुकृ॒त्सखा॑यः ।
इदा हि ते वेविषतः पुराऽजाः प्रत्नासः आसुः पुरुऽकृत् सखायः ।
तुझी सेवा करणारे परंतु तुझे जिवलग मित्र म्हणविणारे आमचे पुरातन पूर्वज, हे विश्वकर्त्या, ह्याच ठिकाणी होते. तर हे असंख्यजनस्तुता देवा, मध्यमकालांतील आमचे पूर्वज, अगदी अलीकडील, आणि सर्वांत नवीन हे आम्ही, ह्या सर्वांच्याच स्थितीकडे तुझे लक्ष असूं दे. ॥ ५ ॥
तं पृ॒च्छन्तोऽवरासः॒ परा॑णि प्र॒त्ना त॑ इन्द्र॒ श्रुत्यानु॑ येमुः ।
तं पृच्छंतः अवरासः पराणि प्रत्ना ते इन्द्र श्रुत्या अनु येमुः ।
हे इंद्रा, तुला विचारून विचारूनच, तुझ्या संमतीनेच तुझ्या क्षुल्लक उपासकांनी सुद्धां सर्वोत्कृष्ट पुरातन आख्यानांचा अभ्यास केला. ब्रह्मस्तोत्राच्या नायका, हे वीरा आम्हांस जें काय यत्किंचित् अवगत असेल तितक्यावरच आम्ही तुझी उपासना करूं. ॥ ६ ॥
अ॒भि त्वा॒ पाजो॑ र॒क्षसो॒ वि त॑स्थे॒ महि॑ जज्ञा॒नम॒भि तत्सु ति॑ष्ठ ।
अभि त्वा पाजः रक्षसः वि तस्थे महि जज्ञानं अभि तत् सु तिष्ठ ।
राक्षसांच्या जोराचा सर्व भर तुझ्याच भोंवती आहे. उत्तरोत्तर बलाढ्य होणार्या त्याच्या सामर्थ्याला तू आळा घाल. आणि तुझा पुरातन प्राणमित्र जे तुझे वज्र त्याने हे धैर्यनिधे, त्यांना पार धुडकावून लाव. ॥ ७ ॥
स तु श्रु॑धीन्द्र॒ नूत॑नस्य ब्रह्मण्य॒तो वी॑र कारुधायः ।
सः तु श्रुधि इन्द्र नूतनस्य ब्रह्मण्यतः वीर कारुऽधायः ।
स्तोतृजनपोषका, वीरा इंद्रा, तुझ्या प्रार्थनेत निमग्न झालेल्या नवीन कवीच्या कवनांकडे लक्ष दे. कारण पुरातन काळी आमच्या वाडवडिलांनी कळकळीने हांक मारली असतां ती तात्काळ ऐकणारा त्यांचा खरा आप्त निरंतर तूच होतास. ॥ ८ ॥
प्रोतये॒ वरु॑णं मि॒त्रमिन्द्रं॑ म॒रुतः॑ कृ॒ष्वाव॑से नो अ॒द्य ।
प्र ऊतये वरुणं मित्रं इन्द्रं मरुतः कृष्व अवसे नः अद्य ।
वरुण मित्ररूपी इंद्र, आणि मरुत ह्यांना आमच्या रक्षणाकरितां, त्यांची आम्हांवर कृपा करावी म्हणून येथे घेऊन ये. पूषा, विष्णु, बुद्धिदाता अग्नि, कविता, ओषधी आणि पर्वत हांचेही स्तवन कर. ॥ ९ ॥
इ॒म उ॑ त्वा पुरुशाक प्रयज्यो जरि॒तारो॑ अ॒भ्यर्चन्त्य॒र्कैः ।
इम ऊंइति त्वा पुरुऽशाक प्रयज्योइतिप्रयज्यो जरितारः अभि अर्चंति अर्कैः ।
सर्वशक्तिमंता, परमपूज्य देवा, हे स्तोतजन "अर्क" स्तोत्रांनी तुझे अर्चन करीत आहेत. त्यांनी तुझा धांवा मांडला आहे, तर धांवा करणार्या भक्तांची हांक ऐक. हे मृत्युरहित, तुझा तोडीचा देव तुझ्या वांचून दुसरा कोणीच नाही. ॥ १० ॥
नू म॒ आ वाच॒मुप॑ याहि वि॒द्वान्विश्वे॑भिः सूनो सहसो॒ यज॑त्रैः ।
नू मे आ वाचं उप याहि विद्वान् विश्वेभिः सूओइति सहसः यजत्रैः ।
तू सर्व जाणतोसच, तर हे सामर्थ्यप्रभवा, तुझ्या सर्व पूज्य दिव्यविभूतींना माझी प्रार्थना श्रवण करण्यास घेऊन ये. तुझ्या दिव्य विभूति अशा आहेत कीं, अग्नि हीच त्यांची देदीप्यमान जिव्हा, आणि सनातन सत्य हेंच त्यांचे नित्यकर्म, त्यांनीच अधार्मिक दुष्टांना त्राही करून सोडणारा बलाढ्य मनु राजा उत्पन्न केला. ॥ ११ ॥
स नो॑ बोधि पुरए॒ता सु॒गेषू॒त दु॒र्गेषु॑ पथि॒कृद्विदा॑नः ।
सः नः बोधि पुरःऽएता सुऽगेषु उत दुःऽगेषु पथिऽकृत् विदानः ।
तू सन्मार्गदर्शक आहेस, सर्वज्ञ आहेस, तर सुखांत आणी संकटकालीही आमचा धुरीण तूच हो. तुझे अश्व कधी दमत नाहींत, ते विशाल व फार मजबूत आहेत, तेव्हां हे इंद्रा, अशा अश्वांच्या योगाने तू आम्हाला सर्व सामर्थ्याकडे घेऊन जा. ॥ १२ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त २२ ( संपात सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
य एक॒ इद् धव्य॑श्चर्षणी॒नामिन्द्रं॒ तं गी॒र्भिर॒भ्यर्च आ॒भिः ।
य एकः इत् हव्यः चर्षणीनां इंद्रं तं गीःऽभिः अभि अर्चे आभिः ।
सर्व मनुष्यांनी धंवा करण्यास योग्य असा एक इंद्रच होय. तर अशा इंद्राचे ह्या स्तुतिस्तोत्रांनी मी अर्चन करतो. ह्या स्तवनांनी तो वीरपुंगव प्रसन्न होवो. तो कामनावर्षक वीर सत्यस्वरुप, सत्वाढ्य आहे. त्याच्या मायेचा अंत नाही. तो विश्वजेता सर्व जगाचा प्रभु आहे. ॥ १ ॥
तमु॑ नः॒ पूर्वे॑ पि॒तरो॒ नव॑ग्वाः स॒प्त विप्रा॑सो अ॒भि वा॒जय॑न्तः ।
तं ऊंइति नः पूर्वे पितरः नवऽग्वाः सप्त विप्रासः अभि वाजयंतः ।
आमचे पुरातन पूर्वज सात ऋषी आणि नवग्व ह्या सर्वांनाच सात्विक सामर्थ्यांची लालसा होती, व त्यांनी ध्यानस्फुरित सूक्तांनी अरिमर्दन, तीव्रविक्रमी, मेघमंडलाधिष्ठित, मधुरभाषी, अतुलप्रतापी इंद्राची स्तुति केली. ॥ २ ॥
तमी॑मह॒ इन्द्र॑मस्य रा॒यः पु॑रु॒वीर॑स्य नृ॒वतः॑ पुरु॒क्षोः ।
तं ईमहे इन्द्रं अस्य रायः पुरुऽवीरस्य नृऽवतः पुरुऽक्षोः ।
त्या इंद्रापुढे आम्ही पदर पसरतो. वीरनायक, वीरश्रेष्ठ आणि अमितबल जो इंद्र त्याच्यापाशी दिव्य ऐश्वर्याची याचना करतो. ते अपरंपार, अक्षय्य, आदि दिव्य आहे. हे हरिदश्वनायका, त्या वैभवाने आम्ही आंअंदमग्न व्हावे म्हणून ते आम्हांस अर्पण कर. ॥ ३ ॥
तन्नो॒ वि वो॑चो॒ यदि॑ ते पु॒रा चि॑ज्जरि॒तार॑ आन॒शुः सु॒म्नमि॑न्द्र ।
तत् नः वि वोचः यदि ते पुरा चित् जरितारः आनशुः सुम्नं इन्द्र ।
प्राचीनकाळी भक्तजनांना तुझे आनंद धाम जर प्राप्त झालेले आहे तर ते कसे ते आम्हांस समजावून सांग. बलसागरा, अमितवीर्या, सर्वजनस्तुता, अपारनिधे इंद्रा, तुझा हविभाग कोणता ? तारुण्यावर्धक भोज्य कोणते तेही सांग. आपणांस ईश्वर म्हणविणार्या राक्षसांचा नायनाट करणारा तूच आहेस. ॥ ४ ॥
तं पृ॒च्छन्ती॒ वज्र॑हस्तं रथे॒ष्ठामिन्द्रं॒ वेपी॒ वक्व॑री॒ यस्य॒ नू गीः ।
तं पृच्छ्ंन्ती वज्रऽहस्तं रथेऽस्थां इन्द्रं वेपी वक्वरी यस्य नू गीः ।
त्या वज्रधारी रथारूढ इंद्राला, ज्याची पकड कधीही ढिली पडत नाही, तो अत्यंत कार्यक्षम आणि उत्साहप्रद अशा इंद्राला - ज्या भक्ताची वक्तृत्वपूर्ण स्तुति मोठ्या मिनतवारीने सर्वकांही विचारून घेते. असाच भक्त सुखमार्ग उत्साहप्राप्ति आणि भीषणबल साध्य करून घेतो. ॥ ५ ॥
अ॒या ह॒ त्यं मा॒यया॑ वावृधा॒नं म॑नो॒जुवा॑ स्वतवः॒ पर्व॑तेन ।
अया ह त्यं मायया ववृधानं मनःऽजुवा स्वऽतवः पर्वतेन ।
ज्या तुझा प्रताप स्वतःसिद्ध आहे अशा इंद्रा, हे अपारतेजस्का, माजलेला शत्रु आणि त्याचे अढळ दुर्भेद्य किल्ले हे तू आपल्या ह्या ईश्वरी मायेने आणि मनाप्रमाणे वेगाने जाणार्या पर्वतास्त्राच्या योगाने फोडून टाकलेस. विकसित सामर्थ्या तू आपल्या धडाडीने ते मजबूत दुर्गहि फोडुन टाकलेस. ॥ ६ ॥
तं वो॑ धि॒या नव्य॑स्या॒ शवि॑ष्ठं प्र॒त्नं प्र॑त्न॒वत्प॑रितंस॒यध्यै॑ ।
तं वः धिया नव्यस्या शविष्ठं प्रत्नं प्रत्नऽवत् परिऽतंसयध्यै ।
तुमच्यासाठी ध्यानस्फुरित अपूर्व स्तोत्राने प्राचीन काळच्या पद्धतिप्रमाणे त्या पुराण पुरुषाला सुशोभित करूं. ह्या इंद्राला अंतपार नाही, हा उत्तम धुरीण आहे तर हा अत्यंत बिकट अशा सर्व संकटांतून आम्हांस पार नेवो. ॥ ७ ॥
आ जना॑य॒ द्रुह्व॑णे॒ पार्थि॑वानि दि॒व्यानि॑ दीपयोऽ॒न्तरि॑क्षा ।
आ जनाय द्रुह्वणे पार्थिवानि दिव्यानि दीपयः अंतरिक्षा ।
अपायकारक जे दुष्ट आहेत त्यांच्या प्रतिकारार्थ पृथ्वी, आकाश आणि अंतरिक्ष ह्यांतील प्रदेश तू सुप्रकाशित करून ठेवलेच आहेस. पण हे मनोरथवर्षक वीरा आपल्या प्रखर तेजाने आतां त्या राक्षसांना चोहोंबाजूने होरपळून टाक, आणि प्रार्थनासूक्तांचा तिटकारा करणार्या अधमाच्या नाशार्थ पृथ्वी व पाणी हे अतां तप्त कर. ॥ ८ ॥
भुवो॒ जन॑स्य दि॒व्यस्य॒ राजा॒ पार्थि॑वस्य॒ जग॑तस्त्वेषसंदृक् ।
भुवः जनस्य दिव्यस्य राजा पार्थिवस्य जगतः त्वेषऽसंदृक् ।
तुझे स्वरूप जाज्वल्य, तू स्वर्गांतील विभूतींचा व तसाच ह्या पृथ्वीवरील चराचर वस्तूंचा मालक आहेस. तर हे इंद्रा आपल्या उजव्या हातांत वज्र घे. हे अक्षया, सर्व माया सर्व चातुर्य तू देतोस. ॥ ९ ॥
आ सं॒यत॑मिन्द्र णः स्व॒स्तिं श॑त्रु॒तूर्या॑य बृह॒तीममृ॑ध्राम् ।
आ संऽयतं इन्द्र नः स्वस्तिं शत्रुऽतूर्याय बृहतीं अमृध्रां ।
इंद्रा, शत्रु पराभवार्थ आमची उन्नति कर. ती अशी की, ती श्रेष्ठ, अक्षय्य, आणि दृढ असावी. जिच्या योगाने अधार्मिक आणि अज्ञानी शत्रूंना तू आर्य केलेस आणि हे वज्रधरा, नहुषांना वीरपुत्रयुक्त केलेस. ॥ १० ॥
स नो॑ नि॒युद्भिः॑व पुरुहूत वेधो वि॒श्ववा॑राभि॒रा ग॑हि प्रयज्यो ।
सः नः नियुत्ऽभिः पुरुऽहूत वेधः विश्वऽवाराभिः आ गहि प्रयज्योइतिप्रयज्यो ।
अखिलजनस्तुता, हे जगत् नियामका, हे परमपूज्या, सर्व जगाला जे हवेहवेसे वाटतात अशा आपल्या नियुत अश्वावर आरूढ होऊन आगमन कर. देवता असो वा मनुष्य किंवा राक्षस असो कोणीच त्यांना आवरून धरूं शकत नाही तर अशा घोड्यावर आरोहण करून माझ्याकडे ये. ॥ ११ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त २३ ( इंद्र सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
सु॒त इत्त्वं निमि॑श्ल इन्द्र॒ सोमे॒ स्तोमे॒ ब्रह्म॑णि श॒स्यमा॑न उ॒क्थे ।
सुत इत् त्वं निऽमिश्लः इंद्र सोमे स्तोमे ब्रह्मणि शस्यमाने उक्थे ।
इंद्रा, तू केव्हां केव्हां सोमरसाला लुब्ध होऊन, व कधी कधी भक्तांची स्तवने, प्रार्थनासूक्ते अथवा सामगायन गात असतांना तल्लीन होऊन, हे भगवंता, इंद्रा, अश्व जोडलेल्या रथांत वसून व खांद्यावर वज्र टाअकून भक्तांकडे जातोस. ॥ १ ॥
यद्वा॑ दि॒वि पार्ये॒ सुष्वि॑मिन्द्र वृत्र॒हत्येऽवसि॒ शूर॑सातौ ।
यत् वा दिवि पार्ये सुस्विं इंद्र वृत्रऽहत्ये अवसि शूरऽसातौ ।
तसेच हे इंद्रा, शूरभक्त विजय संपादनार्थ झगडत असतां शत्रूचा वध व्हावा म्हणून ऐन आणीबाणीच्या वेळेस तू सोमार्पण करणार्या भक्तांचे रक्षणच करतोस. किंवा हे इंद्र तुला कसलीच भीति नाही तेव्हां, जय मिळेल की नाही अशा विषयी साशंक असणार्या चतुर भक्तांच्या कह्यांत अधार्मिक दुष्टांना तू आणतोस. ॥ २ ॥
पाता॑ सु॒तमिन्द्रो॑ अस्तु॒ सोमं॑ प्रणे॒नीरु॒ग्रो ज॑रि॒तार॑मू॒ती ।
पाता सुतं इंद्रः अस्तु सोमं प्रऽनेनीः उग्रः जरितारं ऊती ।
इंद्र सोमरसाचे प्राशन करो. तो उग्ररूपदेव आपल्या संरक्षक सहायाने भक्ताचा मार्गदर्शक होवो. सोमापर्ण करणार्या वीराला अनिर्बंध स्थान देवो आणि स्तवन कर्त्या कवीला अभीष्ट अशी अमोलिक वस्तू अर्पण करो. ॥ ३ ॥
गन्तेया॑न्ति॒ सव॑ना॒ हरि॑भ्यां ब॒भ्रिर्वज्रं॑ प॒पिः सोमं॑ द॒दिर्गाः ।
गंन्ता इयन्ति सवना हरिऽभ्यां बभ्रिः वज्रं पपिः सोमं ददिः गाः ।
येवढेंसे जरी सवन असले तरी त्या सवनाला इंद्र आपल्या अश्वावर आरूढ होऊन जातोच. हातांत वज्र घेतो; भक्तांकडे येऊन सोम प्राशन करतो आणि ज्ञान धेनूं त्यांस देतो. लोकांचे हित करणारा जो वीर असेल त्यास इंद्र सर्वांत श्रेष्ठ करतो. सर्वस्तुति त्याला साजतात, गुणकीर्तन करणार्या भक्ताची हांक तो ऐकतो. ॥ ४ ॥
अस्मै॑ व॒यं यद्वा॒वान॒ तद्वि॑विष्म॒ इन्द्रा॑य॒ यो नः॑ प्र॒दिवो॒ अप॒स्कः ।
अस्मै वयं यत् वावान तत् विविष्मः इंद्राय यः नः प्रऽदिवः अपः करितिकः ।
ह्या इंद्राला जशी उपासना हवी तशीच त्याची सेवा आम्ही केली. पुरातन काळापासून आमची कार्ये तोच करीत आला अहे. सोमरस सिद्ध करून, व सामसूक्तांनी संकीर्तन करून, इंद्राला आमचे प्रार्थनासूक्त ज्या रीतीने संतोषप्रद होईल तशाच रीतीने आम्ही त्याचे स्तवन करतो. ॥ ५ ॥
ब्रह्मा॑णि॒ हि च॑कृ॒षे वर्ध॑नानि॒ ताव॑त्त इन्द्र म॒तिभि॑र्विविष्मः ।
ब्रह्माणि हि चकृषे वर्धनानि तावत् ते इंद्र मतिऽभिः विविष्मः ।
प्रार्थना सूक्तांना संतोषप्रद शक्ति तूच दिली आहेस. म्हणूनच हे इंद्रा ध्यानस्फुरित स्तोत्रांनी आम्ही तुझी सेवा करीत असतो. तर हे सोमप्रिया देवा, सोमरस सिद्ध करून तुला अत्यंत आल्हाददायक आणि रम्य वाटणारे अर्चन यज्ञद्वारा करू असे घडो. ॥ ६ ॥
स नो॑ बोधि पुरो॒ळाशं॒ ररा॑णः॒ पिबा॒ तु सोमं॒ गोऋ॑जीकमिन्द्र ।
सः नः बोधि पुरोळाशं रराणः पिब तु सोमं गोऽऋजीकं इंद्र ।
तू आनंदमग्न आहेसच, तर आमच्या ह्या पुरोडाशाकडे जरा दृष्टि फेंक. इंद्रा हा गोदुग्ध मिश्रित सोमरस प्राशन कर. हे यजमानाने अर्पण केलेले कुशासन, त्याच्यावर आरोहण कर आणि तुझ्या दासाला अनिर्बंध स्थान दे. । ७ ॥
स म॑न्दस्वा॒ ह्यनु॒ जोष॑मुग्र॒ प्र त्वा॑ य॒ज्ञास॑ इ॒मे अ॑श्नुवन्तु ।
सः मन्दस्व हि अनु जोषं उग्र प्र त्वा यज्ञासः इमे अश्नुवन्तु ।
हे उग्ररूपा, तुझ्या इच्छेप्रमाणे तू दृष्टचित्त हो. हे आमचे यज्ञयाग तुला पोहोंचोत. अखिलजन सेविता, हा आमचा धांवा तुझ्या कानी पडो. इंद्रा, आमची खरी अंतःकरण प्रवृत्ति, आमच्यावर तुझी कृपा व्हावी म्हणून तुला इकडे वळवून आणो. ॥ ८ ॥
तं वः॑ सखायः॒ सं यथा॑ सु॒तेषु॒ सोमे॑भिरीं पृणता भो॒जमिन्द्र॑म् ।
तं वः सखायः सं यथा सुतेषु सोमेभिः ईं पृणता भोजं इंद्रं ।
मित्रांनो, तुम्ही आपले सोमरस सिद्ध करून ह्या औदार्यशील इंद्राला सोमरसाने यथेच्छ तृप्त करा. आमची उन्नति व्हावी असे त्याला वाटत नसेल काय. असेलच व म्हणूनच तो सोमार्पण करणार्या भक्ताला आपल्या कृपेंत अंतर देत नाही. ॥ ९ ॥
ए॒वेदिन्द्रः॑ सु॒ते अ॑स्तावि॒ सोमे॑ भ॒रद्वा॑जेषु॒ क्षय॒दिन्म॒घोनः॑ ।
एव इत् इंद्रः सुते अस्तावि सोमे भरत्ऽवाजेषु क्षयत् इत् मघोनः ।
ह्याप्रमाणे सोमरस सिद्ध करून, सर्व दात्यांमध्ये श्रेष्ठ जो इंद्र त्याचीच स्तुति भरद्वाजांच्या घराण्यांत होत आली आहे. ह्या स्तुतीने तो भक्तांचा धुरीण होईल असे घडो. कारण सर्व जग ज्या ऐश्वर्याविषयी लालस असते ते दिव्य ऐश्वर्य देतो. ॥ १० ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त २४ ( इंद्र सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
वृषा॒ मद॒ इन्द्रे॒ श्लोक॑ उ॒क्था सचा॒ सोमे॑षु सुत॒पा ऋ॑जी॒षी ।
वृषा मदः इंद्रे श्लोकः उक्था सचा सोमेषु सुतऽपाः ऋजीषी ।
वीर्यदर्शक वीरश्री, कीर्ति, आणि सामसूक्ते ही इंद्रामध्ये एकत्र होतात. सोमयागांत तो तीव्रवेग इंद्र सोमरस प्राशन करतो. सामसूक्तांनी ज्याची उपासना करावी तो आकाशस्थ भगवान इंद्र वीरांकरिता सकल स्तुतींचा प्रभु होतो. व त्याचे रक्षण अखंड होय. ॥ १ ॥
ततु॑रिर्वी॒रो नर्यो॒ विचे॑ताः॒ श्रोता॒ हवं॑ गृण॒त उ॒र्व्यूतिः ।
ततुरिः वीरः नर्यः विऽचेताः श्रोता हवं गृणतऽ उर्विऽऊतिः ।
इंद्र असा आहे की तो तत्काळ विजयी होतो. तो लोकहितकर महा विचक्षण, उपासकांची हांक ऐकणारा आहे. त्याचे रक्षण अपार, तो दिव्यनिधि लोकांना स्तुत्य, तो कविजनांचा पोषक आणि सत्वाढ्यवीर आहे. यज्ञसभेत त्यांची स्तुति केली असता तो भक्तांना सत्वसामर्थ्य देतो. ॥ २ ॥
अक्षो॒ न च॒क्र्योः शूर बृ॒हन्प्र ते॑ म॒ह्ना रि॑रिचे॒ रोद॑स्योः ।
अक्षः न चक्र्योः शूर बृहन् प्र ते मह्ना रिरिचे रोदस्योः ।
चाकांचा आंस त्याच्यांतून आरपार जातो त्याप्रमाणे, हे शूरा, तुझ्या प्रतापाने तुझा महिमा पृथ्वी आणि आकाश गोल ह्यांना भेदून गेला आहे. वृक्षाच्या शाखाप्रमाणे हे अखिलजनसेविता इंद्रा, तुझी असंख्य साधने तुझ्यापासून प्रादुर्भुत होतात. ॥ ३ ॥
शची॑वतस्ते पुरुशाक॒ शाका॒ गवा॑मिव स्रु॒तयः॑ सं॒चर॑णीः ।
शचीऽवतः ते पुरुशाक शाकाः गवांऽइव स्रुतयः संऽचरणीः ।
अपारशक्ते देवा, तू दिव्यशक्तिमान् आहेस तेव्हां तुझी सामर्थ्ये इतकी आहेत कीं प्रकाशधेनूंच्या समूहाप्रमाणे ती सर्वत्रच संचार करीत असतात. हे महोदरा वांसरांच्या गळ्याला बांधलेल्या दोरीप्रमाणे तुझी न्यायबंधने ही खरोखरच बंधने नव्हेतच. ॥ ४ ॥
अ॒न्यद॒द्य कर्व॑रम॒न्यदु॒ श्वोऽ॑सच्च॒ सन्मुहु॑राच॒क्रिरिन्द्रः॑ ।
अन्यत् अद्य कर्वरं अन्यत् ऊंइति श्वः असत् च सत् मुहुः आऽचक्रिः इंद्रः ।
तुझी करामत आज एक प्रकारची तर उद्यां दुसर्याच प्रकारची. ह्याप्रमाणे इंद्र हा "असत्याचे नसते आणि नसत्याचे असते" करून टाकतो. आणि ह्या लोकी तोच मित्र वरुण पूषा होऊन सेवकजनांचा पुरस्कर्ता होतो. ॥ ५ ॥
वि त्वदापो॒ न पर्व॑तस्य पृ॒ष्ठादु॒क्थेभि॑रिन्द्रानयन्त य॒ज्ञैः ।
वि त्वत् आपः नः पर्वतस्य पृष्ठात् उक्थेभिः इंद्र अनयंत यज्ञैः ।
पर्वताच्या शिखरावरून आणल्याप्रमाणे, हे इंद्रा सामसूक्तांनी आणि यज्ञांच्या योगाने तुझ्याकडून भक्तांनी उदक वृष्टि करविली. हे स्तुतीच्या धारका, लढाऊ घोडे युद्धाला जातात त्याप्रमाणे अशाच प्रकारच्या स्तुतींनी सर्व सामर्थ्योत्सुकजन तुझ्याकडे धांवत गेले. ॥ ६ ॥
न यं जर॑न्ति श॒रदो॒ न मासा॒ न द्याव॒ इन्द्र॑मवक॒र्शय॑न्ति ।
न यं जरंति शरदः न मासा न द्यावः इंद्रं अवऽकर्शयंति ।
कितीही महिने वा शरदऋतु लोटले तरी ज्याला वार्धक्य येत नाही, ज्या इंद्राला असंख्य दिवस सुद्धां दौर्बल्य आणूं शकत नाहीत असा जो अती विशाल इंद्र त्याचे दिव्य शरीर, आमच्या स्तवनांनी आणि सामगायनांनी त्याचे संकीर्तन झाल्यामुळे आणखी वृद्धिंगत होवो. ॥ ७ ॥
न वी॒ळवे॒ नम॑ते॒ न स्थि॒राय॒ न शर्ध॑ते॒ दस्यु॑जूताय स्त॒वान् ।
न वीळवे नमते न स्थिराय न शर्धते दस्युऽजूताय स्तवान् ।
ज्याचे यशोवर्णन होतच असते असा हा इंद्र कोणत्याही ताठर माणसापुढे लवत नाही. हट्टाने अडून बसलेल्यापुढे वांकत नाही किंवा धर्मभ्रष्ट लोकांनी पाठविलेल्या मारेकर्यांपुढेही मान खाली करीत नाही. गगनचुंबी पर्वत इंद्राला मैदानाप्रमाणे सखल वाटतात आणि अत्यंत खोल जलाशय त्याच्यापुढे उथळ होतात. ॥ ८ ॥
ग॒म्भी॒रेण॑ न उ॒रुणा॑मत्रि॒न्प्रेषो य॑न्धि सुतपाव॒न्वाजा॑न् ।
गंभीरेण नः उरुणा अमत्रिन् प्र इषः यंधि सुतऽपावन् वाजान् ।
आपल्या गंभीर आणि दूरवर ऐकू जाणार्या वाणीने हे भीमपराक्रमा, आम्हांला उत्साह दे. सोमप्रिया सत्वसामर्थ्यही दे. तुला कधी अपाय होणेंच नाही, व आता ही चिंताभय रात्र संपून दिशा उजळल्या आहेत तर आपल्या संरक्षण साधनानिशी आमच्या सहायार्थ सज्ज होऊन रहा. ॥ ९ ॥
सच॑स्व ना॒यमव॑से अ॒भीक॑ इ॒तो वा॒ तमि॑न्द्र पाहि रि॒षः ।
सचस्व नायं अवसे अभीके इतः वा तं इंद्र पाहि रिषः ।
कृपा करून आमच्या धुरीणाच्या पाठीवर रहा. इंद्रा सर्वबाजूने त्याचा हानिपासून बचाव कर. घरी दारी आणि अरण्यांत सुद्धां त्याला अपाय होऊं देऊं नको व आमच्या शूरवीरांसह शेकडो वर्षे आम्ही आनंदमग्न राहूं असे कर. ॥ १० ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त २५ ( इंद्र सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
या त॑ ऊ॒तिर॑व॒मा या प॑र॒मा या म॑ध्य॒मेन्द्र॑ शुष्मि॒न्नस्ति॑ ।
या ते ऊतिः अवमा या परमा या मध्यमा इंद्र शुष्मिन् अस्ति ।
हे उग्रा इंद्रा, तुझी कनिष्ठ, मध्यम, व उत्कट अशी सर्व प्रकारची सहाय्य सामग्री आम्हांस येऊन, आमच्या कोंडमारा करणार्या शत्रूचा नाश करण्याच्या कामी आम्हांस मदत कर. हे घोररूपा तू थोरच आहेस. तेव्हां अशी सामग्री आणि सत्वयुक्तसामर्थ्य आम्हांस देऊन त्यायोगाने आम्हांवर कृपा कर. ॥ १ ॥
आभिः॒ स्पृधो॑ मिथ॒तीररि॑षण्यन्न॒मित्र॑स्य व्यथया म॒न्युमि॑न्द्र ।
आभि स्पृधः मिथतीः अरिषण्यन् अमित्रस्य व्यथय मन्युं इंद्र ।
आमच्याशी झुंजणार्या शत्रुसेनेला ह्याच सामर्थ्याने जर्जर कर. इंद्रा, तुला कोणताही अपाय होणे शक्यच नाही तर असा तू शत्रूच्या त्वेषाची नांगी मोडून टाक, आणि आमच्यावर हल्ला करणार्या व सर्वत्र पसरलेल्या अधार्मिक शत्रूंच्या यच्चावत् टोळ्यांना आम्हा आर्यांपुढे दांती तृण धरावयास लाव. ॥ २ ॥
इन्द्र॑ जा॒मय॑ उ॒त येऽजामयोऽर्वाची॒नासो॑ व॒नुषो॑ युयु॒ज्रे ।
इन्द्र जामयः उत ये अजामयः अर्वाचीनासः वनुषः युयुज्रे ।
इंद्रा, आमचा नाश करावयास टपलेले शत्रु, मग ते नातलग असोत की तिऱ्हाईत असोत, आमच्या समोर दंड थोपटून जे उभे राहतील, त्यांची ती धमक तू पार ढिली पाडून त्यांचा संहार कर. त्यांच्या त्या शूर (!) सेनेला जीव मुठीत धरून पळावयास लाव. ॥ ३ ॥
शूरो॑ वा॒ शूरं॑ वनते॒ शरी॑रैस्तनू॒रुचा॒ तरु॑षि॒ यत्कृ॒ण्वैते॑ ।
शूरः वा शूरं वनते शरीरैः तनूरुचा तरुषि यत् कृण्वैतेइति ।
पोराबाळांच्या राक्ष्णार्थ, प्रकाशाच्या लाभासाठी, दिव्योदकाच्या प्राप्तिसाठी किंवा सुपीक प्रदेशाच्या मालकीसाठी परस्पर विरुद्ध सैन्यें गर्जना करूं लागतात. त्यांच्या आंगावरील चिलखतांच्या चकाकीच्या तोर्यांतच युद्धांत सामील होतात, तेव्हांच परस्परांचे शूर सैनिक स्वतः जातीने तुटून पडून शत्रूकडील सैनिकास मारतात. ॥ ४ ॥
न॒हि त्वा॒ शूरो॒ न तु॒रो न धृ॒ष्णुर्न त्वा॑ यो॒धो मन्य॑मानो यु॒योध॑ ।
नहि त्वा शूरः न तुरः न धृष्णुः न त्वा योधः मन्यमानः युयोध ।
कोणीही योद्धा, मग तो आपणांस शूर समजो, तडफदार मानो, अथवा धैर्याचा पुतळा म्हणून म्हणो, तुझ्याशी युद्ध करण्याला धजला नाही. इंद्रा, तुला कोणीही प्रतिस्पर्धी नाही आणि तूंच उलट सर्व वस्तुमात्राला घेरून टाकले आहेस. ॥ ५ ॥
स प॑त्यत उ॒भयो॑र्नृ॒म्णम॒योर्यदी॑ वे॒धसः॑ समि॒थे हव॑न्ते ।
सः पत्यते उभयोः नृम्णं अयोः यदी वेधसः संइथे हवन्ते ।
दोन्ही बाजूचे धुरंधर सेनापति युद्धांत तुलाच हांक मारतात, म्हणून त्या दोन्हीही सैन्यांच्या शौर्यावर ताबा तुझाच असतो. आपल्या सैन्याचा व्यूह विस्तृत करून संग्रामांत किंवा शूर शिपायांनी रक्षण करीत असतां एखादे महत्वाचे ठिकाण घेण्याकरितां जेव्हा सैन्ये एकमेकास वेढू लागता तेव्हांही त्यांच्यावर तुझीच सत्ता असते. ॥ ६ ॥
अध॑ स्मा ते चर्ष॒णयो॒ यदेजा॒निन्द्र॑ त्रा॒तोत भ॑वा वरू॒ता ।
अध स्म ते चर्षणयः यत् एजान् इंद्र त्राता उत भव वरूता ।
म्हणून तुझे लोक (आम्ही) कूच करू लागतो अशा वेळेस तू आमचा रक्षक आणि त्राता हो. इंद्रा, आमचे अत्यंत शूर आर्य धुरंधर जे आमचे पुढारी झाले आहेत त्यांचाही तू रक्षक हो. ॥ ७ ॥
अनु॑ ते दायि म॒ह इ॑न्द्रि॒याय॑ स॒त्रा ते॒ विश्व॒मनु॑ वृत्र॒हत्ये॑ ।
अनु ते दायि महे इन्द्रियाय सत्रा ते विश्वं अनु वृत्रऽहत्ये ।
तुझ्या श्रेष्ठतम ईश्वरी सामर्थ्यास अनुलक्षून, तू वृत्रासारख्या महाबलाढ्य दुष्टास ठार मारलेस हे पाहून सर्व देवांनी, यच्चावत् क्षात्रपराक्रम तुझ्यामध्ये सांठविलेला आहे हे मान्यच केले आहे. हे परमपूज्या इंद्रा, शूरांचा दर्प तू हरण करतोस हे जाणून शत्रुदमन शक्तीचाही प्रत्यय त्यांस आला. ॥ ८ ॥
ए॒वा न॒ स्पृधः॒ सम॑जा स॒मत्स्विन्द्र॑ रार॒न्धि मि॑थ॒तीरदे॑वीः ।
एव नः स्पृधः सं अज समत्ऽसु इंद्र रारंधि मिथतीः अदेवीः ।
इंद्रा, ह्या प्रमाणे समरांगणांतून आमच्या प्रतिस्पर्ध्यांना हांकून लाव, आणि आम्हांला उपद्रव देणार्या देवभक्तिविहीन दुष्टांना आमच्या स्वाधीन कर. तसेच हे इंद्रा, आम्ही भरद्वाज तुझे असून तुझे स्तवन करतो, तर तुझ्या कृपेने ह्या उषःकाली आम्हांस अभीष्ट लाभ होवो. ॥ ९ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त २६ ( इंद्र सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
श्रु॒धी न॑ इन्द्र॒ ह्वया॑मसि त्वा म॒हो वाज॑स्य सा॒तौ वा॑वृषा॒णाः ।
श्रुधी नः इंद्र ह्वयामसि त्वा महः वाजस्य सातौ वावृषाणाः ।
इंद्रा आमची हांक ऐक; श्रेष्ठ अशा सत्वसामर्थ्याच्या प्राप्तिकरिता झगडा चालू आहे, त्यांत आम्ही शौर्य गाजवू इच्छितो म्हणून तुझा धांवा आम्ही करीत आहो. ह्या वीरांच्या दंगलीत सर्व शूरलोक एकत्र झाले आहेत, तर आमच्या कठीण प्रसंगी तुझा शत्रुभयानक व संरक्षक प्रसाद आम्हांस दे. ॥ १ ॥
त्वां वा॒जी ह॑वते वाजिने॒यो म॒हो वाज॑स्य॒ गध्य॑स्य सा॒तौ ।
त्वां वाजी हवते वाजिनेयः महः वाजस्य गध्यस्य सातौ ।
वाजिनीचा शत्वशूर पुत्र, अत्यंत विलोभनीय असे जे सामर्थ्य आहे, त्याच्या संपादनार्थ तुला हांक मारीत आहे. हे इंद्रा, तू सज्जनप्रतिपालक, संकटमोचन, म्हणून प्रकाशधेनूंकरितां चाललेल्या घोर युद्धांत केवळ आपल्या मनगटाच्या जोरांवर लढणारा, हा वीर तुझ्याच कडे दृष्टि लावतो. ॥ २ ॥
त्वं क॒विं चो॑दयोऽ॒र्कसा॑तौ॒ त्वं कुत्सा॑य॒ शुष्णं॑ दा॒शुषे॑ वर्क् ।
त्वं कविं चोदयः अर्कऽसातौ त्वं कुत्साय शुष्णं दाशुषे वर्क् ।
स्तोत्र प्रबंध रचनेत कविंना प्रेरणा तूच केली आहेस, आणि आपल्या कुत्स नामक भक्ताकरितां शुष्णाचा शिरच्छेद तूच केलास. अतिथिग्वाकरितां प्रशंसनीय कार्य करण्याच्या हेतूने, ज्याला मर्मस्थानच मुळी नव्हते अशा अहिचे मस्तक तूंच पार उडवून दिलेस. ॥ ३ ॥
त्वं रथं॒ प्र भ॑रो यो॒धमृ॒ष्वमावो॒ युध्य॑न्तं वृष॒भं दश॑द्युम् ।
त्वं रथं प्र भरः योधं ऋष्वं आवः युध्यन्तं वृषभं दशऽद्युं ।
तू आपला रथ पुढें लोटून, महाभाग वीरपुंगव दशद्यु म्हणून एक योद्धा लढत होता त्याचे सहाय्य केलेस, वेतसु करितां एकदम तू तुग्राला ठार मारलेस, आणि तुझे भजन करणारा तुझा भक्त त्याचा, हे इंद्रा, तू उत्कर्ष केलास. ॥ ४ ॥
त्वं तदु॒क्थमि॑न्द्र ब॒र्हणा॑ कः॒ प्र यच्छ॒ता स॒हस्रा॑ शूर॒ दर्षि॑ ।
त्वं तत् उक्थं इंद्र बर्हणा करितिकः प्र यत् शता सहस्रा शूर दर्षि ।
तू सज्जनांच्या लाखो शत्रूंच्या चिंधड्या उडवून दिल्यास तेव्हां भक्त जी सामगायने गातात ती तू यथार्थच केलीस. शंबर नांवाच्या धर्मविमुख शत्रूला कड्याखाली लोटून मारून, तू आपल्या अद्भुत संरक्षक प्रकारांनी दिवोदासाचे रक्षण केलेंस. ॥ ५ ॥
त्वं श्र॒द्धाभि॑र्मन्दसा॒नः सोमै॑र्द॒भीत॑ये॒ चुमु॑रिमिन्द्र सिष्वप् ।
त्वं श्रद्धाभिः मंदसानः सोमैः दभीतये चुमुरिं इंद्र सिस्वप् ।
निष्ठेने आणि सोमार्पणाने तू उल्लसित होऊन, इंद्रा, दभीतीच्या रक्षणासाठी चुमुरी दैत्याला जमीनीवर कायमचे निजविलेस. ’रजि’ नामक तरुण कुमारी तू ’पिठीना" ला देऊन शिवाय त्याच्या साठ हजार शत्रूंना तू एकदम मारून टाकलेंस ॥ ६ ॥
अ॒हं च॒न तत्सू॒रिभि॑रानश्यां॒ तव॒ ज्याय॑ इन्द्र सु॒म्नमोजः॑ ।
अहं चन तत् सूरिऽभिः आनश्यां तव ज्यायः इंद्र सुम्नं ओजः ।
आमचे पुढारी जे यजमान त्यांच्यासह, हे इंद्रा, तुझ्या त्या श्रेष्ट आनंदधामाला तुझ्या त्या तेजस्वितेला मी पावेन असे कर. हे सर्ववीरा, अतुलप्रभवा, कारण तिप्पट बळकट असे चिलखत चढवून तुझ्या कृपेने नहुष वीर आज स्तुतीस पात्र झाले आहेत. ॥ ७ ॥
व॒यं ते॑ अ॒स्यामि॑न्द्र द्यु॒म्नहू॑तौ॒ सखा॑यः स्याम महिन॒ प्रेष्ठाः॑ ।
वयं ते अस्यां इंद्र द्युम्नऽहूतौ सखायः स्याम महिन प्रेष्ठाः ।
श्रेष्ठतमा, तुझ्या दिव्य प्रेरणेकरितां जो हा धांवा आम्ही करीत आहो त्या योगाने आम्ही तुझे प्राणापेक्षांही प्रिय मित्र होऊं असे घडो. क्षात्रतेजःसंपन्न असा प्रतर्दनाचा पुत्र हा त्याला ह्या भयंकर लढाईत यशोधन लाभावे म्हणून उत्कृष्ट वीर ठरो. ॥ ८ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त २७ ( इंद्र सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
किम॑स्य॒ मदे॒ किम्व॑स्य पी॒ताविन्द्रः॒ किम॑स्य स॒ख्ये च॑कार ।
किं अस्य मदे किं ऊंइति अस्य पीतौ इंद्रः किं अस्य सख्ये चकार ।
इंद्राने आपल्या हर्षावेगांत, किंवा सोमप्राशन केला असतां, किंवा भक्ताने त्याच्याशी सरम जोडले असतां कोण कोणती महत्कृत्ये केली ? त्याच्या सनातन लोकी जो सहजानंद आहे त्याचा लाभ पूर्वीच्या ऋषींस झाला काय व आधुनिक भक्तांसही झाला काय ॥ १ ॥
सद॑स्य॒ मदे॒ सद्व॑स्य पी॒ताविन्द्रः॒ सद॑स्य स॒ख्ये च॑कार ।
सद् अस्य मदे सत् वस्य पीताऔ इंद्रः सद् अस्य सख्ये चकार ।
आपल्या हर्षभरांत इंद्राने सत्यकर्मच केले, त्याने सोमरस प्राशन केला असतांनाही सत्यकृत्य, अथवा भक्ताने त्याच्याशी सख्य जोडले असतां सुद्धां त्याने सत्यकृत्यच केले. त्याच्या सनातन लोकी सहजानंद आहेत, तेव्हां पुरातन भक्तांना सत्याचाच लाभ झाला आणि आधुनिक भक्तांनाही पण सत्याचीच प्राप्ति झाली. ॥ २ ॥
न॒हि नु ते॑ महि॒मनः॑ समस्य॒ न म॑घवन्मघव॒त्त्वस्य॑ वि॒द्म ।
नहि नु ते महिमनः समस्य न मघऽवन् मघवत्ऽत्वस्य विद्म ।
तुझा सर्व महिमा काय हे आम्हांस कळत नाही. हे भगवंता, तुझ्या ऐश्वर्याची ही सीमा आम्हांस समजणार नाही. तसेच तुझी नवीन अपूर्व पारितोषिके, किंवा हे इंद्रा तुझे ईश्वरी सामर्थ्य हींही कोणी समग्र पाहूं शकत नाही. ॥ ३ ॥
ए॒तत्त्यत्त॑ इन्द्रि॒यम॑चेति॒ येनाव॑धीर्व॒रशि॑खस्य॒ शेषः॑ ।
एतत् त्यत् ते इंद्रियं अचेति येन अवधीः वरऽशिखस्य शेषः ।
तुझे ईश्वरी सामर्थ्य आम्हांस दिसले ते हे की वरशिख दैत्याचे जे काय शिल्लक सैन्य राहिले होते त्याचाही तू फडशा उडविलास. तसेच फेंकून मारलेल्या वज्राच्या नुसत्या सोसाट्याने आणि आवाजानेंच त्या परमश्रेष्ठ इंद्राने शत्रूचा नाश केला. ॥ ४ ॥
वधी॒दिन्द्रो॑ व॒रशि॑खस्य॒ शेषो॑ऽभ्याव॒र्तिने॑ चायमा॒नाय॒ शिक्ष॑न् ।
वधीत् इंद्रः वरशिखस्य शेषः अभिऽआवर्तिने चायमानाय शिक्षन् ।
चयमानाचा पुत्र अभ्यावर्ति ह्याला शांतिसुख देण्याकरितां इंद्राने वरशिखाच्या सग्यालाग्यांचा विध्वंस करून टाकला. आणि ’हरियूपिया’ नदीचे काठी वृचीवानाची आघाडींची दोन अर्धी सैन्ये मारून टाकलीस त्याबरोबर पिछाडीच्या भागाने भीतिने पौबारा केला. ॥ ५ ॥
त्रिं॒शच्छ॑तं व॒र्मिण॑ इन्द्र सा॒कं य॒व्याव॑त्यां पुरुहूत श्रव॒स्या ।
त्रिंशत्ऽशतं वर्मिणः इंद्र साकं यव्याऽवत्यां पुरुऽहूत श्रवस्या ।
अखिलजनसेविता इंद्रा, यव्यावतीचे कांठी वृचीवताचे तीन हजार सैनिक चिलखते चढवून लोभाने तुझ्या घातकी हत्यारांच्या टोंकावर येऊन आदळले. त्याबरोबर फुटक्या भांड्यांप्रमाणे ते कवडी मोल होऊन गेले. ॥ ६ ॥
यस्य॒ गावा॑वरु॒षा सू॑यव॒स्यू अ॒न्तरू॒ षु चर॑तो॒ रेरि॑हाणा ।
यस्य गावौ अरुषा सूयवस्यूइतिसुऽयवस्यू अंतः ऊंइति सु चरतः रेरिहाणा ।
ज्याच्या आरक्तवर्ण दोन धेनू हरिततृण करण्याच्या इच्छेने चरत चरत अंतराळांत संचार करतात, त्या इंद्राने दैववाताच्या हाती वृचीवतांना देऊन, सृञ्चयाला तुर्वश नांवाचा पुत्र दिला. ॥ ७ ॥
द्व॒याँ अ॑ग्ने र॒थिनो॑ विंश॒तिं गा व॒धूम॑तो म॒घवा॒ मह्यं॑ सं॒राट् ।
द्वयान् अग्ने रथिनः विंशतिं गाः वधूऽमंतः मघऽवा मह्यं संराट् ।
हे अग्नी, वैभवशाली चक्रवर्ती जो चयमानाचा पुत्र अभ्यावर्ति त्याने सुंदर कुमारीकांसह, शूर सैनिकांची दोन पथके, आणि वीस गाई अशी देणगी मला दिली. पृथुकुलोत्पन्नांनी दिलेली ही दक्षिणा (देणगी) इतरत्र दुर्लभच. ॥ ८ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त २८ ( गो सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - गो : छंद - त्रिष्टुभ्
आ गावो॑ अग्मन्नु॒त भ॒द्रम॑क्र॒न्सीद॑न्तु गो॒ष्ठे र॒णय॑न्त्व॒स्मे ।
आ गावः अग्मन् उत भद्रं अक्रन् सीदंतु गोऽस्थे रणयंन्तु अस्मेइति ।
पहा इंद्राच्या (दिव्य) धेनू आल्या. त्यांनी आमचे कल्याण केले. तर त्या आता आमच्या गोठ्यांत बसून आनंद करोत. ह्यांनी पुष्कळ दिवस इंद्राकरितां आपले दुग्ध दिले आहे. तर त्या नानारूप गाईंना पुष्कळ वांसते होवोत. ॥ १ ॥
इन्द्रो॒ यज्व॑ने पृण॒ते च॑ शिक्ष॒त्युपेद्द॑दाति॒ न स्वं मु॑षायति ।
इन्द्रः यज्वने पृणते च शिक्षति उप इत् ददाति न स्वं मुषायति ।
यो यजन करतो आणि दीनजनास दानाने तृप्त करतो त्याचा इंद्र पुरस्कारच करतो, त्याला वैभव देतो. त्याचे द्रव्य कधींही हरण करीत नाही. पण उलट त्याचे वैभव उत्तरोत्तर वृद्धिंगत करून अविनाशी आणि अत्यंत दुर्लभ जे आनंदस्थान त्या ठिकाणी त्या भगवद्भक्तास नेऊन ठेवतो. ॥ २ ॥
न ता न॑शन्ति॒ न द॑भाति॒ तस्क॑रो॒ नासा॑मामि॒त्रो व्यथि॒रा द॑धर्षति ।
न ताः नशंति न दभाति तस्करः न आसां आमित्रः व्यथिः आ दधर्षति ।
इंद्राच्या दिव्य धेनू कधी नाश पावत नाहींत, चोर त्यांचे हरण करूं शकत नाही, शत्रूचा हल्ला त्यांना कांही एक इजा करूं शकत नाही. अशा प्रकारच्या ज्या धेनूंच्या सहाय्याने भक्त देवयजन करतो, दीनांस दानधर्म करतो, तो ज्ञान नायक होऊन त्यांच्यासह चिरकाळ नांदतो. ॥ ३ ॥
न ता अर्वा॑ रे॒णुक॑काटो अश्नुते॒ न सं॑स्कृत॒त्रमुप॑ यन्ति॒ ता अ॒भि ।
न ताः अर्वा रेणुऽककाटः अश्नुते न संस्कृतऽत्रं उप यंति ताः अभि ।
आपल्या टापांनी धूळ उडविणारा खंदा लढाऊ घोडा अशा धेनूंचा मुळींच पाडाव करीत नाहीं. बलिदान देण्याच्या ठिकाणीही त्यांना कोणी घेऊन जात नाही, परंतु त्या भगवभक्त जनाच्या विस्तीर्ण आणि भयरहित कुरणांत मात्र त्या यथेच्छ फिरत असतात. ॥ ४ ॥
गावो॒ भगो॒ गाव॒ इन्द्रो॑ मे अच्छा॒न् गावः॒ सोम॑स्य प्रथ॒मस्य॑ भ॒क्षः ।
गावः भगः गावः इंद्रः मे अच्छान् गावः सोमस्य प्रथमस्य भक्षः ।
भाग्यदाता देव, मला धेनू देवो, इंद्र मला गोधन देवो. कारण धेनूचे दुग्ध हा सोमाचा अगदी आवडता पदार्थ होय. अशा ज्या ह्या धेनू आहेत, हे जनहो, त्या इंद्ररूपच होत. म्हणून मनानें, अंतःकरणानेंही मला इंद्रच पाहिजे आहे. ॥ ५ ॥
यू॒यं गा॑वो मेदयथा कृ॒शं चि॑दश्री॒रं चि॑त्कृणुथा सु॒प्रती॑कम् ।
यूयं गावः मेदयथ कृशं चित् अश्रीरं चित् कृणुथ सुऽप्रतीकं ।
दिव्य धेनूंनो, रोड झालेल्या मनुष्यास तुम्ही पुष्ट करतां, आणि ज्याच्या तोंडावर अगदी कळा नाही त्याला तजेलदार करून सोडतां. तुमचा स्वर मंगलकारक आहे, तर तुम्ही आमचे मंगलमय करा. ह्या तुमच्या महान् सामर्थ्याची वाखाणणी लोकसभेंतून सुद्धा होत असते. ॥ ६ ॥
प्र॒जाव॑तीः सू॒यव॑सं रि॒शन्तीः॑ शु॒द्धा अ॒पः सु॑प्रपा॒णे पिब॑न्तीः ।
प्रजावतीः सूऽयवसं रिशंतीः शुद्धाः अपः सुऽप्रपाने पिबंतीः ।
तुम्हांस वासरे पुष्कळ होऊन तुम्ही कोंवळे कोंवळे गवत खातां आणि पाणवठ्यावर शुद्धनिर्मल उदक पितां अशा तुम्ही आहांत. चोराची मात्रा तुमच्यावर न चालो, किंवा इतर धर्मभ्रष्टाचीही न चालो. रुद्राचे शस्त्र तुम्हांला वगळून दुसरीकडे वळो. ॥ ७ ॥
उपे॒दमु॑प॒पर्च॑नमा॒सु गोषूप॑ पृच्यताम् । उप॑ ऋष॒भस्य॒ रेत॒स्युपे॑न्द्र॒ तव॑ वी॒र्ये ॥ ८ ॥
उप इदं उपऽपर्चनं आसु गोषु उप पृच्यतां ।
ह्या धेनूच्या दुग्धामध्यें हा मसाला मिसळा. त्या वृषभाच्या सोमाच्या आंगरसांत ते सर्व मिसळा. इंद्रा, शेवटी तुझ्या वीरश्रींतही हे सोमरस मिश्रण मिसळले जावो. ॥ ८ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त २९ ( इंद्र सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
इन्द्रं॑ वो॒ नरः॑ स॒ख्याय॑ सेपुर्म॒हो यन्तः॑ सुम॒तये॑ चका॒नाः ।
इंद्रं वः नरः सख्याय सेपुः महः यंतः सुऽमतये चकानाः ।
तुमच्यासाठी इंद्राचा कृपालोभ संपादन करण्याकरितां त्या शूर पुरुषांनी इंद्राची कांस धरली, आणि त्याच्या सौजन्यास पात्र होण्याकरितां त्याच्या तेजस्वितेचा गौरव केला. तो मोठा दानशूर व वज्रधर आहे तर त्याचा अनुग्रह व्हावा म्हणून त्या थोर मनोहर देवाचे यजन करा. ॥ १ ॥
आ यस्मि॒न्हस्ते॒ नर्या॑ मिमि॒क्षुरा रथे॑ हिर॒ण्यये॑ रथे॒ष्ठाः ।
आ यस्मिन् हस्ते नर्याः मिमिक्षुः आ रथे हिरण्यये रथेऽस्थाः ।
मनुष्यांना कल्याणप्रद अशा ज्या कांही गोष्टी आहेत त्या सर्व त्याच्याच हातांत असतात. तो सुवर्णमय रथांत आरूढ होतो, आणि आपल्या दणकट भुजदंडांनी घोड्यांचा लगाम खेंचून धरतो. त्याचे मजबूत घोडेसुद्धां असे आहेत की ते वाटेत आपोआप रथाला जोडले जातात. ॥ २ ॥
श्रि॒ये ते॒ पादा॒ दुव॒ आ मि॑मिक्षुर्धृ॒ष्णुर्व॒ज्री शव॑सा॒ दक्षि॑णावान् ।
श्रिये ते पादा दुवः आ मिमिक्षुः धृष्णुः वज्री शवसा दक्षिणऽवान् ।
मोक्षश्रीसाठी सेवकांनी तुझ्याच चरणांचा आश्रय केला आहे. तू धैर्यशाली वज्रधर आणि वात्सल्यपूर्ण आहेस, आणि लोकांना तुझे मंगल दर्शन घडावे म्हणून सूर्याप्रमाणे तू आपल्या प्रभावाने दिव्य तेजोमय कवच परिधान करून, रणभैरवा, तू भक्तांना रणोत्साह उत्पन्न केलास. ॥ ३ ॥
स सोम॒ आमि॑श्लतमः सु॒तो भू॒द्यस्मि॑न्प॒क्तिः प॒च्यते॒ सन्ति॑ धा॒नाः ।
सः सोमः आमिश्लऽतमः सुतः भूत् यस्मिन् पक्तिः पच्यते संति धानाः ।
पहा तो सोमरस पिळून तयार होऊन त्यांत नाना तऱ्हेचा मसाला पूर्णपणे मिसळला आहे. रस तयार होतांच पक्वान्नें आणि दुसरी धान्येंही शिजून तयार झाली व प्रार्थना सूक्ते म्हणणारे ऋषिगण इंद्राचे गुणवर्णन आणि सामसूक्तांचे गायन करून देवाच्या निःसीम प्रेमास पात्र झाले. ॥ ४ ॥
न ते॒ अन्तः॒ शव॑सो धाय्य॒स्य वि तु बा॑बधे॒ रोद॑सी महि॒त्वा ।
न ते अंतः शवसः धायि अस्य वि तु बबाधे रोदसीइति महिऽत्वा ।
तुझ्या ह्या उत्कटबलाचा अन्त कोणासच लागला नाही, त्याच्या महिम्याने दिगंत भेदून टाकले आले. सज्जनधुरीण इंद्र मोठ्या सरोबरीने, पशूंचा समुदाय पाण्यांत फैलावून द्यावा, नक्षत्रें आकाश मंडलांत विखरून टाकावी त्याप्रमाणे, आपल्या संरक्षक सामर्थ्याने अंतराल भरून टाकतो. ॥ ५ ॥
ए॒वेदिन्द्रः॑ सु॒हव॑ ऋ॒ष्वो अ॑स्तू॒ती अनू॑ती हिरिशि॒प्रः सत्वा॑ ।
एव इत् इंद्रः सुऽहवः ऋष्वः अस्तु ऊती अनूती हिरिऽशिप्रः सत्वा ।
ह्याप्रमाणे तो अत्युदात्त इंद्र आमचा धांवा सुलभतेने तत्काळ ऐकून घेवो. त्याला कोणाच्याच सहायाची अपेक्षा नाही, तो सुवर्णमुकुटमंडित सत्वाढ्य देव आपल्या संरक्षक सामर्थ्याने आमच्याकरितां सज्ज राहो. प्रकट होतांक्षणीच त्याच्या तेजाची तुलना होईनाशी झाली. अंधकाररूप असंख्य शत्रू आणि अधार्मिक दुष्ट ह्यांचा तोच संहार करतो. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल ६ सूक्त ३० ( इंद्र सूक्त )
ऋषी - भरद्वाज बार्हस्पत्य : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्
भूय॒ इद्वा॑वृधे वी॒र्यायँ॒ एको॑ अजु॒र्यो द॑यते॒ वसू॑नि ।
भूयः इत् ववृधे वीर्याय एक अजुर्यः दयते वसूनि ।
आपला पराक्रम गाजविण्याकरितां तो अतिशय वाढला, व तोच एकटा अजरामर देव अमोलिक संपत्ति भक्तांना देतो. इंद्राने आकाश आणि पृथिवी ह्यांना पार व्यापून टाकिले आहे, ते इतके कीं, त्याचा एक अंशच दोहोंनाही पुरून उरण्यासारखा आहे. ॥ १ ॥
अधा॑ मन्ये बृ॒हद॑सु॒र्यमस्य॒ यानि॑ दा॒धार॒ नकि॒रा मि॑नाति ।
अध मन्ये बृहत् असुर्यं अस्य यानि दाधार नकिः आ मिनाति ।
आतां त्याच्या श्रेष्ठ ईश्वरीसत्तेचे मी चिंतन करतो. त्याने जे जे नियम एकदा ठरविले ते ते कोणीही मोडूं शकत नाही. दररोज सूर्य हा आपल्या मनोहर स्वरूपाने प्रकट होतो, आणि त्याच अगाध कर्तृत्वशाली इंद्राने ही दिव्य भवने दूरवर व्यवस्थित ठेवून दिली आहेत. ॥ २ ॥
अ॒द्या चि॒न्नू चि॒त्तदपो॑ न॒दीनां॒ यदा॑भ्यो॒ अर॑दो गा॒तुमि॑न्द्र ।
अद्य चित् नु चित् तत् अपः नदीनां यत् आभ्यः अरदः गातुं इंद्र ।
ज्ञान नद्यां विषयींची तुझी कर्तबगारी आज मितिसही स्पष्ट दिसत आहे, ती ही कीं, हे इंद्रा त्यांच्याकरितां तू वाटा खोदून ठेविल्यास. सुखवस्तु मनुष्याप्रमाणे हे पर्वत तुझ्यामुळें स्थिर होऊन बसले, आणि हे अपूर्व कर्तृत्वशील, हे रजोलोकही तूंच धारण केले आहेस. ॥ ३ ॥
स॒त्यमित्तन्न त्वावाँ॑ अ॒न्यो अ॒स्तीन्द्र॑ दे॒वो न मर्त्यो॒ ज्याया॑न् ।
सत्यं इत् तत् न त्वाऽवान् अन्यः अस्ति इंद्र देवः न मर्त्यः ज्यायान् ।
इंद्रा, तुझ्या सारखा दुसरा कोणीही देव किंवा मनुष्य नाही, ही गोष्ट खरी नाही काय ? आकाशरूप उदकांत आडवा पडलेल्या भुजंगास तूंच ठार केलेंस आणि समुद्रास मिळण्याकरिता नद्यांना सोडून दिलेंस. ॥ ४ ॥
त्वम॒पो वि दुरो॒ विषू॑ची॒रिन्द्र॑ दृ॒ळ्हम॑रुजः॒ पर्व॑तस्य ।
त्वं अपः वि दुरः विषूचीः इंद्र दृळ्हं अरुजः पर्वतस्य ।
सर्वत्र गति अशा दिव्योदकांचा मार्ग तू खुला केलास. हे इंद्रा पर्वतांचे अति कठीण दुर्ग तू फोडून टाकलेस. आणि सूर्य, नक्षत्रें व उषा ह्यांना एकदमच उत्पन्न करून तू ह्या जगतांतील प्राणिमात्रांचा राजा झालास. ॥ ५ ॥
ॐ तत् सत् |