PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ५ - सूक्त ७१ ते ८०

ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ७१ ( मित्रावरुण सूक्त )

ऋषी - बाहुवृक्त आत्रेय : देवता - मित्रावरुण : छंद - उष्णिह


आ नो॑ गन्तं रिशादसा॒ वरु॑ण॒ मित्र॑ ब॒र्हणा॑ । उपे॒मं चारु॑मध्व॒रम् ॥ १ ॥

आ नः गंतं रिशादसा वरुण मित्र बर्हणा । उप इमं चारुं अध्वरम् ॥ १ ॥

हे शत्रुनाशन मित्रावरुणांनो, मोठ्या लगबगीने ह्या आमच्या चित्तकर्षका याग समारंभास आगमन करा. ॥ १ ॥


विश्व॑स्य॒ हि प्र॑चेतसा॒ वरु॑ण॒ मित्र॒ राज॑थः । ई॒शा॒ना पि॑प्यतं॒ धियः॑ ॥ २ ॥

विश्वस्य हि प्रऽचेतसा वरुण मित्र राजथः । ईशाना पिप्यतं धियः ॥ २ ॥

महाज्ञानी मित्रावरुणांनो, तुम्ही संपूर्ण विश्वावरच राज्य करीत आहांत, तर हे ईश्वर स्वरूप देवांनो आमच्या बुद्धिंना भक्तिने परिपूर्ण करा. ॥ २ ॥


उप॑ नः सु॒तमा ग॑तं॒ वरु॑ण॒ मित्र॑ दा॒शुषः॑ । अ॒स्य सोम॑स्य पी॒तये॑ ॥ ३ ॥

उप नः सुतं आ गतं वरुण मित्र दाशुषः । अस्य सोमस्य पीतये ॥ ३ ॥

मित्रावरुणांनो, हवि अर्पण करणार्‍या ह्या भक्ताच्या सोमरसाकडे या. ॥ ३ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ७२ ( मित्रावरुण सूक्त )

ऋषी - बाहुवृक्त आत्रेय : देवता - मित्रावरुण : छंद - उष्णिह


आ मि॒त्रे वरु॑णे व॒यं गी॒र्भिर्जु॑हुमो अत्रि॒वत् । नि ब॒र्हिषि॑ सदतं॒ सोम॑पीतये ॥ १ ॥

आ मित्रे वरुणे वयं गीःऽभिः जुहुमः अत्रिऽवत् । नि बर्हिषि सदतं सोमऽपीतये ॥ १ ॥

स्तुतींच्या योगाने अत्रिप्रमाणेच आम्हीहि मित्रावरुणांना पाचारण करूं. तर हे देवांनो, सोमरसाचा आस्वाद घेण्याकरितां ह्या कुशासनावर आरोहण करा. ॥ १ ॥


व्र॒तेन॑ स्थः ध्रु॒वक्षे॑मा॒ धर्म॑णा यात॒यज्ज॑ना । नि ब॒र्हिषि॑ सदतं॒ सोम॑पीतये ॥ २ ॥

व्रतेन स्थः ध्रुवऽक्षेमा धर्मणा यातयत्ऽजना । नि बर्हिषि सदतं सोमऽपीतये ॥ २ ॥

विधिनियमाच्या पालनानेच तुमचे स्थान अढळ आहे, आणि धर्माच्या योगानेच तुम्ही लोकांना, आपआपल्या उद्योगाला लावतां, तर हे देवांनो सोमरसाचा आस्वाद घेण्याकरितां ह्या कुशासनावर आरोहण करा. ॥ २ ॥


मि॒त्रश्च॑ नो॒ वरु॑णश्च जु॒षेतां॑ य॒ज्ञमि॒ष्टये॑ । नि ब॒र्हिषि॑ सदतां॒ सोम॑पीतये ॥ ३ ॥

मित्रः च नः वरुणश् च जुषेतां यज्ञं इष्टये । नि बर्हिषि सदतां सोमपीतये ॥ ३ ॥

मित्र आणि वरुण असे उभयतां आमचा इष्ट हेतु पूर्ण व्हावा म्हणून हा आमचा यज्ञ मान्य करून घेवोत. तर आतां हे देवांनो, सोमरसाचा आस्वाद घेण्याकरितां ह्या कुशासनावर तुम्ही आरोहण करा. ॥ ३ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ७३ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषी - पौर आत्रेय : देवता - अश्विनीकुमार : छंद - अनुष्टुभ्


यद॒द्य स्थः प॑रा॒वति॒ यद॑र्वा॒वत्य॑श्विना ।
यद्वा॑ पु॒रू पु॑रुभुजा॒ यद॒न्तरि॑क्ष॒ आ ग॑तम् ॥ १ ॥

यत् अद्य स्थः पराऽवति यत् अर्वाऽवति अश्विना ।
यत् वा पुरू पुरुऽभुजा यत् अंतरिक्षे आ गतम् ॥ १ ॥

अश्वीहो, आज तुम्ही अतीदूरच्या लोकांत किंवा अगदी जवळच्या लोकांत जरी असलां, अथवा दुसर्‍या अनेक ठिकाणी किंवा अऽन्तराळांत जरी असलां तरी सर्वजन तोषदायी देवांनो, आमच्याकडे आगमन करा. ॥ १ ॥


इ॒ह त्या पु॑रु॒भूत॑मा पु॒रू दंसां॑सि॒ बिभ्र॑ता ।
व॒र॒स्या या॒म्यध्रि॑गू हु॒वे तु॒विष्ट॑मा भु॒जे ॥ २ ॥

इह त्या पुरुऽभूतमा पुरू दंसांसि बिभ्रता ।
वरस्या यामि अध्रिगूइत्यध्रिऽगू हुवे तुविःऽतमा भुजे ॥ २ ॥

ह्याच ठिकाणी, सर्व भक्ताशी ज्यांचा अत्यंत निकट संबंध असतो, जे अनेक प्रकारची मनोहर रूपें धारण करतात, जे सर्वोत्कृष्ट आणि अप्रतिरथ योद्धे म्हणून गाजले आहेत, त्या अत्यंत बलाढ्य विभूतींना आमच्या स्तुतींचा उपभोग घ्यावा म्हणून मी पाचारण करतो. ॥ २ ॥


ई॒र्मान्यद्वपु॑षे॒ वपु॑श्च॒क्रं रथ॑स्य येमथुः ।
पर्य॒न्या नाहु॑षा यु॒गा म॒ह्ना रजां॑सि दीयथः ॥ ३ ॥

ईर्मा अन्यत् वपुषे वपुः चक्रं रथस्य येमथुः ।
परि अन्या नाहुषा युगा मह्ना रजांसि दीयथः ॥ ३ ॥

तुम्ही आपल्या रथाच्या शोभेकरितां रथाचे एक सुंदर चाक सूर्याच्या ठिकाणी रोंवून दिले आहांत, की जेणेकरून त्या तेजामुळे दुसरे चाक फिरवीत मानवी प्राण्याच्या अनेक पिढ्या आणि अनेक प्रकारचे रजोलोक ह्यांना सुप्रकाशित करीत तुम्ही फिरत असतां. ॥ ३ ॥


तदू॒ षु वा॑मे॒ना कृ॒तं विश्वा॒ यद्वा॒मनु॒ ष्टवे॑ ।
नाना॑ जा॒ताव॑रे॒पसा॒ सम॒स्मे बन्धु॒मेय॑थुः ॥ ४ ॥

तत् ऊइति सु वां एना कृतं विश्वा यत् वां अनु स्तवे ।
नाना जातौ अरेपसा सं अस्मेइति बंधुं आ इयथुः ॥ ४ ॥

जे जे कांही तुमचे स्तवन करण्याच्या कामी उपयोगी पडले असेल ते ते सर्व ह्या भक्ताने केले आहे. नाना प्रकारांनी तुम्ही अवतीर्ण होता. तुमचे स्वरूप निर्मल आहे तर तुम्ही विभूतिंनी आमच्याशी बंधुप्रेम ठेविले हे केवढे नवल ? ॥ ४ ॥


आ यद्वां॑ सू॒र्या रथं॒ तिष्ठ॑द्रघु॒ष्यदं॒ सदा॑ ।
परि॑वामरु॒षा वयो॑ घृ॒णा व॑रन्त आ॒तपः॑ ॥ ५ ॥

आ यत् वां सूर्या रथं तिष्ठत् रघुऽस्यदं सदा ।
परि वा अरुषाः वयः घृणा वरंते आऽतपः ॥ ५ ॥

ज्यावेळेस सूर्याची कन्या, नेहमीच त्वरेने धांवणार्‍या अशा तुमच्या रथांत जाऊन बसली, त्यावेळेस आरक्तवर्ण पक्षांचा घोळका तुमच्या भोंवती जमला, आणि तुमच्या प्रखर किरणाचे आवरण तुमच्या भोंवती पडले. ॥ ५ ॥


यु॒वोरत्रि॑श्चिकेतति॒ नरा॑ सु॒म्नेन॒ चेत॑सा ।
घ॒र्मं यद्वा॑मरे॒पसं॒ नास॑त्या॒स्ना भु॑र॒ण्यति॑ ॥ ६ ॥

युवोः अत्रिः चिकेतति नरा सुम्नेन चेतसा ।
घर्मं यत् वां अरेपसं नासत्या आस्ना भुरण्यति ॥ ६ ॥

वीरांनो, अत्रिऋषि आपल्या प्रशांत चित्ताच्या योगानेच तुम्हाला ओळखतात, आणि अशा वेळेस ते आपल्या मुखाने स्तुति गाऊन तुमच्या निष्कलंक परंतु तीव्र तेजाला स्फुरण आणतात. ॥ ६ ॥


उ॒ग्रः वां॑ ककु॒हो य॒यिः शृ॒ण्वे यामे॑षु संत॒निः ।
यद्वां॒ दंसो॑भिरश्वि॒नात्रि॑र्नराव॒वर्त॑ति ॥ ७ ॥

उग्रः वां ककुहः ययिः शृण्वे यामेषु संऽतनिः ।
यत् वां दंसःऽभिः अश्विना अत्रिः नरा आऽववर्तति ॥ ७ ॥

हे अश्विदेवांनो, हे वीरांनो, जेव्हां आपल्या अद्‍भुत कृतींच्या योगाने, अत्रि ऋषि तुम्हाला वळवून आमच्याकडे आणतात, त्या वेळेस तुमच्या त्या भयंकर परंतु उत्तुंग आणि संतत गति रथाचा घोष आम्हाला वाटेतच ऐकूं येतो. ॥ ७ ॥


मध्व॑ ऊ॒ षु म॑धूयुवा॒ रुद्रा॒ सिष॑क्ति पि॒प्युषी॑ ।
यत् स॑मु॒द्राति॒ पर्ष॑थः प॒क्वाः पृक्षो॑ भरन्त वाम् ॥ ८ ॥

मध्व ऊइति सु मधुऽयुवा रुद्रा सिसक्ति पिप्युषी ।
यत् समुद्रा अति पर्षथः पक्वाः पृक्षः भरंत वाम् ॥ ८ ॥

मधुररसप्रिय अश्वींनो, भक्तिरसाने ओथंबलेली स्तुति, पातक्यांना भयंकर दिसणारे जे तुम्ही, त्या तुम्हा विभूतिंची सदैव सेवा करीत असते. आणि जेव्हा अंतरीक्ष समुद्र तुम्ही ओलांडून येता तेव्हा पक्वान्ने तयार होऊन ती तुम्हाला समर्पण होत असतात. ॥ ८ ॥


स॒त्यमिद्वा उ॑ अश्विना यु॒वामा॑हुर्मयो॒भुवा॑ ।
ता याम॑न्याम॒हूत॑मा॒ याम॒न्ना मृ॑ळ॒यत्त॑मा ॥ ९ ॥

सत्यं इत् वा ऊंइति अश्विना युवां आहुः मयःऽभुवा ।
ता यामन् यामऽहूतमा यामन् आं मृळयत्ऽतमा ॥ ९ ॥

अश्वीहो, तुम्हाला जगताचे मंगल करणारे म्हणून तुम्हाला म्हणतात ते अगदी खरे आहे. म्हणून यज्ञांत भक्त तुमची अत्याग्रहाने विनवणी करीत असतात. कारण यज्ञांत अत्यंत सुख देणारेहि तुम्हीच आहात. ॥ ९ ॥


इ॒मा ब्रह्मा॑णि॒ वर्ध॑ना॒श्विभ्यां॑ सन्तु॒ शंत॑मा ।
या तक्षा॑म॒ रथाँ॑ इ॒वावो॑चाम बृ॒हन्नमः॑ ॥ १० ॥

इमा ब्रह्माणि वर्धना अश्विऽभ्यां संतु शंऽतमा ।
या तक्षाम रथान्ऽइव अवोचाम बृहत् नमः ॥ १० ॥

ही जी आनंदवर्धन करणारी सूक्ते आम्ही म्हणतो ती अश्वीदेवांना अत्यंत हर्षप्रद होवोत. एखादा रथ सजवून तयार करावा त्याप्रमाणे ती हि आम्ही व्यवस्थित बसविली आहेत; आणि देवाचा मोठ्याने जयजयकार केला आहे. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ७४ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषी - पौर आत्रेय : देवता - अश्विनीकुमार : छंद - अनुष्टुभ्


कूष्ठो॑ देवावश्विना॒द्या दि॒वः म॑नावसू ।
तच् छ्र॑वथो वृषण्वसू॒ अत्रि॑र्वा॒मा वि॑वासति ॥ १ ॥

कूस्थः देवौ अश्विना अद्य दिवः मनावसूइति ।
तच् श्रवथः वृषण्वसूइतिवृषण्ऽवसू अत्रिः वां आ विवासति ॥ १ ॥

भक्तांनी केलेले अखंड मनन हे ज्या तुमचे धन, अशा अश्विदेवांनो, आज आकाशाच्या कोणत्याही भागात तुम्ही असला तरी तेथून हे वीर्यधन आणि वृष्टिधन देवांनो, आमची हांक ऐकतांच अत्रि ऋषि तुमची सेवा करीत आहेत. ॥ १ ॥


कुह॒ त्या कुह॒ नु श्रु॒ता दि॒वि दे॒वा नास॑त्या ।
कस्मि॒न्ना य॑तथो॒ जने॒ कः वां॑ न॒दीनां॒ सचा॑ ॥ २ ॥

कुह त्या कुह नु श्रुता दिवि देवा नासत्या ।
कस्मिन् आ यतथः जने कः वां नदीनां सचा ॥ २ ॥

ते तुम्ही आता कोठे आहात, तुम्ही विख्यात सत्यस्वरूप विभूति द्युलोकात कोठे असता ? कोणत्या भक्ताच्या उद्धारार्थ तुमची खटपट चालली आहे ? तुमच्या प्रसाद रूप नद्यांच्या ओघाबरोबर कोण धन्य झाला ? ॥ २ ॥


कं या॑थः॒ कं ह॑ गच्छथः॒ कमच्छा॑ युञ्जाथे॒ रथ॑म् ।
कस्य॒ ब्रह्मा॑णि रण्यथो व॒यं वां॑ उश्मसी॒ष्टये॑ ॥ ३ ॥

कं याथः कं ह गच्छथः कं अच्छ युञ्जाथेइति रथम् ।
कस्य ब्रह्माणि रण्यथः वयं वां उश्मसि इष्टये ॥ ३ ॥

तुम्ही कोणाकडे निघाला आहात, तुम्ही कोणाकडे जात असता ? कोणाकरिता तुम्ही आपला रथ जोडता ? कोणाच्या प्रार्थना सूक्तांत तुमचे मन रमते ? आमच्या हेतु पूर्तिकरितां आम्ही तर तुमचा ध्यास घेतला आहे ॥ ३ ॥


पौ॒रं चि॒द्ध्युद॒प्रुतं॒ पौर॑ पौ॒राय॒ जिन्व॑थः ।
यदीं॑ गृभी॒तता॑तये सिं॒हमि॑व द्रु॒हस्प॒दे ॥ ४ ॥

पौरं चित् हि उदऽप्रुतं पौर पौराय जिन्वथः ।
यत् ईं ऋभीतऽतातये सिंहंऽइव द्रुहः पदे ॥ ४ ॥

धडपड करीत पाण्यांत पोहोणार्‍या मला पौराला "अरे पौरा" अशी हाक मारून पौराकरिता (म्हणजे सोमरस पात्रात भरून अर्पण करण्याकरितां) मला तुम्ही उत्तेजन दिलेत. शत्रूच्या तडाख्यांत सापडलेल्या सिंहाला, त्या कचाटीतून सुटण्याकरिता हुषारी आणावी त्याप्रमाणे करून मला वाचवून आनंदित केलेत. ॥ ४ ॥


प्र च्यवा॑नाज्जुजु॒रुषो॑ व॒व्रिमत्कं॒ न मु॑ञ्चथः ।
युवा॒ यदी॑ कृ॒थः पुन॒रा काम॑मृण्वे व॒ध्वः ॥ ५ ॥

प्र च्यवानात् जुजुरुषः वव्रिं अत्कं न मुञ्चथः ।
युवा यदी कृथः पुनः आ कामं ऋण्वे वध्वः ॥ ५ ॥

वृद्ध आणि जीर्ण झालेल्या च्यवानाच्या शरीरापासून एखादा अंगरखा दूर करावा त्यचप्रमाणे म्हातारपणची कात तुम्ही काढून घेतलीत. आणि तुम्ही त्याला अशा रीतीने तरुण पठ्ठा बनावल्या बरोबर त्याने नवयुवतिंचा कामज्वर पुनः उद्दीपित केला ॥ ५ ॥


अस्ति॒ हि वा॑मि॒ह स्तो॒ता स्मसि॑ वां सं॒दृशि॑ श्रि॒ये ।
नू श्रु॒तं म॒ आ ग॑तं॒ अवो॑भिर्वाजिनीवसू ॥ ६ ॥

अस्ति हि वां इह स्तोता स्मसि वां संऽदृशि श्रिये ।
नू श्रुतं मे आ गतं अवःऽभिः वाजिनीवसूइतिवाजिनीऽवसू ॥ ६ ॥

तुमचे स्तवन करणार भक्त हा मी इथे आहे; व आमचे गौरव व्हावे म्हणून आम्ही तुझ्या कृपादृष्टिखाली राहतो. माझी हांक ऐकून, हे सत्वसामर्थ्यधन देवांनो, आपल्या अनुग्रहांसहित इकडे आगमन करा. ॥ ६ ॥


को वां॑ अ॒द्य पु॑रू॒णामा व॑व्ने॒ मर्त्या॑नाम् ।
को विप्रो॑ विप्रवाहसा॒ को य॒ज्ञैर्वा॑जिनीवसू ॥ ७ ॥

कः वां अद्य पुरूणां आ वव्ने मर्त्यानाम् ।
कः विप्रः विप्रऽवाहसा कः यज्ञैः वाजिनीवसूइतिवाजिनीऽवसू ॥ ७ ॥

बिचारे असंख्य लोक आहेत त्यांच्यामध्ये, हे कवि प्रतिपालकांनो, आज कोणता सत्कवि, हे सत्वसामर्थ्यधन देवांनो, कोणता भक्त तुम्हाला यज्ञांनी प्रसन्न करीत आहे ? ॥ ७ ॥


आ वां॒ रथो॒ रथा॑नां॒ येष्ठो॑ यात्वश्विना ।
पु॒रू चि॑दस्म॒युस्ति॒र आ॑ङ्‌गू्॒षो मर्त्ये॒ष्वा ॥ ८ ॥

आ वां रथः रथानां येष्ठः यातु अश्विना ।
पुरू चित् अस्मऽयुः तिर आङ्‌गूेषः मर्त्येषु आ ॥ ८ ॥

तुमच्या रथात अतिशय वेगवान् जो रथ असेल तो रथ, तो आमच्यावर कृपा करणारा तुमचा रथ, शेंकडो अभक्तांस मागे टाकून हे अश्वीहो, आमच्याकडे येवो. हा पहा भक्तजनामध्ये तुमच्या नांवाचा घोष सुरू आहे. ॥ ८ ॥


शमू॒ षु वां॑ मधूयुवा॒स्माक॑मस्तु चर्कृ॒तिः ।
अ॒र्वा॒ची॒ना वि॑चेतसा॒ विभिः॑ श्ये॒नेव॑ दीयतम् ॥ ९ ॥

शं ऊंइति सु वां मधुऽयुवा अस्माकं अस्तु चर्कृतिः ।
अर्वाचीना विचेतसा विऽभिः श्येनाऽइव दीयतम् ॥ ९ ॥

मधुरसप्रिय अश्वीहो, आमची ही सेवा तुम्हाला प्रमुदित करो, हे सर्वज्ञ विभूतिंनो, तुम्ही आमच्याकडे वळलेले आहात तर आपल्या पक्षिरथाच्या योगाने एखाद्या ससाण्यासारखे वेगाने उड्डाण करून इकडे या. ॥ ९ ॥


अश्वि॑ना॒ यद्ध॒ कर्हि॑ चिच्छुश्रू॒यात॑मि॒मं हव॑म् ।
वस्वी॑रू॒ षु वां॒ भुजः॑ पृ॒ञ्चन्ति॒ सु वां॒ पृचः॑ ॥ १० ॥

अश्विना यत् ह कर्हि चित् शुश्रूयातं इमं हवम् ।
वस्वीः ऊंइति सु वां भुजः फृञ्चंति सु वां पृचः ॥ १० ॥

अश्विदेवहो, कोणत्याहि वेळी जरी तुम्ही आमची हांक ऐकली, तरी तुमच्या उपभोगार्थ ह्या उत्कृष्ट वस्तु येथे ठेवल्या आहेत, आणि मग तुमच्यासाठी सोमरसाचे मिश्रण मिसळून तयार करीत आहेत असे तुम्हाला आढळेल. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ७५ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषी - अवस्थु आत्रेय : देवता - अश्विनीकुमार : छंद - पंक्ति


प्रति॑ प्रि॒यत॑मं॒ रथं॒ वृष॑णं वसु॒वाह॑नम् ।
स्तो॒ता वा॑मश्विना॒वृषिः॒ स्तोमे॑न॒ प्रति॑ भूषति॒ माध्वी॒ मम॑ श्रुतं॒ हव॑म् ॥ १ ॥

प्रति प्रियऽतमं रथं ऋषणं वसुऽवाहनम् ।
स्तोता वां अश्विनौ ऋषिः स्तोमेन प्रति भूषति माध्वीइति मम श्रुतं हवम् ॥ १ ॥

तुमचा अत्यंत आवडता, तुम्हा वीरांना आपल्या ठिकाणी आरोहण करविणारा आणि सर्वोत्कृष्ट वस्तु भक्तांकडे वाहून आणणारा जो तुमचा रथ आहे, त्या तुमच्या रथाला हे अश्विहो, हा विप्र स्तोत्रांनी अलंकृत करीत आहे. तर हे मधुररसप्रिय विभूतिंनो, माझी हांक ऐका. ॥ १ ॥


अ॒त्याया॑तमश्विना ति॒रो विश्वा॑ अ॒हं सना॑ ।
दस्रा॒ हिर॑ण्यवर्तनी॒ सुषु॑म्ना॒ सिन्धु॑वाहसा॒ माध्वी॒ मम॑ श्रुतं॒ हव॑म् ॥ २ ॥

अतिऽआयातं अश्विना तिरः विश्वा अहं सना ।
दस्रा हिरण्यवर्तनीइतिहिरण्यऽवर्तनी सुऽसुम्ना सिन्धुऽवाहसा माध्वीइति मम श्रुतं हवम् ॥ २ ॥

सर्व अहंकारमत्तांना मागे टाकून हे अश्विहो आमच्याकडे या. हे रुचिरस्वरूप देवांनो, तुमच्या रथाची चाके सुवर्णाची आहेत, तुमचे सुख उत्कृष्ट असते आणि तुम्ही मोठमोठ्या नद्यांना उदकपूर्ण करून वाहावयास लावता, तेव्हा हे मधुररसप्रिय देवांनो माझीहि एक शंका ऐका. ॥ २ ॥


आ नो॒ रत्ना॑नि॒ बिभ्र॑ता॒वश्वि॑ना॒ गच्छ॑तं यु॒वम् ।
रुद्रा॒ हिर॑ण्यवर्तनी जुषा॒णा वा॑जिनीवसू॒ माध्वी॒ मम॑ श्रुतं॒ हव॑म् ॥ ३ ॥

आ नः रत्नानि बिभ्रतौ अश्विना गच्छतं युवम् ।
रुद्रा हिरण्यवर्तनीइतिहिरण्यऽवर्तनी जुषाणा वाजिनीवसूइतिवाजिनीऽवसू माध्वीइति मम श्रुतं हवम् ॥ ३ ॥

अत्युत्कृष्ट रत्नसंपत्ति घेऊन हे अश्विदेवांनो, तुम्ही उभयता आमच्याकडे आगमन करा. तुम्ही भयानकस्वरूप व तुमची रथचक्रे सुवर्णाची आहेत. हे सत्वसारधन देवांनो, हे मधुररसप्रिय विभूतिंनो, तुम्ही नित्य तृप्त आहात तर तुम्ही आमची ही शंका ऐका. ॥ ३॥


सु॒ष्टुभो॑ वां वृषण्वसू॒ रथे॒ वाणी॒च्याहि॑ता ।
उ॒त वां॑ ककु॒हो मृ॒गः पृक्षः॑ कृणोति वापु॒षो माध्वी॒ मम॑ श्रुतं॒ हव॑म् ॥ ४ ॥

सुऽस्तुभः वां वृषण्वसूइतिवृषण्विसू रथे वाणीचि आऽहिता ।
उत वां ककुहः मृगः पृक्षः कृणोति वापुषः माध्वीइति मम श्रुतं हवम् ॥ ४ ॥

तुमचे उत्तम कीर्तन करणार्‍या भक्तांची वाणी, हे वीर्यधन विभूतिंनो, तुमच्या रथाच्या ठिकाणी विनटली आहे. आणि ह्या तुमच्या रथाला जोडलेले हे ऐटदार नामांकित जनावर तर आपल्या जोराची शिकस्त करीत धांवत येत आहे, तर हे मधुररस प्रिय देवांनो, माझी हांक ऐका. ॥ ४ ॥


बो॒धिन्म॑नसा र॒थ्येषि॒रा ह॑वन॒श्रुता॑ ।
विभि॒श्च्यवा॑नमश्विना॒ नि या॑थो॒ अद्व॑याविनं॒ माध्वी॒ मम॑ श्रुतं॒ हव॑म् ॥ ५ ॥

बोधित्ऽमनसा रथ्या इषिरा हवनऽश्रुता ।
विभिः च्यवानं अश्विना नि याथः अद्वयाविनं माध्वीइति मम श्रुतं हवम् ॥ ५ ॥

हे अश्वीहो, तुम्ही प्रबुद्धमनस्क महारथी आहांत, तुम्ही आवेशी व भक्ताची हांक तात्काळ ऐकणारे आहांत, म्हणूनच तुम्ही पंख असलेल्या रथासह निर्मल अंतःकरणाचा जो च्यवान त्याच्यकडे जाता, तर मधुररसप्रिय देवांनो, माझ्याहि हांकेकडे लक्ष द्या. ॥ ५ ॥


आ वां॑ नरा मनो॒ युजोऽ॑श्वासः प्रुषि॒तप्स॑वः ।
वयो॑ वहन्तु पी॒तये॑ स॒ह सु॒म्नेभि॑रश्विना॒ माध्वी॒ मम॑ श्रुतं॒ हव॑म् ॥ ६ ॥

आ वां नरा मनःऽयुजः अश्वासः प्रुषितऽप्सवः ।
वयः वहंतु पीतये सह सुम्नेभिः अश्विना माध्वीइति मम श्रुतं हवम् ॥ ६ ॥

हे वीरांनो, तुमच्या मनांत आल्या बरोबर आपण होऊन रथाला जोडले जाणारे ते तुमचे बुट्टीदार घोडे किंवा तुमचे पंख असलेले रथ हे अश्विहो, तुमच्या कृपेच्या आनंदासह तुम्हाला सोमप्राशनार्थ इकडे घेऊन येवोत. तर आता हे मधुररसप्रिय देवांनो, माझी हांक ऐका. ॥ ६ ॥


अश्वि॑ना॒वेह ग॑च्छतं॒ नास॑त्या॒ मा वि वे॑नतम् ।
ति॒रश्चि॑दर्य॒या परि॑ व॒र्तिर्या॑तमदाभ्या॒ माध्वी॒ मम॑ श्रुतं॒ हव॑म् ॥ ७ ॥

अश्विनौ आ इह गच्छतं नासत्या मा वि वेनतम् ।
तिरः चित् अर्यऽया परि वर्तिः यातं अदाभ्या माध्वीइति मम श्रुतं हवम् ॥ ७ ॥

अश्विहो, कसेंहिकरून इकडे याच, सत्यस्वरूप देवांनो, अनमान करूं नका. महानुभाव विभूतींनो, मध्ये कितीहि अंतर असले तरी ते ओलांडून भक्ताच्या घरी याच आणि हे अप्रतिद्वंद्व वीरांनो, हे मधुररसप्रिय देवांनो , माझी हांक ऐका. ॥ ७ ॥


अ॒स्मिन्य॒ज्ञे अ॑दाभ्या जरि॒तारं॑ शुभस्पती ।
अ॒व॒स्युम॑श्विना यु॒वं गृ॒णन्त॒मुप॑ भूषथो॒ माध्वी॒ मम॑ श्रुतं॒ हव॑म् ॥ ८ ॥

अस्मिन् यज्ञे अदाभ्या जरितारं शुभः पतीइति ।
अवस्युं अश्विना युवं गृणंतं उप भूषथः माध्वीइति मम श्रुतं हवम् ॥ ८ ॥

अजिंक्य वीरांनो, मंगलाधीशांनो, ह्या यज्ञामध्ये तुमच्या अनुग्रहाची इच्छा धरणारा स्तोतृवर्ग तुमचे स्तवन करीत असतांना हे अश्वीदेवहो, तुम्ही त्याचे गौरव करतां तर मधुररसप्रिय देवांनो , माझी हांक ऐका. ॥ ८ ॥


अभू॑दु॒षा रुश॑त्पशु॒राग्निर॑धाय्यृ॒त्वियः॑ ।
अयो॑जि वां वृषण्वसू॒ रथो॑ दस्रा॒वम॑र्त्यो॒ माध्वी॒ मम॑ श्रुतं॒ हव॑म् ॥ ९ ॥

अभूत् उषा रुशत्ऽपशुः आ अग्निः अधायि ऋत्वियः ।
अयोजि वां वृषण्वसूइतिवृषण्ऽवसू रथः दस्रौ अमर्त्यः माध्वीइति मम श्रुतं हवम् ॥ ९ ॥

आपल्या उज्ज्वलकिरणरूप गोधनासह पहा ही उषा उदय पावली. यथाकाळी प्रदीप्त होणारा अग्निदेव वेदीवर अधिष्ठित झाला. हे वीर्यधन देवांनो, तुमचा अविनाशी रथहि जोडून तयार झाला, तर हे मधुररसप्रिय देवांनो , माझी हांक ऐका. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ७६ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषी - अत्रि भौम : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुभ्


आ भा॑त्य॒ग्निरु॒षसा॒मनी॑क॒मुद्विप्रा॑णां देव॒या वाचो॑ अस्थुः ।
अ॒र्वाञ्चा॑ नू॒नं र॑थ्ये॒ह या॑तं पीपि॒वांस॑मश्विना घ॒र्ममच्छ॑ ॥ १ ॥

आ भाति अग्निः उषसां अनीकं उत् विप्राणां देवऽयाः वाचः अस्थुः ।
अर्वाञ्चा नूनं रथ्या इह यातं पीपिऽवांसं अश्विना घर्मं अच्छ ॥ १ ॥

अग्निदेव आणि उषेचा रश्मिसमूह सुप्रकाशित दिसू लागला. प्रतिभावान् कविला देवभक्तिपूर्ण काव्योद्‍गार स्फुरण पावूं लागले. तर अशा प्रभातसमयी हे महारथी वीरांनो, हे अश्वीदेवांनो इकडे मुख करा; आणि क्षीरीने उचंबळून जाणार्‍या ह्या पात्राकडे त्वरित आगमन करा. ॥ १ ॥


न सं॑स्कृ॒तं प्र मि॑मीतो॒ गमि॒ष्ठान्ति॑ नू॒नम॒श्विनोप॑स्तुते॒ह ।
दिवा॑भिपि॒त्वेऽ॑व॒साग॑मिष्ठा॒ प्रत्यव॑र्तिं दा॒शुषे॒ शम्भ॑विष्ठा ॥ २ ॥

न संस्कृतं प्र मिमीतः गमिष्ठा अंति नूनं अश्विना उपऽस्तुता इह ।
दिवा अभिऽपित्वे अवसा आऽगमिष्ठा प्रति अवर्तिं दाशुषे शंऽभविष्ठा ॥ २ ॥

भक्तांकडे वारंवार जाणारे ते दिव्य विभूति, भक्तांच्या उत्कृष्ट कृतिचा कधी अव्हेर करीत नाहीत. ते भक्तस्तुत देव नेहमी येथे अगदी जवळच असतात. दिवसा असो सायंकाळी असो, आपल्या कृपेच्या संरक्षणासह भक्त संकट निवारणार्थ ते पाहिजे तितक्या वेळां येतात, आणि हवि अर्पण करणार्‍या उपासकास अत्यंत कल्याणप्रद होतात. ॥ २ ॥


उ॒ता या॑तं संग॒वे प्रा॒तरह्नो॑ म॒ध्यंदि॑न॒ उदि॑ता॒ सूर्य॑स्य ।
दिवा॒ नक्त॒मव॑सा॒ शंत॑मेन॒ नेदानीं॑ पी॒तिर॒श्विना त॑तान ॥ ३ ॥

उत आ यातं संऽगवे प्रातः अह्नः मध्यंदिने उत्ऽइता सूर्यस्य ।
दिवा नक्तं अवसा शंऽतमेन न इदानीं पीतिः अश्विना आ ततान ॥ ३ ॥

पहाटे, गोदोहनाच्या वेळेस, सूर्योदय झाल्यावर, दुपारी माध्यान्हसमयी, व तसेच दिवसा काय रात्री काय, नेहमी आपल्या अत्यंत मंगलकारक सहायासह येथे या. ह्या सोमप्राशन समारंभाने अश्विदेवांना आता पहिल्यांदाच आणले आहे असे नाही. ॥ ३ ॥


इ॒दं हि वां॑ प्र॒दिवि॒ स्थान॒मोक॑ इ॒मे गृ॒हा अ॑श्विने॒दं दु॑रो॒णम् ।
आ नो॑ दि॒वो बृ॑ह॒तः पर्व॑ता॒दाद्‌भ्यो या॑त॒मिष॒मूर्जं॒ वह॑न्ता ॥ ४ ॥

इदं हि वां प्रऽदिवि स्थानं ओकः इमे गृहाः अश्विना इदं दुरोणम् ।
आ नः दिवः बृहतः पर्वतात् अद्‌भ्यःव यातं इषं ऊर्जं वहंता ॥ ४ ॥

पुरातन काळापासून हेच तुमचे ठिकाण, हेच तुमचे निवासस्थान, हीच गृहे आणि अश्विदेवांनो हेच मंदिर होय. तर तुम्ही आकाशातून अथवा त्यांतील प्रचंड मेघरूप पर्वतांतून, किंवा आकाशोदकांतून, उत्साह आणि ओजस्विता ही भक्तांना देण्याकरिता घेऊन इकडे या. ॥ ४ ॥


सम॒श्विनो॒रव॑सा॒ नूत॑नेन मयो॒भुवा॑ सु॒प्रणी॑ती गमेम ।
आ नो॑ र॒यिं व॑हत॒मोत वी॒राना विश्वा॑न्यमृता॒ सौभ॑गानि ॥ ५ ॥

सं अश्विनोः अवसा नूतनेन मयोभुवा सुप्रणीती गमेम ।
आ नः रयिं वहतं ओत वीरान् आ विश्वान्नि मृता सौभगानि ॥ ५ ॥

अश्विदेवांनो, तुमच्या नवीन कल्याणप्रद अनुग्रहाचा आणि तुमच्या उत्कृष्ट नेतृत्वाचा लाभ आम्हांस घडो. अमर विभूतिंनो, दिव्य वैभव, सर्व प्रकारचे वीरपुरुष आणि भाग्यवंतास प्राप्त होणारी इतर सौख्येंहि घेऊन तुम्ही आमच्याकडे आगमन करा. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ७७ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषी - अत्रि भौम : देवता - अश्विनीकुमार : छंद - त्रिष्टुभ्


प्रा॒त॒र्यावा॑णा प्रथ॒मा य॑जध्वं पु॒रा गृध्रा॒दर॑रुषः पिबातः ।
प्रा॒तर्हि य॒ज्ञम॒श्विना॑ द॒धाते॒ प्र शं॑सन्ति क॒वयः॑ पूर्व॒भाजः॑ ॥ १ ॥

प्रातःऽयावाना प्रथमा यजध्वं पुरा गृध्रात् अररुषः पिबातः ।
प्रातः हि यज्ञं अश्विना दधातेइति प्र शंसंति कवयः पूर्वऽभाजः ॥ १ ॥

ऋत्विजांनो प्रातःकाळी आगमन करणार्‍या ह्या आद्य विभूतिप्रित्यर्थ यजन करा. लोभी दुरात्मा पोट जाळतो त्यापूर्वीच हे येऊन सोमरस प्राशन करतात. प्रातःकाळीच आश्विदेव येऊन यज्ञ सांग करितात अशीच तुमची कीर्ति पुरातन ऋषींनी गाईली आहे. ॥ १ ॥


प्रा॒तर्य॑जध्वम॒श्विना॑ हिनोत॒ न सा॒यम॑स्ति देव॒या अजु॑ष्टम् ।
उ॒तान्यो अ॒स्मद्य॑जते॒ वि चावः॒ पूर्वः॑ पूर्वो॒ यज॑मानो॒ वनी॑यान् ॥ २ ॥

प्रातः यजध्वं अश्विना हिनोत न सायं अस्ति देवऽयाः अजुष्टम् ।
उत अन्यः अस्मत् यजते वि च आवः ऊर्वः पूर्वऽपूर्वः अजमानः वनीयान् ॥ २ ॥

तुम्ही पंचपंच उषःकाळीच अश्वीदेवांचे यजन करा, त्यांच्या प्रित्यर्थ हवि अर्पण करा. सायंकाळी सुद्धा देवसेवेचा स्वीकार होत नाही असे नाही. तरीपण आमच्या अगोदर दुसरा कोणीएक भक्त भगवत् यजन करून त्याचा धांवाहि करीलच. आणि जो जो भक्त ज्यास्त लवकर उपासना करील तो तर देवाला फारच प्रिय. ॥ २ ॥


हिर॑ण्यत्व॒ङ्ममधु॑वर्णो घृ॒तस्नुः॒ पृक्षो॒ वह॒न्ना रथो॑ वर्तते वाम् ।
मनो॑जवा अश्विना॒ वात॑रंहा॒ येना॑तिया॒थो दु॑रि॒तानि॒ विश्वा॑ ॥ ३ ॥

हिरण्यऽत्वक् मधुऽवर्णः घृतऽस्नुः पृक्षः वहन् आ रथः वर्तते वाम् ।
मनःऽजवाः अश्विना वातऽरंहाः येन अतिऽयाथः दुःऽइतानि विश्वा ॥ ३ ॥

तुमच्या रथावर सोन्याचे आस्तरण असून त्याची कांति फारच चित्ताकर्षक आहे. तो घृताचा वर्षाव करतो, आणि बलवर्धक पदार्थ भरून आमच्याकडे वळतो. तो मनाप्रमाणे शीघ्रगामी, आणि हे अश्वि देवांनो, प्रभंजनाप्रमाणे सोसाट्याने जाणरा आहे. तर अशा रथात आरोहण करून तुम्ही यच्चावत् अत्यंत बिकट स्थलांतून खुशाल संचार करतां. ॥ ३ ॥


यो भूयि॑ष्ठं॒ नास॑त्याभ्यां वि॒वेष॒ चनि॑ष्ठं पि॒त्वो रर॑ते विभा॒गे ।
स तो॒कम॑स्य पीपर॒च्छमी॑भि॒रनू॑र्ध्वभासः॒ सद॒मित्तु॑तुर्यात् ॥ ४ ॥

यः भूयिष्ठं नासत्याभ्यां विवेष चनिष्ठं पित्वः ररते विऽभागे ।
सः तोकं अस्य पीपरत् शमीभिः अनूर्ध्वऽभासः सदं इत् तुतुर्यात् ॥ ४ ॥

जो सत्यस्वरूप अश्विदेवांप्रित्यर्थ फारच मिष्ट असे पेय चषकांत भरपूर ओतून त्यांना समर्पण करतो, अणि दिवसाच्या प्रत्येक भागाला त्यांना अर्पण करतो, तो आपल्या अशा अपूर्व सत्कृतींनी आपल्याच वंशजांची उन्नति करतो असेच म्हटले पाहिजे. असा भक्त, ज्याचे तेज कधीच उर्जित दशेस येत नाही अशा दुर्जनांना नेहमीच सपाट्यासरशी चिरडून टकतो. ॥ ४ ॥


सम॒श्विनो॒रव॑सा॒ नूत॑नेन मयो॒भुवा॑ सु॒प्रणी॑ती गमेम ।
आ नो॑ र॒यिं व॑हत॒मोत वी॒राना विश्वा॑न्यमृता॒ सौभ॑गानि ॥ ५ ॥

सं अश्विनः अवसा नूतनेन मयोभुवा सुप्रणीती गमेम ।
आ नः रयिं वहतं ओत वीरान् आ विश्वानि अमृता सौभगानि ॥ ५ ॥

अश्विदेवांनो, तुमच्या नवीन कल्याणप्रद अनुग्रहाचा आणि तुमच्या उत्कृष्ट नेतृत्त्वाचा लाभ आम्हांस घडो. अमरविभूतींनो, दिव्य वैभव, सर्व प्रकारचे वीरसैनिक आणि भाग्यवंतास प्राप्त होणारी सौख्येंहि घेऊन तुम्ही आमच्याकडे आगमन करा. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ७८ ( अश्विनीकुमार सूक्त )

ऋषी - सप्तवध्रि आत्रेय : देवता - अश्विनीकुमार : छंद - उष्णिह, त्रिष्टुभ्, अनुष्टुभ्


अश्वि॑ना॒वेह ग॑च्छतं॒ नास॑त्या॒ मा वि वे॑नतम् ।
हं॒सावि॑व पतत॒मा सु॒ताँ उप॑ ॥ १ ॥

अश्विनौ इह गच्छतं नासत्या मा वि वेनतम् ।
हंसौऽइव पततं आ सुतान् उप ॥ १ ॥

अश्विदेवांनो, इकडे आगमन करा. सत्यस्वरूप विभूतींनो, उदासीनता धरूं नका. तर हंसाप्रमाणे उल्हासाने आमच्या सोमरसाकडे या. ॥ १ ॥


अश्वि॑ना हरि॒णावि॑व गौ॒रावि॒वानु॒ यव॑सम् ।
हं॒साव् इ॑व पततं॒ आ सु॒ताँ उप॑ ॥ २ ॥

अश्विना हरिणौऽइव गौरौऽइव अनु यवसम् ।
हंसौऽइव पततं आ सुतान् उप ॥ २ ॥

अश्विदेवहो, हरिणांची जोडी, किंवा गव्यांची जोडी कोमल तृणधान्याकडे त्वरेने घेऊन जाते, त्याप्रमाणे अथवा हंसाप्रमाणे आमच्या सोमरसाकडे तुम्ही उड्डाण करून या. ॥ २ ॥


अश्वि॑ना वाजिनीवसू जु॒षेथां॑ य॒ज्ञमि॒ष्टये॑ ।
हं॒सावि॑व पतत॒मा सु॒ताँ उप॑ ॥ ३ ॥

अश्विना वाजिनीवसूइतिवाजिनीऽवसू जुषेथां यज्ञं इष्टये ।
हंसौऽइव पततं आ सुतान् उप ॥ ३ ॥

हे अश्विदेवहो, हे सत्वसामर्थ्यसंपन्न विभूतीहो, आमच्या हेतू पूर्तिकरितां ह्या यज्ञाचा स्वीकार करा, आणि हंसांप्रमाणे आमच्या सोमरसाकडे उड्डाण करून या. ॥ ३ ॥


अत्रि॒र्यद्वा॑मव॒रोह॑न्नृ॒बीस॒मजो॑हवी॒न्नाध॑मानेव॒ योषा॑ ।
श्ये॒नस्य॑ चि॒ज्जव॑सा॒ नूत॑ने॒नाग॑च्छतमश्विना॒ शंत॑मेन ॥ ४ ॥

अत्रिः यत् वां अवऽरोहन् ऋबीसं अजोहवीन् नाधमानाऽइव योषा ।
श्येनस्य चित् जवसा नूतनेन आ अगच्छतं अश्विना शंऽतमेन ॥ ४ ॥

खोल विवरांतील अग्निकुंडात पडतां पडतां अत्रि ऋषिंनी, आर्तस्वराने धांवा करणार्‍या आपल्या पत्नीप्रमाणेच आपणही स्वतः जेव्हां तुम्हा उभयतांना हांक मारली, तेव्हां हे अश्वीहो, ससाण्यासारख्या आपल्या अगदी ताज्या दमाने, आणि भक्तकल्याणाविषयी अत्यंत आतुर अशा त्वरेने तुम्ही तिकडे धांवून गेलांत. ॥ ४ ॥


वि जि॑हीष्व वनस्पते॒ योनिः॒ सूष्य॑न्त्या इव ।
श्रु॒तं मे॑ अश्विना॒ हवं॑ स॒प्तव॑ध्रिं च मुञ्चतम् ॥ ५ ॥

वि जिहीष्व वनस्पते योनिः सूष्यंत्याःऽइव ।
श्रुतं मे अश्विना हवं सप्तऽवध्रिं च मुञ्चतम् ॥ ५ ॥

हे महावृक्षा, प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या कुसवेप्रमाणे तू दुभंग हो; हे अश्विहो, माझी हांक ऐका, आणि झाडांत अडकलेल्या "सप्तवध्रि" ला सोडवा. ॥ ५ ॥


भी॒ताय॒ नाध॑मानाय॒ ऋष॑ये स॒प्तव॑ध्रये ।
मा॒याभि॑रश्विना यु॒वं वृ॒क्षं सं च॒ वि चा॑चथः ॥ ६ ॥

भीताय नाधमानाय ऋषये सप्तऽवध्रये ।
मायाभिः अश्विना युवं वृक्षं सं च वि च अचथः ॥ ६ ॥

घाबरून जाऊन देवाचा धांवा करणार जो "सप्तवध्रि" ऋषि त्याच्याकरिता हे अश्विहो, तुम्ही आपल्या दैवी चमत्काराने त्या महान् वृक्षाला वांकवून विदीर्ण केलेत. ॥ ६ ॥


यथा॒ वातः॑ पुष्क॒रिणीं॑ समि॒ङ्‌ग्य॑ति स॒र्वतः॑ ।
ए॒वा ते॒ गर्भ॑ एजतु नि॒रैतु॒ दश॑मास्यः ॥ ७ ॥

यथा वातः पुष्करिणीं संऽइङ्‌गेयति सर्वतः ।
एव ते गर्भः एजतु निःऽऐतु दशऽमास्यः ॥ ७ ॥

वार्‍याची झुळुक तलावांतील पाण्याला चोहोंकडून चाळविते, त्याप्रमाणे हे गर्भिणी तुझा पोटांतील नवमास पूर्ण झालेला हा गर्भ हालचाल करूं लागो. ॥ ७ ॥


यथा॒ वातो॒ यथा॒ वनं॒ यथा॑ समु॒द्र एज॑ति ।
ए॒वा त्वं द॑शमास्य स॒हावे॑हि ज॒रायु॑णा ॥ ८ ॥

यथा वातः यथा वनं यथा समुद्र एजति ।
एव त्वं दशऽमास्य सह अव इहि जरायुणा ॥ ८ ॥

वार्‍याची झुळुक अरण्यांतील वृक्ष आणि समुद्राची लाट हलविते त्याप्रमाणे हे नवमासपूर्ण गर्भा, तू आपल्या गर्भगुंठनासह हलू लाग. ॥ ८ ॥


दश॒ मासा॑ञ्छशया॒नः कु॑मा॒रो अधि॑ मा॒तरि॑ ।
नि॒रैतु॑ जी॒वो अक्ष॑तो जी॒वो जीव॑न्त्या॒ अधि॑ ॥ ९ ॥

दश मासान् शशयानः कुमारः अधि मातरि ।
निःऽऐतु जीवः अक्षतः जीवः जीवंत्याः अधि ॥ ९ ॥

नवमास पूर्ण होऊन जाई पर्यंत मातेच्या उदरांत स्वस्थ पडून राहणारा हा बालक आता जिवंत बाहेर येवो. आपल्या जिवंत मातेच्या कुशीतून जिवंत निपजो. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ७९ ( उषा सूक्त )

ऋषी - सत्यश्रवस् आत्रेय : देवता - उषा : छंद - पंक्ति


म॒हे नो॑ अ॒द्य बो॑ध॒योषो॑ रा॒ये दि॒वित्म॑ती ।
यथा॑ चिन्नो॒ अबो॑धयः स॒त्यश्र॑वसि वा॒य्ये सुजा॑ते॒ अश्व॑सूनृते ॥ १ ॥

महे नः अद्य बोधय उषः राये दिवित्मती ।
यथा चिन् नः अबोधयः सत्यऽश्रवसि वाय्ये सुऽजाते अश्वऽसूनृते ॥ १ ॥

हे उषे, आकाशात तू आपले तेजःपुंज रश्मिजाल पसरून देतेस तर श्रेष्ठ वैभवाची प्राप्ति आम्हांस व्हावी म्हणून तू आज आम्हाला ज्ञानदानाने जागृत कर. हे विशुद्धप्रभवे, विद्युत्-अश्वे, सत्यमधुरभाषिणी उषे, वय्याचा पुत्र सत्यकीर्ति ह्याला तू ह्याचप्रमाने जागृत केले होतेस. ॥ १ ॥


या सु॑नी॒थे शौ॑चद्र॒थे व्यौच्छो॑ दुहितर्दिवः ।
सा व्युच्छ॒ सही॑यसि स॒त्यश्र॑वसि वा॒य्ये सुजा॑ते॒ अश्व॑सूनृते ॥ २ ॥

या सुऽनीथे शौचत्ऽरथे वि औच्छः दुहितः दिवः ।
सा वि उच्छ सहीयसि सत्यऽश्रवसि वाय्ये सुऽजाते अश्वऽसूनृते ॥ २ ॥

हे आकाशकन्यके, शुद्धाचरणी, शोचत्‍रथ ह्याच्यावर जसा तू आपला उज्ज्वल प्रकाश पाडलास तसाच, हे विशुद्धप्रभवे, विद्युत्-अश्वे, सत्यमधुरभषिणी उषे, रणधुरंधर, सत्यकीर्ति असा जो वय्यपुत्र त्याच्यावरहि पाड. ॥ २ ॥


सा नो॑ अ॒द्याभ॒रद्व॑सु॒र्व्युच्छा दुहितर्दिवः ।
यो व्यौच्छः॒ सही॑यसि स॒त्यश्र॑वसि वा॒य्ये सुजा॑ते॒ अश्व॑सूनृते ॥ ३ ॥

सा नः अद्य आभरत्ऽवसुः वि उच्छ दुहितः दिवः ।
योइति वि औच्छः सहीयसि सत्यऽश्रवसि वाय्ये सुऽजाते अश्वऽसूनृते ॥ ३ ॥

हे आकाशकन्यके, तू उत्कृष्ट धनदात्री देवी आम्हांवरहि ज्ञानाचा प्रकाश पाड. हे विशुद्ध प्रभवे, विद्युत्-अश्वे, सत्यमधुरभाषिणी उषे, रणशूर, सत्यकीर्ति जो वय्याचा पुत्र त्यांच्यावर तू आपला उज्ज्वल प्रकाश् लोटलास तसेच आम्हांलाही सुप्रकाशित कर. ॥ ३ ॥


अ॒भि ये त्वा॑ विभावरि॒ स्तोमै॑र्गृ॒णन्ति॒ वह्न॑यः ।
म॒घैर्म॑घोनि सु॒श्रियो॒ दाम॑न्वन्तः सुरा॒तयः॒ सुजा॑ते॒ अश्व॑सूनृते ॥ ४ ॥

अभि ये त्वा विभाऽवरि स्तोमैः गृणंति वह्नयः ।
मघैः मघोनि सुऽश्रियः दामन्ऽवंतः सुऽरातयः सुऽजाते अश्वऽसूनृते ॥ ४ ॥

उज्ज्वल प्रभा-भूषित उषे, हवि अर्पण करणारे जे जे पवित्र भक्त स्तोत्रांनी तुझे यशोवर्णन करतात; हे औदार्यशीले, विशुद्ध प्रभवे, विद्युदश्वे, सत्यमधुरभाषिणी उषे, ते तुझ्या देणग्यांनीच वैभवमंडित, दातृत्वशाली आणि सुधार्मिक होतात. ॥ ४ ॥


यच्चि॒द्धि ते॑ ग॒णा इ॒मे छ॒दय॑न्ति म॒घत्त॑ये ।
परि॑ चि॒द्वष्ट॑यो दधु॒र्दद॑तो॒ राधो॒ अह्र॑यं॒ सुजा॑ते॒ अश्व॑सूनृते ॥ ५ ॥

यच् चित् हि ते गणाः इमे छदयंति मघत्तये ।
परि चित् वष्टयः दधुः ददतः राधः अह्रयं सुऽजाते अश्वऽसूनृते ॥ ५ ॥

जे जे भक्तजन तुजकडून ज्ञानधनाच्या देणगीची प्रप्ति करून घेण्याकरितां तुझे आराधन करतात, ते ते तुजवरच प्रेम करूं लागून, तुला भूषणच वाटेल अशा प्रकारचा हविर्भाग ते अर्पण करतात आणि हे विशुद्ध प्रभवे, विद्युदश्वे, सत्यमधुरभाषिणी उषे, तुझ्या सभोवती निरंतर राहतात. ॥ ५ ॥


ऐषु॑ धा वी॒रव॒द्यश॒ उषो॑ मघोनि सू॒रिषु॑ ।
ये नो॒ राधां॒स्यह्र॑या म॒घवा॑नो॒ अरा॑सत॒ सुजा॑ते॒ अश्व॑सूनृते ॥ ६ ॥

आ एषु धा वीरऽवत् यशः उषः मघोनि सूरिषु ।
ये नः राधांसि अह्रया मघऽवानः अरासत सुऽजाते अश्वऽसूनृते ॥ ६ ॥

हे भाग्य-धनवति, जे जे धनाढ्य दानशूर, आम्हाला भूषणा वाटेल अशा तऱ्हेची देणगी आम्हांस देतात, अशांना हे विशुद्धप्रभवे, विदुत्-अश्वे, सत्यमधुरभषिणी उषे, शूर वीरांनाच जे यश लभ्य ते यश तू अशा लोकधुरीणांना दे. ॥ ६ ॥


तेभ्यो॑ द्यु॒म्नं बृ॒हद्यश॒ उषो॑ मघो॒न्या व॑ह ।
ये नो॒ राधां॒स्यश्व्या॑ ग॒व्या भज॑न्त सू॒रयः॒ सुजा॑ते॒ अश्व॑सूनृते ॥ ७ ॥

तेभ्यः द्युम्नं बृहत् यशः उषः मघोनि आ वह ।
ये नः राधांसि अश्व्या गव्या भजंत सूरयः सुऽजाते अश्वऽसूनृते ॥ ७ ॥

हे भग्य-धनवति, जे जे लोकधुरीण, अश्वप्रचुर व गोधनयुक्त संपन्न देणग्या आम्हांस देतात, हे विशुद्धप्रभवे विदुत्-अश्वे, सत्यमधुरभषिणी उषे, अशा दानशूरांकरितां, प्रतापतेज आणि महद्यश हा प्रसाद घेऊन ये. ॥ ७ ॥


उ॒त नो॒ गोम॑ती॒रिष॒ आ व॑हा दुहितर्दिवः ।
सा॒कं सूर्य॑स्य र॒श्मिभिः॑ शु॒क्रैः शोच॑द्‌भि्र॒र्चिभिः॒ सुजा॑ते॒ अश्व॑सूनृते ॥ ८ ॥

उत नः गोऽमतीः इषः आ वह दुहितः दिवः ।
साकं सूर्यस्य रश्मिऽभिः शुक्रैः शोचत्ऽ‍भिः अर्चिभिः सुऽजाते अश्वऽसूनृते ॥ ८ ॥

तसेच हे आकाशनंदिनी, ज्ञान धेनूच्या प्रकाशाने विभूषित असा उत्साह तू भक्तांकरिता घेऊन ये, हे विशुद्धप्रभवे विदुत्-अश्वे, सत्यमधुरभषिणी उषे, ही देणगी शुभ्र व उज्ज्वल अशा रविप्रकाशाबरोबरच तू घेऊन ये. ॥ ८ ॥


व्युच्छा दुहितर्दिवो॒ मा चि॒रं त॑नुथा॒ अपः॑ ।
नेत्त्वा॑ स्ते॒नं यथा॑ रि॒पुं तपा॑ति॒ सूरो॑ अ॒र्चिषा॒ सुजा॑ते॒ अश्व॑सूनृते ॥ ९ ॥

वि उच्छ दुहितः दिवः मा चिरं तनुथाः अपः ।
न इत् त्वा स्तेनं यथा रिपुं तपाति सूरः अर्चिषा सुऽजाते अश्वऽसूनृते ॥ ९ ॥

हे आकाश कुमरि, आपला निर्मल प्रकाश प्रकट कर. ह्या सत्कार्याला आता विलंब करू नको. हे विशुद्धप्रभवे विदुत्-अश्वे, सत्यमधुरभषिणी उषे, चोर आणि शत्रु ह्यांना जसा सूर्य आपल्या ज्वालेने भाजून काढतो तसा तुला तो खचित ताप देणार नाही. ॥ ९ ॥


ए॒ताव॒द्वेदु॑ष॒स्त्वं भूयो॑ वा॒ दातु॑मर्हसि ।
या स्तो॒तृभ्यो॑ विभावर्यु॒च्छन्ती॒ न प्र॒मीय॑से॒ सुजा॑ते॒ अश्व॑सूनृते ॥ १० ॥

एतावत् वा इत् उषः त्वं भूयः वा दातुं अर्हसि ।
या स्तोतृऽभ्यः विभावऽरि उच्छंती न प्रऽमीयसे सुऽजाते अश्वऽसूनृते ॥ १० ॥

हे उषे, इतकेच काय, पण ह्याहिपेक्षा कितीतरी अधिक तू आम्हा भक्तांना देशील. हे उज्ज्वल प्रभाभूषिते, हे विशुद्धप्रभवे विदुत्-अश्वे, सत्यमधुरभषिणी उषे, भक्तजनाकरिता तू एकदा सुप्रकाशित होऊं लागलीस की, त्यांत तू कसूर करीत नाहीस. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ८० ( उषा सूक्त )

ऋषी - सत्यश्रवस् आत्रेय : देवता - उषा : छंद - त्रिष्टुभ्


द्यु॒तद्या॑मानं बृह॒तीमृ॒तेन॑ ऋ॒ताव॑रीमरु॒णप्सुं॑ विभा॒तीम् ।
दे॒वीमु॒षसं॒ स्वरा॒वह॑न्तीं॒ प्रति॒ विप्रा॑सो म॒तिभि॑र्जरन्ते ॥ १ ॥

द्युतत्ऽयामानं बृहतीं ऋतेन ऋतऽवरीं अरुणऽप्सुं विऽभातीम् ।
देवीं उषसं स्वः आऽवहंतीं प्रति विप्रासः मतिऽभिः जरंते ॥ १ ॥

उषेचा दीप्तिमान अरक्तवर्ण रथ, आणि ती श्रेष्ठ देवी, सनातन सन्मार्गानेच सनातन सत्यधर्मावर प्रेम करणारी, व सूर्याला आपल्या मागोमाग आणणारी उषा, हिचि स्तुति ज्ञानी कवि आपल्या भावशाली काव्यांनी करीत असतात. ॥ १ ॥


ए॒षा जनं॑ दर्श॒ता बो॒धय॑न्ती सु॒गान्प॒थः कृ॑ण्व॒ती या॒त्यग्रे॑ ।
बृ॒ह॒द्र॒था बृ॑ह॒ती वि॑श्वमि॒न्वोषा ज्योति॑र्यच्छ॒त्यग्रे॒ अह्ना॑म् ॥ २ ॥

एषा जनं दर्शता बोधयंती सुऽगान् पथः कृण्वती याति अग्रे ।
बृहत्ऽरथा बृहती विश्वंऽइन्वा उषाः ज्योतिः यच्छति अग्रे अह्नाम् ॥ २ ॥

ही लावण्यवती देवी, लोकांना ज्ञानबोधाने जागृत करून त्यांचे मार्ग सुगम करून देते. ती श्रेष्ठ देवी आपल्या भव्य रथावर आरूढ होऊन व विश्वाला प्रेरणा करून पुढे होते आणि दिवस सुरू होण्यापूर्वीच आपली प्रभा प्रकट करते. ॥ २ ॥


ए॒षा गोभि॑ररु॒णेभि॑र्युजा॒नास्रे॑धन्ती र॒यिमप्रा॑यु चक्रे ।
प॒थो रद॑न्ती सुवि॒ताय॑ दे॒वी पु॑रुष्टु॒ता वि॒श्ववा॑रा॒ वि भा॑ति ॥ ३ ॥

एषा गोभिः अरुणेभिः युजाना अस्रेधंती रयिं अप्रऽआयु चक्रे ।
पथः रदंती सुविताय देवी पुरु‍स्तुता विश्वऽवारा वि भाति ॥ ३ ॥

आरक्ततेजोमय वृषभ आपल्या रथास जोडून, कोणाला अपकार न करणारी ही उषा, भक्तांना अविनाशी धन देते व लोक-सुखार्थ त्यांचे मार्ग खुले करते. अशी ही सर्वजनस्तुत आणि सर्वजनप्रिय उषादेवी पहा आता प्रकाशुं लागली आहे. ॥ ३ ॥


ए॒षा व्येनी भवति द्वि॒बर्हा॑ आविष्कृण्वा॒ना त॒न्वं पु॒रस्ता॑त् ।
ऋ॒तस्य॒ पन्था॒मन्वे॑ति सा॒धु प्र॑जान॒तीव॒ न दिशो॑ मिनाति ॥ ४ ॥

एषा विऽएनी भवति द्विऽबर्हाः आविःऽष्कृण्वाना तन्वं पुरस्तात् ।
ऋतस्य पंथां अन्वेति साधु प्रजानतीव न दिशः मिनाति ॥ ४ ॥

हरिणीप्रमाणे ही चंचल किरणांची आहे तथापि, आपले पूर्व दिग्भागी शरीर तिने पूर्ण प्रकट केले म्हणजे ती दोन प्रकारच्या रंगांची दिसते. ती शुद्धस्वभाव देवी आपल्या सनातन सत्यमार्गालाच बरोबर अनुसरते. चाणाक्ष स्त्रीप्रमाणे आपली दिशा कधी चुकत नाही. ॥ ४ ॥


ए॒षा शु॒भ्रा न त॒न्वो विदा॒नोर्ध्वेव॑ स्ना॒ती दृ॒शये॑ नो अस्थात् ।
अप॒ द्वेषो॒ बाध॑माना॒ तमां॑स्यु॒षा दि॒वो दु॑हि॒ता ज्योति॒षागा॑त् ॥ ५ ॥

एषा शुभ्रा न तन्वः विदाना ऊर्ध्वाऽइव स्नाती दृशये नः अस्थात् ।
अप द्वेषः बाधमाना तमांसि उषाः दिवः दुहिता ज्योतिषा आ अगात् ॥ ५ ॥

न्हालेल्या शुभ्रवर्ण निर्मल स्त्रीप्रमाणे आपली अंगकांती आहे अशी तिला जाणीव असल्याने, आम्ही तिला डोळेभरून पहावे म्हणून पहा ती आमच्या समोर उभी राहिली व द्वेष आणि अंधकार ह्यांना सतावून सोडून व हांकून देऊन ही आकाशनंदिनी उषा पहा आपल्या तेजांसह प्राप्त झाली आहे. ॥ ५ ॥


ए॒षा प्र॑ती॒ची दु॑हि॒ता दि॒वो नॄन्योषे॑व भ॒द्रा नि रि॑णीते॒ अप्सः॑ ।
व्यू॒र्ण्व॒ती दा॒शुषे॒ वार्या॑णि॒ पुन॒र्ज्योति॑र्युव॒तिः पू॒र्वथा॑कः ॥ ६ ॥

एषा प्रतीची दुहिता दिवः नॄन् योषाऽइव भद्रा नि रिणीते अप्सः ।
विऽऊर्ण्वती दाशुषे वार्याणि पुनः ज्योतिः युवतिः पूर्वऽथा अकरित्यकः ॥ ६ ॥

ही आकाशकुमरी उषा वीरपुरुषांसन्मुख उभी राहिली म्हणजे कुलीन तरुणी प्रमाणे आपले शरीर किंचित् झांकून घेते, परंतु भक्तांना मात्र अभिलषणीय वस्तु अनावृत करते. याप्रमाणे त्या तरुणीने जगावर पूर्ववत् पुनः प्रकाश पाडला आहे. ॥ ६ ॥


ॐ तत् सत्


GO TOP