PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ५ - सूक्त ५१ ते ६०

ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ५१ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - स्वस्ति आत्रेय : देवता - विश्वेदेव : छंद - गायत्री, उष्णिक्, त्रिष्टुभ्, अनुष्टुभ्


अग्ने॑ सु॒तस्य॑ पी॒तये॒ विश्वै॒रूमे॑भि॒रा ग॑हि । दे॒वेभि॑र्ह॒व्यदा॑तये ॥ १ ॥

अग्ने सुतस्य पीतये विश्वैः ऊमेभिः आ गहि । देवेभिः हव्यऽदातये ॥ १ ॥

हे अग्नि, तुझ्या सर्व विभूतीसह, तुझ्या संरक्षण सामग्रीसह तू आमच्या सोमरसाचा आस्वाद घेण्याकरिता आणि हविर्भागाचा स्वीकार करण्याकरिता आगमन कर. ॥ १ ॥


ऋत॑धीतय॒ आ ग॑त॒ सत्य॑धर्माणो अध्व॒रम् । अ॒ग्नेः पि॑बत जि॒ह्वया॑ ॥ २ ॥

ऋतऽधीतयः आ गत सत्यऽधर्माणः अध्वरम् । अग्नेः पिबत जिह्वया ॥ २ ॥

सनातन धर्म हीच तुमची बुद्धि, आणि सत्य हाच तुमचा धर्म अशा दिव्य विभूतींनो, ह्या आमच्या याग समारंभास या, आणि अग्नीच्या ज्वालारूप जिव्हेने सोमरसाचे प्राशन करा. ॥ २ ॥


विप्रे॑भिर्विप्र सन्त्य प्रात॒र्याव॑भि॒रा ग॑हि । दे॒वेभिः॒ सोम॑पीतये ॥ ३ ॥

विप्रेभिः विप्र संत्य प्रातर्यावऽभिः आ गहि । देवेभिः सोमऽपीतये ॥ ३ ॥

हे साधुश्रेष्ठा, हे ज्ञानीकवे अग्निदेवा, ज्ञानी आणि कवि अशाच तुझ्या विभूतींसह सोमरस पानार्थ इकडे ये. ॥ ३ ॥


अ॒यं सोम॑श्च॒मू सु॒तोऽमत्रे॒ परि॑ षिच्यते । प्रि॒य इन्द्रा॑य वा॒यवे॑ ॥ ४ ॥

अयं सोमः चमूइति सुतः अमत्रे परि सिच्यते । प्रियः इंद्राय वायवे ॥ ४ ॥

हा सोमरस, लांडाच्या तुंब्यांतून पिळून काढलेला हा रस इंद्राला आनि वायुदेवाला फार आवडतो, म्हणून तो ह्या चषकांत ओतून ठेविला आहे. ॥ ४ ॥


वाय॒वा या॑हि वी॒तये॑ जुषा॒णो ह॒व्यदा॑तये । पिबा॑ सु॒तस्यान्ध॑सो अ॒भि प्रयः॑ ॥ ५ ॥

वायोइति आ याहि वीतये जुषाणः हव्यऽदातये । पिब सुतस्य अन्धसः अभि प्रयः ॥ ५ ॥

हे वायुदेवा, तू प्रसन्न होऊन आमचा नैवेद्य आणि हविर्भाग ह्यांचा स्वीकार करण्याकरिता आगमन कर. आणि आम्हास प्रमोद प्राप्त व्हावा म्हणून आम्ही सिद्ध केलेल्या मधुर पेयाचा आस्वाद घे. ॥ ५ ॥


इन्द्र॑श्च वायवेषां सु॒तानां॑ पी॒तिम॑र्हथः । ताञ्जु॑षेथामरे॒पसा॑व॒भि प्रयः॑ ॥ ६ ॥

इंद्रः च वायो एषां सुतानां पीतिं अर्हथः । तान् जुषेथां अरेपसौ अभि प्रयः ॥ ६ ॥

हे वायू, इंद्र आनि तू अशा तुम्ही उभयतांनी आमच्या सोमरसाचे प्राशन करावे अशी आमची प्रार्थना आहे; तर तुम्ही निष्कलंक देव, आम्हास प्रमोद व्हावा म्हणून त्या रसाचा स्वीकार करा. ॥ ६ ॥


सु॒ता इन्द्रा॑य वा॒यवे॒ सोमा॑सो॒ दध्या॑शिरः । नि॒म्नं न य॑न्ति॒ सिन्ध॑वोऽ॒भि प्रयः॑ ॥ ७ ॥

सुताः इंद्राय वायवे सोमासः दधिऽआशिरः । निम्नं न यंति सिन्धवः ऽभि प्रयः ॥ ७ ॥

इंद्र आणि वायु ह्यांच्या प्रित्यर्थ सोमरस पिळून त्यांत दाट दूध घालून तो तयार केला आहे. तेव्हां आम्हाला प्रमोद प्राप्त व्हावा म्हणून सखल प्रदेशातून नदी जशी जोराने वाहते त्याप्रमाणे ते त्वरेने आमच्याकडे येत आहेत. ॥ ७ ॥


स॒जूर्विश्वे॑भिर्दे॒वेभि॑र॒श्विभ्या॑मु॒षसा॑ स॒जूः । आ या॑ह्यग्ने अत्रि॒वत्सु॒ते र॑ण ॥ ८ ॥

सऽजूः विश्वेभिः देवेभिः अश्विऽभ्यां उषसा सऽजूः । आ याहि अग्ने अत्रिऽवत् सुते रण ॥ ८ ॥

हे अग्नी, सर्व दिव्य विभूतींशी मिळून, अश्वी आणि उषा ह्याच्याशीही मिळून तू इकडे आगमन कर, आणि अत्रि ऋषिच्या प्रमाणे आमच्याही सोमरसाने आनंदित हो. ॥ ८ ॥


स॒जूर्मि॒त्रावरु॑णाभ्यां स॒जूः सोमे॑न॒ विष्णु॑ना । आ या॑ह्यग्ने अत्रि॒वत्सु॒ते र॑ण ॥ ९ ॥

सऽजूः मित्रावरुणाभ्यां सऽजूः सोमेन विष्णुना । आ याहि अग्ने अत्रिऽवत् सुते रण ॥ ९ ॥

हे अग्नी मित्रवरुण ह्यांच्या समवेत, आणि विष्णु समवेत इथे ये, आणि अत्रि ऋषिच्या सोमरसाप्रमाणे आमच्याही सोमरसाने आनंदित हो. ॥ ९ ॥


स॒जूरा॑दि॒त्यैर्वसु॑भिः स॒जूरिन्द्रे॑ण वा॒युना॑ । आ या॑ह्यग्ने अत्रि॒वत्सु॒ते र॑ण ॥ १० ॥

सऽजूः आदित्यैः वसुऽभिः सऽजूः इन्द्रेण वायुना । आ याहि अग्ने अत्रिऽवत् सुते रण ॥ १० ॥

अग्ने, आदित्य वसु ह्यांच्यासह, इंद्राशी वायूशी एक रूप होऊन आगमन कर आणि अत्रि ऋषिच्या सोमरसाप्रमाणे आमच्याही सोमरसाने आनंदित हो. ॥ १० ॥


स्व॒स्ति नो॑ मिमीताम॒श्विना॒ भगः॑ स्व॒स्ति दे॒व्यदि॑तिरन॒र्वणः॑ ।
स्व॒स्ति पू॒षा असु॑रो दधातु नः स्व॒स्ति द्यावा॑पृथि॒वी सु॑चे॒तुना॑ ॥ ११ ॥

स्वस्ति नः मिमीतां अश्विना भगः स्वस्ति देवि अदितिः अनर्वणः ।
स्वस्ति पूषा असुरः दधातु नः स्वस्ति द्यावापृथिवीइति सुऽचेतुना ॥ ११ ॥

अश्वीहो, आम्हाला हितकर अशी गोष्ट घडवा, अनाद्यनंत दैवी शक्ति, भाग्यदाता देव आणि अपाय रहित इतर दिव्य विभूतीही आमचे हितच करोत. महेश्वर, सर्वपोषक पूषा देव आमचे कल्याण करो, आणि ज्ञानी व प्रेमळ अशा द्यावा पृथिवीही आमचे कुशल करोत. ॥ ११ ॥


स्व॒स्तये॑ वा॒युमुप॑ ब्रवामहै॒ सोमं॑ स्व॒स्ति भुव॑नस्य॒ यस्पतिः॑ ।
बृह॒स्पतिं॒ सर्व॑गणं स्व॒स्तये॑ स्व॒स्तये॑ आदि॒त्यासो॑ भवन्तु नः ॥ १२ ॥

स्वस्तये वायुं उप ब्रवामहै सोमं स्वस्ति भुवनस्य यः पतिः ।
बृहस्पतिं सर्वऽगणं स्वस्तये स्वस्तये आदित्यासः भवंतु नः ॥ १२ ॥

आमचे कल्याण व्हावे म्हणून वायुदेवाचे आम्ही स्तवन करतो. त्याचप्रमाणे सोमाचेही करतो. सर्व जगताचा स्वामी सर्व समाजाचा प्रभू देवाधिदेव बृहस्पति त्याचा धांवा करणे आमचे कर्तव्यच आहे. तेव्हा सकल आदित्य हेही आम्हाला कल्याणप्रद होवोत. ॥ १२ ॥


विश्वे॑ दे॒वा नो॑ अ॒द्या स्व॒स्तये॑ वैश्वान॒रो वसु॑र॒ग्निः स्व॒स्तये॑ ।
दे॒वा अ॑वन्त्वृ॒भवः॑ स्व॒स्तये॑ स्व॒स्ति नो॑ रु॒द्रः पा॒त्वंह॑सः ॥ १३ ॥

विश्वे देवा नः अद्य स्वस्तये वैश्वानरः वसुः अग्निः स्वस्तये ।
देवा अवंतु ऋभवः स्वस्तये स्वस्ति नः रुद्रः पातु अंहसः ॥ १३ ॥

सकल दिव्य विभूति आम्हाला कल्याणकारक होत. तो जगत्-हित-तत्पर दिव्य निधि अग्नीही आम्हाला मंगलदायक होवो. दिव्य ऋभू आमच्या हितार्थ प्रसन्न होवोत आणि रुद्र आम्हाला शुभप्रद होऊन सर्व क्लेशाच्या व पातकांच्या पार नेवो. ॥ १३ ॥


स्व॒स्ति मि॑त्रावरुणा स्व॒स्ति प॑थ्ये रेवति ।
स्व॒स्ति न॒ इन्द्र॑श्चा॒ग्निश्च॑ स्व॒स्ति नो॑ अदिते कृधि ॥ १४ ॥

स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति पथ्ये रेवति ।
स्वस्ति न इंद्रः च अग्निः च स्वस्ति नः अदिते कृधि ॥ १४ ॥

मित्र वरुणहो आमचे हितच करा. दिव्य धनाढ्ये शुभप्रदे देवी आमचे कल्याण कर. भगवान् इंद्र आणि अग्नि आमचे मंगल करोत, आणि हे अदिते तूही आमचे हितच कर. ॥ १४ ॥


स्व॒स्ति पन्थां॒ अनु॑ चरेम सूर्याचन्द्र॒मसा॑विव ।
पुन॒र्दद॒ताघ्न॑ता जान॒ता सं ग॑मेमहि ॥ १५ ॥

स्वस्ति पंथां अनु चरेम सूर्याचंद्रमसौऽइव ।
पुनः ददता अघ्नता जानता सं गमेमहि ॥ १५ ॥

चंद्रसूर्य आपला मार्ग आक्रमण करतात त्याप्रमाणे, आम्हीही आमची उन्नति होईल अशा तऱ्हेने मार्ग आक्रमण करूं असे होवो. आणि दानशील, सालस, आणि जाणत्या माणसाचीच आमच्याशी पुनः पुनः गांठ पडेल असे घडो. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ५२ ( मरुत् सूक्त )

ऋषी - श्यावाश्व आत्रेय : देवता - मरुत् : छंद - पंक्ति, अनुष्टुभ्


प्र श्या॑वाश्व धृष्णु॒यार्चा॑ म॒रुद्‌भिः॒वर्ऋ्क्व॑भिः ।
ये अ॑द्रो॒घम॑नुष्व॒धं श्रवो॒ मद॑न्ति य॒ज्ञियाः॑ ॥ १ ॥

प्र श्यावाश्व धृष्णुऽया अर्च मरुत्ऽ‍भिः ऋक्वऽभिः ।
ये अद्रोघं अनुऽस्वधं श्रवः मदंति यज्ञियाः ॥ १ ॥

श्यावाश्वा, भक्ति-गान-प्रिय-मरुतां बरोबरच तूही मोठ्या आवेशाने ’अर्क’ गायन कर. मरुत् हे आपणांस पूज्य आहेत आणि त्यांच्या स्वभावानुरूप, ज्याच्यात कोणाचा द्वेष करण्याचे कारण नाही अशाच कीर्तिप्रद सत्कृत्यात ते आनंद मानतात. ॥ १ ॥


ते हि स्थि॒रस्य॒ शव॑सः॒ सखा॑यः॒ सन्ति॑ धृष्णु॒या ।
ते याम॒न्ना धृ॑ष॒द्विन॒स्त्मना॑ पान्ति॒ शश्व॑तः ॥ २ ॥

ते हि स्थिरस्य शवसः सखायः संति धृष्णुऽया ।
ते यामन् आ धृषत्ऽविनः त्मना पांति शश्वतः ॥ २ ॥

जे बल उत्कट परंतु धिमे असते अशा बलाशी स्वतःच्या आवेशामुळे त्यांची सहजच गट्टी जमते. त्यांचा कलच धाडसी, त्यामुळे मार्गात आपण होऊनच ते असंख्यजनांचे संकटापासून रक्षण करतात. ॥ २ ॥


ते स्य॒न्द्रासो॒ नोक्षणोऽ॑ति ष्कन्दन्ति॒ शर्व॑रीः ।
म॒रुता॒मधा॒ महो॑ दि॒वि क्ष॒मा च॑ मन्महे ॥ ३ ॥

ते स्यंद्रासः न उक्षणः अति स्कंदंति शर्वरीः ।
मरुतां अध महः दिवि क्षमा च मन्महे ॥ ३ ॥

झपाट्याने धावणार्‍या तुंद वृषभाप्रमाणे ते काळ्याकुट्ट अंधार्‍या रात्रीवरही आपली छाप बसवितात. तेव्हा अशा रितीने पृथ्वी आणि आकाश ह्या दोहोंमध्येही जो त्यांचा महिमा गाजत आहे त्या महिम्याचेच आम्ही चिन्तन करतो. ॥ ३ ॥


म॒रुत्सु॑ वो दधीमहि॒ स्तोमं॑ य॒ज्ञं च॑ धृष्णु॒या ।
विश्वे॒ ये मानु॑षा यु॒गा पान्ति॒ मर्त्यं॑ रि॒षः ॥ ४ ॥

मरुत्ऽसु वः दधीमहि स्तोमं यज्ञं च धृष्णुऽया ।
विश्वे ये मानुषा युगा पांति मर्त्यं रिषः ॥ ४ ॥

आवेश प्रेरित होऊन आम्ही आपले स्तोत्र गायन आणि यज्ञ मरुतांचे चरणी अर्पण करतो. म्हणजे ते सर्वजण मिळून, आम्हां मानवांच्या कित्येक पिढ्यांपर्यंत हानि पासून आमचे रक्षण करतील. ॥ ४ ॥


अर्ह॑न्तो॒ ये सु॒दान॑वो॒ नरो॒ असा॑मिशवसः ।
प्र य॒ज्ञं य॒ज्ञिये॑भ्यः दि॒वो अ॑र्चा म॒रुद्‌भ्यः॒॑ ॥ ५ ॥

अर्हंतः ये सुऽदानवः नरोअः असामिऽशवसः ।
प्र यज्ञं यज्ञियेभ्यः दिवः अर्च मरुत्ऽभ्यः ॥ ५ ॥

मरुत् हे शूर, वीर, पूज्य, दानशूर आहेत, आणि त्यांचे बलही असे तसे नाही चांगले भरपूर आहे, तर अश द्युलोकनिवासी यज्ञार्ह मरुतांप्रित्यर्थ ऋत्विजा तू ’अर्क’ गायन कर. ॥ ५ ॥


आ रु॒क्मैरा यु॒धा नर॑ ऋ॒ष्वा ऋ॒ष्टीर॑सृक्षत ।
अन्वे॑नाँ॒ अह॑ वि॒द्युतो॑ म॒रुतो॒ जज्झ॑तीरिव भा॒नुर॑र्त॒त्मना॑ दि॒वः ॥ ६ ॥

आ रुक्मैः आ युधा नरः ऋष्वा ऋष्टीः असृक्षत ।
अनु एनान् अह विऽद्युतः मरुतः जज्झतीःऽइव भानुः अर्त त्मना दिवः ॥ ६ ॥

वीरभूषणांनी मंडित आणि सशस्त्र अशा मरुतांनी आपल्या हातांतील बरची फेकून मारली. तेव्हा त्यांच्या मागोमागच दुसरे एक तेज-अर्थात् विकट हास्य करणार्‍या विद्युलता ह्या आकाशात एकदम चमकू लागल्या. ॥ ६ ॥


ये वा॑वृ॒धन्त॒ पार्थि॑वा॒ य उ॒राव॒न्तरि॑क्ष॒ आ ।
वृ॒जने॑ वा न॒दीनां॑ स॒धस्थे॑ वा म॒हो दि॒वः ॥ ७ ॥

ये ववृधंत पार्थिवाः य उरौ अंतरिक्षे आ ।
वृजने वा नदीनां सधऽस्थे वा महः दिवः ॥ ७ ॥

पृथिवीशी निकट संबंधी म्हणून ते वृद्धिंगत झाले, विस्तीर्ण वातवरणांत, त्याचप्रमाणे नदीच्या तीरावरील प्रदेशात आणि देव भवनात, त्या आकाशांतहि ते वृद्धिंगत झाले. ॥ ७ ॥


शर्धो॒ मारु॑त॒मुच्छं॑स स॒त्यश॑वस॒मृभ्व॑सम् ।
उ॒त स्म॒ ते शु॒भे नरः॒ प्र स्य॒न्द्रा यु॑जत॒ त्मना॑ ॥ ८ ॥

शर्धः मारुतं उत् शंसं सत्यऽशवसं ऋभ्वसम् ।
उत स्म ते शुभे नरः प्र स्यंद्रा युजत त्मना ॥ ८ ॥

तर सत्य हेच ज्यांचे सामर्थ्य अशा त्य महाप्रतापी मरुत् सेनेची प्रशंसा कर. त्या वीरांचा वेग प्रचंड आहे खरा परंतु जगत्कल्याणास त्यांनी अपल्या स्वतःस आपण होऊन वाहून घेतलेले आहे. ॥ ८ ॥


उ॒त स्म॒ ते परु॑ष्ण्या॒मूर्णा॑ वसत शु॒न्ध्यवः॑ ।
उ॒त प॒व्या रथा॑ना॒मद्रिं॑ भिन्द॒न्त्योज॑सा ॥ ९ ॥

उत स्म ते परुष्ण्यां ऊर्णा वसत शुन्ध्यवः ।
उत पव्या रथानां अद्रिं भिंदंति ओजसा ॥ ९ ॥

ते निर्मळ कांतियुक्त मरुत् परुष्णी नदीच्या फेसामुळे जणो काय लोंकरीच्या वस्त्राने आच्छादित असे दिसूं लागले, आणि स्वतःच्या विलक्षण जोमाने त्यांनी आपल्या नुसत्या रथाच्या धांवाच्या रगाड्या खालीच पर्वत आणि मेघ ह्यांच चुराडा उडवून दिला. ॥ ९ ॥


आप॑थयो॒ विप॑थ॒योऽ॑न्तस्पथा॒ अनु॑पथाः ।
ए॒तेभि॒र्मह्यं॒ नाम॑भिर्य॒ज्ञं वि॑ष्टा॒र ओ॑हते ॥ १० ॥

आऽपथयः विऽपथयः अन्तःपथाः अनुऽपथाः ।
एतेभिः मह्यं नामऽभिः यज्ञं विऽस्तारः ओहते ॥ १० ॥

मरुतांनी आमच्याकडे येण्याचा रस्ता धरलेला असो, ते आमच्या कडून परत निघाले असोत किंवा आमच्या प्रदेशामधून अथवा अनुकुल अशा मार्गाने जात असोत; परंतु अशा अनेक प्रकारांनी त्याच्या सर्व समूहाचे लक्ष आमच्या यज्ञाकडेच असते. ॥ १० ॥


अधा॒ नरो॒ न्योह॒तेऽ॑धा नि॒युत॑ ओहते ।
अधा॒ पारा॑वता॒ इति॑ चि॒त्रा रू॒पाणि॒ दर्श्या॑ ॥ ११ ॥

अध नरः नि ओहते अऽध निऽयुत ओहते ।
अध पारावताः इति चित्रा रूपाणि दर्श्या ॥ ११ ॥

त्या वीरांचेच लक्ष आमच्याकडे आहे असे नव्हे तर त्यांच्या ’नियुत्’ अश्वाचेहि आहे काय ? हे पारावत की काय ? म्हणून त्यान्चा आकार वेष प्रेक्षणीय परंतु फारच विलक्षण दिसत आहेत. ॥ ११ ॥


छ॒न्दः॒ स्तुभः॑ कुभ॒न्यव॒ उत्स॒मा की॒रिणो॑ नृतुः ।
ते मे॒ के चि॒न्न ता॒यव॒ ऊमा॑ आसन्दृ॒शि त्वि॒षे ॥ १२ ॥

छंदःस्तुभः उभन्यवः उत्सं आ कीरिणः नृतुः ।
ते मे के चित् न तायवः ऊमाः आसन् दृशि त्विषे ॥ १२ ॥

हे मरुत् नानाप्रकारच्या पद्यांनी ईश्वरस्तवन करतात, मोठ्याने गर्जना करून उदक वृष्टि करतात, गुणानुवाद गात गातच आकाशंतील व पृथ्वीवरील जलाशयाच्या भोवती आनंदाने नाचत असतात, तर असे हे मरुत् आमचे अंगी खरी तडफ आणण्यांत ते आमचे सहायकर्ते होत. ॥ १२ ॥


ये ऋ॒ष्वा ऋ॒ष्टिवि॑द्युतः क॒वयः॒ सन्ति॑ वे॒धसः॑ ।
तमृ॑षे॒ मारु॑तं ग॒णं न॑म॒स्या र॒मया॑ गि॒रा ॥ १३ ॥

ये ऋष्वाः ऋष्टिऽविद्युतः कवयः संति वेधसः ।
तं ऋषे मारुतं गणं नमस्य रमय गिरा ॥ १३ ॥

हे उदाता, ज्ञानी कवि सृष्टीची घडामोद करणारे आहेत. विद्युल्लता हेच त्यंचे भाले, तर हे स्तोत्रकर्त्या तू ह्या मरुत् समूहांस अभिवादन कर आणि आपल्या स्तुतीने त्याचे गौरव कर. ॥ १३ ॥


अच्छ॑ ऋषे॒ मारु॑तं ग॒णं दा॒ना मि॒त्रं न यो॒षणा॑ ।
दि॒वो वा॑ धृष्णव॒ ओज॑सा स्तु॒ता धी॒भिरि॑षण्यत ॥ १४ ॥

अच्छ ऋषे मारुतं गणं दाना मित्रं न योषणा ।
दिवः वा धृष्णवः ओजसा स्तुताः धीभिः इषण्यत ॥ १४ ॥

स्तोत्रकर्त्या, परितोषिकाने आणि तरुणी प्रेमाने जसे एखाद्यास वळवावे त्या प्रमाणे स्तुतीने आणि दानाने तू ह्या मरुत् समूहास आपलेसे कर. ज्या तुमच्या तेजस्वितेचा जोम विलक्षण असतो अशा हे मरुतांनो ! आम्ही अंतःकरणपूर्वक केलेल्या स्तुतीने संतुष्ट होऊन तुम्ही द्यूलोकांतून झपाट्याने येथे या. ॥ १४ ॥


नू म॑न्वा॒न ए॑षां दे॒वाँ अच्छा॒ न व॒क्षणा॑ ।
दा॒ना स॑चेत सू॒रिभि॒र्याम॑श्रुतेभिर॒ञ्जिभिः॑ ॥ १५ ॥

नू मन्वानः एषां देवान् अच्छ न वक्षणा ।
दाना सचेत सूरिऽभिः यामऽश्रुतेभिः अञ्जिभिः ॥ १५ ॥

इतर दिव्यविभूतींप्रमाणे, ह्या मरुताचेहि जो स्तोत्रकर्ता अभिमत प्रकारांनी आणि दानधर्माने चिंतन करतो, तो भक्त, ज्यांचे त्वरित आगमन लोक विश्रुतच असते अशा त्या वीरभूषण मंडित भक्तजन धुरीण मरुतां बरोबरच सदैव राहो. ॥ १५ ॥


प्र ये मे॑ बन्ध्वे॒षे गां वोच॑न्त सू॒रयः॒ पृश्निं॑ वोचन्त मा॒तर॑म् ।
अधा॑ पि॒तर॑मि॒ष्मिणं॑ रु॒द्रं वो॑चन्त॒ शिक्व॑सः ॥ १६ ॥

प्र ये मे बंधुऽएषे गां वोचंत सूरयः पृश्निं वोचंत मातरम् ।
अध पितरं इष्मिणं रुद्रं वोचंत शिक्वसः ॥ १६ ॥

मी त्यांचे आप्तगोत विचारिले तेव्हा त्या त्या भक्तजन धुरीणांनी ’चित्रविचित्र वर्णाची प्रकाशरूप धेनू पृश्नि ती आमची माता’ असे सांगितले. आणि ’प्रबळ वेगवान् रुद्र तो आमचा पिता’ असेही ते महात्मे म्हणाले. ॥ १६ ॥


स॒प्त मे॑ स॒प्त शा॒किन॒ एक॑मेका श॒ता द॑दुः ।
य॒मुना॑या॒मधि॑ श्रु॒तमुद्राधो॒ गव्यं॑ मृजे॒ नि राधो॒ अश्व्यं॑ मृजे ॥ १७ ॥

सप्त मे सप्त शाकिनः एकंऽएका शता ददुः ।
यमुनायां अधि श्रुतं उत् राधः गव्यं मृजे नि राधः अश्व्यं मृजे ॥ १७ ॥

ते बलाढ्य वीर सात सात मिळून एकूणपन्नास होते. त्यापैकी प्रत्येकाने मला शेकडो देणग्या दिल्या आहेत. आणि यमुना नदीच्या तीरावरच ती गोधनाची प्रख्यात देणगी मला मिळाली व घोड्यांच्या पथकाचीहि तेथेच मिळाली. ॥ १७ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ५३ ( मरुत् सूक्त )

ऋषी - श्यावाश्व आत्रेय : देवता - मरुत् : छंद - अनेक


को वे॑द॒ जान॑मेषां॒ को वा॑ पु॒रा सु॒म्नेष्वा॑स म॒रुता॑म् ।
यद्यु॑यु॒ज्रे कि॑ला॒स्यः ॥ १ ॥

कः वेद जानं एषां कः वा पुरा सुम्नेषु आस मरुताम् ।
यत् युयुज्रे किलास्यः ॥ १ ॥

ह्यांचा जन्म केव्हा कसा झाला हे कोणाला माहीत आहे ? प्राचीन काळी ह्या मरुतांच्या कृपेच्या आनंदामध्ये कोणता भक्त होता ? त्यांनी ठिपकेदार हरिणी रथास प्रथम केव्हा जोडल्या ? ॥ १ ॥


ऐतान्रथे॑षु त॒स्थुषः॒ कः शु॑श्राव क॒था य॑युः ।
कस्मै॑ सस्रुः सु॒दासे॒ अन्वा॒पय॒ इळा॑भिर्वृ॒ष्टयः॑ स॒ह ॥ २ ॥

आ एतान् रथेषु तस्थुषः कः शुश्राव कथा ययुः ।
कस्मै सस्रुः सुऽदासे अनु आपयः इळाभिः वृष्टयः सह ॥ २ ॥

त्यांनी आपल्या रथावर आरोहण केले ही गोष्ट प्रथम कोणी ऐकली ? ते कसे धांवून गेले, आणि ह्या मरुतांची अगदी निकटची आप्त जी पर्जन्य वृष्टि ती आपल्या धान्यसमृद्धीसह कोणत्या सद्‍भक्तावर अनुरक्त झाली ? ॥ २ ॥


ते म॑ आहु॒र्य आ॑य॒युरुप॒ द्युभि॒र्विभि॒र्मदे॑ ।
नरो॒ मर्या॑ अरे॒पस॑ इ॒मान्पश्य॒न्निति॑ ष्टुहि ॥ ३ ॥

ते मे आहुः ये आऽययुः उप द्युऽभिः विऽभिः मदे ।
नरः मर्या अरेपसः इमान् पश्यन् इति स्तुहि ॥ ३ ॥

जे आपल्या देदीप्य पक्षिगणांसह इकडे आले तेच मजजवळ बोलले की "आम्ही मरुत् वीर अगदी निर्मल आहोंत, तर आता आमच्याकडे पाहून तुला जी काय प्रशंसा करणे असेल ती कर". ॥ ३ ॥


ये अ॒ञ्जिषु॒ ये वाशी॑षु॒ स्वभा॑नवः स्र॒क्षु रु॒क्मेषु॑ खा॒दिषु॑ ।
श्रा॒या रथे॑षु॒ धन्व॑सु ॥ ४ ॥

ये अञ्जिषु ये वाशीषु स्वऽभानवः स्रक्षु रुक्मेषु खादिषु ।
श्रायाः रथेषु धन्वऽसु ॥ ४ ॥

मरुत् हे स्वयंप्रकाश आहेत. ते जसे आपल्या वीरभूषणांनी, बरची-भाल्यांनी खुलुन दिसतात त्याचप्रमाणे ते रथावर विराजमान होऊन आपल्या गळ्यांतील हारांनी सुवर्णलंकारांनी, हातांतील चक्रांनी अंतराळांत शोभिवंत दिसतात. ॥ ४ ॥


यु॒ष्माकं॑ स्मा॒ रथाँ॒ अनु॑ मु॒दे द॑धे मरुतः जीरदानवः ।
वृ॒ष्टी द्यावो॑ य॒तीरि॑व ॥ ५ ॥

युष्माऽकं स्म रथान् अनु मुदे दधे मरुतः जीरऽदानवः ।
वृष्टी द्यावः यतीःऽइव ॥ ५ ॥

जीवनोदक वर्षणार्‍या मरुतांनो, वृष्टीबरोबरच दिसणार्‍या चंचल तेजांना पाहून जसा आनंद होतो तसाच आनंद मला तुमच्या रथांना पाहून झाला आहे. ॥ ५ ॥


आ यं नरः॑ सु॒दान॑वो ददा॒शुषे॑ दि॒वः कोश॒मचु॑च्यवुः ।
वि प॒र्जन्यं॑ सृजन्ति॒ रोद॑सी॒ अनु॒ धन्व॑ना यन्ति वृ॒ष्टयः॑ ॥ ६ ॥

आ यं नरः सुऽदानवः ददाशुषे दिवः कोशं अचुच्यवुः ।
वि पर्जन्यं सृजंति रोदसीइति अनु धन्वना यंति वृष्टयः ॥ ६ ॥

त्या औदार्यशील वीरांनी भक्तहितार्थ आकाशामध्ये जलसंचय गदगदां हालविला म्हणजे तोच संचय-पर्जन्य ते अंतरालातून धोंधों सोडून देतात, त्याबरोबर निर्जल प्रदेशांतही एकसारखी वृष्टी सुरू होते. ॥ ६ ॥


त॒तृ॒दा॒नाः सिन्ध॑वः॒ क्षोद॑सा॒ रजः॒ प्र स॑स्रुर्धे॒नवो॑ यथा ।
स्य॒न्ना अश्वा॑ इ॒वाध्व॑नो वि॒मोच॑ने॒ वि यद्वर्त॑न्त ए॒न्यः ॥ ७ ॥

ततृदानाः सिन्धवः क्षोदसा रजः प्र सस्रुः धेनवः यथा ।
स्यन्नाः अश्वाःइव अध्वनः विऽमोचने वि यत् वर्तंते एन्यः ॥ ७ ॥

मेघपटल फोडून बाहेत पडणार्‍या वृष्टीरूप नद्या तुषारांच्या झोतानिशी अंतरिक्षांत पसरून धेनूंप्रमाणे सैरावैरा वाहूं लागल्या आणि घोडे आपल्या वाटेतील मुक्कामाकडे दौडत जातात त्याप्रमाणे मरुतांच्या हरिणी आणि पृथ्वीवरील सरिता इतस्ततः संचार करू लागल्या. ॥ ७ ॥


आ या॑त मरुतो दि॒व आन्तरि॑क्षाद॒मादु॒त ।
माव॑ स्थात परा॒वतः॑ ॥ ८ ॥

आ यात मरुतः दिवः आ अन्तरिक्षात् अमात् उत ।
मा अव स्थात पराऽवतः ॥ ८ ॥

मरुतांनो तुम्ही द्युलोकांतून या, अंतरिक्षापासून अथवा आपल्या मंदिरांतून इकडे या परंतु आम्हाला सोडून दूर देशी राहूं नका. ॥ ८ ॥


मा वो॑ र॒सानि॑तभा॒ कुभा॒ क्रुमु॒र्मा वः॒ सिन्धु॒र्नि री॑रमत् ।
मा वः॒ परि॑ ष्ठात्स॒रयुः॑ पुरी॒षिण्य॒स्मे ईत्सु॒म्नम॑स्तु वः ॥ ९ ॥

मा वः रसा अनितभा कुभा क्रुमुः मा वः सिन्धुः नि रीरमत् ।
मा वः परि स्थात् सरयुः पुरीषिणी अस्मेइति इत् सुम्नं अस्तु वः ॥ ९ ॥

रसा, अनितभा, कुभा, क्रुमु ह्या नद्या किंवा सिंधु नदी ह्या तुमच्या वाटेत आडव्या येऊन तुम्हाला थोपवून न घरोत. पाण्याने उचंबळणार्‍या सरयू नदीकडूनसुद्धां तुम्हाला कांही एक अडथळा न होवो. आणि तुम्ही जे काही सुख देणार आहां ते आम्हामध्येच राहो. ॥ ९ ॥


तं वः॒ शर्धं॒ रथा॑नां त्वे॒षं ग॒णं मारु॑तं॒ नव्य॑सीनाम् ।
अनु॒ प्रय॑न्ति वृ॒ष्टयः॑ ॥ १० ॥

तं वः शर्धं रथानां त्वेषं गणं मारुतं नव्यसीनाम् ।
अनु प्र यंति वृष्ट्टयः ॥ १० ॥

तुमच्या रथांचा समुदाय, तुम्हा मरुतांच जाज्वल्य समूह आणि तुमच्या अपूर्व शक्तीचे आविर्भाव ह्या सर्वांच्या अनुरोधाने आकाशांतील जलवृष्टि वागतात. ॥ १० ॥


शर्धं॑शर्धं व एषां॒ व्रातं॑व्रातं ग॒णंग॑णं सुश॒स्तिभिः॑ ।
अनु॑ क्रामेम धी॒तिभिः॑ ॥ ११ ॥

शर्धंऽशर्धं वः एषां व्रातंऽव्रातं गणंऽगणं सुशस्तिऽभिः ।
अनु क्रामेम धीतिऽभिः ॥ ११ ॥

ह्या मरुताचे प्रत्येक सैन्य, प्रत्येक समुदाय आणि प्रत्येक समूह ह्यांच्या धोरणानेच, मधुर आवाजात मनःपूर्वक गायिलेल्या स्तुतींच्या योगाने आम्ही राहूं असे घडो. ॥ ११ ॥


कस्मा॑ अ॒द्य सुजा॑ताय रा॒तह॑व्याय॒ प्र य॑युः ।
ए॒ना यामे॑न म॒रुतः॑ ॥ १२ ॥

कस्मै अद्य सुऽजाताय रातऽहव्याय प्र ययुः ।
एना यामेन मरुतः ॥ १२ ॥

आज हविर्भाग अर्पण करणार्‍या कोणत्या कुलीन भक्ताकडे ह्या वाटेने मरुत् गेले असावे बरे. ? ॥ १२ ॥


येन॑ तो॒काय॒ तन॑याय धा॒न्य॑१ ं बीजं॒ वह॑ध्वे॒ अक्षि॑तम् ।
अ॒स्मभ्यं॒ तद्ध॑त्तन॒ यद्व॒ ईम॑हे॒ राधो॑ वि॒श्वायु॒ सौभ॑गम् ॥ १३ ॥

येन तोकाय तनयाय धान्यं बीजं वहध्वे अक्षितम् ।
अस्मभ्यं तत् धत्तन यत् वः ईमहे राधः विश्वऽआयु सौभगम् ॥ १३ ॥

तुमची लहान लेकरें जे आम्ही भक्तलोक, त्यांच्याकडे ज्याच्या योगाने तुम्ही धान्यादिकांच्या अक्षय बीजाच्या राशि आणून टाकतां, ज्याच्या योगाने प्राणिमात्र जगतात, आणि त्यांचा भाग्योदय होतो तो, तुमचा कृपाप्रसाद आम्ही तुमच्यापाशी पदर पसरून मागत आहो, तर तो अक्षय्य प्रसाद आम्हांस द्या ना बरे ? ॥ १३ ॥


अती॑याम नि॒दस्ति॒रः स्व॒स्तिभि॑र्हि॒त्वाव॒द्यमरा॑तीः ।
वृ॒ष्ट्वी शं योराप॑ उ॒स्रि भे॑ष॒जं स्याम॑ मरुतः स॒ह ॥ १४ ॥

अति इयाम निदः तिरः स्वस्तिऽभिः हित्वा आवद्यं अरातीः ।
वृष्ट्वी शं योः आपः उस्रि भेषजं स्याम मरुतः सह ॥ १४ ॥

अश्लील अपवाद आणि पापबुद्धि ह्यांना फेटाळून देऊन व निंदकांच्या छातीवर पाय देऊन आम्ही पलीकडे जाऊं असे करा. उषःकाली तुम्ही आमच्या कल्याणार्थ- आमच्या मंगलार्थ उदक आणि औषधे ह्यांची वृष्टि करूं लागता त्यावेळी आम्ही तुमच्या जवळ असावे असे करा. ॥ १४ ॥


सु॒दे॒वः स॑महासति सु॒वीरो॑ नरो मरुतः॒ स मर्त्यः॑ ।
यं त्राय॑ध्वे॒ स्याम॒ ते ॥ १५ ॥

सुऽदेवः समह असति सुऽवीरः नरः मरुतः सः मर्त्यः ।
यं त्रायध्वे स्याम ते ॥ १५ ॥

मरुत् वीरांनो, तुम्ही ज्याचा सांभळ करिता, हे तेजःपुंज विभूतींनो, तो पुरुष देवप्रिय आणि शूर निपजतो म्हणून आम्हीही तुमचे अनुचर होऊं असे करा. ॥ १५ ॥


स्तु॒हि भो॒जान्स्तु॑व॒तो अ॑स्य॒ याम॑नि॒ रण॒न्गावो॒ न यव॑से ।
य॒तः पूर्वाँ॑ इव॒ सखीँ॒रनु॑ ह्वय गि॒रा गृ॑णीहि का॒मिनः॑ ॥ १६ ॥

स्तुहि भोजान् स्तुवतः अस्य यामनि रणन् गावः न यवसे ।
यतः पूर्वान्ऽइव सखीन् अनु ह्वय गिरा गृणीहि कामिनः ॥ १६ ॥

उदारधी मरुतांचे स्तवन कर. धेनू जशा हरित् तृणावलोकनाने आनंदित होतात त्याप्रमाणे ह्य स्तोत्रकर्त्या यजमानाच्या सन्मार्ग सेवनांत त्यांना संतोष वाटतो, तर तू आपल्या मधुर शब्दांनी आपल्या पुरातन मित्रास पाचारण कर, स्तुति कामुक मरुताचे यशोवर्णन कर. ॥ १६ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ५४ ( मरुत् सूक्त )

ऋषी - श्यावाश्व आत्रेय : देवता - मरुत् : छंद - जगती, त्रिष्टुभ्


प्र शर्धा॑य॒ मारु॑ताय॒ स्वभा॑नव इ॒मां वाच॑मनजा पर्वत॒च्युते॑ ।
घ॒र्म॒स्तुभे॑ दि॒व आ पृ॑ष्ठ॒यज्व॑ने द्यु॒म्नश्र॑वसे॒ महि॑ नृ॒म्णम॑र्चत ॥ १ ॥

प्र शर्धाय मारुताय स्वऽभानवे इमां वाचं अनज पर्वतऽच्युते ।
घर्मऽस्तुभे दिवः आ पृष्ठऽयज्वने द्युम्नऽश्रवसे महि नृम्णं अर्चत ॥ १ ॥

स्वयंप्रकाश मरुतांच्या सैन्याप्रित्यर्थ मी ह्या सुंदर स्तुतीची योजना करतो, जे पर्वताप्रमणे प्रचंड मेघांना हालवून सोडतात, सूर्याचा उष्मा आवरून धरतात, आकाशाच्या अत्युच्च प्रदेशी "पृष्ट" नांवाच्या यज्ञास प्रारंभ करतात, आणि ज्यांच्या ओजस्वितेची कीर्ति सर्वत्र आहे अशा मरुत् देवांप्रित्यर्थ त्यांच्या महान पराक्रमाची महती वर्णन कर. ॥ १ ॥


प्र वो॑ मरुतस्तवि॒षा उ॑द॒न्यवो॑ वयो॒वृधो॑ अश्व॒युजः॒ परि॑ज्रयः ।
सं वि॒द्युता॒ दध॑ति॒ वाश॑ति त्रि॒तः स्वर॒न्त्यापो॒ऽवना॒ परि॑ज्रयः ॥ २ ॥

प्र वः मरुतः तविषाः उदन्यवः वयःऽवृधः अश्वऽयुजः अरिऽज्रयः ।
सं विऽद्युता दधति वाशति त्रितः स्वरंति आपः आवना परिज्रयः ॥ २ ॥

मरुतांनो तुमचा समूह जिकडे तिकडे धुमश्चक्री उडवून देणारा खरा, परंतु तो जलवर्षाव करतो त्याच्यामुळे ज्वानीचा भर वाढतो, अश्व रथास जोडले जाऊन रंगणावर हिंडतात. विजेशी गांठ पडल्याबरोबर त्रित मेघ मोठ्याने गडगडाट करीत वाहत असतात. ॥ २ ॥


वि॒द्युन्म॑हसो॒ नरो॒ अश्म॑दिद्यवो॒ वात॑त्विषो म॒रुतः॑ पर्वत॒च्युतः॑ ।
अ॒ब्द॒या चि॒न्मुहु॒रा ह्रा॑दुनी॒वृतः॑ स्त॒नय॑दमा रभ॒सा उदो॑जसः ॥ ३ ॥

विद्युत्ऽमहसः नरः अश्मऽदिद्यवः वातत्विषः मरुतः पर्वतऽच्युतः ।
अब्दऽया चित् मुहुः आ ह्रादुनिऽवृतः स्तनयत्ऽअमाः रभसाः उत्ऽओजसः ॥ ३ ॥

हे मरुत् वीर असे आहेत कीं, विद्युल्लतेप्रमाणे त्यांचा झोत, आणि आकाशांतील तुटणार्‍या तार्‍यांप्रमाणे त्यांची झळाळी, वार्‍याप्रमाणे त्यांची धडाडी, आणि जोर असा कीं पर्वतसुद्धां हादरतात. त्यांच्या मनांत पाऊस पाडण्याचे आल्याबरोबर ते अगोदर गारांवा वर्षाव करतात. गडगडाटांतहि त्यांची विलक्षण शक्ति दिसून येते. त्यांचे जाणे बेधडक आणि तेजपणा फारच तीव्र असतो. ॥ ३ ॥


व्य॑१क्तून्रु॑द्रा॒ व्यहा॑नि शिक्वसो॒ व्य॑१न्तरि॑क्षं॒ वि रजां॑सि धूतयः ।
वि यदज्राँ॒ अज॑थ॒ नाव॑ ईं यथा॒ वि दु॒र्गाणि॑ मरुतो॒ नाह॑ रिष्यथ ॥ ४ ॥

वि अक्तून् रुद्राः वि अहानि शिक्वसः वि अंतरिक्षं वि रजांसि धूतयः ।
वि यत् अज्रान् अजथ नावः ईं यथा वि दुःऽगानि मरुतः न अह रिष्यथ ॥ ४ ॥

हे रुद्रांनो जेव्हां तुम्ही रात्रींना उधळून देता, हे महात्म्यांनो दिवसांनाही पार घालवून देता, हे धुधाट देवांनो, जेव्हा अंतरिक्ष व रजोलोक हे खळबळून सोडता आणि उभी पिके वार्‍यापुढे लवावी त्याप्रमाणे जेव्हा जहाजांना ह्या बाजूवरून त्या बाजूला कलंडून देतां, अशा वेळेस मोठे अवघड किल्लेही पडतील की काय असे तुम्ही करून टाकतां. परंतु तुम्हा स्वतःला यत्किंचितहि इजा होत नाही. ॥ ४ ॥


तद्वी॒र्यं वो मरुतो महित्व॒नं दी॒र्घं त॑तान॒ सूर्यो॒ न योज॑नम् ।
एता॒ न यामे॒ अगृ॑भीतशोचि॒षोऽ॑नश्वदां॒ यन्न्यया॑तना गि॒रिम् ॥ ५ ॥

तत् वीर्यं वः मरुतः महिऽत्वनं दीर्घं ततान् सूर्यः न योजनम् ।
एताः न यामे अगृभीतऽशोचिषः अनश्वऽदां यत् नि अयातना गिरिम् ॥ ५ ॥

तुमचे तेज कोणासही हिसकावून घेता येणार नाही. तर हे मरुतांनो, विद्युल्लतारूप अश्व ज्याच्यामध्ये मुळीच दृष्टोत्पत्तिस येत नाही अशा मेघरूप पर्वताच्या जाता जाता तुम्ही ठिकर्‍या उडविता, त्यावेळी, सूर्य आपली रोजची मजल जसजशी वाढवितो किंवा तुमच्या रथांच्या हरिणी जास्त जास्त धांवतात तसतसा हा तुमचा पराक्रम हा तुमचा महिमा दूरदूर प्रसिद्ध होत जातो. ॥ ५ ॥


अभ्रा॑जि॒ शर्धो॑ मरुतो॒ यद॑र्ण॒सं मोष॑था वृ॒क्षं क॑प॒नेव॑ वेधसः ।
अध॑ स्मानो अ॒रम॑तिं सजोषस॒श्चक्षु॑रिव॒ यन्त॒मनु॑ नेषथा सु॒गम् ॥ ६ ॥

अभ्राजि शर्धः मरुतः यत् अर्णसं मोषथ वृक्षं कपनाऽइव वेधसः ।
अध स्म नः अरमतिं सऽजोषसः चक्षुःऽइव यंतं अनु नेषथ सुऽगम् ॥ ६ ॥

हे मरुतांनो, हे जगताची व्यवस्था ठेवणार्‍या विभूतींनो, वावटीमुळे जोराने हलणार्‍या वृक्षास मुळासकट उपटून एखाद्या कीटकाप्रमाणे फेंकून देतां अशावेळी तुमच्या सामर्थ्याची चमक दिसून येते. तरी हे प्रेमळ देवांनो, वाटसरूला योग्य ठिकाणी घेऊन चला. ॥ ६ ॥


न स जी॑यते मरुतो॒ न ह॑न्यते॒ न स्रे॑धति॒ न व्य॑थते॒ न रि॑ष्यति ।
नास्य॒ राय॒ उप॑ दस्यन्ति॒ नोतय॒ ऋषिं॑ वा॒ यं राजा॑नं वा॒ सुषू॑दथ ॥ ७ ॥

न सः जीयते मरुतः अ हन्यते न स्रेधति न व्यथते न रिष्यति ।
न अस्य रायः उप दस्यंति न ऊतयः ऋषिं वा यं राजानं वा सुषूदथ ॥ ७ ॥

मरुतांनो, ज्या कोणाला - मग तो ऋषि अगर राजा असो - तुम्ही सन्मार्गाने घेऊन जाता त्याचा कधी पराजय होत नाही किंवा तो मारला जात नाही. तो कधीही कच खात नाही, त्याला दुःख अथवा इजा होत नाही, त्याचे ऐश्वर्य क्षीण होत नाही किंवा त्याला आत्मरक्षणाचीहि कधी वाण होत नाही. ॥ ७ ॥


नि॒युत्व॑न्तो ग्राम॒जितो॒ यथा॒ नरो॑ऽर्य॒मणो॒ न म॒रुतः॑ कब॒न्धिनः॑ ।
पिन्व॒न्त्युत्सं॒ यदि॒नासो॒ अस्व॑र॒न्व्युन्दन्ति पृथि॒वीं मध्वो॒ अन्ध॑सा ॥ ८ ॥

नियुत्वंतः ग्रामजितः यथा नरः अर्यमणः न मरुतः कबंधिनः ।
पिन्वंति उत्सं यत् इनासः अस्वरन् वि उंदंति पृथिवीं मध्वः अन्धसा ॥ ८ ॥

गांव जिंकणारे शूर सैनिक जसे ऐटीने जात असतात त्याप्रमाणे "नियुत्" घोड्यांवर स्वार झालेले जगन्मित्रच असे हे मरुत् पाण्याने भरलेले मेघरूप ढोल घेऊन सर्व जलाशय तुडुंब भरून टाकतात. ह्या बलाढ्य वीरांनी गर्जना केली म्हणजे पृथ्वीला मधुर रसाच्या वर्षावाने तर्र करून सोडतात. ॥ ८ ॥


प्र॒वत्व॑ती॒यं पृ॑थि॒वी म॒रुद्‌भ्यः॑र प्र॒वत्व॑ती॒ द्यौर्भ॑वति प्र॒यद्‌भ्यः॑ ।
प्र॒वत्व॑तीः प॒थ्या अ॒न्तरि॑क्ष्याः प्र॒वत्व॑न्तः॒ पर्व॑ता जी॒रदा॑नवः ॥ ९ ॥

प्रवत्वती इयं पृथिवी मरुत्ऽभ्यः प्रवत्वती द्यौः भवति प्रऽयत्ऽभ्यः ।
प्रवत्वतीः पथ्या अंतरिक्ष्याः प्रवत्वंतः पर्वतः जीरऽदानवः ॥ ९ ॥

खोल दर्‍याखोरी ह्यांनी व्याप्त असलेली ही पृथ्वी मरुतांपुढे नमते. जोराने धांवणार्‍या ह्या मरुतांच्या धडकी पुढें आकाशसुद्धां नम्र होते. अंतरिक्षांतील मार्ग उतार आणि मेघ हे जीवनाचे सार जे उदक त्याची वृष्टी करतात. ॥ ९ ॥


यन्म॑रुतः सभरसः स्वर्णरः॒ सूर्य॒ उदि॑ते॒ मद॑था दिवः नरः ।
न वोऽ॑श्वाः श्रथय॒न्ताह॒ सिस्र॑तः स॒द्यो अ॒स्याध्व॑नः पा॒रम॑श्नुथ ॥ १० ॥

यत् मरुतः सऽभरसः स्वःनरः सूर्ये उत्ऽइते मदथ दिवः नरः ।
न वः अश्वाः श्रथयंत अह सिस्रतः सद्यः अस्य अध्वनः पारं अश्नुथ ॥ १० ॥

भक्तांना देण्याकरिता आणलेल्या पारितोषिकांच्या भाराने लवलेल्या मरुतांनो, हे दिव्य वीरांनो, हे आकाशस्थ शूरांनो, सूर्योदयाचे वेळेस जेव्हां तुम्ही सामपानाने प्रमुदित होता, तेव्हां दौडत जाणारे तुमच्या रथाचे अश्व किंचितही थकत नाहीत, ह्यामुळे तुम्ही आपल्या मार्गाची अखेर तात्काळ गाठतां. ॥ १० ॥


अंसे॑षु व ऋ॒ष्टयः॑ प॒त्सु खा॒दयो॒ वक्षः॑सु रु॒क्मा म॑रुतो॒ रथे॒ शुभः॑ ।
अ॒ग्निभ्रा॑जसो वि॒द्युतो॒ गभ॑स्त्योः॒ शिप्राः॑ शी॒र्षसु॒ वित॑ता हिर॒ण्ययीः॑ ॥ ११ ॥

अंसेषु वः ऋष्टयः पत्ऽसु खादयः वक्षऽस्सु रुक्माः मरुतः रथे शुभः ।
अग्निऽभ्राजसः विऽद्युतः गभस्त्योः शिप्राः शीर्षऽसु विऽतता हिरण्ययीः ॥ ११ ॥

मरुतांनो तुमच्या खांद्यावर भाले आणि, पायांमध्ये पादवलये आहेत. तुमच्या वक्षःस्थलावर सुवर्ण पदके आणि तुमच्या रथालाही रत्ने जडविली आहेत. अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे देदीप्यमान विद्युल्लता ती तुमच्या बाहूंवर तळपत असून तुमच्या मस्तकावर सुवर्णाचे मुगुट आहेत. ॥ ११ ॥


तं नाक॑म॒र्यः अगृ॑भीतशोचिषं॒ रुश॒त्पिप्प॑लं मरुतो॒ वि धू॑नुथ ।
सम॑च्यन्त वृ॒जनाति॑त्विषन्त॒ यत्स्वर॑न्ति॒ घोषं॒ वित॑तमृता॒यवः॑ ॥ १२ ॥

तं नाकं अर्यः अगृभीतऽशोचिषं रुशत् पिप्पलं मरुतः वि धूनुथ ।
सं अच्यंत वृजना अतित्विषंत यत् स्वरंति घोषं विऽततं ऋतऽयवः ॥ १२ ॥

मरुतांनो तुम्ही उदारचित्त आहात, ज्याची तेजस्विता अप्रतिहत आहे अशा आकाशमंडळाला तुम्ही गदगदां हलविता. तुमची क्रोधज्वाला प्रखर झाली म्हणजे आर्यांच्या अनेक प्रदेशांतील लोक एकत्र जमतात आणि धर्मनिष्ठ ऋषिजन उच्च स्वराने तुमच्या स्तवनाचा घोष करतात. ॥१२ ॥


यु॒ष्माद॑त्तस्य मरुतः विचेतसो रा॒यः स्या॑म र॒थ्यो॒३॑वय॑स्वतः ।
न यो युच्छ॑ति ति॒ष्यो॒३॑ यथा॑ दि॒वोऽ॒स्मे रा॑रन्त मरुतः सह॒स्रिण॑म् ॥ १३ ॥

युष्माऽदत्तस्य मरुतः विऽचेतसः रायः स्याम रथ्यः वयस्वतः ।
न यः युच्छति तिष्यः यथा दिवः अस्मे ररंत मरुतः सहस्रिणम् ॥ १३ ॥

महाज्ञानी मरुतांनो, तारुण्याची धमक प्राप्त करून देणारे जे तुम्हीच दिलेले दिव्य वैभव आहे त्या वैभवाचे नियंते आम्ही होऊं असे करा. ज्या प्रमाणे ध्रुव नक्षत्र आकाशातून कधी चळत नाही, त्याप्रमाणे जे ऐश्वर्य अचल असेल ते आम्हांस हजारों वेळां अर्पण करा. ॥ १३ ॥


यू॒यं र॒यिं म॑रुतः स्पा॒र्हवी॑रं यू॒यमृषि॑मवथ॒ साम॑विप्रम् ।
यू॒यमर्व॑न्तं भर॒ताय॒ वाजं॑ यू॒यं ध॑त्थ॒ राजा॑नं श्रुष्टि॒मन्त॑म् ॥ १४ ॥

यूयं रयिं मरुतः स्पार्हऽवीरं यूयं ऋषिं अवथ सामऽविप्रम् ।
यूयं अर्वंतं भरताय वाजं यूयं धत्थ राजानं श्रुष्टिऽमंतम् ॥ १४ ॥

मरुतांनो जे धन स्पृहणीय आहे त्याचे आणि सामगायनांत निष्णात अशा स्तोत्यांचे रक्षण तुम्हीच करता. भरताला एक अजिंक्य घोडा आनि राजाला आज्ञांकित सेवक असे तुम्हीच मिळवून दिलेत. ॥ १४ ॥


तद्वो॑ यामि॒ द्रवि॑णं सद्यऊतयो॒ येना॒ स्व॑३र्ण त॒तना॑म॒ नॄँर॒भि ।
इ॒दं सु मे॑ मरुतो हर्यता॒ वचो॒ यस्य॒ तरे॑म॒ तर॑सा श॒तं हिमाः॑ ॥ १५ ॥

तत् वः यामि द्रविणं सद्यऽऊतयः येना स्वः न ततनाम नॄन् अभिः ।
इदं सु मे मरुतः हर्यत वचः यस्य तरेम तरसा शतं हिमाः ॥ १५ ॥

भक्तांचे तात्काल संरक्षण करणार्‍या विभूतींनो, जिच्या योगाने सूर्यप्रकाशाप्रमाणे आम्ही आपल्या शूर सैनिकांची मालिका एकसारखी प्रसृत करूं अशा सामर्थ्य-संपत्तिची तुझ्यापाशी मी पदर पसरून याचना करतो. मरुतांनो, हे माझे स्तोत्र तुम्ही गोड मानून घ्या म्हणजे त्याच्या जोरावर शेंकडो वर्षे आम्ही सुखाने नांदू. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ५५ ( मरुत् सूक्त )

ऋषी - श्यावाश्व आत्रेय : देवता - मरुत् : छंद - जगती, त्रिष्टुभ्


प्रय॑ज्यवो म॒रुतो॒ भ्राज॑दृष्टयो बृ॒हद्वयो॑ दधिरे रु॒क्मव॑क्षसः ।
ईय॑न्ते॒ अश्वैः॑ सु॒यमे॑भिरा॒शुभिः॒ शुभं॑ या॒तामनु॒ रथा॑ अवृत्सत ॥ १ ॥

प्रऽयज्यवः मरुतः भ्राजत्ऽऋष्टयः बृहत् वयः दधिरे रुक्मऽवक्षसः ।
ईयंते अश्वैः सुऽयमेभिः आशुऽभिः शुभं यातां अनु रथाः अवृत्सत ॥ १ ॥

हातातील झगझगीत भाले, वक्षःस्थलावर सुवर्णाची पदके अशा थाटांत मरुत् वागतात. त्यांचे वय नेहमी ऐन जवानीचे असते. उत्तम रीतीने शिकविलेल्या आपल्या चलाख घोड्यानिशी ते चालले असतात. आणि अशा रीतीने ते विजय संपादनार्थ निघाले असतां सैनिकांचे रथ त्यांच्या मागूनच दौडत असतात. ॥ १ ॥


स्व॒यं द॑धिध्वे॒ तवि॑षीं॒ यथा॑ वि॒द बृ॒हन्म॑हान्त उर्वि॒या वि रा॑जथ ।
उ॒तान्तरि॑क्षं ममिरे॒ व्योज॑सा॒ शुभं॑ या॒तामनु॒ रथा॑ अवृत्सत ॥ २ ॥

स्वयं दधिध्वे तविषीं अथा विद बृहत् महान्तः उर्विया वि राजथ ।
उत अन्तरिक्षं ममिरे वि ओजसा शुभं यातां अनु रथाः अवृत्सत ॥ २ ॥

तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही आपण होऊन भक्तांकरिता सामर्थ्य संपादन करून ठेवले आहे. श्रेष्ठ विभूतींनो अतिशय दूरवर तुम्ही आपल्या तेजाची प्रभा पसरून देता. सर्व वातावरण प्रदेश आपल्या सामर्थ्य तेजानेंच त्यांनी भरून टाकला असता सैनिकांचे रथ त्यांच्या मागूनच दौडत गेले. ॥ २ ॥


सा॒कं जा॒ताः सु॒भ्वः सा॒कमु॑क्षि॒ताः श्रि॒ये चि॒दा प्र॑त॒रं वा॑वृधु॒र्नरः॑ ।
वि॒रो॒किणः॒ सूर्य॑स्येव र॒श्मयः॒ शुभं॑ या॒तामनु॒ रथा॑ अवृत्सत ॥ ३ ॥

साकं जाताः सुऽभ्वः साकं उक्षिताः श्रिये चित् आ प्रऽतरं ववृधुः नरः ।
विऽरोकिणः सूर्यस्यऽइव रश्मयः शुभं यातां अनु रथाः अवृत्सत ॥ ३ ॥

ते सर्व एकदम आविर्भूत होऊन तुंद आणि पिळदार शरीराचे असे झाले. ते वीर देदीप्यमानच, तेव्हा वैभवाच्या भरात सूर्यकिरणांप्रमाणे पूर्णपणे वृद्धिंगत झाले. अर्थातच ते विजय संपादनार्थ निघाले असतां सैनिकांचे रथ त्यांच्या मागोमाग दौडत गेले. ॥ ३ ॥


आ॒भू॒षेण्यं॑ वो मरुतो महित्व॒नं दि॑दृ॒क्षेण्यं॒ सूर्य॑स्येव॒ चक्ष॑णम् ।
उ॒तो अ॒स्माँ अ॑मृत॒त्वे द॑धातन॒ शुभं॑ या॒तामनु॒ रथा॑ अवृत्सत ॥ ४ ॥

आऽभूषेण्यं वः मरुतः महिऽत्वनं दिदृक्षेण्यं सूर्यस्यऽइव चक्षणम् ।
उतोइति अस्मान् अमृतऽत्वे दधातन शुभं यातां अनु रथाः अवृत्सत ॥ ४ ॥

मरुतांनो तुमचा महिमा तुम्हाला भूषणप्रदच झाला आहे. आणि तुमचे दर्शन होणे ही गोष्ट सूर्याच्या अवलोकनाप्रमाणे मोठी अप्रूप होय. तर आम्हाला अजरामर झालेल्या व्यक्तींत जागा द्या. व अशा करिताच तुम्ही विजय संपादनार्थ निघाला असतां सैनिकांचे रथ तुमच्या मागोमाग धांवत जातात. ॥ ४ ॥


उदी॑रयथा मरुतः समुद्र॒तः यू॒यं वृ॒ष्टिं व॑र्षयथा पुरीषिणः ।
न वो॑ दस्रा॒ उप॑ दस्यन्ति धे॒नवः॒ शुभं॑ या॒तामनु॒ रथा॑ अवृत्सत ॥ ५ ॥

उत् ईरयथ मरुतः समुद्रतः यूयं वृष्टिं वर्षयथ पुरीषिणः ।
न वः दस्राः उप दस्यंति धेनवः शुभं यातां अनु रथाः अवृत्सत ॥ ५ ॥

मरुतांनो, तुम्ही अंतरिक्ष समुद्रातून गर्जना करा. हे बाष्पोत्पादक देवांनो तुम्हीच पर्जन्य वृष्टि करा. अद्‍भुत चारित्र्य विभूतींनो तुमच्या मेघरूप धेनू कधीही थकत नाहीत तेव्हा अर्थातच तुम्ही विजय संपादनार्थ निघाला असतां सैनिकाचे रथ तुमच्या मागोमाग दौडत जातात. ॥ ५ ॥


यदश्वा॑न्धू॒र्षु पृष॑ती॒रयु॑ग्ध्वं हिर॒ण्यया॒न्प्रत्यत्काँ॒ अमु॑ग्ध्वम् ।
विश्वा॒इत्स्पृधो॑ मरुतो॒ व्यस्यथ॒ शुभं॑ या॒तामनु॒ रथा॑ अवृत्सत ॥ ६ ॥

यत् अश्वान् धूःऽसु पृषतीः अयुग्ध्वं हिरण्ययान् प्रति अत्कान् अमुग्ध्वम् ।
विश्वाः इत् स्पृधः मरुतः वि अस्यथ शुभं यातां अनु रथाः अवृत्सत ॥ ६ ॥

ठिपकेदार हरिणीच तुम्ही अश्व म्हणून रथास जोडल्या आहांत. तुम्ही आपले सुवर्णमय अविनाशी चिलखत आंगावर चढविले न चढविले तोंच हे मरुतांनो, एकंदर शत्रुसमाज तुम्ही भुस्कटाप्रमाणे उधळून लावता तेव्हां मरुतांनो तुम्ही विजय संपादनार्थ निघाला म्हणजे सैनिकांचे रथ मागोमाग धांवून गेले ह्यांत काय नवल ? ॥ ६ ॥


न पर्व॑ता॒ न न॒द्यो वरन्त वो॒ यत्राचि॑ध्वं मरुतो॒ गच्छ॒थेदु॒ तत् ।
उ॒त द्यावा॑पृथि॒वी या॑थना॒ परि॒ शुभं॑ या॒तामनु॒ रथा॑ अवृत्सत ॥ ७ ॥

न पर्वता न नद्यः वरंत वः यत्र अचिध्वं मरुतः गच्छथ इत् ऊंइति तत् ।
उत द्यावापृथिवीइति याथना परि शुभं यातां अनु रथाः अवृत्सत ॥ ७ ॥

मेघ पर्वत तुम्हाला अडवूं शकत नाहीत आणि नद्यांनाही तुम्हाला अडवून धरण्याचे सामर्थ्य नाही. तुम्हास वाटेल तिकडे तुम्ही हिंडता. सर्व आकाश आणि पृथ्वी ह्यांनाही प्रदक्षिणा करता. म्हणूनच तुम्ही विजय संपादनार्थ निघाला तेव्हां सैनिकांचे रथ तुमच्या मागोमाग दौडत गेले. ॥ ७ ॥


यत्पू॒र्व्यं म॑रुतो॒ यच्च॒ नूत॑नं॒ यदु॒द्यते॑ वसवो॒ यच्च॑ श॒स्यते॑ ।
विश्व॑स्य॒ तस्य॑ भवथा॒ नवे॑दसः॒ शुभं॑ या॒तामनु॒ रथा॑ अवृत्सत ॥ ८ ॥

यत् पूर्व्यं मरुतः यत् च नूतनं यत् उद्यते वसवः यत् च शस्यते ।
विश्वस्य तस्य भवथा नवेदसः शुभं यातां अनु रथाः अवृत्सत ॥ ८ ॥

मरुतांनो, स्तोत्र पुरातन असो वा नविन असो, गद्य असो किंवा पद्य असो, त्या सर्वांचे चाहते तुम्हीच व्हा. पहा की, विजय संपादनार्थ तुम्ही निघाल्या बरोबर मागोमाग सैनिकांचे रथ दौडत गेले. ॥ ८ ॥


मृ॒ळत॑ नो मरुतो॒ मा व॑धिष्टना॒स्मभ्यं॒ शर्म॑ बहु॒लं वि य॑न्तन ।
अधि॑ स्तो॒त्रस्य॑ स॒ख्यस्य॑ गातन॒ शुभं॑ या॒तामनु॒ रथा॑ अवृत्सत ॥ ९ ॥

मृळत नः मरुतः मा वधिष्टन अस्मभ्यं शर्म बहुलं वि यंतन ।
अधि स्तोत्रस्य सख्यस्य गातन शुभं यातां अनु रथाः अवृत्सत ॥ ९ ॥

मरुतांनो आमच्यावर कृपा करा, आमचा वध करूं नका. उलट आम्हाला बहुमोल सुखस्थान द्या, आणि आम्ही केलेले स्तवन आणि आमचे तुमच्या विषयींचे प्रेम ह्यांच्याकडे आपले लक्ष असू द्या. पहा की, विजय संपादनार्थ तुम्ही निघाल्या बरोबर मागोमाग सैनिकांचे रथ दौडत गेले. ॥ ९ ॥


यू॒यम॒स्मान्न॑यत॒ वस्यो॒ अच्छा॒ निरं॑ह॒तिभ्यो॑ मरुतो गृणा॒नाः ।
जु॒षध्वं॑ नः ह॒व्यदा॑तिं यजत्रा व॒यं स्या॑म॒ पत॑यो रयी॒णाम् ॥ १० ॥

यूयं अस्मान् नयत वस्यः अच्छ निः अंहतिऽभ्यः मरुतः गृणानाः ।
जुषध्वं नः हव्यऽदातिं यजत्राः वयं स्याम पतयः रयीणाम् ॥ १० ॥

मरुतांनो तुमचे स्तवन आम्हांकडून घडले. आता अत्युत्कृष्ट संपत्तिकडे आम्हांस न्या. पातके-क्लेश ह्यांच्या पार घेऊन जा. परमपूज्य देवांनो आमच्या हविर्भागाचा स्वीकार करा. आणि आम्ही दिव्यसंपत्तिचे धनी होऊं असे घडवा. ॥१० ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ५६ ( मरुत् सूक्त )

ऋषी - श्यावाश्व आत्रेय : देवता - मरुत् : छंद - बृहती, सतोबृहती


अग्ने॒ शर्ध॑न्तं॒आ ग॒णं पि॒ष्टं रु॒क्मेभि॑र॒ञ्जिभिः॑ ।
विशो॑ अ॒द्य म॒रुता॒मव॑ ह्वये दि॒वश्चि॑द्रोच॒नादधि॑ ॥ १ ॥

अग्ने शर्धंतं आ गणं पिष्टं रुक्मेभिः अञ्जिऽभिः ।
विशः अद्य मरुतां अव ह्वये दिवः चित् रोचनात् अधि ॥ १ ॥

अग्निदेव, सुवर्णाच्या वीरभूषणांनी सुशोभित अशा मरुतांचे सैन्य - त्यांचा समुदाय - देदीप्यमान द्युलोकांतून खाली भूमीवर त्याची विनवणी करून बोलावीत आहे. ॥ १ ॥


यथा॑ चि॒न्मन्य॑से हृ॒दा तदिन्मे॑ जग्मुरा॒शसः॑ ।
ये ते॒ नेदि॑ष्ठं॒ हव॑नान्या॒गम॒न्तान्व॑र्ध भी॒मसं॑दृशः ॥ २ ॥

यथा चित् मन्यसे हृदा तत् इत् मे जग्मुः आऽशसः ।
ये ते नेदिष्ठं हवनानिं आऽगमन् तान् वर्ध भीमऽसंदृशः ॥ २ ॥

अग्नी, तू आपल्या अंतःकरणांत जो विचार आणला आहेस त्याच हेतूकडे माझ्या आकांक्षा लागून राहिल्या आहेत, तर तुझ्या ठिकाणी अर्पिलेल्या आहुतीच्या अगदी समीप जे प्राप्त झाले आहेत त्या मरुतास तू आनंदाने वृद्धिंगत कर. ॥ २ ॥


मी॒ळ्हुष्म॑तीव पृथि॒वी परा॑हता॒ मद॑न्त्येत्य॒स्मदा ।
ऋक्षो॒ न वो॑ मरुतः॒ शिमी॑वाँ॒ अमो॑ दु॒ध्रः गौरि॑व भीम॒युः ॥ ३ ॥

मीळ्हुष्मतीऽइव पृथिवी पराऽहता मदंति एति अस्मत् आ ।
ऋक्षः न वः मरुतः शिमीवान् अमः दुध्रः गौःऽइव भीमऽयुः ॥ ३ ॥

कितीही तडाखे बसले तरी धान्यकलादिकांचा वर्षाव करणारी ही पृथ्वी सदा आनंदित अशीच आमच्या डोळ्यांपुढे येते. आणि हे मरुतांनो, तुमचा तर जोर असा आहे कीं तो एखाद्या अस्वलाप्रमाणे बेगुमान आणि मस्त पोळाप्रमाणे अनावर असतो. ॥३ ॥


नि ये रि॒णन्त्योज॑सा॒ वृथा॒ गावो॒ न दु॒र्धुरः॑ ।
अश्मा॑नं चित्स्व॒र्यं॑१ पर्व॑तं गि॒रिं प्र च्या॑वयन्ति॒ याम॑भिः ॥ ४ ॥

नि ये रिणंति ओजसा वृथा गावः न दुर्धुरः ।
अश्मानं चित् स्वर्यं पर्वतं गिरिं प्र च्यावयंति यामभिः ॥ ४ ॥

आपल्या तेजस्वितेच्या जोमाने दुर्निवार असलेले मरुत् एखाद्या पुष्ट वृषभाप्रमाणे असे सहज हुंदाडून देतात की त्याच्या इकडून तिकडे तुसत्या जाण्यानेच आकाशांतील उल्का, मेघ आणि पर्वतशिखरे खाली कोसळून आदळतात. ॥ ४ ॥


उत्ति॑ष्ठ नू॒नमे॑षां॒ स्तोमैः॒ समु॑क्षितानाम् ।
म॒रुतां॑ पुरु॒तम॒मपू॑र्व्यं॒ गवां॒ सर्ग॑मिव ह्वये ॥ ५ ॥

उत् तिष्ठ नूनं एषां स्तोमैः संऽउक्षितानाम् ।
मरुतां पुरुऽतमं अपूर्व्यं गवां सर्गंऽइव ह्वये ॥ ५ ॥

तर हे सद्‍भक्ता, आता ऊठ; हा पहा एकदम बलिष्ठ झालेल्या ह्या असंख्य मरुतांचा अश्रुतपूर्व समुदाय, प्रकाश धेनूंच्या समूहाप्रमाणे मी बोलावून आपल्या येथे आणतो. ॥ ५ ॥


यु॒ङ्‌ग्ध्वं ह्यरु॑षी॒ रथे॑ यु॒ङ्‌ग्ध्वं रथे॑षुरो॒हितः॑ ।
यु॒ङ्‌ग्ध्वं हरी॑ अजि॒रा धु॒रि वोळ्ह॑वे॒ वहि॑ष्ठा धु॒रि वोळ्ह॑वे ॥ ६ ॥

युङ्‌ग्ध्वं हि अरुषी रथे युङ्‌ग्ध्वं रथेषु रोहितः ।
युङ्‌ग्ध्वं हरीइति अजिरा धुरि वोळ्हवे वहिष्ठा धुरि वोळ्हवे ॥ ६ ॥

तुम्ही रथाला आज लाल घोड्या जोडा, वाटल्यास तुमच्या ठिपकेदार हरिणी जोडा, पाहिजे असल्यास व जलद न्यावे म्हणून धुरेला तुमचे ते हरित्तेजोमय दणगट घोडे, त्वरित येण्याकरिता ते अश्व धुरेला जोडा. ॥ ६ ॥


उ॒त स्य वा॒ज्यरु॒षस्तु॑वि॒ष्वणि॑रि॒ह स्म॑ धायि दर्श॒तः ।
मा वो॒ यामे॑षु मरुतश्चि॒रं क॑र॒त्प्र तं रथे॑षु चोदत ॥ ७ ॥

उत स्यः वाजी अरुषः तुविऽस्वनिः इह स्म धायि दर्शतः ।
मा वः यामेषु मरुतः चिरं करत् प्र तं रथेषु चोदत ॥ ७ ॥

हा पहा तुमचा खिंकाळणारा लाल, तेजस्वी, देखणा घोडा येथे आणून उभा केला आहे. तर आता येण्याला विलंब नको. त्याला रथाला जोडून भरधांव चालवा. ॥ ७ ॥


रथं॒ नु मारु॑तं व॒यं श्र॑व॒स्युमा हु॑वामहे ।
आ यस्मि॑न्त॒स्थौ सु॒रणा॑नि॒ बिभ्र॑ती॒ सचा॑ म॒रुत्सु॑ रोद॒सी ॥ ८ ॥

रथं नु मारुतं वयं श्रवस्युं आ हुवामहे ।
आ यस्मिन् तस्थौ सुऽरणानि बिभ्रती सचा मरुत्ऽसु रोदसी ॥ ८ ॥

मरुतांच्या त्या लोकोत्तर रथालाच इकडे बोलवितो. तो सामान्य रथ नव्हे. अनेक रमणीय पारितोषिके बरोबर घेऊन मरुतांबरोबर त्यांची प्रियतमा ’रोदसी’च त्या रथावर आरूढ झाली आहे. ॥ ८ ॥


तं वः॒ शर्धं॑ रथे॒शुभं॑ त्वे॒षं प॑न॒स्युमा हु॑वे ।
यस्मि॒न्सुजा॑ता सु॒भगा॑ मही॒यते॒ सचा॑ म॒रुत्सु॑ मीळ्हु॒षी ॥ ९ ॥

तं वः शर्धं रथेऽशुभं वेषं पनस्युं आ हुवे ।
यस्मिन् सुऽजाता सुऽभगा महीयते सचा मरुत्ऽसु मीळ्हुषी ॥ ९ ॥

रथामध्ये विराजमान झालेला, स्तुतियोग्य आणि उग्रतेज असा जो तुमचा समूह, त्या समूहाला नम्रभावाने आम्ही बोलावीत आहो. ह्याच समूहांत मरुतां बरोबरच ती सद्वंशा महाभाग "रोदसी" सन्माननीय झाली आहे. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ५७ ( मरुत् सूक्त )

ऋषी - श्यावाश्व आत्रेय : देवता - मरुत् : छंद - जगती, त्रिष्टुभ्


आ रु॑द्रास॒ इन्द्र॑वन्तः स॒जोष॑सो॒ हिर॑ण्यरथाः सुवि॒ताय॑ गन्तन ।
इ॒यं वो॑ अ॒स्मत्प्रति॑ हर्यते म॒तिस्तृ॒ष्णजे॒ न दि॒व उत्सा॑ उद॒न्यवे॑ ॥ १ ॥

आ रुद्रास इंद्रऽवंतः सऽजोषसः हिरण्यऽरथाः सुविताय गंतन ।
इयं वः अस्मत् प्रति हर्यते मतिः तृष्णऽजे न दिवः उत्सा उदन्यवे ॥ १ ॥

रुद्रपुत्रांनो तुम्ही इंद्रासारखा प्रभू जोडला आहात, तर प्रेमळ मनाने आपल्या सुवर्णाच्या अविनाशी रथार बसून आमच्याकडे या बरे ? तृषाक्रांत होऊन पाण्याकरिता तळमळणार्‍या मनुष्याची दिव्य जलाच्या झर्‍याकडे जशी तंद्री लागते त्याप्रमाणे आमची अंतःकरण प्रवृत्ति सर्वस्वी तुमच्याकडे लागून राहिलेली आहे ॥ १ ॥


वाशी॑मन्त ऋष्टि॒मन्तो॑ मनी॒षिणः॑ सु॒धन्वा॑न॒ इषु॑मन्तः निष॒ङ्‌गिनणः॑ ।
स्वश्वाः॑ स्थ सु॒रथाः॑ पृश्निमातरः स्वायु॒धा म॑रुतो याथना॒ शुभ॑म् ॥ २ ॥

वाशीऽमंत ऋष्टिऽमंतः मनीषिणः सुऽधन्वानः इषुऽमंतः निषङ्‌गििणः ।
सुऽअश्वाः स्थ सुऽरथाः पृश्निऽमातरः सुऽआयुधाः मरुतः याथन शुभम् ॥ २ ॥

बरच्या, भाले, धनुष्यबाण, भाते इत्यादिकांनी तुम्ही सशस्त्र आहांतच. तुमचे अश्व आणि रथही उत्कृष्टच आहेत. तर हे पृश्निपुत्र मरुतांनो, उत्तमोत्तम आयुधानिशी तुम्ही आता विजयसंपादनार्थ निघता ना ? ॥ २ ॥


धू॒नु॒थ द्यां पर्व॑तान्दा॒शुषे॒ वसु॒ नि वो॒ वना॑ जिहते॒ याम॑नो भि॒या ।
को॒पय॑थ पृथि॒वीं पृ॑श्निमातरः शु॒भे यदु॑ग्राः॒ पृष॑ती॒रयु॑ग्ध्वम् ॥ ३ ॥

धूनुथ द्यां पर्वतान् दाशुषे वसु नि वः वना जिहते यामनः भिया ।
कोपयथ पृथिवीं पृश्निऽमातरः शुभे यत् उग्राः पृषतीः अयुग्ध्वम् ॥ ३ ॥

द्यूलोक आणि मेघमंडल ह्यांना तुम्ही गदगद हलविता त्याबरोबरच भक्ताकरिता उत्कृष्टसंपत्ति हालवून पृथ्वीवर ओतून देता. तुमच्या मार्गांतील अरण्येसुद्धा भितीने खाली वाकतात. आणि हे पृश्निपुत्रांनो, आपल्या भीषण अविर्भावाने तुम्ही विजयसंपादनार्थ हरिणी जोडून निघाला म्हणजे सहजच पृथ्वीची खळबळ उडवून देता. ॥ ३ ॥


वात॑त्विषो म॒रुतो॑ व॒र्षनि॑र्णिजो य॒मा इ॑व॒ सुस॑दृशः सु॒पेश॑सः ।
पि॒शङ्‌गा॑वश्वा अरु॒णाश्वा॑ अरे॒पसः॒ प्रत्व॑क्षसो महि॒ना द्यौरि॑वो॒रवः॑ ॥ ४ ॥

वातऽत्विषः मरुतः वर्षऽनिर्निजः यमाःऽइव सुऽसदृशः सुऽपेशसः ।
पिशङ्‌ग्ऽअश्वाः अरुणऽअश्वाः अरेपसः प्रऽत्वक्षसः महिना द्यौःऽइव उरवः ॥ ४ ॥

वादळ हा तुमचा त्वेष, मुसळधार पर्जन्य हे तुमचे शरीर तथापि अश्वीदेवाप्रमाणे तुमचे दर्शन आनंददायक असून तुमचे स्वरूप सुशोभित दिसते. तुमचे अश्व सोन्यासारख्या रंगाचे आणि लाल रंगाचेही आहेत. ते निष्कलंक व फार तीव्र असून आपल्या महिम्यामुळे आकाशाप्रमाणे विस्तीर्ण आहेत. ॥ ४ ॥


पु॒रु॒द्र॒प्सा अ॑ञ्जि॒मन्तः॑ सु॒दान॑वस्त्वे॒षसं॑दृशो अनव॒भ्ररा॑धसः ।
सु॒जा॒तासो॑ ज॒नुषा॑ रु॒क्मव॑क्षसो दि॒वो अ॒र्का अ॒मृतं॒ नाम॑ भेजिरे ॥ ५ ॥

पुरुऽद्रप्साः अञ्जिऽमंतः सुऽदानवः त्वेषसंदृशः अनवभ्रऽराधसः ।
सुऽजातासः जनुषा रुक्मऽवक्षसः दिवः अर्काः अमृतं नाम भेजिरे ॥ ५ ॥

मरुत हे अतिशय वृष्टि करणारे, वीरभूषणांनी मंडित, दानशूर आहेत. इंगळाप्रमाणे लाल दिसतात परंतु त्यांच्या कृपेच्या ओघास कधीही खंड पडत नाही. ते अभिजात आहेत. प्रकट होताक्षणींच त्यांच्या वक्षस्थलांवर सुवर्णाची पदके चमकतात. ते आशांतील ’अर्क’ गायन करणारे तेव्हा त्यांनी आपली कीर्ति अजरामर केली आहे. ॥ ५ ॥


ऋ॒ष्टयो॑ वो मरुतो॒ अंस॑यो॒रधि॒ सह॒ ओजो॑ बा॒ह्वोर्वो॒ बलं॑ हि॒तम् ।
नृ॒म्णा शी॒र्षस्वायु॑धा॒ रथे॑षु वो॒ विश्वा॑ वः॒ श्रीरधि॑ त॒नूषु॑ पिपिशे ॥ ६ ॥

ऋष्टयः वः मरुतः अंसयोः अधि सहः ओजः बाह्वोः वः बलं हितम् ।
नृम्णा शीर्षऽसु आयुधा रथेषु वः विश्वा वः श्रीः अधि तनूषु पिपिशे ॥ ६ ॥

मरुतांनो तुमच्या खांद्यावर भाले, बाहूंच्या ठिकाणी झुंझार बल, तेजस्विता, आणि बल, ही ठेविली आहेत. आणि जगांतील सर्व सौंदर्य तुमच्याच शरीरांत राहून आकारास आली आहेत कीं काय असे वाटते. ॥ ६ ॥


गोम॒दश्वा॑व॒द्रथ॑वत्सु॒वीरं॑ च॒न्द्रव॒द्राधो॑ मरुतः ददा नः ।
प्रश॑स्तिं नः कृणुत रुद्रियासो भक्षी॒य वोऽ॑वसो॒ दैव्य॑स्य ॥ ७ ॥

गोऽमत् अश्वऽवत् रथऽवत् सुऽवीरं चंद्रऽवत् राधः मरुतः दद नः ।
प्रऽशस्तिं नः कृणुत रुद्रियासः भक्षीय वः अवसः दैव्यस्य ॥ ७ ॥

मरुतांनो, प्रकाश धेनू, बुद्धिरूप अश्व, रथ, शूर सैनिक ह्यांच्या संपन्नतेमुळे आल्हाददायक वाटणारे जे तुमचे कृपाधन आहे ते आम्हास द्या. रुद्रपुत्रांनो आमची सत्कीर्ति होईल असे करा. आणि तुम्हां देवांच्याच अनुग्रहामुळे तिचा मी उपभोग घेईन असे करा. ॥ ७ ॥


ह॒ये नरो॒ मरु॑तो मृ॒ळता॑ न॒स्तुवी॑मघासो॒ अमृ॑ता॒ ऋत॑ज्ञाः ।
सत्य॑श्रुतः॒ कव॑यो॒ युवा॑नो॒ बृह॑द्गि रयो बृ॒हदु॒क्षमा॑णाः ॥ ८ ॥

हये नरः मरुतः मृळत नः तुवीऽमघासः अमृताः ऋतऽज्ञाः ।
सत्यऽश्रुतः कवयः युवानः बृहत्ऽगिरयः बृहत् उक्षमाणाः ॥ ८ ॥

अहो मरुतांनो, आमच्यावर कृपा करा. तुमच्या देणग्या अपार आहेत. तुम्ही अमर आहात आणि त्रिकालाबाधित धर्म कोणता तेहि तुम्हाला माहित आहे. सत्याचरणाविषयी तुम्ही प्रसिद्धच आहात. तुम्ही ज्ञानी कवि आणि यौवनाढ्य आहात. तुमच्याकरिता उत्तम उत्तम स्तुति चाललेल्या असतात आणि त्यांच्यामुळे संतुष्ट होऊन तुम्ही यथास्थित हर्षोत्फुल्ल होत असता. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ५८ ( मरुत् सूक्त )

ऋषी - श्यावाश्व आत्रेय : देवता - मरुत् : छंद - त्रिष्टुभ्


तमु॑ नू॒नं तवि॑षीमन्तमेषां स्तु॒षे ग॒णं मारु॑तं॒ नव्य॑सीनाम् ।
य आ॒श्वश्वा॒ अम॑व॒द्वह॑न्त उ॒तेशि॑रे अ॒मृत॑स्य स्व॒राजः॑ ॥ १ ॥

तं ऊंइति नूनं तविषीऽमंतं एषां स्तुषे गणं मारुतं नव्यसीनाम् ।
ये आशुऽअश्वा अमऽवत् वहंते उत ईशिरे अमृतस्य स्वऽराजः ॥ १ ॥

रणधुमाळी माजविणारा, जो मरुतांचा संघ त्याची, आणि त्यांच्या अपूर्व शक्तीची लीला ह्यांची महती मी आता यथाशक्ति वर्णन करतो. ते आपल्या तलख घोड्यांवर स्वार होऊन धडाकून जातात. ते स्वतंत्र स्वप्रकाश देव अमरत्वावरच आपली सत्ता गाजवितात. ॥ १ ॥


त्वे॒षं ग॒णं त॒वसं॒ खादि॑हस्तं॒ धुनि॑व्रतं मा॒यिनं॒ दाति॑वारम् ।
म॒यो॒भुवो॒ ये अमि॑ता महि॒त्वा वन्द॑स्व विप्र तुवि॒राध॑सो॒ नॄन् ॥ २ ॥

त्वेषं गणं तवसं खादिऽहस्तं धुनिऽव्रतं मायिनं दातिऽवारम् ।
मयःऽभुवः ये अमिताऽ महिऽत्वा वंदस्व विप्र तुविऽराधसः नॄन् ॥ २ ॥

ते प्रखर, जोमदार, हातांत वीरकंकणे बांधलेले असे आहेत. भयंकर गर्जना करणे हा त्यांचा नित्य व्यवसायच. ते मेघ पटलाचे विदारण करणारे आहेत. तर अशा मरुतांच्या संघाचे स्तवन कर. ऋषिवर्या, जे महिम्याने अमर्याद आहेत, आणि ज्यांची कृपा अपार त्या मरुद्वीरांना प्रणिपात कर. ॥ २ ॥


आ वो॑ यन्तूदवा॒हासो॑ अ॒द्य वृ॒ष्टिं ये विश्वे॑ म॒रुतो॑ जु॒नन्ति॑ ।
अ॒यं यो अ॒ग्निर्म॑रुतः॒ समि॑द्ध ए॒तं जु॑षध्वं कवयः युवानः ॥ ३ ॥

आ वः यंतु उदऽवाहासः अद्य वृष्टिं ये विश्वे मरुतः जुनंति ।
अयं यः अग्निः मरुतः संऽइद्धः एतं जुषध्वं कवयः युवानः ॥ ३ ॥

जे उदकाला आकाशांत धारण करतात आणि पर्जन्य वृष्टिला प्रेरणा करतात, ते सर्व मरुत्गण येथे प्राप्त होवोत. हा अग्नि येथे प्रदीप्त झाला तेव्हा हे यौवन संपन्न मरुतांनो, कविजनांनी त्याचे अर्चन केले. ॥ ३ ॥


यू॒यं राजा॑न॒मिर्यं॒ जना॑य विभ्वत॒ष्टं ज॑नयथा यजत्राः ।
यु॒ष्मदे॑ति मुष्टि॒हा बा॒हुजू॑तो यु॒ष्मद्सद॑श्वो मरुतः सु॒वीरः॑ ॥ ४ ॥

यूयं राजानं इर्यं जनाय विभ्वऽतष्टं जनयथ यजत्राः ।
युष्मत् एति मुष्टिऽहा बाहुऽजूतः युष्मत् सत्ऽअश्वः मरुतः सुऽवीरः ॥ ४ ॥

पवित्र देवांनो, ज्याला विश्वाधीशानेच घडविले अशा सततोद्योगी पुरुषास तुम्ही लोकहितार्थ राजाकरितां, हातघा‍ईवर येऊन युद्ध करणारा, व आपल्या बाहुबलाने अस्त्रे फेंकणारा अशा प्रकारचे वीर तुमच्याकडून प्राप्त होतात, आणि हे मरुतांनो उत्तम घोड्यावर स्वार झालेला रणशूर योद्धाही तुमच्यापासूनच लाभतो. ॥ ४ ॥


अ॒रा इ॒वेदच॑रमा॒ अहे॑व॒ प्रप्र॑ जायन्ते॒ अक॑वा॒ महो॑भिः ।
पृश्नेः॑ पु॒त्रा उ॑प॒मासो॒ रभि॑ष्ठाः॒ स्वया॑ म॒त्या म॒रुतः॒ सं मि॑मिक्षुः ॥ ५ ॥

अराःऽइव इत् अचरमाः अहाऽइव प्रऽप्र जायंते अकवाः महःऽभिः ।
पृश्नेः पुत्रा उपऽमासः रभिष्ठाः स्वया मत्या मरुतः सं मिमिक्षुः ॥ ५ ॥

चाकांचे अरे किंवा दिवसा पाठिमागून दिवस ह्यांत पहिला कोणता व शेवटचा कोणता हे जसे कळत नाही. त्याप्रमाणे मरुतांमध्ये प्रथमचा कोण हे कळत नाही. असामान्य वीर आपल्या महत्तेजाप्रमाणे प्रकट होतात. हे पृश्निपुत्र अत्युत्कृष्ट परंतु अतिशय जलाल आहेत. आणि आपल्या स्वतःच्याच प्रवृत्तीशी जुळून वागत आले आहेत. ॥ ५ ॥


यत्प्राया॑सिष्ट॒ पृष॑तीभि॒रश्वै॑र्वीळुप॒विभि॑र्मरुतो॒ रथे॑भिः ।
क्षोद॑न्त॒ आपो॑ रिण॒ते वना॒न्यवो॒स्रियो॑ वृष॒भः क्र॑न्दतु॒ द्यौः ॥ ६ ॥

यत् प्र अयासिष्ट पृषतीभिः अश्वैः वीळुपविऽभिः मरुतः रथेभिः ।
क्षोदंते आपः रिणते वनानि अव उस्रियः वृषभः क्रंदतु द्यौः ॥ ६ ॥

मरुतांनो ठिपकेदार हरिणी घोड्याप्रमाणे जोडून त्यांच्यासह आपल्या कणखर धांवांची चाके असलेल्या रथात बसून भर धोशाने जाता तेव्हा आकाशोदके एकदम उसळतात आणि अरण्ये गारद होतात. आता द्यौ म्हणजे तो तेजोमय वृषभ खुशाल डुरकण्या फोडूं द्या. ॥ ६ ॥


प्रथि॑ष्ट॒ याम॑न्पृथि॒वी चि॑देषां॒ भर्ते॑व॒ गर्भं॒ स्वमिच्छवो॑ धुः ।
वाता॒न्ह्यश्वा॑न्धु॒र्यायुयु॒ज्रे व॒र्षं स्वेदं॑ चक्रिरे रु॒द्रिया॑सः ॥ ७ ॥

प्रथिष्ट यामन् पृथिवी चित् एषां भर्ताऽइव गर्भं स्वं इत् शवः धुः ।
वातान् हि अश्वान् धुरि आऽयुयुज्रे वर्षं स्वेदं चक्रिरे रुद्रियासः ॥ ७ ॥

मरुत हे धांवत येऊं लागले तेव्हा पृथ्वी त्यांच्यापुढे विस्तृत झाली. नंतर पतीने आधान करावे त्याप्रमाणे त्यांनी आपले जोमदार बल तेथे ठेऊन दिले. आणि झंझावातासच घोडा करून त्यांनी रथाला जोडले तेव्हा आपल्या घर्मालाच त्या रुद्रपुत्रांनी पर्जन्य वृष्टीचे स्वरूप दिले. ॥ ७ ॥


ह॒ये नरो॒ मरु॑तो मृ॒ळता॑ न॒स्तुवी॑मघासो॒ अमृ॑ता॒ ऋत॑ज्ञाः ।
सत्य॑श्रुतः॒ कव॑यो॒ युवा॑नो॒ बृह॑द्गि रयो बृ॒हदु॒क्षमा॑णाः ॥ ८ ॥

हये नरः मरुतः मृळत नः तुवीऽमघासः अमृताः ऋतऽज्ञाः ।
सत्यऽश्रुतः कवयः युवानः बृहत्ऽगिरयः बृहत् उक्षमाणाः ॥ ८ ॥

अहो मरुतांनो आमच्यावर कृपा करा. तुमच्या देणग्या अपार आहेत. तुम्ही अमर आहात आणि त्रिकालाबाधित धर्म कोणता हेंही तुम्हांला माहित आहे. तुम्ही ज्ञानवान् कवि आणि यौवन संपन्न आहात. तुमच्या प्रित्यर्थ उत्तम उत्तम स्तुति चाललेल्या असतात, आणि त्यांच्यामुळे संतुष्ट होऊन तुम्ही यथास्थित हर्षोत्फुल्ल होत असता. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ५९ ( मरुत् सूक्त )

ऋषी - श्यावाश्व आत्रेय : देवता - मरुत् : छंद - जगती, त्रिष्टुभ्


प्र वः॒ स्पळ॑क्रन्सुवि॒ताय॑ दा॒वने ऽ॑र्चा दि॒वे प्र पृ॑थि॒व्या ऋ॒तं भ॑रे ।
उ॒क्षन्ते॒ अश्वा॒न्तरु॑षन्त॒ आ रजः ऽ॑नु॒ स्वं भा॒नुं श्र॑थयन्ते अर्ण॒वैः ॥ १ ॥

प्र वः स्पट् अक्रन् सुविताय दावने अर्च दिवे प्र पृथिव्यै ऋतं भरे ।
उक्षंते अश्वान् तरुषंते आ रजः अनु स्वं भानुं श्रथयंते अर्णवैः ॥ १ ॥

अभिवृद्धिची देणगी मिळावी म्हणून तुमच्या प्रित्यर्थ यज्ञहोत्याने देवांची करुणा भाकिली आहे. तर मित्रा तू आता द्यावापृथिवीचे स्तोत्र कर आणि मी हा सद्धर्मद्योतक यज्ञ यथासांग करतो. पहा ते मरुत् आपल्या अश्वांना मेघोदकांनी स्नान घालीत आहेत व रजोलोकांमधून त्वरेने इकडे येत आहेत, अणि आपले तीव्र तेजःकिरण बाष्पपटलांनी जरा सौम्य करीत आहेत. ॥ १ ॥


अमा॑देषां भि॒यसा॒ भूमि॑रेजति॒ नौर्न पू॒र्णा क्ष॑रति॒ व्यथि॑र्य॒ती ।
दू॒रे॒दृशो॒ ये चि॒तय॑न्त॒ एम॑भिर॒न्तर्म॒हे वि॒दथे॑ येतिरे॒ नरः॑ ॥ २ ॥

अमात् एषां भियसा भूमिः एजति नौः न पूर्णा क्षरति व्यथिः यती ।
दूरेऽदृशः ये चितयंते एमऽभिः अंतः महे विदथे येतिरे नरः ॥ २ ॥

ह्यांच्या सपाट्यापुढे पृथ्वी भितीने चळचळां कांपू लागते, आणि मालाने भरगच्च भरलेली नौका तोल न राहिल्याने हेलकावे खाते त्याप्रमाणे, ती लटपटत चलते. मरुत् येऊ लागले म्हणजे लांबूनच दिसतात. आणि येण्याच्या रस्त्यांवरून तर चांगले ओळखूं येतात. तर अशा ह्या शूरवीरांनी आजच्या महत्त्वाच्या यज्ञसभेमध्ये विशेष कार्यभाग उचलला आहे. ॥ २ ॥


गवा॑मिव श्रि॒यसे॒ शृङ्‌ग॑ेमुत्त॒मं सूर्यो॒ न चक्षू॒ रज॑सो वि॒सर्ज॑ने ।
अत्या॑ इव सु॒भ्व॑१श्चार॑वः स्थन॒ मर्या॑ इव श्रि॒यसे॑ चेतथा नरः ॥ ३ ॥

गवांऽइव श्रियसे श्रृङ्‌गंः उत्ऽतमं सूर्यः न चक्षुः रजसः विऽसर्जने ।
अत्याःऽइव सुभ्वः चारवः स्थन मर्याःऽइव श्रियसे चेतथ नरः ॥ ३ ॥

वृषभाला त्याचे उत्तम श्रृंग जसे शोभादायक, किंवा धुके व अभ्रपटल ह्यांचा निरास होऊन स्पष्ट दिसूं लागावे म्हणून सूर्यरूप नेत्र जसा आवश्यक, त्याप्रमाणे अथवा, अस्सल तडफदार घोडेस्वाराप्रमाने तुम्ही भव्य दिसत आहां. हे शूरांनो विवाहित तरुण पुरुषाप्रमाणेही तुम्ही शोभायमान दिसत आहां. ॥ ३ ॥


को वो॑ म॒हान्ति॑ मह॒तामुद॑श्नव॒त्कस्काव्या॑ मरुतः॒ कः ह॒ पौंस्या॑ ।
यू॒यं ह॒ भूमिं॑ कि॒रणं॒ न रे॑जथ॒ प्र यद्‌भर॑ध्वे सुवि॒ताय॑ दा॒वने॑ ॥ ४ ॥

कः वः महांति महतां उत् अश्नवत् कः काव्या मरुतः कः ह पौंस्या ।
यूयं ह भूमिं किरणं न रेजथ प्र यत् भरध्वे सुविताय दावने ॥ ४ ॥

तुम्ही श्रेष्ठ विभूति. तेव्हा तुमचा महिमा, तुमचे कवित्व आणि तुमचा पराक्रम ह्यांची बरोबरी इतरांस कशी होईल ? अभिवृद्धीची देणगी भक्तास देण्याकरिता जेव्हा ती तुम्ही घेऊन येता, तेव्हा इतक्या जोराने येता की ही पृथ्वी एखाद्या क्षुद्र रजःकणाप्रमाणे थरथरूं लागते. ॥ ४ ॥


अश्वा॑ इ॒वेद॑रु॒षासः॒ सब॑न्धवः॒ शूरा॑ इव प्र॒युधः॒ प्रोत यु॑युधुः ।
मर्या॑ इव सु॒वृधो॑ वावृधु॒र्नरः॒ सूर्य॑स्य॒ चक्षुः॒ प्र मि॑नन्ति वृ॒ष्टिभिः॑ ॥ ५ ॥

अश्वाःऽइव इत् अरुषासः सऽबंधवः शूराःऽइव प्रयुधः प्र उत युयुधुः ।
मर्याःऽइव सुऽवृधः वऽवृधुः नरः सूर्यस्य चक्षुः प्र मिनंति वृष्टिभिः ॥ ५ ॥

ते एकमेकांचे बंधू आहेत. विद्युद्रुप अश्वांप्रमाणे ते लाल दिसत असून युद्धकुशल वीराप्रमाणे त्यांनी अनेकवेळा युद्ध केलेले आहे. कसलेल्या बांधेसूद जवान वीरांप्रमाणे त्यांची शरीरे कमावलेली आहेत, असे हे शूर विभूति सूर्यरूप नेत्राला पर्जन्यवृष्टीच्या योगाने मंद करून टाकतात. ॥ ५ ॥


ते अ॑ज्ये॒ष्ठा अक॑निष्ठास उ॒द्‌भिरदोऽ॑मध्यमासो॒ मह॑सा॒ वि वा॑वृधुः ।
सु॒जा॒तासो॑ ज॒नुषा॒ पृश्नि॑मातरो दि॒वो मर्या॒ आ नो॒ अच्छा॑ जिगातन ॥ ६ ॥

ते अज्येष्ठाः अकनिष्ठासः उत्ऽभिदः ऽमध्यमासः महसा वि ववृधुः ।
सुऽजातासः जनुषा पृश्निऽमातरः दिवः मर्याः आ नः अच्छ जिगातन ॥ ६ ॥

ते एकदम प्रकट झाले म्हणजे त्यांच्यात वडील कोण, धाकटे कोण आणि मधले कोण ते कांहीच कळत नाही. ते आपल्या तेजाने वृद्धिंगत झालेले असतात. मरुतांनो तुम्ही सुद्धवंशीय आहात, तुम्ही ’पृश्नि’चे पुत्र आहात, तुम्ही उपजतांच दिव्यलोकींचे विक्रमशाली तरुण वीर बनला आहात तर कृपा करून आमच्याकडे या बरे ? ॥ ६ ॥


वयो॒ न ये श्रेणीः॑ प॒प्तुरोज॒सान्ता॑न्दि॒वो बृ॑ह॒तः सानु॑न॒स्परि॑ ।
अश्वा॑स एषामु॒भये॒ यथा॑ वि॒दुः प्र पर्व॑तस्य नभ॒नूँर॑चुच्यवुः ॥ ७ ॥

वयः न ये श्रेणीः पप्तुः ओजसा अंतान् दिवः बृहतः सानुनः परि ।
अश्वासः एषां उभये यथा विदुः प्र पर्वतस्य नभनून् अचुच्यवुः ॥ ७ ॥

पक्ष्यांप्रमाणे सरखे एका ओळीने कूच करीत असता, विस्तीर्ण द्युलोकाची मर्यादा आणि द्युलोकाची शिखरे ह्यांनाही आपल्या तेजस्वितेमुळे ओलांडून ते उड्डाण करून गेले व देवता आणि मनुष्यें अशा उभयतांना सुद्धा माहित झाले आहे कीं त्यांच्या रथाच्या घोड्यांनी मेघरूप पर्वतांतील झरे हालवून ते वाहते केले. ॥ ७ ॥


मिमा॑तु॒ द्यौरदि॑तिर्वी॒तये॑ नः॒ सं दानु॑चित्रा उ॒षसो॑ यतन्ताम् ।
आचु॑च्यवुर्दि॒व्यं कोश॑मे॒त ऋषे॑ रु॒द्रस्य॑ म॒रुतो॑ गृणा॒नाः ॥ ८ ॥

मिमातु द्यौः अदितिः वीतये नः सं दानुऽचित्रा उषसः यतंताम् ।
आ अचुच्यवुः दिव्यं कोशं एत ऋषे रुद्रस्य मरुतः गृणानाः ॥ ८ ॥

किंवा अदिति हे आमच्या हविर्भागाकरिता आपली उत्सुकता आता प्रदर्शित करोत. जलतुषारांच्या नानाविध वर्णांनी विभूषित दिसणारी उषाही त्याकरिता उत्कंठित झाली असो. कारण हे स्तोत्र गायका, तू स्तवन केलेल्या रुद्र पुत्र मरुतांनी दिव्य लोकांतील जीवनाचा संचय भूलोकी ओतून दिला आहे. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ६० ( अग्निमरुत् सूक्त )

ऋषी - श्यावाश्व आत्रेय : देवता - अग्निमरुत् : छंद - जगती, त्रिष्टुभ्


ईळे॑ अ॒ग्निं स्वव॑सं॒ नमो॑भिरि॒ह प्र॑स॒त्तो वि च॑यत्कृ॒तं नः॑ ।
रथै॑रिव॒ प्र भ॑रे वाज॒यद्‌भिः॑द प्रदक्षि॒णिन्म॒रुतां॒ स्तोम॑मृध्याम् ॥ १ ॥

ईळे अग्निं सुऽअवसं नमःऽभिः इह प्रऽसत्तः वि चयत् कृतं नः ।
रथैःऽइव प्र भरे वाजयत्ऽभिः प्रऽदक्षिणित् मरुतां तोमं ऋध्याम् ॥ १ ॥

ह्या दयाघन अग्नीचे वंदनांनीच मी आता स्वागत करतो. म्हणजे येथे विराजमान होऊन तो आमच्या सर्व कृत्याचे निरीक्षण करील. सत्वसामर्थ्य प्राप्त करून घेण्यास समर्थ अशा जणो रथात बसूनच मी पुढे सरसावतो आणि प्रदक्षिणाकरून मरुताचे स्तवन वाढवून ताल सुरावर म्हणतो. ॥ १ ॥


आ ये त॒स्थुः पृष॑तीषु श्रु॒तासु॑ सु॒खेषु॑ रु॒द्रा म॒रुतो॒ रथे॑षु ।
वना॑ चिदुग्रा जिहते॒ नि वो॑ भि॒या पृ॑थि॒वी चि॑द्रेजते॒ पर्व॑तश्चित् ॥ २ ॥

आ ये तस्थुः पृषतीषु श्रुतासु सुऽखेषु रुद्रा मरुतः रथेषु ।
वना चित् उग्राः जिहते नि वः भिया पृथिवी चित् रेजते पर्वतः चित् ॥ २ ॥

पहा ते मरुत् आपल्या ठिपकेदार हरिणीवर आरूढ होऊन येत आहेत. ते सुखकारक रथांतही बसून येत आहेत. ते रुद्ररूप आहेत. हे थोर विभूतिंनो, तुम्हाला भिऊन अरण्ये सुद्धा जमीनदोस्त झाली, आणि पृथ्वी व मेघमंडळ हींही कापूं लागली. ॥ २ ॥


पर्व॑तश्चि॒न्महि॑ वृ॒द्धो बि॑भाय दि॒वश्चि॒त्सानु॑ रेजत स्व॒ने वः॑ ।
यत्क्रीळ॑थ मरुत ऋष्टि॒मन्त॒ आप॑ इव स॒ध्र्यञ्चो धवध्वे ॥ ३ ॥

पर्वतः चित् महि वृद्धः बिभाय दिवः चित् सानु रेजत स्वने वः ।
यत् क्रीळथ मरुतः ऋष्टिऽमंत आपःऽइव सध्र्यञ्चः धवध्वे ॥ ३ ॥

तुम्ही गर्जना केल्याबरोबर, पर्वत केव्हढाही मोठा असो तो भिऊन गेलाच म्हणून म्हणा. आकाशाचे शिखरसुद्धां हादरूं लागते मग इतरांची काय कथा ? मरुतांनो तुम्ही आपले भाले हातात घेऊन सहज जरी खेळूं लागला तरी पाण्याचे अनेक ओघ जोराने एकत्र मिळावे त्याप्रमाणे तुम्ही घोघाऊन एकत्र भिडता. ॥ ३ ॥


व॒रा इ॒वेद्रै॑व॒तासो॒ हिर॑ण्यैर॒भि स्व॒धाभि॑स्त॒न्वः पिपिश्रे ।
श्रि॒ये श्रेयां॑सस्त॒वसो॒ रथे॑षु स॒त्रा महां॑सि चक्रिरे त॒नूषु॑ ॥ ४ ॥

वराःऽइव इत् रैवतासः हिरण्यैः अभि स्वधाभिः तन्वः पिपिश्रे ।
श्रिये श्रेयांसः तवसः रथेषु सत्रा महांसि चक्रिरे तनूषु ॥ ४ ॥

विवाह योग्य धनाढ्य वरांनी सुवर्णाचे अलंकार धारण करावे, त्याप्रमाणे मरुतांनीही भूषणार्थ केवल आपल्या स्वतःच्या सामर्थ्यांनीच आपली शरीरें अलंकृत केली. ते मंगलस्वरूप आणि बलाढ्य आहेत. रथात बसून त्यांनी आपल्या आंगावरील तेज प्रकट केले आहे. ॥ ४ ॥


अ॒ज्ये॒ष्ठासो॒ अक॑निष्ठास ए॒ते सं भ्रात॑रो वावृधुः॒ सौभ॑गाय ।
युवा॑ पि॒ता स्वपा॑ रु॒द्र ए॑षां सु॒दुघा॒ पृश्निः॑ सु॒दिना॑ म॒रुद्‌भ्यः॑ि ॥ ५ ॥

अज्येष्ठासः अकनिष्ठासः एते सं भ्रातरः ववृधुः सौभगाय ।
युवा पिता सुऽअपा रुद्रः एषां सुऽदुघा पृश्निः सुऽदिना मरुत्ऽभ्यः ॥ ५ ॥

ज्यांच्यात कोणी वडील नाही आणि धाकटाही नाही असे हे भाऊ भाऊ आहेत. जगाच्या भाग्याकरितांच हे सामर्थ्याने वृद्धिंगत झाले आहेत. तरुण, सत्कार्यव्रत असा रुद्र हाच त्यांचा पिता. भरपूर मनोरथ दुग्ध देणारी पृश्नि माता हिने मरुतांच्या प्रेमाकरितांच आम्हांस हे चांगले दिवस दाखविले आहेत. ॥ ५ ॥


यदु॑त्त॒मे म॑रुतः मध्य॒मे वा॒ यद्वा॑व॒मे सु॑भगासः दि॒विष्ठ ।
अतो॑ नः रुद्रा उ॒त वा॒ न्व॑१स्याग्ने॑ वि॒त्ताद्ध॒विषो॒ यद्यजा॑म ॥ ६ ॥

यत् उत्ऽतमे मरुतः मध्यमे वा यत् वा अवमे सुऽभगासः दिवि स्थ ।
अतः नः रुद्राऽ उत वा अनु अस्य अग्ने वित्तात् हविषः यत् यजाम ॥ ६ ॥

दिव्यैश्वर्यशाली मरुतांनो, तुम्ही अत्युच्च दिव्य लोकांत, अथवा मधल्या किंवा खालच्या लोकांत कोठेही असा, पण तेथूनसुद्धा तुम्ही, आणि हे अग्नी तू ही जे हवि आम्ही अर्पण करूं ते लक्षात घ्या. ॥ ६ ॥


अ॒ग्निश्च॒ यन्म॑रुतो विश्ववेदसो दि॒वो वह॑ध्व॒ उत्त॑रा॒दधि॒ ष्णुभिः॑ ।
ते म॑न्दसा॒ना धुन॑यः रिशादसो वा॒मं ध॑त्त॒ यज॑मानाय सुन्व॒ते ॥ ७ ॥

अग्निः च यत् मरुतः विश्वऽवेदसः दिवः वहध्व उत्ऽतरात् अधि स्नुऽभिः ।
ते मंदसानाः धुनयः रिशादसः वामं धत्त यजमानाय सुन्वते ॥ ७ ॥

सर्वज्ञ मरुतांनो, अग्निदेव आणि तुम्ही, हे सर्वामध्ये उंच अस जो एक द्युलोक आहे त्याच्याही शिखरावरून, आपल्या वाहनावर आरूढ होऊन भूलोकी येता. दुष्टनाशन मरुतांनो तुम्ही गर्जनेने सर्व भुवन हालवून सोडणारे आणि तुम्ही हृष्टचित्त होऊन सोमार्पण करणार्‍या यजमानाला अमोलिक वस्तु देणारे आहात. ॥ ७ ॥


अग्ने॑ म॒रुद्‌भिः॑ु शु॒भय॑द्‌भि॒ुर्ऋ्क्व॑भिः॒ सोमं॑ पिब मन्दसा॒नो ग॑ण॒श्रिभिः॑ ।
पा॒व॒केभि॑र्विश्वमि॒न्वेभि॑रा॒युभि॒र्वैश्वा॑नरः प्र॒दिवा॑ के॒तुना॑ स॒जूः ॥ ८ ॥

अग्ने मरुत्ऽभिः शुभयत्ऽभिः ऋक्वऽभिः सोमं पिब मंदसानः गणश्रिऽभिः ।
पावकेभिः विश्वंऽइन्वेभिः आयुऽभिः वैश्वानर प्रऽदिवा केतुना सऽजूः ॥ ८ ॥

अग्निदेवा, पवित्रतेजाने युक्त, भक्ति गानप्रिय भव्य समूहाने शोभायमान् दिसणार्‍या मरुतांसह हर्षभरीत हो. हे जगन्मित्रा वैश्वानरा तुझा पुरातन देदीप्यमान ज्वालारूप ध्वज, आणि पवित्र व सर्व प्राणिमात्रांना चैतन्य व आयुष्य देणार्‍या तुझ्या विभूतींसह हृष्टचित्त होऊन आमच्या सोमरसाचा अस्वाद घे. ॥ ८ ॥


ॐ तत् सत्


GO TOP