PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ५ - सूक्त ४१ ते ५०

ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ४१ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - अत्रि भौम : देवता - विश्वेदेव : छंद - अतिजगती, त्रिष्टुभ्


को नु वां॑ मित्रावरुणावृता॒यन्दि॒वो वा॑ म॒हः पार्थि॑वस्य वा॒ दे ।
ऋ॒तस्य॑ वा॒ सद॑सि॒ त्रासी॑थां नो यज्ञाय॒ते वा॑ पशु॒षो न वाजा॑न् ॥ १ ॥

कः नु वां मित्रावरुणौ ऋतऽयन् दिवः वा महः पार्थिवस्य वा दे ।
ऋतस्य वा सदसि त्रासीथां नः यज्ञऽयते वा पशुसः न वाजान् ॥ १ ॥

मित्रावरुणांनो ! आणखी कोण कोण सद्धर्मनिरत भक्तजन तुम्हांस हविभाग देत असतात. आकाश, पृथ्वी आणि सनातन सत्याच्यालोकी वास करणारे तुम्ही देव आमचे संरक्षण करा. पशुपालाला गोधन द्यावे त्याप्रमाणे यज्ञकर्मरत भक्ताला तुझी पवित्र सामर्थ्यें अर्पण करा. ॥ १ ॥


ते नो॑ मि॒त्रो वरु॑णो अर्य॒मायुरिन्द्र॑ ऋभु॒क्षा म॒रुतो॑ जुषन्त ।
नमो॑भिर्वा॒ ये दध॑ते सुवृ॒क्तिं स्तोमं॑ रु॒द्राय॑ मी॒ळ्हुषे॑ स॒जोषाः॑ ॥ २ ॥

ते नः मित्रः वरुणः अर्यमायुः इंद्र ऋभुक्षा मरुतः जुषंत ।
नमःऽभिः वा ये दधते सुऽवृक्तिं स्तोमं रुद्राय मीळ्हुषे सऽजोषाः ॥ २ ॥

जगन्मित्र वरुण, जीवांच्या आयुष्याचा सूत्रधार अर्यमा, ऋभूंचा प्रभू इंद्र, आणि मरुत् हे सर्व आम्हांवर प्रसन्न होवोत. जे प्रेमळ भक्त प्रणिपातांनी अभीष्टवर्षक रुद्राला सोम व आपली निःष्कलंक अंतःकरण प्रवृत्ति, ह्या दोन्ही अर्पण करतात तेही संतुष्ट होवोत. ॥ २ ॥


आ वां॒ येष्ठा॑श्विना हु॒वध्यै॒ वात॑स्य॒ पत्म॒नृथ्य॑स्य पु॒ष्टौ ।
उ॒त वा॑ दि॒वः असु॑राय॒ मन्म॒ प्रान्धां॑सीव॒ यज्य॑वे भरध्वम् ॥ ३ ॥

आ वां येष्ठा अश्विना हुवध्यै वातस्य पत्मन् रथ्यस्य पुष्टौ ।
उत वा दिवः असुराय मन्म प्र अन्धांसिऽइव यज्यवे भरध्वम् ॥ ३ ॥

वायूच्या मार्गात, म्हणजे आकाशात, आपल्या अश्वांना तुंद ठेवण्यांत ज्यांची अतिशय लगबग चाललेली असते, त्या अश्विदेवांना तुमच्याकरता येथे पाचारण करण्याची मी व्यवस्था करतो. परंतु ह्या तेजोमय आकाशात राहणारा परमपूज्य जो परमेश्वर, त्याच्या प्रीत्यर्थ तुम्ही मधुर पेय अर्पण करता, त्याचप्रमाणे त्याला एक सुंदर मननीय स्तोत्र अर्पण करा. ॥ ३ ॥


प्र स॒क्षणो॑ दि॒व्यः कण्व॑होता त्रि॒तो दि॒वः स॒जोषा॒ वातो॑ अ॒ग्निः ।
पू॒षा भगः॑ प्रभृ॒थे वि॒श्वभो॑जा आ॒जिं न ज॑ग्मुरा॒श्वश्वतमाः ॥ ४ ॥

प्र सक्षणः दिव्यः कण्वऽहोता त्रितः दिवः सऽजोषा वातः अग्निः ।
पूषा भगः प्रऽभृथे विश्वऽभोजाः आजिं न जग्मुः आश्वश्वऽतमाः ॥ ४ ॥

कण्वकुलाचा विजयशाली ’होता’, आकाशाचे तिन्ही प्रांत व्यापून टाकणारा प्रेमळ वायु, भाग्यदाता देव अग्नि, विश्वाचे पोषण करणारा पूषा, ह्यांच्या विद्युल्लतेसारख्या त्वरित गतीला उपमाच नाही. तथापि ईश्वराच्या ह्या सर्व विभूति आमच्या येथे सत्वर प्राप्त झाल्या आहेत. ॥ ४ ॥


प्र वो॑ र॒यिं यु॒क्ताश्वं॑ भरध्वं रा॒य एषेऽवसे दधीत॒ धीः ।
सु॒शेव॒ एवै॑रौशि॒जस्य॒ होता॒ ये व॒ एवा॑ मरुतस्तु॒राणा॑म् ॥ ५ ॥

प्र वः रयिं युक्ताऽअश्वं भरध्वं रायः एषे अवसे दधीत धीः ।
सुऽशेव एवैः औशिजस्य होता ये वः एवा मरुतआ तुराणाम् ॥ ५ ॥

ज्यामध्ये तीव्रबुद्धिरूप अश्वाचा लाभ घडेल, अशा तऱ्हेचे ऐश्वर्य आम्हास अर्पण करा. आम्हाला सात्विक आवेश देऊन आम्हावर अनुग्रह करण्याविषयी मनीषा धरा. मरुतांनो, शत्रूंचा तडकाफडकी पाडाव करणारे व भक्तांकरिता त्वरेने धांवून येणारे तुम्ही, त्या तुमच्या कृपेचे जे जे मार्ग असतील त्या मार्गांच्या अनुसरणाने आशिजाचा यज्ञसंपादक कृतार्थ होवो. ॥ ५ ॥


प्र वो॑ वा॒युं र॑थ॒युजं॑ कृणुध्वं॒ प्र दे॒वं विप्रं॑ पनि॒तार॑म॒र्कैः ।
इ॒षु॒ध्यव॑ ऋत॒सापः॒ पुरं॑धी॒र्वस्वी॑र्नो॒ अत्र॒ पत्नी॒रा धि॒ये धुः॑ ॥ ६ ॥

प्र वः वायुं रथऽयुजं कृणुध्वं प्र देवं विप्रं पनितारं अर्कैः ।
इषुध्यवः ऋतऽसापः पुरंऽधीः वस्वीः नः अत्र पत्नीः आ धिये धुरितिधुः ॥ ६ ॥

तुमच्या दिव्य वायूसच क्षणभर रथास जोडून निघा, आणि ज्ञानी कवीला ’अर्क’ स्तोत्रांनी भगवत् स्तुती करण्याची प्रेरणा करा. ईर्ष्येने वागणार्‍या, धर्मकार्य तत्पर, प्रज्ञाशालिनी, आणि अप्रतिम धनसंपन्न अशा ज्या देवपत्न्या, त्यांनाहि ह्या कार्यात आम्हाला सद्‍बुद्धि दिलीच आहे. ॥ ६ ॥


उप॑ व॒ एषे॒ वन्द्ये॑भिः शू॒षैः प्र य॒ह्वी दि॒वश्चि॒तय॑द्‌भितर॒र्कैः ।
उ॒षासा॒नक्ता॑ वि॒दुषी॑व॒ विश्व॒मा हा॑ वहतो॒ मर्त्या॑य य॒ज्ञम् ॥ ७ ॥

उप व एषे वन्द्येभिः शूषैः प्र यह्वीइति दिवः चितयत्ऽभिः अर्कैः ।
उषसानक्ता विदुषीइवेतिविदुषीऽइव विश्वं आ हा वहतः मर्त्याय यज्ञम् ॥ ७ ॥

तुमच्यासाठी, प्रसंशनीय परंतु जोरदार अशी कवनांनी, आणि अंतःकरणांत स्पष्टपणे भरणार्‍या ’अर्क’ स्तोत्रांनी आकाशाच्या तेजस्वी व चपल कन्यकांपुढे आम्ही नम्रपणाने येतो. उषा आणि रात्र ह्या देवी सर्वज्ञ असल्याप्रमाणेच आहेत, त्या दीन मानवाकरिता सर्व प्रकारचे यज्ञमार्ग प्रसिद्धीस आणतात. ॥ ७ ॥


अ॒भि वो॑ अर्चे पो॒ष्याव॑तो॒ नॄन्वास्तो॒ष्पतिं॒ त्वष्टा॑रं॒ ररा॑णः ।
धन्या॑ स॒जोषा॑ धि॒षणा॒ नमो॑भि॒र्वन॒स्पतीँ॒रोष॑धी रा॒य एषे॑ ॥ ८ ॥

अभि वः अर्चे पोष्याऽवतः नॄन् वास्तोः पतिं त्वष्टारं रराणः ।
धन्या सऽजोषा धिषणा नमःऽभिः वनस्पतीन् ओषधीः रायः एषे ॥ ८ ॥

तुमच्यासाठी, शूर योद्ध्यांचे पोशिंदे मरुत् आणि त्वष्टादेव ह्यांना प्रसन्न करून घेऊन मी, गृहस्वामी जो इंद्र, त्याचे मोठ्याने भजन करतो. तेव्हां ह्या इंद्राची धनदात्री आणि प्रेमार्द्र बुद्धि आमच्या प्रणिपातांनी जागृत होऊन आम्हांस संपत्ति प्राप्त होण्यासाठी वनस्पती आणि औषधी ह्यांच्याकडे वळत आहे. ॥ ८ ॥


तु॒जे न॒स्तने॒ पर्व॑ताः सन्तु॒ स्वैत॑वो॒ ये वस॑वो॒ न वी॒राः ।
प॒नि॒त आ॒प्त्यो य॑ज॒तः सदा॑ नो॒ वर्धा॑न्नः॒ शंसं॒ नर्यो॑ अ॒भिष्टौ॑ ॥ ९ ॥

तुजे नः तने पर्वताः सन्तु स्वएवतवः ये वसवः न वीराः ।
पनितः आप्त्यः यजतः सदा नः वर्धात् नः शंसं नर्यः अभिष्टौ ॥ ९ ॥

’वसु’ प्रमाणेच जे वीर्यशाली आहेत ते मेघरूप स्वेच्छाचारी पर्वत आम्हाला पुत्रपौत्र व संतति ह्यांचा लाभ घेऊं देवोत. स्तुतिनिरत, पूज्य, मनुष्यहितकर जो आप्त्य तोहि आमची कवित्वशक्ति निरंतर वृद्धिंगत करो, आणि आमचे अभीष्ट साधून देणाची योजना करो. ॥ ९ ॥


वृष्णो॑ अस्तोषि भू॒म्यस्य॒ गर्भं॑ त्रि॒तः नपा॑तम॒पां सु॑वृ॒क्ति ।
गृ॒णी॒ते अ॒ग्निरे॒तरी॒ न शू॒षैः शो॒चिष्के॑शो॒ नि रि॑णाति॒ वना॑ ॥ १० ॥

वृष्णः अस्तोषि भूम्यस्य गर्भं त्रितः नपातं अपां सुऽवृक्ति ।
गृणीते अग्निः एतरी न शूषैः शोचिःऽकेशः नि रिणाति वना ॥ १० ॥

पृथ्वीवर वृष्टि करणार्‍या पर्जन्याचा गर्भ असून जो उदकांचा नातु आहे त्या अग्नीची मी योग्य अशा स्तोत्राने स्तुति करतो. तो विस्तीर्ण अग्नि आपला मार्ग अक्रमित असतां आपल्या किरणांनी कोणाला सतावीत नाही. परंतु प्रज्वलित असणार्‍या किरणांनी युक्त असा तो अग्नि अरण्यांना मात्र दग्ध करून टाकतो. ॥ १० ॥


क॒था म॒हे रु॒द्रिया॑य ब्रवाम॒ कद्रा॒ये चि॑कि॒तुषे॒ भगा॑य ।
आप॒ ओष॑धीरु॒त नो॑ऽवन्तु॒ द्यौर्वना॑ गि॒रयो॑ वृ॒क्षके॑शाः ॥ ११ ॥

कथा महे रुद्रियाय ब्रवाम कत् राये चिकितुषे भगाय ।
आपः ओषधीः उत नः अवन्तु द्यौः वना गिरयः वृक्षऽकेशाः ॥ ११ ॥

परमथोर रुद्राप्रीत्यर्थ सुंदर स्तोत्र आम्हांस कसे म्हणतां येईल ? ऐश्वर्य प्रीत्यर्थ त्या ज्ञानरूप भाग्यदाता देवाला आम्ही आता कोणते स्तोत्र म्हणावे ? ह्या कार्यात दिव्य उदके, औषधी, आकाश, वने आणि वनस्पति हेच ज्यांचे केश असे मोठे मोठे पर्वत आम्हांस सहाय्य करोत. ॥ ११ ॥


शृ॒णोतु॑ न ऊ॒र्जां पति॒र्गिरः॒ स नभ॒स्तरी॑याँ इषि॒रः परि॑ज्मा ।
शृ॒ण्वन्त्वापः॒ पुरो॒ न शु॒भ्राः परि॒ स्रुचो॑ बबृहा॒णस्याद्रेः॑ ॥ १२ ॥

शृणोतु नः ऊर्जां पतिः गिरः स नभः तरीयान् इषिरः परिऽज्मा ।
शृण्वन्तु आपः पुरः न शुभ्राः परि स्रुचः बबृहाणस्य अद्रेः ॥ १२ ॥

शरीरांतील जोम ज्याच्या कृपेने लाभतो, मेघाच्छादित आकाशात जो सोसाट्याने व आवेशाने वावरतो, जो पृथ्वीभोंवती सर्वत्र पर्यटन करतो, तो वायुरूप ईश्वर आमच्या प्रार्थनांकडे लक्ष देवो. गगनचुंबित पर्वतांपासून चोहोंबाजूने झुळझुळ वाहणारी स्फटिकांप्रमाणे स्वच्छ उदके हीहि आमचे भगवत् स्तोत्र श्रवण करोत. ॥ १२ ॥


वि॒दा चि॒न्नु म॑हान्तो॒ ये व॒ एवा॒ ब्रवा॑म दस्मा॒ वार्यं॒ दधा॑नाः ।
वय॑श्च॒न सु॒भ्व॑१ आव॑ यन्ति क्षु॒भा मर्त॒मनु॑यतं वध॒स्नैः ॥ १३ ॥

विद चित् नु महांतः ये वः एवा ब्रवाम दस्माः वार्यं दधानाः ।
वयः चन सुऽभ्वः आ अव यन्ति क्षुभा मर्तं अनुऽयतं वधऽस्नैः ॥ १३ ॥

श्रेष्ठ विभूतींनो, तुमच्या उपासनेचे मार्ग आम्हास अवगत आहेत. हे अद्‍भुत चारित्र्य देवांनो, तुमचे अभिलषणीय प्रेम आम्हांस लाभले त्याचेच महत्व आता आम्ही सांगू. पहा पक्षीसुद्धा अतिशय सालस मनुष्याकडे येतील परंतु फांसे व सुर्‍या घेऊन आंगावर धांवणार्‍या मनुष्याच्या वार्‍यासहि ते उभे राहणार नाहीत. ॥ १३ ॥


आ दैव्या॑नि॒ पार्थि॑वानि॒ जन्मा॒पश्चाच्छा॒ सुम॑खाय वोचम् ।
वर्ध॑न्तां॒ द्यावो॒ गिर॑श्च॒न्द्राग्रा॑ उ॒दा व॑र्धन्ताम॒भिषा॑ता॒ अर्णाः॑ ॥ १४ ॥

आ दैव्यानि पार्थिवानि जन्म अपः च अच्छा सुऽमखाय वोचम् ।
वर्धंतां द्यावः गिरः चन्द्रऽअग्राः उदा वर्धंतां अभिऽषाता अर्णाः ॥ १४ ॥

आकाशात प्रादुर्भूत झालेल्या दिव्य विभूति, भूलोकी जन्म घेणारे मानव आणि उदके ह्या सर्वांची यज्ञ यथासांग तडीस जावा म्हणून मी प्रार्थना करीत आहे. चंद्रमा ज्यामध्ये श्रेष्ठ आहे अशी नक्षत्रे आमच्या स्तवनवाणीचे गौरव करोत. जिंकून परत मिळविलेल्या ज्ञान ओघाचे कल्लोळ हेही आमच्या स्तुतींचे कौतुक करोत. ॥ १४ ॥


प॒देप॑दे मे जरि॒मा नि धा॑यि॒ वरू॑त्री वा श॒क्रा या पा॒युभि॑श्च ।
सिष॑क्तु मा॒ता म॒ही र॒सा नः॒ स्मत्सू॒रिभि॑रृजु॒हस्त॑ ऋजु॒वनिः॑ ॥ १५ ॥

पदेऽपदे मे जरिमा नि धायि वरूत्री वा शक्रा या पायुऽभिः च ।
सिसक्तु माता मही रसा नः स्मत् सूरिऽभिः ऋजुऽस्ता ऋजुऽवनिः ॥ १५ ॥

प्रत्येक पदार्थामध्ये माझे काव्य भरलेले आहे. प्राणिमात्रांचे संरक्षक कवच अशी ईश्वराची सर्व समर्थ शक्ति "वरुत्री" ती आपल्या संरक्षणसाधनांनी आमच्या बरोबर राहो. परमथोर भूमाता हीहि नृप मंडलासहित आमच्या पाठीवर राहो. ॥ १५ ॥


क॒था दा॑शेम॒ नम॑सा सु॒दानू॑नेव॒या म॒रुतो॒ अच्छो॑क्तौ॒ प्रश्र॑वसः म॒रुतो॒ अच्छो॑क्तौ ।
मा नोऽहिर्बु॒ध्न्यः रि॒षे धा॑द॒स्माकं॑ भूदुपमाति॒वनिः॑ ॥ १६ ॥

कथा दाशेम नमसा सुऽदानून् एवऽया मरुतः अच्छऽउक्तौ प्रऽश्रवसः मरुतः अच्छऽउक्तौ ।
मा नः अहिः बुध्न्यः रिषे धात् अस्माकं भूत् उपमातिऽवनिः ॥ १६ ॥

वंदन करून सुद्धा त्या दानशूर देवांचा सन्मान आमच्या हातून कसा होईल ? स्तुतींच्या मार्गाने, भाषणांमध्ये, किंवा प्रख्याति करून त्या द्वारेतरी मरुतांची उपासना आमच्याकडून कशी होईल ? तलातलामध्ये जो महाभुजंग आहे, त्याच्याकडून आम्हांस किंचितहि अपाय होऊ नये इतकेच नव्हे तर आमची प्रार्थना त्यालाहि पसंत पडो. ॥ १६ ॥


इति॑ चि॒न्नु प्र॒जायै॑ पशु॒मत्यै॒ देवा॑सो॒ वन॑ते॒ मर्त्यो॑ व॒ आ दे॑वासः वनते॒ मर्त्यो॑ वः ।
अत्रा॑ शि॒वां त॒न्वो धा॒सिम॒स्या ज॒रां चि॑न्मे॒ निर्ऋ॑rतिर्जग्रसीत ॥ १७ ॥

इति चित् नु प्रऽजायै पशुऽमत्यै देवासः वनते मर्त्यः व आ देवासः वनते मर्त्यः वः ।
अत्रा शिवां तन्वः धासिं अस्याः जरां चिन् मे निःऋतिः जग्रसीत ॥ १७ ॥

देवांनो, हा मानवी प्राणी आपल्या पोराबाळांकरिता व आपल्या गाईगुरांकरिता तुम्हाला आळवीत असतो. देवांनो तुमचा लोभ संपादन करण्याकरिता ह्याप्रमाणे प्रयत्न करीत असतो. तर मजसारख्याच्या ह्या अंतरात्म्याला शुभप्रद अशी तृप्ति द्या, आणि "निर्‍ऋति" ही राक्षसी माझे म्हातारपणच खाऊन टाकील असे करा. ॥ १७ ॥


तां वो॑ देवाः सुम॒तिमू॒र्जय॑न्ती॒मिष॑मश्याम वसवः॒ शसा॒ गोः ।
सा नः॑ सु॒दानु॑र्मृ॒ळय॑न्ती दे॒वी प्रति॒ द्रव॑न्ती सुवि॒ताय॑ गम्याः ॥ १८ ॥

तां वः देवाः सुऽमतिं ऊर्जयन्तीं इषं अश्याम वसवः शसा गोः ।
सा नः सुऽदानुः मृळयन्ती देवी प्रति द्रवन्ती सुविताय गम्याः ॥ १८ ॥

देवांनो, तुमचे ते जिव्हाळ्याचे प्रेम, दिव्य निधींनो, तुमचा तो ओजस्वी आवेश ह्यांचा लाभ ज्ञान धेनूच्या स्तुतीरूप सेवेने आम्हांस घडेल असे करा. उदार देवी ’इळा’ हिला आमची दया येवून ती आमच्या कल्याणाकरिता त्वरेने धांवून येईल असे करा. ॥ १८ ॥


अ॒भि न॒ इळा॑ यू॒थस्य॑ मा॒ता स्मन्न॒दीभि॑रु॒र्वशी॑ वा गृणातु ।
उ॒र्वशी॑ वा बृहद्दि॒वा गृ॑णा॒नाभ्यू॑र्ण्वा॒ना प्र॑भृ॒थस्या॒योः ॥ १९ ॥

अभि नः इळा यूथस्य माता स्मन् नदीभि उर्वशी वा गृणातु ।
उर्वशी वा बृहद्ऽदिवा गृणाना अभ्यिऽऊर्ण्वाना प्रऽभृथस्य आयोः ॥ १९ ॥

पशूच्या कळपांची जोपासना करणारी धरित्रीमाता, उत्कंठित मनाने नद्यांच्या गर्जनानी आमचे अभिनंदन करो. तशीच अत्युच्च आकाशात प्रकाशणारी अत्युत्सुक ’उषा’ हीहि भक्तजनांचे उपायन गृहण करून आमचे कौतुक करो. ॥ १९ ॥


सिष॑क्तु न ऊर्ज॒व्यस्य पु॒ष्टेः ॥ २० ॥

सिसक्तु न ऊर्जव्यस्य पुष्टेः ॥ २० ॥

आणि उर्जख्य राजाची भरभराट भावी म्हणून एकसारखी आमच्या बरोबर राहो. ॥ २० ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ४२ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - अत्रि भौम : देवता - विश्वेदेव : छंद - अतिजगती, त्रिष्टुभ्


प्र शंत॑मा॒ वरु॑णं॒ दीधि॑ती॒ गीर्मि॒त्रं भग॒मदि॑तिं नू॒नम॑श्याः ।
पृष॑द्योनिः॒ पञ्च॑होता शृणो॒त्वतू॑र्तपन्था॒ असु॑रः मयो॒भुः ॥ १ ॥

प्र शंतमा वरुणं दीधिती गीः मित्रं भगं अदितिं नूनं अश्याः ।
पृषत्ऽयोनिः पञ्चऽहोता शृणोतु अतूर्तऽपन्था असुरः मयःऽभुः ॥ १ ॥

माझी स्तुति, माझी ध्तानबुद्धि ही जगन्मित्र वरुण, भाग्याधिपति देव व ती अनाद्यनंत शक्ति अदिति ह्यांचा आश्रय करो. जगातील विविधता हेच ज्याचे आद्य स्थान, पाच प्रकारच्या होतृकर्मात जो निष्णात, ज्याच्या मार्गात विघ्न करण्याची कोणाचीही प्राज्ञा नाही असा तो मंगलमय परमेश्वर माझी प्रार्थना कृपाकरून ऐकून घेवो. ॥ १ ॥


प्रति॑ मे॒ स्तोमं॒ अदि॑तिर्जगृभ्यात्सू॒नुं न मा॒ता हृद्यं॑ सु॒शेव॑म् ।
ब्रह्म॑ प्रि॒यं दे॒वहि॑तं॒ यदस्त्य॒हं मि॒त्रे वरु॑णे॒ यन्म॑यो॒भु ॥ २ ॥

प्रति मे स्तोमं अदितिः जगृभ्यात् सूनुं न माता हृद्यं सुऽशेवम् ।
ब्रह्म प्रियं देवऽहितं यत् अस्ति अहं मित्रे वरुणे यत् मयःऽभु ॥ २ ॥

आपल्या सोनुकल्या बाळाला आईने पोटाशी धरावे त्याचप्रामाणे ह्या माझ्या हृदयंगम व सुखप्रद स्तोत्राचा अदिति माता स्वीकार करो. जी जी माझी प्रार्थना, स्तुति सुंदर असेल, जी देवाला पटेल, जी कल्याणप्रद होईल, ती प्रार्थना मी त्या जगन्मित्र वरुणाच्या पायी वाहतो. ॥ २ ॥


उदी॑रय क॒वित॑मं कवी॒नामु॒नत्तै॑नम॒भि मध्वा॑ घृ॒तेन॑ ।
स नो॒ वसू॑नि॒ प्रय॑ता हि॒तानि॑ च॒न्द्राणि॑ दे॒वः स॑वि॒ता सु॑वाति ॥ ३ ॥

उत् ईरय कविऽतमं कवीनां उनत्त एनं अभि मध्वा घृतेन ।
स नः वसूनि प्रऽयता हितानि चन्द्राणि देवः सविता सुवाति ॥ ३ ॥

कविमंडळातील उत्कृष्ट कवीला काव्यस्फुर्ति दे. मधाने आणि घृताने त्याला स्नपन करा. पहा हा जगत्प्रेरक सविता देव विशुद्ध, हितकर, आल्हाददायक अशा ज्याच्या अपूर्व वस्तू जगात आहेत त्या प्रकट करील. ॥ ३ ॥


समि॑न्द्र णो॒ मन॑सा नेषि॒ गोभिः॒ सं सू॒रिभि॑र्हरिवः॒ सं स्व॒स्ति ।
सं ब्रह्म॑णा दे॒वहि॑तं॒ यदस्ति॒ सं दे॒वानां॑ सुम॒त्या य॒ज्ञिया॑नाम् ॥ ४ ॥

सं इंद्र नः मनसा नेषि गोभिः सं सूरिऽभिः हरिऽवः सं स्वस्ति ।
सं ब्रह्मणा देवऽहितं यत् अस्ति सं देवानां सुऽमत्या यज्ञियानाम् ॥ ४ ॥

हे इंद्रा, हे हरिदश्वनायका, ज्ञान धेनू आणि सूज्ञ नृपाल ह्याचा लाभ आम्हास सुखाने घडू दे. आणि तुला देवाला जे ब्रह्म स्तोत्र योग्य वाटत असेल त्याचा आणि परमपूज्य दिव्य विभूतिंच्याहि सौहार्दाचा आम्हास उपयोग होऊं दे. ॥ ४ ॥


दे॒वः भगः॑ सवि॒ता रा॒यो अंश॒ इन्द्रो॑ वृ॒त्रस्य॑ स॒ञ्जितो॒ धना॑नाम् ।
ऋ॒भु॒क्षा वाज॑ उ॒त वा॒ पुरं॑धि॒रव॑न्तु नः अ॒मृता॑सस्तु॒रासः॑ ॥ ५ ॥

देवः भगः सविता रायः अंशः इंद्रः वृत्रस्य संऽजितः धनानाम् ।
ऋभुक्षा वाजः उत वा पुरंऽधिः अवन्तु नः अमृतासः तुरासः ॥ ५ ॥

संपत्ति यथाविभाग वाटून देणारा भाग्यदाता देव जगत्प्रेरक सविता, वृत्राचे सर्व वैभव जिंकून आणणारा भगवान् इंद्र, ऋभुक्षा, वाज आणि सद्‍बुद्धीची मूर्ति पुरंधि, हे सर्व अमर देव भक्तसहायार्थ त्वरेने धांवून येतात, तर ते आम्हावर अनुग्रह करोत. ॥ ५ ॥


म॒रुत्व॑तो॒ अप्र॑तीतस्य जि॒ष्णोरजू॑र्यतः॒ प्र ब्र॑वामा कृ॒तानि॑ ।
न ते॒ पूर्वे॑ मघव॒न्नाप॑रासो॒ न वी॒र्यं॑१ नूत॑नः॒ कश्च॒नाप॑ ॥ ६ ॥

मरुत्वतः अप्रतिऽइतस्य जिष्णोः अजूर्यतः प्र ब्रवाम कृतानि ।
न ते पूर्वे मघऽवन् न अपरासः न वीर्यं नूतनः कः चन आप ॥ ६ ॥

मरुत् देव ज्याच्या भोवती उभे आहेत, ज्या जयशाली वीराला प्रतिरोध करणे कोणालाच शक्य नाही, आणि ज्याला वार्धक्याचे वारेही कधी लागत नाही, त्या इंद्राचे पराक्रम वर्णन करणे हे आमचे कर्तव्यच आहे. हे भगवंता, अगदी प्रचीनकाळचा, त्यापेक्षा अर्वाचिनकाळचा किंवा अगदी अलिकडचा कोणीहि घ्या, त्याला पराक्रमची बरोबरी करता आली असे झालेच नाही. ॥ ६ ॥


उप॑ स्तुहि प्रथ॒मं र॑त्न॒धेयं॒ बृह॒स्पतिं॑ सनि॒तारं॒ धना॑नाम् ।
यः शंस॑ते स्तुव॒ते शम्भ॑विष्ठः पुरू॒वसु॑रा॒गम॒ज्जोहु॑वानम् ॥ ७ ॥

उप स्तुहि प्रथमं रत्नऽधेयं बृहस्पतिं सनितारं धनानाम् ।
यः शंसते स्तुवते शंऽभविष्ठः पुरूऽवसुः आऽगमज् जोहुवानम् ॥ ७ ॥

भक्तला अनुपम रत्न देण्यात अग्रगण्य, संपत्ती स्वाधीन करून घेऊन ती उदार हाताने अर्पण करणारा, भाविकांच्या स्तुतींचा नाथ बृहस्पति, त्याचे यशोगायन कर. संकीर्तन आणि स्तुति करणार्‍या उपासकाचे तो अपरिमित कल्याण करतो. त्यांच्या संपत्तीचा निधि अमर्याद आहे. असे असून त्याचा धांवा करणार्‍या भक्ताजवळ पहा तो येऊन ठेपलाच. ॥ ७ ॥


तवो॒तिभिः॒ सच॑माना॒ अरि॑ष्टा॒ बृह॑स्पते म॒घवा॑नः सु॒वीराः॑ ।
ये अ॑श्व॒दा उ॒त वा॒ सन्ति॑ गो॒दा ये व॑स्त्र॒दाः सु॒भगा॒स्तेषु॒ रायः॑ ॥ ८ ॥

तव ऊतिऽभिः सचमानाः अरिष्टाः बृहस्पते मघऽवानः सुऽवीराः ।
ये अश्वऽदा उत वा संति गोऽदाः ये वस्त्रऽदाः सुऽभगाः तेषु रायः ॥ ८ ॥

सर्व स्तवनांच्या प्रभो देवा, तुझे कृपाकटाक्ष आमच्यावर एकसारखे राहून आणि आमच्या मार्गातील विघ्ने नाहीशी होऊन आम्ही उदार व उत्तम प्रतीचे शूर होऊं असे कर. जे आर्तजनास, सुबुद्धिरूप अश्वाची अथवा ज्ञानरूप धेनूची देणगी देतात, त्याचप्रमाणे जे गरिबांस वस्त्र देतात तेच खरोखर भाग्यशाली होत. ऐश्वर्य अशांच्याच जवळ टिकते. ॥ ८ ॥


वि॒स॒र्माणं॑ कृणुहि वि॒त्तमे॑षां॒ ये भु॒ञ्जते॒ अपृ॑णन्तो न उ॒क्थैः ।
अप॑व्रतान्प्रस॒वे वा॑वृधा॒नान्ब्र॑ह्म॒द्विषः॒ सूर्या॑द् यावयस्व ॥ ९ ॥

विऽसर्माणं कृणुहि वित्तं एषां ये भुञ्जते अपृणंतः न उक्थैः ।
अपऽव्रतान् प्रऽसवे वावृधानान् ब्रह्मऽद्विषः सूर्यात् यावयस्व ॥ ९ ॥

जे आमच्या प्रार्थनेच्या बळावर चैन मारतात परंतु एक कवडीचाहि धर्म करून देवास संतुष्ट करीत नाहीत त्यांचे धन तू क्षणभंगुर करून टाक. भरपूर पोरेबाळे झाल्यामुळे माजलेले, धर्माच्या व्रतापासून भ्रष्ट झालेले, ज्ञानाचा द्वेष करणारे असे जे दुष्ट असतील त्यांना सूर्यप्रकाशातून अंधारांत हांकलून दे. ॥ ९ ॥


य ओह॑ते र॒क्षसो॑ दे॒ववी॑तावच॒क्रेभि॒स्तं म॑रुतो॒ नि या॑त ।
यो वः॒ शमीं॑ शशमा॒नस्य॒ निन्दा॑त्तु॒च्छ्यान् कामा॑न्करते सिष्विदा॒नः ॥ १० ॥

यः ओहते रक्षसः देवऽवीतौ अचक्रेभिः तं मरुतः नि यात ।
यः वः शमीं शशमानस्य निंदात् तुच्छ्यान् कामान् करते सिस्विदानः ॥ १० ॥

मरुतांनो, देवाप्रीत्यर्थ यज्ञ चालला असतांना जो राक्षरांविषयीच गप्पा झोकीत असतो अशाची बिनचाकी गाड्यावर धिंड काढा. तुमच्या प्रीत्यर्थ प्रयत्नांची शर्थ करणार्‍या भाविकाच्या करामतीची जो निंदा करील तो स्वतः कितीही खपला तरी त्याचे मनोरथ शेवटी तुच्छच ठरेल. ॥ १० ॥


तं उ॑ ष्टुहि॒ यः स्वि॒षुः सु॒धन्वा॒ यः विश्व॑स्य॒ क्षय॑ति भेष॒जस्य॑ ।
यक्ष्वा॑ म॒हे सौ॑मन॒साय॑ रु॒द्रं नमो॑भिर्दे॒वमसु॑रं दुवस्य ॥ ११ ॥

तं ऊंइति स्तुहि यः सुऽइषुः सुऽधन्वा यः विश्वस्य क्षयति भेषजस्य ।
यक्ष्व महे सौमनसाय रुद्रं नमःभिः देवं असुरं दुवस्य ॥ ११ ॥

ज्याचे शरसंधान उत्कृष्ट, जो महाधनुर्धर, जो यच्चावत् ओषधींचा प्रभू त्या रुद्राचे स्तवन कर. मनाच्या थोरवीची साक्ष पटण्यास तू रुद्राचे यजन कर. त्या देवाची, त्या परमात्म्याची नमस्कृतींनी सेवा कर. ॥ ११ ॥


दमू॑नसो अ॒पसो॒ ये सु॒हस्ता॒ वृष्णः॒ पत्नी॑र्न॒द्यो विभ्वत॒ष्टाः ।
सर॑स्वती बृहद्दि॒वोत रा॒का द॑श॒स्यन्ती॑र्वरिवस्यन्तु शु॒भ्राः ॥ १२ ॥

दमूनसः अपसः ये सुऽहस्ताः वृष्णः पत्नीः नद्यः विभ्वऽतष्टाः ।
सरस्वती बृहद्ऽदिवा उत राका दशस्यन्तीः वरिवस्यन्तु शुभ्राः ॥ १२ ॥

जे स्वाधीनचित्त आहेत, जे उदार आणि कुशल आहेत ते, वीरोत्तम इंद्राच्या दासी बनलेल्या, व ज्यांचे मार्ग त्या विश्वव्यापकानेच आंखून दिले त्या नद्या, अत्युच्च आकाशात विराजमान होणारी सरस्वती आणि राका ह्या देदीप्यमान व दातृत्वशालिनी देवता आमचे सहाय करोत. ॥ १२ ॥


प्र सू म॒हे सु॑शर॒णाय॑ मे॒धां गिरं॑ भरे॒ नव्य॑सीं॒ जाय॑मानाम् ।
य आ॑ह॒ना दु॑हि॒तुर्व॒क्षणा॑सु रू॒पा मि॑ना॒नो अकृ॑णोदि॒दं नः॑ ॥ १३ ॥

प्र सु महे सुऽशरणाय मेधां गिरं भरे नव्यसीं जायमानां ।
यः आहनाः दुहितुः वक्षणासु रूपा मिनानः अकृणोत् इदं नः ॥ १३ ॥

एकदम स्फुरण पावणारी माझी ध्यानबुद्धि आणि माझी अपूर्व स्तुति ही त्या श्रेष्ठ जगदाधाराच्या ठिकाणी मी अर्पण करतो. त्याने आपल्या कन्यकेच्या हृदयदेशी निरनिराळ्या रंगाची प्रकाशमय रूपे निर्माण करून प्रेमाने हे सर्व विश्व आमच्याकरिता घडविले. ॥ १३ ॥


प्र सु॑ष्टु॒ति स्त॒नय॑न्तं रु॒वन्त॑मि॒ळस्पतिं॑ जरितर्नू॒नम॑श्याः ।
यो अ॑ब्दि॒माँ उ॑दनि॒माँ इय॑र्ति॒ प्र वि॒द्युता॒ रोद॑सी उ॒क्षमा॑णः ॥ १४ ॥

प्र सुऽस्तुतिः स्तनयंतं रुवंत इळः पतिं जरितः नूनं अश्याः ।
यः अब्दिऽमान् उदनिऽमान् इयर्ति प्र विऽद्युता रोदसीइति उक्षमाणः ॥ १४ ॥

मोठमोठ्याने गर्जना व घोष करणार्‍या इळस्वती पर्जन्याकडे स्तोतृजनाची ही सुंदर स्तुति जाऊन पोंहोचो. तो मेघसमूहाने युक्त व जलधारांनी परिवेष्टित आहे. पृथ्वी आणि अंतराळ ह्यांना उदकाने चिंब भिजवून विद्युल्लतेसह तो झपाट्याने येतो. ॥ १४ ॥


ए॒ष स्तोमो॒ मारु॑तं॒ शर्धो॒ अच्छा॑ रु॒द्रस्य॑ सू॒नूँर्यु॑व॒न्यूँरुद॑श्याः ।
कामो॑ रा॒ये ह॑वते मा स्व॒स्त्युप॑ स्तुहि॒ पृष॑दश्वाँ अ॒यासः॑ ॥ १५ ॥

एष स्तोमः मारुतं शर्धः अच्छ रुद्रस्य सूनून्ः युवन्यून्ः उत् अश्याः ।
कामः राये हवते मा स्वस्ति उप स्तुहि पृषत्ऽअश्वान् अयासः ॥ १५ ॥

मरुद्‍गणाला, तारुण्यशोभी रुद्रपुत्रांना हे स्तवन अर्पण असो. माझा मनोरथ मला वैभवाकडे शुभदायक रीतीने बोलावित आहे तेव्हां मेघ हेच ज्यांचे अश्व असे जे अविश्रांत मरुत् त्यांचे मजकरिता तू स्तवन कर. ॥ १५ ॥


प्रैष स्तोमः॑ पृथि॒वीम॒न्तरि॑क्षं॒ वन॒स्पतीँ॒रोष॑धी रा॒ये अ॑श्याः ।
दे॒वोदे॑वः सु॒हवो॑ भूतु॒ मह्यं॒ मा नो॑ मा॒ता पृ॑थि॒वी दु॑र्म॒तौ धा॑त् ॥ १६ ॥

प्र एषः स्तोमः पृथिवीं अंतरिक्षं वनस्पतीन्ः ओषधी राये अश्याः ।
देवोऽदेवः सुऽहवः भूतु मह्यं मा नः माता पृथिवी दुःमतौ धात् ॥ १६ ॥

संपत्ति सर्वत्र असावी म्हणून हे स्तवन पृथ्वी, अंतरिक्ष आणि वनस्पति ह्यांच्या पर्यंत जाऊन भिडो. प्रत्येक विभूति माझी प्रार्थना तात्काळ ऐकून घेवो, आणि ही भूमाता मला दुष्ट विचारांत कधी न ठेवो. ॥ १६ ॥


उ॒रौ दे॑वा अनिबा॒धे स्या॑म ॥ १७ ॥

उरौ देवा अनिऽबाधे स्याम ॥ १७ ॥

देवांनो, अतिविस्तीर्ण आणि अनिर्बंध सुखाच्या स्थानी आम्ही राहू असे घडो. ॥ १७ ॥


सम॒श्विनो॒रव॑सा॒ नूत॑नेन मयो॒भुवा॑ सु॒प्रणी॑ती गमेम ।
आ नो॑ र॒यिं व॑हत॒मोत वी॒राना विश्वा॑न्यमृता॒ सौभ॑गानि ॥ १८ ॥

सं अश्विनोः अवसा नूतनेन मयःभुवा सुऽप्रणीती गमेम ।
आ नः रयिं वहतं आ उत वीरान् आ विश्वानि अमृता सौभगानि ॥ १८ ॥

अश्विदेवांनो, तुमच्या नवीन कल्याणप्रद कृपेचा आणि तसाच तुमच्या उत्कृष्ट नेतृत्वाचा लाभ आम्हास घडो. हे अमर विभूतींनो, वैभव सर्वप्रकारचे वीरपुरुष आणि भाग्यवंतास प्राप्त होणारी इतर सौख्येंहि घेऊन तुम्ही आमच्याकडे आगमन करा. ॥ १८ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ४३ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - अत्रि भौम : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


आ धे॒नवः॒ पय॑सा॒ तूर्ण्य॑र्था॒ अम॑र्धन्ती॒रुप॑ नो यन्तु॒ मध्वा॑ ।
म॒हो रा॒ये बृ॑ह॒तीः स॒प्त विप्रो॑ मयो॒भुवो॑ जरि॒ता जो॑हवीति ॥ १ ॥

आ धेनवः अयसा तूर्णिऽअर्था अमर्धन्तीः उप नः यन्तु मध्वा ।
महः राये बृहतीः सप्त विप्रः मयःऽभुवः जरिता जोहवीति ॥ १ ॥

आपल्या जवळचा इच्छितपदार्थ तात्काळ देऊन कोणाला उपद्रव न देणार्‍या धेनु आपल्या मधुर पयासह आमच्याकडे येवोत. हा ज्ञाता स्तोतृजन श्रेष्ठ संपत्तिसाठी त्या थोर सात जणींना, त्या मंगलप्रद शक्तींना आळवीत आहे. ॥ १ ॥


आ सु॑ष्टु॒ती नम॑सा वर्त॒यध्यै॒ द्यावा॒ वाजा॑य पृथि॒वी अमृ॑ध्रे ।
पि॒ता मा॒ता मधु॑वचाः सु॒हस्ता॒ भरे॑भरे नो य॒शसा॑वविष्टाम् ॥ २ ॥

असुऽस्तुती नमसा वर्तयध्यै द्यावा वाजाय पृथिवीइति अमृध्रेइति ।
पिता माता मधुऽवचाः सुऽहस्ता भरेऽभरे नः यशसाव् अविष्टाम् ॥ २ ॥

कधीहि न थकणार्‍या द्यावापृथ्वी, सुंदर स्तुतींनी, नमस्कृतींनी सत्वसामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी मी आपल्याकडे वळवितो. ते मधुरभाषणी उदारहस्त जगाचे आईबाप प्रत्येक संग्रामात आम्हास यशाने अलंकृत करोत. ॥ २ ॥


अध्व॑र्यवश्चकृ॒वांसो॒ मधू॑नि॒ प्र वा॒यवे॑ भरत॒ चारु॑ शु॒क्रम् ।
होते॑व नः प्रथ॒मः पा॑ह्य॒स्य देव॒ मध्वो॑ ररि॒मा ते॒ मदा॑य ॥ ३ ॥

अध्वर्यवः चकृवांसः मधूनि प्र वायवे भरत चारु शुक्रम् ।
होताऽइव नः प्रथमः पाहि अस्य देव मध्व ररिम ते मदाय ॥ ३ ॥

अध्वर्युंनो, तुम्ही मधुरपेय तयार केले आहे, ते रुचिर स्वच्छ तकतकीत मिष्ट पेय तुम्ही वायुदेवाला अर्पण करा. हे देवा ’होत्या’प्रमाणेच तूहि ह्या मधुर रसाचा प्रथम आस्वाद घे. तुला उल्हास व्हावा म्हणूनच तुजला आम्ही ते समर्पण केले आहे. ॥ ३ ॥


दश॒ क्षिपो॑ युञ्जते बा॒हू अद्रिं॒ सोम॑स्य॒ या श॑मि॒तारा॑ सु॒हस्ता॑ ।
मध्वो॒ रसं॑ सु॒गभ॑स्तिर्गिरि॒ष्ठां चनि॑श्चदद्दुदुहे शु॒क्रमं॒शुः ॥ ४ ॥

दश क्षिपः युञ्जते बाहूइति अद्रिं ओमस्य या शमितारा सुऽहस्ता ।
मध्वः रसं सुऽगभस्तिः गिरिऽस्थां चनिश्चदत् दुदुहे शुक्रं अंशुः ॥ ४ ॥

ऋत्विजांचे बळकट भुजदंड आणि त्यांची दहा बोटे ह्यांच्या योगाने सोमवल्लिरूप ’मेध्या’चा आलंभ होतो, अशा प्रकारच्या त्यांच्या बाहूंनी हे ग्रावे जोडून ठेविले आहेत. बारीक बारीक व नाजूक डहाळ्या असलेली सोमवल्ली मधुर व तकतकीत रस ज्यांचे वर्णन सूक्तांत अतिशय असते असा रस देवांकरिता पिळून देते. ॥ ४ ॥


असा॑वि ते जुजुषा॒णाय॒ सोमः॒ क्रत्वे॒ दक्षा॑य बृह॒ते मदा॑य ।
हरी॒ रथे॑ सु॒धुरा॒ योगे॑ अ॒र्वागिन्द्र॑ प्रि॒या कृ॑णुहि हू॒यमा॑नः ॥ ५ ॥

असावि ते जुजुषाणाय सोमः ऋत्वे दक्षाय बृहते मदाय ।
हरीइति रथे सुऽधुरा योगे अर्वाक् इंद्र प्रिया कृणुहि हूयमानः ॥ ५ ॥

मोठ्या हौसेने तू सोमरस ग्रहण करतोस तेव्हां तू आपल्या चातुर्याची कर्तबगारी प्रकट करावीस, तुला अतिशय उल्लास यावा म्हणून हा रस आम्ही गाळून सिद्ध केला आहे. हे इंद्रा, तुला मनःपूर्वक हांक मारिली आहे, तर आम्हाला ज्यागोष्टी अजून मिळवावयाच्या आहेत त्या मिळवून देण्याकरितां तू आपले पटाईत आवडते घोडे रथाला जोडून इकडे वळ. ॥ ५ ॥


आ नो॑ म॒हीम॒रम॑तिं स॒जोषा॒ ग्नां दे॒वीं नम॑सा रा॒तह॑व्याम् ।
मधो॒र्मदा॑य बृह॒तीमृ॑त॒ज्ञां आग्ने॑ वह प॒थिभि॑र्देव॒यानैः॑ ॥ ६ ॥

आ नः महीं अरमतिं सऽजोषा ग्नां देवीं नमसा रातऽहव्याम् ।
मधोः मदाय बृहतीं ऋतऽज्ञां आ अग्ने वह पथिऽभिः देवऽयानैः ॥ ६ ॥

नमस्कारपूर्वक जिला हवि अर्पण केला आहे अशी ती श्रेष्ठ, थोर, सद्धर्मप्रिय दिव्य शक्ति देवी "अरमति" तिला हि मधुर पेयाने आनंद व्हावा म्हणून हे अग्निदेवा तू प्रेमळ अंतःकरणाने देव्यजनांना योग्य अशा मार्गाने इकडे घेऊन ये. ॥ ६ ॥


अ॒ञ्जन्ति॒ यं प्र॒थय॑न्तो॒ न विप्रा॑ व॒पाव॑न्तं॒ नाग्निना॒ तप॑न्तः ।
पि॒तुर्न पु॒त्र उ॒पसि॒ प्रेष्ठ॒ आ घ॒र्मो अ॒ग्निमृ॒तय॑न्न् असादि ॥ ७ ॥

अंजंति यं प्रथयंतः अ विप्रा वपाऽवंतं न अग्निना तपंतः ।
पितुः न पुत्र उपसि प्रेष्ठः आ घर्मः अग्निं ऋतऽयन्न् असादि ॥ ७ ॥

आंत ’वपा’ असते म्हणून अग्निवर तापवून त्याचा प्रसार करण्याकरताच की काय ज्ञाते विप्र ज्याला सुशोभित करीत असतात असे घर्म म्हणून जे एक मोठे पात्र असते ते सद्धर्मरूप यज्ञाला पोषकच होते म्हणून, अतिशय लाडका मुलगा जसा पित्याच्या मांडीवर लोळतो त्याप्रमाणे, ते ’घर्म’ पात्रहि अग्निवर ठेविलेले असते. ॥ ७ ॥


अच्छा॑ म॒ही बृ॑ह॒ती शंत॑मा॒ गीर्दू॒तो न ग॑न्त्व॒श्विना॑ हु॒वध्यै॑ ।
म॒यो॒भुवा॑ स॒रथा या॑तम॒र्वाग्ग॒न्तं नि॒धिं धुर॑मा॒णिर्न नाभि॑म् ॥ ८ ॥

अच्छ मही बृहती शंऽतमा गीः दूतः न गन्तु अश्विना हुवध्यै ।
मयःऽभुवा सऽरथा यातं अर्वाक् गंतं निऽधिं धुरं आणिः न नाभिम् ॥ ८ ॥

अश्विदेवांस पाचारण करण्याकरितां ही अत्यंत उत्कृष्ट स्तुति दूताप्रमाणे मोठ्या लडिवळपणाने इकडे येवो. मंगलमय देवांनो, रथात बसून तुम्ही हविर्भोजनाकरिता इकडे या. चाकांचा तुंबा आणि रथाचे जूं जेथल्या तेथे बसण्यास ज्याप्रमाणे मेख अगदी अवश्य आहे, त्याप्रमाणे यज्ञांत तुमचे आगमन अगदी अवश्य आहे. ॥ ८॥


प्र तव्य॑सो॒ नम॑उक्तिं तु॒रस्या॒हं पू॒ष्ण उ॒त वा॒योर॑दिक्षि ।
या राध॑सा चोदि॒तारा॑ मती॒नां या वाज॑स्य द्रविणो॒दा उ॒त त्मन् ॥ ९ ॥

प्र तव्यसः नमःऽउक्तिं तुरस्य अहं पूष्णः उत वायोः अदिक्षि ।
या राधसा चोदितारा मतीनां या वाजस्य द्रविणःऽदौ उत त्मन् ॥ ९ ॥

अत्यंत कार्यक्षम आणि त्वरित विजय संपादन करणारा पूषा आणि वायु ह्यांची नमःपूर्वक स्तुति केलीच आहे. हे दयाळु देव बुद्धिला प्रेरणा करून सत्वसामर्थ्याचे धन आपण होऊन देत असतात. ॥ ९ ॥


आ नाम॑भिर्म॒रुतो॑ वक्षि॒ विश्वा॒ना रू॒पेभि॑र्जातवेदो हुवा॒नः ।
य॒ज्ञं गिरो॑ जरि॒तुः सु॑ष्टु॒तिं च॒ विश्वे॑ गन्त मरुतो॒ विश्व॑ ऊ॒ती ॥ १० ॥

आ नामऽभिः मरुतः वक्षि विश्वान् आ रूपेभिः जातवेदः हुवानः ।
यज्ञं गिरः जरितुः सुऽस्तुतिं च विश्वे गंत मरुतः विश्व ऊती ॥ १० ॥

हे सर्वज्ञ अग्नि तुला हांक मारली असतां सर्व मरुत्गणांना त्यांचे नांव घेऊन त्या त्या रूपाने तू येथे आणतोस. हे मरुतांनो, तुम्ही सर्व आपल्या रक्षणायुधांनी भक्ताच्या यज्ञाकरिता, त्याची उत्कृष्ट स्तवनवाणी श्रवण करण्याकरितां आगमन करा. ॥ १० ॥


आ नो॑ दि॒वः बृ॑ह॒तः पर्व॑ता॒दा सर॑स्वती यज॒ता ग॑न्तु य॒ज्ञम् ।
हवं॑ दे॒वी जु॑जुषा॒णा घृ॒ताची॑ श॒ग्मां नो॒ वाचं॑ उश॒ती शृ॑णोतु ॥ ११ ॥

आ नः दिवः बृहतः पर्वतात् आ सरस्वती यजता गन्तु यज्ञम् ।
हवं देवी जुजुषाणा घृताची शग्मां नोः वाचं उशती शृणोतु ॥ ११ ॥

द्युलोकांतून किंवा पर्वत श्रेष्ठाच्या शिखरांतून परमपूज्य सरस्वती आमच्या समारंभास आगमन करो. घृताप्रमाणे मृदुल कांतियुक्त अशी ती देवी आमच्या हवीचा स्विकार करून उत्कंठितमनाने आमची भक्तिरसपूर्ण वाणी श्रवण करो. ॥ ११ ॥


आ वे॒धसं॒ नील॒पृष्ठं॑ बृ॒हन्तं॒ बृह॒स्पतिं॒ सद॑ने सादयध्वम् ।
सा॒दद्यो॑निं॒ दम॒ आ दी॑दि॒वांसं॒ हिर॑ण्यवर्णमरु॒षं स॑पेम ॥ १२ ॥

आ वेधसं नीलऽपृष्ठं बृहंतं बृहस्पतिं सदने सादयध्वम् ।
सादत्ऽयोनिं दमे आ दीदिऽवांसं हिरण्यवर्णं अरुषं सपेम ॥ १२ ॥

ज्याचा पृष्ठभाग नीलवर्ण आच्छादनाने झांकून गेला आहे असा जगन्नियामक थोर बृहस्पति, त्याला यज्ञमंदिरांत आसनावर अधिष्ठित करा. ह्याप्रमाणे तो आपल्या आद्यस्थानी विराजमान झाला म्हणजे आम्ही त्य तप्तकांचनवर्ण आरक्तवर्ण स्तुतिप्रिय देवाचे स्तवन करू. ॥ १२ ॥


आ ध॑र्ण॒सिर्बृ॒हद्दि॑वो॒ ररा॑णो॒ विश्वे॑भिर्ग॒न्त्वोम॑भिर्हुवा॒नः ।
ग्ना वसा॑न॒ ओष॑धी॒रमृ॑ध्रस्त्रि॒धातु॑शृङ्‌गोज वृष॒भो व॑यो॒धाः ॥ १३ ॥

आ धर्णसिः बृहत्ऽदिवः रराणः विश्वेभिः गन्तु ओमऽभिः हुवानः ।
ग्नाः वसानह् ओषधीः अमृध्रः त्रिधातुऽश्रृङ्‌गःा वृषभः वयोऽधाः ॥ १३ ॥

जगदाधार, महदाकाशांत क्रीडा करणारा, आणि आपल्या सर्व भक्तरक्षक आयुधांसह हांकेसरशी येणारा अग्निदेव येथे आगमन करो. तो वनस्पतींच्या अंतरंगी वास करतो, त्याला अपकार करण्याची शक्ति कोणालाच नाही. असा ज्वालारूप तीन प्रकारची शृंगे असलेला तो वीर पुंगच भक्तांना यौवनाच्या जोमाचा लाभ करून देणारा आहे. ॥ १३ ॥


मा॒तुष्प॒दे प॑र॒मे शु॒क्र आ॒योर्वि॑प॒न्यवो॑ रास्पि॒रासो॑ अग्मन् ।
सु॒शेव्यं॒ नम॑सा रा॒तह॑व्याः॒ शिशुं॑ मृजन्त्या॒यवो॒ न वा॒से ॥ १४ ॥

मातुः पदे परमे शुक्र आयोः विपन्यवः रास्पिरासः अग्मन् ।
सुऽशेव्यं नमसा रातऽहव्याः शिशुं मृजन्ति आयवः न वासे ॥ १४ ॥

भूमातेच्या अत्युच्च शुभ्र दीप्तीमान् स्थानी आरोहण करणार्‍या त्या विश्वजीवनाची गंभीर आवाजाने वक्तृत्वपूर्ण स्तुति करणारे कवि येथे प्राप्त झाले आणि लहान बालकास वस्त्र लेवविण्याकरितां त्याला स्वच्छ करावे त्याप्रमाणे ह्या शुभदायक अग्निला त्या कविंनी हवि अर्पण करून प्रणिपातसेवेने अलंकृत केले आहे. ॥ १४ ॥


बृ॒हद्वयो॑ बृह॒ते तुभ्य॑मग्ने धिया॒जुरो॑ मिथु॒नासः॑ सचन्त ।
दे॒वोदे॑वः सु॒हवो॑ भूतु॒ मह्यं॒ मा नो॑ मा॒ता पृ॑थि॒वी दु॑र्म॒तौ धा॑त् ॥ १५ ॥

बृहत् वयः बृहते तुभ्यं अग्ने धियाऽजुरः मिथुनासः सचंत ।
देवोऽदेवः सुहवः भूतु मह्यं मा नः माता पृथिवी दुर्मतौ धात् ॥ १५ ॥

ऐन तारुण्याचा भर हे अग्नि, तुज सारख्या परम थोर देवाच्या अंगीच, तुझ्या ध्यानसेवेत आयुष्य खर्चिलेले हे आमच्या यजमानचे जोडपे, अजूनहि तुझ्या प्रार्थनेत तत्पर असते. तर प्रत्येक दिव्य विभूतीचे आगमन मला सुलभ होवो आणि भू-माता मला दुष्टविचारांत कधीहि न ठेवो. ॥ १५ ॥


उ॒रौ दे॑वा अनिबा॒धे स्या॑म ॥ १६ ॥

उरौ देवा अनिबाधे स्याम ॥ १६ ॥

देवांनो, निरतिशय आणि अनिर्बंध सुखांत आम्ही राहू असे करा. ॥ १६ ॥


सम॒श्विनो॒रव॑सा॒ नूत॑नेन मयो॒भुवा॑ सु॒प्रणी॑ती गमेम ।
आ नो॑ र॒यिं व॑हतं॒ ओत वी॒राना विश्वा॑न्यमृता॒ सौभ॑गानि ॥ १७ ॥

सं अश्विनः अवसा नूतनेन मयोभुवा सुप्रणीती गमेम ।
आ नः रयिं वहतं ओत वीरान् आ विश्वानि अमृता सौभगानि ॥ १७ ॥

अश्विदेवांनो, तुमच्या नूतन कल्याणप्रद आणि तसाच तुमच्या उत्कृष्ट नेतृत्वाचा लाभ आम्हांस घडवा. हे अमर विभूतींनो, वैभव, सर्व प्रकारचे वीरपुरुष, आणि भाग्यवानास प्राप्त होणारी इतर सर्व सुखें हींही घेऊन तुम्ही आमच्याकडे आगमन करा. ॥ १७ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ४४ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - अवत्सार कश्यप : देवता - विश्वेदेव : छंद - जगती, त्रिष्टुभ्


तं प्र॒त्नथा॑ पू॒र्वथा॑ वि॒श्वथे॒मथा॑ ज्ये॒ष्ठता॑तिं बर्हि॒षदं॑ स्व॒र्विद॑म् ।
प्र॒ती॒ची॒नं वृ॒जनं॑ दोहसे गि॒राशुं जय॑न्त॒मनु॒ यासु॒ वर्ध॑से ॥ १ ॥

तं प्रत्नऽथा पूर्वऽथा विश्वऽथा इमऽथा ज्येष्ठऽतातिं बर्हिऽसदं स्वःऽविदम् ।
प्रतीचीनं वृजनं ओहसे गिरा आशुं जयंतं अनु यासु वर्धसे ॥ १ ॥

फार पुरातन काळच्या, जुन्याकाळच्या तुझ्या पद्धतीप्रमाणे, तुझ्या नेहमींच्या, तुझ्या हल्लींच्या प्रघाताप्रमाणे सुद्धां, प्रार्थनेने, सर्वांमध्ये श्रेष्ठत्व, व कुशासनावर बसण्याचा मान तू देतोस. स्वर्गसुख मिळवून देणारी यथायोग्य विजयी अशी शक्ति तुझ्यापासून दोहून घेतां येते. कारण प्रार्थनांमध्येच तुझ्या आनंदाची वृद्धि होत असते. ॥ १ ॥


श्रि॒ये सु॒दृशी॒रुप॑रस्य॒ याः स्वर्वि॒रोच॑मानः क॒कुभा॑मचो॒दते॑ ।
सु॒गो॒पा अ॑सि॒ न दभा॑य सुक्रतो प॒रो मा॒याभि॑र्ऋ॒सत आ॑स॒ नाम॑ ते ॥ २ ॥

श्रिये सुऽदृशीः उपरस्य याः स्वः विऽरोचमानः ककुभां अचोदते ।
सुऽगोपा असि न दभाय सुक्रतोइतिसुऽक्रतो परः मायाभिः ऋते आस नाम ते ॥ २ ॥

मेघाची जी दीप्ति तिच्या तेजस्वितेचे कारण तू आहेस. सूर्याला सुद्धां प्रकाश देणारा तू देव, दिशा पर्याकुल न करणार्‍या वायुचाहि संरक्षणकर्ता तू आहेस. हे अगाध-कर्तृत्वशाली देवा, तुला फसविण्याची कोणाचीही शामत नाही. सर्व युक्ति प्रयुक्ति यांच्या पलीकडचा तू आहेस. सनातन सत्यांतच तुझे नांव साठविलेले आहे. ॥ २ ॥


अत्यं॑ ह॒विः स॑चते॒ सच्च॒ धातु॒ चारि॑ष्टगातुः॒ स होता॑ सहो॒भरिः॑ ।
प्र॒सर्स्रा॑णो॒ अनु॑ ब॒र्हिर्वृषा॒ शिशु॒र्मध्ये॒ युवा॒जरो॑ वि॒स्रुहा॑ हि॒तः ॥ ३ ॥

अत्यं अविः सचते सच् च धातु च अरिष्टऽगातुः स होता सहःऽभरिः ।
प्रऽसर्स्राणः अनु बर्हिः वृषा शिशुः मध्ये युवा अजरः विऽस्रुहा हितः ॥ ३ ॥

हा अग्नि सर्व प्रकारचे अस्थिर हवि ग्रहण करतो, सत्तामात्र आणि स्थिर असेंहि हवि ग्रहण करतो. हा जो यज्ञसंपादक आहे, त्याचा मार्ग अप्रतिहतच असतो. झुंझारबलाचा हा पोषक आहे. हा पसरूं लागला म्हणजे प्रथम बालरूप पण नेहमी तरुण, कधीहि वृद्ध न होणारा, असा वनस्पतीच्या पोटी राहिलेला असतो. ॥ ३ ॥


प्र व॑ ए॒ते सु॒युजो॒ याम॑न्नि॒ष्टये॒ नीची॑र॒मुष्मै॑ य॒म्य ऋता॒वृधः॑ ।
सु॒यन्तु॑भिः सर्वशा॒सैर॒भीशु॑भिः॒ क्रिवि॒र्नामा॑नि प्रव॒णे मु॑षायति ॥ ४ ॥

प्र वः एते सुऽयुजः यामन् इष्टये नीचीः अमुष्मै यम्यः ऋतऽवृधः ।
सुयन्तुऽभिः सर्वऽशासैः अभीशुऽभिः क्रिविः नामानि प्रवणे मुषायति ॥ ४ ॥

तुमच्याकरितां हे सूर्याचे सुयन्त्र, व्यवस्थित जोडलेले सद्धर्मपोषक अश्व ह्या यजमानाच्या इष्टीला जाण्याकरितां खाली पृथ्वीकडे निघाले आहेत. व त्याच्या सुयंत्रित आणि सर्वांवर आपला अधिकार चालविणार्‍या रश्मींच्या योगाने तळ्यांतील पाण्याचे नांवहि उरूं दिले नाही. ॥ ४ ॥


सं॒जर्भु॑राण॒स्तरु॑भिः सुते॒गृभं॑ वया॒किनं॑ चि॒त्तग॑र्भासु सु॒स्वरुः॑ ।
धा॒र॒वा॒केष्वृ॑जुगाथ शोभसे॒ वर्ध॑स्व॒ पत्नी॑र॒भि जी॒वः अ॑ध्व॒रे ॥ ५ ॥

संऽजर्भुराणः तरुऽभिः सुतेऽगृभं वयाकिनं चित्तऽगर्भासु सुऽस्वरुः ।
धारऽवाकेषु ऋजुऽगाथ शोभसे वर्धस्व पत्नीः अभि जीवः अध्वरे ॥ ५ ॥

इतर काष्ठांच्या बरोबरच सोमवल्लीच्या रसपूर्ण झुडुपालाहि मोठ्या स्फुरणाने घेरून टाकतो. परंतु ज्यांच्यांत चित्त रममाण होते अशा प्रार्थनांत ह्या अग्निला फारच आळविले आहे. ज्याच्या गुणांची प्रशंसा अगदी खरी आहे अशा अग्निदेवा; तुझे गुणनुवाद गाणार्‍या भक्तांत तूंच शोभतोस. तू आपल्या ज्वालारूप पत्नींनां वृद्धिंगत कर, कारण, यज्ञभागांतील आत्मा तूच आहेस. ॥ ५ ॥


या॒दृगे॒व ददृ॑शे ता॒दृगु॑च्यते॒ सं छा॒यया॑ दधिरे सि॒ध्रया॒प्स्वा ।
म॒हीम॒स्मभ्य॑मुरु॒षामु॒रु ज्रयो॑ बृ॒हत्सु॒वीर॒मन॑पच्युतं॒ सहः॑ ॥ ६ ॥

यादृक् एव ददृशे तादृक् उच्यते सं छायया दधिरे सिध्रया अप्सु आ ।
महीं अस्मभ्यं उरुऽसां उरु ज्रयः बृहत् सुऽवीरं अनपऽच्युतं सहः ॥ ६ ॥

तो आम्हास जसा दिसला त्याचप्रमाणे आम्ही त्याचे वर्णन करीत आहोत. त्याच्या नुसत्या अमोघ कांतीच्या योगाने देवांनी अंतरालरूप उदकांत आम्हांकरिता अमर्याद प्रदेश देणारी पृथ्वी स्थापन केली आहे, आणि अपार आवेश, शूरपुरुष परिप्लुत व कधीहि पराभव न पावणारे असे महांत विक्रांत सामर्थ्यहि त्यांनी आम्हांस दिले आहे. ॥ ६ ॥


वेत्यग्रु॒र्जनि॑वा॒न्वा अति॒ स्पृधः॑ समर्य॒ता मन॑सा॒ सूर्यः॑ क॒विः ।
घ्रं॒सं रक्ष॑न्तं॒ परि॑ वि॒श्वतो॒ गय॑म॒स्माकं॒ शर्म॑ वनव॒त्स्वाव॑सुः ॥ ७ ॥

वेति अग्रुः जनिऽवान् व अति स्पृधः सऽमर्यता मनसा सूर्यः कविः ।
घ्रंसं रक्षंतं परि विश्वतः गयं अस्माकं हर्म वनवत् स्वऽवसुः ॥ ७ ॥

उषारूप स्त्री बरोबर असूनहि जो अविवाहितच आहे असा ज्ञानी सूर्य आपल्या संग्रामोत्सुक आवेशाने शत्रुसैन्यांत धुमश्चक्री माजवीत आहे. सर्व उत्कृष्ट वस्तू ज्याच्या स्वाधीन आहेत असा हा देव तापनिवारक आणि सर्वतोपरी सुरक्षित असे घर असा सुखाश्रय आम्हांस अर्पण करो. ॥ ७ ॥


ज्यायां॑सम॒स्य य॒तुन॑स्य के॒तुन॑ ऋषिस्व॒रं च॑रति॒ यासु॒ नाम॑ ते ।
या॒दृश्मि॒न्धायि॒ तम॑प॒स्यया॑ विद॒द्य उ॑ स्व॒यं वह॑ते॒ सः अरं॑ करत् ॥ ८ ॥

ज्यायांसं अस्य यतुनस्य केतुना ऋषिऽस्वरं चरति यासु नाम ते ।
यादृश्मिन् धायि तं अपस्यया विदत् यः ऊंइति स्वयं वहते सः अरं करत् ॥ ८ ॥

उपासका, ज्या स्थितीत तुझे नांव आहे तेथेहि ते कार्यव्यापृत सूर्याच्या देदीप्यमान किरणांच्या योगाने त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वरापर्यंत जाते. ऋषि त्याचेच गुणगायन करतात, तर ज्या गोष्टींत एखाद्याने आपला हेतू ठेविला असतो त्याला त्याच्या कौशल्याने त्या प्राप्त होतात. जो स्वतः खटपट करील, तोच ती गोष्ट कडेला नेईल. ॥ ८ ॥


स॒मु॒द्रमा॑सा॒मव॑ तस्थे अग्रि॒मा न रि॑ष्यति॒ सव॑नं॒ यस्मि॒न्नाय॑ता ।
अत्रा॒ न हार्दि॑ क्रव॒णस्य॑ रेजते॒ यत्रा॑ म॒तिर्वि॒द्यते॑ पूत॒बन्ध॑नी ॥ ९ ॥

समुद्रं आसां अव तस्थे अग्रिमा न रिष्यति सवनं अस्मिन् आऽयता ।
अत्र न हार्दि क्रवणस्य रेजते यत्र मतिः विद्यते पूतऽबंधनी ॥ ९ ॥

ह्या सर्व स्तुतींत श्रेष्ठ अशा ह्या आमच्या स्तुतिने समुद्रासही व्याप्त करून टाकले. ज्या यज्ञगृहामध्ये विस्तृत स्तोत्रें गाण्यांत येतात तेथील यज्ञास कोणताही अडथळा उत्पन्न होत नाही. पवित्र विषयांशी संबद्ध अशी स्तुति जेथे गाण्यात येत असते तेथे स्तुति-कर्त्याच्या अंतःकरणांतील मनोरथांना कधीही धोका येत नाही. ॥ ९ ॥


स हि क्ष॒त्रस्य॑ मन॒सस्य॒ चित्ति॑भिरेवाव॒दस्य॑ यज॒तस्य॒ सध्रेः॑ ।
अ॒व॒त्सा॒रस्य॑ स्पृणवाम॒ रण्व॑भिः॒ शवि॑ष्ठं॒ वाजं॑ वि॒दुषा॑ चि॒दर्ध्य॑म् ॥ १० ॥

सः हि क्षत्रस्य मनसस्य चित्तिऽभिः एवऽवदस्य यजतस्य सध्रेः ।
अवऽत्सारस्य स्पृणवाम रण्वऽभिः शविष्ठं वाजं विदुषा चित् अर्ध्यम् ॥ १० ॥

तो एक असो, परंतु योद्धा मनस, पूज्य एवावद, कार्यक्षम अवत्सार ह्यांच्या चित्ताकर्षक सुरम्य प्रार्थनांनी ज्ञानी पुरुषांनाही लोभनीय असे अत्यंत उफाड्याचे सत्व सामर्थ्य आम्ही साध्य करूं. ॥ १० ॥


श्ये॒न आ॑सा॒मदि॑तिः क॒क्ष्यो॒३ मदो॑ वि॒श्ववा॑रस्य यज॒तस्य॑ मा॒यिनः॑ ।
सम॒न्यम॑न्यमर्थय॒न्त्येत॑वे वि॒दुर्वि॒षाणं॑ परि॒पानं॒ अन्ति॒ ते ॥ ११ ॥

श्येनः आसां अदितिः कक्ष्यः मदः विश्वऽवारस्य यजतस्य मायिनः ।
सं अन्यंऽअन्यं अर्थयंति एतवे विदुः विऽसानं परिऽपानं अंति ते ॥ ११ ॥

ह्या सोमवल्लीचा अनिर्बाध आश्रय तो दिव्य श्येन होय. पूज्य आणि हिकमती विश्ववाराच्या सोमरसाचा तृप्ति-प्रमोद अगदी पोट भरून होतो. तेव्हं सोमपानोत्सुक जन एकमेकांस चालविण्याविषयी आग्रह करीत असतात. कारण त्यांना हे माहित असते की भरपूर सोमप्राशन करण्याची वेळ अगदी येऊन ठेपली. ॥ ११ ॥


स॒दा॒पृ॒णः य॑ज॒तो वि द्विषो॑ वधीद्बाहुवृ॒क्तः श्रु॑त॒वित्तर्यो॑ वः॒ सचा॑ ।
उ॒भा स वरा॒ प्रत्ये॑ति॒ भाति॑ च॒ यदीं॑ ग॒णं भज॑ते सुप्र॒याव॑भिः ॥ १२ ॥

सदाऽपृणः यजतः वि द्विषः वधीत् बाहुऽवृक्तः श्रुतऽवित् तर्यः वः सचा ।
उभा स वरा प्रति एति भाति च यत् ईं गणं भजते सुप्रयावऽभिः ॥ १२ ॥

दिव्य विभूतींनो, याचकांना सदैव तृप्त करणारा बहुबक्त आणि मोठा बहुश्रुत तर्य ह्यांनी तुमच्या सहायाने शत्रूंचा नाश केला. ह्याप्रमाणे जो दिव्य विभूतींना भक्तिपूर्ण स्तोत्रांनी भजतो त्याला दोन्ही उत्कृष्ट लोक प्राप्त होऊन तो तेजस्वी होतो. ॥ १२ ॥


सु॒त॒म्भ॒रो यज॑मानस्य॒ सत्प॑ति॒र्विश्वा॑सा॒मूधः॒ स धि॒यामु॒दञ्च॑नः ।
भर॑द्धे॒नू रस॑वच्छिश्रिये॒ पयो॑ऽनुब्रुवा॒णो अध्ये॑ति॒ न स्व॒पन् ॥ १३ ॥

सुतंऽभरः यजमानस्य सत्ऽपतिः विश्वासां ऊधः सः धियां उत्ऽअञ्चनः ।
भरत् धेनूः रसऽवत् शिश्रिये पयः अनुऽब्रुवाणः अधि एति न स्वपन् ॥ १३ ॥

देवभक्ताचा उत्तमोत्तम प्रतिपालक ’सुतंभर’ हाच होता. तोच सर्वप्रकारच्या बुद्धिप्रयुक्त कवनांचा साठा आणि त्यांची अभिवृद्धि करणारा होय. स्वर्गीय धेनूनें सुरस दुग्ध दिले, कारण असे दुग्ध तिच्यांतच असते. पण हे सर्व जो सतत भगवत् कीर्तन करतो, त्यालाच कळेल. घोरत पडलेल्यास काय कळणार ? ॥ १३ ॥


यो जा॒गार॒ तमृचः॑ कामयन्ते॒ यो जा॒गार॒ तमु॒ सामा॑नि यन्ति ।
यो जा॒गार॒ तम॒यं सोम॑ आह॒ तवा॒हं अ॑स्मि स॒ख्ये न्योकाः ॥ १४ ॥

यः जागार तं ऋचः कामयन्ते यः जागार तं ऊंइति सामानि यंति ।
यः जागार तं अयं सोमः आह तव अहं अस्मि सख्ये निऽओकाः ॥ १४ ॥

जो जागृत राहतो त्याच्यावरच "ऋचा" प्रेम करतात, जो जागृत राहतो त्याच्याकडेच सामसूक्ते येतात, जो जागृत राहतो त्यालाच सोमरस असे म्हणतो कीं तुझ्याच मित्रप्रेमात मी घर करून सुखाने राहतो. ॥ १४ ॥


अ॒ग्निर्जा॑गार॒ तमृचः॑ कामयन्तेऽ॒ग्निर्जा॑गार॒ तमु॒ सामा॑नि यन्ति ।
अ॒ग्निर्जा॑गार॒ तम॒यं सोम॑ आह॒ तवा॒हम॑स्मि स॒ख्ये न्योकाः ॥ १५ ॥

अग्निः जागार तं ऋचः कामयन्ते अग्निः जागार तं ऊंइति सामानि यंति ।
अग्निः जागार तं अयं सोम आह तवाहं अस्मि सख्ये न्योकाः ॥ १५ ॥

अग्नि हा जागरूक असतो म्हणून त्याच्यावरच "ऋचा" प्रेम करतात, अग्नि हा सदैव जागरूक असतो म्हणून सामसूक्तेहि त्याच्याकडेच वळतात. अग्नि हा जागरूक राहतो म्हणूनच सोमरस असे म्हणतो कीं तुझ्या मित्रप्रेमांतच मी गृहसौख्याचा उपभोग घेत राहणार. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ४५ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - सदापृण आत्रेय : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


वि॒दा दि॒वो वि॒ष्यन्नद्रि॑मु॒क्थैरा॑य॒त्या उ॒षसो॑ अ॒र्चिनो॑ गुः ।
अपा॑वृत व्र॒जिनी॒रुत्स्वर्गा॒द्वि दुरो॒ मानु॑षीर्दे॒व आ॑वः ॥ १ ॥

विदाः दिवः विष्यन्न् अद्रिं उक्थैः आऽयत्या उषसः अर्चिनः गुः ।
अप अवृत व्रजिनीः उत् उत् स्वः गात् वि दुरः मानुषीः देव आवरित्यावः ॥ १ ॥

उदयोन्मुख उषेच्या बन्दिजनांच्या आलापांनी जागृत होऊन, आकाशांतील नक्षत्रांवरून काल जाणणारे ऋत्विज ग्रावा चालवून सोमरस काढण्याकरिता आले. इतक्यात सूर्यावरचे आवरण दूर होऊन तो वर आला आणि गाईंच्या गोठ्याची द्वारे आणि मनुष्याच्या गृहांची द्वारे एकदम उघडली. ॥ १ ॥


वि सूर्यो॑ अ॒मतिं॒ न श्रियं॑ सा॒दोर्वाद्गवां॑ मा॒ता जा॑न॒ती गा॑त् ।
धन्व॑र्णसो न॒द्यः॑१ खादो॑अर्णाः॒ स्थूणे॑व॒ सुमि॑ता दृंहत॒ द्यौः ॥ २ ॥

वि सूर्यः अमतिं न श्रियं सात् आ ऊर्वात् गवां माता जानती गात् ।
धन्व्ऽअर्णसः नद्यः खादःऽअर्णा स्थूणाऽइव सुऽमिता दृंहत द्यौः ॥ २ ॥

परंतु सूर्याने आपल्या उज्ज्वलरूपाला योग्य असे आपले जे वैभव ते सोडून दिले होते हे पाहून प्रकाश धेनूंची माता ही आपल्या मन्दिरांतून बाहेर पडली. इकडे मोठ्या जोराने वाहणार्‍या नद्या पूराने भरून जाऊन त्यांचे तट उखळून गेले. आणि पक्क्या रोवलेल्या खांबावर राहिल्याप्रमाणे आकाशमण्डल अगदी स्थिर झाले. ॥ २ ॥


अ॒स्मा उ॒क्थाय॒ पर्व॑तस्य॒ गर्भो॑ म॒हीनां॑ ज॒नुषे॑ पू॒र्व्याय॑ ।
वि पर्व॑तो॒ जिही॑त॒ साध॑त॒ द्यौरा॒विवा॑सन्तो दसयन्त॒ भूम॑ ॥ ३ ॥

अस्मै उक्थाय पर्वतस्य गर्भः महीनां अनुषे पूर्व्याय ।
वि पर्वतः जिहीत साधत द्यौः आऽविवासंतः दसयंत भूम ॥ ३ ॥

पहा हा माझ्या प्रार्थनासूक्ताकरितां मेघाच्य पोटी उदकांचा गर्भ राहिला. उत्तमोत्तम प्रार्थनारूप नद्यांचा पुरातन उगम जो भगवान् त्याच्याकरितां हा मेघ दुभंग झाला आणि आकाशाने आपले काम बजाविले, तेव्हां सेवा करणारे भाविक पावसामुळे बरेच त्रस्त झाले. ॥ ३ ॥


सू॒क्तेभि॑र्वो॒ वचो॑भिर्दे॒वजु॑ष्टै॒रिन्द्रा॒ न्व॑१ग्नी अव॑से हु॒वध्यै॑ ।
उ॒क्थेभि॒र्हि ष्मा॑ क॒वयः॑ सुय॒ज्ञा आ॒विवा॑सन्तो म॒रुतो॒ यज॑न्ति ॥ ४ ॥

सूऽक्तेभिः वः वचःऽभिः देवःऽजुष्टैः इंद्रा नु अग्नीइति अवसे हुवध्यै ।
उक्थेभिः हि स्म कवयः सुऽयज्ञा आऽविवासंतः मरुतः यजन्ति ॥ ४ ॥

इंद्राग्नीहो तुम्हां देवांना आवडणार्‍या कवनांनी आणि प्रार्थनांनी तुमच्या कृपाप्रसादाकरितां तुम्हांस पाचरण करण्यास मी प्रवृत्त झालो आहे. यज्ञयाग संपादन करणारे सेवातत्पर असे तुमचे भक्तजन आपल्या स्तोत्रांनी मरुतांचेहि अर्चन करीत असतात. ॥ ४ ॥


एतो॒ न्व॑१द्य सु॒ध्यो॒३॑भवा॑म॒ प्र दु॒च्छुना॑ मिनवामा॒ वरी॑यः ।
आ॒रे द्वेषां॑सि सनु॒तर्द॑धा॒माया॑म॒ प्राञ्चो॒ यज॑मान॒मच्छ॑ ॥ ५ ॥

एतोइति नु अद्य सुऽध्यः भवाम प्र दुच्छुनाः मिनवाम वरीयः ।
आरे द्वेषांसि सनुतः दधाम अयाम प्राञ्चः यजमानं अच्छ ॥ ५ ॥

आज आमच्याकडे आगमन करा. तुमच्या कृपेने आम्ही उत्तम ध्यानयोगी झालो आहोत. दुर्वासनांचा आम्ही पार बीमोड करून टाकूं, आणि द्वेषाला दिगंतरास पाठवूं. आणि तुमचे यजन करणार्‍या भक्ताला त्वरेने जाऊन भेटूं. ॥ ५ ॥


एता॒ धियं॑ कृ॒णवा॑मा सखा॒योऽ॑प॒ या मा॒ताँ ऋ॑णु॒त व्र॒जं गोः ।
यया॒ मनु॑र्विशिशि॒प्रं जि॒गाय॒ यया॑व॒णिग्व॒ङ्कुञरापा॒ पुरी॑षम् ॥ ६ ॥

आ इत धियं ऋणवाम सखायः अप या माता ऋणुत व्रजं गोः ।
यया मनुः विशिऽशिप्रं जिगाय यया वणिक् वङ्कुःस आपा पुरीषम् ॥ ६ ॥

मित्रांनो या, जिच्या ’उषा’ मातेने प्रकाशाचा पुंज पृथ्वीवर सोडून दिला, जिच्या जोरावर मनुराजाने ’विशिशिप्रा’चा मोड केला, आणि जिच्यामुळे व्यापाराकरितां चोहों मुलखी हिंडणार्‍या भक्ताला दिव्य उदकाचा लाभ झाला, ती भगवत् ध्यानोपासना आपण पूर्ण करूं. ॥ ६ ॥


अनू॑नो॒दत्र॒ हस्त॑यतो॒ अद्रि॒रार्च॒न्येन॒ दश॑ मा॒सः नव॑ग्वाः ।
ऋ॒तं य॒ती स॒रमा॒ गा अ॑विन्द॒द्विश्वा॑नि स॒त्याङ्‌गि॑ुराश्चकार ॥ ७ ॥

अनूनोत् अत्र हस्तऽयतः अद्रिः आर्चन् येन दश मासः नवऽग्वाः ।
ऋतं यती सरमा गा अविन्दत् विश्वानि सत्या अङ्‌गिरराः चकार ॥ ७ ॥

ह्या ठिकाणी हातांनी चालविले जाणार्‍या सोमपाषाणाने आपल्या मधुर आवाजाने देवाचे स्तोत्र केले. आणि अशा रीतीने ’नवग्वां’नी दहा महिने पर्यंत देवाचे भजन केले. नंतर सरळ मार्गाने जाणार्‍या सरमेला प्रकाशधेनूंचा शोध लागला; आणि अंगिरा ऋषिंनी सर्व गोष्टी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खर्‍या करून दाखविल्या. ॥ ७ ॥


विश्वे॑ अ॒स्या व्युषि॒ माहि॑नायाः॒ सं यद्गोभि॒रङ्‌गि॑॑रसो॒ नव॑न्त ।
उत्स॑ आसां पर॒मे स॒धस्थ॑ ऋ॒तस्य॑ प॒था स॒रमा॑ विद॒द्गाः ॥ ८ ॥

विश्वे अस्या विऽउषि माहिनायाः सं यत् गोभिः अङ्‌गिारसः नवंत ।
उत्सः आसां परमे सधऽस्थे ऋतस्य पथा सरमा विदत् गाः ॥ ८ ॥

ह्या परमश्रेष्ठ उषेची प्रभा फांकल्यामुळे सर्व अंगिरस ऋषिंनी ’प्रकाशधेनूं’सह भगवंताची स्तुति केली. ह्या धेनूंचे उद्‍गमस्थान अत्युच्च देवलोकी आहे. आणि सनातन सत्यमार्गानेच सरमेने त्या धेनूंचा शोध लावला. ॥ ८ ॥


आ सूर्यो॑ यातु स॒प्ताश्वः॒ क्षेत्रं॒ यद॑स्योर्वि॒या दी॑र्घया॒थे ।
र॒घुः श्ये॒नः प॑तय॒दन्धो॒ अच्छा॒ युवा॑ क॒विर्दी॑दय॒द्गोषु॒ गच्छ॑न् ॥ ९ ॥

आ सूर्यः यातु सप्तऽअश्वः क्षेत्रं यत् अस्य उर्विया दीर्घऽयाथे ।
रघुः श्येनः पतयत् अन्धः अच्छा युवा कविः दीदयत् गोषु गच्छन् ॥ ९ ॥

आतांतरी, किरणरूप सात अश्वांच्या रथांतून जाणारा सूर्य ह्या प्रदेशांत दृगोच्चर होवो. हा आकाशाचा प्रदेश त्याच्याच दीर्घ प्रवासाकरिता प्रशस्तपणे आंखून ठेवला आहे. वायुवेगाने उडणार्‍या त्या ’शैना’ने अमृतावर झडप घातली तेव्हां आता हा तरुण कविवर्य सूर्य आपल्या प्रकाशधेनूंच्या समूहात जाता जाता प्रकाशु लगला. ॥ ९ ॥


आ सूर्यो॑ अरुहच्छु॒क्रमर्णः ऽ॑युक्त॒ यद्ध॒रितो॑ वी॒तपृ॑ष्ठाः ।
उ॒द्ना न नाव॑मनयन्त॒ धीरा॑ आशृण्व॒तीरापो॑ अ॒र्वाग॑तिष्ठन् ॥ १० ॥

आ सूर्यः अरुहत् शुक्रं अर्णः अयुक्त यत् हरितः वीतऽपृष्ठाः ।
उद्ना न नावं अनयंत धीराः आऽशृण्वतीः आपः अर्वाक् अतिष्ठन् ॥ १० ॥

सूर्याने लकलकीत पाठीच्या आपल्या घोड्या रथास जोडल्या त्याबरोबर पांढर्‍या स्वच्छ कांतीने विभूषित झालेल्या आकाशरूप समुद्राच्या पृष्ठभागावर त्याने आरोहण केले. पाण्यांतून नाव चालवावी त्याप्रमाणे ज्ञानी विभूतींनी त्याला आकाशांतून चालविला, दिव्य उदकेंही त्यांचे ऐकून मुकाट्याने खाली आली. ॥ १० ॥


धियं॑ वो अ॒प्सु द॑धिषे स्व॒र्षां ययात॑र॒न्दश॑ मा॒सो नव॑ग्वाः ।
अ॒या धि॒या स्या॑म दे॒वगो॑पा अ॒या धि॒या तु॑तुर्या॒मात्यंहः॑ ॥ ११ ॥

धियं वः अप्ऽसु दधिषे स्वःऽसां यया अतरन् दश मासः नवऽग्वाः ।
अया धिया स्याम देवऽगोपाः अया धिया तुतुर्याम अति अंहः ॥ ११ ॥

स्वर्ग प्राप्त करून देणार्‍या ह्या तुमच्या ध्यानोपासनेची योजना आता मी उदकांच्या ठिकाणी किंवा आकाशाच्या ठिकाणी करून ठेवितो. हिच्याच योगाने ’नवग्वां’नी दहा महिने पर्यंत तग धरला. ह्याच ध्यानोपासनेमुळे देव आमचा प्रतिपाल करोत, आणि ह्याच ध्यानोपासनेने सर्व पातकराशींतून आम्ही सुरक्षित पार पडून जाऊं. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ४६ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - प्रतिक्षत्र आत्रेय : देवता - विश्वेदेव : छंद - जगती, त्रिष्टुभ्


हयो॒ न वि॒द्वाँ अ॑युजि स्व॒यं धु॒रि तां व॑हामि प्र॒तर॑णीमव॒स्युव॑म् ।
नास्या॑ वश्मि वि॒मुचं॒ नावृतं॒ पुन॑र्वि॒द्वान्प॒थः पु॑रए॒त ऋ॒जु ने॑षति ॥ १ ॥

हयः न विद्वान् अयुजि स्वयं धुरि तां वहामि प्रऽतरणीं अवस्युवम् ।
न अस्याः वश्मि विऽमुचं आऽवृतं पुनः विद्वान् पथः पुरःऽएत ऋजु नेषति ॥ १ ॥

सर्वज्ञ देवाने अपल्या स्वतःला अश्वाप्रमाणे यज्ञाच्या धुरेला जोडून घेतले, तेव्हां मीही मनुष्यांचा उद्धार करणारे अणि त्यांचे रक्षण करणारे ते जूं आपल्या मानेवर घेतो. ह्या जोखडापासून सुटण्याची मी इच्छा करीत नाही किंवा माघारे पाऊल घेण्याचीहि माझी इच्छा नाही. सर्व मार्ग जाणणारा देव माझ्यापुढे चालला आहे तो नीट सरळपणानें मला वाट दाखवील. ॥ १ ॥


अग्न॒ इन्द्र॒ वरु॑ण॒ मित्र॒ देवाः॒ शर्धः॒ प्र य॑न्त॒ मारु॑तो॒त वि॑ष्णो ।
उ॒भा नास॑त्या रु॒द्रः अध॒ ग्नाः पू॒षा भगः॒ सर॑स्वती जुषन्त ॥ २ ॥

अग्ने इंद्र वरुण मित्र देवाः शर्धः प्र यंत मारुत उत विष्णोइति ।
उभा नासत्या रुद्रः अध ग्नाः पूषा भगः सरस्वती जुषंत ॥ २ ॥

हे अग्नी, हे इंद्रा, जगन्मित्रा वरुणा, मरुद्‍गणांनो, हे देवांनो इकडे या. हे अश्वीहो, हे रुद्रा, विश्वपोषक पूषा, भाग्यदात्या हे देवींनो, हे सरस्वती आमची सेवा मान्य करून घ्या. ॥ २ ॥


इ॒न्द्रा॒ग्नी मि॒त्रावरु॒णादि॑तिं॒ स्वः पृथि॒वीं द्यां म॒रुतः॒ पर्व॑ताँ अ॒पः ।
हु॒वे विष्णुं॑ पू॒षणं॒ ब्रह्म॑ण॒स्पतिं॒ भगं॒ नु शंसं॑ सवि॒तार॑मू॒तये॑ ॥ ३ ॥

इंद्राग्नीइति मित्रावरुणा अदितिं स्व१रितिस्वः पृथिवीं द्यां मरुतः अर्वतान् अपः ।
हुवे विष्णुं पूषणं ब्रह्मणः पतिं भगं नु शंसं सवितारं ऊतये ॥ ३ ॥

इंद्र, अग्नि, मित्रवरुण, अदिति, सूर्य, द्यावापृथिवी, मरुत्, पर्वत, दिव्य उदके, आणि तसेच विष्णू, पूषा, ब्राह्मणस्पति, भग, शंस आणि जगत्प्रेरक सविता ह्यांना माझ्या रक्षणाकरितां मी हांक मारतो. ॥ ३ ॥


उ॒त नो॒ विष्णु॑रु॒त वातो॑ अ॒स्रिधो॑ द्रविणो॒दा उ॒त सोमो॒ मय॑स्करत् ।
उ॒त ऋ॒भव॑ उ॒त रा॒ये नो॑ अ॒श्विनो॒त त्वष्टो॒त विभ्वानु॑ मंसते ॥ ४ ॥

उत नः विष्णुः उत वातः अस्रिधः द्रविणःऽदा उत सोमः मयः करत् ।
उत ऋभवः उत राये नः अश्विना उत त्वष्टा उत विऽभ्वा अनु मंसते ॥ ४ ॥

तसेच विष्णु, आणि ज्याला अपकार होणे शक्यच नाही असा सामर्थ्यसंपत्ति देणारा वायु आणि सोम हे माझे मंगल करोत. ऋभू, अश्विन, त्वष्टा आणि विभ्वा हे आम्हाला ऐश्वर्य देण्याकरिता आमची आठवण करतील हे खचित्. ॥ ४ ॥


उ॒त त्यन्नो॒ मारु॑तं॒ शर्ध॒ आ ग॑मद्दिविक्ष॒यं य॑ज॒तं ब॒र्हिरा॒सदे॑ ।
बृह॒स्पतिः॒ शर्म॑ पू॒षोत नो॑ यमद्वरू॒थ्यं॑१ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा ॥ ५ ॥

उत त्यत् नः मारुतं शर्ध आ गमत् दिविऽक्षयं यजतं बर्हिः आऽसदे ।
बृहस्पतिः शर्म पूषा उत नः यमत् वरूथ्यं वरुणः मित्रः अर्यमा ॥ ५ ॥

त्याचप्रमाणे तो वन्दनीय मरुताचा द्युलोकवासी समूह येथे कुशासनावर आरोहण करण्याकरितां आगमन करो. आणि बृहस्पति, पूषा, जगन्मित्र वरुण आणि अर्यमा हे आम्हाला आमच्या संरक्षणाचे साधन देवोत. ॥ ५ ॥


उ॒त त्ये नः॒ पर्व॑तासः सुश॒स्तयः॑ सुदी॒तयो॑ न॒द्य॑१स्त्राम॑णे भुवन् ।
भगो॑ विभ॒क्ता शव॒साव॒सा ग॑मदुरु॒व्यचा॒ अदि॑तिः श्रोतु मे॒ हव॑म् ॥ ६ ॥

उत त्ये नः पर्वतासः सुऽशस्तयः सुऽदीतयः नद्यः त्रामणे भुवन् ।
भगः विऽभक्ता शवसा अवसा आ गमत् उरुऽव्यचाः अदितिः श्रोतु मे हवम् ॥ ६ ॥

तसेच ते पर्वत, व ज्याचे पाणी आरशाप्रमाणे चमकते अशा त्या प्रशंसनीय नद्या आमचे परित्राण करोत. यथाविभाग संपत्ति देणारा भाग्यदाता देव आणि ह्या अमर्याद अवकाशाची स्वामिनी अदिति आपल्या अलोट कृपेने माझी हांक ऐको. ॥ ६ ॥


दे॒वानां॒ पत्नी॑रुश॒तीर॑वन्तु नः॒ प्राव॑न्तु नस्तु॒जये॒ वाज॑सातये ।
याः पार्थि॑वासो॒ या अ॒पामपि॑ व्र॒ते ता नो॑ देवीः सुहवाः॒ शर्म॑ यच्छत ॥ ७ ॥

देवानां पत्नीः उशतीः अवंतु नः प्र अवंतु नः तुजये वाजऽसातये ।
याः पार्थिवासः आ अपां अपि व्रते ताः नः देवीः सुऽहवाः शर्म यच्छत ॥ ७ ॥

दिव्य विभूतींच्या उत्कंठित पत्नी आमचा धांवा ऐकोत, आमच्या संततीच्या हितार्थ आणि आम्हांला सात्विकसामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून आमचा सांभाळ करोत. ज्या ज्या शक्ति भूमिवर आहेत, ज्या ज्या उदकप्रदेशांत आहेत त्याहि कनवाळू देवी आम्हाला सुखाचा आश्रय देवोत. ॥ ७ ॥


उ॒त ग्ना व्य॑न्तु दे॒वप॑त्नीरिन्द्रा॒ण्य॑१ग्नाय्य॒श्विनी॒राट् ।
आरोद॑सी वरुणा॒नी शृ॑णोतु॒ व्यन्तु॑दे॒वीर्यऋ॒तुर्जनी॑नाम् ॥ ८ ॥

उत ग्नाः व्यन्तु देवऽपत्नीः इंद्राणि अग्नायि अश्विनी राट् ।
आ रोदसीइति वरुणानी शृणोतु व्यन्तु देवीः यः ऋतुः जनीनाम् ॥ ८ ॥

तसेच दिव्य स्त्रिया, देवांच्या पत्नी म्हणजे इंद्राणी, अग्नायी, देदीप्यमान अश्विनी, रोदसी, वरुणानी ह्या दिव्य शक्ती आमची हांक ऐकोत. देवपत्नींची जी विवक्षित वेल असते तीहि आमचे हवि ग्रहण करो. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ४७ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - प्रतिरथ आत्रेय : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


प्र॒यु॒ञ्ज॒ती दि॒व ए॑ति ब्रुवा॒णा म॒ही मा॒ता दु॑हि॒तुर्बो॒धय॑न्ती ।
आ॒विवा॑सन्ती युव॒तिर्म॑नी॒षा पि॒तृभ्य॒ आ सद॑ने॒ जोहु॑वाना ॥ १ ॥

प्रऽयुञ्जती दिव एति ब्रुवाणा मही माता दुहितुः बोधयंती ।
आऽविवासंती युवतिः मनीषा पितृऽभ्य आ सदने जोहुवाना ॥ १ ॥

आकाशकन्येची जी श्रेष्ठ जननी सर्वांना आपल्या शब्दाने आज्ञा करणारी देवी, ती येत आहे. ती तरुण सुंदरी म्हणजे मनोमय निष्ठा हीच होय. तीच भक्तांना ज्ञानबोध करते. तीच त्यांना उद्योगव्यापृत करणारी आणि त्यांच्याकडून उपासना करविणारी आहे. घरी पाचरण केल्यामुळे सर्वांचे आईबाप जे देव, त्यांच्या करितां ती प्राप्त झाली आहे. ॥ १ ॥


अ॒जि॒रास॒स्तद॑प॒ ईय॑माना आतस्थि॒वांसो॑ अ॒मृत॑स्य॒ नाभि॑म् ।
अ॒न॒न्तास॑ उ॒रवो॑ वि॒श्वतः॑ सीं॒ परि॒ द्यावा॑पृथि॒वी य॑न्ति॒ पन्थाः॑ ॥ २ ॥

अजिरासः तत्ऽअपः ईयमाना आतस्थिऽवांसः अमृतस्य नाभिम् ।
अनंतासः उरवः विश्वतः सीं परि द्यावापृथिवीइति यंति पंथाः ॥ २ ॥

हे रश्मि प्रचंड वेगाचे आपले कार्य बरोबर करणारे असून त्याकरिताच सतत चालले आहेत. अमरत्वाचा गाभा जो सूर्य त्याच्या ठिकाणी त्यांची वस्ती असते. त्यांना शेवट असा नाहीच. ह्याप्रमाणे स्वर्गद्वाराचे विस्तीर्ण मार्गच असे हे सूर्यकिरण पृथ्वीच्या सर्व बाजूंनी चोंहोकडे पसरलेले आहेत. ॥ २ ॥


उ॒क्षा स॑मु॒द्रः अ॑रु॒षः सु॑प॒र्णः पूर्व॑स्य॒ योनिं॑ पि॒तुरा वि॑वेश ।
मध्ये॑ दि॒वो निहि॑तः॒ पृश्नि॒रश्मा॒ वि च॑क्रमे॒ रज॑सस्पा॒त्यन्तौ॑ ॥ ३ ॥

उक्षा समुद्रः अरुषः सुऽपर्णः पूर्वस्य योनिं पितुः आ विवेश ।
मध्ये दिवः निऽहितः पृश्निः अश्मा वि चक्रमे रजसः पाति अंतौ ॥ ३ ॥

प्रबळ वीरपुंगव, किंवा तेजोनिधि अथवा आरक्तवर्ण पक्षीच की काय अशा ह्या सूर्याने पहा सनातन जगत् पित्याच्या निवासस्थलांत प्रवेश केला आहे. विविधपूर्ण अशा उल्केप्रमाणे हा आकाशांत स्थित होऊन परिभ्रमण करीतच आहे. रजो लोकांच्या सीमेचे संरक्षण तोच करतो. ॥ ३ ॥


च॒त्वार॑ ईं बिभ्रति क्षेम॒यन्तो॒ दश॒ गर्भं॑ च॒रसे॑ धापयन्ते ।
त्रि॒धात॑वः पर॒मा अ॑स्य॒ गावो॑ दि॒वश्च॑रन्ति॒ परि॑ स॒द्यो अन्ता॑न् ॥ ४ ॥

चत्वारः ईं बिभ्रति क्षेमऽयंतः दश गर्भं चरसे धापयंते ।
त्रिऽधातवः परमा अस्य गावः दिवः चरंति परि सद्यः अंतान् ॥ ४ ॥

जगताचे कुशल करणारे चौघेजण ह्या सूर्याला सांवरून धरीत असतात आणि त्या लहान अर्भकाने हिंडू फिरू लागावे म्हणून दहाजणी त्याचे लालन करीत असतात. तेव्हां अशा ह्या सूर्याच्या परमोत्कृष्ठ रश्मिरूप धेनू आकाशाच्या अगदी सीमेपासून त्याच्याकडे धांवतच येतात. ॥ ४ ॥


इ॒दं वपु॑र्नि॒वच॑नं जनास॒श्चर॑न्ति॒ यन्न॒द्यस्त॒स्थुरापः॑ ।
द्वे यदीं॑ बिभृ॒तो मा॒तुर॒न्ये इ॒हेह॑ जा॒ते य॒म्या॒३॑सब॑न्धू ॥ ५ ॥

इदं वपुः निऽवचनं जनासः चरंति यत् नद्यः तस्थुः आपः ।
द्वेइति यत् ईं बिभृतः मातुः अन्येइति इहऽइह जातेइति यम्या सबंधूइतिसऽबंधू ॥ ५ ॥

जनहो, ही गोष्ट कितीतरी अद्‍भुत मौजेची आहे, की नद्या एकसारख्या धूम धडाका वहात असूनही समुद्रांतील उदक अगदी जसेच्या तसेच रहावे. त्याचप्रमाणे जगन्माता अदिति तिच्या शिवाय येथल्या येथेंच आविर्भूत झालेल्या दोघीजणी परस्पर भगिनी ज्या द्यावापृथिवी, त्यांनीही सूर्याला संभाळून धरावे. ॥ ५ ॥


वि त॑न्वते॒ धियो॑ अस्मा॒ अपां॑सि॒ वस्त्रा॑ पु॒त्राय॑ मा॒तरो॑ वयन्ति ।
उ॒प॒प्र॒क्षे वृष॑णो॒ मोद॑माना दि॒वस्प॒था व॒ध्वो य॒न्त्यच्छ॑ ॥ ६ ॥

वि तन्वते धियः अस्मै अपांसि वस्त्रा पुत्राय मातरः वयंति ।
उपऽप्रक्षे वृषणः मोदमानाः दिवः पथा वध्वः यंति अच्छ ॥ ६ ॥

माता त्याच्याकरिता तेजोरूप वस्त्रे तयार करीत असतात, त्याचप्रमाणे भक्तजनही त्याच्या प्रित्यर्थ ध्यानमय स्तुति आणि सत्कर्मे ह्यांची वस्त्रे बनवीत असतात. आणि त्याच्या प्रिय वल्लभा उषा देवी उत्कंठा होऊन ह्या वीराच्या समागम सुखाकरिता आकाश मार्गाने त्याच्या समोर येतात. ॥ ६ ॥


तद॑स्तु मित्रावरुणा॒ तद॑ग्ने॒ शं योर॒स्मभ्य॑मि॒दम॑स्तु श॒स्तम् ।
अ॒शी॒महि॑ गा॒धमु॒त प्र॑ति॒ष्ठां नमो॑ दि॒वे बृ॑ह॒ते साद॑नाय ॥ ७ ॥

तत् अस्तु मित्रावरुणा तत् अग्ने शं योः अस्मभ्यं इदं अस्तु शस्तम् ।
अशीमहि गाधं उत प्रतिऽस्थां नमः दिवे बृहते सादनाय ॥ ७ ॥

मित्र-वरुणहो, तर आमचे कल्याण असो. अग्निदेवा हे सर्व आम्हांला क्षेमप्रद आणि मंगलकारक असो. ह्या जगामध्ये आमच्या आशेला आधार सापडून आम्हाला स्थैर्य प्राप्त होवो. तेव्हां सर्व श्रेष्ठ असे जे देवी कृपेचे आगर त्याला प्रणाम असो. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ४८ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - प्रतिभानु आत्रेय : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


कदु॑ प्रि॒याय॒ धाम्ने॑ मनामहे॒ स्वक्ष॑त्राय॒ स्वय॑शसे म॒हे व॒यम् ।
आ॒मे॒न्यस्य॒ रज॑सो॒ यद॒भ्र आँ अ॒पो वृ॑णा॒ना वि॑त॒नोति॑ मा॒यिनी॑ ॥ १ ॥

कत् ऊंइति प्रियाय धाम्ने मनामहे स्वऽक्षत्राय स्वऽयशसे महे वयम् ।
आऽमेन्यस्य रजसः यत् अभ्रे आ अपः वृणाना विऽतनोति मायिनी ॥ १ ॥

सर्वांना प्रिय, आपल्या स्वतःच्या बलाने समर्थ आणि आपल्या स्वतःच्या कीर्तिने अलंकृत अशा त्या श्रेष्ठ ईश्वरी सत्तेच्या प्रित्यर्थ आम्ही आतां कोणत्या स्तोत्राचे मनन करावे बरें ? पहा ती सत्ता किती अजब आहे, कीं ह्या अमर्याद रजोलोकावरील मेघरूप आस्तरणाच्या आंत उदक संचयकरून ते पसरून देते. ॥ १ ॥


ता अ॑त्नत व॒युनं॑ वी॒रव॑क्षणं समा॒न्या वृ॒तया॒ विश्व॒मा रजः॑ ।
अपो॒ अपा॑ची॒रप॑रा॒ अपे॑जते॒ प्र पूर्वा॑भिस्तिरते देव॒युर्जनः॑ ॥ २ ॥

ताः अत्नत वयुनं वीरऽवक्षणं समान्या वृतया विश्वं आ रजः ।
अपोइति अपाचीः अपराः अप ईजते प्र पूर्वाभिः तिरते देवऽयुः जनः ॥ २ ॥

वीरांचे धाडस वाढविणार्‍या अशा उचित विद्याचराची त्याच अजब शक्तीने प्रवृत्ति केली, आणि आपल्या एकसरख्याच पद्धतीने हे सर्व अंतरिक्ष पसरून दिले. दोहींपैकी दुसरी आपले तोंड फिरवून मागे मागे हटत चालली तेव्हां भक्तजनांनी पहिलीच्या सहाय्याने आपला उत्कर्ष करून घेतला. ॥ २ ॥


आ ग्राव॑भिरह॒न्येभिर॒क्तुभि॒र्वरि॑ष्ठं॒ वज्र॒मा जि॑घर्ति मा॒यिनि॑ ।
श॒तं वा॒ यस्य॑ प्र॒चर॒न्स्वे दमे॑ संव॒र्तय॑न्तो॒ वि च॑ वर्तय॒न्नहा॑ ॥ ३ ॥

आ ग्रावऽभिः अहन्येभिः अक्तुऽभिः वरिष्ठं वज्रं आ जिघर्ति मायिनि ।
शतं वा यस्य प्रऽचरन् स्वे दमे संऽवर्तयंतः वि च वर्तयन् अहा ॥ ३ ॥

दिवसा आणि रात्री ग्राव्यांच्या योगाने पिळून तयार केलेल्या सोमरसाच्या आस्वादाने हर्षभरीत होऊन इंद्राने आपले सर्वोत्कृष्ट वज्र त्या कपटी शत्रूवर झक्क उगारले. ह्या भगवंताचे शेकडों किरण आपल्या ठिकाणी राहूनच दिवसा मागून दिवस ह्याप्रमाणे अनेक दिवस एकत्र करीत किंवा त्यांची परंपरा नाहीशी करीत सर्वत्र संचार करीत असतात. ॥ ३ ॥


ताम॑स्य री॒तिं प॑र॒शोरि॑व॒ प्रत्यनी॑कमख्यं भु॒जे अ॑स्य॒ वर्प॑सः ।
सचा॒ यदि॑ पितु॒मन्त॑मिव॒ क्षयं॒ रत्नं॒ दधा॑ति॒ भर॑हूतये वि॒शे ॥ ४ ॥

तां अस्य रीतिं परशोःइव प्रति अनीकं अख्यं भुजे अस्य वर्पसः ।
सचा यदि पितुमंतंऽइव क्षयं रत्नं दधाति भरऽहूतये विशे ॥ ४ ॥

युद्ध प्रसंगी धांवा करणार्‍या भक्तवर्गाला सर्व समृद्धिंनी युक्त असे स्थान आणि त्याचप्रमाणे पाहिजे ते अमोलिक रत्न देव देतो तरी अशावेळींच ह्या देवाच्या स्वरूप दीप्तीचा आपल्याला उपयोग व्हावा म्हणून फरशूच्या धारेप्रमाणे जलाल असा जो, त्याचा सपाटा तोही मी पाहून ठेवला आहे. ॥ ४ ॥


स जि॒ह्वया॒ चतु॑रनीक ऋञ्जते॒ चारु॒ वसा॑नो॒ वरु॑णो॒ यत॑न्न॒रिम् ।
न तस्य॑ विद्म पुरुष॒त्वता॑ व॒यं यतो॒ भगः॑ सवि॒ता दाति॒ वार्य॑म् ॥ ५ ॥

सः जिह्वया चतुःऽअनीकः ऋञ्जते चारु वसानः वरुणः यतन् अरिम् ।
न तस्य विद्म पुरुषत्वता वयं यतः भगः सविता दाति वार्यम् ॥ ५ ॥

चार प्रकारच्या दृष्य आकाराचा आणि तेजोरूप रुचिर वस्त्रें धारण करणारा भगवान् वरुण आपल्या वाणीने भक्तांना उत्तेजन देऊन आणि अधर्मिकांना जिव्हेने चटकावून टाकून पुढे सरसावला आहे. मनुष्यास स्वाभाविक अशा दौर्बल्यामुळे ह्या ईश्वराचे रहस्य आम्हांस कळत नाही परंतु येवढे खास की भाग्यदाता सविता देव जी जी अभिलषणीय संपत्ति आम्हांस देतो ती तेथूनच येते. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ४९ ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - प्रतिप्रभ आत्रेय : देवता - विश्वेदेव : छंद - त्रिष्टुभ्


दे॒वं वो॑ अ॒द्य स॑वि॒तार॒मेषे॒ भगं॑ च॒ रत्नं॑ वि॒भज॑न्तमा॒योः ।
आ वां॑ नरा पुरुभुजा ववृत्यां दि॒वेदि॑वे चिदश्विना सखी॒यन् ॥ १ ॥

देवं वः अद्य सवितारं आ इषे भगं च रत्नं विऽभजंतं आयोः ।
आ वां अरा पुरुऽभुजा ववृत्यां दिवेऽदिवे चित् अश्विना सखीऽयन् ॥ १ ॥

तुमच्या हितासाठी आज त्या जगत्प्रेरक सविता देवाला, सज्जनांना सर्वोत्कृष्ट रत्नसंपत्ति यथान्याय देणार्‍या त्या भाग्यदाता देवाला मी येथे घेऊन येतो. अपरिमित लोकांचा प्रतिपाल करणारे हे अश्वी देवहो तुमची विनवणी करून मी तुम्हाला इकडे आणीत असतो कारण दिवसानुदिवस तुमच्या कृपालोभाविषयी मी आतुर झालो आहे. ॥ १ ॥


प्रति॑ प्र॒याण॒मसु॑रस्य वि॒द्वान्सू॒क्तैर्दे॒वं स॑वि॒तारं॑ दुवस्य ।
उप॑ ब्रुवीत॒ नम॑सा विजा॒नञ्ज्येष्ठं॑ च॒ रत्नं॑ वि॒भज॑न्तमा॒योः ॥ २ ॥

प्रति प्रऽयाणं असुरस्य विद्वान् सूऽक्तैः देवं सवितारं दुवस्य ।
उप ब्रुवीत नमसा विऽजानन् ज्येष्ठं च रत्नं विऽभजंतं आयोः ॥ २ ॥

त्या महेश्वराचे आगमन केव्हां होईल हे तुला माहित आहे, तर हे ऋत्विजा, प्रेमळ सूक्तांनी तू त्या जगत्प्रेरक देवाचे अभिवादन कर. सज्जनाला तो यथान्याय रत्नसंपत्ति देतो अशी ज्याची ज्याची खात्री आहे त्याने त्याने सर्व श्रेष्ठ परमेश्वराला अवश्यमेव साष्टांग नमन केले पाहिजे. ॥ २ ॥


अ॒द॒त्र॒या द॑यते॒ वार्य्या॑णि पू॒षा भगो॒ अदि॑ति॒र्वस्त॑उ॒स्रः ।
इन्द्रो॒ विष्णु॒र्वरु॑णो मि॒त्रो अ॒ग्निरहा॑नि भ॒द्रा ज॑नयन्त द॒स्माः ॥ ३ ॥

अदत्रऽया दयते वार्याणि पूषा भगः अदितिः वस्ते उस्रः ।
इन्द्रः विष्णुः वरुणः मित्रः अग्निः अहानि भद्रा जनयंत दस्माः ॥ ३ ॥

भाग्यदाता विश्वंभर देव किंवा अदिति हे भक्ताला अभिलषणीय वस्तु देतात, ते भक्तजनांनी त्यांना कांही उलट बक्षीस द्यावे म्हणून नव्हे. सूर्यही निर्हेतुकच प्रकाशतो. जगत्प्रभु इंद्र, जगन्निवास विष्णु, आव‍इक वरुण, जगन्मित्र अग्नि आणि दुसर्‍या विभूतिही मंगलकारक दिवस दाखवितात. ते निर्हेतुक वृत्तिमुळेंच होय. ॥ ३ ॥


तन्नो॑ अन॒र्वा स॑वि॒ता वरू॑थं॒ तत्सिन्ध॑व इ॒षय॑न्तो॒ अनु॑ ग्मन् ।
उप॒ यद्वोचे॑ अध्व॒रस्य॒ होता॑ रा॒यः स्या॑म॒ पत॑यो॒ वाज॑रत्नाः ॥ ४ ॥

तन् नः अनर्वा सविता वरूथं अत् सिन्धवः इषयंतः अनु ग्मन् ।
उप यत् वोचे अध्वरस्य होता रायः स्याम पतयः वाजऽरत्नाः ॥ ४ ॥

ज्याला कसलाही अपाय होऊं शकत नाही असा जगत्प्रेरक देव हाच आमचे अभेद्य कवच होय. त्वरेने वाहणार्‍या नद्या आम्हांलाच अनुसरून वागत आल्या आहेत, आणि म्हणूनच ह्या यागांतील "होता" देवाची मी अशी प्रार्थना करतो कीं आम्ही सत्वाढ्य भक्त दिव्य संपत्तिचे मालक होऊं असे घडो. ॥ ४ ॥


प्र ये वसु॑भ्य॒ ईव॒दा नमो॒ दुर्ये मि॒त्रे वरु॑णे सू॒क्तवा॑चः ।
अवै॒त्वभ्वं॑ कृणु॒ता वरी॑यो दि॒वस्पृ॑थि॒व्योरव॑सा मदेम ॥ ५ ॥

प्र ये वसुऽभ्य ईवत् आ नमः दुः ये मित्रे वरुणे सूक्तऽवाचः ।
अव एतु अभ्वं कृणुता वरीयः दिवःपृथिव्योः अवसा मदेम ॥ ५ ॥

ह्या प्रमाणे दिव्य संपत्तीच्या निधींना जे प्रणिपात करतात, जे जगन्मित्र वरुणांशी प्रेमळ सूक्तांचीच भाषा बोलतात, त्यांचे महासंकट निवारण होवो. दिव्य विभूतींनो आम्हाला आराम घेऊं द्या. आणि द्यु व पृथिवी ह्यांच्या संतोषाने आम्हांलाही हर्ष निर्भर करा. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल ५ सूक्त ५० ( विश्वेदेव सूक्त )

ऋषी - स्वस्ति आत्रेय : देवता - विश्वेदेव : छंद - पंक्ति, अनुष्टुभ्


विश्वो॑ दे॒वस्य॑ ने॒तुर्मर्तो॑ वुरीत स॒ख्यम् ।
विश्वो॑ रा॒य इ॑षुध्यति द्यु॒म्नं वृ॑णीत पु॒ष्यसे॑ ॥ १ ॥

विश्वः देवस्य नेतुः मर्तः वुरीत सख्यम् ।
विश्वः राय इषुध्यति द्युम्नं वृणीत पुष्यसे ॥ १ ॥

प्रत्येक मनुष्याने जगन्नायक देवाचा कृपालोभ जोडावाच; कारण दिव्य संपत्तिचा ध्यास प्रत्येकास आहेच. आणि म्हणून आपला उत्कर्ष व्हावा ह्याकरिता तरी पुण्याचे ओज संपादन केलेंच पाहिजे. ॥ १ ॥


ते ते॑ देव नेत॒र्ये चे॒माँ अ॑नु॒शसे॑ ।
ते रा॒या ते ह्या॒३॑पृचे॒ सचे॑महि सचथ्यैः ॥ २ ॥

ते ते देव नेतः ये च इमान् अनुऽशसे ।
ते राया ते हि आऽपृचे सचेमहि सचथ्यैः ॥ २ ॥

जगन्नायका देवा, आम्ही तुझे आहोत. आणि ह्या इतर विभूतींची प्रशंसा करण्यास प्रवृत्त झालेले लोक, तेहि तुझेच आहेत. तर ते आणि आम्ही अशा दोघांचाही दिव्य संपत्तीशी योग घडावा, आणि तुझ्या सेवेने तुझाच अखंड सहवास घडावा हेंच आमचे मागणे आहे. ॥ २ ॥


अतो॑ न॒ आ नॄनति॑थी॒नतः॒ पत्नी॑र्दशस्यत ।
आ॒रे विश्वं॑ पथे॒ष्ठां द्वि॒षो यु॑योतु॒ यूयु॑विः ॥ ३ ॥

अतः न आ नॄन् अतिथीन् अतः पत्नीः दशस्यत ।
आरे विश्वं पथेऽस्थां द्विषः युयोतु युयुविः ॥ ३ ॥

ऋत्विजांनो आता आमचे शूर योद्धे, पाहुणे आणि त्यांच्या स्त्रिया ह्यांचा सन्मान करा. तो विघ्न विनाशन प्रभु जे जे आमच्या मार्गांत आडवे येत असतील त्य सर्वांना आणि त्याचप्रमाणे शत्रूंनाही पार देशोधडीस लावून देवो. ॥ ३ ॥


यत्र॒ वह्नि॑र॒भिहि॑तो दु॒द्रव॒द्द्रोण्यः॑ प॒शुः ।
नृ॒मणा॑ वी॒रप॒स्त्योऽ॑र्णा॒ धीरे॑व॒ सनि॑ता ॥ ४ ॥

यत्र वह्निः अभिऽहितः दुद्रवत् द्रोण्यः पशुः ।
नृऽमना वीरऽपस्त्यः अर्णा धीराऽइव सनिता ॥ ४ ॥

जेथे जेथे अपवित्र अग्नि सिद्ध असतो, आणि द्रोणांत भरून ठेवलेला सोमरसरूपी मेध्य पशु देवाकडे जाण्यास सरसावत असतो, तेथे तेथे यजमानाच्या अंतःकरणांत पराक्रमाचा संचार होतो, त्यांच्या घरी दारी शूर पुरुष राहतात आणि गंभीर अशा समुद्र लहरी प्रमाणेच तो पाहिजे ती वस्तु स्वाधीन करून घेऊं शकतो. ॥ ४ ॥


ए॒ष ते॑ देव नेता॒ रथ॒स्पतिः॒ शं र॒यिः ।
शं रा॒ये शं स्व॒स्तय॑ इषः॒ स्तुतो॑ मनामहे देव॒स्तुतो॑ मनामहे ॥ ५ ॥

एषः ते देव नेतरिति रथःपतिः शं रयिः ।
शं राये शं स्वस्तय इषःस्तुतः मनामहे देवऽस्तुतः मनामहे ॥ ५ ॥

जगन्नायका देवा, पथकाचे स्वामित्व देणारे असे तुझे वैभव आम्हाला मंगलकारक होवो. आम्हाला दैवी संपत्ति मिळावी, आमचे चिरकल्याण व्हावे अशा रितीने ते आम्हास लाभदायक होवो. सात्विक आवेशाची प्रशंसा करणारे जे आम्ही त्या आम्हाला हाच निदिध्यास लागला आहे. आम्हा भगवद्‍भक्तांस हाच निदिध्यास लागला आहे. ॥ ५ ॥


ॐ तत् सत्


GO TOP