PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ३ - सूक्त ३१ ते ४०

ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ३१ (संपात सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


शास॒द्वह्नि॑र्दुहि॒तुर्न॒प्त्यं गाद्वि॒द्वाँ ऋ॒तस्य॒ दीधि॑तिं सप॒र्यन् ।
पि॒ता यत्र॑ दुहि॒तुः सेक॑मृ॒ञ्जन्सं श॒ग्म्येन॒ मन॑सा दध॒न्वे ॥ १ ॥

शासद्वह्निर्दुहितुर्नप्त्यं गाद्विद्वान् ऋतस्य दीधितिं सपर्यन् ।
पिता यत्र दुहितुः सेकमृञ्जन्सं शग्म्येन मनसा दधन्वे ॥ १ ॥

ज्या ठिकाणी आपल्या कन्येच्या ( उषेच्या ) संततीस अलंकार चढवीत असतां मनास समाधान वाटून जगत्‌पिता जो द्यौ त्यास विश्रांति प्राप्त झाली त्याच स्थली विद्वान व सर्वांचे अनुशासन करणार्‍या अग्नीस सत्यपूर्ण विधींचे परिपालन करीत असतां त्याच जगत्‌पित्याच्या कन्येचे (उषेचें) पुत्रत्व प्राप्त झाले. ॥ १ ॥


न जा॒मये॒ तान्वो॑ रि॒क्थमा॑रैक्च॒कार॒ गर्भं॑ सनि॒तुर्नि॒धान॑म् ।
यदी॑ मा॒तरो॑ ज॒नय॑न्त॒ वह्नि॑म॒न्यः क॒र्ता सु॒कृतो॑र॒न्य ऋ॒न्धन् ॥ २ ॥

न जामये तान्वः रिक्थमारैक्चकार गर्भं सनितुर्निधानम् ।
यदी मातरः जनयंत वह्निमन्यः कर्ता सुऽकृतोरन्य ऋंधन् ॥ २ ॥

त्या पित्यानें आपली संपत्ति नातलगांस दिली नाही, तर आपल्या कन्येच्याच पुत्रास त्याने संपत्ति मिळविणार्‍या सर्वांच्या धनास वारस केलें, जर खरोखर अग्नीस (द्यौच्या कन्येने जन्म न देतां) यज्ञ काष्ठांनी जन्म दिला असेल तर सत्‍कृत्याचा कर्ता एक आणि त्याचे कौतुक करणारा भलताच असें म्हटले पाहिजे. ॥ २ ॥


अ॒ग्निर्ज॑ज्ञे जु॒ह्वा१रेज॑मानो म॒हस्पु॒त्राँ अ॑रु॒षस्य॑ प्र॒यक्षे॑ ।
म॒हान्गर्भो॒ मह्या जा॒तमे॑षां म॒ही प्र॒वृद्धर्य॑श्वस्य य॒ज्ञैः ॥ ३ ॥

अग्निर्जज्ञे जुह्वा१रेजमानः महस्पुत्रान् अरुषस्य प्रयक्षे ।
महान्गर्भः मह्या जातमेषां मही प्रवृद्धर्यश्वस्य यज्ञैः ॥ ३ ॥

आपल्या जिव्हेच्या योगाने कंपायमान दिसत त्या महत्तेजाच्या पुत्रांचा सन्मान करण्याकरितां अग्नीनें जन्म घेतला. अग्नीचा जन्म अलौकिकच होता. यज्ञ केलें असतां पीतवर्ण अश्वांनी युक्त असलेल्या इंद्राचीही पराक्रमाकडे अलौकिक प्रवृत्ति होते. ॥ ३ ॥


अ॒भि जैत्री॑रसचन्त स्पृधा॒नं महि॒ ज्योति॒स्तम॑सो॒ निर॑जानन् ।
तं जा॑न॒तीः प्रत्युदा॑यन्नु॒षासः॒ पति॒र्गवा॑मभव॒देक॒ इन्द्रः॑ ॥ ४ ॥

अभि जैत्रीरसचंत स्पृधानं महि ज्योतिस्तमसः निरजानन् ।
तं जानतीः प्रत्युदायन्नुषासः पतिर्गवामभवदेक इंद्रः ॥ ४ ॥

इंद्र युद्ध करीत असतां विजयी सेना त्यास येऊन मिळाल्या आणि अंधःकारांतून त्यांनी बलवत्तर तेज प्राप्त करून घेतलें. इंद्रास ओळखून उषा त्याच्या स्वागतार्ह पुढे झाल्या आणि इंद्र धेनूंचा एकटाच मालक झाला. ॥ ४ ॥


वी॒ळौ स॒तीर॒भि धीरा॑ अतृन्दन्प्रा॒चाहि॑न्व॒न्मन॑सा स॒प्त विप्राः॑ ।
विश्वा॑मविन्दन्प॒थ्यामृ॒तस्य॑ प्रजा॒नन्नित्ता नम॒सा वि॑वेश ॥ ५ ॥

वीळौ सतीरभि धीरा अतृंदन्प्राचाहिन्वन्मनसा सप्त विप्राः ।
विश्वामविंदन्पथ्यामृतस्य प्रजानन्नित्ता नमसा विवेश ॥ ५ ॥

बळकट किल्ल्यामध्यें बंदिवान झालेल्या धेनूंस प्रज्ञाशाली पुरुषांनी मुक्त केले, आणि सात ज्ञात्यांनी भक्तिपूर्वक अंतःकरणाने त्यांस तेथून काढले. सत्यधर्माचा सविस्तर मार्ग त्यांना माहित झाला. इंद्रानें हे सर्व ओळखून, भक्तांनी नम्र प्रार्थना केल्यामुळें त्यांत प्रवेश केला. ॥ ५ ॥


वि॒दद्यदी॑ स॒रमा॑ रु॒ग्णमद्रे॒र्महि॒ पाथः॑ पू॒र्व्यं स॒ध्र्यक्कः ।
अग्रं॑ नयत्सु॒पद्यक्ष॑राणा॒मच्छा॒ रवं॑ प्रथ॒मा जा॑न॒ती गा॑त् ॥ ६ ॥

विदद्यदी सरमा रुग्णमद्रेर्महि पाथः पूर्व्यं सध्र्यक्कः ।
अग्रं नयत्सुपद्यक्षराणामच्छा रवं प्रथमा जानती गात् ॥ ६ ॥

ज्या वेळीं पर्वतांतील छिद्र सरमेस माहित झाले त्या वेळी तिनें पूर्वीप्रमाणें एक मोठा रस्ता सुरेख रीतीनें तयार केला. त्या सुंदर पावलांच्या सरमेनें विनाशरहित अशा त्या सेनेचा अग्रभाग आपणाकडे घेतला होता. धेनूंचा शब्द ओळखल्याबरोबार ती थेट त्या दिशेला तेथें प्रथम पोंचली. ॥ ६ ॥


अग॑च्छदु॒ विप्र॑तमः सखी॒यन्नसू॑दयत्सु॒कृते॒ गर्भ॒मद्रिः॑ ।
स॒सान॒ मर्यो॒ युव॑भिर्मख॒स्यन्नथा॑भव॒दञ्गि॑राः स॒द्यो अर्च॑न् ॥ ७ ॥

अगच्छदु विप्रतमः सखीयन्नसूदयत्सुऽकृते गर्भमद्रिः ।
ससान मर्यः युवभिर्मखस्यन्नथाभवदञ्गिराः सद्यः अर्चन् ॥ ७ ॥

अतिशय ज्ञानशील असा तो इंद्र आपल्या मित्रास बरोबर घेऊन तेथें गेला, त्याबरोबर आपल्या उदरांत दडवलेला निधी त्या सत्कृत्यशील इंद्रापुढें पर्वतानें ताबडतोब काढून दिला. आपल्या तरुण मित्रासहवर्तमान इंद्राची उपासना करणार्‍या मानवांना धेनूंची प्राप्ति झाली आणि अंगिरसही एकदम त्याच्या अर्चनांत निमग्न झाला. ॥ ७ ॥


स॒तःस॑तः प्रति॒मानं॑ पुरो॒भूर्विश्वा॑ वेद॒ जनि॑मा॒ हन्ति॒ शुष्ण॑म् ।
प्र णो॑ दि॒वः प॑द॒वीर्ग॒व्युरर्च॒न्सखा॒ सखीँ॑रमुञ्च॒न्निर॑व॒द्यात् ॥ ८ ॥

सतःसतः प्रतिमानं पुरोभूर्विश्वा वेद जनिमा हंति शुष्णम् ।
प्र णः दिवः पदवीर्गव्युरर्चन्सखा सखीन्रमुञ्चन्निरवद्यात् ॥ ८ ॥

जी जी वस्तु अस्तित्वांत आहे तिची केवळ प्रतिमाच अशा ह्या सनातन कालापासून अस्तित्वांत असणार्‍या इंद्रास जगांतील प्रत्येक गोष्ट माहित आहे. शुष्णासही हा इंद्रच मारून टाकतो. स्वर्गांत आपल्य उच्च स्थानीं विराजमान झालेला, धेनूंच्या विषयीं आवड बाळगणारा व देदीप्यमान कांतीनें युक्त अशा आमच्या जिवलग इंद्रानें आमच्या सर्व मित्रांस संकटांपासून मुक्त केलें आहे. ॥ ८ ॥


नि ग॑व्य॒ता मन॑सा सेदुर॒र्कैः कृ॑ण्वा॒नासो॑ अमृत॒त्वाय॑ गा॒तुम् ।
इ॒दं चि॒न्नु सद॑न॒म् भूर्ये॑षां॒ येन॒ मासाँ॒ असि॑षासन्नृ॒तेन॑ ॥ ९ ॥

नि गव्यता मनसा सेदुरर्कैः कृण्वानासः अमृतत्वाय गातुम् ।
इदं चिन्नु सदनम् भूर्येषां येन मासान् असिषासन्नृतेन ॥ ९ ॥

धेनूची प्राप्ति व्हावी अशी इच्छा मनांत बाळगून अमर्त्यपणाचा मार्ग प्रार्थनेच्या योगानें शोधीत ते खालीं बसले. खरोखर हेंच त्यांचे विस्तृत सदन कीं जेथें बसून त्यांनी सत्य वर्तनाच्या योगानें उत्सवप्रद महिन्यांची प्राप्ति होण्याची इच्छा केली. ॥ ९ ॥


स॒म्पश्य॑माना अमदन्न॒भि स्वं पयः॑ प्र॒त्नस्य॒ रेत॑सो॒ दुघा॑नाः ।
वि रोद॑सी अतप॒द्घो ष॑ एषां जा॒ते नि॒ष्ठामद॑धु॒र्गोषु॑ वी॒रान् ॥ १० ॥

सम्पश्यमाना अमदन्नभि स्वं पयः प्रत्नस्य रेतसः दुघानाः ।
वि रोदसी अतपद्घोःष एषां जाते निष्ठामदधुर्गोषु वीरान् ॥ १० ॥

पुरातन निर्झरापासून दुग्धप्राप्तीची इच्छा करणार्‍या अशा त्या अंगिरसांना जेव्हां त्यांचा वैभवनिधी दृष्टीस पडला तेव्हां त्यांना संतोष झाला. त्यांची आनंदगर्जना द्युलोक आणि भूलोक ह्यांनाही त्रासवूं लागली. गाई मिळाल्यानंतर त्यांना उल्हास वाटला व त्यांचे रक्षण करण्याकरितां त्यांनी शूर पुरुषांची योजना केली. ॥ १० ॥


स जा॒तेभि॑र्वृत्र॒हा सेद् उ॑ ह॒व्यैरुदु॒स्रिया॑ असृज॒दिन्द्रो॑ अ॒र्कैः ।
उ॒रू॒च्यस्मै घृ॒तव॒द्‌भर॑न्ती॒ मधु॒ स्वाद्म॑ दुदुहे॒ जेन्या॒ गौः ॥ ११ ॥

स जातेभिर्वृत्रहा सेद् ऊं इति हव्यैरुदुस्रिया असृजदिंद्रः अर्कैः ।
उरूच्यस्मै घृतवद्‌भरंती मधु स्वाद्म दुदुहे जेन्या गौः ॥ ११ ॥

त्या वृत्रनाशक इंद्रानें, स्तुति आणि हवि ह्यांच्या योगानें संतुष्ट होऊन बरोबर सैन्य समुदाय घेऊन धेनूंना प्रतिबंधांतून मोकळे केलें. मग त्या सर्वव्यापिनी व उत्कृष्ट अशा धेनूनें आपल्या कासेंत घृत उत्पन्न करणारे दुग्ध भरून तें रुचकर व मधुर पेय इंद्राकरितां दोहूं दिलें. ॥ ११ ॥


पि॒त्रे चि॑च्चक्रुः॒ सद॑नं॒ सम॑स्मै॒ महि॒ त्विषी॑मत्सु॒कृतो॒ वि हि ख्यन् ।
वि॒ष्क॒भ्नन्तः॒ स्कम्भ॑नेना॒ जनि॑त्री॒ आसी॑ना ऊ॒र्ध्वं र॑भ॒सं वि मि॑न्वन् ॥ १२ ॥

पित्रे चिच्चक्रुः सदनं समस्मै महि त्विषीमत्सुऽकृतः वि हि ख्यन् ।
विष्कभ्नंतः स्कम्भनेना जनित्री आसीना ऊर्ध्वं रभसं वि मिन्वन् ॥ १२ ॥

त्या अंगिरसांनी आपल्या जनकासाठीं सुद्धां एक गृह तयार केलें आणी तेथें प्रकाशमान व विस्तीर्ण असें वसतिस्थान त्यास दाखविलें. आपल्या मातापितरांस दृढ आधार देऊन स्थिरता आणल्यावर उच्च स्थानावर विराजमान झालेल्या त्या अंगिरसांनी आपल्या जनकाचा स्वभाव फार चंचल होता तरी त्यास स्थैर्य आणले. ॥ १२ ॥


म॒ही यदि॑ धि॒षणा॑ शि॒श्नथे॒ धात्स॑द्यो॒वृधं॑ वि॒भ्वं१रोद॑स्योः ।
गिरो॒ यस्मि॑न्ननव॒द्याः स॑मी॒चीर्विश्वा॒ इन्द्रा॑य॒ तवि॑षी॒रनु॑त्ताः ॥ १३ ॥

मही यदि धिषणा शिश्नथे धात्सद्योवृधं विभ्वं१रोदस्योः ।
गिरः यस्मिन्ननवद्याः समीचीर्विश्वा इंद्रय तविषीरनुत्ताः ॥ १३ ॥

ज्याचे ठिकाणी सर्व निर्दोष स्तवनें एकत्र झालेलीं आहेत, जो अकस्मात मोठा होतो व जो सर्व संचारी आहे अशा इंद्रास सामर्थ्यवान स्तुतींनी द्युलोक व भूलोक ह्यांस एकमेकांपासून विभागण्यास ज्या वेळीं प्रवृत्त केलें त्या वेळीं सर्व शक्ति इंद्राचें अंगी प्रकट झाल्या. ॥ १३ ॥


मह्या ते॑ स॒ख्यं व॑श्मि श॒क्तीरा वृ॑त्र॒घ्ने नि॒युतो॑ यन्ति पू॒र्वीः ।
महि॑ स्तो॒त्रमव॒ आग॑न्म सू॒रेर॒स्माकं॒ सु म॑घवन्बोधि गो॒पाः ॥ १४ ॥

मह्या ते सख्यं वश्मि शक्तीरा वृत्रघ्ने नियुतः यंति पूर्वीः ।
महि स्तोत्रमव आगन्म सूरेरस्माकं सु मघऽवन्बोधि गोपाः ॥ १४ ॥

तुझी मैत्री उत्कृष्ट असते आणि म्हणून तुझ्या सामर्थ्याची आम्ही इच्छा करतो. अनेक सामर्थ्यवान तुरगी तुझा आश्रय शोधीत आहेत, कारण तूं वृत्राला मारलें आहेस. तुझ्या साठीं रचलेलें हें मोठें स्तोत्र पहा, तूं जो प्रज्ञावान, त्याच्या कृपेची इच्छा धारण करून आम्ही आलों आहोंत. हे उदार इंद्रा, आमचा संरक्षणकर्ता हो. ॥ १४ ॥


महि॒ क्षेत्रं॑ पु॒रुश्च॒न्द्रं वि॑वि॒द्वानादित्सखि॑भ्यश्च॒रथं॒ समै॑रत् ।
इन्द्रो॒ नृभि॑रजन॒द्दीद्या॑नः सा॒कं सूर्य॑मु॒षसं॑ गा॒तुम॒ग्निम् ॥ १५ ॥

महि क्षेत्रं पुरुश्चंद्रं विविद्वानादित्सखिभ्यश्चरथं समैरत् ।
इंद्रः नृभिरजनद्दीद्यानः साकं सूर्यमुषसं गातुमग्निम् ॥ १५ ॥

विस्तीर्ण, विशाल व सुखकारक असा प्रदेश आढळून आल्यावर त्यानें आपल्या कृपेंतील भक्तांस तेथें तिकडे जाण्यास प्रवृत्त केलें. देदीप्यमान इंद्रानें आपल्या शूर सहाय्यकर्त्याच्या मदतीनें सूर्य, उषा, क्षोणी व अग्नि ह्यांस एकाच कालीं निर्माण केलें. ॥ १५ ॥


अ॒पश्चि॑दे॒ष वि॒भ्वो३दमू॑नाः॒ प्र स॒ध्रीची॑रसृजद्वि॒श्वश्च॑न्द्राः ।
मध्वः॑ पुना॒नाः क॒विभिः॑ प॒वित्रै॒र्द्युभि॑र्हिन्वन्त्य॒क्तुभि॒र्धनु॑त्रीः ॥ १६ ॥

अपश्चिदेष विभ्वो३दमूनाः प्र सध्रीचीरसृजद्विश्वश्चंद्राः ।
मध्वः पुनानाः कविभिः पवित्रैर्द्युभिर्हिन्वंत्यक्तुभिर्धनुत्रीः ॥ १६ ॥

गृहाचा कृपाळू अधिपति अशा ह्या इंद्रानें खरोखर सर्वव्यापी आणि सर्वांस संतोषप्रद अशा उदकांचा एकत्र प्रवाह चालण्याकरितां त्यांस बंधनांतून मुक्त केलें. ज्ञानवान व पवित्र पुरुषांच्या योगानें जगतास पावन करणारीं तीं मधुर जलें आपले शीघ्र प्रवाह तेव्हां पासून अहोरात्र चालू ठेवित आहेत. ॥ १६ ॥


अनु॑ कृ॒ष्णे वसु॑धिती जिहाते उ॒भे सूर्य॑स्य मं॒हना॒ यज॑त्रे ।
परि॒ यत्ते॑ महि॒मानं॑ वृ॒जध्यै॒ सखा॑य इन्द्र॒ काम्या॑ ऋजि॒प्याः ॥ १७ ॥

अनु कृष्णे वसुधिती जिहाते उभे सूर्यस्य मंहना यजत्रे ।
परि यत्ते महिमानं वृजध्यै सखाय इंद्र काम्या ऋजिप्याः ॥ १७ ॥

कृष्णवर्ण आणि शुभ्रवर्ण अशा त्या दोघीजणी सूर्याच्या सामर्थ्यामुळें एकमेकींमागून जात असतात. आणि त्यावेळी हे इंद्रा तुला प्रिय असे तुझे चपल व शूर मित्र दुरितांचा परिहार करण्याकरितां तुझ्या श्रेष्ठ सामर्थ्याभोंवती एकत्र होतात. ॥ १७ ॥


पति॑र्भव वृत्रहन्सू॒नृता॑नां गि॒रां वि॒श्वायु॑र्वृष॒भो व॑यो॒धाः ।
आ नो॑ गहि स॒ख्येभिः॑ शि॒वेभि॑र्म॒हान्म॒हीभि॑रू॒तिभिः॑ सर॒ण्यन् ॥ १८ ॥

पतिर्भव वृत्रहन्सूनृतानां गिरां विश्वायुर्वृषभः वयोधाः ।
आ नः गहि सख्येभिः शिवेभिर्महान्महीभिरूतिभिः सरण्यन् ॥ १८ ॥

वृत्राचा वध करणार्‍या हे इंद्रा, ज्या आर्थी सर्वांची आयुष्यें तुझ्या हातांत आहेत आणि तूं सामर्थ्यवान आहेस त्या अर्थी आम्हास दीर्घ आयुष्य अर्पण करून आमच्या सत्यपूर्ण व मधुर स्तोत्रांचा स्वामी हो. तूं श्रेष्ठ आहेस म्हणून आपली कल्याणप्रद कृपा व सर्वोत्कृष्ट वत्सलता ह्यांसह आमच्याकडे सत्वर आगमन कर. ॥ १८ ॥


तम॑ङ्गिर॒स्वन्नम॑सा सप॒र्यन्नव्यं॑ कृणोमि॒ सन्य॑से पुरा॒जाम् ।
द्रुहो॒ वि या॑हि बहु॒ला अदे॑वीः॒ स्वश्च नो मघवन्सा॒तये॑ धाः ॥ १९ ॥

तमङ्गिरस्वन्नमसा सपर्यन्नव्यं कृणोमि सन्यसे पुराजाम् ।
द्रुहः वि याहि बहुला अदेवीः स्वश्च नः मघऽवन्सातये धाः ॥ १९ ॥

अंगिरसाप्रमाणें प्रमाणपूर्वक त्याचें पूजन करून मी माझा उत्कर्ष व्हावा ह्या इच्छेनें त्या पुरातन देवास पुनः नाविन्य आणतो. हे उदार इंद्रा भक्तिहीन अशा अनेक दुष्टांची दाणादाण उडवून टाक आणि आमच्या कल्याणाकरितां तेजाची प्राप्ति करून दे. ॥ १९ ॥


मिहः॑ पाव॒काः प्रत॑ता अभूवन्स्व॒स्ति नः॑ पिपृहि पा॒रमा॑साम् ।
इन्द्र॒ त्वं र॑थि॒रः पा॑हि नो रि॒षो म॒क्षूम॑क्षू कृणुहि गो॒जितो॑ नः ॥ २० ॥

मिहः पावकाः प्रतता अभूवन्स्वस्ति नः पिपृहि पारमासाम् ।
इंद्र त्वं रथिरः पाहि नः रिषः मक्षूमक्षू कृणुहि गोजितः नः ॥ २० ॥

जगतास पावन करणारे उदकाचे प्रवाह हे आतां भरपूर झाले आहेत. आम्हांस त्यांच्यांवाचून पलीकडे सुखरूप घेऊन जा. हे इंद्रा तूं रथामध्यें आरूढ होऊन शत्रूंपासून आम्हांस बचावून ने; आणि आम्हांस गाई लौकर जिंकता येतील असें कर. ॥ २० ॥


अदे॑दिष्ट वृत्र॒हा गोप॑ति॒र्गा अ॒न्तः कृ॒ष्णाँ अ॑रु॒षैर्धाम॑भिर्गात् ।
प्र सू॒नृता॑ दि॒शमा॑न ऋ॒तेन॒ दुर॑श्च॒ विश्वा॑ अवृणो॒दप॒ स्वाः ॥ २१ ॥

अदेदिष्ट वृत्रहा गोपतिर्गा अंतः कृष्णान् अरुषैर्धामभिर्गात् ।
प्र सूनृता दिशमान ऋतेन दुरश्च विश्वा अवृणोदप स्वाः ॥ २१ ॥

वृत्राचा वध करणारा आणि धेनूंचा स्वामी अशा ह्या इंद्रानें आम्हांस गाई दाखविल्या आहेत व कृष्णवर्ण प्रदेशाच्या अंतरंग भागांत त्यानें आपल्या प्रदीप्त किरणांच्या योगानें प्रवेश केला आहे. आपल्या सत्वधीर आज्ञांनी आम्हांस मधुर सत्याचा उपदेश करीत ह्यानें आपल्या दिव्य मंदिराचे सर्व दरवाजे उघडे करून ठेवले आहेत. ॥ २१ ॥


शु॒नं हु॑वेम म॒घवा॑न॒मिन्द्र॑म॒स्मिन्भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शृ॒ण्वन्त॑मु॒ग्रमू॒तये॑ स॒मत्सु॒ घ्नन्तं॑ वृ॒त्राणि॑ सं॒जितं॒ धना॑नाम् ॥ २२ ॥

शुनं हुवेम मघऽवानमिंद्रमस्मिन्भरे नृतमं वाजसातौ ।
शृण्वंतमुग्रमूतये समत्सु घ्नंतं वृत्राणि संजितं धनानाम् ॥ २२ ॥

जो प्रत्यक्ष सौम्यच आहे, ज्याचे शौर्य अप्रतीम आहे, उग्र असतांही युद्धांत हांक मारली असतां जो ती कळवळ्यानें ऐकतो, जो दुष्टांचा वध करणारा आहे व जो संपत्ति जिंकून आणतो अशा त्या इंद्रास आपला हा उत्साहवर्धक सोम सिद्ध झाला असल्यामुळें आपण आमंत्रण करूं या. ॥ २२ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ३२ (इंद्र सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


इन्द्र॒ सोमं॑ सोमपते॒ पिबे॒मं माध्यं॑दिनं॒ सव॑नं॒ चारु॒ यत्ते॑ ।
प्र॒प्रुथ्या॒ शिप्रे॑ मघवन्नृजीषिन्वि॒मुच्या॒ हरी॑ इ॒ह मा॑दयस्व ॥ १ ॥

इंद्र सोमं सोमपते पिबेमं माध्यंदिनं सवनं चारु यत्ते ।
प्रप्रुथ्या शिप्रे मघऽवन्नृजीषिन्विमुच्या हरी इह मादयस्व ॥ १ ॥

हे सोमाच्या अधिपते इंद्रा, ज्या अर्थी मध्यान्हींचा हवि तुला प्रिय असतो त्या अर्थीं ह्या सोमाचें प्राशन कर. हे सरल वृत्तीच्या उदार इंद्रा, आपले घोडे सोडून ह्या सोमरसांत इतका तल्लीन हो कीं तुझे गाल फुगलेले दिसावे. ॥ १ ॥


गवा॑शिरं म॒न्थिन॑मिन्द्र शु॒क्रं पिबा॒ सोमं॑ ररि॒मा ते॒ मदा॑य ।
ब्र॒ह्म॒कृता॒ मारु॑तेना ग॒णेन॑ स॒जोषा॑ रु॒द्रैस्तृ॒पदा वृ॑षस्व ॥ २ ॥

गवाशिरं मंथिनमिंद्र शुक्रं पिबा सोमं ररिमा ते मदाय ।
ब्रह्मकृता मारुतेना गणेन सजोषा रुद्रैस्तृपदा वृषस्व ॥ २ ॥

हे इंद्रा, ज्यामध्यें दुग्ध व यव हीं मिश्र केली आहेत असा हा चमकणारा सोमरस पी. कारण तुला आनंद व्हावा म्हणून तो तुला आम्हीं अर्पण केला आहे. स्तोत्रें गाण्यांत निमग्न झालेला मरुतांचा समुदाय आणि त्याचप्रमाणे रुद्र ह्यांचे सहवर्तमान सोमरसानें तृप्त होऊन तूं वृद्धिंगत हो. ॥ २ ॥


ये ते॒ शुष्मं॒ ये तवि॑षी॒मव॑र्ध॒न्नर्च॑न्त इन्द्र म॒रुत॑स्त॒ ओजः॑ ।
माध्यं॑दिने॒ सव॑ने वज्रहस्त॒ पिबा॑ रु॒द्रेभिः॒ सग॑णः सुशिप्र ॥ ३ ॥

ये ते शुष्मं ये तविषीमवर्धन्नर्चंत इंद्र मरुतस्त ओजः ।
माध्यंदिने सवने वज्रहस्त पिबा रुद्रेभिः सगणः सुशिप्र ॥ ३ ॥

ज्यांनी तुझें सामर्थ्य व बल वृद्धिंगत केले आणि जे, हे इंद्रा, तुझ्या तेजाचे पूजन करीत आहेत अशा मरुतांस आणि त्याप्रमाणें रुद्रांसही बरोबर घेऊन हे वज्रधारी व सुंदर मुकुट धारण करणार्‍या देवा, मध्यान्हीच्या यज्ञप्रसंगी सोमरसाचें प्राशन कर. ॥ ३ ॥


त इन्न्वस्य॒ मधु॑मद्विविप्र॒ इन्द्र॑स्य॒ शर्धो॑ म॒रुतो॒ य आस॑न् ।
येभि॑र्वृ॒त्रस्ये॑षि॒तो वि॒वेदा॑म॒र्मणो॒ मन्य॑मानस्य॒ मर्म॑ ॥ ४ ॥

त इन्न्वस्य मधुमद्विविप्र इंद्रस्य शर्धः मरुतः य आसन् ।
येभिर्वृत्रस्येषितः विवेदामर्मणः मन्यमानस्य मर्म ॥ ४ ॥

जे मरुत इंद्राचे सैनिक होत व ज्यांनी प्रेरणा केल्यामुळें स्वतःस अमर मानणार्‍या वृत्राचे मर्मस्थान इंद्रास सांपडलें त्याच मरुतांनी खरोखर मधुर सोमरस इंद्राकडे पोंचता केला. ॥ ४ ॥


म॒नु॒ष्वदि॑न्द्र॒ सव॑नं जुषा॒णः पिबा॒ सोमं॒ शश्व॑ते वी॒र्याय ।
स आ व॑वृत्स्व हर्यश्व य॒ज्ञैः स॑र॒ण्युभि॑र॒पो अर्णा॑ सिसर्षि ॥ ५ ॥

मनुष्वदिंद्र सवनं जुषाणः पिबा सोमं शश्वते वीर्याय ।
स आ ववृत्स्व हर्यश्व यज्ञैः सरण्युभिरपः अर्णा सिसर्षि ॥ ५ ॥

ज्याप्रमाणे हे इंद्रा, तूं मनूच्या हवीचा स्वीकार केलास त्याप्रमाणें आमच्याही हवीचा स्वीकार करून शाश्वत उल्हास प्राप्त होण्याकरितां सोमाचें प्राशन कर. हे पीत अश्वावर आरूढ होणार्‍या देवा, त्याप्रमाणें यज्ञांच्या योगानें तूं वृद्धिंगत हो. चपल मरुतांच्या मदतीनें उदकांचे प्रवाह तूंच वहावयस लावतोस. ॥ ५ ॥


त्वम् अ॒पो यद्ध॑ वृ॒त्रं ज॑घ॒न्वाँ अत्याँ॑ इव॒ प्रासृ॑जः॒ सर्त॒वाजौ ।
शया॑नमिन्द्र॒ चर॑ता व॒धेन॑ वव्रि॒वांस॒म् परि॑ दे॒वीरदे॑वम् ॥ ६ ॥

त्वम् अपः यद्ध वृत्रं जघन्वान् अत्यान् इव प्रासृजः सर्तवाजौ ।
शयानमिंद्र चरता वधेन वव्रिवांसम् परि देवीरदेवम् ॥ ६ ॥

ज्यावेळी हे इंद्रा, युद्धांत तळपणार्‍या शस्त्रानें पवित्र जलास वेष्टून पडलेल्या वृत्रास तूं मारून टांकलेस त्यावेळीं ज्याप्रमाणें घोडे रणांगणावर दौडत जातात त्याप्रमाणें दौडत जाण्यासाठीं तूं उदकांस मुक्त केलेंस. ॥ ६ ॥


यजा॑म॒ इन्नम॑सा वृ॒द्धमिन्द्रं॑ बृ॒हन्त॑मृ॒ष्वम॒जरं॒ युवा॑नम् ।
यस्य॑ प्रि॒ये म॒मतु॑र्य॒ज्ञिय॑स्य॒ न रोद॑सी महि॒मानं॑ म॒माते॑ ॥ ७ ॥

यजाम इन्नमसा वृद्धमिंद्रं बृहंतमृष्वमजरं युवानम् ।
यस्य प्रिये ममतुर्यज्ञियस्य न रोदसी महिमानं ममाते ॥ ७ ॥

नमस्कृतींच्या योगानें जो वृद्धींगत पावतो, जो श्रेष्ठ व थोर आहे, ज्यास जग माहीत नाही, व जो सदा तरुणच असतो आणि ज्या यज्ञार्ह देवाचा महिमा त्यास प्रिय असलेल्या द्यावापृथिवीला सुद्धां मापन करतां आला नाहीं व आतां येणार नाहीं अशा त्या इंद्रा प्रित्यर्थच आम्ही यजन करतो. ॥ ७ ॥


इन्द्र॑स्य॒ कर्म॒ सुकृ॑ता पु॒रूणि॑ व्र॒तानि॑ दे॒वा न मि॑नन्ति॒ विश्वे॑ ।
दा॒धार॒ यः पृ॑थि॒वीं द्यामु॒तेमां ज॒जान॒ सूर्य॑मु॒षसं॑ सु॒दंसाः॑ ॥ ८ ॥

इंद्रस्य कर्म सुऽकृता पुरूणि व्रतानि देवा न मिनंति विश्वे ।
दाधार यः पृथिवीं द्यामुतेमां जजान सूर्यमुषसं सुदंसाः ॥ ८ ॥

इंद्राची कृती व त्याची सत्कृत्यें पुष्कळ आहेत. कोणाही देवास त्याच्या आज्ञेचा भंग करतां येत नाहीं. ह्यानें पृथिवी आणी द्यूलोक ह्यांना आधार दिला व अद्‌भुत कृत्य करून सूर्य आणि उषा ह्यांस उत्पन्न केलें. ॥ ८ ॥


अद्रो॑घ स॒त्यं तव॒ तन्म॑हि॒त्वं स॒द्यो यज्जा॒तो अपि॑बो ह॒ सोम॑म् ।
न द्याव॑ इन्द्र त॒वस॑स्त॒ ओजो॒ नाहा॒ न मासाः॑ श॒रदो॑ वरन्त ॥ ९ ॥

अद्रोघ सत्यं तव तन्महित्वं सद्यः यज्जातः अपिबः ह सोमम् ।
न द्याव इंद्र तवसस्त ओजः नाहा न मासाः शरदः वरंत ॥ ९ ॥

हे द्रोहरहित इंद्रा, तो तुझा महिमा अगदीं खरा कीं जन्म घेतल्याबरोबर तूं सोमाचें प्राशन केलेंस. द्यूलोक अथवा दिवस, महिने आणि वर्षें ह्यापैकीं कोणालाही तुझ्या सामर्थ्याचें तेज आकलन करतां आलें नाहीं. ॥ ९ ॥


त्वं स॒द्यो अ॑पिबो जा॒त इ॑न्द्र॒ मदा॑य॒ सोमं॑ पर॒मे व्योमन् ।
यद्ध॒ द्यावा॑पृथि॒वी आवि॑वेशी॒रथा॑भवः पू॒र्व्यः का॒रुधा॑याः ॥ १० ॥

त्वं सद्यः अपिबः जात इंद्र मदाय सोमं परमे व्योमन् ।
यद्ध द्यावापृथिवी आविवेशीरथाभवः पूर्व्यः कारुधायाः ॥ १० ॥

हे इंद्रा, तूं जन्म घेतल्याबरोबर त्या विस्तीर्ण स्वर्गांत विराजित होऊन आपल्या संतोषार्थ सोमरसाचें पान केलेंस. ह्याच कारणामुळें तुला द्यावापृथिवी व्याप्त करतां आली व तूं तुझें स्तोत्र गाणार्‍या भक्तजनांचा पोषणकर्ता झालास. ॥ १० ॥


अह॒न्नहिं॑ परि॒शया॑न॒मर्ण॑ ओजा॒यमा॑नं तुविजात॒ तव्या॑न् ।
न ते॑ महि॒त्वमनु॑ भू॒दध॒ द्यौर्यद॒न्यया॑ स्फि॒ग्या३क्षामव॑स्थाः ॥ ११ ॥

अहन्नहिं परिशयानमर्ण ओजायमानं तुविजात तव्यान् ।
न ते महित्वमनु भूदध द्यौर्यदन्यया स्फिग्या३क्षामवस्थाः ॥ ११ ॥

अनेक भक्तांकरितां जन्म घेणार्‍या हे इंद्रा, उदकांना वेष्टून राहणार्‍या सामर्थ्यवान अहीस तूं आपल्या पराक्रमानें मारून टाकीत असतां द्यूलोकासही तुझ्या मोठेपणाची कल्पना झाली नाही. कारण एकाच जांघेंत तूं सर्व पृथिवी झांकून टाकलीस. ॥ ११ ॥


य॒ज्ञो हि त॑ इन्द्र॒ वर्ध॑नो॒ भूदु॒त प्रि॒यः सु॒तसो॑मो मि॒येधः॑ ।
य॒ज्ञेन॑ य॒ज्ञम॑व य॒ज्ञियः॒ सन्य॒ज्ञस्ते॒ वज्र॑महि॒हत्य॑ आवत् ॥ १२ ॥

यज्ञः हि त इंद्र वर्धनः भूदुत प्रियः सुतसोमः मियेधः ।
यज्ञेन यज्ञमव यज्ञियः सन्यज्ञस्ते वज्रमहिहत्य आवत् ॥ १२ ॥

हे इंद्रा, खरोखर यज्ञ तुझें वर्धन करणारा झाला आणि सोमरसानें युक्त असा हवीही तुला प्रिय झाला. ज्या अर्थी तूं यज्ञार्ह आहेस त्या अर्थीं यज्ञाच्या योगानें आमच्या यज्ञाचें संरक्षण कर. कारण अहीचा वध करण्याचे वेळीं यज्ञानेंच तुझ्या वज्राचें रक्षण केलें. ॥ १२ ॥


य॒ज्ञेनेन्द्र॒मव॒सा च॑क्रे अ॒र्वागैनं॑ सु॒म्नाय॒ नव्य॑से ववृत्याम् ।
यः स्तोमे॑भिर्वावृ॒धे पू॒र्व्येभि॒र्यो म॑ध्य॒मेभि॑रु॒त नूत॑नेभिः ॥ १३ ॥

यज्ञेनेंद्रमवसा चक्रे अर्वागैनं सुम्नाय नव्यसे ववृत्याम् ।
यः स्तोमेभिर्वावृधे पूर्व्येभिर्यः मध्यमेभिरुत नूतनेभिः ॥ १३ ॥

जो इंद्रा प्राचीन कालांतील, मध्य कालांतील व नूतन अशा स्तोत्रांनी वृद्धिंगत झाला त्याला त्याच्या सामर्थ्यासह मी यज्ञांच्या योगानें येथें येण्यास प्रवृत्त करतो व मला नवीन आनंद प्राप्त करण्याविषयीं मी त्याचें मन वळवितों. ॥ १३ ॥


वि॒वेष॒ यन्मा॑ धि॒षणा॑ ज॒जान॒ स्तवै॑ पु॒रा पार्या॒दिन्द्र॒मह्नः॑ ।
अंह॑सो॒ यत्र॑ पी॒पर॒द्यथा॑ नो ना॒वेव॒ यान्त॑मु॒भये॑ हवन्ते ॥ १४ ॥

विवेष यन्मा धिषणा जजान स्तवै पुरा पार्यादिंद्रमह्नः ।
अंहसः यत्र पीपरद्यथा नः नावेव यांतमुभये हवंते ॥ १४ ॥

ज्यावेळीं माझ्या अंतःकरणांत स्तोत्रें रचण्याच्या इच्छेनें प्रवेश केला तेव्हां मी इंद्रावर स्तोत्रें रचली. आम्हांस त्यानें संकटांच्या पार सुखरूप घेऊन जावें म्हणून निकराचा दिवस येण्यापूर्वींच मला इंद्राचें स्तवन करूं द्या. ज्या प्रमाणें नौकेंत बसून जाणार्‍या मनुष्यांस दोन्हीं तीरांवरील लोक हांक मारतात त्याप्रमाणे दोन्ही पक्षाचीं मनुष्यें इंद्राचा धांवा करीत असतात. ॥ १४ ॥


आपू॑र्णो अस्य क॒लशः॒ स्वाहा॒ सेक्ते॑व॒ कोशं॑ सिसिचे॒ पिब॑ध्यै ।
समु॑ प्रि॒या आव॑वृत्र॒न् मदा॑य प्रदक्षि॒णिद॒भि सोमा॑स॒ इन्द्र॑म् ॥ १५ ॥

आपूर्णः अस्य कलशः स्वाहा सेक्तेव कोशं सिसिचे पिबध्यै ।
समु प्रिया आववृत्रन् मदाय प्रदक्षिणिदभि सोमास इंद्रम् ॥ १५ ॥

इंद्राप्रित्यर्थ हा कलश भरून ठेवलेला आहे. आतां स्वाहा असे म्हणून मी त्यास तो अर्पण करतो. ज्या प्रमाणें पाणीवाला आपली पखाल ओततो त्याप्रमाणें इंद्राचे प्राशनार्थ मी येथें सोमरस ओतून ठेवला आहे. इंद्रास आवडणार्‍या ह्या सोमरसांनी त्यास प्रदक्षिणा करून त्याच्या संतोषार्थ त्यास भरून टाकले आहे. ॥ १५ ॥


न त्वा॑ गभी॒रः पु॑रुहूत॒ सिन्धु॒र्नाद्र॑यः॒ परि॒ षन्तो॑ वरन्त ।
इ॒त्था सखि॑भ्य इषि॒तो यदि॒न्द्रा दृ॒ळ्हं चि॒दरु॑जो॒ गव्य॑मू॒र्वम् ॥ १६ ॥

न त्वा गभीरः पुरुहूत सिंधुर्नाद्रयः परि षंतः वरंत ।
इत्था सखिभ्य इषितः यदिंद्र दृळ्हं चिदरुजः गव्यमूर्वम् ॥ १६ ॥

अनेक भक्तांनी धांवा केलेल्या हे इंद्रा, ज्यावेळीं ज्या प्रमाणें आपल्या मित्रांवर उपकार करण्याच्या ईर्षेनें तूं ज्यामध्यें धेनूंना प्रतिबंधांत टाकलें होतें अशा अत्यंत विस्तीर्ण व अभेद्य दुर्गाचाही भेद केलास त्या वेळीं अगाध समुद्रास अथवा सभोंवताली असणार्‍या पर्वतासही तुला प्रतिबंध करतां आला नाहीं. ॥ १६ ॥


शु॒नं हु॑वेम म॒घवा॑न॒मिन्द्र॑म॒स्मिन्भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शृ॒ण्वन्त॑मु॒ग्रमू॒तये॑ स॒मत्सु॒ घ्नन्तं॑ वृ॒त्राणि॑ सं॒जितं॒ धना॑नाम् ॥ १७ ॥

शुनं हुवेम मघऽवानमिंद्रमस्मिन्भरे नृतमं वाजसातौ ।
शृण्वंतमुग्रमूतये समत्सु घ्नंतं वृत्राणि संजितं धनानाम् ॥ १७ ॥

जो प्रत्यक्ष सौख्यच आहे, ज्याचें शौर्य अप्रतीम आहे, उग्र असतांही युद्धांत संरक्षणासठीं हांक मारली असतां जो ती कळवळ्यानें ऐकतो, जो दुष्टांचा वध करणारा आहे व जो संपत्ति जिंकून आणतो अशा त्या इंद्रास आपला हा उत्साहवर्धक सोम सिद्ध झाला असल्यामुळें आपण निमंत्रण करूं या. ॥ १७ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ३३ (विश्वामित्र-नदी संवाद सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - नध्यः, इंद्रः : छंद - त्रिष्टुप्, अनुष्टुप्


प्र पर्व॑तानामुश॒ती उ॒पस्था॒दश्वे॑ इव॒ विषि॑ते॒ हास॑माने ।
गावे॑व शु॒भ्रे मा॒तरा॑ रिहा॒णे विपा॑ट्छुतु॒द्री पय॑सा जवेते ॥ १ ॥

प्र पर्वतानामुशती उपस्थादश्वे इव विषिते हासमाने ।
गावेव शुभ्रे मातरा रिहाणे विपाट्छुतुद्री पयसा जवेते ॥ १ ॥

वासरें असलेल्या व त्यांना चाटण्याकरितां धांवणार्‍या दोन शुभ्र गाईंप्रमाणे अथवा रथापासून सोडलेल्या व म्हणूनच आनंदानें खिंकाळत जाणार्‍या दोन घोड्यांप्रमाणें विपाट आणि शुतुद्रि ह्या दोन प्रेमपूरीत नद्या पर्वतांच्या उतारावरून आपल्या जलासह वेगानें धांवत जात आहेत. ॥ १ ॥


इन्द्रे॑षिते प्रस॒वं भिक्ष॑माणे॒ अच्छा॑ समु॒द्रं र॒थ्येव याथः ।
स॒मा॒रा॒णे ऊ॒र्मिभिः॒ पिन्व॑माने अ॒न्या वा॑म॒न्यामप्ये॑ति शुभ्रे ॥ २ ॥

इंद्रेषिते प्रसवं भिक्षमाणे अच्छा समुद्रं रथ्येव याथः ।
समाराणे ऊर्मिभिः पिन्वमाने अन्या वामन्यामप्येति शुभ्रे ॥ २ ॥

इंद्राकडून प्रेरीत होऊन व त्याच्या जवळच पुढें मार्ग आक्रमण करण्याची परवानगी मागून, एकाच रथास जोडल्याप्रमाणें तुम्ही समुद्राकडे जातां. अहो शुभ्र नद्यांनो, उसळणार्‍या लाटांनी तुम्ही भरून जात असतां आपले प्रवाह एकत्र करून तुमच्यापैकीं एक दुसरींत अगदीं बेमालूम मिळून जाते. ॥ २ ॥


अच्छा॒ सिन्धुं॑ मा॒तृत॑मामयासं॒ विपा॑शमु॒र्वीं सु॒भगा॑मगन्म ।
व॒त्समि॑व मा॒तरा॑ संरिहा॒णे स॑मा॒नं योनि॒मनु॑ सं॒चर॑न्ती ॥ ३ ॥

अच्छा सिंधुं मातृतमामयासं विपाशमुर्वीं सुभगामगन्म ।
वत्समिव मातरा संरिहाणे समानं योनिमनु संचरंती ॥ ३ ॥

अत्यंत श्रेष्ठ माता जी सिंधु तिच्याजवळ मी प्राप्त झालो आहे. विशाल आणि सौख्यदायिनी अशा विपाट नांवाच्या नदीजवळ मी गेलों आहे. आपल्या वासरांना चाटण्याची इच्छा करणार्‍या दोन व्यालेल्या गाईंप्रमाणें ह्या दोघी एकाच मार्गानें धांवत आहेत. ॥ ३ ॥


ए॒ना व॒यं पय॑सा॒ पिन्व॑माना॒ अनु॒ योनिं॑ दे॒वकृ॑तं॒ चर॑न्तीः ।
न वर्त॑वे प्रस॒वः सर्ग॑तक्तः किं॒युर्विप्रो॑ न॒द्यो जोहवीति ॥ ४ ॥

एना वयं पयसा पिन्वमाना अनु योनिं देवकृतं चरंतीः ।
न वर्तवे प्रसवः सर्गतक्तः किंयुर्विप्रः नद्यः जोहवीति ॥ ४ ॥

आमच्या ह्या जलानें आम्ही भरून जाऊन देवांनी नेमलेल्या मार्गांनी आम्ही वाढत आहोंत. पुढें जाण्याविषयीं निश्चित असलेली आमची जती कोणालाही रोखता येणार नाही. तर कोणती इच्छा धरून हा विद्वान आम्हां नद्यांस पाचारण करीत आहे बरें ? ॥ ४ ॥


रम॑ध्वं मे॒ वच॑से सो॒म्याय॒ ऋता॑वरी॒रुप॑ मुहू॒र्तमेवैः॑ ।
प्र सिन्धु॒मच्छा॑ बृह॒ती म॑नी॒षाव॒स्युर॑ह्वे कुशि॒कस्य॑ सू॒नुः ॥ ५ ॥

रमध्वं मे वचसे सोम्याय ऋतावरीरुप मुहूर्तमेवैः ।
प्र सिंधुमच्छा बृहती मनीषावस्युरह्वे कुशिकस्य सूनुः ॥ ५ ॥

अहो पवित्र नद्यांनो, माझे नम्र शब्द ऐकण्याकरितां एक मुहुर्त मात्र तुम्ही आपली गति बंद करून उभ्या रहा. मी कुशिकाचा पुत्र एक दीर्घ स्तोत्र गात कल्याणाच्या इच्छेनें सिंधूस हांक मारीत आहे. ॥ ५ ॥


इन्द्रो॑ अ॒स्माँ अ॑रद॒द्वज्र॑बाहु॒रपा॑हन्वृ॒त्रं प॑रि॒धिं न॒दीना॑म् ।
दे॒वोऽनयत्सवि॒ता सु॑पा॒णिस्तस्य॑ व॒यं प्र॑स॒वे या॑म उ॒र्वीः ॥ ६ ॥

इंद्रः अस्मान् अरदद्वज्रबाहुरपाहन्वृत्रं परिधिं नदीनाम् ।
देवोऽनयत्सविता सुपाणिस्तस्य वयं प्रसवे याम उर्वीः ॥ ६ ॥

ज्यानें सर्व नद्यांना अडवून धरलें होतें अशा त्या वृत्रास मारून वज्रबाहू इंद्रानें आम्हांस अडचणींतून बाहेर काढलें व सुंदर हस्तांनी युक्त अशा सवितादेवानें आम्हांस मार्ग दाखवून दिला. त्याच्याच इच्छेनें आम्ही विशाल नद्या मार्ग क्रमण करीत आहोंत. ॥ ६ ॥


प्र॒वाच्यं॑ शश्व॒धा वी॒र्य१न्तदिन्द्र॑स्य॒ कर्म॒ यदहिं॑ विवृ॒श्चत् ।
वि वज्रे॑ण परि॒षदो॑ जघा॒नाय॒न्नापोऽ॑यनमि॒च्छमा॑नाः ॥ ७ ॥

प्रवाच्यं शश्वधा वीर्य१ंतदिंद्रस्य कर्म यदहिं विवृश्चत् ।
वि वज्रेण परिषदः जघानायन्नापोऽयनमिच्छमानाः ॥ ७ ॥

तो इंद्राचा पराक्रम - तें त्याचें शूरत्वाचे कृत्य - नेहमीं वर्णन करण्याजोगें आहे कीं त्यानें अहीचे तुकडे तुकडे केले आणि नद्यांस प्रतिबंध करणार्‍या सर्व दुष्टांस त्यानें आपल्या वज्रानें मारून टाकलें. ज्यांना आपण केव्हां चालूं असें झाले होतें अशीं जलें नंतर वाहूं लागली. ॥ ७ ॥


ए॒तद्वचो॑ जरित॒र्मापि॑ मृष्ठा॒ आ यत्ते॒ घोषा॒नुत्त॑रा यु॒गानि॑ ।
उ॒क्थेषु॑ कारो॒ प्रति॑ नो जुषस्व॒ मा नो॒ नि कः॑ पुरुष॒त्रा नम॑स्ते ॥ ८ ॥

एतद्वचः जरितर्मापि मृष्ठा आ यत्ते घोषानुत्तरा युगानि ।
उक्थेषु कारः प्रति नः जुषस्व मा नः नि कः पुरुषत्रा नमस्ते ॥ ८ ॥

हे स्तुति गाणार्‍या भक्ता तुझें वचन कीं, ज्याचा घोष पुढील पिढ्या करीत राहतील तें कधीएंही विसरूं नको. हे स्तोत्रकर्त्या तूं जेव्हां स्तवनोक्ति म्हणत जाशील त्या वेळीं आमचीही उपासना करीत जा. जनांमध्यें आम्हांस तुच्छ मानूं नकों. नमस्कार (जा आतां). ॥ ८ ॥


ओ षु स्व॑सारः का॒रवे॑ शृणोत य॒यौ वो॑ दू॒रादन॑सा॒ रथे॑न ।
नि षू न॑मध्व॒म्भव॑ता सुपा॒रा अ॑धोअ॒क्षाः सि॑न्धवः स्रो॒त्याभिः॑ ॥ ९ ॥

अः षु स्वसारः कारवे शृणोत ययौ वः दूरादनसा रथेन ।
नि षू नमध्वम्भवता सुपारा अधोअक्षाः सिंधवः स्रोत्याभिः ॥ ९ ॥

हे भगिनींनो, तुमची स्तुति करणारा जो हा भक्त गाड्यांमधून आणि रथांतून प्रवास करीत फार दुरून तुमच्याकडे आला आहे त्याचें वचन श्रवण करा. हे नद्यांनो, तुम्हांस उत्तम रीतीनें उतार पडूं द्या आणि गाडीच्या कण्याच्याही खालीं ओसरून तुमच्या प्रवाहांतून आम्हाला सुलभ रीतीनें पलीकडे जातां येईल अशा व्हा. ॥ ९ ॥


आ ते॑ कारो शृणवामा॒ वचां॑सि य॒याथ॑ दू॒रादन॑सा॒ रथे॑न ।
नि ते॑ नंसै पीप्या॒नेव॒ योषा॒ मर्या॑येव क॒न्या शश्व॒चै ते॑ ॥ १० ॥

आ ते कारः शृणवामा वचांसि ययाथ दूरादनसा रथेन ।
नि ते नंसै पीप्यानेव योषा मर्यायेव कन्या शश्वचै ते ॥ १० ॥

हे स्तवन करणार्‍या भक्ता, तुला जें कांही बोलावयाचें असेल तें आम्हांस ऐकूं दे. खरोखरच तूं गाड्यांतून आणि रथांतून फार लांबून आला आहेस. बालकाला पाजणार्‍या एकाद्या लेकुरवाळी प्रमाणें मी तुजकरितां वाकेन आणि आपल्या प्रियकरापुढें उभ्या असलेल्या एखाद्या कुमारिकेप्रमाणें मी नम्र होईन. ॥ १० ॥


यद॒ङ्ग त्वा॑ भर॒ताः सं॒तरे॑युर्ग॒व्यन्ग्राम॑ इषि॒त इन्द्र॑जूतः ।
अर्षा॒दह॑ प्रस॒वः सर्ग॑तक्त॒ आ वो॑ वृणे सुम॒तिं य॒ज्ञिया॑नाम् ॥ ११ ॥

यदङ्ग त्वा भरताः संतरेयुर्गव्यन्ग्राम इषित इंद्रजूतः ।
अर्षादह प्रसवः सर्गतक्त आ वः वृणे सुमतिं यज्ञियानाम् ॥ ११ ॥

इंद्रानें प्रेरणा व स्फूर्ति उत्पन्न केलेली व गाईंच्या शोधार्थ निघालेली हीं मनुष्यें (हे भरत) खरोखर ज्यावेळीं तुझ्या प्रवाहांतून पलीकडे जातील त्यावेळीं पुढें जाण्याविषयीं निश्चित झालेल्या तुझा प्रवाहही अव्यग्र रीतीनें पुढें चालूं लागेल. तुम्ही ज्या पूजनीय नद्या, त्यांच्या कृपेची मी इच्छा करीत आहे. ॥ ११ ॥


अता॑रिषुर्भर॒ता ग॒व्यवः॒ समभ॑क्त॒ विप्रः॑ सुम॒तिं न॒दीना॑म् ।
प्र पि॑न्वध्वमि॒षय॑न्तीः सु॒राधा॒ आ व॒क्षणाः॑ पृ॒णध्वं॑ या॒त शीभ॑म् ॥ १२ ॥

अतारिषुर्भरता गव्यवः समभक्त विप्रः सुमतिं नदीनाम् ।
प्र पिन्वध्वमिषयंतीः सुराधा आ वक्षणाः पृणध्वं यात शीभम् ॥ १२ ॥

गाईंच्या शोधार्थ निघालेले भरत नदीपार गेले आणि विद्वान स्तोत्रकर्त्यालाही नद्यांच्या कृपेची प्राप्ति झाली. हे नद्यांनो आम्हांस प्रेरणा आणि अनुग्रह हीं अर्पण करून तुम्ही वृद्धिंगत व्हा. आपले सर्व प्रवाह पाण्यानें तुडुंब भरून टाका आणि त्वरीत पुढें चालू लागा. ॥ १२ ॥


उद्व॑ ऊ॒र्मिः शम्या॑ ह॒न्त्वापो॒ योक्त्रा॑णि मुञ्चत ।
मादु॑ष्कृतौ॒ व्येनसा॒घ्न्यौ शून॒मार॑ताम् ॥ १३ ॥

उद्व ऊर्मिः शम्या हंत्वापः योक्त्राणि मुञ्चत ।
मादुष्कृतौ व्येनसाघ्न्यौ शूनमारताम् ॥ १३ ॥

तुमच्या लाटा फक्त जुवाच्या खिटीला आदळोत. हे जलांनो तुम्ही दोरखंडांना मात्र शाबूत ठेवा. ज्या पापविमुक्त आहेत, ज्यांना कुणासही अपाय करितां येत नाहीं आणि ज्या कुणास अपाय करीत नाहींत अशा ह्या दोन नद्या कधींही हीन स्तितींत न पोंचोत. ॥ १३ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ३४ (संपात सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


इन्द्रः॑ पू॒र्भिदाति॑र॒द्दास॑म॒र्कैर्वि॒दद्व॑सु॒र्दय॑मानो॒ वि शत्रू॑न् ।
ब्रह्म॑जूतस्त॒न्वा वावृधा॒नो भूरि॑दात्र॒ आपृ॑ण॒द्रोद॑सी उ॒भे ॥ १ ॥

इंद्रः पूर्भिदातिरद्दासमर्कैर्विदद्वसुर्दयमानः वि शत्रून् ।
ब्रह्मजूतस्तन्वा वावृधानः भूरिदात्र आपृणद्रोदसी उभे ॥ १ ॥

पुरांचा नाश करणार्‍या, वित्त जिंकून आणणार्‍या अशा इंद्रानें दासास व त्याचप्रमाणें इतर शत्रूंस जिंकले. स्तोत्रांच्या योगानें ज्यास स्फुरण येते, विशाल शरीर धारण करून जो वृद्धिंगत होतो व ज्याचें दातृत्व उदारपणाचें आहे अशा त्या देवानें द्यूलोक व भूलोक ह्या दोहोंसही व्याप्त केलें आहे. ॥ १ ॥


म॒खस्य॑ ते तवि॒षस्य॒ प्र जू॒तिमिय॑र्मि॒ वाच॑म॒मृता॑य॒ भूष॑न् ।
इन्द्र॑ क्षिती॒नाम॑सि॒ मानु॑षीणां वि॒शां दैवी॑नामु॒त पू॑र्व॒यावा॑ ॥ २ ॥

मखस्य ते तविषस्य प्र जूतिमियर्मि वाचममृताय भूषन् ।
इंद्र क्षितीनामसि मानुषीणां विशां दैवीनामुत पूर्वयावा ॥ २ ॥

तुझी सत्कृत्यें व बल ह्यांना स्फूर्ति देणार्‍या अशा एखाद्या स्तोत्रास तूं जो अमरदेव त्याचे प्रित्यर्थ सजवून मी तुला अर्पण करतो. हे इंद्रा, तूं मानवांचे कुळ व देवांचा समुदाय ह्या दोघांचाही अग्रणी आहेस. ॥ २ ॥


इन्द्रो॑ वृ॒त्रम॑वृणो॒च्छर्ध॑नीतिः॒ प्र मा॒यिना॑ममिना॒द्वर्प॑णीतिः ।
अह॒न्व्यंसमु॒शध॒ग्वने॑ष्वा॒विर्धेना॑ अकृणोद्रा॒म्याणा॑म् ॥ ३ ॥

इंद्रः वृत्रमवृणोच्छर्धनीतिः प्र मायिनाममिनाद्वर्पणीतिः ।
अहन्व्यंसमुशधग्वनेष्वाविर्धेना अकृणोद्राम्याणाम् ॥ ३ ॥

आपल्या सैन्यास पुढें घेऊन जाऊन इंद्रानें वृत्रास वेढून टाकलें, व युक्ती प्रयुक्तींत निष्णात असल्यामुळें त्यानें मायावी लोकांच्या सर्व योजना निष्फल केल्या. वनांमध्यें आपल्या सर्व सामर्थ्यासह अग्नि पसरून त्याने व्यंसास मारलें व धेनूंना आपल्या प्रिय भक्तजनांच्या दृष्टीस पाडलें. ॥ ३ ॥


इन्द्रः॑ स्व॒र्षा ज॒नय॒न्नहा॑नि जि॒गायो॒शिग्भिः॒ पृत॑ना अभि॒ष्टिः ।
प्रारो॑चय॒न्मन॑वे के॒तुमह्ना॒मवि॑न्द॒ज्ज्योति॑र्बृह॒ते रणा॑य ॥ ४ ॥

इंद्रः स्वर्षा जनयन्नहानि जिगायोशिग्भिः पृतना अभिष्टिः ।
प्रारोचयन्मनवे केतुमह्नामविंदज्ज्योतिर्बृहते रणाय ॥ ४ ॥

प्रकाशाची प्राप्ति करून घेणार्‍या व भक्तांस साहाय्य करणार्‍या इंद्राने, दिवसांना उत्पन्न करून आपल्यावर प्रेम करणार्‍या योद्ध्यांच्या मदतीनें शत्रुसेनांवर विजय मिळविला. त्यानें मानव जातीच्या हितार्थ दिवसांची विजय पताकाच असा जो सूर्य त्यास प्रदीप्त केलें व मानवांच्या परम संतोषासाठीं प्रकाशाचा लाभ करून घेतला. ॥ ४ ॥


इन्द्र॒स्तुजो॑ ब॒र्हणा॒ आ वि॑वेश नृ॒वद्दधा॑नो॒ नर्या॑ पु॒रूणि॑ ।
अचे॑तय॒द्धिय॑ इ॒मा ज॑रि॒त्रे प्रेमं वर्ण॑मतिरच्छु॒क्रमा॑साम् ॥ ५ ॥

इंद्रस्तुजः बर्हणा आ विवेश नृवद्दधानः नर्या पुरूणि ।
अचेतयद्धिय इमा जरित्रे प्रेमं वर्णमतिरच्छुक्रमासाम् ॥ ५ ॥

शूराप्रमाणें अनेक पराक्रमाचीं कृत्यें करीत इंद्रानें शत्रूंच्या वाढत्या सैन्यांमध्यें प्रवेश केला. त्यानें आपल्या भक्तांकरितां ह्या स्तोत्रांची स्फूर्ति करविली, आणि ह्या उषांचा उज्वल वर्ण वृद्धिंगत केला. ॥ ५ ॥


म॒हो म॒हानि॑ पनयन्त्य॒स्येन्द्र॑स्य॒ कर्म॒ सुकृ॑ता पु॒रूणि॑ ।
वृ॒जने॑न वृजि॒नान्त्सं पि॑पेष मा॒याभि॒र्दस्यूँ॑र॒भिभू॑त्योजाः ॥ ६ ॥

महः महानि पनयंत्यस्येंद्रस्य कर्म सुऽकृता पुरूणि ।
वृजनेन वृजिनांत्सं पिपेष मायाभिर्दस्यून्रभिभूत्योजाः ॥ ६ ॥

ह्या श्रेष्ठ इंद्राच्या महत्कृत्यांची, पराक्रमाची व अनेक सत्कृतींची सर्व मनुष्यें प्रशंसा करीत असतात. ज्याचे तेज शत्रूंस पराभूत करणारे आहे अशा त्या इंद्रानें कुटील योजनांनी कुटिलांचे व क्रूर हिकमतींनी क्रूरांचे पारिपत्य केलें. ॥ ६ ॥


यु॒धेन्द्रो॑ म॒ह्ना वरि॑वश्चकार दे॒वेभ्यः॒ सत्प॑तिश्चर्षणि॒प्राः ।
वि॒वस्व॑तः॒ सद॑ने अस्य॒ तानि॒ विप्रा॑ उ॒क्थेभिः॑ क॒वयो॑ गृणन्ति ॥ ७ ॥

युधेंद्रः मह्ना वरिवश्चकार देवेभ्यः सत्पतिश्चर्षणिप्राः ।
विवस्वतः सदने अस्य तानि विप्रा उक्थेभिः कवयः गृणंति ॥ ७ ॥

सज्जनांचा नायक व मनुष्यांच्या इच्छा पुरविणार्‍या इंद्राने मोठे युद्ध करून देवांकरितां आश्रयस्थान तयार केले. तीं त्याचीं कृत्यें विवस्वानाचें घरीं विद्वान स्तोत्रकर्ते अनेक प्रकारचीं स्तोत्रें रचून गात असतात. ॥ ७ ॥


स॒त्रा॒साहं॒ वरे॑ण्यं सहो॒दां स॑स॒वांसं॒ स्वर॒पश्च॑ दे॒वीः ।
स॒सान॒ यः पृ॑थि॒वीं द्यामु॒तेमामिन्द्रं॑ मद॒न्त्यनु॒ धीर॑णासः ॥ ८ ॥

सत्रासाहं वरेण्यं सहोदां ससवांसं स्वरपश्च देवीः ।
ससान यः पृथिवीं द्यामुतेमामिंद्रं मदंत्यनु धीरणासः ॥ ८ ॥

जो सर्वदा विजयी असतो व जो अत्यंत श्रेष्ठ आहे, जो सामर्थ्याची प्राप्ति करून देतो, ज्यानें प्रकाश व दिव्य उदकें आणून दिलीं आणि ज्यानें पृथिवी व हा द्युलोक ह्यांचाही लाभ घडविला त्या इंद्रास पाहून स्तोत्रें गाण्याची ज्यास आवड आहे अशा भक्तांना आनंद होतो. ॥ ८ ॥


स॒सानात्याँ॑ उ॒त सूर्यं॑ ससा॒नेन्द्रः॑ ससान पुरु॒भोज॑सं॒ गाम् ।
हि॒र॒ण्यय॑म् उ॒त भोगं॑ ससान ह॒त्वी दस्यू॒न्प्रार्यं॒ वर्ण॑मावत् ॥ ९ ॥

ससानात्यान् उत सूर्यं ससानेंद्रः ससान पुरुभोजसं गाम् ।
हिरण्ययम् उत भोगं ससान हत्वी दस्यून्प्रार्यं वर्णमावत् ॥ ९ ॥

इंद्राने अश्वांची व सूर्याची प्राप्ति करून दिली व त्यानें पोषण करणार्‍या धेनूचाही लाभ घडविला. शिवाय हिरण्मय संपत्तीही मिळवून दिली व दुष्टांचा वध करून आर्यवर्णाचें संरक्षण केलें. ॥ ९ ॥


इन्द्र॒ ओष॑धीरसनो॒दहा॑नि॒ वन॒स्पतीँ॑रसनोद॒न्तरि॑क्षम् ।
बि॒भेद॑ व॒लं नु॑नु॒दे विवा॒चोऽ॑थाभवद्दमि॒ताभिक्र॑तूनाम् ॥ १० ॥

इंद्र ओषधीरसनोदहानि वनस्पतीन्रसनोदंतरिक्षम् ।
बिभेद वलं नुनुदे विवाचोऽथाभवद्दमिताभिक्रतूनाम् ॥ १० ॥

इंद्रानें औषधींचा लाभ करून दिला व दिवस, वनस्पति व अंतरिक्ष ह्यांचीही प्राप्ति घडवून दिली. त्यानें वलास छिन्नविच्छिन्न करून टाकले, निंदकांची दाणादाण उडविली व सामर्थ्याचा गर्व वाहणार्‍या उद्दाम शत्रूंचे तो दमन करणारा झाला. ॥ १० ॥


शु॒नं हु॑वेम म॒घवा॑न॒मिन्द्र॑म॒स्मिन्भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शृ॒ण्वन्त॑मु॒ग्रमू॒तये॑ स॒मत्सु॒ घ्नन्तं॑ वृ॒त्राणि॑ सं॒जितं॒ धना॑नाम् ॥ ११ ॥

शुनं हुवेम मघऽवानमिंद्रमस्मिन्भरे नृतमं वाजसातौ ।
शृण्वंतमुग्रमूतये समत्सु घ्नंतं वृत्राणि संजितं धनानाम् ॥ ११ ॥

जो प्रत्यक्ष सौख्यच आहे, ज्याचें शौर्य अप्रतीम आहे, उग्र असतांही युद्धांत संरक्षणासाठीं हांक मारली असतां जो ती कळवळ्यानें ऐकतो, जो दुष्टांचा वध करणारा आहे व जो संपत्ति जिंकून आणतो अशा त्या इंद्रास आपला हा उत्साहवर्धक सोम सिद्ध झाला असल्यामुळें आपण निमंत्रण करूं या. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ३५ (इंद्र सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


तिष्ठा॒ हरी॒ रथ॒ आ यु॒ज्यमा॑ना या॒हि वा॒युर्न नि॒युतो॑ नो॒ अच्छ॑ ।
पिबा॒स्यन्धो॑ अ॒भिसृ॑ष्टो अ॒स्मे इन्द्र॒ स्वाहा॑ ररि॒मा ते॒ मदा॑य ॥ १ ॥

तिष्ठा हरी रथ आ युज्यमाना याहि वायुर्न नियुतः नः अच्छ ।
पिबास्यंधः अभिसृष्टः अस्मे इंद्र स्वाहा ररिमा ते मदाय ॥ १ ॥

रथास जे जोडले जात आहेत अशा आपल्या अश्वांवर आरूढ हो. आणि ज्याप्रमाणें वायू आपल्या घोड्यावर स्वार होऊन येतो त्याप्रमाणें तूंही आमचेकडे ये. तूं आमच्याकडे निघाला असल्यामुळें तुला आनंद व्हावा ह्यासाठीं आम्ही .... ?? ॥ १ ॥


उपा॑जि॒रा पु॑रुहू॒ताय॒ सप्ती॒ हरी॒ रथ॑स्य धू॒र्ष्वा यु॑नज्मि ।
द्र॒वद्यथा॒ सम्भृ॑तं वि॒श्वत॑श्चि॒दुपे॒मं य॒ज्ञमा व॑हात॒ इन्द्र॑म् ॥ २ ॥

उपाजिरा पुरुहूताय सप्ती हरी रथस्य धूर्ष्वा युनज्मि ।
द्रवद्यथा सम्भृतं विश्वतश्चिदुपेमं यज्ञमा वहात इंद्रम् ॥ २ ॥

चपल आणि त्वरेनें धांवणार्‍या इंद्राचे अश्वास अनेक भक्तांकडून पाचारण होणार्‍या त्या देवा प्रित्यर्थ मी रथाच्या धुरेस जोडतो, कारण माझी अशी इच्छा आहे कीं, सर्व प्रकारानें सजवलेल्या ह्या यज्ञाकडे त्यांनी इंद्रास लवकर घेऊन यावे. ॥ २ ॥


उपो॑ नयस्व॒ वृष॑णा तपु॒ष्पोतेम॑व॒ त्वं वृ॑षभ स्वधावः ।
ग्रसे॑ता॒मश्वा॒ वि मु॑चे॒ह शोणा॑ दि॒वेदि॑वे स॒दृशी॑रद्धि धा॒नाः ॥ ३ ॥

उपः नयस्व वृषणा तपुष्पोतेमव त्वं वृषभ स्वधावः ।
ग्रसेतामश्वा वि मुचेह शोणा दिवेदिवे सदृशीरद्धि धानाः ॥ ३ ॥

आपले प्रबल व पुष्ट अश्व इकडे घेऊन ये. हे हवींचा स्वीकार करणार्‍या सामर्थ्यवान देवा, ह्या यज्ञकर्त्याचें तूं रक्षण कर. घोड्यांना चरूं दे. त्या रक्तवर्ण अश्वांस येथें सोडून दे. दररोज तूं त्याच त्याच प्रकारच्या लाह्या खात जा. ॥ ३ ॥


ब्रह्म॑णा ते ब्रह्म॒युजा॑ युनज्मि॒ हरी॒ सखा॑या सध॒माद॑ आ॒शू ।
स्थि॒रं रथं॑ सु॒खमि॑न्द्राधि॒तिष्ठ॑न्प्रजा॒नन्वि॒द्वाँ उप॑ याहि॒ सोम॑म् ॥ ४ ॥

ब्रह्मणा ते ब्रह्मयुजा युनज्मि हरी सखाया सधमाद आशू ।
स्थिरं रथं सुखमिंद्रधितिष्ठन्प्रजानन्विद्वान् उप याहि सोमम् ॥ ४ ॥

स्तोत्रांमुळेंच जे रथास नियुक्त होतात आणि जे चपल आहेत अशा तुझ्या प्रिय अश्वांस तूं सर्वांस संतोषकारक अशा यज्ञाकडे आगमन करावें म्हणून एक स्तोत्र गाऊन मी रथास जोडतों. हे इंद्रा ज्यास सर्व ज्ञान आहे व जो विद्वान आहे असा तूं ह्या सुखकारक आणि स्थिर रथांत आरूढ होऊन आमच्या सोमाकडे ये. ॥ ४ ॥


मा ते॒ हरी॒ वृष॑णा वी॒तपृ॑ष्ठा॒ नि री॑रम॒न्यज॑मानासो अ॒न्ये ।
अ॒त्याया॑हि॒ शश्व॑तो व॒यं तेऽ॑रं सु॒तेभिः॑ कृणवाम॒ सोमैः॑ ॥ ५ ॥

मा ते हरी वृषणा वीतपृष्ठा नि रीरमन्यजमानासः अन्ये ।
अत्यायाहि शश्वतः वयं तेऽरं सुतेभिः कृणवाम सोमैः ॥ ५ ॥

शोभिवंत पाठीच्या तुझ्या प्रबल अश्वांस दुसरे उपासक मार्गांत खोळंबून न धरोत. त्यांचेकडे न पाहतां तूं इकडे ये. तुजकरितां काढलेल्या सोमरसांनी आम्हास तुला नेहमीं संतुष्ट करूं दे. ॥ ५ ॥


तवा॒यं सोम॒स्त्वमेह्य॒र्वाङ् श॑श्वत्त॒मं सु॒मना॑ अ॒स्य पा॑हि ।
अ॒स्मिन्य॒ज्ञे ब॒र्हिष्या नि॒षद्या॑ दधि॒ष्वेमं ज॒ठर॒ इन्दु॑मिन्द्र ॥ ६ ॥

तवायं सोमस्त्वमेह्यर्वाङ् शश्वत्तमं सुमना अस्य पाहि ।
अस्मिन्यज्ञे बर्हिष्या निषद्या दधिष्वेमं जठर इंदुमिंद्र ॥ ६ ॥

हा सोमरस तुझा आहे. तूं आमचे समीप ये व संतुष्ट अंतःकरणानें त्याचें नेहमीं प्राशन करीत जा. यज्ञांत कुशासनवर विराजमान होऊन, हे इंद्रा, हा चमकणारा सोमरस आपले उदरांत ठेव. ॥ ६ ॥


स्ती॒र्णं ते॑ ब॒र्हिः सु॒त इ॑न्द्र॒ सोमः॑ कृ॒ता धा॒ना अत्त॑वे ते॒ हरि॑भ्याम् ।
तदो॑कसे पुरु॒शाका॑य॒ वृष्णे॑ म॒रुत्व॑ते॒ तुभ्यं॑ रा॒ता ह॒वींषि॑ ॥ ७ ॥

स्तीर्णं ते बर्हिः सुत इंद्र सोमः कृता धाना अत्तवे ते हरिभ्याम् ।
तदोकसे पुरुशाकाय वृष्णे मरुत्वते तुभ्यं राता हवींषि ॥ ७ ॥

हे इंद्रा, तुझ्याकरितां कुशासन मांडले आहे व सोम काढून ठेवला आहे. तुझ्या अश्वांना खाण्यासाठीं लाह्या तयार केल्या आहेत. ज्यानें हवींमध्ये जणूं कांही आपलें वसतिस्थान केलें, ज्याचे पराक्रम अनेक आहेत, जो सामर्थ्यवान आहे व जो मरुतांनी परिवेष्टित आहे अशा तुझ्याकरितां हे येथें हवि अर्पण केले आहेत. ॥ ७ ॥


इ॒मं नरः॒ पर्व॑ता॒स्तुभ्य॒मापः॒ समि॑न्द्र॒ गोभि॒र्मधु॑मन्तमक्रन् ।
तस्या॒गत्या॑ सु॒मना॑ ऋष्व पाहि प्रजा॒नन्वि॒द्वान्प॒थ्या३अनु॒ स्वाः ॥ ८ ॥

इमं नरः पर्वतास्तुभ्यमापः समिंद्र गोभिर्मधुमंतमक्रन् ।
तस्यागत्या सुमना ऋष्व पाहि प्रजानन्विद्वान्पथ्या३अनु स्वाः ॥ ८ ॥

हे इंद्रा, धेनूंसहवर्तमान मनुष्यें, आणि उदके ह्यांनी हा मधुर सोमरस तुझें करितां तयार केलेला आहे. हे श्रेष्ठ देवा, जाणता आणि प्रज्ञाशील असा जो तूं, स्वमार्गांनी येथें येऊन संतुष्ट अंतःकरणानें त्याचें प्राशन कर. ॥ ८ ॥


याँ आभ॑जो म॒रुत॑ इन्द्र॒ सोमे॒ ये त्वामव॑र्ध॒न्नभ॑वन्ग॒णस्ते॑ ।
तेभि॑रे॒तं स॒जोषा॑ वावशा॒नोऽ॒ग्नेः पि॑ब जि॒ह्वया॒ सोम॑मिन्द्र ॥ ९ ॥

यान् आभजः मरुत इंद्र सोमे ये त्वामवर्धन्नभवन्गणस्ते ।
तेभिरेतं सजोषा वावशानोऽग्नेः पिब जिह्वया सोममिंद्र ॥ ९ ॥

हे इंद्रा, ज्या मरुतांस तूं सोमरसांत वाटेकरी केलेंस, ज्यांनी तुझें बल वाढविले व जे तुझे अनुचर बनलें त्यांचे सहवर्तमान हा सोमरस अग्नीच्या जिव्हेनें उत्सुक होऊन पी. ॥ ९ ॥


इन्द्र॒ पिब॑ स्व॒धया॑ चित्सु॒तस्या॒ग्नेर्वा॑ पाहि जि॒ह्वया॑ यजत्र ।
अ॒ध्व॒र्योर्वा॒ प्रय॑तं शक्र॒ हस्ता॒द्धोतु॑र्वा य॒ज्ञं ह॒विषो॑ जुषस्व ॥ १० ॥

इंद्र पिब स्वधया चित्सुतस्याग्नेर्वा पाहि जिह्वया यजत्र ।
अध्वर्योर्वा प्रयतं शक्र हस्ताद्धोतुर्वा यज्ञं हविषः जुषस्व ॥ १० ॥

हे यज्ञार्ह इंद्रा, आम्ही तयार केलेल्या सोमरसाचे स्वतःच्याच जिव्हेनें अथवा अग्नीच्या जिव्हेनें प्राशन कर आणि ह्या आमच्या पवित्र यज्ञाच्या अध्वर्यूच्या हातांतून अथवा होत्याच्या हवींच्या द्वारें स्वीकार कर. ॥ १० ॥


शु॒नं हु॑वेम म॒घवा॑न॒मिन्द्र॑म॒स्मिन्भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शृ॒ण्वन्त॑मु॒ग्रमू॒तये॑ स॒मत्सु॒ घ्नन्तं॑ वृ॒त्राणि॑ सं॒जितं॒ धना॑नाम् ॥ ११ ॥

शुनं हुवेम मघऽवानमिंद्रमस्मिन्भरे नृतमं वाजसातौ ।
शृण्वंतमुग्रमूतये समत्सु घ्नंतं वृत्राणि संजितं धनानाम् ॥ ११ ॥

जो प्रत्यक्ष सौख्यच आहे, ज्याचें शौर्य अप्रतीम आहे, उग्र असतांही युद्धांत संरक्षणासाठीं हांक मारली असतां जो ती कळवळ्यानें ऐकतो, जो दुष्टांचा वध करणारा आहे व जो संपत्ति जिंकून आणतो अशा त्या इंद्रास आपला हा उत्साहवर्धक सोम सिद्ध झाला असल्यामुळें आपण निमंत्रण करूं या. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ३६ (संपात सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः, अङ्गिरसः घोरः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


इ॒मामू॒ षु प्रभृ॑तिं सा॒तये॑ धाः॒ शश्व॑च्छश्वदू॒तिभि॒र्याद॑मानः ।
सु॒तेसु॑ते वावृधे॒ वर्ध॑नेभि॒र्यः कर्म॑भिर्म॒हद्भिः॒ं सुश्रु॑तो॒ भूत् ॥ १ ॥

इमामू षु प्रभृतिं सातये धाः शश्वच्छश्वदूतिभिर्यादमानः ।
सुतेसुते वावृधे वर्धनेभिर्यः कर्मभिर्महद्भिःध सुश्रुतः भूत् ॥ १ ॥

नेहमीं नेहमीं आपल्या भक्तरक्षक कृपेसह येथें येऊन हे इंद्रा, जो तूं श्रेष्ठ कृत्यांमुळें सर्वत्र प्रसिद्ध झालास आणि उत्साह वृद्धि करणार्‍या सोमानें जो तूं प्रत्येक हवीबरोबर वृद्धिंगत झालास तो आमच्या कल्याणाकरितां ह्या सोमरसाच्या भरपूर आहुतीचा स्वीकार कर. ॥ १ ॥


इन्द्रा॑य॒ सोमाः॑ प्र॒दिवो॒ विदा॑ना ऋ॒भुर्येभि॒र्वृष॑पर्वा॒ विहा॑याः ।
प्र॒य॒म्यमा॑ना॒न्प्रति॒ षू गृ॑भा॒येन्द्र॒ पिब॒ वृष॑धूतस्य॒ वृष्णः॑ ॥ २ ॥

इंद्रय सोमाः प्रदिवः विदाना ऋभुर्येभिर्वृषपर्वा विहायाः ।
प्रयम्यमानान्प्रति षू गृभायेंद्र पिब वृषधूतस्य वृष्णः ॥ २ ॥

ज्याच्या योगानें इंद्र चतुर, कणखर हाडापेराचा आणि देहानें विशाल बनला ते हे सोम प्राचीनकाली सुद्धां इंद्रास अर्पण करण्यांत येत होते. ते हवि आम्ही तुला देत आहोंत त्यांचा हे इंद्रा, तूं स्वीकार कर आणि प्रबल साधनांनी सोमवल्लींतून काढलेला हा बलवर्धक सोम पी. ॥ २ ॥


पिबा॒ वर्ध॑स्व॒ तव॑ घा सु॒तास॒ इन्द्र॒ सोमा॑सः प्रथ॒मा उ॒तेमे ।
यथापि॑बः पू॒र्व्याँ इ॑न्द्र॒ सोमाँ॑ ए॒वा पा॑हि॒ पन्यो॑ अ॒द्या नवी॑यान् ॥ ३ ॥

पिबा वर्धस्व तव घा सुतास इंद्र सोमासः प्रथमा उतेमे ।
यथापिबः पूर्व्यान् इंद्र सोमान् एवा पाहि पन्यः अद्या नवीयान् ॥ ३ ॥

ह्याचे प्राशन कर आणि वृद्धिंगत हो. खरोखर प्राचीन कालचे आणि तसेंच हे आजचे सिद्ध केलेले सोमरस हे इंद्रा, ज्याप्रमाणें पूर्वकालीन सोमरसांचे तूं प्राशन केलेंस त्याचप्रमाणे स्तवनीय असा जो तूं तो ह्या नवीन सोमरसांचेंही प्राशन कर. ॥ ३ ॥


म॒हाँ अम॑त्रो वृ॒जने॑ विर॒प्श्यु१ग्रं शवः॑ पत्यते धृ॒ष्ण्वोजः॑ ।
नाह॑ विव्याच पृथि॒वी च॒नैनं॒ यत्सोमा॑सो॒ हर्य॑श्व॒मम॑न्दन् ॥ ४ ॥

महान् अमत्रः वृजने विरप्श्यु१ग्रं शवः पत्यते धृष्ण्वोजः ।
नाह विव्याच पृथिवी चनैनं यत्सोमासः हर्यश्वममंदन् ॥ ४ ॥

श्रेष्ठ, अमित, बलशाली आणि संकटांत आश्वासन देणारा अशा ह्या इंद्राचें सामर्थ्य उग्र असून शौर्य आणि भिती उत्पन्न करणारे आहे. खरोखर पीतवर्ण अश्वावर आरूढ होणार्‍या ह्या इंद्रास जेव्हां सोमरसांनी हर्ष उत्पन्न केला त्यावेळीं पृथिवी सुद्धां त्याचें आकलन करण्यास समर्थ झाली नाहीं. ॥ ४ ॥


म॒हाँ उ॒ग्रो वा॑वृधे वी॒र्याय स॒माच॑क्रे वृष॒भः काव्ये॑न ।
इन्द्रो॒ भगो॑ वाज॒दा अ॑स्य॒ गावः॒ प्र जा॑यन्ते॒ दक्षि॑णा अस्य पू॒र्वीः ॥ ५ ॥

महान् उग्रः वावृधे वीर्याय समाचक्रे वृषभः काव्येन ।
इंद्रः भगः वाजदा अस्य गावः प्र जायंते दक्षिणा अस्य पूर्वीः ॥ ५ ॥

श्रेष्ठ आणि उग्र असा हा इंद्र पराक्रम करण्याकरितां वृद्धिंगत झाला. त्या सामर्थ्यवान देवानें आपल्या बुद्धीनें हें सर्व केलें. ज्यास सुदैव म्हणून म्हणतात तें इंद्रच होय. त्याच्या धेनु मनुष्याच्या अंगांत शक्ति उत्पन्न करतात. ह्याचे पासून अनेक प्रकारचे विपुल लाभ प्राप्त होतात. ॥ ५ ॥


प्र यत् सिन्ध॑वः प्रस॒वं यथाय॒न्नापः॑ समु॒द्रं र॒थ्येव जग्मुः ।
अत॑श्चि॒दिन्द्रः॒ सद॑सो॒ वरी॑या॒न्यदीं॒ सोमः॑ पृ॒णति॑ दु॒ग्धो अं॒शुः ॥ ६ ॥

प्र यत् सिंधवः प्रसवं यथायन्नापः समुद्रं रथ्येव जग्मुः ।
अतश्चिदिंद्रः सदसः वरीयान्यदीं सोमः पृणति दुग्धः अंशुः ॥ ६ ॥

ज्याप्रमाणें नद्या जलसंचयाकडे धांवत जातात अथवा ज्याप्रमाणें रथात आरूढ होऊनच कीं काय उदकें समुद्राकडे पळत सुटतात, त्याप्रमाणें जेव्हां सोमवल्लींतून पिळून काढलेला हा तकतकीत सोमरस ह्या इंद्राचें उदर भरून टाकतो त्यावेळीं इंद्र हा त्याच्या वसतिस्थानापेक्षां सुद्धां जास्त विशाल होतो. ॥ ६ ॥


स॒मु॒द्रेण॒ सिन्ध॑वो॒ याद॑माना॒ इन्द्रा॑य॒ सोमं॒ सुषु॑तं॒ भर॑न्तः ।
अं॒शुं दु॑हन्ति ह॒स्तिनो॑ भ॒रित्रै॒र्मध्वः॑ पुनन्ति॒ धार॑या प॒वित्रैः॑ ॥ ७ ॥

समुद्रेण सिंधवः यादमाना इंद्रय सोमं सुषुतं भरंतः ।
अंशुं दुहंति हस्तिनः भरित्रैर्मध्वः पुनंति धारया पवित्रैः ॥ ७ ॥

नद्या ज्याप्रमाणे आपणांस समुद्राच्या हवाली करतात त्याप्रमाणें उत्तम तऱ्हेने सिद्ध केलेले सोमरस इंद्रास अर्पण करणारे कुशल उपासक आपल्या बाहूंनी तो चामकणारा रस सोमवल्लींतून पिळून काढतात आणि पवित्र द्रव्यांनी व मधाच्या धारेनें त्यास शुद्ध करतात. ॥ ७ ॥


ह्र॒दा इ॑व कु॒क्षयः॑ सोम॒धानाः॒ समी॑ विव्याच॒ सव॑ना पु॒रूणि॑ ।
अन्ना॒ यदिन्द्रः॑ प्रथ॒मा व्याश॑ वृ॒त्रं ज॑घ॒न्वाँ अ॑वृणीत॒ सोम॑म् ॥ ८ ॥

ह्रदा इव कुक्षयः सोमधानाः समी विव्याच सवना पुरूणि ।
अन्ना यदिंद्रः प्रथमा व्याश वृत्रं जघन्वान् अवृणीत सोमम् ॥ ८ ॥

सोमरसानें भरलेल्या इंद्राच्या कुक्षि सरोवरांप्रमाणें तुडुंब भरलेल्या दिसतात. त्यानें अनेक हवि पोटांत सांठविले आहेत. वृत्रास मारून थकलेल्या त्या इंद्रानें प्रथम मागितलेले हविरन्न सोमरस हेंच होय. ज्यावेळीं इंद्रानें हविरन्नाचा प्रथम स्वीकार केला त्यावेळीं वृत्रास मारून तो थकलेला असल्यामुळें त्यानें प्रथम सोमच मागितला. ॥ ८ ॥


आ तू भ॑र॒ माकि॑रे॒तत्परि॑ ष्ठाद्वि॒द्मा हि त्वा॒ वसु॑पतिं॒ वसू॑नाम् ।
इन्द्र॒ यत्ते॒ माहि॑नं॒ दत्र॒मस्त्य॒स्मभ्यं॒ तद्ध॑र्यश्व॒ प्र य॑न्धि ॥ ९ ॥

आ तू भर माकिरेतत्परि ष्ठाद्विद्मा हि त्वा वसुपतिं वसूनाम् ।
इंद्र यत्ते माहिनं दत्रमस्त्यस्मभ्यं तद्धर्यश्व प्र यंधि ॥ ९ ॥

तें वैभव शीघ्र घेऊन ये आणि ह्यास कोणीही अडथळा न करो. खरोखर तूं धनाचा स्वामी आहेस हें आम्ही जाणतों. पीत वर्ण अश्वांवर आरूढ होणार्‍या हे इंद्रा, जी कांही श्रेष्ठ संपत्ति तुझ्या जवळ अर्पण करण्याजोगी असेल ती तूं आम्हांस देऊन टाक. ॥ ९ ॥


अ॒स्मे प्र य॑न्धि मघवन्नृजीषि॒न्निन्द्र॑ रा॒यो वि॒श्ववा॑रस्य॒ भूरेः॑ ।
अ॒स्मे श॒तं श॒रदो॑ जी॒वसे॑ धा अ॒स्मे वी॒राञ्छश्व॑त इन्द्र शिप्रिन् ॥ १० ॥

अस्मे प्र यंधि मघऽवन्नृजीषिन्निंद्र रायः विश्ववारस्य भूरेः ।
अस्मे शतं शरदः जीवसे धा अस्मे वीराञ्छश्वत इंद्र शिप्रिन् ॥ १० ॥

हे सरल वृत्तीच्या उदार इंद्रा सर्वांना हवीशी वाटणारी अशी विपुल संपत्ति आम्हांस अर्पण कर. ह्या जगांत आम्हांस हयात राहण्याकरितां शंभर वर्षें आयुष्य दे आणि सुंदर मुकुटानें युक्त अशा हे इंद्रा, आमच्याकडे सतत राहणार्‍या वीर पुरुषांची भरती कर. ॥ १० ॥


शु॒नं हु॑वेम म॒घवा॑न॒मिन्द्र॑म॒स्मिन्भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शृ॒ण्वन्त॑मु॒ग्रमू॒तये॑ स॒मत्सु॒ घ्नन्तं॑ वृ॒त्राणि॑ सं॒जितं॒ धना॑नाम् ॥ ११ ॥

शुनं हुवेम मघऽवानं इंद्रं अस्मिन् भरे नृऽतमं वाजऽसातौ ।
शृण्वंतं उग्रं ऊतये समत्ऽसु घ्नंतं वृत्राणि संऽजितं धनानाम् ॥ ११ ॥

जो प्रत्यक्ष सौख्यच आहे, ज्याचें शौर्य अप्रतीम आहे, उग्र असतांही युद्धांत संरक्षणासाठीं हांक मारली असतां जो ती कळवळ्यानें ऐकतो, जो दुष्टांचा वध करणारा आहे व जो संपत्ति जिंकून आणतो अशा त्या इंद्रास आपला हा उत्साहवर्धक सोम सिद्ध झाला असल्यामुळें आपण निमंत्रण करूं या. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ३७ (इंद्र सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - गायत्री, अनुष्टुप्


वार्त्र॑हत्याय॒ शव॑से पृतना॒षाह्या॑य च । इन्द्र॒ त्वा व॑र्तयामसि ॥ १ ॥

वार्त्रहत्याय शवसे पृतनाषाह्याय च । इंद्र त्वा वर्तयामसि ॥ १ ॥

इंद्रा, दुष्टाचें हनन करण्याजोगें आणि शत्रूची खोड मोडण्याइतके सामर्थ्य तूं प्रकट करावें म्हणून आम्ही तुझें मन वळवीत आहों. ॥ १ ॥


अ॒र्वा॒चीनं॒ सु ते॒ मन॑ उ॒त चक्षुः॑ शतक्रतो । इन्द्र॑ कृ॒ण्वन्तु॑ वा॒घतः॑ ॥ २ ॥

अर्वाचीनं सु ते मन उत चक्षुः शतक्रतः । इंद्र कृण्वंतु वाघतः ॥ २ ॥

शतावधी सामर्थ्यें ज्याचें अंगी आहेत अशा हे इंद्रा स्तुतिकर्ते भक्तजन तुझी दृष्टि आणि तुझें मन आम्हाविषयीं सानुकूल करोत. ॥ २ ॥


नामा॑नि ते शतक्रतो॒ विश्वा॑भिर्गी॒र्भिरी॑महे । इन्द्रा॑भिमाति॒षाह्ये॑ ॥ ३ ॥

नामानि ते शतक्रतः विश्वाभिर्गीर्भिरीमहे । इंद्रभिमातिषाह्ये ॥ ३ ॥

शतावधी सामर्थ्यानें युक्त असणार्‍या हे इंद्रा, जितकी वाक् शक्ति आमच्या अंगांत आहे तितकी सर्व खर्च करून आम्ही तुझी नांवें तूं आम्हावर हल्ला करणार्‍यांची खोड मोडावी म्हणून आवडीनें घेत असतों. ॥ ३ ॥


पु॒रु॒ष्टु॒तस्य॒ धाम॑भिः श॒तेन॑ महयामसि । इन्द्र॑स्य चर्षणी॒धृतः॑ ॥ ४ ॥

पुरुष्टुतस्य धामभिः शतेन महयामसि । इंद्रस्य चर्षणीधृतः ॥ ४ ॥

इंद्राची शेंकडों प्रकारांनी दृगोच्चर होणारी कांति अवलोकन करून मी इंद्राची महती वर्णन करतो. तो मानवांचा पोषणकर्ता असून अनेकांनी त्याची स्तुति केली आहे. ॥ ४ ॥


इन्द्रं॑ वृ॒त्राय॒ हन्त॑वे पुरुहू॒तमुप॑ ब्रुवे । भरे॑षु॒ वाज॑सातये ॥ ५ ॥

इंद्रं वृत्राय हंतवे पुरुहूतमुप ब्रुवे । भरेषु वाजऽसातये ॥ ५ ॥

सोमरसाच्या अर्पपणानें इंद्रास हुषारी यावी व त्यानें वृत्राचा वध करावा म्हणून अनेक भक्तांनी पाचारण केलेल्या त्यास मी पाचारण करतों. ॥ ५ ॥


वाजे॑षु सास॒हिर्भ॑व॒ त्वामी॑महे शतक्रतो । इन्द्र॑ वृ॒त्राय॒ हन्त॑वे ॥ ६ ॥

वाजेषु सासहिर्भव त्वामीमहे शतक्रतः । इंद्र वृत्राय हंतवे ॥ ६ ॥

पराक्रम दाखविण्याचे प्रसंगी तूंच विजयी हो. शतावधी समर्थ्य अंगी असणार्‍या हे इंद्रा, तूं वृत्राचा वध करावा म्हणून आम्ही तुझ्या आगमनाची इच्छा करीत आहोंत. ॥ ६ ॥


द्यु॒म्नेषु॑ पृत॒नाज्ये॑ पृत्सु॒तूर्षु॒ श्रवः॑सु च । इन्द्र॒ साक्ष्वा॒भिमा॑तिषु ॥ ७ ॥

द्युम्नेषु पृतनाज्ये पृत्सुतूर्षु श्रवःसु च । इंद्र साक्ष्वाभिमातिषु ॥ ७ ॥

वैभवें प्राप्त करून घेण्याचे प्रसंगी, युद्धाचे वेळीं अथवा जेव्हां लढाईंत विजयी होऊन कीर्ति मिळवावयाची असेल तेव्हां हे इंद्रा तुझ्या विरुद्ध चाल करून येणार्‍या शत्रूस तूंच जेरीस आण. ॥ ७ ॥


शु॒ष्मिन्त॑मं न ऊ॒तये॑ द्यु॒म्निनं॑ पाहि॒ जागृ॑विम् । इन्द्र॒ सोमं॑ शतक्रतो ॥ ८ ॥

शुष्मिंतमं न ऊतये द्युम्निनं पाहि जागृविम् । इंद्र सोमं शतक्रतः ॥ ८ ॥

शतावधी सामर्थ्य धारण करणार्‍या हे इंद्रा आमच्या कल्याणाकरितां हा चेतना उत्पन्न करणारा व अत्यंत शक्तिमान असा उज्वल सोमरस पी. ॥ ८ ॥


इ॒न्द्रि॒याणि॑ शतक्रतो॒ या ते॒ जने॑षु प॒ञ्चसु॑ । इन्द्र॒ तानि॑ त॒ आ वृ॑णे ॥ ९ ॥

इंद्रियाणि शतक्रतः या ते जनेषु पञ्चसु । इंद्र तानि त आ वृणे ॥ ९ ॥

शतावधी सामर्थ्य धारण करणार्‍या हे इंद्रा ज्या तुझ्या शक्ति पांचही वर्गाच्या लोकांत प्रकट झाल्या आहेत त्यांची मी स्थापना करीत आहे. ॥ ९ ॥


अग॑न्निन्द्र॒ श्रवो॑ बृ॒हद्द्यु॒म्नं द॑धिष्व दु॒ष्टर॑म् । उत्ते॒ शुष्मं॑ तिरामसि ॥ १० ॥

अगन्निंद्र श्रवः बृहद्द्युम्नं दधिष्व दुष्टरम् । उत्ते शुष्मं तिरामसि ॥ १० ॥

हे इंद्रा, तूं अतिशय कीर्ति संपादन केली आहेस. ज्यास कोणालाही अपाय करतां येणार नाही असें वैभव आम्हांस दे. आम्ही तुझ्या प्रतापाचा सर्वत्र प्रसार करूं ॥ १० ॥


अ॒र्वा॒वतो॑ न॒ आ ग॒ह्यथो॑ शक्र परा॒वतः॑ । उ॒ लो॒को यस्ते॑ अद्रिव॒ इन्द्रे॒ह तत॒ आ ग॑हि ॥ ११ ॥

अर्वावतः न आ गह्यथः शक्र परावतः । ऊं इति लोकः यस्ते अद्रिव इंद्रेह तत आ गहि ॥ ११ ॥

हे सामर्थ्यवान देवा जवळच्या प्रदेशांतून आणि लांबच्या प्रदेशांतून आमचेकडे ये. वज्रधारी इंद्रा जो तुझा लोक आहे तेथून ह्या ठिकाणीं आगमन कर. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ३८ (संपात सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


अ॒भि तष्टे॑व दीधया मनी॒षामत्यो॒ न वा॒जी सु॒धुरो॒ जिहा॑नः ।
अ॒भि प्रि॒याणि॒ मर्मृ॑श॒त्परा॑णि क॒वीँरि॑च्छामि सं॒दृशे॑ सुमे॒धाः ॥ १ ॥

अभि तष्टेव दीधया मनीषामत्यः न वाजी सुधुरः जिहानः ।
अभि प्रियाणि मर्मृशत्पराणि कवीन्रिच्छामि संदृशे सुमेधाः ॥ १ ॥

रथास जोडण्यास सुलभ अशा एखाद्या सामर्थ्यवान अश्वाप्रमाणे त्वरेनें जाऊन कुशल कारागिराप्रमाणें आपलें स्तोत्र नीट सजव. जीं उत्कृष्ट प्रकारचीं सुखें असतील त्यांचा अनुभव घे. उत्तम बुद्धीनें युक्त असा मी प्रज्ञावान पुरुषांच्या दर्शनाची इच्छा प्रकट करीत आहे. ॥ १ ॥


इ॒नोत पृ॑च्छ॒ जनि॑मा कवी॒नां म॑नो॒धृतः॑ सु॒कृत॑स्तक्षत॒ द्याम् ।
इ॒मा उ॑ ते प्र॒ण्यो३वर्ध॑माना॒ मनो॑वाता॒ अध॒ नु धर्म॑णि ग्मन् ॥ २ ॥

इनोत पृच्छ जनिमा कवीनां मनोधृतः सुऽकृतस्तक्षत द्याम् ।
इमा ऊं इति ते प्रण्यो३वर्धमाना मनोवाता अध नु धर्मणि ग्मन् ॥ २ ॥

आणि आतां सामर्थ्यानें युक्त अशा कवींचा जन्म कसा झाला ह्याची चौकशी कर. आपल्या मनाची इच्छा खरी करणार्‍या आणि शोभणारी कृत्यें करणार्‍या त्या प्रज्ञावंतांनी स्वर्ग लोक निर्माण केला आणि नंतर ह्या तुझ्या मनापासून - अंतःकरणापासून - स्फूर्ति पावलेल्या व वृद्धिंगत होणार्‍या स्तुति यज्ञामध्यें त्याचेप्रत जाऊन पोंचल्या. ॥ २ ॥


नि षी॒मिदत्र॒ गुह्या॒ दधा॑ना उ॒त क्ष॒त्राय॒ रोद॑सी॒ सम॑ञ्जन् ।
सम्मात्रा॑भिर्ममि॒रे ये॒मुरु॒र्वी अ॒न्तर्म॒ही समृ॑ते॒ धाय॑से धुः ॥ ३ ॥

नि षीमिदत्र गुह्या दधाना उत क्षत्राय रोदसी समञ्जन् ।
सम्मात्राभिर्ममिरे येमुरुर्वी अंतर्मही समृते धायसे धुः ॥ ३ ॥

नंतर ह्या जगांत गुह्य शक्ति धारण करणार्‍या त्या प्रज्ञाशीलांनी आपणास आचार कृत्यें करावयास सांपडावींत म्हणून द्यावापृथिवीस सुशोभित केलें. त्यांनी मोजण्याचीं साधनें घेऊन त्याचें मापन केलें आणि त्या विशाल द्यावा पृथिवीस स्थिरता आणली. त्या पूर्वीं एकमेकांशी संलग्न असतां त्यांनी त्या दोघींस शाश्वतपणा आणण्याकरितां त्यांच्या त्यांच्या मर्यादेच्या आंत आणून ठेवलें. ॥ ३ ॥


आ॒तिष्ठ॑न्तं॒ परि॒ विश्वे॑ अभूष॒ञ्छ्रियो॒ वसा॑नश्चरति॒ स्वरो॑चिः ।
म॒हत्तद्वृष्णो॒ असु॑रस्य॒ नामा वि॒श्वरू॑पो अ॒मृता॑नि तस्थौ ॥ ४ ॥

आतिष्ठंतं परि विश्वे अभूषञ्छ्रियः वसानश्चरति स्वरोचिः ।
महत्तद्वृष्णः असुरस्य नामा विश्वरूपः अमृतानि तस्थौ ॥ ४ ॥

तो तेथें उभा असतंना सर्वांनी त्यांस अलंकृत केलें. स्वतःच्या तेजाचा पोषाख चढवून सर्वांस प्रिय असलेला तो इंद्र संचार करीत असतो. विश्वाची घडामोड करणार्‍या त्या पराक्रमी देवांचें नांव मोठें आहे. सर्व प्रकारची रूपें धारण करून त्यानें चरणरहित अशा प्रदेशास व्याप्त करून टाकलें. ॥ ४ ॥


असू॑त॒ पूर्वो॑ वृष॒भो ज्याया॑नि॒मा अ॑स्य शु॒रुधः॑ सन्ति पू॒र्वीः ।
दिवो॑ नपाता वि॒दथ॑स्य धी॒भिः क्ष॒त्रं रा॑जाना प्र॒दिवो॑ दधाथे ॥ ५ ॥

असूत पूर्वः वृषभः ज्यायानिमा अस्य शुरुधः संति पूर्वीः ।
दिवः नपाता विदथस्य धीभिः क्षत्रं राजाना प्रदिवः दधाथे ॥ ५ ॥

सर्वांच्यापेक्षां वयानें जास्त असा हा सामर्थ्यवान देव पहिल्यानें उत्पन्न झाला आणि प्रथन उत्पन्न झालेलीं हीं त्याचीं सामर्थ्यें होत. हे उभय राजांनो, हे स्वर्गलोकाच्या पुत्रांनो, यज्ञांतील स्तुतींमुळेंच तुम्हाला प्राचीन काळापासून बल प्राप्त झालें आहे. ॥ ५ ॥


त्रीणि॑ राजाना वि॒दथे॑ पु॒रूणि॒ परि॒ विश्वा॑नि भूषथः॒ सदां॑सि ।
अप॑श्य॒मत्र॒ मन॑सा जग॒न्वान्व्र॒ते ग॑न्ध॒र्वाँ अपि॑ वा॒युके॑शान् ॥ ६ ॥

त्रीणि राजाना विदथे पुरूणि परि विश्वानि भूषथः सदांसि ।
अपश्यमत्र मनसा जगन्वान्व्रते गंधर्वान् अपि वायुकेशान् ॥ ६ ॥

हे राजांनो, तुम्ही तीनच काय पण अनेक अथवा सर्वच स्थानें सुशोभित करीत असतां. येथें ह्या पवित्र विधीच्या ठिकाणीं मी मनानें परिभ्रमण करतां करतां ज्यांचे केश वायुरूप आहेत असे गंधर्व देखील पाहिले. ॥ ६ ॥


तदिन्न्वस्य वृष॒भस्य॑ धे॒नोरा नाम॑भिर्ममिरे॒ सक्म्यं॒ गोः ।
अ॒न्यद॑न्यदसु॒र्यं१वसा॑ना॒ नि मा॒यिनो॑ ममिरे रू॒पम॑स्मिन् ॥ ७ ॥

तदिन्न्वस्य वृषभस्य धेनोरा नामभिर्ममिरे सक्म्यं गोः ।
अन्यदन्यदसुर्यं१वसाना नि मायिनः ममिरे रूपमस्मिन् ॥ ७ ॥

खरोखर त्या सामर्थ्यवान धेनूचाच हा प्रभाव होय कीं त्यांचीं नांवे जपल्याबरोबर त्या धेनूंपासून उत्पन्न झालेलीं मधुर द्रव्यें त्यांना मोजतां आलीं. युक्ति प्रयुक्तिमध्यें निष्णात असणार्‍या त्यांनी आळीपाळीनें अतिशय सामर्थ्य धारण करून त्याच्या रूपाचें मापन त्याच्याच शरीरांत केलें ॥ ७ ॥


तदिन्न्वस्य सवि॒तुर्नकि॑र्मे हिर॒ण्ययी॑म॒मतिं॒ यामशि॑श्रेत् ।
आ सु॑ष्टु॒ती रोद॑सी विश्वमि॒न्वे अपी॑व॒ योषा॒ जनि॑मानि वव्रे ॥ ८ ॥

तदिन्न्वस्य सवितुर्नकिर्मे हिरण्ययीममतिं यामशिश्रेत् ।
आ सुष्टुती रोदसी विश्वमिन्वे अपीव योषा जनिमानि वव्रे ॥ ८ ॥

खरोखर तो त्या सवित्याचा प्रभाव. माझ्या सारख्या दुर्बलाचा नव्हे कीं, त्यानें सुवर्णाप्रमाणें उज्वल कांति धारण केली. स्तुतींनी मोहित होऊन त्यानें सर्व विधीचें पोषण करणार्‍या द्यावा पृथिवीस ज्याप्रमाणें एखादी स्त्री आपल्या मुलांस कवटाळून घेते त्याप्रमाणें कवटाळून धरलें. ॥ ८ ॥


यु॒वं प्र॒त्नस्य॑ साधथो म॒हो यद्दैवी॑ स्व॒स्तिः परि॑ णः स्यातम् ।
गो॒पाजि॑ह्वस्य त॒स्थुषो॒ विरू॑पा॒ विश्वे॑ पश्यन्ति मा॒यिनः॑ कृ॒तानि॑ ॥ ९ ॥

युवं प्रत्नस्य साधथः महः यद्दैवी स्वस्तिः परि णः स्यातम् ।
गोपाजिह्वस्य तस्थुषः विरूपा विश्वे पश्यंति मायिनः कृतानि ॥ ९ ॥

जें कार्य त्या श्रेष्ठ पुराण पुरुषानें आरंभिले तें तुम्ही दोघे सिद्धीस नेत असतां तुम्ही आमच्या समीपच असा, म्हणजे दैवी समाधान आम्हांस प्राप्त होईल. अभय वचनें देत जो हा देव उभा राहिलेला आहे त्यच्या नानाविध कृति चतुर लोकांना ओळखता येतात. ॥ ९ ॥


शु॒नं हु॑वेम म॒घवा॑न॒मिन्द्र॑म॒स्मिन्भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शृ॒ण्वन्त॑मु॒ग्रमू॒तये॑ स॒मत्सु॒ घ्नन्तं॑ वृ॒त्राणि॑ सं॒जितं॒ धना॑नाम् ॥ १० ॥

शुनं हुवेम मघऽवानमिंद्रमस्मिन्भरे नृतमं वाजऽसातौ ।
शृण्वंतमुग्रमूतये समत्सु घ्नंतं वृत्राणि संजितं धनानाम् ॥ १० ॥

जो प्रत्यक्ष सौख्यच आहे, ज्याचें शौर्य अप्रतीम आहे, उग्र असतांही युद्धांत संरक्षणासाठीं हांक मारली असतां जो ती कळवळ्यानें ऐकतो, जो दुष्टांचा वध करणारा आहे व जो संपत्ति जिंकून आणतो अशा त्या इंद्रास आपला हा उत्साहवर्धक सोम सिद्ध झाला असल्यामुळें आपण निमंत्रण करूं या. ॥ १० ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ३९ (इंद्र सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्


इन्द्रं॑ म॒तिर्हृ॒द आ व॒च्यमा॒नाच्छा॒ पतिं॒ स्तोम॑तष्टा जिगाति ।
या जागृ॑विर्वि॒दथे॑ श॒स्यमा॒नेन्द्र॒ यत्ते॒ जाय॑ते वि॒द्धि तस्य॑ ॥ १ ॥

इंद्रं मतिर्हृद आ वच्यमानाच्छा पतिं स्तोमतष्टा जिगाति ।
या जागृविर्विदथे शस्यमानेंद्र यत्ते जायते विद्धि तस्य ॥ १ ॥

जी स्तुति जागृत बुद्धीनें परिपूर्ण आहे, जी यज्ञप्रसंगी म्हटली जात असते, जीची रचना गौरवयुक्त वाक्यांनी झालेली आहे व जिचें पठण भक्ताच्या अगदीं अंतःकरणापासून होत आहे ती तिचा नाथ जो इंद्र त्यास शोधीत त्याच्याकडे चालली आहे. हे इंद्रा जें स्तोत्र तुझ्या करितां जन्म पावलें तें तूंही विदित करून घे. ॥ १ ॥


दि॒वश्चि॒दा पू॒र्व्या जाय॑माना॒ वि जागृ॑विर्वि॒दथे॑ श॒स्यमा॑ना ।
भ॒द्रा वस्त्रा॒ण्यर्जु॑ना॒ वसा॑ना॒ सेयम॒स्मे स॑न॒जा पित्र्या॒ धीः ॥ २ ॥

दिवश्चिदा पूर्व्या जायमाना वि जागृविर्विदथे शस्यमाना ।
भद्रा वस्त्राण्यर्जुना वसाना सेयमस्मे सनजा पित्र्या धीः ॥ २ ॥

हीच आमची परंपरागत चालत आलेली स्तुति होय कीं जी पूर्वीं थेट स्वर्गांतून जन्म पावली होती, जी जागृत बुद्धीनें युक्त आहे, जी यज्ञप्रसंगी म्हणण्यांत येते, जी मंगलमय आहे व जिनें उज्वल वेष धारण केलेला आहे. ॥ २ ॥


य॒मा चि॒दत्र॑ यम॒सूर॑सूत जि॒ह्वाया॒ अग्रं॒ पत॒दा ह्यस्था॑त् ।
वपूं॑षि जा॒ता मि॑थु॒ना स॑चेते तमो॒हना॒ तपु॑षो बु॒ध्न एता॑ ॥ ३ ॥

यमा चिदत्र यमसूरसूत जिह्वाया अग्रं पतदा ह्यस्थात् ।
वपूंषि जाता मिथुना सचेते तमोहना तपुषः बुध्न एता ॥ ३ ॥

खरोखर ह्या दोघा देवांच्या मातेनें त्यांस येथें जन्म दिला. व तें पाहून माझ्या जिव्हेचें अग्र स्तवनोत्सुक होऊन स्फुरण पावूं लागलें परंतु अखेर ते कुंठीतच झालें. प्रकाशाच्या अगदीं जन्मस्थानींच अंधःकाराचा बींमोड करणारे हे दोघे देव अवतीर्ण झाल्याबरोबर त्यांस मनोहर रूपें प्राप्त झाली. ॥ ३ ॥


नकि॑रेषां निन्दि॒ता मर्त्ये॑षु॒ ये अ॒स्माकं॑ पि॒तरो॒ गोषु॑ यो॒धाः ।
इन्द्र॑ एषां दृंहि॒ता माहि॑नावा॒नुद्गो॒त्राणि॑ ससृजे दं॒सना॑वान् ॥ ४ ॥

नकिरेषां निंदिता मर्त्येषु ये अस्माकं पितरः गोषु योधाः ।
इंद्र एषां दृंहिता माहिनावानुद्गोत्राणि ससृजे दंसनावान् ॥ ४ ॥

खरोखर ज्या आमच्या पितरांनी धेनूंच्या प्राप्त्यर्थ युद्ध केलें त्यांची निंदा करील असा अखिल मानवांमध्यें कोणीही नसेल. श्रेष्ठ व महा पराक्रमी इंद्रानें गाई कोंडून ठेवलेले बळकट किल्ले त्यांचे करितां भेदून टाकले. ॥ ४ ॥


सखा॑ ह॒ यत्र॒ सखि॑भि॒र्नव॑ग्वैरभि॒ज्ञ्वा सत्व॑भि॒र्गा अ॑नु॒ग्मन् ।
स॒त्यं तदिन्द्रो॑ द॒शभि॒र्दश॑ग्वैः॒ सूर्यं॑ विवेद॒ तम॑सि क्षि॒यन्त॑म् ॥ ५ ॥

सखा ह यत्र सखिभिर्नवग्वैरभिज्ञ्वा सत्वभिर्गा अनुग्मन् ।
सत्यं तदिंद्रः दशभिर्दशग्वैः सूर्यं विवेद तमसि क्षियंतम् ॥ ५ ॥

खरोखर ज्या ठिकाणीं आपले शूर मित्र जे नवग्व त्यांच्याशीं सख्य करणारा इंद्र गुडघ्यावर सरपटत धेनूंच्या शोधार्थ गेला. त्याच ठिकाणीं दहा दशग्वांसहवर्तमान त्यास अंधःकरांत बुडालेला सूर्य आढळून आला. ॥ ५ ॥


इन्द्रो॒ मधु॒ सम्भृ॑तमु॒स्रिया॑यां प॒द्वद्वि॑वेद श॒फव॒न्नमे॒ गोः ।
गुहा॑ हि॒तं गुह्यं॑ गू॒ळ्हम॒प्सु हस्ते॑ दधे॒ दक्षि॑णे॒ दक्षि॑णावान् ॥ ६ ॥

इंद्रः मधु सम्भृतमुस्रियायां पद्वद्विवेद शफवन्नमे गोः ।
गुहा हितं गुह्यं गूळ्हमप्सु हस्ते दधे दक्षिणे दक्षिणावान् ॥ ६ ॥

गाई कोंडलेल्या जागीं इंद्रास धेनूच्या शरीरांत सांठवलेले मधुर पेय सांपडले व पाउले आणि खूर असलेले पशूही आढळून आले. त्या उदार इंद्रानें गुहेंत ठेवलेलें व उदकांत दडवलेले असें गुप्त भांडार आपल्या उजव्या हातामध्यें धारण केलें. ॥ ६ ॥


ज्योति॑र्वृणीत॒ तम॑सो विजा॒नन्ना॒रे स्या॑म दुरि॒ताद॒भीके॑ ।
इ॒मा गिरः॑ सोमपाः सोमवृद्ध जु॒षस्वे॑न्द्र पुरु॒तम॑स्य का॒रोः ॥ ७ ॥

ज्योतिर्वृणीत तमसः विजानन्नारे स्याम दुरितादभीके ।
इमा गिरः सोमपाः सोमवृद्ध जुषस्वेंद्र पुरुतमस्य कारोः ॥ ७ ॥

अंधःकारास ओळखून इंद्र प्रकाशाच्या शोधार्थ गेला. आपणही आपल्या समीप भिडलेल्या दुरितापासून दूर जाऊं. सोमाने वृद्धि पावणार्‍या हे इंद्रा, तूं सोमपान करशील तेव्हां ह्या अत्यंत नम्र भक्ताच्याही स्तोत्राचा अंगिकार कर. ॥ ७ ॥


ज्योति॑र्य॒ज्ञाय॒ रोद॑सी॒ अनु॑ ष्यादा॒रे स्या॑म दुरि॒तस्य॒ भूरेः॑ ।
भूरि॑ चि॒द्धि तु॑ज॒तो मर्त्य॑स्य सुपा॒रासो॑ वसवो ब॒र्हणा॑वत् ॥ ८ ॥

ज्योतिर्यज्ञाय रोदसी अनु ष्यादारे स्याम दुरितस्य भूरेः ।
भूरि चिद्धि तुजतः मर्त्यस्य सुपारासः वसवः बर्हणावत् ॥ ८ ॥

द्युलोक आणि भूलोक यांचे अनुकरण करून प्रकाशही आमच्या यज्ञाकडे येवो. गहन अशा दुरितापासून आपणही दूर जाऊं. हे वसूंनो खरोखर अत्यंत भक्तीनें स्तवन करणार्‍या मनुष्याच्या शत्रूंचे निर्दालन करून तुम्ही त्यास सुखानें संकटाच्या पार नेतां. ॥ ८ ॥


शु॒नं हु॑वेम म॒घवा॑न॒मिन्द्र॑म॒स्मिन्भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शृ॒ण्वन्त॑मु॒ग्रमू॒तये॑ स॒मत्सु॒ घ्नन्तं॑ वृ॒त्राणि॑ सं॒जितं॒ धना॑नाम् ॥ ९ ॥

शुनं हुवेम मघऽवानं इंद्रं अस्मिन् भरे नृऽतमं वाजऽसातौ ।
शृण्वंतं उग्रं ऊतये समत्ऽसु घ्नंतं वृत्राणि संऽजितं धनानाम् ॥ ९ ॥

जो प्रत्यक्ष सौख्यच आहे, ज्याचें शौर्य अप्रतीम आहे, उग्र असतांही युद्धांत संरक्षणासाठीं हांक मारली असतां जो ती कळवळ्यानें ऐकतो, जो दुष्टांचा वध करणारा आहे व जो संपत्ति जिंकून आणतो अशा त्या इंद्रास आपला हा उत्साहवर्धक सोम सिद्ध झाला असल्यामुळें आपण निमंत्रण करूं या. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ४० (इंद्र सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - गायत्री


इन्द्र॑ त्वा वृष॒भं व॒यं सु॒ते सोमे॑ हवामहे । स पा॑हि॒ मध्वो॒ अन्ध॑सः ॥ १ ॥

इंद्र त्वा वृषभं वयं सुते सोमे हवामहे । स पाहि मध्वः अंधसः ॥ १ ॥

हे इंद्रा, तूं सामर्थ्यवान असल्यामुळें आम्ही, सोमरस सिद्ध झाल्याबरोबर, तुला आमंत्रण करीत आहोंत. ह्या मधुर हवीचें तूं सेवन कर. ॥ १ ॥


इन्द्र॑ क्रतु॒विदं॑ सु॒तं सोमं॑ हर्य पुरुष्टुत । पिबा वृ॑षस्व॒ तातृ॑पिम् ॥ २ ॥

इंद्र क्रतुविदं सुतं सोमं हर्य पुरुष्टुत । पिबा वृषस्व तातृपिम् ॥ २ ॥

हे अनेक भक्तांच्या स्तुतीस पात्र होणार्‍या इंद्रदेवा, बुद्धीस प्रदीप्त करणार्‍या या सोमरसाचा स्वीकार कर. हा तृप्ति उत्पन्न करणारा असल्यामुळें हा पी व सामर्थ्यवान हो. ॥ २ ॥


इन्द्र॒ प्र णो॑ धि॒तावा॑नं य॒ज्ञं विश्वे॑भिर्दे॒वेभिः॑ । ति॒रः स्त॑वान विश्पते ॥ ३ ॥

इंद्र प्र णः धितावानं यज्ञं विश्वेभिर्देवेभिः । तिरः स्तवान विश्पते ॥ ३ ॥

हे सर्वस्तुत व सर्वाधिपति इंद्रा, हवींनी समृद्ध अशा आमच्या यज्ञाची सर्व देवांसहवर्तमान येऊन तूं भरभराट कर. ॥ ३ ॥


इन्द्र॒ सोमाः॑ सु॒ता इ॒मे तव॒ प्र य॑न्ति सत्पते । क्षयं॑ च॒न्द्रास॒ इन्द॑वः ॥ ४ ॥

इंद्र सोमाः सुता इमे तव प्र यंति सत्पते । क्षयं चंद्रास इंदवः ॥ ४ ॥

हे सज्ज्नांच्या अधिपति इंद्रदेवा, हे सिद्ध करून ठेवलेले आल्याददायक सोमरस तुझ्या निवासस्थानाकडे चाललेले आहेत. ॥ ४ ॥


द॒धि॒ष्वा ज॒ठरे॑ सु॒तं सोम॑मिन्द्र॒ वरे॑ण्यम् । तव॑ द्यु॒क्षास॒ इन्द॑वः ॥ ५ ॥

दधिष्वा जठरे सुतं सोममिंद्र वरेण्यम् । तव द्युक्षास इंदवः ॥ ५ ॥

इंद्रदेवा, हा सिद्ध केलेला उत्कृष्ट सोमरस आपले उदरांत ठेव. द्युलोकापर्यंत उचंबळणारे सोमबिंदु तुझे आहेत. ॥ ५ ॥


गिर्व॑णः पा॒हि नः॑ सु॒तं मधो॒र्धारा॑भिरज्यसे । इन्द्र॒ त्वादा॑त॒मिद्यशः॑ ॥ ६ ॥

गिर्वणः पाहि नः सुतं मधोर्धाराभिरज्यसे । इंद्र त्वादातमिद्यशः ॥ ६ ॥

हे स्तुतिप्रिय देवा, हा आम्ही सिद्ध केलेला सोमरस पी. मधुर सोमाच्या धारांचा तुला अभिषेकच होत आहे. हे इंद्रा, तूं देशील तेंच यश आम्हांस मिळेल. ॥ ६ ॥


अ॒भि द्यु॒म्नानि॑ व॒निन॒ इन्द्रं॑ सचन्ते॒ अक्षि॑ता । पी॒त्वी सोम॑स्य वावृधे ॥ ७ ॥

अभि द्युम्नानि वनिन इंद्रं सचंते अक्षिता । पीत्वी सोमस्य वावृधे ॥ ७ ॥

याचकाकडून सतत अर्पण होत असलेले हवि इंद्राकडे जात असतात. सोमाचें प्राशन करूनच तो बलवान झाला. ॥ ७ ॥


अ॒र्वा॒वतो॑ न॒ आ ग॑हि परा॒वत॑श्च वृत्रहन् । इ॒मा जु॑षस्व नो॒ गिरः॑ ॥ ८ ॥

अर्वावतः न आ गहि परावतश्च वृत्रहन् । इमा जुषस्व नः गिरः ॥ ८ ॥

हे वृत्रनाशक इंद्रा, तूं दूर अथवा जवळ असशील तेथून आमचेकडे ये. ह्या आमच्या स्तोत्राचा स्वीकार कर. ॥ ८ ॥


यद॑न्त॒रा प॑रा॒वत॑मर्वा॒वतं॑ च हू॒यसे॑ । इन्द्रे॒ह तत॒ आ ग॑हि ॥ ९ ॥

यदंतरा परावतमर्वावतं च हूयसे । इंद्रेह तत आ गहि ॥ ९ ॥

हे इंद्रा आम्ही जेथून तुला बोलावित असूं तेथून तूं आमचेकडे ये. मग तें जवळ असो, दूर असो, अथवा साधारण अंतरावर असो. ॥ ९ ॥


ॐ तत् सत्


GO TOP