|
ऋग्वेद - मण्डल ३ - सूक्त ४१ ते ५० ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ४१ (इंद्र सूक्त) ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - गायत्री
आ तू न॑ इन्द्र म॒द्र्यग्घुवा॒नः सोम॑पीतये । हरि॑भ्यां याह्यद्रिवः ॥ १ ॥
आ तू न इंद्र मद्र्यग्घुवानः सोमपीतये । हरिभ्यां याह्यद्रिवः ॥ १ ॥
हे वज्रधारी इंद्रा, आम्ही तुला आमंत्रण करील असल्यामुळें तूं आपल्या पीतवर्ण अश्वांवर आरूढ होऊन सोमप्राशनार्थ सत्वर इकडे ये. ॥ १ ॥
स॒त्तो होता॑ न ऋ॒त्विय॑स्तिस्ति॒रे ब॒र्हिरा॑नु॒षक् । अयु॑ज्रन्प्रा॒तरद्र॑यः ॥ २ ॥
सत्तः होता न ऋत्वियस्तिस्तिरे बर्हिरानुषक् । अयुज्रन्प्रातरद्रयः ॥ २ ॥
योग्य पूजासमय जाणणारा उपासक स्थानापन्न झाला आहे. दर्भही एकमेकांजवळ जवळ आंथरले आहेत. सकाळ होतांच सोमपाषाणांचेंही काम चालू झालें आहे. ॥ २ ॥
इ॒मा ब्रह्म॑ ब्रह्मवाहः क्रि॒यन्त॒ आ ब॒र्हिः सी॑द । वी॒हि शू॑र पुरो॒ळाश॑म् ॥ ३ ॥
इमा ब्रह्म ब्रह्मवाहः क्रियंत आ बर्हिः सीद । वीहि शूर पुरोळाशम् ॥ ३ ॥
स्तुतीचा स्वीकार करणार्या हे इंद्रा, हीं स्तोत्रें येथें होत आहेत, यास्तव तूं कुशासनावर येऊन बस. हे शूरा, ह्या हवीचा स्वीकार कर. ॥ ३ ॥
रा॒र॒न्धि सव॑नेषु ण ए॒षु स्तोमे॑षु वृत्रहन् । उ॒क्थेष्वि॑न्द्र गिर्वणः ॥ ४ ॥
रारंधि सवनेषु ण एषु स्तोमेषु वृत्रहन् । उक्थेष्विंद्र गिर्वणः ॥ ४ ॥
हे वृत्रनाशक व सोमप्रिय इंद्रा, आमच्या ह्या हवींत, स्तोत्रांत व प्रार्थनांत संतोष मान. ॥ ४ ॥
म॒तयः॑ सोम॒पामु॒रुं रि॒हन्ति॒ शव॑स॒स्पति॑म् । इन्द्रं॑ व॒त्सं न मा॒तरः॑ ॥ ५ ॥
मतयः सोमपामुरुं रिहंति शवसस्पतिम् । इंद्रं वत्सं न मातरः ॥ ५ ॥
ज्याप्रमाणे व्यालेल्या गाई आपल्या वत्सांस चाटतात त्याप्रमाणें ह्या श्रेष्ठ, सामर्थ्याधिपति व सोमप्राशन करणार्या इंद्रास आमच्या प्रार्थना बिलगत आहेत. ॥ ५ ॥
स म॑न्दस्वा॒ ह्यन्ध॑सो॒ राध॑से त॒न्वा म॒हे । न स्तो॒तारं॑ नि॒दे क॑रः ॥ ६ ॥
स मंदस्वा ह्यंधसः राधसे तन्वा महे । न स्तोतारं निदे करः ॥ ६ ॥
आम्हांस श्रेष्ठ सुख अर्पण करण्याकरितां तूं स्वतः हवीचा स्वीकार करून संतुष्ट हो. तुझ्या भक्ताची जगांत निंदा होईल असें करूं नको. ॥ ६ ॥
व॒यमि॑न्द्र त्वा॒यवो॑ ह॒विष्म॑न्तो जरामहे । उ॒त त्वम॑स्म॒युर्व॑सो ॥ ७ ॥
वयमिंद्र त्वायवः हविष्मंतः जरामहे । उत त्वमस्मयुर्वसः ॥ ७ ॥
हे इंद्रा, तुझ्या आगमनाची इच्छा धरून आम्ही हवींनी तुझी आराधना करीत आहों. तुझ्या भक्ताची जगांत निंदा होईल असें करूं नको. ॥ ७ ॥
मारे अ॒स्मद्वि मु॑मुचो॒ हरि॑प्रिया॒र्वाङ्या॑हि । इन्द्र॑ स्वधावो॒ मत्स्वे॒ह ॥ ८ ॥
मारे अस्मद्वि मुमुचः हरिप्रियार्वाङ्याहि । इंद्र स्वधावः मत्स्वेह ॥ ८ ॥
हे इंद्रा, तूं आपले घोडे आम्हांपासून लांब सोडूं नको. हे बलवान इंद्रा, तूं येथें संतोष पाव. ॥ ८ ॥
अ॒र्वाञ्चं॑ त्वा सु॒खे रथे॒ वह॑तामिन्द्र के॒शिना॑ । घृ॒तस्नू॑ ब॒र्हिरा॒सदे॑ ॥ ९ ॥
अर्वाञ्चं त्वा सुखे रथे वहतामिंद्र केशिना । घृतस्नू बर्हिरासदे ॥ ९ ॥
हे इंद्रा, लांब आयाळ असलेले व घृतानें जणूं कांही न्हालेले तुझे घोडे तुला कुशासनावर विराजमान करण्याकरितां सुखकारक रथांतून इकडे घेऊन येवोत. ॥ ९ ॥
मण्डल ३ सूक्त ४२ (इंद्र सूक्त) ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - गायत्री
उप॑ नः सु॒तमा ग॑हि॒ सोम॑मिन्द्र॒ गवा॑शिरम् । हरि॑भ्यां॒ यस्ते॑ अस्म॒युः ॥ १ ॥
उप नः सुतमा गहि सोममिंद्र गवाशिरम् । हरिभ्यां यस्ते अस्मयुः ॥ १ ॥
हे इंद्रा, ज्यांत दुग्ध मिश्रित केलें आहे अशा ह्या आम्ही सिद्ध केलेल्या सोमरसाकडे आमच्यावर ज्याचा लोभ आहे अश आपल्या रथास घोडे जोडून त्यांत बसून ये. ॥ १ ॥
तमि॑न्द्र॒ मद॒मा ग॑हि बर्हि॒ष्ठां ग्राव॑भिः सु॒तम् । कु॒विन्न्वस्य तृ॒प्णवः॑ ॥ २ ॥
तं इंद्र मदमा गहि बर्हिष्ठां ग्रावभिः सुतम् । कुविन्न्वस्य तृप्णवः ॥ २ ॥
यज्ञपाषाणांच्या योगानें पिळून दर्भांवर तयार करून ठेवलेल्या ह्या आनंददायक सोमरसाकडे ये. खरोखर ह्याचे बिंदु तृप्ति देणारे आहेत. ॥ २ ॥
इन्द्र॑मि॒त्था गिरो॒ ममाच्छा॑गुरिषि॒ता इ॒तः । आ॒वृते॒ सोम॑पीतये ॥ ३ ॥
इंद्रमित्था गिरः ममाच्छागुरिषिता इतः । आवृते सोमपीतये ॥ ३ ॥
इंद्राने सोमपान करून आमचे संरक्षण करावें ह्या हेतूनें मी अर्पण केलेल्या माझ्या प्रार्थना येथून इंद्राकडे उत्सुकतेने निघाल्या. ॥ ३ ॥
इन्द्रं॒ सोम॑स्य पी॒तये॒ स्तोमै॑रि॒ह ह॑वामहे । उ॒क्थेभिः॑ कु॒विदा॒गम॑त् ॥ ४ ॥
इंद्रं सोमस्य पीतये स्तोमैरिह हवामहे । उक्थेभिः कुविदागमत् ॥ ४ ॥
अनेक प्रार्थना करून आम्ही इंद्रास सोमपानार्थ बोलावित आहों. खरोखर तो स्तुतींच्या योगानेंच येथें आला होता. ॥ ४ ॥
इन्द्र॒ सोमाः॑ सु॒ता इ॒मे तान्द॑धिष्व शतक्रतो । ज॒ठरे॑ वाजिनीवसो ॥ ५ ॥
इंद्र सोमाः सुता इमे तांदधिष्व शतक्रतः । जठरे वाजिनीवसः ॥ ५ ॥
हे इंद्रा, येथें सोम तयार करून ठेवले आहेत. अत्यंत सामर्थ्यवान व आपल्या प्रभावानें देदीप्यमान दिसणार्या देवा, तूं त्यांस आपल्या उदरांत स्थान दे. ॥ ५ ॥
वि॒द्मा हि त्वा॑ धनंज॒यं वाजे॑षु दधृ॒षं क॑वे । अधा॑ ते सु॒म्नमी॑महे ॥ ६ ॥
विद्मा हि त्वा धनंजयं वाजेषु दधृषं कवे । अधा ते सुम्नमीमहे ॥ ६ ॥
हे प्रज्ञाशील देवा, तूं वैभवें जिंकून आणणारा व युद्धांत शत्रूंची दाणादाण करणारा आहेस हें आम्हांस माहीत आहे. ह्याकरितां तुझ्या श्रेष्ठ संपत्तीची आम्ही याचना करतों. ॥ ६ ॥
इ॒ममि॑न्द्र॒ गवा॑शिरं॒ यवा॑शिरं च नः पिब । आ॒गत्या॒ वृष॑भिः सु॒तम् ॥ ७ ॥
इममिंद्र गवाशिरं यवाशिरं च नः पिब । आगत्या वृषभिः सुतम् ॥ ७ ॥
गोरस व यव हे ज्यांत मिश्रित आहेत व खंबीर यज्ञपाषाणांच्या योगानें जो पिळून काढला आहे त्या ह्या आमच्या सोमरसाचें येथें येऊन प्राशन कर. ॥ ७ ॥
तुभ्येदि॑न्द्र॒ स्व ओ॒क्ये३सोमं॑ चोदामि पी॒तये॑ । ए॒ष रा॑रन्तु ते हृ॒दि ॥ ८ ॥
तुभ्येदिंद्र स्व ओक्ये३सोमं चोदामि पीतये । एष रारंतु ते हृदि ॥ ८ ॥
तुझ्या प्राशनार्थ व तुझ्याच करितां हा सोमरस तुझ्या निवासस्थानाकडे आम्ही पाठवीत आहों. हा तुझ्या अंतःकरणांत आनंद उत्पन्न करो. ॥ ८ ॥
त्वां सु॒तस्य॑ पी॒तये॑ प्र॒त्नोमि॑न्द्र हवामहे । कु॒शि॒कासो॑ अव॒स्यवः॑ ॥ ९ ॥
त्वां सुतस्य पीतये प्रत्नममिंद्र हवामहे । कुशिकासः अवस्यवः ॥ ९ ॥
हे इंद्रा तुझ्या कृपेची लालसा धरून आम्ही कुशिककुलोत्पन्न भक्त तुला सोमप्राशनार्थ बोलावीत आहों. तूं फार पुरातन आहेस. ॥ ९ ॥
ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ४३ (इंद्र सूक्त) ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्
आ या॑ह्य॒र्वाङुप॑ वन्धुरे॒ष्ठास्तवेदनु॑ प्र॒दिवः॑ सोम॒पेय॑म् ।
आ याह्यर्वाङुप वंधुरेष्ठास्तवेदनु प्रदिवः सोमपेयम् ।
आपले रथांत विराजमान होऊन तूं इकडे ये. खरोखर प्राचीन कालापासून सोमपानांवर तुझाच अधिकार आहे. आपल्या आवडत्या व सहाय्यकर्त्या अश्वांस तूं दर्भासनाजवळच सोडून दे. हे हवि अर्पण करणारे भक्त तुला बोलावीत आहेत. ॥ १ ॥
आ या॑हि पू॒र्वीरति॑ चर्ष॒णीराँ अ॒र्य आ॒शिष॒ उप॑ नो॒ हरि॑भ्याम् ।
आ याहि पूर्वीरति चर्षणीरान् अर्य आशिष उप नः हरिभ्याम् ।
दुसरे अनेक उपासक सोडून देऊन आपल्या अश्वांसह तूं कृपापूर्वक आमच्याच हवींकडे ये. हे इंद्रा, तुझ्या मित्रत्वाची इच्छा धारण करून ह्या कवित्वस्फूर्तीनें रचलेल्या प्रार्थना तुझीच विनवणी करीत आहेत. ॥ २ ॥
आ नो॑ य॒ज्ञं न॑मो॒वृधं॑ स॒जोषा॒ इन्द्र॑ देव॒ हरि॑भिर्याहि॒ तूय॑म् ।
आ नः यज्ञं नमोवृधं सजोषा इंद्र देव हरिभिर्याहि तूयम् ।
नमस्कृतींनी उत्कर्ष पावणाअ़या ह्या यज्ञाकडे हे इंद्रदेवा, आपल्या रथांसह सत्वर ये. घृतमिश्रित हवि सिद्ध करून आम्ही अनेक प्रकारचीं स्तोत्रें गात गात ह्या सोमपरिप्लुत यज्ञमंडपाकडे तुला बोलावीत आहो. ॥ ३ ॥
आ च॒ त्वामे॒ता वृष॑णा॒ वहा॑तो॒ हरी॒ सखा॑या सु॒धुरा॒ स्वङ्गा॑ ।
आ च त्वामेता वृषणा वहातः हरी सखाया सुधुरा स्वङ्गा ।
सामर्थ्यवान, रथास जोडण्यास सुलभ, सुंदर शरीराचे व तुला सहाय्यभूत असे तुझे अश्व तुला इकडे घेऊन येवोत. लाह्यांनी युक्त अशा माझ्या यज्ञाचा स्वीकार करीत माझा मित्र इंद्रदेव आणि त्याच्याशी मित्रत्वानें राहणारा असा मी त्या माझ्या स्तुतींचे श्रवण करो. ॥ ४ ॥
कु॒विन्मा॑ गो॒पां कर॑से॒ जन॑स्य कु॒विद्राजा॑नं मघवन्नृजीषिन् ।
कुविन्मा गोपां करसे जनस्य कुविद्राजानं मघऽवन्नृजीषिन् ।
हे इंद्रा, तूं मला लोकांचा संरक्षणकर्ता कर. हे सरल स्वभावाच्या व उदार देवा, खरोखर मला राजाही कर. सोमरस प्राशन करणारा ऋषि मला होऊ दे आणि मला अविनाशी धन अर्पण कर. ॥ ५ ॥
आ त्वा॑ बृ॒हन्तो॒ हर॑यो युजा॒ना अ॒र्वाग् इ॑न्द्र सध॒मादो॑ वहन्तु ।
आ त्वा बृहंतः हरयः युजाना अर्वाग् इंद्र सधमादः वहंतु ।
हे इंद्रा, जे घोडे अतिशय सामर्थ्यवान असा जो तूं त्या तुझी थाप पाठीवर पडतांच बेफाम होऊन दोन दिशांनी द्युलोकाच्या सीमापर्यंत एकसारखें धांवूं लागतात ते तुझेबरोबर सोमप्राशनाने आनंदित होणरे तुझे श्रेष्ठ अश्व तुझ्या रथास जोडले जाऊन तुला इकडे घेऊन येवोत. ॥ ६ ॥
इन्द्र॒ पिब॒ वृष॑धूतस्य॒ वृष्ण॒ आ यं ते॑ श्ये॒न उ॑श॒ते ज॒भार॑ ।
इंद्र पिब वृषधूतस्य वृष्ण आ यं ते श्येन उशते जभार ।
हे इंद्रा, तू तृषित झाला असतां ज्यास तुझेसाठी श्येन पक्ष्यानें इकडे आणले, त्याच्या आनंदाच्या भरांत तूं शत्रुजनांची दाणादाण करतोस व ज्याचे सुखाचे तंद्रीत तूं धेनूंची कारागृहें खुली करून टाकलीस तो शूर लोकांनी पिळून काढलेला शौर्ययुक्त सोमरस तूं येथें पी. ॥ ७ ॥
शु॒नं हु॑वेम म॒घवा॑न॒मिन्द्र॑म॒स्मिन्भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शुनं हुवेम मघऽवानमिंद्रमस्मिन्भरे नृतमं वाजऽसातौ ।
वैभवान आणि पराक्रमी अशा सौख्यदायक इंद्रास पराक्रमाची प्राप्ति होण्याकरितां आम्ही हा सोमरस अर्पण करून बोलावूं. भक्ताची हांक ऐकणारा, उग्र, शत्रूंना मारणारा व धन जिंकून आणणारा जो इंद्र त्यास आम्ही साहाय्यासाठीं युद्धाम्ध्यें हांक मारूं. ॥ ८ ॥
ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ४४ (इंद्र सूक्त) ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - बृहती
अ॒यं ते॑ अस्तु हर्य॒तः सोम॒ आ हरि॑भिः सु॒तः ।
अयं ते अस्तु हर्यतः सोम आ हरिभिः सुतः ।
हा सुंदर पाषाणांच्या योगानें पिळून काढलेला सुंदर सोमरस तुला अर्पण असो. हे इंद्रा तूं येऊन त्याचा स्वीकार कर. तूं सुंदर रथांत विराजमान हो. ॥ १ ॥
ह॒र्यन्नु॒षस॑मर्चयः॒ सूर्यं॑ ह॒र्यन्न॑रोचयः ।
हर्यन्नुषसमर्चयः सूर्यं हर्यन्नरोचयः ।
तूं सुंदर असल्यामुळें उषेस प्रकाशित करतोस व सूर्याची प्रभा पाडतोस. हे पीतवर्ण अश्वांच्या स्वामी इंद्रा, तूं विद्वान आणि ज्ञानवान अशा सर्व वैभवाचें चोहोंकडून वर्धन करतोस. ॥ २ ॥
द्यामिन्द्रो॒ हरि॑धायसं पृथि॒वीं हरि॑वर्पसम् ।
द्यामिंद्रः हरिधायसं पृथिवीं हरिवर्पसम् ।
ज्या दोहोंच्यामध्यें पीतवर्ण कांतीनें युक्त असा इंद्र संचार करीत असतो त्या सुंदर द्यावापृथिवींना इंद्रानेंच सांवरून धरलें आहे. ह्या द्यावापृथिवींवरच त्याच्या अश्वांचे सर्वथैव पोषण होत असतें. ॥ ३ ॥
ज॒ज्ञा॒नो हरि॑तो॒ वृषा॒ विश्व॒म् आ भा॑ति रोच॒नम् ।
जज्ञानः हरितः वृषा विश्वम् आ भाति रोचनम् ।
सर्वज्ञ, सामर्थ्यवान व सुंदर असा तो देव सर्वत्र उज्वल प्रकाश उत्पन्न करीत असतो. पीतवर्ण अश्वांचा स्वामी असा तो देव सुंदर आयुधें व सुंदर वज्र आपल्या बाहूंवर धारण करतो. ॥ ४ ॥
इन्द्रो॑ ह॒र्यन्त॒मर्जु॑नं॒ वज्रं॑ शु॒क्रैर॒भीवृ॑तम् ।
इंद्रः हर्यंतमर्जुनं वज्रं शुक्रैरभीवृतम् ।
सुंदर, शुभ्र व उज्वल तेजानें युक्त असलेल्या वज्रास इंद्रानें धारण केलें. सुंदर यज्ञपाषाणांनी पिळून काढलेल्या सोमरसाचा त्यानें शोध लावला व आपल्या पीतवर्ण अश्वांच्या साहाय्यानें त्यानें प्रतिबंधांत पडलेल्या गाईंस बाहेर काढले. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ४५ (इंद्र सूक्त) ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - बृहती
आ म॒न्द्रैरि॑न्द्र॒ हरि॑भिर्या॒हि म॒यूर॑रोमभिः ।
आ मंद्रैरिंद्र हरिभिर्याहि मयूररोमभिः ।
हे इंद्रा, मोरांच्या पिसार्याप्रमाणें ज्यांचे केश आहेत अशा त्या आनंदी पिंवळ्या घोड्यांसहवर्तमान तूं ये. ज्याप्रमाणे फांसेपारधी पांखरांना जाळ्यांत अडकवितात त्याप्रमाणे तुला कोणीही प्रतिबंध न करोत. ज्याप्रमाणें निर्जल प्रदेशांना वर्ज करावें त्याप्रमाणें अशा लोकांना वर्ज करून तूं इकडे ये. ॥ १ ॥
वृ॒त्र॒खा॒दो व॑लंरु॒जः पु॒रां द॒र्मो अ॒पाम॒जः ।
वृत्रखादः वलंरुजः पुरां दर्मः अपामजः ।
इंद्र हा वृत्राचा वध करणारा, वलाचा उच्छेदक, शत्रूंचे किल्ले फोडणारा, उदकांना गति देणारा, पीतवर्ण अश्वांना हांकण्याकरितां रथांत बसणारा आणि दृढ वस्तूंनाही फोडणारा असा आहे. ॥ २ ॥
ग॒म्भी॒राँ उ॑द॒धीँरि॑व॒ क्रतुं॑ पुष्यसि॒ गा इ॑व ।
गम्भीरान् उदधीन्रिव क्रतुं पुष्यसि गा इव ।
हे इंद्रा, गंभीर महासागर अथवा पुष्ट धेनू ह्यांचेप्रमाणें तूं सामर्थ्यांना भरती आणतोस. त्याप्रमाणें चांगल्या तऱ्हेनें पाळलेल्या गाई चरण्याच्या स्थलाकडे जातात अथवा उदकाचे निरनिराळे पाट एखाद्या मोठ्या डोहांत निमग्न होतात त्याप्रमाणे सर्व सामर्थ्यें तुझ्या ठायीं एकत्र झालीं आहेत. ॥ ३ ॥
आ न॒स्तुजं॑ र॒यिं भ॒रांशं॒ न प्र॑तिजान॒ते ।
आ नस्तुजं रयिं भरांशं न प्रतिजानते ।
जाणत्या मुलाला संपत्तीचा वाटेकरी बनविल्याप्रमाणें शत्रूंचा नाश करण्यास उपयोगीं पडणारी अशी संपत्ति आम्हांस अर्पण कर. हे इंद्रा, ज्याप्रमाणें एखादा मनुष्य आंकडी घेऊन झाडावरचीं पिकलेली फळें काढून घेतो त्याप्रमाणें संकटकालीं उपयोगी पडणारें असें वैभव तूं आम्हांपुढें आणून फेंक. ॥ ४ ॥
स्व॒युरि॑न्द्र स्व॒राळ॑सि॒ स्मद्दि॑ष्टिः॒ स्वय॑शस्तरः ।
स्वयुरिंद्र स्वराळसि स्मद्दिष्टिः स्वयशस्तरः ।
हे इंद्रा, तूं स्वतंत्र सम्राट आहेस. तूं चांगल्या आज्ञा करणारा व स्वयशानें शोभणारा आहेस. अनेक भक्तांच्या स्तुतीस पात्र होणार्या हे इंद्रा, तूं आपल्या सामर्थ्यानें वृद्धिंगत होऊन आम्हांस कीर्तिची जोड करून देणारा हो. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ४६ (इंद्र सूक्त) ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्
यु॒ध्मस्य॑ ते वृष॒भस्य॑ स्व॒राज॑ उ॒ग्रस्य॒ यून॒ स्थवि॑रस्य॒ घृष्वेः॑ ।
युध्मस्य ते वृषभस्य स्वराज उग्रस्य यून स्थविरस्य घृष्वेः ।
हे इंद्रा, तूं युद्धप्रवीण, स्वतः तेजानें युक्त, प्रबळ, सदैव तारुण्ययुक्त, पुरातन, शत्रूंची दाणादाण करणारा, वार्धक्यरहित, वज्रधारी व श्रेष्ठ वीर असल्यामुळें तुझे मोठमोठे पराक्रम आहेत. ॥ १ ॥
म॒हाँ अ॑सि महिष॒ वृष्ण्ये॑भिर्धन॒स्पृदु॑ग्र॒ सह॑मानो अ॒न्यान् ।
महान् असि महिष वृष्ण्येभिर्धनस्पृदुग्र सहमानः अन्यान् ।
हे प्रबळ व सामर्थ्यवान देवा, तूं श्रेष्ठ आहेस तूं वैभव जिंकून आणणारा व आपल्या पराक्रमांनी दुसर्यांचा पाडाव करणारा आहेस. तूं सर्व भुवनांचा एकटा राजा आहेस. तूं शत्रूंशीं युद्ध कर व तुझ्या कृपेंतील लोकांस सुखानें राहूं दे. ॥ २ ॥
प्र मात्रा॑भी रिरिचे॒ रोच॑मानः॒ प्र दे॒वेभि॑र्वि॒श्वतो॒ अप्र॑तीतः ।
प्र मात्राभी रिरिचे रोचमानः प्र देवेभिर्विश्वतः अप्रतीतः ।
देदीप्यमान इंद्र पर्वतांहून थोर आहे. ज्यास कोठेंही प्रतिबंध नाहीं असा हा इंद्र देवांपेक्षांही मोठा विस्तीर्ण आणि भव्य अंतरिक्षापेक्षां फार अधिक आहे. ॥ ३ ॥
उ॒रुं ग॑भी॒रं ज॒नुषा॒भ्यु१ग्रं वि॒श्वव्य॑चसमव॒तं म॑ती॒नाम् ।
उरुं गभीरं जनुषाभ्यु१ग्रं विश्वव्यचसमवतं मतीनाम् ।
श्रेष्ठ, गंभीर, जन्मतःच उग्र, विश्वव्यापी व सर्व स्तुतींचा जणूं कांही संचयच असा जो इंद्र त्याचे ठिकाणीं ज्याप्रमाणें नद्या समुद्रांत प्रवेश करतात त्याप्रमाणें सिद्ध केलेले सोमरस प्रतिदिवशीं प्रवेश करीत असतात. ॥ ४ ॥
यं सोम॑मिन्द्र पृथि॒वीद्यावा॒ गर्भं॒ न मा॒ता बि॑भृ॒तस्त्वा॒या ।
यं सोममिंद्र पृथिवीद्यावा गर्भं न माता बिभृतस्त्वाया ।
हे इंद्रा, ज्याप्रमाणें माता गर्भाला धारण करते त्याप्रमाणे तुझ्या प्रमाणें प्रवृत्त झालेल्या द्यावापृथिवी ज्या सोमरसाचें धारण करतात तोच सोम अध्वर्यु तुला अर्पण करीत आहेत व, हे वीरा, तो सोम तूं प्यावा म्हणून तोच ते शुद्ध करीत आहेत. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ४७ (इंद्र सूक्त) ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्
म॒रुत्वाँ॑ इन्द्र वृष॒भो रणा॑य॒ पिबा॒ सोम॑मनुष्व॒धं मदा॑य ।
मरुत्वान् इंद्र वृषभः रणाय पिबा सोममनुष्वधं मदाय ।
हे इंद्रा, मरुतांसहवर्तमान त्यांना देऊनही तूं स्वतःस आनंद व सौख्य प्राप्त होण्याकरितां वाटेल तितका सोमरस प्राशन कर. मधुर सोमरसाची धार पोटांत ओत. पुरातन कालापासून तूंच सोमाचा राजा आहेस. ॥ १ ॥
स॒जोषा॑ इन्द्र॒ सग॑णो म॒रुद्भिः॒ सोमं॑ पिब वृत्र॒हा शू॑र वि॒द्वान् ।
सजोषा इंद्र सगणः मरुद्भिः सोमं पिब वृत्रहा शूर विद्वान् ।
हे शूर इंद्रा, वृत्राचा वध करणारा व ज्ञानसंपन्न असा जो तूं तो मरुतांसहवर्तमान येऊन सोम प्राशन कर. शत्रूंचा वध कर, वैर्यांचा नायनाट कर आणि आम्हांस सर्व बाजूंनी निर्भयता दे. ॥ २ ॥
उ॒त ऋ॒तुभि॑र्ऋतुपाः पाहि॒ सोम॒मिन्द्र॑ दे॒वेभिः॒ सखि॑भिः सु॒तं नः॑ ।
उत ऋतुभिर्ऋतुपाः पाहि सोममिंद्र देवेभिः सखिभिः सुतं नः ।
तूं योग्य काळीं सोम पिणारा असल्यामुळें योग्य कालीं त्याचें प्राशन कर. हे इंद्रा, तुझे मित्र हे मरुत्देव त्यांसह तूं आमचा सोम पी. ह्याच मरुतास तूं सोमाचे विभागी केलें होतेस, ह्यांनी वृत्रवधाचे वेळीं तुला साह्य केलें होते आणि ह्यांनीच तुझे ठिकाणीं पराक्रम उत्पन्न केला होता. ॥ ३ ॥
ये त्वा॑हि॒हत्ये॑ मघव॒न्नव॑र्ध॒न्ये शा॑म्ब॒रे ह॑रिवो॒ ये गवि॑ष्टौ ।
ये त्वाहिहत्ये मघऽवन्नवर्धन्ये शाम्बरे हरिवः ये गविष्टौ ।
हे पीतवर्ण अश्वांवरून येणार्या इंद्रा, ज्यांनी अहिवधाचे कामीं, शंबरास मारण्याचें वेळीं व धेनूंना जिंकण्याचे वेळेस तुझें सामर्थ्य वाढविलें आणि जे प्रज्ञाशील मरुत् तुझ्याबरोबर हर्षानें राहतात त्यांसह तूं सोमरस पी. ॥ ४ ॥
म॒रुत्व॑न्तं वृष॒भं वा॑वृधा॒नमक॑वारिं दि॒व्यं शा॒समिन्द्र॑म् ।
मरुत्वंतं वृषभं वावृधानमकवारिं दिव्यं शासमिंद्रम् ।
मरुत् देवांसह येणारा, वीर्यवान, वृद्धिंगत झालेला, मोठमोठ्या शत्रूंची खोड जिरवणारा, दिव्य, सर्वांवर सत्ता चालविणारा, सर्वांचा पराभव करणारा, प्रबळ व बल अर्पण करणारा असा जो इंद्र त्यानें आम्हांवर नूतन अनुग्रह करावे म्हणून आम्ही बोलावेत आहोंत. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ४८ (संपात सूक्त) ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्
स॒द्यो ह॑ जा॒तो वृ॑ष॒भः क॒नीनः॒ प्रभ॑र्तुमाव॒दन्ध॑सः सु॒तस्य॑ ।
सद्यः ह जातः वृषभः कनीनः प्रभर्तुमावदंधसः सुतस्य ।
जो जन्मल्याबरोबर एकदम तरुण वीर झाला तो सोमरस अर्पण करणार्या भक्ताचें रक्षण करो. हे इंद्रा, दूध मिसळलेल्या ह्या उत्तम सोमरसाचें यथेच्छ प्राशन कर. ॥ १ ॥
यज्जाय॑था॒स्तदह॑रस्य॒ कामे॑ऽं॒शोः पी॒यूष॑मपिबोगिरि॒ष्ठाम् ।
यज्जायथास्तदहरस्य कामेऽंशोः पीयूषमपिबोगिरिष्ठाम् ।
हे इंद्रा, तूं ज्या दिवशीं जन्म पावलास त्याच दिवशीं पर्वतावर असलेल्या उज्वल सोमाच्या मधुर सुधेची इच्छा होऊन तूं त्याचे प्राशन केलेंस. तुला जन्म देणार्या तुझ्या तरुण जनजीनें तुझ्या श्रेष्ठ पित्याच्या गृहीं तुला त्याचे प्रथम पान करविलें. ॥ २ ॥
उ॒प॒स्थाय॑ मा॒तर॒मन्न॑मैट्ट ति॒ग्मम॑पश्यद॒भि सोम॒मूधः॑ ।
उपस्थाय मातरमन्नमैट्ट तिग्ममपश्यदभि सोममूधः ।
मातेजवळ जाऊन त्याने अन्न मागितले. तिच्या स्तनांत त्यास तीव्र सोमरस आढळला. त्या प्रज्ञावान देवानें इतर सर्व पदार्थांना कंपायमान करीत संचार केला. अनेक रूपें धारण करणार्या त्या इंद्रानें मोठमोठे पराक्रम केले. ॥ ३ ॥
उ॒ग्रस्तु॑रा॒षाळ॒भिभू॑त्योजा यथाव॒शं त॒न्वं चक्र ए॒षः ।
उग्रस्तुराषाळभिभूत्योजा यथावशं तन्वं चक्र एषः ।
शत्रूंना भिती उत्पन्न करणार्या, विजयशाली व पराक्रमी अशा त्या इंद्रानें इच्छेस येतील तीं रूपें धारण केलीं. जन्मल्याबरोबर इंद्रानें त्वष्ट्याचा पराभव करुन चमसांतून सोम हिरावून घेतला व तो पिऊन टाकला. ॥ ४ ॥
शु॒नं हु॑वेम म॒घवा॑न॒मिन्द्र॑म॒स्मिन्भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शुनं हुवेम मघऽवानं इंद्रं अस्मिन् भरे नृऽतमं वाजऽसातौ ।
वैभववान, पराक्रमी आणि सौख्यदायक अशा इंद्रास पराक्रमाची प्राप्ति होण्याकरितां आम्हीं सोमरस अर्पण करून बोलावूं. भक्ताची हांक ऐकणारा, उग्र, शत्रूंना मारणारा व धन जिंकून आणणारा जो इंद्र त्यास आम्ही साहाय्यासाठीं युद्धामध्यें हांक मारूं. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ४९ (इंद्र सूक्त) ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्
शंसा॑ म॒हामिन्द्रं॒ यस्मि॒न्विश्वा॒ आ कृ॒ष्टयः॑ सोम॒पाः काम॒मव्य॑न् ।
शंसा महामिंद्रं यस्मिन्विश्वा आ कृष्टयः सोमपाः काममव्यन् ।
सोमप्राशन करणारे सर्व जन ज्याचे पासून आपल्या सर्व कामना पूर्ण करून घेतात, व विभ्वाच्या साहाय्यानें ज्या प्रज्ञाशील देवास द्यावापृथिवी व सर्व देव ह्यांनी वृत्राचा वध करण्याकरितां जन्म घेण्यास लावलें त्या श्रेष्ठ इंद्राची तूं स्तुति कर. ॥ १ ॥
यं नु नकिः॒ पृत॑नासु स्व॒राजं॑ द्वि॒ता तर॑ति॒ नृत॑मं हरि॒ष्ठाम् ।
यं नु नकिः पृतनासु स्वराजं द्विता तरति नृतमं हरिष्ठाम् ।
साम्राज्याचा उपभोग घेणार्या व अत्यंत पीतवर्ण अश्वांवर आरूढ होणार्या ज्या शूर इंद्राचा युद्धांत कोणासही पराभव करतां येत नाहीं आणि जो प्रबळ व पराक्रमी मरुतांच्या साहाय्यानें अत्यंत शक्तिमान होतो त्या वेगवान इंद्रानें दस्यूचें आयुष्य हरण केलें. ॥ २ ॥
स॒हावा॑ पृ॒त्सु त॒रणि॒र्नार्वा॑ व्यान॒शी रोद॑सी मे॒हना॑वान् ।
सहावा पृत्सु तरणिर्नार्वा व्यानशी रोदसी मेहनावान् ।
सामर्थ्यवान, युद्धांत एखाद्या अश्वाप्रमाणें विजयी होणारा, दोन्ही लोकांस व्यापून टाकणारा आणि वैभव अर्पण करणारा इंद्र हा प्रत्येक स्तोत्रप्रसंगी उत्तम भाग्याप्रमाणें प्रार्थना करण्यास योग्य आहे. आयुष्य वर्धन करणारा इंद्र पित्याप्रमाणें प्रेमळ व सहज हांक मारण्याजोगा आहे. ॥ ३ ॥
ध॒र्ता दि॒वो रज॑सस्पृ॒ष्ट ऊ॒र्ध्वो रथो॒ न वा॒युर्वसु॑भिर्नि॒युत्वा॑न् ।
धर्ता दिवः रजसस्पृष्ट ऊर्ध्वः रथः न वायुर्वसुभिर्नियुत्वान् ।
तो द्युलोक व अंतरिक्ष ह्यांचा आवडता रक्षक आहे. तो श्रेष्ठ आहे. तो वसूंसहवर्तमान येणारा असून रथाप्रमाणें वेगवान आहे. तो रात्रींना उज्ज्वल करणारा व सूर्यास जन्म देणारा आहे. ज्याप्रमाणें बुद्धिमत्ता ही सामर्थ्याची प्राप्ति करून देते, त्याप्रमाणें तो भाग्याची प्राप्ति करून देतो. ॥ ४ ॥
शु॒नं हु॑वेम म॒घवा॑न॒मिन्द्र॑म॒स्मिन्भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शुनं हुवेम मघऽवानमिंद्रमस्मिन्भरे नृतमं वाजऽसातौ ।
वैभववान, पराक्रमी आणि सौख्यदायक अशा इंद्रास पराक्रमाची प्राप्ति होण्याकरितां आम्ही सोमरस अर्पण करून बोलावूं. भक्ताची हांक ऐकणारा, उग्र शत्रूंना मारणारा व धन जिंकून आणणारा जो इंद्र त्यास आम्ही साहाय्यासाठीं युद्धामध्यें हांक मारूं. ॥ ५ ॥
ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ५० (इंद्र सूक्त) ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इंद्रः : छंद - त्रिष्टुप्
इन्द्रः॒ स्वाहा॑ पिबतु॒ यस्य॒ सोम॑ आ॒गत्या॒ तुम्रो॑ वृष॒भो म॒रुत्वा॑न् ।
इंद्रः स्वाहा पिबतु यस्य सोम आगत्या तुम्रः वृषभः मरुत्वान् ।
सोमावर सर्वस्वी ज्याच अधिकार आहे असा तो शत्रुविनाशक व बलवान इंद मरुतांसह येथें येऊन स्वाहा ह्या शब्दाचा उच्चार होतांच सोमाचे प्राशन करतो. ह्या हवींनीं संतुष्ट होऊन तो सर्वव्यापी इंद्र आमचे मनोरथ पूर्ण करो. हा हवि त्याची सर्व हौस पुरवो. ॥ १ ॥
आ ते॑ सप॒र्यू ज॒वसे॑ युनज्मि॒ ययो॒रनु॑ प्र॒दिवः॑ श्रु॒ष्टिमावः॑ ।
आ ते सपर्यू जवसे युनज्मि ययोरनु प्रदिवः श्रुष्टिमावः ।
ज्यांची सेवा तूं पुरातन कालापासून ग्रहण केली आहेस असे ते तुझे दोन आज्ञांकित अश्व तुला येथें वेगाने घेऊन येण्याकरितां मी रथास जोडतों. हे सुंदर मुकुट धारण करणार्या इंद्रा, तुझे पीतवर्ण अश्व तुला येथें आणोत. हा उत्तम तऱ्हेनें काढून ठेवलेला सुंदर सोमरस तूं प्राशन कर. ॥ २ ॥
गोभि॑र्मिमि॒क्षुं द॑धिरे सुपा॒रमिन्द्रं॒ ज्यैष्ठ्या॑य॒ धाय॑से गृणा॒नाः ।
गोभिर्मिमिक्षुं दधिरे सुपारमिंद्रं ज्यैष्ठ्याय धायसे गृणानाः ।
स्तुति करणार्या उपासकांनी कल्याणप्रद असा दुग्धमिश्रित सोम इंद्रास तो सर्वांत श्रेष्ठ म्हणून अर्पण केला आहे. हे सरल स्वभावाच्या इंद्रदेवा, तो सोम तूं प्राशन करून आम्हांस अनेक मार्गांनी धेनू पाठवून दे. ॥ ३ ॥
इ॒मं कामं॑ मन्दया॒ गोभि॒रश्वै॑श्च॒न्द्रव॑ता॒ राध॑सा प॒प्रथ॑श् च ।
इमं कामं मंदया गोभिरश्वैश्चंद्रवता राधसा पप्रथश् च ।
धेनू व अश्व अर्पण करून ही आमची इच्छा पूर्ण कर आणि आम्हांस उज्वल संपत्ति देऊन आमची प्रख्याति कर. सौख्याची इच्छा धारण करणार्या कुशिककुलोत्पन्न भक्तांनी हे स्तोत्र तूं जो इंद्र त्याचे प्रित्यर्थ मोठ्या आवडीनें रचलें आहे. ॥ ४ ॥
शु॒नं हु॑वेम म॒घवा॑न॒मिन्द्र॑म॒स्मिन्भरे॒ नृत॑मं॒ वाज॑सातौ ।
शुनं हुवेम मघऽवानमिंद्रमस्मिन्भरे नृतमं वाजऽसातौ ।
वैभववान, पराक्रमी आणि सौख्यदायक अशा इंद्रास आम्हांला प्राक्रमाची प्राप्ति व्हावी म्हणून आम्ही सोमरस अर्पण करून बोलावूं. भक्ताची हांक ऐकणारा, उग्र शत्रूंना मारणारा व धन जिंकून आणणारा जो इंद्र त्यास आम्ही साहाय्यासाठीं युद्धामध्यें हांक मारूं. ॥ ५ ॥
ॐ तत् सत् |