PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ३ - सूक्त १ ते १०

ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १ (अग्निसूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


सोम॑स्य मा त॒वसं॒ वक्ष्य॑ग्ने॒ वह्निं॑ चकर्थ वि॒दथे॒ यज॑ध्यै ।
दे॒वाँ अच्छा॒ दीद्य॑द्यु॒ञ्जे अद्रिं॑ शमा॒ये अ॑ग्ने त॒न्वं जुषस्व ॥ १ ॥

सोमस्य मा तवसं वक्ष्यग्ने वह्निं चकर्थ विदथे यजध्यै ।
देवान् अच्छा दीद्यद्युञ्जे अद्रिं शमाये अग्ने तन्वं जुषस्व ॥ १ ॥

हे अग्ने, तुझ्या प्रेरणेने सोमसाधक बनलेल्या तेजस्वी भक्तांना तू सामर्थ्यसंपन्न बनव. सोमनिष्पादक ग्राव्यांच्या साह्याने आम्ही सिद्ध केलेल्या सोमाचा आणि स्तोत्रांचा तू बलसंवर्धनार्थ स्वीकार कर. ॥ १ ॥


प्राञ्चं॑ य॒ज्ञं च॑कृम॒ वर्ध॑तां॒ गीः स॒मिद्‌भि॑र॒ग्निं नम॑सा दुवस्यन् ।
दि॒वः श॑शासुर्वि॒दथा॑ कवी॒नां गृत्सा॑य चित्त॒वसे॑ गा॒तुमी॑षुः ॥ २ ॥

प्राञ्चं यज्ञं चकृम वर्धतां गीः समिद्‌भिरग्निं नमसा दुवस्यन् ।
दिवः शशासुर्विदथा कवीनां गृत्साय चित्तवसे गातुमीषुः ॥ २ ॥

हे बलवान आणि प्रशंसनीय अग्ने, स्वर्लोकातून भूलोकी उतरलेल्या आमच्या यज्ञीय स्तोत्रांनी प्रसन्न होऊन समिधांच्या आणि हविर्द्रव्यांच्या साह्याने तुझी उपासना चिरंतन करण्याचे वरदान तू आम्हास दे. ॥ २ ॥


मयो॑ दधे॒ मेधि॑रः पू॒तद॑क्षो दि॒वः सु॒बन्धु॑र्ज॒नुषा॑ पृथि॒व्याः ।
अवि॑न्दन्नु दर्श॒तम॒प्स्व१न्तर्दे॒वासो॑ अ॒ग्निम॒पसि॒ स्वसॄ॑णाम् ॥ ३ ॥

मयः दधे मेधिरः पूतदक्षः दिवः सुबंधुर्जनुषा पृथिव्याः ।
अविंदन्नु दर्शतमप्स्व१ंतर्देवासः अग्निमपसि स्वसॄणाम् ॥ ३ ॥

देवगणांनी नद्यांच्या जलामधून यज्ञकार्यार्थ बाहेर काढलेला, पृथ्वीबांधव, स्वर्गसख, सुंदर मेधावी आणि सामर्थ्यसंपन्न अग्नि भक्तांना सुख प्रदान करतो. ॥ ३ ॥


अव॑र्धयन्सु॒भगं॑ स॒प्त य॒ह्वीः श्वे॒तं ज॑ज्ञा॒नम॑रु॒षं म॑हि॒त्वा ।
शिशुं॒ न जा॒तम॒भ्यारु॒रश्वा॑ दे॒वासो॑ अ॒ग्निं जनि॑मन्वपुष्यन् ॥ ४ ॥

अवर्धयन्सुभगं सप्त यह्वीः श्वेतं जज्ञानमरुषं महित्वा ।
शिशुं न जातमभ्यारुरश्वा देवासः अग्निं जनिमन्वपुष्यन् ॥ ४ ॥

सप्तनद्यांनी संवर्धिलेल्या, भाग्यशाली, शुभ्र आणि तेजस्वी अग्नीला देवगण शिंगराकडे धाव घेणार्‍या अश्वांच्या आतुरतेने प्रदीप्त करीत आहेत. ॥ ४ ॥


शु॒क्रेभि॒रञ्गै॒ रज॑ आतत॒न्वान् क्रतु॑म् पुना॒नः क॒विभिः॑ प॒वित्रैः॑ ।
शो॒चिर्वसा॑नः॒ पर्यायु॑र॒पां श्रियो॑ मिमीते बृह॒तीरनू॑नाः ॥ ५ ॥

शुक्रेभिरञ्गै रज आततन्वान् क्रतुम् पुनानः कविभिः पवित्रैः ।
शोचिर्वसानः पर्यायुरपां श्रियः मिमीते बृहतीरनूनाः ॥ ५ ॥

स्वतःच्या विशुद्ध तेजाने आकाश व्यापणारा, आणि भक्तांना पवित्र करणारा, तेजोवसन अग्नि उपासकांना विपुल संपत्ती आणि दीर्घायुष्य प्रदान करतो. ॥ ५ ॥


व॒व्राजा॑ सी॒मन॑दती॒रद॑ब्धा दि॒वो य॒ह्वीरव॑साना॒ अन॑ग्नाः ।
सना॒ अत्र॑ युव॒तयः॒ सयो॑नी॒रेकं॒ गर्भं॑ दधिरे स॒प्त वाणीः॑ ॥ ६ ॥

वव्राजा सीमनदतीरदब्धा दिवः यह्वीरवसाना अनग्नाः ।
सना अत्र युवतयः सयोनीरेकं गर्भं दधिरे सप्त वाणीः ॥ ६ ॥

विवस्त्र असूनही वस्त्रभूषित भासणार्‍या सात निरागस, अजेय, आणि चिरतरुण स्वर्गकन्यांनी एकत्रपणे अग्निरूपी गर्भ धारण केला. ॥ ६ ॥


स्ती॒र्णा अ॑स्य सं॒हतो॑ वि॒श्वरू॑पा घृ॒तस्य॒ योनौ॑ स्र॒वथे॒ मधू॑नाम् ।
अस्थु॒रत्र॑ धे॒नवः॒ पिन्व॑माना म॒ही द॒स्मस्य॑ मा॒तरा॑ समी॒ची ॥ ७ ॥

स्तीर्णा अस्य संहतः विश्वरूपा घृतस्य योनौ स्रवथे मधूनाम् ।
अस्थुरत्र धेनवः पिन्वमाना मही दस्मस्य मातरा समीची ॥ ७ ॥

द्यावापृथिवीरूपी सरळमार्गी आणि विशाल मातेच्या, तसेच मेघरूपी दुग्धसंपन्न धेनूंच्या उपस्थितीत सर्वगामी किरणयुक्त अग्नीचा जलधारायुक्त अंतरिक्षात जन्म झाला. ॥ ७ ॥


ब॒भ्रा॒णः सू॑नो सहसो॒ व्यद्यौ॒द्दधा॑नः शु॒क्रा र॑भ॒सा वपूं॑षि ।
श्चोत॑न्ति॒ धारा॒ मधु॑नो घृ॒तस्य॒ वृषा॒ यत्र॑ वावृ॒धे काव्ये॑न ॥ ८ ॥

बभ्राणः सूनः सहसः व्यद्यौद्दधानः शुक्रा रभसा वपूंषि ।
श्चोतंति धारा मधुनः घृतस्य वृषा यत्र वावृधे काव्येन ॥ ८ ॥

भक्तांनी वृद्धिंगत करताच मधुर घृताच्या धारा चहुबाजूस वाहविणार्‍या हे भक्तपोषित, बलपुत्र, आणि बलसंपन्न अग्ने, तेजस्वी आणि द्रुतगामी शरीराने तू प्रकाशमान झालास. ॥ ८ ॥


पि॒तुश्चि॒दूध॑र्ज॒नुषा॑ विवेद॒ व्यस्य॒ धारा॑ असृज॒द्वि धेनाः॑ ।
गुहा॒ चर॑न्तं॒ सखि॑भिः शि॒वेभि॑र्दि॒वो य॒ह्वीभि॒र्न गुहा॑ बभूव ॥ ९ ॥

पितुश्चिदूधर्जनुषा विवेद व्यस्य धारा असृजद्वि धेनाः ।
गुहा चरंतं सखिभिः शिवेभिर्दिवः यह्वीभिर्न गुहा बभूव ॥ ९ ॥

अंतरिक्षीय जलसंचयाचे उपजतच ज्ञान असणार्‍या, जलधारारूपी सन्मित्रासह गुहेमध्ये संचार करणार्‍या, तसेच जलधारा आणि आकाशवाणी पृथ्वीच्या रोखाने प्रक्षेपिणार्‍या अग्नीचे स्वरूप ज्ञानी लोकांनाही अज्ञातच राहिले. ॥ ९ ॥


पि॒तुश्च॒ गर्भं॑ जनि॒तुश्च॑ बभ्रे पू॒र्वीरेको॑ अधय॒त्पीप्या॑नाः ।
वृष्णे॑ स॒पत्नी॒ शुच॑ये॒ सब॑न्धू उ॒भे अ॑स्मै मनु॒ष्ये३ नि पा॑हि ॥ १० ॥

पितुश्च गर्भं जनितुश्च बभ्रे पूर्वीरेकः अधयत्पीप्यानाः ।
वृष्णे सपत्नी शुचये सबंधू उभे अस्मै मनुष्ये३ नि पाहि ॥ १० ॥

अंतरिक्ष आणि सृष्टी यांच्या जन्मदात्या परमेश्वराचा गर्भ धारण करणार्‍या, ओषधीभक्षक, शुद्ध आणि पराक्रमी अग्नीचे समानपती आणि लोकहितकारक द्यावापृथिवींनी रक्षण केले. ॥ १० ॥


उ॒रौ म॒हाँ अ॑निबा॒धे व॑व॒र्धापो॑ अ॒ग्निं य॒शसः॒ सं हि पू॒र्वीः ।
ऋ॒तस्य॒ योना॑वशय॒द्दमू॑ना जामी॒नाम॒ग्निर॒पसि॒ स्वसॄ॑णाम् ॥ ११ ॥

उरौ महान् अनिबाधे ववर्धापः अग्निं यशसः सं हि पूर्वीः ।
ऋतस्य योनावशयद्दमूना जामीनामग्निरपसि स्वसॄणाम् ॥ ११ ॥

उदकसंवर्धित, महान, आणि उदार अग्नि अंतरिक्षात परिवर्धित होऊन तेथील जलामध्ये पडून राहिला. ॥ ११ ॥


अ॒क्रो न ब॒भ्रिः स॑मि॒थे म॒हीनां॑ दिदृ॒क्षेयः॑ सू॒नवे॒ भाऋ॑जीकः ।
उदु॒स्रिया॒ जनि॑ता॒ यो ज॒जाना॒पां गर्भो॒ नृत॑मो य॒ह्वो अ॒ग्निः ॥ १२ ॥

अक्रः न बभ्रिः समिथे महीनां दिदृक्षेयः सूनवे भाऋजीकः ।
उदुस्रिया जनिता यः जजानापां गर्भः नृतमः यह्वः अग्निः ॥ १२ ॥

सृष्टि उत्पत्तिकारक जलधारांमध्ये निवास करणार्‍या, अजेय, सैन्यरक्षक, शूर, दर्शनीय, थोर कांतिमान अग्नीने भक्तांसाठी जलधारांची निर्मिती केली. ॥ १२ ॥


अ॒पां गर्भं॑ दर्श॒तमोष॑धीनां॒ वना॑ जजान सु॒भगा॒ विरू॑पम् ।
दे॒वास॑श्चि॒न्मन॑सा॒ सं हि ज॒ग्मुः पनि॑ष्ठं जा॒तं त॒वसं॑ दुवस्यन् ॥ १३ ॥

अपां गर्भं दर्शतमोषधीनां वना जजान सुभगा विरूपम् ।
देवासश्चिन्मनसा सं हि जग्मुः पनिष्ठं जातं तवसं दुवस्यन् ॥ १३ ॥

जल आणि जलसंपन्न ओषधिनिविष्ट, विभिन्नस्वरूपी, प्रशंसनीय, आणि बलसंपन्न अग्नीला भाग्यशाली अरणिद्वयाने जन्म देताच देवगण त्याची प्रेमभरे उपासना करू लागले. ॥ १३ ॥


बृ॒हन्त॒ इद्‌भा॒नवो॒ भाऋ॑जीकम॒ग्निं स॑चन्त वि॒द्युतो॒ न शु॒क्राः ।
गुहे॑व वृ॒द्धं सद॑सि॒ स्वे अ॒न्तर॑पा॒र ऊ॒र्वे अ॒मृतं॒ दुहा॑नाः ॥ १४ ॥

बृहंत इद्‌भानवः भाऋजीकमग्निं सचंत विद्युतः न शुक्राः ।
गुहेव वृद्धं सदसि स्वे अंतरपार ऊर्वे अमृतं दुहानाः ॥ १४ ॥

पर्जन्यरूपाने आपल्या तेजाची चोंहोकडे वृष्टि करणार्‍या अग्नीच्याच सेवेंत सर्व नामांकित रश्मिसमूह तत्पर झाला; तो रश्मिसमूह असा देदीप्यमान, कीं जणों काय झगझगीत शुभ्र विद्युल्लताच. हा उज्ज्वल रश्मिसमूह अपार आणि अमर्याद अशा आकाशांत अमृतरूप दुग्ध दोहन करून, गुप्तपणाने वाढल्याप्रमाणें एकदम विकसित झालेल्या अग्नीच्या सेवेंत तत्पर झाला. ॥ १४ ॥


ईळे॑ च त्वा॒ यज॑मानो ह॒विर्भि॒रीळे॑ सखि॒त्वं सु॑म॒तिं निका॑मः ।
दे॒वैरवो॑ मिमीहि॒ सं ज॑रि॒त्रे रक्षा॑ च नो॒ दम्ये॑भि॒रनी॑कैः ॥ १५ ॥

ईळे च त्वा यजमानः हविर्भिरीळे सखित्वं सुमतिं निकामः ।
देवैरवः मिमीहि सं जरित्रे रक्षा च नः दम्येभिरनीकैः ॥ १५ ॥

तुजप्रित्यर्थ यज्ञ करणारा मी उपासक तुला हवि अर्पण करून तुझे स्तवन करीत आहे. अत्यंत उत्सुकतेनें तुझें प्रेम आणि तुझी दयार्द्र बुद्धि ह्यांचीच भिक्षा मी तुजपाशी मागत आहे. तर हे देवा, तूं आपल्या दिव्य विभूतींसह आम्हां स्तोतृजनांवर तुझा कृपाप्रसाद कर, आणि आपल्या दुर्निर्वार तेजोबलांनी आमचें रक्षण कर. ॥ १५ ॥


उ॒प॒क्षे॒तार॒स्तव॑ सुप्रणी॒तेऽ॑ग्ने॒ विश्वा॑नि॒ धन्या॒ दधा॑नाः ।
सु॒रेत॑सा॒ श्रव॑सा॒ तुञ्ज॑माना अ॒भि ष्या॑म पृतना॒यूँरदे॑वान् ॥ १६ ॥

उपक्षेतारस्तव सुप्रणीतेऽग्ने विश्वानि धन्या दधानाः ।
सुरेतसा श्रवसा तुञ्जमाना अभि ष्याम पृतनायून्रदेवान् ॥ १६ ॥

हे सन्मार्गदर्शक अग्निदेवा, आम्ही, तुझ्या सेवकांनी, सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे वांटेकरी व्हावें आणि कीर्तिप्रद अशी सत्कृत्यें, जीं वीर्यशालित्वानेंच साध्य करतां येतात, अशा सत्कृत्यांच्या लालसेनें पुढें सरसवून देवद्वेष्ट्या शत्रूंच्या सैन्याची धुळधाण उडवून द्यावी असें कर. ॥ १६ ॥


आ दे॒वाना॑मभवः के॒तुर॑ग्ने म॒न्द्रो विश्वा॑नि॒ काव्या॑नि वि॒द्वान् ।
प्रति॒ मर्ताँ॑ अवासयो॒ दमू॑ना॒ अनु॑ दे॒वान् र॑थि॒रो या॑सि॒ साध॑न् ॥ १७ ॥

आ देवानामभवः केतुरग्ने मंद्रः विश्वानि काव्यानि विद्वान् ।
प्रति मर्तान् अवासयः दमूना अनु देवान् रथिरः यासि साधन् ॥ १७ ॥

हे अग्ने ! तूं देवतांचा भव्य ध्वजच आहेस. तूं आनंदमग्न असून भक्तांची सर्व काव्यमय कृति तूं अगोदरच जाणतोस. तूं प्रशांतचित्त आहेस; आम्हांसारख्या दीन मानवांना ह्या जगांत बसावयास स्वतंत्र जागा तूंच दिली आहेस; आणि देवांचे यज्ञकार्य तडीस नेऊन व रथारूढ होऊन त्यांच्या पाठोपाठ तूं जात असतोस. ॥ १७ ॥


नि दु॑रो॒णे अ॒मृतो॒ मर्त्या॑नां॒ राजा॑ ससाद वि॒दथा॑नि॒ साध॑न् ।
घृ॒तप्र॑तीक उर्वि॒या व्यद्यौद॒ग्निर्विश्वा॑नि॒ काव्या॑नि वि॒द्वान् ॥ १८ ॥

नि दुरोणे अमृतः मर्त्यानां राजा ससाद विदथानि साधन् ।
घृतप्रतीक उर्विया व्यद्यौदग्निर्विश्वानि काव्यानि विद्वान् ॥ १८ ॥

मर्त्य भक्तांचा हा अमर राजा अग्नि, यज्ञसभेंतील सर्व कार्यभाग उरकून आतां आपल्या स्वगृहीं स्वस्थ बसलेला आहे. ज्याची अंगकांति घृताप्रमाणे उज्ज्वल, व भक्तांची यच्चावत् स्तोत्रें कवनें ज्याला पूर्वीच कळतात अशा ह्या अग्नीचा प्रकाश पहा आतां कसा फार दूरपर्यंत पसरला आहे. ॥ १८ ॥


आ नो॑ गहि स॒ख्येभिः॑ शि॒वेभि॑र्म॒हान्म॒हीभि॑रू॒तिभिः॑ सर॒ण्यन् ।
अ॒स्मे र॒यिम् ब॑हु॒लं संत॑रुत्रं सु॒वाचं॑ भा॒गं य॒शसं॑ कृधी नः ॥ १९ ॥

आ नः गहि सख्येभिः शिवेभिर्महान्महीभिरूतिभिः सरण्यन् ।
अस्मे रयिम् बहुलं संतरुत्रं सुवाचं भागं यशसं कृधी नः ॥ १९ ॥

तूं आपल्या कल्याणप्रद अशा स्नेहप्रेमानें आमच्याकडे ये. तूं अत्यंत बलाढ्य म्हणून आपल्या बलिष्ठ अशाच सामर्थ्यासह धांवतच आमच्याकडे ये. सर्व दुःखांतून पार पाडील असें श्रेष्ठ ऐश्वर्य आम्हांस दे, आणि ज्याची जिकडे तिकडे स्तुति ऐकूं येते व जें नेहमी यशस्वीच होते असे तुझें सद्‍भाग्य आम्हांस दे. ॥ १९ ॥


ए॒ता ते॑ अग्ने॒ जनि॑मा॒ सना॑नि॒ प्र पू॒र्व्याय॒ नूत॑नानि वोचम् ।
म॒हान्ति॒ वृष्णे॒ सव॑ना कृ॒तेमा जन्मं॑जन्म॒न् निहि॑तो जा॒तवे॑दाः ॥ २० ॥

एता ते अग्ने जनिमा सनानि प्र पूर्व्याय नूतनानि वोचम् ।
महांति वृष्णे सवना कृतेमा जन्मंजन्मन् निहितः जातऽवेदाः ॥ २० ॥

हे अग्निदेवा ! तुझ्या पुरातन अवतारांचे आणि तुझ्या नेहमी होणार्‍या नूतन अवतारांचे जे हे वर्णन मी केले आहे ते सनातन देव जो तूं, त्या तुजप्रित्यर्थच केले आहें सर्व वस्तुमात्रांचे ज्ञान तुला आहे कारण प्रत्येक प्राण्याच्या अंतःकरणांत जन्मोजन्मी तुझीच स्थापना झाली आहे. ॥ २० ॥


जन्मं॑जन्म॒न् निहि॑तो जा॒तवे॑दा वि॒श्वामि॑त्रेभिरिध्यते॒ अज॑स्रः ।
तस्य॑ व॒यं सु॑म॒तौ य॒ज्ञिय॒स्यापि॑ भ॒द्रे सौ॑मन॒से स्या॑म ॥ २१ ॥

जन्मंजन्मन् निहितः जातऽवेदा विश्वामित्रेभिरिध्यते अजस्रः ।
तस्य वयं सुमतौ यज्ञियस्यापि भद्रे सौमनसे स्याम ॥ २१ ॥

सकल वस्तुजात जाणण्यास व ज्याची स्थापना प्रत्येक जीवाच्या हृदयांत झालेली आहे, असा हा अग्नि कुशिक कुलोत्पन्न ऋषींनी सतत प्रज्वलीत ठेवलेला आहे. तर त्या परम वंद्य अग्नीच्या कृपाछत्राकाली, त्याच्या मंगलमय सौजन्याच्या आश्रयाखालीं आम्हिराहूं असे घडो. ॥ २१ ॥


इ॒मं य॒ज्ञं स॑हसाव॒न् त्वं नो॑ देव॒त्रा धे॑हि सुक्रतो॒ ररा॑णः ।
प्र यं॑सि होतर्बृह॒तीरिषो॒ नोऽ॑ग्ने॒ महि॒ द्रवि॑ण॒मा य॑जस्व ॥ २२ ॥

इमं यज्ञं सहसावन् त्वं नः देवत्रा धेहि सुक्रतः रराणः ।
प्र यंसि होतर्बृहतीरिषः नोऽग्ने महि द्रविणमा यजस्व ॥ २२ ॥

हे प्रतापशाली अग्निदेवा ! हे परमप्रज्ञ देवा ! तूं उदार अंतःकरणाने हा आमचा यज्ञ देवापर्यंत प्रविष्ट कर. हे यज्ञसंपादका, तूं आम्हाला उत्कृष्ट प्रतीचा चित्तोत्साह देतोसच; तर हे अग्निदेवा, श्रेष्ठ असें सामर्थ्यधन कृपाकरून तूं ह्या यज्ञाच्या योगानें आम्हांस प्रदान कर. ॥ २२ ॥


इळा॑मग्ने पुरु॒दंसं॑ स॒निं गोः श॑श्वत्त॒मं हव॑मानाय साध ।
स्यान्नः॑ सू॒नुस्तन॑यो वि॒जावाग्ने॒ सा ते॑ सुम॒तिर्भू॑त्व॒स्मे ॥ २३ ॥

इळामग्ने पुरुदंसं सनिं गोः शश्वत्तमं हवमानाय साध ।
स्यान्नः सूनुस्तनयः विजावाग्ने सा ते सुमतिर्भूत्वस्मे ॥ २३ ॥

हे अग्निदेवा, धनधान्यदात्री भूमि आणि अद्‍भुत कृत्य प्रचुर अशी दिव्य ज्ञानाची देणगी, मनोभावानें तुझा धांव करणार्‍या भक्ताला सदैव साध्य होईल असें कर. आमचे पुत्रपौत्र हे आमचा वंशविस्तार करणारे होऊन, हे अग्निदेवा, तुझी अनुपम कृपा आम्हांस प्राप्त होईल असें कर. ॥ २३ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त २ (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - वैश्वानर अग्नि : छंद - जगती


वै॒श्वा॒न॒राय॑ धि॒षणा॑मृता॒वृधे॑ घृ॒तं न पू॒तम॒ग्नये॑ जनामसि ।
द्वि॒ता होता॑रं॒ मनु॑षश्च वा॒घतो॑ धि॒या रथं॒ न कुलि॑शः॒ समृ॑ण्वति ॥ १ ॥

वैश्वानराय धिषणामृतावृधे घृतं न पूतमग्नये जनामसि ।
द्विता होतारं मनुषश्च वाघतः धिया रथं न कुलिशः समृण्वति ॥ १ ॥

अग्नि हा वैश्वानर म्हणजे सर्व जनांचा हितकर्ता आहे. सत्यधर्माची अभिवृद्धि तोच करतो. तर ह्या वैश्वानर अग्निकरितां आपण पवित्र घृताहुति सिद्ध करतो, त्याप्रमाणेंच ध्यानयोग असे एक स्तोत्रही बसवून ठेवूं. कारण एकादा यंत्रकुशल मनुष्य रथ झराझर चालवितो त्याप्रमाणें देव आणि मानव ह्या दोघांचाही यज्ञसंपादक जो अग्नि त्याला आमचे यजमान आणि ऋत्विज हे यज्ञमंदिराकडे येण्याची त्वरा करीत आहेत. ॥ १ ॥


स रो॑चयञ्ज॒नुषा॒ रोद॑सी उ॒भे स मा॒त्रोर॑भवत्पु॒त्र ईड्यः॑ ।
ह॒व्य॒वाळ॒ग्निर॒जर॒श्चनो॑हितो दू॒ळभो॑ वि॒शामति॑थिर्वि॒भाव॑सुः ॥ २ ॥

स रोचयञ्जनुषा रोदसी उभे स मात्रोरभवत्पुत्र ईड्यः ।
हव्यवाळग्निरजरश्चनोहितः दूळभः विशामतिथिर्विभावसुः ॥ २ ॥

प्रकट होतांच त्याने आकाश व पृथिवी ह्या दोघांनाही आपल्या उज्ज्वल कांतीनें सुप्रकाशित केलें व जगताची जीं मातापितरें त्यांचा हा पुत्र ’ खरोखर धन्य होय ’ असें सर्वांकडून म्हणवून घेतलें. हविर्भाग ज्याचा त्यास देणार्‍या ह्या अग्निला वार्धक्य म्हणून कधींच येत नाहीं. तो प्रेमळ, अपराजित आणि भक्तजनांचा पाहुणा होय. प्रकाशरूप संपत्ती तर त्याच्यापाशीं अपार आहे. ॥ २ ॥


क्रत्वा॒ दक्ष॑स्य॒ तरु॑षो॒ विध॑र्मणि दे॒वासो॑ अ॒ग्निं ज॑नयन्त॒ चित्ति॑भिः ।
रु॒रु॒चा॒नं भा॒नुना॒ ज्योति॑षा म॒हामत्यं॒ न वाजं॑ सनि॒ष्यन्नुप॑ ब्रुवे ॥ ३ ॥

क्रत्वा दक्षस्य तरुषः विधर्मणि देवासः अग्निं जनयंत चित्तिभिः ।
रुरुचानं भानुना ज्योतिषा महामत्यं न वाजं सनिष्यन्नुप ब्रुवे ॥ ३ ॥

आपल्या यशस्वी चातुर्याच्या बळावर व एकाग्र ध्यानाच्या योगानें, देवांनी अग्नीला ह्या नानाविध जगांत प्रकट केले. मलाही सत्यसामर्थ्याच्या लाभांची उत्कट इच्छा आहे, तेव्हां एकाद्या तडफदार वीराची प्रशंसा करावी त्याप्रमाणे आपल्या अति-उज्ज्वल तेजानें प्रकाशणार्‍या ह्या श्रेष्ठ अग्नीची स्तुति मी करीत आहे. ॥ ३ ॥


आ म॒न्द्रस्य॑ सनि॒ष्यन्तो॒ वरे॑ण्यं वृणी॒महे॒ अह्र॑यं॒ वाज॑मृ॒ग्मिय॑म् ।
रा॒तिं भृगू॑णामु॒शिजं॑ क॒विक्र॑तुम॒ग्निं राज॑न्तं दि॒व्येन॑ शो॒चिषा॑ ॥ ४ ॥

आ मंद्रस्य सनिष्यंतः वरेण्यं वृणीमहे अह्रयं वाजमृग्मियम् ।
रातिं भृगूणामुशिजं कविक्रतुमग्निं राजंतं दिव्येन शोचिषा ॥ ४ ॥

कशाचीही पर्वा वाटूं न देणारे असे ह्या आनंदमय अग्नीचें जें एक अत्यंत उत्कृष्ट आणि परम स्तुत्य सत्वसामर्थ्य आहे तें प्राप्त करून घेण्याची आम्हां भक्तजनांना उत्कट लालसा असते, तर आम्हां भृगुकुलोत्पन्नांचा कनवाळू दाता, कवींचे प्रतिभा-सामर्थ्य, व आपल्या लोकोत्तर दिव्य तेजानें प्रकाशमान होणारा जो हा अग्नि त्याचीच प्रार्थना आम्ही पदर पसरून करीत असतो. ॥ ४ ॥


अ॒ग्निं सु॒म्नाय॑ दधिरे पु॒रो जना॒ वाज॑श्रवसमि॒ह वृ॒क्तब॑र्हिषः ।
य॒तस्रु॑चः सु॒रुचं॑ वि॒श्वदे॑व्यं रु॒द्रं य॒ज्ञानां॒ साध॑दिष्टिम॒पसा॑म् ॥ ५ ॥

अग्निं सुम्नाय दधिरे पुरः जना वाजश्रवसमिह वृक्तबर्हिषः ।
यतस्रुचः सुरुचं विश्वदेव्यं रुद्रं यज्ञानां साधदिष्टिमपसाम् ॥ ५ ॥

सत्वा‍ढ्य अशीच ज्याची ख्याती आहे त्या अग्नीची स्थपना भक्तजनांनी, सोमरसांतील दर्भाग्रें काढून टाकून आपल्या समोरच वेदीवर केली आणि आहुति देण्यासाठीं पळी वर उचलून व आहुति देऊन हा अत्यंत दीप्तिमान, अखिल देवांचा प्रभू आणि यज्ञरूप उपासनेचें ध्येय साध्य करून देणारा रुद्र स्वरूप अग्नि त्याची त्यांनी सेवा केली. ॥ ५ ॥


पाव॑कशोचे॒ तव॒ हि क्षयं॒ परि॒ होत॑र्य॒ज्ञेषु॑ वृ॒क्तब॑र्हिषो॒ नरः॑ ।
अग्ने॒ दुव॑ इ॒च्छमा॑नास॒ आप्य॒मुपा॑सते॒ द्रवि॑णं धेहि॒ तेभ्यः॑ ॥ ६ ॥

पावकशोचे तव हि क्षयं परि होतर्यज्ञेषु वृक्तबर्हिषः नरः ।
अग्ने दुव इच्छमानास आप्यमुपासते द्रविणं धेहि तेभ्यः ॥ ६ ॥

तुझा प्रकाशच अगोदर सर्वांना पवित्र करतो; तर हे यज्ञसंपादका, दर्भाग्रें काढून सोमरस तयार करून ठेवून भक्तजन यज्ञामध्यें तुझ्या निवासस्थानांत (वेदीवर) तुझें अर्चन करतात. हे अग्ने, सेवा करून तुझें आप्तप्रेम संपादन करण्याची इच्छा बाळगणारे भक्तजन भक्तिपूर्वक तुझी उपासना करीत असतात, तर हे देवा त्यांना सामर्थ्यसंपत्तीचें दान कर. ॥ ६ ॥


आ रोद॑सी अपृण॒दा स्वर्म॒हज्जा॒तं यदे॑नम॒पसो॒ अधा॑रयन् ।
सो अ॑ध्व॒राय॒ परि॑ णीयते क॒विरत्यो॒ न वाज॑सातये॒ चनो॑हितः ॥ ७ ॥

आ रोदसी अपृणदा स्वर्महज्जातं यदेनमपसः अधारयन् ।
सः अध्वराय परि णीयते कविरत्यः न वाजसातये चनोहितः ॥ ७ ॥

अग्नि हा प्रकट झाल्याबरोबर उपासना कर्मतत्पर ऋत्विजांनी त्याची वेदीवर स्थापना केली, आणि तसें करतांच त्यानें अंतराळ प्रदेश व अत्युच्च स्वर्गलोक अशा दोहोंनाही आपल्या प्रकाशानें ओतप्रोत भरून टाकलें. एखाद्या शूर चलाख योध्याला विजयश्री जिंकून आणण्यासाठीं रणांत घेऊन जावे त्याप्रमाणे पहा ह्या महाप्रज्ञ अग्नीला भक्तजन यागसंपादनार्थ घेऊन जात आहेत. ॥ ७ ॥


न॒म॒स्यत॑ ह॒व्यदा॑तिं स्वध्व॒रं दु॑व॒स्यत॒ दम्यं॑ जा॒तवे॑दसम् ।
र॒थीर्‌ऋ॒तस्य॑ बृह॒तो विच॑र्षणिर॒ग्निर्दे॒वाना॑मभवत्पु॒रोहि॑तः ॥ ८ ॥

नमस्यत हव्यदातिं स्वध्वरं दुवस्यत दम्यं जातऽवेदसम् ।
रथीर्‌ऋतस्य बृहतः विचर्षणिरग्निर्देवानामभवत्पुरोहितः ॥ ८ ॥

हा देवांना हविर्भाग पोहोंचवितो. यज्ञयाग यथासांग सिद्धीस नेतो. ह्याला साष्टांह प्रणिपात करा. अगदी ह्याच्या घरच्या मनुष्याप्रमाणें हा प्रेमळ आणि सर्व वस्तुजात जाणणारा आहे, तेव्हां ह्या अग्नीची भक्तीनें उपासना करा. श्रेष्ठ असा जो सनातन धर्म, त्याच्या संरक्षणाकरितां अग्नि हा रथावर आरूढ होऊन अगदी सज्ज असतो, व म्हणूनच हा सर्वसाक्षी भगवान देवतांचा धुरीण झाला आहे. ॥ ८ ॥


ति॒स्रो य॒ह्वस्य॑ स॒मिधः॒ परि॑ज्मनो॒ऽग्नेर॑पुनन्नु॒शिजो॒ अमृ॑त्यवः ।
तासा॒मेका॒मद॑धु॒र्मर्त्ये॒ भुज॑मु लो॒कमु॒ द्वे उप॑ जा॒मिमी॑यतुः ॥ ९ ॥

तिस्रः यह्वस्य समिधः परिज्मनोऽग्नेरपुनन्नुशिजः अमृत्यवः ।
तासामेकामदधुर्मर्त्ये भुजमु लोकमु द्वे उप जामिमीयतुः ॥ ९ ॥

सर्व जगाला गराडा देणारा व अखंडगति असा जो श्रेष्ठ अग्नि त्याच्या तीन अमर व तेजःपुंज विभूतींनी उत्कट भक्तिमान अशा उपासकांना पावन केलें त्या तिन्हीपैकीं सर्वांचे पोषण करणारी अशी एक विभूति भक्तांनी ह्या मृत्युलोकीं ठेऊन घेतली आणि बाकीच्या दोघी ह्या मृत्युलोकाच्या बरोबरच निर्माण झालेला जो स्वर्गलोक , तेथें निघून गेल्या. ॥ ९ ॥


वि॒शां क॒विं वि॒श्पतिं॒ मानु॑षी॒रिषः॒ सं सी॑मकृण्व॒न्स्वधि॑तिं॒ न तेज॑से ।
स उ॒द्वतो॑ नि॒वतो॑ याति॒ वेवि॑ष॒त्स गर्भ॑मे॒षु भुव॑नेषु दीधरत् ॥ १० ॥

विशां कविं विश्पतिं मानुषीरिषः सं सीमकृण्वन्स्वधितिं न तेजसे ।
स उद्वतः निवतः याति वेविषत्स गर्भमेषु भुवनेषु दीधरत् ॥ १० ॥

एखादा खड्ग अगदी जलाल धार आणण्यासाठीं पाजळावा त्याप्रमाणें सर्व जनांचा नृपति जो अग्नि त्याच्या आंगी आमच्या मानवी ऋत्विजांच्या ईर्ष्येनें मोठी तीव्रता आली आहे, त्या कारणानें पृथ्वीवरील प्रदेश उंच असो कीं सखल असो, तो सर्व ह्या अग्नीनें व्यापून टाकून अखिल भुवनांच्या अंतर्भागीं त्यानें आपल्या तेजाचें बीज ठेवून दिलें. ॥ १० ॥


स जि॑न्वते ज॒ठरे॑षु प्रजज्ञि॒वान्वृषा॑ चि॒त्रेषु॒ नान॑द॒न्न सिं॒हः ।
वै॒श्वा॒न॒रः पृ॑थु॒पाजा॒ अम॑र्त्यो॒ वसु॒ रत्ना॒ी दय॑मानो॒ वि दा॒शुषे॑ ॥ ११ ॥

स जिन्वते जठरेषु प्रजज्ञिवान्वृषा चित्रेषु नानदन्न सिंहः ।
वैश्वानरः पृथुपाजा अमर्त्यः वसु रत्नात दयमानः वि दाशुषे ॥ ११ ॥

अत्यंत ज्ञानशाली, वीरश्रेष्ठ असा हा अग्नि पृथ्वीच्या चित्रविचित्र कुहरांत मोठी भयंकर गर्जना करणार्‍या सिंहाप्रमाणे जोराने वृद्धिंगत होतो. सर्वजनप्रिय, व आपल्या अलोट तेजाच्या भरांत असणारा हा अमर प्रभू आपल्या भक्तांना मनोरथांची आणि दिव्य रत्नांची प्राप्ति निःसंशय करून देतो. ॥ ११ ॥


वै॒श्वा॒न॒रः प्र॒त्नरथा॒ नाक॒मारु॑हद्दि॒वस्पृ॒ष्ठं भन्द॑मानः सु॒मन्म॑भिः ।
स पू॑र्व॒वज्ज॒नय॑ञ्ज॒न्तवे॒ धनं॑ समा॒नमज्मं॒ पर्ये॑ति॒ जागृ॑विः ॥ १२ ॥

वैश्वानरः प्रत्नयथा नाकमारुहद्दिवस्पृष्ठं भंदमानः सुमन्मभिः ।
स पूर्ववज्जनयञ्जंतवे धनं समानमज्मं पर्येति जागृविः ॥ १२ ॥

सर्वजनप्रिय वैश्वानर अग्नि अनादि कालापासून द्युलोकाच्या शिखरावर आरोहण करून बसला आहे आणि भक्तांनी वेळोवेळी केलेल्या मनोहर आणि मननीय स्तोत्रांनी त्याच्या दिव्य वैभवाची महतीही गाइलीच आहे; म्हणून पूर्वीं जसे हा भक्तांना दिव्य धन प्राप्त करून देत असे त्याप्रमाणे आतांही आठवण ठेवून दीन जनांना दिव्य धनाचा लाभ देतांना त्या पूर्वीच्याच प्रशस्त मार्गाचा अवलंब करतो. ॥ १२ ॥


ऋ॒तावा॑नं य॒ज्ञियं॒ विप्र॑मु॒क्थ्य१मा यं द॒धे मा॑त॒रिश्वा॑ दि॒वि क्षय॑म् ।
तं चि॒त्रया॑मं॒ हरि॑केशमीमहे सुदी॒तिम॒ग्निं सु॑वि॒ताय॒ नव्य॑से ॥ १३ ॥

ऋतावानं यज्ञियं विप्रमुक्थ्य१मा यं दधे मातरिश्वा दिवि क्षयम् ।
तं चित्रयामं हरिकेशमीमहे सुदीतिमग्निं सुविताय नव्यसे ॥ १३ ॥

जो सत् धर्मप्रिय, परमपूज्य, महाज्ञानी असून स्तुत्य आणि द्युलोकनिवासी आहे, ज्याची मातरिश्वाने भूमीवर स्थापना केली, ज्याची गती अद्‍भुत व ज्याचे किरणरूप केश पीतवर्ण आहेत अशा त्या उज्ज्वल, कांतिमान अग्नीची प्रार्थना अपूर्व आनंद प्राप्त व्हावा म्हणून आम्ही त्याच्यापुढे पदर पसरून करीत आहो. ॥ १३ ॥


शुचिं॒ न याम॑न्निषि॒रं स्व॒र्दृशं॑ के॒तुं दि॒वो रो॑चन॒स्थामु॑ष॒र्बुध॑म् ।
अ॒ग्निम्मू॒र्धानं॑ दि॒वो अप्र॑तिष्कुतं॒ तमी॑महे॒ नम॑सा वा॒जिनं॑ बृ॒हत् ॥ १४ ॥

शुचिं न यामन्निषिरं स्वर्दृशं केतुं दिवः रोचनस्थामुषर्बुधम् ।
अग्निम्मूर्धानं दिवः अप्रतिष्कुतं तमीमहे नमसा वाजिनं बृहत् ॥ १४ ॥

जो परम पवित्र व दिव्यलोकदर्शी असून आकाशलोकाचा ध्वजच शोभतो, ज्याचा निवास तेजोमय अशा द्युलोकांत आहे, जो उषेला जागृत करणारा आणि द्युलोकांचें जणुं श्रेष्ठ मस्तकच असा अनिवार्य आणि सत्यवीर अग्नि मनोरथप्राप्तीच्या मार्गात भक्तांना प्रोत्साहन देतो म्हणून त्याला प्रणिपात करून आणि अत्यंत लीन होऊन आम्ही त्याची प्रार्थना करीत आहो. ॥ १४ ॥


म॒न्द्रं होता॑रं॒ शुचि॒मद्व॑याविनं॒ दमू॑नसमु॒क्थ्यं वि॒श्वच॑र्षणिम् ।
रथं॒ न चि॒त्रं वपु॑षाय दर्श॒तं मनु॑र्हितं॒ सद॒मिद्रा॒य ई॑महे ॥ १५ ॥

मंद्रं होतारं शुचिमद्वयाविनं दमूनसमुक्थ्यं विश्वचर्षणिम् ।
रथं न चित्रं वपुषाय दर्शतं मनुर्हितं सदमिद्राय ईमहे ॥ १५ ॥

जो आनंदमय, परम पवित्र आणि निष्कपट आहे, जो प्रशांतचित्त, परम स्तुत्य व सर्वसाक्षी असा यज्ञ-होता आहे, एखाद्या अद्‍भुत रथाप्रमाणे आपल्या मनोहर कांतिमुळेंच जो दर्शनीय झाला आहे आणि जो लोकांचा हित-कर्ता आहे, अशा अग्निपाशी आम्ही सदैव लीन होऊन दिव्य ऐश्वर्याची याचना करतो. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ३ (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - वैश्वानर अग्नि : छंद - जगती


वै॒श्वा॒न॒राय॑ पृथु॒पाज॑से॒ विपो॒ रत्ट्ना॑ विधन्त ध॒रुणे॑षु॒ गात॑वे ।
अ॒ग्निर्हि दे॒वाँ अ॒मृतो॑ दुव॒स्यत्यथा॒ धर्मा॑णि स॒नता॒ न दू॑दुषत् ॥ १ ॥

वैश्वानराय पृथुपाजसे विपः रत्ट्ना विधंत धरुणेषु गातवे ।
अग्निर्हि देवान् अमृतः दुवस्यत्यथा धर्माणि सनता न दूदुषत् ॥ १ ॥

सर्वजनप्रिय व आपल्या अलोट तेजाच्या भरांत मग्न राहणार्‍या अशा अग्नीची उपासना ज्ञानी भक्तजन स्तोत्ररत्‍नांनी करीत असतात, ते त्याची जीं शाश्वत स्थानें आहेत त्या ठिकाणी जाण्याकरितां होय. स्वतः अग्नि हा अमर असूनही यज्ञामध्यें भक्तांसाठी देवतांना प्रसन्न ठेवतो, तेव्हां अर्थातच धर्माला बट्टा आणण्यासारखे वर्तन कोणी कधींही करू नये. ॥ १ ॥


अ॒न्तर्दू॒तो रोद॑सी द॒स्म ई॑यते॒ होता॒ निष॑त्तो॒ मनु॑षः पु॒रोहि॑तः ।
क्षयं॑ बृ॒हन्तं॒ परि॑ भूषति॒ द्युभि॑र्दे॒वेभि॑र॒ग्निरि॑षि॒तो धि॒याव॑सुः ॥ २ ॥

अंतर्दूतः रोदसी दस्म ईयते होता निषत्तः मनुषः पुरोहितः ।
क्षयं बृहंतं परि भूषति द्युभिर्देवेभिरग्निरिषितः धियावसुः ॥ २ ॥

अद्‍भुत चमत्कार करणारा हा अग्नि भक्तांचा प्रतिनिधी होऊन द्युलोक आणि पृथिवी ह्यांच्या अंतर्भागी स्वेच्छ संचार करीत असतो. सर्व भक्तांचा तो यज्ञसंपादक व प्रमुख आचार्य होऊन बसलेलाच आहे आणि देवांचे विस्तीर्ण निवासस्थान असे आकाश अग्नीनें जें तेजोगोलकांनी अत्यंत सुशोभित करून सोडले ते देवांनी केलेल्या विनंतीवरून होय, कारण भक्तांनी केलेलें स्तवन आणि ध्यान हीच त्याची संपत्ति आहे. ॥ २ ॥


के॒तुं य॒ज्ञानां॑ वि॒दथ॑स्य॒ साध॑नं॒ विप्रा॑सो अ॒ग्निं म॑हयन्त॒ चित्ति॑भिः ।
अपां॑सि॒ यस्मि॒न्नधि॑ संद॒धुर्गिर॒स्तस्मि॑न्सु॒म्नानि॒ यज॑मान॒ आ च॑के ॥ ३ ॥

केतुं यज्ञानां विदथस्य साधनं विप्रासः अग्निं महयंत चित्तिभिः ।
अपांसि यस्मिन्नधि संदधुर्गिरस्तस्मिन्सुम्नानि यजमान आ चके ॥ ३ ॥

यज्ञाचा उज्ज्वल ध्वज आणि धर्मसभेच्या उत्कर्षाचे मूळ कारण म्हणून अग्नीची महती ज्ञानी भक्तजन एकाग्र चित्त करून वर्णन करीत असतात. ज्या अग्नीच्या ठिकाणी धर्मनिष्ठ लोक आपली सर्व स्तवनें आणि उपासना अर्पण करतात, त्याच ह्या अग्नीपासून उदात्त सुखाची प्राप्ति करून घेण्याची यजमानालाही लालसा असते. ॥ ३ ॥


पि॒ता य॒ज्ञाना॒मसु॑रो विप॒श्चितां॑ वि॒मान॑म॒ग्निर्व॒युनं॑ च वा॒घता॑म् ।
आ वि॑वेश॒ रोद॑सी॒ भूरि॑वर्पसा पुरुप्रि॒यो भ॑न्दते॒ धाम॑भिः क॒विः ॥ ४ ॥

पिता यज्ञानामसुरः विपश्चितां विमानमग्निर्वयुनं च वाघताम् ।
आ विवेश रोदसी भूरिवर्पसा पुरुप्रियः भंदते धामभिः कविः ॥ ४ ॥

जो यज्ञाचा पिता आहे, महाज्ञानी ऋषि ज्याला परमात्मा म्हणतात, आणि जो स्तोत्रगायन करणार्‍या ऋत्विजांच्या भक्तीचे मापच व धर्मज्ञानाचे निदर्शनच आहे, अशा सर्वजनप्रिय अग्नीनें ह्या प्रचंड द्यावापृथिवींना व्यापून टाकले आहे, आणि म्हणूनच त्याच्या किरणस्पर्शानेंच कवीचा उत्कर्ष होत असतो. ॥ ४ ॥


च॒न्द्रम॒ग्निं च॒न्द्रर॑थं॒ हरि॑व्रतं वैश्वान॒रम॑प्सु॒षदं॑ स्व॒र्विद॑म् ।
वि॒गा॒हं तूर्णिं॒ तवि॑षीभि॒रावृ॑तं॒ भूर्णिं॑ दे॒वास॑ इ॒ह सु॒श्रियं॑ दधुः ॥ ५ ॥

चंद्रमग्निं चंद्ररथं हरिव्रतं वैश्वानरमप्सुषदं स्वर्विदम् ।
विगाहं तूर्णिं तविषीभिरावृतं भूर्णिं देवास इह सुश्रियं दधुः ॥ ५ ॥

स्वतः आल्हाददायक असून त्याचा रथही आल्हाददायक आहे ; ज्याची प्रत्येक आज्ञा सुवर्णाप्रमाणे मौल्यवान असते, जो सर्वजनप्रिय, आकाशोदकांत राहून स्वर्लोकातील प्रकाशाची प्राप्ति करून देतो, सर्व वस्तूंच्या अंतरंगाचा ठाव ज्याला आहे व जो भक्तांकरितां त्वरेनें धांवणारा आणि धैर्यबलानें मंडित आहे, त्या ह्या तीव्र गतिमान व मनोहर कांतीने सुशोभित अशा अग्नीची खुद्द देवांनीच येथें पृथ्वीवर स्थापना केली. ॥ ५ ॥


अ॒ग्निर्दे॒वेभि॒र्मनु॑षश्च ज॒न्तुभि॑स्तन्वा॒नो य॒ज्ञं पु॑रु॒पेश॑सं धि॒या ।
र॒थीर॒न्तरी॑यते॒ साध॑दिष्टिभिर्जी॒रो दमू॑ना अभिशस्ति॒चात॑नः ॥ ६ ॥

अग्निर्देवेभिर्मनुषश्च जंतुभिस्तन्वानः यज्ञं पुरुपेशसं धिया ।
रथीरंतरीयते साधदिष्टिभिर्जीरः दमूना अभिशस्तिचातनः ॥ ६ ॥

देव आणि मनुष्यप्राणी अशा दोन्ही वर्गांना बरोबर घेऊन अग्नि हा नाना प्रकारचे यज्ञ आपल्या प्रज्ञासामर्थ्याने तडीस नेतो. हा रथारूढ वीरनायक, आणि प्रशांतचित्त अग्नि भक्तांना शिव्याशाप देणार्‍या दुर्जनांचे उच्चाटन करून व भक्तांच्या उपासनेचें ध्येय साध्य करून देऊन ह्या भूलोकीं सर्वत्र संचार करीत असतो. ॥ ६ ॥


अग्ने॒ जर॑स्व स्वप॒त्य आयु॑न्यू॒र्जा पि॑न्वस्व॒ समिषो॑ दिदीहि नः ।
वयां॑सि जिन्व बृह॒तश्च॑ जागृव उ॒शिग्दे॒वाना॒मसि॑ सु॒क्रतु॑र्वि॒पाम् ॥ ७ ॥

अग्ने जरस्व स्वपत्य आयुन्यूर्जा पिन्वस्व समिषः दिदीहि नः ।
वयांसि जिन्व बृहतश्च जागृव उशिग्देवानामसि सुक्रतुर्विपाम् ॥ ७ ॥

अग्निदेवा, ज्याला सुपुत्र आहेत त्याला भरपूर आयुष्याचा आशिर्वाद दे, त्याला ओजस्वीपणानें भरून टाक. आम्हांला उत्कृष्ट मनोत्साह दे, आणि आमच्या थोर यजमानाच्या उमेदीच्या वयाचा जोम वाढव. हे निरंतर जागृत राहणार्‍या अग्निदेवा, तूं देवांवर प्रेम करणारा आहेस आणि ज्ञानीजनांचे अलौकिन कर्तृत्वही तूंच आहेस. ॥ ७ ॥


वि॒श्पतिं॑ य॒ह्वमति॑थिं॒ नरः॒ सदा॑ य॒न्तारं॑ धी॒नामु॒शिजं॑ च वा॒घता॑म् ।
अ॒ध्व॒राणां॒ चेत॑नं जा॒तवे॑दसं॒ प्र शं॑सन्ति॒ नम॑सा जू॒तिभि॑र्वृ॒धे ॥ ८ ॥

विश्पतिं यह्वमतिथिं नरः सदा यंतारं धीनामुशिजं च वाघताम् ।
अध्वराणां चेतनं जातऽवेदसं प्र शंसंति नमसा जूतिभिर्वृधे ॥ ८ ॥

मनुष्यांचा नृपति असूनही जो नेहमी कार्यव्यापृत असतो, जो भक्तांचा अतिथि, बुद्धिंचा नियामक, ऋत्विजांच्या प्रेमाचा भुकेला व यज्ञयागांची प्राणज्योति आहे, सर्व वस्तुजात ज्याला अवगत अशा अग्निला प्रणिपात करून भक्तजन हे आपल्या उत्कर्षासाठी त्यांच्या अंतःकरणांतून उमाळ्यानें बाहेर पडणार्‍या स्तवनांनी त्याला सदैव आळवीत असतात. ॥ ८ ॥


वि॒भावा॑ दे॒वः सु॒रणः॒ परि॑ क्षि॒तीर॒ग्निर्ब॑भूव॒ शव॑सा सु॒मद्र॑थः ।
तस्य॑ व्र॒तानि॑ भूरिपो॒षिणो॑ व॒यमुप॑ भूषेम॒ दम॒ आ सु॑वृ॒क्तिभिः॑ ॥ ९ ॥

विभावा देवः सुरणः परि क्षितीरग्निर्बभूव शवसा सुमद्रथः ।
तस्य व्रतानि भूरिपोषिणः वयमुप भूषेम दम आ सुवृक्तिभिः ॥ ९ ॥

देदीप्यमान आणि मधुर निनाद करणारा हा देव आपल्या स्वयंप्रेरित रथांत आरूढ होऊन ज्याच्या योगानें हवे तेवढे मोठे होता येतें, अशा आपल्या सामर्थ्यानें सर्व जगाला वेष्टून राहिलेला आहे. तर ह्या विश्वपोषक अग्नीच्या यज्ञमंदिरांत शुद्ध अंतःकरणानें त्याच्या उपासनांचे परिपालन करणें हें आपलें कर्तव्य आहे. ॥ ९ ॥


वैश्वा॑नर॒ तव॒ धामा॒न्या च॑के॒ येभिः॑ स्व॒र्विदभ॑वो विचक्षण ।
जा॒त आपृ॑णो॒ भुव॑नानि॒ रोद॑सी॒ अग्ने॒ ता विश्वा॑ परि॒भूर॑सि॒ त्मना॑ ॥ १० ॥

वैश्वानर तव धामान्या चके येभिः स्वर्विदभवः विचक्षण ।
जात आपृणः भुवनानि रोदसी अग्ने ता विश्वा परिभूरसि त्मना ॥ १० ॥

हे सर्वजनप्रिय, महाप्रज्ञ अग्निदेवा, ज्यांच्या योगानें तूं भक्तांना स्वर्गीय प्रकाशाचा लाभ करून देतोस त्या तुझ्या यशोमहिम्याचीच मला आवड आहे. कारण प्रकट होतांच तूं उभय लोकांना, अर्थात सर्व भुवनांना भरून सोडून पुनः त्याच्या बाहेरही तूं त्यांना वेढून टाकून सांवरून धरलें आहेस. ॥ १० ॥


वै॒श्वा॒न॒रस्य॑ दं॒सना॑भ्यो बृ॒हदरि॑णा॒देकः॑ स्वप॒स्यया॑ क॒विः ।
उ॒भा पि॒तरा॑ म॒हय॑न्नजायता॒ग्निर्द्यावा॑पृथि॒वी भूरि॑रेतसा ॥ ११ ॥

वैश्वानरस्य दंसनाभ्यः बृहदरिणादेकः स्वपस्यया कविः ।
उभा पितरा महयन्नजायताग्निर्द्यावापृथिवी भूरिरेतसा ॥ ११ ॥

काव्यकुशल भक्त सत्कर्म तत्पर असला म्हणजे त्याच्या योगाने तो ह्या सर्वजनप्रिय अग्नीच्या अद्‍भुत कृत्यांपासून वाटेल तेवढे महत्कार्य साध्य करूं शकतो. ज्याचें उत्पादन साधन फारच मोठे असे जे जगाचे आईबाप पृथिवी आणि द्यू त्याचे गौरव राखून हा अग्नि वेदीवर अवतीर्ण झाला आहे. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ४ (आप्री सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - इध्मः समिद्धः अग्नि : छंद - त्रिष्टुप्


स॒मित्स॑मित् सु॒मना॑ बोध्य॒स्मे शु॒चाशु॑चा सुम॒तिं रा॑सि॒ वस्वः॑ ।
आ दे॑व दे॒वान्य॒जथा॑य वक्षि॒ सखा॒ सखी॑न्त्सु॒मना॑ यक्ष्यग्ने ॥ १ ॥

समित्समित् सुमना बोध्यस्मे शुचाशुचा सुमतिं रासि वस्वः ।
आ देव देवान्यजथाय वक्षि सखा सखींत्सुमना यक्ष्यग्ने ॥ १ ॥

हे अग्ने, जसजसा तूं प्रज्वलित होत जाशील तसतसा तूं आम्हांवर अधिक अधिक प्रसन्न हो आणि तुझ्या प्रकाशाच्या वाढत्या लकाकीबरोबरच सर्वोत्कृष्ट वैभवाकडे आमचे लक्ष्य अधिकाधिक वेधून जाईल असे कर. हे देवा तूं आपल्या देवतागणाला आमच्या यज्ञाकरितां घेऊन ये, आणि तूं आम्हा सर्वांचा जिवलग मित्र म्हणून तूं आम्हांवर प्रसन्न होऊन तुझे जिवलग मित्र जे देव त्यांनाही संतुष्ट कर. ॥ १ ॥


यं दे॒वास॒स्त्रिरह॑न्ना॒यज॑न्ते दि॒वेदि॑वे॒ वरु॑णो मि॒त्रो अ॒ग्निः ।
सेमं य॒ज्ञं मधु॑मन्तं कृधी न॒स्तनू॑नपाद्‌घृ॒तयो॑निं वि॒धन्त॑म् ॥ २ ॥

यं देवासस्त्रिरहन्नायजंते दिवेदिवे वरुणः मित्रः अग्निः ।
सेमं यज्ञं मधुमंतं कृधी नस्तनूनपाद्‌घृतयोनिं विधंतम् ॥ २ ॥

ज्याला वरुण, मित्र आणि अग्नि हे नित्य दिवसांतूने तीन वेळ यज्ञ सांग करण्यासाठी भक्ताकडून संतुष्ट करतात, तो तूं तनूनपात् (देवांचा) सत्कार करणारा व घृतामुळेच ज्याचे अस्तित्त्व आहे असा हा आमचा यज्ञ मधुर अमृतानें आर्द्र कर. ॥ २ ॥


प्र दीधि॑तिर्वि॒श्ववा॑रा जिगाति॒ होता॑रमि॒ळः प्र॑थ॒मं यज॑ध्यै ।
अच्छा॒ नमो॑भिर्वृष॒भं व॒न्दध्यै॒ स दे॒वान्य॑क्षदिषि॒तो यजी॑यान् ॥ ३ ॥

प्र दीधितिर्विश्ववारा जिगाति होतारमिळः प्रथमं यजध्यै ।
अच्छा नमोभिर्वृषभं वंदध्यै स देवान्यक्षदिषितः यजीयान् ॥ ३ ॥

विश्वांतील सर्व रमणीयत्व जिच्यांत आहे अशी भक्तानें केलेली एकाग्र स्तुति, पुरातन आचार्य जो अग्नि, त्याला हवि अर्पण करण्याकरितां आणि त्या कामवर्षक वीराला वंदन करण्याकरितां नमस्कार करीत करीत पुढे सरसावत आहे. तर हा अग्नि आम्हां भक्तांच्याच विज्ञप्तीनें आमचा याजक होऊन देवांना संतुष्ट करो. ॥ ३ ॥


ऊ॒र्ध्वो वां॑ गा॒तुर॑ध्व॒रे अ॑कार्यू॒र्ध्वा शो॒चींषि॒ प्रस्थि॑ता॒ रजां॑सि ।
दि॒वो वा॒ नाभा॒ न्यसादि॒ होता॑ स्तृणी॒महि॑ दे॒वव्य॑चा॒ वि ब॒र्हिः ॥ ४ ॥

ऊर्ध्वः वां गातुरध्वरे अकार्यूर्ध्वा शोचींषि प्रस्थिता रजांसि ।
दिवः वा नाभा न्यसादि होता स्तृणीमहि देवव्यचा वि बर्हिः ॥ ४ ॥

हे पतिपत्‍नींनो, ह्या यज्ञामध्यें तुम्हां उभयतांच्या कर्तव्याचा मार्ग अगदीं सुव्यवस्थित झाला आहे, आणि अग्नीच्या ज्वालाही पहा कशा नीट रजोलोकाकडेच लागून राहून तो यज्ञसंपादक अग्नि द्युलोकाच्या मध्य मार्गी अत्युच्च प्रदेशी विराजमान झाला आहे; तर सर्व देवतांचे विस्तृत आसन जे कुशास्तरण तें आपण आतां पसरूं. ॥ ४ ॥


स॒प्त हो॒त्राणि॒ मन॑सा वृणा॒ना इन्व॑न्तो॒ विश्वं॒ प्रति॑ यन्नृ॒तेन॑ ।
नृ॒पेश॑सो वि॒दथे॑षु॒ प्र जा॒ता अ॒भी३मं य॒ज्ञं वि च॑रन्त पू॒र्वीः ॥ ५ ॥

सप्त होत्राणि मनसा वृणाना इन्वंतः विश्वं प्रति यन्नृतेन ।
नृपेशसः विदथेषु प्र जाता अभी३मं यज्ञं वि चरंत पूर्वीः ॥ ५ ॥

सप्त होत्र कर्मांची ज्यांना मनापासून इच्छा आहे त्या देवता सर्व जगाला आनंदित करून आपल्या परिपाठाप्रमाणे आतां आमच्याकडे आल्या आहेत. एखाद्या वीर पुरुषाप्रमाणे ज्यांचा आविर्भाव असून यज्ञसभेमध्येंच ज्या प्रकट होतात त्या नानाविध देवतासुद्धां आमच्या यज्ञाला प्राप्त झाल्या आहेत. ॥ ५ ॥


आ भन्द॑माने उ॒षसा॒ उपा॑के उ॒त स्म॑येते त॒न्वा३ विरू॑पे ।
यथा॑ नो मि॒त्रो वरु॑णो॒ जुजो॑ष॒दिन्द्रो॑ म॒रुत्वाँ॑ उ॒त वा॒ महो॑भिः ॥ ६ ॥

आ भंदमाने उषसा उपाके उत स्मयेते तन्वा३ विरूपे ।
यथा नः मित्रः वरुणः जुजोषदिंद्रः मरुत्वान् उत वा महोभिः ॥ ६ ॥

उषा आणि रात्र ज्या आपल्याच यशानें विभूषित परंतु अगदीं विसदृश असतांही परस्परांशी अगदीं सल्लग्न असतात त्या आमच्यावर स्मितहास्याचा अनुग्रह करोत. कारण त्यांनी दयाळुपणानें स्मित केलें कीं मित्र, वरुण अथवा आपल्या वैभवानें अलंकृत असा मरुतांचा प्रभू जो इंद्र त्याची आम्हांवर कृपा होईल. ॥ ६ ॥


दैव्या॒ होता॑रा प्रथ॒मा न्यृञ्जे स॒प्त पृ॒क्षासः॑ स्व॒धया॑ मदन्ति ।
ऋ॒तं शंस॑न्त ऋ॒तमित्त आ॑हु॒रनु॑ व्र॒तं व्र॑त॒पा दीध्या॑नाः ॥ ७ ॥

दैव्या होतारा प्रथमा न्यृञ्जे सप्त पृक्षासः स्वधया मदंति ।
ऋतं शंसंत ऋतमित्त आहुरनु व्रतं व्रतपा दीध्यानाः ॥ ७ ॥

अगदीं मूळचे जे दोन दिव्य यज्ञ होते त्यांचा मी आतां सत्कार करतो. सामर्थ्यसंपन्न असे सात ऋषि, पुरातन सांप्रदायानुरूप सोमरस प्राशनानें दृष्टचित्त झालेच आहेत, ते सत्यधर्माचीच महती गातात, अबाधित असेंच सत्यभाषण करतात आणि धर्माचारांचे यथायोग्य परिपालन करून भगवत् आज्ञेप्रमाणे ध्यानामध्यें तल्लीन होतात. ॥ ७ ॥


आ भार॑ती॒ भार॑तीभिः स॒जोषा॒ इळा॑ दे॒वैर्म॑नु॒ष्येभिर॒ग्निः ।
सर॑स्वती सारस्व॒तेभि॑र॒र्वाक् ति॒स्रो दे॒वीर् ब॒र्हिरेदं स॑दन्तु ॥ ८ ॥

आ भारती भारतीभिः सजोषा इळा देवैर्मनुष्येभिरग्निः ।
सरस्वती सारस्वतेभिरर्वाक् तिस्रः देवीर् बर्हिरेदं सदंतु ॥ ८ ॥

आपल्या परिचारिकांसह भारती, देवसंघासहित प्रेमळ अशी इळा, मनुष्य-ऋषि-गणांसहित अग्नि, आणि आपल्या सेवकवर्गासहित सरस्वति, अशा तिन्ही देवी इकडे भूलोकीं येऊन ह्या कुशासनावर आरोहण करोत. ॥ ८ ॥


तन्न॑स्तु॒रीप॒मध॑ पोषयि॒त्नुर देव॑ त्वष्ट॒र्वि र॑रा॒णः स्य॑स्व ।
यतो॑ वी॒रः क॑र्म॒ण्यः सु॒दक्षो॑ यु॒क्तग्रा॑वा॒ जाय॑ते दे॒वका॑मः ॥ ९ ॥

तन्नस्तुरीपमध पोषयित्नुन देव त्वष्टर्वि रराणः स्यस्व ।
यतः वीरः कर्मण्यः सुदक्षः युक्तग्रावा जायते देवकामः ॥ ९ ॥

हे उज्ज्वल कांतिमान त्वष्ट्रदेवा, तूं संतुष्ट होऊन, आम्हांमध्यें जें प्रबल वीर्य आहे त्याची अशी योजना कर, कीं आमचा पुत्र शौर्यसंपन्न, सत्कर्मरत, चतुर, सोमयाजी आणि भगवद्‍भक्त असाच निपजेल. ॥ ९ ॥


वन॑स्प॒तेऽ॑व सृ॒जोप॑ दे॒वान॒ग्निर्ह॒विः श॑मि॒ता सू॑दयाति ।
सेदु॒ होता॑ स॒त्यत॑रो यजाति॒ यथा॑ दे॒वानां॒ जनि॑मानि॒ वेद॑ ॥ १० ॥

वनस्पतेऽव सृजोप देवानग्निर्हविः शमिता सूदयाति ।
सेदु होता सत्यतरः यजाति यथा देवानां जनिमानि वेद ॥ १० ॥

हे यूपा, देवांकरितां तुझ्याजवळील हवि तूं अर्पण कर म्हणजे स्वतः अग्नीच शमिता होऊन तें परिपक्व करील. तो पूर्ण सत्यस्वरूप आहे, तेव्हां यज्ञाचा संपादक होऊन तोच यजन करील, कारण देवतांची इत्थंभूत माहिती त्यालाच आहे. ॥ १० ॥


आ या॑ह्यग्ने समिधा॒नो अ॒र्वाङ्‌इन्द्रे॑ण दे॒वैः स॒रथं॑ तु॒रेभिः॑ ।
ब॒र्हिर्न॑ आस्ता॒मदि॑तिः सुपु॒त्रा स्वाहा॑ दे॒वा अ॒मृता॑ मादयन्ताम् ॥ ११ ॥

आ याह्यग्ने समिधानः अर्वाङ्‌इंद्रेण देवैः सरथं तुरेभिः ।
बर्हिर्न आस्तामदितिः सुपुत्रा स्वाहा देवा अमृता मादयंताम् ॥ ११ ॥

तर हे अग्ने, तूं प्रज्वलित होऊन घाईघाईनें इकडे निघालेल्या देवतांना घेऊन इंद्रासह एका रथांत बसून आमच्याकडे ये. जी सत्पुत्रांनाच प्रसवली आहे ती चिच्छक्ति अदितिही येथें कुशासनावर विराजमान होवो, आणि "स्वाहा" असा उच्चार होतांच देव हविर्भाग गृहण करून हर्षभरीत होवोत. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ५ (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


प्रत्य॒ग्निरु॒षस॒श्चेकि॑ता॒नोऽ॑बोधि॒ विप्रः॑ पद॒वीः क॑वी॒नाम् ।
पृ॒थु॒पाजा॑ देव॒यद्‌भिः॒ समि॒द्धोऽ॑प॒ द्वारा॒ तम॑सो॒ वह्नि॑रावः ॥ १ ॥

प्रत्यग्निरुषसश्चेकितानोऽबोधि विप्रः पदवीः कवीनाम् ।
पृथुपाजा देवयद्‌भिः समिद्धोऽप द्वारा तमसः वह्निरावः ॥ १ ॥

प्रति दिवशी आपल्या प्रकाशानें उषांना अर्थपूर्ण दृष्टीने पाहणारा व कवींच्या काव्य मार्गाचा धुरीण असा हा महाज्ञानी अग्नि जागृत झाला आहे, आणि देवभक्तांनीं प्रज्वलित केल्यावर आपल्या अलोट तेजोभरानें प्रदीप्त होऊन त्या पवित्र हव्य वाहन अग्नीनें अंधकाराचे बंद असलेले दरवाजे फोडून टाकून प्रकाशाचा रस्ता मोकळा केला आहे. ॥ १ ॥


प्रेद्व॒ग्निर्वा॑वृधे॒ स्तोमे॑भिर्गी॒र्भिः स्तो॑तॄ॒णां न॑म॒स्य उ॒क्थैः ।
पू॒र्वीर्‌ऋ॒तस्य॑ सं॒दृश॑श्चका॒नः सं दू॒तो अ॑द्यौदु॒षसो॑ विरो॒के ॥ २ ॥

प्रेद्वग्निर्वावृधे स्तोमेभिर्गीर्भिः स्तोतॄणां नमस्य उक्थैः ।
पूर्वीर्‌ऋतस्य संदृशश्चकानः सं दूतः अद्यौदुषसः विरोके ॥ २ ॥

परमवंद्य अग्नि स्तोतृजनांच्या कीर्तनांनी आणि सामगायनांनी खरोखरच अतिशय उल्हसित झाला. सनातन धर्माची जी अनेक प्रकारची शोभा आहे तीच त्याला फार प्रिय वाटते, आणि अशा तऱ्हेने भक्तांचा मध्यस्थ होऊन तो उषःकालची प्रभा दृगोच्चर होण्याबरोबर सुप्रकाशित झाला आहे. ॥ २ ॥


अधा॑य्य॒ग्निर्मानु॑षीषु वि॒क्ष्व१॑पां गर्भो॑ मि॒त्र ऋ॒तेन॒ साध॑न् ।
आ ह॑र्य॒तो य॑ज॒तः सान्व॑स्था॒दभू॑दु॒ विप्रो॒ हव्यो॑ मती॒नाम् ॥ ३ ॥

अधाय्यग्निर्मानुषीषु विक्ष्व१पां गर्भः मित्र ऋतेन साधन् ।
आ हर्यतः यजतः सान्वस्थादभूदु विप्रः हव्यः मतीनाम् ॥ ३ ॥

प्रेमळ अग्नि हा दिव्यलोकांचे उत्पत्तिस्थान असून सत्यधर्माच्या योगानेंच भक्तांची सर्व कार्ये व हेतु तडीस नेतो. त्याची स्थापना ह्या मानवलोकांत झालेलीच आहे, व म्हणूनच हा रुचिर, पूज्य आणि महाप्रज्ञ अग्नि वेदीच्या शिखरावर आरोहण करून बसला आणि भक्तांच्या सुविचारमय स्तवनांनी आळविण्यास पात्र झाला. ॥ ३ ॥


मि॒त्रो अ॒ग्निर्भ॑वति॒ यत्समि॑द्धो मि॒त्रो होता॒ वरु॑णो जा॒तवे॑दाः ।
मि॒त्रो अ॑ध्व॒र्युरि॑षि॒रो दमू॑ना मि॒त्रः सिन्धू॑नामु॒त पर्व॑तानाम् ॥ ४ ॥

मित्रः अग्निर्भवति यत्समिद्धः मित्रः होता वरुणः जातऽवेदाः ।
मित्रः अध्वर्युरिषिरः दमूना मित्रः सिंधूनामुत पर्वतानाम् ॥ ४ ॥

प्रेमळ अग्नि प्रज्वलित झाला म्हणजे तोच यज्ञसंपादक होतो, मित्रदेव तोच आणि सकलवस्तू जाणणारा असा वरुणही तोच होतो. सर्वांचा मित्र असा हा उत्साहप्रद आणि प्रशांतचित्त अग्नीच अध्वर्यु होतो व महानद्या आणि पर्वत ह्यांचा उपकारकही तोच होतो. ॥ ४ ॥


पाति॑ प्रि॒यं रि॒पो अग्रं॑ प॒दं वेः पाति॑ य॒ह्वश्चर॑णं॒ सूर्य॑स्य ।
पाति॒ नाभा॑ स॒प्तशी॑र्षाणम॒ग्निः पाति॑ दे॒वाना॑मुप॒माद॑मृ॒ष्वः ॥ ५ ॥

पाति प्रियं रिपः अग्रं पदं वेः पाति यह्वश्चरणं सूर्यस्य ।
पाति नाभा सप्तशीर्षाणमग्निः पाति देवानामुपमादमृष्वः ॥ ५ ॥

तो पृथ्वीचे आणि दिव्य पक्ष्याच्या प्रिय व उच्च अशा स्थानाचे रक्षण करतो. सूर्याच्या मार्गाचेंही रक्षण तोच अखंडगति अग्नि करतो. अग्नि हा पृथ्वीच्या मध्यभागीं राहून सात मस्तकें असणार्‍या छंदांचे जसे रक्षण करतो त्याप्रमाणे देवांच्या आनंदाचें स्थान जो यज्ञ त्याचेंही संरक्षण तो परम श्रेष्ठ अग्निच करतो. ॥ ५ ॥


ऋ॒भुश्च॑क्र॒ ईड्यं॒ चारु॒ नाम॒ विश्वा॑नि दे॒वो व॒युना॑नि वि॒द्वान् ।
स॒सस्य॒ चर्म॑ घृ॒तव॑त्प॒दं वेस्तदिद॒ग्नी र॑क्ष॒त्यप्र॑युच्छन् ॥ ६ ॥

ऋभुश्चक्र ईड्यं चारु नाम विश्वानि देवः वयुनानि विद्वान् ।
ससस्य चर्म घृतवत्पदं वेस्तदिदग्नी रक्षत्यप्रयुच्छन् ॥ ६ ॥

सर्वधर्मविधींचे ज्याला उत्कृष्ट ज्ञान, अशा अग्नि देवानेंच ऋभुरूपानें आपलें आधीच सुंदर असे नांव लोकांच्या धन्यवादानें अधिकच संस्मरणीय करून ठेवलें आहे. जगांतील धान्यसंपत्तीचें रक्षण ढालीप्रमाणें करून दिव्य पक्ष्याचें पद आहे तेंही अग्नि हा अगदी न विसंबतां संभाळित असतो. ॥ ६ ॥


आ योनि॑म॒ग्निर्घृ॒तव॑न्तमस्थात्पृ॒थुप्र॑गाणमु॒शन्त॑मुशा॒नः ।
दीद्या॑नः॒ शुचि॑र्‌ऋ॒ष्वः पा॑व॒कः पुनः॑ पुनर्मा॒तरा॒ नव्य॑सी कः ॥ ७ ॥

आ योनिमग्निर्घृतवंतमस्थात्पृथुप्रगाणमुशंतमुशानः ।
दीद्यानः शुचिर्‌ऋष्वः पावकः पुनः पुनर्मातरा नव्यसी कः ॥ ७ ॥

घृताप्रमाणे ओजस्वी, मोठे विस्तीर्ण आणि देवाच्या आगमनाकरतां उत्सुक झालेले असें जें यज्ञाचें स्थान त्या स्थानावर पहा अग्नि उत्सुकतेनें आरूढ झाला आणि आरूढ होऊन तो देदीप्यमान, परमश्रेष्ठ, स्वतः पवित्र व इतरांसही पावन करणारा अग्नि आपल्या अरणिरूप दोन्ही मातांना पुनः पुनः तारुण्य दशेंत आणतो. ॥ ७ ॥


स॒द्यो जा॒त ओष॑धीभिर्ववक्षे॒ यदी॒ वर्ध॑न्ति प्र॒स्वो घृ॒तेन॑ ।
आप॑ इव प्र॒वता॒ शुम्भ॑माना उरु॒ष्यद॒ग्निः पि॒त्रोरु॒पस्थे॑ ॥ ८ ॥

सद्यः जात ओषधीभिर्ववक्षे यदी वर्धंति प्रस्वः घृतेन ।
आप इव प्रवता शुम्भमाना उरुष्यदग्निः पित्रोरुपस्थे ॥ ८ ॥

लतांचे कोमल अंकुर ओजस्वी अशा आकाशोदकानें वाढतात त्या प्रमाणें हा अग्निही एकदम प्रकट झाल्यावर वनस्पतीच्या योगानें प्रबल होतो. उंचावरून खालीं झपाट्यानें कोसळणार्‍या उदक प्रवाहाप्रमाणे ज्याचा झोत भव्य असतो असा हा अग्नि धरित्री व आकाश ह्या आईबापांच्या मांडीवर आम्हीं बसलों आहोंत तेथें आम्हांस पापनिर्मुक्त करो. ॥ ८ ॥


उदु॑ ष्टु॒तः स॒मिधा॑ य॒ह्वो अ॑द्यौ॒द्वर्ष्म॑न्दि॒वो अधि॒ नाभा॑ पृथि॒व्याः ।
मि॒त्रो अ॒ग्निरीड्यो॑ मात॒रिश्वा दू॒तो व॑क्षद्य॒जथा॑य दे॒वान् ॥ ९ ॥

उदु ष्टुतः समिधा यह्वः अद्यौद्वर्ष्मंदिवः अधि नाभा पृथिव्याः ।
मित्रः अग्निरीड्यः मातरिश्वा दूतः वक्षद्यजथाय देवान् ॥ ९ ॥

आम्ही अग्नीचें स्तवन केलें तेव्हां तो अखंडगति अग्नि आपल्या उज्ज्वल तेजानें पृथिवीच्या मध्यभागापासून आकाशाच्या अत्युच्च शिखरापर्यंत एकसारखा देदीप्यमान झाला आहे. अत्यंत धन्य अग्नि हाच मित्र आणि मातरिश्वा आहे तर तो आमचा प्रतिनिधी होऊन यज्ञाकरितां देवांना येथे घेऊन येवो. ॥ ९ ॥


उद॑स्तम्भीत्स॒मिधा॒ नाक॑मृ॒ष्वोऽ॒ग्निर्भव॑न्नुत्त॒मो रो॑च॒नाना॑म् ।
यदी॒ भृगु॑भ्यः॒ परि॑ मात॒रिश्वा॒ गुहा॒ सन्तं॑ हव्य॒वाहं॑ समी॒धे ॥ १० ॥

उदस्तम्भीत्समिधा नाकमृष्वोऽग्निर्भवन्नुत्तमः रोचनानाम् ।
यदी भृगुभ्यः परि मातरिश्वा गुहा संतं हव्यवाहं समीधे ॥ १० ॥

देवांना हविर्भाग पोहोंचविणारा हा अग्नि प्रथम गुप्त होता, त्याला मातरिश्वाने भृगूंपासून आणून प्रज्वलित केलें. त्यावेळेस तो परम श्रेष्ठ देव सर्व आकाशस्थ ज्योतींमध्ये आपल्या उज्वल कांतीनें प्रमुखत्व पावून आपल्या ज्वालेच्या आधारावर त्यानें खुद्द आकाशमंडलच सांवरून धरलें. ॥ १० ॥


इळा॑मग्ने पुरु॒दंसं॑ स॒निं गोः श॑श्वत्त॒मं हव॑मानाय साध ।
स्यान्नः॑ सू॒नुस्तन॑यो वि॒जावाग्ने॒ सा ते॑ सुम॒तिर्भू॑त्व॒स्मे ॥ ११ ॥

इळामग्ने पुरुदंसं सनिं गोः शश्वत्तमं हवमानाय साध ।
स्यान्नः सूनुस्तनयः विजावाग्ने सा ते सुमतिर्भूत्वस्मे ॥ ११ ॥

हे अग्निदेवा, मनोभावानें जो तुझा धांवा करतो त्या भक्ताला, धनधान्यसंपन्न भूमि आणि अद्भुत सामर्थ्यप्रचुर अशी दिव्य ज्ञानाची देणगी हीं सदैव साध्य होतील असें कर. आमचे पुत्रपौत्र हे आमचा वंशविस्तार करणारे होऊन, हे अग्निदेवा, तुझी अनुपम कृपाही आम्हांस प्राप्त होवो. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ - सूक्त ६ ते १०

ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ६ (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


प्र का॑रवो मन॒ना व॒च्यमा॑ना देव॒द्रीचीं॑ नयत देव॒यन्तः॑ ।
द॒क्षि॒णा॒वाड्वा॒जिनी॒ प्राच्ये॑ति ह॒विर्भर॑न्त्य॒ग्नये॑ घृ॒ताची॑ ॥ १ ॥

प्र कारवः मनना वच्यमाना देवद्रीचीं नयत देवयंतः ।
दक्षिणावाड्वाजिनी प्राच्येति हविर्भरंत्यग्नये घृताची ॥ १ ॥

स्तोतृजनहो, तुम्ही देवसेवा तत्पर आहांत. देवाचें मनन केल्याच्या योगानें तुमचे अंतःकरण उचंबळून गेलें आहे; तर ही देवसेवोत्सुक स्रुचा (पळी) आतां पुढें करा. ती सामर्थ्यदात्री व घृतपूर्ण अशी स्रुचा अग्नीप्रित्यर्थ हविर्भाग उचलून घेऊन पूर्वेकडे तोंड करून दक्षिणेकडे त्याच्या जवळ जाते. ॥ १ ॥


आ रोद॑सी अपृणा॒ जाय॑मान उ॒त प्र रि॑क्था॒ अध॒ नु प्र॑यज्यो ।
दि॒वश्चि॑दग्ने महि॒ना पृ॑थि॒व्या व॒च्यन्तां॑ ते॒ वह्न॑यः स॒प्तजि॑ह्वाः ॥ २ ॥

आ रोदसी अपृणा जायमान उत प्र रिक्था अध नु प्रयज्यः ।
दिवश्चिदग्ने महिना पृथिव्या वच्यंतां ते वह्नयः सप्तजिह्वाः ॥ २ ॥

हे परमवंद्य देवा, तूं प्रकट होतांच आकाश आणि पृथिवी ह्यांच्यात ओत प्रोत भरून राहिलास; इतकेंच नाहीं, तर त्यांच्यापेक्षांही जास्त वृद्धिंगत झालास. तर हे अग्निदेवा, तुझे ते सात जिव्हांचे अश्व तुझ्या सामर्थ्यमहिम्यानें आकाश व पृथिवी ह्यांच्या मधून उसळतच इकडे येवोत. ॥ २ ॥


द्यौश्च॑ त्वा पृथि॒वी य॒ज्ञिया॑सो॒ नि होता॑रं सादयन्ते॒ दमा॑य ।
यदी॒ विशो॒ मानु॑षीर्देव॒यन्तीः॒ प्रय॑स्वती॒रीळ॑ते शु॒क्रम॒र्चिः ॥ ३ ॥

द्यौश्च त्वा पृथिवी यज्ञियासः नि होतारं सादयंते दमाय ।
यदी विशः मानुषीर्देवयंतीः प्रयस्वतीरीळते शुक्रमर्चिः ॥ ३ ॥

भगवत्सेवोत्सुक मर्त्यजन आनंदभरीत होऊन तुझ्या शुभ्रवर्ण, तेजःपुंज कांतीचें गौरव करतात, म्हणूनच द्युलोक, पृथिवी आणि पूज्य अशा दिव्य विभूति ह्या सर्वांनी तुज अग्निलाच होतृत्व देऊन पातकांचे दमन करण्याकरितां ह्या भूलोकीं स्थापन केलें आहे. ॥ ३ ॥


म॒हान्त्स॒धस्थे॑ ध्रु॒व आ निष॑त्तोऽ॒न्तर्द्यावा॒ माहि॑ने॒ हर्य॑माणः ।
आस्क्रे॑ स॒पत्नी॑ अ॒जरे॒ अमृ॑क्ते सब॒र्दुघे॑ उरुगा॒यस्य॑ धे॒नू ॥ ४ ॥

महांत्सधस्थे ध्रुव आ निषत्तोऽंतर्द्यावा माहिने हर्यमाणः ।
आस्क्रे सपत्नी अजरे अमृक्ते सबर्दुघे उरुगायस्य धेनू ॥ ४ ॥

श्रेष्ठ व भक्तजनांना अत्यंत प्रिय असा हा अढळ अग्नि अत्यंत विशाल अशा आकाशाच्या आंत देवलोकांमध्ये विराजमान झाला आहे, तेव्हां परस्पर सवती असूनही ज्या प्रेमसंलग्न आहेत, ज्या सदैव तरुण, निर्मल आणि अमृत दुग्ध स्रवणार्‍या आहेत अशा द्यावापृथिवी, आपल्या यशानें सर्व जग व्यापणार्‍या अग्नीच्या धेनू झाल्या. ॥ ४ ॥


व्र॒ता ते॑ अग्ने मह॒तो म॒हानि॒ तव॒ क्रत्वा॒ रोद॑सी॒ आ त॑तन्थ ।
त्वं दू॒तो अ॑भवो॒ जाय॑मान॒स्त्वं ने॒ता वृ॑षभ चर्षणी॒नाम् ॥ ५ ॥

व्रता ते अग्ने महतः महानि तव क्रत्वा रोदसी आ ततंथ ।
त्वं दूतः अभवः जायमानस्त्वं नेता वृषभ चर्षणीनाम् ॥ ५ ॥

अग्निदेवा, तूं श्रेष्ठ, तेव्हां तुझ्या आज्ञाही श्रेष्ठ प्रतीच्याच आहेत. भूलोक आणि स्वर्ग असे हे दोन्ही विस्तीर्ण लोक तूं आपल्या कर्तबगारीनेंच उलगडून ठेवलें आहेस, व प्रकट होतांच मानवांचा प्रतिनिधी आणि चराचरांचा धुरीण झाला आहेस. ॥ ५ ॥


ऋ॒तस्य॑ वा के॒शिना॑ यो॒ग्याभि॑र्घृत॒स्नुवा॒ रोहि॑ता धु॒रि धि॑ष्व ।
अथा व॑ह दे॒वान्दे॑व॒ विश्वा॑न्त्स्वध्व॒रा कृ॑णुहि जातवेदः ॥ ६ ॥

ऋतस्य वा केशिना योग्याभिर्घृतस्नुवा रोहिता धुरि धिष्व ।
अथा वह देवांदेव विश्वांत्स्वध्वरा कृणुहि जातऽवेदः ॥ ६ ॥

झुबकेदार आयाळ असलेले तुझे अश्व घृताचा वर्षाव करणारे व आरक्त रंगाचे आहेत त्यांना लगाम घालून सत्यधर्मरूप जो तुझा रथ त्या रथाला जोड, आणि हे देवा, सर्व दिव्य विभूतींना इकडे घेऊन ये. आमचे यज्ञयाग यथासांग सिद्धीस ने, पहा जगांत जें कांही आहे तें तूंच जाणतोस. ॥ ६ ॥


दि॒वश्चि॒दा ते॑ रुचयन्त रो॒का उ॒षो वि॑भा॒तीरनु॑ भासि पू॒र्वीः ।
अ॒पो यद॑ग्न उ॒शध॒ग्वने॑षु॒ होतु॑र्म॒न्द्रस्य॑ प॒नय॑न्त दे॒वाः ॥ ७ ॥

दिवश्चिदा ते रुचयंत रोका उषः विभातीरनु भासि पूर्वीः ।
अपः यदग्न उशधग्वनेषु होतुर्मंद्रस्य पनयंत देवाः ॥ ७ ॥

तुझ्या दीप्तीची प्रभा थेट आकाशापर्यंत जाऊन तेथें प्रकाश पाडूं लागली. तेजःपुंज अशा ज्या अनेक उषा आहेत त्या सर्वांच्या मागोमाग तुझाच प्रकाश असतो. हे अग्निदेवा, तूं भक्तांना आनंदी आनंद करणारा यज्ञहोता आहेस म्हणून तुझ्या ज्वलंत पराक्रमाची वाखाणणी खुद्द देवांनींच केली आहे. ॥ ७ ॥


उ॒रौ वा॒ ये अ॒न्तरि॑क्षे॒ मद॑न्ति दि॒वो वा॒ ये रो॑च॒ने सन्ति॑ दे॒वाः ।
ऊमा॑ वा॒ ये सु॒हवा॑सो॒ यज॑त्रा आयेमि॒रे र॒थ्यो अग्ने॒ अश्वाः॑ ॥ ८ ॥

उरौ वा ये अंतरिक्षे मदंति दिवः वा ये रोचने संति देवाः ।
ऊमा वा ये सुहवासः यजत्रा आयेमिरे रथ्यः अग्ने अश्वाः ॥ ८ ॥

जे अंतरिक्षांत राहूनच प्रमुदित होतात अथवा द्युलोकांतील लकलकणार्‍या तारांगणांत ज्या देवांचा वास असतो किंवा जे भक्तरक्षण तत्पर असून त्यांचा धांवा त्वरीत ऐकतात; अथवा हे अग्नी, ज्या पूज्य विभूतींनी आपल्या रथाचे अश्व अजूनही आवरूनच धरलेले आहेत, ॥ ८ ॥


ऐभि॑रग्ने स॒रथं॑ याह्य॒र्वाङ् ना॑नार॒थं वा॑ वि॒भवो॒ ह्यश्वाः॑ ।
पत्नी॑वतस्त्रिं॒शतं॒ त्रींश्च॑ दे॒वान॑नुष्व॒धमा व॑ह मा॒दय॑स्व ॥ ९ ॥

ऐभिरग्ने सरथं याह्यर्वाङ् नानारथं वा विभवः ह्यश्वाः ।
पत्नीवतस्त्रिंशतं त्रींश्च देवाननुष्वधमा वह मादयस्व ॥ ९ ॥

हे अग्निदेवा, अशा सर्व देवतांना तूं आपल्याच रथांत घेऊन आमच्याकडे ये अगर त्यांना निरनिराळ्या रथांतच बसव, कारण तुझे घोडे कांही सामान्य नाहींत, फार प्रबळ आहेत; तेव्हां सर्व तेहेतीस देवांना त्यांच्या पत्नीसहित तूं आपल्या नेहमींच्या परिपाठाप्रमाणें येथें घेऊन ये आणि त्यांना हर्षभरीत कर. ॥ ९ ॥


स होता॒ यस्य॒ रोद॑सी चिदु॒र्वी य॒ज्ञंय॑ज्ञम॒भि वृ॒धे गृ॑णी॒तः ।
प्राची॑ अध्व॒रेव॑ तस्थतुः सु॒मेके॑ ऋ॒ताव॑री ऋ॒तजा॑तस्य स॒त्ये ॥ १० ॥

स होता यस्य रोदसी चिदुर्वी यज्ञंयज्ञमभि वृधे गृणीतः ।
प्राची अध्वरेव तस्थतुः सुमेके ऋतावरी ऋतजातस्य सत्ये ॥ १० ॥

अमर्याद अशा रोदसी सुद्धां स्वतः ज्याच्या प्रत्येक यज्ञाची प्रशंसा आपल्या अभिवृद्धीसाठी करीत असतात अशा प्रकारचा श्रेष्ठ यज्ञहोता हा अग्नि आहे. त्या रमणीय धर्मतत्पर आणि सत्यस्वरूप द्यावापृथिवीही, सनातन सत्यापासून प्रकट झालेल्या अग्नीच्या इच्छेनुरूप अध्वरा प्रमाणें निरंतर अनुकूल अशाच वागत आल्या आहेत. ॥ १० ॥


इळा॑मग्ने पुरु॒दंसं॑ स॒निं गोः श॑श्वत्त॒मं हव॑मानाय साध ।
स्यान्नः॑ सू॒नुस्तन॑यो वि॒जावाग्ने॒ सा ते॑ सुम॒तिर्भू॑त्व॒स्मे ॥ ११ ॥

इळामग्ने पुरुदंसं सनिं गोः शश्वत्तमं हवमानाय साध ।
स्यान्नः सूनुस्तनयः विजावाग्ने सा ते सुमतिर्भूत्वस्मे ॥ ११ ॥

हे अग्निदेवा, मनोभावानें जो तुझा धांवा करतो त्या भक्ताला, धनधान्यसंपन्न भूमि आणि अद्‍भुत सामर्थ्यप्रचुर अशी दिव्य ज्ञानाची देणगी हीं सदैव साध्य होतील असें कर. आमचे पुत्रपौत्र हे आमचा वंशविस्तार करणारे होऊन, हे अग्निदेवा, तुझी अनुपम कृपाही आम्हांस प्राप्त होवो. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ७ (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


प्र य आ॒रुः शि॑तिपृ॒ष्ठस्य॑ धा॒सेरा मा॒तरा॑ विविशुः स॒प्त वाणीः॑ ।
प॒रि॒क्षिता॑ पि॒तरा॒ सं च॑रेते॒ प्र स॑र्स्राते दी॒र्घमायुः॑ प्र॒यक्षे॑ ॥ १ ॥

प्र य आरुः शितिपृष्ठस्य धासेरा मातरा विविशुः सप्त वाणीः ।
परिक्षिता पितरा सं चरेते प्र सर्स्राते दीर्घमायुः प्रयक्षे ॥ १ ॥

जो जगताचा पोषक आहे व ज्याचा पृष्ठभाग तेजःपुंज आहे अशा ह्या अग्नीच्या ज्या ज्वाला बाहेर आल्या आहेत त्यांनी ह्या विश्वाचें जनकद्वय ह्यांना व सप्तवाणींना वेष्टून टाकलें आहे. ते सर्वव्यापी मातापितर सर्वत्र संचार करीत आहेत, व आम्हांस दीर्घ आयुष्य अर्पण करण्याकरितांच कीं काय पुढें पाऊल टाकीत आहेत. ॥ १ ॥


दि॒वक्ष॑सो धे॒नवो॒ वृष्णो॒ अश्वा॑ दे॒वीरा त॑स्थौ॒ मधु॑म॒द्व ह॑न्तीः ।
ऋ॒तस्य॑ त्वा॒ सद॑सि क्षेम॒यन्तं॒ पर्येका॑ चरति वर्त॒निं गौः ॥ २ ॥

दिवक्षसः धेनवः वृष्णः अश्वा देवीरा तस्थौ मधुमद्वशहंतीः ।
ऋतस्य त्वा सदसि क्षेमयंतं पर्येका चरति वर्तनिं गौः ॥ २ ॥

द्यु लोकांमध्यें वास करणार्‍या ह्या सामर्थ्यवान अग्नीच्या रथास जोडलेल्या घोड्या म्हणजे धेनु ह्याच होत. माधुर्याचा पूर वाहणार्‍या ह्या दिव्य वाहनांवर तो बसून आला आहे. सत्याच्या मंदिरांत सुखानें वास करणार्‍या तुझ्या समीप एक धेनु वाट चालून येत आहे. ॥ २ ॥


आ सी॑मरोहत्सु॒यमा॒ भव॑न्तीः॒ पति॑श्चिकि॒त्वान्र॑यि॒विद्र॑यी॒णाम् ।
प्र नील॑पृष्ठो अत॒सस्य॑ धा॒सेस्ता अ॑वासयत्पुरु॒धप्र॑तीकः ॥ ३ ॥

आ सीमरोहत्सुयमा भवंतीः पतिश्चिकित्वान्रयिविद्रयीणाम् ।
प्र नीलपृष्ठः अतसस्य धासेस्ता अवासयत्पुरुधप्रतीकः ॥ ३ ॥

सर्व संपत्तीचा अधिष्ठाता, ज्ञानवान व सर्वांचा अधिपति अशा ह्या अग्नीनें, त्याच्यापुढें अतिशय गरीब झालेल्या ह्या घोड्यांवर आरोहण केलें आहे. ज्या ठिकाणी त्या तृणावर चरत होत्या, तेथून त्यांना हा इकडे घेऊन आला. ह्याची पाठ नील वर्णाची आहे व हा अनेक प्रकारच्या स्वरूपांत दृश्यमान होतो. ॥ ३ ॥


महि॑ त्वा॒ष्ट्रमू॒र्जय॑न्तीरजु॒र्यं स्त॑भू॒यमा॑नं व॒हतो॑ वहन्ति ।
व्यङ्गे॑भिर्दिद्युता॒नः स॒धस्थ॒ एका॑मिव॒ रोद॑सी॒ आ वि॑वेश ॥ ४ ॥

महि त्वाष्ट्रमूर्जयंतीरजुर्यं स्तभूयमानं वहतः वहंति ।
व्यङ्गेभिर्दिद्युतानः सधस्थ एकामिव रोदसी आ विवेश ॥ ४ ॥

त्वष्ट्रा देवाच्या ह्या वार्धक्यरहित व स्थैर्यवान पुत्राचा अत्यंत गौरव करीत ह्या त्याच्या वाहन असणार्‍या घोड्या त्यास वाहून नेत आहेत. आपल्या सर्व अंगांनी देवांच्यासह निवासस्थानांत सुप्रकाशित होणार्‍या ह्या देवानें स्वर्ग आणि पृथ्वी ह्या दोन्ही ठिकाणीं, जणूं कांही तें एकच स्थल आहे अशा रीतीनें प्रवेश केला आहे. ॥ ४ ॥


जा॒नन्ति॒ वृष्णो॑ अरु॒षस्य॒ शेव॑मु॒त ब्र॒ध्नस्य॒ शास॑ने रणन्ति ।
दि॒वो॒रुचः॑ सु॒रुचो॒ रोच॑माना॒ इळा॒ येषां॒ गण्या॒ माहि॑ना॒ गीः ॥ ५ ॥

जानंति वृष्णः अरुषस्य शेवमुत ब्रध्नस्य शासने रणंति ।
दिवोरुचः सुरुचः रोचमाना इळा येषां गण्या माहिना गीः ॥ ५ ॥

भक्तांना स्वर्लोकशोभित अंगकांती प्रदान करणार्‍या, कामपूरक, थोर, आणि अजातशत्रू अग्नीची महती जाणून स्तोते त्याची अधिसत्ता आनंदाने मान्य करतात. ॥ ५ ॥


उ॒तो पि॒तृभ्यां॑ प्र॒विदानु॒ घोषं॑ म॒हो म॒हद्भ्या॑ मनयन्त शू॒षम् ।
उ॒क्षा ह॒ यत्र॒ परि॒ धान॑म॒क्तोरनु॒ स्वं धाम॑ जरि॒तुर्व॒वक्ष॑ ॥ ६ ॥

उतः पितृभ्यां प्रविदानु घोषं महः महद्भ्या मनयंत शूषम् ।
उक्षा ह यत्र परि धानमक्तोरनु स्वं धाम जरितुर्ववक्ष ॥ ६ ॥

मातृपितृभूत द्यावापृथिवींचे प्रत्ययकारी सुख स्तोत्यांना प्रदान करणार्‍या, पर्जन्यवृष्टीकारक अग्नीचे रात्रीच्या उदरातील स्वतःचे तेज स्तोत्यांना दिले. ॥ ६ ॥


अ॒ध्व॒र्युभिः॑ प॒ञ्चभिः॑ स॒प्त विप्राः॑ प्रि॒यं र॑क्षन्ते॒ निहि॑तं प॒दं वेः ।
प्राञ्चो॑ मदन्त्यु॒क्षणो॑ अजु॒र्या दे॒वा दे॒वाना॒मनु॒ हि व्र॒ता गुः ॥ ७ ॥

अध्वर्युभिः पञ्चभिः सप्त विप्राः प्रियं रक्षंते निहितं पदं वेः ।
प्राञ्चः मदंत्युक्षणः अजुर्या देवा देवानामनु हि व्रता गुः ॥ ७ ॥

’वषट्कार’ कर्ते सात ऋत्विज, आणि पाच यज्ञाध्वर्यू यांनी साक्षिलेला अग्नि प्राङ्‍मुख, समर्थ, आणि अविनाशी स्तोत्यांच्या द्वारा देवव्रतांचे पालन करवितो. ॥ ७ ॥


दैव्या॒ होता॑रा प्रथ॒मा न्यृञ्जे स॒प्त पृ॒क्षासः॑ स्व॒धया॑ मदन्ति ।
ऋ॒तं शंस॑न्त ऋ॒तमित्त आ॑हु॒रनु॑ व्र॒तं व्र॑त॒पा दीध्या॑नाः ॥ ८ ॥

दैव्या होतारा प्रथमा न्यृञ्जे सप्त पृक्षासः स्वधया मदंति ।
ऋतं शंसंत ऋतमित्त आहुरनु व्रतं व्रतपा दीध्यानाः ॥ ८ ॥

स्तोत्रपालक, व्रतस्थ, आणि तेजस्वी सप्तहोतृंच्या द्वारा ’ऋत’ उपाधी प्राप्त करणार्‍या अग्निरूपी दोन देवहोतृंना मी प्रज्वलित करतो. ॥ ८ ॥


वृ॒षा॒यन्ते॑ म॒हे अत्या॑य पू॒र्वीर्वृष्णे॑ चि॒त्राय॑ र॒श्मयः॑ सुया॒माः ।
देव॑ होतर्म॒न्द्रत॑रश्चिकि॒त्वान्म॒हो दे॒वान्रोद॑सी॒ एह व॑क्षि ॥ ९ ॥

वृषायंते महे अत्याय पूर्वीर्वृष्णे चित्राय रश्मयः सुयामाः ।
देव होतर्मंद्रतरश्चिकित्वान्महः देवान्रोदसी एह वक्षि ॥ ९ ॥

वृषभसदृश ज्वालायुक्त अशा हे देवपाचारक, सर्वश्रेष्ठ, बलिष्ठ, आनंददायी, आणि ज्ञानवान अग्निदेवा, देवगणांना तू द्यावापृथिवींमध्ये घेऊन येतोस. ॥ ९ ॥


पृ॒क्षप्र॑यजो द्रविणः सु॒वाचः॑ सुके॒तव॑ उ॒षसो॑ रे॒वदू॑षुः ।
उ॒तो चि॑दग्ने महि॒ना पृ॑थि॒व्याः कृ॒तं चि॒देनः॒ सं म॒हे द॑शस्य ॥ १० ॥

पृक्षप्रयजः द्रविणः सुवाचः सुकेतव उषसः रेवदूषुः ।
उतः चिदग्ने महिना पृथिव्याः कृतं चिदेनः सं महे दशस्य ॥ १० ॥

बहुस्तुत, संपत्तिदात्या, आणि सुविख्यात उषांना उदित करणार्‍या हे भ्रमणशील अग्ने, आमच्या पापांचे तू निवारण कर. ॥ १० ॥


इळा॑मग्ने पुरु॒दंसं॑ स॒निं गोः श॑श्वत्त॒मं हव॑मानाय साध ।
स्यान्नः॑ सू॒नुस्तन॑यो वि॒जावाग्ने॒ सा ते॑ सुम॒तिर्भू॑त्व॒स्मे ॥ ११ ॥

इळामग्ने पुरुदंसं सनिं गोः शश्वत्तमं हवमानाय साध ।
स्यान्नः सूनुस्तनयः विजावाग्ने सा ते सुमतिर्भूत्वस्मे ॥ ११ ॥

हे अग्ने, तुझ्या भक्तांना तू चिरस्थायी, सुपीक आनि गोसंवर्धक भूमी, तसेच वंशकर संतती प्रदान कर. तुझी चिरन्तन कृपा आम्हास प्राप्त होऊं दे. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ८ (यूपसूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - यूपः : छंद - त्रिष्टुप्, अनुष्टुप्


अ॒ञ्जन्ति॒ त्वाम॑ध्व॒रे दे॑व॒यन्तो॒ वन॑स्पते॒ मधु॑ना॒ दैव्ये॑न ।
यदू॒र्ध्वस्तिष्ठा॒ द्रवि॑णे॒ह ध॑त्ता॒द्यद्वा॒ क्षयो॑ मा॒तुर॒स्या उ॒पस्थे॑ ॥ १ ॥

अञ्जंति त्वामध्वरे देवयंतः वनस्पते मधुना दैव्येन ।
यदूर्ध्वस्तिष्ठा द्रविणेह धत्ताद्यद्वा क्षयः मातुरस्या उपस्थे ॥ १ ॥

हे घृताहुतिसमर्पित यूपरूपी वनस्पते, स्वर्लोकाहून अथवा पृथिवीचा अंकावरून तू आम्हास धन प्रदान कर. ॥ १ ॥


समि॑द्धस्य॒ श्रय॑माणः पु॒रस्ता॒द्‌ब्रह्म॑ वन्वा॒नो अ॒जरं॑ सु॒वीर॑म् ।
आ॒रे अ॒स्मदम॑तिं॒ बाध॑मान॒ उच्छ्र॑यस्व मह॒ते सौभ॑गाय ॥ २ ॥

समिद्धस्य श्रयमाणः पुरस्ताद्‌ब्रह्म वन्वानः अजरं सुवीरम् ।
आरे अस्मदमतिं बाधमान उच्छ्रयस्व महते सौभगाय ॥ २ ॥

प्रज्वलित अग्नीच्या सम्मुख उपस्थित राहाणार्‍या हे अन्नसमृद्धी आणि पुत्रपौत्रदात्या यूपा, शत्रुसंहार करून तू आम्हास ऐश्वर्य प्रदान कर. ॥ २ ॥


उच्छ्र॑यस्व वनस्पते॒ वर्ष्म॑न्पृथि॒व्या अधि॑ ।
सुमि॑ती मी॒यमा॑नो॒ वर्चो॑ धा य॒ज्ञवा॑हसे ॥ ३ ॥

उच्छ्रयस्व वनस्पते वर्ष्मन्पृथिव्या अधि ।
सुमिती मीयमानः वर्चः धा यज्ञवाहसे ॥ ३ ॥

हे सुस्थापित यूपरूपी वनस्पते, तू सुस्थितपणे उभा राहून आम्हा यज्ञकर्त्यांना अन्न प्रदान कर. ॥ ३ ॥


युवा॑ सु॒वासाः॒ परि॑वीत॒ आगा॒त्स उ॒ श्रेया॑न्भवति॒ जाय॑मानः ।
तं धीरा॑सः क॒वय॒ उन्न॑यन्ति स्वा॒ध्यो३मन॑सा देव॒यन्तः॑ ॥ ४ ॥

युवा सुवासाः परिवीत आगात्स ऊं इति श्रेयान्भवति जायमानः ।
तं धीरासः कवय उन्नयंति स्वाध्यो३मनसा देवयंतः ॥ ४ ॥

ज्ञानवान भक्तांनी उभारलेला, तसेच चांगली दोरी बांधलेला, समृद्धिदाता आणि बलसंपन्न यूप यज्ञकार्यार्थ सिद्ध आहे. ॥ ४ ॥


जा॒तो जा॑यते सुदिन॒त्वे अह्नां॑ सम॒र्य आ वि॒दथे॒ वर्ध॑मानः ।
पु॒नन्ति॒ धीरा॑ अ॒पसो॑ मनी॒षा दे॑व॒या विप्र॒ उदि॑यर्ति॒ वाच॑म् ॥ ५ ॥

जातः जायते सुदिनत्वे अह्नां समर्य आ विदथे वर्धमानः ।
पुनंति धीरा अपसः मनीषा देवया विप्र उदियर्ति वाचम् ॥ ५ ॥

ज्ञानवान यज्ञकर्त्यांनी बुद्धिपूर्वक शुद्ध केलेला, सुशोभित, आणि भक्तस्तुत यूप मनुष्यांनी गजबजलेल्या यज्ञकार्यास चांगले दिवस आणतो. ॥ ५ ॥


यान्वो॒ नरो॑ देव॒यन्तो॑ निमि॒म्युर्वन॑स्पते॒ स्वधि॑तिर्वा त॒तक्ष॑ ।
ते दे॒वासः॒ स्वर॑वस्तस्थि॒वांसः॑ प्र॒जाव॑द॒स्मे दि॑धिषन्तु॒ रत्न॑रम् ॥ ६ ॥

यान्वः नरः देवयंतः निमिम्युर्वनस्पते स्वधितिर्वा ततक्ष ।
ते देवासः स्वरवस्तस्थिवांसः प्रजावदस्मे दिधिषंतु रत्न म् ॥ ६ ॥

देवभक्तांनी कुऱ्हाडीने तोडून जमिनीत पुरलेल्या हे तेजोमयी काष्ठयुक्त यूपरूपी वनस्पते, तू आम्हास पुत्रपौत्रादि विपुल धन प्रदान कर. ॥ ६ ॥


ये वृ॒क्णासो॒ अधि॒ क्षमि॒ निमि॑तासो य॒तस्रु॑चः ।
ते नो॑ व्यन्तु॒ वार्यं॑ देव॒त्रा क्षे॑त्र॒साध॑सः ॥ ७ ॥

ये वृक्णासः अधि क्षमि निमितासः यतस्रुचः ।
ते नः व्यंतु वार्यं देवत्रा क्षेत्रसाधसः ॥ ७ ॥

तासून जमिनीत पुरलेले, ऋत्विजस्थापित यज्ञसिद्धिकारक यूप आम्हास उत्कृष्ट संपत्ती प्रदान करोत. ॥ ७ ॥


आ॒दि॒त्या रु॒द्रा वस॑वः सुनी॒था द्यावा॒क्षामा॑ पृथि॒वी अ॒न्तरि॑क्षम् ।
स॒जोष॑सो य॒ज्ञम॑वन्तु दे॒वा ऊ॒र्ध्वं कृ॑ण्वन्त्वध्व॒रस्य॑ के॒तुम् ॥ ८ ॥

आदित्या रुद्रा वसवः सुनीथा द्यावाक्षामा पृथिवी अंतरिक्षम् ।
सजोषसः यज्ञमवंतु देवा ऊर्ध्वं कृण्वंत्वध्वरस्य केतुम् ॥ ८ ॥

बहुस्तुत द्यावापृथिवी, अंतरिक्ष, आदित्य, रुद्र, वसु या देवता एकमताने आमच्या यज्ञाचे रक्षण करून यूपरूपी यज्ञध्वज उंचावोत. ॥ ८ ॥


हं॒सा इ॑व श्रेणि॒शो यता॑नाः शु॒क्रा वसा॑नाः॒ स्वर॑वो न॒ आगुः॑ ।
उ॒न्नी॒यमा॑नाः क॒विभिः॑ पु॒रस्ता॑द्दे॒वा दे॒वाना॒मपि॑ यन्ति॒ पाथः॑ ॥ ९ ॥

हंसा इव श्रेणिशः यतानाः शुक्रा वसानाः स्वरवः न आगुः ।
उन्नीयमानाः कविभिः पुरस्ताद्देवा देवानामपि यंति पाथः ॥ ९ ॥

यज्ञस्थानी उभारल्यामुळे देवत्व प्राप्त झालेले, तसेच झुळझुळीत वस्त्र ल्यालेले, ऋत्विजस्थापित, चकचकीत यूप, हंसाच्या मंदगतीने यज्ञस्थानी उपस्थित होतात. ॥ ९ ॥


शृङ्गा॑णी॒वेच्छृ॒ङ्गिणां॒ सं द॑दृश्रे च॒षाल॑वन्तः॒ स्वर॑वः पृथि॒व्याम् ।
वा॒घद्‌भि॑र्वा विह॒वे श्रोष॑माणा अ॒स्माँ अ॑वन्तु पृत॒नाज्ये॑षु ॥ १० ॥

शृङ्गाणीवेच्छृङ्गिणां सं ददृश्रे चषालवंतः स्वरवः पृथिव्याम् ।
वाघद्‌भिर्वा विहवे श्रोषमाणा अस्मान् अवंतु पृतनाज्येषु ॥ १० ॥

शृंगयुक्त प्राण्यांच्या चमकदार शिंगाप्रमाणे दिसणारे, तासून स्वच्छ केलेले, ऋत्विजस्थापित यूप युद्धामध्ये आमचे रक्षण करोत. ॥ १० ॥


वन॑स्पते श॒तव॑ल्शो॒ वि रो॑ह स॒हस्र॑वल्शा॒ वि व॒यं रु॑हेम ।
यं त्वाम॒यं स्वधि॑ति॒स्तेज॑मानः प्रणि॒नाय॑ मह॒ते सौभ॑गाय ॥ ११ ॥

वनस्पते शतवल्शः वि रोह सहस्रवल्शा वि वयं रुहेम ।
यं त्वामयं स्वधितिस्तेजमानः प्रणिनाय महते सौभगाय ॥ ११ ॥

तीक्ष्ण कुर्‍हाडीमुळे यूप होण्याचे भाग्य लाभलेल्या हे यूप वृक्षा, शतावधी उपशाखांनी वृद्धिंगत होऊन सहस्रावधी शाखांनी तू आमचा विस्तार कर. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त ९ (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - बृहती, त्रिष्टुप् 0


सखा॑यस्त्वा ववृमहे दे॒वं मर्ता॑स ऊ॒तये॑ ।
अ॒पां नपा॑तं सु॒भगं॑ सु॒दीदि॑तिं सु॒प्रतू॑र्तिमने॒हस॑म् ॥ १ ॥

सखायस्त्वा ववृमहे देवं मर्तास ऊतये ।
अपां नपातं सुभगं सुदीदितिं सुप्रतूर्तिमनेहसम् ॥ १ ॥

हे जलोत्पन्न, धनवान, स्वरूपसुंदर, संरक्षक, आणि परोपकारी अग्ने, आमच्या साह्यार्थ आम्ही तुझी प्रार्थना करीत आहोत. ॥ १ ॥


काय॑मानो व॒ना त्वं यन्मा॒तॄरज॑गन्न॒पः ।
न तत्ते॑ अग्ने प्र॒मृषे॑ नि॒वर्त॑नं॒ यद्दू॒रे सन्नि॒हाभ॑वः ॥ २ ॥

कायमानः वना त्वं यन्मातॄरजगन्नपः ।
न तत्ते अग्ने प्रमृषे निवर्तनं यद्दूरे सन्निहाभवः ॥ २ ॥

अरण्यभक्षणार्थ जलामध्ये प्रविष्ट झालेल्या हे अग्ने, पृथ्वीलोकी राहूनही तू आमचेपासून दूर गेल्याने तुझा विरह आम्हास असह्य झाला. ॥ २ ॥


अति॑ तृ॒ष्टं व॑वक्षि॒थाथै॒व सु॒मना॑ असि ।
प्रप्रा॒न्ये यन्ति॒ पर्य॒न्य आ॑सते॒ येषां॑ स॒ख्ये असि॑ श्रि॒तः ॥ ३ ॥

अति तृष्टं ववक्षिथाथैव सुमना असि ।
प्रप्रान्ये यंति पर्यन्य आसते येषां सख्ये असि श्रितः ॥ ३ ॥

हे अरण्यभक्षक अग्ने, तुझ्या सख्येच्छु भक्तांपैकी केवळ ऋत्विज तुझी उपासना करीत तुझ्यासमवेत राहिले. अन्य सारे पुढे निघून गेले. ॥ ३ ॥


ई॒यि॒वांस॒मति॒ स्रिधः॒ शश्व॑ती॒रति॑ स॒श्चतः॑ ।
अन्वी॑मविन्दन्निचि॒रासो॑ अ॒द्रुहो॑ अ॒प्सु सिं॒हमि॑व श्रि॒तम् ॥ ४ ॥

ईयिवांसमति स्रिधः शश्वतीरति सश्चतः ।
अन्वीमविंदन्निचिरासः अद्रुहः अप्सु सिंहमिव श्रितम् ॥ ४ ॥

शत्रुनाशक, आणि जलपरिहारक, जलसिक्त अग्निदेवाला अमर देवांनी जलात लपलेल्या सिंहाप्रमाणे शोधून काढले. ॥ ४ ॥


स॒सृ॒वांस॑मिव॒ त्मना॒ग्निमि॒त्था ति॒रोहि॑तम् ।
ऐनं॑ नयन्मात॒रिश्वा॑ परा॒वतो॑ दे॒वेभ्यो॑ मथि॒तम् परि॑ ॥ ५ ॥

ससृवांसमिव त्मनाग्निमित्था तिरोहितम् ।
ऐनं नयन्मातरिश्वा परावतः देवेभ्यः मथितम् परि ॥ ५ ॥

वाट चुकलेल्या बालकाप्रमाणे अचानकपणे लुप्त झालेल्या अग्नीला मातरिश्वन्‌ने मंथन करून शोधून आणले. ॥ ५ ॥


तं त्वा॒ मर्ता॑ अगृभ्णत दे॒वेभ्यो॑ हव्यवाहन ।
विश्वा॒न्यद्य॒ज्ञाँ अ॑भि॒पासि॑ मानुष॒ तव॒ क्रत्वा॑ यविष्ठ्य ॥ ६ ॥

तं त्वा मर्ता अगृभ्णत देवेभ्यः हव्यवाहन ।
विश्वान्यद्यज्ञान् अभिपासि मानुष तव क्रत्वा यविष्ठ्य ॥ ६ ॥

हे यज्ञरक्षक, हव्यवाहक, तरुण, आणि मनुष्यहितदक्ष अग्ने, देवकार्यार्थ मनुष्यमात्रांनी तुला शिरोधार्य मानले आहे. ॥ ६ ॥


तद्‌भ॒द्रं तव॑ दं॒सना॒ पाका॑य चिच्छदयति ।
त्वां यद॑ग्ने प॒शवः॑ स॒मास॑ते॒ समि॑द्धमपिशर्व॒रे ॥ ७ ॥

तद्‌भद्रं तव दंसना पाकाय चिच्छदयति ।
त्वां यदग्ने पशवः समासते समिद्धमपिशर्वरे ॥ ७ ॥

हे कल्याणकारक अग्ने, सायंकाली तू प्रज्वलित होताच अज्ञ पशूही तुझी उपासना करतात. ॥ ७ ॥


आ जु॑होता स्वध्व॒रं शी॒रं पा॑व॒कशो॑चिषम् ।
आ॒शुं दू॒तम॑जि॒रं प्र॒त्नोमीड्यं॑ श्रु॒ष्टी दे॒वं स॑पर्यत ॥ ८ ॥

आ जुहोता स्वध्वरं शीरं पावकशोचिषम् ।
आशुं दूतमजिरं प्रत्न्मीड्यं श्रुष्टी देवं सपर्यत ॥ ८ ॥

हे ऋत्विजांनो, यज्ञशोभाकारक, शुभकांती, सर्वव्यापी, द्रुतगामी,चिरयुवा आणि प्रशंसनीय अग्निदेवाची तुम्ही आहुतीपूर्वक उपासना करा. ॥ ८ ॥


त्रीणि॑ श॒ता त्री स॒हस्रा॑ण्य॒ग्निं त्रिं॒शच्च॑ दे॒वा नव॑ चासपर्यन् ।
औक्ष॑न्घृ॒तैरस्तृ॑णन्ब॒र्हिर॑स्मा॒ आदिद्धोता॑रं॒ न्यसादयन्त ॥ ९ ॥

त्रीणि शता त्री सहस्राण्यग्निं त्रिंशच्च देवा नव चासपर्यन् ।
औक्षन्घृतैरस्तृणन्बर्हिरस्मा आदिद्धोतारं न्यसादयंत ॥ ९ ॥

तीन हजार तीनशे एकुणचाळीस अग्नि उपासक देवांनी अग्नीला घृताहुतीपूर्वक दर्भासनी स्थानापन्न केले. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल ३ सूक्त १० (अग्नि सूक्त)

ऋषी - वैश्वामित्र गाथिनः : देवता - अग्नि : छंद - उष्णिक् 0


त्वाम् अ॑ग्ने मनी॒षिणः॑ स॒म्राजं॑ चर्षणी॒नाम् । दे॒वं मर्ता॑स इन्धते॒ सम॑ध्व॒रे ॥ १ ॥

त्वाम् अग्ने मनीषिणः सम्राजं चर्षणीनाम् । देवं मर्तास इंधते समध्वरे ॥ १ ॥

हे सर्वलोकाधिपते अग्ने, ज्ञाते लोक तुला यज्ञामधे प्रज्वलित करतात. ॥ १ ॥


त्वां य॒ज्ञेष्वृ॒त्विज॒म् अग्ने॒ होता॑रमीळते । गो॒पा ऋ॒तस्य॑ दीदिहि॒ स्वे दमे॑ ॥ २ ॥

त्वां यज्ञेष्वृत्विजम् अग्ने होतारमीळते । गोपा ऋतस्य दीदिहि स्वे दमे ॥ २ ॥

हे भक्तस्तुत, यज्ञऋत्विज, होतृ आणि संरक्षक अग्ने, तू आमच्या निवासस्थानी प्रज्वलित हो. ॥ २ ॥


स घा॒ यस्ते॒ ददा॑शति स॒मिधा॑ जा॒तवे॑दसे । सो अ॑ग्ने धत्ते सु॒वीर्यं॒ स पु॑ष्यति ॥ ३ ॥

स घा यस्ते ददाशति समिधा जातऽवेदसे । सः अग्ने धत्ते सुवीर्यं स पुष्यति ॥ ३ ॥

हे सर्वज्ञ अग्ने, तुझ्या समिधायुक्त भक्ताला पराक्रमी पुत्र आणि समृद्धी प्राप्त होते. ॥ ३ ॥


स के॒तुर॑ध्व॒राणा॑म॒ग्निर्दे॒वेभि॒रा ग॑मत् । अ॒ञ्जा॒नः स॒प्त होतृ॑भिर्ह॒विष्म॑ते ॥ ४ ॥

स केतुरध्वराणामग्निर्देवेभिरा गमत् । अञ्जानः सप्त होतृभिर्हविष्मते ॥ ४ ॥

सप्तहोतृंनी हवि अर्पिलेल्या यज्ञध्वज अग्नि देवगणांसह यज्ञस्थानी अवतीर्ण होवो. ॥ ४ ॥


प्र होत्रे॑ पू॒र्व्यं वचो॑ऽ॒ग्नये॑ भरता बृ॒हत् । वि॒पां ज्योतीं॑षि॒ बिभ्र॑ते॒ न वे॒धसे॑ ॥ ५ ॥

प्र होत्रे पूर्व्यं वचोऽग्नये भरता बृहत् । विपां ज्योतींषि बिभ्रते न वेधसे ॥ ५ ॥

हे स्तोत्यांनो, ज्ञानी लोकांचे तेज धारण करणार्‍या, देवपाचारक आणि विधातृ अग्नीप्रीत्यर्थ तुझी विराट आणि पुरातन स्तोत्रे पठण करा. ॥ ५ ॥


अ॒ग्निं व॑र्धन्तु नो॒ गिरो॒ यतो॒ जाय॑त उ॒क्थ्यः । म॒हे वाजा॑य॒ द्रवि॑णाय दर्श॒तः ॥ ६ ॥

अग्निं वर्धंतु नः गिरः यतः जायत उक्थ्यः । महे वाजाय द्रविणाय दर्शतः ॥ ६ ॥

भक्तांसाठी उत्पन्न झालेला, धनधान्यसमृद्धिदाता, स्तवनीय आणि प्रशंसनीय अग्नि आमच्या स्तोत्रांनी वृद्धिंगत होवो. ॥ ६ ॥


अग्ने॒ यजि॑ष्ठो अध्व॒रे दे॒वान्दे॑वय॒ते य॑ज । होता॑ म॒न्द्रो वि रा॑ज॒स्यति॒ स्रिधः॑ ॥ ७ ॥

अग्ने यजिष्ठः अध्वरे देवांदेवयते यज । होता मंद्रः वि राजस्यति स्रिधः ॥ ७ ॥

शत्रुसंहार केल्यानंतर शोभनीय दिसणार्‍या हे देवपाचारक आणि पूजनीय अग्ने, भक्तांप्रीत्यर्थ तू देवांना संतुष्ट कर. ॥ ७ ॥


स नः॑ पावक दीदिहि द्यु॒मद॒स्मे सु॒वीर्य॑म् । भवा॑ स्तो॒तृभ्यो॒ अन्त॑मः स्व॒स्तये॑ ॥ ८ ॥

स नः पावक दीदिहि द्युमदस्मे सुवीर्यम् । भवा स्तोतृभ्यः अंतमः स्वस्तये ॥ ८ ॥

हे पावक अग्ने, आमच्या कल्याणार्थ समीप येऊन तेजःसंपन्न धन तू आम्हास प्रदान कर. ॥ ८ ॥


तं त्वा॒ विप्रा॑ विप॒न्यवो॑ जागृ॒वांसः॒ समि॑न्धते । ह॒व्य॒वाह॒मम॑र्त्यं सहो॒वृध॑म् ॥ ९ ॥

तं त्वा विप्रा विपन्यवः जागृवांसः समिंधते । हव्यवाहममर्त्यं सहोवृधम् ॥ ९ ॥

हे सामर्थ्यसंपन्न, अमर आणि हव्यवाहक अग्ने, जागरूक आणि ज्ञानवान स्तोते तुला प्रज्वलित करीत आहेत. ॥ ९ ॥


ॐ तत् सत्


GO TOP