PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ९१ ते १००

ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ९१ ( सोम सूक्त )

ऋषि - गोतम राहूगण : देवता - सोम : छंद - अनेक


त्वं सो॑म॒ प्र चि॑कितो मनी॒षा त्वं रजि॑ष्ठ॒मनु॑ नेषि॒ पन्था॑म् ॥
तव॒ प्रणी॑ती पि॒तरो॑ न इंदो दे॒वेषु॒ रत्न॑मभजन्त॒ धीराः॑ ॥ १ ॥

त्वं सोम प्र चिकितः मनीषा त्वं रजिष्ठं अनु नेषि पंथाम् ॥
तव प्रऽणीती पितरः नः इंदो इति देवेषु रत्नं अभजंत धीराः ॥ १ ॥

हे सोम देवा, तूं अत्यंत प्रज्ञावन व विचारी आहेस. तूंच सर्व जगास सरळ मार्गाकडे नेऊन पोंचवितोस. हे इंदो, तुझ्या मार्गदर्शकपणाखाली आमच्या सुज्ञ वाडवडिलांस देवसमुदायामधून उत्तम उत्तम देणग्यांचा लाभ झाला. ॥ १ ॥


त्वं सो॑म॒ क्रतु॑भिः सु॒क्रतु॑र्भू॒स्त्वं दक्षैः॑ सु॒दक्षो॑ वि॒श्ववे॑दाः ॥
त्वं वृषा॑ वृष॒त्वेभि॑र्महि॒त्वा द्यु॒म्नेभि॑र्द्यु॒म्न्यभवो नृ॒चक्षाः॑ ॥ २ ॥

त्वं सोम क्रतुऽभिः सुऽक्रतुः भूः त्वं दक्षैः सुऽदक्षः विश्वऽवेदाः ॥
त्वं वृषा वृषऽत्वेभिः महिऽत्वा द्युम्नेभिः द्युम्नी अभवः नृऽचक्षाः ॥ २ ॥

हे सोम देवा, तुझ्या ठायीं अनेक सामर्थ्यें एकत्र झाल्यामुळें तूं सामर्थ्यवान झालास. तूं सर्वज्ञ असून अनेक प्रकारची शक्ति तुझ्या ठायी वास करीत असल्यामुळें तूं शक्तिमान बनलास. आपल्या श्रेष्ठपणामुळें अनेक बलें तुला संपादन करतां आली म्हणून बलवानपणा तुझ्या अंगी आला. अनेक प्रकारची उज्ज्वल संपत्ति तुला प्राप्त झाली म्हणून तुला वैभवशालित्व आलें. सर्व मानवांवर तुझी दृष्टी आहे. ॥ २ ॥


राज्ञो॒ नु ते॒ वरु॑णस्य व्र॒तानि॑ बृ॒हद्ग॑भी॒रं तव॑ सोम॒ धाम॑ ॥
शुचि॒ष्ट्वम॑सि प्रि॒यो न मि॒त्रो द॒क्षाय्यो॑ अर्य॒मेवा॑सि सोम ॥ ३ ॥

राज्ञः नु ते वरुणस्य व्रतानि बृहत् गभीरं तव सोम धाम ॥
शुचिः त्वं असि प्रियः न मित्रः दक्षाय्यः अर्यमाऽइव असि सोम ॥ ३ ॥

जीं जीं नियमनें ह्या पृथ्वीवर प्रचलित आहेत तीं तीं तूं तो राजा वरुण त्याचींच होत. हे सोमा, तुझें निवासस्थान विशाल व भव्य आहे. तूं देदीप्यमानही आहेस. हे सोम देवा, तूं मित्राप्रमाणें सर्वांच आवडता व अर्यमाप्रमाणें सामर्थ्यवान आहेस. ॥ ३ ॥


या ते॒ धामा॑नि दि॒वि या पृ॑थि॒व्यां या पर्व॑ते॒ष्वोष॑धीष्व॒प्सु ॥
तेभि॑र्नो॒ विश्वैः॑ सु॒मना॒ अहे॑ळ॒न्राज॑न्त्सोम॒ प्रति॑ ह॒व्या गृ॑भाय ॥ ४ ॥

या ते धामानि दिवि या पृथिव्यां या पर्वतेषु ओषधीषु अप्ऽसु ॥
तेभिः नः विश्वैः सुऽमनाः अहेळन् राजन् सोम प्रति हव्या गृभाय ॥ ४ ॥

द्युलोकांत, पृथिवीवर, पर्वतांवर, ओषधींत, अथवा उदकांमध्यें जीं जीं तुझी निवासस्थानें असतील त्या त्या सर्व ठिकाणी हे सोम राजा, तूं आमच्यावरचा राग टाकून प्रसन्न मनानें ह्या हवींचा स्वीकार कर. ॥ ४ ॥


त्वं सो॑मासि॒ सत्प॑ति॒स्त्वं राजो॒त वृ॑त्र॒हा ॥ त्वम् भ॒द्रो अ॑सि॒ क्रतुः॑ ॥ ५ ॥

त्वं सोम असि सत्ऽपतिः त्वं राजा उत वृत्रऽहा ॥ त्वं भद्रः असि क्रतुः ॥ ५ ॥

हे सोमा, तूंच सर्वांचा दयाशील अधिपति आहेस. तूं राजा आहेस, तूं वृत्राचा वध करणारा आहेस, तूं कल्याणकारक अशी श्रेष्ठ शक्ति आहेस. ॥ ५ ॥


त्वं च॑ सोम नो॒ वशो॑ जी॒वातुं॒ न म॑रामहे ॥ प्रि॒यस्तो॑त्रो॒ वन॒स्पतिः॑ ॥ ६ ॥

त्वं च सोम नः वशः जीवातुं न मरामहे ॥ प्रियऽस्तोत्रः वनस्पतिः ॥ ६ ॥

हे सोमा, आम्ही आपल्या आयुष्याचा उपभोग घ्यावा असें तूं मनांत आणशील, तर आम्हास मध्येंच मृत्यु येणार नाही. तूं अरण्यांतील वृक्षांचा मालक आहेस व तुला स्तुति प्रिय आहे. ॥ ६ ॥


त्वं सो॑म म॒हे भगं॒ त्वं यून॑ ऋताय॒ते ॥ दक्षं॑ दधासि जी॒वसे॑ ॥ ७ ॥

त्वं सोम महे भगं त्वं यूने ऋतऽयते ॥ दक्षं दधासि जीवसे ॥ ७ ॥

हे सोमा, तुझे नीतिनियम पाळणार्‍या भक्तास, तो तरुण असतांना अथवा वृद्धत्व पावल्यावरही तूं सौख्य अर्पण करतोस. त्याची आयुष्यवृद्धि व्हावी म्हणून तूं त्यास उत्तम सामर्थ्य देतोस. ॥ ७ ॥


त्वं नः॑ सोम वि॒श्वतो॒ रक्षा॑ राजन्नघाय॒तः ॥ न रि॑ष्ये॒त्त्वाव॑तः॒ सखा॑ ॥ ८ ॥

त्वं नः सोम विश्वतः रक्ष राजन् अघऽयतः ॥ न रिष्येत् त्वाऽवतः सखा ॥ ८ ॥

हे सोमराजा, पातकी मनुष्यापासून तूं आमचे चोहोंकडून रक्षण कर. तूं ज्याचा संरक्षक आहेस अशा तुझ्या प्रिय भक्तांचा नाश होणें युक्त नाहीं. ॥ ८ ॥


सोम॒ यास्ते॑ मयो॒भुव॑ ऊ॒तयः॒ सन्ति॑ दा॒शुषे॑ ॥ ताभि॑र्नोऽवि॒ता भ॑व ॥ ९ ॥

सोम याः ते मयःऽभुवः ऊतयः संति दाशुषे ॥ ताभिः नः अविता भव ॥ ९ ॥

हे सोमा, तुला हवि अर्पण करणार्‍या भक्तांच्या संरक्षणाकरितां जीं सुखपरिणामी साधनें तूं सज्ज करून ठेवली असशील तीं घेऊन आमचें संरक्षण कर. ॥ ९ ॥


इ॒मं य॒ज्ञमि॒दं वचो॑ जुजुषा॒ण उ॒पाग॑हि ॥ सोम॒ त्वं नो॑ वृ॒धे भ॑व ॥ १० ॥

इमं यज्ञं इदं वचः जुजुषाणः उपऽआगहि ॥ सोम त्वं नः वृधे भव ॥ १० ॥

हा यज्ञ व ही स्तुति ह्यांचा स्वीकार करीत इकडे ये. हे सोमा, तूं आमचा उत्कर्ष करणारा हो. ॥ १० ॥


सोम॑ गी॒र्भिष्ट्वा॑ व॒यं व॒र्धया॑मो वचो॒विदः॑ ॥ सु॒मृ॒ळी॒को न॒ आ वि॑श ॥ ११ ॥

सोम गीःऽभिः त्वा वयं वर्धयामः वचःऽविदः ॥ सुऽमृळीकः न आ विश ॥ ११ ॥

हे सोमा, स्तुति कशी करावी ह्याचें ज्ञान संपादन करून आम्ही स्तोत्रांनी तुला संतुष्ट करीत आहोंत. ह्यासाठीं तूं प्रसन्न अंतःकरणानें आम्हांकडे ये. ॥ ११ ॥


ग॒य॒स्फानो॑ अमीव॒हा व॑सु॒वित्पु॑ष्टि॒वर्ध॑नः ॥ सु॒मि॒त्रः सो॑म नो भव ॥ १२ ॥

गयऽस्फानः अमीवऽहा वसुऽवित् पुष्टिऽवर्धनः ॥ सुऽमित्रः सोम नः भव ॥ १२ ॥

सोमा, तूं आमच्या वैभवाची वृद्धि कर, आमचे रोग हरण कर, आम्हांस संपत्ति दे, आमचे घरी धनधान्याची वृद्धि होऊं दे, व तूं आमचा उत्तम मित्र हो. ॥ १२ ॥


सोम॑ रार॒न्धि नो॑ हृ॒दि गावो॒ न यव॑से॒ष्वा ॥ मर्य॑ इव॒ स्व ओ॒क्ये ॥ १३ ॥

सोम ररंधि नः हृदि गावः न यवसेषु आ ॥ मर्यःऽइव स्व ओक्ये ॥ १३ ॥

हे सोमा, ज्याप्रमाणे स्वगृही मनुष्य आनंदांत असतो अथवा तृण पाहून धेनु संतुष्ट होतात, त्याप्रमाणें आमच्या अंतःकरणांत संतोष उत्पन्न कर. ॥ १३ ॥


यः सो॑म स॒ख्ये तव॑ रा॒रण॑द्देव॒ मर्त्यः॑ ॥ तं दक्षः॑ सचते क॒विः ॥ १४ ॥

यः सोम सख्ये तव ररणत् देव मर्त्यः ॥ तं दक्षः सचते कविः ॥ १४ ॥

हे सोमदेवा, जो मानव तुझ्या मित्रत्वांत आनंद मानतो त्याच्याच सहवासाची सामर्थ्यवान व प्रज्ञावान लोक इच्छा करतात. ॥ १४ ॥


उ॒रु॒ष्या णो॑ अ॒भिश॑स्तेः॒ सोम॒ नि पा॒ह्यंह॑सः ॥ सखा॑ सु॒शेव॑ एधि नः ॥ १५ ॥

उरुष्य नः अभिऽशस्तेः सोम नि पाहि अंहसः ॥ सखा सुऽशेव एधि नः ॥ १५ ॥

हे सोमा, दुरुक्तीपासून आमचा बचाव कर, व पातकापासून आमचें संरक्षण कर. सौख्य अर्पण करून तूं आमचा उत्तम स्नेही हो. ॥ १५ ॥


आ प्या॑यस्व॒ समे॑तु ते वि॒श्वतः॑ सोम॒ वृष्ण्य॑म् ॥ भवा॒ वाज॑स्य सङ्ग॒थे ॥ १६ ॥

आ प्यायस्व सं एतु ते विश्वतः सोम वृष्ण्यम् ॥ भव वाजस्य संऽगथे ॥ १६ ॥

हे सोमा तूं प्रवृद्ध हो, सामर्थ्याचा प्रवाह चोहोंकडून तुझ्याकडे चालू होवो. जेथें अनेक पराक्रम एकवटलेले असतील त्या ठिकाणीं तुझा वास असो. ॥ १६ ॥


आ प्या॑यस्व मदिन्तम॒ सोम॒ विश्वे॑भिरं॒शुभिः॑ ॥
भवा॑ नः सु॒श्रव॑स्तमः॒ सखा॑ वृ॒धे ॥ १७ ॥

आ प्यायस्व मदिन्ऽतम सोम विश्वेभिः अंशुऽभिः ॥
भव नः सुश्रवःऽतमः सखा वृधे ॥ १७ ॥

हे अत्यंत आनंद अर्पण करणार्‍या सोमा, आपल्या सर्व प्रकाशकिरणांनी तूं वृद्धिंगत हो. तुझी मनोहर कीर्ति सर्वत्र विदित आहे, व तूं आमचा प्रेमळ स्नेही आहेस, म्हणून तूं आम्हांस उत्कर्ष प्राप्त करून दे. ॥ १७ ॥


सं ते॒ पयां॑सि॒ समु॑ यन्तु॒ वाजाः॒ सं वृष्ण्या॑न्यभिमाति॒षाहः॑ ॥
आ॒प्याय॑मानो अ॒मृता॑य सोम दि॒वि श्रवां॑स्युत्त॒मानि॑ धिष्व ॥ १८ ॥

सं ते पयांसि सं ऊं इति यंतु वाजाः सं वृष्ण्यानि अभिमातिऽसहः ॥
आऽप्यायमानः अमृताय सोम दिवि श्रवांसि उत्ऽतमानि धिष्व ॥ १८ ॥

दुष्टांचा पराभव करणार्‍या हे सोमा, ह्या जगांत जेवढें म्हणून दुग्ध आहे तेवढें सर्व तुझ्याकडे येवो, सर्व सामर्थ्य तुला प्राप्त होवो, व सर्व शक्तीचा ओघ तुझ्याकडे वळो. हे सोमा, आपलें अमरत्व प्रस्थापित होण्याकरितां तूं अभिवृद्धि पावून द्युलोकांत उत्तम कीर्ति धारण कर. ॥ १८ ॥


या ते॒ धामा॑नि ह॒विषा॒ यज॑न्ति॒ ता ते॒ विश्वा॑ परि॒भूर॑स्तु य॒ज्ञम् ॥
ग॒य॒स्फानः॑ प्र॒तर॑णः सु॒वीरोऽ॑वीरहा॒ प्र च॑रा सोम॒ दुर्या॑न् ॥ १९ ॥

या ते धामानि हविषा यजंति ता ते विश्वा परिऽभूः अस्तु यज्ञम् ॥
गयऽस्फानः प्रऽतरणः सुऽवीरः अवीरऽहा प्र चर सोम दुर्यान् ॥ १९ ॥

तुझ्या ज्या निवासस्थानांची सर्व लोक हवींनी पूजा करतात, ती सर्व आमच्या यज्ञावर हरएक बाजूंनी कृपादृष्टी राखोत. हे सोमा, आमच्या वैभवाची वृद्धि करीत, आम्हांविषयीं दानशूरता धारण करीत, आपलें वीर्य गाजवीत, व जे भित्रे असतील त्यांचे हनन करीत, तूं आमच्या गृहाकडे येण्यास प्रवृत्त हो. ॥ १९ ॥


सोमो॑ धे॒नुं सोमो॒ अर्व॑न्तमा॒शुं सोमो॑ वी॒रं क॑र्म॒ण्यं ददाति ॥
सा॒द॒न्यं विद॒थ्यं स॒भेयं॑ पितृ॒श्रव॑णं॒ यो ददा॑शदस्मै ॥ २० ॥

सोमः धेनुं सोमः अर्वंतं आशुं सोमः वीरं कर्मण्यं ददाति ॥
सदन्यं विदथ्यं सभेयं पितृऽश्रवणं यः ददाशत् अस्मै ॥ २० ॥

जो ह्या सोमास हवि अर्पण करतो, त्यास सोम धेनूंचा लाभ घडवितो, वेगानें धांवणारा अश्व देतो, व स्वकर्माविषयी दक्ष, घरादाराची काळजी घेणार्‍या, यज्ञकर्में चुकूं न देणार्‍या, समाजांत प्रतिष्ठितपणें वागणार्‍या, व आपल्या पित्याची कीर्ति वाढविणार्‍या अशा शूर अपत्याची प्राप्ति करून देतो. ॥ २० ॥


अषा॑ळ्हं यु॒त्सु पृत॑नासु॒ पप्रिं॑ स्व॒र्षाम॒प्सां वृ॒जन॑स्य गो॒पाम् ॥
भ॒रे॒षु॒जां सु॑क्षि॒तिं सु॒श्रव॑सं॒ जय॑न्तं॒ त्वामनु॑ मदेम सोम ॥ २१ ॥

अषाळ्हं युत्सु पृतनासु पप्रिं स्वःऽसां अप्सां वृजनस्य गोपाम् ॥
भरेषुऽजां सुऽक्षितिं सुऽश्रवसं जयंतं त्वां अनु मदेम सोम ॥ २१ ॥

युद्धांत अजिंक्य, संग्रामांत साहाय्यकारक, स्वर्गांतून उदकास आणणारा, संकटकाली रक्षण करणारा, यज्ञांत आविर्भूत होणारा, उत्तम मंदिरांत वास्तव्य करणारा, उत्तम कीर्तिनें मंडित असलेला, व सर्वदा विजयी, असा जो तूं त्या तुला पाहून हे सोमा, आम्ही प्रमुदित होऊं. ॥ २१ ॥


त्वमि॒मा ओष॑धीः सोम॒ विश्वा॒स्त्वम॒पो अ॑जनय॒स्त्वं गाः ॥
त्वमा त॑तन्थो॒र्व१॑न्तरि॑क्षं॒ त्वं ज्योति॑षा॒ वि तमो॑ ववर्थ ॥ २२ ॥

त्वं इमाः ओषधीः सोम विश्वाः त्वं अपः अजनयः त्वं गाः ॥
त्वं आ ततंथ उरु अंतरिक्षं त्वं ज्योतिषा वि तमः ववर्थ ॥ २२ ॥

हे सोमा, तूं ह्या सर्व वनस्पति उत्पन्न केल्यास, तूं पाणी उत्पन्न केलेंस, व तूं धेनू निर्माण केल्यास, हे विशाल अंतरिक्ष तूं सर्वत्र पसरलेंस, व प्रकाशाच्या योगानें तूं अंधकाराचा नाश केलास. ॥ २२ ॥


दे॒वेन॑ नो॒ मन॑सा देव सोम रा॒यो भा॒गं स॑हसावन्न॒भि यु॑ध्य ॥
मा त्वा त॑न॒दीशि॑षे वी॒र्यस्यो॒भये॑भ्यः॒ प्र चि॑कित्सा॒ गवि॑ष्टौ ॥ २३ ॥

देवेन नः मनसा देव सोम रायः भागं सहसाऽवन् अभि युध्य ॥
मा त्वा तनत् ईशिषे वीर्यस्य उभयेभ्यः प्र चिकित्स गोऽइष्टौ ॥ २३ ॥

हे सामर्थ्यवान सोम देवा, आमच्याकरितां संपत्तीची भरती करण्याकरितां तुझ्या दिव्य अंतःकरणांत जितकी कळकळ असेल तितक्या कळकळीनें युद्ध कर. तुला कोणीही प्रतिबंध न करो. सर्व सामर्थ्याचा स्वामी तूंच आहेस. धेनुप्राप्तीकरितां युद्ध चाललें असतां तूं दोन्ही पक्षांना आपलें तेज जाणावयास लाव. ॥ २३ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ९२ ( उषा सूक्त )

ऋषि - गोतम राहूगण : देवता - १-१५ उषा; १६-१८ अश्विनीकुमार : छंद - जगती; त्रिष्टुभ्


ए॒ता उ॒ त्या उ॒षसः॑ के॒तुम॑क्रत॒ पूर्वे॒ अर्धे॒ रज॑सो भा॒नुम॑ञ्जते ॥
नि॒ष्कृ॒ण्वा॒ना आयु॑धानीव धृ॒ष्णवः॒ प्रति॒ गावोऽ॑रुषीर्यन्ति मा॒तरः॑ ॥ १ ॥

एताः ऊं इतिउ त्याः उषसः केतुं अक्रत पूर्वे अर्धे रजसः भानुं अञ्जते ॥
निःऽष्कृण्वानाः आयुधानिऽइव धृष्णवः प्रति गावः अरुषीः यंति मातरः ॥ १ ॥

त्या ह्या सर्व प्रसिद्ध उषांनी आपलें निशाण फडकाविले आहे. अंतरिक्षाच्या पहिल्या अर्ध्या भागांत त्या आपलें सुंदर किरण फेंकीत आहेत. आपलीं शस्त्रें परजणार्‍या शूर योद्ध्याप्रमाणें आपलें लखलखणारे तेज प्रकट करीत ह्या माता - ह्या धेनु - इकडे येऊं लागल्या आहेत. ॥ १ ॥


उद॑पप्तन्नरु॒णा भा॒नवो॒ वृथा॑ स्वा॒युजो॒ अरु॑षी॒र्गा अ॑युक्षत ॥
अक्र॑न्नु॒षासो॑ व॒युना॑नि पू॒र्वथा॒ रुश॑न्तं भा॒नुमरु॑षीरशिश्रयुः ॥ २ ॥

उत् अपप्तन् अरुणाः भानवः वृथा सुऽआयुजः अरुषीः गाः अयुक्षत ॥
अक्रन् उषासः वयुनानि पूर्वऽथा रुशंतं भानुं अरुषीः अशिश्रयुः ॥ २ ॥

ह्यांची रक्तवर्ण किरणें कशी सहज रीतीनें वर उड्या मारीत येत आहेत. रथास जोडण्यास कधींही त्रास न देणार्‍या अशा लखलखीत प्रकाशाच्या गाई, ह्यांनी आपल्या रथास जोडल्या आहेत. पूर्वीप्रमाणें आजही सर्व जगावर उजेड पाडावा असा विचार ह्या उषांनी केला आहे. ह्या उज्ज्वल उषांनी झळझळणारें तेज धारण केलें आहे. ॥ २ ॥


अर्च॑न्ति॒ नारी॑र॒पसो॒ न वि॒ष्टिभिः॑ समा॒नेन॒ योज॑ने॒ना प॑रा॒वतः॑ ॥
इषं॒ वह॑न्तीः सु॒कृते॑ सु॒दान॑वे॒ विश्वेदह॒ यज॑मानाय सुन्व॒ते ॥ ३ ॥

अर्चंति नारीः अपसः न विष्टिऽभिः समानेन योजनेन आ पराऽवतः ॥
इषं वहंतीः सुऽकृते सुऽदानवे विश्वा इत् अह यजमानाय सुन्वते ॥ ३ ॥

सदाचारी, उत्तम हवि अर्पण करणार्‍या, व सोमरस सिद्ध ठेवणार्‍या, अशा आपल्या भक्ताकरितां त्याच्या पोषणास भरपूर होईल इतकी संपत्ति सदैव घेऊन येणार्‍या ह्या युवति फार लांबच्या प्रदेशापासून एकाच रथांत बसून येऊन, मोठ्या आवेशानें जणूं कांही आपण किती पराक्रमी आहों ह्याचें प्रदर्शनच करीत आहेत. ॥ ३ ॥


अधि॒ पेशां॑सि वपते नृ॒तूरि॒वापो॑र्णुते॒ वक्ष॑ उ॒स्रेव॒ बर्ज॑हम् ॥
ज्योति॒र्विश्व॑स्मै॒ भुव॑नाय कृण्व॒ती गावो॒ न व्र॒जं व्यु१॑षा आ॑व॒र्तमः॑ ॥ ४ ॥

अधि पेशांसि वपते नृतूःऽइव अप ऊर्णुते वक्षः उस्राऽइव बर्जहम् ॥
ज्योतिः विश्वस्मै भुवनाय कृण्वती गावः न व्रजं वि उषा आवरित्यावः तमः ॥ ४ ॥

ज्याप्रमाणें एखादी नटी निरनिराळे वेष धारण करते त्याप्रमाणे ही उषा निरनिराळी रूपें घेऊन येते. जशी धेनु आपली कांस सर्वांच्या दृष्टीस पडूं देते, त्याप्रमाणें ही आपला वक्षप्रदेश अनावृत ठेविते. सर्व जगास प्रकाश देणार्‍या ह्या उषेनें ज्या प्रमाणें गाई आपला गोठा उघडा टाकून जातात, त्याप्रमाणे अंधकारास उघडें टाकून दिलें आहे. ॥ ४ ॥


प्रत्य॒र्ची रुश॑दस्या अदर्शि॒ वि ति॑ष्ठते॒ बाध॑ते कृ॒ष्णमभ्व॑म् ॥
स्वरुं॒ न पेशो॑ वि॒दथे॑ष्व॒ञ्जञ्चि॒त्रं दि॒वो दु॑हि॒ता भा॒नुम॑श्रेत् ॥ ५ ॥

प्रति अर्चिः रुशत् अस्याः अदर्शि वि तिष्ठते बाधते कृष्णं अभ्वम् ॥
स्वरुं न पेशः विदथेषु अंजन् चित्रं दिवः दुहिता भानुं अश्रेत् ॥ ५ ॥

हिचा उज्जवल प्रकाश दिसूं लागला आहे. तो सर्वत्र पसरत असून निबिड अंधकाराचा नाश करीत आहे. यज्ञामध्यें ज्या प्रमाणे यज्ञस्तंभास शोभवितात त्या प्रमाणें स्वशरीरास हिनें शोभविलें आहे. ही द्युलोकदुहिता आश्चर्यकारक प्रकाश आपले बरोबर घेऊन आली आहे. ॥ ५ ॥


अता॑रिष्म॒ तम॑सस्पा॒रम॒स्योषा उ॒च्छन्ती॑ व॒युना॑ कृणोति ॥
श्रि॒ये छन्दो॒ न स्म॑यते विभा॒ती सु॒प्रती॑का सौमन॒साया॑जीगः ॥ ६ ॥

अतारिष्म तमसः पारं अस्य उषाः उच्छंती वयुना कृणोति ॥
श्रिये छंदः न स्मयते विऽभाती सुऽप्रतीका सौमनसाय अजीगरिति ॥ ६ ॥

ह्या अंधकाराचे बाहेर आम्ही एकदांचे निघालो. ही पहा उषा आपला प्रकाश पाडीत आपले हेतु व्यक्त करीत आहे. ह्या दीप्तिमान उषेनें कवितेप्रमाणे चारुता धारण केलेली असून तिचे हंसरे मुख व्यक्त होत आहे. आपल्या अत्यंत मनोहर स्वरूपानें ती आम्हांवर कृपाप्रसाद करण्याकरितां आली आहे. ॥ ६ ॥


भास्व॑ती ने॒त्री सू॒नृता॑नां दि॒व स्त॑वे दुहि॒ता गोत॑मेभिः ॥
प्र॒जाव॑तो नृ॒वतो॒ अश्व॑बुध्या॒नुषो॒ गोअ॑ग्रा॒ँ उप॑ मासि॒ वाजा॑न् ॥ ७ ॥

भास्वती नेत्री सूनृतानां दिव स्तवे दुहिता गोतमेभिः ॥
प्रजाऽवतः नृऽवतः अश्वऽबुध्यान् उषः गोऽअग्रान् उप मासि वाजान् ॥ ७ ॥

सत्य व माधुर्य ह्यांची स्फूर्ति करविणारी जी ही देदीप्यमान द्युलोककन्या, तिचे स्तवन गोतमांनी केलें आहे. हे उषा देवी, ज्यांचे योगानें आम्हांस संतति व शूर लोक ह्यांचा लाभ होईल, अश्वांच्या योगानें ज्यांचे अस्तित्व दृगोचर होईल, व मुख्यतः ज्यांचे योगानें धेनूंची प्राप्ति होईल, अशी सामर्थ्यें तूं आम्हांस देत असतेस. ॥ ७ ॥


उष॒स्तम॑श्यां य॒शसं॑ सु॒वीरं॑ दा॒सप्र॑वर्गं र॒यिमश्व॑बुध्यम् ॥
सु॒दंस॑सा॒ श्रव॑सा॒ या वि॒भासि॒ वाज॑प्रसूता सुभगे बृ॒हन्त॑म् ॥ ८ ॥

उषः तं अश्यां यशसं सुऽवीरं दासऽप्रवर्गं रयिं अश्वऽबुध्यम् ॥
सुऽदंससा श्रवसा या विऽभासि वाजऽप्रसूता सुऽभगे बृहंतम् ॥ ८ ॥

सामर्थ्यापासून जन्म पावून जी तूं, आश्चर्यकारक पराक्रम व कीर्ति प्रकट करीत, अत्यंत उज्ज्वल तेजानें प्रकाशत आहेस असे हे दयाशील उषा देवी, तुझ्या कृपेने वीर पुरुष आमचे पदरी असल्याविषयींची कीर्ति मला प्राप्त होईल व नोकरचाकरांची विपुलता असलेले व अश्वशालेंत अनेक अश्व असल्यामुळें सहज ओळखतां येण्याजोगें असे वैभवही मला उपभोगण्यास सांपडेल. ॥ ८ ॥


विश्वा॑नि दे॒वी भुव॑नाभि॒चक्ष्या॑ प्रती॒ची चक्षु॑रुर्वि॒या वि भा॑ति ॥
विश्वं॑ जी॒वं च॒रसे॑ बो॒धय॑न्ती॒ विश्व॑स्य॒ वाच॑मविदन्मना॒योः ॥ ९ ॥

विश्वानि देवी भुवना अभिऽचक्ष्य प्रतीची चक्षुः उर्विया वि भाति ॥
विश्वं जीवं चरसे बोधयंती विश्वस्य वाचं अविदन् मनायोः ॥ ९ ॥

सर्व जगताकडे एकदां नजर फेंकून ही देवी आपली दृष्टि परत फिरविते व मग उज्ज्वल प्रकाश पाडावयास लागते. सर्व जीवांना संचारार्थ जागृत करून हिनें अखिल प्रतिभाशाली कवींची स्तवनें संपादन करून घेतली आहेत. ॥ ९ ॥


पुनः॑पुन॒र्जाय॑माना पुरा॒णी स॑मा॒नं वर्ण॑म॒भि शुम्भ॑माना ॥
श्व॒घ्नीव॑ कृ॒त्नुर्विज॑ आमिना॒ना मर्त॑स्य दे॒वी ज॒रय॒न्त्यायुः॑ ॥ १० ॥

पुनःऽपुनः जायमाना पुराणी समानं वर्णं अभि शुंभमाना ॥
श्वघ्नीऽइव कृत्नुः विजः आऽमिनाना मर्तस्य देवी जरयंति आयुः ॥ १० ॥

पुनः पुनः जन्म घेत असून ही जी अति पुरातन म्हणून प्रसिद्ध आहे, त्याच त्याच रंगाच्या वस्त्रांनी जी आपणास भूषवीत असते व श्वानांचा वध करण्याकरितां त्यांचेवर हत्यार चालविणार्‍या व त्यामुळें भिती उत्पन्न करणार्‍या हिंसक मनुष्याप्रमाणे जी सर्वांच्या आयुष्याची हानि करते, ती ही उषा देवी, मानवांचे आयुष्य हरण करीत येथें उभी आहे. ॥ १० ॥


व्यू॒र्ण्व॒ती दि॒वो अन्ताँ॑ अबो॒ध्यप॒ स्वसा॑रं सनु॒तर्यु॑योति ॥
प्र॒मि॒न॒ती म॑नु॒ष्या यु॒गानि॒ योषा॑ जा॒रस्य॒ चक्ष॑सा॒ वि भा॑ति ॥ ११ ॥

विऽऊर्ण्वती दिवः अंतान् अबोधि अप स्वसारं सनुतः युयोति ॥
प्रऽमिनती मनुष्या युगानि योषा जारस्य चक्षसा वि भाति ॥ ११ ॥

द्युलोकाच्या सीमेपर्यंत प्रकाश पाडीत ही जागृत झाली आहे. आपली भगिनी जी रात्र तिला ही अतिशय दूर घालवून देत आहे. मानवांच्या आयुष्याचा अवधि कमी कमी करीत ही युवति आपल्या वल्लभाच्या कांतीने युक्त होऊन येथें प्रकाशत आहे. ॥ ११ ॥


प॒शून्न चि॒त्रा सु॒भगा॑ प्रथा॒ना सिंधु॒र्न क्षोद॑ उर्वि॒या व्यश्वैत् ॥
अमि॑नती॒ दैव्या॑नि व्र॒तानि॒ सूर्य॑स्य चेति र॒श्मिभि॑र्दृशा॒ना ॥ १२ ॥

पशून् न चित्रा सुऽभगा प्रथाना सिंधुः न क्षोदः उर्विया वि अश्वैत् ॥
अमिनती दैव्यानि व्रतानि सूर्यस्य चेति रश्मिऽभिः दृशाना ॥ १२ ॥

ज्याप्रमाणे उदधि हा आपल्या उदकाचे प्रदर्शन मांडतो त्याप्रमाणें सर्व पशूंना बाहेर मैदानांत आणून त्यांचे जणूं कांही प्रदर्शन मांडीत ही कृपाशील परंतु आश्चर्यकारक प्रकाशानें मंडित अशी उषा दूरवर प्रकाशली आहे. देवांच्या आज्ञांचा कधींही भंग न होऊं देतां सूर्याच्या किरणांनी प्रकाशणारी ही उषा येथें दृगोचर होत आहे. ॥ १२ ॥


उष॒स्तच्चि॒त्रमा भ॑रा॒स्मभ्यं॑ वाजिनीवति ॥ येन॑ तो॒कं च॒ तन॑यं च॒ धाम॑हे ॥ १३ ॥

उषः स्तत् चित्रं आ भर अस्मभ्यं वाजिनीऽवति ॥ येन तोकं च तनयं च धामहे ॥ १३ ॥

हे सामर्थ्यवान उषादेवते, ज्याच्या योगानें मुलें आणि नातवंडे ह्यांचा लाभ होईल असलें दुर्मिळ भाग्य आम्हांस प्राप्त होईल असें कर. ॥ १३ ॥


उषो॑ अ॒द्येह गो॑म॒त्यश्वा॑वति विभावरि ॥ रे॒वद॒स्मे व्युच्छ सूनृतावति ॥ १४ ॥

उषः अद्य इह गोऽमति अश्वऽवति विभाऽवरि ॥ रेवत् अस्मे इति वि उच्छ सूनृताऽवति ॥ १४ ॥

सत्य व माधुर्य ह्यानें परिप्लुत भाषण करणारे हे उषे, धेनु व अश्व ह्यांनी सुसंपन्न असणारे हे देवी, आम्हांस वैभव प्राप्त होण्यासाठी तुझा मंगल प्रकाश आम्हांवर पाड. ॥ १४ ॥


यु॒क्ष्वा हि वा॑जिनीव॒त्यश्वाँ॑ अ॒द्यारु॒णाँ उ॑षः ॥ अथा॑ नो॒ विश्वा॒ सौभ॑गा॒न्या व॑ह ॥ १५ ॥

युक्ष्वा हि वाजिनीऽवति अश्वान् अद्य अरुणान् उषः ॥ अथ नः विश्वा सौभगानि आ वह ॥ १५ ॥

सामर्थ्यसंपन्न हे उषादेवी, आपलें रक्तवर्ण अश्व आज जोड आणि सर्व सौख्यें आम्हांकडे घेऊन ये. ॥ १५ ॥


अश्वि॑ना व॒र्तिर॒स्मदा गोम॑द्दस्रा॒ हिर॑ण्यवत् ॥ अ॒र्वाग्रथं॒ सम॑नसा॒ नि य॑च्छतम् ॥ १६ ॥

अश्विना वर्तिः अस्मत् आ गोमत् दस्रा हिरण्यऽवत् ॥ अर्वाक् रथं सऽमनसा नि यच्छतम् ॥ १६ ॥

शत्रूंचा नाश करणार्‍या हे अश्विनी देवांनो, आमचें घर धेनूंनी व सुवर्णानें मंडित करण्याकरितां आपण एकमतानें आपला रथ तिकडे घेऊन या. ॥ १६ ॥


यावि॒त्था श्लोक॒म् आ दि॒वो ज्योति॒र्जना॑य च॒क्रथुः॑ ॥ आ न॒ ऊर्जं॑ वहतमश्विना यु॒वम् ॥ १७ ॥

यौ इत्था श्लोकं आ दिवः ज्योतिः जनाय चक्रथुः ॥ आ नः ऊर्जं वहतं अश्विना युवम् ॥ १७ ॥

हे अश्विनहो, आम्हांकरितां पुष्कळ सामर्थ्य इकडे घेऊन या. ह्या सर्व लोकांकरितां प्रशंसायोग्य असें उज्ज्वल तेज द्युलोकांतून आपणच ह्याप्रमाणें इकडे आणलें. ॥ १७ ॥


एह दे॒वा म॑यो॒भुवा॑ द॒स्रा हिर॑ण्यवर्तनी ॥ उ॒ष॒र्बुधो॑ वहन्तु॒ सोम॑पीतये ॥ १८ ॥

आ इह देवा मयःऽभुवा दस्रा हिरण्यवर्तनी इति हिरण्यऽवर्तनी ॥ उषःऽबुधः वहंतु सोमऽपीतये ॥ १८ ॥

सौख्याची प्राप्ति करून घेणारे, शत्रूंचा नाश करणारे, व सुवर्णमय मार्गांवरून गमन करणारे हे दोघे अश्विनी देव प्रतःकालींच जागृत होणार्‍या देवांस सोमपानार्थ इकडे घेऊन येवोत. ॥ १८ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ९३ ( अग्निषोम सूक्त )

ऋषि - गोतम राहूगण : देवता - अग्निषोम : छंद - गायत्री; अनुष्टुभ्; त्रिष्टुभ्


अग्नी॑षोमावि॒मं सु मे॑ शृणु॒तं वृ॑षणा॒ हव॑म् ॥
प्रति॑ सू॒क्तानि॑ हर्यतं॒ भव॑तं दा॒शुषे॒ मयः॑ ॥ १ ॥

अग्नीषोमौ इमं सु मे शृणुतं वृषणा हवम् ॥
प्रति सुऽक्तानि हर्यतं भवतं दाशुषे मयः ॥ १ ॥

हे सामर्थ्यवान अग्नि व सोम हो, माझी हांक नीट ऐका, माझ्या सुंदर स्तोत्रांचा स्वीकार करा व आपणांस हवि अर्पण करणार्‍या आपल्या उपासकास सौख्य अर्पण करणारे व्हा. । १ ॥


अग्नी॑षोमा॒ यो अ॒द्य वा॑मि॒दं वचः॑ सप॒र्यति॑ ॥
तस्मै॑ धत्तं सु॒वीर्यं॒ गवां॒ पोषं॒ स्वश्व्य॑म् ॥ २ ॥

अग्नीषोमा यः अद्य वां इदं वचः सपर्यति ॥
तस्मै धत्तं सुऽवीर्यं गवां पोषं सुऽअश्व्यम् ॥ २ ॥

हे अग्नि व सोमहो, जो आज आपणांस स्तोत्र अर्पण करून आळवीत आहे त्यास अशा उत्तम शौर्याची प्राप्ति करून द्या, कीं त्याच्या योगानें त्यास सुंदर अश्व लाभावे व त्याच्या धेनूंच्या संख्येतही भर पडत जावी. ॥ २ ॥


अग्नी॑षोमा॒ य आहु॑तिं॒ यो वां॒ दाशा॑द्ध॒विष्कृ॑तिम् ॥
स प्र॒जया॑ सु॒वीर्यं॒ विश्व॒मायु॒र्व्यश्नवत् ॥ ३ ॥

अग्नीषोमा यः आहुतिं यः वां दाशात् हविःऽकृतिम् ॥
सः प्रऽजया सुऽवीर्यं विश्वं आयुः वि अश्नवत् ॥ ३ ॥

हे अग्नि व सोमहो, जो भक्त आपणांस आहुति अर्पण करतो अथवा आपणांस उद्देशून यज्ञ करतो त्यास उत्तम संतति व शौर्य प्राप्त होवो आणि त्यास पूर्ण आयुष्याचा उपभोग मिळो. ॥ ३ ॥


अग्नी॑षोमा॒ चेति॒ तद्वी॒र्यं वां॒ यदमु॑ष्णीतमव॒सं प॒णिं गाः ॥
अवा॑तिरतं॒ बृस॑यस्य॒ शेषोऽ॑विंदतं॒ ज्योति॒रेकं॑ ब॒हुभ्यः॑ ॥ ४ ॥

अग्नीषोमा चेति तत् वीर्यं वां यत् अमुष्णीतं अवसं पणिं गाः ॥
अवातिरतं बृसयस्य शेषः अविंदतं ज्योतिः एकं बहुऽभ्यः ॥ ४ ॥

हे अग्नि व सोमहो, ज्यावेळी तुम्ही पणीने अगदी जपून ठेवलेले धन - म्हणजे धेनू - ह्यांचे हरण केले, ज्यावेळी तुम्ही बृसयाच्या शेष राहिलेल्या अनुचरांचा पराभव केला, व ज्यावेळी अनेकांच्या हिताकरितांच तुम्ही एकच देदीप्यमान ज्योति घेऊन आलां त्यावेळी ते आपले सर्वसिद्ध वीर्य सर्वांस विदित झाले. ॥ ४ ॥


यु॒वमे॒तानि॑ दि॒वि रो॑च॒नान्य॒ग्निश्च॑ सोम॒ सक्र॑तू अधत्तम् ॥
यु॒वं सिंधूँ॑र॒भिश॑स्तेरव॒द्यादग्नी॑षोमा॒वमु॑ञ्चतं गृभी॒तान् ॥ ५ ॥

युवं एतानि दिवि रोचनानि अग्निः च सोम सक्रतू अधत्तम् ॥
युवं सिंधून् अभिऽशस्तेः अवद्यात् अग्नीषोमौ अमुंचतं गृभीतान् ॥ ५ ॥

हे सोमा तूं आणि अग्नि, हे दोघेही सामर्थ्यवान असल्यामुळे तुम्ही दोघांनी ह्या नक्षत्ररूपी ज्योतींची द्युलोकांत संस्थापना केली. हे अग्नि आणि सोमहो, प्रतिबंधात पडलेल्या सर्व नद्यांस तुम्ही अमंगल निंदेपासून मुक्त केले ॥ ५ ॥


आन्यं दि॒वो मा॑त॒रिश्वा॑ जभा॒राम॑थ्नाद॒न्यं परि॑ श्ये॒नो अद्रेः॑ ॥
अग्नी॑षोमा॒ ब्रह्म॑णा वावृधा॒नोरुं य॒ज्ञाय॑ चक्रथुरुलो॒कम् ॥ ६ ॥

आ अन्यं दिवः मातरिश्वा जभार अमथ्नात् अन्यं परि श्येनः अद्रेः ॥
अग्नीषोमा ब्रह्मणा वावृधाना उरुं यज्ञाय चक्रथुः ऊं इति लोकम् ॥ ६ ॥

ह्या दोघांपैकी एकास मातरिश्वा देवानें द्युलोकांतून येथे आणले व दुसर्‍यास श्येन पक्षी पर्वतांतून मंथन क्रियेनें उत्पन्न करून घेऊन आला. हे अग्नि आणि सोमहो, स्तुतिस्तोत्रांच्या योगानें तुम्ही प्रमुदित होऊन यज्ञकर्माच्या सिद्धतेसाठी ह्या जगतास विस्तीर्णता आणली. ॥ ६ ॥


अग्नी॑षोमा ह॒विषः॒ प्रस्थि॑तस्य वी॒तं हर्य॑तं वृषणा जु॒षेथा॑म् ॥
सु॒शर्मा॑णा॒ स्वव॑सा॒ हि भू॒तमथा॑ धत्तं॒ यज॑मानाय॒ शं योः ॥ ७ ॥

अग्नीषोमा हविषः प्रऽस्थितस्य वीतं हर्यतं वृषणा जुषेथाम् ॥
सुऽशर्माणा सुऽअवसा हि भूतं अथ धत्तं यजमानाय शं योः ॥ ७ ॥

हे अग्नि व सोमहो, हा येथे तुमच्याकरितां हवि सिद्ध आहे, त्याचा आस्वाद घ्या, त्याचा स्वीकार करा. हे पराक्रमी देवांनो, तो गोड मानून घ्या. आपण आमचे कल्याण करणारे व आमच्या रक्षणाचा भार घेणारे व्हा. आपणांस शरण येणार्‍या भक्तास जें सौख्य आपण अर्पण करतां तेंच याग करणार्‍या उपासकसही अर्पण करा. ॥ ७ ॥


यो अ॒ग्नीषोमा॑ ह॒विषा॑ सप॒र्याद्दे॑व॒द्रीचा॒ मन॑सा॒ यो घृ॒तेन॑ ॥
तस्य॑ व्र॒तं र॑क्षतं पा॒तमंह॑सो वि॒शे जना॑य॒ महि॒ शर्म॑ यच्छतम् ॥ ८ ॥

यः अग्नीषोमा हविषा सपर्यात् देवद्रीचा मनसा यः घृतेन ॥
तस्य व्रतं रक्षतं पातं अंहसः विशे जनाय महि शर्म यच्छतम् ॥ ८ ॥

हे अग्नि व सोमहो, जो उपासक हवि अर्पण करून आपलें पूजन करील अथवा अंतःकरण भक्तियुक्त करून जो आपलें घृतानें अर्चन करील त्याच्या सत्कर्माचें आपण रक्षण करा, व संकटांपासून त्यास बचावून न्या. सर्व लोक हे आपली प्रजा असल्यामुळें त्यांनाही आपण उत्तम सुख अर्पण करा. ॥ ८ ॥


अग्नी॑षोमा॒ सवे॑दसा॒ सहू॑ती वनतं॒ गिरः॑ ॥ सं दे॑व॒त्रा ब॑भूवथुः ॥ ९ ॥

अग्नीषोमा सऽवेदसा सहूती इति सऽहुती वनतं गिरः ॥ सं देवऽत्रा बभूवथुः ॥ ९ ॥

हे अग्नि व सोमहो, आपणांस सर्व गोष्टी सारख्याच विदित होत असल्यामुळें व आम्ही आपणां दोघांस एकदमच हाक मारीत असल्यामुळें आमच्या स्तोत्रावर आपण प्रेम ठेवा. देवसमुदायांत आपण एकदम प्रकट झाला. ॥ ९ ॥


अग्नी॑षोमाव॒नेन॑ वां॒ यो वां॑ घृ॒तेन॒ दाश॑ति ॥ तस्मै॑ दीदयतं बृ॒हत् ॥ १० ॥

अग्नीषोमौ अनेन वां यः वां घृतेन दाशति ॥ तस्मै दीदयतं बृहत् ॥ १० ॥

हे अग्नि व सोमहो, जो घृताचे योगानें आपणांस हवि अर्पण करतो त्याचेकरितां उत्तम संपत्ति धारण करून आपण सुप्रकाशित व्हा. ॥ १० ॥


अग्नी॑षोमावि॒मानि॑ नो यु॒वं ह॒व्या जु॑जोषतम् ॥ आ या॑त॒मुप॑ नः॒ सचा॑ ॥ ११ ॥

अग्नीषोमौ इमानि नः युवं हव्या जुजोषतम् ॥ आ यातं उप नः सचा ॥ ११ ॥

हे अग्नि व सोमहो, ह्या हविंचा आपण आवडीनें स्वीकार करा व दोघे मिळून आम्हांकडे या. ॥ ११ ॥


अग्नी॑षोमा पिपृ॒तमर्व॑तो न॒ आ प्या॑यन्तामु॒स्रिया॑ हव्य॒सूदः॑ ॥
अ॒स्मे बला॑नि म॒घव॑त्सु धत्तं कृणु॒तं नो॑ अध्व॒रं श्रु॑ष्टि॒मन्त॑म् ॥ १२ ॥

अग्नीषोमा पिपृतं अर्वतः नः आ प्यायंतां उस्रिया हव्यऽसूदः ॥
अस्मे इति बलानि मघवत्ऽसु धत्तं कृणुतं नः अध्वरं श्रुष्टिऽमंतम् ॥ १२ ॥

हे अग्नि व सोमहो, आमच्या अश्वांच्या पोषणाची उत्तम तजवीज करा. ज्यांच्या दुग्धामुळें आम्हांस हवि तयार करता येतात त्या आमच्या गाईही वृद्धि पावोत. आम्ही आपणांस आहुति अर्पण करीत असल्यामुळें आमचे अंगी अनेक प्रकारचे सामर्थ्य आणा व आमच्या यज्ञाची कीर्ति दूरवर जाईल असें करा. ॥ १२ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ९४ ( अग्नि सूक्त )

ऋषि - कुत्स अंगिरस : देवता - १-८ अग्नि; शेष अनेक : छंद - अनेक


इ॒मं स्तोम॒मर्ह॑ते जा॒तवे॑दसे॒ रथ॑मिव॒ सं म॑हेमा मनी॒षया॑ ॥
भ॒द्रा हि नः॒ प्रम॑तिरस्य सं॒सद्यग्ने॑ स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ १ ॥

इमं स्तोमं अर्हते जातऽवेदसे रथंऽइव सं महेम मनीषया ॥
भद्रा हि नः प्रऽमतिः अस्य संऽसदि अग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ १ ॥

सन्मानास योग्य व सर्वज्ञ अशा अग्निदेवास आपण, एखाद्यास जसा रथ आणून द्यावा, त्याचप्रमाणें हे स्तोत्र अंतःकरणपूर्वक अर्पण केलें पाहिजे. खरोखर ह्याची कृपाशील बुद्धि सर्व लोकांत आमच्य संबंधाने फार अनुकूल आहे. हे अग्निदेवा, तुझें सख्य आम्ही जोडलें असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ १ ॥


यस्मै॒ त्वमा॒यज॑से॒ स सा॑धत्यन॒र्वा क्षे॑ति॒ दध॑ते सु॒वीर्य॑म् ॥
स तू॑ताव॒ नैन॑मश्नोत्यंह॒तिरग्ने॑ स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ २ ॥

यस्मै त्वं आऽयजसे सः साधति अनर्वा क्षेति दधते सुऽवीर्यम् ॥
सः तूताव नैनं अश्नोति अंहतिरग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ २ ॥

ज्याचेकरितां तूं यज्ञ संपादन करतोस त्याचे हेतु सिद्ध होतात. त्याचेजवळ अश्व नसले तरी पराभव न पावतां त्यास राहतां येते. उत्तम प्रकारचे शौर्य तो संपादन करून घेतो. अभिवृद्धिही त्यास प्राप्त झालीच असें समजावे त्याला कसलीही अडचण येत नाहीं. हे अग्निदेवा, तुझें सख्य आम्ही जोडलें असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ २ ॥


श॒केम॑ त्वा स॒मिधं॑ सा॒धया॒ धिय॒स्त्वे दे॒वा ह॒विर॑द॒न्त्याहु॑तम् ॥
त्वम् आ॑दि॒त्याँ आ व॑ह॒ तान्ह्यु१॑श्मस्यग्ने॑ स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ ३ ॥

शकेम त्वा संऽइधं साधय धियः त्वे इति देवाः हविः अदंति आऽहुतम् ॥
त्वं आदित्यान् आ वह तान् हि उश्मसि अग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ ३ ॥

तुला प्रज्वलित करण्याचे सामर्थ्य आम्हांस खचित प्राप्त होईल. तूं आमच्या प्रार्थना सफल कर. तुझे ठिकाणी अर्पण केलेल्या हवीचेंच सर्व देव सेवन करतात. तूं आदित्यांना इकडे घेऊन ये. त्याच्याविषयी आम्हांस फार प्रेम आहे. हे अग्निदेवा, तुझें सौख्य आम्ही जोडलेले असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ ३ ॥


भरा॑मे॒ध्मं कृ॒णवा॑मा ह॒वींषि॑ ते चि॒तय॑न्तः॒ पर्व॑णापर्वणा व॒यम् ॥
जी॒वात॑वे प्रत॒रं सा॑धया॒ धियोऽ॑ग्ने स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ ४ ॥

भराम इध्मं कृणवाम हवींषि ते चितयंतः पर्वणाऽपर्वणा वयम् ॥
जीवातवे प्रऽतरं साधय धियः अग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ ४ ॥

तुला आम्ही इंधन अर्पण करूं व पर्वणीपर्वणीला तुला प्रदीप्त करीत तुला हवि देत जाऊं. आमचे आयुष्य वृद्धि पावावे म्हणून तूं आमच्या प्रर्थना उत्तम रीतीनें सफल कर. हे अग्निदेवा, तुझें सख्य आम्ही जोडलें असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ ४ ॥


वि॒शां गो॒पा अ॑स्य चरन्ति ज॒न्तवो॑ द्वि॒पच्च॒ यदु॒त चतु॑ष्पद॒क्तुभिः॑ ॥
चि॒त्रः प्र॑के॒त उ॒षसो॑ म॒हाँ अ॒स्यग्ने॑ स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ ५ ॥

विशां गोपाः अस्य चरंति जंतवः द्विऽपत् च यत् उत चतुःऽपत् अक्तुऽभिः ॥
चित्रः प्रऽकेतः उषसः महान् असि अग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ ५ ॥

हा सर्व लोकांचा संरक्षक आहे. ह्याच्याच मुळें द्विपाद व चतुष्पाद असे सर्व प्राणी रात्री संचार करण्यास समर्थ होतात. तूं उषेचा आश्चर्यकारक परंतु श्रेष्ठ असा कीर्ति ध्वज आहेस. हे अग्निदेवा, तुझें सख्य आम्ही जोडलें असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ ५ ॥


त्वम॑ध्व॒र्युरु॒त होता॑सि पू॒र्व्यः प्र॑शा॒स्ता पोता॑ ज॒नुषा॑ पु॒रोहि॑तः ॥
विश्वा॑ वि॒द्वाँ आर्त्वि॑ज्या धीर पुष्य॒स्यग्ने॑ स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ ६ ॥

त्वं अध्वर्युः उत होता असि पूर्व्यः प्रऽशास्ता पोता जनुषा पुरःऽहितः ॥
विश्वा विद्वान् आर्त्विज्या धीर पुष्यसि अग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ ६ ॥

तूं अध्वर्यु आहेस, हवि अर्पण करणारा तूं पुरातनकालीन होता आहेस. तूं यज्ञामध्यें आपलें अनुशासन चालविणारा व यज्ञास पवित्रता आणणारा आहेस. जन्मतःच तूं यज्ञाचा अग्रणी आहेस. तूं प्रज्ञावान असल्यामुळें, हे सुज्ञवर अग्निदेवा, ऋत्विजांची सर्व कार्यें तूं सहजच सांभाळून नेतोस. हे अग्निदेवा, तुझें सख्य आम्ही जोडलें असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ ६ ॥


यो वि॒श्वतः॑ सु॒प्रती॑कः स॒दृङ्ङ्सि॑ दू॒रे चि॒त्सन्त॒ळिदि॒वाति॑ रोचसे ॥
रात्र्या॑श्चि॒दन्धो॒ अति॑ देव पश्य॒स्यग्ने॑ स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ ७ ॥

यः विश्वतः सुऽप्रतीकः सऽदृङ् असि दूरे चित् सन् तळित्ऽइव अति रोचसे ॥
रात्र्याः चित् अंधः अति देव पश्यसि अग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ ७ ॥

हे अग्निदेवा तूं सर्व प्रकारें सारखा देखणा आहेस. दूर असतांनासुद्धां तूं जवळ असल्याप्रमाणेंच अति प्रखर तेजानें तळपत असतोस. रात्रीच्या अंधकारांतूनसुद्धां हे देवा, तू अवलोकन करण्यास समर्थ होतोस. हे अग्निदेवा, तुझें सख्य आम्ही जोडलें असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ ७ ॥


पूर्वो॑ देवा भवतु सुन्व॒तो रथो॑ऽ॒स्माकं॒ शंसो॑ अ॒भ्यस्तु दू॒ढ्यः ॥
तदा जा॑नीतो॒त पु॑ष्यता॒ वचोऽ॑ग्ने स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ ८ ॥

पूर्वः देवा भवतु सुन्वतः रथः अस्माकं शंसः अभि अस्तु दुःऽध्यः ॥
तत् आ जानीत उत पुष्यत वचः अग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ ८ ॥

हे देवहो, सोमरस सिद्ध करणार्‍या उपासकाचा रथ सर्वांच्यापुढें असो, आणि आमची स्तुती दुष्ट हृदयाच्या माणसांना ओलांडून पुढें जावो. ती आमची प्रार्थना नीट समजून घ्या व तिला यशस्वी करा. हे अग्निदेवा, तुझें सख्य आम्ही जोडलें असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ ८ ॥


व॒धैर्दुः॒शंसा॒ँ अप॑ दू॒ढ्यो जहि दू॒रे वा॒ ये अन्ति॑ वा॒ के चि॑द॒त्रिणः॑ ॥
अथा॑ य॒ज्ञाय॑ गृण॒ते सु॒गं कृ॒ध्यग्ने॑ स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ ९ ॥

वधैः दुःशंसान् अप दुःऽध्यः जहि दूरे वा ये अंति वा के चित् अत्रिणः ॥
अथा यज्ञाय गृणते सुऽगं कृधि अग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ ९ ॥

आपल्या घातक शस्त्रांनी दुष्ट हृदयांच्या मनुष्यांस व त्याचप्रमाणे जे कोणी दुरात्मे तुझ्या समीप अथवा तुझ्यापासून दूर असतील त्यांसही मारून टाक. तुझी स्तोत्रें गाणार्‍या भक्तांकरितां यज्ञाचा मार्ग सुगम कर. हे अग्निदेवा, तुझें सख्य आम्ही जोडलें असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ ९ ॥


यदयु॑क्था अरु॒षा रोहि॑ता॒ रथे॒ वात॑जूता वृष॒भस्ये॑व ते॒ रवः॑ ॥
आदि॑न्वसि व॒निनो॑ धू॒मके॑तु॒नाग्ने॑ स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ १० ॥

यत् अयुक्थाः अरुषा रोहिता रथे वातऽजूता वृषभस्यऽइव ते रवः ॥
आत् इन्वसि वनिनः धूमऽकेतुना अग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ १० ॥

ज्यावेळी देदीप्यमान कांतीनें युक्त व जणूं काय कांही वार्‍यानें प्रेरणा केल्याप्रमाणें धावणारे असे रक्तवर्ण अश्व तूं जोडलेले असतात त्यावेळी एखाद्या वृषभाप्रमाणें तुझी गर्जना होते, व धूम्ररूपी निशाण फडकविणार्‍या आपल्या ज्वालांनी तूं वृक्षांना व्यापून टाकतोस. हे अग्निदेवा, तुझें सख्य आम्ही जोडलें असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ १० ॥


अध॑ स्व॒नादु॒त बि॑भ्युः पत॒त्रिणो॑ द्र॒प्सा यत्ते॑ यव॒सादो॒ व्यस्थि॑रन् ॥
सु॒गं तत्ते॑ ताव॒केभ्यो॒ रथे॒भ्योऽ॑ग्ने स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ ११ ॥

अध स्वनात् उत बिभ्युः पतत्रिणः द्रप्सा यत् ते यवसऽअदः वि अस्थिरन् ॥
सुऽगं तत् ते तावकेभ्यः रथेभ्यः अग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ ११ ॥

ज्या तुझ्या ठिणग्या तृणाचा संहार करीत चोहोंकडे पसरतात त्यवेळी तुझी गर्जना ऐकून पक्षीसुद्धां भयभीत होतात. तुझ्या रथाचा मार्गही त्यावेळीं सुलभ होतो. हे अग्निदेवा, तुझें सख्य आम्ही जोडलें असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ ११ ॥


अ॒यं मि॒त्रस्य॒ वरु॑णस्य॒ धाय॑सेऽवया॒तां म॒रुतां॒ हेळो॒ अद्भु॑ातः ॥
मृ॒ळा सु नो॒ भूत्वे॑षां॒ मनः॒ पुन॒रग्ने॑ स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ १२ ॥

अयं मित्रस्य वरुणस्य धायसे अवऽयातां मरुतां हेळः अद्भुितः ॥
मृळा सु नः भूतु एषां मनः पुनः अग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ १२ ॥

मित्र व वरुण ह्यांच्या संतोषार्थ खाली गमन करणार्‍या मरुतांचा हा क्रोध खरोखर आश्चर्य उत्पन्न करणारा आहे. हे अग्निदेवा आम्हांस सौख्य अर्पण कर. त्या मरुतांचे मन पुन्हां आमच्याकडे आकर्षित होवो. हे अग्निदेवा, तुझें सख्य आम्ही जोडलें असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ १२ ॥


दे॒वो दे॒वाना॑मसि मि॒त्रो अद्भु॑ऽतो॒ वसु॒र्वसू॑नामसि॒ चारु॑रध्व॒रे ॥
शर्म॑न्त्स्याम॒ तव॑ स॒प्रथ॑स्त॒मेऽ॑ग्ने स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ १३ ॥

देवः देवानां असि मित्रः अद्भुनतः वसुः वसूनां असि चारुः अध्वरे ॥
शर्मन् स्याम तव सप्रथःऽतमे अग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ १३ ॥

तूं सर्व देवांत श्रेष्ठ देव आहेस, तूं अद्‍भुत मित्र आहेस, सर्व वसूंत श्रेष्ठ वसु आहेस, सर्व यज्ञांत तूं शोभणारा आहेस. तुझ्या सर्वविस्तृत अशा मंगल आश्रयाखाली आम्ही राहूं. हे अग्निदेवा, तुझें सख्य आम्ही जोडलें असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ १३ ॥


तत्ते॑ भ॒द्रं यत्समि॑द्धः॒ स्वे दमे॒ सोमा॑हुतो॒ जर॑से मृळ॒यत्त॑मः ॥
दधा॑सि॒ रत्नं॒ि द्रवि॑णं च दा॒शुषेऽ॑ग्ने स॒ख्ये मा रि॑षामा व॒यं तव॑ ॥ १४ ॥

तत् ते भद्रं यत् संऽइद्धः स्वे दमे सोमऽआहुतः जरसे मृळयत्ऽतमः ॥
दधासि रत्नं द्रविणं च दाशुषे अग्ने सख्ये मा रिषाम वयं तव ॥ १४ ॥

हेंच तुझे मांगल्यकारक कृत्य कीं तुझ्या सदनांत तुला सोमाचा हवि दिला असतां तूं प्रदीप्त होऊन भक्तास अत्यंत सौख्य प्राप्त करून देण्याकरितां मधुर शब्द बोलतोस व आपल्या अर्चकास उत्तम उत्तम वस्तु व धन अर्पण करतोस. हे अग्निदेवा, तुझें सख्य आम्ही जोडलें असल्यामुळें आमचा नाश होऊं देऊं नको. ॥ १४ ॥


यस्मै॒ त्वं सु॑द्रविणो॒ ददा॑शोऽनागा॒स्त्वम॑दिते स॒र्वता॑ता ॥
यं भ॒द्रेण॒ शव॑सा चो॒दया॑सि प्र॒जाव॑ता॒ राध॑सा॒ ते स्या॑म ॥ १५ ॥

यस्मै त्वं सुऽद्रविणः ददाशः अनागाःऽत्वं अदिते सर्वऽताता ॥
यं भद्रेण शवसा चोदयासि प्रजाऽवता राधसा ते स्याम ॥ १५ ॥

हे वैभवसंपन्न व अखंड सामर्थ्ययुक्त देवा, सर्व तऱ्हेने निष्पापपणा राखण्याविषयी तूं ज्यास सामर्थ्य देतोस व ज्यास सौख्य व बल अर्पण करून तूं भरभराटीस पोंचवितोस तसें आम्हीही होऊन, उत्तम संतति प्राप्त करून देणार्‍या तुझ्या कृपाछत्राखाली आनंदानें राहूं. ॥ १५ ॥


स त्वम॑ग्ने सौभग॒त्वस्य॑ वि॒द्वान॒स्माक॒मायुः॒ प्र ति॑रे॒ह दे॑व ॥
तन्नो॑ मि॒त्रो वरु॑णो मामहन्ता॒मदि॑तिः॒ सिंधुः॑ पृथि॒वी उ॒त द्यौः ॥ १६ ॥

सः त्वं अग्ने सौभगऽत्वस्य विद्वान् अस्माकं आयुः प्र तिर इह देव ॥
तन् नः मित्रः वरुणः मामहंतां अदितिः सिंधुः पृथिवी उत द्यौः ॥ १६ ॥

हे अग्निदेवा, खरे कल्याण कशांत आहे ह्याचें तुला ज्ञान असल्यामुळें ह्या जगांत तूं आमचे आयुष्य वृद्धिंगत कर. ह्या आमच्या विनंतीस मित्र व वरुण हे व त्याचप्रमाणे अदिति, सिन्धु, पृथिवी व द्युलोक हेही संमति देवोत. ॥ १६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ९५ ( ऋतु उत्पत्ति सूक्त )

ऋषि - कुत्स अंगिरस : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्


द्वे विरू॑पे चरतः॒ स्वर्थे॑ अ॒न्यान्या॑ व॒त्समुप॑ धापयेते ॥
हरि॑र॒न्यस्यां॒ भव॑ति स्व॒धावा॑ञ्छु॒क्रो अ॒न्यस्यां॑ ददृशे सु॒वर्चाः॑ ॥ १ ॥

द्वे इति विरूपे इति विऽरूपे चरतः स्वर्थे इति सुऽअर्थे अन्याऽअन्या वत्सं उप धापयेते इति ॥
हरिः अन्यस्यां भवति स्वधाऽवान् शुक्रः अन्यस्यां ददृशे सुऽअर्चाः ॥ १ ॥

रूपांत अगदींच भिन्न अशा ह्या दोघी युवती आपआपल्या सुंदर मार्गांनी गमन करीत असतात. दोघींपैकी प्रत्येक, एक एक बालकाला पाजीत असते. एकीजवळ पीतवर्ण बालक पुष्ट होत असते व दुसरीजवळ शुभ्रवर्ण बालक झपाट्यानें वाढत असलेले आढळलें आहे. ॥ १ ॥


दशे॒मं त्वष्टु॑र्जनयन्त॒ गर्भ॒मत॑न्द्रासो युव॒तयो॒ विभृ॑त्रम् ॥
ति॒ग्मानी॑कं॒ स्वय॑शसं॒ जने॑षु वि॒रोच॑मानं॒ परि॑ षीं नयन्ति ॥ २ ॥

दश इमं त्वष्टुः जनयंत गर्भं अतंद्रासः युवतयः विऽभृत्रम् ॥
तिग्मऽअनीकं स्वऽयशसं जनेषु विऽरोचमानं परि सीं नयंति ॥ २ ॥

त्वष्टा देवाच्या निरालस अशा दहा युवतींनी ह्या खेळकर बाळास जन्म दिला. जेव्हां ह्याची प्रखर कांति दृष्टीस पडून ह्याची ख्याति सर्व लोकांत पसरली तेव्हां ह्या देदीप्यमान बालकास इकडे तिकडे सर्वत्र घेऊन जाऊं लागले. ॥ २ ॥


त्रीणि॒ जाना॒ परि॑ भूषन्त्यस्य समु॒द्र एकं॑ दि॒व्येक॑म॒प्सु ॥
पूर्वा॒मनु॒ प्र दिशं॒ पार्थि॑वानामृ॒तून्प्र॒शास॒द्वि द॑धावनु॒ष्ठु ॥ ३ ॥

त्रीणि जाना परि भूषंति अस्य समुद्र एकं दिवि एकं अप्ऽसु ॥
पूर्वां अनु प्र दिशं पार्थिवानां ऋतून् प्रऽशासत् वि दधौ अनुष्ठु ॥ ३ ॥

समुद्रांतील एक, द्युलोकांतील एक व अंतरिक्षांतील जलांत एक अशा रीतीनें ह्याच्या तिन्ही जन्मांचे कविजन सुंदर वर्णन करतात. पूर्व दिशेपासून पृथिवीच्या भागांतील सर्व दिशांचे नियमन करून व त्याचप्रमाणे ऋतूंवर आपला अधिकार चालवून ह्यानें त्यांच्या त्यांच्या क्रमाप्रमाणें त्यांची संस्थापना केली आहे. ॥ ३ ॥


क इ॒मं वो॑ नि॒ण्यमा चि॑केत व॒त्सो मा॒तॄर्ज॑नयत स्व॒धाभिः॑ ॥
ब॒ह्वी॒नां गर्भो॑ अ॒पसा॑मु॒पस्था॑न्म॒हान्क॒विर्निश्च॑रति स्व॒धावा॑न् ॥ ४ ॥

क इमं वः निण्यं आ चिकेत वत्सः मातॄः जनयत स्वधाभिः ॥
बह्वीनां गर्भः अपसां उपऽस्थान् महान् कविः निः चरति स्वधावान् ॥ ४ ॥

अंतर्हित असतांना हा तुम्हांपैकी कोणास ओळखूं येतो ? ह्या बालकानें आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने आपल्या मातांसही जन्म दिला. अनेक वस्तूंना गर्भरूप, श्रेष्ठ, प्रज्ञावान व सामर्थ्यशाली असा हा अग्नि आपल्या अद्‍भुत पराक्रमांच्या जागेमधून बाहेर निघून सर्वत्र संचार करीत आहे. ॥ ४ ॥


आ॒विष्ट्यो॑ वर्धते॒ चारु॑रासु जि॒ह्माना॑मू॒र्ध्वः स्वय॑शा उ॒पस्थे॑ ॥
उ॒भे त्वष्टु॑र्बिभ्यतु॒र्जाय॑मानात्प्रती॒ची सिं॒हं प्रति॑ जोषयेते ॥ ५ ॥

आविः त्यः वर्धते चारुः आसु जिह्मानां ऊर्ध्वः स्वऽयशाः उपऽस्थे ॥
उभे त्वष्टुः बिभ्यतुः जायमानात् प्रतीची इति सिंहं प्रति जोषयेते इति ॥ ५ ॥

हा सुंदर अग्नि जलांमध्यें राहून सर्वांच्या दृष्टीस पडेल अशा रीतीनें वृद्धिंगत होतो. हा स्वतःच्या कीर्तिनें मंडित होऊन, तीं जलें वक्र गतीनें वहात असतांही त्यांचेमध्यें सरळ उभा राहतो. ह्याचा जन्म होत असतां, त्वष्टा देवानें निर्माण केलेल्या द्युलोक व पृथिवी ह्या दोघींस त्याची भिती वाटली, परंतु पुन्हां परत वळून त्यांनी ह्या सिंहाचा आश्रय केला. ॥ ५ ॥


उ॒भे भ॒द्रे जो॑षयेते॒ न मेने॒ गावो॒ न वा॒श्रा उप॑ तस्थु॒रेवैः॑ ॥
स दक्षा॑णां॒ दक्ष॑पतिर्बभूवा॒ञ्जन्ति॒ यं द॑क्षिण॒तो ह॒विर्भिः॑ ॥ ६ ॥

उभे इति भद्रे इति जोषयेते इति न मेने इति गावः न वाश्राः उप तस्थुः एवैः ॥
सः दक्षाणां दक्षऽपतिः बभूव अंजंति यं दक्षिणतः हविःऽभिः ॥ ६ ॥

त्या उभयतां कल्याणप्रद द्यावापृथिवींनी, दोघी स्त्रियांप्रमाणें, ह्याचें परिपालन केलें. वत्सासाठी हंबरणार्‍या गाईप्रमाणें त्या धांवत धांवत ह्याचेजवळ आल्या. ज्यास दक्षिण बाजूनें सर्व उपासक लोक हवि अर्पण करून भूषवित असतात असा तो अग्नि सर्व सामर्थ्यवान पुरुषांत सामर्थ्यवान ठरला. ॥ ६ ॥


उद्यं॑यमीति सवि॒तेव॑ बा॒हू उ॒भे सिचौ॑ यतते भी॒म ऋ॒ञ्जन् ॥
उच्छु॒क्रमत्क॑मजते सि॒मस्मा॒न्नवा॑ मा॒टृभ्यो॒ वस॑ना जहाति ॥ ७ ॥

उत् यंयमीति सविताऽइव बाहू इति उभे इति सिचौ यतते भीम ऋंजन् ॥
उत् छुक्रं अत्कं अजते सिमस्मात् नवा मातृभ्यः वसना जहाति ॥ ७ ॥

सवित्याप्रमणें हा आपले बाहू उभारतो व वृष्टिकारक अशा त्या दोघी द्यावापृथिवींस अलंकृत करीत हा सत्कृत्यांत जोमाने गढून जातो. सर्वांपासून हा त्यांची उज्ज्वल प्रावरणें हिसकावून घेतो. स्वतःच्या जननीपासून सुद्धां हा त्यांची नूतन वसनें काढून घेतो. ॥ ७ ॥


त्वे॒षं रू॒पं कृ॑णुत॒ उत्त॑रं॒ यत्स॑म्पृञ्चा॒नः सद॑ने॒ गोभि॑र॒द्भिः ॥
क॒विर्बु॒ध्नं परि॑ मर्मृज्यते॒ धीः सा दे॒वता॑ता॒ समि॑तिर्बभूव ॥ ८ ॥

त्वेषं रूपं कृणुते उत्ऽतरं यत् संऽपृंचानः सदने गोभिः अत्ऽभिः ॥
कविः बुध्नं परि मर्मृज्यते धीः सा देवऽताता संऽइतिः बभूव ॥ ८ ॥

हा स्वसदनांत धेनु व उदक ह्यांच्याशी जेव्हां संपर्क ठेवतो तेव्हां ह्यास अति उज्ज्वल रूप धारण करतां येतें. मूर्तिमंत बुद्धिच असा हा प्रज्ञावान अग्नि स्वर्गलोकाच्या मूल स्तंभास निर्मलत्व आणतो, व म्हणू हीच त्याची कृति त्याची यज्ञांत देवांबरोबर भेट होण्यास कारणीभूत होते. ॥ ८ ॥


उ॒रु ते॒ ज्रयः॒ पर्ये॑ति बु॒ध्नं वि॒रोच॑मानं महि॒षस्य॒ धाम॑ ॥
विश्वे॑भिरग्ने॒ स्वय॑शोभिरि॒द्धोऽ॑दब्धेभिः पा॒युभिः॑ पाह्य॒स्मान् ॥ ९ ॥

उरु ते ज्रयः परि एति बुध्नं विऽरोचमानं महिषस्य धाम ॥
विश्वेभिः अग्ने स्वयशाःऽभिः इद्धः अदब्धेभिः पायुभिः पाहि अस्मान् ॥ ९ ॥

श्रेष्ठ असा जो तूं त्या तुझें वसतिस्थान स्वर्गलोकाच्या मूल प्रदेशावर आहे व त्यास तुझें विस्तृत व देदीप्यमान तेज व्याप्त करून टाकीत आहे. हे अग्नि देवा, सर्वविख्यात अशी आपल्या सकल ज्वालांचे योगानें प्रदीप्त हो व कधींही कुंठित न होणार्‍या अशा आपल्या भक्तसंरक्षक सामर्थ्यानें आमचें रक्षण कर. ॥ ९ ॥


धन्व॒न्स्रोतः॑ कृणुते गा॒तुमू॒र्मिं शु॒क्रैरू॒र्मिभि॑र॒भि न॑क्षति॒ क्षाम् ॥
विश्वा॒ सना॑नि ज॒ठरे॑षु धत्तेऽ॒न्तर्नवा॑सु चरति प्र॒सूषु॑ ॥ १० ॥

धन्वन् स्रोतः कृणुते गातुं ऊर्मिं शुक्रैः ऊर्मिऽभिः अभि नक्षति क्षाम् ॥
विश्वा सनानि जठरेषु धत्ते अंतः नवासु चरति प्रऽसूषु ॥ १० ॥

निर्जल प्रदेशांत हा जलप्रवाह आणतो, तेथें उदकांना मार्ग करतो व पाण्याच्या लाटा उसळावयास लावतो. प्रकाशामुळें चकाकणार्‍या अशा वीचींच्या योगानें हा पृथिवीस भरून टाकतो. सर्व पुरातन वस्तूंना तो आपल्या उदरांत टाकतो आणि नूतन तरुलतामध्यें हा निर्भयपणें संचार करतो. ॥ १० ॥


ए॒वा नो॑ अग्ने स॒मिधा॑ वृधा॒नो रे॒वत्पा॑वक॒ श्रव॑से॒ वि भा॑हि ॥
तन्नो॑ मि॒त्रो वरु॑णो मामहन्ता॒मदि॑तिः॒ सिंधुः॑ पृथि॒वी उ॒त द्यौः ॥ ११ ॥

एव नः अग्ने संऽइधा वृधानः रेवत् पावक श्रवसे वि भाहि ॥
तन् नः मित्रः वरुणः मामहंतां अदितिः सिंधुः पृथिवी उत द्यौः ॥ ११ ॥

हे अग्निदेवा, आम्ही अर्पण केलेल्या इंधनामुळें अशा रीतीनें वृद्धिंगत होऊन, हे सर्वांस पावन करणार्‍या देवा, तूं आपला प्रकाश सर्वत्र पाड. आम्हांस धन देऊन उत्तम कीर्ति मिळव. ह्या आमच्या विनंतीस मित्र व वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी व द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ९६ ( अग्नि सूक्त )

ऋषि - कुत्स अंगिरस : देवता - द्रविणोदसग्नि : छंद - त्रिष्टुभ्


स प्र॒त्नथा॒ सह॑सा॒ जाय॑मानः स॒द्यः काव्या॑नि॒ बळ॑धत्त॒ विश्वा॑ ॥
आप॑श्च मि॒त्रं धि॒षणा॑ च साधन्दे॒वा अ॒ग्निं धा॑रयन्द्रविणो॒दाम् ॥ १ ॥

सः प्रत्न्ऽथा सहसा जायमानः सद्यः काव्यानि बळ् अधत्त विश्वा ॥
आपः च मित्रं धिषणा च साधन् देवाः अग्निं धारयन् द्रविणःऽदाम् ॥ १ ॥

पूर्वीप्रमाणे सामर्थ्यापासूनच जन्म घेणार्‍या ह्या अग्नीनें खरोखर सर्व बुद्धिमत्व एकदम प्राप्त करून घेतलें. ह्यास उदकें व प्रज्ञा ह्यांनी जगाचा मित्र होण्यास प्रवृत्त केलें व ह्या वैभवदायक अग्नीचा सर्व देवांनी आश्रय केला. ॥ १ ॥


स पूर्व॑या नि॒विदा॑ क॒व्यता॒योरि॒माः प्र॒जा अ॑जनय॒न्मनू॑नाम् ॥
वि॒वस्व॑ता॒ चक्ष॑सा॒ द्याम॒पश्च॑ दे॒वा अ॒ग्निं धा॑रयन्द्रविणो॒दाम् ॥ २ ॥

सः पूर्वया निऽविदा कव्यता आयोः इमाः प्रऽजाः अजनयन् मनूनाम् ॥
विवस्वता चक्षसा द्यां अपः च देवाः अग्निं धारयन् द्रविणःऽदाम् ॥ २ ॥

आयूच्या स्तोत्रांनी संतुष्ट होऊन त्यानें आपल्या पुरातन प्रज्ञावानपणानें ही मनूची सर्व प्रजा निर्माण केली व आपल्या सर्वप्रसृत तेजानें द्युलोक व उदक ह्यांस जन्म दिला. ह्या वैभवदायक अग्नीचा सर्व देवांनी आश्रय केला आहे. ॥ २ ॥


तमी॑ळत प्रथ॒मं य॑ज्ञ॒साधं॒ विश॒ आरी॒राहु॑तमृञ्जसा॒नम् ॥
ऊ॒र्जः पु॒त्रं भ॑र॒तं सृ॒प्रदा॑नुं दे॒वा अ॒ग्निं धा॑रयन्द्रविणो॒दाम् ॥ ३ ॥

तं ईळत प्रथमं यज्ञऽसाधं विशः आरीः आहुतं ऋंजसानम् ॥
ऊर्जः पुत्रं भरतं सृप्र*दानुं देवाः अग्निं धारयन् द्रविणःऽदाम् ॥ ३ ॥

सामर्थ्याचा पुत्र, विश्वाचें भरण करणारा, व दानकर्मांत अत्यंत उदार अशा ह्या यज्ञसिद्धिदायक अग्नीस श्रद्धावान लोकांनी सर्वांचे अगोदर आमंत्रण करून व सर्वांचे अगोदर भूषणांनी सजवून स्तुतींनी संतुष्ट केले. ह्या वैभदायक अग्नीचा सर्व देवांनी आश्रय केला आहे. ॥ ३ ॥


स मा॑त॒रिश्वा॑ पुरु॒वार॑पुष्टिर्वि॒दद्गा॒तुं तन॑याय स्व॒र्वित् ॥
वि॒शां गो॒पा ज॑नि॒ता रोद॑स्योर्दे॒वा अ॒ग्निं धा॑रयन्द्रविणो॒दाम् ॥ ४ ॥

सः मातरिश्वा पुरुवारऽपुष्टिः विदत् गातुं तनयाय स्वःऽवित् ॥
विशां गोपा जनिता रोदस्योः देवाः अग्निं धारयन् द्रविणःऽदाम् ॥ ४ ॥

सर्व मानवाचा संरक्षणकर्ता, द्युलोक आणि भूलोक ह्यांचा उत्पादक, स्वर्गाची प्राप्ति करून देणारा व असंख्य वैभवें जवळ बाळगणारा असा जो हा मातरिष्वा त्यानें आपल्या अपत्यांकरितां उत्तम नीति मार्ग शोधून काढला व म्हणूनच ह्या वैभवदायक अग्नीचा सर्व देवांनी आश्रय केला आहे. ॥ ४ ॥


नक्तो॒षासा॒ वर्ण॑मा॒मेम्या॑ने धा॒पये॑ते॒ शिशु॒मेकं॑ समी॒ची ॥
द्यावा॒क्षामा॑ रु॒क्मो अ॒न्तर्वि भा॑ति दे॒वा अ॒ग्निं धा॑रयन्द्रविणो॒दाम् ॥ ५ ॥

नक्तोषासा वर्णं आमेम्याने धापयेते शिशुं एकं समीची ॥
द्यावाक्षामा रुक्मः अंतर्वि भाति देवा अग्निं धारयन् द्रविणःऽदाम् ॥ ५ ॥

नेहमी आपली अंगकांति बदलणार्‍या अशा रात्र व उषा एकत्र जमून ह्या एकाच बालकास दुग्धपान करवितात. सुवर्णाप्रमाणे शोभणारा हा देव द्युलोक व भूलोक ह्या दोन्ही लोकांत आपली प्रभा पसरवितो. ह्या वैभवदायक अग्नीचा सर्व देवांनी आश्रय केला आहे. ॥ ५ ॥


रा॒यो बु॒ध्नः सं॒गम॑नो॒ वसू॑नां य॒ज्ञस्य॑ के॒तुर्म॑न्म॒साध॑नो॒ वेः ॥
अ॒मृ॒त॒त्वं रक्ष॑माणास एनं दे॒वा अ॒ग्निं धा॑रयन्द्रविणो॒दाम् ॥ ६ ॥

रायः बुध्नः संऽगमनः वसूनां यज्ञस्य केतुः मन्मऽसाधनः वेः ॥
अमृतऽत्वं रक्षमाणासः एनं देवाः अग्निं धारयन् द्रविणःऽदाम् ॥ ६ ॥

हा संपत्तीचें मूल भांडार, धनाची प्राप्ति करून देणारा, यज्ञाची ध्वजा व याचकाचें इच्छित पुरविणारा आहे. आपले अमरत्व कायम राहण्याकरितां प्रयत्न करणार्‍या देवांनी ह्या वैभवदायक अग्नीचा आश्रय केला आहे. ॥ ६ ॥


नू च॑ पु॒रा च॒ सद॑नं रयी॒णां जा॒तस्य॑ च॒ जाय॑मानस्य च॒ क्षाम् ॥
स॒तश्च॑ गो॒पां भव॑तश्च॒ भूरे॑र्दे॒वा अ॒ग्निं धा॑रयन्द्रविणो॒दाम् ॥ ७ ॥

नु च पुरा च सदनं रयीणां जातस्य च जायमानस्य च क्षाम् ॥
सतः च गोपां भवतः च भूरेः देवा अग्निं धारयन् द्रविणःऽदाम् ॥ ७ ॥

जो आतां व पूर्वींही वैभवाचें मंदिरच होता, आजपर्यंत जन्म पावलेल्या व जन्मास येत असलेल्या सर्व जीवांचे जो आनंद स्थान आहे, व जे अनेक जीव आतां अस्तित्वांत आहेत अथवा पुढें अस्तित्वांत येणार आहेत त्यांचा जो संरक्षणकर्ता आहे त्या वैभवदायक अग्नीचा सर्व देवांनी आश्रय केला आहे. ॥ ७ ॥


द्र॒वि॒णो॒दा द्रवि॑णसस्तु॒रस्य॑ द्रविणो॒दाः सन॑रस्य॒ प्र यं॑सत् ॥
द्र॒वि॒णो॒दा वी॒रव॑ती॒मिषं॑ नो द्रविणो॒दा रा॑सते दी॒र्घमायुः॑ ॥ ८ ॥

द्रविणःऽदा द्रविणसः तुरस्य द्रविणःऽदाः सनरस्य प्र यंसत् ॥
द्रविणःऽदा वीरवतीं इषं नः द्रविणःऽदा रासते दीर्घं आयुः ॥ ८ ॥

ह्या वैभवदायक देवानें, सत्वर वृद्धि पावणारी संपत्ति आम्हांस दिली आहे. त्यानें वीर पुरुषांनी युक्त अशी संपत्ति आम्हांस दिली आहे. त्यानें वीर्यशाली संततीसह आमच्या पोषणास अगदीं पुरेसें होईल इतकें द्रव्य आम्हांस दिलें आहे. हा वैभवदायक देव आम्हांस दीर्घ आयुष्यही देत आहे. ॥ ८ ॥


ए॒वा नो॑ अग्ने स॒मिधा॑ वृधा॒नो रे॒वत्पा॑वक॒ श्रव॑से॒ वि भा॑हि ॥
तन्नो॑ मि॒त्रो वरु॑णो मामहन्ता॒मदि॑तिः॒ सिंधुः॑ पृथि॒वी उ॒त द्यौः ॥ ९ ॥

एव नः अग्ने संऽइधा वृधानः रेवत् पावकः श्रवसे वि भाहि ॥
तन् नः मित्रः वरुणः मामहंतां अदितिः सिंधुः पृथिवी उत द्यौः ॥ ९ ॥

हे अग्निदेवा, आम्ही अर्पण केलेल्या इंधनामुळें अशा रीतीनें वृद्धिंगत होऊन, हे सर्वांस पावन करणार्‍या देवा, तूं आपला प्रकाश सर्वत्र पाड व आम्हांस धन देऊन उत्तम कीर्ति मिळव. ह्या आमच्या विनंतीस मित्र व वरुण व त्याचप्रमाणें अदिति, सिंदु, पृथिवी व द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ९७ ( अग्नि सूक्त )

ऋषि - कुत्स अंगिरस : देवता - अग्नि : छंद - गायत्री


अप॑ नः॒ शोशु॑चद॒घमग्ने॑ शुशु॒ग्ध्या र॒यिम् ॥ अप॑ नः॒ शोशु॑चद॒घम् ॥ १ ॥

अप नः शोशुचत् अघं अग्ने शुशुग्धि आ रयिम् ॥ अप नः शोशुचत् अघम् ॥ १ ॥

हा अग्नि प्रज्वलित होऊन आमचे पाप नाहींसे करो. हे अग्निदेवा, आमचेवर संपत्तीचा प्रकाश पाड. खरोखर हा अग्नि प्रज्वलित होऊन आमचें पाप नाहींसे करो. ॥ १ ॥


सु॒क्षे॒त्रि॒या सु॑गातु॒या व॑सू॒या च॑ यजामहे ॥ अप॑ नः॒ शोशु॑चद॒घम् ॥ २ ॥

सुऽक्षेत्रिया सुगातुऽया वसूऽया च यजामहे ॥ अप नः शोशुचत् अघम् ॥ २ ॥

सुस्थळीं राहणार्‍या व सुमार्गांनी मिळविणार्‍या संपत्तीची इच्छा धरून आम्ही ह्याचें अर्चन करीत आहोंत. हा अग्नि प्रज्वलित होऊन आमचें पाप नाहींसे करो. ॥ २ ॥


प्र यद्‍भन्दि॑ष्ठ एषां॒ प्रास्माका॑सश्च सू॒रयः॑ ॥ अप॑ नः॒ शोशु॑चद॒घम् ॥ ३ ॥

प्र यत् भंदिष्ठः एषां प्र अस्माकासः च सूरयः ॥ अप नः शोशुचत् अघम् ॥ ३ ॥

ह्या सर्वांत ज्या अर्थी हाच तुझा भक्त तुझें अतिशय स्तवन करीत आहे व त्याचप्रमणें आमच्या कुलांतील इतर विद्वान लोकही तुझ्या स्तुतींत अत्यंत निमग्न आहेत, त्या अर्थीं हा अग्नि प्रज्वलित होऊन आमचें पाप नाहींसे करो. ॥ ३ ॥


प्र यत्ते॑ अग्ने सू॒रयो॒ जाये॑महि॒ प्र ते॑ व॒यम् ॥ अप॑ नः॒ शोशु॑चद॒घम् ॥ ४ ॥

प्र यत् ते अग्ने सूरयः जायेमहि प्र ते वयम् ॥ अप नः शोशुचत् अघम् ॥ ४ ॥

हे अग्निदेवा, ज्या अर्थीं आम्हीं तुझे उपासक होऊन जन्मलों आहोंत - ज्या अर्थीं आम्ही तुझे आहोंत - त्या अर्थीं हा अग्नि प्रज्वलित होऊन आमचें पाप नाहींसे करो. ॥ ४ ॥


प्र यद॒ग्नेः सह॑स्वतो वि॒श्वतो॒ यन्ति॑ भा॒नवः॑ ॥ अप॑ नः॒ शोशु॑चद॒घम् ॥ ५ ॥

प्र यत् अग्नेः सहस्वतः विश्वतः यंति भानवः ॥ अप नः शोशुचत् अघम् ॥ ५ ॥

ज्या अर्थीं प्रबल अग्निचे रश्मि सर्वत्र प्रसरले आहेत त्या अर्थी हा अग्नि प्रज्वलित होऊन आमचे पाप नाहींसे करो. ॥ ५ ॥


त्वं हि वि॑श्वतोमुख वि॒श्वतः॑ परि॒भूरसि॑ ॥ अप॑ नः॒ शोशु॑चद॒घम् ॥ ६ ॥

त्वं हि विश्वतःऽमुख विश्वतः परिऽभूः असि ॥ अप नः शोशुचत् अघम् ॥ ६ ॥

चारी दिशांकडे ज्याचें सुंदर मुख दिसत असते अशा हे अग्निदेवा, खरोखर तूं सर्वत्र आहेस. हा अग्नि प्रज्वलित होऊन आमचे पाप नाहींसे करो. ॥ ६ ॥


द्विषो॑ नो विश्वतोमु॒खाति॑ ना॒वेव॑ पारय ॥ अप॑ नः॒ शोशु॑चद॒घम् ॥ ७ ॥

द्विषः नः विश्वतःऽमुख अति नावाऽइव पारय ॥ अप नः शोशुचत् अघम् ॥ ७ ॥

चारी दिशांकडे ज्याचें सुंदर मुख दिसत असतें अशा हे अग्निदेवा, नौकेंत बसवून नेल्याप्रमाणें आमच्या शत्रूंच्या पलिकडे आम्हांस घेऊन जा. हा अग्नि प्रज्वलित होऊन आमचे पाप नाहींसे करो. ॥ ७ ॥


स नः॒ सिंधु॑मिव ना॒वयाति॑ पर्षा स्व॒स्तये॑ ॥ अप॑ नः॒ शोशु॑चद॒घम् ॥ ८ ॥

सः नः सिंधुंऽइव नावया अति पर्षा स्वस्तये ॥ अप नः शोशुचत् अघम् ॥ ८ ॥

नौकेंत बसवून समुद्राच्या पार नेल्याप्रमाणें आमच्या स्वास्थ्याकरितां आम्हांस संकटांतून बचावून ने. हा अग्नि प्रज्वलित होऊन आमचे पाप नाहींसे करो. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ९८ ( अग्नि सूक्त )

ऋषि - कुत्स अंगिरस : देवता - वैश्वानर अग्नि : छंद - त्रिष्टुभ्


वै॒श्वा॒न॒रस्य॑ सुम॒तौ स्या॑म॒ राजा॒ हि कं॒ भुव॑नानामभि॒श्रीः ॥
इ॒तो जा॒तो विश्व॑मि॒दं वि च॑ष्टे वैश्वान॒रो य॑तते॒ सूर्ये॑ण ॥ १ ॥

वैश्वानरस्य सुऽमतौ स्याम राजा हि कं भुवनानां अभिऽश्रीः ॥
इतः जातः विश्वं इदं वि चष्टे वैश्वानरः यतते सूर्येण ॥ १ ॥

अखिल मानवांविषयीं प्रेमबुद्धि बाळगणार्‍या ह्या अग्नीच्या कृपादृष्टीखाली आम्हीं राहूं. हा राजा कोणाचे रक्षण करीत असतो बरें ? हा सर्व भुवनांचे भूषण आहे. येथेंच जन्म पावून हें सर्व विश्व तो अवलोकन करतो. अखिल मानवांविषयीं प्रेमबुद्धि बाळगणारा हा अग्नि सूर्याशीं स्पर्धा करीत असतो. ॥ १ ॥


पृ॒ष्टो दि॒वि पृ॒ष्टो अ॒ग्निः पृ॑थि॒व्यां पृ॒ष्टो विश्वा॒ ओष॑धी॒रा वि॑वेश ॥
वै॒श्वा॒न॒रः सह॑सा पृ॒ष्टो अ॒ग्निः स नो॒ दिवा॒ स रि॒षः पा॑तु॒ नक्त॑म् ॥ २ ॥

पृष्टः दिवि पृष्टः अग्निः पृथिव्यां पृष्टः विश्वाः ओषधीः आ विवेश ॥
वैश्वानरः सहसा पृष्टः अग्निः सः नः दिवा सः रिषः पातु नक्तम् ॥ २ ॥

द्युलोकांत ज्यास सर्व शोधीत असतात, व पृथ्वीवरही ज्याचा शोध करतात, अशा ह्या अग्नीनें सर्व ओषधींत प्रवेश केला. मानवाविषयीं प्रेमबुद्धि बाळगणार्‍या ह्या अग्नीस, तो बलवान असल्यामुळेंच सर्व शोधीत असतात. तो अग्निदेव दिवसां व रात्रीं आमचें दुष्ट लोकांपासून संरक्षण करो. ॥ २ ॥


वैश्वा॑नर॒ तव॒ तत्स॒त्यम॑स्त्व॒स्मान्‍रायो॑ म॒घवा॑नः सचन्ताम् ॥
तन्नो॑ मि॒त्रो वरु॑णो मामहन्ता॒मदि॑तिः॒ सिंधुः॑ पृथि॒वी उ॒त द्यौः ॥ ३ ॥

वैश्वानर तव तत् सत्यं अस्तु अस्मान् रायः मघऽवानः सचंताम् ॥
तन् नः मित्रः वरुणः मामहंतां अदितिः सिंधुः पृथिवी उत द्यौः ॥ ३ ॥

सर्व मानवाविषयीं स्नेह बुद्धि बाळगणार्‍या हे अग्निदेवा, तें तुझें सत्य निरंतर तुझे जवळ असो. विपुल संपत्ति आमचेकडे येऊन प्राप्त होवो. ह्या आमच्या प्रार्थनेस मित्र व वरुण आणि त्याचप्रमाणें अदिति, सिंदु, पृथिवी, व द्युलोक ह्यांचेही अनुमोदन असो. ॥ ३ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ९९ ( सूक्त )

ऋषि - कश्यप मारीच : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्


जा॒तवे॑दसे सुनवाम॒ सोम॑मरातीय॒तो नि द॑हाति॒ वेदः॑ ॥
स नः॑ पर्ष॒दति॑ दु॒र्गाणि॒ विश्वा॑ ना॒वेव॒ सिंधुं॑ दुरि॒तात्य॒ग्निः ॥ १ ॥

जातऽवेदसे सुनवाम सोमं अरातिऽयतः नि दहाति वेदः ॥
सः नः पर्षत् अति दुःऽगाणि विश्वा नावाऽइव सिंधुं दुःऽइता अति अग्निः ॥ १ ॥

चला, ह्या सर्वज्ञ अग्नीच्या सन्मानार्थ आपण सोमरस काढून ठेवूं या. आमच्याविषयीं शत्रुत्व आचरणार्‍या मनुष्यांचे धन हा दग्ध करून टाकतो. जहाजात बसवून समुद्राच्या पार नेल्याप्रमाणें हा अग्नि सर्व संकटें व दुरितें ह्यांतून आम्हांस निभावून नेवो. ॥ १ ॥


ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त १०० ( इंद्र सूक्त )

ऋषि - ऋज्राश्व वार्षागिर : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


स यो वृषा॒ वृष्ण्ये॑भिः॒ समो॑का म॒हो दि॒वः पृ॑थि॒व्याश्च॑ स॒म्राट् ॥
स॒ती॒नस॑त्वा॒ हव्यो॒ भरे॑षु म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ १ ॥

सः यः वृषा वृष्ण्येभिः संऽओका महः दिवः पृथिव्याः च संऽराट् ॥
सतीनऽसत्वा हव्यः भरेषु मरुत्वान् नः भवतु इंद्रः ऊती ॥ १ ॥

तो बलवान इंद्र - कीं जो दुसर्‍या अनेक वीर्यशाली देवतांसहवर्तमान वास करतो, जो ह्या विस्तीर्ण द्युलोकाचा व पृथ्वीचा अधिपती आहे, ज्याच्या बलाचें अस्तित्व खरोखर अनुभवास येण्याजोगें आहे व सोमरस सिद्ध झाल्याबरोबर जो हवींनी संतुष्ट करण्यास सर्वथैव योग्य आहे, तो इंद्र मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ १ ॥


यस्याना॑प्तः॒ सूर्य॑स्येव॒ यामो॒ भरे॑भरे वृत्र॒हा शुष्मो॒ अस्ति॑ ॥
वृष॑न्तमः॒ सखि॑भिः॒ स्वेभि॒रेवै॑र्म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ २ ॥

यस्य अनाप्तः सूर्यस्यऽइव यामः भरेऽभरे वृत्रऽहा शुष्मः अस्ति ॥
वृषन्ऽतमः सखिऽभिः स्वेभिः एवैः मरुत्वान् नः भवतु इंद्र ऊती ॥ २ ॥

तो इंद्र, - कीं ज्याचा मार्ग सूर्याच्या मार्गाप्रमाणें अप्रतिहत आहे, जेव्हां जेव्हां सोमरस सिद्ध होतो तेव्हां तेव्हां ज्या वृत्रघातक इंद्राची पराक्रमाकडे प्रवृत्ति होते, व स्वमित्रांचे साहाय्य असल्यामुळें जो अत्यंत सामर्थ्यवान झालेला आहे - तो इंद्र, मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून आपली वाट चालत येथें प्राप्त होवो. ॥ २ ॥


दि॒वो न यस्य॒ रेत॑सो॒ दुघा॑नाः॒ पन्था॑सो॒ यन्ति॒ शव॒साप॑रीताः ॥
त॒रद्द्वे॑षाः सास॒हिः पौंस्ये॑भिर्म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ ३ ॥

दिवः न यस्य रेतसः दुघानाः पंथासः यंति शवसा अपरिऽइताः ॥
तरत्ऽद्वेषाः ससहिः पौंस्येभिः मरुत्वान् नः भवतु इंद्र ऊती ॥ ३ ॥

सामर्थ्यामुळे अप्रतिहत झालेले ज्याचे मार्ग, द्युलोकांतील उदकाचें जणूं कांही दोहनच करीत, पुढें सुरू असतात, जो आपल्या शत्रूंतून सहज निभावून निघून जातो व जो आपल्या पराक्रमांमुळें सर्वत्र विजयी झालेला आहे - तो इंद्र, मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ ३ ॥


सो अङ्गि॑यरोभि॒रङ्गि॑ंरस्तमो भू॒द्वृषा॒ वृष॑भिः॒ सखि॑भिः॒ सखा॒ सन् ॥
ऋ॒ग्मिभि॑रृ॒ग्मी गा॒तुभि॒र्ज्येष्ठो॑ म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ ४ ॥

सः अङ्गिखरःऽभिः अङ्गिुरःऽतमः भूत् वृषा वृषऽभिः सखिऽभिः सखा सन् ॥
ऋग्मिऽभिः ऋग्मी गातुऽभिः ज्येष्ठः मरुत्वान् नः भवतु इंद्रः ऊती ॥ ४ ॥

आपल्या मित्रांशी मित्र होऊन वागणारा व पराक्रमी पुरुषांत पराक्रमी म्हणून गाजणारा जो इंद्र, तो सर्व अंगिरसांतील श्रेष्ठ अंगिरस झाला. स्तवनार्ह देवतांत जो अत्यंत स्तवनार्ह ठरला आहे व स्तवनाच्या योगानें ज्याचें माहत्म्य प्रस्थापित झालें आहे असा तो इंद्र, मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ ४ ॥


स सू॒नुभि॒र्न रु॒द्रेभि॒र्‌ऋभ्वा॑ नृ॒षाह्ये॑ सास॒ह्वाँ अ॒मित्रा॑न् ॥
सनी॑ळेभिः श्रव॒स्यानि॒ तूर्व॑न्म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ ५ ॥

सः सूनुऽभिः न रुद्रेभिः ऋभ्वा नृऽसह्ये ससह्वान् अमित्रान् ॥
सऽनीळेभिः श्रवस्यानि तूर्वन् मरुत्वान् नः भवतु इंद्रः ऊती ॥ ५ ॥

युद्धांत आपल्या द्वेष्ट्यांस जिंकणारा हा इंद्र, जणूं कांही पुत्राच्याच साहाय्याप्रमाणें रुद्रांचे साहाय्य मिळाल्यामुळें अतिशय श्रेष्ठतेस चढला. आपल्या बरोबरच निवास करणारे जे देव त्यांच्यासह कीर्तिप्रद पराक्रम करीत हा इंद्र, मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ ५ ॥


स म॑न्यु॒मीः स॒मद॑नस्य क॒र्तास्माके॑भि॒र्नृभिः॒ सूर्यं॑ सनत् ॥
अ॒स्मिन्नह॒न्सत्प॑तिः पुरुहू॒तो म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ ६ ॥

सः मन्युऽमीः सऽमदनस्य कर्ता अस्माकेभिः नृऽभिः सूर्यं सनत् ॥
अस्मिन् अहन् सत्ऽपतिः पुरुऽहूतः मरुत्वान् नः भवतु इंद्र ऊती ॥ ६ ॥

शत्रूच्या क्रोधाची धुंदी उतरविणार्‍या व अनेक युद्धें करणार्‍या ह्या इंद्रानें आमच्या शूर पुरुषांचे साहाय्य घेऊन सूर्याचा शोध लावला. ज्यास अनेक भक्तजन नेहमीं बोलावीत असतात व जो सज्जनांचा प्रतिपालक आहे असा तो इंद्र आज, मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ ६ ॥


तमू॒तयो॑ रणय॒ञ्छूर॑सातौ॒ तं क्षेम॑स्य क्षि॒तयः॑ कृण्वत॒ त्राम् ॥
स विश्व॑स्य क॒रुण॑स्येश॒ एको॑ म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ ७ ॥

तं ऊतयः रणयन् शूरऽसातौ तं क्षेमस्य क्षितयः कृण्वत त्राम् ॥
सः विश्वस्य करुणस्य ईश एकः मरुत्वान् नः भवतु इंद्र ऊती ॥ ७ ॥

शूर लोक जेथें धनप्राप्त्यर्थ युद्ध करीत असतात अशा प्रसंगी त्यास त्याच्या स्वतःच्या सामर्थ्यानेंच उत्साह उत्पन्न केला. सर्व मनुष्यांनी ह्यासच आपल्या कल्याणाचा जबाबदार केले आहे. ह्या जगांतील अखिल सत्कृत्यांचा हाच एकटा अधिपति आहे. ह्यास्तव हा इंद्र, मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ ७ ॥


तम॑प्सन्त॒ शव॑स उत्स॒वेषु॒ नरो॒ नर॒मव॑से॒ तं धना॑य ॥
सो अ॒न्धे चि॒त्तम॑सि॒ ज्योति॑र्विदन्म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ ८ ॥

तं अप्संत शवसः उत्ऽसवेषु नरः नरं अवसे तं धनाय ॥
सः अंधे चित् तमसि ज्योतिः विदन् मरुत्वान् नः भवतु इंद्रः ऊती ॥ ८ ॥

आनंदोत्सवाचे समयीं त्यास नवीन स्फुरण चढत असे व स्वसंरक्षण व धनप्राप्ति ह्यांची इच्छा धरून शूर पुरुष ह्या पराक्रमी देवाचा आश्रय करीत असत. अत्यंत निबिड असा अंधकार पडला असतांही त्यांतून ह्यानें तेजाची प्राप्ति करून घेतली. ह्यास्तव हा इंद्र मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ ८ ॥


स स॒व्येन॑ यमति॒ व्राध॑तश्चि॒त्स द॑क्षि॒णे संगृ॑भीता कृ॒तानि॑ ॥
स की॒रिणा॑ चि॒त्सनि॑ता॒ धना॑नि म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ ९ ॥

सः सव्येन यमति व्राधतः चित् सः दक्षिणे संऽगृभीता कृतानि ॥
सः कीरिणा चित् सनिता धनानि मरुत्वान् नः भवतु इंद्रः ऊती ॥ ९ ॥

आपल्या डाव्या हातानें बलिष्ठांचेही नियमन करतो आणि हरण केलेलें धन तो उजव्या हातांत धारण करतो. स्तवन करणार्‍या उपासकानें विनविलें असतांही हा धनाची प्राप्ति करून घेतो. असा हा इंद्र, मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ ९ ॥


स ग्रामे॑भिः॒ सनि॑ता॒ स रथे॑भिर्वि॒दे विश्वा॑भिः कृ॒ष्टिभि॒र्न्वद्य ॥
स पौंस्ये॑भिरभि॒भूरश॑स्तीर्म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ १० ॥

सः ग्रामेभिः सनिता सः रथेभिः विदे विश्वाभिः कृष्टिऽभिः नु अद्य ॥
सः पौंस्येभिः अभिऽभूः अशस्तीः मरुत्वान् नः भवतु इंद्रः ऊती ॥ १० ॥

सैनिकांच्या समुदायाच्या व रथांच्या योगानें हा धन जिंकून आणतो. सर्व मानवांस तो आज विदित झाला आहे. आपली स्तुति न करणार्‍या दुष्टांचा तो आपल्या सामर्त्यानें पराभव करतो. असा हा इंद्र, मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ १० ॥


स जा॒मिभि॒र्यत्स॒मजा॑ति मी॒ळ्हेऽ॑जामिभिर्वा पुरुहू॒त एवैः॑ ॥
अ॒पां तो॒कस्य॒ तन॑यस्य जे॒षे म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ ११ ॥

सः जामिऽभिः यत् संऽअजाति मीळ्हे अजामिऽभिः वा पुरुऽहूत एवैः ॥
अपां तोकस्य तनयस्य जेषे मरुत्वान् नः भवतु इंद्रः ऊती ॥ ११ ॥

अनेक भक्तांनी ज्यास पाचारण केलें आहे असा हा इंद्र, आपले आप्त अथवा अनाप्त ह्यांनी बोलाविल्यावरून जेव्हां युद्धाकडे शीघ्र गतीनें गमन करतो तेव्हां, उदक, पुत्र, व पौत्र ह्यांची आम्हांस प्राप्ति करून देण्याकरितां तो मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ ११ ॥


स व॑ज्र॒भृद्द॑स्यु॒हा भी॒म उ॒ग्रः स॒हस्र॑चेताः श॒तनी॑थ॒ ऋभ्वा॑ ॥
च॒म्री॒षो न शव॑सा॒ पाञ्च॑जन्यो म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ १२ ॥

सः वज्रऽभृत् दस्युऽहा भीमः उग्रः सहस्रऽचेताः शतऽनीथः ऋभ्वा ॥
चम्रीषः न शवसा पांचऽजन्यः मरुत्वान् नः भवतु इंद्रः ऊती ॥ १२ ॥

हा वज्र धारण करणारा आहे, हा शत्रूचा नाश करणारा आहे, हा भितीप्रद, उग्र, सहस्र प्रज्ञांनी युक्त, शतावधि सैनिकांचा नायक व सामर्थ्यवान आहे. उत्साहीपणांत हा सोमरसासारखा आहे व पांचही मानवसमाजांचा हा संरक्षणकर्ता आहे. हा इंद्र, मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ १२ ॥


तस्य॒ वज्रः॑ क्रन्दति॒ स्मत्स्व॒र्षा दि॒वो न त्वे॒षो र॒वथः॒ शिमी॑वान् ॥
तं स॑चन्ते स॒नय॒स्तं धना॑नि म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ १३ ॥

तस्य वज्रः क्रंदति स्मत् स्वःऽसाः दिवः न त्वेषः रवथः शिमीऽवान् ॥
तं सचंते सनयः तं धनानि मरुत्वान् नः भवतु इंद्रः ऊती ॥ १३ ॥

द्युलोकाच्या प्रबल व त्वेषाच्या गर्जनेप्रमाणें ह्याचें वज्र स्वर्गोलोकांसही गवसणी घालून जोरानें गर्जना करतें. अनेक प्रकारचे लाभ व संपत्ति त्याचेकडे चालत येत असतात. हा इंद्र, मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ १३ ॥


यस्याज॑स्रं॒ शव॑सा॒ मान॑मु॒क्थं प॑रिभु॒जद्रोद॑सी वि॒श्वतः॑ सीम् ॥
स पा॑रिष॒त्क्रतु॑भिर्मन्दसा॒नो म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ १४ ॥

यस्य अजस्रं शवसा मानं उक्थं परिऽभुजत् रोदसी इति विश्वतः सीम् ॥
सः पारिषत् क्रतुऽभिः मंदसानः मरुत्वान् नः भवतु इंद्रः ऊती ॥ १४ ॥

ज्याच्या सामर्थ्यामुळें त्याचे माहात्म व कीर्ति हीं द्युलोक व भूलोक ह्यांना सर्वत्र व सतत वेष्टून टाकतात तो इंद्र, आमच्या अर्चनांनी संतुष्ट होऊन आम्हांस संकटांतून पलिकडे घेऊन जावो. हा इंद्र, मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ १४ ॥


न यस्य॑ दे॒वा दे॒वता॒ न मर्ता॒ आप॑श्च॒न शव॑सो॒ अन्त॑मा॒पुः ॥
स प्र॒रिक्वा॒ त्वक्ष॑सा॒ क्ष्मो दि॒वश्च॑ म॒रुत्वा॑न्नो भव॒त्विंद्र॑ ऊ॒ती ॥ १५ ॥

न यस्य देवाः देवता न मर्ताः आपः चन शवसः अंतं आपुः ॥
सः प्रऽरिक्वा त्वक्षसा क्ष्मः दिवः च मरुत्वान् नः भवतु इंद्र ऊती ॥ १५ ॥

ज्याच्या सामर्थ्याचा अंत, देव, देवता, मर्त्य, अथवा उदकें ह्यांपैकी कोणासही लागला नाहीं तो इंद्र, आपल्या बलानें द्युलोक व भूलोक ह्यांचे आक्रमण करणारा तो इंद्र, मरुतांसहवर्तमान, आमचें संरक्षण करण्याची इच्छा धारण करून येथें येवो. ॥ १५ ॥


रो॒हिच्छ्या॒वा सु॒मदं॑शुर्लला॒मीर्द्यु॒क्षा रा॒य ऋ॒ज्राश्व॑स्य ॥
वृष॑ण्वन्तं॒ बिभ्र॑ती धू॒र्षु रथं॑ म॒न्द्रा चि॑केत॒ नाहु॑षीषु वि॒क्षु ॥ १६ ॥

रोहित् श्यावा सुमत्ऽअंशुः ललामीः द्युक्षा राये ऋज्रऽअश्वस्य ॥
वृषण्ऽवंतं बिभ्रती धूःऽसु रथं मंद्रा चिकेत नाहुषीषु विक्षु ॥ १६ ॥

हा समर्थ्यवान देव आपल्या रथांत विराजमान झाला असतांना त्याच्या रथाचें जूं वाहून नेणारी किंचित् रक्तवर्ण व किंचित् श्यामवर्ण अशी त्याची द्युलोकांत निवास करणारी देदीप्यमान व सुंदर तुरगी ऋज्राश्वास संपत्ति अर्पण करण्याकरितां मानवसमुदायांतून आनंदानें येत असतांना दिसत आहे. ॥ १६ ॥


ए॒तत्त्यत्त॑ इंद्र॒ वृष्ण॑ उ॒क्थं वा॑र्षागि॒रा अ॒भि गृ॑णन्ति॒ राधः॑ ॥
ऋ॒ज्राश्वः॒ प्रष्टि॑भिरम्ब॒रीषः॑ स॒हदे॑वो॒ भय॑मानः सु॒राधाः॑ ॥ १७ ॥

एतत् त्यत् ते इंद्र वृष्ण उक्थं वार्षागिराः अभि गृणंति राधः ॥
ऋज्रऽअश्वः प्रष्टिऽभिः अम्बरीषः सहऽदेवः भयमानः सुऽराधाः ॥ १७ ॥

हे इंद्रा, ऋज्राश्व, अम्बरीष, सहदेव, भयमान आणि सुराधा हे वृषागिराचे पुत्र आपआपल्या मित्रगणांसह, सामर्थ्यवान असा जो तूं, त्या तुझ्या सन्मानार्थ हें तुझें आनंददायक स्तोत्र गात आहे. ॥ १७ ॥


दस्यू॒ञ्छिम्यूं॑श्च पुरुहू॒त एवै॑र्ह॒त्वा पृ॑थि॒व्यां शर्वा॒ नि ब॑र्हीत् ॥
सन॒त्क्षेत्रं॒ सखि॑भिः श्वि॒त्न्ये॒भिः॒ सन॒त्सूर्यं॒ सन॑द॒पः सु॒वज्रः॑ ॥ १८ ॥

दस्यून् शिम्यून् च पुरुऽहूतः एवैः हत्वा पृथिव्यां शर्वा नि बर्हीत् ॥
सनत् क्षेत्रं सखिऽभिः श्वित्न्येंभिः सनत् सूर्यं सनत् अपः सुऽवज्रः ॥ १८ ॥

ज्याचा अनेक भक्तजन धांवा करीत असतात अशा त्या इंद्रानें पृथ्वीवर दुष्ट लोक व पीडा देणारे शत्रु ह्यांचे क्रमाक्रमानें हनन करून टाकलें. त्या वज्रधारी देवानें आपल्या तेजस्वी मित्रांच्या साहाय्यानें भूमीची प्राप्ति करून घेतली, सूर्याचा शोध लावला, व उदकांस उपलब्ध केलें. ॥ १८ ॥


वि॒श्वाहेन्द्रो॑ अधिव॒क्ता नो॑ अ॒स्त्वप॑रिह्वृताः सनुयाम॒ वाज॑म् ॥
तन्नो॑ मि॒त्रो वरु॑णो मामहन्ता॒मदि॑तिः॒ सिंधुः॑ पृथि॒वी उ॒त द्यौः ॥ १९ ॥

विश्वाहा इंद्रः अधिऽवक्ता नः अस्तु अपरिऽह्वृताः सनुयाम वाजम् ॥
तन् नः मित्रः वरुणः मामहंतां अदितिः सिंधुः पृथिवी उत द्यौः ॥ १९ ॥

इंद्र आम्हांस नेहमीं मंगल आशीर्वचनें देणारा असो. ह्यायोगानें मार्गांत कोणतेंही विघ्न न येतां खरोखर आम्हांस सामर्थ्याची प्राप्ति होईल. ह्या आमच्या विनंतीस मित्र, वरुण, व त्याचप्रमाणें अदिति, सिंधु, पृथिवी व द्युलोक ह्यांचेंही अनुमोदन असो. ॥ १९ ॥


ॐ तत् सत्


GO TOP