PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ६१ ते ७०

ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ६१ ( संपात सूक्त )

ऋषि - नोधस् गौतम : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


अ॒स्मा इदु॒ प्र त॒वसे॑ तु॒राय॒ प्रयो॒ न ह॑र्मि॒ स्तोमं॒ माहि॑नाय ॥
ऋची॑षमा॒याध्रि॑गव॒ ओह॒म् इन्द्रा॑य॒ ब्रह्मा॑णि रा॒तत॑मा ॥ १ ॥

अस्मै इत् ऊं इति प्र तवसे तुराय प्रयः न हर्मि स्तोमं माहिनाय ॥
ऋचीषमाय अध्रिऽगवे ओहं इंद्राय ब्रह्माणि रातऽतमा ॥ १ ॥

प्रबल, त्वरावान् व श्रेष्ठ अशा ह्या इंद्रास उद्देशूनच मी हा हवि व त्याचप्रमाणे हें स्तवन अर्पण करतो. मी त्या स्तवनार्ह आणि निर्बाध रीतीनें संचार करणार्‍या इंद्रास अनुलक्षून अशा स्तुति गातो कीं जी त्यास अर्पण करण्यास योग्य आहे व अशी स्तोत्रें कीं जी आजपर्यंत त्याचे सन्मानार्थ केलेल्या स्तोत्रांत उत्कृष्ट आहेत. ॥ १ ॥


अ॒स्मा इदु॒ प्रय॑ इव॒ प्र यं॑सि॒ भरा॑म्य् आङ्‍गू॒षं बाधे॑ सुवृ॒क्ति ॥
इन्द्रा॑य हृ॒दा मन॑सा मनी॒षा प्र॒त्नाय॒ पत्ये॒ धियो॑ मर्जयन्त ॥ २ ॥

अस्मै इत् ऊं इति प्रयःऽइव प्र यंसि भरामि अंगुषं बाधे सुऽवृक्ति ॥
इंद्राय हृदा मनसा मनीषा प्रत्नाय पत्ये धियः मर्जयंत ॥ २ ॥

खरोखर ह्या देवास मी जणूं कांही हविच अर्पण करीत आहे, ह्या शत्रू विनाशक देवास मी एक सुंदर स्तवन अर्पण करतो. इंद्र हा जो ह्या विश्वाचा पुरातन प्रभु त्याचे प्रित्यर्थ विद्वान् उपासकांनी आपले अंतःकरण, मन, बुद्धि खर्च करून अनेक स्तोत्रें गाइलेली आहेत. ॥ २ ॥


अ॒स्मा इदु॒ त्यमु॑प॒मं स्व॒र्षां भरा॑म्याङ्‍गू॒षमा॒स्येन ॥
मंहि॑ष्ठ॒मच्छो॑क्तिभिर्मती॒नां सु॑वृ॒क्तिभिः॑ सू॒रिं वा॑वृ॒धध्यै॑ ॥ ३ ॥

अस्मै इत् ऊं इति त्यं उपऽमं स्वःऽसां भरामि आङ्‍गूषं आस्येन ॥
मंहिष्ठं अच्छोक्तिऽभिः मतीनां सुवृक्तिऽभिः सूरिं ववृधध्यै ॥ ३ ॥

खरोखर ज्याची उपमा दुसर्‍या स्तोत्रांस देण्यांत यावी व जें प्रकाशाचा लाभ करून देणारें आहे असें स्तोत्र मी त्या इंद्रा प्रित्यर्थ गात आहे. त्या अत्यंत उदार व प्रज्ञाशाली देवाचें माहात्म्य माझ्या मनाजोग्या सुंदर स्तुतींनी वर्णन करण्याचा माझा हेतु आहे. ॥ ३ ॥


अ॒स्मा इदु॒ स्तोमं॒ सं हि॑नोमि॒ रथं॒ न तष्टे॑व॒ तत्सि॑नाय ॥
गिर॑श्च॒ गिर्वा॑हसे सुवृ॒क्तीन्द्रा॑य विश्वमि॒न्वं मेधि॑राय ॥ ४ ॥

अस्मै इत् ऊं इति स्तोमं सं हिनोमि रथं न तष्टाऽइव तत्ऽसिनाय ॥
गिरः च गिर्वाहसे सुऽवृक्ति इंद्राय विश्वंऽइन्वं मेधिराय ॥ ४ ॥

ज्या मनुष्याला रथाची गरज असते त्याचेकडे ज्याप्रमाणे एखादा सुतार रथ तयार करून पाठवितो त्याप्रमाणे खरोखर ह्या इंद्राकडे मी आपली स्तुति पाठवीत आहे. त्याचप्रमाणे सुंदर सुंदर स्तवनें व ज्याचा सर्वत्र स्वीकार केला जाईल असें एक स्तोत्र ही भक्तांच्या स्तवनांचा स्वीकार करणार्‍या ह्या इंद्राकडे मी पाठवून देतो. ॥ ४ ॥


अ॒स्मा इदु॒ सप्ति॑मिव श्रव॒स्येन्द्रा॑या॒र्कं जु॒ह्वा३॑सम॑ञ्जे ॥
वी॒रं दा॒नौक॑सं व॒न्दध्यै॑ पु॒रां गू॒र्तश्र॑वसं द॒र्माण॑म् ॥ ५ ॥

अस्मै इत् ऊं इति सप्तिंऽइव श्रवस्या इंद्राय अर्कं जुह्वा सं अञ्जे ॥
वीरं दानऽओकसं वंदध्यै पुरां गूर्तऽश्रवसं दर्माणम् ॥ ५ ॥

एखाद्या अश्वास ज्याप्रमाणें सजवून तयार करतात त्याप्रमाणें खरोखर मी कीर्ति प्राप्त करून घेण्याची इच्छा धरून, स्ववाणीनें इंद्राप्रित्यर्थ एक स्तोत्र नीटनेटकें सजवीत आहे. त्या योगानें वीर्यशाली, सर्व दानशूरतेचे आगर, शत्रूंच्या पुरांचा विध्वंस करणारा व ज्याची कीर्ति सर्वत्र गात असतात अशा इंद्रास माझी प्रणीत अर्पण करावी अशी माझी इच्छा आहे. ॥ ५ ॥


अ॒स्मा इदु॒ त्वष्टा॑ तक्ष॒द्वज्रं॒ स्वप॑स्तमं स्व॒र्यं१॑रणा॑य ॥
वृ॒त्रस्य॑ चिद्वि॒दद्येन॒ मर्म॑ तु॒जन्नीशा॑नस्तुज॒ता कि॑ये॒धाः ॥ ६ ॥

अस्मै इत् ऊं इति त्वष्टा तक्षत् वज्रं स्वपऽतमं स्वर्यं रणाय ॥
वृत्रस्य चित् विदत् येन मर्म तुजन् ईशानः तुजता कियेधाः ॥ ६ ॥

शत्रूवर प्रहार करणार्‍या ज्या वज्राने शत्रूंचा संहार करीत ह्या बलशाली विश्वाधिपतीनें वृत्राच्या मर्माशीच गांठ घातली तें उज्ज्वल व वधकर्मास अत्यंत उपयोगी असें वज्र खरोखर ह्या इंद्राप्रित्यर्थच त्वष्टा देवानें तयार करून दिलें. ॥ ६ ॥


अ॒स्येदु॑ मा॒तुः सव॑नेषु स॒द्यो म॒हः पि॒तुं प॑पि॒वाञ्चार्वन्ना॑ ॥
मु॒षा॒यद्विष्णुः॑ पच॒तं सही॑या॒न्विध्य॑द्वरा॒हं ति॒रो अद्रि॒मस्ता॑ ॥ ७ ॥

अस्य इत् ऊं इति मातुः सवनेषु सद्यः महः पितुं पपिऽवान् चारु अन्ना ॥
मुषायत् विष्णु पचतं सहीयान् विध्यत् वराहं तिरः अद्रिं अस्ता ॥ ७ ॥

खरोखर ह्याच्या मातेनें केलेल्या यागांतच ह्याने एकदम उत्कृष्ट पेय प्राशन केले व हवींचा उत्कृष्ट आस्वाद घेतला. बलवान् विष्णूनेंही ह्याचेकरितां ज्यांची पाकसिद्धि उत्तम झाली होती असे हवि हरण करून आणले. त्यांचे भक्षण करून अस्त्रविद्येंत प्रवीण असलेल्या देवानें, त्या डुकराच्या अंगावर वज्र तिरपें करून फेंकून त्याचा देह छिन्नविच्छिन्न करून टाकला. ॥ ७ ॥


अ॒स्मा इदु॒ ग्नाश्चि॑द्दे॒वप॑त्नी॒रिन्द्रा॑या॒र्कम॑हि॒हत्य॑ ऊवुः ॥
परि॒ द्यावा॑पृथि॒वी ज॑भ्र उ॒र्वी नास्य॒ ते म॑हि॒मानं॒ परि॑ ष्टः ॥ ८ ॥

अस्मै इत् ऊं इति ग्नाः चित् देवऽपत्नीः इंद्राय अर्कं अहिहत्ये ऊवुरित्यूवुः ॥
परि द्यावापृथिवी इति जभ्रे उर्वी इति न अस्य ते इति महिमानं परि स्त‍इतिस्तः ॥ ८ ॥

अहीचा वध करणार्‍या ह्या इंद्राप्रित्यर्थच स्त्रियांनीही (खुद्द देवांच्या पत्नींनी) एक सुंदर स्तोत्र गुंफले. विस्तीर्ण असे जे द्युलोक व भूलोक ह्यांचे त्याने आकलन केलें आहे. परंतु ह्याचा महिमा आकलन करण्याचें सामर्थ्य मात्र त्यांच्या अंगांत नाही. ॥ ८ ॥


अ॒स्येदे॒व प्र रि॑रिचे महि॒त्वं दि॒वस्पृ॑थि॒व्याः पर्य॒न्तरि॑क्षात् ॥
स्व॒राळिन्द्रो॒ दम॒ आ वि॒श्वगू॑र्तः स्व॒रिरम॑त्रो ववक्षे॒ रणा॑य ॥ ९ ॥

अस्य इत् एव प्र रिरिचे महिऽत्वं दिवः पृथिव्याः परि अंतरिक्षात् ॥
स्वराट् इंद्रः दमे आ विश्वऽगूर्तः सुऽअरिः अमत्रः ववक्षे रणाय ॥ ९ ॥

खरोखर ह्याचा महिमा द्युलोक, भूलोक व अंतरिक्ष ह्या सर्वांहूनही अधिक आहे. स्वतेजानें विराजमान होणार्‍या इंद्राचे घरोघरी स्तवन होत असते. हा समर्थ्यवान् इंद्र शत्रूंशी लढण्याकरितां उच्च घोष करून एकदम वृद्धिंगत झाला होता. ॥ ९ ॥


अ॒स्येदे॒व शव॑सा शु॒षन्तं॒ वि वृ॑श्च॒द्वज्रे॑ण वृ॒त्रमिन्द्रः॑ ॥
गा न व्रा॒णा अ॒वनी॑रमुञ्चद॒भि श्रवो॑ दा॒वने॒ सचे॑ताः ॥ १० ॥

अस्य इत् एव शवसा शुषंतं वि वृश्चत् वज्रेण वृत्रं इंद्रः ॥
गाः न व्राणाः अवनीः अमुञ्चत् अभि श्रवः दावने सऽचेताः ॥ १० ॥

जगताचे शोषण करणार्‍या वृत्रास इंद्रानें स्वसामर्थ्यानें वज्र घेऊन छिन्नविच्छिन करून टाकले. आपल्या कीर्तिचा प्रसार करण्याकरिता दानकर्माकडे मनाची प्रवृत्ति असलेल्या ह्या इंद्रानें धेनूप्रमाणें प्रतिबंधांत पडलेल्या जलप्रवाहांना वाट मोकळी करून दिली. ॥ १० ॥


अ॒स्येदु॑ त्वे॒षसा॑ रन्त॒ सिन्ध॑वः॒ परि॒ यद्वज्रे॑ण सी॒मय॑च्छत् ॥
ई॒शा॒न॒कृद्दा॒शुषे॑ दश॒स्यन्तु॒र्वीत॑ये गा॒धं तु॒र्वणिः॑ कः ॥ ११ ॥

अस्य इत् ऊं इति त्वेषसा रंत सिंधवः परि यत् वज्रेण सीं अयच्छत् ॥
ईशानऽकृत् दाशुषे दशस्यन् तुर्वीतये गाधं तुर्वणिः करितिकः ॥ ११ ॥

ज्यावेळी आपल्या वज्रानें त्या वृत्रास जिंकले त्यावेळी हा त्याच्याच सामर्थ्याचा प्रताप, कीं नद्या आनंदानें बागडूं लागल्या. सर्व विश्वावर अधिपत्य स्थापन करणारा, हवि अर्पण करणार्‍या भक्ताविषयी दातृत्वबुद्धि धारण करणारा व शत्रूंचा संहार करणारा जो हा इंद्र त्यानेंच तुर्वीतीकरितां पाण्यास उतार पाडला. ॥ ११ ॥


अ॒स्मा इदु॒ प्र भ॑रा॒ तूतु॑जानो वृ॒त्राय॒ वज्र॒मीशा॑नः किये॒धाः ॥
गोर्न पर्व॒ वि र॑दा तिर॒श्चेष्य॒न्नर्णां॑स्य॒पां च॒रध्यै॑ ॥ १२ ॥

अस्मै इत् ऊं इति प्र भर तूतुजानः वृत्राय वज्रं ईशानः कियेधाः ॥
गोः न पर्व वि रद तिरश्चः इष्यन् अर्णांसि अपां चरध्यै ॥ १२ ॥

तूं जगताचा प्रभु व सामर्थ्यवान् आहेस म्हणून ह्या वृत्रावर नेम धरून सत्वर वज्र फेंक. उदकांचे प्रवाह पुन्हां वाहूं लागावे म्हणून त्यांच्यांत गति उत्पन्न करून ह्या वृत्राच्या शरीराच्या सांध्यासांध्यावर वार करून एखाद्या बैलाच्या देहाच्या सांध्याप्रमाणे त्यांचे विदारण करून टाक. ॥ १२ ॥


अ॒स्येदु॒ प्र ब्रू॑हि पू॒र्व्याणि॑ तु॒रस्य॒ कर्मा॑णि॒ नव्य॑ उ॒क्थैः ॥
यु॒धे यदि॑ष्णा॒न आयु॑धान्यृघा॒यमा॑णो निरि॒णाति॒ शत्रू॑न् ॥ १३ ॥

अस्य इत् ऊं इति प्र ब्रूहि पूर्व्याणि तुरस्य कर्माणि नव्यः उक्थैः ॥
युधे यत् इष्णानः आयुधानि ऋघायमाणः निऽरिणाति शत्रून् ॥ १३ ॥

खरोखर वेगाने शत्रूवर तुटून पडणार्‍या ह्या देवाचे पुरातन कालापासूनचे पराक्रम गाऊं लागा. स्तुतींच्या योगाने शरण जाण्यास हा योग्य आहे, कारण लढाई करण्यासाठीं आपली आयुधें सरसावून व शत्रूंना मारून तो त्यांचा नायनाट करून टाकतो. ॥ १३ ॥


अ॒स्येदु॑ भि॒या गि॒रय॑श्च दृ॒ळ्हा द्यावा॑ च॒ भूमा॑ ज॒नुष॑स्तुजेते ॥
उपो॑ वे॒नस्य॒ जोगु॑वान ओ॒णिं स॒द्यो भु॑वद्वी॒र्यायनो॒धाः ॥ १४ ॥

अस्य इत् ऊं इति भिया गिरयः च दृळ्हाः द्यावा च भूम जनुषः तुजेते इति॥
उपो इति वेनस्य जोगुवानः ओणिं सद्यः भुवत् वीर्याय नोधाः ॥ १४ ॥

खरोखर हा जगांत अवतीर्ण झाल्याबरोबर त्याच्या भितीनें अतिशय स्थिर असे प्रत्यक्ष पर्वत - एव्ढेंच काय पण भूलोक व द्युलोक ह्यांनाही कांपरें भरते. ह्या सुंदर देवाच्या भक्त संरक्षण सामर्थ्याची प्रशंसा करणारा नोधा ह्यास एकाएकी पुष्कळ पराक्रम करतां येऊं लागले. ॥ १४ ॥


अ॒स्मा इदु॒ त्यदनु॑ दाय्येषा॒मेको॒ यद्व॒व्ने भूरे॒रीशा॑नः ॥
प्रैत॑शं॒ सूर्ये॑ पस्पृधा॒नं सौव॑श्व्ये॒सुष्वि॑माव॒दिन्द्रः॑ ॥ १५ ॥

अस्मै इत् ऊं इति त्यत् अनु दायि एषां एकः यत् वव्ने भूरेः ईशानः ॥
प्र एतशं सूर्ये पस्पृधानं सौवश्व्ये सुस्विं आवत् इंद्रः ॥ १५ ॥

खरोखर, विपुल संपत्तिचा एकटाच मालक असा जो इंद्र त्यानें ह्या सकल वस्तूंपैकी जी जी वस्तू आपणास असावी अशी इच्छा केली ती ती त्यास अर्पण होत गेली. अश्वावर चांगला बसणारा कोण ह्याविषयी एतशाची सूर्याबरोबर जेव्हां स्पर्धा लागली तेव्हां एतशा हा इंद्राचा सोमरसाचे उत्तम हवि अर्पण करणारा भक्त असल्यामुळे, त्यानें एतशाचें रक्षण केलें. ॥ १५ ॥


ए॒वा ते॑ हारियोजना सुवृ॒क्तीन्द्र॒ ब्रह्मा॑णि॒ गोत॑मासो अक्रन् ॥
ऐषु॑ वि॒श्वपे॑शसं॒ धियं॑धाः प्रा॒तर्म॒क्षू धि॒याव॑सुर्जगम्यात् ॥ १६ ॥

एव ते हारिऽयोजन सुऽवृक्ति इंद्र ब्रह्माणि गोतमासः अक्रन् ॥
आ एषु विश्वपेशसं धियं धाः प्रातः मक्षू धियाऽवसु जगम्यात् ॥ १६ ॥

हे पीतवर्ण अश्वांवर आरोहण करणार्‍या इंद्रा, ह्याप्रमाणें गोतमांनी ही स्तोत्रें इतक्या सुरेख रीतीनें खरोखर तुझ्याच प्रित्यर्थ केली आहेत. ह्या स्तोत्रांवर तूं सर्व प्रकारानें कृपादृष्टी ठेव. स्तुतिस्तोत्रांच्या वैभवानें परिपूर्ण असा हा इंद्र आमचेकडे प्रातःकाली त्वरेनें आगमन करो. ॥ १६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ६२ ( इंद्र सूक्त )

ऋषि - नोधस् गौतम : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


प्र म॑न्महे शवसा॒नाय॑ शू॒षमा॑ङ्‍गू॒षं गिर्व॑णसे अङ्‍गिर॒स्वत् ॥
सु॒वृ॒क्तिभि॑ स्तुव॒त ऋ॑ग्मि॒यायार्चा॑मा॒र्कं नरे॒ विश्रु॑ताय ॥ १ ॥

प्र मन्महे शवसानाय शूषं आङ्‍गूषं गिर्वणसे अङ्‍गिरस्वत् ॥
सुवृक्तिऽभि स्तुवते ऋग्मियाय अर्चाम अर्कं नरे विऽश्रुताय ॥ १ ॥

सामर्थ्यवान् व स्तुतिप्रिय अशा इंद्राकरितां अंगिरसाप्रमाणें, एखादे जोरदार स्तोत्र आम्ही आठवून ठेवीत आहों. स्तुति करणार्‍या भक्तांस अत्यंत स्तवनीय, व अतिशय कीर्तिमान्, अशा त्या वीराचे सन्मानार्थ, सुंदर शब्दरचना करून, आपण स्तोत्र म्हणूं या. ॥ १ ॥


प्र वो॑ म॒हे महि॒ नमो॑ भरध्वमाङ्‍गू॒ष्यं शवसा॒नाय॒ साम॑ ॥
येना॑ नः॒ पूर्वे॑ पि॒तरः॑ पद॒ज्ञा अर्च॑न्तो॒ अङ्‍गि॑रसो॒ गा अवि॑न्दन् ॥ २ ॥

प्र वः महे महि नमः भरध्वं आङ्‍गूष्यं शवसानाय साम ॥
येन नः पूर्वे पितरः पदऽज्ञाः अर्चंतः अङ्‍गिरसः गाः अविंदन् ॥ २ ॥

दुसर्‍याची पावले ओळखून काढण्यांत तरबेज असणार्‍या अंगिरस नांवाच्या आमच्या भक्तिमान् अशा प्राचीन पूर्वजांना ज्याच्या कृपेमुळें धेनूंची प्राप्ति करून घेतां आली त्या श्रेष्ठ इंद्रास तुम्ही अत्यंत नम्रतेने वंदन करा, त्या सामर्थ्यवान् इंद्राप्रित्यर्थ तुम्ही स्तुतीनें परिपूर्ण असें एखादें गायन करा. ॥ २ ॥


इन्द्र॒स्याङ्‍गि॑रसां चे॒ष्टौ वि॒दत्स॒रमा॒ तन॑याय धा॒सिम् ॥
बृह॒स्पति॑र्भि॒नदद्रिं॑ वि॒दद्गाः समु॒स्रिया॑भिर्वावशन्त॒ नरः॑ ॥ ३ ॥

इंद्रस्य अंगिरसां च इष्टौ विदत् सरमा तनयाय धासिम् ॥
बृहस्पतिः भिनत् अद्रिं विदत् गाः सं उस्रियाभिः वावशंत नरः ॥ ३ ॥

इंद्र आणि अंगिरस ह्यांच्या इच्छेनें सरमेस आपल्या पुत्राकरितां उत्तम पेय मिळाले, बृहस्पतीनें पर्वत फोडला व गाईंची प्राप्ति करून घेतली आणि शूर लोकांनी घेनूंसह आनंदाच्या आरोळ्या ठोकल्या. ॥ ३ ॥


स सु॒ष्टुभा॒ स स्तु॒भा स॒प्त विप्रैः॑ स्व॒रेणाद्रिं॑ स्व॒र्यो३॑नव॑ग्वैः ॥
स॒र॒ण्युभिः॑ फलि॒गमि॑न्द्र शक्र व॒लं रवे॑ण दरयो॒ दश॑ग्वैः ॥ ४ ॥

सः सुऽस्तुभा सः स्तुभा सप्त विप्रैः स्वरेण अद्रिं स्वर्यः नवऽग्वैः ॥
सरण्युऽभिः फलिऽगं इंद्र शक्र वलं रवेण दरयः दशऽग्वैः ॥ ४ ॥

तूं तेजस्वी आहेस. तुला सप्त विप्रांनी व अत्यंत चपल अशा नवग्वांनी व दशग्वांनी स्तुतिस्तोत्रें व गीतें गाऊन प्रोत्साहन दिले तेव्हां, हे पराक्रमी इंद्रा तूं पर्वताचा, मेघाचा व वलाचा मोठी गर्जना करून ध्वंस केलास. ॥ ४ ॥


गृ॒णा॒नो अङ्‍गि॑रोभिर्दस्म॒ वि व॑रु॒षसा॒ सूर्ये॑ण॒ गोभि॒रन्धः॑ ॥
वि भूम्या॑ अप्रथय इन्द्र॒ सानु॑ दि॒वो रज॒ उप॑रमस्तभायः ॥ ५ ॥

गृणानः अंगिरःऽओभिः दस्म वि वः उषसा सूर्येण गोभिः अंधः ॥
वि भूम्याः अप्रथयः इंद्र सानु दिवः रजः उपरं अस्तभायः ॥ ५ ॥

हे सौंदर्यवान् इंद्रदेवा, अंगिरसांनी तुझी स्तुति केली तेव्हां तूं उषा, सूर्य व धेनु ह्यांस घेऊन अंधकाराचा उच्छेद केलास. तूं भूलोकाची मर्यादा विस्तृत केलीस व रजोलोकाचे वर द्युलोकाची संस्थापना केलीस. ॥ ५ ॥


तदु॒ प्रय॑क्षतममस्य॒ कर्म॑ द॒स्मस्य॒ चारु॑तममस्ति॒ दंसः॑ ॥
उ॒प॒ह्व॒रे यदुप॑रा॒ अपि॑न्व॒न्मध्व॑र्णसो न॒द्य१॑श्चत॑स्रः ॥ ६ ॥

तत् ऊं इति प्रयक्षऽतमं अस्य कर्म दस्मस्य चारुऽतमं अस्ति दंसः ॥
उपऽह्वरे यत् उपराः अपिन्वत् मधुऽअर्णसः नद्यः चतस्रः ॥ ६ ॥

ह्या सौंदर्यवान् देवाचे हे कर्म अतिशय सन्मानार्ह आहे - हे त्याचे अद्‍भुत कृत्य खरोखर अतिशय सुंदर आहे - कीं क्षितिजापाशी त्यानें मधुर जलाच्या चार नद्या वरच्यावरच तुडुंब भरून टाकल्या. ॥ ६ ॥


द्वि॒ता वि व॑व्रे स॒नजा॒ सनी॑ळे अ॒यास्य॒ स्तव॑मानेभिर॒र्कैः ॥
भगो॒ न मेने॑ पर॒मे व्योम॒न्नधा॑रय॒द्‍रोद॑सी सु॒दंसाः॑ ॥ ७ ॥

द्विता वि वव्रे सनऽजा सनीळे इति सऽनीळे अयास्यः स्तवमानेभिः अर्कैः ॥
भगः न मेन इति परमे विऽओमन् अधारयत् रोदसी इति सुऽदंसाः ॥ ७ ॥

स्तुतींनी परिपूर्ण अशी स्तोत्रें चाललीं असतांना ह्या कधींही श्रांत न होणार्‍या देवानें प्राचीन काळापासून एकत्र असणारी जोडी फोडून तिचे दोन भाग लेले. अनेक सुंदर व आश्चर्यकारक पराक्रम करणार्‍या ह्या देवानें भगाप्रमाणे स्वर्गभू व पृथ्वी ह्या दोन युवतींची ह्या विशाल आकाशभागीं स्थापना केली. ॥ ७ ॥


स॒नाद्दिवं॒ परि॒ भूमा॒ विरू॑पे पुन॒र्भुवा॑ युव॒ती स्वेभि॒रेवैः॑ ॥
कृ॒ष्णेभि॑र॒क्तोषा रुश॑द्‌भि॒र्वपु॑र्भि॒रा च॑रतो अ॒न्यान्या॑ ॥ ८ ॥

सनात् दिवं परि भूम विरूपे इति विऽरूपे पुनःऽभुवा युवती स्वेभिः एवैः ॥
कृष्णेभिः अक्ता उषाः रुशत्ऽभिः वपुःऽभिः आ चरतः अन्याऽअन्या ॥ ८ ॥

सनातन कालापासून रात्र व उषा ह्या रोज जन्मणार्‍या दोन युवती, कीं ज्यांची रूपें भिन्न आहेत, त्या आपापल्या गमनपद्धनीनें द्युलोक व पृथ्वी ह्यांचे सभोंवार, रात्र कृष्णरूपें धारण करून एकएकटी व उषा उज्ज्वलरूपें धारण करून एकएकटी अशा परिभ्रमण करीत असतात. ॥ ८ ॥


सने॑मि स॒ख्यं स्व॑प॒स्यमा॑नः सू॒नुर्दा॑धार॒ शव॑सा सु॒दंसाः॑ ॥
आ॒मासु॑ चिद् दधिषे प॒क्वम् अ॒न्तः पयः॑ कृ॒ष्णासु॒ रुश॒द् रोहि॑णीषु ॥ ९ ॥

सनेमि सख्यं सुऽअपस्यमानः सूनुः दाधार शवसा सुऽदंसाः ॥
आमासु चित् दधिषे पक्वं अंतरिति पयः कृष्णासु रुशत् रोहिणीषु ॥ ९ ॥

सुंदर सुंदर चमत्कार करणारा व अत्यंत उदार अशा ह्या इंद्रानें आपल्या सामर्थ्यानें श्रेष्ठ कृत्यें करीत सर्व विश्वाविषयीं चिरकालिक प्रेमबुद्धि धारण केली आहे. हे इंद्रा, गाईंचा रंग तांबडा असो कीं काळा असो, किंबहुना, त्या जरी अगदी नवीन वेताच्याच असल्या, तरी त्यांचे ठिकाणी तूं तकतकीत पांढरे व मधुर दूध ठेवतोस. ॥ ९ ॥


स॒नात्सनी॑ळा अ॒वनी॑रवा॒ता व्र॒ता र॑क्षन्ते अ॒मृताः॒ सहो॑भिः ॥
पु॒रू स॒हस्रा॒ जन॑यो॒ न पत्नी॑र्दुव॒स्यन्ति॒ स्वसा॑रो॒ अह्र॑याणम् ॥ १० ॥

सनात् सऽनीळा अवनीः अवाताः व्रता रक्षंते अमृताः सहःऽभिः ॥
पुरू सहस्रा जनयः न पत्नीः दुवस्यंति स्वसारः अह्रयाणम् ॥ १० ॥

ज्यांची गति एकाच ठिकाणाकडे आहे व ज्यांस प्रत्यवाय अथवा नाश होण्याची भिती नाही अशा नद्या पुरातनकालापासून स्वसामर्थ्यानुरूप ह्या देवाच्या आज्ञांचे परिपालन करीत आहेत. एकाच पुरुषाच्या ज्याप्रमाणें लग्नाच्या हजारों बायका असाव्यात त्याप्रमाणें ह्या बहिणी बहिणी ह्याची एकट्याची सेवा करीत असतात व तो ती मनमोकळें करून घेतो. ॥ १० ॥


स॒ना॒युवो॒ नम॑सा॒ नव्यो॑ अ॒र्कैर्व॑सू॒यवो॑ म॒तयो॑ दस्म दद्रुः ॥
पतिं॒ न पत्नी॑रुश॒तीरु॒शन्तं॑ स्पृ॒शन्ति॑ त्वा शवसावन्मनी॒षाः ॥ ११ ॥

सनाऽयुवः नमसा नव्यः अर्कैः वसूऽयवः मतयः दस्म दद्रुः ॥
पतिं न पत्नीः उशतीः उशंतं स्पृशंति त्वा शवसाऽवन् मनीषाः ॥ ११ ॥

नमस्कृनींनी व स्तोत्रांनी अर्चन करण्यास तूं योग्य आहेस. हे सौंदय्रयुक्त देवा, धनाची व लाभाची इच्छा धरून, आमच्या मनाची स्फूर्ति तुजकडे धांव घेत असते. हे बलशाली देवा, ज्याप्रमाणें अनुरक्त पत्नी अनुरक्त पतीस आलिंगन देते त्याप्रमाणें आमच्या स्तुति तुला भेटावयास येतात. ॥ ११ ॥


स॒नादे॒व तव॒ रायो॒ गभ॑स्तौ॒ न क्षीय॑न्ते॒ नोप॑ दस्यन्ति दस्म ॥
द्यु॒माँ अ॑सि॒ क्रतु॑माँ इन्द्र॒ धीरः॒ शिक्षा॑ शचीव॒स्तव॑ नः॒ शची॑भिः ॥ १२ ॥

सनात् एव तव रायः गभस्तौ न क्षीयंते न उप दस्यंति दस्म ॥
द्युऽमान् असि क्रतुऽमान् इंद्र धीरः शिक्ष शचीऽवः तव नः शचीभिः ॥ १२ ॥

सनातन कालापासून तुझ्या हातांत संपत्ति आहे. तिचा क्षय अथवा र्‍हास, हे लावण्यवान देवा, कधीही होत नाहीं. इंद्रा तूं कांतीमान, बुद्धिमान व प्रज्ञावान आहेस. स्वशक्तीच्या योगानें, हे सामर्थ्यवान् देवा, आम्हांस सन्मार्गास लाव. ॥ १२ ॥


स॒ना॒य॒ते गोत॑म इन्द्र॒ नव्यं॒ अत॑क्ष॒द्‍ब्रह्म॑ हरि॒योज॑नाय ॥
सु॒नी॒थाय॑ नः शवसान नो॒धाः प्रा॒तर्म॒क्षू धि॒याव॑सुर्जगम्यात् ॥ १३ ॥

सनाऽयते गोतमः इंद्र नव्यं अतक्षत् ब्रह्म हरिऽयोजनाय ॥
सुऽनीथाय नः शवसान नोधाः प्रातः मक्षु धियाऽवसुः जगम्यात् ॥ १३ ॥

हे इंद्रा, हा गोतम प्राचीन ऋषींचे अनुकरण करीत आहे. हरिद्वर्ण अश्वांवर आरोहण करणारा जो तूं, त्या तुजकरितां त्यानें नवीन स्तोत्र रचले आहे. हे सामर्थ्यवान् देवा, तूं आमचा सन्मार्गदर्शक आहेस. तुझ्याकरितां नोधा ऋषीने स्तुति केली आहे. अनेक स्तोत्रांनी आळविलेला हा देव प्रातःकाळीच आम्हांकडे सत्वर गमन करो. ॥ १३ ॥


मण्डल १ सूक्त ६३ ( इंद्र सूक्त )

ऋषि - नोधस् गौतम : देवता - इंद्र : छंद - त्रिष्टुभ्


त्वं म॒हाँ इ॑न्द्र॒ यो ह॒ शुष्मै॒र्द्यावा॑ जज्ञा॒नः पृ॑थि॒वी अमे॑ धाः ॥
यद्ध॑ ते॒ विश्वा॑ गि॒रय॑श्चि॒दभ्वा॑ भि॒या दृ॒ळ्हासः॑ कि॒रणा॒ नैज॑न् ॥ १ ॥

त्वं महान् इंद्र यः ह शुष्मैः द्यावा जज्ञानः पृथिवी अमे धाः ॥
यत् ह ते विश्वा गिरयः चित् अभ्वा भिया दृळ्हासः किरणाः न ऐजन् ॥ १ ॥

ज्या अर्थी हे इंद्रा, कठीण पर्वत आणी भूमीवर दृढ संस्थापित झालेल्या इतरही सर्व अवाढव्य वस्तु तुझ्या भितीमुळे सूर्याच्या किरणाप्रमाणे लटलट हलूं लागल्या, त्या अर्थी तूं खचित मोठा आहेस - इतका मोठा कीं तूं सर्वज्ञ असून, द्युलोक आणि भूलोक ह्यांनानी स्वसामर्थ्यानें तूं आपल्या धाकांत ठेवलें आहेस. ॥ १ ॥


आ यद्धरी॑ इन्द्र॒ विव्र॑ता॒ वेरा ते॒ वज्रं॑ जरि॒ता बा॒ह्वोर्धा॑त् ॥
येना॑विहर्यतक्रतो अ॒मित्रा॒न्पुर॑ इ॒ष्णासि॑ पुरुहूत पू॒र्वीः ॥ २ ॥

आ यत् हरी इति इंद्र विऽव्रता वेः आ ते वज्रं जरिता बाह्वोः धात् ॥
येनाविहर्यतक्रतो इत्यविहर्यतऽक्रतो अमित्रान् पुरः इष्णासि पुरुऽहूत पूर्वीः ॥ २ ॥

जेव्हां हे इंद्रा, अनेक तर्‍हेने तुझा हुकूम मानणारे स्वतःचे अश्व तूं जोडलेस त्यावेळीं तुझें स्तवन करणार्‍या भक्तानें तुझ्या बाहूंवर वज्र दिलें. स्वतःच्या बुद्धीनें वागणार्‍या व अनेक भक्तांनी स्वसंरक्षणार्थ पाचारण केलेल्या हे इंद्रा, तेंच वज्र घेऊन तूं शत्रूंचा व त्यांच्या, संपत्तीनें समृद्ध अशा, पुरांचा उच्छेद करतोस. ॥ २ ॥


त्वं स॒त्य इ॑न्द्र धृ॒ष्णुरे॒तान् त्वं ऋ॑भु॒क्षा नर्य॒स्त्वं षाट् ॥
त्वं शुष्णं॑ वृ॒जने॑ पृ॒क्ष आ॒णौ यूने॒ कुत्सा॑य द्यु॒मते॒ सचा॑हन् ॥ ३ ॥

त्वं सत्यः इंद्र धृष्णुः एतान् त्वं ऋभुक्षाः नर्यः त्वं षाट् ॥
त्वं शुष्णं वृजने पृक्ष आणौ यूने कुत्साय द्युऽमते सचा अहन् ॥ ३ ॥

इंद्रा, तूं सत्यस्वरूप आहेस, तूं ह्या शत्रूंचा उच्छेदक आहेस, तूं ऋभूंचा स्वामी आहेस, तूं मनुष्यांचा कल्याणकर्ता आहेस वु तुझ्याशी युद्धास प्रवृत्त होणारास तूं जेरीस आणणारा आहेस. तूं तेजस्वी व तरुण अशा कुत्साचा पक्ष घेऊन संग्रामांत, युद्धांत व लढाईंत सुष्णाचे हनन केलेंस. ॥ ३ ॥


त्वं ह॒ त्यदि॑न्द्र चोदीः॒ सखा॑ वृ॒त्रं यद्व॑ज्रिन्वृषकर्मन्नु॒भ्नाः ॥
यद्ध॑ शूर वृषमणः परा॒चैर्वि दस्यू॒ँर्योना॒व् अकृ॑तो वृथा॒षाट् ॥ ४ ॥

त्वं ह त्यत् इंद्र चोदीः सखा वृत्रं यत् वज्रिन् वृषऽकर्मन् उभ्नाः ॥
यत् ह शूर वृषऽमनः पराचैः वि दस्यून् योनौ अकृतः वृथाषाट् ॥ ४ ॥

वीर्यशाली पुरुषाप्रमाणें मनाची प्रवृत्ति असलेल्या हे शूर इंद्रा, ज्यावेळीं दस्यूंवर सहज विजय गाजवून व त्यांस पळावयास लावून खुद्द त्यांच्या निवासाच्या ठिकाणींच तूं त्यांना खरोखर कापून काढलेंस व ज्यावेळीं, पराक्रमी पुरुषाप्रमाणे कृत्यें करणार्‍या हे वज्रधर इंद्रा, तूं कुत्साचा स्नेही होऊन वृत्राचा वध केलास, त्यावेळीं त्या कृत्याविषयीं तुझी स्वतःचीच बलवत्तर इच्छा होती. ॥ ४ ॥


त्वं ह॒ त्यदि॒न्द्रारि॑षण्यन्दृ॒ळ्हस्य॑ चि॒न्मर्ता॑ना॒मजु॑ष्टौ ॥
व्य१॑स्मदा काष्ठा॒ अर्व॑ते वर्घ॒नेव॑ वज्रिञ्छ्नथिह्य॒मित्रा॑न् ॥ ५ ॥

त्वं ह त्यत् इंद्र अरिषण्यन् दृळ्हस्य चिन् मर्तानां अजुष्टौ ॥
वि अस्मत् आ काष्ठाः अर्वते वः घनाऽइव वज्रिन् श्नथिहि अमित्रान् ॥ ५ ॥

मानवांपैकीं जो अत्यंत बलिष्ठ असेल त्याचा जरी तोष झाला तथापि, हे इंद्रा, तूं त्यांत विघ्न येऊं दिलें नाहीस. तूं आमच्या अश्वांकरितां सर्व दिशा मोकळ्या ठेविल्यास. हे बज्रधर इंद्रा, हातांत घण घेऊन मारल्याप्रमाणें शत्रूंचा नाश कर. ॥ ५ ॥


त्वां ह॒ त्यदि॒न्द्रार्ण॑सातौ॒ स्वर्मीळ्हे॒ नर॑ आ॒जा ह॑वन्ते ॥
तव॑ स्वधाव इ॒यमा स॑म॒र्य ऊ॒तिर्वाजे॑ष्वत॒साय्या॑ भूत् ॥ ६ ॥

त्वां ह त्यत् इंद्र अर्णऽसातौ स्वःऽमीळ्हे नरः आजा हवंते ॥
तव स्वधाऽवः इयं आ समर्ये ऊतिः वाजेषु अतसाय्या भूत् ॥ ६ ॥

समुद्रावर वर्चस्व मिळविण्याच्या अथवा स्वर्गप्राप्ति करून घेण्याच्या इच्छेनें आरंभिलेल्या युद्धांत ह्याच कारणामुळें योद्धेजन तुला खरोखर हांक मारतात. हे अनेक हवींचा उपभोग घेणार्‍या इंद्रा, समरामध्यें अथवा पराक्रमाच्या कृत्यांत हें तुझेंच साहाय्य आम्हांस सुलभ रीतीनें प्राप्त झालें. ॥ ६ ॥


त्वं ह॒ त्यदि॑न्द्र स॒प्त युध्य॒न्पुरो॑ वज्रिन्पुरु॒कुत्सा॑य दर्दः ॥
ब॒र्हिर्न यत्सु॒दासे॒ वृथा॒ वर्गं॒हो रा॑ज॒न्वरि॑वः पू॒रवे॑ कः ॥ ७ ॥

त्वं ह त्यत् इंद्र सप्त युध्यन् पुरः वज्रिन् पुरुऽकुत्साय दर्दरिति दर्दः ॥
बर्हिः न यत् सुऽदासे वृथा वर्क् अंहः राजन् वरिवः पूरवे करितिकः ॥ ७ ॥

हे वज्रधारी इंद्रा, ह्याच कारणास्वत तूं पुरुकुत्साकरितां युद्ध करून सप्त पुरांचा विध्वंस केलास. ज्यवेळी सुदासाकरितां तूं त्याचे शत्रूंस कांही एक श्रम न करतां गवत कापल्याप्रमाणें कापून काढलेंस, त्यावेळीं, हे राजन्, पुरूचा तूं संकटापासून बचाव केलास. ॥ ७ ॥


त्वं त्यां न॑ इन्द्र देव चि॒त्रामिष॒मापो॒ न पी॑पयः॒ परि॑ज्मन् ॥
यया॑ शूर॒ प्रत्य॒स्मभ्यं॒ यंसि॒ त्मन॒मूर्जं॒ न वि॒श्वध॒ क्षर॑ध्यै ॥ ८ ॥

त्वं त्यां नः इंद्र देव चित्रां इषं आपः न पीपयः परिज्मन् ॥
यया शूर प्रति अस्मभ्यं यंसि त्मनं ऊर्जं न विश्वध क्षरध्यै ॥ ८ ॥

हे सर्वसंचारी इंद्रदेवा, तूं आम्हांवर उदकाप्रमाणें त्या तुझ्या अलौकिक कृपादृष्टीचा असा वर्षाव केलास कीं ज्याच्या योगानें, हे शूरा, सर्व ठिकाणीं जणूं काय उदकाप्रमाणें सांडत जाईल अशा रीतीनें तुझेपासून आम्हांस उत्तम सामर्थ्याचा लाभ झाला. ॥ ८ ॥


अका॑रि त इन्द्र॒ गोत॑मेभि॒र्ब्रह्मा॒ण्योक्ता॒ नम॑सा॒ हरि॑भ्याम् ॥
सु॒पेश॑सं॒ वाज॒मा भ॑रा नः प्रा॒तर्म॒क्षू धि॒याव॑सुर्जगम्यात् ॥ ९ ॥

अकारि ते इंद्र गोतमेभिः ब्रह्माणि आऽउक्ता नमसा हरिऽभ्याम् ॥
सुऽपेशसं वाजं आ भर नः प्रातः मक्षू धियाऽवसुः जगम्यात् ॥ ९ ॥

हे इंद्रा, गौतमांनी तुझें स्तवन केलें आहे आणि तुझ्या अश्वांस वंदन करून त्यांचे सन्मानार्थही त्यांनी स्तोत्रें गाईलीं आहेत. आम्हास उत्तम प्रमारचें सामर्थ्य दे. असंख्य स्तुतिस्तोत्रांनी आळविलेला हा देव आम्हांकडे प्रातःकाळी लवकर गमन करो. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ६४ ( मरुत् सूक्त )

ऋषि - नोधस् गौतम : देवता - मरुत् : छंद - जगती; त्रिष्टुभ्


वृष्णे॒ शर्धा॑य॒ सुम॑खाय वे॒धसे॒ नोधः॑ सुवृ॒क्तिं प्र भ॑रा म॒रुद्‍भ्यः॑ ॥
अ॒पो न धीरो॒ मन॑सा सु॒हस्त्यो॒ गिरः॒ सम॑ञ्जे वि॒दथे॑ष्वा॒भुवः॑ ॥ १ ॥

वृष्णे शर्धाय सुऽमखाय वेधसे नोधः सुऽवृक्तिं प्र भरा मरुत्ऽभ्यः ॥
अपः न धीरः मनसा सुऽहस्त्यः गिरः सं अंजे विदथेषु आऽभुवः ॥ १ ॥

मरुत् देवांचे सन्मानार्थ, हे नोधा, सामर्थ्यवान्, अत्यंत पूज्य व अत्यंत कर्तृत्ववान् अशा त्यांच्या गणास उद्देशून एक सुंदर स्तोत्र अर्पण करा. मनांत बाळगून व चांगली हातोटी साध्य करून घेऊन मी यज्ञप्रसंगी प्रभावसंपन्न स्तोत्रांची पाण्याप्रमाणें वृष्टि करतो. ॥ १ ॥


ते ज॑ज्ञिरे दि॒व ऋ॒ष्वास॑ उ॒क्षणो॑ रु॒द्रस्य॒ मर्या॒ असु॑रा अरे॒पसः॑ ॥
पा॒व॒कासः॒ शुच॑यः॒ सूर्या॑ इव॒ सत्वा॑नो॒ न द्र॒प्सिनो॑ घो॒रव॑र्पसः ॥ २ ॥

ते जज्ञिरे दिवः ऋष्वासः उक्षणः रुद्रस्य मर्याः असुराः अरेपसः ॥
पावकासः शुचयः सूर्याःऽइव सत्वानः न द्रप्सिनः घोरऽवर्पसः ॥ २ ॥

रुद्राचे पुत्र, शत्रूंचा नाश करणारे, सर्व अवगुणांपासून अलिप्त, जगतास पावन करणारे, सूर्याप्रमणे तेजःपुंज व वृष्टि करणारे असून सामर्थ्यवान पुरुषाप्रमाणे भयप्रद असे हे उंच शरीराचे पराक्रमी वृषभ द्युलोकापासून जन्म पावले. ॥ २ ॥


युवा॑नो रु॒द्रा अ॒जरा॑ अभो॒ग्घनो॑ वव॒क्षुरध्रि॑गावः॒ पर्व॑ता इव ॥
दृ॒ळ्हा चि॒द्विश्वा॒ भुव॑नानि॒ पार्थि॑वा॒ प्र च्या॑वयन्ति दि॒व्यानि॑ म॒ज्मना॑ ॥ ३ ॥

युवानः रुद्राः अजराः अभोक्ऽहनः ववक्षुः अध्रिऽगावः पर्वताःऽइव ॥
दृळ्हा चित् विश्वा भुवनानि पार्थिवा प्र च्यवयंति दिव्यानि मज्मना ॥ ३ ॥

तारुण्ययुक्त, जरारहित, भक्तिहीन कृपण पुरुषांचा नाश करणारे, व कोणाच्या प्रतिरोधास न जुमानणारे हे रुद्र पर्वताप्रमाणे बलवान होत गेले. आपल्या सामर्थ्याच्या योगानें हे दिव्य लोकांना, व पृथ्वीवरील प्रदेशांना, ते कितीही अचल असले तरी हालवून सोडतात. ॥ ३ ॥


चि॒त्रैर॒ञ्जिभि॒र्वपु॑षे॒ व्यञ्जते॒ वक्ष॑स्सु रु॒क्माँ अधि॑ येतिरे शु॒भे ॥
अंसे॑ष्वेषां॒ नि मि॑मृक्षुरृ॒ष्टयः॑ सा॒कं ज॑ज्ञिरे स्व॒धया॑ दि॒वो नरः॑ ॥ ४ ॥

चित्रैः अंजिऽभिः वपुषे वि अंजते वक्षःऽसु रुक्मान् अधि येतिरे शुभे ॥
अंसेषु एषां नि मिमृक्षुः ऋष्टयः साकं जज्ञिरे स्वधया दिवः नरः ॥ ४ ॥

सुंदर दिसण्याचे हेतूनें ते चित्रविचित्र आभरणांनी स्वतःस भूषवित आहेत. शोभेकरितां त्यांनी आपल्या वक्षःस्थलावर सुवर्णलंकार धारण केलेले आहेत. त्यांच्या खांद्याव भाले लखलखतांना दिसत आहेत व हे वीर, स्वतःचाच मार्ग धारण करून, द्युलोकापासून उत्पन्न झालेले आहेत. ॥ ४ ॥


ई॒शा॒न॒कृतो॒ धुन॑यो रि॒शाद॑सो॒ वाता॑न्वि॒द्युत॒स्तवि॑षीभिरक्रत ॥
दु॒हन्त्यूध॑र्दि॒व्यानि॒ धूत॑यो॒ भूमिं॑ पिन्वन्ति॒ पय॑सा॒ परि॑ज्रयः ॥ ५ ॥

ईशानऽकृतः धुनयः रिशादसः वातान् विऽद्युतः तविषीभिः अक्रत ॥
दुहंति ऊधः दिव्यानि धूतयः भूमिं पिन्वंति पयसा परिऽज्रयः ॥ ५ ॥

विश्वावर अधिपत्य संपादन करणार्‍या, सर्व जगास हालवून सोडणार्‍या, व दुष्टांचा संहार करणार्‍या, ह्या मरुतांनी वारे व विजा ह्यांना स्वसामर्थ्यानें उत्पन्न केलें. हे शूर स्वर्भूमीच्या कांसेचे दोहन करतात व सर्वत्र संचार करून दुग्धानें पृथ्वीस पुष्टि आणतात. ॥ ५ ॥


पिन्व॑न्त्य॒पो म॒रुतः॑ सु॒दान॑वः॒ पयो॑ घृ॒तव॑द्वि॒दथे॑ष्वा॒भुवः॑ ॥
अत्यं॒ न मि॒हे वि न॑यन्ति वा॒जिन॒मुत्सं॑ दुहन्ति स्त॒नय॑न्त॒मक्षि॑तम् ॥ ६ ॥

पिन्वंति अपः मरुतः सुऽदानवः पयः घृतऽवत् विऽदथेषु आऽभुवः ॥
अत्यं न मिहे वि नयंति वाजिनं उत्सं दुहंति स्तनयंतं अक्षितम् ॥ ६ ॥

कर्तृत्व अंगी असलेले हे दानशूर मरुत् जलाची व घृतपरिपूर्ण अशा दुग्धाची समृद्धि करतात. ते सामर्थ्यवान् अश्वास जणूं काय वृष्टि करण्याचेंच शिक्षण देतात व मोठ्यानें शब्द करणार्‍या अविनाशी झर्‍यांचे दोहन करतात. ॥ ६ ॥


म॒हि॒षासो॑ मा॒यिन॑श्चि॒त्रभा॑नवो गि॒रयो॒ न स्वत॑वसो रघु॒ष्यदः॑ ॥
मृ॒गा इ॑व ह॒स्तिनः॑ खादथा॒ वना॒ यदारु॑णीषु॒ तवि॑षी॒रयु॑ग्ध्वम् ॥ ७ ॥

महिषासः मायिनः चित्रऽभानवः गिरयः न स्वऽतवसः रघुऽस्यदः ॥
मृगाःऽइव हस्तिनः खादथ वना यत् आरुणीषु तविषीः अयुग्ध्वम् ॥ ७ ॥

हे मरुतांनो, आकाशातील विजेच्या प्रकाशमान आणि आरक्त ज्वालांसमवेत तुम्ही कार्यान्वित होताच, तुमच्या महान, मायावी, तेजसंपन्न, पर्वतसदृश आणि शीघ्रगामी सामर्थ्याने रानटी हत्तीप्रमाणे सारी वने तुम्ही भक्षण करता, नष्ट करता. ॥ ७ ॥


सिं॒हा इ॑व नानदति॒ प्रचे॑तसः पि॒शा इ॑व सु॒पिशो॑ वि॒श्ववे॑दसः ॥
क्षपो॒ जिन्व॑न्तः॒ पृष॑तीभिर्‌ऋ॒ष्टिभिः॒ समित्स॒बाधः॒ शव॒साहि॑मन्यवः ॥ ८ ॥

सिंहाःऽइव नानदति प्रऽचेतसः पिशाःऽइव सुऽपिशः विश्ववेदसः ॥
क्षपः जिन्वंतः पृषतीभिः ऋष्टिऽभिः सं इत् सऽबाधः शवसा अहिऽमन्यवः ॥ ८ ॥

ज्यावेळी बलवान्, सर्व युक्तिप्रयुक्तींत निष्णात, आश्चर्यकारक तेजानें युक्त, पर्वताप्रमाणे स्वसामर्थ्यानें परिपूर्ण व शीघ्रसंचारी असे आपण आपल्या रक्तवर्ण हरिणींपैकीं बलिष्ठ हरिणींना आपल्या रथास जोडतां, त्यावेळी एखाद्या रानटी हत्तीप्रमाणे आपण सर्व झाडेझुडे खाऊनच टाकता किं काय असा भास होतो. ॥ ७ ॥


रोद॑सी॒ आ व॑दता गणश्रियो॒ नृषा॑चः शूराः॒ शव॒साहि॑मन्यवः ॥
आ व॒न्धुरे॑ष्व॒मति॒र्न द॑र्श॒ता वि॒द्युन्न त॑स्थौ मरुतो॒ रथे॑षु वः ॥ ९ ॥

रोदसी इति आ वदत गणऽश्रियः नृऽसाचः शूराः शवसा अहिऽमन्यवः ॥
आ वंधुरेषु अमतिः न दर्शता विऽद्युत् न तस्थौ मरुतः रथेषु वः ॥ ९ ॥

अत्यंत प्रज्ञाशील रुरु नांवाच्या मृगाप्रमाणें सुंदर, सर्वज्ञ, आपल्या ठिपकेदार हरिणी जोडून व भाले घेऊन रात्रीला पळवून लावणारे, शत्रूस एकदम एकाच वेळी पीडा देणारे व बलिष्ठ असल्यामुळें सर्पाप्रमाणें रागीट असे हे मरुत् सिंहाप्रमाणें गर्जना करीत आहेत. ॥ ८ ॥


वि॒श्ववे॑दसो र॒यिभिः॒ समो॑कसः॒ सम्मि॑श्लास॒स्तवि॑षीभिर्विर॒प्शिनः॑ ॥
अस्ता॑र॒ इषुं॑ दधिरे॒ गभ॑स्त्योरन॒न्तशु॑ष्मा॒ वृष॑खादयो॒ नरः॑ ॥ १० ॥

विश्वऽवेदसः रयिऽभिः संऽओकसः संऽमिश्लासः तविषीभिः विऽरप्शिनः ॥
अस्तारः इषुं दधिरे गभस्त्योः अनंतऽशुष्माः वृषऽखादयः नरः ॥ १० ॥

समुदायामध्यें शोभिवंत दिसणार्‍या, मनुष्यांस साहाय्यभूत होणार्‍या व अंगी सामर्थ्य असल्यामुळें सर्पाप्रमाणें कुपित होणार्‍या हे शूर मरुद्देवांनो, स्वर्ग व पृथ्वी ह्या दोन्ही लोकांशी संभाषण करा. तुमच्या रथाच्या वन्धुरांवर सुंदर तेज दृगोचर होत नाहीं काय व तुमच्या रथावर विद्युत् विराजमान झाली नाहीं काय ? ॥ ९ ॥


हि॒र॒ण्यये॑भिः प॒विभिः॑ पयो॒वृध॒ उज्जि॑घ्नन्त आप॒थ्यो३॑न पर्व॑तान् ॥
म॒खा अ॒यासः॑ स्व॒सृतो॑ ध्रुव॒च्युतो॑ दुध्र॒कृतो॑ म॒रुतो॒ भ्राज॑दृष्टयः ॥ ११ ॥

हिरण्ययेभिः पविऽभिः पयःऽवृधः उत्ऽजिघ्नंते आऽपथ्यः न पर्वतान् ॥
मखाः अयासः स्वऽसृतः ध्रुवऽच्युतः दुध्रऽकृतः मरुतः भ्राजत्ऽऋष्टयः ॥ ११ ॥

सर्वज्ञ, स्ववैभव धारण करून एकत्र निवास करणार्‍या, एकमेकांशी अगदीं संलग्न असलेल्या, स्वसामर्थ्याच्या योगानें श्रेष्ठपणा पावलेल्या, अस्त्रविद्यानिपुण, अपार बल अंगी असलेल्या व आयुधें धारण करणार्‍या ह्या शूर मरुतांनी हातांत बाण घेतलेला आहे. ॥ १० ॥


घृषुं॑ पाव॒कं व॒निनं॒ विच॑र्षणिं रु॒द्रस्य॑ सू॒नुं ह॒वसा॑ गृणीमसि ॥
र॒ज॒स्तुरं॑ त॒वसं॒ मारु॑तं ग॒णमृ॑जी॒षिणं॒ वृष॑णं सश्चत श्रि॒ये ॥ १२ ॥

घृषुं पावकं वनिनं विऽचर्षणिं रुद्रस्य सूनुं हवसा गृणीमसि ॥
रजःऽतुरं तवसं मारुतं गणं ऋजीषिणं वृषणं सश्चत श्रिये ॥ १२ ॥

पवित्र, चपल, स्वमार्गाने गमन करणारे, स्थिर पदार्थांस चळविणारे, स्वतःस शत्रूंकडून अजिंक्यपणा प्राप्त करून घेणारे व हातांत भाले चमकविणारे हे मरुत् दुग्धप्राशनानें सामर्थ्यवान बनून आपल्या सुवर्णमय पवींनी पर्वतांचा मार्गावरील एखाद्या क्षुद्र पदार्थाप्रमाणें चुराडा करून टाकतात. ॥ ११ ॥


प्र नू स मर्तः॒ शव॑सा॒ जना॒ँ अति॑ त॒स्थौ व॑ ऊ॒ती म॑रुतो॒ यमाव॑त ॥
अर्व॑द्‌भि॒र्वाजं॑ भरते॒ धना॒ नृभि॑रा॒पृच्छ्यं॒ क्रतु॒मा क्षे॑ति॒ पुष्य॑ति ॥ १३ ॥

प्र नू सः मर्तः शवसा जनान् अति तस्थौ वः ऊती मरुतः यं आवत ॥
अर्वत्ऽभिः वाजं भरते धना नृऽभिः आऽपृच्छ्यं क्रतुं आ क्षेति पुष्यति ॥ १३ ॥

युद्धसंघर्षणांत चतुर, पवित्र, अरण्यांत संचार करणारे व सर्वत्र परिभ्रमण करणारे असे जे रुद्राचे पुत्र त्यांचा धांवा करून आम्ही त्यांचे स्तवन करतो. रजोलोकांत जाणारे, बलिष्ठ, सरल गतीनें धावणारे व अतिशय शक्तिमान असे जे मरुद्‍गण त्यांस तुम्ही वैभव प्राप्त होण्याकरितां भजा ॥ १२ ॥


च॒र्कृत्यं॑ मरुतः पृ॒त्सु दु॒ष्टरं॑ द्यु॒मन्तं॒ शुष्मं॑ म॒घव॑त्सु धत्तन ॥
ध॒न॒स्पृत॑मु॒क्थ्यं वि॒श्वच॑र्षणिं तो॒कं पु॑ष्येम॒ तन॑यं श॒तं हिमाः॑ ॥ १४ ॥

चर्कृत्यं मरुतः पृत्ऽसु दुऽस्तरं द्युऽमंतं शुष्मं मघवत्ऽसु धत्तन ॥
धनऽस्पृतं उक्थ्यं विश्वऽचर्षणिं तोकं पुष्येम तनयं शतं हिमाः ॥ १४ ॥

आपलें साहाय्य अर्पण करून ज्याचें तुम्ही संरक्षण करतां तो मानव हे मरुत् हो, आपल्या सामर्थानें सर्व लोकांपेक्षां ज्यास्त बलवान् होतो. तो आपल्या अश्वांच्या योगानें सामर्थ्य संपादन करतो, तो आपल्या पदरच्या शूर माणसांकडून संपत्ति मिळवितो, लोकांनी जिच्याबद्दल कौतुकानें चौकशी करावी अशी शक्ति त्यास प्राप्त होते व तो भरभराटीस चढतो. ॥ १३ ॥


नू ष्ठि॒रं म॑रुतो वी॒रव॑न्तमृती॒षाहं॑ र॒यिम॒स्मासु॑ धत्त ॥
स॒ह॒स्रिणं॑ श॒तिनं॑ शूशु॒वांसं॑ प्रा॒तर्म॒क्षू धि॒याव॑सुर्जगम्यात् ॥ १५ ॥

नु स्थिरं मरुतः वीरऽवंतं ऋतीऽसहं रयिं अस्मासु धत्त ॥
सहस्रिणं शतिनं शूशुऽवांसं प्रातः मक्षू धियाऽवसुः जगम्यात् ॥ १५ ॥

धनाची प्राप्ति करून देणारी, प्रशंसनीय, सर्व विश्वांत विदित होणारी, अत्यंत स्तुत्य, युद्धांत हार न जाणावी व उज्ज्वल अशी शक्ति हे मरुत् हो, तुम्हांस हवि देणार्‍या भक्तांचे अंगी आणा. आम्हांस शतायु पुत्रपौत्र लाभोत. ॥ १४ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ६५ ( अग्नि सूक्त )

ऋषि - पराशर शाक्त्य : देवता - अग्नि : छंद - द्विपदा विराज्


प॒श्वा न ता॒युं गुहा॒ चत॑न्तं॒ नमो॑ युजा॒नं नमो॒ वह॑न्तम् ॥
स॒जोषा॒ धीराः॑ प॒दैरनु॑ ग्म॒न्नुप॑ त्वा सीद॒न्विश्वे॒ यज॑त्राः ॥ १ ॥

पश्वा न तायुं गुहा चतंतं नमः युजानं नमः वहंतम् ॥
सऽजोषा धीराः पदैः अनु ग्मन् उप त्वा सीदन् विश्वे यजत्राः ॥ १ ॥

ज्याप्रमाणे गुरें चोरून नेऊन एकादा चोर गुहेंत लपून बसला असतां त्याच्या पावलांवरून त्याचा माग काढतात त्याप्रमाणे प्रज्ञाशील पुरुषांनी आपापसांत एकमत करून सर्वांच्या नमस्कृति स्वतः स्वीकारून त्या देवांकडे पोंचविणार्‍या तुझ्या पावलांवरून तुझा शोध लावला व ते सर्व पुण्यशील पुरुष तुझ्यासमीप विराजमान झाले. ॥ १ ॥


ऋ॒तस्य॑ दे॒वा अनु॑ व्र॒ता गु॒र्भुव॒त्परि॑ष्टि॒र्द्यौर्न भूम॑ ॥
वर्ध॑न्ती॒मापः॑ प॒न्वा सुशि॑श्विमृ॒तस्य॒ योना॒ गर्भे॒ सुजा॑तम् ॥ २ ॥

ऋतस्य देवाः अनु व्रता गुः भुवत् परिष्टिः द्यौः न भूम ॥
वर्धंति ईं आपः पन्वा सुऽशिश्विं ऋतस्य योना गर्भे सुऽजातम् ॥ २ ॥

सत्यनियमांपासून उत्पन्न झालेल्या अनुशासनांचे देवांनी परिपालन केले. स्वर्गाप्रमाणे पृथ्वीही त्या सत्यनियमांचे आश्रयस्थान झाली. प्रत्यक्ष सत्यानें जेथें जन्म घेतला अशा गर्भांतून अतिशय थाटामाटांत ज्याचें जनन झालें तो अग्नि वृद्धिंगत होऊं लागला असतां सर्व उदकांनी त्याचें स्तवन करून त्याच्या वर्धनास उत्तेजन दिले. ॥ २ ॥


पु॒ष्टिर्न र॒ण्वा क्षि॒तिर्न पृ॒थ्वी गि॒रिर्न भुज्म॒ क्षोदो॒ न श॒म्भु ॥
अत्यो॒ नाज्म॒न्सर्ग॑प्रतक्तः॒ सिन्धु॒र्न क्षोदः॒ क ईं॑ वराते ॥ ३ ॥

पुष्टिः न रण्वा क्षितिः न पृथ्वी गिरिः न भुज्म क्षोदः न शंऽभु ॥
अत्यः न अज्मन् सर्गऽप्रतक्तः सिंधुः न क्षोदः कः ईं वराते ॥ ३ ॥

उत्कर्ष जसा रमणीय असतो, पृथ्वी जशी विस्तीर्ण आहे, गिरि जसा पुष्पफलादिक भोग्यवस्तूंनी परिपूर्ण असतो, उदक जसें हितकर असते, धांवत असतांही जास्त चेतविलेला घोडा जसा आणखी दौड करतो अथवा एखादी महानदी ज्याप्रमाणे आपले तट भंगून टाकील अशी सामर्थ्यवान् असते, तसा हा अग्नि आहे. खरोखर ह्यास कोण प्रतिबंध करूं शकेल ? ॥ ३ ॥


जा॒मिः सिन्धू॑नां॒ भ्राते॑व॒ स्वस्रा॒मिभ्या॒न्न राजा॒ वना॑न्यत्ति ॥
यद्वात॑जूतो॒ वना॒ व्यस्था॑द॒ग्निर्ह॑ दाति॒ रोमा॑ पृथि॒व्याः ॥ ४ ॥

जामिः सिंधूनां भ्राताऽइव स्वस्रां इभ्यान् न राजा वनानि अत्ति ॥
यत् वातऽजूतः वना वि अस्थात् अग्निः ह दाति रोम पृथिव्याः ॥ ४ ॥

हा नद्यांचा जिवलग आप्त आहे कीं जणूं कांही त्या बहिणी व हा भाऊच. ज्याप्रमाणे एखादा नृपति शत्रूंचा संहार करतो त्याप्रमाणे हा सबंध अरण्यांचे भक्षण करतो. ज्याप्रमाणे वायूनें प्रेरित होऊन ह्याचा मोर्चा वनांचेकडे वळलेला असतो त्यावेळी खरोखर हा अग्नि पृथ्वीचे जणूं कांही केंसच कापून टाकतो. ॥ ४ ॥


श्वसि॑त्य॒प्सु हं॒सो न सीद॒न् क्रत्वा॒ चेति॑ष्ठो वि॒शामु॑ष॒र्भुत् ॥
सोमो॒ न वे॒धा ऋ॒तप्र॑जातः प॒शुर्न शिश्वा॑ वि॒भुर्दू॒रेभाः॑ ॥ ५ ॥

श्वसिति अप्ऽसु हंसः न सीदन् क्रत्वा चेतिष्ठः विशां उषःभुत् ॥
सोमः न वेधा ऋतऽप्रजातः पशुः न शिश्वा विऽभुः दूरेऽभाः ॥ ५ ॥

हंसाप्रमाणे उदकांत बसून हा श्वासोच्छवास करतो. हा आपल्या बुद्धिवान्‍पणामुळें अतिशय ज्ञानशील आहे. सर्व लोकांस प्रभातकालीं हा जागृत करतो. सोमाप्रमाणे ह्याचे अंगांत तरतरी आहे. ह्याचा जन्म सत्यापासून झालेला आहे. ज्याप्रमाणे एखादें जनावर पुष्ट असलें म्हणजे देखणें दिसतें त्याप्रमाणें हा दिसतो. हा सर्वव्यापी आहे. ह्याची कांती दूरवर पसरते. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ६६ ( अग्नि सूक्त )

ऋषि - पराशर शाक्त्य : देवता - अग्नि : छंद - द्विपदा विराट्


र॒यिर्न चि॒त्रा सूरो॒ न सं॒दृगायु॒र्न प्रा॒णो नित्यो॒ न सू॒नुः ॥
तक्वा॒ न भूर्णि॒र्वना॑ सिषक्ति॒ पयो॒ न धे॒नुः शुचि॑र्वि॒भावा॑ ॥ १ ॥

रयिः न चित्रा सूरः न संऽदृक् आयुः न प्राणः नित्यः न सूनुः ॥
तक्वा न भूर्णिः वना सिसक्ति पयः न धेनुः शुचिः विभाऽवा ॥ १ ॥

तेजस्वी व प्रभावशील असा हा अग्नि आश्चर्यप्रद संपत्तीप्रमाणे, सर्वदर्शी सूर्याप्रमाणें, जीवनप्रद आयुष्याप्रमाणे, स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणें, व चपल अश्वाप्रमाणें असून ज्याप्रमाणें धेनु दुग्धास धारण करते त्याप्रमाणें वनांतील वृक्षांना बळकट धरून ठेवतो. ॥ १ ॥


दा॒धार॒ क्षेम॒मोको॒ न र॒ण्वो यवो॒ न प॒क्वो जेता॒ जना॑नाम् ॥
ऋषि॒र्न स्तुभ्वा॑ वि॒क्षु प्र॑श॒स्तो वा॒जी न प्री॒तो वयो॑ दधाति ॥ २ ॥

दाधार क्षेमं ओकः न रण्वः यवः न पक्वः जेता जनानाम् ॥
ऋषिः न स्तुभ्वा विक्षु प्रऽशस्तः वाजी न प्रीतः वयः दधाति ॥ २ ॥

सर्व लोकांवर विजय मिळविणारा हा अग्नि पक्व झालेल्या शेतांतील धान्याप्रमाणें अथवा शोभिवंत अशा एखाद्या मंदिराप्रमाणें असून त्यानें भक्तांचे क्षेम राहील असें केलें आहे. स्तोत्रे गाण्यांत मग्न झालेला ऋषि अथवा सर्वांचा आवडता असा एकादा अश्व ह्यांची जशी सर्व जनांत तारीफ होते तशी ह्याची विश्वांत प्रशंसा होत असते व हा सर्वांस त्यांचे हीवन अर्पण करतो. ॥ २ ॥


दु॒रोक॑शोचिः॒ क्रतु॒र्न नित्यो॑ जा॒येव॒ योना॒वरं॒ विश्व॑स्मै ॥
चि॒त्रो यदभ्रा॑ट् श्वे॒तो न वि॒क्षु रथो॒ न रु॒क्मी त्वे॒षः स॒मत्सु॑ ॥ ३ ॥

दुरोकऽशोचिः क्रतुः न नित्यः जायाऽइव योनौ अरं विश्वस्मै ॥
चित्रः यत् अभ्राट् श्वेतः न विक्षु रथः न रुक्मी त्वेषः समत्ऽसु ॥ ३ ॥

शाश्वत टिकणार्‍या सामर्थ्याप्रमाणे अथवा स्वगृहांतील प्रियपत्नीप्रमाणें हा सर्वांस पूज्य व प्रिय असून ह्याचें तेज दूरवर पसरणारे आहे व सर्व विश्वाची हा तृप्ति करणारा आहे. जेव्हां आपल्या चित्रविचित्र कांतीनें हा विराजमान झालेला असतो त्यावेळीं सुवर्णाप्रमाणें, अथवा जनसमुदायांत आपल्या तेजानें तळपणार्‍या एखाद्या तेजस्वी पुरुषाप्रमाणें, हा शोभावयास लागतो. संग्रामामध्यें ह्याचा त्वेष फार तीव्र असतो. ॥ ३ ॥


सेने॑व सृ॒ष्टामं॑ दधा॒त्यस्तु॒र्न दि॒द्युत्त्वे॒षप्र॑तीका ॥
य॒मो ह॑ जा॒तो य॒मो जनि॑त्वं जा॒रः क॒नीनां॒ पति॒र्जनी॑नाम् ॥ ४ ॥

सेनाऽइव सृष्टा अमं दधाति अस्तुः न दिद्युत् त्वेषऽप्रतीका ॥
यमः ह जातः यमः जनिऽत्वं जारः कनीनां पतिः जनीनाम् ॥ ४ ॥

शत्रूविरुद्ध पाठविलेल्या सेनेप्रमाणें अथवा एखाद्या अस्त्रकुशल वीरानें त्वेषानें फेंकलेल्या दीप्तिमान् बाणाप्रमाणें हा भिती उत्पन्न करतो. हा मूर्तिमान् यमच आहे- मग त्यानें जन्म धारण केलेला असो अथवा त्याचें मानस जन्म घेण्याच्या तयारींत असो. हा कुमारिकांचा वल्लभ व विवाहित स्त्रियांचा नाथ आहे. ॥ ४ ॥


तं व॑श्च॒राथा॑ व॒यं व॑स॒त्यास्तं॒ न गावो॒ नक्ष॑न्त इ॒द्धम् ॥
सिन्धु॒र्न क्षोदः॒ प्र नीची॑रैनो॒न्नव॑न्त॒ गावः॒ स्व१॑र्दृशी॑के ॥ ५ ॥

तं वः चराथा वयं वसत्या अस्तं न गावः नक्षंते इद्धम् ॥
सिंधुः न क्षोदः प्र नीचीः ऐनोन् नवंत गावः स्वः दृशीके ॥ ५ ॥

ज्याप्रमाणे धेनु स्वगृहाकडे गमन करतात त्याप्रमाणें, तुम्हांस प्रिय असा जो अग्नि तो प्रज्वलित झाला असतां, आम्ही आपल्या स्थावर व जंगम संपत्तीसह त्या अग्नीकडे गमन करतो. एखाद्या महानदीप्रमाणे जलाचे प्रवाह उतरत्या मार्गानें व्हावयास ह्यानेंच लावले. धेनूही वरती सूर्याकडे पाहून हंबरावयास लागल्या. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ६७ ( अग्नि सूक्त )

ऋषि - पराशर शाक्त्य : देवता - अग्नि : छंद - द्विपदा विराट्


वने॑षु जा॒युर्मर्ते॑षु मि॒त्रो वृ॑णी॒ते श्रु॒ष्टिं राजे॑वाजु॒र्यम् ॥
क्षेमो॒ न सा॒धुः क्रतु॒र्न भ॒द्रो भुव॑त्स्वा॒धीर्होता॑ हव्य॒वाट् ॥ १ ॥

वनेषु जायुः मर्तेषु मित्रः वृणीते श्रुष्टिं राजाऽइव अजुर्यम् ॥
क्षेमः न साधुः क्रतुः न भद्रः भुवत् सुऽआधीः होता हव्यऽवाट् ॥ १ ॥

अरण्यें दग्ध करून विजय संपादन करून हा मनुष्य जातीचा कल्याणकर्ता, एखाद्या राजाप्रमाणें, जो उपासक सेवेनें थकल्यासारखा होणार नाहीं अशा सेवकास चाहतो. मनुष्याचें क्षेम जसें त्यास सुखदायक असतें अथवा बुद्धिसामर्थ्य जसे मनुष्याचे उपयोगी पडतें त्याप्रमाणे सौख्यकारक असणारा हा अत्यंत प्रज्ञाशील अग्नि आमचे हवि देवांप्रत नेऊन त्यांस ते अर्पण करो. ॥ १ ॥


हस्ते॒ दधा॑नो नृ॒म्णा विश्वा॒न्यमे॑ दे॒वान्धा॒द्गुहा॑ नि॒षीद॑न् ॥
वि॒दन्ती॒मत्र॒ नरो॑ धियं॒धा हृ॒दा यत्त॒ष्टान् मन्त्राँ॒ अशं॑सन् ॥ २ ॥

हस्ते दधानः नृम्णा विश्वानि अमे देवान् धात् गुहा निऽसीदन् ॥
विदंतीं अत्र नरः धियंऽधाः हृदा यत् तष्टान् मंत्रान् अशंसन् ॥ २ ॥

सर्व वैभवें आपल्या हातांत वागविणार्‍या ह्या देवानें गुहेंत लपून बसून मोठ्या घोरांत पाडलें. मन तल्लीन करून रचलेल्या प्रार्थना जेव्हां बुद्धिवान् भक्तजन प्रेमानें गात बसलेले असतात त्यावेळी ह्या देवाचें ह्या जगांत ज्ञान होते. ॥ २ ॥


अ॒जो न क्षां दा॒धार॑ पृथि॒वीं त॒स्तम्भ॒ द्यां मन्त्रे॑भिः स॒त्यैः ॥
प्रि॒या प॒दानि॑ प॒श्वो नि पा॑हि वि॒श्वायु॑रग्ने गु॒हा गुहं॑ गाः ॥ ३ ॥

अजः न क्षां दाधार पृथिवीं तस्तंभ द्यां मंत्रेभिः सत्यैः ॥
प्रिया पदानि पश्वः नि पाहि विश्वऽआयुः अग्ने गुहा गुहं गाः ॥ ३ ॥

जन्मरहित अशा परमेश्वराप्रमाणें ह्यानें विस्तीर्ण पृथ्वीचें पोषण केलें आहे, सत्यस्फुरित प्रार्थनांच्या योगाने त्यानें द्युलोकास सांवरून धरलें आहे. हे अग्निदेवा, तूं विश्वाचा प्राण आहेस, तूं गुहागुहांतून परिभ्रमण करीत असतोस, परंतु आमच्या पशूंची जेवढीं चरण्याची आवडतीं ठिकाणें असतील तेवढ्यांचा अवश्य बचाव कर. ॥ ३ ॥


य ईं॑ चि॒केत॒ गुहा॒ भव॑न्त॒मा यः स॒साद॒ धारा॑मृ॒तस्य॑ ॥
वि ये चृ॒तन्त्यृ॒ता सप॑न्त॒ आदिद्‍वसू॑नि॒ प्र व॑वाचास्मै ॥ ४ ॥

य ईं चिकेत गुहा भवंतं आ यः ससाद धारां ऋतस्य ॥
वि ये चृतंति ऋता सपंत आत् इत् वसूनि प्र ववाच अस्मै ॥ ४ ॥

गुहेमध्यें निवास करणार्‍या ह्या अग्निदेवाचें जास्त ज्ञान करून घेण्याची इच्छा आहे. सत्यरूपी अमृताची धारा प्राशन करण्याकरितां जो तिच्या सभोंवती टपून बसलेला असतो व जो अग्नीच्या सत्य नियमांचे परिपालन करून त्यास त्याच्या निवासस्थानांतून बाहेर आणतो त्याला तो संपत्ति प्राप्त होण्याबद्दल आशीर्वचनें देतो. ॥ ४ ॥


वि यो वी॒रुत्सु॒ रोध॑न्महि॒त्वोत प्र॒जा उ॒त प्र॒सूष्व॒न्तः ॥
चित्ति॑र॒पां दमे॑ वि॒श्वायुः॒ सद्मे॑व॒ धीराः॑ स॒म्माय॑ चक्रुः ॥ ५ ॥

वि यः वीरुत्ऽसु रोधन् महिऽत्वा उत प्रऽजाः उत प्रऽसूषु अंतरिति ॥
चित्तिः अपां दमे विश्वऽआयुः सद्मऽइव धीराः संऽमाय चक्रुः ॥ ५ ॥

जो आपल्या सामर्थ्यानें लतासमुदायांत वृद्धिंगत होतो, जो त्यांचे अपत्यच होय, व जो आपल्या जननीमध्यें राहतो, जो प्रज्ञाशील आहे व जो विश्वाचा जणूं कांही प्राणच होय, तो अग्निदेव जलांच्या गृहांत वास करतो. सुज्ञलोकांनी त्या गृहाचें माप घेऊन तें त्यांचे जणूं मंदिरच केलें आहे. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ६८ ( अग्नि सूक्त )

ऋषि - पराशर शाक्त्य : देवता - अग्नि : छंद - द्विपदा विराट्


श्री॒णन्नुप॑ स्था॒द्दिवं॑ भुर॒ण्युः स्था॒तुश्च॒रथ॑म॒क्तून्व्यूर्णोत् ॥
परि॒ यदे॑षा॒मेको॒ विश्वे॑षां॒ भुव॑द्दे॒वो दे॒वानां॑ महि॒त्वा ॥ १ ॥

श्रीणन् उप स्थात् दिवं भुरण्युः स्थातुः चरथं अक्तून् वि ऊर्णोत् ॥
परि यत् एषां एकः विश्वेषां भुवत् देवः देवानां महिऽत्वा ॥ १ ॥

सर्व वस्तू परिपक्वतेस पोंचवीत हा चपल अग्नि द्युलोकावर आरूढ झाला आहे. स्थावरापासून जंगमापर्यंत सर्व वस्तूंस- इतकेंच काय पण रात्रींसही - त्यानें सुप्रकाशित केलें आहे. हा देव ह्या सर्व वस्तूं एकटा वेष्टून टाकून आपल्या श्रेष्ठ गुणांमुळे देवांतील प्रमुख देव होऊन बसला आहे. ॥ १ ॥


आदित्ते॒ विश्वे॒ क्रतुं॑ जुषन्त॒ शुष्का॒द्यद्दे॑व जी॒वो जनि॑ष्ठाः ॥
भज॑न्त॒ विश्वे॑ देव॒त्वं नाम॑ ऋ॒तं सप॑न्तो अ॒मृत॒मेवैः॑ ॥ २ ॥

आत् इत् ते विश्वे क्रतुं जुषंत शुष्कात् यत् देव जीवः जनिष्ठाः ॥
भजंत विश्वे देवऽत्वं नाम ऋतं सपंतः अमृतं एवैः ॥ २ ॥

ज्यावेळीं हे देवा, तूं जीव बनून शुष्क काष्ठापासून जन्म घेतलास त्यावेळी तुझ्या बुद्धिसामर्थ्याची त्या सर्वांनी वाहवा केली. आपापल्या मार्गांनी तुझ्या अविनाशी सत्य नियमांचे जेव्हां त्यांनी परिपालन केले त्यावेळी त्या सर्वांस ’देव’ ही संज्ञा प्राप्त झाली. ॥ २ ॥


ऋ॒तस्य॒ प्रेषा॑ ऋ॒तस्य॑ धी॒तिर्वि॒श्वायु॒र्विश्वे॒ अपां॑सि चक्रुः ॥
यस्तुभ्यं॒ दाशा॒द्यो वा॑ ते॒ शिक्षा॒त्तस्मै॑ चिकि॒त्वान्‍र॒यिं द॑यस्व ॥ ३ ॥

ऋतस्य प्रेषाः ऋतस्य धीतिः विश्वऽआयुः विश्वे अपांसि चक्रुः ॥
यः तुभ्यं दाशात् यः वा ते शिक्षात् तस्मै चिकित्वान् रयिं दयस्व ॥ ३ ॥

सत्यनियमांचा हा प्रेरक आहे. सत्यनियमांचा हा कल्पक आहे. सर्व विश्वाचा हा प्राण आहे. ह्याच्यामुळेंच सर्व लोक आपापल्या कर्मास प्रवृत्त होतात. तूं ज्ञानवान् आहेस. जो तुला हवि अर्पण करील, अथवा जो तुझी सेवा करील त्यास तूं संपत्ति दे. ॥ ३ ॥


होता॒ निष॑त्तो॒ मनो॒रप॑त्ये॒ स चि॒न्न्वासां॒ पती॑ रयी॒णाम् ॥
इ॒च्छन्त॒ रेतो॑ मि॒थस्त॒नूषु॒ सं जा॑नत॒ स्वैर्दक्षै॒रमू॑राः ॥ ४ ॥

होता निऽसत्तः मनोः अपत्ये सः चिन् नु आसां पतीः रयीणाम् ॥
इच्छंत रेतः मिथः तनूषु सं जानत स्वैः दक्षैः अमूराः ॥ ४ ॥

मनूच्या अपत्यांचे समुदायांत हा ’हविर्दाता’ होऊन बसला आहे. सर्व संपत्तीचा हा खरोखर स्वामी आहे. आपल्या शरांत वीर्य असावें अशी स्त्रीपुरुषांना परस्परांस इच्छा झाली तेव्हां त्यांचेवर मनोभंग होण्याचा प्रसंग न येतां त्यांस आपल्या शक्तीच्या योगानें संततिलाभ करून घेतां आला. ॥ ४ ॥


पि॒तुर्न पु॒त्राः क्रतुं॑ जुषन्त॒ श्रोष॒न्ये अ॑स्य॒ शासं॑ तु॒रासः॑ ॥
वि राय॑ और्णो॒द्दुरः॑ पुरु॒क्षुः पि॒पेश॒ नाकं॒ स्तृभि॒र्दमू॑नाः ॥ ५ ॥

पितुः न पुत्राः क्रतुं जुषंत श्रोषन् ये अस्य शासं तुरासः ॥
वि रायः और्णोत् दुरः पुरुऽक्षुः पिपेश नाकं स्तृभिः दमूनाः ॥ ५ ॥

ज्यांनी ह्याच्या आज्ञा ताबडतोब ऐकलेल्या आहेत त्यांना, ज्याप्रमाणें पुत्राला पित्याचा अधिकार प्राप्त होतो त्याप्रमाणें, ह्याचें सामर्थ्य प्राप्त झालेलें आहे. सर्वांच्या पोषणाची व्यवस्था करणार्‍या ह्या अग्नीनें, एखाद्या गृहाचीं द्वारें खुली केल्याप्रमाणें, आपली संपत्ति खुली करून ठेवली आहे. सर्वांच्या गृहस्वास्थांत आनंद मानणार्‍या ह्या अग्नीनें नक्षत्रांचे योगानें स्वर्गास शोभा आणिली आहे. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ६९ ( अग्नि सूक्त )

ऋषि - पराशर शाक्त्य : देवता - अग्नि : छंद - द्विपदा विराट्


शु॒क्रः शु॑शु॒क्वाँ उ॒षो न जा॒रः प॒प्रा स॑मी॒ची दि॒वो न ज्योतिः॑ ॥
परि॒ प्रजा॑तः॒ क्रत्वा॑ बभूथ॒ भुवो॑ दे॒वानां॑ पि॒ता पु॒त्रः सन् ॥ १ ॥

शुक्रः शुशुक्वान् उषः न जारः पप्रा समीची इति संऽईची दिवः न ज्योतिः ॥
परि प्रऽजातः क्रत्वा बभूथ भुवः देवानां पिता पुत्रः सन् ॥ १ ॥

उषेच्या वल्लभाप्रमाणे हा उज्ज्वल व देदीप्यमान असून स्वर्गांतील ज्योतीप्रमाणे द्युलोक व पृथ्वी ह्यांचे आक्रमण करतो. जन्म घेतल्याबरोबर ह्याने आपल्या सामर्थ्यानें सर्व जग वेढून टाकले व पुत्र असतांही तो देवांचा पिता झाला. ॥ १ ॥


वे॒धा अदृ॑प्तो अ॒ग्निर्वि॑जा॒नन्नूध॒र्न गोनां॒ स्वाद्मा॑ पितू॒नाम् ॥
जने॒ न शेव॑ आ॒हूर्यः॒ सन्मध्ये॒ निष॑त्तो र॒ण्वो दु॑रो॒णे ॥ ॥ २ ॥

वेधा अदृप्तः अग्निः विऽजानन् ऊधः न गोनां स्वाद्म पितूनाम् ॥
जने न शेवः आऽहूर्यः सन् मध्ये निऽसत्तः रण्वः दुरोणे ॥ ॥ २ ॥

ह्या अग्नीचे ठिकाणी कर्तृत्वशक्ति फार आहे. ह्याचें ज्ञान विशाल असतांही ह्यास गर्वाचा विटाळ नाही. धेनूंच्या कांसेप्रमाणें पेय पदार्थांतील हा मूर्तिमंत माधुर्यच आहे. ह्याचा ताप दुर्धर असतांही प्रत्यक्ष सौख्याप्रमाणें हा जनांस आनंद देणारा आहे. घराच्या मध्यभागीं स्थित असतांही हा रमणीय दिसतो. ॥ २ ॥


पु॒त्रो न जा॒तो र॒ण्वो दु॑रो॒णे वा॒जी न प्री॒तो विशो॒ वि ता॑रीत् ॥
विशो॒ यदह्वे॒ नृभिः॒ सनी॑ळा अ॒ग्निर्दे॑व॒त्वा विश्वा॑न्यश्याः ॥ ३ ॥

पुत्रः न जातः रण्वः दुरोणे वाजी न प्रीतः विशः वि तारीत् ॥
विशः यत् अह्वे नृभिः सऽनीळा अग्निः देवऽत्वा विश्वानि अश्याः ॥ ३ ॥

पोटी पुत्र जन्मास आला म्हणजे तो जसा घरांत पित्यास रमणीय दिसतो तसा हा रमणीय वाटतो. आवडत्या घोड्याप्रमाणे हा अवघड प्रसंग निभावून नेतो. मनुष्यांशी सहवास करण्यांत ज्या देवसमुदायांस आनंद वाटतो त्यास मी जेव्हां जेव्हां आपल्या यज्ञाकडे बोलावतो तेव्हां तेव्हां त्या सर्वांचा हाच दूत होऊन येतो. ॥ ३ ॥


नकि॑ष्ट ए॒ता व्र॒ता मि॑नन्ति॒ नृभ्यो॒ यदे॒भ्यः श्रु॒ष्टिं च॒कर्थ॑ ॥
तत्तु ते॒ दंसो॒ यदह॑न्समा॒नैर्नृभि॒र्यद्यु॒क्तो वि॒वे रपां॑सि ॥ ४ ॥

नकिः ते एता व्रता मिनंति नृऽभ्यः यत् एभ्यः श्रुष्टिं चकर्थ ॥
तत् तु ते दंसः यत् अहन् समानैः नृऽभिः यत् युक्तः विवेः रपांसि ॥ ४ ॥

ज्या अर्थीं ह्या सर्व मानवांकडे तूं आजपर्यंत लक्ष्य पुरविलेलें आहेस त्या अर्थीं ह्या तुझ्या आज्ञा मोडण्यास वस्तुतः कोणीच उद्युक्त होणार नाही. खरोखर तो तुझाच पराक्रम होय कीं समबल अशा देवांच्या साहाय्यानें तुं शत्रूंचा वध केला व वीर पुरुषांस हाताशीं घेऊन तूं दुर्भाषणी निंदकाची दाणादाण करून टाकली. ॥ ४ ॥


उ॒षो न जा॒रो वि॒भावो॒स्रः संज्ञा॑तरूप॒श्चिके॑तदस्मै ॥
त्मना॒ वह॑न्तो॒ दुरो॒ व्यृण्व॒न्नव॑न्त॒ विश्वे॒ स्व१॑र्दृशी॑के ॥ ५ ॥

उषः न जारः विभाऽवा उस्रः संज्ञातऽरूपः चिकेतत् अस्मै ॥
त्मना वहंतः दुरः वि ऋण्वन् नवंत विश्वे स्वः दृशीके ॥ ५ ॥

उषेच्या वल्लभप्रमाणें देदीप्यमान व तेजस्वी असणार्‍या ह्या अग्नीची कांति सर्वांच्या ओळखीची आहे. आपल्या स्वतःच्या प्रेरणेनें रथ वाहून नेणार्‍या अग्नीच्या अश्वांनी द्वारें उघडली व सूर्यदर्शन झाल्याबरोबर आनंदाचा शब्द केला. ॥ ५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ७० ( अग्नि सूक्त )

ऋषि - पराशर शाक्त्य : देवता - अग्नि : छंद - द्विपदा विराट्


व॒नेम॑ पू॒र्वीर॒र्यो म॑नी॒षा अ॒ग्निः सु॒शोको॒ विश्वा॑न्यश्याः ॥
आ दैव्या॑नि व्र॒ता चि॑कि॒त्वाना मानु॑षस्य॒ जन॑स्य॒ जन्म॑ ॥ १ ॥

वनेम पूर्वीः अर्यः मनीषा अग्निः सुशोकः विश्वानि अश्याः ॥
आ दैव्यानि व्रता चिकित्वान् आ मानुषस्य जनस्य जन्म ॥ १ ॥

अग्नीची उपासना करणारे आम्ही त्याची मनःपूर्वक स्तुति करून भरपूर प्राप्त होण्याबद्दल याचना करूं. कारण हा अत्यंत तेजःपुंज अग्नि सर्व विश्वास व्याप्त करून टाकणारा आहे. देवलोकांतील नियमांचे ह्यास पूर्ण ज्ञान आहे व मनुष्यजातींतील प्राणी कसे जन्म पावतात हें हा उत्तम रीतीनें जाणतो. ॥ १ ॥


गर्भो॒ यो अ॒पां गर्भो॒ वना॑नां॒ गर्भ॑श्च स्था॒तां गर्भ॑श्च॒रथा॑म् ॥
अद्रौ॑ चिदस्मा अ॒न्तर्दु॑रो॒णे वि॒शां न विश्वो॑ अ॒मृतः॑ स्वा॒धीः ॥ २ ॥

गर्भः यः अपां गर्भः वनानां गर्भश्च स्थातां गर्भः चरथाम् ॥
अद्रौ चित् अस्मै अंतः दुरोणे विशां न विश्वः अमृतः सुऽआधीः ॥ २ ॥

उदकांचा जो गर्भ आहे, जो तरुलतादिकांचा गर्भ आहे, जो चर व अचर सृष्टीचाही गर्भ आहे, त्या ह्या अग्नीपुढें, मग तो अंतर्भागांत असो कीं गृहांच्या अंतर्भागांत असो, मानव जातींतील प्रत्येक मनुष्य व त्याचप्रमाणें अमरांचा समुदायही संतोषानें नम्र होतो. ॥ २ ॥


स हि क्ष॒पावाँ॑ अ॒ग्नी र॑यी॒णां दाश॒द्यो अ॑स्मा॒ अरं॑ सू॒क्तैः ॥
ए॒ता चि॑कित्वो॒ भूमा॒ नि पा॑हि दे॒वानां॒ जन्म॒ मर्तां॑श्च वि॒द्वान् ॥ ३ ॥

सः हि क्षपाऽवान् अग्निः रयीणां दाशत् यः अस्मै अरं सुऽउक्तैः ॥
एता चिकित्वः भूम नि पाहि देवानां जन्म मर्तान् च विद्वान् ॥ ३ ॥

जो ह्या अग्नीस उत्तम स्तोत्रांसह तृप्ति होईपर्यंत हवि अर्पण करतो, त्याचेकरितां हा रात्रीचा स्वामी अग्नि धनाचें भांडार देतो. देवांचा जन्म व मर्त्यजन ह्यांचे ज्यास ज्ञान आहे अशा हे ज्ञानशील अग्निदेवा, ह्या सर्व भूप्रदेशांचें संरक्षण कर. ॥ ३ ॥


वर्धा॒न्यं पू॒र्वीः क्ष॒पो विरू॑पाः स्था॒तुश्च॒ रथ॑मृ॒तप्र॑वीतम् ॥
अरा॑धि॒ होता॒ स्व१॑र्निष॑त्तः कृ॒ण्वन्विश्वा॒न्यपां॑सि स॒त्या ॥ ४ ॥

वर्धान् यं पूर्वीः क्षपः विऽरूपाः स्थातुः च रथं ऋतऽप्रवीतम् ॥
अराधि होता स्वः निऽसत्तः कृण्वन् विश्वानि अपांसि सत्या ॥ ४ ॥

स्वर्गांत अधिष्ठित झालेला हा हविर्दाता अग्नि सत्यानें परिपूर्ण असे पराक्रम करीत असतां त्याची आराधना आमचेकडून झालेली आहे. हा सत्यानें परिवेष्टीत आहे. ह्याचें वर्धन भिन्न भिन्न स्वरूपांच्या अनेक रात्रींनी व त्याचप्रमाणे स्थावर जंगम सर्व पदार्थांनी केलें आहे. ॥ ४ ॥


गोषु॒ प्रश॑स्तिं॒ वने॑षु धिषे॒ भर॑न्त॒ विश्वे॑ ब॒लिं स्वर्णः ॥
वि त्वा॒ नरः॑ पुरु॒त्रा स॑पर्यन्पि॒तुर्न जिव्रे॒र्वि वेदो॑ भरन्त ॥ ५ ॥

गोषु प्रऽशस्तिं वनेषु धिषे भरंत विश्वे बलिं स्वः नः ॥
वि त्वा नरः पुरुऽत्रा सपर्यन् पितुः न जिव्रेः वि वेदः भरंत ॥ ५ ॥

तूं आमच्या धेनूंची प्रशंसा करवितोस, तूं आमच्या तब्यांतील वनांची प्रशंसा करवितोस. आमच्या द्युलोकांतील सर्व मनुष्यें तुला स्वर्गांतील बलि अर्पण करतात. तुझी अनेक स्थानी मानवांकडून स्तुति झाली आहे व वृद्ध झालेल्या पित्याची संपत्ति ज्याप्रमाणें त्याच्या पुत्रांस प्राप्त होते त्याप्रमाणें तुझेकडून त्यांस संपत्ति मिळालेली आहे. ॥ ५ ॥


सा॒धुर्न गृ॒ध्नुरस्ते॑व॒ शूरो॒ याते॑व भी॒मस्त्वे॒षः स॒मत्सु॑ ॥ ६ ॥

साधुः न गृध्नुः अस्ताऽइव शूरः याताऽइव भीमः स्त्वेषः समत्ऽसु ॥ ६ ॥

तो कार्यसाधु मनुष्याप्रमाणें आपला मतलब पकडणारा, अस्त्रकुशल मनुष्याप्रमाणें शूर, सूड उगविणार्‍या खुनशी माणसाप्रमाणें भयप्रद व संग्रामांत उग्रपणा धारण करणारा आहे. ॥ ६ ॥


ॐ तत् सत्


GO TOP