PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ५१ ते ६०

ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ५१ ( इंद्र सूक्त )

ऋषि - सव्य अङ्‌गिरस : देवता - इंद्र : छंद - जगती; त्रिष्टुभ्


अ॒भि त्यं मे॒षं पु॑रुहू॒तमृ॒ग्मिय॒मिन्द्रं॑ गी॒र्भिर्म॑दता॒ वस्वो॑ अर्ण॒वम् ॥
यस्य॒ द्यावो॒ न वि॒चर॑न्ति॒ मानु॑षा भु॒जे मंहि॑ष्ठम॒भि विप्र॑मर्चत ॥ १ ॥

अभि त्यं मेषं पुरुऽहूतं ऋग्मियं इंद्रं गीःऽभिः मदत वस्वः अर्णवम् ॥
यस्य द्यावः न वि*चरंति मानुषा भुजे मंहिष्ठं अभि विप्रं अर्चत ॥ १ ॥

त्या मेषरूपधारी इंद्रास स्तुतींनी संतुष्ट करा. ह्यास संकटकाळी अनेकांनी पाचारण केलेले आहे, ह्याची स्तोत्रें सर्वत्र गाईली जातात व हा संपत्तीचा महोदधि आहे. ज्याची मानवांच्या कल्याणार्थ केलेलीं कृत्यें किरणांप्रमाणेंच जिकडे जावे तिकडे दृगोचर होतात त्या अत्यंत उदार व प्रज्ञाशाली इंद्राचें अर्चन करा. ॥ १ ॥


अ॒भीम॑वन्वन्स्वभि॒ष्टिमू॒तयो॑ ऽन्तरिक्ष॒प्रां तवि॑षीभि॒रावृ॑तम् ॥
इन्द्रं॒ दक्षा॑स ऋ॒भवो॑ मद॒च्युतं॑ श॒तक्र॑तुं॒ जव॑नी सू॒नृतारु॑हत् ॥ २ ॥

अभि ईं अवन्वन् सुऽअभिष्टिं ऊतयः अन्तरिक्षऽप्रां तविषीभिः आवृतम् ॥
इंद्रं दक्षासः ऋभवः मदऽच्युतं शतऽक्रतुं जवनी सूनृता आ अरुहत् ॥ २ ॥

सामर्थ्यवान् ऋभु, इंद्रास साहाय्यभूत होऊन, भक्तांचे संरक्षण करण्यास सर्व तर्‍हेने समर्थ, अंतरिक्षास व्यापून राहिलेल्या, अखिल सामर्थ्यांनी युक्त व शत्रूंच्या आनंदाचा बिघाड करणार्‍या अशा ह्या इंद्राकडे आले. ह्या अत्यंत पराक्रमी इंद्रास त्यांच्या उत्तेजनपर शब्दांनी स्फुरण चढविलें. ॥ २ ॥


त्वं गो॒त्रमङ्‍गि॑रोभ्योऽवृणो॒रपो॒तात्र॑ये श॒तदु॑रेषु गातु॒वित् ॥
स॒सेन॑ चिद्विम॒दाया॑वहो॒ वस्वा॒जावद्रिं॑ वावसा॒नस्य॑ न॒र्तय॑न् ॥ ३ ॥

त्वं गोत्रं अङ्‍गिरःऽभ्यः अवृणोः अप उत अत्रये शतऽदुरेषु गातुऽवित् ॥
ससेन चित् विऽमदाय अवहः वसु आजौ अद्रिं ववसानस्य नर्तयन् ॥ ३ ॥

जेथे धेनूंना कोंडून ठेवलें होते तो दुर्ग तूं अंगिरसाकरितां उघडलास आणि शेंकडो दरवाज्यांमधून तूं अत्रीकरितां मार्ग शोधून काढलास. वावसानाच्या युद्धांत आपले वज्र शत्रुसमुदायांतून नाचवीत तूं विमदाला धनधान्य अर्पण केलेंस ॥ ३ ॥


त्वम॒पाम॑पि॒धाना॑वृणो॒रपाधा॑रयः॒ पर्व॑ते॒ दानु॑म॒द्वसु॑ ॥
वृ॒त्रं यदि॑न्द्र॒ शव॒साव॑धी॒रहि॒मादित्सूर्यं॑ दि॒व्यारो॑हयो दृ॒शे ॥ ४ ॥

त्वं अपां अपिऽधाना अवृणोः अप अधारयः पर्वते दानुऽमत् वसु ॥
वृत्रं यत् इंद्र शवसा अवधीः अहिं आत् इत् सूर्यं दिवि आ आरोहयः दृशे ॥ ४ ॥

तूं उदकांवरील आवरण काढून टाकलेंस व पर्वतांत शिरून विपुल संपत्ति हस्तगत करून घेतलीस. जेव्हां हे इंद्रा, वृत्र०अहीस तूं आपल्या सामर्थ्यांएं मारून टाकलेंस त्या वेळीं तू, सर्वांच्या दृष्टीस पडेल अशा रीतीनें सूर्याची द्युलोकांत स्थापना केलीस. ॥ ४ ॥


त्वम् मा॒याभि॒रप॑ मा॒यिनो॑ऽधमः स्व॒धाभि॒र्ये अधि॒ शुप्ता॒वजु॑ह्वत ॥
त्वम् पिप्रो॑र्नृमणः॒ प्रारु॑जः॒ पुरः॒ प्र ऋ॒जिश्वा॑नं दस्यु॒हत्ये॑ष्वाविथ ॥ ५ ॥

त्वं मायाभिः अप मायिनः अधमः स्वधाभिः ये अधि शुप्तौ अजुह्वत ॥
त्वं पिप्रोः नृऽमनः प्र अरुजः पुरः प्र ऋजिश्वानं दस्युऽहत्येषु आविथ ॥ ५ ॥

युक्तिप्रयुक्तींचा बळावर तूं कपटी शत्रूंचा धुव्वा उडविलास व त्याचप्रमाणें जे लोक तुझी थट्टा करण्याकरितां तुला हवि अर्पण करण्याचें ढोंग करीत असत त्यांनाही तूं आपल्या युद्धपद्धतीनें चीत केलेंस. मानवांचे कल्याण करणार्‍या हे इंद्रा, तूं पिप्रूच्या पुरांचा विध्वंस केलास, आणि दस्यु मारावयास आले असतां ऋजिश्वानाचें संरक्षण केलेंस. ॥ ५ ॥


त्वं कुत्सं॑ शुष्ण॒हत्ये॑ष्वावि॒थार॑न्धयोऽतिथि॒ग्वाय॒ शम्ब॑रम् ॥
म॒हान्तं॑ चिदर्बु॒दं नि क्र॑मीः प॒दा स॒नादे॒व द॑स्यु॒हत्या॑य जज्ञिषे ॥ ६ ॥

त्वं कुत्सं शुष्णऽहत्येषु आविथ अरंधयः अतिथिऽग्वाय शम्बरम् ॥
महांतं चित् अर्बुदं नि क्रमीः पदा सनात् एव दस्युऽहत्याय जज्ञिषे ॥ ६ ॥

सुष्ण मारावयास धांवला असतां तूं कुत्साचें संरक्षण केलेंस आणि अतिथिग्वाचा पक्ष घेऊन शंबराचा चुराडा करून टाकलास. अर्बुद एवढा मोठा असतांही तूं त्यावर पाय देऊन उभा राहिलास. दस्यूंचे हनन करण्याकरितांच तूं पुरातनकालापासून जन्म घेतला आहेस. ॥ ६ ॥


त्वे विश्वा॒ तवि॑षी स॒ध्र्यग्घि॒ता तव॒ राधः॑ सोमपी॒थाय॑ हर्षते ॥
तव॒ वज्र॑श्चिकिते बा॒ह्वोर्हि॒तो वृ॒श्चा शत्रो॒रव॒ विश्वा॑नि॒ वृष्ण्या॑ ॥ ७ ॥

त्वे इति विश्वा तविषी सध्र्यक् घिता तव राधः सोमऽपीथाय हर्षते ॥
तव वज्रः चिकिते बाह्वोः हितः वृश्च शत्रोः अव विश्वानि वृष्ण्या ॥ ७ ॥

तुझे ठिकाणी सर्व सामर्थ्य पूर्णपणें सुस्थापित झालें आहे. सोमपानासाठी आनंदाला उकळी येत असते. बाहूंवर ठेवलेल्या तुझ्या वज्राची सर्वांस ओळख आहे. ते घेऊन तूं शत्रूच्या अखिल सामर्थ्यांचे विदारण कर. ॥ ७ ॥


वि जा॑नी॒ह्यार्या॒न्ये च॒ दस्य॑वो ब॒र्हिष्म॑ते रन्धया॒ शास॑दव्र॒तान् ॥
शाकी॑ भव॒ यज॑मानस्य चोदि॒ता विश्वेत्ता ते॑ सध॒मादे॑षु चाकन ॥ ८ ॥

वि जानीहि आर्यान् ये च दस्यवः बर्हिष्मते रंधय शासत् अव्रतान् ॥
शाकी भव यजमानस्य चोदिता विश्वा इत् ता ते सधऽमादेषु चाकन ॥ ८ ॥

आर्य कोण आणि दस्यु कोण हे नीट ओळखून ठेव आणि जे तुझी आज्ञा न पाळणारे आहेत त्यांस शासन करून आपल्या उपासकांपुढे त्यांना शरण यावयास लाव. तूं सामर्थ्यवान आहेस. आपल्या भक्तांस तूं उत्कर्षाप्रत पोंचीव. तुझे सर्व पराक्रम यज्ञामध्यें गात असतां मला आनंद देतात. ॥ ८ ॥


अनु॑व्रताय र॒न्धय॒न्नप॑व्रताना॒भूभि॒रिन्द्रः॑ श्न॒थय॒न्नना॑भुवः ॥
वृ॒द्धस्य॑ चि॒द्वर्ध॑तो॒ द्यामिन॑क्षत॒ स्तवा॑नो व॒म्रो वि ज॑घान सं॒दिहः॑ ॥ ९ ॥

अनुऽव्रताय रंधयन् अपऽव्रतान् आऽभूभिः इंद्रः श्नथयन् अनाभुवः ॥
वृद्धस्य चित् वर्धतः द्यां इनक्षतः स्तवानः वम्रः वि जघान संऽदिहः ॥ ९ ॥

जे इंद्राची आज्ञा मानतात त्यांच्या पुढें त्याच्या आज्ञांस न जुमानणार्‍या लोकांना वांकावयास लावून हा इंद्र भक्तांकडून भक्तिहीनांचा नाश करवीत असतो. वम्र तुझें स्तवन करीत असल्यामुळें त्याला त्याच्या शत्रूनें सांठवून ठेवलेल्या संपत्तीचा विध्वंस करता आला. हा त्याचा शत्रू अगोदरच फार बलिष्ठ झालेला असूनही त्याचें बल वाढतच चाललेलें होते व तो स्वर्गापर्यंत जाऊन भिडला होता. ॥ ९ ॥


तक्ष॒द्यत्त॑ उ॒शना॒ सह॑सा॒ सहो॒ वि रोद॑सी म॒ज्मना॑ बाधते॒ शवः॑ ॥
आ त्वा॒ वात॑स्य नृमणो मनो॒युज॒ आ पूर्य॑माणमवहन्न॒भि श्रवः॑ ॥ १० ॥

तक्षत् यत् ते उशना सहसा सहः वि रोदसी इति मज्मना बाधते शवः ॥
आ त्वा वातस्य नृऽमनः मनःऽयुजः आ पूर्यमाणं अवहन् अभि श्रवः ॥ १० ॥

उशनानें आपल्या शक्तीच्या योगानें जे सामर्थ्य तुझ्याकरिता निर्माण केलें त्या सामर्थ्यांत इतके बल आहे कीं तें द्युलोक व भूलोक ह्या दोहोंसही भारी होऊन बसलें आहे. मानवांचे हित करण्याची बुद्धि बाळगणार्‍या हे इंद्रा, स्वतःस रथाला आपोआप जोडून घेणार्‍या वायूच्या अश्वांनी, सर्वत्र भरून राहणार्‍या तुला, पुष्कळ कीर्ति प्राप्त करून दिली आहे. ॥ १० ॥


मन्दि॑ष्ट॒ यदु॒शने॑ का॒व्ये सचा॒ँ इन्द्रो॑ व॒ङ्‍कू व॑ङ्‍कु॒तराधि॑ तिष्ठति ॥
उ॒ग्रो य॒यिं निर॒पः स्रोत॑सासृज॒द्वि शुष्ण॑स्य दृंहि॒ता ऐ॑रय॒त्पुरः॑ ॥ ११ ॥

मंदिष्ट यत् उशने काव्ये सचा इंद्रः वङ्‍कू वङ्‍कुऽतरा अधि तिष्ठति ॥
उग्रः ययिं निः अपः स्रोतसा असृजत् वि शुष्णस्य दृंहिताः ऐरयत् पुरः ॥ ११ ॥

ज्या वेळी उशनाकाव्या सहवर्तमान इंद्र संतुष्ट झाला त्यावेळीं ऐटीनें वांकडे वांकडे चालणार्‍या अशा अश्वांतील अतिशय उत्कृष्ट अश्वांवर त्यानें आरोहण केलें. त्या प्रतापी देवानें प्रवाहरूपानेंच जलांना मोकळें सोडून त्यांस शीघ्रगति आणली आणि शुष्णाच्या बळकट किल्ल्याचें त्यानें विदारण केलें. ॥ ११ ॥


आ स्मा॒ रथं॑ वृष॒पाणे॑षु तिष्ठसि शार्या॒तस्य॒ प्रभृ॑ता॒ येषु॒ मन्द॑से ॥
इन्द्र॒ यथा॑ सु॒तसो॑मेषु चा॒कनो॑ऽन॒र्वाणं॒ श्लोक॒मा रो॑हसे दि॒वि ॥ १२ ॥

आ स्मा रथं वृषऽपानेषु तिष्ठसि शार्यातस्य प्रऽभृताः येषु मंदसे ॥
इंद्र यथा सुतऽसोमेषु चाकनः अनर्वाणं श्लोकं आ रोहसे दिवि ॥ १२ ॥

सामर्थ्यवान पुरुष ज्याचें प्राशन करतात त्या सोमरसाचा आस्वाद घेत असतां तू रथावर आरूढ होतोस. शार्याताचे सोमरसाचे चमस तयार आहेत. तुलाही त्यामुळें फार आनंद होतो. हे इंद्रा, ज्या ज्या प्रमाणानें आम्ही सिद्ध केलेल्या सोमरसाविषयीं तुझी आवड वाढत जाते त्या त्या प्रमाणानें तूं द्युलोकांत आपोआप कीर्तीस पात्र होत जातोस. ॥ १२ ॥


अद॑दा॒ अर्भां॑ मह॒ते व॑च॒स्यवे॑ क॒क्षीव॑ते वृच॒यामि॑न्द्र सुन्व॒ते ॥
मेना॑भवो वृषण॒श्वस्य॑ सुक्रतो॒ विश्वेत्ता ते॒ सव॑नेषु प्र॒वाच्या॑ ॥ १३ ॥

अददाः अर्भां महते वचस्यवे कक्षीवते वृचयां इंद्र सुन्वते ॥
मेना अभवः वृषणश्वस्य सुक्रतो इति सुऽक्रतो विश्वा इत् ता ते सवनेषु प्रऽवाच्या ॥ १३ ॥

हे इंद्रा, तुझें स्तोत्र गाणार्‍या व तुला सोमरस अर्पण करणार्‍या वृद्ध कक्षीवानास तूं कोमल वयाची वृचया अर्पण केलीस. हे बुद्धिसामर्थ्यवान देवा ! तूंच वृषाणश्वाची कन्या मेना ही बनलास. ही तुझी सर्व कृत्यें यज्ञांत गाण्यास योग्य आहेत. ॥ १३ ॥


इन्द्रो॑ अश्रायि सु॒ध्यो निरे॒के प॒ज्रेषु॒ स्तोमो॒ दुर्यो॒ न यूपः॑ ॥
अ॒श्व॒युर्ग॒व्यू र॑थ॒युर्व॑सू॒युरिन्द्र॒ इद्रा॒यः क्ष॑यति प्रय॒न्ता ॥ १४ ॥

इंद्रः अश्रायि सुऽध्यः निरेके पज्रेषु स्तोमः दुर्यः न यूपः ॥
अश्वऽयुः गव्युः रथऽयुः वसुऽयुः इंद्रः इत् रायः क्षयति प्रऽयंता ॥ १४ ॥

विपत्‍काली सदाचारी लोकांनी इंद्राचाच आश्रय केलेला आहे. जसा दाराचा खांब कधी ढळत नाहीं त्याप्रमाणें पज्रांचे कुलांत इंद्राची पूजा कधींही चुकावयाची नाही. अश्व, धेनु, रथ व वित्त ह्यांची आवड धरणारा व दानकर्मांत शूर असणारा इंद्र हाच एकटा सर्व वैभवांचा स्वामी आहे. ॥ १४ ॥


इ॒दं नमो॑ वृष॒भाय॑ स्व॒राजे॑ स॒त्यशु॑ष्माय त॒वसे॑ऽवाचि ॥
अ॒स्मिन्नि॑न्द्र वृ॒जने॒ सर्व॑वीराः॒ स्मत्सू॒रिभि॒स्तव॒ शर्म॑न्स्याम ॥ १५ ॥

इदं नमः वृषभाय स्वराजे सत्यऽशुष्माय तवसे अवाचि ॥
अस्मिन् इंद्र वृजने सर्वऽवीराः स्मत् सूरिऽभिः तव शर्मन् स्याम ॥ १५ ॥

सामर्थ्यवान, स्वतेजाने युक्त, सत्य कार्यांत बलाचा विनियोग करणारा आणि शक्तिसंपन्न अशा इंद्राचे सन्मानार्थ ही नम्र स्तुति आम्ही म्हटली आहे. हे इंद्रा ! आमच्या पदरचे सर्व पराक्रमी पुरुष व विद्वान लोक ह्यांचेसह ह्या संकटसमयी आम्ही तुझ्या कृपेचा आधार मानून राहूं ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ५२ ( इंद्र सूक्त )

ऋषि - सव्य अंगिरस : देवता - इंद्र : छंद - जगती; त्रिष्टुभ्


त्यं सु मे॒षं म॑हया स्व॒र्विदं॑ श॒तं यस्य॑ सु॒भ्वः सा॒कमीर॑ते ॥
अत्यं॒ न वाजं॑ हवन॒स्यदं॒ रथ॒मेन्द्रं॑ ववृत्या॒मव॑से सुवृ॒क्तिभिः॑ ॥ १ ॥

त्यं सु मेषं महय स्वःऽविदं शतं यस्य सुऽभ्वः साकं ईरते ॥
अत्यं न वाजं हवनऽस्यदं रथं इंद्रं ववृत्यां अवसे सुवृक्तिऽभिः ॥ १ ॥

ज्याने प्रकाशाची प्राप्ती करून घेतली त्या मेषाचे चांगले अर्चन कर. ह्य्चीच कीर्ति शेंकडो स्तोते एकत्र बसून गात असतात. ज्याप्रमाणे एखाद्या जोमदार अश्वाला यज्ञाकडे निघालेल्या र्तथास जोडण्याकरितां प्रयत्नपूर्वक वळवून आणावे लागते त्याप्रमाणे ह्या इंद्रास आमच्या संरक्षणार्थ सुंदर स्तोत्रांनी वळवून आणण्यास मी समर्थ होवो. ॥ १ ॥


स पर्व॑तो॒ न ध॒रुणे॒ष्वच्यु॑तः स॒हस्र॑मूति॒स्तवि॑षीषु वावृधे ॥
इन्द्रो॒ यद् वृ॒त्रमव॑धीन्नदी॒वृत॑मु॒ब्जन्नर्णां॑सि॒ जर्हृ॑षाणो॒ अन्ध॑सा ॥ २ ॥

सः पर्वतः नः धरुणेऽषु अच्युतः सहस्रं ऊं इतिः तविषीषु ववृधे ॥
इंद्रः यत् वृत्रं अवधीत् नदीऽवृतं उब्जन् अर्णांसि जर्हृषाणः अंधसा ॥ २ ॥

ज्यावेळी हवींनी संतुष्ट होऊन इंद्राने नद्यांचा मार्ग मोकळा करीत करीत जलांस प्रतिबंध करणार्‍या वृत्राचा वध केला त्यावेळी आपल्याच सामर्थ्यानी परिवेष्टीत होऊन व कठीण भूभागावर असलेल्या पर्वताप्रमाणे स्थिर राहून हजारों प्रकारांनी भक्तांचे संरक्षण करणारा तो इंद्र जास्त जास्त मोठा होत गेला. ॥ २ ॥


स हि द्व॒रो द्व॒रिषु॑ व॒व्र ऊध॑नि च॒न्द्रबु॑ध्नो॒ मद॑वृद्धो मनी॒षिभिः॑ ॥
इन्द्रं॒ तम॑ह्वे स्वप॒स्यया॑ धि॒या मंहि॑ष्ठरातिं॒ स हि पप्रि॒रन्ध॑सः ॥ ३ ॥

सः हि द्वरः द्वरिषु वव्र ऊधनि चंद्रऽबुध्नः मदऽवृद्धः मनीषिभिः ॥
इंद्रं तं अह्वे सुऽअपस्यया धिया मंहिष्ठरातिं सः हि पप्रिः अंधसः ॥ ३ ॥

शत्रूंमध्यें शत्रूप्रमाणे असलेला व गाईच्या कांसेप्रमाणे दिसणार्‍या अशा ह्या अंतरिक्षांत व्याप्त होऊन राहिलेल्या, ह्या इंद्राचे मुख्य निवासस्थान आल्हाददायक प्रकाशांत आहे व विद्वान् लोकांनी सोमरस अर्पण करून त्याचा आनंद वृद्धिंगत केला आहे. मनांत फार तत्परता बाळगून त्या परम उदार इंद्रास मी पाचारण करतो. अन्नाची समृद्धि करणारा तोच होय. ॥ ३ ॥


आ यं पृ॒णन्ति॑ दि॒वि सद्म॑बर्हिषः समु॒द्रं न सु॒भ्व१ स्वा अ॒भिष्ट॑यः ॥
तं वृ॑त्र॒हत्ये॒ अनु॑ तस्थुरू॒तयः॒ शुष्मा॒ इन्द्र॑मवा॒ता अह्रु॑तप्सवः ॥ ४ ॥

आ यं पृणंति दिवि सद्मऽबर्हिषः समुद्रं न सुऽभ्वः स्वा अभिष्टयः ॥
तं वृत्रऽहत्ये अनु तस्थुः ऊतयः शुष्माः इंद्रं अवाताः अह्रुतऽप्सवः ॥ ४ ॥

यज्ञगृहात आसनावर विराजमान होणारे ज्याचे उत्साही सेवक ज्यास द्युलोकांत समुद्राप्रमाणे सोमरसाने भरून टाकतात त्या इंद्राचे समीप त्याचे सामर्थ्यवान्, कोणत्याही प्रतिरोधास न जुमानणारे, व सरलाकृति सहाय्यकर्ते वृत्रहनप्रसंगी उभे होते. ॥ ४ ॥


अ॒भि स्ववृ॑ष्टिं॒म् मदे॑ अस्य॒ युध्य॑तो र॒घ्वीरि॑व प्रव॒णे स॑स्रुरू॒तयः॑ ॥
इन्द्रो॒ यद्व॒ज्री धृ॒षमा॑णो॒ अन्ध॑सा भि॒नद्व॒लस्य॑ परि॒धीँरि॑व त्रि॒तः ॥ ५ ॥

अभि स्वऽवृष्टिं मदे अस्य युध्यतः रघ्वीःऽइव प्रवणे सस्रुः ऊतयः ॥
इंद्रः यत् वज्री धृषमाणः अंधसा भिनत् वलस्य परिधीन्ऽइव त्रितः ॥ ५ ॥

ज्यावेळी सोमरसामुळे उत्साहपरिप्लुत झालेल्या वज्रधर इंद्राने त्रिताप्रमाणे बलाच्या भोंवतालचे दुर्ग फोडून टाकले, त्यावेळी हर्षाच्या भरांत युद्ध करणार्‍या त्या देवाचे साह्यकर्ते, ज्याप्रमाणे उतार जागेवरून नद्या वेगानें धांवत जातात, त्याप्रमाणे पर्जन्यवृष्टीस प्रतिबंध करणार्‍या त्या वृत्रावर तुटून पडले. ॥ ५ ॥


परीं॑ घृ॒णा च॑रति तित्वि॒षे शवो॑ऽ॒पो वृ॒त्वी रज॑सो बु॒ध्नमाश॑यत् ॥
वृ॒त्रस्य॒ यत्प्र॑व॒णे दु॒र्गृभि॑श्वनो निज॒घन्थ॒ हन्वो॑रिन्द्र तन्य॒तुम् ॥ ६ ॥

परि ईं घृणा चरति तित्विषे शवः अपः वृत्वी रजसः बुध्नं आ अशयत् ॥
वृत्रस्य यत् प्रवणे दुःऽगृभिश्वनः निऽजघंथ हन्वोः रिंद्र तन्यतुम् ॥ ६ ॥

हे इंद्रा, ज्यावेळी तू आपले वज्र पराजय करण्यास दुष्कर अशा वृत्राच्या हनुवटीखाली फेंकून मारलेंस त्यावेळी तुझे तेज तुझ्या सभोंवार पसरले. तुझ्या सामर्थ्याचा प्रकाश पडला व उदकांस प्रतिबंध करणारा वृत्र रजोलोकाच्या तळाशी मरून पडला. ॥ ६ ॥


ह्र॒दं न हि त्वा॑ न्यृ॒षन्त्यू॒र्मयो॒ ब्रह्मा॑णीन्द्र॒ तव॒ यानि॒ वर्ध॑ना ॥
त्वष्टा॑ चित्ते॒ युज्यं॑ वावृधे॒ शव॑स्त॒तक्ष॒ वज्र॑म॒भिभू॑त्योजसम् ॥ ७ ॥

ह्रदं न हि त्वा निऽऋषंति ऊर्मयः ब्रह्माणी इंद्र तव यानि वर्धना ॥
त्वष्टा चित् ते युज्यं ववृधे शवः ततक्ष वज्रं अभिभूतिऽयोजसम् ॥ ७ ॥

जी स्तोत्रें तुझी महती वृद्धिंगत करतात ती, ज्याप्रमाणें उदकाचे प्रवाह डोहाकडे धांवत जातात त्याप्रमाणे तुझ्याकडे धांव घेतात. त्वष्ट्यानेंच तुझ्या उपयोगी पडणारे असे तुझें सामर्थ्य वाढविलें आणि शत्रूंचा पराभव करण्यास समर्थ असे वज्र तुझ्या करितांच तयारे केले. ॥ ७ ॥


ज॒घ॒न्वाँ उ॒ हरि॑भिः सम्भृतक्रत॒विन्द्र॑ वृ॒त्रं मनु॑षे गातु॒यन्न॒पः ॥
अय॑च्छथा बा॒ह्वोर्वज्र॑माय॒समधा॑रयो दि॒व्या सूर्यं॑ दृ॒शे ॥ ८ ॥

जघन्वान् ऊं इति हरिऽभिः संभृतक्रतो इति संभृतऽक्रतो इंद्र वृत्रं मनुषे गातुयन् अपः ॥
अयच्छथाः बाह्वोः वज्रं आयसं अधारयः दिवि आ सूर्यं दृशे ॥ ८ ॥

सामर्थ्यपरिप्लुत असणार्‍या हे इंद्रदेवा, मानवांचे हिताकरितां उदकांस वहाण्यास मार्ग मोकळा करण्याकरितां तूं आपल्या अश्वांचे योगाने वृत्राचा वध केलास. तू आपल्या बाहूंवर लोखंडाचे केलेले वज्र धारण केलेस व सूर्यदेव सर्वांचे नजरेस पडावा अशा रीतीनें त्याची द्युलोकांत स्थापना केलीस. ॥ ८ ॥


बृ॒हत्स्वश्च॑न्द्र॒मम॑व॒द्यदु॒क्थ्य१मकृ॑ण्वत भि॒यसा॒ रोह॑णं दि॒वः ॥
यन्मानु॑षप्रधना॒ इन्द्र॑मू॒तयः॒ स्वर्नृ॒षाचो॑ म॒रुतोऽ॑मद॒न्ननु॑ ॥ ९ ॥

बृहत् स्वःऽचंद्रं अमऽवत् यत् उक्थ्यं अकृण्वतः भियसा रोहणं दिवः ॥
यत् मानुषऽप्रधनाः इंद्रं ऊतयः स्वः नृऽसाचः मरुतः अमदन् अनु ॥ ९ ॥

ज्यावेळी मनुष्यांनी भितीने तुझे जोरदार, आपोआप आल्हाद उत्पन्न करणारे, दीर्घ, व स्वर्गलोकापर्यंत प्रवेश करणारे, असे तुझे स्तोत्र गाइले, ज्यावेळी मनुष्यांच्या हिताकरितां युद्धास प्रवृत्त होणारे, स्वर्गामध्यें नेहमी शूरांचा सहवास करणारे, व इंद्रास साह्यभूत होणारे, अशा मरुतांनी इंद्रास प्रोत्साहन दिले, ॥ ९ ॥


द्यौश्चि॑द॒स्याम॑वाँ॒ अहेः॑ स्व॒नादयो॑यवीद्भि॒यसा॒ वज्र॑ इन्द्र ते ॥
वृ॒त्रस्य॒ यद्ब॑द्‍बधा॒नस्य॑ रोदसी॒ मदे॑ सु॒तस्य॒ शव॒साभि॑न॒च्छिरः॑ ॥ १० ॥

द्यौः ह्चित् अस्य अमऽवान् अहेः स्वनात् अयोयवीत् भियसा वज्रः इंद्र ते ॥
वृत्रस्य यत् बद्‍बधानस्य रोदसी इति मदे सुतस्य शवसा अभिनत् शिरः ॥ १० ॥

आणि ज्यावेळी, हे इंद्रा, तुझ्या वज्राने द्युलोक आणि भूलोक ह्या दोहोंसही पीडा उत्पन्न करणार्‍या वृत्राचे शिर सोमरसाच्या आनंददायक स्फुरणांत तुझ्या वज्राने आपल्या सामर्थ्याने छेदून टाकले, त्यावेळी भयामुळें, बलिष्ठ असा स्वर्गलोकसुद्धां, त्या अहीच्या गर्जनेने थरथर कांपू लागला. ॥ १० ॥


यदिन्न्वै॑न्द्र पृथि॒वी दश॑भुजि॒रहा॑नि॒ विश्वा॑ त॒तन॑न्त कृ॒ष्टयः॑ ॥
अत्राह॑ ते मघव॒न्विश्रु॑तं॒ सहो॒ द्यामनु॒ शव॑सा ब॒र्हणा॑ भुवत् ॥ ११ ॥

यत् इत् नु इंद्र पृथिवी दशऽभुजिः अहानि विश्वा ततनंत कृष्टयः ॥
अत्र अह ते मघऽवन् विऽश्रुतं सहः द्यां अनु शवसा बर्हणा भुवत् ॥ ११ ॥

हे इंद्रा, जर खरोखर पृथिवी दसपट वाढेल आणि मनुष्याचें आयुष्य चिरकाल टिकणारे होईल, तरच हे उदार देवा, तुझे विख्यात सामर्थ्य, शक्ति आणि पराक्रम ह्या बाबतींत, द्युलोकांत मावूं लागेल. ॥ ११ ॥


त्वम॒स्य पा॒रे रज॑सो॒ व्योमनः॒ स्वभू॑त्योजा॒ अव॑से धृषन्मनः ॥
च॒कृ॒षे भूमिं॑ प्रति॒मान॒मोज॑सोऽ॒पः स्वःपरि॒भूरे॒ष्या दिव॑म् ॥ १२ ॥

त्वं अस्य पारे रजसः विऽओमनः स्वभूतिऽओजाः अवसे धृषत्ऽमनः ॥
चकृषे भूमिं प्रतिऽमानं ओजसः अपः स्वः इति स्वः परिऽभूः एषि आ दिवम् ॥ १२ ॥

मनांत अतिशय उत्साह बाळगणार्‍या हे इंद्रा, स्वसंरक्षण करण्यास स्वतःच्या पराक्रमानेंच समर्थ असणारा जो तूं त्याने रजोलोकाच्या व आकाशाच्या पलीकडे राहून या पृथिवीस आपले सामर्थ्य मोजण्याचें मापच बनविलेले आहे. तूं उदक व प्रकाश यांस व्यापून द्युलोकांतही प्रवेश करतोस. ॥ १२ ॥


त्वं भु॑वः प्रति॒मानं॑ पृथि॒व्या ऋ॒ष्ववी॑रस्य बृह॒तः पति॑र्भूः ॥
विश्व॒माप्रा॑ अ॒न्तरि॑क्षं महि॒त्वा स॒त्यम॒द्धा नकि॑र॒न्यस्त्वावा॑न् ॥ १३ ॥

त्वं भुवः प्रतिऽमानं पृथिव्याः ऋष्वऽवीरस्य बृहतः पतिः भूः ॥
विश्वं आ अप्रा अंतरिक्षं महिऽत्वा सत्यं अद्धा नकिः अन्यः त्वाऽवान् ॥ १३ ॥

तूं ह्या पृथिवीस मापून टाकले आहेस व ज्यांत अत्युच्च योग्यतेचे शूर पुरुष आहेत अशा विशाल स्वर्गलोकाचा तू स्वामी होऊन बसला आहेस. तूं आपल्या समर्थ्यानें सर्व अंतरिक्ष व्यापून टाकले आहेस. खरोखर तुझ्यासारखा ह्या जगांत दुसरा कोणीही नाही. ॥ १३ ॥


न यस्य॒ द्यावा॑पृथि॒वी अनु॒ व्यचो॒ न सिन्ध॑वो॒ रज॑सो॒ अन्त॑मान॒शुः ॥
नोत स्ववृ॑ष्टिं॒ मदे॑ अस्य॒ युध्य॑त॒ एको॑ अ॒न्यच्च॑कृषे॒ विश्व॑मानु॒षक् ॥ १४ ॥

न यस्य द्यावापृथिवी इति अनु व्यचः न सिंधवः रजसः अंतं आनशुः ॥
न उत स्वऽवृष्टिं मदे अस्य युध्यत एकः अन्यत् चकृषे विश्वं आनुषक् ॥ १४ ॥

ज्याच्या व्यापकपणाची सर द्युलोक अथवा भूलोक ह्या दोहोंसही आलेली नाही व ज्याचा अंत अंतरिक्षांतल्या नद्यांसही लागला नाही, त्याचप्रमाणे सोमरसाच्या आनंदाचे भरांत, उदकांस प्रतिबंध करणार्‍या वृत्राशी युद्ध करीत असतांही (ज्याचे पूर्ण ज्ञान कोणासही झाले नाही), अशा तूं एकट्यानें आत्मव्यतिरिक्त सर्व जगतास, स्वतःस वश करून ठेवलें आहेस. ॥ १४ ॥


आर्च॒न्नत्र॑ म॒रुतः॒ सस्मि॑न्ना॒जौ विश्वे॑ दे॒वासो॑ अमद॒न्ननु॑ त्वा ॥
वृ॒त्रस्य॒ यद्भृ॑ष्टि॒मता॑ व॒धेन॒ नि त्वमि॑न्द्र॒ प्रत्या॒नं ज॒घन्थ॑ ॥ १५ ॥

आर्चन् अत्र मरुतः सस्मिन् आजौ विश्वे देवासः अमदन् अनु त्वा ॥
वृत्रस्य यत् भृष्टिऽमता वधेन नि त्वं इंद्र प्रति आनं जघंथ ॥ १५ ॥

ज्यावेळी आपल्या तीक्ष्ण शस्त्रानें हे इंद्रा, तूं वृत्राच्या मुखावर वार केलास त्यावेळी त्या युद्धप्रसंगी मरुतांनी तुझे पूजन केले व सर्व देवांनी तुला प्रोत्साहन दिले. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ५३ ( इंद्र सूक्त )

ऋषि - सव्य अंगिरस : देवता - इंद्र : छंद - जगती; त्रिष्टुभ्


न्यू षु वाचं॒ प्र म॒हे भ॑रामहे॒ गिर॒ इन्द्रा॑य॒ सद॑ने वि॒वस्व॑तः ॥
नू चि॒द्धि रत्नं॑ सस॒तामि॒वावि॑द॒न्न दु॑ष्टु॒तिर्द्र॑विणो॒देषु॑ शस्यते ॥ १ ॥

नि ऊं इति सु वाचं प्र महे भरामहे गिरः इंद्राय सदने विवस्वतः ॥
नु चित् हि रत्नं ससतांऽइव अविदत् न दुःऽस्तुतिः द्रविणःऽदेषु शस्यते ॥ १ ॥

ह्या श्रेष्ठ इंद्रास उद्देशून आम्ही स्तोत्र गाण्यास बसलो. विवस्वानाचे सदनांत आम्ही त्यास स्तुति अर्पण करतो. निजल्या निजल्या ज्याप्रमाणे एखाद्यास कोणी द्रव्य आणून द्यावे, त्याप्रमाणें त्याने आम्हांस संपत्ति अर्पण केली आहे. अशा धनदात्याची कोणी कधीही वाईट स्तुति करीत नसतात. ॥ १ ॥


दु॒रो अश्व॑स्य दु॒र इ॑न्द्र॒ गोर॑सि दु॒रो यव॑स्य॒ वसु॑न इ॒नस्पतिः॑ ॥
शि॒क्षा॒न॒रः प्र॒दिवो॒ अका॑मकर्शनः॒ सखा॒ सखि॑भ्य॒स्तमि॒दं गृ॑णीमसि ॥ २ ॥

दुरः अश्वस्य दुरः इंद्र गोः असि दुरः यवस्य वसुनः इनः पतिः ॥
शिक्षाऽनरः प्रऽदिवः अकामऽकर्शनः सखा सखिऽभ्यः तं इदं गृणीमसि ॥ २ ॥

तूं अश्व देणारा, धेनु देणारा व धान्य देणारा असून सर्व संपत्तीचा स्वामी व प्रभु आहेस. पुरातन कालापासून तू मानवांचा मार्गदर्शक आहेस. तूं कोणाच्याही आशेचा कधींही भंग केलेला नाहींस. तू आपल्या मित्रांचा जिवलग मित्र आहेस. तू असा थोर असल्याकारणानें आम्ही तुझ्या सन्मानार्थ हे स्तोत्र गातो. ॥ २ ॥


शची॑व इन्द्र पुरुकृद्द्युमत्तम॒ तवेदि॒दम॒भित॑श्चेकिते॒ वसु॑ ॥
अतः॑ सं॒गृभ्या॑भिभूत॒ आ भ॑र॒ मा त्वा॑य॒तो ज॑रि॒तुः काम॑मूनयीः ॥ ३ ॥

शचीऽवः इंद्र पुरुऽकृत् द्युमत्ऽतम तव इत् इदं अभितः चेकिते वसु ॥
अतः संऽगृभ्य अभिऽभूत आ भर मा त्वाऽयतः जरितुः कामं ऊनयीः ॥ ३ ॥

हे ज्ञानसामर्थ्ययुक्त इंद्रा, हे अनेक महत्कृत्यें करणार्‍या व अत्यंत दीप्तिशाली देवा, जे हे वैभव सभोंवार प्रकाशमान होत आहे, ते तुझे आहे. ह्यासाठी, शत्रूस पराभूत करणार्‍या हे इंद्रा, ते घेऊन आम्हांस आणून दे. तुझी भक्ति करणार्‍या तुझ्या स्तोत्याचा मनोरथ भग्न होऊं देऊं नकोस. ॥ ३ ॥


ए॒भिर्द्युभिः॑ सु॒मना॑ ए॒भिरिन्दु॑भिर्निरुन्धा॒नो अम॑तिं॒ गोभि॑र॒श्विना॑ ॥
इन्द्रे॑ण॒ दस्युं॑ द॒रय॑न्त॒ इन्दु॑भिर्यु॒तद्वे॑षसः॒ समि॒षा र॑भेमहि ॥ ४ ॥

एभिः द्युऽभिः सुऽमना एभिः इंदुऽभिः निऽरुन्धानः अमतिं गोभिः अश्विना ॥
इंद्रेण दस्युं दरयंत इंदुऽभिः युतऽद्वेषसः सं इषा रभेमहि ॥ ४ ॥

ह्या यज्ञांतील अग्निज्वालांनी व ह्या सोमरसाच्या बिंदूंनी मनांत संतुष्ट होऊन तूं धेनु व अश्व ही आम्हांस देऊन आमचे दारिद्र्य नष्ट कर. सोमरस अर्पण करून इंद्रचे हातून दस्युंचा वध करवून घेऊन आम्ही शत्रूंपासून अगदी निर्भय होऊं व धनधान्याने समृद्ध बनूं. ॥ ४ ॥


समि॑न्द्र रा॒या समि॒षा र॑भेमहि॒ सं वाजे॑भिः पुरुश्च॒न्द्रैर॒भिद्यु॑भिः ॥
सं दे॒व्या प्रम॑त्या वी॒रशु॑ष्मया॒ गोअ॑ग्र॒याश्वा॑वत्या रभेमहि ॥ ५ ॥

सं इंद्र राया सं इषा रभेमहि सं वाजेभिः पुरुऽचंद्रैः अभिद्युभिः ॥
सं देव्या प्रऽमत्या वीरऽशुष्मया गोऽअग्रया अश्वऽवत्या रभेमहि ॥ ५ ॥

आम्ही संपत्तीने, धनसंचयाने, व अनेक तर्‍हेने आनंदकारक व तेजस्वीपणाने युक्त अशा सामर्थ्याने सुसमृद्ध होऊं. त्याचप्रमाणे जिच्यामुळें आमच्या पदरच्या शूर पुरुषांचे बल दृष्टीस पडेल व जिच्यांत धेनूंचा लाभ प्रमुख असून अश्वही मिळण्याजोगे आहेत अशा तुझ्या दिव्य कृपेचीही आम्हांस प्राप्ति होईल. ॥ ५ ॥


ते त्वा॒ मदा॑ अमद॒न्तानि॒ वृष्ण्या॒ ते सोमा॑सो वृत्र॒हत्ये॑षु सत्पते ॥
यत्का॒रवे॒ दश॑ वृ॒त्राण्य॑प्र॒ति ब॒र्हिष्म॑ते॒ नि स॒हस्रा॑णि ब॒र्हयः॑ ॥ ६ ॥

ते त्वा मदाः अमदन् तानि वृष्ण्या ते सोमासः वृत्रऽहत्येषु सत्ऽपते ॥
यत् कारवे दश वृत्राणि अप्रति बर्हिष्मते नि सहस्राणि बर्हयः ॥ ६ ॥

वृत्रहनप्रसंगी, हे सज्जनांच्या नायका इंद्रा, त्या आनंदकारक पेयांनी, त्या उत्साहवर्धक हवींनी, व त्या सोमरसांनी, तुला खचित नवीन आवेश आला. कारण, त्याचे भरांत तुझ्याकरितां दर्भावर मांडून तुझी कीर्ति गाणार्‍या भक्तांकरितां, तू कोणाच्या प्रतिरोधाची पर्वा न करतां, दहा वृत्रांना कापून काढलेस. ॥ ६ ॥


यु॒धा युध॒मुप॒ घेदे॑षि धृष्णु॒या पु॒रा पुरं॒ समि॒दं हं॒स्योज॑सा ॥
नम्या॒ यदि॑न्द्र॒ सख्या॑ परा॒वति॑ निब॒र्हयो॒ नमु॑चिं॒ नाम॑ मा॒यिन॑म् ॥ ७ ॥

युधा युधं उप घ इत् एषि धृष्णुऽया पुरा पुरं सं इदं हंसि ओजसा ॥
नम्या यत् इंद्र सख्या पराऽवति निऽबर्हयः नमुचिं नाम मायिनम् ॥ ७ ॥

हे इंद्रा, ज्यावेळी तुझा जिवलग भक्त जो नमी त्यास बरोबर घेऊन तू नमुचि नांवाच्या कपटी राक्षसास अत्यंत दूर अशा प्रदेशांत जाऊन कापून काढलेस, तेव्हां रणसंग्रामांत मोठ्या आवेशाने शिरणारा जो तूं त्या तुला युद्धामागून युद्ध करावे लागलें व आपल्या सामर्थ्यानें पुरामागून पुरांचा तूं विध्वंस करीत सुटलास. ॥ ७ ॥


त्वं कर॑ञ्जमु॒त प॒र्णयं॑ वधी॒स्तेजि॑ष्ठयातिथि॒ग्वस्य॑ वर्त॒नी ॥
त्वं श॒ता वङ्‍गृ॑दस्याभिन॒त्पुरो॑ऽनानु॒दः परि॑षूता ऋ॒जिश्व॑ना ॥ ८ ॥

त्वं करंजं उत पर्णयं वधीः तेजिष्ठया अतिथिऽग्वस्य वर्तनी ॥
त्वं शता वंगृदस्य अभिनत् पुरः अननुऽदः परिऽसूताः ऋजिश्वना ॥ ८ ॥

अतिथिग्वाच्या अत्यंत तेजस्वी चक्राच्या योगाने तूं करंज व पर्णय ह्यांचा वध केलास. ऋजिश्वानानें वेढा दिलेली वृंगदाची शंभर पुरें तूं उध्वस्त करून टाकलीस. तुझ्या दातृत्वास खरोखर कोणाचीच जोड मिळणार नाही. ॥ ८ ॥


त्वमे॒ताञ्ज॑न॒राज्ञो॒ द्विर्दशा॑ब॒न्धुना॑ सु॒श्रव॑सोपज॒ग्मुषः॑ ॥
ष॒ष्टिं स॒हस्रा॑ नव॒तिं नव॑ श्रु॒तो नि च॒क्रेण॒ रथ्या॑ दु॒ष्पदा॑वृणक् ॥ ९ ॥

त्वं एतान् जनऽराज्ञः द्विः दश अबंधुना सुऽश्रवसा उपऽजग्मुषः ॥
षष्टिं सहस्रा नवतिं नव श्रुतः नि चक्रेण रथ्या दुःऽपदा अवृणक् ॥ ९ ॥

तूं सत्कीर्तीने मंडित आहेस. ज्यावेळीं सुश्रवस ह्याला सहाय्य करण्यास कोणी नाही असे पाहून वीर राजांनी त्याचेवर स्वारी केली त्यावेळी, ज्याचेपुढें कोणाचा टिकाव लागणार नाही असे एक रथचक्र घेऊन तूं त्यांचा व त्याबरोबरच त्यांच्या साठ हजार नव्व्याण्णव लोकांचा उच्छेद करून टाकलास. ॥ ९ ॥


त्वमा॑विथ सु॒श्रव॑सं॒ तवो॒तिभि॒स्तव॒ त्राम॑भिरिन्द्र॒ तूर्व॑याणम् ॥
त्वम॑स्मै॒ कुत्स॑मतिथि॒ग्वमा॒युं म॒हे राज्ञे॒ यूने॑ अरन्धनायः ॥ १० ॥

त्वं आविथ सुऽश्रवसं तव उतिऽभिः तव त्रामऽभिः इंद्र तूर्वयाणम् ॥
त्वं अस्मै कुत्सं अतिथिऽग्वं आयुं महे राज्ञे यूने अरंधनायः ॥ १० ॥

हे इंद्रा, तू आपल्या कृपाछत्रामुळें सुश्रवसाचे संरक्षण केलेंस व आपलें साहाय्य देऊन तुर्वयाणाचा बचाव केलास. तूं ह्या श्रेष्ठ व तरुण नृपतीपुढें कुत्स, अतिथिग्व व आयु ह्यांना शरण यावयास लावलेंस. ॥ १० ॥


य उ॒दृची॑न्द्र दे॒वगो॑पाः॒ सखा॑यस्ते शि॒वत॑मा॒ असा॑म ॥
त्वां स्तो॑षाम॒ त्वया॑ सु॒वीरा॒ द्राघी॑य॒ आयुः॑ प्रत॒रं दधा॑नाः ॥ ११ ॥

य उत्ऽऋचि इंद्र देवऽगोपाः सखायः ते शिवऽतमा असाम ॥
त्वां स्तोषाम त्वया सुवीराः द्राघीयः आयुः प्रऽतरं दधानाः ॥ ११ ॥

सर्व देवांच्या संरक्षणाखाली असलेल्या आम्हांस तुझे जिवलग भक्त होऊन इतरही सौख्यांतच असूं दे. अत्यंत दीर्घ व चिरकालिक आयुष्याचा उपभोग घेत तुझ्या कृपेनें प्राप्त झालेल्या आमच्या पदरच्या शूर माणसांसह तुझें स्तवन करीत आम्हांस बसूं दे. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ५४ ( इंद्र सूक्त )

ऋषि - सव्य अंगिरस : देवता - इंद्र : छंद - जगती; त्रिष्टुभ्


मा नो॑ अ॒स्मिन्म॑घवन्पृ॒त्स्वंह॑सि न॒हि ते॒ अन्तः॒ शव॑सः परी॒णशे॑ ॥
अक्र॑न्दयो न॒द्यो रोरु॑व॒द्वना॑ क॒था न क्षो॒णीर्भि॒यसा॒ समा॑रत ॥ १ ॥

मा नः अस्मिन् मघऽवन् पृत्ऽसु अंहसि नहि ते अंतः शवसः परिऽनशे ॥
अक्रंदयः नद्यः रोरुवत् वना कथा न क्षोणीः भियसा सं आरत ॥ १ ॥

हे उदार देवा, ह्या युद्धांत अशा कठीण प्रसंगी आम्हांस मोकलूं नकोस. खरोखर तुझ्या सामर्थ्याचा अंत लागणें अशक्य आहे. तूं गर्जना केल्याबरोबर नद्या व वृक्ष ह्यांना मोठ्यानें ओरडावयास लाविलेंस. अशा स्थितींत तुझ्या भितीनें मनुष्यें एकत्र कशी जमणार नाहींत बरें ? ॥ १ ॥


अर्चा॑ श॒क्राय॑ शा॒किने॒ शची॑वते शृ॒ण्वन्त॒मिन्द्रं॑ म॒हय॑न्न॒भि ष्टु॑हि ॥
यो धृ॒ष्णुना॒ शव॑सा॒ रोद॑सी उ॒भे वृषा॑ वृष॒त्वा वृ॑ष॒भो न्यृ॒ञ्जते॑ ॥ २ ॥

अर्च शक्राय शाकिने शचीऽवते शृण्वंतं इंद्रं महयन् अभि स्तुहि ॥
यः धृष्णुना शवसा रोदसी इति उभे इति वृषा वृषत्वा वृषभः निऽऋञ्जते ॥ २ ॥

सामर्थ्यवान्, पराक्रमी व बलवान इंद्राचे अर्चन करा. भक्तांची हांक ऐकण्यास तयार असलेल्या इंद्राचा गौरव करून त्याचें स्तवन करा. शक्तिसामर्थ्यानें युक्त असा हा इंद्र आपली धाडशी शक्ति व वीर्य ह्याच्या योगानें द्युलोक व भूलोक ह्या दोहोंसही भूषित करतो. ॥ २ ॥


अर्चा॑ दि॒वे बृ॑ह॒ते शू॒ष्यं३ वचः॒ स्वक्ष॑त्रं॒ यस्य॑ धृष॒तो धृ॒षन्मनः॑ ॥
बृ॒हच्छ्र॑वा॒ असु॑रो ब॒र्हणा॑ कृ॒तः पु॒रो हरि॑भ्यां वृष॒भो रथो॒ हि षः ॥ ३ ॥

अर्च दिवे बृहते शूष्यं वचः स्वऽक्षत्रं यस्य धृषतः धृषत् मनः ॥
बृहत्ऽश्रवाः असुरः बर्हणा कृतः पुरः हरिऽभ्यां वृषभः रथः हि सः ॥ ३ ॥

ज्या शूराचे अंतःकरणांत स्वतःच्या सामर्थ्याविषयी विश्वास असून त्याची धाडसाकडे प्रवृत्ति आहे त्या देदीप्यमान व श्रेष्ठ इंद्रास उद्देशून एकादें जोरदार स्तोत्र म्हणा. त्याची कीर्ति विशाल आहे. तो शत्रूंचा नाश करणारा आहे, तो पराक्रमी आहे, तो हरिद्वर्ण अश्व रथाच्या पुढें जोडीत असतो. तो सामर्थ्यवान् आहे व भक्तांकडे जाणारा तो जणूं काय रथच आहे. ॥ ३ ॥


त्वं दि॒वो बृ॑ह॒तः सानु॑ कोप॒योऽ॑व॒ त्मना॑ धृष॒ता शम्ब॑रं भिनत् ॥
यन्मा॒यिनो॑ व्र॒न्दिनो॑ म॒न्दिना॑ धृ॒षच्छि॒तां गभ॑स्तिम॒शनिं॑ पृत॒न्यसि॑ ॥ ४ ॥

त्वं दिवः बृहतः सानु कोपयः अव त्मना धृषता शंबरं भिनत् ॥
यत् मायिनः व्रंदिनः मंदिना धृषत् शितां गभस्तिं अशनिं पृतन्यसि ॥ ४ ॥

ज्यावेळी हातांत बळकट धरलेल्या तीक्ष्ण अशा वज्रानें, तूं तुला आनंद देणार्‍या सोमरसाच्या योगानें स्फुरण चढल्यामुळें, कपटी राक्षसांच्या चमूशी युद्ध केलेंस त्यावेळी विस्तीर्ण द्युलोकाचें शिखरही तूं हालवावयास लावलेंस व आपल्या जोराच्या प्रहारानें शंबराचें शरीर विदीर्ण केलेंस. ॥ ४ ॥


नि यद्वृ॒णक्षि॑ श्वस॒नस्य॑ मू॒र्धनि॒ शुष्ण॑स्य चिद्व्र॒न्दिनो॒ रोरु॑व॒द्वना॑ ॥
प्रा॒चीने॑न॒ मन॑सा ब॒र्हणा॑वता॒ यद॒द्या चि॑त्कृ॒णवः॒ कस्त्वा॒ परि॑ ॥ ५ ॥

नि यत् वृणक्षि श्वसनस्य मूर्धनि शुष्णस्य चित् व्रंदिनः रोरुवत् वना ॥
प्राचीनेन मनसा बर्हणाऽवता यत् अद्य चित् कृणवः कः त्वा परि ॥ ५ ॥

ज्याअर्थी वृक्षांना रुदन करावयास लावून शुष्णाच्याही सैन्यास तूं वायूच्या शिखरावर नेऊन कापून काढलेंस आणि ज्या अर्थी आपल्या उत्साही मनाची प्रवृत्ति अशाच पराक्रमाकडे ठेवून अजून सुद्धां तूं असे पराक्रम गाजवीत असतोस त्या अर्थी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे ? ॥ ५ ॥


त्वमा॑विथ॒ नर्यं॑ तु॒र्वशं॒ यदुं॒ त्वं तु॒र्वीतिं॑ व॒य्यं शतक्रतो ॥
त्वं रथ॒मेत॑शं॒ कृत्व्ये॒ धने॒ त्वं पुरो॑ नव॒तिं द॑म्भयो॒ नव॑ ॥ ६ ॥

त्वं आविथ नर्यं तुर्वशं यदुं त्वं तुर्वीतिं वय्यं शतक्रतो इति शतऽक्रतो ॥
त्वं रथं एतशं कृत्व्ये धने त्वं पुरः नवतिं दंभयः नव ॥ ६ ॥

तूं नर्य, तुर्वश व यदु ह्यांचे रक्षण केलेस. हे सामर्थ्यवान् इंद्रा तूं वय्य तुर्वींतीचेंही रक्षण केलेंस. संग्रामाचा प्रसंग प्राप्त झाला असतां तूं रथ आणि एतश ह्यांचे रक्षण केलेंस आणि शत्रूंची नव्व्याण्णव पुरें फोडून टाकलीस. ॥ ६ ॥


स घा॒ राजा॒ सत्प॑तिः शूशुव॒ज्जनो॑ रा॒तह॑व्यः॒ प्रति॒ यः शास॒मिन्व॑ति ॥
उ॒क्था वा॒ यो अ॑भिगृ॒णाति॒ राध॑सा॒ दानु॑रस्मा॒ उप॑रा पिन्वते दि॒वः ॥ ७ ॥

सः घ राजा सत्ऽपतिः शूशुवत् जनः रातऽहव्यः प्रति यः शासं इन्वति ॥
उक्था वा यः अभिऽगृणाति राधसा दानुः अस्मै उपरा पिन्वते दिवः ॥ ७ ॥

इंद्रास हवि अर्पण करून जो त्याच्या अनुशासनाप्रमाणे चालतो तो सज्जनांतील प्रमुख मनुष्य, राजा होऊन, अभिवृद्धीस पावतो. अथवा जो संतोषदायक हवि अर्पण करून त्यास उद्देशून स्तोत्रें म्हणतो, त्याचेसाठी वरून द्युलोकांतून, विपुल धनाची वृष्टि होते. ॥ ७ ॥


अस॑मं क्ष॒त्रमस॑मा मनी॒षा प्रसो॑म॒पा अप॑सा सन्तु॒ नेमे॑ ॥
ये त॑ इन्द्र द॒दुषो॑ व॒र्धय॑न्ति॒ महि॑ क्ष॒त्रं स्थवि॑रं॒ वृष्ण्यं॑ च ॥ ८ ॥

असमं क्षत्रं असमा मनीषा प्र सोमऽपाः अपसा संतु नेमे ॥
ये ते इंद्र ददुषः वर्धयंति महि क्षत्रं स्थविरं वृष्ण्यं च ॥ ८ ॥

तुझ्या बलास सीमा नाही, तुझ्या बुद्धिमत्तेसही सीमा नाही. जे सोमपान करणारे तुझे उपासक, दानकर्मांत प्रवीण अशा तुझ्या श्रेष्ठ सामर्थ्याची व विशाल शक्तीची थोरवी गातात, ते आपल्या सत्कृत्यांनी अभिवृद्धीला पोंहोचोत. ॥ ८ ॥


तुभ्येदे॒ते ब॑हु॒ला अद्रि॑दुग्धाश्चमू॒षद॑श्चम॒सा इ॑न्द्र॒पानाः॑ ॥
व्यश्नुहि त॒र्पया॒ काम॑मेषा॒मथा॒ मनो॑ वसु॒देया॑य कृष्व ॥ ९ ॥

तुभ्य इत् एते बहुलाः अद्रिऽदुग्धाः चमूसदः चमसाः इंद्रऽपानाः ॥
वि अश्नुहि तर्पय कामं एषां अथ मनः वसुऽदेयाय कृष्व ॥ ९ ॥

पाषाणाच्या केलेल्या उलूखलांत घालून पिळलेले, पात्रांत भरून ठेवलेले व इंद्रा तूं प्राशन करावेंस ह्याच हेतूनें तयार केलेले हे सोमरसाचे अनेक चमस तुझ्याचकरितां ठेवलेले आहेत. तूं त्यांचे प्राशन कर. ह्यांच्या संबंधाने तुझी जेवढी वांछा असेल तेवढी तृप्त करून घे, आणि आम्हांस संपत्ति देण्याकडे आपल्या मनाची प्रवृत्ति कर. ॥ ९ ॥


अ॒पाम॑तिष्ठद्ध॒रुण॑ह्वरं॒ तमो॑ऽ॒न्तर्वृ॒त्रस्य॑ ज॒ठरे॑षु॒ पर्व॑तः ॥
अ॒भीमिन्द्रो॑ न॒द्यो व॒व्रिणा॑ हि॒ता विश्वा॑ अनु॒ष्ठाः प्र॑व॒णेषु॑ जिघ्नते ॥ १० ॥

अपां अतिष्ठत् धरुणऽह्वरं तमः अन्तः वृत्रस्य जठरेषु पर्वतः ॥
अभि ईं इंद्रः नद्यः वव्रिणा हिताः विश्वाः अनुस्थाः प्रवणेषु जिघ्नते ॥ १० ॥

अंधकार उदकांच्या प्रवाहास बंद करून बसलेला होता, आणि पर्वतही वृत्राच्या जठरांत होता. पण इंद्राने त्या जलांस प्रतिबंध करणार्‍या राक्षसानें अडविलेल्या नद्यांस, त्या सर्वांनी सखल प्रदेशांतून एकीप्रमाणें दुसरीनें वहावें ह्या उद्देशानें वाट फोडून दिली. ॥ १० ॥


स शेवृ॑ध॒मधि॑ धा द्यु॒म्नम॒स्मे महि॑ क्ष॒त्रं ज॑ना॒षाळि॑न्द्र॒ तव्य॑म् ॥
रक्षा॑ च नो म॒घोनः॑ पा॒हि सू॒रीन्‍रा॒ये च॑ नः स्वप॒त्या इ॒षे धाः॑ ॥ ११ ॥

सः शेऽवृधं अधि धाः द्युम्नं अस्मे इति महि क्षत्रं जनाषाट् इंद्र तव्यम् ॥
रक्ष च नः मघोनः पाहि सूरीन् राये च नः सुऽअपत्यै इषे धाः ॥ ११ ॥

तर आतां आम्हांस हे इंद्रा, आमचे सौख्यवर्धन होईल असें वैभव अर्पण कर, आणि लोकांपेक्षां वरचढ असें विपुल शौर्य व बलही आम्हांस दे. हे औदार्यशाली देवा, आमचे रक्षण व आमच्या पदरच्या विद्वान् लोकांचेंही परिपालन कर आणि आम्हांस असे वैभव व समृद्धि दे कीं जिच्यांत उत्तम संततीचाही समावेश होईल. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ५५ ( इंद्र सूक्त )

ऋषि - सव्य अंगिरस : देवता - इंद्र : छंद - जगती


दि॒वश्चि॑दस्य वरि॒मा वि प॑प्रथ॒ इन्द्रं॒ न म॒ह्ना पृ॑थि॒वी च॒न प्रति॑ ॥
भी॒मस्तुवि॑ष्माञ्चर्ष॒णिभ्य॑ आत॒पः शिशी॑ते॒ वज्रं॒ तेज॑से॒ न वंस॑गः ॥ १ ॥

दिवः चित् अस्य वरिमा वि पप्रथे इंद्रं न मह्ना पृथिवी चन प्रति ॥
भीमः तुविष्मान् चर्षणिऽभ्य आऽतपः शिशीते वज्रं तेजसे न वंसगः ॥ १ ॥

ह्याचा श्रेष्ठपणा द्युलोकाहूनही जास्त आहे. पृथिवीसुद्धां आपल्या मोठेपणांत इंद्राची बरोबरी करूं शकणार नाहीं. हा शत्रूंस भितीप्रद, सामर्थ्यवान, व मानवांकरितां आपला प्रताप गाजविणारा असून, एखादा वृषभ आपल्या शिंगांस तीक्ष्णता आणण्याकरितां ती जशी पाजळतो त्याप्रमाणें आपलें वज्र जास्त तीक्ष्ण व्हावें म्हणून तो त्याची धारा तिखट करतो. ॥ १ ॥


सो अ॑र्ण॒वो न न॒द्यः समु॒द्रियः॒ प्रति॑ गृभ्णाति॒ विश्रि॑ता॒ वरी॑मभिः ॥
इन्द्रः॒ सोम॑स्य पी॒तये॑ वृषायते स॒नात्स यु॒ध्म ओज॑सा पनस्यते ॥ २ ॥

सः अर्णवः न नद्यः समुद्रियः प्रति गृभ्णाति विऽश्रिताः वरीमऽभिः ॥
इंद्रः सोमस्य पीतये वृषऽयते सनात् सः युध्मः ओजसा पनस्यते ॥ २ ॥

समुद्रामध्यें निवास करून, एखाद्या महासागराप्रमाणें, त्याच्या आश्रयार्थ येणार्‍या सर्व नद्यांचा, तो आपल्या श्रेष्ठ सामर्थ्याच्या योगाने स्वीकार करतो, आपणास सोमाचे प्राशन घडावें म्हणून एखाद्या वृषभाप्रमाणें तो आपली शक्ति प्रदर्शित करतो. त्याच्या अलौकिक बलामुळें हा योद्धा सनातन कालापासून स्तवनास पात्र झालेला आहे. ॥ २ ॥


त्वं तमि॑न्द्र॒ पर्व॑तं॒ न भोज॑से म॒हो नृ॒म्णस्य॒ धर्म॑णामिरज्यसि ॥
प्र वी॒र्येण दे॒वताति॑ चेकिते॒ विश्व॑स्मा उ॒ग्रः कर्म॑णे पु॒रोहि॑तः ॥ ३ ॥

त्वं तं इंद्र पर्वतं न भोजसे महः नृम्णस्य धर्मणां इरज्यसि ॥
प्र वीर्येण देवता अति चेकिते विश्वस्मै उग्रः कर्मणे पुरःऽहितः ॥ ३ ॥

हे इंद्रा, त्या पर्वतास जणूं काय ग्रासून टाकण्याकरितांच तूं अतिशय पौरुष आणि पराक्रम स्वतःकरितां प्राप्त करून घेतोस. सर्व अद्‍भुत कृत्यांत हा उग्र इंद्र पुढाकार घेत असून आपल्या सामर्थ्यांत सर्व देवतांस तो मागे टाकतो. ॥ ३ ॥


स इद्वने॑ नम॒स्युभि॑र्वचस्यते॒ चारु॒ जने॑षु प्रब्रुवा॒ण इ॑न्द्रि॒यम् ॥
वृषा॒ छन्दु॑र्भवति हर्य॒तो वृषा॒ क्षेमे॑ण॒ धेना॑म् म॒घवा॒ यदिन्व॑ति ॥ ४ ॥

सः इत् वने नमस्युऽभिः वचस्यते चारु जनेषु प्रऽब्रुवाण इंद्रियम् ॥
वृषा छंदुः भवति हर्यतः वृषा क्षेमेण धेनां मघऽवा यत् इन्वति ॥ ४ ॥

सर्व लोकांमध्ये आपल्या कल्याणप्रद सामर्थ्याची प्रसिद्धि करणार्‍या या एकट्या इंद्राचीच नमस्कृतिपूर्वक स्तुति होत असते. ज्यावेळी हवि अर्पण करणारा भक्त स्वकल्याणाच्या इच्छेनें इंद्राच्या स्तुतीस प्रवृत्र होतो, त्यावेळी हा पराक्रमी इंद्र त्याचेवर संतुष्ट होतो, त्याचेपुढें तो आपलें रमणीयत्व प्रकट करतो. ॥ ४ ॥


स इन्म॒हानि॑ समि॒थानि॑ म॒ज्मना॑ कृ॒णोति॑ यु॒ध्म ओज॑सा॒ जने॑भ्यः ॥
अधा॑ च॒न श्रद्द॑धति॒ त्विषी॑मत॒ इन्द्रा॑य॒ वज्रं॑ नि॒घनि॑घ्नते व॒धम् ॥ ५ ॥

सः इन् महानि संऽइथानि मज्मना कृणोति युध्मः ओजसा जनेभ्यः ॥
अध चन श्रत् दधति त्विषीऽमते इंद्राय वज्रं निऽघनिघ्नते वधम् ॥ ५ ॥

हाच योद्धा आपलें बल व सामर्थ्य ह्यांचे योगानें जनहिताकरितां मोठेमोठी युद्धे करतो, आणि म्हणूनच ह्या तेजस्वी व घातुक वज्रानें शत्रूंवर पुनःपुनः प्रहार करणार्‍या इंद्रावर सर्वलोक श्रद्धा ठेवतात. ॥ ५ ॥


स हि श्र॑व॒स्युः सद॑नानि कृ॒त्रिमा॑ क्ष्म॒या वृ॑धा॒न ओज॑सा विना॒शय॑न् ॥
ज्योतीं॑षि कृ॒ण्वन्न॑वृ॒काणि॒ यज्य॒वेऽ॑व सु॒क्रतुः॒ सर्त॒वा अ॒पः सृ॑जत् ॥ ६ ॥

सः हि श्रवस्युः सदनानि कृत्रिमा क्ष्मया वृधानः ओजसा विऽनाशयन् ॥
ज्योतींषि कृण्वन् अवृकाणि यज्यवे अव सुऽक्रतुः सर्तवै अपः सृजत् ॥ ६ ॥

खरोखर कीर्तीची इच्छा असलेल्या ह्या सामर्थ्यवान् इंद्रानें, पृथिवीप्रमाणें विशाल रूप धारण करून, आपल्या पराक्रमानें शत्रूंनी बांधलेल्या सदनांचा विध्वंस करून आणि यजन करणार्‍या भक्तांकरितां आकाशस्थ ज्योतींना त्रासापासून विमुक्त करून, जलांचे प्रवाह पुन्हां वाहूं लागावे म्हणून त्यांस बंधमुक्त केले. ॥ ६ ॥


दा॒नाय॒ मनः॑ सोमपावन्नस्तु तेऽ॒र्वाञ्चा॒ हरी॑ वन्दनश्रु॒दा कृ॑धि ॥
यमि॑ष्ठासः॒ सार॑थयो॒ य इ॑न्द्र ते॒ न त्वा॒ केता॒ आ द॑भ्नुवन्ति॒ भूर्ण॑यः ॥ ७ ॥

दानाय मनः सोमऽपावन् अस्तु ते अर्वांचा हरी इति वंदनऽश्रुत् आ कृधि ॥
यमिष्ठासः सारथयः ये इंद्र ते न त्वा केताः आ दभ्नुवंति भूर्णयः ॥ ७ ॥

हे सोमप्राशन करणार्‍या इंद्रा, तुझें मन आम्हांविषयी दातृत्वबुद्धि धारण करो आणि आमच्या नम्र स्तुति ऐकणार्‍या हे देवा, तूं आपले पीतवर्ण अश्व आमच्याकडे वळव. इंद्रा, तुझे सारथी तुझ्या अश्वांस ताब्यांत ठेवण्यांत अत्यंत कुशल आहेत, आणि म्हणून तुझे अश्व कितीही चपल असोत, ते तुला भलतीकडे कधीच घेऊन जात नाहीत. ॥ ७ ॥


अप्र॑क्षितं॒ वसु॑ बिभर्षि॒ हस्त॑यो॒रषा॑ळ्हं॒ सह॑स्तन्वि श्रु॒तो द॑धे ॥
आवृ॑तासोऽव॒तासो॒ न क॒र्तृभि॑स्त॒नूषु॑ ते॒ क्रत॑व इन्द्र॒ भूर॑यः ॥ ८ ॥

अप्रऽक्षितं वसु बिभर्षि हस्तयोः अषाळ्हं सहः तन्वि श्रुतः दधे ॥
आऽवृतासः अवतासः न कर्तृऽभिः तनूषु ते क्रतवः इंद्र भूरयः ॥ ८ ॥

हे इंद्रा, तूं विख्यात आहेस, ज्यास कधीं विनाश नाही असें वैभव तूं आपले हातांत वागवितोस. तूं शत्रूंस वरचढ करण्यास कठीण असे सामर्थ्य आपले अंगी धारण केले आहेस. कर्तृत्ववान् पुरुष ज्याचे सभोंवती उभे आहेत अशा विहिरीप्रमाणे शोभणार्‍या तुझ्या अनेक शक्ति, हे इंद्रा ! तुझ्या शरीरांत वास करून आहेत. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ५६ ( इंद्र सूक्त )

ऋषि - सव्य अंगिरस : देवता - इंद्र : छंद - जगती


ए॒ष प्र पू॒र्वीरव॒ तस्य॑ च॒म्रिषोऽ॑त्यो॒ न योषा॒मुद॑यंस्त भु॒र्वणिः॑ ॥
दक्षं॑ म॒हे पा॑ययते हिर॒ण्ययं॒ रथ॑मा॒वृत्या॒ हरि॑योग॒मृभ्व॑सम् ॥ १ ॥

एष प्र पूर्वीः अव तस्य चम्रिषः अत्यः न योषां उत् अयंस्त भुर्वणिः ॥
दक्षं महे पाययते हिरण्ययं रथं आऽवृत्य हरिऽयोगं ऋभ्वसम् ॥ १ ॥

ज्याप्रमाणे एखादा तुरग आपल्या तुरगीकरितां उत्सुक असतो, त्याप्रमाणे चमसांत भरपूर भरून ठेवलेला सोमरस पिण्यास हा उतावीळपणे उद्युक्त झाला आहे. ज्यास पीतवर्ण अश्व जोडलेले आहेत असा आपला मोठा रथ इकडे फिरवून हा इंद्र महत्कार्यास अत्यवश्यक असा सामर्थ्यदायक सोमरस प्राशन करतो. ॥ १ ॥


तं गू॒र्तयो॑ नेम॒न्निषः॒ परी॑णसः समु॒द्रं न सं॒चर॑णे सनि॒ष्यवः॑ ॥
पतिं॒ दक्ष॑स्य वि॒दथ॑स्य॒ नू सहो॑ गि॒रिं न वे॒ना अधि॑ रोह॒ तेज॑सा ॥ २ ॥

तं गूर्तयः नेमन्ऽइषः परीणसः समुद्रं न संऽचरणे सनिष्यवः ॥
पतिं दक्षस्य विदथस्य नु सहः गिरिं न वनाः अधि रोह तेजसा ॥ २ ॥

ज्याप्रमाणे प्रवासास निघण्याचेवेळी धनार्जनेच्छु धाडसी लोकांची समुद्रावर गर्दी होते, त्याप्रमाणे हवि सिद्ध करून तयार असलेल्या स्तोत्रजनांची ह्याचे सभोंवती गर्दी जमते. यज्ञाचे केवळ बलच असा जो हा सामर्थ्याधिपति सूर्य त्यास हे देवा, ज्याप्रमाणे ह्या सुंदर युवति (म्ह. उषा) पर्वतावर आरूढ झालेल्या आहेत त्याप्रमाणे, पर्वतावर संस्थापित कर. ॥ २ ॥


स तु॒र्वणि॑र्म॒हाँ अ॑रे॒णु पौंस्ये॑ गि॒रेर्भृ॒ष्टिर्न भ्रा॑जते तु॒जा शवः॑ ॥
येन॒ शुष्णं॑ मा॒यिन॑माय॒सो मदे॑ दु॒ध्र आ॒भूषु॑ रा॒मय॒न्नि दाम॑नि ॥ ३ ॥

सः तुर्वणिः महान् अरेणु पौंस्ये गिरेः भृष्टिः न भ्राजते तुजा शवः ॥
येन शुष्णं मायिनं आयसः मदे दुध्रः आभूषु रमयन् नि दामनि ॥ ३ ॥

तो शत्रूंचा नाश करणारा व श्रेष्ठ आहे. त्याचे अत्यंत शुद्ध बल आपल्या सामर्थ्याने प्रत्येक युद्धांत गिरिशिखराप्रमाणे चमकत असतें. ह्या बलाच्या योगानें ह्या अजिंक्य देवानें सोमरसामुळें उत्पन्न झालेल्या आनंदाच्या भरांत आपले लोखंडी वज्र घेऊन, कपटी शुष्णाचा पराभव केला व त्यास शृंखलाबद्ध करून कारागृहांत कोंडून टाकलें. ॥ ३ ॥


दे॒वी यदि॒ तवि॑षी॒ त्वावृ॑धो॒तय॒ इन्द्रं॒ सिष॑क्त्यु॒षसं॒ न सूर्यः॑ ॥
यो धृ॒ष्णुना॒ शव॑सा॒ बाध॑ते॒ तम॒ इय॑र्ति रे॒णुं बृ॒हद॑र्हरि॒ष्वणिः॑ ॥ ४ ॥

देवी यदि तविषी त्वाऽवृधा ऊतये इंद्रं सिसक्ति उषसं न सूर्यः ॥
यः धृष्णुना शवसा बाधते तम इयर्ति रेणुं बृहत् अर्हरिऽस्वनिः ॥ ४ ॥

ज्यावेळी तूंच लहानपणापासून वाढविलेली शक्तिरूपी देवता, ज्याप्रमाणे सूर्य उषेवर आसक्त होतो त्याप्रमाणें, स्वसंरक्षणार्थ इंद्राचा आश्रय करते त्यावेळी आपल्या प्रतापी सामर्थ्यानें अंधकाराचा नाश करणारा हा देव जयघोष करीत सर्व मलिनतेस दूर घालवून देतो. ॥ ४ ॥


वि यत्ति॒रो ध॒रुण॒मच्यु॑तं॒ रजोऽ॑तिष्ठिपो दि॒व आता॑सु ब॒र्हणा॑ ॥
स्वर्मीळ्हे॒ यन्मद॑ इन्द्र॒ हर्ष्याह॑न्वृ॒त्रं निर॒पामौ॑ब्जो अर्ण॒वम् ॥ ५ ॥

वि यत् तिरः धरुणं अच्युतं रजः अतिस्थिपः दिवः आतासु बर्हणा ॥
स्वः मीळ्हे यत् मद इंद्र हर्ष्या अहन् वृत्रं निः अपां औब्जः अर्णवम् ॥ ५ ॥

जेव्हां तूं आपल्या सामर्थ्याने द्युलोकाच्या सीमेवर रजोलोकाची दृढपणें व सुस्थिरपणें संस्थापना केलीस व जेव्हां सोमरसामुळे उत्पन्न झालेल्या हर्षाच्या भरांत तूं मोठ्या आवेशाने वृत्राचा युद्धांत वध केलास तेव्हां उदकाचा संचय तुझे हातून बंधमुक्त झाला. इंद्रा, तूं श्रेष्ठ आहेस, तूं पृथिवीच्या प्रदेशांत आपल्या सामर्थ्यानें आकाशाच्या बालकास घेऊन येतोस. सोमरसामुळें उत्पन्न झालेल्या हर्षाचे भरांत तूं उदकांना वाट फोडून दिलीस व वृत्राच्या दगडी तटांचा उच्छेद करून टाकलास. ॥ ५ ॥


त्वं दि॒वो ध॒रुणं॑ धिष॒ ओज॑सा पृथि॒व्या इ॑न्द्र॒ सद॑नेषु॒ माहि॑नः ॥
त्वं सु॒तस्य॒ मदे॑ अरिणा अ॒पो वि वृ॒त्रस्य॑ स॒मया॑ पा॒ष्यारुजः ॥ ६ ॥

त्वं दिवः धरुणं धिषे ओजसा पृथिव्याः इंद्र सदनेषु माहिनः ॥
त्वं सुतस्य मदे अरिणाः अपः वि वृत्रस्य समया पाष्या अरुजः ॥ ६ ॥

द्युलोकातील जलराशी स्वपराक्रमाने पृथ्वीवर आणणार्‍या हे इंद्रा, सोमरसाच्या आवेशात वृत्राच्या पाषाणमय दुर्गांचा भेद करून त्यामध्ये कोंडलेल्या जलराशी तू विमुक्त केल्यास. ॥ ६ ॥


ऋग्वेद - ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ५७ ( इंद्र सूक्त )

ऋषि - सव्य अंगिरस : देवता - इंद्र : छंद - जगती


प्र मंहि॑ष्ठाय बृह॒ते बृ॒हद्र॑ये स॒त्यशु॑ष्माय त॒वसे॑ म॒तिं भ॑रे ॥
अ॒पामि॑व प्रव॒णे यस्य॑ दु॒र्धरं॒ राधो॑ वि॒श्वायु॒ शव॑से॒ अपा॑वृतम् ॥ १ ॥

प्र मंहिष्ठाय बृहते बृहत्ऽरये सत्यऽशुष्माय तवसे मतिं भरे ॥
अपांऽइव प्रवणे यस्य दुःधरं राधः विश्वऽआयु शवसे अपऽवृतम् ॥ १ ॥

अत्यंत उदार, श्रेष्ठ, अत्यंत वैभवशाली, सत्य, सामर्थ्यवान् व पराक्रमाचा पुतळाच अशा ह्या देवा प्रित्यर्थ मी स्तुति अर्पण करतो. ज्याप्रमाणे उतार जमीनीवर पाण्याचा झोत सुरू झाला म्हणजे तो कोणत्याही प्रतिबंधास न जुमानतां सर्वत्र पसरतो त्याप्रमाणे सर्वत्र दृगोचर होणार्‍या व अखंड सुरू असणार्‍या कृपाप्रसादाची कपाटें भक्तांचे अंगी सामर्थ्य आणण्याकरितां सदैव खुली असतात. ॥ १ ॥


अध॑ ते॒ विश्व॒मनु॑ हासदि॒ष्टय॒ आपो॑ नि॒म्नेव॒ सव॑ना ह॒विष्म॑तः ॥
यत्पर्व॑ते॒ न स॒मशी॑त हर्य॒त इन्द्र॑स्य॒ वज्रः॒ श्नथि॑ता हिर॒ण्ययः॑ ॥ २ ॥

अध ते विश्वं अनु ह असत् इष्टये आपः निम्नाऽइव सवना हविष्मतः ॥
यत् पर्वते न संऽअशीत हर्यतः इंद्रस्य वज्रः श्नथिता हिरण्ययः ॥ २ ॥

ज्यावेळीं सुवर्णमय, सुंदर परंतु प्राणघातक वज्र पर्वतावर फेंकल्याप्रमाणे वृत्राच्या शरीरावर जाऊन पडलें त्यावेळी सर्व विश्व तुझें पूजन करण्यास प्रवृत्त झालें व सखल जमीनीकडे पाण्याचा ओघ जसा भराभर वहात जातो त्याप्रमाणें भक्तांचे हवि तुझ्याकडे एकसारखे येऊं लागले. ॥ २ ॥


अ॒स्मै भी॒माय॒ नम॑सा॒ सम॑ध्व॒र उषो॒ न शु॑भ्र॒ आ भ॑रा॒ पनी॑यसे ॥
यस्य॒ धाम॒ श्रव॑से॒ नामे॑न्द्रि॒यं ज्योति॒रका॑रि ह॒रितो॒ नाय॑से ॥ ३ ॥

अस्मै भीमाय नमसा सं अध्वरे उषः न शुभ्रे आ भर पनीयसे ॥
यस्य धाम श्रवसे नाम इंद्रियं ज्योतिः आकारि हरितः न अयसे ॥ ३ ॥

ज्याचे तेज, ज्याचें नाम, ज्याचें बल व ज्याचा प्रकाश यांची चोहोंकडे प्रशंसा व्हावी म्हणून तूं त्यांना सर्वत्र प्रसृत होण्याकरितां, त्या इंद्राच्या पीतवर्ण अश्वांप्रमाणेंच प्रवृत्र केलेंस. त्या भितीप्रद पण स्तुतिस्तोत्रें गाण्यास योग्य अशा इंद्रास, उषेप्रमाणें कांतिमान दिसणारी हे युवति, ह्या यज्ञांत नमस्कृति अर्पण करून घेऊन ये. ॥ ३ ॥


इ॒मे त॑ इन्द्र॒ ते व॒यं पु॑रुष्टुत॒ ये त्वा॒रभ्य॒ चरा॑मसि प्रभूवसो ॥
न॒हि त्वद॒न्यो गि॑र्वणो॒ गिरः॒ सघ॑त्क्षो॒णीरि॑व॒ प्रति॑ नो हर्य॒ तद्वचः॑ ॥ ४ ॥

इमे ते इंद्र ते वयं पुरुऽस्तुत ये त्वा आऽरभ्य चरामसि प्रभूवसो इति प्रभुऽवसो ॥
नहि त्वत् अन्यः गिर्वणः गिरः सघत् क्षोणीःऽइव प्रति नः हर्य तत् वचः ॥ ४ ॥

अनेकांनी ज्याची स्तुति केली अशा हे वैभवशाली इंद्रा, आम्ही सर्वस्वी तुझें आहोत. कारण तुझा आश्रय धरून आम्ही ह्या जगांत नांदत असतो. हे स्तुतिप्रिय देवा, तुझ्या वांचून अन्य कोणासही स्तुति प्राप्त होत नाहींत. ह्यासाठी ज्याप्रमाणे पृथ्वी ही जीवनमात्रास जागा देते तद्वत् तूंही आमच्या स्तोत्रांचा स्वीकार कर. ॥ ४ ॥


भूरि॑ त इन्द्र वी॒र्यं१ ं तव॑ स्मस्य॒स्य स्तो॒तुर्म॑घव॒न्काम॒मा पृ॑ण ॥
अनु॑ ते॒ द्यौर्बृ॑ह॒ती वी॒र्यम् मम इ॒यं च॑ ते पृथि॒वी ने॑म॒ ओज॑से ॥ ५ ॥

भूरि ते इंद्र वीर्यं तव स्मसि अस्य स्तोतुः मघऽवन् कामं आ पृण ॥
अनु ते द्यौः बृहती वीर्यं ममे इयं च ते पृथिवी नेमे ओजसे ॥ ५ ॥

हे इंद्रा ! तुझे बल विपुल आहे. आम्ही तुझे आहोंत. तूं ह्या आपल्या भक्ताची इच्छा पुरव. या विशाल द्युलोकानें आपलें सामर्थ्यशी तोलून पाहिले आहे व ही पृथ्वीही तुझ्या पराक्रमापुढें नम्र झाली आहे. ॥ ५ ॥


त्वं तमि॑न्द्र॒ पर्व॑तं म॒हामु॒रुं वज्रे॑ण वज्रिन्पर्व॒शश्च॑कर्तिथ ॥
अवा॑सृजो॒ निवृ॑ताः॒ सर्त॒वा अ॒पः स॒त्रा विश्वं॑ दधिषे॒ केव॑लं॒ सहः॑ ॥ ६ ॥

त्वं तं इंद्र पर्वतं महां उरुं वज्रेण वज्रिन् पर्वऽशः चकर्तिथ ॥
अव असृजः निऽवृताः सर्तवै अपः सत्रा विश्वं दधिषे केवलं सहः ॥ ६ ॥

हे वज्रधारी इंद्रा, त्या मोठ्या व विशाल पर्वताचे तूं आपल्या वज्रानें तुकडे तुकडे केलेस. रोखून टाकलेले जलप्रवाह पुन्हां चालू व्हावे म्हणूनही तूंच त्यास मार्ग करून दिलास. खरोखर सर्व सामर्थ्य काय तें तूंच एकटा धारण करतोस. ॥ ६ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ५८ ( अग्नि सूक्त )

ऋषि - नोधस् गौतम : देवता - अग्नि : छंद - जगती; त्रिष्टुभ्


नू चि॑त्सहो॒जा अ॒मृतो॒ नि तु॑न्दते॒ होता॒ यद्दू॒तो अभ॑वद्वि॒वस्व॑तः ॥
वि साधि॑ष्ठेभिः प॒थिभी॒ रजो॑ मम॒ आ दे॒वता॑ता ह॒विषा॑ विवासति ॥ १ ॥

नु चित् सहःऽजाः अमृतः नि तुंदते होता यत् दूतः अभवत् विवस्वतः ॥
वि साधिष्ठेभिः पथिऽभिः रजः ममे आ देवऽताता हविषा विवासति ॥ १ ॥

हा देवांस हवि पोंचविणारा अग्नि विवस्वानाचा दूत झालेला आहे. म्हणूनच हा सामर्थ्यापासून जन्म पावणारा अमर्त्य देव कधींही श्रांत होत नाही. तो उत्तम मार्गांनी रजोलोकाचे आक्रमण करतो व यज्ञांत देवांस हवि अर्पण करून त्यांचे आदरातिथ्य करतो. ॥ १ ॥


आ स्वमद्म॑ यु॒वमा॑नो अ॒जर॑स्तृ॒ष्ववि॒ष्यन्न॑त॒सेषु॑ तिष्ठति ॥
अत्यो॒ न पृ॒ष्ठं प्रु॑षि॒तस्य॑ रोचते दि॒वो न सानु॑ स्त॒नय॑न्नचिक्रदत् ॥ २ ॥

आ स्वं अद्म युवमानः अजरः तृषु अविष्यन् अतसेषु तिष्ठति ॥
अत्यः नः पृष्ठं प्रुषितस्य रोचते दिवः न सानु स्तनयन् अचिक्रदत् ॥ २ ॥

ज्यास जरेची भिती नाही असा हा अग्निदेव आपल्या अन्नाचा सत्वर व आतुरतेनें स्वीकार करून काष्टामध्यें प्रज्वलित होऊन राहतो. त्यास घृत अर्पण केले म्हणजे ह्याचा पृष्ठभाग एखाद्या ताज्यातवान्या अश्वाप्रमाणे तुकतुकीत दिसतो. ह्यानें जणूं कांही स्वर्गाच्याही टोंकापर्यंत उत्पन्न करीत गर्जना केली आहे. ॥ २ ॥


क्रा॒णा रु॒द्रेभि॒र्वसु॑भिः पु॒रोहि॑तो॒ होता॒ निष॑त्तो रयि॒षाळम॑र्त्यः ॥
रथो॒ न वि॒क्ष्वृञ्जसा॒न आ॒युषु॒ व्यानु॒षग्वार्या॑ दे॒व ऋ॑ण्वति ॥ ३ ॥

क्राणाः रुद्रेभिः वसुभिः पुरःऽहितः होता निःऽसत्तः रयिषाट् अमर्त्यः ॥
रथः न विक्षु ऋञ्जसानः आयुषु वि आनुषक् वार्या देव ऋण्वति ॥ ३ ॥

जो कर्तृत्वशील आहे, रुद्र आणि वसु ह्यांनी ज्यास प्रमुखत्व दिले आहे, ज्याने वैभव जिंकून आणले आहे व ज्यास मृत्युभय नाही असा हा हविर्दाता अग्नि येथें येऊन विराजमान झाला आहे. हा देव ह्या जगांत असणार्‍या सर्व मनुष्यांत प्रतिष्ठा पावून एखाद्या रथाप्रमाणे एकसारखी संपत्ति घेऊन येत असतो. ॥ ३ ॥


वि वात॑जूतो अत॒सेषु॑ तिष्ठते॒ वृथा॑ जु॒हूभिः॒ सृण्या॑ तुवि॒ष्वणिः॑ ॥
तृ॒षु यद॑ग्ने व॒निनो॑ वृषा॒यसे॑ कृ॒ष्णं त॒ एम॒ रुश॑दूर्मे अजर ॥ ४ ॥

वि वातऽजूतः अतसेषु तिष्ठते वृथा जुहूभिः सृण्या तुविऽस्वनिः ॥
तृषु यत् अग्ने वनिनः वृषऽयसे कृष्णं ते एम रुशत्ऽदूर्मे अजर ॥ ४ ॥

वायूनें प्रेरित होतांच हा मोठीं गर्जना करून आपली जिव्हारूप कोयती बरोबर घेऊन काष्ठसमुदायांत सहज रीतीनें ठाणे देतो. ज्वलज्वालांनी परिवेष्टित व वार्धक्यपीडेपासून निर्मुक्त असणार्‍या हे अग्निदेवा, जेव्हां तूं काष्ठसमुदायांत आपलें सामर्थ्य एकदम प्रकट करतोस त्यावेळी तुझा मार्ग धुरानें काळा होऊन जातो. ॥ ४ ॥


तपु॑र्जम्भो॒ वन॒ आ वात॑चोदितो यू॒थे न सा॒ह्वाँ अव॑ वाति॒ वंस॑गः ॥
अ॒भि॒व्रज॒न्नक्षि॑तं॒ पाज॑सा॒ रज॑ स्था॒तुश्च॒रथं॑ भयते पत॒त्रिणः॑ ॥ ५ ॥

तपुःजंभः वने आ वातऽचोदितः यूथे न सह्वान् अव वाति वंसगः ॥
अभिऽव्रजन् अक्षितं पाजसा रजः स्थातुः चरथं भयते पतत्रिणः ॥ ५ ॥

ज्याची दंष्ट्रा ज्वालामय आहे असा हा अग्नि वायूनें प्रेरित होऊन जेव्हां काष्ठसमुदायांत शिरतो त्यावेळी, एखादा शक्तिमान वृषभ जसा आपल्या कळपांत निर्भय संचार करतो, तसा हा संचार करूं लागतो. जेव्हां अविनाशी अशा रजोलोकांतून आपल्या सामर्थ्याने हा गमन करतो, त्यावेळी सर्व चराचर सृष्टीस ह्या पक्षिराजाचें भय वाटूं लागतें. ॥ ५ ॥


द॒धुष्ट्वा॒ भृग॑वो॒ मानु॑षे॒ष्वा र॒यिं न चारुं॑ सु॒हवं॒ जने॑भ्यः ॥
होता॑रमग्ने॒ अति॑थिं॒ वरे॑ण्यं मि॒त्रं न शेवं॑ दि॒व्याय॒ जन्म॑ने ॥ ६ ॥

दधुः त्वा भृगवः मानुषेषु आ रयिं न चारुं सुऽहवं जनेभ्यः ॥
होतारं अग्ने अतिथिं वरेण्यं मित्रं न शेवं दिव्याय जन्मने ॥ ६ ॥

संपत्तीप्रमाणें मोहक असणारा, सर्व लोकांस हांक मारण्यास सुलभ वाटणारा, व दिव्य लोकांतील पुरुषांना मित्राप्रमाणें सौख्यदायक असणारा असा हा जो श्रेष्ठ हविर्दाता, तो तूं हे अग्निदेवा जेव्हां भृगूंचा अतिथि झालास तेव्हां त्यांनी तुला मानवसमुदायांत सन्मानाने जागा दिली. ॥ ६ ॥


होता॑रं स॒प्त जु॒ह्वो३यजि॑ष्ठं॒ यं वा॒घतो॑ वृ॒णते॑ अध्व॒रेषु॑ ॥
अ॒ग्निं विश्वे॑षामर॒तिं वसू॑नां सप॒र्यामि॒ प्रय॑सा॒ यामि॒ रत्न॑म् ॥ ७ ॥

होतारं सप्त जुह्वः यजिष्ठं यं वाघतः वृणते अध्वरेषु ॥
अग्निं विश्वेषां अरतिं वसूनां सपर्यामि प्रयसा यामि रत्नम् ॥ ७ ॥

भक्तांस सर्व संपत्ति अर्पण करणार्‍या अग्नीचें मी हवींनी पूजन करतो व त्यामुळें मला उत्कृष्ट संपत्तिही प्राप्त होते. हा अग्नि देवांस हवि पोंचविणारा असल्यामुळें ह्या यज्ञार्ह अग्नीचें यज्ञांत आगमन व्हावें अशी हवि अर्पण करणारे सप्त ऋत्विज नेहमी इच्छा करीत असतात. ॥ ७ ॥


अच्छि॑द्रा सूनो सहसो नो अ॒द्य स्तो॒तृभ्यो॑ मित्रमहः॒ शर्म॑ यच्छ ॥
अग्ने॑ गृ॒णन्त॒मंह॑स उरु॒ष्योर्जो॑ नपात्पू॒र्भिराय॑सीभिः ॥ ८ ॥

अच्छिद्रा सूनो इति सहसः नः अद्य स्तोतृऽभ्यः मित्रऽमहः शर्म यच्छ ॥
अग्ने गृणंतं अंहसः उरुष्य ऊर्जः नपात् पूःऽर्भिः आयसीभिः ॥ ८ ॥

सामर्थ्यापासून जन्म पावणार्‍या व स्वमित्रांस आनंद देणार्‍या हे अग्निदेवा ! तुझें स्तवन करणार्‍या भक्तांस तूं आज अक्षय्य सुख प्राप्त करून दे. हे शक्तिपुत्र अग्ने, तुझी स्तुति गाणार्‍या सेवकांस लोखंडी तटांची नगरें बांधून देऊन तूं त्यांचे संकटांपासून संरक्षण कर. ॥ ८ ॥


भवा॒ वरू॑थं गृण॒ते वि॑भावो॒ भवा॑ मघवन्म॒घव॑द्‍भ्यः॒ शर्म॑ ॥
उ॒रु॒ष्याग्ने॒ अंह॑सो गृ॒णन्तं॑ प्रा॒तर्म॒क्षू धि॒याव॑सुर्जगम्यात् ॥ ९ ॥

भव वरूथं गृणते विभाऽवः भवा मघऽवन् मघवत्ऽ‍भ्यः शर्म ॥
उरुष्य अग्ने अंहसः गृणंतं प्रातः मक्षू धियाऽवसुः जगम्यात् ॥ ९ ॥

हे दीप्तिमान अग्निदेवा, तुझी स्तुति करणार्‍या भक्ताचें तूं कवच हो. हे उदार देवा जे तुला हवि अर्पण करतात त्यांस तूं प्रत्यक्ष कल्याणस्वरूपच हो. तूं आपल्या स्तोतृजनांचें संकटापासून संरक्षण करीतच असतोस, तेव्हां असंख्य स्तुति स्तोत्रांनी मंडित असा अग्निदेव प्रातःकाळी लवकरच आमच्या यज्ञाकडे येवो. ॥ ९ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ५९ ( अग्नि सूक्त )

ऋषि - नोधस् गौतम : देवता - वैश्वानर अग्नि : छंद - त्रिष्टुभ्


व॒या इद॑ग्ने अ॒ग्नय॑स्ते अ॒न्ये त्वे विश्वे॑ अ॒मृता॑ मादयन्ते ॥
वैश्वा॑नर॒ नाभि॑रसि क्षिती॒नां स्थूणे॑व॒ जना॑ँ उप॒मिद्य॑यन्थ ॥ १ ॥

वया इत् अग्ने अग्नयः ते अन्ये त्वेइति विश्वे अमृताः मादयंते ॥
वैश्वानर नाभिः असि क्षितीनां स्थूणाऽइव जनान् उपऽमित् ययंथ ॥ १ ॥

हे अग्निदेवा, इतर सर्व अग्नि ह्या तुझ्या शाखा आहेत. सर्व अमर देव तुझ्याच ठिकाणी अत्यंत संतोष पावतात. सर्व विश्वाविषयी मित्रत्व धारण करणार्‍या हे अग्निदेवा, तूं सर्व पृथ्वीचा मध्यबिंदु आहेस. ॥ १ ॥


मू॒र्धा दि॒वो नाभि॑र॒ग्निः पृ॑थि॒व्या अथा॑भवदर॒ती रोद॑स्योः ॥
तं त्वा॑ दे॒वासो॑ऽजनयन्त दे॒वं वैश्वा॑नर॒ ज्योति॒रिदार्या॑य ॥ २ ॥

मूर्धा दिवः नाभिः अग्निः पृथिव्याः अथ अभवत् अरतीः रोदस्योः ॥
तं त्वा देवासः अजनयंत देवं वैश्वानर ज्योतिः इत् आर्याय ॥ २ ॥

अग्नि हा द्युलोकाचें मस्तक व पृथिवीची नाभि आहे. शिवाय द्युलोक व भूलोक ह्यांचा अधिपति झाला आहे. सर्व विश्वाविषयी मित्रत्व धारण करणार्‍या हे अग्निदेवा, तूं असा श्रेष्ठ देव असल्यामुळें तू आर्यजनांची मार्गदर्शक अशी ज्योतिच व्हावेंस ह्या हेतूनें तुला देवांनी निर्माण केलें. ॥ २ ॥


आ सूर्ये॒ न र॒श्मयो॑ ध्रु॒वासो॑ वैश्वान॒रे द॑धिरेऽ॒ग्ना वसू॑नि ॥
या पर्व॑ते॒ष्वोष॑धीष्व॒प्सु या मानु॑षे॒ष्वसि॒ तस्य॒ राजा॑ ॥ ३ ॥

आ सूर्ये न रश्मयः ध्रुवासः वैश्वानरे दधिरे अग्ना वसूनि ॥
या पर्वतेषु ओषधीषु अप्ऽसु या मानुषेषु असि तस्य राजा ॥ ३ ॥

ज्याप्रमाणे सूर्याचे ठिकाणी रश्मींचा निरंतर वास असतो त्याप्रमाणे सर्व विश्वाविषयी मित्रत्व धारण करणार्‍या ह्या अग्नीचे ठिकणी सर्व वैभवें संस्थापित झालेलीं आहेत. ज्या द्रव्यनिधींचा, पर्वत, वनस्पति अथवा मर्त्यलोक ह्यांचे ठिकाणी निवास असतो त्या सर्वांचा तूंच एकटा राजा आहेस. ॥ ३ ॥


बृ॒ह॒ती इ॑व सू॒नवे॒ रोद॑सी॒ गिरो॒ होता॑ मनु॒ष्यो३॑ न दक्षः॑ ॥
स्वर्वते स॒त्यशु॑ष्माय पू॒र्वीर्वै॑श्वान॒राय॒ नृत॑माय य॒ह्वीः ॥ ४ ॥

बृहती इवेति बृहतीऽइव सूनवे रोदसी इति गिरः होता मनुष्यः न दक्षः ॥
स्वःऽवते सत्यऽशुष्माय पूर्वीः वैश्वानराय नृऽतमाय यह्वीः ॥ ४ ॥

जणूं कांही ह्या उदार अग्निप्रित्यर्थच द्युलोक व भूलोक इतके विस्तीर्ण झालेले आहेत. ह्या प्रकाशमान, सत्यबलानें युक्त, सर्व विश्वाविषयी मित्रभाव धारण करणार्‍या व सर्व शूरांमध्यें श्रेष्ठ अशा अग्निदेवास हा उपासक प्रज्ञावान पुरुषाप्रमाणे मोठीं मोठीं अशी असंख्य स्तोत्रें अर्पण करीत आहे. ॥ ४ ॥


दि॒वश्चि॑त्ते बृह॒तो जा॑तवेदो॒ वैश्वा॑नर॒ प्र रि॑रिचे महि॒त्वम् ॥
राजा॑ कृष्टी॒नाम॑सि॒ मानु॑षीणां यु॒धा दे॒वेभ्यो॒ वरि॑वश्चकर्थ ॥ ५ ॥

दिवः चित् ते बृहतः जातऽवेदः वैश्वानर प्र रिरिचे महिऽत्वम् ॥
राजा कृष्टीनां असि मानुषीणां युधा देवेभ्यः वरिवः चकर्थ ॥ ५ ॥

सर्व विश्वाविषयी मित्रत्व धारण करणार्‍या हे सर्वज्ञ अग्निदेवा, तुझा महिमा ह्या विस्तीर्ण द्युलोकासही पुरून उरला आहे. तूं सर्व मानवसमुदायाचा राजा आहेस. राक्षसांशी युद्ध करून तूं देवांना सुरक्षितपणा उत्पन्न केलास. ॥ ५ ॥


प्र नू म॑हि॒त्वं वृ॑ष॒भस्य॑ वोचं॒ यं पू॒रवो॑ वृत्र॒हणं॒ सच॑न्ते ॥
वै॒श्वा॒न॒रो दस्यु॑म॒ग्निर्ज॑घ॒न्वाँ अधू॑नो॒त्काष्ठा॒ अव॒ शम्ब॑रं भेत् ॥ ६ ॥

प्र नु महिऽत्वं वृषभस्य वोचं यं पूरवः वृत्रऽहनं सचंते ॥
वैश्वानरः दस्युं अग्निः जघन्वान् अधूनोत् काष्ठाः अव शंबरं भेत् ॥ ६ ॥

वृत्राचा वध करणार्‍या ज्या अग्नीचा आश्रय सर्व लोक शोधतात त्या सामर्थ्यवान् देवाचा महिमा ह्या स्तोत्रांत मी गाइला आहे. सर्व विश्वाविषयी मित्रत्व बाळगणार्‍या ह्या अग्नीनें दस्यूंचा वध करून उदकांचे मार्गांतील प्रतिबंध नाहींसा केला व शंबरास छिन्नविच्छिन्न करून टाकले. ॥ ६ ॥


वै॒श्वा॒न॒रो म॑हि॒म्ना वि॒श्वकृ॑ष्टिर्भ॒रद्वा॑जेषु यज॒तो वि॒भावा॑ ॥
शा॒त॒व॒ने॒ये श॒तिनी॑भिर॒ग्निः पु॑रुणी॒थे ज॑रते सू॒नृता॑वान् ॥ ७ ॥

वैश्वानरः महिम्ना विश्वऽकृष्टिः भरत्ऽवाजेषु यजतः विभाऽवा ॥
शातऽवनेये शतिनीभिः अग्निः पुरुऽनीथे जरते सूनृताऽवान् ॥ ७ ॥

सर्व विश्वाविषयी मित्रत्व धारण करणारा व आपल्या सामर्थ्याने सर्वत्र वास करणारा असा हा पूज्य व दीप्तिमान् अग्नि भारद्वाज कुलांतील पुरुषांमध्यें येऊन विराजमान झाला आहे. ज्याची वाणी मधुर परंतु सत्यपरिप्लुत आहे अशा अग्नीची शांतवनेय व पुरुणीथ ह्यांच्या यज्ञांत शेंकडो स्तोत्रांनी स्तुति झालेली आहे. ॥ ७ ॥


ऋग्वेद - मण्डल १ सूक्त ६० ( अग्नि सूक्त )

ऋषि - नोधस् गौतम : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुभ्


वह्निं॑ य॒शसं॑ वि॒दथ॑स्य के॒तुं सु॑प्रा॒व्यं दू॒तं स॒द्योअ॑र्थम् ॥
द्वि॒जन्मा॑नं र॒यिमि॑व प्रश॒स्तं रा॒तिं भ॑र॒द्‍भृग॑वे मात॒रिश्वा॑ ॥ १ ॥

वह्निं यशसं विदथस्य केतुं सुप्रऽअव्यं दूतं सद्यःऽअर्थम् ॥
द्विऽजन्मानं रयिंऽइव प्रऽशस्तं रातिं भरत् भृगवे मातरिश्वा ॥ १ ॥

जो आमचे हवि देवतांप्रत पोंचविणारा आहे, जो मूर्तिमंत कीर्तिच आहे, यज्ञाची जो केवळ ध्वजाच होय, जो यज्ञगृहात ठेवण्यास अत्यंत योग्य आहे, जो आमचा दूत होऊन देवांकडे त्वरेने गमन करतो, जो दोन वेळां जन्मास येत असतो, उत्कर्षाप्रमाणे जो प्रशंसनीय आहे व जो केवळ वैभवाची मूर्तिच होय अशा त्या अग्नीस मातरिश्वा भृगूकरितां घेऊन आला. ॥ १ ॥


अ॒स्य शासु॑रु॒भया॑सः सचन्ते ह॒विष्म॑न्त उ॒शिजो॒ ये च॒ मर्ताः॑ ॥
दि॒वश्चि॒त्पूर्वो॒ न्यसादि॒ होता॒पृच्छ्यो॑ वि॒श्पति॑र्वि॒क्षु वे॒धाः ॥ २ ॥

अस्य शासुः उभयासः सचंते हविष्मंतः उशिजः ये च मर्ताः ॥
दिवः चित् पूर्वः नि असादि होता आऽपृच्छ्यः विश्पतिः विक्षु वेधाः ॥ २ ॥

हवींचे ग्रहण करण्याविषयी उत्सुक असलेले जे देव व जे मर्त्यलोकांतील मानव आहेत ते अशा रीतीने उभयलोक ह्याची आज्ञा मान्य करीत असतात. सर्व लोकांस जो सन्मानानें सत्कार करण्यास योग्य आहे, जो सर्व मानवांमध्ये त्यांचा राजा होऊन वर्तन करतो व ज्याचे कर्तृत्व विलक्षण आहे असा हा हविर्दाता सूर्योदयापूर्वीच येथें येऊन स्थानापन्न झाला आहे. ॥ २ ॥


तं नव्य॑सी हृ॒द आ जाय॑मानम॒स्मत्सु॑की॒र्तिर्मधु॑जिह्वमश्याः ॥
यं ऋ॒त्विजो॑ वृ॒जने॒ मानु॑षासः॒ प्रय॑स्वन्त आ॒यवो॒ जीज॑नन्त ॥ ३ ॥

तं नव्यसी हृदः आ जायमानं अस्मत् सुऽकीर्तिः मधुऽजिह्वं अश्याः ॥
यं ऋत्विजः वृजने मानुषासः प्रयस्वंतः आयवः जीजनंत ॥ ३ ॥

ज्यास त्याची उपासना करणारे ह्या जगांतील मानव आपले संकटसमयी हवींनी प्रज्वलित करीत आले आहेत त्या भक्तांच्या हृदयांत प्रकट होणार्‍या व मधुर भाषण करणार्‍या अग्नीस हें आम्ही मनःपूर्वक गाइलेले नवीन स्तोत्र जाऊन पोहोंचो. ॥ ३॥


उ॒शिक्पा॑व॒को वसु॒र्मानु॑षेषु॒ वरे॑ण्यो॒ होता॑धायि वि॒क्षु ॥
दमू॑ना गृ॒हप॑ति॒र्दम॒ आँ अ॒ग्निर्भु॑वद्‍रयि॒पती॑ रयी॒णाम् ॥ ४ ॥

उशिक् पावकः वसुः मानुषेषु वरेण्यः होता अधायि विक्षु ॥
दमूनाः गृहऽपतिः दम आ अग्निः भुवत् रयिऽपतिः रयीणाम् ॥ ४ ॥

हवींकरितां उत्सुकता बाळगणारा व सर्व जगास पावन करणारा आणि प्रत्यक्ष वैभवच कीं काय असा जो श्रेष्ठ हविर्दाता अग्नि त्याची येथे मर्त्य अशा मानवांच्या समुदायांत स्थापना करण्यांत आलेली आहे. आपल्या भक्तांच्या गृहांत निवास करणारा व गृहांत गृहाचा अधिपति म्हणून शोभणारा असा जो अग्नि त्याचेकडेच सर्व संपत्तींचे प्रभुत्व आजपर्यंत निर्बाध चालत आलेले आहे. ॥ ४ ॥


तं त्वा॑ व॒यं पति॑मग्ने रयी॒णां प्र शं॑सामो म॒तिभि॒र्गोत॑मासः ॥
आ॒शुं न वा॑जम्भ॒रं म॒र्जय॑न्तः प्रा॒तर्म॒क्षू धि॒याव॑सुर्जगम्यात् ॥ ५ ॥

तं त्वा वयं पतिं अग्ने रयीणां प्र शंसामः मतिःऽभिः गोतमासः ॥
आशुं न वाजंऽभरं मर्जयंतः प्रातः मक्षू धियाऽवसुः जगम्यात् ॥ ५ ॥

हे अग्निदेवा, अश्वाच्या पाठीवरून ज्याप्रमाणे एकादा मोतद्दार हात फिरवितो त्याप्रमाणे सामर्थ्याची प्राप्ति देणार्‍या तुला वारा घालीत आम्ही गोतम कुलोत्पन्न तुझे भक्त सर्व संपत्तीचा स्वामी जो तू त्या तुझी अनेक स्तोत्रांच्या द्वारें स्तुति करतो. स्तुतिस्तोत्रें हेंच ह्या अग्निदेवाचें वैभव आहे. हा प्रातःकाळी लवकरच येथें प्राप्त होवो. ॥ ५ ॥


ॐ तत् सत्


GO TOP