|
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २१ ते ३० ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २१ (इंद्राग्नि सूक्त ) ऋषी - मेधातिथि काण्व : देवता - इंद्र, अग्नि : छंद - गायत्री इ॒हेन्द्रा॒ग्नी उप॑ ह्वये॒ तयो॒रित्स्तोम॑मुश्मसि । ता सोमं॑ सोम॒पात॑मा ॥ १ ॥ इह इन्द्राग्नी इति उप ह्वये तयोः इत् स्तोमं उश्मसि । ता सोमं सोमऽपातमा ॥ १ ॥
इंद्र आणि अग्नि ह्या दोघांस मी येथे बोलावितो. त्यांच्याच स्तवनाची आम्हास इच्छा आहे. ते सोमप्राशन करोत. त्यांस सोमरस आवडतो. ॥ १ ॥
ता य॒ज्ञेषु॒ प्र शं॑सतेन्द्रा॒ग्नी शु॑म्भता नरः । ता गा॑य॒त्रेषु॑ गायत ॥ २ ॥ ता यज्ञेषु प्र शंसत इन्द्राग्नी इति शुम्भत नरः । ता गायत्रेषु गायत ॥ २ ॥
मानवहो, इंद्र व अग्नि ह्यांचे यज्ञांत स्तवन करा, त्यांस स्तुतींनी अलंकृत करा आणि त्यांचे गायन करा. ॥ २ ॥
ता मि॒त्रस्य॒ प्रश॑स्तय इंद्रा॒ग्नी ता ह॑वामहे । सो॒म॒पा सोम॑पीतये ॥ ३ ॥ ता मित्रस्य प्रऽशस्तये इंद्राग्नी इति ता हवामहे । सोमऽपा सोमऽपीतये ॥ ३ ॥
मित्राच्या गौरवार्थ त्यांस - त्या सोमप्रिय इंद्राग्नींस - मी सोमपानार्थ पाचारण करतो. ॥ ३ ॥
उ॒ग्रा सन्ता॑ हवामह॒ उपे॒दं सव॑नं सु॒तम् । इ॒न्द्रा॒ग्नी एह ग॑च्छताम् ॥ ४ ॥ उग्रा संता हवामहे उप इदं सवनं सुतं । इन्द्राग्नी इति आ इह गच्छताम् ॥ ४ ॥
त्या उग्र पण उदार देवांस, तयार करून ठेविलेल्या हविचें संनिध आम्ही बोलवतो. हे इंद्राग्नि इकडे येवोत. ॥ ४ ॥
ता म॒हान्ता॒ सद॒स्पती॒ इंद्रा॑ग्नी॒ रक्ष॑ उब्जतम् । अप्र॑जाः सन्त्व॒त्रिणः॑ ॥ ५ ॥ ता महांता सदस्पती इंद्राग्नी इति रक्षः उब्जतं । अप्रजाः सन्तु अत्रिणः ॥ ५ ॥
सर्व लोकसमुदायाचें रक्षण करणारे असे सर्वश्रेष्ठ इंद्राग्निदेवहो, राक्षसांस शासन करा. दुष्ट लोकांचे निसंतान होवो. ॥ ५ ॥
तेन॑ स॒त्येन॑ जागृत॒मधि॑ प्रचे॒तुने॑ प॒दे । इंद्रा॑ग्नी॒ शर्म॑ यच्छतम् ॥ ६ ॥ तेन सत्येन जागृतं अधि प्रऽचेतुने पदे । इंद्राग्नी इति शर्म यच्छतम् ॥ ६ ॥
हे इंद्राग्निदेवांनो, चैतन्यतेजाने अतिशय उज्ज्वल झालेल्या अशा स्थानावर विराजमान होऊन तुम्ही त्या तुमच्या सर्व प्रसिद्ध सत्यत्वास जागृत रहा, व आम्हांस सौख्य अर्पण करा. ॥ ६ ॥
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २२ (अनेक देवता सूक्त)
ऋषी - मेधातिथि काण्व : देवता - १ ते ४ अश्विनीकुमार; ५ ते ८ सवितृ; प्रा॒त॒र्युजा॒ वि बो॑धया॒श्विना॒वेह ग॑च्छताम् । अ॒स्य सोम॑स्य पी॒तये॑ ॥ १ ॥ प्रातः युजा वि बोधय अश्विनौ आ इह गच्छतां । अस्य सोमस्य पीतये ॥ १ ॥
प्रभातकाळींच रथ जोडून सिद्ध होणाऱ्या अश्विनांस जाऊन जागें कर. ते येथें त्या सोमरसाच्या प्राशनाकरितां प्राप्त होवोत. ॥ १ ॥
या सु॒रथा॑ र॒थीत॑मो॒भा दे॒वा दि॑वि॒स्पृशा॑ । अ॒श्विना॒ ता ह॑वामहे ॥ २ ॥ या सुऽरथा रथिऽतमा उभा देवा दिविऽस्पृशा । अश्विना ता हवामहे ॥ २ ॥
ज्याचा रथ उत्कृष्ट आहे, जे महारथी योद्ध्यांत श्रेष्ठ आहेत, आणि जे द्युलोकापर्यंत जाऊन भिडणारे आहेत, त्या दोन अश्वीदेवांस मी पाचारण करतो. ॥ २ ॥
या वां॒ कशा॒ मधु॑म॒त्यश्वि॑ना सू॒नृता॑वती । तया॑ य॒ज्ञं मि॑मिक्षतम् ॥ ३ ॥ या वां कशा मधुऽमती अश्विना सूनृताऽवती । तया यज्ञं मिमिक्षतम् ॥ ३ ॥
तुमच्या रथाचा चाबूक ऐकूं आला असतां सन्मानार्थ मधुर सोमरस तयार करण्याची ज्या यज्ञकर्त्याची लगबग उडून जाते, व ज्याच्या ध्वनीबरोबर आपणांस आतां सत्य तत्त्वांचा मनोहर लाभ होणार अशी सर्वांस आशा वाटावयास लागते, त्याच्या योगाने आमच्या यज्ञावर सुखसमृद्धीचे ओघ वाहतील असे करा. ॥ ३ ॥
न॒हि वा॒मस्ति॑ दूर॒के यत्रा॒ रथे॑न॒ गच्छ॑थः । अश्वि॑ना सो॒मिनो॑ गृ॒हम् ॥ ४ ॥ नहि वां अस्ति दूरके यत्रा रथेन गच्छथः । अश्विना सोमिनः गृहम् ॥ ४ ॥
सोमरस अर्पण करणाऱ्या भक्ताच्या ज्या गृहाकडे हे अश्विनहो आपण रथांतून जाण्यास निघतां तें आपणांस मुळींच दूर नाहीं. ॥ ४ ॥
हिर॑ण्यपाणिमू॒तये॑ सवि॒तार॒मुप॑ ह्वये । सः चेत्ता॑ दे॒वता॑ प॒दम् ॥ ५ ॥ हिरण्यऽपाणिं ऊतये सवितारं उप ह्वये । सः चेत्ता देवता पदम् ॥ ५ ॥
ज्याचे कर सुवर्णाप्रमाणें कांतिमान् आहेत अशा सवित्यास आपल्या रक्षणाकरितां मी आमंत्रण करतो. तो सवितादेव परम पदाचा ज्ञाता आहे. ॥ ५ ॥
अ॒पां नपा॑त॒मव॑से सवि॒तार॒मुप॑ स्तुहि । तस्य॑ व्र॒तान्यु॑श्मसि ॥ ६ ॥ अपां नपातं अवसे सवितारं उप स्तुहि । तस्य व्रतानि उश्मसि ॥ ६ ॥
जलापासून अवतीर्ण झालेल्या सविता देवाची, आपले संरक्षण व्हावें म्हणून स्तुति कर. त्याच्या आज्ञा आम्हांस मान्य आहेत. ॥ ६ ॥
वि॒भ॒क्तारं॑ हवामहे॒ वसो॑श्चि॒त्रस्य॒ राध॑सः । स॒वि॒तारं॑ नृ॒चक्ष॑सम् ॥ ७ ॥ विऽभक्तारं हवामहे वसोः चित्रस्य राधसः । सवितारं नृऽचक्षसम् ॥ ७ ॥
सविता देवास आम्ही भक्तीनें वोलावतो. सर्व मनुष्यांवर ह्याची नजर आहे. आश्चर्यकारक व मनास आल्हाद देणाती अशी संपत्ति हा सर्वांस वाटून देतो. ॥ ७ ॥
सखा॑य॒ आ नि षी॑दत सवि॒ता स्तोम्यो॒ नु नः॑ । दाता॒ राधां॑सि शुम्भति ॥ ८ ॥ सखायः आ नि सीदत सविता स्तोम्यः नु नः । दाता राधांसि शुंभति ॥ ८ ॥
मित्रहो, बसा, आपणांस सवित्याची स्तुति करावयाची नाहीं काय ? हा दाता आहे, व मनोरम ऐश्वर्यास हा शोभा आणतो. ॥ ८ ॥
अग्ने॒ पत्नी॑रि॒हा व॑ह दे॒वाना॑मुश॒तीरुप॑ । त्वष्टा॑रं॒ सोम॑पीतये ॥ ९ ॥ अग्ने पत्नीः इह आ वह देवानां उशतीः उप । त्वष्टारं सोमऽपीतये ॥ ९ ॥
हे अग्निदेवा, इकडे येण्यास संतोषाने तयार असलेल्या देवपत्नीस व त्याचप्रमाणे त्वष्टा देवास येथें सोमपनार्थ घेऊन ये. ॥ ९ ॥
आ ग्ना अ॑ग्न इ॒हाव॑से॒ होत्रां॑ यविष्ठ॒ भार॑तीम् । वरू॑त्रीं धि॒षणां॑ वह ॥ १० ॥ आ ग्नाः अग्ने इह अवसे होत्रां यविष्ठ भारतीं । वरूत्रीं धिषणां वह ॥ १० ॥
अत्यंत तरुण दिसणाऱ्या हे अग्निदेवा, होत्रा, भारती, वरूत्रा व धिषणा ह्या देवस्त्रियांस आमच्या संरक्षणाकरितां येथें घेऊन ये. ॥ १० ॥
अ॒भि नः॑ दे॒वीरव॑सा म॒हः शर्म॑णा नृ॒पत्नीः॑ । अच्छि॑न्नपत्राः सचन्ताम् ॥ ११ ॥ अभि नः देवीः अवसा महः शर्मणा नृऽपत्नीः । अच्छिन्नऽपत्राः सचंताम् ॥ ११ ॥
मार्गांत कोठेही विघ्न न होता आम्हांकडे येऊन वीरपत्नी देवता आम्हांस कृपा, सौख्य व आनंद ह्यांची जोड करून देवोत. ॥ ११ ॥
इ॒हेन्द्रा॒णीमुप॑ ह्वये वरुणा॒नीं स्व॒स्तये॑ । अ॒ग्नायीं॒ सोम॑पीतये ॥ १२ ॥ इह इंद्राणीं उप ह्वये वरुणानीं स्वस्तये । अग्नायीं सोमऽपीतये ॥ १२ ॥
आमचें क्षेम असावें म्हणून इंद्राणी, वरुणानी व अग्नायी ह्यांना मी सोमपानार्थ बोलावितो. ॥ १२ ॥
म॒ही द्यौः पृ॑थि॒वी च॑ न इ॒मं य॒ज्ञं मि॑मिक्षताम् । पि॒पृ॒तां नो॒ भरी॑मभिः ॥ १३ ॥ मही द्यौः पृथिवी च नः इमं यज्ञं मिमिक्षतां । पिपृतां नः भरीमऽभिः ॥ १३ ॥
मही, द्यौ व पृथ्वी ह्या, आमचे यज्ञावर सुखसमृद्धीचे ओघ आणोत, त्या आम्हांस भरभराटीने भरपूर भरून टाकोत. ॥ १३ ॥
तयो॒रिद्धृ॒तव॒त्पयो॒ विप्रा॑ रिहन्ति धी॒तिभिः॑ । ग॒न्ध॒र्वस्य॑ ध्रु॒वे प॒दे ॥ १४ ॥ तयोः इत् घृतऽवत् पयः विप्राः रिहंति धीतिऽभिः । गन्धर्वस्य ध्रुवे पदे ॥ १४ ॥
त्याच्याच घृतपरिपूर्ण दुग्धाची विद्वान पुरुष आपल्या स्तोत्रांमध्ये, गंधर्वाच्या अक्षय्यलोकीं प्रशंसा करतात. ॥ १४ ॥
स्यो॒ना पृ॑थिवि भवानृक्ष॒रा नि॒वेश॑नी । यच्छा॑ नः॒ शर्म॑ स॒प्रथः॑ ॥ १५ ॥ स्योना पृथिवि भव अनृक्षरा निऽवेशनी । यच्छ नः शर्म सऽप्रथः ॥ १५ ॥
हे पृथिवीमाते, तूं आम्हांवर संतुष्ट हो. तूं कोणाचा नाश होऊं देणारी नाहींस, सर्वांचा समावेश तूं करतेस, आम्हांस अतिशय सौख्य दे. ॥ १५ ॥
अतो॑ दे॒वा अ॑वन्तु नो॒ यतो॒ विष्णु॑र्विचक्र॒मे । पृ॒थि॒व्याः स॒प्त धाम॑भिः ॥ १६ ॥ अतः देवा अवंतु नः यतः विष्णुः विऽचक्रमे । पृथिव्याः सप्त धामऽभिः ॥ १६ ॥
पृथ्वीचे सप्तप्रदेश धरून ज्या ज्या स्थानाचें विष्णूने आक्रमण केलें त्या त्या ठिकाणी देव आमचे संरक्षण करोत. ॥ १६ ॥
इ॒दं विष्णु॒र्वि च॑क्रमे त्रे॒धा नि द॑धे प॒दम् । समू॑ळ्हमस्य पांसु॒रे ॥ १७ ॥ इदं विष्णुः वि चक्रमे त्रेधा नि दधे पदं । संऽऊळ्हं अस्य पांसुरे ॥ १७ ॥
विष्णूनें हें सर्व आक्रमून टाकले. त्यानें तीन ठिकाणी आपले पाऊल ठेविले. त्याच्या पदरजांत सर्व निमग्न होऊन गेलें होतें. ॥ १७ ॥
त्रीणि॑ प॒दा वि च॑क्रमे॒ विष्णु॑र्गो॒पा अदा॑भ्यः । अतो॒ धर्मा॑णि धा॒रय॑न् ॥ १८ ॥ त्रीणि पदा वि चक्रमे विष्णुः गोपाः अदाभ्यः । अतः धर्माणि धारयन् ॥ १८ ॥
ज्याचा कोणास पराभव करतां यावयाचा नाही व जो जगताचा संरक्षक आहे अशा विष्णूनें त्या त्या ठिकाणीं आपल्या धर्मनियमांची प्रस्थापना करून, तीन पावलें आक्रमण केलीं. ॥ १८ ॥
विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे । इंद्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ ॥ १९ ॥ विष्णोः कर्माणि पश्यत यतः व्रतानि पस्पशे । इंद्रस्य युज्यः सखा ॥ १९ ॥
ज्या अलौकिक पराक्रमी कृत्यांच्या योगाने विष्णूनें जगांतील अखिल कर्में अवलोकन केलीं त्या कृत्यांकडे दृष्टि फेका. विष्णु हा इंद्राचा सहाय्यकारक व मित्र आहे. ॥ १९ ॥
तद्विष्णोः॑ पर॒मं प॒दं सदा॑ पश्यन्ति सू॒रयः॑ । दि॒वीव॒ चक्षु॒रात॑तम् ॥ २० ॥ तत् विष्णोः परमं पदं सदा पश्यंति सूरयः । दिविऽइव चक्षुः आऽततम् ॥ २० ॥
त्या विष्णूच्या परमपदाचें ज्ञाते लोक नेहमी निरीक्षण करीत असतात आणि त्यावेळी त्यांचे नेत्र आकाशाकडे टक लावल्याप्रमाणें विस्तार पावतात. ॥ २० ॥
तद्विप्रा॑सोःविप॒न्यवो॑ जागृ॒वांसः॒ समिं॑धते । विष्णो॒र्यत्प॑र॒मं प॒दम् ॥ २१ ॥ तत् विप्रासः विपन्यवः जागृऽवांसः सं इंधते । विष्णोः यत् परमं पदम् ॥ २१ ॥
सदा जागृत व परम भक्तीनें स्तवन करणारे बुद्धिशाली पुरुष विष्णूचें जें परमपद आहे त्याची सर्वत्र प्रसिद्धि करतात. ॥ २१ ॥
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २३ (अप्सूक्त)
ऋषी - मेधातिथि काण्व : देवता - १ वायु; २-३ इंद्रवायु; ती॒व्राः सोमा॑स॒ आ ग॑ह्या॒शीर्व॑न्तः सु॒ता इ॒मे । वायो तान्प्रस्थि॑तान्पिब ॥ १ ॥ तीव्राः सोमासः आ गहि आशीःऽवन्तः सुताः इमे । वायो इति तान् प्रऽस्थितान् पिब ॥ १ ॥
हे वायुदेवा, तूं ये. हे सोम तीव्र आहेत. ह्यांत दही मिसळून ते तयार करून ठेविलें आहेत. ते तुझ्याकरितां ठेविले आहेत. तूं त्यांचे प्राशन कर. ॥ १ ॥
उ॒भा दे॒वा दि॑वि॒स्पृशे॑न्द्रवा॒यू ह॑वामहे । अ॒स्य सोम॑स्य पी॒तये॑ ॥ २ ॥ उभा देवा दिविऽस्पृशा इन्द्रवायू इति हवामहे । अस्य सोमस्य पीतये ॥ २ ॥
ह्या सोमरसाच्या प्राशनाकरितां मी इंद्र-वायूस बोलावितो. हे दोघेही द्युलोकापर्यंत भिडणारे आहेत. ॥ २ ॥
इ॒न्द्र॒वा॒यू म॑नो॒जुवा॒ विप्रा॑ हवन्त ऊ॒तये॑ । स॒ह॒स्रा॒क्षा धि॒यस्पती॑ ॥ ३ ॥ इन्द्रवायू मनःऽजुवा विप्राः हवन्ते ऊतये । सहस्रऽअक्षा धिय ःपती इति ॥ ३ ॥
विद्वान लोकांनी आपल्या संरक्षणाकरितां इंद्रवायूंनाच पाचारण केले. ह्यांची गति मनाइतकी शीघ्र आहे. त्यांस हजारों नेत्र आहेत व ते सर्व वुद्धिमत्तेचे अधिपति आहेत. ॥ ३ ॥
मि॒त्रं व॒यं ह॑वामहे॒ वरु॑णं॒ सोम॑पीतये । ज॒ज्ञा॒ना पू॒तद॑क्षसा ॥ ४ ॥ मित्रं वयं हवामहे वरुणं सोमऽपीतये । जज्ञाना पूतदक्षसा ॥ ४ ॥
आम्ही मित्र व वरुण ह्यांस सोमपानार्थ निमंत्रण करतो. हे अखिलज्ञानी व पवित्र कार्यासाठी आपल्या सामर्थ्याचा उपयोग करणारे आहेत. ॥ ४ ॥
ऋ॒तेन॒ यावृ॑ता॒वृधा॑वृ॒तस्य॒ ज्योति॑ष॒स्पती॑ । ता मि॒त्रावरु॑णा हुवे ॥ ५ ॥ ऋतेन यौ ऋतऽवृधौ ऋतस्य ज्योतिषः पती इति । ता मित्रावरुणा हुवे ॥ ५ ॥
जे नीतिमार्गानें नीतिनियमनांचा मान वृद्धिंगत करतात आणि जे तेजाचे अधिष्ठाते आहेत त्या मित्रावरुणांस मी हवि अर्पण करतो. ॥ ५ ॥
वरु॑णः प्रावि॒ता भु॑वन्मि॒त्रो विश्वा॑भिरू॒तिभिः॑ । कर॑तां नः सु॒राध॑सः ॥ ६ ॥ वरुणः प्रऽअविता भुवत् मित्रः विश्वाभिरूतिऽभिः । करतां नः सुऽराधसः ॥ ६ ॥
आमचा सांभाळ करण्याचे जेवढे म्हणून मार्ग आहेत तेवढ्या सर्व मार्गांनी मित्र आमचा रक्षणकर्ता होवो. वरुणही आमचा संरक्षक बनो. तें दोघेंही आम्हांस अत्यंत सुखी करोत. ॥ ६ ॥
म॒रुत्व॑न्तं हवामह॒ इंद्र॒मा सोम॑पीतये । स॒जूर्ग॒णेन॑ तृम्पतु ॥ ७ ॥ मरुत्वंतं हवामहे इंद्रं आ सोमऽपीतये । सऽजूः गणेन तृंपतु ॥ ७ ॥
मरुद्देवांसहवर्तमान आम्ही इंद्रास सोमपानार्थ बोलावतो. आपल्या गणांनी तो परिवेष्टित आहे. आमचेकडून त्याचा संतोष होवो. ॥ ७ ॥
इंद्र॑ज्येष्ठा॒ मरु॑द्गणा॒ देवा॑स॒ः पूष॑रातयः । विश्वे॒ मम॑ श्रुता॒ हव॑॑म् ॥ ८ ॥ इंद्रऽज्येष्ठा मरुत्ऽगणा देवासः पूषऽरातयः । विश्वे मम श्रुत हवम् ॥ ८ ॥
अहो इंद्रप्रमुख मरुद्देवहो, तुम्ही पूषाचे स्नेही आहांत. तुम्ही सर्व माझी हांक ऐका. ॥ ८ ॥
ह॒त वृ॒त्रं सु॑दानव॒ इंद्रे॑ण॒ सह॑सा यु॒जा । मा नः॑ दु॒ःशंस॑ ईशत ॥ ९ ॥ हत वृत्रं सुऽदानव इंद्रेण सहसा युजा । मा नः दुःऽशंस ईशत ॥ ९ ॥
हे अति उदार देवहो, तुमच मित्र जो इंद्र त्याच्या पराक्रमाचें साहाय्य घेऊन वृत्राचा वध करा. तो अभद्रभाषी आम्हांवर स्वामित्व न मिळवो. ॥ ९ ॥
विश्वा॑न्दे॒वान्ह॑वामहे म॒रुत॒ः सोम॑पीतये । उ॒ग्रा हि पृश्नि॑मातरः ॥ १० ॥ विश्वान् देवान् हवामहे मरुतः सोमऽपीतये । उग्रा हि पृश्निऽमातरः ॥ १० ॥
आम्ही सोमपानार्थ सर्व मरुद्देवांस निमंत्रण करतो. खरोखर हे पृश्नीचे पुत्र फार उग्र आहेत. ॥ १० ॥
जय॑तामिव तन्य॒तुर्म॒रुता॑मेति धृष्णु॒या । यच्छुभं॑ या॒थना॑ नरः ॥ ११ ॥ जयतांऽइव तन्यतुः मरुतां एति धृष्णुऽया । यत् शुभं याथन नरः ॥ ११ ॥
विजय मिळवून आलेल्या वीरांप्रमाणे मरुतांची गर्जना जोरानें ऐकूं येत आहे. हे शूरहो जें आम्हांस कल्याणप्रद असेल तेथेंच तुमचें गमन होऊं द्या. ॥ ११ ॥
ह॒स्का॒राद्वि॒द्युत॒स्पर्यतो॑ जा॒ता अ॑वन्तु नः । म॒रुतः॑ मृळयन्तु नः ॥ १२ ॥ हस्कारात् विऽद्युतः परि अतः जाताः अवंतु नः । मरुतः मृळयंतु नः ॥ १२ ॥
विद्युल्लतेच्या प्रचंड हास्यामधून अवतीर्ण झालेले मरुद्देव आमचे रक्षण करोत. ते आम्हास सुखी ठेवोत. ॥ १२ ॥
आ पू॑षञ्चि॒त्रब॑र्हिष॒माघृ॑णे ध॒रुणं॑ दि॒वः । आजा॑ न॒ष्टं यथा॑ प॒शुम् ॥ १३ ॥ आ पूषन् चित्रऽबर्हिषं आघृणे धरुणं दिवः । आ अजा नष्टं यथा पशुम् ॥ १३ ॥
हे अत्यंत देदीप्यमान पूषा, चित्रविचित्र रंगांच्या मयूरपुच्छांनी नटविलेल्या आकाशाच्या बालकास, एखाद्या चुकलेल्या वासराप्रमाणें, शोधून घेऊन ये. ॥ १३ ॥
पू॒षा राजा॑न॒माघृ॑णि॒रप॑गूळ्हं॒ गुहा॑ हि॒तम् । अवि॑न्दच्चि॒त्रब॑र्हिषम् ॥ १४ ॥ पूषा राजानं आघृणिः अपऽगूळ्हं गुहा हितम् । अविन्दत् चित्रऽबर्हिषम् ॥ १४ ॥
चित्रविचित्र रंगांच्या मयूरपुच्छांनी नटविलेला, परंतु गुहेंत लपवून ठेवल्यामुळें अदृश्य झालेला आमचा राजा, देदीप्य पूषास पुन्हा सांपडला. ॥ १४ ॥
उ॒तो स मह्य॒मिन्दु॑भि॒ः षड्यु॒क्ताँ अ॑नु॒सेषि॑धत् । गोभि॒र्यवं॒ न च॑र्कृषत् ॥ १५ ॥ उतो इति सः मह्यं इंदुऽभिः षट् युक्तान् अनुऽसेषिधत् । गोभिः यवं न चर्कृषत् ॥ १५॥
शिवाय ज्याप्रमाणे शेतकरी हा बैलाच्या योगाने धान्य पिकवून घरीं आणतो त्याप्रमाणे सोमरसानें संतुष्ट होऊन हा पूषा, एकमेकांशी सांखळीप्रमाणें जोडलेल्या सहां ऋतूंस माझ्यासाठीं घेऊन येवो. ॥ १५ ॥
अ॒म्बयो॑ य॒न्त्यध्व॑भिर्जा॒मयो॑ अध्वरीय॒ताम् । पृ॒ञ्च॒तीर्मधु॑ना॒ पयः॑ ॥ १६ ॥ अम्बयः यंति अध्वऽभिः जामयः अध्वरीऽयताम् । पृञ्चतीः मधुना पयः ॥ १६ ॥
स्वतःची जलें माधुर्याने परिपूरित करीत, भाविक यजनकर्त्याच्या ह्या प्रेमळ जननी, स्वमार्गाने वहात आहेत. ॥ १६ ॥
अ॒मूर्या उप॒ सूर्ये॒ याभि॑र्वा॒ सूर्यः॑ स॒ह । ता नो॑ हिन्वन्त्वध्व॒रम् ॥ १७ ॥ अमूः याः उप सूर्ये याभिः वा सूर्यः सह । ताः नः हिन्वंतु अध्वरम् ॥ १७ ॥
ज्या सूर्याच्या संनिध आहेत, अथवा सूर्य ज्यांचे समीप आहे, त्या ह्या आमच्या जननी, यज्ञास यशस्वी करोत. ॥ १७ ॥
अ॒पो दे॒वीरुप॑ ह्वये॒ यत्र॒ गाव॒ः पिब॑न्ति नः । सिन्धु॑भ्य॒ः कर्त्वं॑ ह॒विः ॥ १८ ॥ अपः देवीः उप ह्वये यत्र गावः पिबंति नः । सिंधुभ्यः कर्त्वं हविः ॥ १८ ॥
जेथें आमच्या धेनू उदक प्राशन करतात, त्या जलदेवतांस मी आमंत्रण करतो. ह्या नद्यांस हवि अर्पण करणें योग्य आहे. ॥ १८ ॥
अ॒प्स्व१न्तर॒मृत॑म॒प्सु भे॑ष॒जम॒पामु॒त प्रश॑स्तये । देवा॒ भव॑त वा॒जिनः॑ ॥ १९ ॥ अप्ऽसु अंतः अमृतं अप्ऽसु भेषजं अपां उत प्रऽशस्तये । देवाः भवत वाजिनः ॥ १९ ॥
जलांचे अंतरंगी अमृत आहे, जलांचे अंतरंगी औषधिगुण आहे, जलाचे स्तवन करण्याकरितां, हे देवांनो, त्वरा करा. ॥ १९ ॥
अ॒प्सु मे॒ सोमो॑ अब्रवीद॒न्तर्विश्वा॑नि भेष॒जा । अ॒ग्निं च॑ वि॒श्वश॑म्भुव॒माप॑श्च वि॒श्वभे॑षजीः ॥ २० ॥ अप्ऽसु मे सोमः अब्रवीत् अन्तः विश्वानि भेषजा । अग्निं च विश्वऽशम्भुवं आपः च विश्वऽभेषजीः ॥ २० ॥
मला सोमानें सांगितलें कीं, जलांचे अंतरंगी सर्व औषधि आहेत, आणि अग्नि हा सर्वांचा कल्याणकर्ता आहे. उदक हें खरोखरच सर्वरोगपरिहारक होय. ॥ २० ॥
आपः॑ पृणी॒त भे॑ष॒जं वरू॑थं त॒न्वे३मम॑ । ज्योक् च॒ सूर्यं॑ दृ॒शे ॥ २१ ॥ आपः पृणीत भेषजं वरूथं तन्वे मम । ज्योक् च सूर्यं दृशे ॥ २१ ॥
हे जलांनो, माझें शरीरस्वास्थ्य सदोदित रहावें व मला चिरकाल सूर्याचें दर्शन न घेतां यावें म्हणून मला उत्कृष्ट औषध द्या. ॥ २१ ॥
इ॒दमा॑प॒ः प्र व॑हत॒ यत् किं च॑ दुरि॒तं मयि॑ । यद्वा॒हम॑भिदु॒द्रोह॒ यद्वा॑ शे॒प उ॒तानृ॑तम् ॥ २२ ॥ इदं आपः प्र वहत यत् किं च दुःऽइतं मयि । यत् वा अहं अभिऽदुद्रोह यत् वा शेपे उत अनृतम् ॥ २२ ॥
हे जलांनो, जो कांही दुष्टपणा माझे अंगी वास करीत असेल, कोणाशींही मी जे शत्रुत्व आचरले असेल, जे मी कोणाचे वाईट इच्छिलें असेल, अथवा जे मी असत्य वर्तन केलें असेल, तें तुम्ही सर्वथैव धुवून टाका. ॥ २२ ॥
आपो॑ अ॒द्यान्व॑चारिषं॒ रसे॑न॒ सम॑गस्महि । पय॑स्वानग्न॒ आ ग॑हि॒ तं मा॒ सं सृ॑ज॒ वर्च॑सा ॥ २३ ॥ आपः अद्य अनु अचारिषं रसेन सं अगस्महि । पयस्वान् अग्ने आ गहि तं मा सं सृज वर्चसा ॥ २३ ॥
हे जलांनो, आज मी तुमचे समीप आलो आहे, व तुमच्या मधुर रसांशी संयुक्त झालो आहे. हे जलनिवासी अग्निदेवा, येथें प्राप्त हो व मला तेजाची जोड करून दे. ॥ २३ ॥
सं मा॑ग्ने॒ वर्च॑सा सृज॒ सं प्र॒जया॒ समायु॑षा । वि॒द्युर्मे॑ अस्य दे॒वा इंद्रो॑ विद्यात्स॒ह ऋषि॑भिः ॥ २४ ॥ सं मा अग्ने वर्चसा सृज सं प्रऽजया सं आयुषा । विद्युः मे अस्य देवाः इंद्रः विद्यात् सह ऋषिऽभिः ॥ २४ ॥
हे अग्निदेवा, तेज, संतति व आयुष्य ह्यांची मला जोड करून दे. म्हणजे हें माझें वैभव देवांस विदित होईल व ऋषींसहवर्तमान इंद्रासही माहित होईल. ॥ २४ ॥
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २४ (अनेक देवतासूक्त)
ऋषी - शुनःशेप आजीगर्ति : देवता १ प्रजापति; २ अग्नि;
कस्य॑ नू॒नं क॑त॒मस्या॒मृता॑नां॒ मना॑महे॒ चारु॑ दे॒वस्य॒ नाम॑ ।
कस्य नूनं कतमस्य अमृतानां मनामहे चारु देवस्य नाम ।
खरोखर आम्ही कोणाचे सुंदर नाम - सर्व अमरदेवांपैकी कोणत्या देवाचें मनोहर नाम - स्मरावें ? मला अदितीस पुन्हा कोण भेटवील की जेणेंकरून मी जनकास व जननीस पाहीन ? ॥ १ ॥
अ॒ग्नेर्व॒यं प्र॑थ॒मस्या॒मृता॑नां॒ मना॑महे॒ चारु॑ दे॒वस्य॒ नाम॑ ।
अग्नेः वयं प्रथमस्य अमृतानां मनामहे चारु देवस्य नाम ।
सर्व अमरदेवांपैकीं प्रमुख जो अग्निदेव त्याचें मोहक नांव आम्ही स्मरूं. तो मला अदितीस पुन्हां भेटवील, व मग मी जनकास व जननीस पाहीन. ॥ २ ॥
अ॒भि त्वा॑ देव सवित॒रीशा॑नं॒ वार्या॑णाम् । सदा॑वन्भा॒गमी॑महे ॥ ३ ॥ अभि त्वा देव सवितः ईशानं वार्याणाम् । सदा अवन् भागं ईमहे ॥ ३ ॥
आमचें निरंतर रक्षण करणार्या हे सविता देवा, सर्व स्पृहणीय वस्तूंचा तूं स्वामी आहेस. तुझेजवळ आम्ही अनुरूप असा संपत्तीचा हिस्सा मागतो. ॥ ३ ॥
यश्चि॒द्धि त॑ इ॒त्था भगः॑ शशमा॒नः पु॒रा नि॒दः । अ॒द्वे॒षो हस्त॑योर्द॒धे ॥ ४ ॥ यः चित् हि ते इत्था भगः शशमानः पुरा निदः । अद्वेषः हस्तयोः दधे ॥ ४ ॥
ह्याप्रमाणें जें कांही प्रशंसनीय भाग्य, कीं ज्याची कोणी निंदा करूं म्हणेल तरी तें अशक्य होईल, व ज्यास द्वेष्टे लोकापासून सुद्धां कोणतीही बाधा पोहोंचावयाची नाही, तें तुझ्या हातीं ठेवलेले आहे. ॥ ४ ॥
भग॑भक्तस्य ते व॒यमुद॑शेम॒ तवाव॑सा । मू॒र्धानं॑ रा॒य आ॒रभे॑ ॥ ५ ॥ भगःभक्तस्य ते वयं उत् अशेम तव अवसा । मूर्धानं राय आऽरभे ॥ ५ ॥
तुझ्याच कृपेमुळें आम्ही श्रीमंत होऊं, व संपत्तीच्या अगदीं शिखरावर सुस्थिरपणें बसूं. सर्व मनुष्यांच्या भाग्याची वांटणी करणारा तूंच आहेस. ॥ ५ ॥
न॒हि ते॑ क्ष॒त्रं न सहो॒ न म॒न्युं वय॑श्च॒नामी प॒तय॑न्त आ॒पुः ।
नहि ते क्षत्रं न सहः न मन्युं वयः चन अमी इति पतयंत आपुः ।
हे उंच भरार्या मारणारे पक्षी, हीं एक निमिषभरही न थांबतां वाहणारीं उदकें, अथवा वायूचा दर्प जे देव धुडकावून लावतात, त्यांसही तुझा पराक्रम, बल अथवा कोप, ह्यांची बरोबरी करवत नाहीं. ॥ ६ ॥
अ॒बु॒ध्ने राजा॒ वरु॑णो॒ वन॑स्यो॒र्ध्वं स्तूपं॑ ददते पू॒तद॑क्षः ।
अबुध्ने राजा वरुणः वनस्य उर्ध्वं स्तूपं ददते पूतऽदक्षः ।
आकाशास कोणता आधार आहे ? पण तेथें पवित्र पराक्रम करणार्या राजा वरुणानें वृक्षाचा स्तंभ उभा रोंवला. त्याबरोबर त्यांचे बुंधे वर गेले व ते खाली झाले. ह्यांचे आंत कोठेंतरी आमची निवासस्थानें असलीं पाहिजेत. ॥ ७ ॥
उ॒रुं हि राजा॒ वरु॑णश्च॒कार॒ सूर्या॑य॒ पन्था॒मन्वे॑त॒वा उ॑ ।
उरुं हि राजा वरुणः चकार सूर्याय पंथां अनुऊएतवै ऊं इति ।
सूर्यास आपला दैनिक प्रवास करतां यावा म्हणून वरुण राजानें त्याचा मार्ग विस्तृत केला. जेथे पाऊल टाकण्याचीही सोय नव्हती तेथें पाय ठेवण्याजोगी त्यानें वाट केली. जे दुसर्यांस वर्मी लागेल असें बोलतात त्यांची वरुण अत्यंत निर्भर्त्सना करतो. ॥ ८ ॥
श॒तं ते॑ राजन्भि॒षजः॑ स॒हस्र॑मु॒र्वी ग॑भी॒रा सु॑म॒तिष्टे॑ अस्तु ।
शतं ते राजन् भिषजः सहस्रं उर्वी गभीरा सुमतिः ते अस्तु ।
हे वरुण राजा, तुझ्याजवळ शेंकडोंच काय, पण सहस्रावधि औषधें आहेत; तुझी कृपा सातिशय व अविच्छिन्न असो. आमच्या साडेसातीस पार घालवून देऊन तिचें निर्मूलन कर, आणि आम्हांपासून आमच्या घडलेल्या पातकांस दूर कर. ॥ ९ ॥
अ॒मीय ऋक्षा॒ निहि॑तास उ॒च्चा नक्तं॒ ददृ॑श्रे॒ कुह॑ चि॒द्दिवे॑युः ।
अमी इति ये ऋक्षाः निऽहितासः उच्चा नक्तं ददृश्रे कुह चित् दिवा ईयुः ।
हीं जीं नक्षत्रे आकाशांत उंच स्थापन केली आहेत ती रात्रींच मात्र दिसतात. दिवसां कोठेंतरी निघून गेली होती. वरुणाच्या आज्ञा अनुल्लंघनीय आहेत. चंद्रमा रात्री प्रकाशमान होतो. ॥ १० ॥
तत्त्वा॑ यामि॒ ब्रह्म॑णा॒ वन्द॑मान॒स्तदा शा॑स्ते॒ यज॑मानो ह॒विर्भिः॑ ।
तत् त्वा यामि ब्रह्मणा वन्दमानः तत् आ शास्ते यजमानः हविःऽभिः ।
ह्याच कारणांस्तव स्तोत्रांनी तुला नमन करीत मी तुझे समीप येतों, याच कारणास्तव याग करणारा भक्त हवि अर्पण करून तुझेजवळ याचना करीत असतो. वरुणा, कोप न करतां येथें जागृतपणानें रहा, व आमचे आयुष्य कमी करूं नको. तुझी कीर्ति फार गाजत असते. ॥ ११ ॥
तदिन्नक्तं॒ तद्दिवा॒ मह्य॑माहु॒स्तद॒यं केतो॑ हृ॒द आ वि च॑ष्टे ।
तत् इत् नक्तं तत् दिवा मह्यं आहुः तत् अयं केतः हृदः आ वि चष्टे ।
दिवसां व रात्री सर्व लोक मला हीच गोष्ट संगतात, व माझ्या हृदयाचाही मला असाच स्पष्ट उपदेश आहे कीं, शुनःशेप बंधनात पडला असतां त्यानें ज्या वरुणास आळविले तोच आम्हांस बंधमुक्त करील. ॥ १२ ॥
शुन॒ःशेपो॒ ह्यह्व॑द्गृभी॒तस्त्रि॒ष्वादि॒त्यं द्रु॑प॒देषु॑ ब॒द्धः ।
शुनःशेपः हि अह्वत् गृभीतः त्रिषु आदित्यं द्रुपदेषु बद्धः ।
तीन खांबाशी जखडून बांधलेल्या शुनःशेपानें बंधनांत असतांना आदित्याचा धांवा केला. ज्ञानवान् वरुण राजास कोणाला अपाय करतां येणार ? तोच शुनःशेपाचे पाश शिथिल करो व त्यास बंधनांतून मुक्त करो. ॥ १३ ॥
अव॑ ते॒ हेळो॑ वरुण॒ नमो॑भि॒रव॑ य॒ज्ञेभि॑रीमहे ह॒विर्भिः॑ ।
अव ते हेळः वरुण नमःऽभि अव यज्ञेभिः ईमहे हविःभिः ।
नमस्कृतींनी, यागांनी व हवींनी आपला कोप शांत करण्याकरितां हे वरुणा, आम्ही तुझी प्रार्थना करतो. तूं शत्रूंचा नाश करणारा व अतिशय ज्ञानशील आहेस. आम्हांकरितां येथे निवास करून हे वरुणराजा, आमच्या पातकांचा क्षय कर. ॥ १४ ॥
उदु॑त्त॒मं व॑रुण॒ पाश॑म॒स्मदवा॑ध॒मं वि म॑ध्य॒मं श्र॑थाय ।
उत् उत्ऽतमं वरुण पाशं अस्मत् अव अधमं वि मध्यमं श्रथय ।
हे वरुणा, आमचे वरच्या बाजूचे, मधले व शरीराच्या खालील भागावरील पाश शिथिल कर. हे आदित्या तुझ्या अमलाखाली आम्ही पापविमुक्त होऊन अदितीच्या आश्रयास पात्र होऊं. ॥ १५ ॥
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २५ (वरुणसूक्त) ऋषी - सुनःशेप आजीगर्ति : देवता - वरुण : छंद - गायत्री 0 यच् चि॒द्धि ते॒ विशो॑ यथा॒ प्र दे॑व वरुण व्र॒तम् । मि॒नी॒मसि॒ द्यवि॑द्यवि ॥ १ ॥ यत् चित् हि ते विशः यथा प्र देव वरुण व्रतम् । मिनीमसि द्यविऽद्यवि ॥ १ ॥
हे वरुणा, तुझी प्रजा या नात्यानें जी कांही तुझी आज्ञा आम्हांकडून रोज मोडली जात असेल, ॥ १ ॥
मा नो॑ व॒धाय॑ ह॒त्नवे॑ जिहीळा॒नस्य॑ रीरधः । मा हृ॑णा॒नस्य॑ म॒न्यवे॑ ॥ २ ॥ मा नः वधाय हत्नवे जिहीळानस्य रीरधः । मा हृणानस्य मन्यवे ॥ २ ॥
तिच्याबद्दल वधाचीच शिक्षा ठरलेली असली तरी, आम्हांवर कोपायमान होऊन, ती शिक्षा आम्हांस देऊं नको. आम्हांवर संतप्त होऊन आपल्या क्रोधाला आम्हांस बळी देऊं नको. ॥ २ ॥
वि मृ॑ळी॒काय॑ ते॒ मनो॑ र॒थीरश्वं॒ न संदि॑तम् । गी॒र्भिर्व॑रुण सीमहि ॥ ३ ॥ वि मृळीकाय ते मनः रथीः अश्वं न संऽदितम् । गीःऽभिः वरुण सीमहि ॥ ३ ॥
हे वरुणा, ज्याप्रमाणें एखादा महारथी आपल्या घोड्यास (त्याने पळून जाऊं नये म्हणून) दोरीनें जखडून ठेवतो, त्याप्रमाणें, तुझ्यापासून सुखें प्राप्त करून घेण्याकरितां अनेक स्तोत्रांच्या द्वारें आम्ही आपलें मन तुझें ठायीं बद्ध करतो. ॥ ३ ॥
परा॒ हि मे॒ विम॑न्यवः॒ पत॑न्ति॒ वस्य॑इष्टये । वयो॒ न व॑स॒तीरुप॑ ॥ ४ ॥ परा हि मे विऽमन्यवः पतंति वस्यःऽइष्टये । वयः न वसतीः उप ॥ ४ ॥
ज्याप्रमाणे पक्षी आपल्या निवासस्थानांकडे पळत सुटतात, त्याप्रमाणे सुखलाभाच्या शोधार्थ माझ्या सर्व उच्चतम मनःकल्पना तुझ्याकडे धांव घेतात. ॥ ४ ॥
क॒दा क्ष॑त्र॒श्रियं॒ नर॒मा वरु॑णं करामहे । मृ॒ळी॒कायो॑रु॒चक्ष॑सम् ॥ ५ ॥ कदा क्षत्रऽश्रियं नरं आ वरुणं करामहे । मृळीकाय उरुऽचक्षसम् ॥ ५ ॥
पराक्रम हेच ज्याचे अलंकार आहेत अशा सर्वसाक्षी वरुणास आमच्या सुखसिध्यर्थ आम्हांस केव्हां घेऊन येतां येईल बरें ? ॥ ५ ॥
तदित्स॑मा॒नमा॑शाते॒ वेन॑न्ता॒ न प्र यु॑च्छतः । धृ॒तव्र॑ताय दा॒शुषे॑ ॥ ६ ॥ तत् इत् समानं आशाते इति वेनंता न प्र युच्छतः । धृतऽव्रताय दाशुषे ॥ ६ ॥
खरोखर अतिशय कनवाळूपणानें हे दोघेही त्याचा समसमान स्वीकार करतात. आज्ञाधारक यागकर्त्यास ते कधीही निराश करीत नाहींत. ॥ ६ ॥
वेदा॒ यः वी॒नां प॒दम॒न्तरि॑क्षेण॒ पत॑ताम् । वेद॑ ना॒वः स॑मु॒द्रियः॑ ॥ ७ ॥ वेद यः वीनां पदं अंतरिक्षेण पतताम् । वेद नावः समुद्रियः ॥ ७ ॥
जो अंतरिक्षांतून परिभ्रमण करणाऱ्या पक्ष्यांचा मार्ग जाणतो; समुद्रनिवासी असल्यामुळें तारवाची वाट ज्यास माहीत आहे, ॥ ७ ॥
वेद॑ मा॒सो धृ॒तव्र॑तो॒ द्वाद॑श प्र॒जाव॑तः । वेदा॒य उ॑प॒जाय॑ते ॥ ८ ॥ वेद मासः धृतऽव्रतः द्वादश प्रजाऽवतः । वेद यः उपऽजायते ॥ ८ ॥
आपल्या आज्ञा सर्वांस मानावयास लावीत असून ज्यास द्वादश मासांचे - कीं ज्यांपैकी प्रत्येकांत लोकसंख्येची एकसारखी वृद्धि होत असते-ज्ञान असतें, शिवाय त्यांस जोडूनच जो महिना कधीं कधीं येतो त्याचीही ज्यास माहिती आहे; ॥ ८ ॥
वेद॒ वात॑स्य वर्त॒निमु॒रोरृ॒ष्वस्य॑ बृह॒तः । वेदा॒ ये अ॒ध्यास॑ते ॥ ९ ॥ वेद वातस्य वर्तनिं उरोः ऋष्वस्य बृहतः । वेद ये अधिऽआसते ॥ ९ ॥
सर्वसंचारी, उत्तुंगगामी व सामर्थ्यवान् अशा वायूची गति ज्यास विदित आहे, व वायुलोकाचेही वरती जे राहतात त्यांनासुद्धां जो ओळखतो; ॥ ९ ॥
नि ष॑साद धृ॒तव्र॑तो॒ वरु॑णः प॒स्त्या३ स्वा । साम्रा॑ज्याय सु॒क्रतुः॑ ॥ १० ॥ नि ससाद धृतऽव्रतः वरुणः पस्त्यासु आ । सांराज्याय सुक्रतुः ॥ १० ॥
असा सर्वसमर्थ वरुण आपल्या आज्ञांचे परिपालन करवीत साम्राज्य गाजविण्याकरितां सर्व लोकांत येऊन विराजमान झाला आहे. ॥ १० ॥
अतो॒ विश्वा॒न्यद्भु॑ता चिकि॒त्वाँ अ॒भि प॑श्यति । कृ॒तानि॒ या च॒ कर्त्वा॑ ॥ ११ ॥ अतः विश्वानि अद्भुता चिकित्वान् अभि पश्यति । कृतानि या च कर्त्वा ॥ ११ ॥
तेथून तो ज्ञानवान देव, जी आश्चर्यें त्यानें उत्पन्न केली आहेत व जी त्यास अजून उत्पन्न करावयाची आहेत, त्या सर्वांचे अवलोकन करीत असतो. ॥ ११ ॥
स नो॑ वि॒श्वाहा॑ सु॒क्रतु॑रादि॒त्यः सु॒पथा॑ करत् । प्र ण॒ आयूं॑षि तारिषत् ॥ १२ ॥ सः नः विश्वाहा सुऊक्रतुः आदित्यः सुऽपथा करत् । प्र णः आयूंषि तारिषत् ॥ १२॥
तो सर्वसमर्थ आदित्य आम्हांस चांगल्या मार्गावर घेऊन जावो. तो आमचीं आयुष्यें वृद्धिंगत करो. ॥ १२ ॥
बिभ्र॑द्द्रा॒पिं हि॑र॒ण्ययं॒ वरु॑णो वस्त नि॒र्णिज॑म् । परि॒ स्पशो॒ नि षे॑दिरे ॥ १३ ॥ बिभ्रत् द्रापिं हिरण्ययं वरुणः वस्त निःनिजम् । परि स्पशः नि सेदिरे ॥ १३॥
आपले सुवर्णमय कवच घालून त्यानें देदीप्यमान वस्त्र धारण केलें आहे, सभोंवार त्याचे दूत बसले आहेत. ॥ १३ ॥
न यं दिप्स॑न्ति दि॒प्सवो॒ न द्रुह्वा॑णो॒ जना॑नाम् । न दे॒वम॒भिमा॑तयः ॥ १४ ॥ न यं दिप्संति दिप्सवः न द्रुह्वाणः जनानाम् । न देवं अभिऽमातयः ॥ १४॥
ह्यास दुष्ट लोक भिती घालूं शकत नाहींत, ह्यास मनुष्यजातीचे द्वेष्टे भयभीत करीत नाहींत, ह्यास पापकर्मे खलही भयचकित करावयास समर्थ नाहींत. ॥ १४ ॥
उ॒त यो मानु॑षे॒ष्वा यश॑श्च॒क्रे असा॒म्या । अ॒स्माक॑मु॒दरे॒ष्वा ॥ १५ ॥ उत यः मानुषेषु आ यशः चक्रे असामि आ । अस्माकं उदरेषु आ ॥ १५॥
शिवाय अखिल मानवजातींत ह्याने आपले यश गाजविलें आहे, आणि तेंही अर्धवट गाजविले आहे अशांतला भाग मुळींच नाहीं, इतकेच काय पण खुद्द आपल्या उदरांतही ह्यानें कीर्तिपद सुंदर रचना करून ठेविली आहे. ॥ १५ ॥
परा॑ मे यन्ति धी॒तयो॒ गावो॒ न गव्यू॑ती॒रनु॑ । इ॒च्छन्ती॑रुरु॒चक्ष॑सम् ॥ १६ ॥ परा मे यंति धीतयः गावः न गव्यूतीः अनु । इच्छन्तीः उरुऽचक्षसम् ॥ १६॥
ह्या सर्वदर्शी देवाविषयी प्रेमपूरीत झाल्यामुळें माझ्या प्रार्थना, ज्याप्रमाणे गाई चारा ठेवलेल्या गोठ्याकडे उत्सुकतेनें परत येतात त्याप्रमाणें, त्याकडेसच पुनः पुनः वळतात. ॥ १६ ॥
सं नु वो॑चावहै॒ पुन॒र्यतो॑ मे॒ मध्वाभृ॑तम् । होते॑व॒ क्षद॑से प्रि॒यम् ॥ १७ ॥ सं नु वोचावहै पुनः यतः मे मध्व् आभृतम् । होताऽइव क्षदसे प्रियम् ॥ १७॥
माझा मधुर हवि अगदी सिद्ध आहे; तेव्हां आपलें एकमेकाशी प्रत्यक्ष संभाषण होऊं द्या. हा हवि तुला प्रिय आहे. यागकर्त्याप्रमाणें तूं त्याचा स्वीकार करतोस. ॥ १७ ॥
दर्शं॒ नु वि॒श्वद॑र्शतं॒ दर्शं॒ रथ॒मधि॒ क्षमि॑ । ए॒ता जु॑षत मे॒ गिरः॑ ॥ १८ ॥ दर्शं नु विश्वऽदर्शतं दर्शं रथं अधि क्षमि । एताः जुषत मे गिरः ॥ १८॥
सर्व विश्वांत ज्याची मनोहर रूपाबद्दल ख्याति आहे त्यचें दर्शन आज मला घडलें. ह्या पृथ्वीवर त्याचा रथ मी पाहिला. ह्या माझ्या स्तुतीचा त्यानें स्वीकार केला आहे. ॥ १८ ॥
इ॒मं मे॑ वरुण श्रुधी॒ हव॑म॒द्या च॑ मृळय । त्वाम॑व॒स्युरा च॑के ॥ १९ ॥ इमं मे वरुण श्रुधी हवं अद्य च मृळय । त्वां अवस्युः आ चके ॥ १९॥
हे वरुणा, ही माझी हांक ऐक, व मला सुखांत ठेव. तुझ्या कृपेची इच्छा धरून मी तुझ्याजवळ याचना करीत आहे. ॥ १९ ॥
त्वं विश्व॑स्य मेधिर दि॒वश्च॒ ग्मश्च॑ राजसि । स याम॑नि॒ प्रति॑ श्रुधि ॥ २० ॥ त्वं विश्वस्य मेधिर दिवः च ग्मः च राजसि । सः यामनि प्रति श्रुधि ॥ २०॥
हे प्रज्ञाशील देवा, अखिल पृथ्वी व स्वर्ग ह्यांवर तुझीच सत्ता आहे. म्हणून तूं जाशील तेव्हां मला आश्वासन देऊन जा. ॥ २० ॥
उदु॑त्त॒मं मु॑मुग्धि नो॒ वि पाशं॑ मध्य॒मं चृ॑त । अवा॑ध॒मानि॑ जी॒वसे॑ ॥ २१ ॥ उत् उत्ऽतमं मुमुग्धि नः वि पाशं मध्यमं चृत । अव अधमानि जीवसे ॥ २१॥
आम्ही चिरकालपर्यंत आयुष्याचा उपभोग घ्यावा म्हणून आमचे वरच्या बाजूचे पाश शिथिल कर. आमची मधलीं आणि शरीराच्या खालील भागांवरील बंधनेंही सोडून टाक. ॥ २१ ॥
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २६ (अग्निसूक्त) ऋषी - सुनःशेप आजीगर्ति : देवता - अग्नि : छंद - गायत्री वसि॑ष्वा॒ हि मि॑येध्य॒ वस्त्रा॑ण्यूर्जां पते । सेमं नो॑ अध्व॒रं य॑ज ॥ १ ॥ वसिष्व हि मियेध्य वस्त्राणि ऊर्जां पते । सः इमं नः अध्वरं यज ॥ १ ॥
हे सामर्थ्यापति देवा, हे यज्ञार्ह अग्ने, आपली दिव्य वस्त्रें अंगावर घाल आणि अशा रीतीने विभूषित होऊन हा आमचा यज्ञ सिद्धीस ने. ॥ १ ॥
नि नो॒ होता॒ वरे॑ण्यः॒ सदा॑ यविष्ठ॒ मन्म॑भिः । अग्ने॑ दि॒वित्म॑ता॒ वचः॑ ॥ २ ॥ नि नः होता वरेण्यः सदा यविष्ठ मन्मऽभिः । अग्ने दिवित्मता वचः ॥ २ ॥
हे अत्यंत तरुण अग्नेदेवा, आमचे वचन श्रवण कर. तूं दिव्य कांतीने युक्त आहेस. अंतःकरणपूर्वक केलेली स्तवनें तुलाच साजतात. तूं आमचे हवि पोहोंचवितोस. ॥ २ ॥
आ हि ष्मा॑ सू॒नवे॑ पि॒तापिर्यज॑त्या॒पये॑ । सखा॒ सख्ये॒ वरे॑ण्यः ॥ ३ ॥ आ हि स्म सूनवे पिता आपिः यजति आपये । सखा सख्ये वरेण्यः ॥ ३ ॥
खरोखर पुत्रांस जो जणूं पिताच आहे, आप्तसंबंधी मनुष्यांस जो नातलगच आहे व जो मित्रांस अत्युत्तम मित्र आहे असा तो अग्नि आमचे यज्ञ सिद्ध करतो. ॥ ३ ॥
आ नो॑ ब॒र्ही रि॒शाद॑सो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा । सीद॑न्तु॒ मनु॑षो यथा ॥ ४ ॥ आ नः बर्हीः रिशादसः वरुणः मित्रः अर्यमा । सीदंतु मनुषः यथा ॥ ४ ॥
ज्याप्रमाणे आम्ही मनुष्यें दर्भाच्या आसनावर बसतो त्याप्रमाणे खलांचा नाश करणारा मित्र, वरुण व अर्यमा देवही प्रेमानें दर्भासनावर येऊन विराजमान होवोत. ॥ ४ ॥
पूर्व्य॑ होतर॒स्य नो॒ मन्द॑स्व स॒ख्यस्य॑ च । इ॒मा उ॒ षु श्रु॑धी॒ गिरः॑ ॥ ५ ॥ पूर्व्य होतः अस्य नः मन्दस्व सख्यस्य च । इमाः ऊं इति सु श्रुधी गिरः ॥ ५ ॥
देवांस हवि अर्पण करणाऱ्या हे पुराणपुरुषा, आमच्या हवींत संतोष मान, आमच्या प्रेमांत आनंद वाटूं दे व आमच्या प्रार्थना श्रवण कर. ॥ ५ ॥
यच्चि॒द्धि शश्व॑ता॒ तना॑ दे॒वंदे॑वं॒ यजा॑महे । त्वे इद्धू॑यते ह॒विः ॥ ६ ॥ यत् चित् हि शश्वता तना देवंऽदेवं यजामहे । त्वे इत् हूयते हविः ॥ ६ ॥
जो कांही हवि आम्ही निरनिराळ्या देवतांस नेहमीं देत असतो तो तुझ्याच ठायीं अर्पण करतो. ॥ ६ ॥
प्रि॒यो नो॑ अस्तु वि॒श्पति॒र्होता॑ म॒न्द्रो वरे॑ण्यः । प्रि॒याः स्व॒ग्नयो॑ व॒यम् ॥ ७ ॥ प्रियः नः अस्तु विश्पतिः होता मंद्रः वरेण्यः । प्रियाः सुऽअग्नयः वयम् ॥ ७ ॥
शुभकारक अग्नीचें पूजन करणारे आम्ही त्यास प्रिय आहोत. त्याचेवरही आमचें खरें प्रेम असो. तो प्रेम करण्यास योग्य आहे, तो आनंद देणारा आहे, तो देवतांस हवि पोंचवितो, सर्व मानवांचा तो राजा आहे. ॥ ७ ॥
स्व॒ग्नयो॒ हि वार्यं॑ दे॒वासो॑ दधि॒रे च॑ नः । स्व॒ग्नयो॑ मनामहे ॥ ८ ॥ सुऽअग्नयः हि वार्यं देवासः दधिरे च नः । सुऽअग्नयः मनामहे ॥ ८ ॥
शुभदायक अग्नीशी सख्य असणाऱ्या देवांनी आपणाकरितां अत्यंत स्पृहणीय वैभव तयार करून ठेवलें आहे. आम्हीही त्याच कल्याणकारक अग्नीचे भक्त होऊन त्याचे चिंतन करतो. ॥ ८ ॥
अथा॑ न उ॒भये॑षा॒ममृ॑त॒ मर्त्या॑नाम् । मि॒थः स॑न्तु॒ प्रश॑स्तयः ॥ ९ ॥ अथ नः उभयेषां अमृत मर्त्यानाम् । मिथः सन्तु प्रऽशस्तयः ॥ ९ ॥
आणि आतां हे अमरदेवा, यज्ञाचे दोन्ही बाजूस बसलेल्या आम्हांमध्यें एकमेकांच्या संबंधाने प्रेमसंभाषण होवो. ॥ ९ ॥
विश्वे॑भिरग्ने अ॒ग्निभि॑रि॒मं य॒ज्ञमि॒दं वचः॑ । चनो॑ धाः सहसो यहो ॥ १० ॥ विश्वेभिः अग्ने अग्निऽभिः इमं यज्ञं इदं वचः । चनः धाः सहसः यहो इति ॥ १० ॥
सामर्थ्यापासून प्रादुर्भूत होणाऱ्या हे अग्निदेवा, इतर सर्व अग्नीसहवर्तमान ह्या यज्ञावर व ह्या स्तोत्रावर प्रेम कर. ॥ १० ॥
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २७ (अग्नि व अनेकदेवतासूक्त) ऋषी - सुनःशेप आजीगर्ति : देवता - १ ते १२ अग्नि; १३ देवगण : छंद - गायत्री, त्रिष्टुभ् अश्वं॒ न त्वा॒ वार॑वन्तं व॒न्दध्या॑ अ॒ग्निं नमो॑भिः । स॒म्राज॑न्तमध्व॒राणा॑म् ॥ १ ॥ अश्वं न त्वा वारऽवंतं वन्दध्यै अग्निं नमःऽभिः । संऽराजंतं अध्वराणाम् ॥ १ ॥
चिलखत घालून सजविलेल्या अश्वाप्रमाणे अनेकदां वंदन करून मला तुझा बहुमान करूं दे. तूं प्रत्येक यज्ञांत विराजमान होत असतोस. ॥ १ ॥
स घा॑ नः सू॒नुः शव॑सा पृ॒थुप्र॑गामा सु॒शेवः॑ । मी॒ढ्वाँ अ॒स्माकं॑ बभूयात् ॥ २ ॥ सः घा नः सूनुः शवसा पृथुऽप्रगामा सुऽशेवः । मीढ्वान् अस्माकं बभूयात् ॥ २ ॥
हा दाता स्वसामर्थ्याच्या योगानें अनेक स्थळीं गमन करतो. हा उत्तम सौख्य अर्पण करणारा आहे. तो आम्हांकरितां कृपेचा वर्षाव करो. ॥ २ ॥
स नो॑ दू॒राच्चा॒साच्च॒ नि मर्त्या॑दघा॒योः । पा॒हि सद॒मित्वि॒श्वायुः॑ ॥ ३ ॥ सः नः दूरात् चासात् च नि मर्त्यात् अघऽयोः । पाहि सदं इत् विश्वऽआयुः ॥ ३ ॥
तूं सर्वांचा प्राण आहेस. तो तूं, आम्ही तुझेजवळ असो कीं दूर असो, पातकाचरण करणाऱ्या माणसापासून आमचें नेहमी संरक्षण कर. ॥ ३ ॥
इ॒ममू॒ षु त्वम॒स्माकं॑ स॒निं गा॑य॒त्रं नव्यां॑सम् । अग्ने॑ दे॒वेषु॒ प्र वो॑चः ॥ ४ ॥ इमं ऊं इति सु त्वं अस्माकं सनिं गायत्रं नव्यांसम् । अग्ने देवेषु प्र वोचः ॥ ४ ॥
अग्निदेवा, आम्ही गाइलेल्या ह्या सर्वकामनापरिपूरक अशा आमच्या नवीन स्तोत्रांची देवांचे समुदायांत तूं प्रशंसा केलेली आहेस. ॥ ४ ॥
आ नो॑ भज पर॒मेष्वा वाजे॑षु मध्य॒मेषु॑ । शिक्षा॒ वस्वो॒ अन्त॑मस्य ॥ ५ ॥ आ नः भज परमेषु आ वाजेषु मध्यमेषु । शिक्ष वस्वः अंतमस्य ॥ ५ ॥
जें सामर्थ्य सर्वोत्कृष्ट आहे, अथवा जे मध्यम प्रतीचे आहे त्याची प्राप्ति होत असतांना आमचे जवळ ऐस. जी संपत्ति अखेरच्या कोटींतील म्हणून गणली जाते तीही कशी प्राप्त करून घ्यावी हें आम्हांस शिकव. ॥ ५ ॥
वि॒भ॒क्तासि॑ चित्रभानो॒ सिन्धो॑रू॒र्मा उ॑पा॒क आ । स॒द्यः दा॒शुषे॑ क्षरसि ॥ ६ ॥ विऽभक्ता असि चित्रभानो सिंधोः ऊर्मौ उपाके आ । सद्यः दाशुषे क्षरसि ॥ ६ ॥
अलौकिक कांतीने देदीप्यमान असणाऱ्या हे देवा, तूं संपत्तीची वाटणी करणारा आहेस. तूं कृपेचा सिंधु असल्यामुळें तुझ्या प्रसाद लहरींजवळ जो भक्त उभा असतो त्याचेसाठीं तूं ताबडतोब संपत्तीचे पूर वाहवितोस. ॥ ६ ॥
यम॑ग्ने पृ॒त्सु मर्त्य॒मवा॒ वाजे॑षु॒ यं जु॒नाः । स यन्ता॒ शश्व॑ती॒रिषः॑ ॥ ७ ॥ यं अग्ने पृत्ऽसु मर्त्यं अवाः वाजेषु यं जुनाः । सः यंता शश्वतीः इषः ॥ ७ ॥
खरोखर ज्या मानवाचा तूं युद्धांत रक्षणकर्ता होतोस व ज्याला तूं शूरत्वाच्या कृत्यांत प्रेरणा करणारा असतोस त्याची सत्ता शाश्वत संपत्तीवर प्रस्थापित होते. ॥ ७ ॥
नकि॑रस्य सहन्त्य पर्ये॒ता कय॑स्य चित् । वाजो॑ अस्ति श्र॒वाय्यः॑ ॥ ८ ॥ नकिः अस्य सहंत्य परिऽएता कयस्य चित् । वाजः अस्ति श्रवाय्यः ॥ ८ ॥
तो कसाही असला तरी हे बलशाली देवा, त्यास कोणी प्रतिरोध करूं शकत नाहीं. त्याच्या सामर्थ्याची कीर्ति सर्वत्र गाजते. ॥ ८ ॥
स वाजं॑ वि॒श्वच॑र्षणि॒रर्व॑द्भिरस्तु॒ तरु॑ता । विप्रे॑भिरस्तु॒ सनि॑ता ॥ ९ ॥ सः वाजं विश्वऽचर्षणिः अर्वत्ऽभिः अस्तु तरुता । विप्रेभिः अस्तु सनिता ॥ ९ ॥
हा सर्वसंचारी देव, आम्हांस आमचे अश्वांसह पराक्रमाच्या कृत्यांतून पार पाडो व विद्वान् स्तोत्यांसह आम्हांस संपत्ति देवो. ॥ ९ ॥
जरा॑बोध॒ तद्वि॑विड्ढि वि॒शेवि॑शे य॒ज्ञिया॑य । स्तोमं॑ रु॒द्राय॒ दृशी॑कम् ॥ १० ॥ जराऽबोध तत् विविड्ढि विशेऽविशे यज्ञियाय । स्तोमं रुद्राय दृशीकम् ॥ १० ॥
स्तवनांनी जागृत होणाऱ्या हे देवा, यज्ञकर्माशी संबंध असलेल्या प्रत्येक मनुष्यासाठीं रुद्रास प्रिय होईल असें एखादें स्तोत्रे निवडून काढ. ॥ १० ॥
स नो॑ म॒हाँ अ॑निमा॒नो धू॒मके॑तुः पुरुश्च॒न्द्रः । धि॒ये वाजा॑य हिन्वतु ॥ ११ ॥ सः नः महान् अनिऽमानः धूमऽकेतुः पुरुऽचन्द्रः । धिये वाजाय हिन्वतु ॥ ११ ॥
तो अग्नि अत्यन्त थोर आहे, त्याच्या गुणास गणनाच नाहीं. धूम हे त्याच्या ध्वजावरील चिन्ह आहे. व त्याची कीर्ति फार पसरलेली आहे. बुद्धिमत्ता व सामर्थ्य ह्या दोहोंच्या प्राप्तीकरितां तो आमची योजना करो. ॥ ११ ॥
स रे॒वाँ इ॑व वि॒श्पति॒र्दैव्यः॑ के॒तुः शृ॑णोतु नः । उ॒क्थैर॒ग्निर्बृ॒हद्भा॑नुः ॥ १२ ॥ सः रेवान्ऽइव विश्पतिः दैव्यः केतुः शृणोतु नः । उक्थैः अग्निः बृहत्ऽभानुः ॥ १२ ॥
एखाद्या वैभवशाली राजाप्रमाणें आमच्या स्तुतींनी मोहित होऊन तो अग्नि आमची प्रार्थना श्रवण करो. तो मानवांचा राजा आहे, तो दिव्य सौंदर्याची मूर्ति आहे. त्याचें तेज प्रखर आहे. ॥ १२ ॥
नमो॑ म॒हद्भ्यो॒ नमो॑ अर्भ॒केभ्यो॒ नमो॒ युव॑भ्यो॒ नम॑ आशि॒नेभ्यः॑ ।
नमः महत्ऽभ्यः नमः अर्भकेभ्यः नमः युवभ्यः नमः आशिनेभ्यः ।
माझा श्रेष्ठ व्यक्तींना नमस्कार असो, लहानांना माझा नमस्कार असो, जे तरुण असतील त्यांस माझा नमस्कार असो, जे वृद्ध असतील त्यांसही माझा नमस्कार असो. शक्य असेल तर आपण देवांच्या सन्मानार्थ याग करूं या. हे देवहो, जो सर्वांहून थोर आहे त्याची स्तुति माझे हातून कधींही न राहो. ॥ १३ ॥
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २८ (सोमसूक्त )
ऋषी - सुनःशेप आजीगर्ति : देवता - १-४ इंद्र; ५-६ उलूखल;
यत्र॒ ग्रावा॑ पृ॒थुबु॑ध्न ऊ॒र्ध्वः भव॑ति॒ सोत॑वे ।
यत्र ग्रावा पृथुऽबुध्नः ऊर्ध्वः भवति सोतवे ।
जे रस सोमवल्लींतून काढण्याकरितां मोठ्या बुडाचा वरवंटा वर न्यावा लागतो, त्या उखळांतून बाहेर पडणाऱ्या सोमरसांचा, हे इंद्रा, तूं उत्सुक्तेने स्वीकार कर. ॥ १ ॥
यत्र॒ द्वावि॑व ज॒घना॑धिषव॒ण्या कृ॒ता ।
यत्र द्वौऽइव जघना अधिऽसवन्या कृता ।
ज्या सोमरसांकरितां जघनद्वयाप्रमाणे एकमेकांशी संलग्न होणारे दोन रसनिष्पादक पाषाण तयार केलेले असतात त्या उखळांतून बाहेर पडणाऱ्या सोमरसांचा, हे इंद्रा, तूं मोठ्या उत्सुकतेनें स्वीकार कर. ॥ २ ॥
यत्र॒ नार्य॑पच्य॒वमु॑पच्य॒वं च॒ शिक्ष॑ते ।
यत्र नारि अपऽच्यवं उपऽच्यवं च शिक्षते ।
ज्याच्या योगानें स्त्रीला, हात पुढेमागें करून घुसळावे कसे ह्याचा धडा मिळतो, त्या उखळांतून बाहेर पडणाऱ्या सोमरसांचा, हे इंद्रा, तूं मोठ्या उत्सुकतेनें स्वीकार कर. ॥ ३ ॥
यत्र॒ मन्थां॑ विब॒ध्नते॑ र॒श्मीन्यमि॑त॒वा इ॑व ।
यत्र मंथां विऽबध्नते रश्मीन् यमितवैऽइव ।
जे सोमरस काढीत असतांना, रवीने भरधांव दौडूं नये म्हणूनचे कीं काय, तिला दोऱ्या बांधलेल्या असतात. त्या उखळांतून बाहेर पडणाऱ्या सोमरसांचा, इंद्रा, तूं मोठ्या उत्सुकतेने स्वीकार कर. ॥ ४ ॥
यच्चि॒द्धि त्वं गृ॒हेगृ॑ह॒ उलू॑खलक यु॒ज्यसे॑ ।
यत् चित् हि त्वं गृहेऽगृह उलूखलक युज्यसे ।
हे उखळा, जेव्हां जेव्हां प्रत्येक घरांत तुला उपयोगांत आणले जाईल त्यावेळी विजयी सेनेच्या सन्मानार्थ दुमदुमणाऱ्या दुंदुभीप्रमाणें गंभीर ध्वनि करीत जा. ॥ ५ ॥
उ॒त स्म॑ ते वनस्पते॒ वातो॒ वि वा॒त्यग्र॒मित् ।
उत स्म ते वनस्पते वातः वि वाति अग्रं इत् ।
हे उत्तम काष्ठा, तुझ्या समोरच हा वारा वहात आहे. हे उखळा, इंद्रास सोमपान घडावें म्हणून तूं सोमरस तयार कर. ॥ ६ ॥
आ॒य॒जी वा॑ज॒सात॑मा॒ ता ह्यु१च्चा वि॑जर्भृ॒तः ।
आयजी इत्याऽयजि वाजऽसातमा ता हि उच्चा विऽजर्भृतः ।
हीं दोन यज्ञसंबंधी उपकरणें - कीं ज्यांच्यामुळे सामर्थ्याचा अत्यंत लाभ होतो - तीं, घोडे गवत खात असतां जशा प्रकरचा आवाज करतात, तशा प्रकारचा ध्वनि उत्पन्न करीत आहेत. ॥ ७ ॥
ता नो॑ अ॒द्य व॑नस्पती ऋ॒ष्वावृ॒ष्वेभिः॑ सो॒तृभिः॑ ।
ता नः अद्य वनस्पती इति ऋष्वौ ऋष्वेभिः सोतृऽभिः ।
तर हे उच्चत्वाने शोभणाऱ्या उत्तम काष्ठोपकरणांनो, सोमनिष्पादनांत तरबेज असलेल्या ऋत्विजांची मदत घेऊन इंद्रासाठीं मधुर सोमरस तयार करा. ॥ ८ ॥
उच्छि॒ष्टं च॒म्वोर्भर॒ सोमं॑ प॒वित्र॒ आ सृ॑ज ।
उत् शिष्टं चम्वोः भर सोमं पवित्रे आ सृज ।
जो सोमरस खाली पडला असेल तो दोन चमसांत भर व पवित्र दर्भातून गाळण्याकरितां ओत. वृषभाच्या चर्मावर तो नेऊन ठेव. ॥ ९ ॥
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २९ (इंद्रसूक्त) ऋषी - सुनःशेप आजीगर्ति : देवता - इंद्र : छंद - पंक्ति
यच्चि॒द्धि स॑त्य सोमपा अनाश॒स्ता इ॑व॒ स्मसि॑ ।
यत् चित् हि सत्य सोमऽपाः अनाशस्ताःऽइव स्मसि ।
हे सत्यस्वरूप व अत्यंत उदार इंद्रा, ज्या अर्थी आम्हांस कोठेंच मान नाहीं असे झाले आहे, त्या अर्थी धेनु, अश्व, उज्ज्वल धन, व सहस्रावधि भोग्यवस्तु ह्यांचेसंबंधात आमचे वर्चस्व सत्वर वाढेल असें कर. ॥ १ ॥
शिप्रि॑न्वाजानां पते॒ शची॑व॒स्तव॑ दं॒सना॑ ।
शिप्रिन् वाजानां पते शचीवः तव दंसना ।
हे सुंदर मुकुट धारण करणाऱ्या अत्यंत उदार इंद्रा, हे सामर्थ्याधिपते, हे पराक्रमी देवा, आपल्या अद्भुत कृतीनें धेनु, अश्व, उज्ज्वल धन, व सहस्रावधि भोग्यवस्तु ह्यांचे संबंधात आमचे वर्चस्व सत्वर वाढेल असें कर. ॥ २ ॥
नि ष्वा॑पया मिथू॒दृशा॑ स॒स्तामबु॑ध्यमाने ।
नि ष्वापया मिथूदृशा सस्तां अबुध्यमाने ।
परस्पराकडे एकसारखी नजर फेंकणाऱ्या त्या दोघीजणींस निद्रित कर. त्या जाग्या न होतां पडून राहतील असें कर. हे अत्यंत उदार इंद्रा, धेनु, अश्व, उज्ज्वल धन, व सहस्रावधि भोग्यवस्तु ह्यांचे संबंधात आमचे वर्चस्व सत्वर वाढेल असें कर. ॥ ३ ॥
स॒सन्तु॒ त्या अरा॑तयो॒ बोध॑न्तु शूर रा॒तयः॑ ।
ससंतु त्याः अरातयः बोधंतु शूर रातयः ।
ते आमचे शत्रु निद्रित असोत, व हे शूरा, आमचे स्नेही मात्र जागृत राहोत. हे अत्यंत उदार इंद्रा, धेनु, अश्व, उज्ज्वल धन, व सहस्रावधि भोग्यवस्तु ह्यांचे संबंधात आमचे वर्चस्व सत्वर वाढेल असें कर. ॥ ४ ॥
समि॑न्द्र गर्द॒भं मृ॑ण नु॒वन्तं॑ पा॒पया॑मु॒या ।
सं इंद्र गर्दभं मृण नुवंतं पापया अमुया ।
असली अभद्र भाषा बोलणाऱ्या गाढवास मारून टाक. हे अत्यंत उदार इंद्रा, धेनु, अश्व, उज्ज्वल धन, व सहस्रावधि भोग्यवस्तु ह्यांचे संबंधात आमचे वर्चस्व सत्वर वाढेल असें कर. ॥ ५ ॥
पता॑ति कुण्डृ॒णाच्या॑ दू॒रं वातः॒ वना॒दधि॑ ।
पताति कुण्डृणाच्या दूरं वातः वनात् अधि ।
वक्र मार्गाने गमन करणाऱ्या वाताचें फार दूर अशा अरण्याच्याही पलीकडे पतन होवो. हे अत्यंत उदार इंद्रा, धेनु, अश्व, उज्ज्वल धन, व सहस्रावधि भोग्यवस्तु ह्यांचे संबंधात आमचे वर्चस्व सत्वर वाढेल असें कर. ॥ ६ ॥
सर्वं॑ परिक्रो॒शं ज॑हि ज॒म्भया॑ कृकदा॒श्वम् ।
सर्वं परिऽक्रोशं जहि जम्भय कृकदाश्वम् ।
सर्व शोकांचा संहार कर. आणि जो कोणी अमचा नाश करणास टपून बसला असेल त्यास मारून टाक. हे अत्यंत उदार इंद्रा, धेनु, अश्व, उज्ज्वल धन, व सहस्रावधि भोग्यवस्तु ह्यांचे संबंधात आमचे वर्चस्व सत्वर वाढेल असें कर. ॥ ७ ॥
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त ३० (इंद्र, अश्विनीलुमार, उषासूक्त)
ऋषी - सुनःशेप आजीगर्ति : देवता - १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमारा; आ व॒ इंद्रं॒ क्रिविं॑ यथा वाज॒यन्तः॑ श॒तक्र॑तुम् । मंहि॑ष्ठं सिञ्च॒ इन्दु॑भिः ॥ १ ॥ आ व इंद्रं क्रिविं यथा वाजयन्तः शतक्रतुम् । मंहिष्ठं सिञ्च इन्दुभिः ॥ १ ॥
ज्याचे सामर्थ्य शतपट मोठे आहे, व जो तुम्हांस प्रिय आहे, अशा इंद्राची स्तुति करण्यांत निमग्न झालेल्या अहो ऋत्विजांनो, ज्याप्रमाणें एखादी विहीर पाण्यानें तुडुंब भरून टाकावी त्याप्रमाणे त्या अति उदार इंद्रास आम्ही सोमरसानें जणूं भरून टाकीत आहों. ॥ १ ॥
श॒तं वा॒ यः शुची॑नां स॒हस्रं॑ वा॒ समा॑शिराम् । एदु॑ नि॒म्नं न री॑यते ॥ २ ॥ शतं वा यः शुचीनां सहस्रं वा संऽआशिराम् । आ इत् ऊं इति निम्नं न रीयते ॥ २ ॥
ज्याप्रमाणे जल उतरत्या भागाकडे वहात जातें त्याप्रमाणें ह्या इंद्राची सोमरसाकडे साहजिक प्रवृत्ति होते. मग ते दुग्धमिश्रित सोमाचे हजार चमस असोत अथवा ज्यांत कांहीही मिश्र केलेले नाही अशा शुद्ध सोमाचे शंभरच चमस असोत. ॥ २ ॥
सं यन्मदा॑य शु॒ष्मिण॑ ए॒ना ह्यस्यो॒दरे॑ । स॒मु॒द्रो न व्यचो॑ द॒धे ॥ ३ ॥ सं यत् मदाय शुष्मिणे एना हि अस्य उदरे । समुद्रः न व्यचः दधे ॥ ३ ॥
जो सोमरस ह्या सामर्थ्यवान इंद्रास संतोष देत असतो त्याच्या योगानें त्याचें उदर समुद्राप्रमणे व्यापून जातें. ॥ ३ ॥
अ॒यमु॑ ते॒ सम॑तसि क॒पोत॑ इव गर्भ॒धिम् । वच॒स्तच्चि॑न्न ओहसे ॥ ४ ॥ अयं ऊं इति ते सं अतसि कपोतःऽइव गर्भऽधिम् । वचः तत् चित् नः ओहसे ॥ ४ ॥
हा सोम तुझाकरितां तयार करून ठेविला आहे. ज्याप्रमाणे कपोत पक्षी आपल्या लहान पिलांकडे प्रेमाने जातो त्याप्रमाणें तूं मोठ्या प्रेमानें ह्या सोमरसाकडे येत आहेस. आणि म्हणूनच आमच्या स्तुतीचाही तूं स्वीकार करीत आहेस. ॥ ४ ॥
स्तो॒त्रं रा॑धानां पते॒ गिर्वा॑हो वीर॒ यस्य॑ ते । विभू॑तिरस्तु सू॒नृता॑ ॥ ५ ॥ स्तोत्रं राधानां पते गिर्वाहः वीर यस्य ते । विऽभूतिः अस्तु सूनृता ॥ ५ ॥
हे इंद्रा, तूं सर्व अभीष्ट वस्तूंचा स्वामी आहेस व तुझी स्तुति केली म्हणजे तूं आपल्या भक्तांकडे येतोस. हे वीरा, ज्या तुझें स्तोत्र आम्ही गात आहों, त्या तुजकडून आम्हांस सत्यप्रेमानें परिपूरीत असे वैभव प्राप्त होऊं दे. ॥ ५ ॥
ऊ॒र्ध्वस्ति॑ष्ठा न ऊ॒तये॑ऽ॒स्मिन्वाजे॑ शतक्रतो । सम॒न्येषु॑ ब्रवावहै ॥ ६ ॥ ऊर्ध्वः तिष्ठा नः ऊतये अस्मिन् वाजे शतक्रतो इति शतऽक्रतो । सं अन्येषु ब्रवावहै ॥ ६ ॥
हे अत्यंत बलशाली इंद्रा, पराक्रमाच्या ह्या कृत्यांत आमचें संरक्षण करण्याकरितां तूं उठून उभा रहा. इतरांना सोडून आपणच एकमेकांशी संभाषण करूं या. ॥ ६ ॥
योगे॑योगे त॒वस्त॑रं॒ वाजे॑वाजे हवामहे । सखा॑य॒ इंद्र॑मू॒तये॑ ॥ ७ ॥ योगेऽयोगे तवःऽतरं वाजेऽवाजे हवामहे । सखायः इंद्रं ऊतये ॥ ७ ॥
जेव्हां वैभव प्राप्त करून घेण्याची संधि येईल अथवा जेव्हां जेव्हां शौर्यकर्म गाजविण्याचा प्रसंग पडेल तेव्हां तेव्हां आमच्या संरक्षणाकरितां आम्ही इंद्राचे स्नेहांकित भक्त, त्या अत्यन्त बलाढ्य इंद्रास पाचारण करतो. ॥ ७ ॥
आ घा॑ गम॒द्यदि॒ श्रव॑त्सह॒स्रिणी॑भिरू॒तिभिः॑ । वाजे॑भि॒रुप॑ नो॒ हव॑म् ॥ ८ ॥ आ घ गमत् यदि श्रवत् सहस्रिणीभिः ऊतिभिः । वाजेभिः उप नः हवम् ॥ ८ ॥
जर आमची स्तुति त्यास ऐकूं गेली असेल तर आपले हजारो प्रकारचे संरक्षणाचे मार्ग प्रकट करीत व आपलें सामर्थ्य निदर्शनास आणीत हा इंद्र आमच्या हांकेच्या अनुरोधानें निःसंशय येथें प्राप्त होईल. ॥ ८ ॥
अनु॑ प्र॒त्नस्यौक॑सो हु॒वे तु॑विप्र॒तिं नर॑म् । यं ते॒ पूर्वं॑ पि॒ता हु॒वे ॥ ९ ॥ अनु प्रत्नस्य ओकसः हुवे तुविऽप्रतिं नरम् । यं ते पूर्वं पिता हुवे ॥ ९ ॥
ज्या इंद्राचा पूर्वी तुझ्या पित्यानें धांवा केला होता त्याच अनेक शत्रूंसही दाद न देणाऱ्या शूर इंद्रास आपल्या पुरातन दिव्य स्थानापासून इकडे येण्यासाठीं मी विनंति करतो. ॥ ९ ॥
तं त्वा॑ व॒यं वि॑श्ववा॒रा शा॑स्महे पुरुहूत । सखे॑ वसो जरि॒तृभ्यः॑ ॥ १० ॥ तं त्वा वयं विश्वऽवार शास्महे पुरुऽहूत । सखे वसो इति जरितृऽभ्यः ॥ १० ॥
हे आमच्या प्रिय इंद्रा, त्या तुझी आज आम्ही स्तुति करीत आहों. सर्व विश्वांत प्रेम करण्यास तुझ्याशिवाय कोणी योग्य नाही. अनेक विद्वानांनी तुझे स्तवन केले आहे. तुझी स्तोत्रें गाणऱ्या भक्तांचे तूं मूर्तिमंत भाग्यच आहेस. ॥ १० ॥
अ॒स्माकं॑ शि॒प्रिणी॑नां॒ सोम॑पाः सोम॒पाव्ना॑म् । सखे॑ वज्रि॒न्सखी॑नाम् ॥ ११ ॥ अस्माकं शिप्रिणीनां सोमपाः सोमऽपाव्नाम् । सखे वज्रिन् सखीनाम् ॥ ११ ॥
हे वज्रधारी इंद्रा, तूं आमचा व आमच्या सहचारिणींचा हितकर्ता आहेस. सोमरस प्रिय असणाऱ्या सर्व देवांत तुलाच सोमाची अत्यंत आवड आहे. ॥ ११ ॥
तथा॒ तद॑स्तु सोमपाः॒ सखे॑ वज्रि॒न्तथा॑ कृणु । यथा॑ त उ॒श्मसी॒ष्टये॑ ॥ १२ ॥ तथा तत् अस्तु सोमऽपाः सखे वज्रिन् तथा कृणु । यथा ते उश्मसि इष्टये ॥ १२ ॥
हे वज्रधारी इंद्रा, हे आमचे मित्रा, तूं असें कर - तुझ्या इच्छेने असें होऊं दे - कीं आम्ही तुझ्याच कृपेची इच्छा करावी. ॥ १२ ॥
रे॒वती॑र्नः सध॒माद॒ इंद्रे॑ सन्तु तु॒विवा॑जाः । क्षु॒मन्तः॒ याभि॒र्मदे॑म ॥ १३ ॥ रेवतीः नः सधऽमाद इंद्रे संतु तुविऽवाजाः । क्षुऽमंतः याभिः मदेम ॥ १३ ॥
आमच्या सहवासांत इंद्रास आनंद वाटून वैभवानें युक्त व समृद्धिने परिपूर्ण असे अतिशय सामर्थ्य आम्हांस प्राप्त होवो, कीं ज्याच्या योगाने आम्हांस हर्ष होईल. ॥ १३ ॥
आ घ॒ त्वावा॒न्त्मना॒प्तः स्तो॒तृभ्यो॑ धृष्णविया॒नः । ऋ॒णोरक्षं॒ न च॒क्र्योः ॥ १४ ॥ आ घ त्वाऽवान् त्मना आप्त स्तोतृऽभ्यः धृष्णो इति इयानः । ऋणोः अक्षं न चक्र्योः ॥ १४ ॥
तुला तुझीच उपमा दिली पाहिजे. तूं आमचा आप्त आहेस. तुझी प्रार्थना केली असतां, हे शूर देवा, तूं भक्तांच्याकरितां रथचक्राच्या अक्षाप्रमाणें धांव घेतलेली आहेस. ॥ १४ ॥
आ यद्दुवः॑ शतक्रत॒वा कामं॑ जरितॄ॒णाम् । ऋ॒णोरक्षं॒ न शची॑भिः ॥ १५ ॥ आ यत् दुवः शतक्रतोअ इति शतऽक्रतो आ कामं जरितॄणाम् । ऋणोः अक्षं न शचीभिः ॥ १५ ॥
हे अत्यंत बुद्धिशाली इंद्रा, तुझ्या सेवकांचे हवि ग्रहण करण्याकरितां आणि त्यांच्या इच्छा परिपूर्ण करण्याकरितां तूं आपल्या सर्व सामर्थ्यासह रथचक्राच्या अक्षाप्रमाणें धांव घेतलीस. ॥ १५ ॥
शश्व॒दिंद्रः॒ पोप्रु॑थद्भिर्जिगाय॒ नान॑दद्भिः॒ शाश्व॑सद्भि॒र्धना॑नि ।
शश्वत् इंद्रः पोप्रुथत्ऽभिः जिगाय नानदत्ऽभिः शाश्वसत्ऽभिः धनानि ।
आपल्या अतिशय फुरफुरणाऱ्या, खिंकाळणाऱ्या आणि जोरानें श्वासोच्छ्वास करणाऱ्या अश्वांच्या योगाने इंद्राने नेहमीच संपत्ति जिंकून आणलेली आहे. अशा त्या अद्भुत कृत्य करणाऱ्या व आमच्या संबंधाने औदार्य करणाऱ्या देवानें आमच्या वैभवांत भर टाकण्यास आम्हांस सुवर्णरथ दिला आहे. ॥ १६ ॥
आश्वि॑ना॒वश्वा॑वत्ये॒षा या॑तं॒ शवी॑रया । गोम॑द्दस्रा॒ हिर॑ण्यवत् ॥ १७ ॥ आ अश्विनौ अश्वावत्या एषा यातं शवीरया । गोऽमत् दस्रा हिरण्यऽवत् ॥ १७ ॥
हे अश्विनहो, अश्वादिकांनी परिपूर्ण व कल्याणप्रद अशी संपत्ति घेऊन या. अहो सुंदर देवांनो, तुम्ही दिलेल्या वैभवांत धेनु आणि सुवर्ण यांचा भरपूर सांठा असो. ॥ १७ ॥
स॒मा॒नयो॑जनो॒ हि वां॒ रथो॑ दस्रा॒वम॑र्त्यः । स॒मु॒द्रे अ॑श्वि॒नेय॑ते ॥ १८ ॥ समानऽयोजनः हि वां रथः दस्रौ अमर्त्यः । समुद्रे अश्विना ईयते ॥ १८ ॥
हे सुंदर अश्विनहो, जो अविनाशी रथ तुम्ही दोघांकरितां मिळून जोडतां तो खरोखर समुद्रातसुद्धां गमन करतो. ॥ १८ ॥
न्य१घ्न्यस्य॑ मू॒र्धनि॑ च॒क्रं रथ॑स्य येमथुः । परि॒ द्याम॒न्यदी॑यते ॥ १९ ॥ नि अघ्न्यस्य मूर्धनि चक्रं रथस्य येमथुः । परि द्यां अन्यत् ईयते ॥ १९ ॥
अभेद्य अशा पर्वताच्याही मस्तकावर तुम्ही आपल्या रथाचें एक चाक भिडविले होते. दुसरें चाक द्युलोकाच्या सभोंवार भ्रमण करीत असतें. ॥ १९ ॥
कस्त॑ उषः कधप्रिये भु॒जे मर्तो॑ अमर्त्ये । कं न॑क्षसे विभावरि ॥ २० ॥ कः ते उषः कधऽप्रिये भुजे मर्तः अमर्त्ये । कं नक्षसे विभाऽवरि ॥ २० ॥
हे स्तुतिप्रिय उषे, हे अमर देवते, तुझ्या बाहुबंधनांत कोणत्या मानवास स्थान मिळणर आहे. हे देदीप्यमान देवि, तुझें आगमन कोणाकरितां होत आहे ? ॥ २० ॥
व॒यं हि ते॒ अम॑न्म॒ह्यान्ता॒दा प॑रा॒कात् । अश्वे॒ न चि॑त्रे अरुषि ॥ २१ ॥ वयं हि ते अमन्महि आ अंतात् आ पराकात् । अश्वे न चित्रे अरुषि ॥ २१ ॥
चित्रविचित्र वर्णाच्या एखाद्या तुरगीप्रमाणे शोभिवंत दिसणाऱ्या हे प्रकाशमान उषा देवते, आम्ही दूर असतांना व जवळ असतांना तुझेंच ध्यान खरोखर करीत होतो. ॥ २१ ॥
त्वं त्येभि॒रा ग॑हि॒ वाजे॑भिर्दुहितर्दिवः । अ॒स्मे र॒यिं नि धा॑रय ॥ २२ ॥ त्वं त्येभिः आ गहि वाजेभिः दुहितः दिवः । अस्मे इति रयिं नि धारय ॥ २२ ॥
हे आकाशकन्ये उषे, आपल्या सर्व सामर्थ्यासह तूं इकडे गमन कर, आणि आमचेसाठी वैभव आणून ठेव. ॥ २२ ॥
ॐ तत् सत् |