॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ देविगीता ॥

॥ अथ सप्तमोऽध्यायः - अध्याय सातवा ॥

हिमालय उवाच -
कति स्थानानि देवेशि द्रष्टव्यानि महीतले ।
मुख्यानि च पवित्राणि देवीप्रियतमानि च ॥ १ ॥
हिमालय म्हणाला, हे देवेश्वरि, मुख्य, पवित्र व देवीला अत्यंत प्रिय अशी किती स्थाने या पृथ्वीतलावर पहाण्यासारखी आहेत ? १.

व्रतान्यपि तथा यानि तुष्टिदान्युत्सवा अपि ।
तत्सर्वं वद मे मातः कृतकृत्यो यतो नरः ॥ २ ॥
त्याचप्रमाणे जी संतोष देणारीं व्रते व उत्सवही असतील ते सर्व, हे मातोश्री, मला सांग. कारण, त्यांच्या श्रवणाने मनुष्य कृतकृत्य होत असतो. २.

श्रीदेव्युवाच -
सर्वं दृश्यं मम स्थानं सर्वे काला व्रतात्मकाः ।
उत्सवाः सर्वकालेषु यतोऽहं सर्वरूपिणी ॥ ३ ॥
श्रीदेवी म्हणाली, ज्याअर्थी मी सर्वरूपिणी आहे त्याअर्थी सर्व दृश्यजात हे माझे स्थान, सर्वकाल माझ्या व्रतरूप व सर्वही काली माझे उत्सव आहेत. ३.

तथापि भक्तवात्सल्यात्किञ्चित्किञ्चिदथोच्यते ।
शृणुष्वावहितो भूत्वा नगराज वचो मम ॥ ४ ॥
तथापि आतां भक्तांच्या प्रेमामुळे कांहीं थोडेसे सांगते. हे नगराजा, माझे भाषण लक्षपूर्वक श्रवण कर. ४.

कोलापुरं महास्थानं यत्र लक्ष्मीः सदा स्थिता ।
मातुःपुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् ॥ ५ ॥
ज्या ठिकाणी लक्ष्मीचा सदा वास आहे असे कोल्हापूर हें महास्थान आहे. रेणुकेचे वसतिस्थान जे सह्याद्रपर्वतांतील मातुःपुर ते श्रेष्ठ व द्वितीय स्थान होय. ५.

तुलजापुरं तृतीयं स्यात्सप्तशृङ्‌गं तथैव च ।
हिङ्‌गुलायां महास्थानं ज्वालामुख्यास्तथैव च ॥ ६ ॥
तुळजापूर हे तिसरे स्थान आहे. तसेच सप्तशृंग, हिंगुलेचे महास्थान, तसेंच ज्वालामुखीचें स्थान, ६,

शाकंभर्याः परं स्थानं भ्रामर्याः स्थानमुत्तमम् ।
श्रीरक्तदन्तिकास्थानं दुर्गास्थानं तथैव च ॥ ७ ॥
शाकंभरीचे श्रेष्ठ पीठ, भ्रामरीचे उत्तम स्थान, श्रीदंतरक्तिकानामक देवीचे ठिकाण, तसेच दुर्गास्थान आहे. ७.

विन्ध्याचलनिवासिन्याः स्थानं सर्वोत्तमोत्तमम् ।
अन्नपूर्णामहास्थानं काञ्चीपुरमनुत्तमम् ॥ ८ ॥
विंध्याचल पर्वतांत राहणार्‍या देवीचें स्थान तर सर्वोत्तमच आहे. अन्नपूर्णामहास्थान, अत्युत्तम कांचीपूर ८,

भीमादेव्याः परं स्थानं विमलास्थानमेव च ।
श्रीचन्द्रलामहास्थानं कौशिकीस्थानमेव च ॥ ९ ॥
भीमादेवीचे उत्तम स्थान, विमलास्थान, कर्णाटक देशांतील श्रीचंद्रलादेवीचे महास्थान, कौशिकीस्थान ९,

नीलांबायाः परं स्थानं नीलपर्वतमस्तके ।
जांबूनदेश्वरीस्थानं तथा श्रीनगरं शुभम् ॥ १० ॥
नीलपर्वतावरील नीलांबेचे उत्तम स्थान, जांबूनदेश्वरीचे स्थान, तसे सुंदर श्रीनर १०,

गुह्यकाल्या महास्थानं नेपाले यत्प्रतिष्ठितम् ।
मीनाक्ष्याः परमं स्थानं यच्च प्रोक्तं चिदंबरे ॥ ११ ॥
नेपाळ देशांत असलेले गुह्यकालीचे महास्थान, चिदंबरसंज्ञक देशांत आहे असे सांगितलेले मीनाक्षीचे मुख्य स्थान, ११,

वेदारण्यं महास्थानं सुन्दर्या समधिष्ठितम् ।
एकांबरं महास्थानं परशक्त्या प्रतिष्ठितम् ॥ १२ ॥
सुंदरी देवीचे अधिष्ठानभूत असे वेदारण्यनामक महास्थान, पराशक्ति ज्यांत रहाते असे एकांबरसंज्ञक महास्थान १२,

महालसा परं स्थानं योगेश्वर्यास्तथैव च ।
तथा नीलसरस्वत्याः स्थानं चीनेषु विश्रुतम् ॥ १३ ॥
महालसेचे उत्तम स्थान, तसेच योगेश्वरीचे स्थान, तसेच चीनांत असलेले नील सरस्वतीचे स्थान १३

वैद्यनाथे तु बगलास्थानं सर्वोत्तमं मतम् ।
श्रीमच्छ्रीभुवनेश्वर्या मणिद्वीपं मम स्मृतम् ॥ १४ ॥
व वैद्यनाथावरील बगलास्थान सर्वोत्तम म्हणून मान्य आहे. मज श्रीमत् श्रीभुवनेश्वरीचे स्थान मणिद्वीप होय असे सांगितलेले आहे. १४.

श्रीमत्त्रिपुरभैरव्याः कामाख्यायोनिमण्डलम् ।
भूमण्डले क्षेत्ररत्नं महामायाधिवासितम् ॥ १५ ॥
सतीच्या देहाने अवतार घेतलेल्या कामाख्या महादेवीचे योनिमंडल ज्या ठिकाणी पडलें तें स्थान श्रीमत्त्रिपुरभैरवीचे आहे. ती महामायेची निवासभूमि असल्यामुळे या भूलोकी क्षेत्ररत्न आहे. १५.

नातः परतरं स्थानं क्वचिदस्ति धरातले ।
प्रतिमासं भवेद्देवी यत्र साक्षाद्‌रजस्वला ॥ १६ ॥
या स्थानाहून उत्तम असे भूलोकी दुसरे कोणतेही स्थान नाही. या स्थानीं देवी प्रतिमासीं साक्षात् रजस्वला होते. १६.

तत्रत्या देवताः सर्वाः पर्वतात्मकतां गताः ।
पर्वतेषु वसन्त्येव महत्यो देवता अपि ॥ १७ ॥
तेथील सर्वही देवता पर्वतात्मक झाल्या आहेत. कारण, पर्वतांवर सुद्धा मोठमोठ्या देवता रहातातच. १७.

तत्रत्या पृथिवी सर्वा देवीरूपा स्मृता बुधैः ।
नातः परतरं स्थानं कामाख्यायोनिमण्डलात् ॥ १८ ॥
त्या ठिकाणी सर्व भूमि देवीरूप आहे, असे सुज्ञांनी सांगितले आहे. सारांश, या कामाख्या देवतेच्या योनिमंडलापेक्षा श्रेष्ठ असे दुसरे स्थान नाहीं. १८.

गायत्र्याश्च परं स्थानं श्रीमत्पुष्करमीरितम् ।
अमरेशे चण्डिका स्यात्प्रभासे पुष्करेक्षिणी ॥ १९ ॥
गायत्रीचें उत्तम स्थान श्रीमत्पुष्कर क्षेत्र असे सांगितले आहे. अमरेश्वरीं चंडिका, प्रभासतीर्थीं पुष्करेक्षणी, १९,

नैमिषे तु महास्थाने देवी सा लिङ्‌गधारिणी ।
पुरुहूता पुष्कराक्षे आषाढौ च रतिस्तथा ॥ २० ॥
नैमिषसंज्ञक महास्थानामध्ये ती लिंगधारिणी देवी, पुष्कराक्षामध्यें पुरुहूता, आषाढस्थानीं रति, २०,

चण्डमुण्डी महास्थाने दण्डिनी परमेश्वरी ।
भारभूतौ भवेद्‌भूतिर्नाकुले नकुलेश्वरी ॥ २१ ॥
महास्थानीं दंडिनी परमेश्वरी चंडमुंडी, भारभूतामध्ये भूति व नाकुलांत नकुलेश्वरी आहे. २१.

चन्द्रिका तु हरिश्चन्द्रे श्रीगिरौ शाङ्‌करी स्मृता ।
जप्येश्वरे त्रिशूला स्यात्सूक्ष्मा चाम्रातकेश्वरे ॥ २२ ॥
हरिश्चंद्रांत चंद्रिका, श्रीगिरीवर शांकरी, जयेश्वरीं त्रिशूला व आम्रातकेश्वरीं सूक्ष्मा देवी आहे. २२.

शाङ्‌करी तु महाकाले शर्वाणी मध्यमाभिधे ।
केदाराख्ये महाक्षेत्रे देवी सा मार्गदायिनी ॥ २३ ॥
उज्जनींत शांकरी, मध्यमासंज्ञक स्थानीं शर्वाणी व केदारनामक महाक्षेत्रामध्यें ती मार्गदायिनी देवी आहे. २३.

भैरवाख्ये भैरवी सा गयायां मङ्‌गला स्मृता ।
स्थाणुप्रिया कुरुक्षेत्रे स्वायंभुव्यपि नाकुले ॥ २४ ॥
भैरवनामक स्थळी भैरवी वे गयेमध्ये मंगला आहे असे वचन आहे. कुरुक्षेत्रामध्ये स्थाणुप्रिया व नाकुलामध्ये स्वायंभुवी सुद्धा आहे. २४.

कनखले भवेदुग्रा विश्वेशा विमलेश्वरे ।
अट्टहासे महानन्दा महेन्द्रे तु महान्तका ॥ २५ ॥
कनखलांत उग्रो, विमलेश्वरांत विश्वेशा, अट्टहासामध्ये महानंदा, महेंद्रावर महांतका २५

भीमे भीमेश्वरी प्रोक्ता रुद्राणी त्वर्धकोटिके ॥ २६ ॥
व भीमावर भीमेश्वरी आहे असे सांगितले असून पुनः वस्त्रापथस्थानी शांकरी भवानी आहे असे सांगितले आहे. अर्धकोटिकक्षेत्रीं रुद्राणी, २६

अविमुक्ते विशालाक्षी महाभागा महालये ।
गोकर्णे भद्रकर्णी स्याद्‌भद्रा स्याद्‌भद्रकर्णके ॥ २७ ॥
अविमुक्तदेशीं विशालाक्षी, महालयीं महाभागा, गोकर्णांत भद्रकर्णी व भद्र कर्णकांत भद्रा आहे. २७.

उत्पलाक्षी सुवर्णाक्षे स्थाण्वीशा स्थाणुसंज्ञके ।
कमलालये तु कमला प्रचण्डा छगलण्डके ॥ २८ ॥
सुवर्णाक्षामध्ये उत्पलाक्षी, स्थाणुसंज्ञकामध्ये स्थाण्वीशा, कमलालयामध्यें कमला, छगलंडकांत प्रचंडा, २८,

कुरण्डले त्रिसन्ध्या स्यान्माकोटे मुकुटेश्वरी ।
मण्डलेशे शाण्डकी स्यात्काली कालञ्जरे पुनः ॥ २९ ॥
कुरंडलांत त्रिसंध्या व माकोटामध्यें मुकुटेश्वरी आहे. मंडलेशामध्ये शांडकी आहे व पुनः कालंजरामध्यें काली आहे. २९.

शङ्‌कुकर्णे ध्वनिः प्रोक्ता स्थूला स्यात्स्थूलकेश्वरे ।
ज्ञानिनां हृदयांभोजे हृल्लेखा परमेश्वरी ॥ ३० ॥
शंकुकर्णामध्यें तिला ध्वनि असे म्हणतात; स्थूलकेश्वरीं तीच स्थूला होते; व ज्ञान्यांच्या हृदयकमलामध्यें परमेश्वरी हृल्लेखा रहाते. ३०.

प्रोक्तानीमानि स्थानानि देव्याः प्रियतमानि च ।
तत्तत्क्षेत्रस्य माहात्म्यं श्रुत्वा पूर्वं नगोत्तम ॥ ३१ ॥
ही देवीची अत्यंत प्रिय अशीं स्थाने मी तुला सांगितलीं. हे पर्वतोत्तमा, पूर्वीं त्या त्या क्षेत्रांचे माहात्म्य श्रवण करून ३१

तदुक्तेन विधानेन पश्चाद्देवीं प्रपूजयेत् ।
अथवा सर्वक्षेत्राणि काश्यां सन्ति नगोत्तम ॥ ३२ ॥
नंतर त्यांत सांगितलेल्या विधानाने देवीची पूजा करावी. अथवा हे भूधरा, सर्व क्षेत्रे काशीमध्यें आहेत. ३२.

तत्र नित्यं वसेन्नित्यं देवीभक्तिपरायणः ।
तानि स्थानानि सम्पश्यञ्जपन्देवीं निरन्तरम् ॥ ३३ ॥
ध्यायंस्तच्चरणांभोजं मुक्तो भवति बन्धनात् ।
इअमानि देवीनामानि प्रातरुत्थाय यः पठेत् ॥ ३४ ॥
यास्तव, देवीच्या भक्तीमध्यें तत्पर असणार्‍या पुरुषानें त्या ठिकाणीं सर्वदा रहावें. ती स्थानें पहात व निरंतर देवीचा जप करीत ३३-३४

भस्मीभवन्ति पापानि तत्क्षणान्नग सत्वरम् ।
श्राद्धकाले पठेदेतान्यमलानि द्विजाग्रतः ॥ ३५ ॥
तिच्या चरणकमलाचें ध्यान करणारा पुरुष संसारबंधनापासून मुक्त होतो. ही देवीचीं नांवें प्रातःकाळी उठून जो म्हणतो त्याची पापे, हे नगा, विलंब व लागतां तात्काल भस्म होतात. ही सर्व निर्मल नांवें ब्राह्मणांपुढे श्राद्धकालीं म्हणावीत. ३५.

मुक्तास्तत्पितरः सर्वे प्रयान्ति परमां गतिम् ।
अधुना कथयिष्यामि व्रतानि तव सुव्रत ॥ ३६ ॥
पाठकाचे सर्व पितर मुक्त होऊन परमगतीला जातात. आता हे सदाचरणी पर्वता, मी तुला व्रते सांगते. ३६.

नारीभिश्च नरैश्चैव कर्तव्यानि प्रयत्नतः ।
व्रतमनन्ततृतीयाख्यं रसकल्याणिनीव्रतम् ॥ ३७ ॥
तीं स्त्रिया व पुरुष यांनी मोठ्या प्रयत्नाने करावी. अनंततृतीयासंज्ञक व्रत, रसकल्याणिनीव्रत ३७

आर्द्रानन्दकरं नाम्ना तृतीयायां व्रतं च यत् ।
शुक्रवारवतं चैव तथा कृष्णचतुर्दशी ॥ ३८ ॥
व आर्द्रानंदकरनामक जें तृतीया तिथीला होणारें व्रत, तसेच शुक्रवारव्रत, कृष्णचतुर्दशीव्रत ३८,

भौमवारव्रतं चैव प्रदोषव्रतमेव च ।
यत्र देवो महादेवो देवीं संस्थाप्य विष्टरे ॥ ३९ ॥
नृत्यं करोति पुरतः सार्धं दवैर्निशामुखे ।
तत्रोपोष्य रजन्यादौ प्रदोषे पूजयाच्छिवाम् ॥ ४० ॥
भौमवारव्रत व ज्या प्रदोषकाळीं देवाधिदेव शंकर देवीला आसनावर बसवून देवांसहवर्तमान पुढें नृत्य करतो ते प्रदोषव्रत करावे. त्या दिवशी उपवास करून रात्रीच्या आरंभीं प्रदोषकाळीं शिवेचें पूजन करावें. ३९-४०.

प्रतिपक्षं विशेषेण तद्देवीप्रीतिकारकम् ।
सोमवारव्रतं चैव ममातिप्रियकृन्नग ॥ ४१ ॥
विशेषतः ते प्रत्येक पक्षांत करावे. कारण, ते देवीला प्रसन्न करीत असते. हे हिमालया, सोमवारव्रत हें मला प्रीतियुक्त करीत असल्यामुळे ४१

तत्रापि देवीं संपूज्य रात्रौ भोजनमाचरेत् ।
नवरात्रद्वयं चैव व्रतं प्रीतिकरं मम ॥ ४२ ॥
त्या दिवशींही रात्रीं देवीचें पूजन करून भोजन करावे. शरदृतूंतील ४२

एवमन्यान्यपि विभो नित्यनैमित्तिकानि च ।
व्रतानि कुरुते यो वै मत्प्रीत्यर्थं विमत्सरः ॥ ४३ ॥
व वसंतऋतूतींल दोन नवरात्रें केल्याने मी प्रसन्न होते. हे विभो पर्वता, ह्याप्रमाणेच अन्यही नित्यनैमित्तिक व्रतें जो कोणी मत्सर सोडून माझ्या संतोषाकारितां करितो ४३,

प्राप्नोति मम सायुज्यं स मे भक्तः स मे प्रियः ।
उत्सवानपि कुर्वीत दोलोत्सवमुखान्विभो ॥ ४४ ॥
त्याला माझ्याशी सायुज्यता प्राप्त होते. तो मला प्रिय आहे व तो माझा भक्त होय. हे विभो, दोलोत्सवप्रभृति उत्सवही करावे. ४४.

शयनोत्सवं तथा कुर्यात्तथा जागरणोत्सवम् ।
रथोत्सवं च मे कुर्याद्दमनोत्सवमेव च ॥ ४५ ॥
जसा शयनोत्सव तसाच जागरणोत्सवही करावा, माझा रथोत्सव करावा व त्याचप्रमाणे दमनोत्सवही करावा. ४५.

पवित्रोत्सवमेवापि श्रावणे प्रीतिकारकम् ।
मम भक्तः सदा कुर्यादेवमन्यान्महोत्सवान् ॥ ४६ ॥
मला प्रसन्न करणारा श्रावणांतील पवित्रोत्सव माझ्या भक्तानें सर्वदा करावा. ह्याप्रमाणेंच अन्य महोत्सवही करावे. ४६.

मद्‌भक्तान्भोजयेत्प्रीत्या तथा चैव सुवासिनीः ।
कुमारीबटुकांश्चापि मद्बुद्ध्या तद्‌गतान्तरः ॥ ४७ ॥
माझ्या भक्तांना व सुवासिनींना, कुमारींना व ब्रह्मचार्‍यांना त्यांच्या ठायीं माझी बुद्धि करून एकाग्र मनाने व भक्तीने भोजन घालावें ४७

वित्तशाठ्येन रहितो यजेदेतान्सुमादिभिः ।
य एवं कुरुते भक्त्या प्रतिवर्षमतन्द्रितः ॥ ४८ ॥
व वित्ताविषयीं कपट न करितां पुष्पादिकांच्या योगाने त्यांची पूजा करावी. प्रतिवर्षीं कंटाळा न करतां जो भक्तिपूर्वक असे करतो, ४८

स धन्यः कृतकृत्योऽसौ मत्प्रीतेः पात्रमञ्जसा ।
सर्वमुक्तं समासेन मम प्रीतिप्रदायकम् ।
नाशिष्याय प्रदातव्यं नाभक्ताय कदाचन ॥ ४९ ॥
तो धन्य होय; तोच कृतकृत्य होय व मुख्यत्वेकरून माझ्या प्रीतीचे तोच पात्र होय. तात्पर्य, मला प्रसन्न करणारे असे सर्व विधान मी संक्षेपतः सांगितले आहे. हे जो आपला शिष्य व भक्त नाहीं त्याला कधीही सांगू नये. ४९.

॥ इति श्रीदेवीभागवते देवीगीतायां सप्तमोऽध्यायः ॥
॥ सातवा अध्याय समाप्त ॥ ७ ॥GO TOP