श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
द्वादशः स्कन्धः
तृतीयोऽध्यायः


गायत्रीमन्त्रकवचवर्णनम्

नारद उवाच
स्वामिन्सर्वजगन्नाथ संशयोऽस्ति मम प्रभो ।
चतुःषष्टिकलाभिज्ञ पातकाद्योगविद्वर ॥ १ ॥
मुच्यते केन पुण्येन ब्रह्मरूपः कथं भवेत् ।
देहश्च देवतारूपो मन्त्ररूपो विशेषतः ॥ २ ॥
कर्म तच्छ्रोतुमिच्छामि न्यासं च विधिपूर्वकम् ।
ऋषिश्छन्दोऽधिदैवं च ध्यानं च विधिवद्विभो ॥ ३ ॥
श्रीनारायण उवाच
अस्त्येकं परमं गुह्यं गायत्रीकवचं तथा ।
पठनाद्धारणान्मर्त्यः सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ४ ॥
सर्वान्कामानवाप्नोति देवीरूपश्च जायते ।
गायत्रीकवचस्यास्य ब्रह्मविष्णुमहेश्वराः ॥ ५ ॥
ऋषयो ऋग्यजुःसामाथर्वश्छन्दांसि नारद ।
ब्रह्मरूपा देवतोक्ता गायत्री परमा कला ॥ ६ ॥
तद्‌बीजं भर्ग इत्येषा शक्तिरुक्ता मनीषिभिः ।
कीलकं च धियः प्रोक्तं मोक्षार्थे विनियोजनम् ॥ ७ ॥
चतुर्भिर्हृदयं प्रोक्तं त्रिभिर्वर्णेः शिरः स्मृतम् ।
चतुर्भिः स्याच्छिखा पश्चात् त्रिभिस्तु कवचं स्मृतम् ॥ ८ ॥
चतुर्भिर्नेत्रमुद्दिष्टं चतुर्भिः स्यात्तदस्त्रकम् ।
अथ ध्यानं प्रवक्ष्यामि साधकाभीष्टदायकम् ॥ ९ ॥
मुक्ताविद्रुमहेमनीलधवलच्छायैर्मुखैस्त्रीक्षणै-
र्युक्तामिन्दुनिबद्धरत्‍नमुकुटां तत्त्वार्थवर्णात्मिकाम् ।
गायत्रीं वरदाभयाङ्‌कुशकशाः शुभ्रं कपालं गुणं
शङ्‌खं चक्रमथारविन्दयुगलं हस्तैर्वहन्तीं भजे ॥ १० ॥
गायत्री पूर्वतः पातु सावित्री पातु दक्षिणे ।
ब्रह्मसन्ध्या तु मे पश्चादुत्तरायां सरस्वती ॥ ११ ॥
पार्वती मे दिशं रक्षेत्पावकीं जलशायिनी ।
यातुधानी दिशं रक्षेद्‌यातुधानभयङ्‌करी ॥ १२ ॥
पावमानी दिशं रक्षेत्पवमानविलासिनी ।
दिशं रौद्री च मे पातु रुद्राणी रुद्ररूपिणी ॥ १३ ॥
ऊर्ध्वं ब्रह्माणी मे रक्षेदधस्ताद्वैष्णवी तथा ।
एवं दश दिशो रक्षेत्सर्वाङ्‌गं भुवनेश्वरी ॥ १४ ॥
तत्पदं पातु मे पादौ जङ्‌घे मे सवितुः पदम् ।
वरेण्यं कटिदेशे तु नाभिं भर्गस्तथैव च ॥ १५ ॥
देवस्य मे तद्धृदयं धीमहीति च गल्लयोः ।
धियः पदं च मे नेत्रे यः पदं मे ललाटकम् ॥ १६ ॥
नः पातु मे पदं मूर्ध्नि शिखायां मे प्रचोदयात् ।
तत्पदं पातु मूर्धानं सकारः पातु भालकम् ॥ १७ ॥
चक्षुषी तु विकारार्णस्तुकारस्तु कपोलयोः ।
नासापुटं वकारार्णो रेकारस्तु मुखे तथा ॥ १८ ॥
णिकार ऊर्ध्वमोष्ठं तु यकारस्त्वधरोष्ठकम् ।
आस्यमध्ये भकारार्णो र्गोकारश्चिबुके तथा ॥ १९ ॥
देकारः कण्ठदेशे तु वकारः स्कन्धदेशकम् ।
स्यकारो दक्षिणं हस्तं धीकारो वामहस्तकम् ॥ २० ॥
मकारो हृदयं रक्षेद्धिकार उदरे तथा ।
धिकारो नाभिदेशे तु योकारस्तु कटिं तथा ॥ २१ ॥
गुह्यं रक्षतु योकार ऊरू द्वौ नः पदाक्षरम् ।
प्रकारो जानुनी रक्षेच्चोकारो जङ्‌घदेशकम् ॥ २२ ॥
दकारं गुल्फदेशे तु यकारः पदयुग्मकम् ।
तकारव्यञ्जनं चैव सर्वाङ्‌गं मे सदावतु ॥ २३ ॥
इदं तु कवचं दिव्यं बाधाशतविनाशनम् ।
चतुःषष्टिकलाविद्यादायकं मोक्षकारकम् ॥ २४ ॥
मुच्यते सर्वपापेभ्यः परं ब्रह्माधिगच्छति ।
पठनाच्छ्रवणाद्वापि गोसहस्रफलं लभेत् ॥ २५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां सहितायां
द्वादशस्कन्धे गायत्रीमन्त्रकवचवर्णनं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥


गायत्रीकवच

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणाले, ''हे स्वामिन्, चौसष्ट कला जाणणारा योगीश्रेष्ठ माणूस कोणत्या पुण्याने पापमुक्त होतो ? तो ब्रह्मरूप, देवतारूप, मंत्ररूप कसा होतो ?''

श्रीनारायण म्हणाले, ''गायत्रीचे गुह्य कवच आहे. त्याचे पठण वा धारण केल्याने माणूस पापमुक्त होतो. त्याला सर्व कामनांची प्राप्ती होते. तो देवीरूप होतो. हे नारदा, या गायत्रीकवचाचे ऋषी, ब्रह्मा, विष्णु, महेश्वर असून ऋक्, यजुः साम व अथर्व हे छंद आहेत. यांची ब्रह्मरूप देवता आहे. गायत्री ही परमकला आहे.

तत् हे पदबीज, भर्ग ही शक्ती आहे. मोक्षासाठी त्याचा विनियोग व बुद्धीचे कीलक आहे. चार वर्णांनी हृदय होत असते. तीन वर्णांनी मस्तक, चार वर्णांनी शिखा व नंतर तीन वर्णांनी कवच असे म्हटले आहे. चार वर्णांनी नेत्र चार वर्णांनी अश्रू असे सांगितले आहे. आता देवीचे अभिष्ट ध्यान सांगतो.

मोती, विद्रुम, सुवर्ण, नील, शुभ्र या रंगांनी युक्त, पाच मुखांनी व तीन नेत्रांनी युक्त, त्याच्यावर चंद्र बांधला आहे असा मुकुट असलेली, चोवीस तत्वांचा अर्थ इत्यदि वर्णांची गायत्री तिची मी सेवा करतो.

तिने वरच्या हातांत दोन कमले; खालच्या हातांत चक्र, शंख, त्याखालील हातांत शुभ्र कपाल, रज्जू, त्याखालील हातांत पाश व अंकुश; आणि सर्वांत खाली असलेल्या हातात अभय व वर धारण केले आहे. ही गायत्री पूर्वेकडून, सावित्री दक्षिणेकडून, ब्रह्मसंध्या पश्चिमेकडून माझे रक्षण करो.

सरस्वती उत्तरेकडे, पार्वती अग्नेयदिशेस, जलशायिनी व यातुधानी नैऋत्यदिशेस माझे रक्षण करो. वायुची विलासिनी, पवमानी वायव्य दिशेस, रुद्रभाषिणी रुद्राणी ईशान्य दिशेस माझे रक्षण करो. हे ब्राह्मणी, ऊर्ध्यगामी, तू माझे रक्षण कर. अधोभागी वैष्णवी माझे रक्षण करो. भुवनेश्वरी माझे सर्वांगाचे दाही दिशेस रक्षण करो.

तत् हे पद माझे पाय, सवितुः माझ्या पोटर्‍या, वरेण्यं कटिदेश, भर्ग, नाभी, देवस्य हृदय, धीमहि हे गाल, धियः हे नेत्र, यः हे माझे ललाट, नः हे मस्तकातील श्रेष्ठ स्थान, प्रचोदयात् हे पद शिखेचे रक्षण करो. विकार व रेफ नेत्रांचे, तुकार, गालांचे, वकार व रेफ नाकपुड्यांचे, रेकार मुखाचे, विकार वरच्या ओठाचे, यकार अधरोष्ठाचे, भकार व रेफ मुखातील भागाचे, गोकार हनुवटीचे, देकार कंठाचे, वकार कंठदेशाचे, स्यकार उजव्या हाताचे, धीकार डाव्या हाताचे, मकार हदयाचे रक्षण करो.

हिकार उदराचे, धिकार नाभीचे, योकार कटीचे व गुह्याचे रक्षण करो. नः पद दोन्ही मांड्यांचे, प्रकार गुडघ्यांचे, चोकार जंघप्रदेशाचे, दकार गुल्कप्रदेशाचे, याकार पादयुगुलाचे, तकार सर्वांगाचे रक्षण करो.

हे दिव्य कवच शेकडो पिंडांचा नाश करून चौसष्ट विद्या, फल व मोक्ष देणारे आहे. यामुळे प्राणी पापमुक्त होतो. तो परब्रह्मात जाऊन पोहोचतो. याच्या पठणाने व श्रवणाने सहस्र गोदानाचे पुण्य मिळते.'



अध्याय तिसरा समाप्त

GO TOP