श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
एकादशः स्कन्धः
चतुर्विंशोऽध्यायः


प्रातश्चिन्तनम्

नारद उवाच
नारायण महाभाग गायत्र्यास्तु समासतः ।
शान्त्यादिकान्प्रयोगांस्तु वदस्व करुणानिधे ॥ १ ॥
श्रीनारायण उवाच
अतिगुह्यमिदं पृष्टं त्वया ब्रह्यतनूद्‍भव ।
न कस्यापि च वक्तव्यं दुष्टाय पिशुनाय च ॥ २ ॥
अथ शान्तिः पयोऽक्ताभिः समिद्‌‍भिर्जुहुयाद् द्विजः ।
शमीसमिद्‌‍भिः शाम्यन्ति भूतरोगग्रहादयः ॥ ३ ॥
आर्द्राभिः क्षीरवृक्षस्य समिद्‌‍भिर्जुहुयाद् द्विजः ।
जुहुयाच्छकलैर्वापि भूतरोगादिशान्तये ॥ ४ ॥
जलेन तर्पयेत्सूर्यं पाणिभ्यां शान्तिमाप्नुयात् ।
जानुदघ्ने जले जप्त्वा सर्वान्दोषाञ्छमं नयेत् ॥ ५ ॥
कण्ठदघ्ने जले जप्त्वा मुच्येत्प्राणान्तिकाद्‍भयात् ।
सर्वेभ्यः शान्तिकर्मभ्यो निमज्याप्सु जपः स्मृतः ॥ ६ ॥
सौवर्णे राजते वापि पात्रे ताम्रमयेऽपि वा ।
क्षीरवृक्षमये वापि निर्व्रणे मृण्मयेऽपि वा ॥ ७ ॥
सहस्रं पञ्चगव्येन हुत्वा सुज्वलितेऽनले ।
क्षीरवृक्षमयैः काष्ठैः शेषं सम्पादयेच्छनैः ॥ ८ ॥
प्रत्याहुतिं स्पृशञ्जप्त्वा सहस्रं पात्रसंस्थितम् ।
तेन तं प्रोक्षयेद्देशं कुशैर्मन्त्रमनुस्मरन् ॥ ९ ॥
बलिं किरंस्ततस्तस्मिन्ध्यायेत्तु परदेवताम् ।
अभिचारसमुत्पन्ना कृत्या पापं च नश्यति ॥ १० ॥
देवभूतपिशाचाद्यान् यद्येवं कुरुते वशे ।
गृहं ग्रामं पुरं राष्ट्रं सर्वं तेभ्यो विमुच्यते ॥ ११ ॥
निखने मुच्यते तेभ्यो लिखने मध्यतोऽपि च ।
मण्डले शूलमालिख्य पूर्वोक्ते च क्रमेऽपि वा ॥ १२ ॥
अभिमन्त्र्य सहस्रं तन्निखनेत्सर्वशान्तये ।
सौवर्णं राजतं वापि कुम्भं ताम्रमयं च वा ॥ १३ ॥
मृण्मयं वा नवं दिव्यं सूत्रवेष्टितमव्रणम् ।
स्थण्डिले सैकते स्थाप्य पूरयेन्मन्त्रविज्जलैः ॥ १४ ॥
दिग्भ्य आहृत्य तीर्थानि चतसृभ्यो द्विजोत्तमैः ।
एलाचन्दनकर्पूरजातीपाटलमल्लिकाः ॥ १५ ॥
बिल्वपत्रं तथा क्रान्तां देवीं व्रीहियवांस्तिलान् ।
सर्षपान्क्षीरवृक्षाणां प्रवालानि च निक्षिपेत् ॥ १६ ॥
सर्वाण्यभिविधायैव कुशकूर्चसमन्वितम् ।
स्नातः समाहितो विप्रः सहस्रं मन्त्रयेद् बुधः ॥ १७ ॥
दिक्षु सौरानधीयीरन्मन्त्रान्विप्रास्त्रयीविदः ।
प्रोक्षयेत्पाययेदेनं नीरं तेनाभिषिञ्चयेत् ॥ १८ ॥
भूतरोगाभिचारेभ्यः स निर्मुक्तः सुखी भवेत् ।
अभिषेकेण मुच्येत मृत्योरास्यगतो नरः ॥ १९ ॥
अवश्यं कारयेद्विद्वान्‍राजा दीर्घं जिजीविषुः ।
गावो देयाश्च ऋत्विग्भ्य अभिषेके शतं मुने ॥ २० ॥
दक्षिणा येन वा तुष्टिर्यथाशक्त्याथवा भवेत् ।
जपेदश्वत्थमालभ्य मन्दवारे शतं द्विजः ॥ २१ ॥
भूतरोगाभिचारेभ्यो मुच्यते महतो भयात् ।
गुडूच्याः पर्वविच्छिन्नाः पयोऽक्ता जुहुयाद् द्विजः ॥ २२ ॥
एवं मृत्युञ्जयो होमः सर्वव्याधिविनाशनः ।
आम्रस्य जुहुयात्पत्रैः पयोऽक्तैर्ज्वरशान्तये ॥ २३ ॥
वचाभिः पयसाक्ताभिः क्षयं हुत्वा विनाशयेत् ।
मधुत्रितयहोमेन राजयक्ष्मा विनश्यति ॥ २४ ॥
निवेद्य भास्करायान्नं पायसं होमपूर्वकम् ।
राजयक्ष्माभिभूतं च प्राशयेच्छान्तिमाप्नुयात् ॥ २५ ॥
लताः पर्वसु विच्छिद्य सोमस्य जुहुयाद् द्विजः ।
सोमे सूर्येण संयुक्ते पयोऽक्ताः क्षयशान्तये ॥ २६ ॥
कुसुमैः शङ्‌खवृक्षस्य हुत्वा कुष्ठं विनाशयेत् ।
अपस्मारविनाशः स्यादपामार्गस्य तण्डुलैः ॥ २७ ॥
क्षीरवृक्षसमिद्धोमादुन्मादोऽपि विनश्यति ।
औदुम्बरसमिद्धोमादतिमेहः क्षयं व्रजेत् ॥ २८ ॥
प्रमेहं शमयेद्धुत्वा मधुनेक्षुरसेन वा ।
मधुत्रितयहोमेन नयेच्छान्तिं मसूरिकाम् ॥ २९ ॥
कपिलासर्पिषा हुत्वा नयेच्छान्तिं मसूरिकाम् ।
उदुम्बरवटाश्वत्थैर्गोगजाश्वामयं हरेत् ॥ ३० ॥
पिपीलिमधुवल्मीके गृहे जाते शतं शतम् ।
शमीसमिद्‌‍भिरन्नेन सर्पिषा जुहुयाद् द्विजः ॥ ३१ ॥
तदुत्थं शान्तिमायाति शेषैस्तत्र बलिं हरेत् ।
अभ्रस्तनितभूकम्पालक्ष्यादौ वनवेतसः ॥ ३२ ॥
सप्ताहं जुहुयादेवं राष्ट्रे राज्यं सुखी भवेत् ।
यां दिशं शतजप्तेन लोष्ठेनाभिप्रताडयेत् ॥ ३३ ॥
ततोऽग्निमारुतारिभ्यो भयं तस्य विनश्यति ।
मनसैव जपेदेनां बद्धो मुच्येत बन्धनात् ॥ ३४ ॥
भूतरोगविषादिभ्यः स्पृशञ्जप्त्वा विमोचयेत् ।
भूतादिभ्यो विमुच्येत जलं पीत्वाभिमन्त्रितम् ॥ ३५ ॥
अभिमन्त्र्य शतं भस्म न्यसेद्‌भूतादिशान्तये ।
शिरसा धारयेद्‍भस्म मन्त्रयित्वा तदित्यृचा ॥ ३६ ॥
सर्वव्याधिविनिर्मुक्तः सुखी जीवेच्छतं समाः ।
अशक्तः कारयेच्छान्तिं विप्रं दत्त्वा तु दक्षिणाम् ॥ ३७ ॥
अथ पुष्टिं श्रियं लक्ष्मीं पुष्पैर्हुत्वाप्नुयाद् द्विजः ।
श्रीकामो जुहुयात्पद्मै रक्तैः श्रियमवाप्नुयात् ॥ ३८ ॥
हुत्वा श्रियमवाप्नोति जातीपुष्पैर्नवैः शुभैः ।
शालितण्डुलहोमेन श्रियमाप्नोति पुष्कलाम् ॥ ३९ ॥
समिद्‌‍भिर्बिल्ववृक्षस्य हुत्वा श्रियमवाप्नुयात् ।
बिल्वस्य शकलैर्हुत्वा पत्रैः पुष्पैः फलैरपि ॥ ४० ॥
श्रियमाप्नोति परमां मूलस्य शकलैरपि ।
समिद्‌‍भिर्बिल्ववृक्षस्य पायसेन च सर्पिषा ॥ ४१ ॥
शतं शतं च सप्ताहं हुत्वा श्रियमवाप्नुयात् ।
लाजैस्त्रिमधुरोपेतैर्होमे कन्यामवाप्नुयात् ॥ ४२ ॥
अनेन विधिना कन्या वरमाप्नोति वाञ्छितम् ।
रक्तोत्पलशतं हुत्वा सप्ताहं हेम चाप्नुयात् ॥ ४३ ॥
सूर्यबिम्बे जलं हुत्वा जलस्थं हेम चाप्नुयात् ।
अन्नं हुत्वाप्नुयादन्नं व्रीहीन्व्रीहिपतिर्भवेत् ॥ ४४ ॥
करीषचूर्णैर्वत्सस्य हुत्वा पशुमवाप्नुयात् ।
प्रियङ्‌गुपायसाज्यैश्च भवेद्धोमादिभिः प्रजा ॥ ४५ ॥
निवेद्य भास्करायान्नं पायसं होमपूर्वकम् ।
भोजयेत्तदृतुस्नातां पुत्रं परमवाप्नुयात् ॥ ४६ ॥
सप्ररोहाभिरार्द्राभिरायुर्हुत्वा समाप्नुयात् ।
समिद्‌‍भिः क्षीरवृक्षस्य हुत्वायुषमवाप्नुयात् ॥ ४७ ॥
सप्ररोहाभिरार्द्राभी रक्ताभिर्मधुरत्रयैः ।
व्रीहीणां च शतं हुत्वा हेम चायुरवाप्नुयात् ॥ ४८ ॥
सुवर्णकुड्मलं हुत्वा शतमायुरवाप्नुयात् ।
दूर्वाभिः पयसा वापि मधुना सर्पिषापि वा ॥ ४९ ॥
शतं शतं च सप्ताहमपमृत्युं व्यपोहति ।
शमीसमिद्‌‍भिरन्नेन पयसा वा च सर्पिषा ॥ ५० ॥
शतं शतं च सप्ताहमपमृत्युं व्यपोहति ।
न्यग्रोधसमिधो हुत्वा पायसं होमयेत्ततः ॥ ५१ ॥
शतं शतं च सप्ताहमपमृत्युं व्यपोहति ।
क्षीराहारो जपेन्मृत्योः सप्ताहाद्विजयी भवेत् ॥ ५२ ॥
अनश्नन्वाग्यतो जप्त्वा त्रिरात्रं मुच्यते यमात् ।
निमज्ज्याप्सु जपेदेवं सद्यो मृत्योर्विमुच्यते ॥ ५३ ॥
जपेद् बिल्वं समाश्रित्य मासं राज्यमवाप्नुयात् ।
बिल्वं हुत्वाप्नुयाद्‌राज्यं समूलफलपल्लवम् ॥ ५४ ॥
हुत्वा पद्मशतं मासं राज्यमाप्नोत्यकण्टकम् ।
यवागूं ग्राममाप्नोति हुत्वा शालिसमन्वितम् ॥ ५५ ॥
अश्वत्थसमिधो हुत्वा युद्धादौ जयमाप्नुयात् ।
अर्कस्य समिधो हुत्वा सर्वत्र विजयी भवेत् ॥ ५६ ॥
संयुक्तैः पयसा पत्रैः पुष्पैर्वा वेतसस्य च ।
पायसेन शतं हुत्वा सप्ताहं वृष्टिमाप्नुयात् ॥ ५७ ॥
नाभिदघ्ने जले जप्त्वा सप्ताहं वृष्टिमाप्नुयात् ।
जले भस्मशतं हुत्वा महावृष्टिं निवारयेत् ॥ ५८ ॥
पालाशाभिरवाप्नोति समिद्‌‍भिर्ब्रह्मवर्चसम् ।
पलाशकुसुमैर्हुत्वा सर्वमिष्टमवाप्नुयात् ॥ ५९ ॥
पयो हुत्वाऽऽप्नुयान्मेधामाज्यं बुद्धिमवाप्नुयात् ।
अभिमन्त्र्य पिबेद् ब्राह्मं रसं मेधामवाप्नुयात् ॥ ६० ॥
पुष्पहोमे भवेद्वासस्तन्तुभिस्तद्विधं पटम् ।
लवणं मधुसम्मिश्रं हुत्वेष्टं वशमानयेत् ॥ ६१ ॥
नयेदिष्टं वशं हुत्वा लक्ष्मीपुष्पैर्मधुप्लुतैः ।
नित्यमञ्जलिनाऽऽत्मानमभिषिञ्चेज्जले स्थितः ॥ ६२ ॥
मतिमारोग्यमायुष्यमग्र्यं स्वास्थ्यमवाप्नुयात् ।
कुर्याद्विप्रोऽन्यमुद्दिश्य सोऽपि पुष्टिमवाप्नुयात् ॥ ६३ ॥
अथ चारुविधिर्मासं सहस्रं प्रत्यहं जपेत् ।
आयुष्कामः शुचौ देशे प्राप्नुयादायुरूत्तमम् ॥ ६४ ॥
आयुरारोग्यकामस्तु जपेन्मासद्वयं द्विजः ।
भवेदायुष्यमारोग्यं श्रियै मासत्रयं जपेत् ॥ ६५ ॥
आयुः श्रीपुत्रदाराद्याश्चतुर्भिश्च यशो जपात् ।
पुत्रदारायुरारोग्यं श्रियं विद्यां च पञ्चभिः ॥ ६६ ॥
एवमेवोत्तरान्कामान् मासैरेवोत्तरैर्व्रजेत् ।
एकपादो जपेदूर्ध्वबाहुः स्थित्वा निराश्रयः ॥ ६७ ॥
मासं शतत्रयं विप्रः सर्वान्कामानवाप्नुयात् ।
एवं शतोत्तरं जप्त्वा सहस्रं सर्वमाप्नुयात् ॥ ६८ ॥
रुद्ध्वा प्राणमपानं च जपेन्मासं शतत्रयम् ।
यदिच्छेत्तदवाप्नोति सहस्रात्परमाप्नुयात् ॥ ६९ ॥
एकपादो जपेदूर्ध्वबाहू रुद्ध्वानिलं वशः ।
मासं शतमवाप्नोति यदिच्छेदिति कौशिकः ॥ ७० ॥
एवं शतत्रयं जप्त्वा सहस्रं सर्वमाप्नुयात् ।
निमज्ज्याप्सु जपेन्मासं शतमिष्टमवाप्नुयात् ॥ ७१ ॥
एवं शतत्रयं जप्त्वा सहस्रं सर्वमाप्नुयात् ।
एकपादो जपेदूर्ध्वबाहू रुद्ध्वा निराश्रयः ॥ ७२ ॥
नक्तमश्नन् हविष्यान्नं वत्सरादृषितामियात् ।
गीरमोघा भवेदेवं जप्त्वा संवत्सरद्वयम् ॥ ७३ ॥
त्रिवत्सरं जपेदेवं भवेत्त्रैकालदर्शनम् ।
आयाति भगवान्देवश्चतुःसंवत्सरं जपेत् ॥ ७४ ॥
पञ्चभिर्वत्सरैरेवमणिमादिगुणो भवेत् ।
एवं षड्वत्सरं जप्त्वा कामरूपित्वमाप्नुयात् ॥ ७५ ॥
सप्तिभिर्वत्सरैरेवममरत्वमवाप्नुयात् ।
मनुत्वं नवभिः सिद्धमिन्द्रत्वं दशभिर्भवेत् ॥ ७६ ॥
एकादशभिराप्नोति प्राजापत्यं सुवत्सरैः ।
बह्मत्वं प्राप्नुयादेवं जप्त्वा द्वादशवत्सरान् ॥ ७७ ॥
एतेनैव जिता लोकास्तपसा नारदादिभिः ।
शाकमन्ये परे मूलं फलमन्ये पयः परे ॥ ७८ ॥
घृतमन्ये परे सोममपरे चरुवृत्तयः ।
ऋषयः पक्षमश्नन्ति केचिद्‍भैक्ष्याशिनोऽहनि ॥ ७९ ॥
हविष्यमपरेऽश्नन्तः कुर्वन्त्येव परं तपः ।
अथ शुद्ध्यै रहस्यानां त्रिसहस्रं जपेद् द्विजः ॥ ८० ॥
मासं शुद्धो भवेत्स्तेयात्सुवर्णस्य द्विजोत्तमः ।
जपेन्मासं त्रिसाहस्रं सुरापः शुद्धिमाप्नुयात् ॥ ८१ ॥
मासं जपेत् त्रिसाहस्रं शुचिः स्याद् गुरुतल्पगः ।
त्रिसहस्रं जपेन्मासं कुटीं कृत्वा वने वसन् ॥ ८२ ॥
ब्रह्महा मुच्यते पापादिति कौशिकभाषितम् ।
द्वादशाहं निमज्ज्याप्सु सहस्रं प्रत्यहं जपेत् ॥ ८३ ॥
मुच्येरन्नंहसः सर्वे महापातकिनो द्विजाः ।
त्रिसाहस्रं जपेन्मासं प्राणानायम्य वाग्यतः ॥ ८४ ॥
महापातकयुक्तो वा मुच्यते महतो भयात् ।
प्राणायामसहस्रेण ब्रह्महापि विशुध्यति ॥ ८५ ॥
षट्कृत्वस्त्वभ्यसेदूर्ध्वं प्राणापानौ समाहितः ।
प्राणायामो भवेदेष सर्वपापप्रणाशनः ॥ ८६ ॥
सहस्रमभ्यसेन्मासं क्षितिपः शुचितामियात् ।
द्वादशाहं त्रिसाहस्रं जपेद्धि गोवधे द्विजः ॥ ८७ ॥
अगम्यागमनस्तेयहननाभक्ष्यभक्षणे ।
दशसाहस्रमभ्यस्ता गायत्री शोधयेद् द्विजम् ॥ ८८ ॥
प्राणायामशतं कृत्वा मुच्यते सर्वकिल्विषात् ।
सर्वेषामेव पापानां सङ्‌करे सति शुद्धये ॥ ८९ ॥
सहस्रमभ्यसेन्मासं नित्यजापी वने वसन् ।
उपवाससमं जप्यं त्रिसहस्रं तदित्यृचम् ॥ ९० ॥
चतुर्विंशतिसाहस्रमभ्यस्तात्कृच्छ्रसंज्ञिता ।
चतुःषष्टिसहस्राणि चान्द्रायणसमानि तु ॥ ९१ ॥
शतकृत्वोऽभ्यसेन्नित्यं प्राणानायम्य सन्ध्ययोः ।
तदित्यृचमवाप्नोति सर्वपापक्षयं परम् ॥ ९२ ॥
निमज्ज्याप्सु जपेन्नित्यं शतकृत्वस्तदित्यृचम् ।
ध्यायन्देवीं सूर्यरूपां सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ९३ ॥
इति ते सम्यगाख्याताः शान्तिशुद्ध्यादिकल्पनाः ।
रहस्यातिरहस्याश्च गोपनीयास्त्वया सदा ॥ ९४ ॥
इति संक्षेपतः प्रोक्तः सदाचारस्य संग्रहः ।
विधिनाऽऽचरणादस्य माया दुर्गा प्रसीदति ॥ ९५ ॥
नैमित्तिकं च नित्यं च काम्यं कर्म यथाविधि ।
आचरेन्मनुजः सोऽयं भुक्तिमुक्तिफलाप्तिभाक् ॥ ९६ ॥
आचारः प्रथमो धर्मो धर्मस्य प्रभुरीश्वरी ।
इत्युक्तं सर्वशास्त्रेषु सदाचारफलं महत् ॥ ९७ ॥
आचारवान्सदा पूतः सदैवाचारवान्मसुखी ।
आचारवान्सदा धन्यः सत्यं सत्यं च नारद ॥ ९८ ॥
देवीप्रसादजनकं सदाचारविधानकम् ।
यदपि शृणुयान्मर्त्यो महासम्पत्तिसौख्यभाक् ॥ ९९ ॥
सदाचारेण सिद्धेच्च ऐहिकामुष्मिकं सुखम् ।
तदेव ते मया प्रोक्तं किमन्यच्छ्रोतुमिच्छसि ॥ १०० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां एकादशस्कन्धे
सदाचारनिरूपणं नाम चतुर्विंशोध्यायः ॥ २४ ॥



पापक्षालनाचे मार्ग

नारद म्हणाले, ''हे नारयण मुने, गायत्रीची शांती व त्यांचे प्रयोग मला संक्षेपाने सांगा.''

श्रीनारायण म्हणाले, ''तू गुह्य तेच विचारलेस. हे ब्रह्मज्ञान कोणाला सांगू नये.'' आता शांती सांगतो. दुधात समिधा भिजवून हवन करावे. त्यामुळे रोग, भूते शांत होतात. चिकाल वृक्षाच्या ओल्या समिधांनी हवन केल्यास भूतरोग शांत होतात. पाणी हातात घेऊन सूर्यास तृप्त करावे म्हणजे शांती लाभते. गुडघाभर पाण्यात जप केल्यास दोषांची शांती होते. गळ्याइतक्या पाण्यात जप केल्यास प्राणांतिक भय नष्ट होते. उदकात बुडून जप केल्यास सर्वशांती होते.

सुवर्ण, रुपे, तांबे, लाकूड, व्रणरहित मातीचे भांडे यात पंचगव्य ठेवावे व ज्वलंत अग्नीत हजार वेळा हवन करावे. उरलेल्या आहूती चिकाल वृक्षांच्या काष्ठांनी पूर्ण कराव्या. पंचगव्य प्रत्येक आहुतीस लावावे. नंतर पात्रातील पंचगव्य हजार गायत्री जप करून अभिमंत्रित करावे व सर्वत्र प्रोक्षण करावे. तेथे बली देऊन परादेवीचे ध्यान करावे. अभिचार कर्मे व पाप नष्ट होतात.

देव, भूत, पिशाच्च यांना वश करून घेता येते. गृह, ग्राम पूर, राष्ट्र यांची मुक्तता करता येते. भूतादि उपद्रवांपासून मुक्त होण्यासाठी चौकोनी मंडलात खणून लिहावे. त्यात अष्टगंध शूल लिहून हजार अभिमंत्रण करावे. सुवर्ण, माती, तांबे, इत्यादीचा उत्तम घट घ्यावा. तो सूत्राने वेष्ठून वेळूच्या स्थंडिलावर स्थापन करावा. मंत्राने तो उदकाने भरावा.

चारी दिशातील तीर्थे आणून वेलदोडा, चंदन, कापूर, जाती, भगवी मालती, बिल्वपत्र, विष्णुकांता, सहदेवी, तांदूळ, जव, तिल, मोहर्‍या, औदुंबर, चिकाल वृक्षांचा कोवळा पाला त्यात घालावा. नंतर सर्वांचे विधान करून कुशकूर्चासह स्नान करावे. सहस्र जप करावा. चोहोबाजूस वेदज्ञ ब्राह्मणांनी बसून सौरसूक्त म्हणावे. अभिमंत्रित जलाने प्रोक्षण करावे. अभिषेक करावा. म्हणजे भूत, रोग, अभिचार यातून मुक्तता होते.

दीर्घायुष्यासाठी अभिषेक करावा. त्यावेळी ऋत्विजास राजाने शंभर गायी द्याव्यात. द्विजाला संतोष होईल अशी यथाशक्ती दक्षिणा द्यावी. अश्वत्थाच्या आश्रयाने शंभर जप करावा. त्यामुळे भूत रोग, अभिचार यापासून मुक्ती मिळते.

गुळवेलीच्या प्रत्येक पेर्‍यावर तुकडा करून दुधात भिजवून त्याचे हवन करावे. वाया नामक पदार्थाचे हवन केल्यास क्षयाचा नाश होतो. दूध, दही, घृत यांनी हवन केल्यास राजयक्ष्मा नष्ट होतो. होम करून भास्करास निवेदन करून पायसातन्न, राजयक्ष्म्याने ग्रस्त झालेल्या पुरुषास द्यावे. म्हणजे रोगशांती होते.

पूर्वोक्त वेलीची तुकडे दुधात भिजवून अमावस्येला क्षयशांतीसाठी स्तोत्राचे हवन करावे. शंखवृक्षाच्या पुष्पांनी हवन केल्यास कोड नष्ट होते. अघाडाच्या बीजांनी हवन केल्यास अपस्मार, चिकाल समिधांनी उन्माद हे नष्ट होतात. औदुंबराच्या समिधांनी हवन केल्यास अतिमेदाचा क्षय होतो.

मध, उसाचा रस यांनी हवन केल्यास प्रमेहाची शांती होते. दूध, दही, घृत यांनी पादरोग, गाईच्या घृताने मसूरिका पादरोग यांची शांती होते. औदुंबर, वट, अश्वस्थ यांच्या समिधांनी हवन केल्यास गाई, अश्व, हत्ती यांचे रोग हटतात. अन्न, घृत, शमीच्या शंभर समिधांनी हवन केल्यास मुंग्यांचे वारुळ, मोहोळ यांचा उपद्रव नष्ट होतो.

हवनानंतर उरलेल्या द्रव्यांचा बली द्यावा. मेघगर्जना, भूकंप, वीज पडणे यासाठी वनदेवतांच्या आहुतींनी सात दिवस हवन करावे. त्यामुळे राष्ट्र सुखी होते. मंतरलेल्या पाषाणांनी ज्या दिशेस ताडण करतो त्या दिशेस अग्नी, वायु, शत्रू यापासून भय नसते. मनाने जप केला तरी बद्ध पुरुष बंधमुक्त होतो. अभिमंत्रित जल प्राशन केल्यास भूतांपासून मुक्त होतो.

शंभर वेळ अभिमंत्रित करून भूतशांतीसाठी भस्म फेकावे. तत् ऋचेने भस्म मंजून मस्तकावर धारण करावे. म्हणजे व्याधीपासून मुक्तता होते. शांती करण्यास असमर्थ असलेल्याने ब्राह्मणास दक्षिणा द्यावी.

पुष्पाचे हवन केल्यास पुष्टी, तेज, लक्ष्मी प्राप्त होते. लाल कमलांनी हवन केल्यास संपत्ती लाभते. जाईच्या फुलांमुळेही संपत्ती मिळते. साळीच्या तांदळाचा होम केल्यास विपुल संपत्ती लाभते. बित्व वृक्षाच्या समिधा, बेलाचे तुकडे, पत्र, पुष्पे, समिधा, फुले, मुळे यांनी हवन केल्यास उत्तम संपत्ती प्राप्त होते. सात दिवस शंभर आहुत्या देऊन संपत्ती लाभते. सूर्यबिंबात जलाचे हवन केल्यास अन्न प्राप्ती होते. तीहीचे हवन केल्यास व्रीहीपती होतो. वासरांच्या शेणाचे चूर्ण हवन केल्यास पशु प्राप्ती होते.

पियंगु, पयस, आज्य यांनी होम केल्यास प्रजाप्राप्ती होते. होमानंतर सूर्यास पायस अन्न निवेदन करावे व भार्येस खायला द्यावे म्हणजे उत्तम पुत्र होतो. चिकाल समिधांनी हवन केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते. आर्द्र, लाल समिधांनी त्रिविध मध, तांदूळ यांच्या शंभर आहुती दिल्यास सुवर्ण व आयुष्य प्राप्त होते.

सुवर्ण कमलाच्या हवनामुळे शंभर वर्षे आयुष्य, दुर्वा, पय, मध अथवा घृत यांच्या शंभर आहुती सात दिवस दररोज दिल्यास अपमृत्युचा नाश होतो. वडाच्या समिधांनी दररोज शंभर आहुती सात दिवस दिल्यास अपमृत्यूचा नाश, दूध पिऊन जप केल्यास सात दिवसात मृत्यूचा पराभव, निराहार राहून, मौन धारण करून तीन रात्री जप केल्यास यमापासून मुक्ती मिळते. बेलाच्या आश्रयाने महिनाभर जप केल्यास अथवा बेलाचे हवन केल्यास राज्यप्राप्ती होते. शंभर कमलाचा महिनाभर होम केल्यास राज्यप्राप्ती होते. शालियुक्त चरूचे हवन केल्यास ग्रामप्राप्ती होते. अश्ववृत्याच्या समिधांनी हवन केल्यास जय प्राप्त होतो. रुईच्या समिधांनी हवन केल्यास जय प्राप्ती होते.

दुधाने भिजलेल्या वेताच्या पानानी किंवा फुलांनी हवन केल्यास व पायसाने सात दिवस शंभर आहुती दिल्यास वृष्टी होते. नाभीइतक्या पाण्यात सात दिवस जप केल्यास वृष्टी होते. जलात शंभर वेळा भस्माचे हवन केल्यास महावृष्टीपासून निवारण होते. पळसाच्या समिधांनी ब्रह्मतेज प्राप्त होते. पळसाच्या फुलांनी हवन केल्यास इष्ट पदार्थांची प्राप्ती होते. दुधाचे हवन केल्यास धारणा शक्ती व घृताचे हवन केल्यास बुद्धी प्राप्त होते.

ब्रह्मरस मंत्रवून प्राशन केल्यास मेधा प्राप्ती, पुष्प होम केल्यास वस्त्रप्राप्ती, तंतूनी होम केल्यास वस्त्र, मिष्टान्नयुक्त मिठायांचा होम केल्यास इष्ट वस्तु आधीन होतात. मधातील बेलाच्या वृक्षांनी हवन केल्यास इष्ट वस्तु वश होते. जलात बसून अंजलीने अभिषेक करावा म्हणजे मती, आरोग्य, आयुष्य, स्वास्थ्य प्राप्ती होते.

आता उत्तम विधी ऐक. आयुष्याची इच्छा असल्यास शुद्ध स्थली एक महिना जप करावा. आयुष्य व आरोग्य यांची इच्छा असल्यास दोन महिने जप करावा. चार महिने असे केल्यास आयुष्य, श्री, पुत्र, स्त्री यात यश प्राप्त होते. त्यापेक्षा अधिक जप केल्यास इष्ट सिद्धी प्राप्त होतात. एक महिना रोज तीनशे जप केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. अधिक जप केल्यास अधिक फल प्राप्त होते. तीनशे, हजार जप केल्यास सर्व प्राप्ती होते.

एका पायावर उभे राहून, हात वर करून, वायूचा विरोध करून, निराश्रय होऊन जप करावा. रात्री हविषान्न भक्षण करावे म्हणजे एक वर्षाने ऋषी होतो. असे दोन वर्षे केल्यास अमोघवाणी तयार होते. तीन वर्षे केल्यास त्रिकालज्ञता प्राप्त होते. चार वर्षे केल्यास देव तेथे येतो. पाच वर्षे केल्यास गुणयुक्त होतो. सहा वर्षे जप केल्यास इष्ट रूप घेता येते. सात वर्षे करणारा अमर होतो. नऊ वर्षांनी मुनित्व प्राप्ति, दहा वर्षांनी इंद्र, अकरा वर्षांनी प्रजापती प्राप्ती होते. विविध प्रकारे व्रत करून हे इष्टप्राप्ती करून घेतात. बारा वर्षांनी ब्रह्मत्व प्राप्त होते.

पातकांच्या शुद्धीसाठी तीन हजार जप करावा. एक महिना तीन हजार जप केल्याने गुरुपत्‍नीशी समागमाचा दोष नष्ट होतो. कुटी करून वनात राहून महिनाभर तीन हजार जप करावा म्हणजे ब्रह्महत्येपासून मुक्त होतो. बारा दिवस उदकात बुडून रोज हजार जप करावा म्हणजे सर्व महापातके नष्ट होतात.

प्राणायाम करून वाणीचे नियमन करावे. एक महिना तीन हजार जप करावा. महापातकी पुरुषाचे पापभय नाहीसे होते. हजार प्राणायामाने ब्रह्मघ्नही शुद्ध होतो. सहा वेळ प्राण अपान ऊर्ध्व करून शांतपणे त्याचा अभ्यास केल्याने म्हणजे प्राणायामाने सर्व पापे नाहीशी होतात.

महिनाभर हजार प्राणायामांचा अभ्यास केल्यास राजा शुद्ध होतो. ब्राह्मणाने बारा दिवस तीन हजार जप केला तर अगम्य स्त्रीशी गमन, चोरी, हिंसा, अभक्ष्य भक्षण हे दोषसुद्धा नष्ट होतात. हजार गायत्री जपाने सर्व पापे नष्ट होतात.

शंभर प्राणायामाने सर्व प्राणी पापमुक्त होतात पातकांनी संकट आल्यास शुद्धीसाठी हजार जप रोज करावा. महिनाभर वनात रहावे. तत् तऋचेचा तीन हजार जप केल्यास उपवासाचे पुण्य लाभते. या ऋचेचा चोवीस हजार जप केल्यास कृच्छ्रसंज्ञा प्राप्त होते. चौसष्ट हजार जप चांद्रायण व्रताप्रमाणे होय.

तद् ऋचेची शंभर आवृत्ती केल्याने सर्व पापापासून मुक्तता होते.

हे नारदा, याप्रमाणे मी तुला शांती, शुद्धी इत्यादिकांच्या कल्पना विस्ताराने सांगितल्या. हे अत्यंत गुप्त रहस्य आहे, तूही त्या गुप्तच ठेव. मी तुला सदाचाराविषयी सांगितले. याचे यथाविधी आचरण केल्यास मायारूपिणी दुर्गा प्रसन्न होते.

जो पुरुष नित्य, नैमित्रिक, काम्य कर्मांचे यथाविधी आचरण करतो त्याला भुक्ती मुक्ती प्राप्त होतात. आचार हा श्रेष्ठ धर्म असून त्या धर्माची देवता ईश्वरी आहे. सदाचाराचे श्रेष्ठ फल सांगितले आहे. आचाराने पुरुष धन्य होतो.

हे नारदा, सदाचाराच्या अनुष्ठानाने देवीचा प्रसाद प्राप्त होतो. मर्त्याने त्याचे श्रवण केले तरी महासंपत्ती व सौख्य प्राप्त होते. सदाचारामुळे ऐहिक अमोलिक सुखाची सिद्धी प्राप्त होते.



अध्याय चोविसावा समाप्त
॥ एकादशः स्कन्धः समाप्तः ॥

GO TOP