[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीनारायण म्हणाले, उत्तम साधकाने, 'अमृतपिधनमसि' असे म्हणून आचमन करावे. नंतर पात्रातील अन्न प्राण्यासाठी टाकावे. भूतली दिलेल्या अन्नाने आमच्या कुलातील दास दासी यांची तृप्ती होवो.
पापाचे घर जो रौरव पद्मार्बुद यात रहाणार्यांना हे उदक नित्य मिळते. असे म्हणून पवित्रक काढून भूमीवर टाकावे. ते पात्रात टाकू नये. अच्छिद्र असताना जो शूद्राने अथवा ध्यानाने स्पर्शित झाल्यावरही एक रात्र उपोषण करतो तो शुद्ध होतो. इतरवेळी स्नान करावे.
एका प्राणाहुतीने कोटी यज्ञाचे पुण्य मिळते. पाच आहुतीमुळे पाच कोटी यज्ञाचे फल मिळते. प्राणाग्नीहोत्र जाणणारास अन्न दान करतो त्या दात्याला व भोक्त्याला दोघांनाही स्वर्ग प्राप्त होतो. पवित्रक घालून भोजन करणारास पंचगव्याचे फल मिळते. तिन्ही पूजाकाली जप, तर्पण, होम व ब्राह्मणभोजन यालाच पुनश्चरण म्हणतात. त्याने भूमीवर शयन करावे. जितेंद्रिय व्हावे. विनयी व शांत असावे. त्रिकाल स्नान करून शुभ भाषण करावे. स्त्री, पतित, चांडाल यांच्याशी बोलू नये. मैथुनाच्या कथा व इतर गोष्टी वर्ज्य कराव्यात त्यालाच ब्रह्मचर्य म्हणतात. ऋतुस्नात स्त्रीशी विधीपूर्वक संगम करणे हेच गृहस्थाचे ब्रह्मचर्य. संस्कार न झालेल्या ऋतुस्नात स्त्रीशी गमन करावे. तीन ऋणातून मुक्त न होणारा, यज्ञ न करणारा, पुत्र उत्पन्न न करणारा अधोगतीस जातो. ब्रह्मचर्यामुळे ऋषींच्या, तिलोदकाने पितरांच्या, यज्ञाने देवांच्या ऋणातून मुक्त होता येते. म्हणून आश्रमयोग्य आचरण करावे. दूध, फले, भाजी, हविष्यान्न भक्षण करून, कृच्छ्र, चांद्रायण व्रत वगैरे आचरून ब्राह्मणाने जप करावा. आम्ल पदार्थ, तांबूल, दोन वेळ भोजन, दुष्टांचा सहवास इत्यादी श्रुतिस्मृतिविरोधी आचरण करू नये. द्यूत, स्त्रीसंभोग, निद्रा, वाद यात व्यर्थ काल घालवू नये. देवपूजा स्तोत्रे यात काल व्यतीत करावा.
भूमीवर शयन, ब्रह्मचर्य, पूजा, दान, स्तुती, कीर्तन हे सर्व जपसिद्धी करून देणारे आहे. सूर्योपस्थान करून जप करावा. देवतेची, अग्नीची मंत्रपूजा करावी. धर्मकृत्ये तत्पर असावे. सर्व कर्मे देवास अर्पण करावीत. तप व अध्ययन यातच सर्व वेळ घालवावा. भूतांवर दया करावी. तपामुळे स्वर्ग व तेज प्राप्त होते.
ज्या ऋषींनी ज्या कारणाकरता देवतेची स्तुती केली असेल, त्यांची ती इच्छा पूर्ण होते. आता ती विविध कर्मे सांगतो.
सर्व कर्मात पुरश्चरण सिद्धी देते. स्वाध्याय करणार्याने प्राजापत्यव्रत करावे. केश, मिशा, लोप, नखे काढून उदकात बुडी मारून दिवसा रहावे. दीर्घकाल मौन करावे. सत्यभाषण करून व्याहृती जप करावा. तद् ऋचारूप गायत्री अपोहिष्ठा हे पवित्र व पापनाशक सूक्त पुनत्यः स्वस्तिमत्त्वः, पावमान्यः इत्यादी ऋचा म्हणून कर्मारंभ करावा. सहस्र, शत, दहा, जप करून ॐकार व व्याहृती यांनी सावित्रीचा दहा हजार जप करावा. आचार्य, ऋषी, छंद देवता यांना तृप्त करावे.
पतिता, पतित, अंत्यज, देव ब्राह्मण यांसी द्वेष माता, पिता, आचार्य, गुरु यांची निंदा करू नये. हेच प्राजापत्यकृच्छ्र होय. आता चांद्रायण, पराककृच्छ्र सांगतो.
तीन चांद्रायणांच्या योगाने प्राणी पवित्र होतो व ब्रह्मलोकी जातो. आठ चांद्रायणांमुळे त्याला वर देणार्या देवता दिसतात. दहा चांद्रायणांमुळे सर्व छंदांचे ज्ञान होऊन कामना पूर्ण होतात. तीन दिवस सकाळी, तीन दिवस सायंकाळी, तीन दिवस अयाचित व तीन दिवस निराहार राहून प्राजापत्य करावे. गोमूत्र, गोमय, क्षीर, दही, तूप, कुशोदक यांचे मिश्रण करून पहिल्या दिवशी पंचगव्य प्राशन करावे. दुसर्या दिवशी उपवास करावा. याला सांतपन कृच्छ्र म्हणतात.
पूर्वीप्रमाणेच तीन दिवस एकेक घास खावा. तीन दिवस उपवास करावा. हे अतिकृच्छ्र व्रत होय. हेच तिप्पट प्रमाणात केल्यास महासंतापन होय. असे तप्त कृच्छ्र ब्राह्मणाने करावे. उष्ण जल, दूध, घृत, वायु हे तीन दिवसांनी बदलून घ्यावे. शांत चित्ताने स्नान करावे. नियमित उदक प्राशावे. यालाच प्राजापत्यविधी म्हणतात.
ज्याने आपला आत्मा नियमित केला आहे, जो सावध आहे, अशा पुरुषाने बारा दिवस भोजन करू नये. यास पराकसंज्ञक कृच्छ्र म्हणतात. हे सर्व पाप नष्ट करते.
कृष्ण पक्षात रोज एकेक घास घ्यावा. शुक्त पक्षात वाढवावा. अमावास्येस भोजन करू नये. हा चांद्रायणविधी होय. दोन्ही पक्षात त्रिकाल स्नान केल्यानेही चांद्रायण होते.
सर्व अन्हिके उरकून सकाळी चार घास खावे. सूर्यास्त झाल्यावर चार घास खावे. हे शिशुचांद्रायण होय. मध्यान्हकाळी हविष्यान्नाचे आठ ग्रास नियमित भक्षण करावे म्हणजे यात चांद्रायण होते. रुद्र, वसू आदित्य यांचे आचरण करतात. त्यामुळे सर्व देव व भूमीसह वायु कुशलसंपन्न झाले आहेत.
हे सर्व विधीयुक्त आचरण करावे. या व्रतामुळे मन शुद्ध होते. त्यामुळे कर्मे शुद्ध होतात. नंतर त्याला सर्व इष्ट पदार्थ साध्य होतात.
सर्व कर्म रहित होऊन तीन रात्री उपवास करावा किंवा तीन व्रते करावी व कर्मास आरंभ करावा. आता पुरश्चरण फल सांगतो.
गायत्रीचे पुरश्चरण सर्व हेतु पूर्ण करते. हे नारदा, महापातकांचा नाश करते. ते विधान मी तुला सांगितले. प्रथम मंत्रवान पुरुषाने देहशुद्धी होणारे व्रत करावे. नंतर पुरश्चरण करावे म्हणजे तो साधक समस्त फलास पात्र होतो. हे नारदमुने, ह्याप्रमाणे मी तुला गुह्य असे पुरश्चरण विधान सांगितले. हे इतरांना सांगू नये. कारण श्रुतींचे सार आहे असे शास्त्रात सांगितले आहे.