श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
एकादशः स्कन्धः
द्वाविंशोऽध्यायः

वैश्वदेवादिविधिनिरूपणम्

श्रीनारायण उवाच
अथातः श्रूयतां ब्रह्मन् वैश्वदेवविधानकम् ।
पुरश्चर्याप्रसङ्‌गेन ममापि स्मृतिमागतम् ॥ १ ॥
देवयज्ञो ब्रह्मयज्ञो भूतयज्ञस्तथैव च ।
पितृयज्ञो मनुष्यस्य यज्ञश्चैव तु पञ्चमः ॥ २ ॥
पञ्चसूना गृहस्थस्य चुल्ली पेषण्युपस्करः ।
कण्डणी चोदकुम्भश्च तेषां पापस्य शान्तये ॥ ३ ॥
न चुल्ल्यां नायसे पात्रे न भूमौ न च खर्परे ।
वैश्वदेवं प्रकुर्वीत कुण्डे वा स्थण्डिलेऽपि वा ॥ ४ ॥
न पाणिना न शूर्पेण न च मेध्याजिनादिभिः ।
मुखेनोपधमेदग्निं मुखादेव व्यजायत ॥ ५ ॥
पटकेन भवेद्व्याधिः शूर्पेण धननाशनम् ।
पाणिना मृत्युमाप्नोति कर्मसिद्धिर्मुखेन तु ॥ ६ ॥
फलैर्दधिघृतैः कुर्यान्मूलशाकोदकादिभिः ।
अलाभे येन केनापि काष्ठमूलतृणादिभिः ॥ ७ ॥
जुहुयात्सर्पिषाभ्यक्तं तैलक्षारविवर्जितम् ।
दध्यक्तं वा पायसाक्तं तदभावेऽम्भसापि वा ॥ ८ ॥
शुष्कैः पर्युषितैः कुष्ठी उच्छिष्टेन द्विषां वशी ।
रुक्षैर्द्ररिद्रतां याति क्षारं हुत्वा व्रजत्यधः ॥ ९ ॥
अङ्‌गारान्भस्ममिश्रांस्तु निर्हृत्योत्तरतोऽनलात् ।
जुहुयाद्वैश्वदेवं तु न क्षारादिविमिश्रितम् ॥ १० ॥
अकृत्वा वैश्वदेवं तु यो भुङ्‌क्ते मूढधीर्द्विजः ।
स मूढो नरकं याति कालसूत्रमवाक्शिराः ॥ ११ ॥
शाकं वा यदि वा पत्रं मूलं वा यदि वा फलम् ।
सङ्‌कल्पयेद्यदाहारं तेनाग्नौ जुहुयादपि ॥ १२ ॥
अकृते वैश्वदेवे तु भिक्षौ भिक्षार्थमागते ।
उद्धृत्य वैश्वदेवार्थं भिक्षां दत्त्वा विसर्जयेत् ॥ १३ ॥
वैश्वदेवकृतं दोषं शक्तो भिक्षुर्व्यपोहितुम् ।
न तु भिक्षुकृतं दोषं वैश्वदेवो व्यपोहति ॥ १४ ॥
यतिश्च ब्रह्मचारी च पक्वान्नस्वामिनावुभौ ।
तयोरन्नमदत्त्वा तु भुक्त्वा चान्द्रायणं चरेत् ॥ १५ ॥
वैश्वदेवानन्तरं च गोग्रासं प्रतिपादयेत् ।
तद्विधानं प्रवक्ष्यामि शृणु देवर्षिपूजित ॥ १६ ॥
सुरभिर्वैष्णवी माता नित्यं विष्णुपदे स्थिता ।
गोग्रासं च मया दत्तं सुरभे प्रतिगृह्यताम् ॥ १७ ॥
गोभ्यश्च नम इत्येव पूजां कृत्वा गवेऽर्पयेत् ।
गोग्रासेन तु गोमाता सुरभिः सम्प्रसीदति ॥ १८ ॥
ततो गोदोहनं कालं तिष्ठेच्चैव गृहाङ्‌गणे ।
अतिथिर्यस्य भग्नाशो गृहात्प्रतिनिवर्तते ॥ १९ ॥
स तस्मै दुष्कृतं दत्त्वा पुण्यमादाय गच्छति ।
माता पिता गुरुर्भ्राता प्रजा दासः समाश्रितः ॥ २० ॥
अभ्यागतोऽतिथिश्चाग्निरेते पोष्या उदाहृताः ।
एवं ज्ञात्वा तु यो मोहान्न करोति गृहाश्रमम् ॥ २१ ॥
तस्य नायं तु न परो लोको भवति धर्मतः ।
यत्फलं सोमयागेन प्राप्नोति धनवान्द्विजः ॥ २२ ॥
सम्यक् पञ्चमहायज्ञैर्दरिद्रस्तेन चाप्नुयात् ।
अथ प्राणाग्निहोत्रं तु वक्ष्यामि मुनिपुङ्‌गव ॥ २३ ॥
यज्ज्ञात्वा मुच्यते जन्तुर्जन्ममृत्युजरादिभिः ।
परिज्ञानेन मुच्यन्ते नराः पातककिल्बिषैः ॥ २४ ॥
विधिना भुज्यते येन मुच्येत स ऋणत्रयात् ।
कुलान्युद्धरते विप्रो नरकानेकविंशतिम् ॥ २५ ॥
सर्वयज्ञफलप्राप्तिः सर्वलोकेषु गच्छति ।
हृत्पुण्डरीकमरणिर्मनो मन्धानसंज्ञकम् ॥ २६ ॥
वायुरज्ज्वा मथेदग्निं चक्षुरध्वर्युरेव च ।
तर्जनीमध्यमाङ्‌गुष्ठैः प्राणस्यैवाहुतिं क्षिपेत् ॥ २७ ॥
मध्यमानामिकाङ्‌गुष्ठैरपानस्याहुतिं क्षिपेत् ।
कनिष्ठानामिकाङ्‌गुष्ठैर्व्यानस्य तदनन्तरम् ॥ २८ ॥
कनिष्ठातर्जन्यङ्‌गुष्ठैरुदानस्याहुतिं क्षिपेत् ।
सर्वाङ्‌गुलैर्गृहीत्वान्नं समानस्याहुतिं क्षिपेत् ॥ २९ ॥
स्वाहान्तान्प्रणवाद्यांश्च नाममन्त्रांश्च वै पठेत् ।
मुखे चाहवनीयस्तु हृदये गार्हपत्यकः ॥ ३० ॥
नाभौ च दक्षिणाग्निः स्यादधः सभ्यावसथ्यकौ ।
वाग्घोता प्राण उद्‌गाता चक्षुरध्वर्युरेव च ॥ ३१ ॥
मनो ब्रह्मा भवेच्छ्रोत्रमाग्नीध्रस्थान एव च ।
अहङ्‌कारः पशुश्चात्र प्रणवः पय ईरितम् ॥ ३२ ॥
बुद्धिश्च पत्‍नी सम्प्रोक्ता यदधीनो गृहाश्रमी ।
उरो वेदिस्तु रोमाणि दर्भाः स्युः स्रुक्स्रुवौ करौ ॥ ३३ ॥
प्राणमन्त्रस्य च ऋषी रुक्मवर्णः क्षुधाग्निकः ।
देवतादित्य एवात्र गायत्रीच्छन्द उच्यते ॥ ३४ ॥
प्राणाय च तथा स्वाहा मन्त्रान्ते कीर्तयेदपि ।
इदमादित्यदेवाय न ममेति वदेदपि ॥ ३५ ॥
अपानमन्त्रस्य तथा गोक्षीरधवलाकृतिः ।
श्रद्धाग्निऋषिरेवात्र सोमो वै देवता स्मृता ॥ ३६ ॥
उष्णिक्छन्दस्तथापानाय स्वाहेत्यपि कीर्तयेत् ।
सोमायेदं च न ममेत्यत्रोहः परिकीर्तितः ॥ ३७ ॥
व्यानमन्त्रस्य चाख्यातोऽम्बुजवर्णहुताशनः ।
ऋषिरुक्तो देवताग्निरनुष्टुप् छन्द ईरितम् ॥ ३८ ॥
व्यानाय च तथा स्वाहाग्नयेदं न ममेत्यपि ।
उदानमन्त्रस्य तथा शक्रगोपसवर्णकः ॥ ३९ ॥
ऋषिरग्निः समाख्यातो वायुर्वै देवता स्मृता ।
बृहतीच्छन्द आख्यातमुदानाय च पूर्ववत् ॥ ४० ॥
वायवे चेदं न मम एवं चैवोच्चरेद् द्विजः ।
समानवायुमन्त्रस्य विद्युद्वर्णो विरूपकः ॥ ४१ ॥
ऋषिरग्निः समाख्यातः पर्जन्यो देवता मता ।
पङ्‌क्तिश्छन्दः समाख्यातं समानाय च पूर्ववत् ॥ ४२ ॥
पर्जन्यायेदमित्युक्त्वा षष्ठीं चैवाहुतिं क्षिपेत् ।
वैश्वानरो महानग्निर्ऋषिर्वै परिकीर्तितः ॥ ४३ ॥
गायत्रीच्छन्द आख्यातं देवस्त्वात्मा भवेदपि ।
स्वाहान्तो मन्त्र आख्यातः परमात्मन उच्चरेत् ॥ ४४ ॥
इदं न मम चेत्येवं जातं प्राणाग्निहोत्रकम् ।
एतज्ज्ञात्वा विधिं कृत्वा ब्रह्मभूयाय कल्पते ।
प्राणाग्निहोत्रविद्येयं संक्षेपात्कथिता हि ते ॥ ४५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां एकादशस्कन्धे
वैश्वदेवादिविधिनिरूपणं नाम द्वाविंशोऽध्यायः ॥ २२ ॥

व्रताची लक्षणे

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारायण मुनी म्हणाले, ''हे ब्राह्मणा, आता वैश्वदेवाचे विधान ऐक.''

देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ व मनुष्ययज्ञ हे पाच यज्ञ आहेत. चूल, पाटावरवंटा, उखळ, घागर, झाडणी ही पाच गृहस्थांची हिंसास्थाने आहेत. कारण या ठिकाणी अजाणतेपणी हिंसा होत असतात. त्यांच्या शांतीसाठी वरील यज्ञ करावा.

लोखंडी भांड्यात, चुलीत, खापरात, भूमीवर वैश्वदेव करू नये. कुंडात किंवा स्थंडिलावर वैश्वदेव करावा. हाताने, सुपाने अग्नीस प्रदीप्त करू नये. मुखाने अग्नी प्रदीप्त करावा. पटाने व्याधी होतात. शूर्पाने धननाश होतो. हाताने मृत्यू संभवतो. पण तोंडाने कर्मसिद्ध होते. फळे, दही, घृत, मूळ, शास्त्र, उदक या द्रव्यांनी वैश्वदेव करावा. शुष्क, पर्युषित यांनी हवन केल्यास मनुष्य कुष्ठयुक्त होतो. उच्छिष्ट पदार्थाचे हवन केल्यास शत्रूच्या आधीन जातो. रुद्र पदार्थामुळे दारिद्र्य येते. खारटाने अधोगती प्राप्त होते. अन्नपाक करणार्‍या अग्नीतून काही निखारे एका बाजूला घेऊन वैश्वदेव करावा. वैश्वदेव न करता भोजन करणारा कालसूत्र नरकात जातो.

भाजीपाला, फळ, मूळ यांचे हवन करावे. एखादा भिक्षार्थी आल्यास वैश्वदेवाचे अन्न बाजूला काढून ठेवून भिक्षा वाढावी. यती, ब्रह्मचारी हे दोघे पक्वान्नाचे स्वामी आहेत. त्यांना न देता भोजन केल्यास चांद्रायण तप करावे. वैश्वदेवानंतर गोग्रास घालावा. त्याचे विधान ऐक. 'वैष्णवी माता सुरभी विभूपदी स्थित आहे म्हणून मी दिलेला गोग्रास सुरभी घेवो. गाईस नमस्कार असो.' असे म्हणून गाईस घास अर्पण करावा. त्यामुळे गोमाता प्रसन्न होते. गोदोहनाच्या वेळेइतका काल भिक्षूने उभे रहावे. आशाभंग होऊन भिक्षु गेल्यास तो आपले पाप यजमानास देऊन त्याचे पुण्य घेऊन जातो. माता, पिता, गुरु, अश्विन, अतिथी वगैरेचे पोषण करावे. जो गृहस्थ असे करीत नाही त्याला सिद्धी होत नाही.

अध्याय बाविसावा समाप्त

GO TOP