श्रीनारायण उवाच
देवर्षे शृणु तत्सर्वं भस्मोद्धूलनजं फलम् ।
सरहस्यविधानं च सर्वकामफलप्रदम् ॥ १ ॥
कपिलायाः शकृत्स्वच्छं गृहीत्वा गगनेऽपतत् ।
न क्लिन्नं नापि कठिनं न दुर्गन्धं न चोषितम् ॥ २ ॥
उपर्यधः परित्यज्य गह्णीयात्पतितं यदि ।
पिण्डीकृत्य शिवाग्न्यादौ तत्क्षिपेन्मूलमन्त्रितम् ॥ ३ ॥
आदाय वाससाऽऽच्छाद्य भस्माधाने विनिक्षिपेत् ।
सुकृते सुदृढे शुद्धे क्षालिते प्रोक्षिते शुभे ॥ ४ ॥
विन्यस्य मन्त्री मन्त्रेण पात्रे भस्म विनिक्षिपेत् ।
तैजसं दारवं चाथ मृण्मयं चैलमेव च ॥ ५ ॥
अन्यद्वा शोभनं शुद्धं भस्माधारं प्रकल्पयेत् ।
क्षौमे चैवातिशुद्धे वा धनवद्भस्म निक्षिपेत् ॥ ६ ॥
प्रस्थितो भस्म गृह्णीयात्स्वयं चानुचरोऽपि वा ।
न चायुक्तकरे दद्यान्न चाशुचितले क्षिपेत् ॥ ७ ॥
न संस्पृशेत्तु नीचाङ्गैर्न क्षिपेन्न च लङ्घयेत् ।
तस्माद्भसितमादाय विनियुञ्जीत मन्त्रितम् ॥ ८ ॥
विभूतिधारणविधिः स्मृतिप्रोक्तो मयेरितः ।
यदीयाचरणेनैव शिवतुल्यो न संशयः ॥ ९ ॥
शैवैः सम्पादितं भस्म वैदिकैः शिवसन्निधौ ।
भक्त्या परमया ग्राह्यं प्रार्थयित्वा तु पूजयेत् ॥ १० ॥
तन्त्रोक्तवर्त्मना सिद्धं भस्म तान्त्रिकपूजकैः ।
यत्रकुत्रापि दत्तं चेत्तद्ग्राह्यं नैव वैदिकैः ॥ ११ ॥
शूद्रैः कापालिकैर्वाथ पाखण्डैरपरैस्तु तत् ।
त्रिपुण्ड्रं धारयेद्भक्त्या मनसापि न लङ्घयेत् ॥ १२ ॥
श्रुत्या विधीयते यस्मात्तत्त्यागी पतितो भवेत् ।
त्रिपुण्ड्रधारणं भक्त्या तथा देहावगुण्ठनम् ॥ १३ ॥
द्विजः कुर्याद्धि मन्त्रेण तत्त्यागी पतितो भवेत् ।
उद्धूलनं त्रिपुण्ड्रं च भक्त्या नैवाचरन्ति ये ॥ १४ ॥
तेषां नास्ति विनिर्मोक्षः संसाराज्जन्मकोटिभिः ।
येन भस्मोक्तमार्गेण धृतं न मुनिपुङ्गव ॥ १५ ॥
तस्य विद्धि मुने जन्म निष्कलं सौकरं यथा ।
येषां वपुर्मनुष्याणां त्रिपुण्ड्रेण विना स्थितम् ॥ १६ ॥
श्मशानसदृशं तत्स्यान्न प्रेक्ष्यं पुण्यकृज्जनैः ।
धिग्भस्मरहितं भालं धिग्ग्राममशिवालयम् ॥ १७ ॥
धिगनीशार्चनं जन्म धिग्विद्यामशिवाश्रयाम् ।
त्रिपुण्ड्रं ये विनिन्दन्ति निन्दन्ति शिवमेव ते ॥ १८ ॥
धारयन्ति च ये भक्त्या धारयन्ति तमेव ते ।
यथा कृशानुरहितो भूधरो न विराजते ॥ १९ ॥
अशेषसाधनेऽप्येवं भस्महीनं शिवार्चनम् ।
उद्धूलनं त्रिपुण्ड्रं च श्रद्धया नाचरन्ति ये ॥ २० ॥
तैः पूर्वाचरितं सर्वं विपरीतं भवेदपि ।
भस्मना वेदमन्त्रेण त्रिपुण्ड्रस्य च धारणम् ॥ २१ ॥
विना वेदोचिताचारं स्मार्तस्यानर्थकारणम् ।
कृतं स्यादकृतं तेन श्रुतमप्यश्रुतं भवेत् ॥ २२ ॥
अधीतमनधीतं च त्रिपुण्ड्रं यो न धारयेत् ।
वृथा वेदा वृथा यज्ञा वृथा दानं वृथा तपः ॥ २३ ॥
वृथा व्रतोपवासेन त्रिपुण्ड्रं यो न धारयेत् ।
भस्मधारणकं त्यक्त्वा मुक्तिमिच्छति यः पुमान् ॥ २४ ॥
विषपानेन नित्यत्वं कुरुते ह्यात्मनो हि सः ।
स्रष्टा सृष्टिच्छलेनाह त्रिपुण्ड्रस्य च धारणम् ॥ २५ ॥
ससर्ज स ललाटं हि तिर्यगूर्ध्वं न वर्तुलम् ।
तिर्यग्रेखाः प्रदृश्यन्ते ललाटे सर्वदेहिनाम् ॥ २६ ॥
तथापि मानवा मूर्खा न कुर्वन्ति त्रिपुण्ड्रकम् ।
न तद्ध्यानं न तन्मोक्षं न तज्ज्ञानं न तत्तपः ॥ २७ ॥
विना तिर्यक्त्रिपुण्ड्रं च विप्रेण यदनुष्ठितम् ।
वेदस्याध्ययने शूद्रो नाधिकारी यथा भवेत् ॥ २८ ॥
त्रिपुण्ड्रेण विना विप्रो नाधिकारी शिवार्चने ।
प्राङ्मुखश्चरणौ हस्तौ प्रक्षाल्याचम्य पूर्ववत् ॥ २९ ॥
प्राणानायम्य सङ्कल्प्य भस्मस्नानं समाचरेत् ।
आदाय भसितं शुद्धमग्निहोत्रसमुद्भवम् ॥ ३० ॥
ईशानेन तु मन्त्रेण स्वमूर्धनि विनिक्षिपेत् ।
तत आदाय तद्भस्म मुखे च पुरुषेण तु ॥ ३१ ॥
अघोराख्येण हृदये गुह्ये वामाह्वयेन च ।
सद्योजाताभिधानेन भस्म पादद्वये क्षिपेत् ॥ ३२ ॥
सर्वाङ्गं प्रणवेनैव मन्त्रेणोद्धूलनं ततः ।
एतदाग्नेयकं स्नानमुदितं परमर्षिभिः ॥ ३३ ॥
सर्वकर्मसमृद्ध्यर्थं कुर्यादादाविदं बुधः ।
ततः प्रक्षाल्य हस्तादीनुपस्पृश्य यथाविधि ॥ ३४ ॥
तिर्यक्त्रिपुण्ड्रं विधिना ललाटे हृदये गले ।
पञ्चभिर्ब्रह्मभिर्वापि कृतेन भसितेन च ॥ ३५ ॥
घृतमेतत्त्रिपुण्ड्रं स्यात्सर्वकर्मसु पावनम् ।
शूद्रैरन्त्यजहस्तस्थं न धार्यं भस्म च क्वचित् ॥ ३६ ॥
भस्मना साग्निहोत्रेण लिप्तः कर्म समाचरेत् ।
अन्यथा सर्वकर्माणि न फलन्ति कदाचन ॥ ३७ ॥
सत्यं शौचं जपो होमस्तीर्थं देवादिपूजनम् ।
तस्य व्यर्थमिदं सर्वं यस्त्रिपुण्ड्रं न धारयेत् ॥ ३८ ॥
त्रिपुण्ड्रधृग्विप्रवरो यो रुद्राक्षधरः शुचिः ।
स हन्ति रोगदुरितव्याधिदुर्भिक्षतस्करान् ॥ ३९ ॥
समाप्नोति परं ब्रह्म यतो नावर्तते पुनः ।
स पङ्क्तिपावनः श्राद्धे पूज्यो विप्रैः सुरैरपि ॥ ४० ॥
श्राद्धे यज्ञे जपे होमे वैश्वदेवे सुरार्चने ।
धृतत्रिपुण्ड्रः पूतात्मा मृत्युं जयति मानवः ।
भस्मधारणमाहात्म्यं भूयोऽपि कथयामि ते ॥ ४१ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां एकादशस्कन्धे
भस्मधारणमाहाम्यवर्णनं नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
भस्मधारणाचा विधी
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीनारायण म्हणाले, ''आता, भस्मधारणापासूनचे फल ऐक. ते सर्व कामफल देणारे आहे.''
कपिला गाईचे शेण अंतराळी धरावे. ते स्वच्छ व शुद्ध असावे. नंतर शिवाग्नीमध्ये घालून ते दग्ध करावे. भस्म काढून ते वस्त्राने झाकून ठेवावे. चांगले, शुद्ध प्रोक्ष केलेले अशा पात्रात त्याचा संग्रह करावा. कोणतेही शुद्ध पात्र भस्म ठेवण्यास उपयोगात आणावे. द्रव्याप्रमाणे भस्म ठेवावे. अयोग्य मनुष्याच्या हातात भस्म देऊ नये. अशुद्ध स्थळी ठेवू नये. अधम स्पर्श होऊ देऊ नये. प्रत्येकवेळी भस्म मंत्रून अंगास लावावे. याला त्रिपुंड्र विधी म्हणतात. त्यायोगे पुरुष शिवतुल्य होतो.
शैवांनी, तांत्रिक पूजकांनी कोठेही भस्म दिले तरी ते घेऊ नये. पण पाखंडी व कापालिक लोकांनी भस्माचा अव्हेर करू नये म्हणून द्विजाने मंत्रपूर्वक त्रिपुंड्र धारण करावा. भस्माचा अव्हेर करणारे कोटी जन्मही मुक्त होत नाहीत. त्यांचा जन्म व्यर्थ होय. त्रिपुंड्र वाचून शरीर स्मशानासारखे होय. भस्मशून्य मस्तकाचा धिक्कार असो. शिवालयावाचून असलेले ग्राम, ईश्वराचे दर्शन न घडणारा जन्म यांचा धिक्कार असो. शंकरावाचून इतर विद्या व्यर्थ होत. भस्म धारण करणे म्हणजे शंकरालाच धारण करणे होय.
वेदोचित आचारावाचून स्मार्त आचरण अनर्थकारक आहे. ते कर्म निष्फळ होय. अध्ययन केलेले देखील त्रिपुंड्रवाचून अनध्यायी होतात. त्यांची सर्व व्रते, आचरण व्यर्थ होय.
ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निमित्ताने त्रिपुंड्र धारणाचा उपदेश केला आहे. कारण त्याने ललाट उत्पन्न करताना तिरकस केले आहे. प्रत्येक मानवाच्या मस्तकावर आडव्या तीन रेघा दिसतात. त्रिपुंड्रवाचून ध्यान, तप मोक्षदायी होत नाही. शूद्र व त्रिपुंड्ररहित हे दोघेही सारखेच अनधिकारी होत.
हातपाय धुऊन पूर्वाभिमुख होऊन 'ईशानः सर्व भूताना' म्हणून भस्म मस्तकावर टाकावे. 'तत् पुरुषाय' म्हणून मुखावर, 'अधोरेभ्यः' म्हणून वक्षस्थलावर, 'वामदेवाय' मंत्राने गुह्यस्थानी, 'सद्यो जाताय' मंत्राने दोन्ही पायांना, प्रणवरूप म्हणून सर्वांगाला भस्म लावावे. या भस्मरनानास आग्नेयक स्नान म्हणतात.
कर्मसमृद्धीसाठी प्रथम स्नान करावे. हस्तपादप्रक्षालन करावे. यथाशास्त्र उदकस्पर्श करावा. विधीपूर्वक, ललाट, हृदय, कंठ याठिकाणी त्रिपुंड्र लावावा. पंचमंत्रांनी भस्म अभिमंत्रण करावे म्हणजे पुरुष कर्मासाठी पवित्र होतो. शूद्रांनी अंत्यजाच्या हाताचे भस्म लावू नये.
अग्निहोत्रातील भस्म लेपन करावे. त्रिपुंड्र धारण न करणाराचे सत्य, शौच, जप, होम, तीर्थ, देवपूजन सर्व व्यर्थ होय. त्रिपुंड्र व रुद्राक्ष धारण करणारा ब्राह्मण रोग, पाप, व्याधी, दुर्भिक्ष, चोर यांचा घात करतो. तो परब्रह्म प्राप्त करून घेतो. तेथून तो पुन्हा येत नाही. तो ब्राह्मण व देव श्राद्धामध्ये पूज्य होय. तो पुरुष पंक्तिपावन होतो. श्राद्ध, यज्ञ, जप, होम, वैश्वदेव, देवपूजा या कृत्यांचे वेळी त्रिपुंड्र धारण करणारा मनुष्य पूतात्मा होय. तो मृत्यूस जिंकतो. असे भस्मधारकाचे महात्म्य आहे.