श्रीनारायण उवाच
आग्नेयं गौणमज्ञानध्वंसकं ज्ञानसाधकम् ।
गौणं नानाविधं विद्धि ब्रह्मन्ब्रह्मविदांवर ॥ १ ॥
अग्निहोत्राग्निजं तद्वद्विरजानलजं मुने ।
औपासनसमुत्पन्नं समिदग्निसमुद्भवम् ॥ २ ॥
पचनाग्निसमुत्पन्नं दावानलसमुद्भवम् ।
त्रैवर्णिकानां सर्वेषामग्निहोत्रसमुद्भवम् ॥ ३ ॥
विरजानलजं चैव धार्यं भस्म महामुने ।
औपासनसमुत्पन्नं गृहस्थानां विशेषतः ॥ ४ ॥
समिदग्निसमुत्पन्नं धार्यं वै ब्रह्मचारिणा ।
शूद्राणां श्रोत्रियागारपचनाग्निसमुद्भवम्॥ ५ ॥
अन्येषामपि सर्वेषां धार्यं दावानलोद्भवम् ।
कालश्चित्रा पौर्णमासी देशः स्वीयः परिग्रहः ॥ ६ ॥
क्षेत्रारामाद्यरण्यं वा प्रशस्तः शुभलक्षणः ।
तत्र पूर्वत्रयोदश्यां सुस्नातः सुकृताह्निकः ॥ ७ ॥
अनुज्ञाप्य स्वमाचार्यं संपूज्य प्रणिपत्य च ।
पूजां वैशेषिकीं कृत्वा शुक्लाम्बरधरः स्वयम् ॥ ८ ॥
शुद्धयज्ञोपवीती च शुक्लमाल्यानुलेपनः ।
दर्भासने समासीनो दर्भमुष्टिं प्रगृह्य च ॥ ९ ॥
प्राणायामत्रयं कृत्वा प्राङ्मुखो वाप्युदङ्मुखः ।
ध्यात्वा देवं च देवीं च तद्विज्ञापनवर्त्मना ॥ १० ॥
व्रतमेतत्करोमीति भवेत्सङ्कल्पदीक्षितः ।
यावच्छरीरपातं वा द्वादशाब्दमथापि वा ॥ ११ ॥
तदर्धं वा तदर्धं वा मासद्वादशकं तु वा ।
तदर्धं वा तदर्धं वा मासमेकमथापि वा ॥ १२ ॥
दिनद्वादशकं वापि दिनषट्कमथापि वा ।
तदर्धं दिनमेकं वा व्रतसङ्कल्पनावधि ॥ १३ ॥
अग्निमाधाय विधिवद्विरजाहोमकारणात् ।
हुत्वाऽऽज्येन समिद्भिश्च चरुणा च यथाविधि ॥ १४ ॥
पूताहात्पुरतो भूयस्तत्त्वानां शुद्धिमुद्दिशन् ।
जुहुयान्मूलमन्त्रेण तैरेव समिदादिभिः ॥ १५ ॥
तत्त्वान्येतानि मे देहे शुध्यन्तामित्यनुस्मरन् ।
पश्चाद्भूतादितन्मात्राः पञ्चकर्मेन्द्रियाणि च ॥ १६ ॥
ज्ञानकर्मविभेदेन पञ्च पञ्च विभागशः ।
त्वगादिधातवः सप्त पञ्च प्राणादिवायवः ॥ १७ ॥
मनो बुद्धिरहङ्कारो गुणाः प्रकृतिपूरुषौ ।
रागो विद्या कला चैव नियतिः काल एव च ॥ १८ ॥
माया च शुद्धविद्या च महेश्वरसदाशिवौ ।
शक्तिश्च शिवतत्त्वं च तत्त्वानि क्रमशो विदुः ॥ १९ ॥
मन्त्रैस्तु विरजैर्हुत्वा होतासौ विरजो भवेत् ।
अथ गोमयमादाय पिण्डीकृत्याभिमन्त्र्य च ॥ २० ॥
न्यस्याग्नौ तं च संरक्ष्य दिने तस्मिन् हविष्यभुक् ।
प्रभाते च चतुर्दश्यां कृत्वा सर्वं पुरोदितम् ॥ २१ ॥
तस्मिन्दिने निराहारः कालशेषं समापयेत् ।
प्रातः पर्वणि चाप्येवं कृत्वा होमावसानतः ॥ २२ ॥
उपसंहृत्य रुद्राग्निं गृहीत्वा भस्म यत्नतः ।
ततश्च जटिलो मुण्डः शिखैकजट एव च ॥ २३ ॥
भूत्वा स्नात्वा पुनर्वीतलज्जश्चेत्स्याद्दिगम्बरः ।
अन्यः काषायवसनश्चर्मचीराम्बरोऽथवा ॥ २४ ॥
एकाम्बरो वल्कलवान्भवेद्दण्डी च मेखली ।
प्रक्षाल्य चरणौ पश्चाद्द्विराचम्यात्मनस्तनुम् ॥ २५ ॥
सङ्कलीकृत्य तद्भस्म विरजानलसम्भवम् ।
अग्निरित्यादिभिर्मन्त्रैः षड्भिराथर्वणैः क्रमात् ॥ २६ ॥
विमृज्याङ्गानि मूर्धादिचरणान्तं च तैः स्पृशेत् ।
ततस्तेन क्रमेणैव समुद्धूल्य च भस्मना ॥ २७ ॥
सर्वाङ्गोद्धूलनं कुर्यात्प्रणवेन शिवेन वा ।
ततश्च पुण्ड्रं रचयेत्त्रियायुषसमाह्वयम् ॥ २८ ॥
शिवभावं समागम्य शिवभावमथाचरेत् ।
कुर्यात्त्रिसन्ध्यमप्येवमेतत्पाशुपतं व्रतम् ॥ २९ ॥
भुक्तिमुक्तिप्रदं चैव पशुत्वं विनिवर्तयेत् ।
तत्पशुत्वं परित्यज्य कृत्वा पाशुपतं व्रतम् ॥ ३० ॥
पूजनीयो महादेवो लिङ्गमूर्तिः सदाशिवः ।
भस्मस्नानं महापुण्यं सर्वसौख्यकरं परम् ॥ ३१ ॥
आयुष्यं बलमारोग्यं श्रीपुष्टिवर्धनं यतः ।
रक्षार्थं मङ्गलार्थं च सर्वसम्पत्समृद्धये ॥ ३२ ॥
भस्मस्निग्धमनुष्याणां महामारीभयं न च ।
शान्तिकं पौष्टिकं भस्म कामदं च त्रिधा भवेत् ॥ ३३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां एकादशस्कन्धे भस्ममाहात्म्ये
पाशुपतव्रतवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥
पाशुपत व्रत
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीनारायण म्हणाले, ''अग्नीजन्य पण गौण भस्मामुळे अज्ञानाचा नाश होतो. अग्निहोत्राच्या अग्नीपासून झालेले मुख्य भस्म होय. विरजा व स्मार्त अग्नीपासून झालेले, समिदग्नीपासून झालेले, पंचाग्नी, दावानलाग्नी यापासून झालेले, असे पाच प्रकारचे भस्म आहे.
तीन वर्णियांनी अग्नीहोत्रापासून निर्माण झालेले विरजाग्नीपासूनचे भस्म घ्यावे. गृहस्थांनी स्मार्त अग्नीपासूनचे व ब्रह्मचार्यांनी समिदग्नीपासून निर्माण झालेले भस्म लावावे. श्रोतियांच्या घरातील पाच अग्नीपासून उत्पन्न झालेले भस्म शूद्रांनी धारण करावे. विरजानल भस्माचा काल चित्रक्षत्र युक्त पौर्णिमा व रहाण्याचे ठिकाण हाच देश होय. क्षेत्र, बाग, अरण्य ही स्थळेही प्रशस्त आहेत. तेथे शुक्रत्रयोदशीला सुस्नात होऊन नित्यकर्म उरकून आचार्यांनी अनुज्ञा घ्यावी. त्यांचे पूजन करावे. शुभ्र वस्त्रे धारण करून यज्ञोपवीती करावी. पुष्पमाला घालून चंदन लावावे. दर्भासनावर बसावे. उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करावे. तीन प्राणायाम करावे. देव व देवी यांचे ध्यान करावे.
''मी हे व्रत करतो'' असे म्हणून दीक्षा घ्यावी. शरीर नाश होईपर्यंत अथवा ठराविक मुदतीपर्यंत संकल्पाप्रमाणे विरजाहोमाकरता शास्त्रोक्त अग्नी उत्पन्न करावा. आज्य, समिधा, चरू यांनी यथाविधी हवन करावे. तसेच याच द्रव्यांनी मूलमंत्राने हवन करावे.
''माझ्या देहातील तत्वे शुद्ध होवोत'' असे चिंतन करावे. पाच इंद्रिये, सात धातु, पंच वायु, मन, बुद्धी, अहंकार, तीन गुण, प्रकृती, पुरुष, राग, अविद्या, कला, नियती, काल, माया, विद्या, महेश्वर, सदाशिव, शक्ति, शिवतत्त्व ही तत्त्वे क्रमाने असतात. विरजामंत्राच्या हवनाने ही शुद्ध होतात.
नंतर गोमयाचा गोळा करून अभिमंत्रण करावे. तो अग्नीत ठेवावा. त्या दिवशी हविष्यान्न भक्षण करावे. चतुर्दशीस प्रातःकाली पूर्वोक्त सर्व क्रिया करून निराहार रहावे. पौर्णिमेच्या दिवशी तसेच करून रूद्राग्नीचा उपसंहार करून होमाची समाप्ती करावी. एकच शिखा ठेवून मुंडन करावे. स्नान करून भोजन करावे. साधकाची लज्जा नष्ट झाली असेल तर त्याने दिगंबर रहावे अथवा काषाय वस्त्र परिधान करावे. पाय धुऊन आचमन करावे व विरजाग्नीपासून झालेले भस्म धारण करावे. ते मंत्रोक्त मस्तकापासून मुख्य अंगास चोळावे व क्रमाने सर्वांग लिप्त करावे. शिवाय नमः या मंत्राने सर्वांगास भस्म लावावे. नंतर पुंड्र लावावा. शिवत्याचे आचरण करावे. या प्रमाणे त्रिकाल आचरण ठेवावे. हेच पाशुपत व्रत होय. भुक्ती, मुक्ती देणारे आहे. हे पशुत्वाचे निवारण करते. हे व्रत धरून लिंगाकृत महादेवाची पूजा करावी.
भस्मस्नान हे अत्यंत पुण्यकारक व सौख्य प्राप्त करून देणारे आहे. त्यामुळे आयुष्य, बल, आरोग्य संपत्ती, पुष्टी प्राप्त होते. म्हणून रक्षण, मंगल व सर्व समृद्धी यासाठी भस्मलेपन करावे. जे आपले शरीरास भस्मलेपन करतात, त्यांना महामारीपासून भय प्राप्त होत नाही. शांतिक, पौष्टिक, कामिक असे तीन प्रकारचे भस्म आहे.