राजोवाच
का सा देवी त्वया प्रोक्ता ब्रूहि कालविदां वर ।
का मोहयति सत्त्वानि कारणं किं भवेद् द्विज ॥ १ ॥
कस्मादुत्पद्यते देवी किंरूपा सा किमात्मिका ।
सर्वमाख्याहि भूदेव कृपया मम सर्वतः ॥ २ ॥
मुनिरुवाच
राजन् देव्याः स्वरूपं ते वर्णयामि निशामय ।
यथा चोत्पतिता देवी येन वा सा जगन्मयी ॥ ३ ॥
यदा नारायणो देवो विश्वं संहृत्य योगराट् ।
आस्तीर्य शेषं भगवान् समुद्रे निद्रितोऽभवत् ॥ ४ ॥
तदा प्रस्वापवशगो देवदेवो जनार्दनः ।
तत्कर्णमलसञ्जातौ दानवौ मधुकैटभौ ॥ ५ ॥
ब्रह्माणं हन्तुमुद्युक्तौ दानवौ घोररूपिणौ ।
तदा कमलजो देवो दृष्ट्वा तौ मधुकैटभौ ॥ ६ ॥
निद्रितं देवदेवेशं चिन्तामाप दुरत्ययाम् ।
निद्रितो भगवानीशो दानवौ च दुरासदौ ॥ ७ ॥
किं करोमि क्व गच्छामि कथं शर्म लभे ह्यहम् ।
एवं चिन्तयतस्तस्य पद्ययोनेर्महात्मनः ॥ ८ ॥
बुद्धिः प्रादूरभूत्तात तदा कार्यप्रसाधिनी ।
यस्या वशं गतो देवो निद्रितो भगवान् हरिः ॥ ९ ॥
तां देवीं शरणं यामि निद्रां सर्वप्रसूतिकाम् ।
ब्रह्मोवाच
देवि देवि जगद्धात्रि भक्ताभीष्टफलप्रदे ॥ १० ॥
जगन्माये महामाये समुद्रशयने शिवे ।
त्वदाज्ञावशगाः सर्वे स्वस्वकार्यविधायिनः ॥ ११ ॥
कालरात्रिर्महारात्रिर्मोहरात्रिर्मदोत्कटा ।
व्यापिनी वशगा मान्या महानन्दैकशेवधिः ॥ १२ ॥
महनीया महाराध्या माया मधुमती मही ।
परापराणां सर्वेषां परमा त्वं प्रकीर्तिता ॥ १३ ॥
लज्जा पुष्टिः क्षमा कीर्तिः कान्तिः कारुण्यविग्रहा ।
कमनीया जगद्वन्द्या जाग्रदादिस्वरूपिणी ॥ १४ ॥
परमा परमेशानी परानन्दपरायणा ।
एकाप्येकस्वरूपा च सद्वितीया द्वयात्मिका ॥ १५ ॥
त्रयी त्रिवर्गनिलया तुर्या तुर्यपदात्मिका ।
पञ्चमी पञ्चभूतेशी षष्ठी षष्ठेश्वरीति च ॥ १६ ॥
सप्तमी सप्तवारेशी सप्तसप्तवरप्रदा ।
अष्टमी वसुनाथा च नवग्रहमयीश्वरी ॥ १७ ॥
नवरागकला रम्या नवसंख्या नवेश्वरी ।
दशमी दशदिक्पूज्या दशाशाव्यापिनी रमा ॥ १८ ॥
एकादशात्मिका चैकादशरुद्रनिषेविता ।
एकादशीतिथिप्रीता एकादशगणाधिपा ॥ १९ ॥
द्वादशी द्वादशभुजा द्वादशादित्यजन्मभूः ।
त्रयोदशात्मिका देवी त्रयोदशगणप्रिया ॥ २० ॥
त्रयोदशाभिधा भिन्ना विश्वेदेवाधिदेवता ।
चतुर्दशेन्द्रवरदा चतुर्दशमनुप्रसूः ॥ २१ ॥
पञ्चाधिकदशी वेद्या पञ्चाधिकदशी तिथिः ।
षोडशी षोडशभुजा षोडशेन्दुकलामयी ॥ २२ ॥
षोडशात्मकचन्द्रांशुव्याप्तदिव्यकलेवरा ।
एवंरूपासि देवेशि निर्गुणे तामसोदये ॥ २३ ॥
त्वया गृहीतो भगवान्देवदेवो रमापतिः ।
एतौ दुरासदौ दैत्यौ विक्रान्तौ मधुकैटभौ ॥ २४ ॥
एतयोश्च वधार्थाय देवेशं प्रतिबोधय ।
मुनिरुवाच
एवं स्तुता भगवती तामसी भगवत्प्रिया ॥ २५ ॥
देवदेवं तदा त्यक्त्वा मोहयामास दानवौ ।
तदैव भगवान्विष्णुः परमात्मा जगत्पतिः ॥ २६ ॥
प्रबोधमाप देवेशो ददृशे दानवोत्तमौ ।
तदा तौ दानवौ घोरौ दृष्ट्वा तं मधुसूदनम् ॥ २७ ॥
युद्धाय कृतसङ्कल्पौ जग्मतुः सन्निधिं हरेः ।
युयुधे च ततस्ताभ्यां भगवान्मधुसूदनः ॥ २८ ॥
पञ्चवर्षसहस्राणि बाहुप्रहरणो विभुः ।
तौ तदातिबलोन्मत्तौ जगन्मायाविमोहितौ ॥ २९ ॥
व्रियतां वर इत्येवमूचतुः परमेश्वरम् ।
एवं तयोर्वचः श्रुत्वा भगवानादिपूरुषः ॥ ३० ॥
वव्रे वध्याबुभौ मेऽद्य भवेतामिति निश्चितम् ।
तौ तदातिबलौ देवं पुनरेवोचतुर्हरिम् ॥ ३१ ॥
आवां जहि न यत्रोर्वी पयसा च परिप्लुता ।
तथेत्युक्त्वा भगवता गदाशङ्खभृता नृप ॥ ३२ ॥
कृत्वा चक्रेण वै छिन्ने जघने शिरसी तयोः ।
एवं देवी समुत्पन्ना ब्रह्मणा संस्तुता नृप ॥ ३३ ॥
महाकाली महाराज सर्वयोगेश्वरेश्वरी ।
महालक्ष्म्यास्तथोत्पत्तिं निशामय महीपते ॥ ३४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां दशमस्कन्धे देवीमाहात्म्ये
मधुकैटभवधवर्णनं नाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
महाकालीचे महात्म्य
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
सुरथ राजा म्हणाला, "हे कालवेत्त्यामध्ये श्रेष्ठा, ती देवी कोणती ? कोण प्राण्यांना मोहित करते ? त्याचे कारण तरी काय ? तिची उत्पत्ती व स्वरूप याविषयी माहिती सांगा."
मुनी म्हणाले, "हे राजा, ज्यावेळी योगराज भगवान नारायण सर्व विश्वाचा संहार केल्यावर शेषावर निद्रिस्त झाला, तेव्हा त्याला गाढ निद्रा लागली. त्याच्या कानातील मळातून मधुकैटभ राक्षस निर्माण झाले. तेव्हा त्या ब्रह्मदेवाला चिंता उत्पन्न झाली. पण त्याचवेळी त्याला बुद्धी सुचली. ज्या योगमायेच्या आधीन होऊन भगवान हरी निद्रिस्त झाला, त्या देवीस तो शरण गेला.
ब्रह्मदेव म्हणाला, "हे देवदेवी, हे इष्टफलदायिनी, हे जगन्माते, हे शिवे, हे कालरात्री, महारात्री, मोहरात्री, हे व्यापिनी, वशगा, मान्या, महानंदे, हे पूज्य, हे महाआराध्य, हे श्रेष्ठ परमेश्वरी, एकसंख्यारूपिणी, वेदत्रयीरूप धर्म, अर्थ, कर्माचे स्थान असलेल्या हे ब्रह्मरूपिणी, षष्ठीदेवी, सात वारांची ईश्वरी, अष्ट वस्तूंची स्वामिनी, हे नऊ राग व कला यांनी परिपूर्ण, हे दहा दिशात पूज्य, हे एकदश रूद्रांनी सेवित देवी, मी तुला शरण आलो आहे.
हे द्वादशभुजांची, बारा आदित्यांची माता, त्रयोदशरूप देवी. त्रयोदशगणप्रिय, हे विश्वदेवांची आधिदेवता, हे चवदा इंद्रांना वर देणारे, चवदा मनूंची माता, पौर्णिमा, तिथी, सोळा भुजांची षोडशा नावाच्या देवी, तू चंद्रकलांनी युक्त आहेस. हे देवेशी, हे निर्गुणे, तू रमाधिपतीस आधीन केलेस. पण इकडे मधुकैटभ दैत्य निर्माण झाले आहेत. त्यांच्या वधासाठी तू जगन्नाथास जागृत कर."
अशाप्रकारे तिचे स्तवन केल्यावर त्या देवीने त्या देवाधिदेवास मुक्त केले व दानवांना मोहित केले. विष्णूने जागृत झाल्यावर त्या दैत्यांकडे पाहिले. तेव्हा ते भयंकर दानव युद्धाचा निश्चय करून हरीच्या जवळ गेले. पुढे पाच हजार वर्षे त्या मधुसूदनाने त्यांच्याशी बाहुयुद्ध केले. पण त्याचवेळी सामर्थ्याने गर्वोन्मत्त झालेले राक्षस विष्णूस, " वर माग" असे म्हणाले. तेव्हा विष्णू म्हणाला, '"हे दानवांनो, आज माझ्याकडून तुम्ही वधले जा."
ते ऐकताच ते बलाढ्य दैत्य सत्वर म्हणाले, "उदकरहित पृथ्वीवर आमचा वध कर." हे ऐकताच त्या भगवानाने उदकरहित प्रदेश उत्पन्न करून चक्राने त्यांची मस्तके जघनप्रदेशावर तोडून टाकली. तेव्हा ही महाकाली प्रकट झाली. ब्रह्मदेवाने तिची स्तुती केली.