श्रीनारायण उवाच
सप्तमो मनुराख्यातो मनुर्वैवस्वतः प्रभुः ।
श्राद्धदेवः परानन्दभोक्ता मान्यस्तु भूभुजाम् ॥ १ ॥
स च वैवस्वतमनुः परदेव्याः प्रसादतः ।
तथा तत्तपसा चैव जातो मन्वन्तराधिपः ॥ २ ॥
अष्टमो मनुराख्यातः सावर्णिः प्रथितः क्षितौ ।
स जन्मान्तर आराध्य देवीं तद्वरलाभतः ॥ ३ ॥
जातो मन्वन्तरपतिः सर्वराजन्यपूजितः ।
महापराक्रमी धीरो देवीभक्तिपरायणः ॥ ४ ॥
नारद उवाव
कथं जन्मान्तरे तेन मनुनाराधनं कृतम् ।
देव्याः पृथिव्युद्भवायास्तन्ममाख्यातुमर्हसि ॥ ५ ॥
श्रीनारायण उवाच
चैत्रवंशसमुद्भूतो राजा स्वारोचिषेऽन्तरे ।
सुरथो नाम विख्यातो महाबलपराक्रमः ॥ ६ ॥
गुणग्राही धनुर्धारी मान्यः श्रेष्ठः कविः कृती ।
धनसंग्रहकर्ता च दाता याचकमण्डले ॥ ७ ॥
अरीणां मर्दनो मानी सर्वास्त्रकुशलो बली ।
तस्यैकदा बभूवुस्ते कोलाविध्वंसिनो नृपाः ॥ ८ ॥
शत्रवः सैन्यसहिताः परिवार्येनमूर्जिताः ।
रुरुधुर्नगरीं तस्य राज्ञो मानधनस्य हि ॥ ९ ॥
तदा स सुरथो नाम राजा सैन्यसमावृतः ।
निर्ययौ नगरात्स्वीयात्सर्वशत्रुनिबर्हणः ॥ १० ॥
तदा स समरे राजा सुरथः शत्रुभिर्जितः ।
अमात्यैर्मन्त्रिभिश्चैव तस्य कोशगतं धनम् ॥ ११ ॥
हृतं सर्वमशेषेण तदातप्यत भूमिपः ।
निष्कासितश्च नगरात्स राजा परमद्युतिः ॥ १२ ॥
जगामाश्वमथारुह्य मृगयामिषतो वनम् ।
एकाकी विजनेऽरण्ये बभ्रामोद्भ्रान्तमानसः ॥ १३ ॥
मुनेः कस्यचिदागत्य स्वाश्रमं शान्तमानसः ।
प्रशान्तजन्तुसंयुक्तं मुनिशिष्यगणैर्युतम् ॥ १४ ॥
उवास कञ्चित्कालं स राजा परमशोभने ।
आश्रमे मुनिवर्यस्य दीर्घदृष्टेः सुमेधसः ॥ १५ ॥
एकदा स महीपालो मुनिं पूजावसानके ।
काले गत्वा प्रणम्याशु पप्रच्छ विनयान्वितः ॥ १६ ॥
मुने मम मनोदुःखं बाधते चाधिसम्भवम् ।
ज्ञाततत्त्वस्य भूदेव निष्प्रज्ञस्य च सन्ततम् ॥ १७ ॥
शत्रुभिर्निर्जितस्यापि हृतराज्यस्य सर्वशः ।
तथापि तेषु मनसि ममत्वं जायते स्फुटम् ॥ १८ ॥
किं करोमि क्व गच्छामि कथं शर्म लभे मुने ।
त्वदनुग्रहमाशासे वद वेदविदां वर ॥ १९ ॥
मुनिरुवाच
आकर्णय महीपाल महाश्चर्यकरं परम् ।
देवीमाहात्म्यमतुलं सर्वकामप्रदं परम् ॥ २० ॥
जगन्मयी महामाया विष्णुब्रह्महरोद्भवा ।
सा बलादपहृत्यैव जन्तूनां मानसानि हि ॥ २१ ॥
मोहाय प्रतिसंयच्छेदिति जानीहि भूमिप ।
सा सृजत्यखिलं विश्वं सा पालयति सर्वदा ॥ २२ ॥
संहारे हररूपेण संहरत्येव भूमिप ।
कामदात्री महामाया कालरात्रिर्दुरत्यया ॥ २३ ॥
विश्वसंहारिणी काली कमला कमलालया ।
तस्यां सर्वं जगज्जातं तस्यां विश्वं प्रतिष्ठितम् ॥ २४ ॥
लयमेष्यति तस्यां च तस्मात्सैव परात्परा ।
तस्या देव्याः प्रसादश्च यस्योपरि भवेन्नृप ।
स एव मोहमत्येति नान्यथा धरणीपते ॥ २५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां दशमस्कन्धे
सुरथनृपतिवृमत्तवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥
सुरथराजाचे आख्यान
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्री नारायण म्हणाले, "वैवस्वत मनू हा सातवा मनू होय. तो श्राद्धदेव, परमानंदाचा भोक्ता आहे. तोही देवीच्या प्रसादाने मन्वंतरांचा राजा झाला. सावर्णी मनू हा आठवा मनू झाला. देवीची आराधना केल्यामुळे तो राजातही मान्य झाला. तो नित्य देवीच्या भक्तीत एकाग्र असे."
नारद म्हणाला, "त्याने देवीची मातीची मूर्ती करून तिची आराधना कशी केली ?"
श्रीनारायण म्हणाले, "सुरथ नावाचा राजा हा अत्यंत श्रेष्ठ, धनुर्धारी, कवी, शत्रूचा नाश करणारा, मानी, बलदंड होता. त्याच्या कोला नावाच्या नगरीचा शत्रू राजाने विध्यंस केला. त्यावेळी तो सुरथ राजा ससैन्य नगरातून बाहेर पडला. पण त्याचे अमात्य शत्रूशी फितूर झाल्यामुळे सुरथ राजा पराभूत झाला तेव्हा शत्रूंनी त्या राजाला नगरातून हाकलून दिले. अखेर तो अश्वारूढ होऊन निर्जन वनात भ्रमण करू लागला. शेवटी तो एका ऋषीश्रेष्ठाच्या आश्रमात पोहोचला. तेव्हा त्याचे मन शांत झाले.
तो राजा महाबुद्धीमान, दीर्घदृष्टी अशा मुनीच्या आश्रमात राहू लागला. एकदा त्याने मुनींना विनयाने विचारले, "हे मुने, तत्त्व समजूनही व्याधीमुळे ज्याला दुःख होते, ज्याचे राज्य शत्रूंनी हरण केले, असा मी पीडित झालो आहे. तेव्हा मी आता काय करू ? आपण मजवर अनुग्रह करून मार्ग दाखवा."
मुनी म्हणाले, "हे राजा, श्रेष्ठ असे देवीमहात्म्य तुला सांगतो. जी ब्रह्मा-विष्णू-महेशाची जननी असून ती बलात्काराने स्वतःच्या मायेने प्राण्यात दुःख निर्माण करते. ती सर्व विश्वाची कर्ती, सर्वांची कामना पूर्ण करणारी, महामाया, कालरात्री, काली, कमला अशी ती परात्पर शक्ती तिचा प्रसाद ज्याला लाभतो त्याला सर्व सुखे प्राप्त होतात. हे राजा, माझे हे सांगणे व्यर्थ नाही."