श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
सप्तचत्वारिंशोऽध्यायः


मङ्‌गलचण्डीमनसयोरुपाख्यानवर्णनम्

श्रीनारायण उवाच
कथितं षष्ठ्युपाख्यानं ब्रह्मपुत्र यथाऽऽगमम् ।
देवी मङ्‌गलचण्डी च तदाख्यानं निशामय ॥ १ ॥
तस्याः पूजादिकं सर्वं धर्मवक्त्रेण यच्छ्रुतम् ।
श्रुतिसम्मतमेवेष्टं सर्वेषां विदुषामपि ॥ २ ॥
दक्षा या वर्तते चण्डी कल्याणेषु च मङ्‌गला ।
मङ्‌गलेषु च या दक्षा सा च मङ्‌गलचण्डिका ॥ ३ ॥
पूज्या या वर्तते चण्डी मङ्‌गलोऽपि महीसुतः ।
मङ्‌गलाभीष्टदेवी या सा वा मङ्‌गलचण्डिका ॥ ४ ॥
मङ्‌गलो मनुवंश्यश्च सप्तद्वीपधरापतिः ।
तस्य पूज्याभीष्टदेवी तेन मङ्‌गलचण्डिका ॥ ५ ॥
मूर्तिभेदेन सा दुर्गा मूलप्रकृतिरीश्वरी ।
कृपारूपातिप्रत्यक्षा योषितामिष्टदेवता ॥ ६ ॥
प्रथमे पूजिता सा च शङ्‌करेण परात्परा ।
त्रिपुरस्य वधे घोरे विष्णुना प्रेरितेन च ॥ ७ ॥
ब्रह्मन् ब्रह्मोपदेशेन दुर्गतेन च सङ्‌कटे ।
आकाशात्पतिते याने दैत्येन पातिते रुषा ॥ ८ ॥
ब्रह्मविष्णूपदिष्टश्च दुर्गां तुष्टाव शङ्‌करः ।
सा च मङ्‌गलचण्डी या बभूव रूपभेदतः ॥ ९ ॥
उवाच पुरतः शम्भोर्भयं नास्तीति ते प्रभो ।
भगवान्वृषरूपश्च सर्वेशस्ते भविष्यति ॥ १० ॥
युद्धशक्तिस्वरूपाहं भविष्यामि न संशयः ।
मायात्मना च हरिणा सहायेन वृषध्वज ॥ ११ ॥
जहि दैत्यं स्वशत्रुं च सुराणां पदघातकम् ।
इत्युक्त्वान्तर्हिता देवी शम्भोः शक्तिर्बभूव सा ॥ १२ ॥
विष्णुदत्तेन शस्त्रेण जघान तमुमापतिः ।
मुनीन्द्र पतिते दैत्ये सर्वे देवा महर्षयः ॥ १३ ॥
तुष्टुवुः शङ्‌करं देवं भक्तिनम्रात्मकन्धराः ।
सद्यः शिरसि शम्भोश्च पुष्पवृष्टिर्बभूव ह ॥ १४ ॥
ब्रह्मा विष्णुश्च सन्तुष्टो ददौ तस्मै शुभाशिषम् ।
ब्रह्मविष्णूपदिष्टश्च सुस्नातः शङ्‌करस्तथा ॥ १५ ॥
पूजयामास तां भक्त्या देवीं मङ्‌गलचण्डिकाम् ।
पाद्यार्घ्याचमनीयैश्च वस्त्रैश्च विविधैरपि ॥ १६ ॥
पुष्पचन्दननैवेद्यैर्भक्त्या नानाविधैर्मुने ।
छागैर्मेषैश्च महिषैर्गवयैः पक्षिभिस्तथा ॥ १७ ॥
वस्त्रालङ्‌कारमाल्यैश्च पायसैः पिष्टकैरपि ।
मधुभिश्च सुधाभिश्च फलैर्नानाविधैरपि ॥ १८ ॥
सङ्‌गीतैर्नर्तकैर्वाद्यैरुत्सवैर्नामकीर्तनैः ।
ध्यात्वा माध्यन्दिनोक्तेन ध्यानेन भक्तिपूर्वकम् ॥ १९ ॥
ददौ द्रव्याणि मूलेन मन्त्रेणैव च नारद ।
ॐ ह्रीं श्रीं क्लीं सर्वपूज्ये देवि मङ्‌गलचण्डिके ॥ २० ॥
हूँ हूँ फट् स्वाहाप्येकविंशाक्षरो मनुः ।
पूज्यः कल्पतरुश्चैव भक्तानां सर्वकामदः ॥ २१ ॥
दशलक्षजपेनैव मन्त्रसिद्धिर्भवेद्‌ ध्रुवम् ।
ध्यानं च श्रूयतां ब्रह्मन् वेदोक्तं सर्वसम्मतम् ॥ २२ ॥
देवीं षोडशवर्षीयां शश्वत्सुस्थिरयौवनाम् ।
बिम्बोष्ठीं सुदतीं शुद्धां शरत्पद्मनिभाननाम् ॥ २३ ॥
श्वेतचम्पकवर्णाभां सुनीलोत्पललोचनाम् ।
जगद्धात्रीं च दात्रीं च सर्वेभ्यः सर्वसम्पदाम् ॥ २४ ॥
संसारसागरे घोरे ज्योतीरूपां सदा भजे ।
देव्याश्च ध्यानमित्येवं स्तवनं श्रूयतां मुने ॥ २५ ॥
महादेव उवाच
रक्ष रक्ष जगन्मातर्देवि मङ्‌गलचण्डिके ।
हारिके विपदां राशेर्हर्षमङ्‌गलकारिके ॥ २६ ॥
हर्षमङ्गलदक्षे च हर्षमङ्गलदायिके ।
शुभे मङ्गलदक्षे च शुभे मङ्‌गलचण्डिके ॥ २७ ॥
मङ्‌गले मङ्‌गलार्हे च सर्वमङ्‌गलमङ्‌गले ।
सतां मङ्‌गदे देवि सर्वेषां मङ्गलालये ॥ २८ ॥
पूज्ये मङ्‌गलवारे च मङ्‌गलाभीष्टदेवते ।
पूज्ये मङ्गलभूपस्य मनुवंशस्य सन्ततम् ॥ २९ ॥
मङ्‌गलाधिष्ठातृदेवि मङ्‌गलानां च मङ्‌गले ।
संसारमङ्‌गलाधारे मोक्षमङ्‌गलदायिनि ॥ ३० ॥
सारे च मङ्गलाधारे पारे च सर्वकर्मणाम् ।
प्रतिमङ्‌गलवारे च पूज्ये मङ्गसुखप्रदे ॥ ३१ ॥
स्तोत्रेणानेन शम्भुश्च स्तुत्वा मङ्‌गलचण्डिकाम् ।
प्रतिमङ्‌गलवारे च पूजां दत्त्वा गतः शिवः ॥ ३२ ॥
प्रथमे पूजिता देवी शिवेन सर्वमङ्‌गला ।
द्वितीये पूजिता सा च मङ्‌गलेन ग्रहेण च ॥ ३३ ॥
तृतीते पूजिता भद्रा मङ्‌गलेन नृपेण च ।
चतुर्थे मङ्‌गले वारे सुन्दरीभिः प्रपूजिता ॥ ३४ ॥
पञ्चमे मङ्‌गलाकाङ्‌क्षिनरैर्मङ्‌गलचण्डिका ।
पूजिता प्रतिविश्वेषु विश्वेशपूजिता सदा ॥ ३५ ॥
ततः सर्वत्र सम्पूज्या बभूव परमेश्वरी ।
देवैश्च मुनिभिश्चैव मानवैर्मनुभिर्मुने ॥ ३६ ॥
देव्याश्च मङ्‌गस्तोत्रं यः शृणोति समाहितः ।
तन्मङ्‌गलं भवेत्तस्य न भवेत्तदमङ्‌गलम् ।
वर्धते पुत्रपौत्रैश्च मङ्‌गलं च दिने दिने ॥ ३७ ॥
श्रीनारायण उवाच
उक्तं द्वयोरुपाख्यानं ब्रह्मपुत्र यथागमम् ।
श्रूयतां मनसाऽऽख्यानं यच्छ्रुतं धर्मवक्त्रतः ॥ ३८ ॥
सा च कन्या भगवती कश्यपस्य च मानसी ।
तेनैव मनसा देवी मनसा या च दीव्यति ॥ ३९ ॥
मनसा ध्यायते या च परमात्मानमीश्वरम् ।
तेन सा मनसा देवी तेन योगेन दीव्यति ॥ ४० ॥
आत्मारामा च सा देवी वैष्णवी सिद्धयोगिनी ।
त्रियुगं च तपस्तप्त्वा कृष्णस्य परमात्मनः ॥ ४१ ॥
जरत्कारुशरीरं च दृष्ट्वा यत्क्षीणमीश्वरः ।
गोपीपतिर्नाम चक्रे जरत्कारुरिति प्रभुः ॥ ४२ ॥
वाञ्छितं च ददौ तस्यै कृपया च कृपानिधिः ।
पूजां च कारयामास चकार च स्वयं प्रभुः ॥ ४३ ॥
स्वर्गे च नागलोके च पृथिव्यां ब्रह्मलोकतः ।
भृशं जगत्सु गौरी सा सुन्दरी च मनोहरा । ४४
जगद्‌गौरीति विख्याता तेन सा पूजिता सती ।
शिवशिष्या च सा देवी तेन शैवी प्रकीर्तिता ॥ ४५ ॥
विष्णुभक्तातीव शश्वद्वैष्णवी तेन कीर्तिता ।
नागानां प्राणरक्षित्री यज्ञे पारीक्षितस्य च ॥ ४६ ॥
नागेश्वरीति विख्याता सा नागभगिनीति च ।
विषं संहर्तुमीशा या तेन विषहरी स्मृता ॥ ४७ ॥
सिद्धयोगं हरात्प्राप तेन सा सिद्धयोगिनी ।
महाज्ञानं च योगं च मृतसज्जीवनीं पराम् ॥ ४८ ॥
महाज्ञानयुतां तां च प्रवदन्ति मनीषिणः ।
आस्तीकस्य मुनीन्द्रस्य माता सापि तपस्विनी ॥ ४९ ॥
आस्तीकमाता विज्ञाता जगत्यां सुप्रतिष्ठिता ।
प्रिया मुनेर्जरत्कारोर्मुनीन्द्रस्य महात्मनः ॥ ५० ॥
योगिनो विश्वपूज्यस्य जरत्कारुप्रिया ततः ।
जरत्कारुर्जगद्‌गौरी मनसा सिद्धयोगिनी ॥ ५१ ॥
वैष्णवी नागभगिनी शैवी नागेश्वरी तथा ।
जरत्कारुप्रियास्तीकमाता विषहरेति च ॥ ५२ ॥
महाज्ञानयुता चैव सा देवी विश्वपूजिता ।
द्वादशैतानि नामानि पूजाकाले तु यः पठेत् ॥ ५३ ॥
तस्य नागभयं नास्ति तस्य वंशोद्‍भवस्य च ।
नागभीते च शयने नागग्रस्ते च मन्दिरे ॥ ५४ ॥
नागशोभे महादुर्गे नागवेष्टितविग्रहे ।
इदं स्तोत्रं पठित्वा तु मुच्यते नात्र संशयः ॥ ५५ ॥
नित्यं पठेद्यस्तं दृष्ट्वा नागवर्गः पलायते ।
दशलक्षजपेनैव स्तोत्रसिद्धिर्भवेन्नृणाम् ॥ ५६ ॥
स्तोत्रसिद्धिर्भवेद्यस्य स विषं भोक्तुमीश्वरः ।
नागैश्च भूषणं कृत्वा स भवेन्नागवाहनः ॥ ५७ ॥
नागासनो नागतल्पो महासिद्धो भवेन्नरः ।
अन्ते च विष्णुना सार्धं क्रीडत्येव दिवानिशम् ॥ ५८ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे नारायणनारदसंवादे
मङ्‌गलचण्डीमनसयोरुपाख्यानवर्णनं
नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४७ ॥


श्री मंगलचंडीदेवी -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारायणमुनी म्हणाले, "आता मी तुला मंगलचंडीचे उपाख्यान सांगतो. कल्याणकारी, मंगल क्रियादक्ष अशी ही मंगलचंडिका आहे. ही सर्वमान्य महीसुत मंगल यासही इष्ट आहे. म्हणून तिला मंगलचंडिका म्हणतात. मनूच्या वंशात हा मंगल ग्रह उत्पन्न झाला. तो सप्तद्वीपाचा राजा आहे. त्याला पूज्य अशी ही देवी आहे.

प्रत्यक्ष मूलप्रकृतीची अंशरूप अशी ही दुर्गाच आहे. ती कृपाळु, अगोचर, स्त्रीयांची इष्ट देवता आहे. विष्णूकडून शंकराला त्रिपूरवधाची प्रेरणा झाल्यावर त्याने मंगलचंडिकेचे पूजन केले. शंकर संकटात सापडल्यावर ब्रह्मदेवाने त्याला उपदेश केला व तिचे पूजन केले.

त्रिपुराने शंकराचे यान पाडले. तेव्हा ते अंतरिक्षातच लोंबत राहिले. तेव्हा शंकराला दुर्गेची स्तुती करण्याचा आदेश दिला. शंकराच्या स्तुतीमुळे दुर्गा प्रसन्न झाली. ती निराळ्याच स्वरूपात प्रकट झाली. ती म्हणाली, "हे प्रभो, भिऊ नकोस. भगवान विष्णु वृषभरूपाने तुझे वाहन होईल व मीच शक्तीरूप होईन. तुला संकटमुक्त करीन. माझ्या प्रसादाने व हरीच्या सहाय्याने देवांचा शत्रू त्रिपूर याचा तू वध करशील."

असे म्हणून ती देवी शंकराची शक्ती झाली. नंतर त्या उमापतीने विष्णूस अर्पण केलेल्या खड्‌गाने त्रिपुराचा वध केला. तेव्हा सर्व देवांनी शंकराची स्तुती केली. नंतर शंकराने स्नानादि क्रिया करून मंगलचंडी देवीला पाद्य, अर्घ्य, आचमन, विविध वस्त्रे, पुष्पे, चंदन, नैवेद्य, बकरे, रेडे, मेंढे, गवय, पक्षी, अलंकार, पुष्पमाला, पायस, मिष्टान्न इत्यादी सर्व प्रकारे तिला अर्पण करून तिची पूजा केली.

"ॐ र्‍हीं श्रीं क्लीं हे पूज्य देवी, हे मंगलचंडिके, हुं फटस्वाहा" हा एकवीस अक्षरी मंत्र जपावा. त्याचा दहा लक्ष जप केल्यास सर्व कामना पूर्ण होतात.

"ही देवी सोळा वर्षांची चिरतरुणी आहे. ती अत्यंत सौंदर्यपूर्ण आहे. तिची कांती शुभ्र चाफ्यासारखी आहे. नीलकमलाप्रमाणे नेत्र आहेत. ती जगताची धात्री असून संपत्ती देणारी आहे. ती समुद्रात ज्योतीरूप आहे. मी तिचे नित्य पूजन करतो." असे तिचे ध्यान करावे.

महादेव म्हणाले, "हे मंगले, तू मंगल आहेस. तू सर्व मंगलांमध्ये मंगल आहेस. तू मंगलाचे आगरच आहेस. सर्वांना मंगल देणारी तू मंगलवारी पूज्य आहेस. मनूच्या वंशातील पूज्य मंगलाची तू प्रिय देवता आहेस. तूच मांगल्याची अधिष्ठात्री असून संसाराचे स्थान आहेस. तू सर्वांचे सार असून मोक्षरूप आहेस. तू सुखदायी असून
प्रत्येक मंगलवारी पूजनीय आहेस."

अशारीतीने मंगलचंडिकेचे स्तवन केल्यावर महादेव स्वस्थानी गेले. शिवानंतर मंगल नावाच्या ग्रहाने तिचे पूजन केले. नंतर मंगल नावाच्या राजाने पूजा केली. सुंदर स्त्रियांनी मंगलवारी तिचे पूजन केले. कल्याणेच्छू पुरुषांनी तिचे पूजन केले. अशा तर्‍हेने प्रत्येक विश्वात तिचे यथोचित पूजन झाले. त्या वेळेपासून ती सर्वांना पूज्य झाली. देव, मनु, मानव, मुनी वगैरेंनी तिचे पूजन केले. तिचे स्तोत्र श्रवण करणार्‍यास पुण्य लाभते.

याप्रमाणे देवीचे आख्यान मी तुला निवेदन केले. आता मनसेचे आख्यान ऐक.

ती कश्यपाची मानसकन्या असून ती मनानेच ईश्वराशी खेळते, म्हणून तिचे नाव मनसा असे पडले आहे. ती मनाने परमात्म्याचे ध्यान करते. ती विष्णूभक्त असून महासिद्ध योगिनी आहे. तिने तीन युगे श्रीकृष्णाचे तप केले. तिचे क्षीण झालेले शरीर अवलोकन करून त्या गोपीपतीने तिचे नाव जरत्कारू ठेवले आणि तिची इच्छा पूर्ण केली. नंतर स्वतः पूजा करून इतरांकडून तिची पूजा करविली.

स्वर्ग, नाग, लोक, पृथ्वी, ब्रह्मलोक व सर्व जगात ती गौरी, जगद्‌गौरी या नावाने विख्यात आहे. ती शंकराची शिष्या असल्याने तिला शैवी असे म्हणतात. ती विष्णूभक्त असल्याने तिला वैष्णवीही म्हणतात. तिनेच परीक्षितीच्या यज्ञाचे वेळी नागांना जीवन प्राप्त करून दिले. त्यामुळे तिला नागेश्वरी व नागभगिनी असे म्हणतात. ती विषाचा नाश करणारी असल्याने तिला विषहारी म्हटले आहे. शंकरापासून सिद्ध योगाची तिला प्राप्ती झाली, म्हणून तिला सिद्धयोगिनी म्हणतात. योग, ज्ञान, मृतसंजीवनी विद्या तिला लाभल्यामुळे तिला महाज्ञानयुता म्हणतात. तिला अस्तिकमाता म्हणूनही संबोधतात. ती जरत्कारूची भार्या असल्याने तिला जरत्कारूप्रिया असे म्हणतात.

जरत्कारू, जगद्‌गौरी, मनसा, सिद्धयोगिनी, वैष्णवी, नागभगिनी, शैवी, नागेश्वरी, जरत्कारूप्रिया, अस्तिकमाता, विषहारी, महाज्ञानयुता अशा बारा नावांनी त्या विश्वपूजितेची पूजा करावी. त्यामुळे पूजकाच्या वंशजांना सर्पापासून भय नाही.

ज्यावेळी नागापासून भय उत्पन्न होईल, त्यावेळी हे स्तोत्र म्हटल्यास त्या भयापासून पुरुष मुक्त होतो. याचा दहा लक्ष जप केल्यास मंत्राची सिद्धी होते. अशाप्रकारे मंत्र सिद्ध करणारा पुरुष सर्प खाण्यासही समर्थ होतो. तो नागांचे वाहन करू शकतो. नागाचे आसन किंवा नागांची शय्या करून तो मृत्यूनंतर विष्णूलोकी जातो."


अध्याय सत्तेचाळिसावा समाप्त

GO TOP