नारद उवाच
अनेकानां च देवीनां श्रुतमाख्यानमुत्तमम् ।
अन्यासां चरितं ब्रह्मन् वद वेदविदांवर ॥ १ ॥
श्रीनारायण उवाच
सर्वासां चरितं विप्र वेदेषु च पृथक्पृथक् ।
पूर्वोक्तानां च देवीनां कासां श्रोतुमिहेच्छसि ॥ २ ॥
नारद उवाच
षष्ठी मङ्गलचण्डी च मनसा प्रकृतेः कला ।
उत्पत्तिमासां चरितं श्रोतुमिच्छामि तत्त्वतः ॥ ३ ॥
श्रीनारायण उवाच
षष्ठांशा प्रकृतेर्या च सा च षष्ठी प्रकीर्तिता ।
बालकानामधिष्ठात्री विष्णुमाया च बालदा ॥ ४ ॥
मातृकासु च विख्याता देवसेनाभिधा च या ।
प्राणाधिकप्रिया साध्वी स्कन्दभार्या च सुव्रता ॥ ५ ॥
आयुःप्रदा च बालानां धात्री रक्षणकारिणी ।
सततं शिशुपार्श्वस्था योगेन सिद्धियोगिनी ॥ ६ ॥
तस्याः पूजाविधिं ब्रह्मनितिहासमिदं शृणु ।
यच्छ्रुतं धर्मवक्येण सुखदं पुत्रदं परम् ॥ ७ ॥
राजा प्रियव्रतश्चासीत्स्वायम्भुवमनोः सुतः ।
योगीन्द्रो नोद्वहद्भार्यां तपस्यासु रतः सदा ॥ ८ ॥
ब्रह्माज्ञया च यत्नेन कृतदारो बभूव ह ।
सुचिरं कृतदारश्च न लेभे तनयं मुने ॥ ९ ॥
पुत्रेष्टियज्ञं तं चापि कारयामास कश्यपः ।
मालिन्यं तस्य कान्तायै मुनिर्यज्ञचरुं ददौ ॥ १० ॥
भुक्त्वा च तं चरुं तस्याः सद्यो गर्भो बभूव ह ।
दधार तं च सा देवी दैवं द्वादशवत्सरम् ॥ ११ ॥
ततः सुषाव सा ब्रह्मन् कुमारं कनकप्रभम् ।
सर्वावयवसम्पन्नं मृतमुत्तारलोचनम् ॥ १२ ॥
तं दृष्ट्वा रुरुदुः सर्वा नार्यश्च बान्धवस्त्रियः ।
मूर्च्छामवाप तन्माता पुत्रशोकेन भूयसा ॥ १३ ॥
श्मशानं च ययौ राजा गहीत्वा बालकं मुने ।
रुरोद तत्र कान्तारे पुत्रं कृत्वा स्ववक्षसि ॥ १४ ॥
नोत्सृजद् बालकं राजा प्राणांस्त्यक्तुं समुद्यतः ।
ज्ञानयोगं विसस्मार पुत्रशोकात्सुदारुणात् ॥ १५ ॥
एतस्मिन्नन्तरे तत्र विमानं च ददर्श सः ।
शुद्धस्फटिकसंकाशं मणिराजविनिर्मितम् ॥ १६ ॥
तेजसा ज्वलितं शश्वच्छोभितं क्षौमवाससा ।
नानाचित्रविचित्राढ्यं पुष्पमालाविराजितम् ॥ १७ ॥
ददर्श तत्र देवीं च कमनीयां मनोहराम् ।
श्वेतचम्पकवर्णाभां शश्वत्सुस्थिरयौवनाम् ॥ १८ ॥
ईषद्धास्यप्रसन्नास्यां रत्नभूषणभूषिताम् ।
कृपामयीं योगसिद्धां भक्तानुग्रहकातराम् ॥ १९ ॥
दृष्ट्वा तां पुरतो राजा तुष्टाव परमादरात् ।
चकार पूजनं तस्या विहाय बालकं भुवि ॥ २० ॥
पप्रच्छ राजा तां तुष्टां ग्रीष्मसूर्यसमप्रभाम् ।
तेजसा ज्वलितां शान्तां कान्तां स्कन्दस्य नारद ॥ २१ ॥
राजोवाच
का त्वं सुशोभने कान्ते कस्य कान्तासि सुव्रते ।
कस्य कन्या वरारोहे धन्या मान्या च योषिताम् ॥ २२ ॥
नृपेन्द्रस्य वचः श्रुत्वा जगन्मङ्गलचण्डिका ।
उवाच देवसेना सा देवानां रणकारिणी ॥ २३ ॥
देवानां दैत्यग्रस्तानां पुरा सेना बभूव सा ।
जयं ददौ सा तेभ्यश्च देवसेना च तेन सा ॥ २४ ॥
श्रीदेवसेनोवाच
ब्रह्मणो मानसी कन्या देवसेनाहमीश्वरी ।
सृष्ट्वा तां मनसा धाता ददौ स्कन्दाय भूमिप ॥ २५ ॥
मातृकासु च विख्याता स्कन्दभार्या च सुव्रता ।
विश्वे षष्ठीति विख्याता षष्ठांशा प्रकृतेः परा ॥ २६ ॥
अपुत्राय पुत्रदाहं प्रियादात्री प्रियाय च ।
धनदाहं दरिद्रेभ्यः कर्मिभ्यश्च स्वकर्मदा ॥ २७ ॥
सुखं दुःखं भयं शोको हर्षो मङ्गलमेव च ।
सम्पत्तिश्च विपत्तिश्च सर्वं भवति कर्मणा ॥ २८ ॥
कर्मणा बहुपुत्रश्च वंशहीनः स्वकर्मणा ।
कर्मणा मृतपुत्रश्च कर्मणा चिरजीवनः ॥ २९ ॥
कर्मणा गुणवांश्चैव कर्मणा चाङ्गहीनकः ।
कर्मणा बहुभार्यश्च भार्याहीनश्च कर्मणा ॥ ३० ॥
कर्मणा रूपवान्धर्मी रोगी शश्वत्स्वकर्मणा ।
कर्मणा च भवेद्व्याधिः कर्मणाऽऽरोग्यमेव च ॥ ३१ ॥
तस्मात्कर्म परं राजन् सर्वेभ्यश्च श्रुतौ श्रुतम् ।
इत्येवमुक्त्वा सा देवी गृहीत्वा बालकं मुने ॥ ३२ ॥
महाज्ञानेन सा देवी जीवयामास लीलया ।
राजा ददर्श तं बालं सस्मितं कनकप्रभम् ॥ ३३ ॥
देवसेना च पश्यन्तं नृपमापृच्छ्य सा तदा ।
गृहीत्वा बालकं देवी गगनं गन्तुमुद्यता ॥ ३४ ॥
पुनस्तुष्टाव तां राजा शुष्ककण्ठोष्ठतालुकः ।
नृपस्तोत्रेण सा देवी परितुष्टा बभूव ह ॥ ३५ ॥
उवाच तं नृपं ब्रह्मन् वेदोक्तं कर्मनिर्मितम् ।
देव्युवाच
त्रिषु लोकेषु त्वं राजा स्वायम्भुवमनोः सुतः ॥ ३६ ॥
मम पूजां च सर्वत्र कारयित्वा स्वयं कुरु ।
तदा दास्यामि पुत्रं ते कुलपद्मं मनोहरम् ॥ ३७ ॥
सुव्रतं नाम विख्यातं गुणवन्तं सुपण्डितम् ।
जातिस्मरं च योगीन्द्रं नारायणकलात्मकम् ॥ ३८ ॥
शतक्रतुकरं श्रेष्ठं क्षत्रियाणां च वन्दितम् ।
मत्तमातङ्गलक्षाणां धृतवन्तं बलं शुभम् ॥ ३९ ॥
धनिनं गुणिनं शुद्धं विदुषां प्रियमेव च ।
योगिनां ज्ञानिनां चैव सिद्धिरूपं तपस्विनाम् ॥ ४० ॥
यशस्विनं च लोकेषु दातारं सर्वसम्पदाम् ।
इत्येवमुक्त्वा सा देवी तस्मै तद्बालकं ददौ ॥ ४१ ॥
राजा चकार स्वीकारं पूजार्थं च प्रियव्रतः ।
जगाम देवी स्वर्गं च दत्त्वा तस्मै शुभं वरम् ॥ ४२ ॥
आजगाम सहामात्यः स्वगृहं हृष्टमानसः ।
आगत्य कथयामास वृत्तान्तं पुत्रहेतुकम् ॥ ४३ ॥
श्रुत्वा बभूवुः सन्तुष्टा नरा नार्यश्च नारद ।
मङ्गलं कारयामास सर्वत्र पुत्रहेतुकम् ॥ ४४ ॥
देवीं च पूजयामास ब्राह्मणेभ्यो धनं ददौ ।
राजा च प्रतिमासेषु शुक्लषष्ठ्यां महोत्सवम् ॥ ४५ ॥
षष्ट्या देव्याश्च यत्नेन कारयामास सर्वतः ।
बालानां सूतिकागारे षष्ठाहे यत्नपूर्वकम् ॥ ४६ ॥
तत्पूजां कारयामास चैकविंशतिवासरे ।
बालानां शुभकार्ये च शुभान्नप्राशने तथा ॥ ४७ ॥
सर्वत्र वर्धयामास स्वयमेव चकार ह ।
ध्यानं पूजाविधानं च स्तोत्रं मत्तो निशामय ॥ ४८ ॥
यच्छ्रुतं धर्मवक्त्रेण कौथुमोक्तं च सुव्रत ।
शालग्रामे घटे वाथ वटमूलेऽथवा मुने ॥ ४९ ॥
भित्त्यां पुत्तलिकां कृत्वा पूजयेद्वा विचक्षणः ।
षष्ठांशां प्रकृतेः शुद्धां प्रतिष्ठाप्य च सुप्रभाम् ॥ ५० ॥
सुपुत्रदां च शुभदा दयारूपां जगत्प्रसूम् ।
श्वेतचम्पकवर्णाभां रत्नभूषणभूषिताम् ॥ ५१ ॥
पवित्ररूपां परमां देवसेनां परां भजे ।
इति ध्यात्वा स्वशिरसि पुष्पं दत्त्वा विचक्षणः ॥ ५२ ॥
पुनर्ध्यात्वा च मूलेन पूजयेत्सुव्रतां सतीम् ।
पाद्यार्घ्याचमनीयैश्च गन्धपुष्पप्रदीपकैः ॥ ५३ ॥
नैवेद्यैर्विविधैश्चापि फलेन शोभनेन च ।
ॐ ह्रीं षष्ठीदेव्यै स्वाहेति विधिपूर्वकम् ॥ ५४ ॥
अष्टाक्षरं महामन्त्रं यथाशक्ति जपेन्नरः ।
ततः स्तुत्वा च प्रणमेद्भक्तियुक्तः समाहितः ॥ ५५ ॥
स्तोत्रं च सामवेदोक्तं वरं पुत्रफलप्रदम् ।
अष्टाक्षरं महामन्त्रं लक्षधा यो जपेत्ततः ॥ ५६ ॥
सुपुत्रं स लभेन्नूनमित्याह कमलोद्भवः ।
स्तोत्रं शृणु मुनिश्रेष्ठ सर्वकामशुभावहम् ॥ ५७ ॥
वाञ्छाप्रदं च सर्वेषां गूढं वेदेषु नारद ।
नमो देव्यै महादेव्यै सिद्ध्यै शान्त्यै नमो नमः ॥ ५८ ॥
शुभायै देवसेनायै षष्ठ्यै देव्यै नमो नमः ।
वरदायै पुत्रदायै धनदायै नमो नमः ॥ ५९ ॥
सुखदायै मोक्षदायै षष्ठ्यै देव्यै नमो नमः ।
सृष्ट्यै षष्ठांशरूपायै सिद्धायै च नमो नमः ॥ ६० ॥
मायायै सिद्धयोगिन्यै षष्ठीदेव्यै नमो नमः ।
सारायै शारदायै च परादेव्यै नमो नमः ॥ ६१ ॥
बालाधिष्ठातृदेव्यै च षष्ठीदेव्यै नमो नमः ।
कल्याणदायै कल्याण्यै फलदायै च कर्मणाम् ॥ ६२ ॥
प्रत्यक्षायै स्वभक्तानां षष्ठ्यै देव्यै नमो नमः ।
पूज्यायै स्कन्दकान्तायै सर्वेषां सर्वकर्मसु ॥ ६३ ॥
देवरक्षणकारिण्यै षष्ठीदेव्यै नमो नमः ।
शुद्धसत्त्वस्वरूपायै वन्दितायै नृणां सदा ॥ ६४ ॥
हिंसाक्रोधवर्जितायै षष्ठीदेव्यै नमो नमः ।
धनं देहि प्रियां देहि पुत्रं देहि सुरेश्वरि ॥ ६५ ॥
मानं देहि जयं देहि द्विषो जहि महेश्वरि ।
धर्मं देहि यशो देहि षष्ठीदेव्यै नमो नमः ॥ ६६ ॥
देहि भूमिं प्रजां देहि विद्यां देहि सुपूजिते ।
कल्याणं च जयं देहि षष्ठीदेव्यै नमो नमः ॥ ६७ ॥
इति देवीं च संस्तूय लेभे पुत्रं प्रियव्रतः ।
यशस्विनं च राजेन्द्रः षष्ठीदेव्याः प्रसादतः ॥ ६८ ॥
षष्ठीस्तोत्रमिदं ब्रह्मन् यः शृणोति तु वत्सरम् ।
अपुत्रो लभते पुत्रं वरं सुचिरजीविनम् ॥ ६९ ॥
वर्षमेकं च यो भक्त्या सम्पूज्येदं शृणोति च ।
सर्वपापाद्विनिर्मुक्तो महावन्ध्या प्रसूयते ॥ ७० ॥
वीरं पुत्रं च गुणिनं विद्यावन्तं यशस्विनम् ।
सुचिरायुष्यवन्तं च सूते देवीप्रसादतः ॥ ७१ ॥
काकवन्ध्या च या नारी मृतवत्सा च या भवेत् ।
वर्षं श्रुत्वा लभेत्पुत्रं षष्ठीदेवीप्रसादतः ॥ ७२ ॥
रोगयुक्ते च बाले च पिता माता शृणोति चेत् ।
मासेन मुच्यते बालः षष्ठीदेवीप्रसादतः ॥ ७३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे नारायणनारदसंवादे
षष्ठ्युपाख्यानवर्णनं नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः ॥ ४६ ॥
षष्ठी देवीचे आख्यान -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारद म्हणाले, "हे मुने, आता इतर देवींची चरित्रे सांगा."
नारायण म्हणाले, "वेदात देवतांची वेगवेगळी चरित्रे सांगितली आहेत. तुला कोणत्या देवीचे चरित्र ऐकायचे आहे ?"
नारद म्हणाले, "षष्ठी, मंगलचंडी, मनसा ह्या प्रकृतीच्या कला आहेत. म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे."
श्री नारायण म्हणाले, "प्रकृतीच्या सहाव्या अंशात्मक देवीला षष्ठी म्हणतात. ती विष्णूची माया असून बालकांची अधिष्ठात्री देवता आहे. षोडश मातृकातील ती प्रसिद्ध देवी आहे. ती देवसेना या नावाने प्रसिद्ध असून स्कंदाची प्रिय व सदाचरणी भार्या आहे. बालकांना आयुष्य देणारी, त्यांचे पालन-रक्षण व पोषण करणारी ती सिद्धयोगिनी आहे. आता तिचा पूजा विधी ऐक.
स्वयंभुव मनूचा पुत्र प्रियव्रताने भार्येचा स्वीकार न करता तो तपश्चर्या करू लागला. पण ब्रह्मदेवाच्या आज्ञेमुळेच त्याने नाईलाजाने विवाह केला. विवाहानंतर बराच कालावधी गेला. तरी त्यांना पुत्र झाला नाही. म्हणून कश्यपाने त्याला पुत्रकामेष्ठी यज्ञ करण्यास लावले. प्रियव्रताने आपली भार्या मालिनी हिला यज्ञाचा चरू भक्षण करण्यास सांगितले. पुढे तिला गर्भ राहिला. देवांची बारा वर्षे तिने तो गर्भ धारण केला.
पुढे यथावकाश तिने एका सुवर्णकांती असलेल्या बालकास जन्म दिला. पण दुर्दैवाने ते बालक जन्मतःच मरण पावले. त्यामुळे त्याचे सर्व आप्तेष्ट दुःखाकुल झाले. माता अतीव दुःखामुळे मूर्च्छित पडली. राजाने बालकाला स्मशानभूमीवर नेले. पण तेथे अनिवार दुःखामुळे त्याने बालकाला हृदयाशी कवटाळले. राजा मृत पुत्राला सोडण्यास तयार होईना. अखेर तो स्वतःच प्राण देण्यास सिद्ध झाला. त्याचवेळी स्फटिकाप्रमाणे शुद्ध, मण्यांनी विभूषित, तेजस्वी, रेशमी वस्त्राने विभूषित असलेले सुंदर व सचित्र पुष्पमाला धारण केलेले उत्कृष्ट विमान राजाला दिसले. अत्यंत सुंदर अशी भगवती देवी विमानात विराजमान झाली होती. पांढर्या चाफ्याप्रमाणे शुभ्र वर्णाची, चिरयौवना, प्रसन्न चेहर्याची, दयाळू, भक्तानुग्रही अशा त्या देवीला अवलोकन करताच राजाने हात जोडले. तो तिची स्तुती करू लागला. त्याने आपल्या मृत पुत्रास भूमीवर ठेवले व भगवतीचे पूजन केले.
तेव्हा ती महातेजस्वी स्कंदभार्या प्रसन्न झाली. राजा म्हणाला, "हे सुंदरी, तू आहेस तरी कोण ? तू धन्य व मान्य आहेस. तू कोणाची कन्या आहेस ?"
ती देवी पूर्वी देवांच्या सेनेची प्रमुख होती. तिनेच देवांना विजय प्राप्त करून दिला. म्हणून तिला देवसेना म्हणतात. ती जगन्मंगलरूप चंडिका देवसेना म्हणाली, "मीच ब्रह्मदेवाची मानसकन्या देवसेना आहे. उत्पन्न होताच मला पित्याने स्कंदास अर्पण केले. मीच षष्ठी या नावाने प्रसिद्ध आहे. मी प्रकृतीच्या सहाव्या अंशाची कला असून मी निपुत्रिकाला पुत्र देते. मी पुरुषाचे मनोरथ पूर्ण करते, दरिद्र्यांना धन व कर्माचे फल देत असते. हे राजा, सुख, दुःख, हर्ष, खेद वगैरे सर्व कर्मामुळे प्राप्त होत असतात. पुत्र होणे, न होणे अथवा पुत्राचा मृत्यु होणे या सर्व घटना कर्मामुळेच घडत असतात. कोणतीही संकटे, आपत्ती ही कर्मामुळेच प्राप्त होतात." असे म्हणून देवीने त्या मृत बालकाला हातात घेतले व त्याला सहज जिवंत केले. तेव्हा त्या हसतमुख पुत्रास पाहून राजाला अपार आनंद झाला. पण त्या बालकाला घेऊनच ती देवी विमानातून निघून जाऊ लागली. ते पाहून राजा हृदयव्याकुळ झाला. नंतर राजाने तिचे स्तवन केले. त्यामुळे देवी संतुष्ट होऊन राजाला म्हणाली, " हे राजा, तू तिन्ही लोकांचा राजा आहेस. म्हणून तू सर्वांना माझी विधिपूर्वक पूजा करण्यास सांग. तसेच तूही माझे पूजन कर. त्यामुळे तुला बलदंड पुत्र होईल. हा पुत्र नारायणाचा अंश आहे. त्याला पूर्व जन्माचे स्मरण असून हा अत्यंत पंडित आहे. शिवाय याच्या अंगी एक लक्ष हत्तीचे बळ आहे. मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झाले आहे. म्हणूनच धनवान, गुणवान, शुद्ध, विद्वान, प्रिय, ज्ञानी,
यशस्वी व संपत्तीदायी असा हा पुत्र तुला मी दिला आहे."
असे म्हणून देवीने त्या बालकाला राजाचे स्वाधीन केले. राजाने तिची पूजा करण्याचे वचन दिल्यावर राजाला अनेक वर देऊन देवी स्वर्गलोकी निघून गेली. राजाही आपल्या अमात्य व मंत्र्यांसह राजवाडयात परत आला. पुत्र जिवंत झाल्यामुळे राजाची भार्या व इतर आप्त सर्वजण आनंदित झाले. नंतर राजाने पुत्राचा जन्मोत्सव केला. ब्राह्मणांना विपुल दक्षिणा देऊन त्याने दरमहा शुक्ल षष्ठीस प्रजेकडून षष्ठीदेवीचा महोत्सव केला. सूतिकागृहात बालकाच्या जन्मानंतर सहाव्या दिवशी व एकविसाव्या दिवशी तिचे पूजन करण्यास सुरुवात केली. बालकाच्या सर्व शुभकर्माचे दिवशी त्याने सर्वांकडून षष्ठीचे पूजन करविले व स्वतःही पूजन केले.
हे नारदा, देवीचे कौमुदशाखेत सांगितलेले ध्यान व पूजाविधी स्तोत्रासह तुला सांगतो.
शालग्राम, घट, वटवृक्ष, अथवा भिंतीवर पुतळी काढून त्या ठिकाणी तिची कल्पना करावी व तिचे पूजन करावे.
"जिची कांती श्वेत चंपकाप्रमाणे आहे, विविध रत्नांनी जी विभूषित आहे अशा या श्रेष्ठ देवसेनेची मी पूजा करतो."
असे म्हणून पूजेच्या निर्माल्यातील पुण्य स्वतःच्या मस्तकावर धारण करून तिचे ध्यान करावे. नंतर व्रतस्थ राहून मूलमंत्रोक्त पाद्य, अर्घ्य, आचमन, गंध, पुष्प, धूप, दीप, निरनिराळ्या प्रकारचे नैवेद्य, मधुर फळे वगैरे उपचारांनी तिचे पूजन करावे.
"ॐ र्हीं षष्ठीदेव्यै स्वाहा ।"
अशा अष्टाक्षरी मंत्राचा जप करावा. तिची स्तुती करून तिला नमस्कार करावा. सामवेदोक्त तिचे स्तोत्र म्हणावे. नंतर अष्टाक्षरी महामंत्राचा लक्ष जप करावा. म्हणजे त्यामुळे पुत्रप्राप्ती होते. आता सर्व शुभकामना पूर्ण करणारे तिचे स्तोत्र सांगतो.
प्रियव्रत म्हणाला, "महादेवी, शांतस्वरूपिणी, सिद्धी अशा देवीला माझा नमस्कार असो. त्या शुभ व षष्ठी नावाच्या देवसेनादेवीस माझा नमस्कार असो. वरदायिनी, पुत्रदायिनी, धनदायिनी अशा देवीला नमस्कार असो. सुखदा, मोक्षदा, अशा स्कंदपत्नीस प्रणाम असो. सृष्टीरूप, प्रकृतीचा सहावा अंश असलेल्या अशा सिद्ध ईश्वरीस मी वंदन करतो. माया व सिद्धयोगिनी अशा देवी षष्ठीस मी नमस्कार करतो. साररूप शारदा नावाच्या देवीस माझे वंदन असो. बलांची अधिदेवता, कल्याणी, कर्मफलदायिनी षष्ठी देवीस मी नमस्कार करतो.
भक्ताला प्रत्यक्ष दर्शन देणारी, सर्व कर्मांना पूज्य असलेल्या स्कंद भार्येस माझा प्रणाम असो. हे देवांचेही संरक्षण करणार्या षष्ठीदेवी, तुला माझा नमस्कार असो, शुद्ध सत्त्वरूप, सर्वांस वंद्य, हिंसा व क्रोध यांचा त्याग केलेली अशी जी देवी षष्ठी, त्या देवीला मी लोटांगण घालतो. हे सुरेश्वरी, मला धन, स्त्री, पुत्र, मान, जय इत्यादी प्राप्त करून दे. हे महेश्वरी, माझ्या शत्रूचा नाश कर. यशदायिनी षष्ठी देवी, माझा तुला नमस्कार असो." अशी प्रियव्रताने देवीची स्तुती केली. तेव्हा देवीच्या प्रसादामुळे त्याला पुत्रलाभ झाला. हे षष्ठीचे स्तोत्र जो वर्षभर श्रवण करतो, त्याला चिरंजीव पुत्र प्राप्त होतो. तसेच एक वर्ष तिची पूजा करून हे स्तोत्र श्रवण केल्यास पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतो. महावांझ पत्नी असली तरी देवीच्या भक्तास पुत्रलाभ होतो. शूर, गुणी, धनवान, रूपवान, दीर्घायुषी असा सर्वलक्षणसंपन्न पुत्र देवीच्या प्रसादाने प्राप्त होतो.
काकवंध्या, मृतवांझ स्त्रीलाही षष्ठीच्या सेवेने सुपुत्र होतो. रोगग्रस्त बालकाच्या पित्याने अथवा मातेने हे स्तोत्र श्रवण केल्यास ते बालक एक महिन्यात निरोगी होते."