श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
सप्तविंशोऽध्यायः


सावित्र्युपाख्याने यमसावित्रीसंवादवर्णनम्

श्रीनारायण उवाव
स्तुत्वानेन सोऽश्वपतिः सम्पूज्य विधिपूर्वकम् ।
ददर्श तत्र तां देवीं सहस्रार्कसमप्रभाम् ॥ १ ॥
उवाच सा च राजानं प्रसन्ना सस्मिता सती ।
यथा माता स्वपुत्रं च द्योतयन्ती दिशस्त्विषा ॥ २ ॥
सावित्र्युवाच
जानाम्यहं महाराज यत्ते मनसि वाञ्छितम् ।
वाञ्छितं तव पत्‍न्याश्च सर्वं दास्यामि निश्चितम् ॥ ३ ॥
साध्वी कन्याभिलाषं च करोति तव कामिनी ।
त्वं प्रार्थयसि पुत्रं च भविष्यति क्रमेण च ॥ ४ ॥
इत्युक्त्वा सा तदा देवी ब्रह्मलोकं जगाम ह ।
राजा जगाम स्वगृहं तत्कन्याऽऽदौ बभूव ह ॥ ५ ॥
आराधनाच्च सावित्र्या बभूव कमला परा ।
सावित्रीति च तन्नाम चकाराश्वपतिर्नृपः ॥ ६ ॥
कालेन सा वर्धमाना बभूव च दिने दिने ।
रूपयौवनसम्पन्ना शुक्ले चन्द्रकला यथा ॥ ७ ॥
सा वरं वरयामास द्युमत्सेनात्मजं तदा ।
सत्यवन्तं सत्यशीलं नानागुणसमन्वितम् ॥ ८ ॥
राजा तस्मै ददौ तां च रत्‍नभूषणभूषिताम् ।
सोऽपि सार्धं कौतुकेन तां गृहीत्वा गृहं ययौ ॥ ९ ॥
स च संवत्सरेऽतीते सत्यवान् सत्यविक्रमः ।
जगाम फलकाष्ठार्थं प्रहर्षं पितुराज्ञया ॥ १० ॥
जगाम साध्वी तत्पश्चात्सावित्री दैवयोगतः ।
निपत्य वृक्षाद्दैवेन प्राणांस्तत्याज सत्यवान् ॥ ११ ॥
यमस्तं पुरुषं दृष्ट्वा बद्ध्वाङ्‌गुष्ठसमं मुने ।
गृहीत्वा गमनं चक्रे तत्पश्चात्प्रययौ सती ॥ १२ ॥
पश्चात्तां सुदतीं दृष्ट्वा यमः संयमनीपतिः ।
उवाच मधुरं साध्वीं साधूनां प्रवरो महान् ॥ १३ ॥
धर्मराज उवाच
अहो क्व यासि सावित्रि गृहीत्वा मानुषीं तनुम् ।
यदि यास्यसि कान्तेन सार्धं देहं तदा त्यज ॥ १४ ॥
गन्तुं मर्त्यो न शक्नोति गृहीत्वा पाञ्चभौतिकम् ।
देहं च मम लोकं च नश्वरं नश्वरः सदा ॥ १५ ॥
भर्तुस्ते पूर्णकालो वै बभूव भारते सति ।
स्वकर्मफलभोगार्थं सत्यवान् याति मद्‌गृहम् ॥ १६ ॥
कर्मणा जायते जन्तुः कर्मणैव प्रलीयते ।
सुखं दुःखं भयं शोकः कर्मणैव प्रणीयते ॥ १७ ॥
कर्मणेन्द्रो भवेज्जीवो ब्रह्मपुत्रः स्वकर्मणा ।
स्वकर्मणा हरेर्दासो जन्मादिरहितो भवेत् ॥ १८ ॥
स्वकर्मणा सर्वसिद्धिममरत्वं लभेद्‌ ध्रुवम् ।
लभेत्स्वकर्मणा विष्णोः सालोक्यादिचतुष्टयम् ॥ १९ ॥
सुरत्वं च मनुत्वं च राजेन्द्रत्वं लभेन्नरः ।
कर्मणा च शिवत्वं च गणेशत्वं तथैव च ॥ २० ॥
कर्मणा च मुनीन्द्रत्वं तपस्वित्वं स्वकर्मणा ।
स्वकर्मणा क्षत्रियत्वं वैश्यत्वं च स्वकर्मणा ॥ २१ ॥
कर्मणैव च म्लेच्छत्वं लभते नात्र संशयः ।
स्वकर्मणा जङ्‌गमत्वं शैलत्वं च स्वकर्मणा ॥ २२ ॥
कर्मणा राक्षसत्वं च किन्नरत्वं स्वकर्मणा ।
कर्मणैवाधिपत्यं च वृक्षत्वं च स्वकर्मणा ॥ २३ ॥
कर्मणैव पशुत्वं च वनजीवी स्वकर्मणा ।
कर्मणा क्षुद्रजन्तुत्वं कृमित्वं च स्वकर्मणा ॥ २४ ॥
दैतेयत्वं दानवत्वमसुरत्वं स्वकर्मणा ।
इत्येतदुक्त्वा सावित्रीं विरराम स वै यमः ॥ २५ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे सावित्र्युपाख्याने
यमसावित्रीसंवादवर्णनं नाम सप्तविंशोऽध्यायः ॥ २७ ॥


सत्यवानाचा मृत्यू -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

असे तिचे स्तवन करून विधीपूर्वक पूजा केल्यावर सहस्र सूर्याइतकी तेजस्वी असलेल्या सावित्रीला त्याने पाहिले. स्वतेजाने दिशांना प्रकाशित करीत हास्यमुखी ती वेदमाता राजास म्हणाली,

"हे राजा, तुझे वांच्छित मला समजले आहे. तुझ्या पत्नीची इच्छाही मी पूर्ण करीन. पण तुझ्या पत्नीला कन्या हवी आहे व तुला पुत्र हवा आहे. तुम्हाला दोन्हीही योग्य वेळी प्राप्त होतील." असा वर देऊन ती स्वस्थानी गेली.

कालांतराने राजाला कन्या झाली. ती लक्ष्मीप्रमाणे सुंदर होती. अश्वपतीने तिचे नाव सावित्री ठेवले. पुढे तिला यौवन प्राप्त झाल्यावर द्युमत्सेनाचा पुत्र पती लाभावा असे तिला वाटू लागले.

त्याचे नाव सत्यवान होते. तो सत्त्वशील होता. अश्वपतीने सत्यवानाला सावित्री अर्पण केली. वर्षानंतर एकदा सत्यवानाला पित्याने फळे व लाकडे आणण्यास सांगितले. म्हणून तो अरण्यात गेला. सावित्रीही बरोबर गेली होती, पण झाडावरून पडल्यामुळे सत्यवानास मृत्यू आला. यम त्याला बांधून नेऊ लागला. तेव्हा सावित्री मागोमाग
गेली. यम संयमनी नगरीचा स्वामी होता. त्याने आपल्या मागे येणार्‍या त्या सुंदरीला पाहिले. तेव्हा त्या साध्वीस तो म्हणाला, "सावित्री तू मानव शरीर घेऊन कोठे निघाली आहेस ? पतीबरोबर येत असल्यास देह सोडावा लागेल. कारण या नश्वर देहाने स्वर्गात जाणे अशक्य आहे. तुझ्या पतीचे आयुष्य संपले आहे. आपल्या कर्माचे फल भोगण्यासाठी तो माझ्या गृही जात आहे.

सुख, दुःख, भय, शोक हे सर्व कर्मामुळे अनुभवास येते. जीव हा कर्मामुळे इंद्रपद अथवा ब्रह्मपुत्रत्व प्राप्त करून घेतो. हरीसेवा करून मुक्त होतो.

योग्य, उत्तम सिद्धीमुळे अमरत्व प्राप्त होते. स्वकर्मानेच विष्णूलोक मिळतो. कर्मवंशात पुरुषाला देवत्व, मनुष्यत्व अथवा राजप्राप्ती होते, तसेच शिवत्व व गणेशत्त्व प्राप्त होते. तपाने सर्व मिळते. क्षत्रियत्व, वैश्यत्व, म्लेंच्छत्त्व, जंगमत्त्व, शैलत्त्व, राक्षसत्त्व, किन्नरत्त्व, पशुत्व, भिल्लत्त्व या सर्व कर्मपरत्त्वे प्राप्त होतात.

कर्मामुळेच क्षुद्रजंतुत्व, कृमित्व, दैत्यत्त्व हेही प्राप्त होत असतात." असे यमाने सावित्रीस सांगितले व तो स्तब्ध झाला.


अध्याय सत्ताविसावा समाप्त

GO TOP