श्रीनारायण उवाच
यमस्य वचनं श्रुत्वा सावित्री च पतिव्रता ।
तुष्टाव परया भक्त्या तमुवाच मनस्विनी ॥ १ ॥
सावित्र्युवाच
किं कर्म तद्भवेत्केन को वा तद्धेतुरेव च ।
को वा देही च देहः कः को वात्र कर्मकारकः ॥ २ ॥
किं वा ज्ञानं च बुद्धिः का को वा प्राणः शरीरिणाम् ।
कानीन्द्रियाणि किं तेषां लक्षणं देवताश्च काः ॥ ३ ॥
भोक्ता भोजयिता को वा को वा भोगश्च निष्कृतिः ।
को जीवः परमात्मा कस्तन्मे व्याख्यातुमर्हसि ॥ ४ ॥
धर्म उवाच
वेदप्रणिहितो धर्मः कर्म यन्मङ्गलं परम् ।
अवैदिकं तु यत्कर्म तदेवाशुभमेव च ॥ ५ ॥
अहैतुकी देवसेवा संकल्परहिता सती ।
कर्मनिर्मूलरूपा च सा एव परभक्तिदा ॥ ६ ॥
को वा कर्मफलं भुङ्क्ते को वा निर्लिप्त एव च ।
ब्रह्मभक्तो यो नरश्च स च मुक्तः श्रुतः श्रुतौ ॥ ७ ॥
जन्ममृत्युजराव्याधिशोकभीतिविवर्जितः ।
भक्तिश्च द्विविधा साध्वि श्रुत्युक्ता सर्वसम्मता ॥ ८ ॥
निर्वाणपददात्री च हरिरूपप्रदा नृणाम् ।
हरिरूपस्वरूपां च भक्तिं वाञ्छन्ति वैष्णवाः ॥ ९ ॥
अन्ये निर्वाणमिच्छन्ति योगिनो ब्रह्मवित्तमाः ।
कर्मणो बीजरूपश्च सततं तत्फलप्रदः ॥ १० ॥
कर्मरूपश्च भगवान्परात्मा प्रकृतिः परा ।
सोऽपि तद्धेतुरूपश्च देहो नश्वर एव च ॥ ११ ॥
पृथिवी वायुराकाशो जलं तेजस्तथैव च ।
एतानि सूत्ररूपाणि सृष्टिरूपविधौ सतः ॥ १२ ॥
कर्मकर्ता च देही च आत्मा भोजयिता सदा ।
भोगो विभवभेदश्च नित्कृतिर्मुक्तिरेव च ॥ १३ ॥
सदसद्भेदबीजं च ज्ञानं नानाविधं भवेत् ।
विषयाणां विभागानां भेदि बीजं च कीर्तितम् ॥ १४ ॥
बुद्धिर्विवेचना सा च ज्ञानबीजं श्रुतौ श्रुतम् ।
वायुभेदाश्च प्राणाश्च बलरूपाश्च देहिनाम् ॥ १५ ॥
इन्द्रियाणां च प्रवरमीश्वरांशमनूहकम् ।
प्रेरकं कर्मणां चैव दुर्निवार्यं च देहिनाम् ॥ १६ ॥
अनिरूप्यमदृश्यं च ज्ञानभेदो मनः स्मृतम् ।
लोचनं श्रवणं घ्राणं त्वक्च रसनमिन्द्रियम् ॥ १७ ॥
अङ्गिनामङ्गरूपं च प्रेरकं सर्वकर्मणाम् ।
रिपुरूपं मित्ररूपं सुखरूपं च दुःखदम् ॥ १८ ॥
सूर्यो वायुश्च पृथिवी ब्रह्माद्या देवताः स्मृताः ।
प्राणदेहादिभृद्यो हि स जीवः परिकीर्तितः ॥ १९ ॥
परमं व्यापकं ब्रह्म निर्गुणः प्रकृतेः परः ।
कारणं कारणानां च परमात्मा स उच्यते ॥ २० ॥
इत्येवं कथितं सर्वं त्वया पृष्टं यथागमम् ।
ज्ञानिनां ज्ञानरूपं च गच्छ वत्से यथासुखम् ॥ २१ ॥
सावित्र्युवाच
त्यक्त्वा क्व यामि कान्तं वा त्वां वा ज्ञानार्णवं ध्रुवम् ।
यद्यत्करोमि प्रश्नं च तद्भवान्वक्तुमर्हति ॥ २२ ॥
कां कां योनिं याति जीवः कर्मणा केन वा पुनः ।
केन वा कर्मणा स्वर्गं केन वा नरकं पितः ॥ २३ ॥
केन वा कर्मणा मुक्तिः केन भक्तिर्भवेद् गुरौ ।
केन वा कर्मणा योगी रोगी वा केन कर्मणा ॥ २४ ॥
केन वा दीर्घजीवी च केनाल्पायुश्च कर्मणा ।
केन वा कर्मणा दुःखी सुखी वा केन कर्मणा ॥ २५ ॥
अङ्गहीनश्च काणश्च बधिरः केन कर्मणा ।
अन्धो वा पङ्गुरपि वा प्रमत्तः केन कर्मणा ॥ २६ ॥
क्षिप्तोऽतिलुब्धकश्चौरः केन वा कर्मणा भवेत् ।
केन सिद्धिमवाप्नोति सालोक्यादिचतुष्टयम् ॥ २७ ॥
केन वा ब्राह्मणत्वं च तपस्वित्वं च केन वा ।
स्वर्गभोगादिकं केन वैकुण्ठं केन कर्मणा ॥ २८ ॥
गोलोकं केन वा ब्रह्मन् सर्वोत्कृष्टं निरामयम् ।
नरको वा कतिविधः किंसंख्यो नाम किं च वा ॥ २९ ॥
को वा कं नरकं याति कियन्तं तेषु तिष्ठति ।
पापिनां कर्मणा केन को वा व्याधिः प्रजायते ।
यद्यत्प्रियं मया पृष्टं तन्मे व्याख्यातुमर्हसि ॥ ३० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे नारायणनारदसवादे सावित्र्युपाख्याने
यमसावित्रीसंवादवर्णनं नामाष्टाविंशोऽध्यायः ॥ २८ ॥
सावित्री यमाला प्रश्न विचारते -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
ते ऐकून सावित्री स्तुतीपूर्वक शब्दात यमाला म्हणाली, "कर्माचे स्वरूप कोणते ? त्याचे निमित्त व कारण काय ? देह कोण ? देहात कोण अभिमानाने राहतो ? कोण कर्माचा कर्ता ? मुक्तीप्रत ज्ञान कोणते ? प्राण कोणता ? इंद्रियांचे लक्षण काय ? त्यांच्या देवता कोण ? तसेच जीव परमात्मा मा विषयी मला विस्ताराने सांगा."
यमधर्म म्हणाला, "वेदांनी सांगितलेले कर्मच मंगल असते. इतर कर्मे अशुभ होत. कामनाविरहित सेवा श्रेष्ठ होय. संकल्पाशिवाय कर्म केल्यास कर्माचा नाश होतो. तीच भक्ती श्रेष्ठ होय. थोडक्यात असे की वेदोक्त कर्म निष्काम मनाने करावे. कर्मे ईश्वराला अर्पण केल्यास उत्तम फळ मिळते.
ब्रह्मभक्त पुरुष मुक्त होतो. परमतत्त्वांचा साक्षात्कार झाल्यावर जन्ममरण हे विकार उद्भवत नाहीत. भक्ती दोन प्रकारची आहे. ती श्रुतींनी सांगितल्यामुळे सर्वमान्य आहे. पैकी एक भक्ती हरीरूप प्राप्त करून देते. निर्गुण भक्ती आत्मविषयक असून सगुण भक्ती ब्रह्मविषयक आहे. विष्णुभक्त सगुण भक्ती करतात.
निर्गुण परमात्मा नित्य फल देतो, म्हणून त्याला संतुष्ट करावे. सृष्टी, स्थिती व लय हे कर्मरूप देवच करीत असतात. परमात्मा हीच श्रेष्ठ प्रकृती आहे. ती सर्वांचे कारण आहे. पण देह नश्वर आहे.
पृथ्वी, जल, वायु, तेज, आकाश हे सूत्ररूप आहेत. कर्म करणार्यास देही म्हणतात. तोच भोक्ता आहे. तसेच तो भोगविता आहे. सुखदुःखाची प्रतीती म्हणजेच भोग होय. सद्रूप आत्मा, असद्रूप मायाकार्य यांच्या विवेकाचे कारण म्हणजेच ज्ञान. ते विविध स्वरूपाचे आहे. विषयांचे विभाग करणारे ते बीज होत, विवेकशक्ती म्हणजेच बुद्धी, बुद्धी हेच ज्ञानाचे बीज होय.
वायूचे भेद म्हणजे प्राण. जीव, प्राण्यांचे बल हे प्राणावर अवलंबून असते. इंद्रियात
उत्तम असलेले, ईश्वरांश, कर्माचे प्रेरक, अनिवार्य असे, तसेच अवर्णनीय असे जे ते ज्ञान होय. ते अदृश्य आहे.
नेत्र, श्रोत्र, घ्राण, त्वक, रसना ही पाच ज्ञानेंद्रिये होत. ती अंगरूप असून कर्माची प्रेरक आहेत. हे ज्ञानपंचक विषयासक्त असते. त्यांचा असत् विषयांशी संयोग झाल्यास दुःखदायक असते. सूर्य, वायू, पृथ्वी, ब्रह्मदेव ह्या त्यांच्या देवता आहेत.
प्राण व देह धारण करणार्यास जीव म्हणतात. ब्रह्म व्यापक श्रेष्ठ, प्रकृतीहून निराळे व निर्गुण आहे त्यालाच परमात्मा म्हणतात. तेच कारणांचे कारण होय. हे सावित्री, हे सर्व तुला सांगितले. आता तू घरी जा."
सावित्री म्हणाली, "पतीला सोडून मी जाऊ कुठे ? तसेच तुझ्यासारख्या ज्ञानसागराला टाकून दुसरीकडे कशी जाऊ ? कारण माझ्या प्रश्नांचे उत्तर देण्यास तूच समर्थ आहेस. हे पित्या, कर्मानुसार जीव कोणत्या योनीत जातो ? कुठले कर्म मुक्तीप्रद आहे ? स्वर्ग व नरक कोणत्या कर्मामुळे मिळतो ? प्राणी, योगी अथवा रोगी कशामुळे होतो ? तो दीर्घायुषी कशाने होतो ? जीव अल्पायुषी का होतो ?
तो सुखी वा दुःखी कोणत्या कर्मामुळे होतो ? अंगहीन, काणा, बहिरा, अंध, पंगू उन्मत्त का होतो ? प्राणी विक्षिप्त, चोर, लुब्धक कसा होतो ? प्राण्याला चार प्रकारच्या मुक्ती कोणत्या कर्मामुळे प्राप्त होतात ? ब्राह्मणत्त्व, मुनीत्व, स्वर्गादि भोग, वैकुंठ हे सर्व प्राण्याला कोणत्या कर्मामुळे मिळते ? तसेच गोलोक केव्हा प्राप्त होतो ? नरक किती व कसे आहेत ? त्यांची नावे कोणती ? तसेच कोणता नरक मिळतो ? कोणत्या पापामुळे व्याधी उद्भवतात ? हे ब्रह्मन्, याविषयी मला विस्ताराने कथन करा. हे सांगण्यास आपणच समर्थ आहात."