श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
दशमोऽध्यायः


पृथिव्युपाख्याने नरकफलप्राप्तिवर्णनम्

नारद उवाच
भूमिदानकृतं पुण्यं पापं तद्धरणेन च ।
परभूहरणात्पापं परकूपे खनने तथा ॥ १ ॥
अम्बुवाच्यां भूखनने वीर्यस्य त्याग एव च ।
दीपादिस्थापनात्पापं श्रोतुमिच्छामि यत्‍नतः ॥ २ ॥
अन्यद्वा पृथिवीजन्यं पापं यत्पृच्छते परम् ।
यदस्ति तत्प्रतीकारं वद वेदविदांवर ॥ ३ ॥
श्रीनारायण उवाच
वितस्तिमात्रभूमिं च यो ददाति च भारते ।
सन्ध्यापूताय विप्राय स याति शिवमन्दिरम् ॥ ४ ॥
भूमिं च सर्वसस्याढ्यां ब्राह्मणाय ददाति च ।
भूमिरेणुप्रमाणाब्दमन्ते विष्णुपदे स्थितिः ॥ ५ ॥
ग्रामं भूमिं च धान्यं च ब्राह्मणाय ददाति यः ।
सर्वपापाद्विनिर्मुक्तौ चोभौ देवीपुरःस्थितौ ॥ ६ ॥
भूमिदानं च तत्काले यः साधुश्चानुमोदते ।
स च प्रयाति वैकुण्ठे मित्रगोत्रसमन्वितः ॥ ७ ॥
स्वदत्तां परदत्तां वा ब्रह्मवृत्तिं हरेत्तु यः ।
स तिष्ठति कालसूत्रे यावच्चन्द्रदिवाकरौ ॥ ८ ॥
तत्युत्रपौत्रप्रभृतिर्भूमिहीनः श्रिया हतः ।
पुत्रहीनो दरिद्रश्च घोरं याति च रौरवम् ॥ ९ ॥
गवां मार्गं विनिष्कृष्य यश्च सस्यं ददाति च ।
दिव्यं वर्षशतं चैव कुम्भीपाके च तिष्ठति ॥ १० ॥
गोष्ठं तडागं निष्कृष्य मार्गे सस्यं ददाति यः ।
स तिष्ठत्यसिपत्रे च यावदिन्द्राश्चतुर्दश ॥ ११ ॥
पञ्चपिण्डाननुद्धृत्य परकूपे च स्नाति यः ।
प्राप्नोति नरकं चैव स्नानं निष्फलमेव च ॥ १२ ॥
कामी भूमौ च रहसि वीर्यत्यागं करोति यः ।
भूमिरेणुप्रमाणं च वर्षं तिष्ठति रौरवे ॥ १३ ॥
अम्बुवाच्यां भूकरणं यः करोति च मानवः ।
स याति कृमिदंशं च स्थितिस्तत्र चतुर्युगम् ॥ १४ ॥
परकीये लुप्तकूपे कूपं मूढः करोति यः ।
पुष्करिण्यां च लुप्तायां पुष्करिणीं ददाति यः ॥ १५ ॥
सर्वं फलं परस्यैव तप्तकुण्डं व्रजेच्च सः ।
तत्र तिष्ठति सन्तप्तो यावदिन्द्राश्चतुर्दश ॥ १६ ॥
परकीये तडागे च पङ्‌कमुद्धृत्य चोन्मृजेत् ।
रेणुप्रमाणवर्षं च ब्रह्मलोके वसेन्नरः ॥ १७ ॥
पिण्डं पित्रे भूमिभर्तुर्न प्रदाय च मानवः ।
श्राद्धं करोति यो मूढो नरकं याति निश्चितम् ॥ १८ ॥
भूमौ दीपं योऽर्पयति स चान्धः सप्तजन्मसु ।
भूमौ शङ्‌खं च संस्थाप्य कुष्ठं जन्मान्तरे लभेत् ॥ १९ ॥
मुक्तां माणिक्यहीरौ च सुवर्णं च मणिं तथा ।
पञ्च संस्थापयेद्‌भूमौ स चान्धः सप्तजन्मसु ॥ २० ॥
शिवलिङ्‌गं शिवामर्चां यश्चार्पयति भूतले ।
शतमन्वन्तरं यावत्कृमिभक्षः स तिष्ठति ॥ २१ ॥
शङ्‌खं यन्त्रं शिलातोयं पुष्पं च तुलसीदलम् ।
यश्चार्पयति भूमौ च स तिष्ठेन्नरके ध्रुवम् ॥ २२ ॥
जपमालां पुष्पमालां कर्पूरं रोचनं तथा ।
यो मूढश्चार्पयेद्‌भूमौ स याति नरकं ध्रुवम् ॥ २३ ॥
भूमौ चन्दनकाष्ठं च रुद्राक्षं कुशमूलकम् ।
संस्थाप्य भूमौ नरके वसेन्मन्वन्तरावधि ॥ २४ ॥
पुस्तकं यज्ञसूत्रं च भूमौ संस्थापयेन्नरः ।
न भवेद्विप्रयोनौ च तस्य जन्मान्तरे जनिः ॥ २५ ॥
ब्रह्महत्यासमं पापमिह वै लभते ध्रुवम् ।
ग्रन्धियुक्तं यज्ञसूत्रं पूज्यं च सर्ववर्णकैः ॥ २६ ॥
यज्ञं कृत्वा तु यो भूमिं क्षीरेण न हि सिञ्चति ।
स याति तप्तभूमिं च सन्तप्तः सप्तजन्मसु ॥ २७ ॥
भूकम्पे ग्रहणे यो हि करोति खननं भुवः ।
जन्मान्तरे महापापो ह्यङ्‌गहीनो भवेद्‌ ध्रुवम् ॥ २८ ॥
भवनं यत्र सर्वेषां भूमिस्तेन प्रकीर्तिता ।
काश्यपी कश्यपस्येयमचला स्थिररूपतः ॥ २९ ॥
विश्वम्भरा धारणाच्चानन्तानन्तस्वरूपतः ।
पृथिवी पृथुकन्यात्वाद्विस्तृतत्वान्महामुने ॥ ३० ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे पृथिव्युपाख्याने
नरकफलप्राप्तिवर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥


भूमीदेवीच्या अपराधाबद्दल फळ -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारदांनी विचारले, "भूमीदानाचे लागणारे पुण्य व परत घेतल्यामुळे मिळणारे पाप, दुसर्‍याच्या भूभागाचा अपहार केल्यामुळे लागणारा दोष, तसेच दुसर्‍याच्या विहिरीत खणल्यामुळे लागणारे पातक, तसेच भूमी रजस्वला असताना तिला खणल्यास, भूमीवर वीर्यत्याग केल्यास, भूमीवर दीप ठेवल्यास कोणते पातक लागते, हे आता मला सांगा. ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे. तसेच इतरही भूमीमुळे घडणारी पापे निवेदन करा. तसेच त्या पातकांचा प्रतिकार कसा करावा हे मला सांगा." श्रीनारायणमुनी म्हणाले, "या भारतवर्षात संध्यावंदनामुळे पवित्र झालेल्या ब्राह्मणांना जो एक वीतभर भूमीदान देतो, तो शिवमंदिरी जातो. जो सर्व धान्यांनी परिपूर्ण भूमी ब्राह्मणाला दान देतो, त्याला भूमीतील तेवढ्या मातीच्या कणांइतकी वर्षे विष्णूलोक मिळतो.

तसेच जो गाव, भूमी, धान्य हे ब्राह्मणाला दान देतो, तो दाता व दान स्वीकारणारा हे दोघेही पापमुक्त होतात आणि देवीचे सन्निध जाऊन पोहोचतात.

साधूच्या अनुमोदनकाली जो भूमीदान देतो, तो आपल्या आप्तेष्टांसह वैकुंठाला जातो. जो स्वतः दिलेली किंवा इतरांनी दिलेली दाने हरण करतो तो कालसूत्र नावाच्या नरकात जातो. तो चंद्र-सूर्याचे अस्तित्व असेपर्यंत तेथेच जाऊन पडतो. त्याचे पुत्र, नातू इत्यादी आप्तेष्ट भूमीहीन, निष्कांचन, पुत्रहीन, भिकारी असे होतात. तेही घोर रौरवात पडतात.

गाईंच्या मार्गाची अडवणूक करून जो धान्य पेरतो तो देवांची शंभर वर्षे कुंभिपाक नावाच्या नरकात पडतो. गाईचा गोठा, तळीं वगैरेंची जागा नांगरून जो धान्य पेरण्यासाठी उपयोगात आणतो तो चवदा वर्षे होईतोपर्यंत असितपत्र नावाच्या नरकात जातो. मातीचे पाच गोळे तरी बाहेर टाकल्याशिवाय जो दुसर्‍याच्या विहिरीत स्नान करतो, तो नरकात पडतोच पण त्याचे स्नानही निष्फळ होय. जो कामातुर होऊन एकांतात भूमीवर धातुपात करतो, तो धातूने व्यापलेल्या भूमीवरील कणाइतकी वर्षे रौरव नावाच्या नरकात जातो.
रजस्वला भूमीत जो मनुष्य खणीत असतो तो कृमिदंश नावाच्या नरकात जातो. तेथे तो चार युगे राहतो. आटून गेलेली विहीर त्या विहिरीच्या मालकाच्या आज्ञेवाचून जो खणतो किंवा जो मनुष्य चौकोनी व आटलेल्या तळ्यात पुन्हा उदकसंचय करतो, तो तप्तकुंड नावाच्या नरकात चौदा मन्वंतरे पडतो. त्याच्या कृत्याचे फळ मात्र धन्याला मिळते, पण हीच गोष्ट मालकाच्या परवानगीने केल्यास जीर्णोद्धाराचे फळ मिळते. दुसर्‍याच्या तळ्यातील चिखल काढून जो त्यात स्नान करतो, तो पुरुष चिखलाच्या कणांइतकी वर्षे ब्रह्मलोकात वास्तव्य करतो. जो मनुष्य पितरांना, भूमीच्या पतीला म्हणजे विष्णूला पिंडदान न करता श्राद्ध करतो तो मूर्ख निश्चितपणे नरकाप्रत जातो. जो भूमीवर दिवा ठेवतो तो सात जन्म आंधळा होतो. भूमीवर शंख ठेवल्याने पुढल्या जन्मी तो कुष्ठरोगी होतो.

मोती, माणिक, हिरा, सुवर्ण व रत्न या पांच पदार्थांना जो भूमीवर ठेवतो तो सात जन्म आंधळा बनतो. शिवाचे लिंग, देवीची मूर्ती, शालिग्राम यांना जो भूमीवर ठेवतो तो शंभर मन्वंतरे कृमी भक्षून राहतो.

शंख, यंत्र, शील, उदक, पुष्प, तुलसीपत्र ही जो भूमीवर टाकतो तो चिरकाल नरकात पडतो. जो पुरुष पुस्तक व यज्ञोपवीत भूमीवर ठेवतो त्याला पुढील जन्म ब्राह्मण कुलात येत नाही. शिवाय त्या जन्मीच त्याला ब्रह्महत्येचे पातक लागते. ग्रंथीयुक्त यज्ञोपवीत सर्वच वर्णांच्या लोकांनी पूज्य मानणे आवश्यक आहे. जो भूमीवर दूध शिंपडीत नाही तो सात जन्म संतप्त होऊन भूमीप्रत जातो. भूकंप व ग्रहणाचे काली जो भूमी खणतो तो महापापी पुढील जन्मी शरीरहीन होतो.

ज्या ठिकाणी सर्वांचीच वसती होते तिला भूमी असे म्हटले आहे. ही काश्यपाची आहे म्हणून काश्यपी म्हणतात. तसेच तिचे रूप स्थिर आहे म्हणून तिला अचला असे म्हणतात. हे विश्वंभरा, हिचे रूप अमर्याद आहे. हे महामुनी नारदा, ती पृथुराजाची कन्या व विस्तृत असल्याने तिला पृथ्वी असे म्हणतात."


अध्याय दहावा समाप्त

GO TOP