श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
नवमोऽध्यायः


भूमिस्तोत्रवर्णनम्

नारद उवाच
देव्या निमेषमात्रेण ब्रह्मणः पात एव च ।
तस्य पातः प्राकृतिकः प्रलयः परिकीर्तितः ॥ १ ॥
प्रलये प्राकृते चोक्ता तत्रादृष्टा वसुन्धरा ।
जलप्लुतानि विश्वानि सर्वे लीनाः परात्मनि ॥ २ ॥
वसुन्धरा तिरोभूता कुत्र वा सा च तिष्ठति ।
सृष्टेर्विधानसमये साविर्भूता कथं पुनः ॥ ३ ॥
कथं बभूव सा धन्या मान्या सर्वाश्रया जया ।
तस्याश्च जन्मकथनं वद मङ्‌गलकारणम् ॥ ४ ॥
श्रीनारायण उवाच
सर्वादिसृष्टौ सर्वेषां जन्म देव्या इति श्रुतिः ।
आविर्भावस्तिरोभावः सर्वेषु प्रलयेषु च ॥ ५ ॥
श्रूयतां वसुधाजन्म सर्वमङ्‌गलकारणम् ।
विघ्ननिघ्नकरं पापनाशनं पुण्यवर्धनम् ॥ ६ ॥
अहो केचिद्वदन्तीति मधुकैटभमेदसा ।
बभूव वसुधा धन्या तद्विरुद्धमतः शृणु ॥ ७ ॥
ऊचतुस्तौ पुरा विष्णुं तुष्टौ युद्धेन तेजसा ।
आवां वध्यौ न यत्रोर्वी पाथसा संवृतेति च ॥ ८ ॥
तयोर्जीवनकाले न प्रत्यक्षा साभवत्स्फुटम् ।
ततो बभूव मेदश्च मरणानन्तरं तयोः ॥ ९ ॥
मेदिनीति च विख्यातेत्युक्तमेतन्मतं शृणु ।
जलधौता कृता पूर्वं वर्धिता मेदसा यतः ॥ १० ॥
कथयामि ते तज्जन्म सार्थकं सर्वमङ्‌गलम् ।
पुरा श्रुतं यच्छ्रुत्युक्तं धर्मवक्त्राच्च पुष्करे ॥ ११ ॥
महाविराट्शरीरस्य जलस्थस्य चिरं स्फुटम् ।
मनो बभूव कालेन सर्वाङ्‌गव्यापकं ध्रुवम् ॥ १२ ॥
तच्च प्रविष्टं सर्वेषां तल्लोम्नां विवरेषु च ।
कालेन महता पश्चाद्‌ बभूव वसुधा मुने ॥ १३ ॥
प्रत्येकं प्रतिलोम्नां च कूपेषु संस्थिता सदा ।
आविर्भूता तिरोभूता सजला च पुनः पुनः ॥ १४ ॥
आविर्भूता सृष्टिकाले तज्जलोपर्युपस्थिता ।
प्रलये च तिरोभूता जलस्याभ्यन्तरे स्थिता ॥ १५ ॥
प्रतिविश्वेषु वसुधा शैलकाननसंयुता ।
सप्तसागरसंयुक्ता सप्तद्वीपसमन्विता ॥ १६ ॥
हेमाद्रिमेरुसंयुक्ता ग्रहचन्द्रार्कसंयुता ।
ब्रह्मविष्णुशिवाद्यैश्च सुरैर्लोकैस्तदाज्ञया ॥ १७ ॥
पुण्यतीर्थसमायुक्ता पुण्यभारतसंयुता ।
काञ्चनीभूमिसंयुक्ता सप्तस्वर्गसमन्विता ॥ १८ ॥
पातालसप्तं तदधस्तदूर्ध्वं ब्रह्मलोकतः ।
ध्रुवलोकश्च तत्रैव सर्वं विश्वं च तत्र वै ॥ १९ ॥
एवं सर्वाणि विश्वानि पृथिव्यां निर्मितानि च ।
नश्वराणि च विश्वानि सर्वाणि कृत्रिमाणि वै ॥ २० ॥
प्रलये प्राकृते चैव ब्रह्मणश्च निपातने ।
महाविराडादिसृष्टौ सृष्टः कृष्णेन चात्मना ॥ २१ ॥
नित्यौ च स्थितिप्रलयौ काष्ठाकालेश्वरैः सह ।
नित्याधिष्ठातृदेवी सा वाराहे पूजिता सुरैः ॥ २२ ॥
मुनिभिर्मनुभिर्विप्रैर्गन्धर्वादिभिरेव च ।
विष्णोर्वराहरूपस्य पत्‍नी सा श्रुतिसम्मता ॥ २३ ॥
तत्पुत्रो मङ्‌गलो ज्ञेयो घटेशो मङ्‌गलात्मजः ।
नारद उवाच
पूजिता केन रुपेण वाराहे च सुरैर्मही ॥ २४ ॥
वाराहे चैव वाराही सर्वैः सर्वाश्रया सती ।
मूलप्रकृतिसम्भूता पञ्चीकरणमार्गतः ॥ २५ ॥
तस्याः पूजाविधानं चाप्यधश्चोर्ध्वमनेकशः ।
मङ्‌गलं मङ्‌गलस्यापि जन्म वासं वद प्रभो ॥ २६ ॥
श्रीनारायण उवाच
वाराहे च वराहश्च ब्रह्मणा संस्तुतः पुरा ।
उद्दधार महीं हत्वा हिरण्याक्षं रसातलम् ॥ २७ ॥
जले तां स्थापयामास पद्मपत्रं यथा हृदे ।
तत्रैव निर्ममे ब्रह्मा विश्वं सर्वं मनोहरम् ॥ २८ ॥
दृष्ट्वा तदधिदेवीं च सकामां कामुको हरिः ।
वराहरूपी भगवान् कोटिसूर्यसमप्रभः ॥ २९ ॥
कृत्वा रतिकलां सर्वां मूर्तिं च सुमनोहराम् ।
क्रीडाञ्चकार रहसि दिव्यवर्षमहर्निशम् ॥ ३० ॥
सुखसम्भोगसंस्पर्शान्मूर्च्छां सम्प्राप सुन्दरी ।
विदग्धाया विदग्धेन सङ्‌गमोऽतिसुखप्रदः ॥ ३१ ॥
विष्णुस्तदङ्‌गसंश्लेषाद्‌ बुबुधे न दिवानिशम् ।
वर्षान्ते चेतनां प्राप्य कामी तत्याज कामुकीम् ॥ ३२ ॥
पूर्वरूपं वराहं च दधार स च लीलया ।
पूजाञ्चकार तां देवीं ध्यात्वा च धरणीं सतीम् ॥ ३३ ॥
धूपैर्दीपैश्च नैवेद्यैः सिन्दूरैरनुलेपनैः ।
वस्त्रैः पुष्पैश्च बलिभिः सम्पूज्योवाच तां हरिः ॥ ३४ ॥
श्रीभगवानुवाच
सर्वाधारा भव शुभे सर्वैः सम्पूजिता सुखम् ।
मुनिभिर्मनुभिर्देवैः सिद्धैश्च दानवादिभिः ॥ ३५ ॥
अम्बुवाचीत्यागदिने गृहारम्भे प्रवेशने ।
वापीतडागारम्भे च गृहे च कृषिकर्मणि ॥ ३६ ॥
तव पूजां करिष्यन्ति मद्वरेण सुरादयः ।
मूढा ये न करिष्यन्ति यास्यन्ति नरकं च ते ॥ ३७ ॥
वसुधोवाच
वहामि सर्वं वाराहरूपेणाहं तवाज्ञया ।
लीलामात्रेण भगवन् विश्वं च सचराचरम् ॥ ३८ ॥
मुक्तां शुक्तिं हरेरर्चां शिवलिङ्‌गं शिवां तथा ।
शङ्‌खं प्रदीपं यन्त्रं च माणिक्यं हीरकं तथा ॥ ३९ ॥
यज्ञसूत्रं च पुष्पं च पुस्तकं तुलसीदलम् ।
जपमालां पुष्पमालां कर्पूरं च सुवर्णकम् ॥ ४० ॥
गोरोचनं चन्दनं च शालग्रामजलं तथा ।
एतान्वोडुमशक्ताहं क्लिष्टा च भगवञ्छृणु ॥ ४१ ॥
श्रीभगवानुवाच
द्रव्याण्येतानि ये मूढा अर्पयिष्यन्ति सुन्दरि ।
यास्यन्ति कालसूत्रं ते दिव्यं वर्षशतं त्वयि ॥ ४२ ॥
इत्येवमुक्त्वा भगवान् विरराम च नारद ।
बभूव तेन गर्भेण तेजस्वी मङ्‌गलग्रहः ॥ ४३ ॥
पूजाञ्चक्रुः पृथिव्याश्च ते सर्वे चाज्ञया हरेः ।
कण्वशाखोक्तध्यानेन तुष्टुवुश्च स्तवेन ते ॥ ४४ ॥
ददुर्मूलेन मन्त्रेण नैवेद्यादिकमेव च ।
संस्तुता त्रिषु लोकेषु पूजिता सा बभूव ह ॥ ४५ ॥
नारद उवाच
किं ध्यानं स्तवनं तस्या मूलमन्त्रं च किं वद ।
गूढं सर्वपुराणेषु श्रोतुं कौतूहलं मम ॥ ४६ ॥
श्रीनारायण उवाच
आदौ च पृथिवी देवी वराहेण च पूजिता ।
ततो हि ब्रह्मणा पश्चामृजिता पृथिवी तदा ॥ ४७ ॥
ततः सर्वैर्मुनीन्द्रैश्च मनुभिर्मानवादिभिः ।
ध्यानं च स्तवनं मन्त्रं शृणु वक्ष्यामि नारद ॥ ४८ ॥
ॐ ह्रीं श्रीं क्लीं वसुधायै स्वाहेत्यनेन
मन्त्रेण विष्णुना पूजिता पुरा ।
श्वेतपङ्‌कजवर्णाभां शरच्चन्द्रनिभाननाम् ॥ ४९ ॥
चन्दनोत्क्षिप्तसर्वाङ्‌गीं रत्‍नभूषणभूषिताम् ।
रत्‍नाधारां रत्‍नगर्भां रत्‍नाकरसमन्विताम् ॥ ५० ॥
वह्निशुद्धांशुकाधानां सस्मितां वन्दितां भजे ।
ध्यानेनानेन सा देवी सर्वैश्च पूजिताभवत् ॥ ५१ ॥
स्तवनं शृणु विप्रेन्द्र कण्वशाखोक्तमेव च ।
श्रीनारायण उवाच
जये जये जलाधारे जलशीले जलप्रदे ॥ ५२ ॥
यज्ञसूकरजाये त्वं जयं देहि जयावहे ।
मङ्‌गले मङ्‌गलाधारे माङ्‌गल्ये मङ्‌गलप्रदे ॥ ५३ ॥
मङ्‌गलार्थं मङ्‌गलेशे मङ्‌गलं देहि मे भवे ।
सर्वाधारे च सर्वज्ञे सर्वशक्तिसमन्विते ॥ ५४ ॥
सर्वकामप्रदे देवि सर्वेष्टं देहि मे भवे ।
पुण्यस्वरूपे पुण्यानां बीजरूपे सनातनि ॥ ५५ ॥
पुण्याश्रये पुण्यवतामालये पुण्यदे भवे ।
सर्वसस्यालये सर्वसस्याढ्ये सर्वसस्यदे ॥ ५६ ॥
सर्वसस्यहरे काले सर्वसस्यात्मिके भवे ।
भूमे भूमिपसर्वस्वे भूमिपालपरायणे ॥ ५७ ॥
भूमिपानां सुखकरे भूमिं देहि च भूमिदे ।
इदं स्तोत्रं महापुण्यं प्रातरुत्थाय यः पठेत् ॥ ५८ ॥
कोटिजन्मसु स भवेद्‌ बलवान्भूमिपेश्वरः ।
भूमिदानकृतं पुण्यं लभ्यते पठनाज्जनैः ॥ ५९ ॥
भूमिदानहरात्पापान्मुच्यते नात्र संशयः ।
अम्बुवाचीभूकरणपापात्स मुच्यते ध्रुवम् ॥ ६० ॥
अन्यकूपे कूपखननपापात्स मुच्यते ध्रुवम् ।
परभूमिहरात्पापान्मुच्यते नात्र संशयः ॥ ६१ ॥
भूमौ वीर्यत्यागपापाद्‌भूमौ दीपादिस्थापनात् ।
पापेन मुच्यते सोऽपि स्तोत्रस्य पठनान्मुने ॥ ६२ ॥
अश्वमेधशतं पुण्यं लभते नात्र संशयः ।
भूमिदेव्या महास्तोत्रं सर्वकल्याणकारकम् ॥ ६३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे
भूमिस्तोत्रवर्णनं नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥


वराहपूजन - विधी व भूमीचे स्तोत्र -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारद मुनी म्हणाले, "हे मुनीश्वरा, देवीच्या एका निमिषार्धात ब्रह्मदेवाचा पात होतो त्याचवेळी प्राकृतिक प्रलय होतो. पृथ्वी नाहीशी होते. सर्व ब्रह्मांडे लीन होतात. सर्व परमात्म्यामध्ये लय पावतात असे आपण सांगितलेत. पण हे ऋषिश्रेष्ठा, ती पृथ्वी कोठे जाते व सृष्टीची पुन्हा उत्पत्ती होण्याच्या वेळी ती पुन्हा कशी बरे व्यक्त होते ? तसेच ती धन्य, मान्य, सर्वाधार व जयरूप अशी कशी झाली ? हे प्रभो, तिचा मंगलमय जन्म वृत्तांत आता आपण निवेदन करा."

श्री नारायणमुनी म्हणाले, "हे नारदा, प्रथमतः देवीपासूनच सर्वांची उत्पत्ती झाली. म्हणून सर्वांची उत्पत्ती व प्रलय यामध्ये त्या पृथ्वीचा नाश होतो. सर्व मंगलकारी, विघ्नहर्ता, पापनाशक, पुण्य वृद्धिंगत करणारा असा हा पृथ्वीचा जन्मवृत्तांत तू श्रवण कर.

हे नारदमुने, तुला आता फार काय सांगू ? कोणी मूर्ख असे म्हणतात की, मधुकैटभाच्या मेदामुळे ही पृथ्वी उत्पन्न झाली आहे. पण त्यांचे हे बोलणे अयोग्य आहे. कारण मधु-कैटभ विष्णूस म्हणाले होते, "तुझ्या युद्धकौशल्यामुळे आम्ही संतुष्ट झालो आहो. म्हणून तू सांप्रत योग्य वर माग."

तेव्हा त्यांचे भाषण ऐकून विष्णु म्हणाला, "हे दानवांनो, तुम्ही माझ्या हातून मरावे असा मी वर मागत आहे. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. जेथे उदकयुक्त पृथ्वी नसेल तेथे तुम्हाला मरण येईल."

त्यावरून हे नारदा, मधुकैटभांचे अस्तित्व असताना पृथ्वी होती हे उघड आहे. आता मेदिनी हे नाव पुष्यीला का प्राप्त झाले याचे कारण मी तुला सांगतो, ते ऐक.

तिला जेव्हा उदकातून बाहेर काढले तेव्हा तिचा प्रतिपाल मेदाने केला म्हणून तिला मेदिनी हे नाव प्राप्त झाले. आता पुष्कर क्षेत्रावर धर्मापासून ऐकलेला पृथ्वीच्या जन्माचा वृत्तांत मी तुला कथन करतो. तो श्रुतिप्रोप्त असून मंगलरूप सप्रयोजन आहे. तो तू श्रवण कर.

जलात असलेल्या महाविराटाचे मन पुष्कळ कालानंतर सर्वांग व्यापून राहणारे व अक्षय झाले. तसेच अस्तित्वाने जाणवू लागले. ते सर्व सूक्ष्म रूपाने सर्व प्राण्यांच्या रोमरंध्रात शिरले. पुढे बर्‍याच कालावधीनंतर ही पृथ्वी उत्पन्न झाली. ही भूमी प्रत्येक प्राण्याच्या रोमरंध्रात होती. ती पुन्हा व्यक्त व पुन्हा अव्यक्त होत असे. तसेच जलमय होत असे. सृष्टीकाली पृथ्वी जलाच्या पृष्ठभागावर राहते व प्रलयकाली ती जलांतर्गत असते.

प्रत्येक विश्वात पर्वत, अरण्ये यांनी ही पृथ्वी युक्त असते. तसेच सप्तसागरांनी परिवेष्ठित सप्त द्वीपांनी युक्त, हेमाद्री, मेरू, ग्रह, चंद्र, सूर्य यांसह ती असते. ब्रह्मा, विष्णु, महेश, देव इतर लोक यांनी ती परिपूर्ण असते व त्यांच्या आज्ञेने वागते.

पुण्यतीर्थे निर्माण होतात. भारतवर्ष, सुवर्ण, भूमी, सप्त स्वर्ग पृथ्वीच्या वरील बाजूस असतात. खालच्या बाजूला सहा पाताळे असतात. सर्वात वर ब्रह्मलोक, ध्रुवलोक व तेथेच सर्व विश्वे असतात. हे सर्व जग ध्रुवामध्ये आहे. अशी विश्वे पृथ्वीमध्ये निर्माण होतात. ती सर्व विश्वे नश्वर असून कृत्रिम आहेत.

ब्रह्माच्या पतनाचे वेळी प्रकृतिलय झाल्यावर श्रीकृष्णाने प्रथम महाविराटाला निर्माण केले. दिशा, काल, आत्मा यांसह स्थिती, प्रलय हे प्रवाहरूपाने नित्य असतात. देव, मनू, ब्राह्मण, मुनी इत्यादींनी जिचे पूजन केले अशी ती अधिष्ठात्री देवी नित्य आहे. वराहरूपी विष्णूची ती श्रुतिसंमत पत्नी आहे. तिच्या पुत्राचे नाव मंगल असून घटेश हा मंगलाचा पुत्र होय."

नारद म्हणाले, "हे मुनीश्रेष्ठा, वराह कल्पामध्ये सर्वांनी त्या पृथ्वीचे स्तवन कोणत्या रूपाने केले ? कारण त्या कल्पात ती सर्वाश्रयभूत अशी वाराही म्हणून उत्पन्न झाली. ती मूलप्रकृतीपासून पंचीकरण मार्गाने निर्माण झाली. तिच्या पूजेचा ऐहिक, पारलौकिक असा अनेक प्रकारचा विधी तसेच सर्व मंगल असाच तिचा जन्म आहे. हे प्रभो, आपण हे सर्व मला आता विस्तारपूर्वक कथन करा."

श्री नारायणमुनी म्हणाले, "वराह कल्पात ब्रह्मदेवाने उत्तम प्रकारे स्तुती केली. म्हणून वराहाने हिरण्याक्षाचा वध करून पृथ्वीला रसातलातून बाहेर काढले व तिचा उद्धार केला. कमलपत्र जसे सरोवरात स्थापन करावे तसे पृथ्वीला त्याने उदकावर स्थापन केले. ब्रह्मदेवाने त्या पृथ्वीवर नंतर मनोहर सृष्टी निर्माण केली.

तिची अधिदेवता सकाम झाल्याचे अवलोकन करून वराहरूपी तेजस्वी हरीने सर्व रतिकला केली आणि तिची अत्यंत मनोहर मूर्ती निर्माण केली. त्या देवाने तिजबरोबर हजारो वर्षे एकांतात क्रीडा केली. सुखोपभोगाचा पूर्ण स्पर्श होताच ती सुंदरी मूर्च्छित झाली. निपुण स्त्रीचा चतुर पुरुषांशी संबंध आल्यास असे होणे साहजिकच आहे. कारण
तो संबंध अतिशय सुखावह असतो. तिच्या शरीरस्पर्शामुळे विष्णूही अहोरात्र असा कित्येक कालपर्यंत जागृत झाला नाही.

असा बराच काळ गेल्यावर त्या कामी पुरुषाला चेतना प्राप्त झाली. तेव्हा त्या कामुकीला त्याने मुक्त केले व पूर्वीचे वराहरूप धारण केले. त्या साध्वी धरणी देवीचे त्याने ध्यान केले. तिची पूजा केली. धूप, दीप, नैवेद्य, शेंदूर, अनुलेपन, वस्त्रे, पुष्पे, बली या साधनांनी तिची उत्तम प्रकारे पूजा केली. त्यानंतर तो हरी तिला म्हणाला, "हे शुभे, तू सर्वांचा आधार हो. मनू, मुनी, देव, सिद्ध, दानव वगैरे हे सर्व तुझी उत्तम प्रकारे पूजा करतील. अंबुवाची म्हणजे रजस्वला पृथ्वी मृगापासून आर्द्रा नक्षत्राच्या प्रथम पदाच्या सप्तमीपर्यंत ऋतुमती असते. या कालात पहिले तीन दिवस ती कोणत्याही कार्याला निषिद्ध असते. अंबुवाची संज्ञक दिवस सोडून गृहाचा आरंभ, गृहप्रवेश, वाणी, तडाग यांस प्रारंभ, गृहकृत्य, कृषीकर्म वगैरे प्रसंगी तिची पूजा करतात. पण जे मूर्ख तिचे असे पूजन करणार नाहीत ते निःसंशय नरकात जातील."

विष्णूचे भाषण ऐकून वसुधा म्हणाली, "हे भगवान, मी तुझ्याच आज्ञेने वराहरूपाने हे चराचर विश्व धारण करीन, पण मोती, शिंप, हरीची मूर्ती, शिवलिंग, पार्वती, शंख, प्रदीप, यंत्र, माणिक, हिरा, यज्ञोपवीत, पुष्प, पुस्तक, तुलसीपत्र, जपमाळ, पुष्पमाला, कापूर, सुवर्ण, गोरोचन, चंदन, शालग्रामाचे तीर्थ हे सर्व पदार्थ वाहण्यास मी असमर्थ आहे. हे देवाधिदेवा, मला फार क्लेश झाले आहेत. म्हणून आपण माझे सांगणे ऐकून घ्या."

श्री भगवान म्हणाले, "हे सुंदरी, जे मूर्ख तू सांगितलेली ही द्रव्ये तुजवर अर्पण करतील ते देवांची शेकडो वर्षे कालसूत्र नावाच्या नरकात पडतील."

हे नारदा, असे म्हणून भगवान स्तब्ध राहिला. पुढे त्या गर्भापासून मंगल नावाचा तेजस्वी ग्रह निर्माण झाला. हरीच्या आज्ञेने त्या देवांनी पृथ्वीची पूजा केली. तसेच कण्व शाखेत सांगितल्याप्रमाणे ध्यान व स्तुती केली. मूलमंत्राच्या योगाने त्यांनी नैवेद्य अर्पण केले. तेव्हापासून तिची स्तुती त्रैलोक्यात पसरली. त्रिलोक तिची पूजा करू लागले."

नारद म्हणाले, "हे मुनिवर्या, तिचे ध्यान, पूजन, स्तवन कसे करायचे ? तो पुराणातील मूल मंत्र ऐकण्याची मला अनिवार इच्छा झाली आहे. तो मला सांगा." श्री नारायण मुनी म्हणाले, "प्रथम वराहाने त्या देवी पृथ्वीचे पूजन केले. नंतर ब्रह्मदेवाने पृथ्वीची पूजा केली. पुढे सर्व श्रेष्ठ मुनींनी, मनूने व मानवांनीही तिचे यथासांग पूजन केले. तिचे ध्यान, स्तवन व मंत्र तू आता ऐक.

"ॐ र्‍हीं श्रीं क्ली वसुधायै स्वाहा ।"

हा मंत्र म्हणून प्रथम विष्णूने तिची पूजा केली. जिचा वर्ण शुभ्र कमलाप्रमाणे आहे, जिच्या सर्वांगावर चंदन शिंपडले आहे, जी रत्नालंकारांनी सुशोभित झाली आहे, जी सर्व रत्नांचे अधिष्ठान आहे, जी समुद्र व रत्ने यांनी युक्त आहे, जिने अग्नीप्रमाणे वस्त्र धारण केले आहे, जी सस्मित असून सर्वांना वंद्य आहे, तिचे मी भजन करतो.

अशा प्रकारच्या ध्यानाने ती देवी सर्वांना पूज्य झाली. हे विप्रश्रेष्ठा, कण्वशाखेत सांगितल्याप्रमाणे तिचे स्तवन आता ऐक."

"हे जये, हे जयाधारे, हे जयशीले, हे जयप्रदे, तुझा जयजयकार असो. हे जयावहे, हे यज्ञसूकराचे स्त्रिये, जय दे, हे मंगले, मंगलाधारे, हे मांगल्ये, मंगलप्रदे, हे मंगलेश्वरी, हे भवे, मंगलाकर्ती, मला मंगल दे. हे सर्वांधारे, हे सर्वज्ञे, हे सर्वशक्तीयुक्त देवी, हे सर्व इष्ट देणार्‍या देवी, हे भवे मला सर्व इष्ट प्राप्त करून दे. हे पुण्यस्वरूपे, हे पुण्यबीजरूप देवी, हे सनातनी, हे पुण्याश्रयभूते, हे पुण्यवंतांच्या वसतीस्थानभूत वसुधे, हे पुण्यदे, हे भवे, ते सर्व धान्यांचे स्थान आहेत. सर्व प्रकारच्या धान्याने पूर्ण आहेस. हे कालरूपी पृथ्वी, हे सर्व धान्यरूप भवानी, हे भूमी, तू राजांचे सर्वस्व आहेस. पृथ्वीपतीचे उत्तम स्थान आहेस. तू नृपतींना सुखकर आहेस. हे भूमिदेवी मला भूमी दे."

असे अत्यंत पुण्यकारक स्तोत्र जो सकाळी नित्य पठण करतो, तो कोटी जन्मपर्यंत बलवान पृथ्वीपती होतो. याच्या पठनामुळे लोकांना भूमीदान केल्याचे पुण्य लागते. भूमीचे दान परत घेतल्यामुळे लागणार्‍या पापापासून मनुष्य मुक्त होतो.

रजस्वला भूमी खणल्यामुळे लागणार्‍या पातकापासून मनुष्य मुक्त होतो. दुसर्‍याने खणून ठेवलेल्या विहिरीत खणल्यामुळे जे पातक लागते, तेही नाश पावते. दुसर्‍याच्या भूमीचे हरण केल्याने लागणारे पातकही नष्ट होते. भूमीवर वीर्यपात केल्यामुळे घडणार्‍या दोषांपासून व भूमीवर दीप ठेवल्यामुळे लागणार्‍या कलंकापासूनही मनुष्य मुक्त होतो.

हे नारदा, या स्तोत्र पठणामुळे शंभर अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य लागते. कारण भूमीदेवतेचे हे महास्तोत्र अत्यंत कल्याणप्रद व पुण्यकारक आहे."


अध्याय नववा समाप्त

GO TOP