श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
सप्तमोऽध्यायः


गङ्‌गादीनां शापोद्धारवर्णनम्

श्रीनारायण उवाच
इत्युक्त्वा जगतां नाथो विरराम च नारद ।
अतीव रुरुदुर्देव्यः समालिङ्‌ग्य परस्परम् ॥ १ ॥
ताश्च सर्वाः समालोक्य क्रमेणोचुस्तदेश्वरम् ।
कम्पिताः साश्रुनेत्राश्च शोकेन च भयेन च ॥ २ ॥
सरस्वत्युवाच
विशापं देहि हे नाथ दुष्टमाजन्मशोचनम् ।
सत्स्वामिना परित्यक्ताः कुतो जीवन्ति ताः स्त्रियः ॥ ३ ॥
देहत्यागं करिष्यामि योगेन भारते ध्रुवम् ।
अत्युन्नतो हि नियतं पातुमर्हति निश्चितम् ॥ ४ ॥
गङ्‌गोवाच
अहं केनापराधेन त्वया त्यक्ता जगत्पते ।
देहत्यागं करिष्यामि निर्दोषाया वधं लभ ॥ ५ ॥
निर्दोषकामिनीत्यागं करोति यो नरो भुवि ।
स याति नरकं घोरं किन्तु सर्वेश्वरोऽपि वा ॥ ६ ॥
पद्मोवाच
नाथ सत्त्वस्वरूपस्त्वं कोपः कथमहो तव ।
प्रसादं कुरु भार्ये द्वे सदीशस्य क्षमा वरा ॥ ७ ॥
भारते भारतीशापाद्यास्यामि कलया ह्यहम् ।
कियत्कालं स्थितिस्तत्र कदा द्रक्ष्यामि ते पदम् ॥ ८ ॥
दास्यन्ति पापिनः पापं सद्यः स्नानावगाहनात् ।
केन तेन विमुक्ताहमागमिष्यामि ते पदम् ॥ ९ ॥
कलया तुलसीरूपं धर्मध्वजसुता सती ।
भुक्त्वा कदा लभिष्यामि त्वत्पादाम्बुजमच्युत ॥ १० ॥
वृक्षरूपा भविष्यामि त्वदधिष्ठातृदेवता ।
समुद्धरिष्यसि कदा तन्मे ब्रूहि कृपानिधे ॥ ११ ॥
गङ्‌गा सरस्वतीशापाद्यदि यास्यति भारते ।
शापेन मुक्ता पापाच्च कदा त्वां च लभिष्यति ॥ १२ ॥
गङ्‌गाशापेन वा वाणी यदि यास्यति भारतम् ।
कदा शापाद्विनिर्मुच्य लभिष्यति पदं तव ॥ १३ ॥
तां वाणीं ब्रह्मसदनं गङ्‌गां वा शिवमन्दिरम् ।
गन्तुं वदसि हे नाथ तत्क्षमस्व च ते वचः ॥ १४ ॥
इत्युक्त्वा कमला कान्तपादं धृत्वा ननाम सा ।
स्वकेशैर्वेष्टनं कृत्वा रुरोद च पुनः पुनः ॥ १५ ॥
(उवाच पद्मनाभस्तां पद्मां कृत्वा स्ववक्षसि ।
ईषद्धास्यप्रसन्नास्यो भक्तानुग्रहकातरः ॥) ॥
श्रीभगवानुवाच
त्वद्वाक्यमाचरिष्यामि स्ववाक्यं च सुरेश्वरि ।
समतां च करिष्यामि शृणु त्वं कमलेक्षणे ॥ १६ ॥
भारती यातु कलया सरिद्‌रूपा च भारते ।
अर्धा सा ब्रह्मसदनं स्वयं तिष्ठतु मद्‌गृहे ॥ १७ ॥
भगीरथेन सा नीता गङ्‌गा यास्यति भारते ।
पूतं कर्तुं त्रिभुवनं स्वयं तिष्ठतु मद्‌गृहे ॥ १८ ॥
तत्रैव चन्द्रमौलेश्च मौलिं प्राप्स्यति दुर्लभम् ।
ततः स्वभावतः पूताप्यतिपूता भविष्यति ॥ १९ ॥
कलांशांशेन गच्छ त्वं भारते वामलोचने ।
पद्मावती सरिद्‌रूपा तुलसीवृक्षरूपिणी ॥ २० ॥
कलेः पञ्चसहस्रे च गते वर्षे तु मोक्षणम् ।
युष्माकं सरितां चैव मद्‌गेहे चागमिष्यथ ॥ २१ ॥
सम्पदा हेतुभूता च विपत्तिः सर्वदेहिनाम् ।
विना विपत्तेर्महिमा केषां पद्मभवे भवेत् ॥ २२ ॥
मन्मन्त्रोपासकानां च सतां स्नानावगाहनात् ।
युष्माकं मोक्षणं पापाद्दर्शनात्स्पर्शनात्तथा ॥ २३ ॥
पृथिव्यां यानि तीर्थानि सन्त्यसंख्यानि सुन्दरि ।
भविष्यन्ति च पूतानि मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ २४ ॥
मन्मन्त्रोपासका भक्ता विभ्रमन्ति च भारते ।
पूतं कर्तुं तारितुं च सुपवित्रां वसुन्धराम् ॥ २५ ॥
मद्‍भक्ता यत्र तिष्ठन्ति पादं प्रक्षालयन्ति च ।
तत्स्थानं च महातीर्थं सुपवित्रं भवेद्‌ध्रुवम् ॥ २६ ॥
स्त्रीघ्नो गोघ्नः कृतघ्नश्च ब्रह्मघ्नो गुरुतल्पगः ।
जीवन्मुक्तो भवेत्पूतो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ २७ ॥
एकादशीविहीनश्च सन्ध्याहीनोऽथ नास्तिकः ।
नरघाती भवेत्पूतो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ २८ ॥
असिजीवी मसीजीवी धावको ग्रामयाचकः ।
वृषवाहो भवेत्पूतो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ २९ ॥
विश्वासघाती मित्रघ्नो मिथ्यासाक्ष्यस्य दायकः ।
स्थाप्याहारी भवेत्पूतो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ ३० ॥
अत्युग्रवान्दूषकश्च जारकः पुंश्चलीपतिः ।
पूतश्च वृषलीपुत्रो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ ३१ ॥
शूद्राणां सूपकारश्च देवलो ग्रामयाजकः ।
अदीक्षितो भवेत्पूतो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ ३२ ॥
पितरं मातरं भार्यां भ्रातरं तनयं सुताम् ।
गुरोः कुलं च भगिनीं चक्षुर्हीनं च बान्धवम् ॥ ३३ ॥
श्वश्रूं च श्वशुरं चैव यो न पुष्णाति सुन्दरि ।
स महापातकी पूतो मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ ३४ ॥
अश्वत्थनाशकश्चैव मद्‍भक्तनिन्दकस्तथा ।
शूद्रान्नभोजी विप्रश्च पूतो मद्‍भक्तदर्शनात् ॥ ३५ ॥
देवद्रव्यापहारी च विप्रद्रव्यापहारकः ।
लाक्षालोहरसानां च विक्रेता दुहितुस्तथा ॥ ३६ ॥
महापातकिनश्चैव शूद्राणां शवदाहकः ।
भवेयुरेते पूताश्च मद्‍भक्तस्पर्शदर्शनात् ॥ ३७ ॥
महालक्ष्मीरुवाच
भक्तानां लक्षणं ब्रूहि भक्तानुग्रहकातर ।
येषां तु दर्शनस्पर्शात्सद्यः पूता नराधमाः ॥ ३८ ॥
हरिभक्तिविहीनाश्च महाहङ्‌कारसंयुतः ।
स्वप्रशंसारता धूर्ताः शठाश्च साधुनिन्दकाः ॥ ३९ ॥
पुनन्ति सर्वतीर्थानि येषां स्नानावगाहनात् ।
येषां च पादरजसा पूता पादोदकान्मही ॥ ४० ॥
येषां संदर्शनं स्पर्शं ये वा वाञ्छन्ति भारते ।
सर्वेषां परमो लाभो वैष्णवानां समागमः ॥ ४१ ॥
न ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः ।
ते पुनन्त्यपि कालेन विष्णुभक्ताः क्षणादहो ॥ ४२ ॥
सूत उवाव
महालक्ष्मीवचः श्रुत्वा लक्ष्मीकान्तश्च सस्मितः ।
निगूढतत्त्वं कथितुमपि श्रेष्ठोपचक्रमे ॥ ४३ ॥
श्रीभगवानुवाच
भक्तानां लक्षणं लक्ष्मि गूढं श्रुतिपुराणयोः ।
पुण्यस्वरूपं पापघ्नं सुखदं भुक्तिमुक्तिदम् ॥ ४४ ॥
सारभूतं गोपनीयं न वक्तव्यं खलेषु च ।
त्वां पवित्रां प्राणतुल्यां कथयामि निशामय ॥ ४५ ॥
गुरुवक्त्राद्विष्णुमन्त्रो यस्य कर्णे पतिष्यति ।
वदन्ति वेदास्तं चापि पवित्रं च नरोत्तमम् ॥ ४६ ॥
पुरुषाणां शतं पूर्वं तथा तज्जन्ममात्रतः ।
स्वर्गस्थं नरकस्थं वा मुक्तिमाप्नोति तत्क्षणात् ॥ ४७ ॥
यैः कैश्चिद्यत्र वा जन्म लब्धं येषु च जन्तुषु ।
जीवन्मुक्तास्तु ते पूता यान्ति काले हरेः पदम् ॥ ४८ ॥
मद्‍भक्तियुक्तो मर्त्यश्च स मुक्तो मद्‌गुणान्वितः ।
मद्‌गुणाधीनवृत्तिर्यः कथाविष्टश्च सन्ततम् ॥ ४९ ॥
मद्‌गुणश्रुतिमात्रेण सानन्दः पुलकान्वितः ।
सगद्‌गदः साश्रुनेत्रः स्वात्मविस्मृत एव च ॥ ५० ॥
न वाञ्छति सुखं मुक्तिं सालोक्यादिचतुष्टयम् ।
ब्रह्मत्वममरत्वं वा तद्वाञ्छा मम सेवने ॥ ५१ ॥
इन्द्रत्वं च मनुत्वं च ब्रह्मत्वं च सुदुर्लभम् ।
स्वर्गराज्यादिभोगं च स्वप्नेऽपि च न वाञ्छति ॥ ५२ ॥
भ्रमन्ति भारते भक्तास्तादृग्जन्म सुदुर्लभम् ।
मद्‌गुणश्रवणाः श्राव्यगानैर्नित्यं मुदान्विताः ॥ ५३ ॥
ते यान्ति च महीं पूत्वा नरं तीर्थं ममालयम् ।
इत्येवं कथितं सर्वं पद्मे कुरु यथोचितम् ।
तदाज्ञया तास्तच्चक्रुर्हरिस्तस्थौ सुखासने ॥ ५४ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापूराणेऽष्टादशसाहस्र्यां
सहितायां नवमस्कन्धे गङ्‌गादीनां
शापोद्धारवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥


देवीची शापापासून मुक्तता -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारायण मुनी म्हणाले, "हे नारदा, अशाप्रकारे त्या देवींना समजावून सांगून तो जगन्नाथ स्तब्ध राहिला. तेव्हा त्या तिघीही देवी एकमेकींना मिठया घालून रडू लागल्या आणि शोकमग्न होऊन तिघीजणी त्या जगन्नाथाला सांगू लागल्या. सरस्वती म्हणाली, "हे स्वामी, या दुर्दैवी शापांचा उःशाप करा. अहो, पतीने त्यागिल्यावर स्त्रिया जिवंत कशा बरे रहातील ? मी भारतवर्षांत पोहोचताच योगसाधनाने देहत्याग करीन हे निश्चित. जो उन्मत्त होतो त्याचा नाशच होणे जरूर आहे."

गंगा म्हणाली, "हे जगतपते, माझ्याकडून कोणता अपराध घडला म्हणून आपण माझा त्याग करीत आहात ? मी आता जर देहत्याग केला तर निर्दोष स्त्रीच्या वधाचा महादोष आपल्याला लागेल. खरोखर निर्दोष स्त्रीत्याग सर्वेश्वर अशा देवाने जरी केला तरीही त्याला नरकाचीच प्राप्ती होत असते."

लक्ष्मी म्हणाली, "हे नाथ, आपण सत्त्वगुणी असूनही आपल्या ठिकाणी क्रोध आहे याचे आश्चर्य वाटते. हे देवा, आपण त्या दोघीही भार्यांवर प्रसन्न व्हा. खरोखरच क्षमा हे ईश्वराचे भूषण आहे. आता सरस्वतीच्या शापामुळे मी अंशरूपाने भारतवर्षात जाईन. पण हे ईश्वरा, मला आपल्या चरणाचे पुन्हा दर्शन केव्हा घडेल ? स्नान केल्याने पापी लोकांचे पाप धुऊन जाईल. पण मी ते स्वीकारल्यावर मला त्यातून कसे बरे मुक्त होता येईल ? हे अच्युता, मी धर्मध्वजाची कन्या होईन व तुलसीचे रूप घेऊन शापाचे फल भोगत असता हे प्रभो, मला आपले चरणरज केव्हा बरे दिसतील ? मी वृक्षरूप पण अधिष्ठात्री देवता होईन. पण हे कृपानिधी, आपण माझा उद्धार केव्हा करणार ते सांगा. तसेच गंगा व सरस्वती एकमेकींच्या शापामुळे भारतवर्षात गेल्या, तर त्यांनाही मुक्ती मिळून हे देवा, त्या तुझे चरणरज केव्हा पाहू शकतील ?

हे प्रभो, आपणच त्या वाणीला ब्रह्मलोकी आणि गंगेला कैलासास जाण्यास सांगितले. पण त्यांना आपण क्षमा करा."

असे म्हणून कमलेने विष्णूचे चरण धरले. व आपल्या केशांनी ते चरणयुगुल झाकून ती रडू लागली. तेव्हा तिचे दुःख पाहून भगवान विष्णू म्हणाले, "हे मी माझे वचन पाळीनच. तसेच तुझ्या म्हणण्याप्रमाणे करीन. हे कमलपत्राक्षी, मी तुला आता विस्ताराने सांगतो, तू ऐक. हे बघ, ही जी सरस्वती अंशभूताने भारवर्षात नदी होईल, ती अर्ध्या कलेने ब्रह्मलोकी व स्वतः पूर्णरूपाने मजजवळ राहील. भगीरथ गंगेला घेऊन भारतवर्षात जाईल. तेथे ती सर्वाना पवित्र करीत राहिल. ती स्वतः पूर्णरूपात येथेच राहील. तिला शिवाच्या जटांचा आधार मिळेल. त्यामुळे गंगेचे पावित्र्य अधिकच वाढेल.

हे सुंदरी, तू अतिसूक्ष्म अंशाने भारतवर्षात पद्मावती नदी हो व वृक्षरूपाने तुलसी हो. कलीची पाच हजार वर्षे लोटल्यावर तुमची मुक्तता होईल. नंतर तुम्ही पुन्हा माझ्या ठिकाणी परत या. हे कमले, विपत्तीवाचून या संसारात कोणाचेही महात्म्य वाढत नाही. माझ्या मंत्रांची उपासना जे सज्जन करतील त्यांना दर्शन देताच अथवा स्पर्श करताच तुमची पापे नाहीशी होतील.

हे प्रिये, पृथ्वीवर जी असंख्य तीर्थ आहेत ती माझ्या भक्तांच्या स्पशनि व दर्शनाने पवित्र होतील. माझ्या मंत्राची उपासना करणारे उपासक भारतवर्षात असून ते सर्व पृथ्वीचे पावित्र्य टिकविण्याचा प्रयत्न करीत असतात. ज्या ठिकाणी माझे भक्त वास्तव्य करतात ते पुण्यक्षेत्र म्हणून ओळखले जाते. ते महातीर्थच होते.

स्त्रियांची हिंसा करणारा, गोवध करणारा, कृतघ्न, बालहत्या करणारा, गुरुपत्नीशी गमन करणारा असा पापी पुरुषही माझ्या भक्तांच्या दर्शनाने पवित्र होईल.

एकादशी न करणारा, संध्या न करणारा, नास्तिक, मनुष्यघातकी असा पतितही माझ्या भक्तांच्या दर्शनाने उद्धरून जाईल. शास्त्रावर उपजीविका करणारा, लेखनविद्येवर निर्वाह करणारा, रजक, भिकारी, बैलारूढ होणारा ब्राह्मणही माझ्या भक्तांच्या स्पर्शाने
पवित्र होईल. विश्वासघातकी, मित्रद्रोही, खोटया साक्षी देणारा, ठेव गिळंकृत करणारा हे माझ्या भक्तदर्शनाने शुद्ध होतील. वाणीने उग्र असलेला, जार, जारिणीचा पती, जारिणीचा पुत्र हेही माझ्या भक्तांच्या स्पर्शाने निष्पाप होतात. शुद्रांचा स्वयंपाकी, ब्राह्मण, देवल, ग्रामयाचक, अदीक्षित माझ्या भक्तांच्या दर्शनामुळे शुद्ध होतो.

पिता, माता, भार्या, भ्राता, पुत्र, कन्या, गुरूचे कुल, अनाथ भगिनी, चक्षुरहित बांधव, सासू, सासरा इत्यादिकांना हे सुंदरी, त्याच्या आपत्काली जो पोशीत नाही तो महापातकी होय. पण माझ्या भक्तांचे दर्शन घडताच तो पातकी पवित्र होईल.

अश्वत्थाचा नाश करणारा, माझ्या भक्ताची निंदा करणारा, शूद्राघरी अन्न घेणारा ब्राह्मणही, अपहार करणारा, लाक्षारस, लोहरस व कन्या यांची विक्री करणारा, महापातकी, शूद्रांची प्रेते जाळणारा हे सर्वजण माझ्या भक्तांच्या दर्शनाने अथवा स्पर्शाने पवित्र होत असतात."

श्री महालक्ष्मी विष्णूला म्हणाली, "हे भक्तानुग्रही देवा, ज्यांच्या दर्शन व स्पर्शामुळे हरिभक्ती शून्य, महाअहंकारी, स्वकीर्ती सांगणारा, धूर्त, शठ, साधूची निंदा करणारा असा कोणताही पापी पवित्र होतो, त्या भक्ताचे लक्षण सांगा. ज्यांनी स्नाने केली असता सर्व तीर्थे पुण्यमय होतात, ज्यांच्या पदरजामुळे उदक व पृथ्वी शुद्ध होते किंवा ज्यांचे दर्शन, स्पर्श इच्छिणारे लोक आहेत, त्या भारतवर्षीयांना भक्तांचा समागम परम लाभाचा वाटतो हे खरेच.

तीर्थे उदकमय नसतात किवा देवही मृत्तिकामय अथवा शीलामय नसतात. विष्णूभक्तच त्यांना तीर्थे अथवा देव बनवितात. कालांतराने ती तीर्थे व मूर्तिकय देव कालांतराने पवित्र होतात, हे कसे !"

हे महालक्ष्मीचे शब्द ऐकून श्रीकांत हसू लागले. हे गुप्त तत्त्व सांगण्यास सत्वर सिद्ध झाले. ते म्हणाले, "हे लक्ष्मी, भक्तांचे लक्षण श्रुती, पुराणे यामध्ये गुप्तच आहे. ते पुण्यरूप असून पापनाशक व भक्ती-मुक्ती देणारे आहे. ते गोपनीय असून दुष्टांना न सांगण्यासारखे आहे. पण तू नित्य पवित्र व प्राणप्रिय असल्यामुळे मी तुला ते निवेदन करतो. तू ते ऐक.

ज्याच्या कानी गुरुमुखातून विष्णुमंत्र पडेल, त्याला वेद पवित्र व पुरुषोत्तम असे म्हणतात. केवळ ज्याच्या जन्माच्या योगाने त्याचे शंभर पूर्वज स्वर्गात अथवा नरकात असले तरीही तत्काळ मुक्त होतात, त्यांनी कोणत्याही प्राणीयोनीत जन्म घेतला असला तरीही ते सत्वर जीवनमुक्त होतात आणि योग्य वेळ येताच या विष्णुलोकी ते प्राप्त होतात. जो मर्त्य माझ्या भक्तीने युक्त असतो तो माझ्या गुणांनी युक्त होऊन मुक्त होतो. ज्याची वृत्ती माझ्याच गुणात आधीन झालेली असते, तसेच जो सतत माझ्याच कथेमध्ये गुंग होऊन गेलेला असतो, माझे गुणसंकीर्तन ऐकण्यातच जो तल्लीन झालेला असतो व ज्याचा कंठ त्यामुळे दाटून येतो, ज्याचे नेत्र अश्रूंनी भरतात, जो स्वतःला विसरून जातो; तो सुखाची तसेच सालोक्य वगैरे चारी मुक्तीचीही अपेक्षा करीत नाही, तो फक्त माझ्या भक्तीचीच इच्छा करतो.

तो इंद्रत्व, मनुत्त्व, ब्रह्मत्व स्वर्ग, राज्य इत्यादी भोग यांचीही इच्छा धरीत नाही. माझे गुण श्रवण करीत तो माझे मधुर गायन करतो व अशाप्रकारे आनंदभरित झालेले माझे भक्त भारतवर्षात नित्य फिरत असतात. पण खरोखरच तशा प्रकारचा धन्य जन्म फारच दुर्लभ आहे. ते प्रत्यक्ष पृथ्वीलाही पवित्र करतात. ते नरतीर्थ नावाच्या माझ्या वसतीस्थानात येतात.

हे पद्मे, ह्याप्रमाणे मी तुला भक्तांविषयी सांगितले. आता तुला योग्य वाटेल तसे तू कर." असे विष्णूंनी सांगितले व ते सुखासनावर बसले. लक्ष्मी, सरस्वती, गंगा यांनी विष्णूच्या आज्ञेप्रमाणे केले.


अध्याय सातवा समाप्त

GO TOP