श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
नवमः स्कन्धः
पञ्चमोऽध्यायः


याज्ञवल्क्यकृतं सरस्वतीस्तोत्रवर्णनम्

श्रीनारायण उवाच
वाग्देवतायाः स्तवनं श्रूयतां सर्वकामदम् ।
महामुनिर्याज्ञवल्क्यो येन तुष्टाव तां पुरा ॥ १ ॥
गुरुशापाज्ज स मुनिर्हतविद्यो बभूव ह ।
तदा जगाम दुःखार्तो रविस्थानं सुपुण्यदम् ॥ २ ॥
सम्प्राप्य तपसा सूर्यं लोलार्के दृष्टिगोचरे ।
तुष्टाव सूर्यं शोकेन रुरोद च मुहुर्मुहुः ॥ ३ ॥
सूर्यस्तं पाठयामास वेदं वेदाङ्‌गमीश्वरः ।
उवाच स्तौहि वाग्देवीं भक्त्या च स्मृतिहेतवे ॥ ४ ॥
तमित्युक्त्वा दीननाथोऽप्यन्तर्धानं चकार सः ।
मुनिः स्नात्वा च तुष्टाव भक्तिनम्रात्मकन्धरः ॥ ५ ॥
याज्ञवल्क्य उवाच
कृपां कुरु जगन्मातर्मामेवं हततेजसम् ।
गुरुशापात्स्मृतिभ्रष्टं विद्याहीनं च दुःखितम् ॥ ६ ॥
ज्ञानं देहि स्मृतिं विद्यां शक्तिं शिष्यप्रबोधिनीम् ।
ग्रन्थकर्तृत्वशक्तिं च सुशिष्यं सुप्रतिष्ठितम् ॥ ७ ॥
प्रतिभां सत्सभायां च विचारक्षमतां शुभाम् ।
लुप्तं सर्वं दैवयोगान्नवीभूतं पुनः कुरु ॥ ८ ॥
यथाङ्‌कुरं भस्मनि च करोति देवता पुनः ।
ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतीरूपा सनातनी ॥ ९ ॥
सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः ।
विसर्गबिन्दुमात्रासु यदधिष्ठानमेव च ॥ १० ॥
तदधिष्ठात्री या देवी तस्यै नित्यै नमो नमः ।
व्याख्यास्वरूपा सा देवी व्याख्याधिष्ठातृरूपिणी ॥ ११ ॥
यया विना प्रसंख्यावान् संख्यां कर्तुं न शक्यते ।
कालसंख्यास्वरूपा या तस्यै देव्यै नमो नमः ॥ १२ ॥
भ्रमसिद्धान्तरूपा या तस्यै देव्यै नमो नमः ।
स्मृतिशक्तिज्ञानशक्तिबुद्धिशक्तिस्वरूपिणी ॥ १३ ॥
प्रतिभाकल्पनाशक्तिर्या च तस्यै नमो नमः ।
सनत्कुमारो ब्रह्माणं ज्ञानं पप्रच्छ यत्र वै ॥ १४ ॥
बभूव मूकवत्सोऽपि सिद्धान्तं कर्तुमक्षमः ।
तदाऽऽजगाम भगवानात्मा श्रीकृष्ण ईश्वरः ॥ १५ ॥
उवाच स तां स्तौहि वाणीमिष्टां प्रजापते ।
स च तुष्टाव तां ब्रह्मा चाज्ञया परमात्मनः ॥ १६ ॥
चकार तत्प्रसादेन तदा सिद्धान्तमुत्तमम् ।
यदाप्यनन्तं पप्रच्छ ज्ञानमेकं वसुन्धरा ॥ १७ ॥
बभूव मूकवत्सोऽपि सिद्धान्तं कर्तुमक्षमः ।
तदा तां स च तुष्टाव संत्रस्तः कश्यपाज्ञया ॥ १८ ॥
ततश्चकार सिद्धान्तं निर्मलं भ्रमभञ्जनम् ।
व्यासः पुराणसूत्रं च पप्रच्छ वाल्मिकिं यदा ॥ १९ ॥
मौनीभूतश्च सस्मार तामेव जगदम्बिकाम् ।
तदा चकार सिद्धान्तं तद्वरेण मुनीश्वरः ॥ २० ॥
सम्प्राप्य निर्मलं ज्ञानं भ्रमान्धध्वंसदीपकम् ।
पुराणसूत्रं श्रुत्वा च व्यासः कृष्णकलोद्‍भवः ॥ २१ ॥
तां शिवां वेद दध्यौ च शतवर्षं च पुष्करे ।
तदा त्वत्तो वरं प्राप्य सत्कवीन्द्रो बभूव ह ॥ २२ ॥
तदा वेदविभागं च पुराणं च चकार सः ।
यदा महेन्द्रः पप्रच्छ तत्त्वज्ञानं सदाशिवम् ॥ २३ ॥
क्षणं तामेव सञ्चिन्त्य तस्मै ज्ञानं ददौ विभुः ।
पप्रच्छ शब्दशास्त्रं च महेन्द्रश्च बृहस्पतिम् ॥ २४ ॥
दिव्यं वर्षसहस्रं च स त्वां दध्यौ च पुष्करे ।
तदा त्वत्तो वरं प्राप्य दिव्यवर्षसहस्रकम् ॥ २५ ॥
उवाच शब्दशास्त्रं च तदर्थं च सुरेश्वरम् ।
अध्यापिताश्च ये शिष्या यैरधीतं मुनीश्वरैः ॥ २६ ॥
ते च तां परिसञ्चिन्त्य प्रवर्तन्ते सुरेश्वरीम् ।
त्वं संस्तुता पूजिता च मुनीन्द्रैर्मनुमानवैः ॥ २७ ॥
दैत्येन्द्रैश्च सुरैश्चापि ब्रह्मविष्णुशिवादिभिः ।
जडीभूतः सहस्रास्यः पञ्चवक्त्रश्चतुर्मुखः ॥ २८ ॥
यां स्तोतुं किमहं स्तौमि तामेकास्येन मानवः ।
इत्युक्त्वा याज्ञवल्क्यश्च भक्तिनम्रात्मकन्धरः ॥ २९ ॥
प्रणनाम निराहारो रुरोद च मुहुर्मुहुः ।
ज्योतीरूपा महामाया तेन दृष्टाप्युवाच तम् ॥ ३० ॥
सुकवीन्द्रो भवेत्युक्त्वा वैकुण्ठं च जगाम ह ।
याज्ञवल्क्यकृतं वाणीस्तोत्रमेतत्तु यः पठेत् ॥ ३१ ॥
स कवीन्द्रो महावाग्मी बृहस्पतिसमो भवेत् ।
महामूर्खश्च दुर्बुद्धिर्वर्षमेकं यदा पठेत् ॥ ३२ ॥
स पण्डितश्च मेधावी सुकवीन्द्रो भवे ध्रुवम् ॥ ३३ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां
संहितायां नवमस्कन्धे याज्ञवल्क्यकृतं
सरस्वतीस्तोत्रवर्णनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥


सरस्वतीचे वाणीस्तोत्र -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीनारायण मुनी म्हणाले, "हे नारदा, पूर्वी याज्ञवल्क्य नावाच्या मुनींनी त्याच स्तोत्राने देवीची स्तुती केली. तेव्हा त्यांच्या संपूर्ण इच्छा फलद्रूप झाल्या, असे हे फलदायी देवीचे स्तवन ऐक.

पूर्वी एकदा गुरूंचा शाप होऊन त्या मुनींची सर्व विद्या नष्ट झाली. तेव्हा याज्ञवल्क्य दुःखाने व्याप्त झाला आणि पुण्यप्रद अशा सूर्यस्थानाप्रत गेला. तपश्चर्येच्या बलावर तो तेथे पोहोचला. तेथे दृष्टीगोचर अशा लोलार्कामध्ये तो उभा राहिला. तो शोकविव्हल होऊन सूर्याचे स्तवन करू लागला. तो पुन्हा पुन्हा रडू लागला. त्यावेळी सर्वनियंता जो सूर्य त्याने त्याला वेद व वेदांग शिकविले. हे केलेले अध्ययन स्मरणात रहावे म्हणून वाग्देवीचे भक्तीपूर्वक स्तवन करण्यास सूयनि मुनीला सांगितले व तो दीनानाथ अंतर्धान पावला.

त्यानंतर याज्ञवल्क्याने सुस्नात होऊन अत्यंत भक्तीने तनमनपूर्वक वाग्देवीची स्तुती केली. याज्ञवल्क्य म्हणाला, "हे माते, मी गुरूच्या शापामुळे स्मृतीभ्रंश झालो आहे. तसेच माझी विद्या लोप पावली आहे. तेव्हा अशाप्रकारे दुःखी व निस्तेज झालेल्या मला क्षमा कर. ज्ञान, स्मृती, विद्या, शिष्यांना ज्ञानदान करण्याची शक्ती, ग्रंथकर्तृत्वशक्ती, अत्यंत प्रतिष्ठित असा शिष्य, सज्जनांच्या सभेत प्रतिभा अशी सुंदर विचारशक्ती मला दे.

हे देवी, हे सर्व दैवयोगाने माझ्यापासून नष्ट झाले आहे. म्हणून ते पुन्हा नूतन कर. ज्याप्रमाणे एखादेवेळी भस्मामध्येही ईश्वर अंकुर उत्पन्न करतो, त्याचप्रमाणे लुप्त झालेले सर्व ज्ञान मला पुन्हा दे.

ब्रह्मस्वरूप, परम, ज्योतिरूप, सनातन, सर्व विद्यांची मुख्य देवी जी सरस्वती तिला नमस्कार असो. विसर्ग, अनुस्वार, मात्रा यांचे आश्रयस्थान असे जे अक्षर यांचीही अधिष्ठात्री देवता जी नित्य देवी तिला आदरपूर्वक वंदन असो. तीच व्याख्यारूप असून व्याख्याची अधिष्ठात्री देवता आहे. तिच्यावाचून अनंत कालाची संख्या मोजता येणार नाही.

म्हणून हे देवी, कालसंख्येची गणनारूप अशा तुला माझा नित्य नमस्कार असो. भ्रम व सिद्धांत ही दोन्हीही जिची स्वरूपे आहेत तिला माझा नमस्कार असो. ती स्मृतिरूप, ज्ञानशक्तीरूप, बुद्धिशक्तिरूप अशी आहे. तीच प्रतिभाशक्ती असून तीच कल्पनाशक्तीही आहे. म्हणून तिला माझा नित्य नमस्कार असो."

सनतकुमारांनी ब्रह्मदेवाला ज्ञान विचारले असता ब्रह्मदेवाने सांगण्यास सुरुवात करताच तो मुक्याप्रमाणे अवाक झाला. त्याला ते सिद्धांत करता येईना. तेव्हा तो
भगवानाकडे गेला. सर्व वृत्तांत त्या भगवानाने ऐकला. तेव्हा तो ईश्वर, आत्मा असा श्रीकृष्ण म्हणाला, "हे प्रजापते, तू त्या इष्ट वाणीची स्तुती कर." हे ऐकताच त्या ब्रह्मदेवाने परमात्म्याच्या आज्ञेने तिची स्तुती केली. तिच्या प्रसादाने ब्रह्मदेवाने उत्तमोत्तम सिद्धांत केला. त्याचवेळी पृथ्वीनेही त्या अनंताला ज्ञानाविषयी एक प्रश्न केला. त्यावेळी सिद्धांत करण्यास असमर्थ होऊन तोही मुक्याप्रमाणेच झाला. अखेर त्रस्त झालेल्या शेषाने कश्यपाच्या आज्ञेवरून सरस्वतीची स्तुती केली. त्यानंतर तो भ्रमनाशक व निर्मल असा सिद्धांत केला.

व्यासांनी ज्यावेळी वाल्मीकींना पुराणे व सूत्रे विचारली तेव्हा तो ऋषीही मूक झाला. पण त्या जगदंबेचे स्मरण करताच तिच्याच वरामुळे त्याने सत्वर सिद्धांत केला.

त्याने भ्रमांचा निरास करणारे शुद्ध उत्कृष्ट ज्ञान उत्तमप्रकारे निवेदन केले. ते ज्ञान म्हणजे जणू प्रत्यक्ष दीपच. ते ज्ञान व्यासांना सांगितले. कृष्णकलेच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या व्यासांनी पुराणे व सूत्रे स्तवन केल्यावर शंभर वर्षेपर्यंत, पुष्करामध्ये राहून त्या देवी शिवेचे ध्यान केले. तिच्यापासून वरप्राप्ती झाल्यावर व्यास कविश्रेष्ठ झाले. त्यांनी वेदांचे विभाग केले, पुराणे रचली. ज्यावेळी महेंद्राने शंकराला तत्त्वज्ञान विचारले तेव्हा त्या देवीचे ध्यान करून प्रत्यक्ष त्या प्रभूने ज्ञान दिले. महेंद्राने बृहस्पतीला शब्दशास्त्र विचारले, पण पुष्करात हजार वर्षे दिव्य ध्यान केल्यावर त्याने वर प्राप्त करून घेतला. तेव्हा तो ज्ञान सांगण्यास समर्थ झाला. तसे सामर्थ्य प्राप्त झाल्यावरच त्याने व्याकरणशास्त्र व त्याचा अर्थ देवराजाला सांगितला. पुढे त्याने शिष्यांना अध्ययन सांगितले. ज्या मुनींनी ते अध्ययन केले, ते त्या देवीची पूर्णपणे स्तुती करण्यास प्रवृत्त झाले.

"हे देवी, मुनीश्रेष्ठ, मनू, मानव, दैत्यश्रेष्ठ, देव, ब्राह्मण, ब्रह्मदेव, विष्णू, महेश्वर यांनी त्या देवीची स्तुती केली व पूजाहि केली. प्रत्यक्ष सहस्रमुखी शेषही तिचे स्तवन करण्यास प्रवृत्त झाला. पंचवक्र, चतुर्मुखही ते स्तवन करण्यास प्रवृत्त झाले. त्याठिकाणी मी पामराने एका मुखाने त्या देवीचे स्तवन कसे करावे ?" असे म्हणून तो यात्रावल्क्य भक्तीने नम्र झाला. तो अत्यंत विनयशील होऊन त्या देवीपुढे नतमस्तक झाला. त्याने निराहार राहून त्या देवीला वारंवार नमस्कार केला. तो एकसारखा रडू लागला. अखेर ती ज्योतीरूप महामाया त्याच्या दृष्टीस पडली. ती याज्ञवल्क्यास म्हणाली, "तू सर्वोत्तम कवी होशील."

इतका आशीर्वाद देऊन ती वैकुंठलोकी गेली. याज्ञवल्क्याने केलेले देवीचे स्तोत्र जो नित्य पठण करील तो उत्तम कवी व बृहस्पतीप्रमाणे महावक्ता होईल. महामूर्ख व दुर्बुद्धी पुरुषानेही एक वर्षभर जर या स्तोत्राचे पारायण केले तर तो पंडित होईल. बुद्धीमान होऊन सर्वोत्कृष्ट काव्य करील.


अध्याय पाचवा समाप्त

GO TOP