श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
अष्टमः स्कन्धः
त्रयोदशोऽध्यायः


भुवनकोशवर्णने क्रौञ्चशाकपुष्करद्वीपवर्णनम्

नारद उवाच
शिष्टद्वीपप्रमाणं च वद सर्वार्थदर्शन ।
येन विज्ञातमात्रेण परानन्दमयो भवेत् ॥ १ ॥
श्रीरानारायण उवाच
कुशद्वीपस्य परितो घृतोदावरणं महत् ।
ततो बहिः क्रौंचद्वीपो द्विगुणः स्यात्स्वमानतः ॥ २ ॥
क्षीरोदेनावृतो भाति यस्मिन्क्रौंचाद्रिरस्ति च ।
नामनिर्वर्तकः सोऽयं द्वीपस्य परिवर्तते ॥ ३ ॥
योऽसौ गुहस्य शक्त्या च भिन्नकुक्षिः पुराभवत् ।
क्षीरोदेनासिच्यमानो वरुणेन च रक्षितः ॥ ४ ॥
घृतपृष्ठो नाम यस्य विभाति किल नायकः ।
प्रियव्रतात्मजः श्रीमान् सर्वलोकनमस्कृतः ॥ ५ ॥
स्वद्वीपं तु विभज्यैव सप्तधा स्वात्मजान्ददौ ।
पुत्रनामसु वर्षेषु वर्षपान्सन्निवेशयन् ॥ ६ ॥
स्वयं भगवतस्तस्य शरणं सञ्जगाम ह ।
आमो मधुरुहश्चैव मेघपृष्ठः सुधामकः ॥ ७ ॥
भ्राजिष्ठो लोहितार्णश्च वनस्पतिरितीव च ।
नगा नद्यश्च सप्तैव विख्याता भुवि सर्वतः ॥ ८ ॥
शुक्लो वै वर्धमानश्च भोजनश्चोपबर्हणः ।
नन्दश्च नन्दनः सर्वतोभद्र इति कीर्तिताः ॥ ९ ॥
अभया अमृतौघा चार्यका तीर्थवतीति च ।
वृत्तिरूपवती शुक्ला पवित्रवतिका तथा ॥ १० ॥
एतासामुदकं पुण्यं चातुर्वर्ण्येन पीयते ।
पुरुषऋषभौ तद्वद्‌ द्रविणाख्यश्च देवकः ॥ ११ ॥
एते चतुर्वर्णजाताः पुरुषा निवसन्ति हि ।
तत्रत्याः पुरुषा आपोमयं देवमपां पतिम् ॥ १२ ॥
पूर्णेनाञ्जलिना भक्त्या यजन्ते विविधक्रियाः ।
आपः पुरुषवीर्याः स्थ पुनन्तीर्भूर्भुवः स्वरः ॥ १३ ॥
ता नः पुनीतामीवघ्नीः स्पृशतामात्मना भुवः ।
इति मन्त्रजपान्ते च स्तुवन्ति विविधैः स्तवैः ॥ १४ ॥
एवं परस्तात्क्षीरोदात्परितश्चोपवेशितः ।
द्वात्रिंशल्लक्षसंख्याकयोजनायाममाश्रितः ॥ १५ ॥
स्वमानेन च द्वीपोऽयं दधिमण्डोदकेन च ।
शाकद्वीपो विशिष्टोऽयं यस्मिच्छाको महीरुहः ॥ १६ ॥
स्वक्षेत्रव्यपदेशस्य कारणं स हि नारद ।
प्रैयव्रतोऽधिपस्तस्य मेधातिथिरिति स्मृतः ॥ १७ ॥
विभज्य सप्त वर्षाणि पुत्रनामानि तेषु च ।
सप्त पुत्रान्निजान् स्थाप्य स्वयं योगगतिं गतः ॥ १८ ॥
पुरोजवो मनःपूर्वजवोऽथ पवमानकः ।
धूम्रानीकश्चित्ररेफो बहुरूपोऽथ विश्वधृक् ॥ १९ ॥
मर्यादागिरयः सप्त नद्यः सप्तैव कीर्तिताः ।
ईशान ऊरुशृङ्गोऽथ बलभद्रः शतकेशरः ॥ २० ॥
सहस्रस्रोतको देवपालोऽप्यन्ते महाशनः ।
एतेऽद्रयः सप्त चोक्ताः सरिन्नामानि सप्त च ॥ २१ ॥
अनघा प्रथमाऽऽयुर्दा उभयस्पृष्टिरेव च ।
अपराजिता पञ्चपदी सहस्रश्रुतिरेव च ॥ २२ ॥
ततो निजधृतिश्चोक्ताः सप्त नद्यो महोज्ज्वलाः ।
तद्वर्षपुरुषाः सर्वे सत्यव्रतक्रतुव्रतौ ॥ २३ ॥
दानव्रतानुव्रतौ च चतुर्वर्णा उदीरिताः ।
भगवन्तं प्राणवायुं प्राणायामेन संयुताः ॥ २४ ॥
यजन्ति निर्धूतरजस्तमसः परमं हरिम् ।
अन्तः प्रविश्य भूतानि यो बिभर्त्यात्मकेतुभिः ॥ २५ ॥
अन्तर्यामीश्वरः साक्षात्पातु नो यद्वशे इदम् ।
परस्ताद्दधिमण्डोदात्ततस्तु बहुविस्तरः ॥ २६ ॥
पुष्करद्वीपनामायं शाकद्वीपद्विसंगुणः ।
स्वसमानेन स्वादूदकेनायं परिवेष्टितः ॥ २७ ॥
यत्रास्ते पुष्करं भ्राजदग्निचूडानिभानि च ।
पत्राणि विशदानीह स्वर्णपत्रायुतायुतम् ॥ २८ ॥
श्रीमद्‍भगवतश्चेदमासनं परमेष्ठिनः ।
कल्पितं लोकगुरुणा सर्वलोकसिसृक्षया ॥ २९ ॥
तद्‌द्वीप एक एवायं मानसोत्तरनामकः ।
अर्वाचीनपराचीनवर्षयोरवधिर्गिरिः ॥ ३० ॥
उच्छ्रायायामयोः संख्यायुतयोजनसम्मिता ।
यत्र दिक्षु च चत्वारि चतसृषु पुराणि ह ॥ ३१ ॥
इन्द्रादिलोकपालानां यदुपर्यर्कनिर्गमः ।
मेरुं प्रदक्षिणीकुर्वन् भानुः पर्येति यत्र हि ॥ ३२ ॥
संवत्सरात्मकं चक्रं देवाहोरात्रतो भ्रमन् ।
प्रैयव्रतोऽधिपो वीतिहोत्रः स्वात्मजकद्वयम् ॥ ३३ ॥
वर्षद्वये परिस्थाप्य वर्षनामधरं क्रमात् ।
रमणो धातकिश्चैव तत्तद्वर्षपती उभौ ॥ ३४ ॥
कृताः स्वयं पूर्वजवद्‍भगवद्‍भक्तितत्पराः ।
तद्‌वर्षपुरुषा ब्रह्मरूपिणं परमेश्वरम् ॥ ३५ ॥
सकर्मकेन योगेन यजन्ति परिशीलिताः ।
यत्तत्कर्ममयं लिङ्ग ब्रह्मलिङ्गं जनोऽर्चयेत् ।
एकान्तमद्वयं शान्तं तस्मै भगवते नमः ॥ ३६ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
भुवनकोशवर्णनं क्रौञ्चशाकपुष्करद्वीपवर्णनं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥


द्वीपे व त्यांची स्थाने -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारद म्हणाले, "हे सर्वज्ञ मुने, आता उरलेल्या द्वीपांचे आकारमानाविषयी सविस्तर माहिती सांगा. खरोखरच फक्त श्रवणानेही आनंद होतो आहे. त्याचे ज्ञान सुखावह आहे."

नारदाचे भाषण ऐकून नारायण मुनी प्रसन्न झाले. त्यांनी नारदाला पुढील द्वीपांची माहिती सांगितली. नारायण मुनी नारदाला म्हणाले, "हे नारदा, धृतोदाच्या मध्यभागी कुशद्वीप वसलेले आहे. कुशद्वीपाच्या पलीकडे क्रौंचद्वीप असून त्याचे आकारमान कुशद्वीपाच्या दुप्पट आहे. क्रौंचद्वीप क्षीरोदाने वेढलेले आहे. त्यामधे क्रौंचपर्वत आहे. या क्रौंचपर्वताने द्वीपाच्या सर्व बाजू व्यापल्यामुळे त्या द्वीपाला त्या पर्वताचेच नाव पडले.

फार वर्षापूर्वी गुहांमुळे त्या सामर्थ्याने या बाजू फुटल्या. पण साक्षात वरुणाने त्यावर क्षारदाची वृष्टी केली आणि पुढचे संकट निवारण केले. धृतपृष्ठ हा या द्वीपाचा अधिपती आहे. तो प्रियव्रताचा पुत्र असून अत्यंत तेजस्वी आहे व तो सर्वांनाच प्रिय व पूज्य वाटतो.

पुढे धृतपृष्ठाने या द्वीपाचे भाग केले आणि आपल्या पुत्रांना वाटून दिले. त्यातील वर्षांची नावे ही त्या पुत्रांचीच नावे असून त्याचे नावाने ते सांप्रत ओळखले जात आहेत. ते सर्व पुत्र त्या वर्षांचे स्वामी आहेत. अशाप्रकारे आपल्या पुत्रांना द्वीपाची अवस्था वाटून दिल्यावर धृतपृष्ठ स्वतः त्या भगवानाला शरण गेला.

आम, मधुरूह, मेघपृष्ठ, सुधामक, भ्रजिष्ठ, लोहितार्ण व वनस्पती अशी त्या वर्षांची व त्या पुत्रांचीही नावे होती. या सातही वर्षामध्ये सात नद्या व सात पर्वत आहेत. त्या या द्वीपात सर्वत्र पसरलेल्या आहेत.

शुक्ल, वर्धमान, भोजन, उपबर्हण, नंद, नंदन व सर्वतोभद्र अशी त्या पर्वतांची नावे आहेत. ते सर्वच पर्वत श्रेष्ठ आहेत. आता तेथील सर्व प्रसिद्ध नद्यांची नावे सांगतो. त्या क्रमाने त्या त्या वर्षातून वहात आहेत.

अभया, अमृतौघा, आर्यका, तीर्थवती, वृतिरूपबती, शुक्ला, पवित्रवतिका अशा या नावांनी प्रसिद्ध असलेल्या या सात नद्या असून त्या अत्यंत पवित्र आहेत. चारी वर्णांचे लोक या नद्यातील पुण्योदक प्राशन करतात.

त्या वर्षात पुरुष, ऋषभ, द्रविण व देव या नावांचे चार वर्ण आहेत. या चार वर्षात उत्पन्न झालेल्या पुरुषांचे येथे वास्तव्य आहे.

उदकाचा जो पती पण उदकमय असा जो देव, त्याची तेथील पुरुष पूजा करतात. ओंजळपूर्ण अत्यंत भक्तीने ते सर्वजण जलरूपी देवास अर्पण करतात. निरनिराळ्या विधींनी ते जलदेवाची भक्ती करतात. ते म्हणतात, "हे उदकांनो, तुम्ही ईश्वराकडून वीर्य मिळवा आणि त्या वीयनि युक्त होऊन तुम्ही भू, भूवः, स्वः या तीन लोकांना पवित्र करा. नंतर आम्हाला स्पर्श करा. म्हणजे निदान त्यामुळे तरी आमचे हे पार्थीव देह पवित्र होतील. हे देवांनो, याचे कारण असे की तुम्ही सर्व पापांचा नाश करणारे आहात."

अशाप्रकारे वरील मंत्राचा ते लोक जप करतात. त्यानंतर निरनिराळी स्तोत्रे गाऊन ते उदकदेवीची भक्तीने स्तुती करतात.

या क्षारोदाच्या पलीकडे लागूनच एक दुसरे द्वीप आहे. त्याचे प्रमाण बत्तीस योजने इतके विस्तृत आहे. तितकाच प्रचंड असलेला जो दधिमंडोद समुद्र, त्या समुद्राने ते द्वीप परिवेष्टित आहे.

हे नारदा, त्या समुद्राने स्वतःचे क्षेत्र मर्यादित केले आहे. प्रियव्रताचा आणखी पुत्र मेधातिथी या नावाने जो प्रसिद्ध तो या द्वीपाचा स्वामी आहे. मेधातिथीने या द्वीपाचे सात विभाग केले आणि आपल्या सात पुत्रांना विभागून दिले. त्याच सात पुत्रांना नावे त्या द्वीपातील सातही वर्षांना दिली. आपल्या पुत्रांना त्या स्थानी स्थिर करून त्यांची राज्यावर स्थापना करून तो प्रियव्रतपुत्र मेधातिथी सद्‍गतीस गेला. युगपुरुषांना प्राप्त होणारी गती त्याला मिळाली. पुरोजव, मनःपूर्वजव, पवमानक, धूम्रानीक चित्ररेफ, बहुरूप, विश्वधृक हीच त्या सातही पुत्रांची नावे असून त्याच सात नावांची ती वर्षे ओळखली जातात. त्या सातही वर्षांची मर्यादा स्पष्ट करणारे उत्कृष्ट पर्वत आहेत. तसेच त्या सात वर्षात पवित्र जलांनी युक्त अशा सात नद्याही प्रसिद्ध आहेत.

ईशान्य, उरुशृंग, बलभद्र, शतकेसर, सहस्रस्त्रोतक, देवपाल व महासन असे सात पर्वत आहेत. हे नारदा, पर्वतांची नावे तर तुला सांगितलीच. आता नद्यांची नावे सांगतो, ती ऐक.

अनघा, प्रथमा, आर्युदा, उभयस्पृष्टि, अपराजिता, पंचपट्टी, सहस्त्रुती व शेवटची नदी निजधृती या सात नद्या असून त्या उज्वल नद्या आहेत. त्या वर्षात चार वर्णाचे पुरुष असून ते वर्ण असे, सत्यव्रत, ऋतुव्रत, दाताव्रत, अनुव्रत या चार वर्णांनी ते सर्व युक्त आहेत. असे शास्त्रात सांगितले आहे.

ते सर्वजण प्राणायाम साधनेने युक्त होतात व नंतर भगवान प्राणवायूचे पूजन करतात. मनातील रज व तम या गुणांचा संपूर्ण नाश करून ते देवाची आराधना करतात. भगवान प्रणव हाच श्रेष्ठ देव आहे असे समजून ते त्याच्या पूजेत रत होतात.

तो भगवान प्राणवायूच सर्व भूतमात्रांमधे प्रवेश करून राहिलेला आहे. तो स्वतःच्या वृत्तींच्या मार्फतच सर्वांच्या प्राणांचे संरक्षण करतो. तोच त्यांचे पोषण करतो. सर्वत्र भूतमात्रे त्याच्या आधीन आहेत. खरोखरच तोच सर्वांच्या अंतर्यामात असलेला ईश्वर आम्हा सर्वांचे रक्षण करो.

हे नारदा, या दधिमण्डोद सागराच्या पुढे आणखी एक द्वीप असून ते पुष्करद्वीप या नावाने प्रसिद्ध आहे. ते अत्यंत विशाल प्रदेशाने व्यापलेले आहे. त्याचे आकारमान शाकद्वीपाच्या दुप्पट आहे.

त्याच्या सभोवती पसरलेला स्वादूदक नावाचा महासागर, त्याने द्वीपाला वेढून टाकले आहे. सर्वात दैदीप्यमान असा पुष्कर तेथे आहे. त्या पुष्कराला हजारो सुवर्ण पाकळ्या आहेत. प्रदीप्त अग्नीच्या शिखा ज्याप्रमाणे निर्मळ असतात तशाच त्या पाकळ्या भासतात.

हेच पुष्कर त्या परमश्रेष्ठ अशा तेथील भगवानाचे आसन आहे. तो लोकगुरु असून त्याने सर्व लोकांना उत्पन्न करण्याच्या हेतूने हे आसन तयार केले आहे व तशीच योजना केली आहे.

या द्वीपाचे वैशिष्टय असे की, त्यामध्ये मानसोत्तर या नावाचा एकच प्रचंड पर्वत आहे. हा पर्वत संपूर्ण दोन वर्षांची सीमा आहे. त्याच्या दोन्ही बाजूला दोन वर्षे आहेत. त्या पर्वताची लांबी दोन हजार योजने असून उंचीही तितकीच म्हणजे दहा हजार योजने आहे. या पर्वताच्या चार दिशेला चार नगरे असून ती सुंदर नगरे इंद्र वगैरे जे लोकपाल आहेत, त्यांची ती नगरे आहेत. येथेच सूर्योदय होतो

मेरूस प्रदक्षिणा करणारा व देवांचा दिवस आणि रात्र यांच्या योगाने संवत्सरासारख्या चक्रातून भ्रमण करणारा सूर्य तेथेच परत येतो.

त्या द्वीपाचा अधिपती प्रियव्रताचा पुत्र वीतिहोत्र हा आहे. त्याने इतरांप्रमाणे या द्वीपाचे दोन विभाग केले व आपल्या दोन्ही पुत्रांना वाटून दिले. आपल्या दोन्ही पुत्रांचीच नावे त्याने या वर्षांना दिली. तेच दोन पुत्र त्या वर्षांचे अधिपती केले. आता त्यांची नावे सांगतो.

वीतिहोत्राचे पुत्र रमण व घातकी या दोघांना त्याने वर्षाचे अधिपती केले नंतर तो भगवदभक्तीत मग्न झाला. त्या वर्षातील पुरुष अभ्यासशील असून कमलासनाधिष्ठित असलेल्या परमेश्वराची पूजा करतात. त्या देवाची सकर्मक म्हणजे ब्रह्मसालोक्यसाधन या नावाच्या योगाने आराधना करतात. जे कर्मफलरूप लिंग आहे म्हणजे सूचक व शापक असे ते लिंग तेच ब्रह्मलिंग होय. त्याची पुरुषांनीच पूजा करावी. एका शुद्ध ईश्वराचे ठिकाणी निश्चयाने ज्याची स्थिती आहे आणि म्हणूनच तो अद्वय व शांत आहे, त्या भगवानाला आमचा वारंवार नमस्कार असो.


अध्याय तेरावा समाप्त

GO TOP