श्रीनारायण उवाच
गिरी मेरुं च पूर्वेण द्वौ चाष्टादशयोजनैः ।
सहस्रैरायतौ चोदग्द्विसहस्रं पृथूच्चकौ ॥ १ ॥
जठरो देवकूटश्च तावेतौ गिरिवर्यकौ ।
मेरोः पश्चिमतोऽद्री द्वौ पवमानस्तथापरः ॥ २ ॥
पारियात्रश्च तौ तावद्विख्यातौ तुङ्गविस्तरौ ।
मेरोर्दक्षिणतः ख्यातौ कैलासकरवीरकौ ॥ ३ ॥
प्रागायतौ पूर्ववृत्तौ महापर्वतराजकौ ।
एवं चोत्तरतो मेरोस्त्रिशृङ्गमकरौ गिरी ॥ ४ ॥
एतैश्चाद्रिवरैरष्टसंख्यैः परिवृतो गिरिः ।
सुमेरुः काञ्चनगिरिः परिभ्राजन् रविर्यथा ॥ ५ ॥
मेरोर्मूर्धनि धातुर्हि पुरी पङ्कजजन्मनः ।
मध्यतश्चोपक्लृप्तेयं दशसाहस्रयोजनैः ॥ ६ ॥
समानचतुरस्रां च शातकौम्भमयीं पुरीम् ।
वर्णयन्ति महात्मानः परावरविदो बुधाः ॥ ७ ॥
तां पुरीमनुलोकानामष्टानामीशिषां पराः ।
पुर्यः प्रख्यातसौवर्णरूपास्ताश्च यथादिशम् ॥ ८ ॥
यथारूपं सार्धनेत्रसहस्रप्रमिताः कृताः ।
मेरोर्नव पुराणि स्युर्मनोवत्यमरावती ॥ ९ ॥
तेजोवती संयमनी तथा कृष्णाङ्गनापरा ।
श्रद्धावती गन्धवती तथा चान्या महोदया ॥ १० ॥
यशोवती च ब्रह्मेन्द्रवह्न्यादीनां यथाक्रमम् ।
तत्रैव यज्ञलिङ्गस्य विष्णोर्भगवतो विभोः ॥ ११ ॥
वामपादाङ्गुष्ठनखनिर्भिन्नस्य च नारद ।
अण्डोर्ध्वभागरन्ध्रस्य मध्यात्संविशती दिवः ॥ १२ ॥
मूर्धन्यवततारेयं गङ्गा संविशती विभो ।
लोकानामखिलानां च पापहारिजलाकुला ॥ १३ ॥
इयं च साक्षाद्भगवत्पदी लोकेषु विश्रुता ।
कालेन महता सा तु युगसाहस्रकेण तु ॥ १४ ॥
दिवो मूर्धानमागत्य देवी देवनदीश्वरी ।
यत्तद्विष्णुपदं नाम स्थानं त्रैलोक्यविश्रुतम् ॥ १५ ॥
औत्तानपादिर्यत्रास्ते ध्रुवः परमपावनः ।
भगवत्पादयुगलं पद्मकोशरजो दधत् ॥ १६ ॥
अद्याप्यास्ते स राजर्षिः पदवीमचलां श्रितः ।
तत्र सप्तर्षयस्तस्य प्रभावज्ञा महाशयाः ॥ १७ ॥
प्रदक्षिणं प्रक्रमन्ति सर्वलोकहितेप्सवः ।
आत्यन्तिकी सिद्धिरियं तपतां सिद्धिदायिनी ॥ १८ ॥
आद्रियन्ते च शिरसा जटाजूटोषितेन च ।
ततो विष्णुपदाद्देवी नैकसाहस्रकोटिभिः ॥ १९ ॥
विमानैराकुले देवयानेऽवतरती च सा ।
चन्द्रमण्डलमाप्लाव्य पतन्ती ब्रह्यसद्यनि ॥ २० ॥
चतुर्धा भिद्यमाना सा ब्रह्मलोके च नारद ।
चतुर्भिर्नामभिर्देवी चतुर्दिशमभिसृता ॥ २१ ॥
सरितां च नदीनां च पतिमेवान्वपद्यत ।
सीता चालकनन्दा च चतुर्भद्रेति नामभिः ॥ २२ ॥
सीता च ब्रह्मसदनाच्छिखरेभ्यः क्षमाभृताम् ।
केसराभिधनाम्ना च प्रस्रवन्ती च स्वर्णदी ॥ २३ ॥
गन्धमादनमूर्ध्नीह पतिता पापहारिणी ।
अन्तरेण तु भद्राश्ववर्षं प्राच्यां समागता ॥ २४ ॥
क्षारोदधिं गता सा तु द्युनदी देवपूजिता ।
ततो माल्यवतः शृङ्गाद् द्वितीया परिनिर्गता ॥ २५ ॥
ततो वेगवती भूत्वा केतुमालं समागता ।
चक्षुर्नाम्नी देवनदी प्रतीच्यां दिश्युपागता ॥ २६ ॥
सरितां पतिमाविष्टा सा गङ्गा देववन्दिता ।
ततस्तृतीया धारा तु नाम्ना ख्याता च नारद ॥ २७ ॥
पुण्या चालकनन्दा वै दक्षिणेनाब्जभूपदात् ।
वनानि गिरिकूटानि समतिक्रम्य चागता ॥ २८ ॥
हेमकूटं गिरिवरं प्राप्तातोऽपीह निर्गता ।
अतिवेगवती भूत्वा भारतं चागतापरा ॥ २९ ॥
दक्षिणं जलधिं प्राप्ता तृतीया सा सरिद्वरा ।
यस्याः स्नानाय सरतां मनुजानां पदे पदे ॥ ३० ॥
राजसूयाश्वमेधादि फलं तु न हि दुर्लभम् ।
ततश्चतुर्थी धारा तु भृङ्गवत्पर्वतात्पुनः ॥ ३१ ॥
भद्राभिधा संस्रवन्ती कुरून्सन्तर्प्य चोत्तरान् ।
समुद्रं समनुप्राप्ता गङ्गा त्रैलोक्यपावनी ॥ ३२ ॥
अन्ये नदाश्च नद्यश्च वर्षे वर्षेऽपि सन्ति हि ।
बहुशो मेरुमन्दारप्रसूताश्चैव नारद ॥ ३३ ॥
तत्रापि भारतं वर्षं कर्मक्षेत्रमुशन्ति हि ।
अन्यानि चाष्टवर्षाणि भौमस्वर्गप्रदानि च ॥ ३४ ॥
स्वर्गिणां पुण्यशेषस्य भोगस्थानानि नारद ।
पुरुषाणां चायुतायुर्वज्राङ्गा देवसन्निभाः ॥ ३५ ॥
पुरुषा नागसाहस्रैर्दशभिः परिकल्पिताः ।
महासौरतसन्तुष्टाः कलत्राढ्याः सुखान्विताः ॥ ३६ ॥
एकवर्षोनके चायुष्याप्तगर्भाः स्त्रियोऽपि हि ।
त्रेतायुगसमः कालो वर्तते सर्वदैव हि ॥ ३७ ॥
इति श्रीमद्देवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायामष्टमस्कन्धे
भुवनकोशवर्णने पर्वतनदीवर्षादिवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
गंगानदीपासून झालेले चार प्रवाह -
[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
मेरूच्या पूर्वेला दोन अत्यंत प्रचंड पर्वत आहेत ते पूर्वेकडे दोन हजार योजने पसरले असून उत्तरेकडेही तसेच रुंद होत गेले आहेत. जठर व देवकूट अशी त्यांची श्रेष्ठ नावे आहेत. त्यांच्या पश्चिमेस पवमान व परियान हे होत. ते अत्यंत उंच व विस्तृत पर्वत आहेत. ते फार प्रसिद्ध आहेत. मेरूच्या दक्षिणेस कैलास व करवीर या नावाचे दोन आणखी पर्वत आहेत.
या सर्व मोठमोठया पर्वतांप्रमाणे पूर्वेकडे अत्यंत महान असे दोन पर्वत आहेत. तसेच दुसरे दोन महापर्वत मेरूच्या उत्तरेस असून त्यांची नावे त्रिशृंग व मकर अशी आहेत.
या आठ पर्वतराजांनी सुमेरु पर्वत परिवेष्ठित आहे. तो विस्तृत सुमेरू नावाचा कांचनगिरी सूर्याप्रमाणे दैदीप्यमान आहे.
मेरूच्या माथ्यावर मध्यभागी कमलापासून उत्पन्न झालेला जो ब्रह्मदेव त्याची नगरी वसली आहे. ती क्षेत्राने दहा हजार योजने एवढी विस्तृत आहे. ती अत्यंत सूक्ष्मदर्शी असून तीमध्ये अनेक पंडितांचे वास्तव्य आहे. ती नगरी चौकोनी आणि सोन्याची आहे.
त्या सुवर्ण नगरीच्या आठही दिशेला सर्व बाजूंनी आठ उत्तम प्रकारची पुरे वसलेली आहेत. तीही सर्व सोन्याची असून आठही दिक्पाल त्यांचे अधिकारी आहेत. या आठ दिक्पालांच्या वर्णाप्रमाणे दिसणारे असे शोभिवंत आणखी नऊ पुरे मेरूपर्वतावर वसले आहेत. ते अडीच हजार योजनांनी विस्तृत आहेत. त्यांची नावे अशी - मनोवती, अमरावती, तेजोवती, संयमिनी, कृष्णांगना, श्रद्धावती, गंधवती, महोदया, यशोवती.
हे ब्राह्मणश्रेष्ठा, वन्हीप्रमाणे जे आणखी लोकपाल आहेत, त्यांची ही पुरे असून ते लोकपाल त्यांचे अधिकारी आहेत हे लक्षात ठेव.
भगवान विष्णूच्या डाव्या पायाच्या अंगठयावरील नखामुळे ब्रह्मांडाचा ऊर्ध्वभाग त्याच ठिकाणी फुटला. तो यज्ञरूप असून त्याच्या रंध्रातूनच गंगा नदीने स्वर्गात प्रवेश केला आणि ती ब्रह्मांडात शिरून वाहू लागली. गंगा नदीचे जल सर्व जनांच्या पापाचा नाश करणारे असून अत्यंत पावित्र्याने परिपूर्ण आहे आणि म्हणून हे साक्षात भगवंताचेच विश्रांतीस्थान आहे असे मानले तरी हरकत नाही. कारण ते प्रसिद्धच आहे.
हजारो युगे लोटली तरी प्रचंड कालावधीनंतर ईश्वराच्या योग्यतेप्रमाणे असलेली ही महानदी गंगा देवनदी होऊन स्वर्गात येऊन वास्तव्य करू लागली. आता तो स्वर्गलोक कोणता हे मी तुला सांगतो.
संपूर्ण त्रैलोक्यात विष्णुपद या नावाने संबोधलेले अत्यंत प्रसिद्ध स्थान आहे. त्या ठिकाणी उत्तानपाद राजाचा पुत्र ध्रुव नित्य वास्तव्य करीत असतो. तेथे ती नदी जाऊन राहिली आहे.
तो राजर्षी ध्रुव अत्यंत पवित्र व पुण्यवान असून भगवंताच्या पद्मयुगुलरूप कोशाचे रजःकण धारण करून तो तेथेच चिरंतन राहिला आहे. त्याने त्या अढळ विष्णुपदाचा आश्रय केला आहे.
जे सर्वांचे हितच चिंतीत असतात असे महान ऋषी जे सप्तर्षी म्हणून हे प्रसिद्ध आहेत, ते या ध्रुवाभोवती प्रदक्षिणा घालीत असतात. त्या गंगेच्या प्रवाहाचा प्रभाव किती श्रेष्ठ याची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे. ही फरच उत्कृष्ट सिद्धी असून अत्यंत उत्कट आहे. म्हणून ते जगधारी ऋषिश्रेष्ठ गंगेच्या जलामध्ये नित्य स्नान करीत असतात. अशाप्रकारे ती कोटयावधी वर्षे तेथे वास्तव्य करते आणि नंतर त्या विष्णुपदापासून ती देवयानामध्ये उतरते.
देवयान विमानांनी गजबजून गेलेले असते. देवयानामधून ती देवी चंद्रमंडलात येते. तेथूनच तिचा प्रवाह ब्रह्मलोकी पडतो.
हे नारदा, ती जेव्हा ब्रह्मलोकात पडते तेव्हा तिचा प्रवाह फुटून चार प्रवाह होतात व ती गंगादेवी चारही दिशेने वेगाने वाहू लागते. अखेर शेवटी सर्वच लहान-मोठया नद्यांचा पती जो सागर त्याला जाऊन ती मिळते व त्याच्यात विलीन होते.
तिचे चारही दिशेला वहाणारे प्रवाह सीता, अलकनंदा, चक्षु, भद्रा या नावांनी विख्यात आहेत. त्यापैकी सीतानदी स्वर्गीय नदी असून ती केसराभिध नावाच्या पर्वत शिखरावरून उगम पावते. प्रथम ती ब्रह्मरंध्रापासून निघते व पुढे वाहू लागते. ती सीता नावाची सुवर्णनदी त्या गंधमादन पर्वतावर पडून वाहते आणि तीही पापविमोचन करते.
ती देवांना अत्यंत पूज्य असलेली द्युनदी भद्राश्ववर्षामधून वहात जाऊन पूर्वेकडे जाते आणि अखेर क्षारोदधीला येऊन मिळते. अशी ती सीतानदी होय.
त्याचप्रमाणे गंगानदीपासून उत्पन्न झालेली दुसरी नदी माल्यवान पर्वताच्या उंच शिखरावरून उगम पावली आहे. त्यामुळे तिच्या प्रवाहाला प्रचंड वेग प्राप्त झाला आहे. ती पुढे केतूमालातून वहात जाते. त्या देवतुल्य नदीला चक्षु या नावाने संबोधतात. ती पूर्वदिशेकडे वाहात जाते. ती देवांनाही वंदनीय असून ती जणू दुसरी गंगाच होऊन समुद्रास जाऊन मिळते.
हे नारदा, गंगेपासून जो तिसरा एक प्रवाह उत्पन्न झाला तो अलकनंदा या नावाने प्रसिद्ध असून हा प्रवाह अत्यंत पवित्रतम आहे. ब्रह्मलोकाच्या दक्षिण बाजूला असलेली विस्तृत वने व उंच शिखरांना ओलांडून ती पुण्यशील नदी पुढे जाते.
ही अलकनंदा पुढे हेमकूट नावाच्या पर्वतावर येऊन पोहोचली आहे. तेथून ती पुढे अधिक वेगाने धावू लागते. ती सर्वश्रेष्ठ नदी नंतर भरतवर्षातून वाहू लागते. अशाप्रकारची ती सर्वश्रेष्ठ नदी अखेर दक्षिण समुद्रास जाऊन मिळाली आहे.
तिच्या पुण्यशील जलाने स्नान केल्यास मानवांना नित्य परम पुण्य लाभते. ते मुक्त होतात. इतकेच नव्हे तर तिच्या जलस्नानाने राजसूय व अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते. असे त्या नदीचे मोठेपण आहे. ती सर्वांना वंद्य आहे.
या नंतरचा शेवटचा चवथा गंगाप्रवाह शृंगवान पर्वतावरून उगम पावला असून तो प्रवाह भद्रा या नावाने प्रसिद्ध आहे. तो उत्तर कुरूमधून वहात जात असल्याने तेथील प्रदेश त्या प्रवाहाने पवित्र केला आहे. अशाप्रकारे संपूर्ण त्रैलोक्यालाही पावन करणारी ती गंगानदी शेवटी उत्तर समुद्रास जाऊन मिळाली आहे.
हे नारदा, प्रत्येक वर्षात इतरही अनेक श्रेष्ठ नद्या आहेत. तसेच प्रचंड नदही आहेत. हे बहुतेक सर्व नद व नद्या मेरूमंदारापासून निर्माण झाले आहेत.
ह्या सर्व वर्षांमध्ये भारतवर्ष श्रेष्ठ असून ते कर्मक्षेत्र आहे. म्हणून त्याला कर्मभूमी म्हणतात. अशाप्रकाची आणखी आठ वर्षे आहे. तीही सुंदर असून उत्तम प्रकारची ऐहिक सुखे देणारी आहेत.
स्वर्गात गेलेल्या सर्व प्राण्यांना तेथील सुख भोगल्यानंतर उरलेला जो काळ रहातो, तो काळ त्या इतर वर्षात जाऊन त्यांना तेथील भोग भोगायला मिळतात. तीही भोगांची उत्तम स्थाने आहेत. म्हणून तीसुद्धा तीर्थस्थानेच बनलेली आहेत.
हे नारदा, तेथे रहाणार्या सर्वांची आयुर्मर्यादा जवळजवळ दहा हजार वर्षांची आहे. तेथे ते जणू देवांप्रमाणे वावरत असतात. त्यांचे देह तेथे वज्रतुल्य बनलेले असतात. जणू दहा हजार हत्तींचे बळ अंगी असावे एवढे सामर्थ्य त्यांच्यात तेथे प्राप्त झालेले असते. ते महासुरतानेच तेथे संतुष्ट होऊन रहातात. त्यांना त्या ठिकाणी सुयोग्य स्त्रियांची प्राप्ती होते व त्यांचा उपभोग घेत ते तेथे रहात असतात. अखेर जेव्हा एक वर्ष आयुष्य शिल्लक राहते तेव्हा तेथील स्त्रिया गर्भवती होतात. तोपर्यंत त्या तारुण्यातच असतात. तेथे नित्य त्रेतायुगाप्रमाणे काल असतो.