श्रीमद्‌देवीभागवत महापुराण
सप्तमः स्कन्धः
चतुस्त्रिंशोऽध्यायः


देवीगीतायां ज्ञानस्य मोक्षहेतुत्ववर्णनम्

श्री देव्युवाच
क्व यूयं मन्दभाग्या वै क्वेदं रूपं महाद्‌भुतम् ।
तथापि भक्तवात्सल्यादीदृशं दर्शितं मया ॥ १ ॥
न वेदाध्ययनैर्योगैर्न दानैस्तपसेज्यया ।
रूपं द्रष्टुमिदं शक्यं केवलं मत्कृपां विना ॥ २ ॥
प्रकृतं शृणु राजेन्द्र परमात्मात्र जीवताम् ।
उपाधियोगात्सम्प्राप्तः कर्तृत्वादिकमप्युत ॥ ३ ॥
क्रियाः करोति विविधा धर्माधर्मैकहेतवः ।
नाना योनीस्ततः प्राप्य सुखदुःखैश्च युज्यते ॥ ४ ॥
पुनस्तत्संस्कृतिवशान्नानाकर्मरतः सदा ।
नानादेहान्समाप्नोति सुखदुःखैश्च युज्यते ॥ ५ ॥
घटीयन्त्रवदेतस्य न विरामः कदापि हि ।
अज्ञानमेव मूलं स्यात्ततः कामः क्रियास्ततः ॥ ६ ॥
तस्मादज्ञाननाशाय यतेत नियतं नरः ।
एतद्धि जन्मसाफल्यं यदज्ञानस्य नाशनम् ॥ ७ ॥
पुरुषार्थसमाप्तिश्च जीवन्मुक्तदशापि च ।
अज्ञाननाशने शक्ता विद्यैव तु पटीयसी ॥ ८ ॥
न कर्म तज्जं नोपास्तिर्विरोधाभावतो गिरे ।
प्रत्युताशाज्ञाननाशे कर्मणा नैव भाव्यताम् ॥ ९ ॥
अनर्थदानि कर्माणि पुनः पुनरुशन्ति हि ।
ततो रागस्ततो दोषस्ततोऽनर्थो महान्भवेत् ॥ १० ॥
तस्मात्सर्वप्रयत्‍नेन ज्ञानं सम्पादयेन्नरः ।
कुर्वन्नेवेह कर्माणीत्यतः कर्माप्यवश्यकम् ॥ ११ ॥
ज्ञानादेव हि कैवल्यमतः स्यात्तत्समुच्चयः ।
सहायतां व्रजेत्कर्म ज्ञानस्य हितकारि च ॥ १२ ॥
इति केचिद्वदन्त्यत्र तद्विरोधान्न सम्भवेत् ।
ज्ञानाधृद्ग्रन्थिभेदः स्याद्‌धृद्ग्रन्थौ कर्मसम्भवः ॥ १३ ॥
यौगपद्यं न सम्भाव्यं विरोधात्तु ततस्तयोः ।
तमः प्रकाशयोर्यद्वद्यौगपद्यं न सम्भवि ॥ १४ ॥
तस्मात् सर्वाणि कर्माणि वैदिकानि महामते ।
चित्तशुद्ध्यन्तमेव स्युस्तानि कुर्यात्प्रयत्‍नतः ॥ १५ ॥
शमो दमस्तितिक्षा च वैराग्यं सत्त्वसम्भवः ।
तावत्पर्यन्तमेव स्युः कर्माणि न ततः परम् ॥ १६ ॥
तदन्ते चैव संन्यस्य संश्रयेद्‌ गुरुमात्मवान् ।
श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं च भक्त्या निर्व्याजया पुनः ॥ १७ ॥
वेदान्तश्रवणं कुर्यान्नित्यमेवमतन्द्रितः ।
तत्त्वमस्यादिवाक्यस्य नित्यमर्थं विचारयेत् ॥ १८ ॥
तत्त्वमस्यादि वाक्यं तु जीवब्रह्मैक्यबोधकम् ।
ऐक्ये ज्ञाते निर्भयस्तु मद्‌रूपो हि प्रजायते ॥ १९ ॥
पदार्थावगतिः पूर्वं वाक्यार्थावगतिस्ततः ।
तत्पदस्य च वाक्यार्थो गिरेऽहं परिकीर्तितः ॥ २० ॥
त्वं पदस्य च वाच्यार्थो जीव एव न संशयः ।
उभयोरैक्यमसिना पदेन प्रोच्यते बुधैः ॥ २१ ॥
वाच्यार्थयोर्विरुद्धत्वादैक्यं नैव घटेत ह ।
लक्षणातः प्रकर्तव्या तत्त्वमोः श्रुतिसंस्थयोः ॥ २२ ॥
चिन्मात्रं तु तयोर्लक्ष्यं तयोरैक्यस्य सम्भवः ।
तयोरैक्यं तथा ज्ञात्वा स्वाभेदेनाद्वयो भवेत् ॥ २३ ॥
देवदत्तः स एवायमितिवल्लक्षणा स्मृता ।
स्थूलादि देहरहितो ब्रह्म सम्पद्यते नरः ॥ २४ ॥
पञ्चीकृतमहाभूतसम्भूतः स्थूलदेहकः ।
भोगालयो जराव्याधिसंयुतः सर्वकर्मणाम् ॥ २५ ॥
मिथ्याभूतोऽयमाभाति स्फुटं मायामयत्वतः ।
सोऽयं स्थूल उपाधिः स्यादात्मनो मे नगेश्वर ॥ २६ ॥
ज्ञानकर्मेन्द्रिययुतं प्राणपञ्चकसंयुतम् ।
मनोबुद्धियुतं चैतत्सूक्ष्मं तत्कवयो विदुः ॥ २७ ॥
अपञ्चीकृतभूतोत्थं सूक्ष्मदेहोऽयमात्मनः ।
द्वितीयोऽयमुपाधिः स्यात्सुखादेरवबोधकः ॥ २८ ॥
अनाद्यनिर्वाच्यमिदमज्ञानं तु तृतीयकः ।
देहोऽयमात्मनो भाति कारणात्मा नगेश्वर ॥ २९ ॥
उपाधिविलये जाते केवलात्मावशिष्यते ।
देहत्रये पञ्चकोशा अन्तःस्थाः सन्ति सर्वदा ॥ ३० ॥
पञ्चकोशपरित्यागे ब्रह्मपुच्छं हि लभ्यते ।
नेतिनेतीत्यादिवाक्यैर्मम रूपं यदुच्यते ॥ ३१ ॥
न जायते म्रियते तत्कदाचि-
     न्नायं भूत्वा न बभूव कश्चित् ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो
     न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ ३२ ॥
हतं चेन्मन्यते हन्तुं हतश्चेन्मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ ३३ ॥
अणोरणीयान्महतो महीया-
     नात्मास्य जन्तोर्निहितो गुहायाम् ।
तमक्रतुः पश्यति वीतशोको
     धातुः प्रसादान्महिमानमस्य ॥ ३४ ॥
आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु ।
बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च ॥ ३५ ॥
इन्द्रियाणि हयानाहुर्विषयांस्तेषु गोचरान् ।
आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः ॥ ३६ ॥
यस्त्वविद्वान्भवति चामनस्कश्च सदाशुचिः ।
न तत्पदमवाप्नोति संसारं चाधिगच्छति ॥ ३७ ॥
यस्तु विज्ञानवान्भवति समनस्कः सदा शुचिः ।
स तु तत्पदमाप्नोति यस्माद्‌भूयो न जायते ॥ ३८ ॥
विज्ञानसारथिर्यस्तु मनः प्रग्रहवान्नरः ।
सोऽध्वनः पारमाप्नोति मदीयं यत्परं पदम् ॥ ३९ ॥
इत्थं श्रुत्या च मत्या च निश्चित्यात्मानमात्मना ।
भावयेन्मामात्मरूपां निदिध्यासनतोऽपि च ॥ ४० ॥
योगवृत्तेः पुरा स्वस्मिन्भावयेदक्षरत्रयम् ।
देवीप्रणवसञ्ज्ञस्य ध्यानार्थं मन्त्रवाच्ययोः ॥ ४१ ॥
हकारः स्थूलदेहः स्याद्‌रकारः सूक्ष्मदेहकः ।
ईकारः कारणात्मासौ ह्रीङ्कारोऽहं तुरीयकम् ॥ ४२ ॥
एवं समष्टिदेहेऽपि ज्ञात्वा बीजत्रयं क्रमात् ।
समष्टिव्यष्ट्योरेकत्वं भावयेन्मतिमान्नरः ॥ ४३ ॥
समाधिकालात्पूर्वं तु भावयित्वैवमादृतः ।
ततो ध्यायेन्निलीनाक्षो देवीं मां जगदीश्वरीम् ॥ ४४ ॥
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ।
निवृत्तविषयाकाङ्क्षो वीतदोषो विमत्सरः ॥ ४५ ॥
भक्त्या निर्व्याजया युक्तो गुहायां निःस्वने स्थले ।
हकारम् विश्वमात्मानं रकारे प्रविलापयेत् ॥ ४६ ॥
रकारं तैजसं देवमीकारे प्रविलापयेत् ।
ईकारं प्राज्ञमात्मानं ह्रीङ्कारे प्रविलापयेत् ॥ ४७ ॥
वाच्यवाचकताहीनं द्वैतभावविवर्जितम् ।
अखण्डं सच्चिदानन्दं भावयेत्तच्छिखान्तरे ॥ ४८ ॥
इति ध्यानेन मां राजन् साक्षात्कृत्य नरोत्तमः ।
मद्‌रूप एव भवति द्वयोरप्येकता यतः ॥ ४९ ॥
योगयुक्त्यानया दृष्ट्वा मामात्मानं परात्परम् ।
अज्ञानस्य सकार्यस्य तत्क्षणे नाशको भवेत् ॥ ५० ॥
इति श्रीदेवीभागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां संहितायां सप्तमस्कन्धे
देवीगीतायां ज्ञानस्य मोक्षहेतुत्ववर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः ॥ ३४ ॥


(देवीगीता ; अध्याय ३ रा) वैराग्यपूर्वक ज्ञान हेच मोक्षाचे खरे साधन !

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

देवी म्हणाली, "देवांनो, हे अद्‌भुत रूप तुम्हाला असह्य झाले म्हणून नकोसे वाटले. खरोखरच तुम्ही मंदभाग्य आहात. पण तुम्ही माझे भक्त आहात आणि भक्तांवरील माझे प्रेम शाश्‍वत आहे. म्हणूनच मी माझे विराट स्वरूप तुम्हा दाखविले. हे देवांनो, तुम्हाला आता खरेच सांगावयाचे म्हणजे प्रत्यक्ष वेदांचे अध्ययन करून अथवा योगाभ्यासात मग्न होऊन किंवा दान आणि तप करून वा यज्ञ करून, ह्या सर्व गोष्टी करूनही माझे हे रूप कोणासही मी दाखवीत नाही. कारण माझ्या कृपेवाचून हे माझे विराट स्वरूप कोणाच्याही दृष्टीस पडणे शक्य नाही."

असे देवांना उद्देशून देवीने सांगितले आणि नंतर पहिल्याप्रमाणे देवीने पुन्हा सर्व देवांना ब्रह्मोपदेश देण्याचे कार्य सुरू केले. देव ऐकू लागले.

देवी देवांना अनुलक्षून म्हणाली, "हे देवांनो, केवळ अनेक उपाधींच्या संबंधामुळे या सृष्टीत परमात्मा सर्व जीवापर्यंत येऊन पोहोचतो. तसेच त्या परमात्म्याच्या ठिकाणी जे कर्तृत्व इत्यादि गुण आढळतात तेही या उपाधींच्या संसर्गामुळेच. हा परमात्माच सर्व वेगवेगळ्या क्रियांना कारण होत असतो. धर्म-अधर्म या क्रिया त्याच्या उपाधीसंबंधामुळेच घडत असतात आणि म्हणून निरनिराळ्या योनींची प्राप्ती झाल्यावर तो सुखदुःखांनी युक्त होऊन राहतो.

तसेच त्या सुखदुःखाच्या कर्मसंस्कारामुळे तो निरनिराळ्या प्रकारच्या कर्मभावनांमध्ये पुन्हा पूर्णपणे आसक्त होऊन जातो. त्यायोगाने त्या एकाच परमात्म्याला अनेक देह धारण करावे लागतात आणि तो देहधारी होऊन पुन्हा सुखदुःखे इत्यादी भोग भोगत राहतो. जसे घटियंत्र नित्य चालूच असते, तसे या परमात्म्याच्या भ्रमणाची ही परंपरा खंडित न होता अथवा समाप्त न होता अखंड चालूच राहते. याचे कारण म्हणजे याच्या मुळाशी असलेले अज्ञान होय. या अज्ञानामुळे काम निर्माण होतो आणि या कामापासून अनेक क्रियाकर्मे निर्माण होत असतात. म्हणून पुरुषाने निश्‍चयपूर्वक अज्ञानाचा नाश करण्याचा नियमितपणे प्रयत्‍न करावा.

कारण अज्ञानाचा नाश करून योग्य दृष्टी प्राप्त करून घेण्यातच जन्मास आल्याचे साफल्य प्राप्त होते. त्यापासून चतुर्थ पुरुषार्थ प्राप्त होतात आणि ज्ञानी पुरुषाला जीवनमुक्तीची अवस्था प्राप्त होते. म्हणून सर्वमुक्त होण्यास व अज्ञानाचा नाश करण्यास फक्त विद्याच समर्थ आहे. म्हणून कष्ट करून विद्या प्राप्त करून घ्यावी.

हे पर्वता, अत्यंत निष्काम राहून कार्ये करणे व अत्यंत उत्तम उपासना करणे ही जरी अविद्येपासून उत्पन्न झाली असली तरी ह्याच गोष्टी चित्ताच्या शुद्धीस कारण होत असतात. म्हणून त्यांचा विद्येला विरोध नसतो आणि तिचा नाश करण्यास ते समर्थ होत नाहीत. तात्पर्य, कामाच्या अपेक्षेने कार्य करून अज्ञानाचा नाश होऊ शकेल अशी आशा करणे हे मूर्खपणाचे आहे. कारण सकाम कर्मे अनर्थ उत्पन्न करणारी असतात आणि प्राण्याला ती वारंवार आसक्त करीत असतात. त्याला भोग भोगण्याचा मोह व्हावा म्हणुन पुन्हाःपुन्हा त्याच्यापुढे येऊन ती उभी रहात असतात. त्यामुळे प्राण्याला सकाम कर्माविषयी प्रीती वाटू लागते. अखेर या कर्माच्या प्रीतीमुळे अनेक दोष उद्‌भवतात आणि त्यातून अत्यंत अनर्थ निर्माण होतात. अनर्थांची परंपरा सुरू होते.

म्हणून पुरुषाने काया, वाचा व मन यांच्या योगाने व दीर्घ प्रयत्‍नाने ते पूर्ण ज्ञानच प्राप्त करून घ्यावे.

"कुर्वन्नेवेह कर्माणि" या लोकी नित्याचे कार्म करीतच जिवंत रहाण्याची इच्छा करावी असे श्रुतींनी सांगितले असल्यामुळे कर्म आणि "ज्ञानादेवही कैवल्यं" ज्ञान प्राप्त झाल्यावरच कैवल्य प्राप्ती होत असते असेही श्रुति सांगत असल्यामुळे ज्ञान हे अत्यंत आवश्यकच आहे. यावरून ज्ञान व निष्काम मनाने केलेले कर्म यांच्या योगानेच अज्ञान तिमिर नाहीसा होतो. कारण निष्काम कर्म हे ज्ञानासाठी सहाय्य करणारे व हित करणारे असे आहे.

यावर कोणा समुच्चयवाद्यांचे असे एक मत प्रसिद्ध आहे की कर्म व ज्ञान दोन्हींच्या संयोगामुळेच मोक्षप्राप्ती होते. परंतु या समुच्चयवाद्यांचे हे म्हणणे खरे नाही. कारण ज्ञान व कर्म यांचा विरोध असल्यामुळे दोघांचा संयोग होणे शक्य नाही. त्यामुळे त्यांचे म्हणणे हे असंभवनीयच आहे. ज्ञानप्राप्तीमुळे साहजिकच हृदयग्रंथीचा भेद होतो. पण हृदयग्रंथी असतील तरच सकाम कर्मे संभवतात, अन्यथा नाही. म्हणून या दोघांच्याही स्वरूपात मूलभूत विरोध असल्याकारणाने ज्याप्रमाणे तम व प्रकाश हे एकाच काळी अनुभवास येणे अशक्य आहे व त्याचप्रमाणे ज्ञान व सकाम कर्म ही एकाच ठिकाणी असणे केव्हाही संभवनीय नाही.

हे महाबुद्धिमान पर्वतश्रेष्ठा, सर्व वैदिक कर्मे ही फक्त चित्तशुद्धीपुरतीच उपयोगी आहेत. म्हणून चित्तशुद्धीसाठी त्यांची प्रयत्‍नपूर्वक अनुष्ठाने करावीत. अंतःकरणाचा निग्रह (शम); तसेच श्रोत्र वगैरे जी बाह्य इंद्रिये आहेत त्यांचा निग्रह (दम); शीत व उष्ण याविषयी सारखेच सहिष्णुत्व (तितिक्षा); ऐहिक आणि पारलौकिक विषयांबद्दल अनासक्ती (वैराग्य) आणि अंतःकरणात वास करीत असलेली सत्त्वगुणाची शुद्धि (सत्त्वसंभव) ह्या सर्वांची सिद्धी होईपर्यंत ही कर्मे करावीत. त्यानंतर ही कर्मे करू नयेत.

शम, दम, तितिक्षा, वैराग्य व सत्त्वसंभव यांची सिद्धी झाल्यानंतर ज्यांचे अंतःकरण स्वाधीन झालेले असेल त्या पुरुषाने सर्व कर्मांचा त्याग करून म्हणजे कर्मसंन्यास करून श्रोत्रीय व ब्रह्मनिष्ठ अशा सद्‌गुरुचा आश्रय करून त्याची निष्कपटपणे भक्ती करावी आणि आळस वगैरे दोष काढून टाकून नित्य वेदांतश्रवण करीत काल कंठावा आणि "तत्त्वमसि" म्हणजे "तू तेच आहेस" ह्यासारख्या इतर अनेक उपनिषदातील उक्तींचा अर्थ समजून घेऊन त्यांच्या अर्थाचाच नित्य विचार करावा.

कारण "तत्त्वमसि" या वाक्याप्रमाणे असणारी अनेक उपनिषदातील वाक्ये जीव व ब्रह्म यांचे जे ऐक्य आहे त्याचे ज्ञान प्राप्त करून देतात. जीव व ब्रह्म यांच्या ऐक्याचा बोध झाल्यावर प्राणी निर्भय होतो आणि अखेर तो माझ्याच रूपाप्रत येऊन पोहोचतो. पदांच्या अर्थाचे अशाप्रकारे ज्ञान झाले असता वाक्यांच्या अर्थाचेही ज्ञान प्राप्त होत असते असा आजपर्यंतचा अनुभव आहे.

म्हणून हे पर्वतराज, मी प्रथम "तत्त्वमसि" या पदाचा अर्थ सांगत आहे. "तत्" या पदाचा वाक्यार्थ "मी" (देवी) आहे असे पंडितांनी सांगितले आहे. नंतर पुढच्या "त्वं" या पदाचा वाक्यार्थ "जीवच" आहे याचा संशय नाही. या उभय पदांचे ऐक्य ज्ञानी जन "असि" या पदाने दर्शवितात.

तत् आणि त्वं यांच्या वाक्यार्थात विरोध आहे. हे खरे म्हणून त्या विरोधामुळे त्याचे ऐक्य निश्‍चित असंभवनीय आहे. म्हणून श्रुतींमध्ये असलेल्या या "तत्" आणि "त्वं" या पदांची लक्षणा करावी. चित्त-मात्र स्वरूप हे या दोन्हीचेही लक्ष्य आहे. त्यामुळे वर उभयतांचे ऐक्य संभवनीय ठरते.

अशाप्रकारे या उभयतांचे ऐक्य समजून घेऊन आत्म्याशी अभिन्न व अद्वय व्हावे. "तोच हा देवदत्त" या वाक्यातील लक्षणेस अनुसरूनही "जहदजहत्" अशी लक्षणा आहे असे यात सांगितले आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे या अनुभवाच्या ज्ञान मार्गाने स्थूल वगैरे देहापेक्षा व्यतिरिक्त असा झालेला पुरुष ब्रह्मच होत असतो.

हा क्षुद्र देहच मुळी पंचीकृत महाभूतांपासून निर्माण झालेला आहे. हा देहच सर्व भोगांचे आश्रयस्थान आहे. म्हणूनच तो जरा, व्याधि इत्यादि सर्व कर्मांनी युक्त आहे. हा देह मायामय आहे म्हणून हा मिथ्या असून विनाशी व क्षणिक आहे असे यावरून स्पष्ट लक्षात येते.

हे नगेश्‍वरा, तो देह हा माझ्या आत्मरूप असलेल्या चित् शक्तीचा स्थूल उपाधि आहे. तो सर्व ज्ञानेंद्रिये, सर्व कर्मेंद्रिये आणि पाचही प्रकारचे प्राण यांनी युक्त आहे. त्याचप्रमाणे मन व बुद्धी यांनी तो परिपूर्ण आहे. असे सूक्ष्म पण संपूर्ण शरीर आहे असे सूक्ष्मदर्शी विद्वज्जनांचे म्हणणे आहे.

हे पर्वतश्रेष्ठा, आत्म्यांचा हा सूक्ष्मदेह अपंचीकृत भूतांपासून उत्पन्न झालेला आहे. हा सूक्ष्मदेह सुखदुःखाची जाणीव ठेवतो म्हणून तो आत्म्याची आणखी एक उपाधी आहे. अनादि आणि अनिर्वाच्य असे जे अज्ञान आहे, ते अज्ञानच आत्म्याचा कारणरूप असा तिसरा देह आहे असे सर्वांस वाटते. पण प्रत्यक्षात उपाधींचा नाश झाल्यावरही केवळ आत्मा हा मागे शिल्लकच राहतो.

या तीन देहांत, अंतर्भागात गुप्त होऊन रहाणारे किंवा अंतर्भूत होणारे असे अन्नमय इत्यादि पाच कोश आहेत. या पाचही कोशांचा परित्याग केल्यावर श्रुति "नेति नेति" इत्यादि वाक्यांनी माझ्या स्वरूपाचे वर्णन करतात, तेच सर्वांस आधारभूत असलेले असे एकमेव ब्रह्म होय.

हे स्वरूप कधीच उत्पन्न होत नसते, तसेच ते नाशही पावत नसते. त्याचप्रमाणे हा आत्मा निर्माण होऊन पुन्हा नाहीसा होतो असे नाही. कारण हा आत्मा अज, न जन्मणारा असल्याकारणाने सर्वदा निर्विकार व शाश्‍वत असून त्रिकालाबाधित आहे. तो पुरातन असला तरी नित्य नूतन आहे. शिवाय शरीर नष्ट झाले तरी हा आत्मा कधीही नाश पावत नाही.

देहाचे ठिकाणी आत्मदृष्टी ठेवणारा हन्ता म्हणजे हननक्रियेचा कर्ता या आत्म्याला म्हणजे दुसर्‍या देहाभिमान्याला, "मी मारीन" असे म्हणेल तर तो दुसराही जर "मी मेलो" असे समजेल तर ते उभयता माझे आत्मरूप न जाणणारे असून अज्ञजन आहेत. असेच म्हणावे लागेल. कारण हा आत्मा कधीही मरणे शक्य नाही आणि त्याला कोणीही मारीत नाही.

हा आत्मा अत्यंत सूक्ष्माहूनही अति सूक्ष्म आहे व विशालाहूनही अति विशाल आहे. तो प्राण्यांच्या हृदयात आत्मरूपाने वास्तव्य करीत असतो. निःस्पृह पुरुषाची इंद्रिये प्रसन्न झालेली असल्यामुळे तोच त्याचा मोठेपणा पहात असतो आणि म्हणूनच तो शोकरहित होतो.

शरीर हा एक रथ असून हा जो आत्मा आहे हा त्याचा रथी आहे. बुद्धी त्याचे सारथ्य करीत असते व त्यासाठी मनरूपी लगामांचा ती वापर करते. कर्मेंद्रिये हे त्या शरीर रथाचे अश्‍व असून सर्व विषय हे त्याचे मार्ग आहेत असे निश्‍चित समजावे. तस्मात् विवेकी जन ह्या शरीर, इंद्रिये व मन यांनी युक्त असलेल्या आत्म्याला भोक्ता या नावाने संबोधतात.

पण जो अविवेकी आहे, ज्याचे मन स्वाधीन नाही व जो नेहमी अपवित्रच असतो त्याला मोक्ष कधीच मिळत नाही आणि अखेर तो नेहमी संसारातच गुंतून राहिलेला असतो.

परंतु विवेकी पुरुषाचे मन मात्र त्याच्या स्वाधीन झालेले असते. तो सर्वदा पवित्र असतो. त्यालाच ते परममोक्ष स्थान प्राप्त होते व त्यानंतर पुन्हा कधीही त्याला योनीमध्ये जन्म घ्यावा लागत नाही. विवेकबुद्धी हाच ज्याच्या शरीररथाचा सारथी आहे व मन हा ज्याचा लगाम आहे तो या संसार चक्रातून मुक्त होत असतो. तेथेच माझे परमपद त्याला प्राप्त होते.

म्हणून श्रवण आणि मनन यांच्या सहाय्याने आत्म्याचा निश्‍चय करून एकाग्र चित्ताने अंतःकरणात नेहमी माझ्याच आत्मस्वरूपाचे चिंतन करीत रहावे.

श्रवण, मनन आणि निदिध्यासन यांच्या योगाने चित्ताला समाधी अवस्थेची योग्यता प्राप्त होते. त्यामुळे समाधीपूर्वी मंत्रवाच्य असे जे माझे समष्टि व व्यष्टि रूप आहे, त्याचे ध्यान करण्यासाठी स्वशरीरात मायाबीज मंत्राच्या तीन अक्षरांची भावना करावी. हाकार हा स्थूल देह, रकार हा सूक्ष्म देह व ईकार हाच कारणदेह आहे. ईकार हे महाकारण आहे. अशाप्रकारे मीच र्‍हींकार रूपाने तुरीयपदवाच्य आहे असे नित्य समजावे.

त्याचप्रमाणे समष्टि देहातही अनुक्रमाप्रमाणे तीन अक्षरांची भावना स्थिर करावी. मतिमान पुरुषाने व्यष्टि व समष्टि यामध्ये मन निश्‍चिंत करावे.

तात्पर्य, समाधीकालापूर्वी अशाप्रकारे आदरपूर्वक तीन अक्षरांची भावना करून नंतर स्वनेत्र मिटून घ्यावेत आणि माझे म्हणजे जगदीश्‍वरी देवीचे निदिध्यासन करावे.

नासिकेच्या आतील भागात व्यवहार सुलभतेने करणारे जे प्राण व अपान वायु असतात त्यांना सम म्हणजे प्राणायामाच्या योगाने हृदयात स्थिर करावे. विषयांविषयीची जी आकांक्षा आहे तिचा त्याग करावा. सर्व दोष त्यजावेत. कोणाचाही मत्सर करू नये आणि अशा निष्क्रिय वृत्तीने युक्त झाल्यावर जेथे कोणाचाही शब्द ऐकू येणार नाही अशा निर्जन गुहेत ध्यानस्थ बसावे, आणि त्यानंतर जो विश्‍वात्मा हकार, त्याला रकारामध्ये लीन करावे. तैजस नावाच्या प्रकाशरूप रकाराला ईकारात लीन करावे. नंतर प्राज्ञ म्हणून ओळखता जाणारा जो ईकाररूप आत्मा आहे, त्याला ईकारात लीन करावे आणि ह्या सर्व अवस्थातून पार पडल्यावर वाच्यवाचकताहीन, द्वैतभाव शून्य, अखंड व सच्चिदानंद असे जे माझे स्वरूप आहे त्याचे चिंतन करावे.

हे शैलराजा, अशाप्रकारे ध्यान करणार्‍याला साक्षात्कार सिद्धी पूर्णपणे प्राप्त होते व तो पुरुष माझा साक्षात्कार झाल्याने धन्य होऊन आमचे दोघांचेही एकचित्त झाल्यामुळे तो माझ्याच रूपात विलीन होतो. या योगमार्गाच्या युक्तीचा उपयोग करून माझ्या परात्पर आत्म्याचा त्याला साक्षात्कार झाल्यावर ह्या कार्यरूपी संसाराला कारण म्हणून असलेल्या अज्ञानाचा त्याचे ठिकाणाहून मुळासह नाश होतो.



अध्याय चौतिसावा समाप्त

GO TOP